काही वैज्ञानिक आस्तिक असतात हे खरे आहे. मात्र सर्व सामान्य जनतेत आस्तिकांचे प्रमाण 90% हून अधिक आहे; तर भौतिक शास्त्रज्ञांत ते 10% हून कमी आहे, असे अनेक विश्वासार्ह सर्वेक्षणे दाखवतात. म्हणजे 90% वैज्ञानिक नास्तिक असतात. ज्यांनी मूलभूत (बेसिक) विज्ञानाचा अभ्यास केला आहे त्यांत 100 तील 10 जण तरी आस्तिक का असावेत ? याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे देता येते.:-
पूर्वी माणसाला निसर्गनियमांविषयी निश्चित असे ज्ञान नव्हते. नैसर्गिक घटनांचे कार्य-कारणभाव कळत नव्हते. अनुभवाने जेवढे समजत होते तेवढेच. भूकंप, वणवे, महापूर, वादळे अशा आपत्तींनी भेदरलेल्या माणसाला या संकटांत कुणाचा तरी आधार हवा होता. हे उत्पात कोण घडवतो हे समजत नव्हते. पण तो कोणीतरी महासामर्थ्यशाली, अलौकिक पुरुष असला पाहिजे असे वाटत होते. अशा परिस्थितीत माणसाला देवकल्पना सुचली असावी. या काल्पनिक देवाला त्याने आपला रक्षणकर्ता मानले. हे बारा/पंधरा हजार वर्षांपूर्वी घडले असावे. देवाने संकटातून वाचवायचे तर त्याला शरण जायला हवे. त्याची स्तुती करायला हवी. त्याला संतुष्ट ठेवायला हवे. त्यासाठी काही अर्पण करायला हवे. त्यांतून ईशस्तवन- देवपूजा-गंध-फूल-अक्षता-नैवेद्य-बळी- अशा प्रथा पडल्या.
ही देवकल्पना माणसाला आश्वासक वाटू लागली. आवडली. ती मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होत गेली. बालपणी मुलगी जे पाहायची, ऐकायची, करायची ते आणि तसे पुढे आपल्या मुलांना सांगायची. आजही आई ,"देवबाप्पाला नमो कर . तो तुला बुद्धी देतो. यश देतो. आयुष्य देतो. संकटातून वाचवतो. " असे आपल्या मुलांना सांगते. कारण तिने तसे आपल्या आईकडून ऐकलेले असते. आपले माता-पिता काय करतात, काय सांगतात. आजूबाजूची मोठी माणसे काय बोलतात, काय करतात. ते बालक पाहाते. देवदर्शनासाठी जमलेल्या गर्दीची दृश्ये टी.व्ही.वर बघते. वर्तमानपत्रात भक्तांच्या गर्दीचे फोटो न्याहाळते. देवाचा जयजयकार ऐकते. मोठे झाल्यावर देवाविषयी वाचते, ऐकते, पाहाते. समाजात सर्वत्र देवाचा उदो उदो होतो असे त्याला दिसते. त्यामुळे मेंदूत संस्कार दृढ होतात. डोक्यावर चढलेले हे भ्रामक संस्कारांचे गाठोडे झुगारून देणे अवघड असते. जगप्रसिद्ध नास्तिक रिचर्ड डॉकिन्स म्हणतात, "आपल्या बाळाला देवा-धर्माच्या संस्कारांचे विष आई स्वमुखातून पाजते. त्याचा परिणाम आयुष्यभर टिकू शकतो."
काही वैज्ञानिकांची देवावर श्रद्धा असते त्याचे कारण या लहानपणीच्या संस्कारात आहे. बालपणी मेंदूत कोरले गेलेले हे संस्कार दृढमूल होतात. मेंदूच्या एका कप्प्यात कायम राहातात. भांड्यावर कोरलेले नाव पुसून टाकणे जसे अवघड असते तसे हे मेंदूतील स्मृतिकेंद्रात कोरलेले संस्कार घालवणे दुरापास्त असते. या कारणाने बुद्धिमान वैज्ञानिकसुद्धा आस्तिक असू शकतात.
ईश्वराची संकल्पना प्रामुख्याने दोन स्तरांवर आहे. एक म्हणजे जगनिर्माता, जगन्नियंता, पूजा-अर्चा-प्रार्थना-स्तवने यांनी प्रसन्न होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटसमयीं धावून येणारा देव. हा उपासनेचा देव होय. बहुसंख्य आस्तिक हाच देव मानतात. त्याच्या कृपेसाठी व्रत-वैकल्ये, हवने-अनुष्ठाने करतात. दुसरा म्हणजे विश्वनिर्माता, निर्गुण, निराकार ईश्वर. त्याने केलेल्या नियमांनुसार विश्व चालते. विश्वरहाटीत तो कोणतीही ढवळाढवळ करीत नाही. या ईश्वराशी माणूस कोणत्याही प्रकारे संपर्क साधू शकत नाही. त्याचे केवळ अस्तित्व मानायचे. असा ईश्वर मानणार्या आस्तिकांचे प्रमाण अल्प आहे. त्यांत या आस्तिक वैज्ञानिकांचा समावेश होतो. म.फुलेसुद्धा असे आस्तिक होते. त्यांनी या परमेश्वरासाठी "निर्मिक" असा शब्द आपल्या लेखनात योजला आहे.
ईश्वराच्या अस्तित्वाविषयीं ज्यांचे कोणतेही ठाम मत नसते ते अज्ञेयवादी होत. विश्वनिर्माता परमेश्वर असेल अथवा नसेल असे ते म्हणतात. सुधारककार आगरकर अज्ञेयवादी होते. डार्विनपूर्वकालीन कांही वैज्ञानिक अज्ञेयवादी होते. कारण इतके आश्चर्यकारक वैविध्य असलेली जीवसृष्टी निसर्गत: निर्माण झाली हे त्यांना पटत नव्हते आणि कशी निर्माण झाली याचे बुद्धिगम्य स्पष्टीकरण मिळत नव्हते. डार्विनच्या उत्क्रांतिवादातील यादृच्छिक उत्परिवर्तन (रॅंडम म्युटेशन ) आणि अयादृच्छिक नैसर्गिक निवड (नॉन रॅंडम नॅचरल सिलेक्शन) या तत्त्वाने ते स्पष्टीकरण आता मिळते. किंबहुना या तत्त्वानुसार हे वैविध्य अपरिहार्य ठरते. डार्विनच्या तत्त्वांमुळे बौद्धिकदृष्ट्या समाधानी नास्तिक होता येते. म्हणून डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धान्तामुळे ज्ञानाच्या क्षेत्रातून ईश्वराची हद्दपारी अधोरेखित झाली असे म्हटले जाते.
आस्तिक वैज्ञानिक
गाभा:
प्रतिक्रिया
4 Dec 2015 - 10:35 am | विवेक ठाकूर
१) मी लिहिलेला मुद्दा क्र १ हा Time (वेळ) याविषयीच होता
तो भास आहे हे तुम्हाला प्रथमच सांगीतलेयं. ती वस्तुस्थिती आहे हे तुम्ही सिद्ध करा.
