आस्तिक वैज्ञानिक

यनावाला's picture
यनावाला in काथ्याकूट
1 Dec 2015 - 9:40 pm
गाभा: 

काही वैज्ञानिक आस्तिक असतात हे खरे आहे. मात्र सर्व सामान्य जनतेत आस्तिकांचे प्रमाण 90% हून अधिक आहे; तर भौतिक शास्त्रज्ञांत ते 10% हून कमी आहे, असे अनेक विश्वासार्ह सर्वेक्षणे दाखवतात. म्हणजे 90% वैज्ञानिक नास्तिक असतात. ज्यांनी मूलभूत (बेसिक) विज्ञानाचा अभ्यास केला आहे त्यांत 100 तील 10 जण तरी आस्तिक का असावेत ? याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे देता येते.:-
पूर्वी माणसाला निसर्गनियमांविषयी निश्चित असे ज्ञान नव्हते. नैसर्गिक घटनांचे कार्य-कारणभाव कळत नव्हते. अनुभवाने जेवढे समजत होते तेवढेच. भूकंप, वणवे, महापूर, वादळे अशा आपत्तींनी भेदरलेल्या माणसाला या संकटांत कुणाचा तरी आधार हवा होता. हे उत्पात कोण घडवतो हे समजत नव्हते. पण तो कोणीतरी महासामर्थ्यशाली, अलौकिक पुरुष असला पाहिजे असे वाटत होते. अशा परिस्थितीत माणसाला देवकल्पना सुचली असावी. या काल्पनिक देवाला त्याने आपला रक्षणकर्ता मानले. हे बारा/पंधरा हजार वर्षांपूर्वी घडले असावे. देवाने संकटातून वाचवायचे तर त्याला शरण जायला हवे. त्याची स्तुती करायला हवी. त्याला संतुष्ट ठेवायला हवे. त्यासाठी काही अर्पण करायला हवे. त्यांतून ईशस्तवन- देवपूजा-गंध-फूल-अक्षता-नैवेद्य-बळी- अशा प्रथा पडल्या.
ही देवकल्पना माणसाला आश्वासक वाटू लागली. आवडली. ती मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होत गेली. बालपणी मुलगी जे पाहायची, ऐकायची, करायची ते आणि तसे पुढे आपल्या मुलांना सांगायची. आजही आई ,"देवबाप्पाला नमो कर . तो तुला बुद्धी देतो. यश देतो. आयुष्य देतो. संकटातून वाचवतो. " असे आपल्या मुलांना सांगते. कारण तिने तसे आपल्या आईकडून ऐकलेले असते. आपले माता-पिता काय करतात, काय सांगतात. आजूबाजूची मोठी माणसे काय बोलतात, काय करतात. ते बालक पाहाते. देवदर्शनासाठी जमलेल्या गर्दीची दृश्ये टी.व्ही.वर बघते. वर्तमानपत्रात भक्तांच्या गर्दीचे फोटो न्याहाळते. देवाचा जयजयकार ऐकते. मोठे झाल्यावर देवाविषयी वाचते, ऐकते, पाहाते. समाजात सर्वत्र देवाचा उदो उदो होतो असे त्याला दिसते. त्यामुळे मेंदूत संस्कार दृढ होतात. डोक्यावर चढलेले हे भ्रामक संस्कारांचे गाठोडे झुगारून देणे अवघड असते. जगप्रसिद्ध नास्तिक रिचर्ड डॉकिन्स म्हणतात, "आपल्या बाळाला देवा-धर्माच्या संस्कारांचे विष आई स्वमुखातून पाजते. त्याचा परिणाम आयुष्यभर टिकू शकतो."
काही वैज्ञानिकांची देवावर श्रद्धा असते त्याचे कारण या लहानपणीच्या संस्कारात आहे. बालपणी मेंदूत कोरले गेलेले हे संस्कार दृढमूल होतात. मेंदूच्या एका कप्प्यात कायम राहातात. भांड्यावर कोरलेले नाव पुसून टाकणे जसे अवघड असते तसे हे मेंदूतील स्मृतिकेंद्रात कोरलेले संस्कार घालवणे दुरापास्त असते. या कारणाने बुद्धिमान वैज्ञानिकसुद्धा आस्तिक असू शकतात.
ईश्वराची संकल्पना प्रामुख्याने दोन स्तरांवर आहे. एक म्हणजे जगनिर्माता, जगन्नियंता, पूजा-अर्चा-प्रार्थना-स्तवने यांनी प्रसन्न होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटसमयीं धावून येणारा देव. हा उपासनेचा देव होय. बहुसंख्य आस्तिक हाच देव मानतात. त्याच्या कृपेसाठी व्रत-वैकल्ये, हवने-अनुष्ठाने करतात. दुसरा म्हणजे विश्वनिर्माता, निर्गुण, निराकार ईश्वर. त्याने केलेल्या नियमांनुसार विश्व चालते. विश्वरहाटीत तो कोणतीही ढवळाढवळ करीत नाही. या ईश्वराशी माणूस कोणत्याही प्रकारे संपर्क साधू शकत नाही. त्याचे केवळ अस्तित्व मानायचे. असा ईश्वर मानणार्‍या आस्तिकांचे प्रमाण अल्प आहे. त्यांत या आस्तिक वैज्ञानिकांचा समावेश होतो. म.फुलेसुद्धा असे आस्तिक होते. त्यांनी या परमेश्वरासाठी "निर्मिक" असा शब्द आपल्या लेखनात योजला आहे.
ईश्वराच्या अस्तित्वाविषयीं ज्यांचे कोणतेही ठाम मत नसते ते अज्ञेयवादी होत. विश्वनिर्माता परमेश्वर असेल अथवा नसेल असे ते म्हणतात. सुधारककार आगरकर अज्ञेयवादी होते. डार्विनपूर्वकालीन कांही वैज्ञानिक अज्ञेयवादी होते. कारण इतके आश्चर्यकारक वैविध्य असलेली जीवसृष्टी निसर्गत: निर्माण झाली हे त्यांना पटत नव्हते आणि कशी निर्माण झाली याचे बुद्धिगम्य स्पष्टीकरण मिळत नव्हते. डार्विनच्या उत्क्रांतिवादातील यादृच्छिक उत्परिवर्तन (रॅंडम म्युटेशन ) आणि अयादृच्छिक नैसर्गिक निवड (नॉन रॅंडम नॅचरल सिलेक्शन) या तत्त्वाने ते स्पष्टीकरण आता मिळते. किंबहुना या तत्त्वानुसार हे वैविध्य अपरिहार्य ठरते. डार्विनच्या तत्त्वांमुळे बौद्धिकदृष्ट्या समाधानी नास्तिक होता येते. म्हणून डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धान्तामुळे ज्ञानाच्या क्षेत्रातून ईश्वराची हद्दपारी अधोरेखित झाली असे म्हटले जाते.

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

1 Dec 2015 - 9:44 pm | मांत्रिक

यनावाला सर इज बॅक विथ अ बिग बँग...
बघूया पुढे काय होते ते.
विषय तर ज्वालाग्राहीच आहे नेहमीप्रमाणे...

मांत्रिक's picture

1 Dec 2015 - 9:47 pm | मांत्रिक

सर अजून तरी माणसाला निसर्गाविषयी निश्चित सांगता येतं का हो? कै च्या कै. फक्त एका तरी नैसर्गिक आपत्तीचे भविष्य विज्ञानाच्या मदतीने वर्तवा की सर.

मांत्रिक's picture

1 Dec 2015 - 9:52 pm | मांत्रिक

कुठे गेले प्रगो, संदीप डांगे, तुडतुडी, बाहुबली?
मंडळी पुन्हा या. जोरदार हमला हुवा है. बाहुबली तर गेले नर्मदा प्रदक्षिणेला. आता ४ ते ५ महिन्यांनीच भेटणार ते. असो.

संदीप डांगे's picture

1 Dec 2015 - 10:31 pm | संदीप डांगे

मांत्रिक, शांत व्हा बघू आधी.

चला तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ल्हानपणी, म्हणजे अगदी पहिली-दुसरीत असतांना, आपल्याला आपले शिक्षक ना, खूप हुशार, ज्ञानी वाटत असतात. कारण ते आपले गुरू असतात. आपण त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन ज्ञानसंपादन करत असतो. कालांतराने आपण मोठे होतो, जग फिरतो, व्यवहार माहिती पडतात, लाखो रुपयाच्या नोकर्‍या करतो, मान-मरातब-पुरस्कार मिळवतो. मग कधी गावात परत गेलो की आपल्याला ते शिक्षक भेटतात. आपल्या ल्हानपणच्या आठवणी काढून आपण कसे शेंबडे होतो, कसे तोतरे बोलायचो असे सांगतात. खरेतर, आपण आता तोतरे, बोबडे राहिलेले नसतो. तसेच त्यांनी आपल्याला जे सांगितले ल्हानपणी त्यातले बरेचसे खोटे होते हेही आपल्याला कळलेले असते. तुटपुंज्या पगारावर काम करत असणारे ते आयुष्यात फार काही करू शकण्याची क्षमता नसलेले गरिब लोक आहेत हे आपल्या लक्षात येते. त्यांच्या पेक्षा कैकपटीने ज्ञान, सन्मान, पैसा आपण कमावलेला असतो. पण...

तरिही आपण कितीही मोठे झालो तरी त्यांच्यासमोर नतमस्तकच होतो. कारण ते आपले एकेकाळचे गुरु असतात. गुरुंसमोर झुकणे हे शिष्याचे कर्तव्यच आहे.

यनावाला त्या शिक्षकांपैकी एक आहेत असे समजा आणि प्रणाम करा बघू...

मांत्रिक's picture

1 Dec 2015 - 10:45 pm | मांत्रिक

ओक्के! यनावाला सर प्रणाम!!! अज्ञानी बालकाकडून...

जानु's picture

1 Dec 2015 - 9:50 pm | जानु

आपल्या चिकाटीला सलाम. पण जो मुद्दा मांडता आहात त्याची माहिती व विवरण नाही. आपण ही माहिती कोठुन मिळविली की भौतिक वैज्ञानिक नास्तिक आहेत? आणि हे सर्वेक्षण कोणी केले? कधी? माहिती द्यायची ती पुराव्यानिशी हे तर पहिले वैज्ञानिक ग्रुहितक. आपण हे कसे विसरु शकतात? यालाच आम्ही एकांगीपणा (सभ्य भाषेत) असे म्हणतो.

याॅर्कर's picture

1 Dec 2015 - 9:58 pm | याॅर्कर

याचा शोध कधी लावणार शास्त्रज्ञ?

आताच हाती आलेल्या माहितिनुसार चखण्यामध्ये काहीही मिळणार नाही. तुम्हाला बॉयल्ड चना, सेंग, चकली वगैरे आधी ऑर्डर करावं लागेल.
नन्तर अंडे किंवा कोम्बडी ते साधारण खिशातील उपलब्ध रकमेवर ठरेल

मांत्रिक's picture

1 Dec 2015 - 10:56 pm | मांत्रिक

एक प्याक् आना रे लवकर. मंडळी खोळंबलीत.

राजेश घासकडवी's picture

2 Dec 2015 - 6:32 pm | राजेश घासकडवी

कसले जुन्या जमान्यातले प्रश्न विचारता हो... हे घ्या उत्तर.

अनुप ढेरे's picture

2 Dec 2015 - 9:42 pm | अनुप ढेरे

लेख वाचनीय आहे!

ट्रेड मार्क's picture

2 Dec 2015 - 9:55 pm | ट्रेड मार्क

डॉक्टर साहेब पण त्यांच्या लेखात म्हणतात की "या चक्राची उत्पत्ती नाही पासून झाली, हे सकृतदर्शनी संभवतच नाही. परमेश्वराने सगळे निर्माण केले. प्रजाती बदलत नाहीत या गृहीतकाला पुष्टी मिळते.".

म्हणजे तुम्हाला पण परमेश्वर आहे हे मान्य आहे?

संदीप डांगे's picture

2 Dec 2015 - 10:05 pm | संदीप डांगे

तुम्ही अर्धवट वाक्य उचलत. पूर्ण उतार्‍यात ते परमेश्वराचा अस्तित्व मान्य करत नाहीत असे दिसतंय.

सर्वसाक्षी's picture

1 Dec 2015 - 9:58 pm | सर्वसाक्षी

देवावर श्रद्धा १०% वैज्ञानिक ठेवतात कारण ते संस्कार विसरु शकत नाहीत.

ठिक आहे. उरलेले ९०% एका प्रश्नाचे उत्तर विज्ञानाच्या आधारे देउ शकतील का? कॅन्सर कशामुळे होतो याच्या बर्‍याच थिअरी आहेत पण जगातील तमाम व्यसने करणारे अनेकजण मस्त जगत असताना कसलं कुपथ्य सोडाच, घराबाहेर क्वचितच जेवणार्‍या एखाद्या लेकुरवाळीला आपल्या लेकरांकडे उघड्या डोळ्यांनी बघत असहाय्यपणे आतड्याच्या कॅन्सरने जग सोडुन का जावे लागते?

ईज्ञानाला असा कोंडित पकडणारा प्रश्न विचरायचा नै. किती दुत्त दुत्त आहात तुम्ही. कळतच नै तुम्हाला. असं मर्मावर बोट ठेवायचं नै राजे. भावना दुखावतात ना मेल्या वैज्ञानिकांच्या.

रामपुरी's picture

2 Dec 2015 - 12:06 am | रामपुरी

काय प्रश्न आहे..
देव/ईश्वर खरोखरीच असता तर असं का झालं असतं?
देवावर श्रद्धा ठेवणार्‍या १०% ना याचं उत्तर नक्कीच देता येईल. पूर्वजन्मीची कर्मफले, मोक्ष वगैरे वगैरे.

लोल

चालू द्या

प्रचेतस's picture

1 Dec 2015 - 10:00 pm | प्रचेतस

उत्तम लेख.

प्रसाद गोडबोले's picture

1 Dec 2015 - 11:11 pm | प्रसाद गोडबोले

यनावाला हे प्रकरण समजावण्यापलीकडे गेले आहे , त्यांच्याशी बोलायची इच्छा नाही पण वल्ली सर तुम्ही सुध्दा ?

बरं आता आमच्या काही प्रश्नांची उत्तरे द्या :

१)आस्तिक म्हणजे काय ? खरा अर्थ काय ?
२) देव म्हणजे काय ? खरा अर्थ काय ?
३) वैदिक तत्वज्ञानाचा बेस आधार जो की जैमिनीचे सांख्यदर्शन , तो देव ह्या संकल्पने विषयी काय म्हणतो ?
४) त्यापुढे विकसीत झालेल्या पातंजलीच्या योगदर्शनात देव ह्या संकल्पनेत काय बदल आहे ?
५) वैदिक धर्मातील देव कल्पना आणि मध्यपुर्वेतील देव कल्पना ह्यात काही फरक आहे की नाही ?
६)रीचर्ड डॉकिन्स आणि डार्विन ह्यांची मते ही मध्यपुर्वेतील देव ह्या क्लपनेला धरुन असतील तर ती हिंदु वैदिक देव ह्या कल्पनेला तशीच लागु पडतील काय ?
७) नासदीय सुक्तामधील ह्या शेवटच्या श्लोकाचा अर्थ काय ?
इ॒यं विसृ॑ष्टि॒र्यत॑।आअब॒भूव॑ यदि॑ वा द॒धे यदि॑ वा॒ न ।
यो।आस्याध्यक्षः परमे व्योमन्त्सो।आङ्ग वेद यदि वा न वेद ॥ ७ ॥

संदीप डांगे's picture

1 Dec 2015 - 11:23 pm | संदीप डांगे

आम्हाला तर वल्ली दा यानावालांची फिरकी घेतायत असं एकूण वाटतंय...

प्रचेतस's picture

2 Dec 2015 - 6:54 am | प्रचेतस

फिरकी कशाला, यनावाला प्रामाणिकपणे त्यांचे मत मांडत आहेत आणि ते मला पटते. काही सदस्य मात्र योग्य प्रतिवाद न करता वैयक्तिक हल्ले करत आहेत असे दिसून येते.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Dec 2015 - 10:00 am | बिपिन कार्यकर्ते

सहमत.

संदीप डांगे's picture

2 Dec 2015 - 10:15 am | संदीप डांगे

तुम्हाला त्यांचे मत पटते हे सांगितल्याबद्दल धन्यवाद! माझे विधान मागे घेतो.

बाकी, काही सदस्य योग्य प्रतिवाद न करता हल्ले करत आहेत ह्यामागे धागालेखकांचे सदस्यांच्या योग्य प्रतिवादाला अजिबात उत्तर न देणे, गप्प बसणे हे कारण आहे असे निरिक्षण आहे. टवाळखोरी एकदम सुरु झालेली नाही. यनावाला आपल्याच विधानांना नीट समजू शकत नाहीत पण इतरांना मूर्ख, बेअक्कल, कमी बुद्धीचे, ब्रेनवॉश्ड असे लेबल चिकटवत आहेत. ही पण सभ्य भाषेतून केली जाणारी एक प्रकारची टवाळखोरीच आहे हे इथे नमूद करू इच्छितो. आपण विधान करावे पण कोणतीही जबाबदारी घेऊ नये अशा परिस्थितीत अजून काय होणार? हे सगळे टाळण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे यनावालांनी मैदानात उतरून प्रतिवादांचे उत्तर द्यावे किंवा सदस्यांनी त्यांना सरळ इग्नोर मारावे, गंभीरतेने घेऊ नये.

