प्रतिसाद टंकण्यापुर्वी क्षणभर थांबा ! शीर्षकात प्रश्नचिन्हा (?) एवजी कृपया स्मायली वाचा (:)). शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी केली आहे. हे सांगूनही तुम्ही या धागा लेखातील विवीध कडबोळे प्रश्न आणि कडबोळे विचारांचे अनाकलनीय काहुर वाचण्यास थांबत असल्यास, 'शनी शिंगणापूर येथील मंदीरात एका स्त्रीने जाऊन चक्क दर्शन घेतले, आणि गावातल्या लोकांनी (कदाचित त्यांच्या भावना दुखावल्यामुळे) बंदपाळल्याची बातमी', हि ह्या धागा लेखाची खरी सुरवात आहे.
स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न तसा दिसतो तेवढा सोपा नसावा, नाहीतर मंदिर प्रवेशाचा प्रश्न ऐरणीवर येऊन ८५व्या वर्षानंतर कदाचित या प्रश्नाची चर्चा करण्याचे प्रयोजन उरले नसते. स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न चर्चेस घेतला तर पहिला आक्षेप हा येऊ शकेल की तुम्ही केवळ हिंदुधर्मीय प्रार्थनास्थळातील असमानतेचीच चर्चा का करता आणि इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्रीयांना दिल्या जाणार्या असमान वागणूकीची चर्चा का करत नाही ? हा प्रश्न येतो, या प्रश्नाचे काहुर येथवरच थांबत नाही, कारण:
१) हा असमानतेचा प्रश्न त्यांना धार्मीक गुरु पुजारी (येथे त्या त्या धर्मातील शब्द कल्पावेत) इत्यादी संधी समानपणे का मिळत नाही हा प्रश्न एक्स्टेंड होतो; मग असे का होते कारण प्रेषित, विदुषी, तत्त्वज्ञ या जागी अपवादात्मक स्त्रीयांचे दाखले सोडल्यास त्यांचे अस्तीत्व विरळ असल्यामुळे असे होते का ? एखादा प्रेषित असो वा प्रार्थनास्थळात प्रवेश अथवा धर्मगुरुपद नाकारणारा पुरुषवर्ग शेवटी स्त्रीयांच्या पोटीच जन्माला येतो माता पत्नी कन्या बहीण या रोलचा प्रभाव इतरवेळी बर्याचदा दिसून येतो तर प्रार्थनास्थळातील समानतेचे तत्त्वज्ञान आपापल्या पातळीवर रेटण्यात या स्त्रीया कुठे कमी पडताहेत का ? मुलतः त्यांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ? :) आता हा प्रश्न म्हणजे जरासे व्हिक्टीम ब्लेमींग केल्यासारखे आहे जे व्यक्तीशः मलाही मान्य नाही (शिवाय मी स्वतःही खोडू शकेन असा यात तर्कदोष आहे) तरीही असा प्रश्न उपस्थीत करण्या मागे उद्देश केवळ चर्चेस तोंड फोडणे एवढाच आहे.
२) शनि शिंगणापुरचा स्त्री प्रवेशाचा प्रश्न कदाचित कायद्याच्या मार्गाने सोडवता येईल पण इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्री प्रवेश आणि धर्मगुरुपदावरील समानतेचा प्रश्न विचारला तरी प्रश्न विचारणारे असहिष्णू ठरतील ? स्त्रीयांना समानता नाकारण्यासाठी आपापल्या धर्मग्रंथाची शब्दपुजा रचत उत्पातमुल्य दाखवणारे असहिष्णू ठरणार नाहीत. मग इथे राजकीय शांतता साधण्याच्या व्यावहारीक गरजांसाठी केलेली धर्मग्रंथांना पुढेकरत उत्पातमुल्य दाखवणार्यांशी विवीध धर्मियांची उत्पातमुल्यावर आधारीत एक तडजोड अस्तीत्वात आहे का? असे उत्पात मुल्य दर्शवणारे असोत अथवा लोकसभेत केवळ असहिष्णूतेवर चर्चा करणार पण तेही गोंधळ करून हा कायदेमंडळांमधे घातला जाणारा गोंधळ ही सुद्धा असहिष्णूता नाही का ?
३) किंवा बर्याचदा असा विचार समोर ठेवला जातो की समाजसुधारणा त्या त्या समाजातूनच पुढे येऊ द्याव्यात अंशतः हे खरेही आहे की शनि शिंगणापुर असो वा इतर धर्मीय प्रार्थनास्थळे समाजसुधारणेचे विचार त्या त्या समाजातून पुढे यावयास हवेत पण समाज हेच एक युनीट आहे का ? त्या गावापुरता शनि शिंगणापुरचाही एक समाज अस्तीत्वात नाही का आणि समाज सुधारणेची सुरवात त्याच गावातील व्यक्ती कडून होणे अधिक श्रेयस्कर असणार नाही का ? मग शनि शिंगणापूर गावातील समाजाची मते बदले पर्यंत उर्वरीत समाजाने थांबले पाहीजे का ? अंदमानात इतर जगातील मानवाचे संबंध नाकारणार्या अदिवासींचा अधिकार आपण स्विकारतोच ना मग शनि शिंगणापुर सारख्या विवीध गावातील जाती जमातीतील परंपरा आतून बदले पर्यंत थांबले पाहीजे का ? असे कुठ पर्यंत थांबणे सयुक्तीक ठरेल. रविंद्रनाथ टागोरांच्या शांती निकेतनापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर काही आदीवासी जमातीत अगदी अलिकडे पर्यंत विच हंटींगची जातपंचायतीकडून बलात्काराच्या आदेशाची उदाहरणे पुढे येतात शनि शिंगणापुर असो वा बंगाल मधील वस्ती वा इतर धर्मीय लोकशाहीत सर्वांचाच सहभाग आहे, प्रागतिक विचारांचे प्रतिनिधी अशा मागे पडलेल्या समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधून प्रबोधनाचे मार्ग प्रशस्त करण्यात नेमके कुठे कमी पडतात ?
४) ज्या मिथककथांवर आधारीत अंधविश्वास अस्तीत्वात आहेत ती केवळ मिथके आहेत, आपापल्या संस्कृती जपताना काळानुरुप परिवर्तनांच्या आड ह्या मिथककथा येऊ नयेत यासाठी लागणारे प्रबोधन करण्यात आमचे विवीध महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे अभ्यासकमंडळी कमी पडत आहेत का ?
आतापर्यंतच्या चर्चेचा रोख तुम्ही पाहीलात तर शीर्षक आणि लेखाचा उद्देश स्त्री विरोधी नाही आणि कोणत्याही विशीष्ट धर्म अथवा संस्कृतीस लक्ष्य करणेही या धागा लेखाचा उद्देश नाही, मी परिवर्तनांसाठी क्रांतीचा पक्षधर नाही पण परिवर्तनासाठी लागणार्या उत्क्रांतीसाठी प्रबोधनासाठी सदैव आग्रही असावे असे वाटते, हे वाचकांनी लक्षात घेतले असेलच. मी माझ्या या धागा लेखातील माझे सर्वच प्रश्न आणि विचारांचे काहुराचे निटसे विश्लेषण केले आहे असेही नाही. इतरांचे विचार समजून घेऊन माझ्या साशंकता कमी करण्यास साहाय्य व्हावे म्हणून हा धागा लेख लिहिला आहे. बाकी चुभूदेघे.
चर्चा सहभाग आणि प्रतिसादांसाठी धन्यवाद
प्रतिक्रिया
30 Nov 2015 - 4:39 pm | प्रसाद१९७१
पॉपकॉर्न
30 Nov 2015 - 4:45 pm | माहितगार
पॉपकॉर्न सोबत थंडीचे दिवस आले म्हणून गरमागरम विषय चर्चेसाठी दिला आहे, खूप गरम वाटल्यास क्षुधाशांतीसाठी थंड पेयेही सोबत ठेवावीत
30 Nov 2015 - 4:49 pm | जेपी
माहितीगार साहेब,हा तुमचा धागा सर्वाधिक प्रतिसाद खेचणारा ठरेल!!
1 Dec 2015 - 1:16 pm | माहितगार
तुमच्या शुभेच्छांसाठी मिठाई.
पहिल्या दिवसात १०० चा दर बरा असतो का ? धागा लेखातील बर्याच मुद्द्यांना अद्याप स्पर्श झाला नाही त्यातील अर्ध्या मुद्द्यांना स्पर्ष केलातरी भरपूर होतील असे वाटते.
30 Nov 2015 - 5:10 pm | पर्नल नेने मराठे
उन्धियु आण ग मौ... खात खात वाचु हा धागा
30 Nov 2015 - 5:20 pm | कंजूस
स्त्रिया बय्राचदा चुलीजवळ असतात.कोणी फुकाचं व्यवहाराला धरून नसलेलं बोललं की " तुझं तत्वज्ञान गेलं चुलीत " +"{ दोनवेळचं गिळण्यासाठी छनछन घेऊन ये मग ऐकते }."हे एक "बेसिक इंस्टिन्क्ट आहे".
बाकी शनि काही शिंगणापुरलाच नाही घरातही बनवता येतो.
30 Nov 2015 - 5:25 pm | मितान
पहिल्या काही प्रतिसादांमध्ये गांभीर्य आले तरच इथे या विषयावर चर्चा करण्यात अर्थ आहे.
अन्यथा वेळ शब्द शक्ती वाया घालवू इच्छित नाही.
30 Nov 2015 - 5:29 pm | परिकथेतील राजकुमार
कोणत्या स्त्रीयांना?
30 Nov 2015 - 5:29 pm | सस्नेह
...चालूद्या निरर्थक अत्मकुंथन !
30 Nov 2015 - 6:09 pm | संदीप डांगे
शशी केसबद्दलः
जिथे स्त्रियांना प्रवेशास बंदी आहे अशा प्रार्थनास्थळांमधे त्यांनी जाऊच नये. किंवा कुणीही जाऊ नये. देवाच्या गाभार्यावर हे बसलेले चोर का नियम ठरवतात..? बाकीचे का पाळतात? खरंच चालत नसेल (म्हणजे देव कोपत बीपत असेल) तर कोपू दे! ती तरुणी तिथेच शिळा होऊन पडली असती तर देव आहे हे सिद्धही झाले असते, नाही पडली त्यामुळे खरा प्रश्न आणि तमाशा चालू झाला. देव कोपण्याऐवजी गावकरीच कोपलेत. अकलेचे कांदे आणि डोळे असून आंधळे लोक अजूनही शनि-शिंगणापुरास जातात. दलितांच्या मंदीरप्रवेश आंदोलनाबद्दलही मला हाच प्रश्न पडला होता. अरे बंदी आहे तर लाथ मारा च्यायला त्या देवाला... जो स्वत: तुम्हाला जवळ घेऊ शकत नाही, तुमचे दु:ख दूर करू शकत नाही तो देव कशाला डोक्यावर घ्यायचा? (देवाने दु:ख दूर करून सुख द्यावे म्हणून लोक देव संकल्पना मानतात, सश्रद्ध लोकांनी अंगावर येऊ नये)
दुसरा प्रतिसाद नंतर देतो.
30 Nov 2015 - 7:50 pm | बोका-ए-आझम
आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत. दुर्दैवाने या अनुषंगाने स्त्रियांना जी सापत्न वागणूक मिळते ती देण्यात इतर स्त्रियाही पुढे सरसावतात.
30 Nov 2015 - 8:02 pm | अजया
हम्म.सहमत आहे :(
30 Nov 2015 - 10:36 pm | प्रसाद गोडबोले
ह्याला म्हणतात अनभ्यासातुन आलेले स्वकपोकल्पित निरर्थक अत्मरंजन !
पारश्यांच्या सर्व अग्यारी मधे कितीही हुच्चवर्णीय असला तरीही तुम्हाला प्रवेश दिला जात नाही ... कित्येक अग्यारीबाहेर "पारशी आणि इराणी झोराष्ट्रीयन सोडुन सर्वांन्ना प्रवेश निशिध्द " अशी स्पष्ट पाटी वाचली आहे मी !
30 Nov 2015 - 10:41 pm | अजया
त्या त्या धर्माच्या अनुषंगाने ते विधान बरोबरच वाटते.
30 Nov 2015 - 10:57 pm | संदीप डांगे
अजयाताईंशी सहमत.
30 Nov 2015 - 10:57 pm | बोका-ए-आझम
त्यावरून तुम्हाला वाचता येतं याशिवाय दुसरं काहीही सिद्ध होत नाही. पहिले तो 'निशिद्ध'शब्द 'निषिद्ध' असा नीट लिहायला शिका. शंभर वेळा लिहून काढा हवं तर. पारशांच्या धर्मस्थळात फक्त पारशांना परवानगी असते. पुरुष किंवा स्त्री. आणि जे पारशी नसतात त्यांना नसते. पुरुष किंवा स्त्री. इथे धाग्यात उल्लेख नसलेल्या मुद्द्यांवर वाद घालायचा असेल तर परीराज्यात जा. नाहीतर मुद्दा समजून घेऊन नीट वाद घाला. एवढा अभ्यास केलाय त्याचा उजेड पडू दे जरा!
30 Nov 2015 - 11:29 pm | प्रसाद गोडबोले
किती ती असहिष्णुता !
तुमच्या ह्या प्रतिसादातुन वाक्य जसेच्या तसे कॉपी पेस्ट करुन लिहिले आहे >>>>
http://www.misalpav.com/comment/777704#comment-777704
१००% सहमत.
बोका-ए-आझम - Mon, 30/11/2015 - 19:50
आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत.
>>>> उगाच स्वतःच्या मनाचे काही घुसडलेले असेल तर दाखवा नाही तर वाक्य लिहायला चुकले असे कबुल करा की राव !!
आम्ही आमचा शब्द सुधारतो तुम्ही तुमचे वाक्य सुधारा . हाकानाका.