पृथ्वी सूर्याभोवती गम्मत म्हणून फिरते का? गुरुत्वाकर्षणमुळेच फिरते ना! मग सांगा कि आता, त्रिकोण किंवा चौकोन आकारात का फिरत नाही?
२)अहो आपण त्या स्पेस मधेच राहतोय जे आपल्यासाठी त्रिमितीय आहे आणि आपली हालचाल देखील तेवढ्याच मितीन्पुरती मर्यादित आहे!!
हा तर भन्नाट ज्योक आहे ! स्पेसचा अर्थ निराकार. तुमच्या शरीराच्या अवतीभवतीची जागा. शरीर त्रिमितीय आहे आणि स्पेसमुळे हालचाल संभव आहे हे कुणालाही कळेल.
३)आता मुद्दा क्र ३: पृथ्वी सूर्याभोवती गम्मत म्हणून फिरते का? गुरुत्वाकर्षणमुळेच फिरते ना! मग सांगा कि आता, त्रिकोण किंवा चौकोन आकारात का फिरत नाही?
या अस्तित्वातली `स्वयंभू गती' चक्राकार आहे. ती तशी का आहे हे विचारणं म्हणजे, `गुरुत्त्वाकर्षण का आहे' विचारण्यासारखं आहे.
4 Dec 2015 - 5:21 pm | शब्दबम्बाळ
हाहा मज्जा आहे बुवा!
स्वयंभू गती?! :D
असो, चालू द्या तुमच!
4 Dec 2015 - 7:37 pm | कवितानागेश
प्रिन्सिपल ऑफ़ लीस्ट एक्शन माहितिये का हो सर?
5 Dec 2015 - 1:40 am | अर्धवटराव
'सरांची' हि लेखनशैली कुठेतरी परिचयाची नाहि वाटत :) ??
2 Dec 2015 - 12:21 pm | तिमा
लेख आवडला. किमान , तेवढे म्हणण्याचे स्वातंत्र्य तरी आहे, एवढे गॄहित धरतो.
2 Dec 2015 - 12:42 pm | पैसा
लेख आवडला. मला काय वाटते हे न बोलण्याचे स्वातंत्र्य घेत आहे. पण
हे फेसबुक आणि राजकीय चर्चांसाठी खरे आहे तेवढेच मिपावरच्या आस्तिक नास्तिक चर्चांसाठी खरे आहे.
2 Dec 2015 - 6:46 pm | चांदणे संदीप
+१
फक्त एवढेच बोलतो आणि पळतो......."वरची ती प्रचेतस(वल्ली) यांची ब्याटींग ज्याम आवडली!" :)
Sandy
2 Dec 2015 - 1:16 pm | मितभाषी
" देव "
कीती पुजला देव तरी,
देव अजुन पावला नाही...
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत घावला नाही..||धृ ||
मंदिरासमोर लुटली इज्जत,
हा बघत बसला पोरीला,
रक्षण करतो म्हणाला,
अन् स्वत:च गेला चोरीला,
हातात असुन धारदार शस्र, कधी चोरामागे धावला नाही..
कुठं राहतो कुणांस ठाऊक,अजुनपर्यंत घावला नाही...||१||
सगळं काही तोच देतो,
तोच पुरवतो सगळ्यांची हौस...
शेतक़री बघतो आभाळांकडं,
मग गेला कुठं पाऊस...
खुप केलं हरी हरी तरी, मुखांत कधी मावला नाही...
कुठं राहतो कुणांस ठाऊक, अजुनपर्यंत घावला नाही...||२||
कधी स्वत: राहून उपाशी,
भुक त्याची भागवली...
हा म्हणे नैवद्यावर थोडी,
साखर का नाही मागवली...
आहार त्याचा वाढतं गेला, कधी एका बक-यावर भागला नाही...
कुठं राहतो कुणांस ठाऊक, अजुनपर्यंत घावला नाही...||३||
आंघोळ करतो दुधाने,
जणू सगळ्याच गाई त्याच्या बापाच्या...
तोच घागरी भरतो म्हणे,
पुण्य अन् पापाच्या...
पाप-पुण्याचा हीशोब कधी, मला त्यानं दावला नाही...
कुठं राहतो कुणांस ठाऊक, अजुनपर्यंत मला घावला नाही...||४||
आता म्हणे गांव सोडूनं तो,
ऊंच टेकड्यांवर बसतोय...
बघुनं गयेचा बुध्द त्याला,
गालामध्ये हसतोय...
उघडा-नागडा केला तरी, भीमावर कधी तो कावला नाही...
कुठं राहतो कुणांस ठाऊक, अजुनपर्यंत घावला नाही...||५||
कवी- सुभाष साळवे. निमित्ताने ही कविता आठवली.
2 Dec 2015 - 4:24 pm | यनावाला
श्री.मितभाषी यांनी उद्धृत केलेली "देव" ही कविता म्हणजे एक उत्तम,समर्पक असा प्रतिसाद आहे. योग्य वेळी योग्य असे कांही आठवणे ही एक प्रकारची प्रतिभाच आहे. ही कविता वास्तवावर आधारित आहे. कवितेत व्यक्त केले आहे ते अनुभवसिद्ध सत्य आहे म्हणून ते पटते. धन्यवाद मितभाषी.! कवि श्री. सुभाष साळवे हे अभिनंदनास पात्र आहेत. ...यनावाला
2 Dec 2015 - 5:05 pm | pacificready
तुमचा दावा हिन्दू धर्मीय देव देवतांशीच आहे काय? वरच्या कवितेतला आंबेडकरवादी बौद्धधर्मीय सूर स्पष्ट दिसतोय की!
अवघड आहे.
2 Dec 2015 - 5:17 pm | संदीप डांगे
त्यांना बाकी काही दिसत नसावं, देवाला शिव्या घातल्याना? बास. कुठल्या का सुरातून घालोत. इप्सित साध्य!
2 Dec 2015 - 6:14 pm | मारवा
हे विषयांतर आवडलं.
कुशलतेने केलेलं विषयांतर कौशल्याला दाद !
आता हा आक्षेप आहे इथे आहे तुमच्या समोर आहे हिन्दु धर्माविरोधात आहे
तुम्ही बोट दुसरीकडे दाखवा आणि मोकळे व्हा
कीती हजार वेळा याच उत्तर अगोदर दिलं गेलेलं आहे सुरुवात साहजिकच स्वतःच्या घरापासुन करणार ना हो ?
आता कोणी भारतीयाने तुम्ही अफ्रिकेतील बान्टु लोकांच्या धर्मावर त्याम्च्या रुढींवर का बोलत नाहीत तुम्ही हिन्दुंच्याच मागावर आहात का ?
असे विचारले तर आश्चर्य वाटायला नको
2 Dec 2015 - 6:36 pm | pacificready
देव आणि धर्म या दोन्हीला विष मानणारा मनुष्य फ़क्त एका धर्माच्या रुढीबाबत भाष्य करतो आणि समर्थनार्थ दुसऱ्या धर्माला पोषक काव्य लिहितो/त्यास अनुमोदन देतो तेव्हा प्रश्न पडतात ना?
बाकी मूर्तीपूजा का कशासाठी हे ठाऊक असलं तर देवाकडून चौकीदाराच्या अपेक्षा आपण करणार नाही.
