- 1 -
आलास समोर | चढले खूळ |
नजरेत अतर्क्य | विखार दाटलेले |
तुटले टाके | उसवले बंध |
विलग होवुनी | वस्त्र फडफडले |
मनात गाणी | दाटती सूर |
रक्तबंबाळ बोटे | विखुरल्या तारा |
राणीचे उसासे | रखेलीचा टाहो |
निपुत्रिक राजा | चढे सरणावरी |
बाटला देह | विटाळ घेवुनी |
धर्माची स्थापना | कुणी करावी ?
विजयकुमार.........
०७ . ०२ . २०१०, मुंबई
- २ -
भरल्या स्तनात | दुधाच्या गाठी |
मृत गर्भाचे | काळे ओठ |
भुकेल्या देहात | गर्भाची पेरणी |
ठिणग्या उडवती | विझल्या चुली |
ओल्या शरीरास | गर्भाची शिक्षा |
कुलवंतीनीचा जार | चांडाळ ठरला |
सुटता हात | तीन्हीसांजी धूळ |
उष्ण शरीरास | संध्या जाळी |
हुंगून वासनेस | फुल जळाले |
उजवीत माड्या | पुरुष परागंदा |
विजयकुमार.........
०७.०२.२०१०, मुंबई
-३-
डोहाचे फुगवटे | संथ नदीत |
अतृप्त आत्मे | पाण्यात तरंगती |
प्राशुनी वारुणी | नजरचोरटे भय |
पडक्या वाड्यात | भुते चेकाळाती |
बाभळीची फुले | झुलती काटे |
पाशवी वासना | अंगभर दाटलेली |
मायेच्या संगास | गर्भाची आण |
उसळले तारुण्य | बाप देशोधडी |
लावता कवाड | अंधारव्यापी पणती |
फाटक्या चिरंगुटात | स्वप्ने गळालेली |
विजयकुमार.........
०७.०२.२०१०, मुंबई
-४-
खोंडाच्या जत्रेत | एकाकी गाय |
फोडती हंबरडे | पान्हा सुटलेले |
पेटत्या वणव्यात | भिजते जंगल |
मनाविरुध्द घडला | असंगाशी संग |
टाळता नजर | उठतो विखार |
फिरती रानोमाळ | विषग्रंथीविना सर्प |
वाटतात सारे | कैफभिजले काटे |
बृहन्नडेच्या पायी | घुंगरू रुतलेले |
ब्रह्मचार्याच्या शपथेने | बांधलेले शरीर |
फोडती हंबरडा | संभोगाचे कैवारी |
विजयकुमार.........
०७ . ०२ . २०१०, मुंबई
-५-
केसाळ नागाचा | मणी विझला |
सुहासिन सांगते | बिळे लिपा |
घोडेस्वार राजा | आडावारती ओलेत्या |
पौगंडावस्थेतील पोरांच्या | संभोग कथा |
पांघरूणातील उसासे | निजभरली पहाट |
ओलेत्या अंगाचा | खडखडतो रहाट |
ऋतू पाळून | श्रावण मोहरतो |
उध्वस्थ घराचा | कोसळतो मांडव |
मागू नये कुणी | बाळांतीणीचे वस्त्रे |
मोहात अडकले | कारुण्य पुरुषाचे |
विजयकुमार.........
०७. ०२. २०१०, मुंबई
प्रतिक्रिया
4 Dec 2015 - 11:14 am | अभ्या..
हायला.
सुरु पण झाला का कोनाडा?
न मागता मेंबरशिप पण मिळाली आम्हाला.
कचकून निशेध प्रा. डॉ. सरांचा.
4 Dec 2015 - 11:18 am | पालीचा खंडोबा १
आभ्या काय झाले हे ह्या पामरास कळेल का ?
4 Dec 2015 - 12:14 pm | सस्नेह
कोनाडा नव्हे, तळघर आहे... !
4 Dec 2015 - 12:43 pm | दमामि
"निशेध" होय? म्या काय भलतंच वाचलं!
4 Dec 2015 - 11:26 am | पालीचा खंडोबा १
निषेध काय कोनाडा काय तळघर काय ? आकलनाच्या पलीकडले त्या पेक्षा माझ्या कविता परवडल्या
4 Dec 2015 - 11:39 am | आदूबाळ
कळल्यासारखं वाटतं आहे. आणि आवडलंही आहे.
सविस्तर रसग्रहण केलंत तर आभारी असेन.
4 Dec 2015 - 12:07 pm | पालीचा खंडोबा १
ह्यातून काय अभिप्रेत आहे ते कळू दे मग मी सविस्तर विवेचन करीन
4 Dec 2015 - 12:54 pm | दमामि
आदूबाळशी सहमत.
तुमच्या सर्वच कविता अतिशय प्रतिभाशाली आहेत, त्यातील रुपके अतर्क्य आणि विलक्षण लक्षवेधी आहेत, पण प्रत्येक वेळी आपल्याला संपूर्ण समजले का अशी शंका येते. प्रत्येक वाचकाला वेगळा अर्थ लागू शकतो पण प्रत्यक्ष कवीला काय म्हणायचे आहे याबद्दल उत्सुकता असते .
4 Dec 2015 - 12:57 pm | पालीचा खंडोबा १
मित्रानो जे तुम्ह्स उमगले ते सांगा मग मी आहेच ना इथे
4 Dec 2015 - 4:59 pm | आदूबाळ
खवचटपणा करत नव्हतो. गैरसमज नसावा.
दमामिप्रमाणेच मलाही वाटतं. आणि हे तुमच्याच बाबतीत असं नाही, पण सगळ्याच कवितांच्या बाबतीत कमीअधिक प्रमाणात वाटतं.
ऐसपैस कथा-कादंबरी असली की कसं, लेखकाला त्यातून काय सांगायचं आहे हे समजायला मला वाचक म्हणून अवसर मिळतो. पण कवितेचं तसं नसतं. एक ललित-कृती-योग्य भावना असते, आणि कविता हे त्याचं फक्त पाण्याबाहेर दिसणारं टोक. ती आख्खी भावना बर्याचदा हिमखंडासारखी आतच राहते. मला तरी ती पटकन समजतेच असं नाही.
स्टॅटिस्टिक्सच्या भाषेत बोलायचं तर कवितेच्या बाबतीत टाईप १ एरर आणि टाईप २ एरर दोन्हींची शक्यता आहे. उदा० "चाफा बोलेना"ला गहन अध्यात्मिक अर्थ आहे हे मला नुकतंच समजलं. इतके दिवस मला ते निसर्गगीत वाटत होतं. ;) (हा टाईप २ एरर - failing to assert what is present). याउलट कशावरून तरी डोकं सनकलं म्हणून मी एकाला "गोली मार भेजे में" ही सद्गुरूची आवश्यकता सांगणारी कविता आहे हे अर्थासह पटवून दिलं. (टाईप १ एरर - asserting something that is absent).
त्यामुळे जी कविता आवडते पण समजली असं वाटत नाही तिथे मी हे न लाजता विचारतो. परत - गैरसमज करून घेऊ नये.
4 Dec 2015 - 5:41 pm | चांदणे संदीप
सर, मला पण सांगणार का? आवडेल तुमच्याकडून ऐकायला!
Sandy
4 Dec 2015 - 6:25 pm | आदूबाळ
गोली मार भेजे में...
इथे "भेजा" हे अज्ञानाचं, विषयांचं प्रतीक आहे, आणि "गोली" हे सद्गुरूचं प्रतीक आहे.
.. के भेजा शोर करता है
म्हणजे अज्ञानाच्या गलबल्यामुळे परमतत्त्वाचा आवाज मानवाला ऐकू येत नाही. विषयवासनेच्या पुटांमधून झळझळीत असं परमतत्त्व झाकोळलं गेलं आहे.
.. भेजे की सुनेगा तो मरेगा कल्लू... मामा
म्हणजे विषयलोलुपतेच्या मागे लागून कल्लू (म्हणजे माणूस) तात्पुरता मरेल, पण...
.. तू करेगा दूसरा भरेगा कल्लू... मामा
त्याला मोक्ष मिळणार नाही. दूसरा (म्हणजे दुसरं शरीर) गतजन्मातली पापं धूत बसेल. चक्र चालू राहील.
----
असं आणखीही होतं. पण मुद्दा असा आहे की "बसलं" की काहीही अर्थ निघू शकतात.