आपण चर्चा करतो तेव्हा दोन्ही बाजूंना नवीन माहिती होणे हेही आवश्यक आहे असे वाटते. भले दोन्ही बाजूंपैकी कोणीही आपली मत बदलण्यास तयार नसेल तरी वादप्रतिवादातून नवीन पैलू समजू शकतात. आस्तिकास/नास्तिकास आपण एका अमूक गोष्टींचा विचारच केला नव्हता हे लक्षात येऊन त्याची बाजू अजून मजबूत होण्यासाठी अधिक अभ्यासासाठी एखादा मुद्दा मिळतो. फार आदर्श परिस्थितीमधे दोन्ही बाजू एकदुसर्‍यांचे थोडेतरी मौलिक, महत्त्वाचे विचार अंगिकारण्यास सुरुवात करू शकते. पण चर्चेचे वातावरण 'तुम्ही किती मूर्ख, मी किती हुशार' असे प्रीडीफाईन्ड असेल तर टिंटलटवाळीव्यतिरिक्त काही होत नाही. चर्चेत भाग घेणारे सर्व सदस्य काही ना काही अभ्यास करून आपली मते मांडत आहेत. त्यामुळे ते निव्वळ टवाळखोरी करत आहेत हा आरोप मान्य होऊ शकत नाही.

तुमचं म्हणणं काहीअंशी मान्य.
अर्थात यनावाला धाग्यावर फारसे प्रतिवाद करत नसून ते प्रतिवाद म्हणून नवा धागा काढत आहेत असे त्यांच्या वाटचालीवरुन दिसते.

संदीप डांगे's picture

2 Dec 2015 - 6:46 pm | संदीप डांगे

ते प्रतिवाद म्हणून धागा काढत नसून फक्त आपले व्यक्तिगत चिंतन मांडत आहेत असे वाटते. हाही धागा बहुतेक मी उपस्थित केलेल्या इस्रोप्रमुखांच्या मुद्द्याबद्दलचे त्यांचे चिंतन आहे, प्रतिवाद नव्हे. प्रतिवाद असता तर तिथेच दिला असता. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की यनावाला यांनी माझ्या कुठल्यात प्रतिसादाला उत्तर दिले नाही. हेही खात्रीलायक सांगतो की माझा कुठलाच प्रतिसाद टवाळखोरीवाला नव्हता. त्यांना खुल्या चर्चेचे आवाहन होते. पण त्यांनी आपली बाजू मांडली नाही. त्यांचे विचार खालच्या एकाच वाक्यत दिसून येतात की ते किती कर्मठ नास्तिक आहेत पण त्याच बरोबर कमालीचे आस्तिकद्वेष्टेही आहेत.

"बुद्धिमान वैज्ञानिकसुद्धा आस्तिक असू शकतात"

याचा अर्थ काय असावा? आस्तिक बुद्धीमान नसतात? कारण बुद्धिमान वैज्ञानिक ही द्विरुक्ती आहे. सगळेच वैज्ञानिक बुद्धिमानच असतात. मग वैज्ञानिक नास्तिकच असतात. म्हणजे जे बुद्धीमान आहे ते नास्तिकच असतात. म्हणजेच जे आस्तिक आहेत ते निर्बुद्ध आणि जे नास्तिक तेच तेवढे बुद्धीमान. असा यनावालासाहेबांचा विश्वास आहे. ह्याबद्दल त्यांना कुठलाही पुरावा, संदर्भ द्यायचेच नाहीत.

त्यांनी धाग्यात विनासंदर्भ ९०%-१०% चे मनगढंत गणित ठोकून दिले. धागालेखक स्वतःला वैज्ञानिक विचारसरणीचे पुरस्कर्ता म्हणतात पण त्यांच्या कृत्यातून तसे काही निदर्शनास येत नाही हे वेळोवेळी इथे मांडले गेले आहे. त्यांच्या कथनी आणि करणी मधे अंतर दिसून येत आहे तरी आपल्यासारखे मान्यवर सदस्य त्यांची बाजू घेऊन प्रोत्साहन देत आहेत हे बघून वाईट वाटते. तुमची वैयक्तिक मते नास्तिक असू देत, माझीही आहेत. पण आपण दोघे आस्तिकांना निर्बुद्ध ठरवण्यासाठी धागे वा प्रतिसाद टाकत आहोत का? तसेच इथे कुणीही यनावालांना मूर्ख ठरवत नाही. मुद्दा एवढाच आहे की त्यांनी अशा जाहिर संस्थळावर येऊन संदर्भहिन, मुद्दाहिन, द्वेषपूर्ण बेताल बडबड करावी आणि इतर सदस्यांनी ती निमूटपणे ऐकून घेऊन 'वा वा छान छान' असे म्हणावे अशी अपेक्षा करावी हे साफ चुकीचे आहे.

मी आधीही म्हणालो तसं "तुम्ही मूर्खच आहात" ह्या इंटेशनने सुरु होणारे संभाषण हा संवाद राहत नाही, भांडण असतो. यनावाला इथे आस्तिकांचा अपमान करायला येत असतील तर त्यांचा सन्मान होईल ही अपेक्षा करणे चूक आहे.

जाहिर संस्थळावर आपले म्हणणे मांडायला त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे पण येणार्‍या प्रतिवादास योग्य ते उत्तर देण्याचीही जबाबदारी त्यांच्यावर येते. आपल्या जबाबदारीपासून पळ काढून नुसते स्वातंत्र उपभोगायचे हे भारतीय राज्यघटनेचे दाखले देणार्‍या, वैज्ञानिक विचारसरणीचे पालन करण्याचा दावा करणार्‍या नागरिकास शोभत नाही. अशा सदस्यास आपण प्रोत्साहन देणे ही पटले नाही. बाकी, ज्याचे त्याचे जैसे विचार.

राजेश घासकडवी's picture

2 Dec 2015 - 7:17 pm | राजेश घासकडवी

"बुद्धिमान वैज्ञानिकसुद्धा आस्तिक असू शकतात"

याचा अर्थ काय असावा? आस्तिक बुद्धीमान नसतात? कारण बुद्धिमान वैज्ञानिक ही द्विरुक्ती आहे. सगळेच वैज्ञानिक बुद्धिमानच असतात. मग वैज्ञानिक नास्तिकच असतात. म्हणजे जे बुद्धीमान आहे ते नास्तिकच असतात.

अहो या विधानातून एवढे टोकाचे अर्थ कसे काढता? बुद्धिमान/अबुद्धिमान, वैज्ञानिक/अवैज्ञानिक, नास्तिक/आस्तिक हे तीन वेगवेगळे व्हेरिएबल्स आहेत. त्यांमध्ये थोडंसं कोरिलेशन असेल, पण ते बुद्धिमान = वैज्ञानिक = नास्तिक असं सोप्पं नाहीये. तेच तर यनावाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्यांचं म्हणणं असं आहे की वैज्ञानिकदेखील आस्तिक असलेले दिसतात, आणि ते का या प्रश्नाचं उत्तर देणं महत्त्वाचं आहे. याचं कारण लोक त्यांच्याकडे बोट दाखवून 'बघा बघा, तो शास्त्रज्ञ आहे तरी त्याचा देवावर विश्वास आहे' हा जणू विज्ञानाचा दोष आहे असं समजून दाखवतात. असं का घडतं याची थोडक्यात कारणपरंपरा अशी की काही वेळा अभ्यासातून शिकलेल्या सत्यापेक्षा लहानपणी झालेल्या संस्कारातून स्वीकारलेलं सत्य अधिक प्रभावी ठरतं.

आता यात तक्रार करण्यासारखं काय आहे? उगाच त्यांच्या म्हणण्याचा गैरअर्थ काढून तो स्वतःचा अपमान वगैरे का म्हणून घ्यायचं?

संदीप डांगे's picture

2 Dec 2015 - 8:23 pm | संदीप डांगे

त्यांचं म्हणणं असं आहे की वैज्ञानिकदेखील आस्तिक असलेले दिसतात,

वैज्ञानिक असणे आणि आस्तिक/नास्तिक असणे हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. त्याची सरमिसळ करू नये. पण वैज्ञानिक असून बुद्धिमान असणे/नसणे असे दोन पर्याय असतात काय?

आणि ते का या प्रश्नाचं उत्तर देणं महत्त्वाचं आहे. याचं कारण लोक त्यांच्याकडे बोट दाखवून 'बघा बघा, तो शास्त्रज्ञ आहे तरी त्याचा देवावर विश्वास आहे' हा जणू विज्ञानाचा दोष आहे असं समजून दाखवतात.

लोक असे करतात कारण काही लोक 'वैज्ञानिक असणे म्हणजे देवावर विश्वास नसणे' असा समज धरून बसलेले असतात. वरच म्हटल्याप्रमाणे वैज्ञानिक असणे व आस्तिक/नास्तिक असणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे समजून घेणे दोन्ही बाजूंच्या लोकांसाठी आवश्यक आहे.

काही वेळा अभ्यासातून शिकलेल्या सत्यापेक्षा लहानपणी झालेल्या संस्कारातून स्वीकारलेलं सत्य अधिक प्रभावी ठरतं.

मागेच यांच्या धाग्यावर माझ्या एका प्रतिसादात मी हा मुद्दा मांडलेला की व्यक्तिचे आस्तिक/नास्तिक असणे हे लहानपणीच्या संस्कारावर अवलंबून नाही. व्यक्तिचे स्वतःच्या पिंडानुसार ते ठरते. ठरवून असे नास्तिक/आस्तिक मुले वाढवता येत नाहीत. परत आपण फक्त मान्यता स्विकारतो. 'आमच्या मान्यता ह्या सत्यच आहेत' याचा कोणताही पुरावा कोणाकडेच नसतो, नास्तिक वा आस्तिक दोघांकडेही.

शालेय अभ्यासातून सत्ये शिकल्या जात नाहीत तर फक्त इन्डॉक्ट्रीनेशन(मराठी शब्द?) होते. ज्याच्या पिंड-प्रकृतीमधे संशोधक वृत्ती टिकून राहते तेच पुढे ग्राउंडब्रेकिंग डिस्कवरीज करतात. बाकीचे संशोधक फार तर कुणाच्या हाताखाली त्यांच्या दिग्दर्शनात त्यांना आवश्यक असे शोध लावत असतात. स्वतंत्र विचार करण्याची कुवत फार थोड्या लोकांमधे शालेय शिक्षणानंतर कायम राहते. घरातील धार्मिक संस्कारातूनही फक्त इन्डॉक्ट्रीनेशन होते. शाळेत आणि घरात दोन्हीकडे 'प्रश्न विचारू नका' ही संस्कृती असतांना वैज्ञानिक विचार कुठे आणि कसा प्रकट होणार ह्याबद्दल कोणी फारसा विचार करत नाही.

ज्या पद्धतीने यनावाला आपले विचार मांडत आहेत त्यातून असे वाटते की तेही अशा वैज्ञानिक इन्डॉक्ट्रीनेशनचे बळी आहेत.

जर शाळेतून वैज्ञानिक विचारपद्धती शिकवल्या गेली असती तर खालील प्रश्न विचारणारे आपल्या अवती-भवती खूप असते.
justthinking

बाकी मान-अपमान हा अर्थ त्यांच्या फक्त एका वाक्यावरून काढलेला नाही. आतापर्यंत च्या सर्व धाग्या-प्रतिसादाच्या अंडरकरंट जी भावना आहे ती काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न आहे. तरीही माझे काही चुकत असेल तर नक्की सांगावे.

मांत्रिक's picture

2 Dec 2015 - 8:25 pm | मांत्रिक

झकास प्रतिवाद डांगेसाहेब!!!

सुबोध खरे's picture

3 Dec 2015 - 10:01 am | सुबोध खरे

कारण बुद्धिमान वैज्ञानिक ही द्विरुक्ती आहे. सगळेच वैज्ञानिक बुद्धिमानच असतात
हे पटले नाही. एम एस सी करून किंवा विज्ञानाच्या एका शाखेच्या एका विषयाच्या एका अंगावर संशोधन करून पी एच डी झालेले शेकड्यांनी वैज्ञानिक CSIR च्या प्रयोगशाळेत सापडतात.नोकरीसाठी आटापिटा करून ते त्या विषयापुरते ज्ञान मिळवून आलेले असतात आणी पुढे काहीही करण्याची ना त्यांच्यात इच्छा असते, ना आपल्या विषयात पुढे सखोल ज्ञान मिळवण्याची आकांक्षा. आयुष्यभर पाट्या टाकत कालमान्य बढती घेत वरच्या पदावर चढलेले हे वैज्ञानिक आपल्याला भारंभार मिळतात.यामुळेच भारतात एवढ्या "संशोधन"संस्था असूनही मुलभूत किंवा औद्योगिक संशोधन करणाऱ्या संस्था किंवा वैज्ञानिक हाताच्या बोटावर मोजण्या इतके कमी आढळतात.
हे म्हणजे सर्वच प्राध्यापक किंवा डॉक्टर "विद्वान" असतात म्हणण्यासारखे आहे.
पदवीचा आणी ज्ञानाचा परस्पर संबंध नाही.
बाकी चालू द्या.

संदीप डांगे's picture

3 Dec 2015 - 10:19 am | संदीप डांगे

डॉक्टरसाहेब, सहमत आहे.

हेच मी खाली एका प्रतिसादात मांडले आहे. यनावाला ज्या वैज्ञानिकांचा दाखला देतायत मी त्यांच्या बद्दल बोलत आहे. नुसतं लॅबमधे चंचूपात्रांशी खेळतो म्हणून कोणी वैज्ञानिक होत नाही. दिवसभर कठीणातल्या कठीण शस्त्रक्रिया करून रुग्णांचे प्राण वाचवणारे, हे यश दिल्याबद्दल, संध्याकाळी देवासमोर नमस्कार करत असतातच. त्यांना 'बुद्धीमान' म्हणावे की नाही?

रुढ सामाजिक मान्यतांना धक्का देणारे संशोधन करणारे अगदी बोटावर मोजण्यासारखे असतात. ह्या बोटांवर मोजल्या जाणार्‍यांना तरी आपण 'विद्वान/बुद्धीमान' म्हणूया का?

प्रसाद गोडबोले's picture

2 Dec 2015 - 1:21 pm | प्रसाद गोडबोले

यनावाला प्रामाणिकपणे त्यांचे मत मांडत आहेत आणि ते मला पटते. काही सदस्य मात्र योग्य प्रतिवाद न करता वैयक्तिक हल्ले करत आहेत असे दिसून येते.

१)धार्मिक टिप्पाण्णी विषयी मिसळ्पाव चे धोरण कायआअणि समजा कोणी व्यक्ति अशी टिप्पण्णी करीत असेल तर त्याचा प्रतिवाद कसा करायचा ? असा प्रश्न मी संपादक मंडळाला विचारला होता , कदाचित संपादक मंडळ सुट्टीवर गेल्याने अजुन तरी त्याला काही उत्तर आलेले नाहीये .

२) यनावालांशी आमची काही खानदानी दुश्मनी नाही की त्यांच्याशी वैयक्तिक वाद करावा . वयोमानानुसार माणसांची मते दृढ होत जातात आणि मग ती कितीही चुकीची असली तरीही बदलणे प्रचंड अवघड रादर अशक्यप्राय असते हे कालातीत सत्य आहे . समजा यनावाला ह्यांच्या प्रत्येक मुद्द्याचा प्र्रतिवाद करुन , त्यांच्या व्याखाच चुकीचा आहेत मग सिध्दांतही चुकीचे निघणार हे दाखवुन दिले तर यनावाला " ओके , तुअमचे मत पटत आहे , ह्यावर जरा वाचन आणि चिंतन करुन पहातो" असे आश्वासन देणार काय की " चालु दे तुमचे निरर्थक अत्मरंजन ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ " असे अत्मसत्य फेकुन मारणार ?

३) परवाच अजित डोवल सरांचे एक अप्रतिम भाषण ऐकले ( गुगल सर्च - युट्युब अजित डोवल - डिफेन्सिव्ह ऑफेन्स ) , त्यात ते म्हणतात समजा कोणी तुमच्यावर दगड फेकुन मारत असेल अन तुम्ही केवळ बचाव म्हणुन ते दगड अडवत असाल तर ह्या गेम मधे द बेस्ट यु कॅन डु इज स्टेल मेट . समोरच्या कडचे दगड संपले की तो थांबेल , पण मोस्ट प्रोबॅब्ली , एखादा तरी दगड तुम्हाला लागणारच , म्हणुन आपण केवळ डिफेन्स न करता डिफेन्सिव्ह ऑफेन्स केला पाहिजे, तुम्ही एक दगड फेकुन मारलात तर आम्ही तुमचेच दगड तुमच्यावरच फेकुन मारुइ, इतके की तुमचा दगड फेकणारा हात दुखावला जाईल . ह्या निमिताने आमच्या आवडत्या राष्ट्राध्यक्षांचे वाक्य आठवले- स्पीक सॉफ्टली अ‍ॅन्ड कॅरी अ बिग स्टीक !!
मागे म्हणल्या प्रमाणे यनावालांवर कोणी सश्रध्द माणुस सक्ती करत असेल तर त्यांचा त्रागा समजु शकतो , त्यांच्या गह्री रोज कोणी सनातन प्रभात टाकत असेल तर त्यांनी इथे कळवावे आपण डायरेक्ट आठवले सरांशी बोलु ह्या विषयावर !
पण उगाचच त्यांना कोणीही डिवचले नसताना ते सतत इतरांना डिवच्त असतील तर त्यांच्या विरुध्द डोवल सरांचे धोरण स्विकारावेच लागेल .