2 Dec 2015 - 6:49 pm | विवेक ठाकूर
उघडा-नागडा केला तरी, भीमावर कधी तो कावला नाही...
हा भीम कोण?
2 Dec 2015 - 8:34 pm | अभ्या..
परिवर्तनवादी किंवा दलित चळवळीतीतील कवितेत भीम, माझा भीम वगैरे संबोधने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून वापरली जातात.
3 Dec 2015 - 7:07 pm | मूकवाचक
We speak often of the Hindu religion, of the Sanatan Dharma, but few of us really know what that religion is. Other religions are preponderatingly religions of faith and profession, but the Sanatan Dharma is life itself; it is a thing that has not so much to be believed as lived.
About many things in Hinduism I had once been inclined to believe that they were imaginations, that there was much of dream in it, much that was delusion and Maya. But now day after day I realised in the mind, I realised in the heart, I realised in the body the truths of the Hindu religion. They became living experiences to me, and things were opened to me which no material science could explain.
- Sri Aurobindo
3 Dec 2015 - 11:24 am | मितभाषी
धन्यवाद सर.
तुमची लेखन शैली चांगली आहे. विवेकपूर्ण विचार. विशेष म्हणजे तुम्ही तुम्चे विचार समोरच्यावर लादत नाही.
हा माझा शेवटचा प्रतिसाद. ईथल्या स्वयंघोषेत धर्ममार्तंडांशी प्रतिवाद करण्यात रस नाही.
3 Dec 2015 - 11:49 am | संदीप डांगे
स्वयंघोषित विवेकवादी सभ्य-शिष्ट-सुसंस्कृत आणि वैज्ञानिक चर्चेच्या आवाहनापासून पलायन का करतात आणि उठसुठ दुसर्याला मूर्ख-अज्ञानि का म्हणतात याबद्दल आपले मत कळले तर बरे होईल. कारण मी तरी स्वयंघोषित धर्ममार्तंड नाही. फक्त जी विधाने करण्यात येत आहेत त्याबद्दल चिकित्सा करत आहे. त्यामुळे माझ्याशी प्रतिवाद करण्यास आपली हरकत नसावी. काय म्हणता?
2 Dec 2015 - 1:34 pm | आतिवास
काही वैज्ञानिक आस्तिक असतात हे खरे आहे. मात्र सर्व सामान्य जनतेत आस्तिकांचे प्रमाण 90% हून अधिक आहे; तर भौतिक शास्त्रज्ञांत ते 10% हून कमी आहे, असे अनेक विश्वासार्ह सर्वेक्षणे दाखवतात
यातील काही सर्वेक्षणांचा संदर्भ मिळेल का? सर्वेक्षणाची पद्धत, सॅम्पल साईज इत्यादी माहिती मिळाल्याविना सर्वेक्षणाचे निष्कर्ष स्वीकारणं माझ्यासाठी बहुधा अवैज्ञानिक ठरेल.
2 Dec 2015 - 1:41 pm | इस्पिक राजा
याच्यासाठी कशाला हवाय सर्व्हे? वैज्ञानिक म्हटल्यावर तो नास्तिकच असणार? आस्तिक असेल तर तो वैज्ञानिक म्हणवुन घ्यायलाच अपात्र आहे. आधी विज्ञानाची व्याख्या समजुन घ्या म्हणजे असले प्रश्न पडणार नाहित. मी तर म्हणतो १००% वैज्ञानिक नास्तिक असतात. फार तर अज्ञेयवादी म्हणु आपण
2 Dec 2015 - 3:39 pm | मारवा
यनावाला यांना केलेला यक्षप्रश्न ?
2 Dec 2015 - 8:28 pm | मांत्रिक
यनावाला सर साध्या साध्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. मग इतका पेचात पकडणारा प्रश्न तर यक्षप्रश्नच झाला की राव मारवासाहेब!!!
असो. आता बघुया मारवासाहेबांचा गिगाबायटी प्रतिसाद काय येतो ते!!!
2 Dec 2015 - 8:35 pm | राजेश घासकडवी
मी याबाबत थोडा शोध घेतला तर मला खालील आकडेवारी सापडली. ९० टक्के १० टक्के इतकं स्पष्ट विभाजन नसलं तरी एकंदरीत वैज्ञानिकांमध्ये नास्तिक आणि अज्ञेयवाद्यांचं प्रमाण सर्वसामान्य लोकसंख्येपेक्षा प्रचंड अधिक आहे. हा सर्व्हे प्यू रिसर्च सेंटर या मान्यवर संस्थेतर्फे केला गेलेला आहे, त्यामुळे विश्वासार्ह आहे.
रिलिजियस अफिलिएशनच्या बाबतीतही असंच चित्र दिसतं. सामान्य जनतेत १४ टक्के नास्तिक, अज्ञेयवादी आणि अनअफिलिएटेड आहेत तर वैज्ञानिकांत त्यांचं प्रमाण ४८ टक्के आहे.
सर्वात रोचक विदा खाली दिलेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत किंवा स्त्री व पुरुषांत फारसा फरक नाही. मात्र वयानुरुप फरक स्पष्ट जाणवतो. तरुण मंडळी कमी विश्वास ठेवणारी आहेत, वयस्क अधिक. यातून कदाचित दोन निष्कर्ष निघतील - एक म्हणजे वयानुरुप माणूस अधिक आस्तिक होतो. किंवा आजची तरुण पिढी कमी आस्तिक आहे. दुसऱ्या विधानाला पुष्टी देणारा इतरही विदा अस्तित्वात असल्याने मला ही शक्यता जास्त योग्य वाटते. (चर्चगोअर पॉप्युलेशन अधिकाधिक वयस्क होत आहे. चर्चगोअर पॉप्युलेशन कमी कमी होत आहे. इ.) या शक्यतेतून यनावालांच्या मांडणीला पुष्टी मिळू शकेल. कारण एके काळी धार्मिक संस्कार मोठ्या प्रमाणावर होत असत, आता पॉप्युलेशन बदलल्यामुळे ते कमी होत आहेत.
तुम्हाला यातून पुरेशी उत्तरं मिळाली असतील अशी आशा आहे. हा विदा २००९ सालचा आहे. त्यानंतरच्या एका सर्वेक्षणात सर्वसामान्य जनतेतलं 'निधर्मी' लोकांचं प्रमाण २० टक्के दिसून आलेलं होतं. त्यामुळे हे आकडे सर्वच बाबतीत किंचित अधिक नास्तिकतेकडे झुकलेले असतील. पण तरीही मुद्दा स्पष्ट करण्यासाठी हा विदा पुरे ठरावा.
संपूर्ण रिपोर्ट इथे आहे.
3 Dec 2015 - 11:26 am | मृत्युन्जय
धन्यवाद. थोडक्यात म्हणजे यनावाला सरळसरळ ठोकुन देतात आणि निखालस खोटे बोलतात असे वरच्या आकडेवारीवरुन सिद्ध होते. अर्थात जगातल्या सर्व वैज्ञानिकांनी यनावालांच्या कानात येउन आपल्या आस्तिकतेची अथवा नास्तिकतेची ग्वाही दिली असेल त्यामुळे उपरोल्लेखित संस्थेपेक्षा त्यांच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जास्त विश्वासार्ह असतील तर प्रश्न मिटतो.
