Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by माहितगार on Mon, 11/30/2015 - 16:33
प्रतिसाद टंकण्यापुर्वी क्षणभर थांबा ! शीर्षकात प्रश्नचिन्हा (?) एवजी कृपया स्मायली वाचा (:)). शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी केली आहे. हे सांगूनही तुम्ही या धागा लेखातील विवीध कडबोळे प्रश्न आणि कडबोळे विचारांचे अनाकलनीय काहुर वाचण्यास थांबत असल्यास, 'शनी शिंगणापूर येथील मंदीरात एका स्त्रीने जाऊन चक्क दर्शन घेतले, आणि गावातल्या लोकांनी (कदाचित त्यांच्या भावना दुखावल्यामुळे) बंदपाळल्याची बातमी', हि ह्या धागा लेखाची खरी सुरवात आहे. स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न तसा दिसतो तेवढा सोपा नसावा, नाहीतर मंदिर प्रवेशाचा प्रश्न ऐरणीवर येऊन ८५व्या वर्षानंतर कदाचित या प्रश्नाची चर्चा करण्याचे प्रयोजन उरले नसते. स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न चर्चेस घेतला तर पहिला आक्षेप हा येऊ शकेल की तुम्ही केवळ हिंदुधर्मीय प्रार्थनास्थळातील असमानतेचीच चर्चा का करता आणि इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्रीयांना दिल्या जाणार्‍या असमान वागणूकीची चर्चा का करत नाही ? हा प्रश्न येतो, या प्रश्नाचे काहुर येथवरच थांबत नाही, कारण: १) हा असमानतेचा प्रश्न त्यांना धार्मीक गुरु पुजारी (येथे त्या त्या धर्मातील शब्द कल्पावेत) इत्यादी संधी समानपणे का मिळत नाही हा प्रश्न एक्स्टेंड होतो; मग असे का होते कारण प्रेषित, विदुषी, तत्त्वज्ञ या जागी अपवादात्मक स्त्रीयांचे दाखले सोडल्यास त्यांचे अस्तीत्व विरळ असल्यामुळे असे होते का ? एखादा प्रेषित असो वा प्रार्थनास्थळात प्रवेश अथवा धर्मगुरुपद नाकारणारा पुरुषवर्ग शेवटी स्त्रीयांच्या पोटीच जन्माला येतो माता पत्नी कन्या बहीण या रोलचा प्रभाव इतरवेळी बर्‍याचदा दिसून येतो तर प्रार्थनास्थळातील समानतेचे तत्त्वज्ञान आपापल्या पातळीवर रेटण्यात या स्त्रीया कुठे कमी पडताहेत का ? मुलतः त्यांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ? :) आता हा प्रश्न म्हणजे जरासे व्हिक्टीम ब्लेमींग केल्यासारखे आहे जे व्यक्तीशः मलाही मान्य नाही (शिवाय मी स्वतःही खोडू शकेन असा यात तर्कदोष आहे) तरीही असा प्रश्न उपस्थीत करण्या मागे उद्देश केवळ चर्चेस तोंड फोडणे एवढाच आहे. २) शनि शिंगणापुरचा स्त्री प्रवेशाचा प्रश्न कदाचित कायद्याच्या मार्गाने सोडवता येईल पण इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्री प्रवेश आणि धर्मगुरुपदावरील समानतेचा प्रश्न विचारला तरी प्रश्न विचारणारे असहिष्णू ठरतील ? स्त्रीयांना समानता नाकारण्यासाठी आपापल्या धर्मग्रंथाची शब्दपुजा रचत उत्पातमुल्य दाखवणारे असहिष्णू ठरणार नाहीत. मग इथे राजकीय शांतता साधण्याच्या व्यावहारीक गरजांसाठी केलेली धर्मग्रंथांना पुढेकरत