4 Dec 2015 - 7:01 pm | माहितगार
रोचक ! :)
4 Dec 2015 - 7:45 pm | विवेक ठाकूर
"बसलं" की काहीही अर्थ निघू शकतात.
हे मात्र नक्की!
4 Dec 2015 - 7:58 pm | चांदणे संदीप
____/\____ घ्या सर!
याच्याशी नम्रपणे सहमत!
Sandy
4 Dec 2015 - 8:06 pm | अद्द्या
मुद्दा असा आहे की "बसलं" की काहीही अर्थ निघू शकतात
__/\__
4 Dec 2015 - 5:44 pm | बॅटमॅन
हाण्ण तेजायला. एरर १-२ तर एकच नंबर._/\_
-( व्हाईट नॉईज़ ) बॅटमॅन.
4 Dec 2015 - 5:58 pm | एस
+१
4 Dec 2015 - 7:02 pm | माहितगार
+१
4 Dec 2015 - 11:45 am | अत्रुप्त आत्मा
खंडूराया , चिडू नगस..चांगलि लिवलसा कविता.
4 Dec 2015 - 12:17 pm | एस
कविता आवडल्या!
4 Dec 2015 - 12:24 pm | बॅटमॅन
कविता छानच आहे.
4 Dec 2015 - 1:04 pm | पालीचा खंडोबा १
सध्या भाषेत संभोग म्हणजे संपूर्ण समाधान परंतु हे समाधान नेहमीच सम्पूर्ण असेल असे नाही. इथे संभोग ह्या शब्दाचा अर्थ व्यक्क्तीश: घेवू नये. हे जगण्यातले अपुरेपण आहे. उदाहरणार्थ
लावता कवाड | अंधारव्यापी पणती |
फाटक्या चिरंगुटात | स्वप्ने गळालेली |
मन मारले तरी धग रहातेच. असह्य कोंडमारा करा. शेवटी पराजय निश्चित
ब्रह्मचार्याच्या शपथेने | बांधलेले शरीर |
फोडती हंबरडा | संभोगाचे कैवारी |
मिळाले गमावले सारे व्यर्थ. कुठे तरी विण उसावतेच. सारे असह्य
मागू नये कुणी | बाळांतीणीचे वस्त्रे |
मोहात अडकले | कारुण्य पुरुषाचे |
स्त्रीत्व पुरुषत्व एका नाण्याच्या दोन बाजू. दोघांचीही दुखे समान कोणी करुनेस प्राप्त होतो तर कोणी विटम्बनेस
4 Dec 2015 - 1:14 pm | दमामि
संभोग याचा अर्थ समभोग असाही असावा का? आनंद, दु:ख, वेदना ,तृप्ती दोघांनी अनुभवायचे. आणि जेव्हा हा दुसऱ्याचा विचार केला जातो तेव्हाच तो पूर्ण होतो, अपुरेपणा किंवा पराजयाची भावना डोकावत नाही.
एक विचार!
4 Dec 2015 - 1:21 pm | पालीचा खंडोबा १
तुम्ही तुम्हास पाहिजे तसा अर्थ काढू शकता परंतु काही लोकांनी मला विवेचनास भाग पडले तेव्हा त्यातील मतितार्थ उलगडला. जे कवी ला अभिप्रेत आहे ते इथे अभिप्रेतीत झाले आहे
4 Dec 2015 - 1:27 pm | pacificready
अभि अभि प्रेतीत हुआ है लगता है!
मायमराठीत असा शब्द आहे?
4 Dec 2015 - 1:34 pm | यशोधरा
सुरेख आहेत कविता. शब्द फार सणसणीत वापरता आणि अचूक.
4 Dec 2015 - 1:37 pm | निनाव
Khoopach bhaavnatmak ANik vichaaratmak kaavya.
4 Dec 2015 - 2:05 pm | जव्हेरगंज
4 Dec 2015 - 2:12 pm | संदीप डांगे
+१०००००,
4 Dec 2015 - 3:03 pm | चांदणे संदीप
सगळ्यांनाच उभ केलं की राव तुम्ही!!
\o/ \o/ \o/
4 Dec 2015 - 2:10 pm | खटपट्या
खूप छान आहेत कविता...
4 Dec 2015 - 3:09 pm | पालीचा खंडोबा १
हा हा हा हा हा हा ::::: हे मात्र नवीन आहे माझ्यासाठी
4 Dec 2015 - 3:53 pm | विवेक ठाकूर
ग्रेसच्या शैलीची नक्कल करण्याच्या नादात संपूर्ण फसलेलं काव्य. वाट्टेल ते शब्द वाट्टेल तसे वापरलेत, कशाचा कश्याला मेळ नाही.
संभोग म्हणजे संपूर्ण समाधान परंतु हे समाधान नेहमीच सम्पूर्ण असेल असे नाही
म्हणजे नक्की काय?
संभोगाचा (शब्दार्थ) तुम्हाला माहिती आहे काय? सम + भोग, म्हणजे स्त्री आणि पुरुष ज्यात समान सुख भोगतात अशी क्रिया.
इथे संभोग ह्या शब्दाचा अर्थ व्यक्क्तीश: घेवू नये. हे जगण्यातले अपुरेपण आहे
म्हणजे संभोगात समाधान नाही म्हणून जगण्यात येणारे अपुरेपण किंवा काय?
ते एक असो, उधृत केलेल्या एकाही कडव्यातून कुठलीही एकसंध अभिव्यक्ती दिसत नाही :
मागू नये कुणी | बाळांतीणीचे वस्त्रे |
मोहात अडकले | कारुण्य पुरुषाचे |
स्त्रीत्व पुरुषत्व एका नाण्याच्या दोन बाजू. दोघांचीही दुखे समान कोणी करुनेस प्राप्त होतो तर कोणी विटम्बनेस
बाळंतीणीची वस्त्रे मागणे म्हणजे काय? का उगीच ग्रेसची स्टाईल मारण्याचा प्रयत्न ? आणि यात कुठे विटंबना आहे?
आणि कसल्या मोहात पुरुषाचं कारूण्य अडकलंय ? आणि त्याचा संभोगाशी किंवा जीवनातल्या अपूर्णतेशी (थोडक्यात काव्यविषयाशी) काय संबंध ?
त्यात पुन्हा कवितेचं शीर्षक "पंचशील ..........संभोगाच्या अपूर्ण कथा" असं दिलंय. तो तर अजून मोठा ज्योक. कवीला पंचशीलबद्दल (महावीर जैनाची जीवनविषयक सूत्र) काही घंटा माहिती दिसत नाही. केवळ कवितेची पाच कडवी आहेत आणि संभोगाचा शीलाशी संबंध असल्यानं तो शब्द निवडला आहे.
4 Dec 2015 - 11:13 pm | सायकलस्वार
विवेकजय ठाकूरसागरांशी थोडासा सहमत आहे.
(नाही म्हणजे मुद्दाम कोणाची नक्कल वगैरे केलीय असं वाटत नाही) पण चमकदार प्रतिमांची माळ एकापुढे एक रचून खरंच कविता बनते का?
(हा प्रश्न आहे, जजमेंट नाही)
4 Dec 2015 - 4:24 pm | मितान
या कविता घुंगुरनादासारख्या वाटल्या. आवाज येतो, गोड वाटतो पण अर्थ कळत नाही.
वर ठाकुर म्हणताहेत तसंच काहीसं..
4 Dec 2015 - 8:05 pm | माहितगार
ज्यांना रुपके/अर्थ समजली आहेत ते जरा उलगडून/रसग्रहण करुन दाखवतील का ? कवि महोदयांनी हिंटा दिल्या आहेत पण मोकळेपणाने सांगावयाचे झाल्यास क्रमांक १-३ समजून घेणे मला खूपच अवघड जाते आहे. क्रमांक ४ , ५ त्यातल्या त्यात बरे पण तेही समजून घेण्यास अजून साहाय्य लागेल असे वाटते.
4 Dec 2015 - 8:10 pm | अभ्या..
काय राव. तुम्ही तर रुपके समजण्यात एकदम माहीर. तुम्हीच असे विच्चारावे म्हणजे आम्हाला बाराखडी सुरु करावी लागेल पुन्हा.