यनावालांकडे देखील अश्या दुसर्याच एखाद्या अतिशय मान्यवर आणी विश्वासार्ह संस्थेतर्फे केल्या गेलेल्या सर्वेक्षणाचे निकाल असतील तर दोन मान्यवर आणी विश्वासार्ह संस्थांच्या सर्वेक्षणातील लक्षणीय तफावत बघता त्यांना मान्यवर आणी विश्वासार्ह म्हणावे की नाही यावरच विचार करावा लागेल. हे निष्कर्ष २००९ ते २०१५ मधले कधीचेही असतील तरी फार फरक पडत नाही कारण इतक्या कमी कालावधीत ट्रेंड मध्ये इतका लक्षणीय फरक पडत नाही.
बाकी काही नाही पण तथाकथित विचारवंत जेव्हा खोटे आकडे फेकुन मारतात तेव्हा गंमत वाटते इतकेच.
असो बाकी त्या सर्वेक्षणातील एका निरीक्षणाबद्दल बोलायचे झाल्यस एकुणच तरुण पिढीचा देव या संकल्पनेवरचा विश्वास कमी झाला आहे असे वाटते. पण हे मला वाटते पिढ्या न पिढ्या होत आले आहे. ५०० वर्षापुर्वी चर्च किंवा भटजी या संस्थांचा समाजजीवनावर जेवढा पगडा होता तितका आता नाही असे मला वाटते (माझ्याकडे विदा नाही). २०० वर्षापुर्वी लोक जितके जास्त मंदिरात जात असतील तितके आता जात नाही असे मला वाटते (माझ्याकडे विदा नाही). अजुन २०० वर्षांनी कदाचित हे प्रमाण वाढलेले असेल.
अजुन एक लोक निधर्मी झालेत म्हणजे ते नास्तिक झालेलेच असतील असे नाही. देवाला एका विशिष्ट धर्माच्या चष्म्यातुन बघायला काही लोकांचा विरोध असतात. हे लोक निधर्मी असतात पण नास्तिक नाही.
3 Dec 2015 - 12:03 pm | संदीप डांगे
सहमत.
बाकी माझे असे निरिक्षण आहे की तरुणपणी गरम रक्ताच्या प्रभावाखाली 'लाथ मारिन तिथं पाणी काढीन' अशी वृत्ती सामान्यपणे आढळते. त्या कालखंडात नास्तिकतेकडे झुकणार्यांचे प्रमाण जास्त असते. पण 'कितीही लाथा मारल्या तरी पाणी जेव्हा निघायचं तेव्हाच निघतं' हे मान्य झाल्याने मग लोक देवभक्तीकडे भयंकर वेगाने वळतात. ह्यात वयाप्रमाणे शरिरात बदलणारे हार्मोन्स, तारुण्यात बघितलेल्या मोठमोठ्या इमल्यांची भूईसपाट अवस्था, 'परिस्थिती बदलणे आपल्या बाच्याने शक्य नाही' हे लक्षात येते, तेव्हा धार्मिक कर्मकांडे करण्याकडे कल वाढतो. हाच नियम आपण मनुष्यजातीच्या मोठ्या कालखंडाला लावू शकतो. म्हणजे काही हजार वर्षात अमूक एक विचारधारा असेल, ती फोल ठरली की दुसरी पुढे येते. अज्ञेयवादी बुद्धतत्त्वज्ञान हा पण असाच स्थित्यंतराचा काळ असावा. आताही गेल्या पंधरावीस वर्षात मंदिरात जाणार्यांची संख्या झपाट्याने वाढतच आहे.
अर्थात हे माझे निरिक्षण आहे. इतरांची मते याबाबत वेगळी असू शकतात.
3 Dec 2015 - 12:11 pm | मृत्युन्जय
आताही गेल्या पंधरावीस वर्षात मंदिरात जाणार्यांची संख्या झपाट्याने वाढतच आहे.
करेक्ट. अर्थात यालाही बरीच कारणे असु शकतात. पण एकुणच मंदिरातली गर्दी खुप वाढते आहे. १५ वर्षापुर्वी आम्ही अगदी आरामात जाउन सिद्धीविनायकाचे दर्शन घ्यायचो. आता तासनतास गर्दीत उभे रहावे लागते असे ऐकुन आहे. सगळ्याच मंदिरांमध्ये हीच परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पुर्वी १०० तले १०% नास्तिक असतील तर याचा अर्थ ९० आस्तिक लोक होते. आता १०० चे २०० झाले (उदाहरण आहे. संख्या वेगळ्या असु शकतात) आहेत त्यापैकी २०% जरी नास्तिक असले तरी एकुण आस्तिकांची संख्या ९० वरुन १६० झाली आहे. नास्तिकांची संख्या वाढते आहे तशी आस्तिकांचीही वाढते आहेच. एकुण लोकसंख्येच्या प्रमाणात कदाचित कमी वाढत असेल.
3 Dec 2015 - 2:22 pm | संदीप डांगे
मंदिरातली गर्दी अचानक वाढण्याला आर्थिक-सामाजिक-शैक्षणिक बरीच कारणं आहेत. मी जिथे लहानाचा मोठा झालो त्या शहरात वीस वर्षांआधी जितकी मंदिरे होती त्यापेक्षा ती कैकपटीने वाढली आहेत, पण लोकसंख्येच्या प्रमाणात वाढली आहेत असे नाही. आधी लोक वर्षातून एकदा गजानन महाराज मंदिरात शेगावी जायचे. आता दर गुरुवारी जाणार्यांची संख्या प्रचंड आहे. ज्यांना तिथे असे नियमित जाणे शक्य नाही त्यांनी आपआपल्या नगरात-वार्डात गजाननमहाराज मंदिर उभे केले आहे. मुंबैहून शिर्डी पदयात्रा करणार्यांची संख्या गेल्या पाच-सात वर्षात लक्षणीय वाढली आहे. जागोजागी साईबाबा मंदिरं उभी राहत आहेत. दत्तमंदिर, समर्थमंदिर यांचीही तशीच परिस्थिती आहे. लोक शंकर-विष्णु-दुर्गा वैगेरे मोठ्या देवांपेक्षा ह्या योगीमहाराजांच्या भक्तीत जास्त जात आहेत अशी महाराष्ट्राची एकंदर परिस्थिती पाहून वाटते. (ह्यामागच्या सर्व कारणांचा उहापोह करणारा लेख लिहावा काय?)
आस्तिकांची संख्या मंदिरातल्या गर्दीवरून मोजता येईल. पण नास्तिक अशा कुठे रांगा लावत नसल्याने त्यांच्या आकडेवारी-टक्केवारी बद्दल काही मत व्यक्त करणे कठीण जाते.