1 Dec 2015 - 7:02 am | बोका-ए-आझम
तुम्ही खरोखर चूक दाखवली असतीत तर ती मान्य करायला हरकत नव्हती. चूक नसताना उगाचच आक्षेप घेणं याला काय अर्थ आहे? धागा स्त्रियांवरच्या धार्मिक बंधनांची चर्चा करतोय. त्यावर संदीप डांगे यांनी शनि शिंगणापूरच्या घटनेचा संदर्भ दिला. त्यावर मी प्रतिक्रिया दिली. त्याला संदर्भ हा शनि शिंगणापूरसारख्या हिंदू तीर्थक्षेत्रात स्त्रियांवर लादण्यात आलेल्या बंधनांवर होता. पारशांचा संबंध कुठे येतो यामध्ये? पारशी कोणत्याही पारशी नसलेल्या माणसाला त्याची जात/धर्म/लिंग/वर्ण यावरून अपवाद करुन अग्यारीत प्रवेश देत नाहीत. यात मुद्दाम पुरुष आणि उच्चवर्णीयांचा अपवाद केला जात नाही. तसंच कोणत्याही पारशी पुरुष आणि स्त्रीला तिथे प्रवेश असतो. त्यात लिंग आणि वर्ण यावरुन अपवाद केला जात नाही. त्यामुळे तुमचा आक्षेप निरर्थक ठरतो. उद्या स्त्रियांच्या स्वच्छतागृहांमध्ये आणि ट्रेनच्या स्त्रियांच्या डब्यांमध्ये पुरूषांना प्रवेश नसतो असं कुणी तरी म्हणेल. ते विधानही तुमच्या आक्षेपाप्रमाणेच निरर्थक आहे.
1 Dec 2015 - 7:18 am | प्रचेतस
वेरुळच्या घृष्णेश्वराच्या मंदिराच्या गाभाऱ्यात मात्र पुरुषांना बनेल काढल्याशिवाय अजूनही प्रवेश मिळत नाही.
1 Dec 2015 - 7:32 am | बोका-ए-आझम
गोकर्ण महाबळेश्वरलाही ही पद्धत आहे. पण सरसकट प्रवेशबंदी नाहीये.
1 Dec 2015 - 11:55 am | तुषार काळभोर
असा नियम असावा.
सासवडजवळच्या हिवरे येथील मंदीराच्या गाभार्यातसुद्धा बनियन (आणि कमरेचा पट्टा-चामडी वस्तू नको म्हणून) काढून जावं लागतं.
कानिफनाथांचं मंदीर हिवर्यापासून पुढेजवळच आहे. (शिवमंदीर नसले तरी) तेथेही हाच नियम आहे.
या नियमामुळे बाय डिफॉल्ट महिला मंदीर प्रवेशास अपात्र ठरतात.
1 Dec 2015 - 2:55 pm | कवितानागेश
मी गोकर्ण, घृष्णेश्वर इथे जाऊन आले आहे. दक्षिणेत अनेक शिवमंदीर्ांमध्ये असा नियम आहे पण तो पुरुषांसाठी. स्त्रियांना तस्सच्या तस्स आत जाऊ देतात.
1 Dec 2015 - 7:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजूनही तुम्हाला काही प्रतिसादांना फाट्यावर मारणं जमत नै ये असा तो अर्थ.
-दिलीप बिरुटे
1 Dec 2015 - 9:49 am | बोका-ए-आझम
तरी आपण उत्तरं देतोच ना सर! शिक्षकांच्या व्यवसायात हा occupational hazard असतोच ना! त्यामुळे इच्छा असूनसुद्धा फाट्यावर मारता येत नाही.
1 Dec 2015 - 10:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत आहे. पण मला अनेक वर्षाच्या जालानुभव सांगतो आपल्याला त्रास होतो पेक्षा थांबणं परवडतं. म्हणजे उद्या एखाद्या मंदिराच्या विश्वस्तानी ठरवलं की महिलांनी यापुढे.... जाऊ देत.
पुरुषांना मंदिरात प्रवेश करायचा असेल तर नागडं जावं लागेल तरी हे म्हणतील काय होतं मंदिराचे नियम पाळले पाहिजेत. शिकलेले असून सारासार विवेकबुद्धि वापरता येत नसेल तर काय उपयोग शिक्षणाचा.
शनीमंदिराचा चौथारा असू देत की रजस्वला असलेल्या महिलांना मंदिरात प्रवेश असू देत स्री पुरुषांनी मिळुन जनआंदोलन केलं पाहिजे, देव आहे नाही तो भाग वेगळा. पण प्रवेश बंदी कोणालाच नको. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सर्वांसाठी खुलं केलं त्या प्रमाणे ही आंदोलनं झाली पाहिजेत, असं वाटतं.
-दिलीप बिरुटे
1 Dec 2015 - 10:46 am | पगला गजोधर
अश्या लोकांना साक्षर म्हणावे, सुशिक्षित नव्हे, भलेही त्यांनी फुरोगामी/विचारजंत असे इतरांना शिव्या घालून हिणवलं तरी… call spade a spade.
1 Dec 2015 - 10:50 am | संदीप डांगे
बिरुटेसर,
परस्परविरोधी विधाने करत आहात. सारासारविवेकबुद्धी असेल तर कुणी मंदिरात जाणारच कशाला?
मंदिरातले नियम विश्वस्त ठरवत नाहीत, भक्त ठरवतात. भक्तांनी ठरवलेले नियम विश्वस्त पाळतात. पुढे विश्वस्त/पुजारी आपल्या सोयीनुसार ते वळवून घेतात आणि पुढे भक्त हेच नियम पाळायला लागतात. हे ज्या भक्तांना कळत नाही त्यांना नागडे जाण्याचाही नियम मान्य होतो. प्रथा एखाद्याच्या मूर्खपणामुळे तयार होतात. एखाद्याने नागड्याने जाण्याचा नवस केला अन् अनमानधपक्याने फळास आला तर ते पाहून अक्कल गहाण टाकलेले लोक तसेच करायला लागतील. बहुसंख्य तसे करतात पाहून मग तोच नियम होईल आणि तीच प्रथा होईल. मग ते न पाळणार्याला देवाचा उपमर्द करत आहे असे म्हणून प्रवेश नाकारला जाईल. कारण मेंढ्यांच्या कळपात ते फिट बसत नाहीत म्हणून.
मंदिरात कुणालाच प्रवेशबंदी नसावी असे ज्यांचे मत आहे त्यांना मंदिर ही व्यवस्थाच समजली नाही असे म्हणावे लागते. चर्च, मशिद, गुरुद्वारा, विहार ह्यापेक्षा ही व्यवस्था कशी वेगळी आहे हे खालच्या माझ्या प्रतिसादात सांगितले आहे. काही चार बुकं शिकून अतिशहाणे झालेले लोक तिकडची व्यवस्था पाहून इकडंही तसेच असले पाहिजे ह्या दिव्य विचाराप्रत येतात. त्यांना तिकडचाही अभ्यास नसतो, इकडचाही नसतो. समानतेच्या तत्त्वाचा चुकीच्या ठिकाणी आग्रह होत आहे हे लक्षात येत नाही.
जनआंदोलन जर करायचे तर मंदिरात कुणीच जाऊ नये यासाठी करावे. त्यानेच समाजाचे जास्त आणि योग्य भले होईल. सगळी मंदिरेच ओसाड पाडावीत. जिथे बंदी आहे तिथे जबरदस्ती मंदिरप्रवेश ही अतिशय हास्यास्पद संकल्पना आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.
1 Dec 2015 - 11:52 am | बोका-ए-आझम
आणि मंदिरात जाणं या परस्परविरोधी गोष्टी कशा काय? मंदिरात नवस करणं, तो पूर्ण होईल किंवा होतोच अशी अंधश्रद्धा ठेवणं, त्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी असणं ही सारासारविवेकबुद्धी नसल्याची लक्षणं आहेत हे मान्य, पण मंदिरात निव्वळ जाणं हे सारासारविवेकबुद्धीच्या विरोधात आहे हे पटलं नाही.
1 Dec 2015 - 11:57 am | संदीप डांगे
सारासार विवेक म्हणजे काय ते स्पष्ट केले तर उत्तर देता येईल.
1 Dec 2015 - 12:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मंदिरात निव्वळ जाणं हे सारासारविवेकबुद्धीच्या विरोधात आहे हे पटलं नाही.
सहमत....!
योग्य आणि अयोग्य यातील समज .
-दिलीप बिरुटे
1 Dec 2015 - 9:30 am | राही
दक्षिणेतल्या काही देवळांत प्रवेशबंदी नसली तरी पुरुषांना वेष्टि नेसावी लागते. अलीकडे बहुतेक पुरुष ती पँट्वरूनच गुंडाळतात.
महिलांना साडी किंवा सलवारकमीज आवश्यक आहे. जीन्स अजूनही काही ठिकाणी चालत नाहीत. चिपळूणमध्ये डेरवण येथे महिलांना नऊवारी नेसावे लागत असे तसेच तेथे महिलांनी महिना असताना आत जाऊ नये अशी पाटीही होती. आताची स्थिती माहीत नाही.
अवांतर : काही वर्षांपूर्वी केरळला गेलो असताना एकदा एका देवळात आमच्या मुलांना प्रवेश द्यावा की नाही याबद्दल तिथल्या पुजार्यांमध्ये चर्चा झाली. तिथल्या मुख्य प्रशासकाला बोलवण्यात आले. कारण मजेशीर होते. त्यावेळी तिथे आम्हीच फक्त उत्तरहिंदुस्तानी होतो आणि मुलांचा वर्ण तांबूस गोरा आणि केस पिंगट ही बाब तिथल्या समुदायात वेगळी दिसत होती. कदाचित परदेशी पाहुणी मुले एक्स्चेंज कार्यक्रमातून आली असतील असा संशय त्यांना आला होता. (केरळमधे बरेच परदेशी लोक येतात.) त्यांची समजूत पटवण्यात थोडा वेळ गेला. रांगेतल्या मागच्या लोकांचा खोळंबा झाला नाही कारण आम्हांला रांगेतून बाहेर काढले होते. थोड्या वेळाने सर्व ठीक झाले.
1 Dec 2015 - 9:43 am | मितान
विजारीवरून वेष्टी एवढा बिनडोक भंपकपणा मी कोणत्याच देवळात पाहिला नाही!
एका ठिकाणी मला सलवारवरून ते कळकट कापड ते ही भाड्याने घेऊन नेसले तरच मंदिरात जाता येईल असे सांगून अडवले. त्याचवेळी २ फिरंगी स्कर्टवाल्या मुलींना मात्र वाकून नमस्कारासह प्रवेश मिळाला. हे बघून मला त्या आतल्या देवाचीच कीव आली. तसंही मला जाऊन न जाऊन काही फरक पडत नसल्याने बाकीच्यांचे दर्शन होईस्तवर मी देवळाबाहेरच्या दुकानांना माझे दर्शन देऊन आले.
1 Dec 2015 - 10:41 am | पगला गजोधर
तै मस्तच, मी सुद्धा जेजुरीला धन्दा होताना पाहीला, तेव्हा मी सुद्धा आत गेलो नाही.
1 Dec 2015 - 12:03 pm | बॅटमॅन
नै म्हणजे जो काय नियम आहे तो तरी सारख्या प्रमाणात राबवावा. हे असली चाटूगिरी डोक्यात जाईल नै तर काय!
1 Dec 2015 - 11:18 am | गॅरी ट्रुमन
मी या वर्षी जानेवारीतच तिथे गेलो होतो. तिथे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही घटनांचे पुतळे आहेत आणि वालावरकर महाराज म्हणून कुणा महाराजांची समाधी आहे. पुतळ्यांच्या ठिकाणी असे वेषभूषेवर बंधन नाही.पण समाधीच्या ठिकाणी जायचे असेल तर स्त्रियांना "वयोमानानुसार फ्रॉक किंवा साडी ही वेशभूषा असेल तरच प्रवेश दिला जाईल" अशी पाटी वाचली होती. नऊवारी असा काही उल्लेख नव्हता. याविषयीच मी मिपावर मागे लिहिलेले थोडे चोप्य-पस्ते करतो---
"म्हणजे मी जीन्स घालून गेलो तरी त्या महाराजांना चालणार पण हिलरीने साडीच नेसली पाहिजे ही सक्ती. हे काही मला पटले नाही....ते पुतळे बघून झाल्यानंतर आणखी एक ठिकाण होते तिथे जायला आम्ही निघालो तेव्हा हिलरीने साडी नेसली नसल्यामुळे आत प्रवेश नाही हे कळले.आम्ही विचारले की आत नक्की काय आहे?त्यावर कळले की तिथे आत वालावलकर महाराजांची समाधी आहे.एक तर वालावरकर महाराज हे नाव मी आयुष्यात दुसऱ्यांदा ऐकले.कदाचित शाळेत असताना आमची सहल गेली होती त्यावेळी ते नाव ऐकले असेल ही शक्यता गृहित धरून दुसऱ्यांदा असे लिहितो.हे महाराज कोण होते किंवा ते खरोखर चांगले होते की नाही याविषयी मला काहीच माहित नव्हते. ज्या माणसाविषयी काही माहित नाही त्याची समाधी बघण्यात काय कपाळ इंटरेस्ट असणार? आणि समजा हे महाराज कोण हे माहित असते तरी तिथे जावेसे वाटायची शक्यता अगदी शून्य होती.उंटाच्या लहान आतड्याची लांबी किती असते हे समजून घेण्यात मला जितका इंटरेस्ट आहे त्यापेक्षाही कमी इंटरेस्ट या असल्या महाराजांच्या समाध्या वगैरे बघण्यात मला आहे.त्यामुळे आत जाऊ देणार नसाल तर नका देऊ, हू केअर्स असे म्हणत आम्ही तिथून निघालो."
1 Dec 2015 - 11:30 am | पगला गजोधर
बेअरीन्ग सुट्ल....
1 Dec 2015 - 6:10 pm | शलभ
चोप्य पस्ते आहे. तेव्हा ते क्लिंटन होते.
1 Dec 2015 - 1:16 pm | प्रसाद गोडबोले
मी फक्त तुमचे हे वाक्य चुकले आहे इतकेच निदर्शनास आणुन देत आहे .
तुम्हाला कदाचित असे लिहायचे असावे
आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली हिंदु प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत.
तुमची वाक्य रचना चुकली आहे इतकेच निदर्शनास आणुन देत आहे !