4 Dec 2015 - 8:44 pm | विवेक ठाकूर
त्यानं फक्त वाट्टेल ते नवनवीन शब्द काढून फक्त एकापुढे एक जोडले आहेत.
सुसंबद्ध कविता लिहीण्यासाठी काव्यविषयाच एकसंध भान, अनुभवाची प्रगाढता आणि प्रतिभा लागते. मुळात या गोष्टीच नसतील तर अभिव्यक्ती पोकळ ठरते.
अर्थात इतक्या लोकांनी भयंकर टाळ्या पिटल्यावर कवितेचा फोलपणा दाखवणं साहसाचं होतं पण ग्रेसची कविता सखोल अभ्यासली असल्यानं ते सोपं होतं.
4 Dec 2015 - 10:39 pm | अजया
Déjà vu !!
4 Dec 2015 - 10:41 pm | आदूबाळ
+१
अगदी मुद्दा मांडायच्या स्टाईलसकट सरच!
4 Dec 2015 - 10:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
:)
5 Dec 2015 - 2:00 pm | एस
निगा रखो! ;-)
5 Dec 2015 - 2:29 pm | नाव आडनाव
ग्रेसचा एव्हढा अभ्यास असणारे एक आयडी होते मिसळपाव वर. आता येत नाहीत का ते ? :)
त्यांचं नाव काय बरं ..... :)
7 Dec 2015 - 4:45 pm | नाखु
एक नाटक होतं "तुझे आहे तुजपाशी" बघा विवेकाने दिसतील इथेच कुठे !!!
4 Dec 2015 - 9:22 pm | पालीचा खंडोबा १
जर का मि इथे कोनाला नको असिन तर मि लिहिने बन्द करतो कारण इथे सहित्य काव्य सोदुन इतर चर्चा होत असतिल तर त्या होवु दे निरोप द्या
4 Dec 2015 - 9:24 pm | पालीचा खंडोबा १
हवे असल्यास लिखान रद्द करतो पण विटंब ना थाम्बवा
4 Dec 2015 - 9:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपाकर अशीच गम्मत जम्मत करत मिपा इंजॉय करतात.
नाराज होऊ नका.
-दिलीप बिरुटे
4 Dec 2015 - 10:16 pm | पालीचा खंडोबा १
नकोच जर प्रतिभे चा असा अप मा न होणा र असेल तर मि इथुन जातो. कलावे लोभ असावा
4 Dec 2015 - 10:31 pm | माहितगार
'कले करता कला' हि एक स्विकार्य भूमिका असू शकते, ज्यात तुमची कला इतरेजनांना कशी वाटली याच्याशी 'कले करता कला' भूमिका बाळगणार्यांना सोयरसुतक असण्याचे काही कारण नाही. तुम्ही स्पष्टीकरणे दिलीच पाहीजेत इतरांना तुमची कला समजलीच पाहिजे असे काही नाही. बा.सी. मर्ढेकर त्यांच्या कवितांची भूमिका उअलगडून दाखवण्याचे टाळत तसेच कवि ग्रेस यांचेही होते म्हणतात.
जसे एक कलाकार म्हणून तुमच्या कवितेतून एखाद्या गोष्टीवर भाष्य ते कठोर टिका करण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला कलाकार म्हणुन आहे तसेच भाष्य ते कठोर टिका करण्याचे स्वातंत्र्य तुमच्या वाचकांना, चाहत्यांना आणि रसिकांनाही असते. माझ्या अलिकडील एका लेखातील एक संदर्भ वाचकांना लक्षात आला नाही त्यांनी टिका केली, त्यांना लक्षात आले नाही आणि मला सांगता आले नाही किंवा मी सांगीतले नाही हि संवाद पूर्ण होण्यातली दरी असते, काही वेळा सांधली जाते काही वेळा पूअ बांधले जातात काही वेळा तशीच राहते. कलाकार जसा संवेदनशीत असतो तसा एखाद्या व्यंगचित्रकारा प्रमाणे आजूबाजूला तटस्थपणेही पाहत असतो आपण सर्वच जण आपापल्यावर होणार्या टीकेकडेही तटस्थपणे पाहण्यास शिकु तेवढेच आपले कलामुल्य वृद्धींगतच होते असे वाटते, असो.
5 Dec 2015 - 7:16 am | दमामि
अतिशय सुंदर प्रतिसाद!
5 Dec 2015 - 8:27 am | अजया
फार सुंदर प्रतिसाद आहे हा.प्रत्येक कलाकाराने वाचावा असा.
5 Dec 2015 - 12:23 pm | अभ्या..
अजिबात नाही. हा प्रतिसाद रसग्रहण करणार्यासाठी आहे.
तटस्थपणे पाहणे वगैरे आयडियल गोष्टी बाजूला ठेवा. नुकताच आमच्या बहिणाबाईने (पिशी अबोलीने) एक सुंदर विवेचन मांडले होते. कट्यार आणि चाबूक वर. माझा चित्रपटाशी जास्त संबंध नाही. दोन्ही चित्रपट मी पाहिले नाही, त्यामुळे तो लेख वाचून माझ्या अल्प स्वल्प बुध्दीला जे वाटले ते तिला कळवले. एक किंचित कलाकार म्हणून अधिकार ही वाटला मला.
हे समजून घेण्याची पात्रता कीती जणाची? कला आपल्याला पहायला मिळाली, तपासायला, अभ्यासायला मिळाली तेंव्हा त्याची समीक्षा करायचा अधिकार किती हा मुद्दा बाजूला पडतो. दर्शकाच्या दृष्टीकोनातून टीका अथवा स्तुती करण्यापेक्षा तटस्थपणे विश्लेषण करा हा सल्ला किती जणांना रुचतो?
सो.. दर्शक व्हा त्यापेक्षा जास्त रसिक व्हा. तटस्थपणे पाहायला शिका, त्याचा आनंद घ्यायला शिका. कदाचित ते कलेला जास्त प्रोत्साहन असेल. त्यातूनसुध्दा कला बहरेल. एखाद्याच्या अहंकारात वाढ होईल पण त्याला नाकारण्याचा अधिकार आहेच ना तुमच्याकडे पण कलाकाराला तटस्थतेचा सल्ला देणे म्हणजे एक खोडा आहे असे मी मानतो.
5 Dec 2015 - 1:53 pm | अजया
कलाकार म्हणून अभ्याचं विवेचन पण पटतंय!
5 Dec 2015 - 4:22 pm | माहितगार
@ अभ्या..
बहुतांश सहमत बहुतांश एवढ्यासाठी की बहुतांश लोक तर्कापेक्षा भावनेस प्राधान्य देतात आणि कलाकार बरेच कलाकार तुम्ही म्हणतातसे पझेसीव्हही असू शकतील. सभोवतालच्या अनुभवल्या जाणार्या वातावरणाशी कलात्मक प्रेरणा संजिवीत होताना एक कलाकार म्हणुन सवेदनांच अटॅच-डिटॅच फ्रिक्वेन्सी माझी जेवढ्या वेगाने होईल आणि मीच निर्मीलेल्या कलेकडे मी जेवढा सहज डिटॅच होऊन पाहू शकेन तेवढ्या वेगाने इतर कलाकारांनाही डिटॅच होऊन तटस्थतेने पहाता येईल असे नाही म्हणून आपल्याशी सहमत.
पण त्याच वेळी माझ्या व्यक्तीगत मतानुसार कलाकारामध्ये बर्याचवेळा संवेदना जाणवतानाच लक्षात न आलेली
एक तटस्थताही असत असावी जसे एक छायाचित्रकार एखाद्या घडत असलेल्या प्रसंगाचे संवेदनशीलपणे चित्रण करतो पण समोर घडत असलेला प्रसंग कितीही गंभीर असला आणि त्याच्या गांभीर्याबद्दल तो कितीही संवेदनशील असला तरीही डोळ्यासमोर घडत असलेल्या प्रसंगात कलाकार सक्रीय हस्तक्षेप करेलच असे नाही त्यावेळी त्याची भूमिका नाही म्हटलेतरी अंशतः तटस्थतेची असते म्हणूनच तो स्वतःस त्या प्रसंगात गोवून घ्यायचे टाळत असू शकतो आणि त्याच वेळी संवेदनशील असल्यामुळे भोवतालच्या प्रसंगातून प्रेरणा घेऊन अभिव्यक्तही होतो. आणि माझा संदर्भ या तटस्थतेशी होता असे वाटते. तरीही तुमचीही भूमिका पटली आणि सहमतच, रोचक चर्चेसाठी धन्यवाद आणि शुभेच्छा.