4 Dec 2015 - 7:47 pm | कवितानागेश
मन्दिरआत जाणाऱ्या वरुन आणि सर्वे मध्ये भाग घेणार्यांवरून आस्तिकांची किंवा नास्तिकांची संख्या ठरावने चुकीचे वाटतंय. मी फ़क्त माझ्या ओलखीतल्या लोकांचा सर्वे घेतला तर मंदिरात न जाणारे आस्तिक जास्त टक्के निघातील. त्याखालोखाल अद्नेयवादी निघतील. पूर्ण नास्तिक २ टक्के निघतील! :)
3 Dec 2015 - 6:49 pm | राजेश घासकडवी
मी इतक्या टोकाचं विधान करणार नाही. बऱ्याच वेळा आपण ९० टक्के वगैरे आकडे 'बहुतांश किंवा बरेचसे' या अर्थाने वापरतो. त्यामुळे ते खरोखरच ९० टक्के आहेत की नाही हा प्रश्न गौण ठरतो. पण या लेखात आकडेवारी वाटेल असं काही देणं हा त्यांचा निष्काळजीपणा झाला खरा. अर्थात अचूक आकडे काय आहेत यांनी त्यांचा युक्तिवाद बदलत नाही.
सहा वर्षांत आकडे ९० टक्क्यांवर जाणार नाहीत हे खरं आहे. पण गेल्या वीसेक वर्षांत ट्रेंडमध्ये खरोखरच प्रचंड फरक पडला आहे. मी अमेरिकेचा विदा देतो आहे कारण तिथे ही आकडेवारी पद्धतशीरपणे मोजली जाते. 'निधर्मी' असं स्वतःचं वर्णन करणारे १९५० सालपासून ते ९० पर्यंत सुमारे ४ ते ५ टक्के असायचे. त्यानंतर ही टक्केवारी वाढत गेलेली आहे. वरच्या विद्यात फक्त १२ टक्के दाखवलेले आहेत, पण १३ का १४ साली झालेल्या सर्वेक्षणात हेच प्रमाण २० टक्क्यांहून थोडंसं अधिक होतं. चर्चगोअर्सची संख्या झपाट्याने कमी होते आहे आणि चर्चगोअर्सचं सरासरी वय वाढतं आहे. म्हणजे मरत चाललेली वयस्क पिढी रिप्लेस करायला तरुण पिढी येत नाहीये.
अगदी बरोबर. सुबत्ता आली, ज्ञान वाढलं, आणि आपल्या आयुष्याच्या भवितव्याबद्दल आशावाद वाढला की देवावर अवलंबून राहाणं कमी होतं. साधी गोष्ट आहे - जर माझ्या मुलाला पोलिओ झाला, मी गरीब असेन तर मला या संकटांत देवाचा आधार वाटणारच. पण पोलियोचं उच्चाटनच झाल्यावर तसा आधार घेण्याची गरज पडणारांची संख्या कमी होते. त्याचबरोबर कोणे एके काळी चर्चला जाणं हे सामाजिक कर्तव्यांचा आणि सोशल नेटवर्किंगचा भाग होता. आता इतर अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
भारतात मात्र अजून अमेरिकेतली ९० सालची परिस्थिती आलेली नाही. शिक्षण, सुबत्ता याबाबत अजून बराच प्रवास व्हायचा आहे. त्यामुळे अजून काही दशकं तरी चित्र फार बदलेलसं वाटत नाही.
4 Dec 2015 - 11:56 am | मृत्युन्जय
मी इतक्या टोकाचं विधान करणार नाही. बऱ्याच वेळा आपण ९० टक्के वगैरे आकडे 'बहुतांश किंवा बरेचसे' या अर्थाने वापरतो. त्यामुळे ते खरोखरच ९० टक्के आहेत की नाही हा प्रश्न गौण ठरतो. पण या लेखात आकडेवारी वाटेल असं काही देणं हा त्यांचा निष्काळजीपणा झाला खरा. अर्थात अचूक आकडे काय आहेत यांनी त्यांचा युक्तिवाद बदलत नाही.
नाही बर का गुर्जी. बहुतांश किंवा बरेचसे यासाठी "बहुतांश किंवा बरेचसे" हेच शब्द वापरले जातात. ९०% म्हणणे हा निखालस खोटेपणा आहे. उद्या तुम्ही ९९% टक्क्यासाठी पण हेच लॉजिक द्याल. किंबहुना मी असे म्हणेन की यनावालांनी बहुतांश हा शब्द वापरला असता तरी मी त्यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप केला नसता. कारण बहुतांश म्हणजे ५०.०१% पासुन पुढे असा अर्थ काढता आला असता. तुमच्या सर्वेक्षणानुसार ३३% शास्त्रज्ञ देवाला मानतात. १८% "देव" म्हणुन मानत नसले तरी "युनिव्हर्सल पॉवर" किंवा "हायर स्पिरीट" म्हणुन मानतात. म्हणजे परत तेच. म्हणजे या लोकांची संख्या ५१% आहे. म्हणजे "बहुतांश". तर नास्तिक लोक आहेत ४१%. ज्या ७% नी प्रतिसाद द्यायला नकार दिला त्यांनी क्रुरकर्मा दहशतवदी आस्तिक लोकांच्या भीतिने ते नास्तिक नसल्याची कबुली दिली नाही असा टोकाचा निष्कर्ष आपण काढला आणि त्या ७% ना देखील नास्तिकांमध्ये जोडले तर त्यांची संख्या होते ४८%. म्हणजे "बहुतांश" या संज्ञेपेक्षा कमी. पण तरीही २ - ३% चा गोंधळ इकडे तिकडे एखाद्याच्या प्रतिवादाशी सोयिस्कर पडतो म्हणुन आकड्यांची थोडीफार मोडतोड करुन कोणी "बहुतांश" हा शब्द वापरला असता तर ते अगदी खोटारडा म्हणण्याइतके चुकीचे मानले जायला नको.
असो. आणि इतके करुनही जर यनावालांकडे असा काही सर्वेक्षणाचा संदर्भ असेल की भौतिकशास्त्रज्ञ इतर शाखेतील वैज्ञानिकांपेक्षा जास्त नास्तिक असतात आणि त्यामुळे "वैज्ञानिक" या जनरल संज्ञेखालील केलेल्या सर्वेक्षणाचे परिणाम भौतिकशास्त्रांशी निगडीत सर्वेक्षणापासुन प्रचंड वेगळे असतील तर मी अजुनही माझे विधान बिनशर्त मागे घेउन श्री यनावालांची आगाऊ आणि जाहीर माफी मागतो.
4 Dec 2015 - 2:28 pm | यनावाला
सर्व सामान्य लोकांत आस्तिकतेचे प्रमाण ९०% + आहे तर वैज्ञानिकांत ते १०% - आहे असे लेखात लिहिले आहे त्याला आधार "Neil deGrasse Tysen " याच्या एका भाषणाच्या व्ही.डी.ओ.चा आहे.(यू ट्यूबवर). मला वाटते "neil degrasse on religion and universe " या लिंकवर मिळावे. मी पूर्वी ऐकले आहे. तो म्हणाला,"सर्वसाधारणपणे ८५% लोक धार्मिक आहेत. पदवीधर व्यक्तींत हे प्रमाण ६०% आहे. पदवी विज्ञान विषयातील असेल तर हे प्रमाण ४०%पर्यंत खाली येते. तर संशोधनात कार्यरत असलेल्या वैज्ञानिकांत केवळ ७(सात) % धार्मिक आहेत. " हे सर्व आकडे माझ्या वहीत टिपलेले आहेत.अभिजन (एलिट) वैज्ञानिकांत देवधर्म मानणार्यांचे प्रमाण ७% तरी का असावे असा उद्वेग प्रकट करून तो म्हणाला," हे प्रमाण जोवर शून्य होत नाही तोवर सर्वसाधारण जनतेत नास्तिकतेचा प्रचार करण्याचा आपल्याला अधिकार नाही." हा त्याचा विचार मात्र मला पटला नाही. प्रबोधनाने हे धार्मिकतेचे प्रमाण घटविता येते. महाराष्ट्रात तरी समाजसुधारकांनी असे प्रबोधन केले आहे. त्याचा सुपरिणाम झाला आहे.