उत्पातमुल्य दाखवणार्‍यांशी विवीध धर्मियांची उत्पातमुल्यावर आधारीत एक तडजोड अस्तीत्वात आहे का? असे उत्पात मुल्य दर्शवणारे असोत अथवा लोकसभेत केवळ असहिष्णूतेवर चर्चा करणार पण तेही गोंधळ करून हा कायदेमंडळांमधे घातला जाणारा गोंधळ ही सुद्धा असहिष्णूता नाही का ? ३) किंवा बर्‍याचदा असा विचार समोर ठेवला जातो की समाजसुधारणा त्या त्या समाजातूनच पुढे येऊ द्याव्यात अंशतः हे खरेही आहे की शनि शिंगणापुर असो वा इतर धर्मीय प्रार्थनास्थळे समाजसुधारणेचे विचार त्या त्या समाजातून पुढे यावयास हवेत पण समाज हेच एक युनीट आहे का ? त्या गावापुरता शनि शिंगणापुरचाही एक समाज अस्तीत्वात नाही का आणि समाज सुधारणेची सुरवात त्याच गावातील व्यक्ती कडून होणे अधिक श्रेयस्कर असणार नाही का ? मग शनि शिंगणापूर गावातील समाजाची मते बदले पर्यंत उर्वरीत समाजाने थांबले पाहीजे का ? अंदमानात इतर जगातील मानवाचे संबंध नाकारणार्‍या अदिवासींचा अधिकार आपण स्विकारतोच ना मग शनि शिंगणापुर सारख्या विवीध गावातील जाती जमातीतील परंपरा आतून बदले पर्यंत थांबले पाहीजे का ? असे कुठ पर्यंत थांबणे सयुक्तीक ठरेल. रविंद्रनाथ टागोरांच्या शांती निकेतनापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर काही आदीवासी जमातीत अगदी अलिकडे पर्यंत विच हंटींगची जातपंचायतीकडून बलात्काराच्या आदेशाची उदाहरणे पुढे येतात शनि शिंगणापुर असो वा बंगाल मधील वस्ती वा इतर धर्मीय लोकशाहीत सर्वांचाच सहभाग आहे, प्रागतिक विचारांचे प्रतिनिधी अशा मागे पडलेल्या समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधून प्रबोधनाचे मार्ग प्रशस्त करण्यात नेमके कुठे कमी पडतात ? ४) ज्या मिथककथांवर आधारीत अंधविश्वास अस्तीत्वात आहेत ती केवळ मिथके आहेत, आपापल्या संस्कृती जपताना काळानुरुप परिवर्तनांच्या आड ह्या मिथककथा येऊ नयेत यासाठी लागणारे प्रबोधन करण्यात आमचे विवीध महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे अभ्यासकमंडळी कमी पडत आहेत का ? आतापर्यंतच्या चर्चेचा रोख तुम्ही पाहीलात तर शीर्षक आणि लेखाचा उद्देश स्त्री विरोधी नाही आणि कोणत्याही विशीष्ट धर्म अथवा संस्कृतीस लक्ष्य करणेही या धागा लेखाचा उद्देश नाही, मी परिवर्तनांसाठी क्रांतीचा पक्षधर नाही पण परिवर्तनासाठी लागणार्‍या उत्क्रांतीसाठी प्रबोधनासाठी सदैव आग्रही असावे असे वाटते, हे वाचकांनी लक्षात घेतले असेलच. मी माझ्या या धागा लेखातील माझे सर्वच प्रश्न आणि विचारांचे काहुराचे निटसे विश्लेषण केले आहे असेही नाही. इतरांचे विचार समजून घेऊन माझ्या साशंकता कमी करण्यास साहाय्य व्हावे म्हणून हा धागा लेख लिहिला आहे. बाकी चुभूदेघे. चर्चा सहभाग आणि प्रतिसादांसाठी धन्यवाद
  • Log in or register to post comments
  • 74579 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 12/01/2015 - 15:45