5 Dec 2015 - 8:07 am | शिव कन्या
यातनंच वाचक लेखक घडतात. स्वातंत्र्य पेलायला ताकद लागते. पण दुसर्याचे स्वातंत्र्य पेलायला जास्त शक्ती लागते.
बाकी तुमची मर्जी !!!
5 Dec 2015 - 11:28 am | पालीचा खंडोबा १
सगळ्यांचे मन:पूर्वक आभार. खरे तर मी ह्या टीकेला उत्तर देणार नव्हतो . एकतर ज्याने टीका केली त्यांचे ज्ञान अपूर्ण आहे. मुळात हि कविता केली गेली २०१० साली त्यामुळे तेव्हा टीका झाली नाही परंतु इथे झाली कारण इथे ती आता प्रकाशित करण्यात आली . असो .
मुद्दा एक.
हे महाशय म्हणतात पंचशील भगवान महावीर ह्यांनी सांगितले. ते आधी दुरुस्त करतो म्हणजे पुढे सविस्तर बोलता येईल. पंचशील मांडले तथागत गौतम बुद्धांनी. त्यामुळे ह्या महाशयांची ज्ञानाची उंची इथे कळते. कारण ते दावा करतात त्यांना ज्ञान आहे आणि ते वाचनातून आले आहे.
मुद्दा दोन:
हे सरळ आरोप करतात कि मी कवी ग्रेस ह्यांची भ्रष्ट नक्कल करत आहे. ह्या कवितेला काहीही अर्थ नाही. दुर्बोध लिहिले कि कोणी ग्रेस होत नाही. महशय मी आधीच नमूद केले आहे कि मी कवी ग्रेस ह्यांच्या प्रभावाखाली आहे. माझे लिखाण हे अशेच ग्रे शैलितील असते. राजा राणी घोडे हे संधर्भ कवी ग्रेस ह्यांच्या कवितंमधेहि येतात म्हणून ते काही कोणाचे पेटंट नहि. ती रूपके आणि प्रतीके आहेत. कवी ला काय वाटते हे महत्वाचे. टीका केली ह्याचे दुख नाही ती टीका व्यक्तिगत स्वरुपात केली गेली म्हणून हे सांगतो आहे.
मुद्दा तीन:
कवी ला काय अभिप्रेत असते हे त्याच्या कवितेतून प्रगट होते. हे महाशय म्हणतात " बाळंतीणीची वस्त्रे मागणे म्हणजे काय? का उगीच ग्रेसची स्टाईल मारण्याचा प्रयत्न ? आणि यात कुठे विटंबना आहे? " ह्याचा अर्थ ह्यांनी सगळ्या कविता निट वाचल्याच नाहित. सगळ्यात महत्वाचे गरेव लिहित असत तेव्हा हि लोक त्यांच्यावर हे काव्य नाही हि कसली दुर्बोधता असले आरोप करत असत.
मुद्दा चार:
महाशय म्हणतात सगळ्यांनी कौतुक केले परंतु मी धाडस केले. ह्यांचे म्हणे आहे कि हे ग्रेस वाचतात आणि त्यांना दुर्बोधता कलते. जिथे ग्रेस म्हण्याचे कि मला जे कवितेतून मांडायचे आहे तिथे माझे शब्द अपुरे पडतात त्यामुळे मी काय लिहितो ह्याचा मला सुध्दा प्रश्न पडतो. दादर साहित्य संघ वाचनालय , दादर पूर्व इथे बोलताना ग्रेस हेच बोलले होते माझ्या कवितेतून तुम्हास पाहिजे तो अर्थ तुम्ही काढू शकता. मी माझ्या टीका कारण मी उत्तरे दिली नहित.
ह्या महाशयांनी माझ्या आधी प्रकाशित केलेल्या कवितांपैकी एकही वाचली नाही आणि इथे आले का ? ह्याचे प्रामाणिक उत्तर ह्या समीक्षक ???? महाशयांनी द्यावे . इतक्या लोकांना शैली भावली हे दुख आहे का कि काही तरी जळाले त्याचा वास ? नाही तर उद्या पंकॅयात होण्याचा संभाव जास्त तोही सकाळी . शोले मधल्या ठाकूर कडे रामुचाचा होता इथे कोण आहे ह्यांच्यासाठी ?
मुद्दा पाच:
टीका जरूर करा परंतु विखर सोडू नका. फुत्कार होते हे विषारी म्हणून ह्याची उत्तरे दिलि. महाशय माझ्या इथे पोस्ट केलेल्या कविता आधी वाचा. अभिप्र्य देवू नका. परंतु उगाच भ्रष नक्कल/ ग्रेस ची कॉपी असे अश्लाघ्य टीकास्त्र सोडू नक. कवितेवर बोललात मान्य परंतु माणूस म्हणून कवी म्हणून माझाबद्दल जे बोललात ते चूक . पुन्हा वर हेच म्हणतात पंचशील त्यातील शब्द शील संभोगाशी जोडला आहे आता मला सांगा जो अर्थ इतक्या अभिपार्य देणा-या लोकाना कळला नाही तो ह्यांनाच कळला आणि वर चोराच्या उलट्या कविता कळली नहि.
तुम्ही ग्रेस वाचले आहे का ह्या विषयी हि मला शंका आहे ? महावीर आणि गौतम बुध्द ह्यात फरक आहे महाशय
आता राहता राहिला प्रतिसादांचा प्रश्न त्याचे दुख आणि उट्टे असे काढू नका . आधी माझ्या सगळ्या कविता वाचा मग बोला शितावरून भाताची परीक्षा करू नका .
मी पुन्हा ठामपणे सांगतो माझी शैली लिखाण हे ग्रेस प्रभावित आहे आणि राहणारच
बोधी वृक्षा खाली बसलेल्या गौतम बुद्ध तुला माझा प्रणाम
कविता रद्द करतो मागे घेतो हे चुकून लिहिले गेले आहे कारण त्यावेळी मी चौथा पेग रिचवत होतो. परंतु आता पूर्ण शुद्धीत उत्तर देत आहे आणि वरील कविताही पाचव्या पेला केली आहे बहुतेक म्हणून तिचे नाव पंचशील असेल कारण शील जितके पवित्र तितकेच मद्य हि पवित्र कारण ते समुद्र मंथनातून बाहेर आले आहे. ह्या नवीन गौतम बुध्दांसाठी नवीन माहिती
मी इथे लिहित राहणार आणि असेच लिहिणार वागवे उणे बोललो असल्यास क्षमा असवि. तसेही गौतम बुध्दांचे मन हे विशाल आणि क्षमाशील होते
5 Dec 2015 - 12:25 pm | अभ्या..
लिहित राहा तुम्ही खंडेराया.
जे वाटते ते वरील प्रतिसादात लिहिलेच आहे.
5 Dec 2015 - 12:25 pm | संदीप डांगे
हाण्ण तिज्यायला! कडक! तुम्ही बिन्दास लिहा हो. आपुन तो पैलेच बोला.
तुमच्या लिखाणात जो दम आहे तो भल्या भल्यांना घाम फोडत असेल. चाकोरीत चालण्याची सवय पडलेल्या अचानक वळणे झेपत नाहीत मग स्वतःचा तोल गेला की रस्त्याला दोष देतात.
आप लिखते रहो. शुभेच्छा!
5 Dec 2015 - 1:35 pm | विवेक ठाकूर
१) पंचशील मांडले तथागत गौतम बुद्धांनी. त्यामुळे ह्या महाशयांची ज्ञानाची उंची इथे कळते
मुळात हा पातंजली सूत्राचा भाग आहे :
अहिंसासत्यास्तेय ब्रह्मचर्यापरिग्रहाः यमाः ॥३०॥
ही पाच तत्त्व बुद्धानी आणि महावीरानी अंगीकारायला सांगितली आहेत. अर्थात, जैन धर्मात ही पाच सूत्र प्रमाण मानून महावीरानं `अहिंसा परमोधर्मः ' हे सर्वात प्रार्थमिक सूत्र सांगितले आहे आणि त्यामुळे पंचशील जैन धर्माशी जोडले गेले आहे .
ते एक असो, पण त्याचा कवितेशी काय संबंध आहे हा मुख्य सवाल होता.