.....
neil degrasse on religion and universe "
4 Dec 2015 - 2:50 pm | संदीप डांगे
फक्त देव नाही हे लोकांकडून मान्य करुन घेउन काय साध्य होणार आहे किंवा झाले आहे? गाडगेबाबांनी 'अनेकदेव' ह्या संकल्पनेवर प्रहार केला, मंदिरे बांधू नये ह्याबद्दल आग्रही होते. लोकांनी त्यांचीच मंदिरे बांधली. कुणीही कितीही उड्या मारल्या तरी कुठल्यातरी पारंबीला लटकून राहण्याच्या मूळ मानवी प्रवृत्तीवर काही उपाय नाही. आज तुम्ही त्यांच्याकडून देव काढून घ्याल, तर विज्ञाननामक भ्रामक कल्पनेला ते चिकटून राहतील. जसा देवावर अचाट विश्वास आहे तसा विज्ञानावर होईल. मग अवास्तव अपेक्षा विज्ञान पूर्ण नाही करू शकले की परत कशाचा आधार घेतील? जेव्हा हे होईल तेव्हा अधांतरी लटकलेल्या समाजाची परिस्थिती वाईट असेल.
समाजमन, माणसाच्या मनाचा अभ्यास कमी पडल्याने असल्या मोहीमा आखण्याचे नास्तिकांच्या मनात येत आहे.
4 Dec 2015 - 9:35 pm | चौकटराजा
मी माझ्या आप्तांचे व परिचितांचे निरिक्षण करता असा निष्कर्ष काढला आहे की बी एस सी झालेले पदवीधर व बी कॉम बी ए यात भाविक असण्याचे प्रमाण बिगर बी एस सी यात जास्त आहेच तसेच चित्पावना पेक्षा बिगर चित्पावानात भाविक असण्याचे प्रमाण ही अधिक आहे.स्त्री पुरुषात हे भाविकतेचे प्रमाण स्त्री वर्गात जास्त आहे.
4 Dec 2015 - 9:50 pm | संदीप डांगे
;-)
3 Dec 2015 - 9:42 pm | निराकार गाढव
All you guys are just "General public", you know....! This data proves it.
बाकी सरांची सर काय कोनलाच नाय....
2 Dec 2015 - 1:59 pm | मारवा
उत्तम लेख आवडला.
एखादा मोठा आरसा रस्त्याच्या मधोमध ठेवलाय.
सर्व ट्रॅफीक सर्वांचे चेहरे झक्क स्वच्छ दिसताय.
सुंदर भव्य आरसा
आवडला.
2 Dec 2015 - 2:17 pm | प्रसाद१९७१
अगदी अगदी.
यनावालांचे वागणे म्हणजे एखाद्या दहशतवाद्यासारखे झाले आहे. त्यांचे म्हणणे मान्य करा नाहीतर जे मान्य करणार नाहीत ते मूर्ख. आयसिस सुद्धा असेच काहीतरी म्हणते.
2 Dec 2015 - 6:03 pm | मोदक
त्यांची डिक्शनरी लै मोठी आहे. मूर्ख, अज्ञानमूलक, अशोभनीय वैग्रै वैग्रै..
2 Dec 2015 - 7:55 pm | आनन्दा
संसदीय भाषा आहे हो ती.. पण मला वाटते ते कोणत्या तरी पुस्तकाची तयारी करत असावेत.
2 Dec 2015 - 8:03 pm | मोदक
थांबा.. तुम्हाला नक्की माहिती आहे का? अन्यथा त्यांना तुम्हीसुद्धा अज्ञानमूलक असल्याचा साक्षात्कार होईल.
..आणि तो आरोप तुम्हाला आयुष्यभर भाळी मिरवावा लागेल. :p
2 Dec 2015 - 8:31 pm | काकासाहेब केंजळे
नास्तिक व्हाय्चा असेल तर प्रचंड धाडस अंगी लागते,काहींना हे झेपत नाही म्हणून ते स्वतःच्या आस्तिकतेला आव्हानचं देत नाहीत.रिचर्ड डॉकीन्सचे गॉड डिल्युजन हे पुस्तक वाचून एका आस्तिक मुलाचे मतपरीवर्तन झाले ,पण त्याला 'देव नाही' हा प्रकारच झेपला नाही व त्याने त्याच मानसिक अवस्थेत आत्महत्या केली.
http://mobile.wnd.com/2008/11/81459/
2 Dec 2015 - 8:34 pm | मांत्रिक
तुमचा पूर्वावतार कुठल्या मानसिकतेत हेवनवासी झाला नानासाहेब नेफळे!!!
2 Dec 2015 - 8:37 pm | संदीप डांगे
ह्याट राव. काय बी बोलू नका.
आम्ही इथे नास्तिकतेला आव्हान देतोय तर तेही तर ते घेत नैत. त्यांच्या अंगी धाडस नै, त्यांना झेपत नै का?
2 Dec 2015 - 8:42 pm | मांत्रिक
माईच्या नाना गोंधळाला ये रे!!!
नानाच्या माई गोंधळाला ये गो!!!
दरेकराच्या दादुसा गोंधळाला ये रे!!!
दादुच्या हितेशा गोंधळाला ये रे!!!
नेफळ्याच्या नाना गोंधळाला ये रे!!!
केंजळ्यांच्या काका गोंधळाला ये रे!!!
खानांच्या मोगाबाबा गोंधळाला ये रे!!!
3 Dec 2015 - 9:21 am | नाखु
कुंपणावरच्या बघ्यांनो गोंधळाला यावे ||
मैदानातील पळपुट्यानों गोंधळाला यावे ||५||
पलीकडच्या धोबीघाटी गोंधळाला यावे ||
अलिकडच्या धूळ्चाटी गोंधळाला यावे ||६||
विचारजंती लेखपाडू गोंधळाला यावे ||
उजेडपण्ती तेलगाळू गोंधळाला यावे ||७||
जे या धाग्यावर आणि गेल्या आठवड्यात मिपावर चालले त्याचा अंदाज फार पूर्वी या गोंधळात मांडला आहे
सपूर्ण गोंधळ इथे आहे मिपाईचा गोंधळ
आस्वाद घ्या..
3 Dec 2015 - 11:09 am | अत्रुप्त आत्मा
@उजेडपण्ती तेलगाळू गोंधळाला यावे >> संपूर्ण वारल्या गेलो आहे!