1 Dec 2015 - 1:58 pm | पगला गजोधर
हिंदु ''प्रार्थनास्थळं'' नसून, हिंदु ''पूजास्थळं'' असतात नं ?
1 Dec 2015 - 2:02 pm | प्रसाद गोडबोले
त्यांचे मुळ वाक्य हे आहे >>>
>>> मी कमीत कमी सुधारणा सुचवत होतो , बरे झाले आपण अजुन एक अॅडीशन सुचवली !
बोकाराव तुमचे वाक्य असे असले पाहिजे
आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली हिंदु पूजास्थळे कुठेच नाहीत.
2 Dec 2015 - 10:26 am | बोका-ए-आझम
+१. ही प्रतिक्रिया आधी दिली असतीत प्रगोभौ, तर उगाचच कटुता निर्माण झाली नसती. असो. धन्यवाद!
1 Dec 2015 - 9:14 am | पगला गजोधर
2 Dec 2015 - 10:10 pm | नूतन सावंत
बारा ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्लर येथे हिंदू धर्मियांशिवाय कोणालाही प्रवेश नाही,अशी पाटी आहे.एकदा आय.टी.डी.सी.च्या बसने आलेल्या क्रिश्चन धर्मियांना मंदिराच्या प्रांगणात आणल्याबद्द्ल पंजाबी हिंदू गाईडला तिथले पुजारी आईबहिणीवरुन शिव्या देताना प्रत्यक्ष पाहिले आहे.
3 Dec 2015 - 10:24 am | माहितगार
खरच हे दुर्दैवी आहे. मी एकदा एका आफ्रीकन (ख्रिश्चन) स्त्रीला विवेकनंदांच्या भूमिकेतून हिंदू धर्म या विषयावर माहिती दिली तिला हिंदू संस्कृती बद्दल सकारात्मक उत्सुकता निर्माण झाली आणि मंदिरांना भेट देण्याचीही इच्छा झाली पण मंदिरातील पुजारीवर्ग कसा वागेल या विचाराने मंदिर भेटीस आमंत्रण देण्याचे धाडस मलाच झाले नाही याची आठवण झाली.
3 Dec 2015 - 11:24 am | संदीप डांगे
जिथे पुजारी नाहीत अशा मंदिरांना भेट द्यायला सांगावी. प्रसिद्ध व गर्दिने गजबजलेली मंदिरे म्हणजेच हिंदू धर्म असे नाही.
3 Dec 2015 - 11:53 am | माहितगार
म्हणजे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष तुमच्या धर्मातील हेदभाव कबूल करणे, शिवाय हायलाइट करणे झाले असे नाही का ?
3 Dec 2015 - 12:37 pm | संदीप डांगे
नाही हो तसे नाही. मंदिरांबद्दल मी जे वर विवेचन दिले त्यानुसार काही मंदिरे खाजगी पद्धतीची आहेत. लोक तिथे गर्दी करतात म्हणजे ती लोकांची झाली असा अर्थ होत नाही. चित्रपटगृहांमधे लोक गर्दी करतात म्हणून तिथे वाट्टेल तसे वागण्याचा, किंवा तिथले नियम ठरवण्याचा अधिकार जाणार्या प्रेक्षकांना मिळत नाही. कुणाला प्रवेश द्यावा न द्यावा हे जसे चित्रमंदीर ठरवू शकते तसेच हे मंदिरही ठरवू शकते. टिकिट असणे म्हणजे प्रवेशास पात्र असणे हा साधा नियम तिकडे आहे, तर हिंदू असणे म्हणजे पात्र असने हा नियम इकडे आहे. ह्यात भेदभाव आहे असे मानणे चुकीचे आहे. 'वसुधैव कुटुंबकम्' असे एखादा हिंदू मानतो म्हणून तुम्ही त्याच्या घरात घुसून राहणार हे योग्य नाही. भेदभाव आणि पात्रतानुसार प्रवेश ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
म्हणून जिथे अपात्र ठरू तिथे न जाता जिथे पात्रतेचे निकष उपलब्ध नसल्याने खुला प्रवेश आहे तिथे जाणे इष्ट असे माझे मत.
मंदिरे आणि देव ह्या दोन वेगळ्या संकल्पना आहेत हे मी आधीपासून सांगतोय. त्यात गल्लत होऊ देऊ नये. प्रवास हा प्रवास असतो पण गावातल्या एसटी स्टँडवर ज्या सहजतेने आपण फिरू शकतो, टिकट काढण्याची वेळ येईपर्यंत बसमधे बसू शकतो, तितक्या सहज कुठल्या एअरपोर्ट वर नाही फिरू शकत. म्हटले तर दोन्ही पब्लिक प्लेस, सार्वजनिक स्थळ आहेत. मग तिथेही भेदभाव समजायचा का? प्रवास म्हणजे हिंदू धर्म आणि मंदिरं म्हणजे एअरपोर्ट, बसस्थानकं असं समजा.
(फार गुंतागुंत होतेय का? फारच दृष्टांतहेवी प्रतिसाद होतोय, माफी असावी)
3 Dec 2015 - 12:50 pm | बॅटमॅन
सरसकट कुणालाही गाभार्यात सोडणे आणि निव्वळ मंदिरात अलाउ करणे यात फरक आहे की नाही?
फक्त मंदिरप्रवेश करू दिला तरी बास आहे. तेवढंही कबूल करवत नसेल तर हाईट आहे.
3 Dec 2015 - 1:00 pm | संदीप डांगे
सरसकट कुणालाही गाभार्यात सोडणे आणि निव्वळ मंदिरात अलाउ करणे यात फरक आहे की नाही?
हो. फरक आहे.
फक्त मंदिरप्रवेश करू दिला तरी बास आहे. तेवढंही कबूल करवत नसेल तर हाईट आहे.
बरोबर. माझ्यामते नियम जर असतील तर ते काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत. अन्यथा तो सरळ भेदभाव आहेच. म्हणजे माहितगार म्हणत आहेत ती आफ्रिकन व्यक्ति जर सहज टूरीस्ट म्हणून मंदिरात आली आणि तीला प्रवेश नाकारला पण तीच व्यक्ती कुणा केंद्रिय मंत्र्यासोबत आली आणि तिला गाभार्यात घेऊन गेले तर हा भेदभावच झाला.
मला वाटते इंदिरा गांधीसोबत जे त्या मंदिराने केले तेवढे कडक नियम कुणी मंदिर पाळत असेल तर तो भेदभाव समजू नये. अन्यथा हाईट आहेच.
3 Dec 2015 - 1:05 pm | बॅटमॅन
कडक नियम असतील तर असोत, मात्र सर्वांना सारखेच असोत काही बाबतीत. गुरुद्वार्यात पहा, तुमचे जातधर्मलिंग कोणी विचारत नाही. अंग झाकणारे कपडे घातले आणि डोके झाकले की संपले. असेच इथेही असावयास हरकत नसावी असे आपले मला वाटते. असो.
3 Dec 2015 - 1:49 pm | पगला गजोधर
अमेरिका/ गोव्यातल्या/केप टाउन चर्चमधे (डोक्यावर टोपी न ठेवणे की संपले) व सिंगापूर /थायलंड मधील बौद्ध मंदिरात (पादत्राणे न घालणे की संपले), मला प्रवेश मिळाला, फोटो सुद्धा काढता आले. (कोणीही जात धर्म विचारला नाही). गुरुद्वाराच्या लंगर मधे जेवलोय (कोणीही जात धर्म विचारला नाही).
3 Dec 2015 - 2:07 pm | बॅटमॅन
सहमत.
3 Dec 2015 - 2:47 pm | नाखु
हेच मी स्वतः शिवथर घळला अनुभवले आहे.
सुमारे २०-२२ वर्षांपूर्वी (जेव्हा थेट नेट सेल्फी) इफे़क्ट नव्हता तेव्हा..
माझ्याबरोबर आम्च्या कंपनी समूहात दोन मुस्लीम २ केरळीयन ख्रिषचन यांनाही विना अटकाव प्रवेश दिला होता.
शिवथर घळ हे संपूर्णतः खाजगी आहे असे मला वाटते तिथेही तुम्ही कुठल्या धर्माचे आहात हे विचारत नाहीत (किमान आम्हाला तरी विचारले नाही) फक्त पोषाख सभ्य असावा असा संकेत असावा.(किंवा मधल्या काळात काही वावगे घडले असावे म्हणून पेहरावाबद्दल काही नियम बन्विले असावेत).
भेदभाव करणे कुठेही वाईच धाग्यावर आणि मंदीरातही......
लाईनीत (थांबण्याची सक्ती न करता लांबूनही नमस्कार)नमस्कारी नाखु
3 Dec 2015 - 1:06 pm | बॅटमॅन
कडक नियम असतील तर असोत, मात्र सर्वांना सारखेच असोत काही बाबतीत. गुरुद्वार्यात पहा, तुमचे जातधर्मलिंग कोणी विचारत नाही. अंग झाकणारे कपडे घातले आणि डोके झाकले की संपले. असेच इथेही असावयास हरकत नसावी असे आपले मला वाटते. असो.
बाकी नियम कसाही असो मात्र पुजार्यांनी शिव्या देणे म्हणजे हाईट आहे. असे अनुभव वाईटच.
3 Dec 2015 - 1:50 pm | अजया
सहमत.
3 Dec 2015 - 2:08 pm | गवि
अ. कडक अथवा सौम्य, जे काही नियम असतील त्यांची कमाल व्याप्ती नागरिकाला एखाद्या खाजगी, प्री-डिफाईन्ड सीमारेषा असलेल्या जागेत प्रवेश नाकारणे इतकीच असेल
आणि
ब. या जागी न जाण्याने त्या व्यक्तीच्या अन्न वस्त्र निवारा यांपैकी एक अथवा अनेक गरजा बाधित होत नसतील किंवा या गरजांना मिळवण्याचा एकमेव मार्ग खंडित होत नसेल.
आणि
क. स्वतःच्या आवारात तसे किंवा कोणतेही नियम करण्याची पूर्ण कायदेशीर मान्यता नियम बनवणार्या बॉडीला त्या देशाच्या मुख्य कायदेशीर संस्थेने दिलेली असेल.
तर कोणतेही नियम चूक ठरणार नाहीत / ठरु नयेत. आणि तसं नसेल तर सर्व नियम चूक ठरतील / ठरावेत.
मग ते वस्त्र, लिंग, वर्ण, धर्म, भाषा, उंची, वजन, केसांची लांबी, आहारपद्धती, लैंगिक ओरिएन्टेशन किंवा अन्य कोणत्याही व्हेरिफायेबल पॅरामीटरवर आधारित असोत.
बाकी कितीही काही बोललं तरी निरुपयोगी.
3 Dec 2015 - 2:18 pm | बॅटमॅन
म्हणजे या न्यायाने दलितांच्या मंदिरप्रवेशाबद्दलची सर्व आंदोलने आणि महिलांच्या गाभाराप्रवेशाबद्दलची आंदोलने निरुपयोगीच ठरावीत, नै का?
मध्यंतरी कर्नाटकातील एका मंदिरातल्या गलिच्छ प्रथेबद्दल बरेच काही छापून आले होते. ब्रह्मवृंदाचे जेवण झाल्यावर त्या उष्ट्या खरकट्या पत्रावळ्यांवर लोटांगण घालत प्रदक्षिणा घालण्याचा प्रकार तिथे अगोदरपासून आहे. हाही कायदेशीर प्रकार आहे, कुणाच्या कसल्या हक्कावर गदा वगैरे येत नाही. पण यावर बंदी घालण्यात आली. आणि ते मलाही समर्थनीय वाटते. बर्याच जणांनी विरोधही केला, कैकांनी समर्थनही केले. नेमके देवळाचे नाव आठवत नै नैतर लिंक दिली असती.
बाकी हा मुद्दा अंमळ भावनिकही आहेच. काही प्रमाणात अॅक्सेस ओपन केल्यास अजून बरे होईल असे बर्याच जणांना वाटते, तदनुरूप अनेक लोकांनी चळवळी केलेल्या आहेत आणि त्यांना कमीअधिक प्रमाणात यशही मिळालेले आहे. त्यामुळे यात निरुपयोगी असे काही वाटत नाही.
3 Dec 2015 - 2:43 pm | संदीप डांगे
मंदिरनामक जागा केंद्रस्थानी ठेवून समाज त्याविषयी काय निर्णय घेतो हे समाजावर बंधनकारक असते. संपूर्ण समाजाने (यात स्त्रिया-पुरुष, दलित-उच्चवर्णिय, श्रीमंत-गरीब सगळे आले) स्त्रियांच्या गाभाराप्रवेशावर बंदी घातली तर तेही बरोबर, उठवली तरी बरोबर. पण समाजातले काही विशिष्ट घटक आपले स्वार्थ साधण्यासाठी, असमतोल मानसिकतांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उर्वरीत समाजाला फसवत असतील आणि त्यायोगे काही भेदभाव घडत असेल तरच तो चुकीचा ठरेल.
बाकी तुम्ही म्हणताय त्या अनिष्ट प्रथा ह्या सहज भावनेतून सुरु झालेल्या, पुढे विकृत रुप घेतलेल्या असतात. त्यांच्यावर प्रबोधनासह बंदी घालणे आवश्यकच आहे.
3 Dec 2015 - 3:05 pm | बॅटमॅन
फसवणे म्हणजे काय? आर्थिक फायदा करून घेणे वगैरे? तसे असेल तर मग दलितांना मंदिरप्रवेशापासून रोखण्यात पुरोहितांचा तरी आर्थिक फायदा काय होता? उलट त्यांना अलाउ केले असते तर त्यांनीही दाने दिलीच असती की. तस्मात निव्वळ फसवणूक असेल तरच चूक ही व्याख्या अपुरी आहे असे वाटते.
पण हा मुद्दा बर्याच अंशी सब्जेक्टिव्ह आहे हेही तितकेच खरे.
3 Dec 2015 - 3:26 pm | संदीप डांगे
फसवणे म्हणजे आर्थिक फायदाच असे नाही. खरे न सांगणे, सत्य दडवून ठेवणे, मिळालेल्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन दमदाटी करणे. 'एखादा अधिकार तुम्हालाही उपलब्ध आहे' हे जातीपातीच्या पूर्वग्रहातून निम्नजातींना न सांगणे ही फसवणूकच आहे.