________________
२) हे सरळ आरोप करतात कि मी कवी ग्रेस ह्यांची भ्रष्ट नक्कल करत आहे.
ग्रेसच्या प्रत्येक रूपकामागे त्यांचा प्रगाढ अनुभव, प्रतिभेचं लालित्य आणि शिवाय यथार्थ स्पष्टीकरण आहे. ग्रेसची मुलाखत पाहिल्यास ते लक्षात येईल.
कवीला रूपकांच काहीही स्पष्टीकरण देता येत नाही. त्यामुळे त्या केवळ शब्दांच्या अर्थहीन चमत्कृती आहेत.
_____________________________
३) बाळंतीणीची वस्त्रे मागणे म्हणजे काय?
याचं अजूनही उत्तर नाही. आणि पुढे :
ह्याचा अर्थ ह्यांनी सगळ्या कविता निट वाचल्याच नाहित.
म्हणजे माझ्या सगळ्या कविता वाचून तुम्हीच बाळंतीणीचा उलगडा करा !
_________________
४) इतक्या लोकांना शैली भावली हे दुख आहे का कि काही तरी जळाले त्याचा वास ?
शैली भावली ? कवितेला अर्थ नाही म्हटल्यावर शैली भावली असं वाटणं म्हणजे `गाडी चालत नाही पण डिझाइन मात्र भारी आहे' असा प्रकार झाला.
_______________
५) पुन्हा वर हेच म्हणतात पंचशील त्यातील शब्द शील संभोगाशी जोडला आहे आता मला सांगा जो अर्थ इतक्या अभिपार्य देणा-या लोकाना कळला नाही तो ह्यांनाच कळला आणि वर चोराच्या उलट्या कविता कळली नहि.
पंचशील सूत्रं आणि अपूर्ण संभोग याचा त्यातल्या त्यात वायझेड संबंध मी जोडण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही म्हणतायं मला कविता कळली ?
वरील कविताही पाचव्या पेला केली आहे बहुतेक म्हणून तिचे नाव पंचशील असेल कारण शील जितके पवित्र तितकेच मद्य हि पवित्र कारण ते समुद्र मंथनातून बाहेर आले आहे.
आता सर्वांना तुम्ही उलगडलेला अर्थ नक्की कळेल! पाचव्या पेगला प्रसवलेली कविता म्हणून पंचशील! त्यामुळेच मी पहिल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे विस्कळीत विचार आणि निरर्थक शब्दांची असंबद्ध बडबड.
बजाते रहो!
5 Dec 2015 - 2:47 pm | बोका-ए-आझम
ग्रेसच्या मृत्युपत्रात त्यांच्या कविता तुमच्या नावावर लिहिल्या आहेत हे माहित नव्हतं.
7 Dec 2015 - 11:54 am | बॅटमॅन
म्हणजे तुम्हांला रूपकांच्या स्पष्टीकरणाचे आयते मऊ मऊ केलेले सेरेलॅकच लागते, कच्ची कविता पचत नाही. हा तुमचा दोष की कवीचा? हे म्हणजे एखाद्या बाळाने तंदुरी चिकन हे गुरगुट्या भातासारखे खाता येत नसल्याने ते चवहीन, पोषणहीन आहे असे म्हटल्यासारखे झाले.
कवितेला अर्थ नाही हे तुम्ही म्हटलं, बाकीच्यांनी नाही. त्यामुळे गाडी चालत नाही हा तुमचा समज आहे, बाकीच्यांचा नाही.
नक्की कशाचा संबंध कशाशी जोडावा हेच कळत नसेल तर तो संबंध वायझेड होतो याची कबुली स्वमुखाने अभावितपणे द्याल असं वाटलं नव्हतं. =))
हे म्हणजे उपरोध न कळाल्यावर माणसे जसे बोलतात त्यापैकी प्रकार आहे. =))
काय राव घंटीचंद गुरुजी, ३१ जुलैची भ्रामक कामे संपली की काय?
7 Dec 2015 - 6:26 pm | चिगो
अगदी दोन मुद्द्यांच्या मधल्या आडव्या रेषेसकट ____________________________ वेलकम बॅक, सर !!
5 Dec 2015 - 12:42 pm | बोका-ए-आझम
तुम्ही लिहित राहा. एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्यांना करता येतं ते करतात, नाही येत ते समीक्षक होतात. आॅस्कर वाईल्डने जे म्हटलेलं आहे नातेवाईकांबद्दल - त्यांना कसे जगावे आणि कधी मरावे हे कळत नाही - ते समीक्षकांनाही लागू पडतं. त्यामुळे त्यांना पौड, धायरी, इस्लामपूर वगैरे महाराष्ट्रात जे काही आहेत त्या सगळ्या फाट्यांवर मारा आणि लिहित राहा.
5 Dec 2015 - 3:50 pm | पालीचा खंडोबा १
आता हि काय प्रश्न पत्रिका अहे का कि तिचि उत्तरे देवु. जे सुचले ति लिहिले कि कविता थरवुन लिहितात. आधि चाल मग त्यात गा णे घाल.
5 Dec 2015 - 4:48 pm | माहितगार
काव्य धाग्यातील कविता/कडवे क्रमांक १ आलास समोर | चढले खूळ |... धर्माची स्थापना | कुणी करावी ? पुन्हा एकदा वाचली तर तीन शक्यता जाणवल्या;
* शक्यता १ :
काव्य डान्सबार सदृश्य नर्तकीच्या दृष्टीकोणातून लिहिले असू शकेल, ज्यात रखेल/नर्तकीच्या समोर विखार दाटलेले एक गिर्हाईक येऊन गेले पण त्या रखेलीचे स्वप्न (तारा) काही वेगळेच आहे ते भंग पावले आहे, ती विचार करते आहे की ती राणी ही उसासे भरते आहे आणि ती स्वतः मनातून टाहोच फोडते आहे ज्या सदगृहस्थाकडून / राजाकडून धर्माच्या स्थापनेची रक्षणाची अपेक्षा होती तोच बाटला आणि एका अर्थाने सरणावर चढला आहे, (कवि महोदयांनी व्यक्तिगत न घेता ह.घ्या. हा केवळ उदाहरणासाठी उपलब्ध पर्यायांपैकी तर्कासाठी तर्क आहे क्लेम नाही; हा राजा म्हणजे एखादा भरकटलेला पो. इन्स्पेक्टर आहे -धर्म रक्षणाची ज्याची जबाब्दारी आहे- त्याच्या भावना कवि तटस्थपणे व्यक्त करू शकत असेल किंवा एखादा भरकटलेला पो. इन्स्पेक्टर किंवा एखादा राजकारणीही अशी कविता लिहू शकेल ?)
* शक्यता २
पण शक्यता १ मध्ये "रक्तबंबाळ बोटे" हे शब्द व्यवस्थीत बसत नाहीत, एखाद्या धर्मसंस्थापने सारखे सतकृत्य अपेक्षीत असलेल्या व्यक्तीची एखाद्या गुन्हेगाराने वाट लावली आणि त्याचे वर्णन आहे ?
* शक्यता ३
वरच्या दोन्ही शक्यता चुकीच्या असून राजकीय स्वरुपाचे काव्य आहे जे मला समजलेले नाही.
या शिवाय इतरही शक्यता असू शकतातच ज्यांचा मला अंदाज आलेला नाही. शक्यतां बद्दल उत्तर देणे कवि महोदयांवर बंधनकारक नाही.
वरील विश्लेषणाचा उद्देश व्यक्तीगतता नाही त्यामूळे एखादे वाक्य अथवा विश्लेषणाचा कोणताही भाग न पटल्यास कवि अथवा इतर कुणासही न पटल्यास, महोदय संपादकांना व्यनिने विनंती करून परस्पर अंशतः अथवा पुर्ण वगळण्यास माझी हरकत असणार नाही.
धन्यवाद
5 Dec 2015 - 5:56 pm | संदीप डांगे
लोक अॅब्स्ट्रॅक्ट कलाविष्कारांचा आनंद का घेऊ शकत नाहीत? कवितेतून जे अमूर्त भाव उभे केलेत त्याच्यामागच्या कवीच्या भावना जाणून घेणे आवश्यकच आहे काय? अमूक एक शब्द का वापरला याचा किस पाडून नक्की काय मिळणार आहे?