3 Dec 2015 - 1:07 am | कवितानागेश
नक्की काय सुरुये?
3 Dec 2015 - 2:23 am | अर्धवटराव
मिपाचं इव्हॉल्युशन :)
एक वन अॅण्ड ओन्ली शहाणे सिद्धकोटीचे आध्यात्मीक सर मिपावर होऊन गेले.
आता त्याचा विज्ञानावतार आलाय.
3 Dec 2015 - 1:25 pm | प्रसाद गोडबोले
अगदी अगदी १०००% अनुमोदन !
यनावाला हे संक्षींचे काऊंटरपार्ट आहेत ह्यात तिळमात्र शंका नाही !!
6 Dec 2015 - 8:30 am | कवितानागेश
एकत्र कट्टा करुयात! सगळे प्रश्न सुटतील. ;)
3 Dec 2015 - 1:21 pm | अत्रुप्त आत्मा
आस्ति धर्म
3 Dec 2015 - 1:48 pm | बांवरे
काय पावर आहे राव *नावाला !
कडवी आणि घासकडवी दोन्ही प्रकारची लोकं जमलीत !
एंटरटेनमेंट + विचारखाद्य = प्रतिसाद !
बाकी धागा नुस्ताच *नावाला ...
3 Dec 2015 - 4:26 pm | प्रमोद देर्देकर
चला मग आता याचा समेट देवुळ या चित्रपटातील वाक्याने करुया " ज्याला देव मानायचा आहे त्यांनी तो मानवा ज्यांना देव नाही असे वाटते त्यांनी मानु नये."
विषय संपला
3 Dec 2015 - 9:15 pm | चौकटराजा
येथील इचार मंथन साकल्याने पाहता मला देवदत्त दाभोलकर यांचे एक वाक्य आठवते ते असे Education means to get confused at higher and higher levels. माझ्या स्वत:च्या तत्वद्न्यानानुसार मानव धरेवरील सर्वात जास्त शोधक वृत्तीचा व परिणामी तितकाच भ्रमिष्ट स्पीशी आहे कारण उत्क्रान्तीत त्याचे भावानादास्यत्व ही उत्क्रांत झाले आहे .भाषाभिमान धर्माभिमान देशा भिमान व त्यातून होणारा संघर्ष व् नाश हा उत्पत्ती स्थिति व लय यासाठी आवश्यकच आहे.ही विधी नावाच्या एका interdependent components चा समावेश असलेल्या system ची कटु योजना आहे.
3 Dec 2015 - 11:59 pm | निराकार गाढव
गाळलेली कविता पूर्ण करा:
जय देव, जय देव, जय *नावाला...
... ... ... ... ......... ............ ............
... ... ... ... ......... ............ ............
... ... ... ... ......... ............ ............
4 Dec 2015 - 11:30 am | प्रकाश घाटपांडे
:)
4 Dec 2015 - 12:21 am | मदनबाण
वाचतोय...
हल्लीच काही असे प्रश्न पडले होते... डाँ.एन.गोपालकॄष्णन { Dr. N.Gopalakrishnan is a scientist and Hon. Director of Indian Institute of Scientific Heritage, having M.Sc. (Pharm. Chem); M.Sc. (Appl. Chem); M.A. etc } यांची काही लेक्चर्स ऐकलीत,आणि समाधान झाले.
ज्यांना रस असेल त्यांनी हे व्हिडीयो ऐकण्यास हरकत नाही.
Hindu Concept of God
Science in Ancient India By Dr N Gopalakrishnan
Rejuvenating Indian Scientific Heritage
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हमने जब देखा की हम अंधों की नगरी में आ गये है,तो हमनें आइने बेचने का धंदा ही बंद कर दिया. ;) :- इति :- जेके फ्रॉम शेहेनशाह
4 Dec 2015 - 10:21 am | प्रसाद१९७१
याच का दुसर्या कुठल्यातरी यनावालांच्या लेखावर कोणाचा तरी "कमीत कमी वयाचा तरी मान ठेवा" हा प्रतिवाद वाचुन थक्क झालो.
ह्या पुढे ६० वर्षाचा आरोपी असेल तर त्याच्या विरुद्ध खटला लढणार्या वकीलाचे वय कमीतकमी ६० वर्षे असायला पाहिजे असली बालिश मागणी केली तरी आश्चर्य वाटायला नको.
कोणी म्हातारा रस्त्यावर उभा राहुन येणार्या जाणार्या माणसांना खडे मारत असेल तर वयाचा मान राखुन दगडांचा मार खावा असे सुचवायचे आहे का?
4 Dec 2015 - 11:45 am | प्रकाश घाटपांडे
http://aisiakshare.com/node/2323#comment-38671
अवांतर- तेच तेच लिहून कंटाळा येतो.
4 Dec 2015 - 8:21 pm | प्रसाद गोडबोले
हा प्रतिसाद अप्रतिम आहे ! मिपाकरांनी विशेषतःयनावालांनी तो आवर्जुन आणि दोनदा वाचावा अशी आमची इच्छा आहे म्हणुन इथे कॉपीपेस्ट करीत आहे !
4 Dec 2015 - 11:48 am | प्रकाश घाटपांडे
आनंद घारे यांचा उपक्रमावरील हाही लेख वाचावा
वि़ज्ञाननिष्ठा व निरीश्वरवाद
4 Dec 2015 - 11:57 am | संदीप डांगे
आपण हे सतत इथे मांडत आला आहात हे ही ज्ञात आहे. तरी अजूनही नास्तिक असणे म्हणजेच वैज्ञानिक विचारसरणी असणे ह्या घोर अंधश्रद्धेत प्रस्तुत लेखक व त्यांचे समर्थक वावरत आहेत ह्याबद्दल वाईट वाटते.
4 Dec 2015 - 12:13 pm | मूकवाचक
+१
8 Dec 2015 - 11:02 pm | सतिश गावडे
उपक्रमावरील लेखाच्या दुव्यासाठी धन्यवाद काका.
4 Dec 2015 - 12:02 pm | संदीप डांगे
"इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी 'रग' जिरवण्यासाठी 'आखाडा' लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना 'खाद्य' वा 'टार्गेट' न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात.
वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही. आपल्या विचारांशी सहमत नसणार्यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी विवेक वैगैरे सगळ्या गोष्टी टिंब टींब च्या टिंब टिंब मधे जाते."
6 Dec 2015 - 8:35 am | कवितानागेश
आपल्या विचारांशी सहमत नसणार्यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो.
हां खरे तर आजार आहे एक प्रकारचा.
4 Dec 2015 - 3:58 pm | सत्य धर्म
पृथ्वीवर असणार्या सर्व प्राण्यात प्राण किंवा चैतन्य कुठून येत आणि मृत्युनंतर ते कुठ जाते.
यानावले कृपया उत्तर द्या. खूप वर्षापासून पडलेला प्रश्न आहे.
4 Dec 2015 - 4:07 pm | प्रसाद गोडबोले
ह्या प्रश्नाचे उत्तर यनावालांपेक्षा घासु गुरुजी जास्त चांगल्या पध्दतीने देवु शकतील असा अंदाज आहे ,
यनावाला एकाही प्रतिवादाला उत्तर देत नाहीत हा आजवरचा इतिहास आहे !
