या मदिरालयात सगळेच धुंद
जाळुनी स्वत:स दिवे जाहले मंद
पसरला सर्वत्र अस्पृश्य गंध
रिचवुनी चषक, उरले रक्तांध !!
किती बुडवावे क्लेष चषकात?
मद्याने मेंदू बधीर कळ हृदयात
जमतात इथे दुख: विसरण्या उद्याचे
कोणी काही म्हणा, साम्राज्य आहे मद्याचे !!
खर्चुनी पदर, स्वत:स विकतात
हाय! पिळविटणा-या संगीतात रिझतात
स्वत:ला फ़सवुनी, प्रतारणा करतील
अम्रुताही लाजवेल हे विष, पिऊनी मरतील !!
काजव्याची हि लढाई, करतील प्रकाशाशी
स्वत:स पेटवुनी, ठेवतील कोळश्याच्या राशी
ह्यांचे दु:ख कुणा का ऊमगेना ?
ह्या मद्यमेळ्यात का मी उभा मज समजेना...............!!
विजयकुमार.........
प्रतिक्रिया
24 Dec 2015 - 2:08 pm | निनाव
Vijay ji, ek dam sundar abhivyakti.
Vishay uttamach!
24 Dec 2015 - 3:09 pm | सोत्रि
मला मान्य आहे की मला पद्यातलं काही कळत नाही, गती नाही!
पण हे काय आहे???
पसरला सर्वत्र अस्पृश्य गंध
खर्चुनी पदर, स्वत:स विकतात
- (हसून लोळागोळा झालेला मद्याचार्य) सोकाजी :)
28 Dec 2015 - 12:58 pm | पालीचा खंडोबा १
खरे तर अश्या उटपटांग टीकेला उत्तर द्यायचे नाही असे ठरवले होते पण काही महाभाग म्हणजे हा सोत्री. तुम्ही खरे म्हणालात तुम्हाला कविता कळत नाहीच परंतु मराठी शब्दां बाबतीत आपले ज्ञान इतके तुटपुंजे आहे कि कीव करावीशी वाटते. हसून मी लोळागोळा झालो कारण आपले मराठी अगाध आहे.
आहो मराठीत पदरमोड पदरचा खर्च असे शब्द आहेत. हि कविता आहे महानुभाव इथे शब्द जपून बसवावे लागतात त्याअर्थी " पदर" आहे पदर खर्च करणे.
आणि अस्पृश्य गंध हा हि त्यातलाच प्रकार आहे मद्यालयात इतक्या गंधांची सरमिसळ झालेली असते कि त्यास हाच शब्द लागू पडतो . स्वीकारू शकत नाही असा त्याचा अर्थ "अस्पृश्य गंध "
एक विनंती जर आपणास कविता आणि कवितेतले ओ कि ठो कळत नाही तर तिच्या वाटेस जावून आपले हसे करून घेवू नका महाशय.
धन्य ते तुमचे अगाध ज्ञान . तुमची कीव करून कुर्निसात करतो . आता कृपा करून कुर्निसात शब्दावरून हसू नका आणि अर्थही विचारू नका .
आता हसा आणि जमलेच तर मरठी शिका किंवा आपली मनोविकृती सुधारण्यासाठी एखाद्या तज्ञा स गाठा चला उठा पळा
28 Dec 2015 - 9:04 pm | सोत्रि
बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले !
:) :) :) :) :) :)
स्वीकारू शकत नाही असा तो - अस्पृश्य???
वारलो, खपलो....
:) :) :) :) :) :)
- (काही महाभाग असलेला) सोकाजी ;)
28 Dec 2015 - 9:48 pm | कविता१९७८
छानय