एक उदाहरण देतो. मी आणि माझ्या मित्राने अमेरिकेतल्या कुठल्या युनिवर्सिटीला अप्लाय केले. पण प्रवेश मिळेल की नाही हे तिथे गेल्यावरच समजते अशी अट आहे. माझा मित्र तिथे आधीच गेलेला आहे. काय निकाल आहे हे त्याने मलाही कळवणे अपेक्षित आहे. पण इर्ष्येतून, सामाजिक सन्मानाच्या हेतूने त्याने मला 'तुझा नंबर लागला नाही' असे चुकीचे सांगितले. मला त्याच्यावर प्रचंड विश्वास असल्याने मी तोच निकाल खरा मानला. यात माझे नुकसान झाले. म्हणजे मला फसवले असेच म्हणेन ना मी?
माझ्यामते मंदिरांमधे विशिष्टांना प्रवेशबंदी ही खाजगीकरणातून आलेली आहे. मंदिरव्यवस्थापनाच्या इतिहासाबद्दल मला तेवढे इत्थंभूत ज्ञान नाही. याविषयी जास्त माहिती मिळाली तर ह्या बंदीप्रथा कुठून उपजल्या हे शोधता येईल.
3 Dec 2015 - 3:32 pm | बॅटमॅन
सहमत, धन्यवाद.
3 Dec 2015 - 6:24 pm | अत्रुप्त आत्मा
@माझ्यामते मंदिरांमधे विशिष्टांना प्रवेशबंदी ही खाजगीकरणातून आलेली आहे.>> आहो कुठचं काय आलय खाजगीकरण.? ही अस्पृश्यता पाळली जाते सरळ सरळ! ह्याला पोथ्यांचाही आधार असतो.. देवाची पॉवर कमी होइल्,अमके तमके शिवल्यानी..असली मूर्ख टनाटनी गणित असतात...ह्या देवाला शिवू न देण्याच्या प्रथांमागे.. आतल्या गोटातून ,माहिती घ्या ..मग कळेल
3 Dec 2015 - 7:01 pm | संदीप डांगे
अहो, अस्पृश्यता म्हणजेच खाजगीकरण. तेच म्हणायचे आहे. हे देवाची पावर कमी होईल वैगेरे बालीश कारणं देण्यामागे जी काय मानसिकता आहे ते म्हणजे खाजगीकरण. खरेतर अस्पृश्यता, देवाची पॉवर इतकी वरवरची कारणं बघण्यापेक्षा माणसाच्या अंतर्मनात ह्या गोष्टी निर्माण होण्यामागे आणि चराचरात देव आहे ह्या भावनेच्या विरूद्ध वागण्यामागे काय इतिहास असावा, कुठून सुरू झालं, नेमकं काय कारण असावं यावर विचार करतोय.
काहीतरी आहे जे इतरांपासून लपवून, सुरक्षित ठेवायचं आहे. कुणाला तरी काही तरी फायदा असल्याशिवाय ह्या मान्यता व भेदभाव निर्माण होणार नाहीत. नुसतं 'आम्ही श्रेष्ठ तुम्ही कनिष्ठ' एवढ्याशा भांडवलावर ही व्यवस्था इतकी शतके चालू शकत नाही.
गूढत्वाच्या भांडवलावर असेल तरी सुरुवातीस काहीतरी अनुभव आल्याशिवाय लोक मानणार नाहीत. म्हणजे दहा समान दर्जा असलेल्या व्यक्ती प्रवासाला निघाल्या पण रस्ता माहीत नाही, त्यातल्या प्रत्येकाने प्रयत्न करून पाहिला पण एकाचेच रस्त्याबद्दलचे अंदाज दोन-तीन वेळा सलग बरोबर निघाले की तोच त्या गटाचा म्होरक्या होतो. मग भलेही पुढचे सगळे अंदाज चुकत गेले तरीही पुर्वसंचितानुसार त्यालाच तो मान मिळतो. पुढे इतरांची मते लक्षात घेऊन तो अंदाज वर्तवेल पण शेवटपर्यंत इतर लोक त्यानेच आपल्याला कसे योग्य मार्गदर्शन केले ह्यावर विश्वास ठेवतील.
चातुर्वर्ण्य व्यवस्था होऊन ब्राह्मण सर्वश्रेष्ठ ठरवण्यामागे ब्राहमणांचे असेच काहीसे योगदान कारणीभूत असेल काय? ज्याचा गैरफायदा घेऊन जन्मनिहाय व्यवस्था निर्माण झाली आणि पुढे श्रेष्ठ कनिष्ठ चे मत मानवी मनाच्या विकृत बाजूचे दर्शन करत प्रभावी झाले.
मूळावरच घाव घातला तर फांद्या आपोआप तुटून पडतात. बाजीरावपेशव्यांनीच सांगितलंय. म्हणून मूळ शोधावे. ते मनुस्मृतीच्याही पलिकडे असावे. जाणकारांच्या मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत.
3 Dec 2015 - 2:46 pm | गवि
माझा प्रतिसाद परत वाच.
आजरोजीविषयी बोलायचं आहे.
अ. जागा खाजगी आहे की सार्वजनिक मालकीची?
ब. प्रवेश रोखणारा नियम अलिखित आणि लोकल पुजार्याने / बडव्यांच्या गटाने आपसात ठरवून केला आहे की मंदिराच्या ट्रस्टने अधिकृत ऑथॉरिटीसह केलेला आहे?
यावर ते वैध की अवैध ते ठरेल. कधी भावना, कधी कायदा अशाने बरेच घोळ होतात.
3 Dec 2015 - 3:01 pm | बॅटमॅन
गाभाराप्रवेशाची आंदोलने गेल्या पाचेक वर्षांत झालेली आहेत. कर्नाटकातले उदाहरणही अलीकडचेच आहे.
बाकी अधिकृत अॅथॉरिटीने घेतलेला निर्णय तांत्रिकदृष्ट्या वैध असला तरी योग्य असेलच का? ते अय्यप्पा मंदिरात पाळीवाल्या स्त्रिया ओळखण्यासाठी स्कॅनर बसवायचा निर्णय समजा उद्या अगदी अधिकृतपणे घेतला तर तुम्ही त्याला योग्यच म्हणाल का?
वैध आणि योग्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दरवेळेस एकाच एक चौकटीत अशा गोष्टी पकडता येत नसल्या म्हणून नुस्ता घोळ आहे असे नाही.
3 Dec 2015 - 2:09 pm | अभ्या..
पुजारी हे माणसांचे प्रतिनिधी म्हणून देवापुढे गार्हाणे मांडतात, सेवा करतात तोपर्यंत ठिकच असते. जेंव्हा ते स्वतःला देवाचे प्रतिनिधी समजू लागतात तेंव्हाच अवघड होते. अशावेळी व्यवस्था त्यांना बदलते किंवा ते व्यवस्था बदलतात.
3 Dec 2015 - 2:21 pm | बॅटमॅन
अगदी सहमत.
3 Dec 2015 - 2:25 pm | पद्मावति
सहमत. अशाने आपणच आपल्या धर्माला वाईटपणा देतो.
3 Dec 2015 - 1:57 pm | माहितगार
@ डांगेजी
काय होतय १) अनेक ऑदरवाईज सार्वजनिक असलेली मंदिरे/प्रार्थनास्थळे केवळ भेदभावाच्या सोईसाठी म्हणून खासगीपणा पुढे केला जाताना दिसतो यात कुणाच्या व्यक्तीगत घरात जाण्याचा तसा प्रश्न नाही आणि 'अतिथी देवोभव' म्हणणार्या संस्कृतीत अगदी घरातल्या मंदिरा बाबत सुद्धा भेदभावयूक्त व्यवहार आदर्श कसा म्हणता येईल ? २) मी समोरच्या परधर्मीय व्यक्तिशी माझ्या संस्कृतीतील उदात्तते बद्दल बोलणार आणि नंतर हजारो लोक जात असलेल मंदिर खासगी आहे आणि तुमच्या बॅकग्राऊंडमुळे प्रवेश नाही असे सांगणार यात माझ्या संस्कृतीच्या उदात्ततेच प्रदर्शन होत की कोत्या मनोवृत्तीच प्रदर्शन होते आहे?
मी माझ्या धर्माचा संस्कृतीचा अभिमान ठेवतानाच, सहिष्णूता बाळगाणारा समधर्म समभाव बाळगणारा व्यक्ती आहे, मला माझ्या प्रमाणेच माझ्या मुलांमध्ये सहिष्णूता वृद्धींगत व्हावी आणि इतर धर्म आणि विचार पद्धतीचा परिचय व्हावा म्हणून माझ्या मुलांना विवीध धर्मांच्या धर्म स्थळांना भेटीस न्यावयाचे आहे त्यावेळी मुलांनो अमुक अमुक मंदिरे/प्रार्थनास्थळांमध्ये तुम्ही तुमच्या बॅकग्राउंडमुळे प्रवेशासाठी अपात्र आहात हे सांगणे नेमकी कोणती गोष्ट बाल मनांवर बिंबवते ज्यांना धर्मंच्या दुकानांवरच्या प्रवेश नाकारणार्र्या असहिष्णु पाट्या पाहून त्या मुलांकडून मोठे झाल्या नंतर सहिष्णूतेची अपेक्षा करणे कितपत रास्त ठरते या बद्दल मी साशंक आहे. असो.
30 Nov 2015 - 11:31 pm | सायकलस्वार
पुरुषांना बंदी असलेला एक गाभारा इथे मिपावरच आहे म्हणे...
30 Nov 2015 - 11:34 pm | प्रसाद गोडबोले
हा हा हा
बास बास ... धाग्याचे सार्थक झाले =))))
1 Dec 2015 - 12:06 pm | बॅटमॅन
अगदी अगदी. =)) =)) =))
1 Dec 2015 - 8:08 pm | टवाळ कार्टा
खिक्क...पण तो खास चाव्यांनी उघडता येतो ;)
2 Dec 2015 - 9:44 am | कपिलमुनी
संपादित
1 Dec 2015 - 7:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा ! वाक्य आवडल. क्लास.
-दिलीप बिरुटे
1 Dec 2015 - 8:02 am | अजया
अरे वा हे सोपे तत्त्वज्ञान दिसते!कळायला अवघड गेला असेल विषय बाकीचा!
चालु द्या निरर्थक अत्मरंजन! etc etc!!
1 Dec 2015 - 8:49 am | मितान
@ सायकलस्वार,
इथला तुमच्या मते गाभारा किती महत्वाचा आहे हे अधोरेखित केल्याबद्दल आभार.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
1 Dec 2015 - 9:37 am | पैसा
सदस्यकाळ ४ महिने फक्त. मिपाचा कमालीचा अभ्यास केलेला दिसतोय! का आताचा आयडी बॅन झाल्यावरची तरतूद करून ठेवली आहे!
अभ्यास जोरात चालू ठेवा बरं!
1 Dec 2015 - 12:08 pm | बॅटमॅन
एका महिन्यात जर कुणी सालसपणे प्रतिसाद देऊ शकत असेल तर चार महिने लै झाले, नै का?
1 Dec 2015 - 12:13 pm | पैसा
अगदी खरं आहे. लोक काड्या करण्यासाठी स्पेशल अवतार घेऊन येतात त्यामुळे तयार असतातच. आमच्यासारखे बसतात बोंबलत.
1 Dec 2015 - 12:24 pm | बॅटमॅन
चांगलंच आहे. बोंबलण्याचे फायदे काय असतात ते इथे पहावयास मिळेल. आरोग्यास हितकारकच असते.
http://www.sanatan.org/mr/a/574.html
त्या निमित्ताने सालसपणामागील अमंगळ निघून जाईल अशी भाबडी आशा करावयास हरकत नाही. =))
1 Dec 2015 - 12:49 pm | पैसा
हितकारक असेल त्यांनी विधी म्हणून करा. मला काही त्याची विधी म्हणून गरज नाही.
1 Dec 2015 - 10:09 am | गणपा
तायांनो थोडं विनोदानं घ्या की सायकलस्वाराचं वाक्य. :D
का उगा वाढदिवसाच्या शुभेच्छा देउन राहीलात?
1 Dec 2015 - 11:03 am | मितान
ब्वॉर्र !
3 Dec 2015 - 3:14 pm | कपिलमुनी
स्त्रीयांना विनोद हा विषय अवघड जातो का ?
किंवा
स्त्रीयांना विनोद हा विषय अवघड का जातो ?
3 Dec 2015 - 3:18 pm | टवाळ कार्टा
पॉपकॉर्न
3 Dec 2015 - 6:02 pm | मितान
जौ दे रे ! कंटाळा आला !!
1 Dec 2015 - 11:09 am | मृत्युन्जय
पुरुषांना बंदी असलेला एक गाभारा इथे मिपावरच आहे म्हणे...
हाहाहाहा.
पण आत मध्ये देव आहे याची खात्री आहे का तुम्हाला? ;)
1 Dec 2015 - 1:21 pm | प्रसाद गोडबोले
देव नाही ह्याची १००% खात्री आहे ... देवी असु शकेल कदाचित =))))
1 Dec 2015 - 2:45 pm | बॅटमॅन
नक्की देवीच की त्या नावाआडचा एखादा किळसवाणा कोळी वगैरे? =)) =)) =))
1 Dec 2015 - 2:59 pm | प्रसाद गोडबोले
आपणास Teotihuacan https://en.wikipedia.org/wiki/Great_Goddess_of_Teotihuacan म्हणायचे आहे की Arachne https://en.wikipedia.org/wiki/Arachne ???
1 Dec 2015 - 3:03 pm | बॅटमॅन
कंचीबी असंन ओ, मुद्दा समजल्याशी कारण. ;)
1 Dec 2015 - 3:11 pm | मितान
हीन प्रतिसाद !