In reply to @ प्रगो by नीलमोहर

Permalink

नीमो ,

नीमो , चित्र सापडले आहे , फक्त तुर्तास संपादक मंडळ सुट्टीवर असल्याने चित्र इथे टाकले नव्हते , आपल्याला व्यनी करतो ;) बाकी चेष्टा मस्करी इतकी स्पोर्टींगली घेतल्याबद्दल आपल्यावर कारवाई वगैरे होईल की हो :)
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Tue, 12/01/2015 - 16:54

In reply to नीमो , by प्रसाद गोडबोले

Permalink

बापरे ..

Image removed. नको नको व्यनि नको.. आणि संपादक मंडळच सुट्टीवर असल्यावर कारवाई कोण करणार :)
  • Log in or register to post comments

Submitted by pacificready on Tue, 12/01/2015 - 17:12

In reply to बापरे .. by नीलमोहर

Permalink

>>>नको नको व्यनि नको.

>>>नको नको व्यनि नको. दूरदर्शन ची दारुबंदी ची जाहिरात आठवली. नको बाबा नको नको. संसार उद्ध्वस्त करी दारु, म्हणून संसार नका करु
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Mon, 11/30/2015 - 20:35

In reply to शशी केसबद्दलः by संदीप डांगे

Permalink

"....मंदीरप्रवेश

"....मंदीरप्रवेश आंदोलनाबद्दलही मला हाच प्रश्न पडला होता............जो स्वत: तुम्हाला जवळ घेऊ शकत नाही, तुमचे दु:ख दूर करू शकत नाही तो देव कशाला डोक्यावर घ्यायचा?....
कदाचित याच भावनेने सहसा लोक दुर्लक्ष करतात, अशी काही स्थाने असतील तर जाण्याचे टाळले जाते पण या दृष्टीकोणा बद्दल एक साशंकता आहे उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी पाणी पिण्यास दिले नाही तर तुम्ही ते टाळाल दुसरीकडे जाऊन पाणी प्याल एका अर्थाने समतेच्या वागणूकीचा आग्रह बाजूस पडून एक अप्रत्यक्ष तडजोड स्विकारली जाते आहे. मी शीख धर्मीय असो वा नसो त्यांच्या डोक्यावर कापड बांधून पाय धुण्याची अट पूर्ण केली कि मला त्यांच्या धर्मस्थानात जाऊन दर्शन घेता येते. मी स्त्री आहे पुरुष आहे कोणत्या वर्ण धर्म पंथाचा आहे याने सहसा फरक पडत नाही. अशाच पद्धतीने इतर धर्मीय स्थळांमध्ये कुणीही आदर पुर्वक दर्शन/प्रार्थना करू इच्छित असेल तर त्यासाठी मुभा असावयास हवी आणि त्यासाठीचे आग्रह तुम्ही नास्तीक असाल अथवा इतर धर्मीय असाल तरीही सोडू नयेत कारण तुम्ही धरत असलेला आग्रह सुसंस्कृततेसाठी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सामाजीक समस्यांच्या संदर्भाने मी मागेही धागा काढला होता, तुम्ही धर्मस्थळात जाऊन प्रत्येक वेळी पुजा केली पाहीजे असे नाही पण एकदा तो अधिकार प्राप्त झाला की बाकी समाजात समतेच्या वागणूकीची खात्री करणे सोपे जाऊ शकते. मी आफ्रीकन ख्रिश्चन असेन तर काळ्यांच्या चर्च मध्ये जाउन तडजोड करेन पण दुसर्‍या समुदाया पासून तुटलेलाच राहीन ही जी सामाजीक दरी आहे ती सांधण्यासाठी म्हणून मला ऑदरवाईज रस नसला तरी गोर्‍यांच्या प्रत्येक चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करून येण्यास आवडेल. अर्थात आपण लाथ वगैरे शब्द सात्वीक रागाने जरी वापरला असला तरी आदरणीय उद्देशाने न येणार्‍यांना नाकारण्याचा एक वेगळा अधिकार धार्मीक स्थळांना प्राप्त होऊ लागतो याने सामाजीक दरी सांधण्यास मदत होते असे वाटत नाही म्हणून असे शब्द टाळावेत किंवा कसे.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Mon, 11/30/2015 - 22:26

