परम मित्रवर्य सुशील,
सर्वप्रथम आम्ही आमच्या अतिशय छोट्या अशा आंतरजालीय पत्राबद्दल बद्दल तुमची माफी मागतो. परंतु तुम्हास लिहिते करण्याचा आम्हासमोर हा एक उत्तम पर्याय होता. (आणि तसंच झालं. तुम्ही एकदम स्फोटक अस प्रती उत्तर दिलंत.)
तुमची आमच्याबद्दलची तक्रार एकदम रास्त आहे . आम्ही याहूवर सचेत दिसत असताना तुम्हास कधी प्रती उत्तर केलं नाही. परंतु बरेच वेळा आम्ही आमचा याहू सचेत सोडून आम्ही घरी निघून जायचो. नाही म्हणायला तुमचे अचेत संदेश आम्हाला दिसायचे. परंतु काही तांत्रीक कारणास्तव आम्हाला आपणास उत्तर देणे जमायचे नाही.
असो . आमचे सर्व क्षेम कुशल आहे.
आम्ही सध्याच्या आस्थापनेत व्यवस्थित स्थिरावलो असून सारं काही उत्तम चालले आहे. आम्ही पुणे नगरामध्ये गृह खरेदी केले आहे आणि लवकरच आमची नेमणूक आस्थापनेच्या पुणे कार्यालयात करून घेण्याच्या विचारात आहोत.
आपली अचानक आठवण येण्यास कारण की, पुढच्या शनिवारी आम्ही एक वर्षासाठी आमच्या आस्थापनेच्या ग्राहकाकडे कामगिरिनिमित्त अमेरिका देशी जात आहोत.
आमचं सदर अमेरिका देशी जाणं आमच्या दृष्टीने एक कर्तुत्वाचि गोष्ट आहे. आणि आम्हास या ध्येयापर्यंत पोहोचवण्यात ज्यानी हातभार लावला त्यामध्ये आपणही आहात. आम्हास आजूनही आठवतं, आपण आमचे पदव्युत्तर शिक्षणाचे सहाध्याई असताना शिक्षण शुल्क भरण्यास मदत केली होती. आणि त्यामुळेच आम्हास आमची पूर्वीची चाकरी मिळाली आणि तिथुनच आमच्या उत्करषास सुरूवात झाली. आपले आम्हावर उपकार आहेत अस बोलणं हे आपल्या सद्भावनांचा अपमान ठरेल आणि ते आमच्याकडून कदापि होणार नाही.
सांगणं एव्हधच आहे की, आपला मायेचा हात असाच आमच्या पाठीशी राहावा.
आपले क्षेम कुशल जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.
कळावे,
लोभ असावा.
प्रतिक्रिया
12 Feb 2008 - 11:34 am | विसोबा खेचर
छान आहे पत्र..!
सुशीलरावांनी वाचलं की नाही कुणास ठाऊक! :)
गावडेसाहेब, आपल्याला अमेरिकेच्या वारीकरता आमच्या शुभेच्छा! प्रस्थान केव्हा?
तात्या.
18 Dec 2015 - 7:12 pm | प्रसाद गोडबोले
आदरणीय गावडे सर ,
असे अंतर्जालीय ओपन पत्र लिहिण्याची कल्पना आम्हास अत्यंत आवडली . आपली हरकत नसल्यास इथे प्रतिसादात काही छोटेखानी पत्रे लिहु इच्छितो .
कळावे
लोभ असावा.
18 Dec 2015 - 8:56 pm | सतिश गावडे
जरुर लिहा. :)
18 Dec 2015 - 7:19 pm | प्रचेतस
अरेच्चा...!!!!
गावडे सरांनी लिहिलेले हे पत्र वाचलेच नव्हते.
18 Dec 2015 - 8:59 pm | सतिश गावडे
या आमच्या मिपा-बाललीला आहेत प्रचेतसजी. बघता बघता आम्ही मिपा-आठ वर्षांचे झालो.
18 Dec 2015 - 10:08 pm | प्रसाद गोडबोले
आठ वर्षे म्हणजे यत्ता दुशली झाली की हो शल !!
=))))
18 Dec 2015 - 10:47 pm | अत्रुप्त आत्मा
19 Dec 2015 - 10:22 am | नाखु
सध्या ते वर्तणुकीतून आणि प्रतिसादातून प्राध्यापक्/मार्गदर्शक असे दिसत आहेत असे आमचा अजिबात "अगलतगल" नसलेला वार्ताहर कळवितो. तथापी त्यांनी स्वतःला जालीय विचारवंत /उपदेशक/सुधारक होण्यापासून शिताफीने वाचविले आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे जाहीर कौतुकही करीत आहोत.
जाता जाता बाळ्लीला हे पुस्तक स्वरूपात उपलब्ध आहे काय ? असल्यास जगप्रसिद्ध काव्य संग्रहाबरोबर एक प्रत घेऊ.
18 Dec 2015 - 9:16 pm | जेपी
अवधुत गुप्ते आठवुन गेला..
पत्रास कारण की..
बोलयची हिंमत नाही..
18 Dec 2015 - 9:29 pm | सस्नेह
=))
18 Dec 2015 - 9:21 pm | अद्द्या
हम्म :)
18 Dec 2015 - 11:29 pm | आनंद कांबीकर
+11
18 Dec 2015 - 11:41 pm | किसन शिंदे
हे आधी पाह्यलंच नव्हतं. आणि वाचताना मध्येच 'अजून स्टॅम्पिंग नाही झालं व्हिजावर आणि हा लग्गेच अमेरिकेला निघालाही न सांगता....दुत्त दुत्त कुठ्चा' असा विचार मनार तरळून गेला. मग परत वर तारीख पाह्यल्यावर हायसं वाटलं.
असंच पत्र आम्हीही गावडे सरांना लिहू इच्छितो.
19 Dec 2015 - 12:37 am | श्रीरंग_जोशी
धन्या - पत्र एकदम भावले.
या निमित्ताने दूरदर्शनवर २२ वर्षांपूर्वी पाहिलेली एक मालिका आठवली ज्यात २० वर्षांपूर्वीची पत्रे पोचल्याने होणारे गोंधळ दाखवले होते.
18 May 2019 - 5:30 am | कंजूस
मजेदारच.
--------
या आणि अशाच लेखांतून मला नेहमी वाटतं की हे लेखक अम्हाला शाळेत मराठीचे शिक्षक असते तर किती बरं झालं असतं!
चारही भाषांतले १५ गुणांचे निबंध/पत्र लिहा प्रश्न सोडून दिलेले आहेत. वेळ पुरला नसावा असा बेनफिट ओफ डाउट विचारांत नसलेली शैली लपवण्यात यशस्वी झालो.