४) आणि कृपया वरील विधानाचा अर्थ "कोणी धर्म चिकित्सा करुच नये " असा काढु नये , धर्मचिकित्सा इज ऑल्वेज वेल्कम . अगदी चार्वाकापासुन ते साळुंखेसरांपर्यंत अनेकांनी धर्म चिकित्सा केली आहेच ! यनावालांनीही करावी ना , आम्हाला आनंदच आहे , यनावालांनी योग्य ते रेफरन्सेस द्यावे , त्यावर त्यांचे अनुमान , चिकित्सा मांडावी . प्रतिवादी पक्षाला चिकित्सा मतखंडन करायची संधी द्यावी , आणि यदाकदाचित मत खंडन झाले तर ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊ म्हणुन पळ काढु नये . इतकीच अपेक्षा आहे ! नाहीतर उगाचच "देवा-धर्माच्या संस्कारांचे विष आई स्वमुखातून पाजते. " असली भडक स्वमातांध मते टाकुन ( तेही योग्य तो रेफरन्स न देता ) पळ काढणे म्हणजे धर्मचिकित्सा नव्हे , ही सरळ सरळ चिखलफेकच आहे !

५) धर्मचिकित्सा ही तांदळातील खडे काढण्यासारखी असावी असे आमचे वैयक्तिक मत आहे , एखादा खडा सापडलाच तर खडा काढुन फेकुन द्यावा , पण काही खडे आहेत म्हणुन तांदुळच फेकुन देणे हा कोण शहाणपणा ?

नाखु's picture

2 Dec 2015 - 2:09 pm | नाखु

उत्तर प्रतीसाद मिळणार नाही हे मी खात्रीने सांगू शकतो..

अगदी जेष्ठ (?) आणि श्रेष्ठ (?) मिपाकरांकडूनही.

तुझ्या-माझ्याक्डे फक्त खडेच आहेत तांदूळ नाही हेच त्यांना सिद्ध करायचे आहे त्याला कोण काय करणार.....

देव आहे असे मानणारा पण असेल हरी तर देईल घरच्याघरी अशी भाबडी +खुळचट अपेक्षा अजिबात नसलेला.

प्रचेतस's picture

2 Dec 2015 - 2:40 pm | प्रचेतस

धार्मिक टिप्पाण्णी विषयी मिसळ्पाव चे धोरण कायआअणि समजा कोणी व्यक्ति अशी टिप्पण्णी करीत असेल तर त्याचा प्रतिवाद कसा करायचा ?

धार्मिक टिप्पणी ही वैयक्तिक कशी होऊ शकते?

समजा यनावाला ह्यांच्या प्रत्येक मुद्द्याचा प्र्रतिवाद करुन , त्यांच्या व्याखाच चुकीचा आहेत मग सिध्दांतही चुकीचे निघणार हे दाखवुन दिले तर यनावाला " ओके , तुअमचे मत पटत आहे , ह्यावर जरा वाचन आणि चिंतन करुन पहातो" असे आश्वासन देणार काय की " चालु दे तुमचे निरर्थक अत्मरंजन ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ " असे अत्मसत्य फेकुन मारणार ?

हे 'जर तर' कशाला? यनावालांचे सिद्धांत चुकीचे आहेत हे सप्रमाण सिद्ध करुन दाखवा मग पुढे बोलू.

पण उगाचच त्यांना कोणीही डिवचले नसताना ते सतत इतरांना डिवच्त असतील तर त्यांच्या विरुध्द डोवल सरांचे धोरण स्विकारावेच लागेल .

परत तेच. यनावालांनी वैयक्तिकरित्या कोणाला डिवचले आहे तो मुद्दा दाखवा. माझ्या निदर्शनास तसे कोठेही आले नाही.

उर्वरित चौथ्या आणि पाचव्या मुद्द्यांबाबत तुमच्याशी सहमत.

नाखु's picture

2 Dec 2015 - 5:02 pm | नाखु

फक्त एकाच प्र्श्नाचे उत्तर द्या...

तुम्ही देव वगैरे मानत नाहीत (ठीक आहे,ही मते वयक्तीक आहेत आणि त्या मतांचा आम्हाला नितांत आदर आहे)

आम्ही अस्तीक आहोत पण अंधश्रद्द नाही आहोत, आणि नेमका लेखक मजकूरांना(अर्थात त्यांचे बाजूने बाकडे वाजविणार्या) त्याचा रास्त आदर आहे का नाही त्यांच्या प्रतीवादातून्/धाग्यातून ध्वनीत झालेले नाही.

खूप भिन्न आणि ठरवून एक्मेकांशी संबध जोडून सगळ्यांना (शाब्दीक) झोडपायचा प्रकार एकूणच ऊबग आणणारा आहेच पण त्या विचारांमागची कळकळ आणि प्रामाणीक हेतुंबद्दल विनाकारण साशंकता,अप्रियता,उद्वेग निर्माण करणारा आहे.

एकूणच भारतीय लोकानी अस्तिकपणा, अध्यात्म , जप मंत्र कृपा, धर्म यांचा एकमेकाशी विनाकारण संबंध आणून गोंधळच घातलेला दिसतो.

टीप हे अवतरण आम्चे अगदी मर्मबंधीय आहे आणि याचा साक्षात्कार गेल्या पंधरा दिवासात ४-५ वेळा आला आहे.

बाकी चालू द्या...

प्रचेतस's picture

2 Dec 2015 - 5:28 pm | प्रचेतस

अहो पण तुम्ही प्रश्नच विचारलेला नाही तर उत्तर कशाचे देऊ? =))

नाखु's picture

3 Dec 2015 - 9:04 am | नाखु

आहे

त्यांना आस्तीकांबद्दल किमान आदर आहे का? का तेही त्यांच्या समर्थकांप्रमाणे सर्व आस्तीकांची खालील सर्वांबरोबर जमेस धरण्याची गल्लत करतात ( त्यांच्या दृष्टीने सब घोडे बारा टक्के मध्ये गणतात)

आस्तीक-कर्मकांडाभिलाषी-धार्मीक-कट्टर धर्ममार्तंड-मंत्रपठण करणारे-वेगवेगळ्या पंथांचे+बाबांचे भक्त-प्रथा पाळ्णारे परंपरावादी हे एकाच तागड्यात न टाकण्यालायक आहेत आणि अग्दी सरमिसळ न करण्याचे अशे एक्मेकांहून भिन्न आहेत. आणि म्हणूच त्यांनी समूहाने किंवा व्य्क्तीशः काही मुद्दा/विषञ मांडला तरच यनावाला यांनी प्रतीवाद करतानाही त्या त्या विचारानुसारच करावा.

मागे ही मिपावर सरसकट सर्व वैद्यकीय व्यावसायींकावर धागा काढला गेला तेव्हांही वेग्वेगळ्या पॅथींबद्दल मत-मतांतरे होतीच.जसे कुठल्या रूग्णाने बरे होण्यासाठी कुठल्या पॅथीने उपचार घ्यावेत हा सर्वस्वी त्याचा व त्याच्या खासगी प्रश्न आहे.(आणि त्याच्या उपचार पद्धतीचा इतरांना त्रास-उप्द्रव-व विद्य्मान काय्द्याचा भंग होत नाही तर इतरांस आ़क्षेप असण्याचे कारण नाही)

तसेच आस्तीक असणे सर्वस्वी खासगी बाब असून जोपर्यंत ती व्यक्ती त्याची कुणावरही जबरदस्ती/आग्रह्/गर्व करीत नाही तोपर्यंत त्याला हिणवण्याचा आणि वरील सर्वांवर (ठळक अक्षरातील) ताशेरे ओढताना आस्तीकांना झोडपू नये इअतकी अपेक्षा गैर आहे काय?

या ईश्वराशी माणूस कोणत्याही प्रकारे संपर्क साधू शकत नाही. त्याचे केवळ अस्तित्व मानायचे. असा ईश्वर मानणार्‍या आस्तिकांचे प्रमाण अल्प आहे. त्यांत या आस्तिक वैज्ञानिकांचा समावेश होतो. म.फुलेसुद्धा असे आस्तिक होते.

सध्याच्या काळात चौकस बुद्धीने आणि इतरही अनेक सुधारक बाबींमुळे जे "असा ईश्वर मानणार्‍या आस्तिकांचे प्रमाण अल्प आहे." लक्षणीय रीत्या वाढत आहे त्यांना मुद्दाम हिणवून कुणीही पुरोगामी ठरणार नाही किंवा सुधारक होणार नाही. मी इश्वर मानीत नाही असा सतत दंभ+दुराभिमान असणे (आणि तो सतत दाखवण्याची हौस असणे) हे सुधारकाचे लक्षण नाहीच नाही.

या धाग्यावर बरेच मुद्देसूद प्रतीवाद आले आहेत पण डॉ सुधीर सारखे यनावाला येऊन कधीही सरमिसळ न करता निराकारण का करीत नाहीत ? का तशी अपेक्षा धरणे हीच अंधश्रद्धा आहे.

अज्ञ बालक नाखु

प्रचेतस's picture

3 Dec 2015 - 9:10 am | प्रचेतस

माझे म्हणणे इतकेच आहेकी यनावालांनी कुणालाही (अगदी कुणालाही) वैयक्तिकरित्या टार्गेट केलेले नाही. त्यांचे एकूण विधान समाजाच्या सर्वसाधारण धर्मभोळ्या मानसिकतेबद्दल आहे असे माझे मत. पण कुण्या एका समाजाच्या भावना दुखावल्या जातात म्हणून त्यावर टीकाच करु नये असे काही आहे का?

असो.
ह्या धाग्यावर माझा हा आता शेवटचा प्रतिसाद.
अश्रद्ध विरुद्ध सश्रद्ध हा वाद सनातन असून कधीच मिटणार नाही हेच खरे.

अनुप ढेरे's picture

3 Dec 2015 - 4:02 pm | अनुप ढेरे

अश्रद्ध विरुद्ध सश्रद्ध हा वाद सनातन असून कधीच मिटणार नाही हेच खरे.

टनाटन म्हणायचय का आपल्याला?

अर्धवटराव's picture

5 Dec 2015 - 1:35 am | अर्धवटराव

माझे म्हणणे इतकेच आहेकी यनावालांनी कुणालाही (अगदी कुणालाही) वैयक्तिकरित्या टार्गेट केलेले नाही.

आस्तिक, आध्यात्मीक वगैरे बाबी सरसकट भोळसटपणा आणि तर्कविहीन मुर्खपणा आहे हा जो सदर लेखकाचा विचार त्यांनी संस्थाळावर मांडला आहे आहे तो भलेही कोणा व्यक्तीला टार्गेट करत नसला तर ते एक ब्लँकेट टार्गेटींग आहे. आध्यात्म हि जिज्ञासा-तर्क-प्रयत्न-अनुभव अशी श्रुंखला आहे असं जर कोणि सांगत असेल तर निदान दुसरी बाजु ऐकुन घेऊन आपली मतं तपासुन बघावी हा कॉमनसेन्स आहे. पण तसं न करता आपली तर्ककर्कश्शता रेटत राहाणं म्हणजे इतरांना टार्गेट करण्याचा अजेंडा राबवणंच आहे.
असो. इग्नोर करण्याचं ऑप्शन आहेच :)

कवितानागेश's picture

6 Dec 2015 - 8:17 am | कवितानागेश

खरा वैताग येतो तो ज्ञानेश्वरान्च्या लेखनाबद्दल बाष्क ळ प्रतिवाद केले जातात तेंव्हा.
धड़ आसनांची नावे देखील माहीत नसताना डायरेक्ट योगाभ्यासातल्या उच्च कोटीच्या अनुभवाला चर्चा देखील न करता खोटे ठरवने हां ***पणा आहे!

प्रसाद गोडबोले's picture

2 Dec 2015 - 5:19 pm | प्रसाद गोडबोले

धार्मिक टिप्पणी ही वैयक्तिक कशी होऊ शकते?

संविधानाने ज्याला त्याला आवडेल तो धर्म आचरण्याचे स्वातंत्र्य दिले आहे म्हणुन धर्म ही वैयक्तिक चॉईसच आहे आणि म्हणुनच वैयक्तिक बाब आहे. यनावाला नास्तिक आहेत तर आमची त्याला काही हरकत नाही , त्यांचे विचार त्यांन्ना लखलाभ असो, नास्तिक लोकांवर टीका करणारा एक जरी धागा आम्ही लिहिला असेल तर दाखवा .

हे 'जर तर' कशाला? यनावालांचे सिद्धांत चुकीचे आहेत हे सप्रमाण सिद्ध करुन दाखवा मग पुढे बोलू.

हा हा . त्यांच्या आस्तिक , देव , विज्ञान ह्या शब्दांच्या व्याख्येतच चुक आहे हे मी गावडे सरांना लिहिलेल्या खव मधे स्पष्ट केले आहे . )स्वतंत्र धागा लिहायची इच्छा नाही , आम्ही धागा काढला की आम्ही जाहिरात करतो अशी आमच्यावर टीका होते !) आणि माझा आधीचाच मुद्द की कोणीही सश्रध्द व्यक्ती यनावालांवर धर्माचरणाची सक्ती करायला गेलेलो नाहीये , तीच विनाकारण आणि कैच्याकै चिखलफेक करत आहेत त्यांच्यावर मग सश्रध्द लोकांनी डिफेन्सीव्ह मोड मधे का जायचे ?
बरं सप्रमाण सिध्द करुन दाखवले तर यनावाला काहीही प्रत्युत्तर न देता गप्प रहातात असे दिसले आहे , संदर्भासाठी त्यांच्या आधीच्या धाग्यावर केलेल्या प्रतिवादाच्या लिन्क्स देवु का इथे ?

परत तेच. यनावालांनी वैयक्तिकरित्या कोणाला डिवचले आहे तो मुद्दा दाखवा. माझ्या निदर्शनास तसे कोठेही आले नाही.

तुमचेही परत तेच ! धर्म ही वैयक्तिकच बाब आहे ! मागे आपल्याच कंपुतील कोणी तरी एक अप्रतिम मेसेज पाठवला होता : Religion is like a d*ck , its ok to have one , Its ok to be the proud of it . But don't pull it out in public and start screaming that mine is better. Keep it to yourself ! हाच तर्क धर्म नसलेल्यांच्या बाबतीतही लागु पडतो , बरं तुम्हाला नाहीये ना धर्म ठीक आहे , तुम्हाला ह्या गोष्टीचा अभिमान आहे ठीक आहे , काही हरकत नाही , फक्त पब्लिकली ह्या गोष्टीचा तमाशा मांडु नका !

बाकी यनावाला ह्यांना धर्मचिकित्सा करायची असल्यास त्यांचे स्वागतच आहे , त्यांनी संदभासकट स्वतःची मते मांडावीत अन प्रतिवादासाठी तयार रहावे :) पण "आई बाळाला देवाधर्माच्या संस्कारांचे विष पाजते" हे असली भडक विधाने म्हणजे चिकित्सा नव्हे . हे म्हणजे निव्वळ उचकावणे झाले !

तो धर्म आचरण्याचे स्वातंत्र्य दिले आहे म्हणुन धर्म ही वैयक्तिक चॉईसच आहे आणि म्हणुनच वैयक्तिक बाब आहे

खी खी खी. तुम्हाला गावरान मटण अवडते म्हणून ती तुमची वैयक्तिक बाब आहे आणि त्यावर कोणी टीका करू नये असे म्हणण्यासारखे वाक्य आहे आहे. तुमचेच एक फ़ेवरिट वाक्य ' लाइफ़, लिबर्टी आणि पर्स्युट ऑफ़ ह्याप्पीनेस' हे इथे प्रकर्षाने अठवते.

बाकी धर्म ही वैयक्तिक बाब नसून सामाजिक बाब आहे असे आमचे मत. प्रत्येकाने आपला धर्म चार भिंतींच्या आत पाळावा.

त्यांच्या आस्तिक , देव , विज्ञान ह्या शब्दांच्या व्याख्येतच चुक आहे हे मी गावडे सरांना लिहिलेल्या खव मधे स्पष्ट केले आहे

इथेच लिहा की, यनावाला गावडे सरांच्या खवत कशाला जातील. प्रतिवाद जेथल्या तेथे करावा हे उत्तम. हेच यनावाला यांनाही लागू आहेच.

, तुम्हाला ह्या गोष्टीचा अभिमान आहे ठीक आहे , काही हरकत नाही , फक्त पब्लिकली ह्या गोष्टीचा तमाशा मांडु नका !

धर्म मानणार्यांनी कोकिळव्रत, शनिउपासना, आरत्यांवर कैच्या कै लिहिलेले का चालते मग?

बाकी अशा वादविवादांमुळे आणि भक्तांच्या अंगावर येण्याच्या वृत्तीमुळे आमचे एक मानसशास्त्रात जाणकार असलेले मित्र हल्ली अशा विषयांवर लिहायला धजावत नाहित.

प्रसाद गोडबोले's picture

2 Dec 2015 - 5:50 pm | प्रसाद गोडबोले

तुम्हाला गावरान मटण अवडते म्हणून ती तुमची वैयक्तिक बाब आहे आणि त्यावर कोणी टीका करू नये असे म्हणण्यासारखे वाक्य आहे आहे.