In reply to "....मंदीरप्रवेश by माहितगार

Permalink

आता पुरेसा वेळ हाताशी

आता पुरेसा वेळ हाताशी नसल्याने तुमच्या प्रतिसादाचं उत्तर नंतर देईल वा वेगळा धागा काढेन, कारण इथे दलितप्रश्नावर चर्चा करणे मूळ धाग्याशी, विषयाशी प्रतारणा होइल. पण खालील मुद्द्यावर माझं मत मांडतो.
अर्थात आपण लाथ वगैरे शब्द सात्वीक रागाने जरी वापरला असला तरी आदरणीय उद्देशाने न येणार्‍यांना नाकारण्याचा एक वेगळा अधिकार धार्मीक स्थळांना प्राप्त होऊ लागतो याने सामाजीक दरी सांधण्यास मदत होते असे वाटत नाही म्हणून असे शब्द टाळावेत किंवा कसे.
'विशिष्ट मंदिरातच जागृत देव असतात' ही इतकी तकलादू आणि भ्रामक कल्पना भारतीय समाज कवटाळून बसला आहे की आपण एकाच बाबतीत वेगवेगळे विचारप्रवाह एकाच वेळी पाळत आहोत ते त्यांच्या लक्षात येत नाही. १. मनुष्य देवळात जातो. कारण देवाप्रति त्याला आपली भक्ती, श्रद्धा अर्पण करायची असते, आपले दु:ख, सुख याचे कारण तोच आहे असे समजून एक मालक-पालक-मित्र-सखा म्हणून त्याच्याशी गुजगोष्टी करायच्या असतात. आपले गार्‍हाणे सांगायचे असते, त्यावर त्याने काहीतरी करावे अशी अपेक्षा असते. थोडक्यात मंदीर हे एका व्यक्तिचे असते. भक्त तिथे स्वतःपुरते लाभ घेण्यासाठी जातो. अखंड समाजासाठी नाही. ते राजे, सत्ताधारी वैगेरे करतात. पण व्यक्तिगत पातळीवर देव हा वैयक्तिकच असतो. २. मंदिरात एक व्यवस्था असते, देवाची काळजी घेण्याची. त्याचे षोडशोपचार, पुजाअर्चा, आरत्या नैवेद्ये वैगेरे करणे गरजेचे असते. त्याची समाजातल्या एका व्यक्तिवर जबाबदारी टाकल्या जाते. परंपरेने वा कसेही चालत आलेले नियम, अटी हे गुरव, पुजारी, पुरोहित पाळत असतात जेणेकरुन 'देवाचे हित' जपल्या जावे. ह्यात स्त्रियांनी प्रवेश करू नये, रजस्वला स्त्रीने प्रवेश करू नये, अमूक जातीतल्या माणसाने प्रवेश करू नये असे नियम असतात. त्याची कारणे दैवी वैगेरे असतात. भारतात अशी बरीच मंदीरे आहेत जी विशिष्ट जातीची, उपजातीची आहेत. त्यांच्याशिवाय तिथे दुसर्‍या कोणाला प्रवेश नसतो. 'स्थानाची पवित्रता' जपणे हा उद्देश असतो. ही पवित्रता, नियम परंपरेने जसे आले तसे, थोडेसे आपल्याला सोयिस्कर ठरतील असे करत पुरोहित, गुरव पाळतात. इथे देव व पुरोहित यांचे हिताला प्राधान्य आहे, भक्तांच्या नाही. आमच्या कुलदैवतेच्या गाभार्‍यात पुरुषांना प्रवेश नाही, तिथे सगळे षोडशोपचार, विधी फक्त स्त्रिया करतात. ३. भारतीय मंदिरांचा इतिहास पाहू जाता. पुरातन मंदिरे व्यक्तिगत उपयोगासाठी, ध्यानपुजाअर्चेसाठी बांधलेली आहेत. गाभार्‍यांची रुंदी एकाच व्यक्तिला सहज बसता येईल अशी आहे. एक असाही संशय आहे की काही महत्त्वपूर्ण ज्ञान, वस्तू इथे सांभाळून ठेवलेल्या आहेत. मंदीर हे अतिशय व्यक्तिगत साधनेचे स्थळ आहे. कोणा