कवितेतून उभ्या राहणार्या तुटक्या-भक्कम प्रतिमांचा आपल्या मनावर जो सहज तरंग उठतो त्याला तटस्थतेने वा भावनिकतेने बघणेच आपल्या हाती असते. इथे समजा एखादे अमूर्त चित्र असते तर हाच रंग का वापरला, ती रेषा मोठी का, हा आकार असा का असले प्रश्न पडत नाहीत. त्या चित्राचा प्रभाव पडतो, अंतर्मनात कुठल्या तरी भावनेला ते मॅच होते आणि आपल्याला रसग्रहणाचा आनंद होतो. हे सगळे अजाणता घडते. त्याचा आनंद घ्यावा.
इथे काही चित्रे देतो, ती बघावी:
वासुदेव गायतोंडे
माझ्या लेखी तरी जगात गायतोंडेंना अमूर्त चित्रांमध्ये तोड नाही.
वर ठाकूर यांनी ग्रेस यांच्या प्रतिभा, अभ्यास, रुपकांच्या खोल अर्थाबद्दल विवेचन केले आहे. तसा अभ्यास खंडोबांचा नाही असे त्यांना म्हणावयाचे आहे असे दिसते. त्याबद्दल एक सांगावेसे वाटते. हे मी जेजे त असतांना ऐकलेले व काही माझे विचार.
"लोक अमूर्त चित्रांना नावे ठेवतात. ज्या चित्रकारांना हुबेहुब चित्रे काढायचा कंटाळा येतो ते शॉर्टकट मारून प्रसिद्ध होण्यासाठी असली चित्रे काढतात. त्यांना त्याचा काय अर्थ आहे हे सांगता येत नाही. कुणाला घरामधे ती टांगता येत नाहीत. नुसते आपले ब्रश घेतले, रंग घेतले, बसले लहान मुलांसारखे रंग फासत की झाले चित्र. त्याला काय लागतं, अशी चित्रे तर कुणी थुंकले तरी निघतील. माय डीअर फ्रेंड्स, ते इतके सोपे नाही. वाटतंय तर करून बघा. रंग, ब्रश आणि कॅनव्हास तर लागतो. चित्रे तर काय लहान मुलांसारखी काढायचीत, तुम्हीच म्हणालात. आता करा, करून बघा. वीस पेंटींग बनवा, आपली शैली कायम ठेवा. सगळी चित्रे एकसारखी दिसली पाहिजेत पण मूलभूत फरकही पाहिजे. अंदाधुंद फटकारे मारत तुम्ही चार पेंटींग्स बनवणार, आठ बनवणार. दहा बनवणार. पण अकराव्या पेंटींगला तुम्ही डोके धरून बसाल, कारण आता 'काय काढू' तुम्हाला सुचणारच नाही. हे 'काय काढायचं' हे सुचणं म्हणजेच अॅब्स्ट्रॅक्ट.
तुम्हाला वाटतं, फिगरेटीव ड्रॉइंगचा, हुबेहुब काढण्याचा कंटाळा करणारे शॉर्टकट मारतात. असेच आहे. कारण जेवढे श्रेष्ठ अॅब्स्ट्रॅक्ट काढणारे आहेत, ते फिगरेटीवच्या पलिकडे आपली कला शोधतात. तो कंटाळा नाही तर ती नव्याची आस आहे. जे जसं उमटेल तसंच कॅन्व्हास वर उतरवायचं आहे. भले ते स्वतःलाच न समजू दे. रसिकांना समजणे तर दूरच.
अॅब्स्ट्रॅक्ट काय आहे. एक आंबा घ्या. पूर्ण पिकलेला. हे फिगरेटीव ड्रॉइंग. पूर्ण आंबा, पिवळा जर्द, हिरवा देठ. आता त्याला कापून फोडी करा. तरी तो आंबाच राहिल. आता त्याचा रस काढुन ग्लासात भरा. तरी तो आंबाच राहील. ग्लासात भरलेला रस म्हणजे अॅब्स्ट्रॅक्ट आंबा. दॄष्य पातळीवर ओळखू येणार नाही, पण तो आंबाच. त्याचा स्वाद आणि ओळख तेव्हाच तुम्हाला कळेल जेव्हा आधी कधीतरी तो आंबा तुम्ही चाखलेला असेल तरच. आफ्रिकेतलं एखादं कधीच न बघितलेल्या फळाचं रस काढून दिला तर कसं समजेल? अमूर्त चित्रकला अशीच आहे.
दोन डोंगराआडून उगवणारा सूर्य कितीजणं पाहतात. कुण्या अमूर्त चित्रकाराला त्याची भावना मांडायची असेल तर ते डोंगर चौकोनी होतील, सुर्य त्रिकोणी होईल, काळा होईल, डोंगर लाल असतील. पण तरीही तो सुर्योदय. फक्त चित्रकाराच्या मनःपटलावरचा.
एकदा तुम्ही गायतोंडेंची चार चित्रे बघितली की जगात कुठेही गेलात तरी गायतोंडेंचे चित्र कोणते हे सांगू शकाल. अमुर्त चित्रकार आपल्या चित्रांवर आपली शैली सोडून जातो. ती अप्रतिम, अलौकिक असते. एखादे चित्र दाखवताच हे हुसैन चे आहे हे त्याच्या ठसठशीत काळ्या रंगाच्या रेषांवरून व दमदार फटकार्यांवरून कळतं. हे खरं चित्रकाराचं संचित. आपली ओळख निर्माण करण्याचं. आजवर हजार राधाकृष्णाची चित्रं बघितली असतील पण कोणतं कोण्या चित्रकाराचं हे सांगू शकणार नाहीत. पण एकदा गायतोंडे बघितलेला, समजलेला माणूस गायतोंडे सांगण्यास चुकणार नाही.
असेच संगिताबद्दलही, अमूक एक वाद्यच इथे का वापरले, ही सतार आहे की तंबोरा अशा शास्त्रिय तांत्रिकतेत घुसण्यापेक्षा मनावर झालेला परिणाम अनुभवा. सारंगीच्या सुरांनी मन हळवं होतं, कुठला निषाद, कुठला पंचम ह्या चौकशा केल्याने नाही. रेहमानपासून शंकर-एहसान-लॉय, आरडी, शंकरजयकिशन, अजय अतुल यांच्या पर्यंत सगळ्यांच्या संगितामधे एक सिग्नेचर आहे. अगदी हिमेश रेशमियांही त्याच्या शैलीची छाप त्याच्या संगितावर सोडून जातो. ती तेव्हाच येते जेव्हा कलाकार स्वत्व ओतत असतो. कुणाची कॉपी मारली की अनु मलिक आणि प्रीतमशीवाय काही होत नाही."
माझं हे सगळं विश्लेषण खंडोबा यांच्या कवितेच्या अमूर्तपणाला न्याय देता यावा म्हणून आहे. रसिकांनी रसग्रहण करतांना चित्रकलेचेच निकष अशा कवितांना वापरावे असे माझे मत आहे.
काही कविता वाचून सोडून द्याव्यात. आवडलंत छान म्हणावे, नाही आवडलं तर तसं सांगावे. चिकित्सा करू नये असे वाटते. अशा काही कवितांमधे खंडोबाच्या कविता असतील तर त्यांना त्रास देऊ नये. बिचारे सगळी नशा उतरून जाइपर्यंत 'लोकांना काय आवडेल आणि मला काय पाहिजे'च्या झगड्यात अडकून बसतील. त्यांचा कमर्शियल आर्टीस्ट करू नये. ते किती त्रासदायका आहे हे आम्हाला चांगलंच माहित आहे.
धन्यवाद!
5 Dec 2015 - 6:17 pm | माहितगार
@ संदीप डांगे
१) कवि महोदयांचा प्रतिसाद अभ्यासला असता त्यांचा रोष काव्य चिकित्सा अथवा टिकेवर नाही त्यांना ठाकूरांची टिका व्यक्तीगत वाटली, तिथ पर्यंतच मर्यादीत असावा असे वाटते(त्यांना ठाकुरांच्या टिकेचा नेमका कोणता भाग व्यक्तीगत टिकेचा वाटला ते माहित नाही - हे मी ठाकूरांची बाजु घेण्यासाठी लिहित नाही आहे).