अगदी हेच असेच मत आहे, आम्हाला आवडती मटन भाकरी आम्ही खातो , ज्यांना आवडत नाही त्यांनी खवु नये . उगाच कशाला आमच्या वर हिंसावादी म्हणुन टीका करता ? केलीच तर आम्ही तुमच्यावर घासफुस वाले गायभईस अशी टीका करणारच की =))

लाइफ़, लिबर्टी आणि पर्स्युट ऑफ़ ह्याप्पीनेस ह्याती ह्यॅप्पीनेस ही सॅडीझम मधुन म्हणजे दुसर्‍याला त्रास देवुन आलेली नसली पाहिजे ही मुलभुत अट आहे सर !!!!

प्रतिवाद जेथल्या तेथे करावा हे उत्तम.

त्यांचा प्रतिवाद करुन मीच काय अनेक जण कंटाळलेल्त , ते एकतर पळ काढतात किंवा नवीन चुल मांडतात , म्हणुन तर मी त्यांच्या लेखावर प्रतिसाद न देता केवळ आपल्या एका प्रतिक्रियेवर प्रतिसाद दिला होता .

बाकी अशा वादविवादांमुळे आणि भक्तांच्या अंगावर येण्याच्या वृत्तीमुळे आमचे एक मानसशास्त्रात जाणकार असलेले मित्र हल्ली अशा विषयांवर लिहायला धजावत नाहित.

मग यनांनी जिथल्या तिथे प्रतिवाद करावा ना !!! उगाच आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी ह्याला काय अर्थ आहे ?
बाकी कोण धावुन गेले हो सरांच्या अंगावर ? मला सांगा , आपण त्यांची चादर चोरुन सत्यनारायण घालु =))))

मांत्रिक's picture

2 Dec 2015 - 5:56 pm | मांत्रिक

+१११ प्रगोसाहेब,
कोणीही यनावाला सरांना जबरदस्ती आमची मते मान्य करा म्हणून सक्ती केलेली नाही. मी त्यांना यापूर्वी पण विनंती केलेली होती की अशा ऋणात्मक स्वरुपाच्या कार्यापेक्षा विज्ञानातील नवनवे शोध, प्रवाह, शास्त्रज्ञांच्याबद्दल माहिती, यावर लेख लिहुन धनात्मक प्रचार करावा. त्यातून सुद्धा लोकांचे लक्ष वेधता येऊ शकते. पण तिथेही यनावाला सरांनी सोयिस्कर मौन बाळगलेले आहे.

प्रचेतस's picture

2 Dec 2015 - 6:07 pm | प्रचेतस

खी खी खी.
त्यांनी पण कुणाला जबरदस्तीने माझी मते मान्य कराच असे लिहिलेले दिसले नाही.

प्रसाद१९७१'s picture

2 Dec 2015 - 6:12 pm | प्रसाद१९७१

त्यांनी पण कुणाला जबरदस्तीने माझी मते मान्य कराच असे लिहिलेले दिसले नाही.

यनावाला, त्यांची मते मान्य नसणार्‍यांना डायरेक्ट निर्बुद्धच ठरवतात.

प्रचेतस's picture

2 Dec 2015 - 6:26 pm | प्रचेतस

उदाहरणार्थ?

प्रचेतस's picture

2 Dec 2015 - 8:14 pm | प्रचेतस

मी अगदी शब्दांचा कीस काढत नसलो तरी अज्ञानमूलक किंवा अशोभनीय ह्याचा अर्थ निर्बुद्ध असा कुठल्याही प्रकारे होत नाही.

बाकी माझे वैयक्तिक मतही हिंदू हा धर्म नसून ती एक संस्कृती, एक जीवनपद्धती आहे असेच आहे. अर्थात सामाजिक जीवनाच्या सोयीसाठी ती धर्माचे (रिलिजन ह्या अर्थी) रूप घेऊन आली हे ही खरेच.

ठीक आहे. एक सांगा - "हिंदु धर्माविषयी दुसर्‍याने मांडलेले विचार पटले नाहीत म्हणून ते अज्ञानमूलक आणि अशोभनीय आहेत" या विचारपद्धतीला तुमचा पाठिंबा आहे का?

(सरळ सोपा प्रश्न आहे, हो किंवा नाही मध्ये उतर येण्यास हरकत नसावी.)

प्रचेतस's picture

2 Dec 2015 - 8:22 pm | प्रचेतस

नाही.
अर्थात इतरांनीही त्यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टिप्पण्या तुम्हाला पटत नसतील हे गृहित धरतो.

मोदक's picture

2 Dec 2015 - 8:36 pm | मोदक

पटत नाही.

पण इतरांनी तशा टिप्पण्या कराव्यात अशी परिस्थीती त्यांनी स्वतः तयार केली आहे असे माझे वैयक्तीक मत आहे.

प्रसाद१९७१'s picture

3 Dec 2015 - 10:11 am | प्रसाद१९७१

हे वाचल्यावर श्रद्धाळूंच्या भावना दुखावतात. ज्याची सत्यता कुणाही सुबुद्ध व्यक्तीला पटावी असे सत्य सुसंस्कृत भाषेत निदर्शनाला आणल्यावर श्रद्धाळूंच्या भावना का दुखावतात?

@प्रचेतस - हे बघा यनांच्या लेखातले वाक्य. ते जे म्हणत आहेत ते मान्य असेल तर ती व्यक्ती सुबुद्ध आणि नाही तर निर्बुद्ध का कुबुद्ध. मुळात शहाणपणाचा आव आणुन लोकांना तू चुकतो आहेत, मूर्ख आहेस हे म्हणायला जावेच का? तो अधिकार कोणी कोणाला दिलाय का? कोणी त्यांच्या मते असलेले निर्बुदमा, त्यांच्या कडे काही मदत मागायला गेले आहेत का? किंवा त्यांनी कोणावर काही उपकार केले आहेत का की त्यांनी लोकांना अक्कल शिकवावी.

हे लिहायचे नव्हते, पण सांगावे लागते. मी पूर्ण नास्तिक आहे, पण कोणाला तू नवस का करतोस, देवळात का जातोस वगैरे विचारत नाही. मी साधारण बारावीत नास्तिक झालो. त्या नंतर ३-४ वर्ष मित्रांशी वाद वगैरे घालायचो ह्या विषयावर, तेंव्हा माझी भुमिका यनावालांसारखी असायची. पण नंतर मी नास्तिक च राहीलो पण लोकांच्या मतांमधे नाक खुपसुन त्यांना अक्कल शिकवणे बंद केले. कदाचित यनावालांना ते शहाणपण यायचे आहे.

शेवटचा परिच्छेद लाजवाब. कुडन्ट अग्री मोअर. हेच आणि असेच विचार आहेत.

मारवा's picture

3 Dec 2015 - 1:57 pm | मारवा

हे लिहायचे नव्हते, पण सांगावे लागते. मी पूर्ण नास्तिक आहे, पण कोणाला तू नवस का करतोस, देवळात का जातोस वगैरे विचारत नाही. मी साधारण बारावीत नास्तिक झालो. त्या नंतर ३-४ वर्ष मित्रांशी वाद वगैरे घालायचो ह्या विषयावर, तेंव्हा माझी भुमिका यनावालांसारखी असायची. पण नंतर मी नास्तिक च राहीलो पण लोकांच्या मतांमधे नाक खुपसुन त्यांना अक्कल शिकवणे बंद केले. कदाचित यनावालांना ते शहाणपण यायचे आहे.

वरील प्रतिसादकाच्या जर मी चुकत नसेल तर वरील दुसरा जो प्रतिसाद आहे त्याच्याशी आपण सहमती दर्शवलेली आहे.

शेवटचा परिच्छेद लाजवाब. कुडन्ट अग्री मोअर. हेच आणि असेच विचार आहेत.

या अगोदर यनावाला यांच्याच मंत्रसामर्थ्य धाग्यावर परा यांनी जो ७८६ व होली वॉटर चे बुरखे फाडण्याच्या प्रतीक्षेत ते आहेत
म्हणजे यनावालांकडुन ते आता या अनुक्रमे इस्ल्माम व ख्रिश्चन धर्मातील अंधविश्वांसा संदर्भात चिकीत्सेच्या ते प्रतीक्षेत आहेत. असं ते म्हणालेले
त्या प्रतिसादावर पण तुम्ही जोरदार सहमती दर्शवत प्रतिसादाची तारीफ केलेली होती.
याचा अर्थ तुम्ही यनावाला केवळ हिन्दु विश्वासावरच नेहमी नेहमी बोलतात इतर धर्मांवर नाही इतर धर्मांची चिकीत्सा करत नाहीत वा करायला कचरतात या अर्थाने सहमती दर्शवलेली.
आता तुम्ही म्हणता वरील प्रतिसादाचा हा परीच्छेद लाजवाब आहे. याचा अर्थ असा आहे का की
इस्लाम व ख्रिश्चन मध्ये नाक खुपसलं जात असेल तर चांगल आहे नव्हे ते आवश्यकच आहे आणि भीतीपोटी टाळल जातय.
मात्र हिन्दु धर्माचा विषय असेल तर नाक खुपसु नका
तुमच्या भुमिकेत जी विसंगती आहे ती कशी याचं सखेच आश्चर्य व्यक्त करुन थांबतो. तुमच्या विषयी आदर आहे हे आवर्जुन नमुद करतो. म्हणुनच खेद अधिक वाटला.

अ. पूर्णपणे अज्ञेयवादी असल्याने मुळात कोणत्याही धर्मातल्या कोणत्याही देवाचा माझ्या बाबतीत काही रिलेव्हन्स नाही.

ब. तरीही अनेक अंधश्रद्धाविरोध"वादी" जे मुद्दे मांडतात ते हिंदू या धर्माविषयीच असतात. इतर धर्मांवर तितकेच सणसणीत आसूड ओढणारा एखादाच दिसतो. तेव्हा पराचा तो मुद्दा पटणं हा पूर्ण वेगळा भाग झाला.

क. स्वतः नास्तिक (खरंतर अज्ञेयविचारी) असल्यास लगेच इतरांचेही आस्तिक्य पुसून टाकण्यासाठी निकराचे प्रयत्न करावेत याला माझा प्रचंड विरोध आहे. मला अगदी निरर्थक वाटलं तरी ज्याला जे पटतं ते त्याने मानावं असा माझा विचार आहे. मीही प्रसाद१९७१ यांच्याप्रमाणे सुरुवातीला अनेकांना आपला निरीश्वर"वादी" विचार पटवून देण्याचे प्रयत्न तावातावाने केले. नंतर तसं करण्यातला इफेक्टिव्हनेसचा फोलपणा समजला असं म्हणण्यापेक्षा त्यातली अनावश्यकता जाणवली म्हणून ते बंद केलं. प्रसाद१९७१ यांच्या प्रतिसादातल्या दुसर्‍या परिच्छेदात हेच म्हटलेलं आहे. त्यामुळे कोणालाही हे निरीश्वरवाद वगैरे पटवून द्यायची गरज नाही असं मत पटल्याचा तो उल्लेख आहे. यालाच पूरक प्रतिसाद मीच यनावालांच्या आधीच्या धाग्यावर दिला होता. तो पहावा. त्याचा आशय असा होता की "लोकांना असं सगळं सांगून, बदलण्याचा प्रयत्न करुन खरंच काही उपयोग होतो का? आउटकम आहे का? इज इट वर्थ इट? आस्तिक हे प्रयत्नशून्य असतात का?

वरील तीन मुद्द्यांमधे मी वेगवेगळे मुद्दे मिक्स होण्यापासून वेगळे काढण्याचा प्रयत्न केला आहे.

हे लिहायचे नव्हते, पण सांगावे लागते. मी पूर्ण नास्तिक आहे, पण कोणाला तू नवस का करतोस, देवळात का जातोस वगैरे विचारत नाही. मी साधारण बारावीत नास्तिक झालो. त्या नंतर ३-४ वर्ष मित्रांशी वाद वगैरे घालायचो ह्या विषयावर, तेंव्हा माझी भुमिका यनावालांसारखी असायची. पण नंतर मी नास्तिक च राहीलो पण लोकांच्या मतांमधे नाक खुपसुन त्यांना अक्कल शिकवणे बंद केले. कदाचित यनावालांना ते शहाणपण यायचे आहे.

या पूर्ण भागाशी सहमती असं म्हणण्यापेक्षा मी अत्यंत स्पेसिफिक वाक्यं खाली क्वोट करतो:

मी पूर्ण नास्तिक आहे, पण कोणाला तू नवस का करतोस, देवळात का जातोस वगैरे विचारत नाही. मी साधारण बारावीत नास्तिक झालो. त्या नंतर ३-४ वर्ष मित्रांशी वाद वगैरे घालायचो ह्या विषयावर, तेंव्हा माझी भुमिका यनावालांसारखी असायची.

इतक्या भागाशी मी स्वतःला रिलेट करु शकणं असं म्हणणं त्यात आहे.

लोकांच्या मतांमधे नाक खुपसुन त्यांना अक्कल शिकवणे बंद केले. कदाचित यनावालांना ते शहाणपण यायचे आहे.

हा टोन मूळ प्रतिसादलेखकाचा आहे. त्याला माझा इलाज नाही.

मी इथे असा टोन वापरीन की :

यनावाला तरीही चिकाटीने हा विचार रुजवण्यासाठी पुन्हापुन्हा मांडत राहतात. त्यांनी त्यातून नेमका काय उपयोगी आउटकम उत्पन्न होणार आहे यावर पुनर्विचार करावा असं मला वाटतं.

कदाचित नेमकी सहमतीची वाक्यं निवडून क्वोट केली असती तर बरं झालं असतं पण असो.

म्हणजे तुमची मतं त्यांच्या मतांसारखीच आहेत.
कधी काळी तुम्ही पण त्यांच्यासारखंच इतरांना आपलं मत पटवून द्यायचा प्रयत्न केलेला आहेत.
काही कारणांनी अशी आवश्यकता आपणास नंतर वाटेनाशी झाली आणि तुम्ही ते प्रयत्न बंद केलेत.
आपण जे केलेत ते आपल्या मते शहाणपणाचे आहे. (यापेक्षा वेगळे वागणे म्हणजे हे शहाणपण यायचे असणे!!)

म्हणून आता तुम्ही, ते जे करत आहेत त्यापासून त्यांनाही परावृत्त करायचा प्रयत्न करत आहात.

आपल्या भूमिकेबद्दलच्या माझ्या आकलनात काही चूक असेल तर कृपया सांगा.

प्रसाद१९७१'s picture

3 Dec 2015 - 12:20 pm | प्रसाद१९७१

म्हणजे तुमची मतं त्यांच्या मतांसारखीच आहेत.
कधी काळी तुम्ही पण त्यांच्यासारखंच इतरांना आपलं मत पटवून द्यायचा प्रयत्न केलेला आहेत.
काही कारणांनी अशी आवश्यकता आपणास नंतर वाटेनाशी झाली आणि तुम्ही ते प्रयत्न बंद केलेत.
आपण जे केलेत ते आपल्या मते शहाणपणाचे आहे.

आवश्यकतेचा प्रश्न नाही, मला माझी चूक लक्षात आली.,
मला हे लक्षात आले / पटले की प्रत्येकाला ज्याची त्याची मते / धारणा बाळगायचा हक्क आहे. आपण जजमेंटल होणे चुकीचे आहे. प्रत्येकाला आनंद / समाधान / शांतता शोधायचा हक्क आहे आणि ते मिळवायचे मार्ग पण ज्याचा त्यानी ठरवायचा आहे. ह्या प्रकारात कोणीच बरोबर किंवा चुक नाहीये.

म्हणून आता तुम्ही, ते जे करत आहेत त्यापासून त्यांनाही परावृत्त करायचा प्रयत्न करत आहात.

त्यांच्या लिखाणाला विरोध करतोय कारण ते सर्वांना ऑफेंड करतायत. आणि कीतीही जनरल आणि गोलगोल लिहीले तरी ती वैयक्तीक टीकाच होत आहे. त्याची सुरुवात ते करतायत म्हणुन मी प्रतिसाद लिहीतो आहे. मी स्वताहुन यनावालांच्या वागण्या-बोलण्यावर धागा काढत नाही.

बोका-ए-आझम's picture

2 Dec 2015 - 9:41 pm | बोका-ए-आझम

इच्छामटणाचा धागा मस्त होता राव! त्यात काही addition करा की.

DEADPOOL's picture

3 Dec 2015 - 1:31 pm | DEADPOOL

Religion is like a duck!

सतिश गावडे's picture

1 Dec 2015 - 11:27 pm | सतिश गावडे

वल्ली सरांना जाऊ दया भुलेश्वरला.
तुम्हीच या सार्‍या प्रश्नांची उत्तरे देणारा एक छानसा लेख लिहा अशी मी आपणांस विनंती करतो.

प्रगो सर तुम्ही देव आणि वैदिक साहित्य यांची गल्लत करत आहात असं वाटतं. मी दर्शने वाचलेली नाहित पण ऋग्वेद थोडासा वाचला आहे. ऋग्वेदाचं सातवं मंडल निव्वळ इतिहास आहे असे आमचे स्पष्ट मत आहे.

बाकी देव (इंद्र, मरुद्गण,वस,, अश्विनीकुमार) आणि भगवान (ब्रह्मा, विष्णू, महेश) ह्या संकल्पना वेगवेगळ्या आहेत. देवांना मानवी भावभावनांचा स्पर्श झालेला आढळून येतो तर भगवान ह्या सर्वांच्या पार असतेत.

वेदकालीन साहित्यात तत्कालीन काळाच्या अनुशंगानेच माहिती आलेली आढळते. अवेस्ता वेदांच्या उलट असल्याचे तुम्हास माहीत असेलच.