डोक्यातल्या किड्यांची पूजा करत बसलं की असं होतं म्हणे ;)
1 Dec 2015 - 3:19 pm | बॅटमॅन
त्या स्वमतांध दांभिक क्रायबेबी कंपूबाजांना आपली पूर्ण सिंपथी आहे. :)
#छाणप्रतिसाद
1 Dec 2015 - 3:25 pm | मितान
माझी तर अशा लोकांना नुसती सिंपथीच नाही तर किंड्यांविषयीच्या फोबियावर फुकट उपचार करणार्या संस्थांची यादीही तयार ठेवली आहे मी !
1 Dec 2015 - 3:25 pm | मितान
माझी तर अशा लोकांना नुसती सिंपथीच नाही तर किंड्यांविषयीच्या फोबियावर फुकट उपचार करणार्या संस्थांची यादीही तयार ठेवली आहे मी !
1 Dec 2015 - 3:28 pm | बॅटमॅन
एकूण प्रतिसाद पाहून "कोण तो **चा म्हणतोय मी शिव्या देतोय म्हणून?" या अजरामर वाक्याची अठवण झाली. =))
1 Dec 2015 - 5:05 pm | मितान
अय्यो =)) =))
1 Dec 2015 - 5:38 pm | अजया
=))=))=))
1 Dec 2015 - 3:23 pm | नीलमोहर
असं नाही असं नाही,
यावेळेस सचित्र व्याख्या का नाही बरं..
अशाने फाऊल धरला जाईल ;)
1 Dec 2015 - 3:45 pm | प्रसाद गोडबोले
नीमो ,
चित्र सापडले आहे , फक्त तुर्तास संपादक मंडळ सुट्टीवर असल्याने चित्र इथे टाकले नव्हते , आपल्याला व्यनी करतो ;)
बाकी चेष्टा मस्करी इतकी स्पोर्टींगली घेतल्याबद्दल आपल्यावर कारवाई वगैरे होईल की हो :)
1 Dec 2015 - 4:54 pm | नीलमोहर
नको नको व्यनि नको..
आणि संपादक मंडळच सुट्टीवर असल्यावर कारवाई कोण करणार :)
1 Dec 2015 - 5:12 pm | pacificready
>>>नको नको व्यनि नको.
दूरदर्शन ची दारुबंदी ची जाहिरात आठवली.
नको बाबा नको नको.
संसार उद्ध्वस्त करी दारु, म्हणून संसार नका करु
30 Nov 2015 - 8:35 pm | माहितगार
कदाचित याच भावनेने सहसा लोक दुर्लक्ष करतात, अशी काही स्थाने असतील तर जाण्याचे टाळले जाते पण या दृष्टीकोणा बद्दल एक साशंकता आहे उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी पाणी पिण्यास दिले नाही तर तुम्ही ते टाळाल दुसरीकडे जाऊन पाणी प्याल एका अर्थाने समतेच्या वागणूकीचा आग्रह बाजूस पडून एक अप्रत्यक्ष तडजोड स्विकारली जाते आहे. मी शीख धर्मीय असो वा नसो त्यांच्या डोक्यावर कापड बांधून पाय धुण्याची अट पूर्ण केली कि मला त्यांच्या धर्मस्थानात जाऊन दर्शन घेता येते. मी स्त्री आहे पुरुष आहे कोणत्या वर्ण धर्म पंथाचा आहे याने सहसा फरक पडत नाही. अशाच पद्धतीने इतर धर्मीय स्थळांमध्ये कुणीही आदर पुर्वक दर्शन/प्रार्थना करू इच्छित असेल तर त्यासाठी मुभा असावयास हवी आणि त्यासाठीचे आग्रह तुम्ही नास्तीक असाल अथवा इतर धर्मीय असाल तरीही सोडू नयेत कारण तुम्ही धरत असलेला आग्रह सुसंस्कृततेसाठी आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सामाजीक समस्यांच्या संदर्भाने मी मागेही धागा काढला होता, तुम्ही धर्मस्थळात जाऊन प्रत्येक वेळी पुजा केली पाहीजे असे नाही पण एकदा तो अधिकार प्राप्त झाला की बाकी समाजात समतेच्या वागणूकीची खात्री करणे सोपे जाऊ शकते. मी आफ्रीकन ख्रिश्चन असेन तर काळ्यांच्या चर्च मध्ये जाउन तडजोड करेन पण दुसर्या समुदाया पासून तुटलेलाच राहीन ही जी सामाजीक दरी आहे ती सांधण्यासाठी म्हणून मला ऑदरवाईज रस नसला तरी गोर्यांच्या प्रत्येक चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करून येण्यास आवडेल.
अर्थात आपण लाथ वगैरे शब्द सात्वीक रागाने जरी वापरला असला तरी आदरणीय उद्देशाने न येणार्यांना नाकारण्याचा एक वेगळा अधिकार धार्मीक स्थळांना प्राप्त होऊ लागतो याने सामाजीक दरी सांधण्यास मदत होते असे वाटत नाही म्हणून असे शब्द टाळावेत किंवा कसे.
30 Nov 2015 - 10:26 pm | संदीप डांगे
आता पुरेसा वेळ हाताशी नसल्याने तुमच्या प्रतिसादाचं उत्तर नंतर देईल वा वेगळा धागा काढेन, कारण इथे दलितप्रश्नावर चर्चा करणे मूळ धाग्याशी, विषयाशी प्रतारणा होइल. पण खालील मुद्द्यावर माझं मत मांडतो.
'विशिष्ट मंदिरातच जागृत देव असतात' ही इतकी तकलादू आणि भ्रामक कल्पना भारतीय समाज कवटाळून बसला आहे की आपण एकाच बाबतीत वेगवेगळे विचारप्रवाह एकाच वेळी पाळत आहोत ते त्यांच्या लक्षात येत नाही.
१. मनुष्य देवळात जातो. कारण देवाप्रति त्याला आपली भक्ती, श्रद्धा अर्पण करायची असते, आपले दु:ख, सुख याचे कारण तोच आहे असे समजून एक मालक-पालक-मित्र-सखा म्हणून त्याच्याशी गुजगोष्टी करायच्या असतात. आपले गार्हाणे सांगायचे असते, त्यावर त्याने काहीतरी करावे अशी अपेक्षा असते. थोडक्यात मंदीर हे एका व्यक्तिचे असते. भक्त तिथे स्वतःपुरते लाभ घेण्यासाठी जातो. अखंड समाजासाठी नाही. ते राजे, सत्ताधारी वैगेरे करतात. पण व्यक्तिगत पातळीवर देव हा वैयक्तिकच असतो.
२. मंदिरात एक व्यवस्था असते, देवाची काळजी घेण्याची. त्याचे षोडशोपचार, पुजाअर्चा, आरत्या नैवेद्ये वैगेरे करणे गरजेचे असते. त्याची समाजातल्या एका व्यक्तिवर जबाबदारी टाकल्या जाते. परंपरेने वा कसेही चालत आलेले नियम, अटी हे गुरव, पुजारी, पुरोहित पाळत असतात जेणेकरुन 'देवाचे हित' जपल्या जावे. ह्यात स्त्रियांनी प्रवेश करू नये, रजस्वला स्त्रीने प्रवेश करू नये, अमूक जातीतल्या माणसाने प्रवेश करू नये असे नियम असतात. त्याची कारणे दैवी वैगेरे असतात. भारतात अशी बरीच मंदीरे आहेत जी विशिष्ट जातीची, उपजातीची आहेत. त्यांच्याशिवाय तिथे दुसर्या कोणाला प्रवेश नसतो. 'स्थानाची पवित्रता' जपणे हा उद्देश असतो. ही पवित्रता, नियम परंपरेने जसे आले तसे, थोडेसे आपल्याला सोयिस्कर ठरतील असे करत पुरोहित, गुरव पाळतात. इथे देव व पुरोहित यांचे हिताला प्राधान्य आहे, भक्तांच्या नाही. आमच्या कुलदैवतेच्या गाभार्यात पुरुषांना प्रवेश नाही, तिथे सगळे षोडशोपचार, विधी फक्त स्त्रिया करतात.
३. भारतीय मंदिरांचा इतिहास पाहू जाता. पुरातन मंदिरे व्यक्तिगत उपयोगासाठी, ध्यानपुजाअर्चेसाठी बांधलेली आहेत. गाभार्यांची रुंदी एकाच व्यक्तिला सहज बसता येईल अशी आहे. एक असाही संशय आहे की काही महत्त्वपूर्ण ज्ञान, वस्तू इथे सांभाळून ठेवलेल्या आहेत. मंदीर हे अतिशय व्यक्तिगत साधनेचे स्थळ आहे. कोणा राजाने, प्रधानाने, मंत्र्याने, सरदाराने स्वतःचे पैसे घालून एक चांगली जागा तयार केली असते. तीथे त्याने वा अजून कोणा तंत्रमंत्रात कुशल पुजार्याने पुजा करून वातावरण, जागा मंतरलेली असते. नित्य साधनेने तिथे एक जाणवेल असे वातावरण तयार होते. तिथे शांती लाभते. मग त्या जागेच्या दैवीपणाचे किस्से बाहेर पडतात. पण हे सगळे व्यक्तिगत आहे. त्यामुळे अशी व्यक्तिगत जागा कुठेही तयार करता येऊ शकते. पण ते वातावरण तयार करणे चटकन, झटपट होणारे काम नाही, त्यास कित्येक वर्षांची अखंड तपस्या लागते. अनिर्बंध हेळसांडीने ते वातावरण नाहिसे होऊ शकते. त्यामुळे अशी मंदीरे लोकांपासून सुरक्षित ठेवणे आले. त्यातून नियम बनले. पण जागृत देवस्थान म्हटले गेल्यावर जनसामान्यांना तेच पावरफुल वाटते आणि लोकांचा गार्हाणे मांडण्यासाठी तिकडेच ओढा असतो.
४. इतर धर्माच्या प्रार्थळास्थळांशी अजिबात तुलना करू नये कारण हिंदू हा व्यक्तिगत धर्म(आचरण) आहे. इतर धर्म हे सामुहिक धर्म आहेत. चर्च, गुरुद्वारा, मशीद इथे आपणास एकसमानता दिसून येईल की अनेक लोकांना एकत्र बसता येईल असा हॉल असतो. जिथे प्रार्थनास्थळ बांधतांनाच समाजाचा विचार केला गेला आहे तिथे 'कुणास मनाई करावी' हा विचारच मुलतः येणार नाही हे सरळ आहे. काळ्यांसाठी वेगळे चर्च असतील तर ते सरळ डिस्क्रिमीनेशन आहे. (आजकाल म्हणजे गेल्या वीस-तीस वर्षांतील नवीन मंदीरांच्या रचना बघितल्या तर आता समुहासाठी अशी खास मंदीरे गाव-शहरामधे चर्चच्या शैलीत बांधली जाऊ लागली आहेत. ज्यात हॉल बराच मोठा असतो, देवाची मुर्ती भींतीला टेकलेली असते, गाभार्यात पुजारी आणि दानपेटी राहील एवढीच जागा असते. देवाला स्पर्श करू शकत नाही. इथे आता एक क्रांती घडलेली आहे. या प्रकारच्या मंदिरांमधे कुणालाही प्रवेश बंदी नसते.)
५. देव चराचरात आहे, ज्याला जिथे भाव प्रकट होईल देव तिथे प्रकट होतो. म्हणून इथे-तिथे कुठेही दगडाला शेंदूर फासून अगरबत्ती लावलेली दिसून येते. मरीआई, म्हसोबा, सटवाई, आसरामाता, अशा जनसामान्यांच्या श्रद्धा स्विकारत भारतात लाखो ठिकाणी आहेत. इथे येता जाता कोणी नमस्कार करू शकतो. अगदी गायींपासून ते झाडांपर्यंत लोक दर्शनं घेत असतात. तिथं कोणालाही बंदी नसते. स्त्री, रजस्वला, दलित, कोणीही निषिद्ध नसतो. कारण तो सर्वांचा देव असतो, 'निसर्गदेव' असतो.
असे सगळे आहे तर मग लक्षात येईल की काही विशिष्ट मंदिरांमधेच प्रवेशबंदी का? पण अशी प्रवेशबंदी असलेली मंदीरे किती आहेत? असली तरी ती खाजगी मालकीची किंवा विशिष्ट जातींसाठीची आहेत. तिथे त्यांचेच नियम चालणार. या नियमांविरुद्ध अपील होऊच शकत नाहीत त्याचे कारणे कितीही मूर्ख वा अवैज्ञानिक असली तरी. ते तिथे भेट द्यायला जाणार्यांना मान्य असलीच पाहिजेत. कारण नाहीतर विसंगती निर्माण होईल. जी शशीं प्रकरणात झाली, सबरीमाला प्रकरणात झाली. तुम्ही शनिदेवाला मानता पण त्याचे नियम नाही. हे मजेशीर आहे. त्यामुळे मंदिरांमधे प्रवेशबंदीला मी समर्थन देतो. एखादा देव मी मानतो तर त्याचे सगळे नियम मला मान्य असलेच पाहिजेत. शिवपिंडीवर मी मेणबत्ती नाही लावणार किंवा चादर नाही घालणार. व्यक्तिस्वातंत्र्याच्या, सन्माननीय वागणुकीच्या नावाखाली मला हे सर्व करण्याचा अधिकार आहेच. पण तो मूर्खपणा आहे ना?