4 Dec 2015 - 4:09 pm | सत्य धर्म
बघू तर खर कोण उत्तर देत आहे ते ....
5 Dec 2015 - 6:36 pm | तिमा
7 Dec 2015 - 3:58 pm | तुडतुडी
शास्त्रज्ञ फक्त अगोदरच अस्तित्वात असलेल्या गोष्टी उलगडून इतरांपुढे मांडतात . शास्त्रज्ञांना स्वबळावर नवीन निर्मिती करता येत नाही .शास्त्रज्ञांना आजपर्यंत कधी माणसाचा मेंदू तयार करता आलाय का ? निसर्गात असे लाखो मेंदू रोज तयार होतात . हे कोण करतं? आकाशात उपग्रह सोडले म्हणून शास्त्रज्ञ भाव खातात . त्याही पूर्वी पासून लाखो वर्षे आकाशात ग्रह आपापल्या कक्षेत फिर्तायेत . एकदा मेलेला माणूस शास्त्रज्ञांना आजपर्यंत कधीही जिवंत करतं आला नाही . टेस्ट ट्यूब बेबी निर्माण केली म्हणून काय तो अभिमान . अहो पण त्यात स्त्री आणि पुरुषाच्या आवश्यक बाबींच मिलन शरीराबाहेर केलं जातं आणि गर्भ निर्माण होण्यासाठी फलित झालेलं बीज नंतर स्त्री च्याच शरीरात सोडलं जातं ना . स्त्री च्या गर्भाशयाची अगदी सेम तू सेम परिस्थिती शरीराबाहेर निर्माण करून बाळ का निर्माण करता आलं नाही शास्त्रज्ञांना ? मासा पाण्यातच जिवंत राहतो . त्याची श्वसन करण्याची सिस्टीम किती गुंतागुंतीची असते . अशीच सिस्टीम तयार करून एक तरी मासा शास्त्रज्ञांनी आज पर्यंत निर्माण केलाय का ?
पृथ्वीवर असणार्या सर्व प्राण्यात प्राण किंवा चैतन्य कुठून येत आणि मृत्युनंतर ते कुठ जाते.
यग्झ्याटली . ह्या प्रश्नाचं उत्तर शास्त्रज्ञ अजून देवू शकलेले नाहीत .
आणि निसर्ग म्हणजे काय ? फक्त झाडं , वेली , हवा , पाणी , दगड -माती ? ह्या सगळ्यांमध्ये कुठं ,काय आणि कसं निर्माण करायचं हि अक्कल असते का ? ह्या सगळ्या निसर्गालाही कंट्रोल करणारी जी शक्ती आहे तीच देव. शास्त्रज्ञांनी भलेही न मानू दे . त्यांच्या मानण्यावर का कुठं देवाचं अस्तित्व अवलंबून आहे .
8 Dec 2015 - 9:04 pm | प्रसाद गोडबोले
बाकी काहीही असो
ह्या धाग्याच्या निमित्ताने आमचे दोन आवडते आयडी जे की गुरुदेव विवेक ठाकुर उर्फ संक्षी आणि निराकार गाढव उर्फ (___) हे परत अॅक्टीव्ह झाले हे पाहुन अम्हाला अत्यंत आणंद झाला आहे , किमान ह्याबद्दल तरी आम्ही यनावालांचे मनःपुर्वक आभारी आहोत :)
8 Dec 2015 - 10:47 pm | pacificready
विवेक जी ठाकूर म्हणजे जणू विवेकानंद आणि रामकृष्ण
वि ठा ई च जणू
आहाहा!
३१-७ मोर मणी णाचले!
8 Dec 2015 - 10:09 pm | होकाका
आजच झालेल्या हायकोर्टाच्या हुकुमानंतर (राहुल सोनिया - नॅशनल हेराल्ड केस) हे बघणं देखील रुचीपूर्ण ठरेल. Be patient while watching this. पुरेसा वेळ द्या हे बघायला. I can only say, it's too good!
या धाग्याचा टि आर पी चांगला असल्याने हे टाकत आहे. अपेक्षाभंग झाल्यास माफी असावी.
8 Dec 2015 - 10:15 pm | निराकार गाढव
ईश्श्य, काहितरीच काय!
9 Dec 2015 - 1:58 pm | अभिजित - १
Tirupati and Mars mission: Rationalists cry foul over Isro chief's temple visit
http://www.firstpost.com/india/tirupati-and-mars-mission-rationalists-cr...
9 Dec 2015 - 2:05 pm | संदीप डांगे
अहो मागच्या धाग्यावर मी हाच मुद्दा मांडलेला म्हणून सरांनी हा धागा काढला स्पेष्यल...
9 Dec 2015 - 2:50 pm | यनावाला
*जे प्रश्न लेखाशी संबंधित असतील त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. अन्य प्रश्नांची नाही. उदा. "आस्तिक वैज्ञानिक" या लेखावरील श्री.प्रगो यांचे प्रश्न:
... *वेदप्रामाण्य मानतो तो आस्तिक. असा मूळ अर्थ असला तरी तो आता लुप्त झाला आहे. ...एवंगुणविशिष्ट देव अस्तित्वात आहे अशी ज्याची दृढश्रद्धा असते तो आस्तिक असा अर्थ बहुरूढ झाला आहे. रूढ अर्थच खरा मानायचा असतो. आज ८०%+ लोकांच्या मनात देवाविषयी जी कल्पना आहे तोच खरा अर्थ. तो सर्वांना ठाऊक आहे.
उर्वरित प्रश्न लेखाशी संबंधित नाहीत. माझ्याजवळ विद्वत्ता नाही. ** श्री. प्रगो म्हणतात "जैमिनीचे सांख्यदर्शन.." माझ्या समजुतीप्रमाणे सांख्यदर्शन कपिलमुनींचे आहे. आचार्य जैमिनी हे पूर्वमीमांसाशास्त्राचे प्रवर्तक आहेत. ते असो. मला वाटते वर्तमान काळातील समाजाचा विचार करावा. दोन हजार वर्षांपूर्वी रचलेल्या षड् दर्शनांचा आज अभ्यास करणे हा मला कालापव्यय वाटतो. (ज्यांना संशोधन करून पी.एच्.डी.मिळवायची असेल त्यांनी अवश्य करावा.) आज बहुसंख्य हिंदुबांधवांच्या देवा-धर्माविषयी ज्या कल्पना आहेत त्यांमुळे त्यांचा पैसा-ऊर्जा आणि वेळ मोठ्याप्रमाणात वाया जात आहे. त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार केल्यास त्यांची, आणि परिणामत: समाजाची, प्रगती होईल. देश पुढे जाईल असे प्रामाणिकपणे वाटते. म्हणून लिहितो. इथे वाचकवर्ग मोठा आहे. कुठेतरी विचार रुजेल. प्रसार होईल अशी आशा वाटते.( माझी कल्पना चुकीची असेल. कदाचित् इथले विद्वत्तापूर्ण प्रतिसाद वाचण्यासाठी इतके सहस्रावधी वाचक येत असतील.)