तेव्हा हे सर्व धर्मग्रंथ, वेद हे इतिहास, बरीचशी अतिशयोक्ती आणि तत्कालीन समाजधारणा एकत्रित करून त्यावर रचलेल्या अप्रतिम साहित्यकृती आहेत हे तुम्ही लक्षात घ्या.

बाकी गावडे सरांप्रमाणेच तुम्ही तुमच्या उपरोक्त प्रश्नांवर लेख लिहावा अशी आमचीही आग्रहाची मागणी.

आदूबाळ's picture

1 Dec 2015 - 10:00 pm | आदूबाळ

बास की राव आता...

अभिजित - १'s picture

1 Dec 2015 - 10:06 pm | अभिजित - १

तोच तोच मुद्दा परत परत मांडण्यात काय अर्थ आहे ? मिपा वरचे लोक पहुचे हुए लोग आहेत. दोन्ही बाजूचे. त्या मुळे तुमचे लेख वाचून इथे कोणाचेही काही हि प्रबोधन होणार नाहीये. तुमची शक्ती इकडे वाया घालवू नका.
रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी !!

राही's picture

1 Dec 2015 - 11:30 pm | राही

रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी !!
हे वाक्य आवडले नाही.
ते पुन्हा पुन्हा लिहितात, टीकाटिंगल (प्रतिवाद नव्हे) होऊनही संयतपणे लिहितात यात त्यांचा काहीतरी हेतु असेलच ना. आणि ही टीकाटिंगल त्यांनी मनावर घेतलेली नाही हेही स्पष्ट आहे ना? एखादा विषय पुन्हा पुन्हा बोर्डावर येणे हे इथे नवीन आहे का? आणि इथे लिहिलेल्या इतर लेखांमुळे नेहमीच प्रबोधन होत असते का?
आस्तिक-नास्तिक, शाकाहार-मांसाहार, मराठी-इंग्लिश, भारत-पाकिस्तान-काश्मीर, गांधी, आंबेडकर या विषयांवर मराठी आंतर्जालावर- यात मिपा आलेच, अनेकदा लिहिले गेले आहे. म्हणून जालीय नवनवी पिढी या विषयांवरचे लेखन थांबवते का?

'तुम्ही इथे लिहू नका' असे वेगळ्या शब्दांत सुचवणे आवडले नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Dec 2015 - 9:58 am | बिपिन कार्यकर्ते

संपूर्णत: सहमत. काल प्रतिसाद वाचून असेच काहीसे वाटले. तुम्ही नेमके मांडले.

राही's picture

2 Dec 2015 - 10:08 am | राही

धन्यवाद बिका,
केवळ म्हणून की,
निषेध जागच्या जागी नोंदवला नाही तर साय्लेंट मेजॉरिटीला काही अर्थच राहात नाही.
केवळ म्हणून.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Dec 2015 - 10:16 am | बिपिन कार्यकर्ते

याच भावनेतून बरेच वेळेस प्रतिसाद देतो. मग कधीकधी अरण्यरूदनाचा कंटाळा येतो म्हणून टंकलेलं डिलीट करून टाकतो. काल तर टंकलंही नव्हतं. तुम्ही नेमकं मांडलंत म्हणून मम म्हणायला आलो.

स्पा's picture

2 Dec 2015 - 11:53 am | स्पा

ओह आय सी बी खा

अत्रुप्त आत्मा's picture

2 Dec 2015 - 4:00 pm | अत्रुप्त आत्मा

ओह आय सी बी खा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif आला रे आला पांडु आला! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif

प्रचेतस's picture

2 Dec 2015 - 4:03 pm | प्रचेतस

पांडु आला की बुवा पण आला. =))

अत्रुप्त आत्मा's picture

2 Dec 2015 - 4:21 pm | अत्रुप्त आत्मा

हलकट जळू http://www.sherv.net/cm/emoticons/guns/ak47.gifआगोबा! http://www.sherv.net/cm/emo/angry/msn.gif

प्रचेतस's picture

2 Dec 2015 - 4:23 pm | प्रचेतस

आम्ही कशाला जळू
तुम्हीच पांडू अला तर (त्याच्या) पाठीमागे पळू

--बुवेश यमकजुळवी.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Dec 2015 - 4:32 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/guns/machine-gun.gif आगोबाधडकूरानडुक्कर!

बॅटमॅन's picture

2 Dec 2015 - 4:03 pm | बॅटमॅन

असा सगळा प्रकार झाला तर

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Dec 2015 - 4:36 pm | बिपिन कार्यकर्ते

अय पोरायहो! आज काय माझा नंबर काय? =))

मारवा's picture

2 Dec 2015 - 4:27 pm | मारवा

निषेध जागच्या जागी नोंदवला नाही तर साय्लेंट मेजॉरिटीला काही अर्थच राहात नाही.
केवळ म्हणून.

निषेध नोंदवण्याची निकड लक्षात आणुन देण्यासाठी धन्यवाद !
पुर्णपणे सहमत आहे
यनावाला विरोधी विचार मांडत आहे जे आवश्यक आहे. सतत एकांगी विचारांचा मारा झाल्याने विरोधी विचार जणु अस्तित्वात नाहीच अशी काहीशी धारणा तयार होते. कम्युनिस्ट शासनात काही ठीकाणी जसं विरोधी मत व्यक्त करणंच फार मोठं पाप मानल जायच अस काहीसं वातावरण निर्माण करणं फार चुक आहे.
हे विचार बीजपेरणी या द्रुष्टीने महत्वाचे आहेत. एक विरोधी विचार मनासमोर आल्यावर जरी त्याला बळजबरीने विना तर्क भावनिकतेने च उडवुन लावला तरी तो कुठेतरी अंतर्मनात खोलवर जाऊन रुजलेला असतोच.
तो नंतर अनुभव चिंतन आदीत पुन्हा उफाळुन वर येत असतो.
विचार-बीज रुजवणं महत्वाचं ते काम यनावाला उत्तम संयत शैलीत करत आहेत.
त्यांना प्रतिवाद न करता सतत व्यक्तीगत हल्ले करण्यातुन तो त्यांचा विचार कीती आतपर्यंत रुजलाय व अस्वस्थ करतोय.
हे दिसुन येत आहे. पुर्वीचे प्रतिवाद काही किमान काही तरी मुळ मुद्द्याच्या जवळपास तरी होते. आता तर एक नविनच असंबद्ध कीती असावा प्रतिसाद याचा एकेक उच्चांक बघायला मिळतोय.
यनावाला यांना दिल्या जात असलेल्या व्यक्तीगत व असंबद्ध प्रतिसादांचा निसंदिग्ध निषेध नोंदवतो.
यनावाला तुम्ही लिहीत रहावे ही विनंती.

यनावाला's picture

2 Dec 2015 - 9:33 pm | यनावाला

मारवाजी लिहितात,

"हे विचार बीजपेरणी या दृष्टीने महत्वाचे आहेत. एक विरोधी विचार मनासमोर आल्यावर जरी त्याला बळजबरीने विनातर्क भावनिकतेनेच उडवुन लावला तरी तो कुठेतरी अंतर्मनात खोलवर जाऊन रुजलेला असतोच. तो नंतर अनुभव चिंतन आदीत पुन्हा उफाळुन वर येत असतो........त्यांचा प्रतिवाद न करता सतत व्यक्तीगत हल्ले करण्यातुन तो त्यांचा विचार कीती आतपर्यंत रुजलाय व अस्वस्थ करतोय.हे दिसुन येत आहे."

हे अगदी खरे आहे हे दिसतेच. धन्यवाद मारवाजी. तुम्ही केलेले विश्लेषण मूलभूत आणि मार्मिक आहे. तुम्हाला या विषयाचे नेमके आकलन झाले आहे.

संदीप डांगे's picture

2 Dec 2015 - 9:40 pm | संदीप डांगे

आम्हालाही झालेच आहे हो! स्वमतांध दांभिक यापेक्षा जास्त विचार करत नाहीत ते.

तुमच्या मनातले आम्ही पेरेलेले विरोधी विचार कधी उफाळून वर येतील आणि त्याचा आपण योग्य तो प्रतिवाद कराल याची वाट पाहतोय.

pacificready's picture

2 Dec 2015 - 12:41 pm | pacificready

>>>>> जालीय नवनवी पिढी

खरंय. शालेय अभ्यासक्रमासारखं नवीन सदस्याना एक एक टॉपिक देऊन अनुषंगानं येणारे तेच विषय frequently asked questions म्हणून एका सामान्य माहिती आणि उत्तरांसह (उत्तर काय असावं याबाबत अनेक पर्याय असू शकतात पण तिथं एक विषयाला सुसंगत उत्तरांचा साठा तयार होईल) दिले गेले पाहिजेत. या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न तिथंच उपस्थित व्हावेत त्याची उत्तरं देता यावीत.
नवीन सदस्यांना नवीन वाचकांना आपल्या डोक्यात आलेला विषय हा आपल्यालाच प्रथम सुचलेला आहे असा समज असतो. कधीतरी थोडा मोठेपना वाटत देखील असतो.

सात आठ वर्षातले चर्चान्चे पॅटर्न बघता प्रत्येकाला आपल्याच विचारात काही बदल झालेले समजून येतील. ठामपणं एखाद्या गोष्टीचं समर्थन करणारा विरोधक झालेला असू शकतो. आणि उलट देखील.

प्रसाद१९७१'s picture

2 Dec 2015 - 4:39 pm | प्रसाद१९७१

म्हणून जालीय नवनवी पिढी या विषयांवरचे लेखन थांबवते का?

नव्या पिढीनी लिहीले तर चालेल ना, पण इथे पुराणकाळातील आजोबा त्याच त्याच जिलब्या नव्या जोमाने पाडतायत. वर सर्वांना त्या आवडल्याच पाहिजेत असा अट्टाहास पण आहे.

शब्दबम्बाळ's picture

3 Dec 2015 - 2:38 am | शब्दबम्बाळ

लेखकाच्या नावाची खिल्ली उडवणे, त्याच्यावर वैयक्तिक टिप्पणी करणे हे प्रकार हास्यास्पद आणि बालिश आहेत!
(माझे हेच मत मोदींना फेकू, राहुल ला पप्पू आणि इतर नावे पडणार्यांच्या बाबतीतही आहे, उगाच तुम्हालाच बोलतोय असे नाही)

जर तुमच्याकडे प्रतिवाद करायला मुद्दे असतील तर त्यावर बोला, संदर्भ द्या!
बाकी 'US जे मानतो ते आम्ही पण मानणार' किंवा 'आधी "त्यांना" सांगा मग आम्हाला' हे असली वाक्य बिनकामाची आहेत.

या लेखात तरी त्यांनी आस्तिक असलेल्या लोकांना मूर्ख महामूर्ख म्हटलेले दिसले नाही मग हा मुद्दा इथे का यावा?

ट्रेड मार्क's picture

3 Dec 2015 - 2:52 am | ट्रेड मार्क

मला वाटलं मिपा वरील आयडी आहे. क्षमा असावी यनावाला आणि धन्स शब्दबम्बाळ.

नावाची खिल्ली उडवायला माझा पण विरोध आहे.

राही's picture

3 Dec 2015 - 10:09 am | राही

बालिश.
फेकू, पप्पू या बाबतीतही तेच मत.

संपादक मंडळाचा अत्यंत आभारी आहे.

गॅरी ट्रुमन's picture

1 Dec 2015 - 10:20 pm | गॅरी ट्रुमन

जगप्रसिद्ध नास्तिक रिचर्ड डॉकिन्स म्हणतात, "आपल्या बाळाला देवा-धर्माच्या संस्कारांचे विष आई स्वमुखातून पाजते. त्याचा परिणाम आयुष्यभर टिकू शकतो."

मजाच म्हणायची.

एक गोष्ट समजत नाही.या नास्तिक लोकांना आपण नास्तिक असल्याचा इतका अभिमान का असतो?या असल्यांच्या अभिमानापुढे अमुक जातीत किंवा धर्मात जन्माला आल्याचा अभिमान धरणाऱ्या हजार लोकांचे अभिमान कमीच पडतील. मला वाटत होते की आस्तिक किंवा नास्तिक असणे ही पूर्णपणे वैयक्तिक गोष्ट आहे. एखाद्या वैयक्तिक गोष्टीसाठी माणूस जगप्रसिध्द वगैरे होतो?

मारवा's picture

2 Dec 2015 - 4:35 pm | मारवा

एखाद्या वैयक्तिक गोष्टीसाठी माणूस जगप्रसिध्द वगैरे होतो?

अभिमान बाळगणे चुकच या तुमच्या मुद्द्याशी पुर्णपणे सहमत आहे. आस्तिक वा नास्तिक वा कोणती विचारधारा असल्याचा अभिमान बाळगणे चुकच आहे यात काहीच शंका नाही.
आता ते रीचर्ड डॉकीन्स जगप्रसिध्द नास्तिक म्हणत आहेत ते अशासाठी की रीचर्ड डॉकीन्स एक शास्त्रज्ञ म्हणुन एक अनेक विख्यात ग्रंथांचा लेखक म्हणून अनेक जाहीर वाद विवादांत विशीष्ट विचारसरणीच्या बाजुने मते मांडण्यासाठी खरोखरच प्रसिद्ध आहे. ते अ‍ॅज अ मॅटर ऑफ फॅक्ट मांडले तर गैर काय ? ती नुसती वैयक्तीक बाब त्याच्यासाठी नाही तो एक वैचारीक लढा आहे. जो तो अनेक वर्षांपासुन लढतोय.

ट्रेड मार्क's picture

1 Dec 2015 - 10:27 pm | ट्रेड मार्क

इतर धाग्यांवरील प्रतिसादांवर प्रतिवाद न करता डायरेक्ट नवीन धागा. याला पण उत्तर द्या की जरा.

परत तुम्ही संस्कार आणि प्रथा यांची सरमिसळ करताय. कुठल्या प्रथा पाळायच्या किंवा नाही हे संस्कारातून शिकता येतं. देवाला नमस्कार करायचा की नाही हे वैयक्तीक आहे. पण पूर्णपणे कर्मकांडांच्या मागे लागू नये हेही तितकाच खरं. मुलांना संस्कार देऊ नयेत असं आपलं म्हणणं नसावं अशी आशा करतो.

आत्ता आपल्याला माहीत असलेलं विज्ञान हे परिपूर्ण आहे अशी आपली समजूत आहे का? डार्विनने सिद्धांत मांडला त्यावर आपण अजून विश्वास ठेवून चाललोय. पण त्यालाही प्रतिवाद आहेतच. ज्ञानाच्या क्षेत्रातून ईश्वराची हद्दपारी झाली म्हणताय पण म्हणून मानवाच्या मनातून कशी होईल? यादृच्छिक उत्परिवर्तन (रॅंडम म्युटेशन ) आणि अयादृच्छिक नैसर्गिक निवड (नॉन रॅंडम नॅचरल सिलेक्शन) हे तत्व फक्त इतके जैववैविध्य कसे आहे हे सांगते. का आहे कसे झाले हे सांगते का? का सगळी माणसे एकसारखी नाहीत याचे स्पष्टीकरण आहे का?

सध्या चेन्नई मध्ये पडत असलेला तुफान पाऊस कश्यामुळे पडतोय ते माहीत आहे का? इतर नैसर्गिक उत्पात जे होत आहेत ते खरंच कश्यामुळे होतात आणि ते थांबवायचं सामर्थ्य आपल्यात आहे का?

जसे तुम्ही फक्त नास्तिक लोकांची उदाहरणे देताय त्याप्रमाणे आस्तिक लोक पण आहेतच. सगळेच आस्तिक फक्त कर्मकांड करत बसतात का? का आस्तिकांच्यातले १०% लोक पण उच्चशिक्षण घेतलेले नाहीत?

निराकार गाढव's picture

1 Dec 2015 - 10:52 pm | निराकार गाढव

जल्ला समदं बरोबर वाटतंय... !
.

गॅरी ट्रुमन's picture

2 Dec 2015 - 12:42 pm | गॅरी ट्रुमन

बाकी सगळं सोडा हो. पण तुम्हाला इथे परत बघून प्रचंड आनंद वाटला. येत रहा मधूनमधून.

+१

अगदी हेच म्हणतो !

बोका-ए-आझम's picture

2 Dec 2015 - 9:43 pm | बोका-ए-आझम

निरवतापाच्या जत्रेतून सवड मिळाली का? लईच मेघविव्हळ होता बघा तुम्ही!

मांत्रिक's picture

1 Dec 2015 - 11:04 pm | मांत्रिक

दुसरा म्हणजे विश्वनिर्माता, निर्गुण, निराकार ईश्वर. त्याने केलेल्या नियमांनुसार विश्व चालते. विश्वरहाटीत तो कोणतीही ढवळाढवळ करीत नाही सर खरंच सांगा, हायपोथेसिस किंवा सिंपल एन्युमरेशन या वैज्ञानिक पद्धतीपण हेच तत्व गृहित धरतात की. मी तुमच्या पहिल्या लेखापासून तुम्हाला हाच प्रश्न विचारत आलोय. पण तुम्ही काय उत्तरच देत नै सर!

संदीप डांगे's picture

1 Dec 2015 - 11:06 pm | संदीप डांगे

शिक्षक उत्तर देत नसतात. फक्त प्रश्न विचारतेत...

इथेच तर थिअरम मार खातो. कारण मग रिग्रेशननी : `नियम करणार्‍याला कुणी निर्माण केलं' असा प्रश्न केला की खेळ खलास!