राजाने, प्रधानाने, मंत्र्याने, सरदाराने स्वतःचे पैसे घालून एक चांगली जागा तयार केली असते. तीथे त्याने वा अजून कोणा तंत्रमंत्रात कुशल पुजार्‍याने पुजा करून वातावरण, जागा मंतरलेली असते. नित्य साधनेने तिथे एक जाणवेल असे वातावरण तयार होते. तिथे शांती लाभते. मग त्या जागेच्या दैवीपणाचे किस्से बाहेर पडतात. पण हे सगळे व्यक्तिगत आहे. त्यामुळे अशी व्यक्तिगत जागा कुठेही तयार करता येऊ शकते. पण ते वातावरण तयार करणे चटकन, झटपट होणारे काम नाही, त्यास कित्येक वर्षांची अखंड तपस्या लागते. अनिर्बंध हेळसांडीने ते वातावरण नाहिसे होऊ शकते. त्यामुळे अशी मंदीरे लोकांपासून सुरक्षित ठेवणे आले. त्यातून नियम बनले. पण जागृत देवस्थान म्हटले गेल्यावर जनसामान्यांना तेच पावरफुल वाटते आणि लोकांचा गार्‍हाणे मांडण्यासाठी तिकडेच ओढा असतो. ४. इतर धर्माच्या प्रार्थळास्थळांशी अजिबात तुलना करू नये कारण हिंदू हा व्यक्तिगत धर्म(आचरण) आहे. इतर धर्म हे सामुहिक धर्म आहेत. चर्च, गुरुद्वारा, मशीद इथे आपणास एकसमानता दिसून येईल की अनेक लोकांना एकत्र बसता येईल असा हॉल असतो. जिथे प्रार्थनास्थळ बांधतांनाच समाजाचा विचार केला गेला आहे तिथे 'कुणास मनाई करावी' हा विचारच मुलतः येणार नाही हे सरळ आहे. काळ्यांसाठी वेगळे चर्च असतील तर ते सरळ डिस्क्रिमीनेशन आहे. (आजकाल म्हणजे गेल्या वीस-तीस वर्षांतील नवीन मंदीरांच्या रचना बघितल्या तर आता समुहासाठी अशी खास मंदीरे गाव-शहरामधे चर्चच्या शैलीत बांधली जाऊ लागली आहेत. ज्यात हॉल बराच मोठा असतो, देवाची मुर्ती भींतीला टेकलेली असते, गाभार्‍यात पुजारी आणि दानपेटी राहील एवढीच जागा असते. देवाला स्पर्श करू शकत नाही. इथे आता एक क्रांती घडलेली आहे. या प्रकारच्या मंदिरांमधे कुणालाही प्रवेश बंदी नसते.) ५. देव चराचरात आहे, ज्याला जिथे भाव प्रकट होईल देव तिथे प्रकट होतो. म्हणून इथे-तिथे कुठेही दगडाला शेंदूर फासून अगरबत्ती लावलेली दिसून येते. मरीआई, म्हसोबा, सटवाई, आसरामाता, अशा जनसामान्यांच्या श्रद्धा स्विकारत भारतात लाखो ठिकाणी आहेत. इथे येता जाता कोणी नमस्कार करू शकतो. अगदी गायींपासून ते झाडांपर्यंत लोक दर्शनं घेत असतात. तिथं कोणालाही बंदी नसते. स्त्री, रजस्वला, दलित, कोणीही निषिद्ध नसतो. कारण तो सर्वांचा देव असतो, 'निसर्गदेव' असतो. असे सगळे आहे तर मग लक्षात येईल की काही विशिष्ट मंदिरांमधेच प्रवेशबंदी का? पण अशी प्रवेशबंदी असलेली मंदीरे किती आहेत? असली तरी ती खाजगी मालकीची किंवा विशिष्ट जातींसाठीची आहेत. तिथे त्यांचेच नियम चालणार. या नियमांविरुद्ध अपील होऊच शकत नाहीत त्याचे कारणे कितीही मूर्ख वा अवैज्ञानिक असली तरी. ते तिथे भेट द्यायला जाणार्‍यांना मान्य असलीच पाहिजेत. कारण नाहीतर विसंगती निर्माण होईल. जी शशीं प्रकरणात