यावर उपाय काय? तर देव चराचरात आहे. प्रत्येक घरी गणपती बसतो, प्रत्येकाच्या घरच्या गणपतीत सेम देवत्व येतं. लाखो ठिकाणी शिवालयं, राममंदीरं आहेत, सगळीकडे प्राणप्रतिष्ठापना केलेले देव आहेत. मग दलितांनी, स्त्रियांनी आपल्यासाठी मंदीर बांधून घ्यावं, तिथेही तोच देव, तेच वातावरण करावं आणि सिद्ध करावं की देव ठायीठायी आहे, तुम्ही त्याला तुमच्या मंदिरात डांबुन ठेवुन मूर्खपणा करत आहात. पण असे होत नाही, झाले नाही. रजस्वला स्त्रियांना प्रवेशबंदी हा एक तांत्रिक मुद्दा बाजूला ठेवला तर दलितांना मंदिरात प्रवेश हा अनेक प्रश्नांना जन्म देणारा आहे. दलितांना मंदिरप्रवेश नाकारणे हा सरळ सरळ सामाजिक भेदभावाचा प्रश्न आहे. तो काही एका दिवसात तयार झालेला नाही. मंदिरात प्रवेश आहे म्हणून फार उचित सन्मान मिळतो असेही नाही हे देवदासींकडे, वाघ्यामुरळी, इत्यादींकडे बघुन कळते. त्यामुळे मंदिरात प्रवेश म्हणजे लगेच पाटील-ब्राहमणांच्या पंगतीत जेवायला मिळेल, त्यांच्या स्वयंपाकघरात प्रवेश मिळेल असे काही नव्हते, आणि झालेही नाही. (शहरातली उदाहरणे देऊ नये) ज्या देवाचा धर्म आपल्यासारख्या माणसाशी अमानुष वागण्याचे नियम बनवतो तो देव आपण कशाला मानावा हा विचार रुजवणे आवश्यक होते. जे आंबेडकरांनी अगदी योग्य पद्धतीने केले. जिथे आपल्याला सन्मान नाही तिथे जावेच कशाला हा साधा प्रश्न माझ्या 'लाथ' या शब्दामागे आहे. तुम्ही पाण्याचे उदाहरण दिले. तडजोडीबद्दल बोलत आहात. ज्या देशात रोटी-बेटी व्यवहार आपल्याच पोटजातीत व्हावे हा आग्रह असतो, तिथे मंदिरप्रवेशाने फार काही बदलत नाही. लोकांना आपल्याच जातीत, पोटजातीत मुली, मुलं बघावी लागतात. कितीही समकक्ष, समविचारी, जीवश्चकंठश्च मित्र असले तरी दोन वेगळ्या जातीत अरेंज मॅरेज होऊ शकत नाही हे स्वता:च्या डोळ्यांनी पाह्यलंय. इथे जी केली जाते ती अप्रत्यक्ष तडजोड नाही का? जात बंद, देव बंद, पंगत बंद अशा समाजाला 'लाथ' नाही मारायची तर का पूजा करायची काय? ह्याच सगळ्याला कंटाळून गावातील लोकांचा ओढा शहरांकडे वाढत असणे हे एक प्रकारे लाथ मारणेच आहे, तडजोड नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
बाकी माझ्या मतांशी प्रत्येकाने सहमत व्हावे असे नाहीच. तरी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.
1 Dec 2015 - 11:13 am | मृत्युन्जय
अरे बंदी आहे तर लाथ मारा च्यायला त्या देवाला..
देवाच्या नावावर चालणार्या भ्रष्ट आचारा बद्द्ल तुमची स्वत:ची काही मते असतील. तुमच्या मतस्वातंत्र्याचा आदर आहे. परंतु दुसर्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असली विधाने करणे कृपया टाळा. "सश्रद्ध लोकांनी अंगावर येउ नये" असा स्वतःच कांगावा करत तुम्ही हे असले काहितरी लिहयचे आणि आम्ही ते निमूटपणे वाचुन घ्यायचे ही अपेक्षा चुकीची आहे. यापुढे आपल्याला जे काही समाज प्रबोधन करायचे आहे ते योग्य शब्दात, योग्य भाषेत आणि योग्य प्रकारे कराल अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद.
1 Dec 2015 - 11:53 am | संदीप डांगे
मागचे पुढचे काही न वाचता एक शब्द उचलून कुणाच्या धार्मिक भावना दुखावत असतील सर्वस्वी अशक्य आहे. प्रतिसादात स्पष्ट लिहलंय की "जो देव तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या देवाला लाथ मारा."
ज्यांना त्यांचा देव हे सगळे करतो (म्हणजे जवळ करतो, दु:ख दुर करून सुख-सन्मान-शांती देतो) अशी खात्री-विश्वास-श्रद्धा आहे त्यांच्या भावना दुखावणारं हे विधान आहे असं कसं काय ठरवलं जातंय? हे म्हणजे असं झालंय की मी म्हटलं, 'दारू पिणार्यांना चाबकाने फोडून काढलं पाहिजे' त्यावर 'दुध' पिणार्यांनी आक्षेप नोंदवावा का तर तिथे 'पिणार्यां'चा उल्लेख केला म्हणून.
कुठल्याही विशिष्ट देवाचे नाव न घेता विधान केलं आहे, त्यात अशा देवाचं वर्णन आहे जो 'देव' ह्या सश्रद्धांच्या संकल्पनेत बसत नाही. मग त्यांच्या धार्मिक भावना का दुखावतात? शंकराला शिवी दिली तर मुस्लिम रागावतील काय? अल्लाहला शिवी दिली तर हिंदु रागावतील काय? जिजसला शिवी दिली तर जैनांना राग येईल काय?
माझं विधान धार्मिक भावना दुखावणारं कसं आहे ते पटवून दिलंत तर तुमच्या अपेक्षेबद्दल विचार करता येईल. अन्यथा समाजप्रबोधनास आपला विरोध आहे असे समजावे लागेल.
1 Dec 2015 - 11:55 am | संदीप डांगे
हे वाक्य असे वाचावे: मागचे पुढचे काही न वाचता एक शब्द उचलून कुणाच्या धार्मिक भावना दुखावत असतील तर सर्वस्वी अशक्य आहे.
1 Dec 2015 - 12:42 pm | सुबोध खरे
"जो देव तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या देवाला लाथ मारा."
डांगे साहेब हेच विधान जर आपण असे वाचले तर?
"जो "बाप" तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या "बापाला" लाथ मारा."
असे पटेल काय? आपण नास्तिक असाल पण शेवटी प्रत्येक माणसाची एक श्रद्धा असते( ती असणे बरोबर कि चूक हा एक वेगळा मुद्दा असू शकतो) त्याला आपण इतक्या सहज ठोकर मारता हे पटले नाही.
1 Dec 2015 - 1:22 pm | संदीप डांगे
डॉक्टरसाहेब,
जो "देश/समाज/धर्म" तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या "देश/समाज/धर्माला" लाथ मारा. असंही वाचून बघा. मला नक्की काय म्हणायचे ते लक्षात येईल अशी अपेक्षा आहे.
1 Dec 2015 - 1:24 pm | pacificready
देखिये आपने देव को लाथ मारो बोला ना?
हां या ना में जवाब दे!
1 Dec 2015 - 1:26 pm | संदीप डांगे
सॉरी शक्तिमान, अब हम ऐसा गलती दुबारा नही करेंगे. आगेसे यादमें रखेंगे.
1 Dec 2015 - 12:49 pm | मृत्युन्जय
आपल्याकडून अश्याच आक्रस्ताळ्या प्रतिसादाची अपेक्षा होती. तुम्ही तुमची वाक्य नीट वाचत नाही किंवा तुम्ही काय लिहिता ते तुमचे तुम्हाला कळत नाही. किंवा कदाचित मुद्दाम वाद निर्माण करण्यासाठी तुम्ही असले वाचाळ प्रतिसाद देता. पहिली गोष्ट म्हणजे तुमची दोन्ही वाक्ये वेगळी आहेत. ती एकत्र करुन लिहिली असतीत तर कदाचित वरचा प्रतिसाद तरी ग्राह्य धरला असता.
दुसरी गोष्ट म्हणजे "लाथ मारा देवाला" हे पुर्णपणे अमान्य, अग्राह्य, अस्थायी आहे. तुम्हाला तुमच्या देवाबद्दलच्या भावना योग्य शब्दात मांडण्याचा पुर्ण अधिकार आहे. पण देवाला लाथा मारा, त्याच्यावर थुंका, मुता (उरलेले दोन शब्द तुम्ही लिहिलेले नाहित. ते उदाहारणार्थ दिले आहेत) असली अग्राह्य भाषा ही मुळात एखाद्याच्या श्रद्धेबद्दल असलेली कमालीची असहिष्णुता दर्शवते. तुम्हाला तुमचा नास्तिकपणा गोंजारत बसण्याचा पुर्ण अधिकार आहे. मात्र हे करताना आस्तिकांच्या भावनेविषयी अनादर दाखवणे हे हीनपणाचे लक्षण आहे.
चूक स्पष्टपणे दाखवल्यावर ती मान्य करुन दुरुस्त करण्यापेक्ष दुरुत्तरे करणे, वाद घालणे, आक्रस्ताळेपणा करणे हाच जर तुम्ही तुमचा युएसपी करु इच्छित असाल तर नाईलाज आहे. योग्य त्या भाषेत सर्वांनाच उत्तरे देता येतील. मात्र हे करताना "देवाला लाथा घाला" असली दळभद्री भाषा वापरणे किंबहुना कुणाच्याही भावना दुखावण्यासाठी उगाच काड्या सारण्यासाठी असंस्कृत भाषा वापरणे आमच्या संस्कृतीत बसत नाही. त्यामुळे प्रतिवाद करताना थोड्या मर्यादा जरुर येतील पण मलातरी पातळी सोडुन बोलणे शक्य होणार नाही.
कुठल्याही विशिष्ट देवाचे नाव न घेता विधान केलं आहे, त्यात अशा देवाचं वर्णन आहे जो 'देव' ह्या सश्रद्धांच्या संकल्पनेत बसत नाही. मग त्यांच्या धार्मिक भावना का दुखावतात? शंकराला शिवी दिली तर मुस्लिम रागावतील काय? अल्लाहला शिवी दिली तर हिंदु रागावतील काय? जिजसला शिवी दिली तर जैनांना राग येईल काय? माझं विधान धार्मिक भावना दुखावणारं कसं आहे ते पटवून दिलंत तर तुमच्या अपेक्षेबद्दल विचार करता येईल. अन्यथा समाजप्रबोधनास आपला विरोध आहे असे समजावे लागेल.
तुम्ही कुठल्याही विशिष्ट धर्माचे नाव घेतले नाही म्हणुभाते धार्मिक भावना न दुखावणारे विधान आहे हा तर्क अजब आहे. देव ही वैश्विक संकल्पना आहे. किंबहुना जगातल्या ९९% धर्मांचा गाभा देव हाच असेल. देवाला कुठल्या स्वरुपात पहायचे याबद्दलचे प्रत्येक धर्माचे निकष वेगळे असु शकतील. पण म्हणुन देव ही संरचना नाकारता येतच नाही. एखाद्या अज्ञेयवाद्यासाठी देवाचे अस्तित्व नसणे हा समज योग्य असु शकतो पण जगाच्या पाठीवरील बहुसंख्य धर्मात देवाचे अतित्व मान्यच आहे. तुम्ही या संरचनेला उद्देशुनच "लाथा घाला" असे म्हटले आहे. इथे ते हिंदुंच्या देवासाठी म्हटले किंवा मुसलमानांच्या देवासाठी म्हटले हा मुद्दा पुर्णतः गैरलागू आहे. किंबहुना मुस्लिमांच्या देवासाठी बोललात तर धार्मिक भावना दुखावणार नाहित आणी हिंदुंच्या देवाबद्दल बोललात तर दुखावतील असेही काही नाही. वाटल्यास "मुस्लिमांचा देव" असे स्पष्टपणे लिहुन मग त्याला "लाथा घाला" असे वक्तव्य खुषाल करुन पहा. मला ते ही आवडणार नाही. पण तुम्हाला प्रयोग करुन बघायचा असेल तर करा की.
अन्यथा समाजप्रबोधनास आपला विरोध आहे असे समजावे लागेल.
गंमतच आहे. कश्यावरुन काहिही अर्थ काढायचा म्हणजे हद्द झाली. उद्या तुम्ही म्हणाल की माझ्या वरील विधानावरुन माझा स्त्रीशिक्षणाला विरोध आहे असे समजावे लागेल. आता असल्या फालतु तर्कांना मी कं क्रवे ब्रं? ज्याची त्याची जाण समज वगैरे वग्रै.
1 Dec 2015 - 1:18 pm | संदीप डांगे
पण देवाला लाथा मारा, त्याच्यावर थुंका, मुता (उरलेले दोन शब्द तुम्ही लिहिलेले नाहित. ते उदाहारणार्थ दिले आहेत)
हे अतिशय चिंताजनक आहे. आपण एखादं विधान कुठल्या बाजूने झुकणारं आहे हे स्वतःच ठरवून मो़कळे होता हे आधी मंत्रीमंडळाच्या विधानाबद्दल जे झालं तिथेच लक्षात आलं. इथेही तेच. ज्या वाक्याचा साधा अर्थ देवाला बंदिस्त करणार्या व्यवस्थेला नाकारा इतकाच अभिप्रेत आहे. 'लाथ घाला' म्हणजे तिथे जाऊन प्रत्यक्ष मुर्तीवर लाथ घाला असेच म्हटले असे तुम्ही कशावरून ठरवले? त्या विधानाला दुसर्या बाजूने ढकलत नेऊन 'थुंका-मुता' इथपर्यंत घेऊन जाणे, वरून मला असंच म्हणायचे होतं असे अर्थ काढणे म्हणजे वा! तुमची 'देव ह्या संकल्पनेला विरोध करणार्यांबद्दलची' स्वतःची मते माझ्यावर लादू नये अशी प्रांजळ प्रार्थना.
कश्यावरुन काहिही अर्थ काढायचा म्हणजे हद्द झाली
हेच तुम्हाला आणि इतरांना ज्यांनी माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला त्यासाठी म्हणावेसे वाटते.
माझे इतर धाग्यांवरचे ह्याच विषयाशी संबंधीत प्रतिसाद आपण वाचलेले नाहीत असे दिसते. तसेच माहितगार यांना जो प्रतिसाद दिला व त्याचे शेवटचे वाक्य उतावीळपणाच्या भरात आपण वाचलेले नाही असेही दिसते. अन्यथा आपण असा प्रतिसाद टाकलाच नसता.
बाकी कोणत्या प्रॉडक्टचा युएसपी काय असावा हे कंझ्युमरच्या पर्सेप्शननुसार ठरते हे आपणास मी काय सांगावे.
धन्यवाद!
1 Dec 2015 - 2:42 pm | मृत्युन्जय
हे अतिशय चिंताजनक आहे. आपण एखादं विधान कुठल्या बाजूने झुकणारं आहे हे स्वतःच ठरवून मो़कळे होता हे आधी मंत्रीमंडळाच्या विधानाबद्दल जे झालं तिथेच लक्षात आलं. इथेही तेच.