पगला गजोधर's picture

2 Dec 2015 - 10:36 am | पगला गजोधर

god

विवेक ठाकूर's picture

1 Dec 2015 - 11:05 pm | विवेक ठाकूर

बाकी सगळं जाऊं दे. खुद्द आपण नेमके कश्यामुळे प्रकट झालो या गोष्टीचा कधी सखोल विचार करुन पाहा! आणि वाट्टेल तो शास्त्रज्ञ आणा घंटा उत्तर मिळणार नाही.

टवाळ कार्टा's picture

2 Dec 2015 - 1:32 am | टवाळ कार्टा

खिक्क....सोज्वळ प्रतिसाद

राजेश घासकडवी's picture

2 Dec 2015 - 6:44 pm | राजेश घासकडवी

तुम्ही उत्क्रांतीविषयी काही वाचलेलं नाहीये का? अज्ञानाचं इतकं उघड प्रदर्शन करायला मी तरी लाजलो असतो बुवा.

थोडं गूगललं तर ज्ञानाचं भांडार मिळतं.
माणसाची उत्क्रांती कशी झाली...

http://humanorigins.si.edu/education/intro-human-evolution
https://en.wikipedia.org/wiki/Timeline_of_human_evolution

उत्क्रांती म्हणजे काय? हे समजावून देणारे तर इतके संदर्भ आहेत की मी नुसतं गूगल सर्चचं पेज देतो आहे.

https://www.google.com/search?q=what+is+evolution%3F&ie=utf-8&oe=utf-8

संदीप डांगे's picture

2 Dec 2015 - 6:53 pm | संदीप डांगे

ह्यावर तर एक स्पेश्यल धागा पायजे.

राजेश घासकडवी's picture

2 Dec 2015 - 8:47 pm | राजेश घासकडवी

अरे वा, केंट होविंड!! अहो तो म्हणतो की पृथ्वी सहा हजार वर्षांपूर्वी निर्माण झाली! आणि त्याच्या भंपक युक्तिवादांवर त्याचे समविचारीही विश्वास ठेवत नाहीत.

Kent E. Hovind (born January 15, 1953) is an American Christian fundamentalist evangelist and tax protester. He is a controversial figure in the Young Earth creationist movement and his ministry focuses on attempting to convince listeners to deny scientific theories including evolution, geophysics, and cosmology in favor of a literalist interpretation of the Genesis creation narrative found in the Bible. Hovind's views, which combine elements of creation science and conspiracy theory, are dismissed by the scientific community as fringe theory and pseudo-scholarship. Moreover, he has been criticized by Young Earth Creationist organizations like Answers in Genesis for his continued use of discredited arguments that have been abandoned by others in the movement.

तुम्हाला मी चांगले संदर्भ दिले, त्यात तुम्हाला उत्तरं सापडतील अशी आशा होती. तर ती उत्तरं शोधण्यापेक्षा कोणीतरी वायझेड माणूस काय म्हणतो आहे याच्या लिका काय देताय मला? तुम्हाला उत्तरं सापडल्याने अधिक आनंद होईल की काही न तपासता यनावालांचं म्हणणं खोडायचंच म्हणून खोडण्यात आनंद मिळेल?

मांत्रिक's picture

2 Dec 2015 - 8:48 pm | मांत्रिक

दुसरेच वायझेड आणि तुम्ही तेवढे माझी लाल वाले....

राजेश घासकडवी's picture

2 Dec 2015 - 8:55 pm | राजेश घासकडवी

केंट हॉविंडला मी जरूर वायझेड म्हणेन. सहा हजार वर्षांपूर्वी पृथ्वी निर्माण झाली यावर तुम्ही तरी विश्वास ठेवाल का? बायबलच्या जेनेसिसचा शब्दशः अर्थ घेणाऱ्याला काय म्हणायचं?

एकंदरीत तुम्हाला उत्तरं शोधण्यात आनंद आहे की व्यक्तिगत हल्ले करण्यात आनंद आहे ते कळलं. धन्यवाद.

आणि हो, मी दिलेल्या लिंका कृपा करून जरा नजरेखालून तरी घाला हो.

मांत्रिक's picture

2 Dec 2015 - 9:03 pm | मांत्रिक

साहेब केंट हाविड आमचा आदर्श नाहीये. एक उदाहरण दिलं गेलं असेल. जौ देत.

आमचा आदर्श ज्ञानोबा तुकोबा नामया हेच आहेत. हे तीन ग्रेट सोल्स काय म्हणले हे तुम्हाला कळत नसेल तर तुमची जिणगाणी व्यर्थच म्हणेन. नीट वाचा त्यांना.

बाकी तुमची हिंदु धर्माविषयी संस्कृतीविषयी पुराणी मळमळ जळजळ माहितेच.

राजेश घासकडवी's picture

2 Dec 2015 - 9:12 pm | राजेश घासकडवी

त्यांनी उत्क्रांतीविषयी काय लिहिलेलं होतं ते वाचायला आवडेल.

आणि यात हिंदू धर्माचा काय संबंध आला? तुम्ही विचारलं की 'घंटा एकाही शास्त्रज्ञाला माणूस कसा झाला हे माहीत नाही.' मी म्हटलं नाही, हे चुकीचं आहे - आणि ते सांगणाऱ्या लिंका दिल्या. त्या मुकाट्याने वाचून प्रतिवाद करण्याऐवजी कोणीतरी यडपट त्याला होक्स म्हणतो हे सांगितलं. नंतर तुमचीच लाल, हिंदू धर्माविषयी मळमळ, जळजळ वगैरे काहीतरी निरर्थक बडबड करत आहात.

असो. तुमच्यासमोर गीता वाचायची नाही असं ठरवलं आहे.

तुमाला गीता वाचताच येणार नाही कारण तुमी स्वमतांध गा** आहात....

त्यांनी उत्क्रांतीविषयी काय लिहिलेलं होतं ते वाचायला आवडेल. त्यांनी उत्क्रांतीविषयी का लिहावं. ज्ञानोबाला तुकोबाला जो विषय समजत होता त्याविषयी त्यांनी लिहिलं. त्यात चुकिचं काय?
तसंही ज्यातील आपल्याला काय कळत नाही त्यावर लिहायला ते स्वमतांध दांभिक नाहीत....

मांत्रिक's picture

2 Dec 2015 - 9:34 pm | मांत्रिक

एकंदरीत तुम्हाला उत्तरं शोधण्यात आनंद आहे की व्यक्तिगत हल्ले करण्यात आनंद आहे ते कळलं. धन्यवाद. सर तुम्ही किती व्यक्तिगत हल्ले केले व त्यावर काय काय भयानक प्रतिसाद दिले गेले हे चांगलंच माहिते. तुमी तरी दुसर्याला व्यक्तिगत हल्ले करणारा म्हणू नये!!!

मारवा's picture

3 Dec 2015 - 4:45 pm | मारवा

आपण दुसरी बाजु वाचण्याचीही गरज समजत नाही ठीक आहे.
आपण वरील ज्या संतांची नावी सांगितली त्या संदर्भात आपली चर्चेची तयारी आहे का ?
म्हणजे मी आपणास असे सांगुन उपयोग नाही की आपण गॉड डेल्युजन वाचावं म्हणुन मी म्हणतोय
ठीक आहे तुमच्या निर्देशीत केलेल्या वरील संताच्या संदर्भातुन चर्चा करण्याची आपली तयारी आहे का?
तुम्हाला प्रश्न ही कमीत कमी विचारतो सरळ विधाने मांडतो तुम्ही त्यावर काय भुमिका आहे ती मांडावी.
आहे तुम्हाला खरोखर गंभीरपणे रस ?
मला तुमच्याविषयी अजुनही पुर्ण खात्री आहे की तुम्ही अजुनही एका सकारात्मक दिशेने चर्चा कराल कदाचित तुम्ही मला एखादा नविन विचारही देऊ शकता यावीषयी देखील माझ्या मनात शंका नाही हे प्रामाणिकपणे सांगतो.
अजुन एक आवर्जुन सांगतो राजेशजी तुमच्याशी अत्यंत पोटतिडीकीने संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांना व्यक्तीगत ओळखत नाही मी त्यांना तुमच्याइतकाच केवळ आंतरजालीय वावरातुनच ओळखतो त्यावरुन सांगतो त्यांचा उत्क्रांती या विषयाचा अत्यंत सखोल असा अभ्यास आहे. तुम्ही किमान एकदा तरी त्यांनी दिलेल्या लिंका संदर्भ तपासुन पाहण्याची तसदी घेतली असती तर कदाचित तुम्हाला एक नविन विचार मिळू शकला असता.
अजुन एक मी कधीही असे म्हणत नाही की तुम्ही माझ्याच विचारांशी सहमत व्हाच कधीच नाही मात्र मी असे म्हणतो की तुम्ही किमान एका सकारात्मक रीतीने असंबद्धता व्यक्तीगतता टाळून गंभीरतेने वरील प्रकारच्या विषयांवर संवाद अ‍ॅक्टीव्हली तरी साधावा म्हणजे अशी नम्रपणे सुचवणी करतो.
तुम्ही असहमत पुर्णपणे झाला अशा चर्चेअंती तरी त्याने काहीच फरक पडत नाही म्हणजे त्यात काहीही गैर नाही, मात्र एकदा स्वतंत्रपणे तुम्ही विषयाला भिडुन तर बघा असे सुचवितो
मांत्रिक जी मी तुम्हाला वेगळा किंवा शत्रु कींवा आस्तिक गटातला यापैकी काहीही समजत नाही.
मला तुमच्याविषयी आस्था एक व्यक्ती म्हणुन आहे. आणि राहील तुमची कुठलीका विचारधारा असेना.

मांत्रिक's picture

2 Dec 2015 - 9:45 pm | मांत्रिक

बायबलच्या जेनेसिसचा शब्दशः अर्थ घेणाऱ्याला काय म्हणायचंयातूनच कळतं की तुम्ही पवित्र बायबलच्या गहन गूढ अर्थावर विश्वास ठेवता.

मग भगवान येशू ख्रिस्त म्हणाला कीः 'अहो कष्टी व भाराक्रांत जनहो! तुम्ही मजकडे या! मी तुम्हाला विसावा देईन!!!'

हे वाक्य कुठलाही स्वमतांध दांभिक विज्ञानी म्हणेल काय? नाही! तो म्हणणार की प्रत्येक जीव डीएनए अनुसार भिन्नच आहे. मी त्याला आपला का म्हणू?????

ही बात आहे सर. विज्ञान बरोबर असून पण भेदभाव निर्माण करते तर अध्यात्म त्या भेदभावाला कवेत घेऊ बघते!!!

मांत्रिक's picture

2 Dec 2015 - 9:50 pm | मांत्रिक

भगवान कृष्ण म्हणतो:

अनन्याश्चिंतयतो माम् ये जनाः पर्युपासते
तेषां नित्याभियुक्तानाम् योगक्षेमम् वहाम्यहम्!!!

हे आश्वासन स्वमतांध दांभिक विवेकवादी, विज्ञानवादी किंवा त्यांचे हिरवे चिल्लेपिल्ले, आपल्यासारखे, देऊ शकतात? खरंच सांगा?

श्री.रा.रा.रा.घासकडवी,

तुमचे खालील म्हणणे योग्य आहे.

सहा हजार वर्षांपूर्वी पृथ्वी निर्माण झाली यावर तुम्ही तरी विश्वास ठेवाल का? बायबलच्या जेनेसिसचा शब्दशः अर्थ घेणाऱ्याला काय म्हणायचं?

वास्तविक जग समुद्रमंथनाच्या वेळी तयार झालंय. चौदा रत्नं म्हणजे मूळ चौदा जीवजाती.

तुम्ही समुद्रमंथनाचा अभ्यास केलाय का? नसल्यास आधी करुन या आणि मग बघू. उगीच सगळीकडे उत्क्रांती उत्क्रांती करत असता. सोडा ही आंधळी डार्विनपूजा.

राही's picture

6 Dec 2015 - 10:56 am | राही

नाय तर काय.

संदीप डांगे's picture

2 Dec 2015 - 9:11 pm | संदीप डांगे

अहो सर. मी फक्त एक मुद्दा मांडला आहे. तुम्ही ज्या लिंका दिल्यात त्याविरोधातही काही आहे हे सांगण्यासाठी. बाकी डिटेलमधे चर्चा करायला एक वेगळा धागा हवा असे मीच म्हटले आहे. मी विडियो दिला म्हणजे मला त्याचे सगळेच दावे मान्य आहेत असे नाही. पण बिगबँग थेरी व हुमन एम्ब्रायो बद्दल आहे तो एक विचारात घेण्यासारखा मुद्दा तर आहे की नाही. तो पृथ्विचं वय सहा हजार वर्षे सांगतो म्हणून त्याचे सगळेच विचार नाकारले पाहिजेत का? हजार वाक्यातले दोन तर ग्राह्य असतीलच की. मी फक्त चर्चेसाठी मुद्दा दिलाय. त्यात अधिक अभ्यास करून विस्तृत लेख लिहिता येइलच.

आजवर इवॉल्युशन थेरी हीच नेहमी समोर येत राहिली आहे. त्या विरोधात विचार आहेत (भले ते चुकीचे, बरोबर कसेही) हे कधी सांगितल्या जात नाहीत. निदान शाळेत तरी. इवॉल्युशन थेरीचा विरोध करणारे अनेक आहेत, त्यांचेही अभ्यासपूर्ण दावे आहेत हे आमच्यासारख्या सामान्य लोकांपर्यंत कधी पोचले नाहीत. त्यांच्या दाव्यांचा मी अभ्यास करत आहे. काही समजलं अन् जमलं तर लेख टाकेन.

नेहमीच इवॉल्युशन थेरी तोंडावर फेकून मारणारे पाहिलेत पण त्याच्यातही लूपहोल्स आहेत असे सांगणारे, त्यावर चर्चा करणारे आजवर कुणी भेटले नाही. म्हटलं आपण करुया सुरुवात. तर वैज्ञानिक विचारसरणीचे लोक लगेच वायझेड म्हणून मोकळे होतात.

बाकी, कुणाला वायझेड म्हणायचे हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. मी तरी कुणालाच वायझेड म्हणत नाही. अस्तिक असो वा नास्तिक. वैज्ञानिक असो वा सामान्य.

असो.

राजेश घासकडवी's picture

2 Dec 2015 - 10:04 pm | राजेश घासकडवी

जरूर. असं करूया, मी एक उत्क्रांतीविषयी लेखमाला लिहितो, तुम्ही उत्क्रांतीतली लूपहोल्स सांगणारी लेखमाला लिहा. आपली जी चर्चा होईल त्यातून अनेकांना शिकायला मिळेल. पण कृपया त्यासाठी केंट होविंड वगैरेंसारख्या बोगस लोकांचे आधार घेण्याची गरज नाही. उत्क्रांतीवादाचं सध्याचं स्वरूप असं आहे की त्यातल्या मूलभूत तथ्याला कोणीच विरोध करत नाही. काही बारीकसारीक गोष्टी नक्की कशा घडल्या असाव्यात याबद्दल वाद आहे - आणि अशा वादांतूनच कुठचंही ज्ञान हळूहळू पुढे जातं, थियरी फाइन ट्यून होत जाते. पण आत्तापर्यंत उत्क्रांतीवादाला इतके प्रचंड आणि भक्कम पुरावे आहेत की उत्क्रांती झाली हे नाकारणं अशक्य आहे.

मूळ मुद्दा असा आहे की 'वैज्ञानिकहो, तुम्ही एवढे शहाणे समजता, तर याचं उत्तर द्या पाहू!' अशा आव्हानांना बहुतेक वेळा अर्थ नसतो. कारण बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सापडली आहेत हेही लोकांना माहीत नसतं. उत्तरं शोधण्यापेक्षा त्या प्रश्नांच्या गूढपणातच वावरायला आवडतं. हे मी तुमच्याविषयी नाही, तर काही लोकांमध्ये दिसणाऱ्या प्रवृत्तीविषयी बोलतो आहे.

तीनशे वर्षांपूर्वी माणूस कसा निर्माण झाला, उत्क्रांत झाला हे कोणाला माहीत नव्हतं. त्यावेळी कोणी न्यूटनला म्हटलं असतं 'आलाय मोठा शहाणा आम्हाला गुरुत्वाकर्षण शिकवायला. म्हणे सूर्याभोवती पृथ्वी फिरते! अरे भल्या माणसा, आधी तुझा जन्म कसा झाला ते सांग. नाही येत ना सांगता, मग तुझ्या विज्ञानाला काय अर्थ आहे? यावरून देवच श्रेष्ठ आहे, त्यानेच सूर्यचंद्रपृथ्वी बनवले आणि सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हेच सिद्ध होतं' पण या युक्तिवादाला अर्थ आहे का? त्याने त्याचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत खोटा ठरतो का?

असो. स्वतंत्र लेखनच होऊन जाऊदेत या विषयांवर.

शब्दबम्बाळ's picture

3 Dec 2015 - 3:07 am | शब्दबम्बाळ

लिहाच तुम्ही, विज्ञान हे माणसाला प्रश्न विचारायला शिकवत आणि त्याची उत्तरे शोधायला प्रवृत्त करते.
पण धर्म मात्र जणू प्रश्न विचारण्यालाच आक्षेप घेतो (इथे धर्मापेक्षा त्याचे 'रखवालदार' असे म्हणणे योग्य ठरेल)

माणसाला सृष्टीविषयी सगळी माहिती नक्कीच नाही पण ज्या गोष्टीविषयी माहिती नाही अशा गोष्टींची माहिती मिळवण्याची धडपड वैज्ञानिकांनी थांबवलेली नाही. वेगवेगळी प्रमेय सिद्धांत मांडले जातात त्यांवर चर्चा होते, काही टिकतात तर काही कालबाह्य होतात.
आणि हाच मोठा फरक आहे! विज्ञान कालबाह्य झालेल्या गोष्टीना सोडून देण्यास मागेपुढे पहात नाही. समोर दिसणाऱ्या सिध्द झालेल्या सत्याला स्वीकारण्याची त्याची वृत्ती आहे.