२) कलाकारास कलाकृतीची निव्वळ स्तुतीच करुन हवी असेल तर कलाकाराने तसे विनम्रपणे नमुद करावे, - बहुतांश लोक धागा लेखकाने धागा लेखात केलेल्या विनंत्यांचा मान ठेवता असा -माझातरी- अनुभव आहे. मोजक्या कलाकृती मिपासारख्या मंचावर प्रकाशित कराव्यात बाकी कलाकृती वाचण्यासाठी ब्लॉगवर पाचारण करावे. कारण टिका करू नका असे विशीष्टपणे नमुद केले तरीही हा सार्वजनिक मंच आहे, या मंचाच्या धोरणात बसेल अशी कोणतीही स्तुती अथवा टिका करण्याचे स्वातंत्र्य सर्वसाधारणपणे सर्व रसिकांना असावे.
३) मीही अमूर्त कलाकृतींचा मोठ्या आवडीने आनंद घेत असतो कधी अर्थ न लावता आनंद घेतो कधी आपण अथवा इतर लोक लावत आहेत तो अर्थ परीपूर्ण नाही माहित असूनही एक रसिक म्हणुन मला जो काही अर्थ भावेल त्या अर्था सहीत आनंद घेतो. टिका करताना माझी टिका मला माझी एक नवी कलाकृती वाटत असते आणि म्हणुन मी कधी कधी टिका करण्याचाही आनंद घेत असतो. ज्यांना चिकित्सा वाचावयाच्या नाहीत त्यांना चिकित्सा वाचण्याचे बंधन मुळीच नाही. चिकित्सा करणे ही आमची स्वतंत्र अभिव्यक्ती असते, आणि त्याच अभिव्यक्तीच्या अधिकाराने आपण चिकित्सा करणार्यांची चिकित्सा केली आहे. चिकित्सा करण्याचा सुसंगत नसेल तर चिकित्सा करणार्यांची चिकित्साकरणेही सुसंगत राहणार नाही असे वाटते. हे आमचे मत बाकी असो.
5 Dec 2015 - 6:46 pm | संदीप डांगे
माहितगारजी, माझा प्रतिसाद आपल्यासाठी नव्हता. रसग्रहण्, चिकित्सा आणि व्यक्तिवेधी टिका ह्या वेगळ्या आहेत. तुम्हाला जाणवलेला अर्थ तुम्ही जरूर लिहा. तेच तर खर्या अमूर्तचं फलित आहे. कुणाला काहीतरी शब्दांत बांधण्यासारखा अर्थ मिळतोय हे कलाकृती आणि रसिक यांच्यामधल्या उत्तम संवादाचं प्रतिक आहे. त्याचं स्वागतच आहे. माझा आक्षेप दुसर्याप्रकारच्या टिकेवर आहे.
जिथे अमूर्त कविता/कलाकृती मनावर परिणाम साधून जाते, मनात तरंग निर्माण होतात पण त्यास नीट पकडता येत नाही. त्याचे अर्थ लावता येत नाही. त्यावेळी रसिक उद्विग्न होऊन कलाकाराला नीट कला सादर न केल्याबद्दल बोल लावत असेल तर तिथे रसिकाचे थोडे चुकते. जिथे कलाकृती आणि रसिक असाच व्यवहार असतो तेव्हा कलाकारावर व्यक्तिगत स्वरुपाची मानहानी होईल अशी टिका वा चिकित्सा चुकीची ठरते.
बाकी आवडली तर सांगावी, नाही आवडली तर तसे सांगावे हे मी लिहिलेच आहे त्यामध्ये तुम्ही ज्यापद्धतीने चिकित्सा वा रसग्रहण करण्याचा प्रयत्न करत आहात तो उत्तम नमुना आहे. असाच प्रयत्न आपण शिवकन्या ह्यांच्या पोपट लंगोट कवितेवरही केला होता तेही आवडले होते. पण प्रतिमा वापरण्यावरून कलाकाराशी भांडण करणे पटत नाही.
माझ्यामते मेरीसाईडसे सब क्लिअर है. तो प्रतिसाद तुमच्या प्रतिसादाखालीच आला म्हणून गैरसमज नको.
5 Dec 2015 - 7:26 pm | माहितगार
प्रतिमेच्या चपखलपणावर टिका करण्याचे रसिकाचे स्वातंत्र्य मान्य करून, प्रतिमा वापरण्याच्या कलाकारच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असेल तर ती भूमिका सुयोग्य ठरणार नाही या बाबत सहमत.
बाकी प्रतिसादाबद्दल आभार.
5 Dec 2015 - 8:24 pm | संदीप डांगे
इथे एक चांगला मुद्दा आपण उपस्थित केलाय, त्याबद्दल सविस्तर लिहावेसे वाटते. (काय करणार, नेहमीच असा प्रसंग येत नाही)
प्रतिमेच्या चपखलपणावर टिका करण्याचे रसिकाचे स्वातंत्र्य
चपखलपणा हा एक विवादित भाग आहे. कारण हाच कलेचा मूळ आत्मा आहे. ते कसे? ते चित्रपट दिग्दर्शनात बरेचदा दिसते. एखादी व्यक्तिरेखा क्रूर आहे असे दाखवण्याचे प्रत्येक दिग्दर्शकाचे प्रयत्न वेगळे असू शकतात. तो प्रयत्न चपखल आहे की नाही याबद्दल खुद्द दिग्दर्शक, रसिक यांची मते आपआपल्या संस्कार मान्यतेनुसार वेगवेगळी असू शकतात. उदा. नवाजुद्दिन सिद्दिकीला मला क्रूर दाखवायचे आहे तर तो थंड चेहर्याने एकानंतर एक कोंबड्या कापत जात आहे असे दृश्य दाखवेल. पण रोज कोंबड्या कापणार्याला त्यात काही क्रौर्य आहे असे वाटणारच नाही. इथे चपखलपणाबद्दल मतभिन्नता येते. दुसरे उदा: पूर्वी नायक-नायिकांचे प्रत्यक्ष चुंबन दाखवण्याऐवजी दोन फुले एकत्र येतांना दाखवत असत. त्याकाळात तेही अमूर्त रोमांटीक असे. पण आज कुणी असा प्रयोग केला तर लोक रोमांटीक होण्याऐवजी हसतात. तीच प्रतिमा, तेच प्रतिक, तीच क्रिया काळ बदलला तर त्याचे 'चपखल असणे' सुसंगत राहत नाही. 'असे धडधड घर पेटलेले' ह्या शब्दांमधुन वाचणार्याच्या मनात तो ज्या घरात राहतो 'त्यासारख्या' घरांच्या जळण्याची दृश्ये उभी राहतील. दु:खद प्रसंग आठवतील. करूण रस उचंबळून येईल. पण कवीला ही प्रतिमा नकोय, त्याने स्पष्ट केले रसिकांनो मी हे निघून गेलेल्या चिमण्यांच्या जुन्या घरट्यांबद्दल बोलत होतो. तर तिथे एक भ्रमनिरास होऊ शकतो.
असे का होते?
मनाच्या संस्काराच्या गाभार्यात काही प्रतिमा काही गोष्टींशी घट्ट चिकटलेल्या असतात. नकळत. त्याची एक चौकट असते. त्यातच माणूस विचार करू शकतो. आजवर उपलब्ध असलेल्या प्रतिमा-भावना संकलनातून फिट बसेल अशी निवडून प्रत्येक समोर येणार्या वस्तूला लावली जाते, ती फिट नसेल तर एलियन समजून नाकारली जाते व तीच वस्तू एक प्रतिमा बनून मेंदूत संरक्षित केली जाते पुढच्या तशाच असणार्या वस्तू ओळखण्यासाठी. आंबा म्हणून कोणी लाल ज्यूस हातात देईल तर तुम्ही मानणारच नाही. कारण ते जाणीवेच्या संग्रहातल्या प्रतिमेशी जुळत नाही. ती 'चपखल' बसत नाही. मग देणारा म्हणेल अरे ह्यात मी अमुक एक रंग टाकलाय तेव्हा विशिष्ट रंगासहित आंब्याचा रस अशी नवी प्रतिमा संग्रहीत केली जाईल. पुढे कधी लाल ज्युस समोर आला तर तो आंब्याचाही असू शकतो असा विचार आपलं अंतर्मन करेल.