तुम्ही काय लिहिता ते तुमचे तुम्हालाच कळत नाही वगैर वगैरे जे मी वरती लिहिले आहे. त्याचा संदरभ मंत्रिमंडळाचा धागच होता. तिथेही तुम्ही चुकीचे लिहुन माती खाल्ली आणि मग सारवासारव केली. इथेही तेच करत आहात. तुम्ही चुकीच्या प्रकारे लिहिता म्हणुन आम्हाला कळफलक बडवावा लागतो.
ज्या वाक्याचा साधा अर्थ देवाला बंदिस्त करणार्या व्यवस्थेला नाकारा इतकाच अभिप्रेत आहे. 'लाथ घाला' म्हणजे तिथे जाऊन प्रत्यक्ष मुर्तीवर लाथ घाला असेच म्हटले असे तुम्ही कशावरून ठरवले?
तुम्ही जे लिहिले आहे तेच मी उद्ध्रूत करतो आहे. तुम्ही स्पष्ट शब्दात "अरे बंदी आहे तर लाथ मारा च्यायला त्या देवाला.." असे लिहिले आहे. इथे "लाथा मारा" आणि "च्यामायला त्या" या दोन्ही शब्दसमूहांना माझा आक्षेप आहे. आणि तुम्ही जे लिहिले आहे तेच मी परत टंकले आहे. तुम्ही स्पष्ट लिहित जा म्हणजे नंतर असली सारवासारव करावी लागणार नाही. तुम्ही चुकीचे लिहित आहात आणि वर कांगावा करत आहात. हे पहिल्यांदा होते आहे असे नाही. पण इतर वेळेस तो मनुष्यस्वभाव म्हणुन सोडुन देता येइल. इथे धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये जाणुनबुजुन करुन तुम्ही वातावरण दूषित करत आहात.
त्या विधानाला दुसर्या बाजूने ढकलत नेऊन 'थुंका-मुता' इथपर्यंत घेऊन जाणे, वरून मला असंच म्हणायचे होतं असे अर्थ काढणे म्हणजे वा!
बघा. तुम्हीच किती आक्रस्ताळेपणा करत आहात. मी तिथे स्पष्टपणे लिहिले आहे की तुम्ही 'थुंका-मुता' लिहिलेले नाही. लाथा घाला हे काही फार वेगळे वक्तव्य आहे असे नाही. बाकी मी अर्थ काहिच काढलेला नाही,. तुम्ही स्पष्टपणे लिहिलेले आहे. "तु गाढव आहेस. कुत्रा आहेस तु" असे लिहायचे आणि वर तोंड करुन म्हणायचे की "तु गाढवासारखा कष्टाळु आणि कुत्र्यासारखा प्रामाणिक आहेस असे मला म्हणायचे होते. तु चुकीचा अर्थ काढतोस" तर ती निव्वळ सारवासारव झाली. इथे स्पष्ट शब्दात "लाथ मारा च्यायला त्या देवाला.." असे लिहिले आहे तुम्ही. अर्थ काढायला पण वाव नाही ठेवलेला.
तुमची 'देव ह्या संकल्पनेला विरोध करणार्यांबद्दलची' स्वतःची मते माझ्यावर लादू नये अशी प्रांजळ प्रार्थना.
मी कुठलीही मते लादत नाही आहे. तुम्ही ओझे वाहत चालला आहात त्याला मी काय करणार?
कश्यावरुन काहिही अर्थ काढायचा म्हणजे हद्द झाली
काहीही बोलण्याची हद्द तर तुम्ही केली आहे.
माझे इतर धाग्यांवरचे ह्याच विषयाशी संबंधीत प्रतिसाद आपण वाचलेले नाहीत असे दिसते. तसेच माहितगार यांना जो प्रतिसाद दिला व त्याचे शेवटचे वाक्य उतावीळपणाच्या भरात आपण वाचलेले नाही असेही दिसते. अन्यथा आपण असा प्रतिसाद टाकलाच नसता.
स्वतः उतावीळपणे बेताल वक्तव्ये करायची आणी मग चोर तो चोर वर शिरजोर या न्यायाने तोंड वर करुन बोलायचे ही सवय आपली असावी. आमची नाही.
बाकी कोणत्या प्रॉडक्टचा युएसपी काय असावा हे कंझ्युमरच्या पर्सेप्शननुसार ठरते हे आपणास मी काय सांगावे.
प्रॉडक्टचा युएसपी प्रॉडक्टवरच ठरतो. त्यातले इंप्रोव्हायझेशन कंझ्युमरच्या पर्सेप्शननुसार होते.
1 Dec 2015 - 3:05 pm | संदीप डांगे
तुम्हाला हिस्टरी चॅनलवरचा हा माणूस आठवतो काय? अगदी असंच बोलतो.
1 Dec 2015 - 7:50 pm | मृत्युन्जय
नाय ब्वो. आम्हाला काही असला कोणी माहिती नाही. पण वरचा तो फोटो बघुन कळाले की तुम्ही फक्त चुकीचे लिहितच नाही तर चुकीचे अर्थ पण काढता.
तुम्ही जरा मराठी भाषा समजुन उमजुन लिहित चला बरे म्हणजे तुमच्याच डोक्यात गोंधळ कमी उडेल.
30 Nov 2015 - 6:41 pm | प्रसाद गोडबोले
मिपावर अचानक सहिष्णुता वाढीला लागलेली दिसत आहे !
30 Nov 2015 - 7:03 pm | नूतन सावंत
यावरून इंदिरा गांधीन पंतप्रधान असतानाही तिरुपती मंदिरात जाण्यास विरोध झाला होता त्याची आठवण झाली.तेव्हा इंदिरा गांधी मंदिरात न जाता परत गेल्या होत्या त्याची आठवण झाली.
30 Nov 2015 - 7:45 pm | बोका-ए-आझम
केरळातील गुरुवायूर येथील प्रसिद्ध अय्यप्पा मंदिरात हा विरोध झाला होता. त्याचं कारण ते कार्तिकेयाचं (जो अखंड ब्रम्हचारी समजला जातो) मंदीर आहे असं सांगण्यात आलं होतं. तिरुपती मंदिरात असं काही असल्याचं पाहण्यात किंवा ऐकण्यात आलेलं नाही. चूभूद्याघ्या.
1 Dec 2015 - 10:17 am | राही
मला वाटते उडीशातल्या जगन्नाथ मंदिरात(ही) असा विरोध झाला होता. त्यांच्या हत्येआधी एक दोन दिवस. इंदिरा गांधींचे शेवटचे जाहीर भाषण या उडीशा दौर्यातले होते आणि 'माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून भारताला संजीवन मिळेल' या अर्थाच्या शब्दांमुळे कायम स्मरणात राहाण्याजोगे झाले आहे.
1 Dec 2015 - 10:19 am | राही
लिंक https://www.youtube.com/watch?v=56_rFuGh8aQ
30 Nov 2015 - 7:11 pm | आदिजोशी
पहिल्या ओळी वाचून डायरेक्ट प्रतिसाद दिला लेख न वाचता. चीयर्स!!!
30 Nov 2015 - 8:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून एक गोष्ट दैनिकात वाचण्यात आली की भारतातील शंभर टक्के साक्षर म्हणुन मिरवणार्या केरळ राज्यातील घटना. आपण अजूनही मानसिकरित्या कसे विकलांग आहोत हे दर्शविणारी ही घटना. केरळमधील पठाणमधिटा जिल्ह्यात असणार्या सबरीमला मंदिराचे विश्वस्त यांनी एका मशीनची मागणी केली आहे. हे स्कॅनिंग मशीन मंदिराच्या सुरक्षेसाठी असेल असे वाटले परंतु तसे ते नाही. तर या मशीनद्वारे महिलांची पवित्रता सिद्ध केली जाणार आहे. मंदिर विश्वस्तांना असे वाटते की मासिक धर्माच्या काळात स्त्रीया अस्वच्छ आणि अपवित्र असतात. आता स्कॅनिंग करणारं मशिन मासिक धर्म असणार्या स्त्रीया ओळखणार आहे. आणि अशा ओळखलेल्या गेलेल्या महिलांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. कारण अशा विटाळलेल्या महिलांमुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात येण्याची शक्यता वाटते. जी गोष्ट नैसर्गिक आहे त्यामुळे देवालाही विटाळ होतो ? स्त्रीयांनी या गोष्टीला विरोध म्हणुन हॅपी टू ब्लीड ही चळवळ सुरु केलीच आहे.
आपण ब्वॉ ही गोष्ट सबरीमला देवावर आणि शनिमहाराजावर सोडून दिली आहे.
-दिलीप बिरुटे
30 Nov 2015 - 10:39 pm | सतिश गावडे
दुर्दैव... मंदिरातील देवाचं आणि त्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ इच्छिणार्या स्त्रीयांचं.
30 Nov 2015 - 11:09 pm | pacificready
विश्वस्तांचा निषेध. बुद्धीची कीव कराविशी वाटते.
देवस्थान सुधारा भगव्यान्नो आधी.
30 Nov 2015 - 11:51 pm | प्रसाद गोडबोले
करेक्ट !
पुरोगामी विचारांच्या लोकांनी ह्यॅप्पी टु ब्लीड वगैरे आंदोलने करत बसण्यापेक्षा असल्या दगडाच्या देवावर आणि संस्थानांवर बहिष्कार टाकावा . ह्याचे दुहेरी फायदे आहेत पुढील प्रमाणे
१) पुरोगामी लोकांन्ना पुरोगामित्वाचा आनंद आणि समाधान मिळेल.
२) परंपरावादी लोकांन्ना मंदीरात गर्दी कमी झाल्याचा अन निवांतपणे दर्शन घेता आल्याचा आनंद मिळेल.
आणि एकच की परंपरावादी लोकांनी स्वतःच्या हुच्चतेची जाहिरात करु नये अन पुरोगामी लोकांनी त्यांन्ना चणे फेकुन मारु नयेत , बस्स इतकेच जमले तर सर्वेत्र सुखिनो सन्तु: हे साध्य होईल !!
:)
30 Nov 2015 - 11:25 pm | गामा पैलवान
च्यायला, स्त्रीपुरुष समानतेचे उमाळे दाटल्यावर संबंधितांना हिंदूंची मंदिरेच बरी आठवतात! एव्हढाच जर पुळका आला असेल तर स्वत:च्या शरीरापासून सुरुवात करावी म्हणतो मी. कोणी अडवलंय!
-गा.पै.
1 Dec 2015 - 10:48 am | माहितगार
आपण धागालेख नीट वाचला आहेत का ? स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करताना हा धागालेख कोणत्याही एकाच विशीष्ट धर्माला लक्ष्य बनवत नाही हे लेखाच्या शेवटी स्पष्ट नमूद केले आहे, अशा स्वरूपाच्या असमानता राखणार्या सर्वच धर्मसंस्थांच्या प्रबोधनाचे आवाहन या धागालेखातून आवाहन केले आहे. शनि शिंगणापूर हे केवळ चर्चा सुरवातीसाठी निमीत्तमात्र आहे. केवळ शनि शिंगणापूरला लक्ष्य बनवायचे असते तर धागा लेखाचे शीर्षक तसे लिहिले असते, ध्रर्मसंस्था आणि धर्मस्थळे संबंधाने पक्षपात टाळण्याचा अधिकतम प्रयास केला आहे.
गा.पै. आपल्या या वाक्याचा नेमका अर्थ लक्षात आला नाही अर्थ काय होतो ते कृपया स्पष्ट कराल काय ? म्हणजे इतरांना चर्चा करता येईल
1 Dec 2015 - 7:59 pm | गामा पैलवान
माहितगार,
माझं म्हणणं अधिक व्यवस्थित शब्दांत मांडता आलं असतं. ते न केल्यामुळे तुमची आणि वाचकांची क्षमा मागतो.
१.
बरोबर आहे. जे लोकं मंदिरांतल्या विविध प्रथांना स्त्रीपुरुष भेदभावाचा रंग देऊ इच्छितात त्यांच्यासाठी माझा प्रतिसाद आहे. धागाकर्त्यासाठी नाही.
२.
जिथेतिथे स्त्रीपुरुष समानता बघायची ज्यांना हौस आहे त्यांनी स्वत:च्या शरीराकडे बघायला शिकावं. आपलं शरीर आणि मन हेच मुळी स्त्रीपुरुष भेदभावावर आधारलेलं आहे. उगाच मंदिरबिंदिर अशा बाह्य ठिकाणी समानता पैदा करण्याऐवजी स्वत:च्या शरीरापासून सुरुवात करावी.
आ.न.,
-गा.पै.
30 Nov 2015 - 11:36 pm | एस
'देव दानवां नरे निर्मिले' आणि त्यांचे नियमही. देव जर असलाच तर त्याच्यापाशी कसला भेदभाव असूच कसा शकेल? शनिशिंगणापूरच्या गावकर्यांनी शनिदेवाला दुधा-तेलाचा अभिषेक घालून स्वतःच्या कोतेपणाचे दर्शन घडवले आहे. देवाला विटाळ घडविणारीही माणसेच. आणि देवाचे शुद्धीकरण करणारीही माणसेच! अजब आहे सगळे...
30 Nov 2015 - 11:44 pm | संदीप डांगे
+१०००
1 Dec 2015 - 12:02 am | अत्रुप्त आत्मा
सर्वच प्रस्थापित धर्मांमधे एक अनुस्यूत घटक म्हणून हा दुजा-भाव पहिल्या पासून आहे....ज्याना बदलायच आहे त्यानी बिनदिक्कत बदलाव.. धर्म आपोआप बदलेल..ज्याना जाणीव पूर्वक मागास रहायच असेल,त्यांना राहु द्यावे. ते आपोआप गाळात जातील.