Conspiracy theories ना सत्य मानणारेदेखील बरेच असतील आणि त्याकडे दुर्लक्ष्यदेखील करता येत नाही कारण जोपर्यंत एखादी गोष्ट नाही हे सिध्द होत नाही तोपर्यंत विज्ञान त्याकडे दुर्लक्ष्य करू शकत नाही. म्हणूनच आस्तिक-नास्तिक वाद अजूनही आहे.

आणि वाद असण्यात काहीच गैर नाही पण आपण नकळत सत्याला नाकारून केवळ धर्म संरक्षण तर करत नाही ना हे सुद्धा बघितलं पाहिजे.

कारण केवळ धर्म संरक्षणासाठी चर्चनी गलिलेओचे हाल हाल केले आणि धर्माच्या पगड्यामुळे लोकांनीही विरोध केला नाही. तब्बल ४०० वर्षांनी चर्चनी माफी मागितली! परंतु इतकी वर्ष त्याच्या महत्वाच्या लेखनाला प्रसिद्धी न मिळाल्याने माणसाचेच नुकसान झाले...

जोपर्यंत एखादी गोष्ट नाही हे सिध्द होत नाही तोपर्यंत विज्ञान त्याकडे दुर्लक्ष्य करू शकत नाही. म्हणूनच आस्तिक-नास्तिक वाद अजूनही आहे.

जोरदार सहमत.. आणि म्हणूनच मी अजून आस्तिक आहे.

संदीप डांगे's picture

6 Dec 2015 - 11:26 am | संदीप डांगे

विज्ञान हे माणसाला प्रश्न विचारायला शिकवत आणि त्याची उत्तरे शोधायला प्रवृत्त करते.
बरोबर. माझेही हेच मत आहे. पण काही लोक प्रश्नच चुकीचे आहेत हे सिद्ध करण्याच्या मागे असतात.

पण धर्म मात्र जणू प्रश्न विचारण्यालाच आक्षेप घेतो (इथे धर्मापेक्षा त्याचे 'रखवालदार' असे म्हणणे योग्य ठरेल)
धर्म विचार करण्याच्या प्रक्रियेलाच आक्षेप घेतो. कारण कळप सांभाळण्याची गरज धर्माच्या रखवालदारांना असते. आणी असा कळप टिकून राहण्याची गरज कळपातल्या मेंढ्यांना असते.

माणसाला सृष्टीविषयी सगळी माहिती नक्कीच नाही पण ज्या गोष्टीविषयी माहिती नाही अशा गोष्टींची माहिती मिळवण्याची धडपड वैज्ञानिकांनी थांबवलेली नाही. वेगवेगळी प्रमेय सिद्धांत मांडले जातात त्यांवर चर्चा होते, काही टिकतात तर काही कालबाह्य होतात.
माणसाच्या आकलनाला मर्यादा आहेत. पुराव्यांचे इंटरप्रीटेशन करून सिद्धांत/प्रमेये मांडल्या जातात. काही टिकतात, काही टिकत नाहीत याचा अर्थच हा आहे की इंटरप्रीटेशनवर सिद्धांत अवलंबून आहेत. पुराव्यांवर नाही. कारण पुराव्यांना मर्यादा पडतात. कुठल्याही थेरीला नाकारतांना त्यात झालेली नवी संशोधने पुर्वीच्या संशोधनातल्या पुराव्यांच्या उणिवा शोधून काढतात. जरी एखादी थेरी प्रयोग करून निष्कर्ष काढून कितीही समर्थ दिसत असली तरी ती त्या विवक्षित वेळेपुरती समर्थ असते. पुढचे वेगळी संशोधने तिला बाद करतात. हेच विज्ञान आहे. त्यामुळे विज्ञानात कुठलाही शब्द अंतिम नसतो.

आणि हाच मोठा फरक आहे! विज्ञान कालबाह्य झालेल्या गोष्टीना सोडून देण्यास मागेपुढे पहात नाही. समोर दिसणाऱ्या सिध्द झालेल्या सत्याला स्वीकारण्याची त्याची वृत्ती आहे.
बरोबर, धर्म आणि विज्ञानात फरक आहेच. पण लोक धर्म आणि विज्ञान ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हेच मान्य करत नाहीत. बदलत्या काळानुसार लोकांची धार्मिक आचरणं व त्यामागचे विचार बदलत आहेत. यश न देणार्‍या खुळचट मान्यतांच्या मागे न लागता लोक विज्ञानावर आधी विश्वास ठेवतात. पण जिथे विज्ञान उत्तर देऊ शकत नाही तिथे त्यांना धार्मिक आधार लागतोच. पण काही विज्ञानवादी हे समजून न घेता विचित्र वागतात.

संदीप डांगे's picture

3 Dec 2015 - 9:35 am | संदीप डांगे

या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

माझेही काहीसे असेच मत उलट प्रकारे आहे. असो. आस्तिकांच्या घट्ट धर्मसंकल्पना, विश्वाबद्दलच्या संकल्पना ह्या मुळापासून उखडण्याचा प्रयत्न झाल्याने हा झगडा उभा राहिला आहे. हा विषय मोठा आहे. एक दोन प्रतिसादात एवढा पसारा मांडणे शक्य नाही. तसेच, बोगसपणाबद्दल म्हणाल तर उत्क्रांतीवाद्यांनीही बराच बोगसपणा केलाय.

विस्तृत माहितीपूर्ण लेखांतून चर्चा आवश्यक आहे. याविषयावर मिपावर आधी चर्चा झालेली असेल तर कृपया लिंक द्यावी.

संदीप डांगे's picture

2 Dec 2015 - 9:53 pm | संदीप डांगे

ही थेरीही बाद झाली म्हणे.

cc
शाळेत आजवर लाखो मुलांना जे शिकवले गेले ते परत करेक्ट केले का शास्त्रज्ञांनी? कारण मला ही थेरी बाद झालीये हे आजच कळते आहे. माझ्यासारख्या करोडोंना तर गंधही नसेल. वैज्ञानिक विचारसरणीचा पुरस्कार करणार्‍या स्वयंघोषित विज्ञानपंडीतांनी ह्याबद्दल खरेतर योग्य ती माहिती प्रसाराचे हे काम करणे इतर गोष्टींपेक्षा जास्त आवश्यक आहे.

प्रसाद१९७१'s picture

3 Dec 2015 - 10:15 am | प्रसाद१९७१

एकुणच एव्होल्युशन ची एकपेशीय जीवा पासुन हळु कळु माणसा पर्यंत चे जीव निर्माण झाली ही थियरी ज्यांना पटते ते चांगलेच अंधश्रद्ध आहेत असे माझे मत आहे.

तो सर्व प्रकार म्हणजे कोडेच आहे आणि अजुन तरी त्याला लॉजिकल्/रॅशनल उत्तर सापडले आहे असे मला तरी वाटत नाही.

मार्मिक गोडसे's picture

2 Dec 2015 - 9:15 pm | मार्मिक गोडसे

Evolution च्या वरील चित्रामुळे अशा शंका काढल्या जातात. मुळात Evolution हे एकरेषीय पद्धतीने झालेले नाही, त्यामुळे एकपेशीय पासून पुढे अनेकपेशी प्राणी तयार झाले तरी एकपेशी (अमिबा) अजुनही अस्तित्वात आहेच की.

संदीप डांगे's picture

2 Dec 2015 - 9:27 pm | संदीप डांगे

now we are challenging our knowledge about things we learned.

इथे दोन गोष्टी आहेत.

माझ्या माहितीनुसार:
१. परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या गरजेतून सजीव उत्क्रांत होत गेले.
२. अनेकपेशी प्राणी तयार झाले तरी एकपेशी अजुनही अस्तित्वात आहे

वरच्या पैकी कोणतेही एक वाक्य सत्य असू शकेल. जर परिस्थितीशी जुळवून घ्यायचे तर अमिबा राहणारच नाही. अमिबाही राहत असेल तर परिस्थितीशी जुळवून घेण्याची गरज का भासावी?

अकरावी सायन्सला येईपर्यंत माझा पक्का समज होता की अमीबा ही एक्स्टिंक्ट स्पीसीज आहे. कारण त्याच्यापासूनच आपण उत्क्रांत झालोना? नंतर कळले की असे काही नाही, अमिबा आहे आणि त्यामुळे काही आजारही होतात. ;-)

(ही चर्चा ह्याव धाग्यावर करायची की कुणी जाणकार वेगळा धागा काढण्याची कृपा करेल?)

अर्धवटराव's picture

3 Dec 2015 - 2:17 am | अर्धवटराव

इव्हॉल्युशन हे रॉ मटेरीयलवर प्रक्रिया करुन प्रॉडक्ट बनवण्यासारखं नाहि. बीज->अंकुर->रोपटं->ओंबी->गहु->कणिक->पोळी असं त्यात होत नाहि. ते झाडाच्या मुळासारखं असतं. एखाद्या सजीव शरीतात १० क्वालिटी असतील. त्यातल्या ४ नवीन परिस्थितीशी जुळवुन घ्यायला म्हणुन बदलतील. किंवा मूळ सजीव शरीर त्या ४ क्वालिटी रद्द करेल. म्हणजे या तीन संभावना - मूळ शरीर, ४ क्वालिटी बदललेलं शरीर, ४ क्वालिटी रद्द केलेले शरीर - स्वतंत्र शरीर रचना म्हणुन पुढे टिकुन राहायला धडपडतील. स्थल, काल, परिस्थिती आणि शरीर रचनेच्या अनंत कॉम्बीनेशन्स आणि प्रकियांचा परिपाक म्हणजे आज दिसतय तसं सजीव शरीर.
अर्थात, हे फार ढोबळ मानाने सुलभीकरण झालं.
अवांतराबद्दल क्षमस्व.

आनन्दा's picture

3 Dec 2015 - 9:03 am | आनन्दा

१. परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या गरजेतून सजीव उत्क्रांत होत गेले.
२. अनेकपेशी प्राणी तयार झाले तरी एकपेशी अजुनही अस्तित्वात आहे

दोन्ही वाक्ये सत्य आहेत. कारण पहिले वाक्य आशयाच्या दृष्टीने अर्धे आहे. ते
१. परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या गरजेतून काही सजीव उत्क्रांत होत गेले. असे पाहिजे.
उत्क्रांती काही स्विच फिरवून झालेली नाही. विशिष्ट प्रजातींमधील काही जीव बदलत्या परिस्थितीला जसे सामोरे गेले त्यावर त्यांची काय आणि कशी उत्क्रांंती झाले हे अवलंबून असते. आता मला सांगा. तुम्ही आणि मी. तुम्ही नाशिकला राहता. मी पुण्यात राहतो. उद्या समजा (समजा हं कारण अवास्तव उदाहरण आहे) पुण्यात पूर आला, आणि मला ४ दिवस पाण्याखाली रहावे लागले, तर माझ्या शरीरात काहीतरी म्युटेशन्स होतील, आणि माणसाअची नवीन प्रजाती तयार होईल. पण म्हणून सगळी मानवजातच नष्ट होईल असे नाही. पण जर माझी म्युटेशन्स फारच वेगळी निघाली आणि जर मी जाऊन बाकी सगळ्यांना मारून टाकले, किंवा जगबुडी आली आणि सगळेच मेले तर मग मात्र मानवजात नष्ट होईल आणि ही नवीन प्रजातच शिल्लक राहील. सगळा प्रोबॅबिलिटीचा खेळ आहे हो. मुळात उत्क्रांती म्हणजे परम्युटेशन्स असतात. त्यामुळे एखादा अंतरिम सिद्धांत असा केवळ हायपोथिसिसवर काढणे शक्य नसते.

संदीप डांगे's picture

3 Dec 2015 - 12:19 pm | संदीप डांगे

आहे हो, भरपूर गोंधळ आहे. निदान माझ्या मनात तरी. ह्या विरुद्ध बाजूने विचार आणि अभ्यास करायला सुरुवात आता आता केली आहे. आधी उत्क्रांतीवाद नीट पूर्णपणे समजून घ्यायला लागेल, नंतर त्याचे लूपहोल्स. शाळेत असतांना जेवढे शिकलो तेवढंच माहित असतं. आणि शाळेत कुठे पूर्ण थेरी शिकवतात? डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे असे आहे म्हटले की संपले, चिकित्सा नको, प्रश्न नको. बराच काळ तर 'सर्वायवल ऑफ द फिटेस्ट' म्हणजे 'बलवान असतात तेच टिकतात' असा चुकीचा अर्थ असलेलं वाक्य जनमान्य होतं. आता 'सर्वायवल ऑफ द फिटेस्ट' ह्या थेरीमधेही बराच गोंधळ आहे असं जाणवतं.

असो. ह्या चर्चेसाठी वेगळा धागाच लागेल असं दिसतंय.

मार्मिक गोडसे's picture

3 Dec 2015 - 12:59 pm | मार्मिक गोडसे

मुळात उत्क्रांती म्हणजे परम्युटेशन्स असतात

.
अगदी योग्य शब्द.
तुमचा वरील प्रतिसाद वाचल्यावर आतातरी 'हे' अजुन अस्तित्वात कसे किंवा 'हे' मिलियन कुठे गेले असे प्रश्न कोणी विचारणार नाही.

ज्यांचे मुळ पुर्वज एकच आहे असे आपल्या अवती भवती मल्टी ड्रग रेझिस्टंस असलेले व मल्टी ड्रग रेझिस्टंस नसलेले अनेक टी.बी चे जिवाणू एकाचवेळी आढळतात हे कोणाला खटकत का नाही?

प्रसाद१९७१'s picture

3 Dec 2015 - 1:17 pm | प्रसाद१९७१

आतातरी 'हे' अजुन अस्तित्वात कसे किंवा 'हे' मिलियन कुठे गेले असे प्रश्न कोणी विचारणार नाही.

प्रश्न हा आहे की खूप पूर्वीचे आणि आत्ताचे "हे" जर अजुन अस्तीत्वात आहेत तर मधल्या काळातले "हे" कसे गायब झाले?

कोणी जेलीबीन ची कीटकॅट ऑपोऑप होताना बघितली आहे का?

मार्मिक गोडसे's picture

3 Dec 2015 - 1:22 pm | मार्मिक गोडसे

तुमचा वरील प्रतिसाद वाचल्यावर आतातरी 'हे' अजुन अस्तित्वात कसे किंवा 'हे' मिलियन कुठे गेले असे प्रश्न कोणी विचारणार नाही.

नीट समजून घ्या

दुसरा म्हणजे विश्वनिर्माता, निर्गुण, निराकार ईश्वर. त्याने केलेल्या नियमांनुसार विश्व चालते. विश्वरहाटीत तो कोणतीही ढवळाढवळ करीत नाही. या ईश्वराशी माणूस कोणत्याही प्रकारे संपर्क साधू शकत नाही. त्याचे केवळ अस्तित्व मानायचे.

हे आवडलं.

असंका's picture

2 Dec 2015 - 8:47 am | असंका

बिकट वाट वहिवाट...
आपल्या चिकाटीला सलाम!!

बाकी सगळे जाऊ दे. मला माझ्या २ प्रश्नांची समर्पक उत्तरे द्या म्हणजे मी सुटलो..
१. या ठिकाणी लिहिलेल्या अनुभवांचा कार्यकारणभाव स्पष्ट करा. वर लिहिलेले अनुभव १००% सत्य आहेत, आणि जखमेत किडे पडणे म्हणजे नेमका कोणता आजार आहे हे एखाद्या गावाकडच्याला विचारा. तो त्या आजारचे गांभीर्य सांगेल. एखाद्या बैलाच्या अंडकोषात झालेल्या जखमेत किडे पडले तर त्यावर काय उपचार करतात ते ही विचारा.
२. माणूस संमोहित नेमक्या कोणत्या कारणाने होतो? मोठ्या सभागृहात संमोहनाचे प्रयोग करणारे नेमकी कोणती वैज्ञानिक क्रिया वापरतात?

आणि जाता जाता अजून एक प्रश्न, संमोहनाला आपण अंधश्रद्धा मानता का? हो तर का? नाही तर का? हो असेल तर मग त्याच संमोहनाचा आधार घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन करणारे श्रद्धाळूंवर आरोप का करतात?

प्रसाद१९७१'s picture

2 Dec 2015 - 10:17 am | प्रसाद१९७१

वैताग आला हो यनावाला तुमच्या ह्या लेखांचा. आता तरी एखादा दुसरा विषय हातात घ्याना.

पगला गजोधर's picture

2 Dec 2015 - 10:33 am | पगला गजोधर

astik

अनुप ढेरे's picture

2 Dec 2015 - 10:38 am | अनुप ढेरे

लेख आवडला. माझे स्वतःचे विचार याबाबत बदलले आहेत गेल्या काही वर्षात. अजूनही बदल आहेत. ते असे लेख वाचूनच.