झाली, सबरीमाला प्रकरणात झाली. तुम्ही शनिदेवाला मानता पण त्याचे नियम नाही. हे मजेशीर आहे. त्यामुळे मंदिरांमधे प्रवेशबंदीला मी समर्थन देतो. एखादा देव मी मानतो तर त्याचे सगळे नियम मला मान्य असलेच पाहिजेत. शिवपिंडीवर मी मेणबत्ती नाही लावणार किंवा चादर नाही घालणार. व्यक्तिस्वातंत्र्याच्या, सन्माननीय वागणुकीच्या नावाखाली मला हे सर्व करण्याचा अधिकार आहेच. पण तो मूर्खपणा आहे ना? यावर उपाय काय? तर देव चराचरात आहे. प्रत्येक घरी गणपती बसतो, प्रत्येकाच्या घरच्या गणपतीत सेम देवत्व येतं. लाखो ठिकाणी शिवालयं, राममंदीरं आहेत, सगळीकडे प्राणप्रतिष्ठापना केलेले देव आहेत. मग दलितांनी, स्त्रियांनी आपल्यासाठी मंदीर बांधून घ्यावं, तिथेही तोच देव, तेच वातावरण करावं आणि सिद्ध करावं की देव ठायीठायी आहे, तुम्ही त्याला तुमच्या मंदिरात डांबुन ठेवुन मूर्खपणा करत आहात. पण असे होत नाही, झाले नाही. रजस्वला स्त्रियांना प्रवेशबंदी हा एक तांत्रिक मुद्दा बाजूला ठेवला तर दलितांना मंदिरात प्रवेश हा अनेक प्रश्नांना जन्म देणारा आहे. दलितांना मंदिरप्रवेश नाकारणे हा सरळ सरळ सामाजिक भेदभावाचा प्रश्न आहे. तो काही एका दिवसात तयार झालेला नाही. मंदिरात प्रवेश आहे म्हणून फार उचित सन्मान मिळतो असेही नाही हे देवदासींकडे, वाघ्यामुरळी, इत्यादींकडे बघुन कळते. त्यामुळे मंदिरात प्रवेश म्हणजे लगेच पाटील-ब्राहमणांच्या पंगतीत जेवायला मिळेल, त्यांच्या स्वयंपाकघरात प्रवेश मिळेल असे काही नव्हते, आणि झालेही नाही. (शहरातली उदाहरणे देऊ नये) ज्या देवाचा धर्म आपल्यासारख्या माणसाशी अमानुष वागण्याचे नियम बनवतो तो देव आपण कशाला मानावा हा विचार रुजवणे आवश्यक होते. जे आंबेडकरांनी अगदी योग्य पद्धतीने केले. जिथे आपल्याला सन्मान नाही तिथे जावेच कशाला हा साधा प्रश्न माझ्या 'लाथ' या शब्दामागे आहे. तुम्ही पाण्याचे उदाहरण दिले. तडजोडीबद्दल बोलत आहात. ज्या देशात रोटी-बेटी व्यवहार आपल्याच पोटजातीत व्हावे हा आग्रह असतो, तिथे मंदिरप्रवेशाने फार काही बदलत नाही. लोकांना आपल्याच जातीत, पोटजातीत मुली, मुलं बघावी लागतात. कितीही समकक्ष, समविचारी, जीवश्चकंठश्च मित्र असले तरी दोन वेगळ्या जातीत अरेंज मॅरेज होऊ शकत नाही हे स्वता:च्या डोळ्यांनी पाह्यलंय. इथे जी केली जाते ती अप्रत्यक्ष तडजोड नाही का? जात बंद, देव बंद, पंगत बंद अशा समाजाला 'लाथ' नाही मारायची तर का पूजा करायची काय? ह्याच सगळ्याला कंटाळून गावातील लोकांचा ओढा शहरांकडे वाढत असणे हे एक प्रकारे लाथ मारणेच आहे, तडजोड नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. बाकी माझ्या मतांशी प्रत्येकाने सहमत व्हावे असे नाहीच. तरी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Tue, 12/01/2015 - 11:13