त्यामुळे अगदी सुस्पष्ट असल्याशिवाय कवीने स्वतः प्रतिमांच्या स्पष्टीकरणाच्या फंदात पडू नये. कारण एकदा त्याची साइड ओपन झाली की सामना सुरु होतो. कविता, कवी आणि रसिक. तो टाळलेलाच बरा.
5 Dec 2015 - 8:39 pm | माहितगार
सहमत आहे. एक उदाहरण देतो, शीव कन्या आणि राधा-कृष्ण विषयक कवियत्रींच्या धाग्यावर मी रसग्रहण करताना शंका व्यक्त करताना खरेतर कविंचे प्रतिसाद मला अपेक्षीत नव्हतेच मला इतर वाचकांशी रसिकांशीच केवळ चर्चा करावयाची होती, या धाग्यावरील माझ्या प्रतिसादांना खरेतर मला कवि कडून उत्तरांची अपेक्षा नाहीच पण बर्याचदा मिपासारख्या मंचावर प्रथमच येणार्या कविंना कदाचित हे लक्षात न येऊन ते स्पष्टीकरण देतात आणि घोटाळा होतो. ठाकूरांसारखा प्रतिसाद आलातरी व्यक्तीगत टिकेच्या वाक्यावर अथवा कुठे व्यक्तीलक्ष्य तर्कदोष असल्यास तेवढ्यापुरते बोट ठेऊन बाकी मौन धरणे कवि म्हणून श्रेयस्कर असावे.
बाकी वर आदुबाळांनी म्हटल्या प्रमाणे इतरांच्या कोणत्याही अर्थ लावण्याला /अथवा टिकेलाही खूप मर्यादा पडतात.
5 Dec 2015 - 8:44 pm | संदीप डांगे
सहमत.
5 Dec 2015 - 6:33 pm | विवेक ठाकूर
कुणाची कॉपी मारली की अनु मलिक आणि प्रीतमशीवाय काही होत नाही.
कवीच्या कविता ग्रेसच्या स्टाईलची नक्कल आहे.
5 Dec 2015 - 6:36 pm | विवेक ठाकूर
कुणाची कॉपी मारली की अनु मलिक आणि प्रीतमशीवाय काही होत नाही.
ही कविता ग्रेसच्या स्टाईलची नक्कल आहे.
5 Dec 2015 - 7:37 pm | बोका-ए-आझम
पण शब्दांना अर्थ असल्यामुळे अमूर्त स्वरुपाचं लेखन समजण्यात लोकांना अडचण येत असावी. बाकी गायतोंड्यांच्या चित्रांबद्दल धन्यवाद!
5 Dec 2015 - 8:33 pm | संदीप डांगे
शब्दांनाच काय तर पंचेंद्रियांद्वारे मेंदूपर्यंत पोचणार्या प्रत्येक जाणीवेला अर्थ आहे. बसमधून जातांना कुण्या पुरुषाचा धक्का स्त्रीला कोणत्या स्वरुपाचा जाणवतो तेही एक कम्युनिकेशनच आहे. धक्का अमूर्त असतो पण अर्थ वेगवेगळे निघू शकतात. ;-)
6 Dec 2015 - 11:42 am | बोका-ए-आझम
शब्दांना एक निरपेक्ष (absolute) अर्थही असतो. तुम्ही जे म्हणताय ते interpretation च्या संदर्भात म्हणताय, म्हणजे जो अर्थ प्रत्येकजण त्याच्या समजुतीनुसार आणि प्रवृत्तीनुसार काढत असतो. मला अभिप्रेत होतं ते meaning.
6 Dec 2015 - 12:09 pm | संदीप डांगे
येस. निरपेक्ष सर्वमान्य अर्थाबद्दल म्हणत आहात तेव्हा ते तुमचं मत बरोबर आहे. त्यामुळेच असे अमूर्त लेखन समजण्यात अडचण येते. अमुर्त लेखनास संदर्भ नसतो. संदर्भ नसेल तर सर्वमान्य अर्थ लावणे कठीणच जाते. उदा. 'तो आला, म्हणाला घरी चल' ह्या पाच शब्दांना कोण लेखक कुठे कसा वापरेल त्यावरून त्याचे अर्थ निघतील. कोठ्यात धंद्याला बसलेल्या आपल्या बहिणीला, वृद्धाश्रमात असलेल्या बापाला, अंथरुणात शेवटच्या घटका मोजणार्या वृद्धाला, रुसून बसलेल्या प्रेयसीला. जितके प्रसंग तितके अर्थ. प्रसंग नसतील तर साध्या शब्दांचा भुलभुलैया होतो.
असो.
5 Dec 2015 - 10:19 pm | पालीचा खंडोबा १
इथ कुठ्रे आण ता तुम्हि गाय तो डे ना हे म्हनतिल हा कोन
5 Dec 2015 - 11:12 pm | चाणक्य
सुंदर प्रतिसाद. आवडला.
7 Dec 2015 - 8:26 pm | शलभ
कविता झेपली नाही. पण तुमचा प्रतिसाद आवडला. अॅब्स्ट्रॅक्ट बद्दल बर्याच कन्सेप्ट क्लियर झाल्या असं वाटतयं.
5 Dec 2015 - 7:12 pm | संदीप डांगे
जबतक फुकट है मजे लो. प्रितमची गाणी फुकटात डाउनलोडवायची, आनंद घ्यायचा आणि वरून त्यालाच चोर म्हणायचे ह्याला काय अर्थ...?
6 Dec 2015 - 11:52 am | pacificready
संभोग 'साधता' आला नाही तर भोग उरतात.
असो!
6 Dec 2015 - 3:45 pm | पर्ण
विवेक ठाकूरांनी कवितेत Ph.D केलेली दिसतेयं.... केवढ्या त्या टिका.. :P
6 Dec 2015 - 3:49 pm | pacificready
न्यू जॉइनी शिक्षक स्वारी सर आहेत.
सरसरून नै तर रसरसून शिकवतात.
7 Dec 2015 - 11:55 am | बॅटमॅन
अहो अलीकडे कोणीही पीएचडी होतात. =))
6 Dec 2015 - 6:12 pm | कंजूस
चित्रकार ,डिझाइनरांसाठी एक शहर पॅरीस आहे तसं मराठी कवितांसाठीही महाराष्ट्रात एक शहर हवे.
7 Dec 2015 - 3:25 pm | तुडतुडी
@विवेक ठाकूर सहमत आहे . मसालेदार शब्द वापरून अर्थहीन कविता लिहिल्यासारखी वाटतेय .
10 Dec 2015 - 4:18 pm | कहर
ठाकुरांशी सहमत. मुक्तछंद हा काव्यप्रकार अस्तित्वात आल्यानंतर निबंधातील क्रियापदे उडवून अनेक जन कवी म्हणवून घेऊ लागले. त्याला काव्यप्रकार म्हणून मानले गेले तरी प्रत्येक मुक्तछंद कविता नसते हे पटवण्यासाठी एका मोठ्या कवीने (नाव आठवत नाही ) असेच उच्च शब्द ओतप्रोत भरीत काव्य सदर केले आणि सर्वांची वाहवा मिळविल्यानंतर सांगितले कि हे काव्य नाहीच. गेल्या पाच मिनिटात बसल्या बसल्या वर्तमान पत्रातील काही शब्द अधोरेखित करून उलट सुलट जोडले आहे. आता याला कविता म्हणावी का ?( फार पूर्वी वाचनात आलेला किस्सा ).
तर मुद्दा असा कि कविता शब्दांनी बनलेली असते पण प्रत्येक शब्द बांधणीला कविता म्हणायचा अट्टाहास का ? ग्रेस यांच्या कृष्ण एकांत मध्ये रुक्मिणी सत्यभामा आणि राधा यांच्या कृष्णावरील प्रेमाची तुलना एवढे सांगितले कि पूर्ण कविता आपोआप कळते .प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा सांगायची गरज रहात नाही. कविता म्हणले कि तिला विषय असतो ती उलगडत जाते आणि तिला (कधी पूर्ण आणि कधी कधी प्रश्नात्मक असला तरी ) अंत हि असतो. या परिमाणांवर या कविता कुठेच बसत नाही. पण ज्याप्रमाणे जय मल्हार मालिके मध्ये खंडेराय आणि म्हाळसा ट्याब वर बोलतात तसा हा प्रकार असू शकतो.
ग्रेस म्हणतात तसे एखादी कविता एकतर कविता असते किंवा ती नसते ….