मृत्युन्जय's picture

2 Dec 2015 - 11:02 am | मृत्युन्जय

बाकी सगळे ठीक आहे. पण तुम्ही विशेषत" भौतिकशास्त्रज्ञांबद्दल लिहिले आहे म्हणुन विचारतो "God does not play dice with the universe.” असे कोण म्हणाले होते? ;)

शिवाय खालचे वाक्य कोणाचे आहे ते देखील सांगा आणि हा माणूस डार्विनच्या आधीचा की नंतरचा ते पण सांगा.

“I want to know how God created this world. I am not interested in this or that phenomenon, in the spectrum of this or that element. I want to know His thoughts; the rest are details.”

असले काही बोलणार्‍या माणसाला भौतिकशास्त्राबद्दल फार काही माहिती नसणार असेच आपले मत असेल अशी अपेक्षा करतो.

अनुप ढेरे's picture

2 Dec 2015 - 11:28 am | अनुप ढेरे

"God does not play dice with the universe.”

याचा अर्थ आइन्स्टाइन देवावर विश्वास ठेवणारा होता असा घेता येत नाही. खालील चर्चा वाचा.
https://www.quora.com/What-did-Einstein-mean-by-God-does-not-play-dice-w...

मृत्युन्जय's picture

2 Dec 2015 - 11:48 am | मृत्युन्जय

म्हणुनच मी अजुन एक वाक्य दिले आहे. ते देखील त्याचेच आहे.

सुबोध खरे's picture

2 Dec 2015 - 11:23 am | सुबोध खरे

आपल्या लेखात काही गृहितके आहेत जी कदाचित बरोबर नाहीत. उदा. पूर्वी माणसाला निसर्गनियमांविषयी निश्चित असे ज्ञान नव्हते.याचा अध्यारुथ अर्थ असा आहे कि आता माणसाला निसर्ग नियमांबद्दल "बरेच"( सर्व शब्द टाळला आहे) काही माहित आहे.
दुर्दैवाने ( दैव मनात असतील त्यांच्यासाठी ) आजही विज्ञानाला ९९.९९ % निसर्गातील गोष्टी माहित नाहीत. जे ज्ञान आहे(असे वाटते) ते बरेचसे वरवरचे आहे. यामुळे कितीही वैज्ञानिक झाला तरी तो एका विशिष्ट टप्प्यावर येतो तेंव्हा त्याची मती कुंठीत होते आणि मग तो एखाद्या अमानवी शक्तीला शरण जातो. मग त्याला तुम्ही जग नियंता म्हणा परमेश्वर म्हणा किंवा अल्ला म्हणा. उदा. चंद्र पृथ्वी भोवती फिरतो याचे कारण गुरुत्वाकर्षण आहे. पण हे गुरुत्व आकर्षणच का?अपकर्षण का नाही? मी जन्माला का आलो? माझे जवळचे नातेवाईक मृत्युमुखी पडले म्हणजे काय झाले. पार्थिव तेथेच आहे पण त्यातील "प्राण" गेला. हा प्राण गेला म्हणजे काय?
आपल्या जन्माच्या आधी काय होते?
आणि आपले मृत्युच्या नंतर काय होते ?
हा शेवटचा प्रश्न तर सर्वानाच भयाकारी वाटतो. अतिशय बुद्धीप्रामाण्यवादी आणि पराकोटीचे नास्तिक असे एक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आपल्या बायपास शल्यक्रियेनंतर आय सी यु मध्ये ventilator वर होते तेंव्हा त्यांचे हृदय नीट चालत नव्हते हृदयाची क्षमता २५ %(ejection fraction) होती. तेंव्हा मी त्यांच्या छातीत पाणी झालेले काढण्यासाठी गेलो होतो. त्याच्या अगोदर त्यांच्या पत्नीने त्यांना कोणत्या तरी गुरूचा अंगारा लावला त्यानंतर त्यांनी भक्तिभावाने त्या गुरुना( किंवा ईश्वराला) नमस्कार केला.
आता आता मी त्यांना परत "असहिष्णुता आणि निधार्मिकतेवर" हिरीरीने वादावाद करताना पाहिले.
म्हणजे शेवटी स्वतः वर पाळी आली कि असंख्य नास्तिक लोक "आस्तिक" होतात कि नाही ते माहित नाही पण "अगतिक" होताना मात्र पाहिले आहे.
नाही देखिले पंचानना
तोवरी जंबुक करी गर्जना

पगला गजोधर's picture

2 Dec 2015 - 11:51 am | पगला गजोधर

तोवरी जंबुक (आस्तिक आणि नास्तिक, दोन्ही) करी गर्जना

a

संदीप डांगे's picture

2 Dec 2015 - 12:07 pm | संदीप डांगे

हे हे....

लय भन्नाट आवडलं. शंभर प्रतिसादाची ताकत एकाच जिफ मधे...

असंका's picture

2 Dec 2015 - 12:02 pm | असंका

अध्यारुथ की अध्याहृत?

शब्दबम्बाळ's picture

3 Dec 2015 - 4:21 am | शब्दबम्बाळ

मुळात निसर्गनियमांविषयी आपल्याला किती माहिती आहे हे टक्केवारी मध्ये काढणे शक्यच नाही कारण त्यासाठी आधी निसर्गनियम किती आहेत याची पूर्ण कल्पना असणे आवश्यक आहे! आणि हा निसर्ग नियमांचा आकडा कोणी आपल्याला देऊ शकणार नसल्यामुळे अशी टक्केवारी कधी काढता येईल का, हा हि प्रश्न आहे.

पण जर सगळे निसर्गनियम माणसाला कळाले तर तो देव होईल का?

बाकी तुम्हाला पडलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रश्नावर थोड लिहितो.
या विश्वातल्या कुठल्याही दोन वस्तुमान असलेल्या वस्तू एकमेकांना ओढण्याचा प्रयत्न करतात त्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो.
आता पृथ्वी सूर्याभोवती का फिरते? या दोघांना एकमेकांत काय बांधून ठेवते हा प्रश्न पडणे साहजिक आहे आणि बर्याच जणांना तो पडला देखील.
याचे उत्तर एका पद्धतीने देत येते.
आपण वेळ(Time ) पाहू शकत नाही. पण वेळेला देखील भौतिकीचे नियम लागू होतात!
आपण त्रिमितीय (3Dimensional ) जगात राहतो त्यामुळे यापेक्षा जास्तीच्या मिती आपण पाहू शकत नाही. यातूनच space -Time या संकल्पनेचा उगम झाला. त्यामुळे आपल्या विश्वाला ३+१ D असे म्हणता येत. ३ Dimesnions for Space and १ Dimension for Time
हा स्पेस टाइम सगळीकडे आहे.

आता विचार करा कि अधांतरी एक सगळ्या बाजूनी घट्ट ताणलेला कापडाचा एक तुकडा आहे. सगळीकडून समान ताण असल्यामुळे तो सध्या सपाट आहे. आता त्याच्या मध्यभागी एक छोटा गोल ठेवा, काय होईल? मध्यभागात खड्डा तयार होईल आणि सपाट असलेल्या कापडाचा खोलगट आकार तयार होईल.
या खोलगट आकारात विशिष्ठ वेगाने अजून एक गोळा सोडला तर तो वर्तुळाकार फिरत मधल्या खोलगट भागाकडे जाऊ लागेल. हाच सिद्धांत आहे गुरुत्वाकर्षणाचा!
spacetime

खूप मस्त आहे फिजिक्स, जनरल रिलेटिविटि, स्पेशल रिलेटिविटि, क़्वाण्टम फिजिक्स यावर स्वतंत्र लेख लिहावे लागतील म्हणजे हे सगळे सोप्प करून सांगता येईल...

काय भारी सांगितलंत!! (म्हणजे कळल्यासारखं वाटलं तरी.)

धन्यवाद!!

विवेक ठाकूर's picture

3 Dec 2015 - 6:19 pm | विवेक ठाकूर

आपण वेळ(Time ) पाहू शकत नाही. पण वेळेला देखील भौतिकीचे नियम लागू होतात!

वेळ हा पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे होणारा भासमान उजेड-अंधाराचा खेळ आहे. केवळ सोयीसाठी आपण, एका परिभ्रमणाला एक दिवस असं कल्पून त्याचे २४ भाग वगैरे केलेत. त्यामुळे जी गोष्ट अस्तित्त्वातच नाही तिला भौतिकीचे नियम लागू होत नाहीत. वेळ या संकल्पनेनं प्रक्रियेला लागणारा कालावधी मोजला जातो.

आपण त्रिमितीय (3Dimensional ) जगात राहतो त्यामुळे यापेक्षा जास्तीच्या मिती आपण पाहू शकत नाही.

आपण चौमितीय जगात राहातो. ज्या मितीत सगळ्या घटना घडतात ती चवथी मिती स्पेस आहे.

या विश्वातल्या कुठल्याही दोन वस्तुमान असलेल्या वस्तू एकमेकांना ओढण्याचा प्रयत्न करतात त्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो.

हे बरोबर आहे पण कापडाचे उदाहरण गंडले आहे.

शब्दबम्बाळ's picture

3 Dec 2015 - 6:53 pm | शब्दबम्बाळ

इतक्या आत्मविश्वासाने आपण हे बोललात हे पाहून गम्मत वाटली!

आपले मुद्दे आणि त्यावर स्पष्टीकरण देत आहे
१. "वेळ हा पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे होणारा भासमान उजेड-अंधाराचा खेळ आहे". इत्यादी....
आपण सापेक्षता सिद्धांत वाचला आहे का?
वेळ (Time ) गुरुत्वाकर्षण यावर देखील अवलंबून असतो. तसेच त्याचे प्रसरण किंवा आकुंचन देखील होऊ शकते.
आकाशात फिरणाऱ्या उपग्र्हांसाठी देखील वेळ(TIME ) हळूहळू पुढे सरकतो (पृथ्वीवरील वेळेच्या सापेक्ष), अर्थात हा फरक फार लहान असतो. पण जर तुम्ही कृष्ण विवारासारखी प्रचंड घनता असलेल्या गोष्टीजवळ असाल तर हि तफावत प्रचंड मोठी होते!

तसेच वस्तूच्या गतीवर देखील TIME अवलंबून असतो. या वरूनच आइनस्टाइनचे प्रसिध्द प्रमेय आले आहे.
E = M * C ^२ (C = प्रकाशाचा वेग, M = वस्तुमान, E = एनर्जी)

२. "आपण चौमितीय जगात राहातो. ज्या मितीत सगळ्या घटना घडतात ती चवथी मिती स्पेस आहे."
याचे काही स्पष्टीकरण मिळेल का?
कुठलीही मिती (Dimension ) हि इतर उपलब्ध मितीना काटकोनात (perpendicular ) छेदते. त्यामुळे स्पेस हि चौथी मिती कशी सिध्द करता येईल हे ऐकायला आवडेल.
-> तसेच आपण चौमितीय जगात राहतो हे ही कसे सिध्द होते?
स्ट्रिंग थेअरी नुसार १०मिति असू शकतात आणि १ मिती TiME साठी. अर्थात तेही अजून खात्रीलायक नाहीये.
आपण त्रिमितीय जीव आहोत कारण आपण चौथ्या मितीमध्ये फेरफार करू शकत नाही किंवा तिचा विचार देखील करू शकत नाही.

३." हे बरोबर आहे पण कापडाचे उदाहरण गंडले आहे."
हाहा, बर मग सांगा तरी काय गंडले आहे!
कस आहे, तुम्ही चूक आहात हे बोलायला काहीही लागत नाही पण ते सिध्द करायला उदाहरण लागत!

त्यामुळे, कृपया स्पष्टीकरण द्यावे कि आपले विचार काय आहेत याबाबत...

१) एक साधी गोष्ट सांगा, घड्याळ नसेल तर वेळ मोजता येईल का? आणि घड्याळ पृथ्वीच्या परिभ्रमणावर आधारित आहे. वेळेचा उपयोग सोयीसाठी आहे पण वस्तुतः वेळ हा निव्वळ भास आहे. भासाचं प्रसरण किंवा आकुंचन असंभव आहे.

तसेच वस्तूच्या गतीवर देखील TIME अवलंबून असतो.

तुम्ही पुन्हा तेच सांगतायं. गती ही प्रोसेस आहे आणि ती मोजायला वेळ उपयोगी आहे पण मुळात वेळ असं काहीही नाही.

२) कुठलीही मिती (Dimension ) हि इतर उपलब्ध मितीना काटकोनात (perpendicular ) छेदते.

ज्या आवकाशात हा छेद जातो ते आवकाश म्हणजे स्पेस.

दुसरी साधी गोष्ट पाहा. स्पेस नसेल तर कोणतिही हालचाल किंवा प्रक्रिया असंभव आहे.

३) बर मग सांगा तरी काय गंडले आहे!

कापड आधांतरी आहे, त्यात पहिला गोळा टाकला आणि कापड खोलगट झालं, मग दुसरा गोळा विशीष्ट वेगानं सोडला....कशाला एवढा उद्योग ?

पृथ्वीवर कोणतिही वस्तु हातातून सुटल्यावर खाली पडते कारण, तुम्ही म्हटल्याप्रमाणे "या विश्वातल्या कुठल्याही दोन वस्तुमान असलेल्या वस्तू एकमेकांना ओढण्याचा प्रयत्न करतात त्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो ".

शब्दबम्बाळ's picture

3 Dec 2015 - 8:05 pm | शब्दबम्बाळ

तुमचा प्रचंड मोठा घोळ होतोय!
पुनः तुमचे मुद्दे आणि स्पष्टीकरण:

१. "एक साधी गोष्ट सांगा, घड्याळ नसेल तर वेळ मोजता येईल का? आणि घड्याळ पृथ्वीच्या परिभ्रमणावर आधारित आहे. वेळेचा उपयोग सोयीसाठी आहे पण वस्तुतः वेळ हा निव्वळ भास आहे. भासाचं प्रसरण किंवा आकुंचन असंभव आहे."

मला सांगा वजनकाट्यशिवय वजन मोजता येईल का? ध्वनिलहरी उपकरण न वापरता मोजता येतील का? मग या गोष्टी देखील अस्तित्वात नाहीत म्हणायला पाहिजे नाही का?

आपण जिथे राहतो ती जागा स्पेसचाच एक भाग आहे आणि या स्पेस मधील कोणत्याही वस्तूच्या जागेला आपण ३ अक्षांच्या सहाय्याने नोंदवू शकतो. पण त्याशिवाय अजून एक गोष्ट लागते ती म्हणजे Time
चंद्र आत्ता ज्या जागी आहे ते आपण ३ अक्षांवर मांडू शकतो पण अजून एक काळाचा अक्ष घेतला तर त्याचा संपूर्ण प्रवास दर्शवता येतो.
आणि मी स्पेस टाईम बद्दल बोललो होतो. ते म्हणजे एकमेकांशी गुंतलेल प्रतल समजू शकता.

२. "ज्या आवकाशात हा छेद जातो ते आवकाश म्हणजे स्पेस.
दुसरी साधी गोष्ट पाहा. स्पेस नसेल तर कोणतिही हालचाल किंवा प्रक्रिया असंभव आहे."

अहो आपण त्या स्पेस मधेच राहतोय जे आपल्यासाठी त्रिमितीय आहे आणि आपली हालचाल देखील तेवढ्याच मितीन्पुरती मर्यादित आहे!!

३. "कशाला एवढा उद्योग ?पृथ्वीवर कोणतिही वस्तु हातातून सुटल्यावर खाली पडते"

तुम्ही खूपच लहान उदाहरण घेत आहात. मग मला सांगा पृथ्वी सुर्याभोवतो चौकान किंवा त्रिकोण आकारात का फिरत नाही हो?
किंवा कुठलाच ग्रह इतर आकारात का फिरत नाही? धप्प करून पडायचं ना सरळ तार्यामध्ये जाउन!!

विवेक ठाकूर's picture

3 Dec 2015 - 10:48 pm | विवेक ठाकूर

म्हणजे चर्चा लाईनवर राहिल.

२. अहो आपण त्या स्पेस मधेच राहतोय जे आपल्यासाठी त्रिमितीय आहे आणि आपली हालचाल देखील तेवढ्याच मितीन्पुरती मर्यादित आहे!!

आपलं शरीर त्रिमितीय आहे आणि त्याची हालचाल स्पेसशिवाय असंभव आहे.

३ कुठलाच ग्रह इतर आकारात का फिरत नाही?

प्रश्न गुरुत्वाकर्षण म्हणजे काय असा होता, परिभ्रमणाच्या आकाराचा नाही.

शब्दबम्बाळ's picture

4 Dec 2015 - 12:46 am | शब्दबम्बाळ

तुम्हाला खरच चर्चा करायची आहे कि उगीच टंगळ मंगळ करत आहात?
कारण तसे असेल तर माझा "वेळ" कृपया वाया घालवू नका

मी लिहिलेला मुद्दा क्र १ हा Time (वेळ) याविषयीच होता त्याकडे सपशेल दुर्लक्ष्य करून चकार शब्दही न काढता मला मुद्द्यावर चर्चा करायला सांगताय?

मुद्दा २ विषयी बोलतच नाही कारण तुम्ही एकाच वाक्य परत परत लिहिताय, कुठल्याही स्पष्टीकरणाशिवाय!

आता मुद्दा क्र ३: पृथ्वी सूर्याभोवती गम्मत म्हणून फिरते का? गुरुत्वाकर्षणमुळेच फिरते ना! मग सांगा कि आता, त्रिकोण किंवा चौकोन आकारात का फिरत नाही?
हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे तुम्ही मी दिलेलं कापडाच उदाहरण गंडले आहे हे म्हणाला होतात. स्वतः लिहिलेल्या प्रतिक्रिया तरी लक्षात ठेवा!