दुसरे धर्म बदलत नाहीत,मग आम्ही तरी का बदलाव? अस म्हणणाय्राना तर बदलाची इच्छा असलेल्यानी
मुद्दाम स्वत: बदलून त्याची ताकद कमी करावी. जोपर्यंत इथे लोकशाही आहे , तो पर्यंत हे सहज शक्य आहे
1 Dec 2015 - 12:26 am | प्रसाद गोडबोले
चला ह्या निमित्ताने एक सत्यनारायण घालुयात =))))
1 Dec 2015 - 9:06 am | अत्रुप्त आत्मा
तुम्हाला दुसर काही जमेल तरी का?
1 Dec 2015 - 1:42 pm | प्रसाद गोडबोले
हो , व्यक्तिगत पातळीवर सत्यनारायणासारखी सरळ सरळ लुबाडणुक करणारी पुजा अन अन्य कर्मकांडे संपुर्णपणे बंद करणे आम्हाला जमले आहे :)
1 Dec 2015 - 3:47 pm | बॅटमॅन
च्यायला या प्रतिसादातही यमक साधलेच का शेवटी ? =))
1 Dec 2015 - 11:45 am | माहितगार
@ अत्रुप्त एक चांगाला प्रतिसाद, असा प्रतिसाद देण्यासाठी धारीष्ट्य लागते.
बाकी प्रगोंंच्या प्रतिसादाबाबत; सत्यनारायण कथेत कुठे दुजाभाव असण्याबद्दल अजून एकदा अभ्यासावी लागेल पण तरीही -सत्यनारायण कथेतील काही विश्वास तुर्तास बाजूस ठेवले तर- सत्यनारायण सर्वांचा समान सहभाग वाढवण्यास उपयूक्त आहे का त्या बाबत त्यात भेदभाव कमी असावा अंदाजा आहे जाणकारांनी प्रकाश टाकावा.
1 Dec 2015 - 3:30 am | कंजूस
संदीप डांगे आणि अत्रुप्त +१००
1 Dec 2015 - 6:11 am | कवितानागेश
तत्त्वज्ञानाबद्दल काही सापडले नाही!
1 Dec 2015 - 9:50 am | संदीप डांगे
धागालेखकांनी एकाच धाग्यात दोन वेगवेगळे मुद्दे मांडलेत. मला तरी दोन्हींची सांगड कशी घालावी हे कळले नाही. माझ्यामते 'समानतेचे तत्त्व' पुरुषवर्गाला समजावून सांगण्यात स्त्रिया कमी पडतात असे त्यांना म्हणायचे आहे. आता समानतेचे तत्त्व न पाळणार्यांमधे स्त्रि-पुरूष असा काही भेद दिसून येत नाही. त्यामुळे तो मुद्दा रद्दबातल होतो.
बहुतेक 'पुरूषांसोबत अर्ग्युमेंट मधे स्त्रिया कमी पडतात' असे त्यांना म्हणायचे आहे काय असा मला प्रश्न पडला कारण मग हा जरा गंमतीदार विषय होइल.
शिर्षक वादग्रस्त असावे याचसाठी केला होता अट्टाहास असे वाटत आहे. धागालेखकांनी यावर अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.
1 Dec 2015 - 11:05 am | माहितगार
=)) अहो काहीही काय ? =)) एनीवे हा विषय या धागा लेखाच्या परिघातला नाही.
बाकी धागा लेखाचा मुद्दा क्रमांक १ तुर्तास चर्चेसाठी पुरेशी हिंट देणारा आहे असे वाटते. अधिक स्पष्टीकरण म्हणजे प्रश्नही मीच विचारला उत्तरही मीच दिले होईल म्हणून चर्चा बरिच पुढे गेल्यावर अथवा संपताना देईन.
1 Dec 2015 - 9:58 am | नीलमोहर
" शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त
करण्यासाठी केली आहे."
मोठ्या अपेक्षेने धागा उघडला होता या विषयी काही उपयुक्त माहिती मिळेल म्हणून,
पण हे 'उल्लू बनाया बडा मजा आया' असं झालं आहे.
बाकी जिथे आपलं स्वागत आहे तिथे जावं, जिथे नाही त्याचा विचारही करू नये असं आमचं तत्व.
आमच्या आवडत्या तळ्यातल्या गणपतीचे दरवाजे सर्वांसाठी खुले असतात, तिथे जाऊन डोकं टेकून यायचं.
दर्शनासाठी न येता कचरा करायला येणार्या बुरखेधारी भक्तांना नो एंट्री, असा फलक न लावलेलं सहिष्णू
देवस्थान आहे ते.
1 Dec 2015 - 11:04 am | गॅरी ट्रुमन
स्त्रियांना किंवा अन्य कोणालाही मंदिर प्रवेशापासून रोखणे अयोग्य आहे याविषयी फारसे दुमत नसावे. पण मंदिरात जाऊन काय होते, सगळी मंदिरे बंदच करा वगैरे विचार असणारे लोक हमरीतुमरीवर येऊन चर्चा करताना दिसले की जरा मजाच वाटते.
समजा माझे असे मत आहे की दारूचे गुत्ते बंद करून टाकावेत आणि कुठल्या दारूच्या गुत्त्याने "ट्रुमन अडनावाच्या लोकांना प्रवेश नाही" अशा स्वरूपाची पाटी लावली तर त्यामुळे मला काय शष्प फरक पडणार आहे? अन्यथाही मी तिथे जाणार नव्हतोच त्यामुळे बंदी असली काय आणि नसली काय--- हू केअर्स?
मंदिरांविरोधात असे मत नसणार्या इतर सर्वांचे आक्षेप मात्र नक्कीच ग्राह्य आहेत असे मला वाटते.
1 Dec 2015 - 11:33 am | संदीप डांगे
इथे 'स्त्रियांना प्रवेशबंदी हे स्पष्ट भेदभावाचे निदर्शक आहे' हा चुकीचा ग्रह काहिजणांनी करून घेतला आहे असे दिसून येते आहे. त्यामुळे लगेच सामाजिक न्यायतत्त्वानुसार सर्वांना समान हक्क, दर्जा ह्याची भलामण करून सर्वांना मंदिरप्रवेशाचा आग्रह धरला जात आहे. पण हे इतके सरळ, साधे सोपे आहे काय?
खरा मुद्दा साधनशुचितेचा आहे. वर काहींनी कपड्यांचे उदाहरण दिले आहे. कुणी बिकिनी घालून मंदिरप्रवेश केलेला चालेल काय? पुरुषांनी भले अंतर्वस्त्रांवर ओलेते गेले तर चालते, पण स्त्रियांनी तसेच करावे असा आग्रह धरून चालेल काय? तिथे समानतेचा आग्रह केला तर मान्य होईल काय? चपला, बूट घालून गेलेले चालेल काय?
गुत्त्यात जायचेच नसेल तर प्रश्नच मिटतो पण ट्रुमन यांना गुत्त्यात जायची इच्छा आहे पण वय २१ पेक्षा कमी असल्याने प्रवेश नाकारला जाईल, त्यावेळी सामाजिक समानतेचा मुद्दा का लागू होत नाही हे सांगता आले तर बर्याच बाबी स्पष्ट होण्यास मदत होईल. तीच गोष्ट संवैधानिक पदांवरील व्यक्तिच्या वयाच्या अटीची, सरकारी नोकरीच्या पदावरील शैक्षणिक अर्हतेच्या अटीची. प्रत्येक जागी सरसकट प्रवेश नाकारणारे इतर मुद्दे असतात. तिथे भेदभाव होतो असे कसे म्हणता येईल?
1 Dec 2015 - 12:08 pm | बॅटमॅन
या निमित्ताने उहापोह होतो आहे ही चांगलीच गोष्ट आहे. खुद्द कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळाच्या गाभार्यात महिलांना प्रवेश नव्हता अगोदर, पाळी ऑर नॉन पाळी. तो ब्यान उठल्याचे कळते, तसेच इथेही होईल मोस्टली होपफुली.
1 Dec 2015 - 12:35 pm | संदीप डांगे
शनि मंदिरात स्त्रियांना प्रवेशबंदीचे कारण कळल्यास ह्या विषयावर अजून विस्तृत व समर्पक चर्चेस मदत होईल म्हणून सामान्य जनमानसात रूढ असलेल्या काही मान्यता:
स्त्रियांच्या शनिमंदिर प्रवेशाला खरा कारणीभूत आहे तो मारूतीराया. कसा? तर मारुतीराया, हनुमान हा आजन्म ब्रह्मचारी आहे, शिवाय तो चिरंजीव आहे, परत तो सर्वव्यापी-विशाल आहे. 'हनुमानतत्त्व' असं काही मानल्या जातं. समर्थांनी महाराष्ट्रात शेकडो ठिकाणी, गावोगावी मारुतीची प्रतिष्ठापना केली. गावात बलोपसाना व्हावी, त्यातून भक्ती आणि शक्तीची उपासना होऊन चांगले तरूण तयार व्हावे अशी त्यांची योजना. दुसरी मान्यता अशी की गावात मारुतीचे मंदीर असेल तर भूत-प्रेत-पिशाच्च यापासून गावाचे रक्षण होते. तीसरी मान्यता अशी की हनुमान हा जागृत देव आहे. म्हणजे त्याचे आवाहन केले तर तो खरंच त्या ठिकाणी येऊन भक्तांच्या समस्या दूर करतो. तो असे करु शकतो ही मान्यता इतकी घट्ट आहे कारण तो अजून जीवंत आहे, त्याला वेगवेगळे आकार, अवस्था घेता येतात ही मान्यता. त्यामुळे शक्यतो हनुमानमंदिरात गांभिर्य जास्त असते. तो इथेच आसपास आहे, आपण काही उलट सुलट केले तर कानफाटवेल अशीही भीती असते.
चौथी मान्यता अशी की हनुमान वीर्यतेजाने संपृक्त आहे. त्याच्या नुसत्या उच्छवासाने वा अवतीभवतीच्या वातावरणाने स्त्रिया गर्भवती राहू शकतात. इतके त्याचे वीर्यतेज बलवान आहे. आता आपल्या लक्षात येईल की याचमुळे कुमारी मुलींना हनुमानमंदिरात बंदी असायची. (असायची असे म्हटले आहे कारण गेल्या १०-१५ वर्षात विचारधारा बदलत गेल्या). अघोरीसदृश्य तंत्रविद्येत मूल न होऊ शकणार्या स्त्रीने अनावृत्त अवस्थेत जाऊन मध्यरात्री हनुमानाची विशिष्ट तंत्राने पूजा करून हनुमानत्त्व जागृत करून त्यास प्रसन्न करणे व गर्भवती होण्याची इच्छा पूर्ण करणे असेही विधी आहेत. ह्याचे एक उदाहरण मी स्वतःच्या डोळ्याने पाहिले आहे. म्हणजे मध्यरात्री स्त्री हनुमान मंदिराकडे जातांना पाहिली आहे. ते सर्व दृश्य पार टरकवणारे असते, त्यामुळे पुढे काही बघायची हिंमत झाली नाही. तेव्हा माझे वयही १५-१६ होते.
हेच वीर्यतेज नव्याने गृहस्थाश्रमात प्रवेश करणार्या नवरदेवाच्या अंगात संचारावे म्हणून लग्नाआधी नवरदेवाला हनुमानमंदिरात दर्शनाला घेऊन जाण्याची प्रथा आहे. आजकाल मानवी अहंकार वाढल्याने ह्या प्रथेचे कारण विचित्रपणे बदलल्याचेही काही ठिकाणी दिसून येते. म्हणजे स्वतःमधे काहीच कमतरता नाही हे दाखवण्यासाठी त्याच्या विर्यतेजाची मला गरज नाही असे म्हणून त्याचे लग्न झाले नाही त्या बिचार्या ब्रह्मचार्याचा आशिर्वाद चांगला असेल म्हणून दर्शनाला आलो असं काहीसे.
एवढं सगळं लक्षात घेतलं तर स्त्रियांनी हनुमानापासून दूर राहावे यामागचे कारण समजुन येईल. आता शनीमहाराजांनी काय घोडं मारलं? तर कुठल्याशा पुराणकथेनुसार शनीमहाराज हे हनुमानाचे अंकित आहेत, साडेसातीत त्रास कमी व्हावा म्हणून शनीसोबतच हनुमानाचीही उपासना करावी म्हणजे हनुमानजी शनीला तंबी देऊन आपल्या भक्ताचे त्रास कमी करून देतात. हनुमानजी आणि शनी हे एकसारखेच मानले जाऊ लागले. ३०-४० वर्षांआधी शनीमंदीर हे काही फार प्रस्थ नव्हते. एखाद्या गावात एखादे दुर्लक्षलेले शनीमंदीर असायचे. आता ते दुर्लक्षलेले नाही हा भाग वेगळा. पण हनुमानमंदिरापेक्षा शनीमंदिरास कमी महत्त्व होते, जे लोक साडेसातीने त्रस्त आहेत तेच तिथे पुजेला जात. पण तिथे गेल्यावरही हनुमानाचेच नियम लावत. परत शनीमहाराजांची कडक असल्याबद्दलची ख्याती. ह्यामुळे स्त्रियांना प्रवेश नाकारणे घडत आले आहे. ह्यात कुठेही भेदभाव, असमानता वैगेरे नाही. अनेक ठिकाणी आता स्त्रिया न घाबरता प्रवेश करत आहेत. काही हनुमान-शनी मंदिरांत अजून कर्मठ व्यवस्था आहे. हळूहळू सर्व बदलणारच आहे.
वरील सर्व जनमान्यता आहेत. वैज्ञानिक सत्ये नव्हेत त्यामुळे चर्चा करतांना ह्याचे भान असणे गरजेचे.
1 Dec 2015 - 12:40 pm | pacificready
गवि सर,
तुमच्या टंचनिकेची- दिसायला ज़रा कमी सुन्दर आणि तत्त्वज्ञानात बऱ्यापैकी पक्की- बहिण डांगे अण्णा कड़े पाठवली आहे ना? खरं सांगा सर.
1 Dec 2015 - 12:43 pm | बॅटमॅन
हे दोन्ही फीचर्स नेहमीच गो टुगेदर असतात का?
1 Dec 2015 - 12:49 pm | pacificready
चाल तीच- हट्टीकट्टी ... लुळीपांगळी ...
आत्ता मुद्दा डांगे अण्णा कडे आलेल्या टंचनिकेचा आहे. कीप फोकस.