In reply to शशी केसबद्दलः by संदीप डांगे

Permalink

अरे बंदी आहे तर लाथ मारा

अरे बंदी आहे तर लाथ मारा च्यायला त्या देवाला.. देवाच्या नावावर चालणार्‍या भ्रष्ट आचारा बद्द्ल तुमची स्वत:ची काही मते असतील. तुमच्या मतस्वातंत्र्याचा आदर आहे. परंतु दुसर्‍यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असली विधाने करणे कृपया टाळा. "सश्रद्ध लोकांनी अंगावर येउ नये" असा स्वतःच कांगावा करत तुम्ही हे असले काहितरी लिहयचे आणि आम्ही ते निमूटपणे वाचुन घ्यायचे ही अपेक्षा चुकीची आहे. यापुढे आपल्याला जे काही समाज प्रबोधन करायचे आहे ते योग्य शब्दात, योग्य भाषेत आणि योग्य प्रकारे कराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 12/01/2015 - 11:53

In reply to अरे बंदी आहे तर लाथ मारा by मृत्युन्जय

Permalink

मागचे पुढचे काही न वाचता एक

मागचे पुढचे काही न वाचता एक शब्द उचलून कुणाच्या धार्मिक भावना दुखावत असतील सर्वस्वी अशक्य आहे. प्रतिसादात स्पष्ट लिहलंय की "जो देव तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या देवाला लाथ मारा." ज्यांना त्यांचा देव हे सगळे करतो (म्हणजे जवळ करतो, दु:ख दुर करून सुख-सन्मान-शांती देतो) अशी खात्री-विश्वास-श्रद्धा आहे त्यांच्या भावना दुखावणारं हे विधान आहे असं कसं काय ठरवलं जातंय? हे म्हणजे असं झालंय की मी म्हटलं, 'दारू पिणार्‍यांना चाबकाने फोडून काढलं पाहिजे' त्यावर 'दुध' पिणार्‍यांनी आक्षेप नोंदवावा का तर तिथे 'पिणार्‍यां'चा उल्लेख केला म्हणून. कुठल्याही विशिष्ट देवाचे नाव न घेता विधान केलं आहे, त्यात अशा देवाचं वर्णन आहे जो 'देव' ह्या सश्रद्धांच्या संकल्पनेत बसत नाही. मग त्यांच्या धार्मिक भावना का दुखावतात? शंकराला शिवी दिली तर मुस्लिम रागावतील काय? अल्लाहला शिवी दिली तर हिंदु रागावतील काय? जिजसला शिवी दिली तर जैनांना राग येईल काय? माझं विधान धार्मिक भावना दुखावणारं कसं आहे ते पटवून दिलंत तर तुमच्या अपेक्षेबद्दल विचार करता येईल. अन्यथा समाजप्रबोधनास आपला विरोध आहे असे समजावे लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 12/01/2015 - 11:55

In reply to मागचे पुढचे काही न वाचता एक by संदीप डांगे

Permalink

हे वाक्य असे वाचावे: मागचे

हे वाक्य असे वाचावे: मागचे पुढचे काही न वाचता एक शब्द उचलून कुणाच्या धार्मिक भावना दुखावत असतील तर सर्वस्वी अशक्य आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 12/01/2015 - 12:42

In reply to हे वाक्य असे वाचावे: मागचे by संदीप डांगे

Permalink

"जो देव तुम्हाला जवळ करत नाही

"जो देव तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या देवाला लाथ मारा." डांगे साहेब हेच विधान जर आपण असे वाचले तर? "जो "बाप" तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या "बापाला" लाथ मारा." असे पटेल काय? आपण नास्तिक असाल पण शेवटी प्रत्येक माणसाची एक श्रद्धा असते( ती असणे बरोबर कि चूक हा एक वेगळा मुद्दा असू शकतो) त्याला आपण इतक्या सहज ठोकर मारता हे पटले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 12/01/2015 - 13:22

In reply to "जो देव तुम्हाला जवळ करत नाही by सुबोध खरे

Permalink

डॉक्टरसाहेब,

डॉक्टरसाहेब, जो "देश/समाज/धर्म" तुम्हाला जवळ करत नाही, तुमचे दु:ख दूर करत नाही, तुम्हाला सुख-सन्मान देत नाही, त्या "देश/समाज/धर्माला" लाथ मारा. असंही वाचून बघा. मला नक्की काय म्हणायचे ते लक्षात येईल अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by pacificready on Tue, 12/01/2015 - 13:24

In reply to डॉक्टरसाहेब, by संदीप डांगे

Permalink

देखिये आपने देव को लाथ मारो

देखिये आपने देव को लाथ मारो बोला ना? हां या ना में जवाब दे!
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 12/01/2015 - 13:26

In reply to देखिये आपने देव को लाथ मारो by pacificready

Permalink

सॉरी शक्तिमान, अब हम ऐसा गलती

सॉरी शक्तिमान, अब हम ऐसा गलती दुबारा नही करेंगे. आगेसे यादमें रखेंगे.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Tue, 12/01/2015 - 12:49

In reply to मागचे पुढचे काही न वाचता एक by संदीप डांगे

Permalink

आपल्याकडून अश्याच

आपल्याकडून अश्याच आक्रस्ताळ्या प्रतिसादाची अपेक्षा होती. तुम्ही तुमची वाक्य नीट वाचत नाही किंवा तुम्ही काय लिहिता ते तुमचे तुम्हाला कळत नाही. किंवा कदाचित मुद्दाम वाद निर्माण करण्यासाठी तुम्ही असले वाचाळ प्रतिसाद देता. पहिली गोष्ट म्हणजे तुमची दोन्ही वाक्ये वेगळी आहेत. ती एकत्र करुन लिहिली असतीत तर कदाचित वरचा प्रतिसाद तरी ग्राह्य धरला असता. दुसरी गोष्ट म्हणजे "लाथ मारा देवाला" हे पुर्णपणे अमान्य, अग्राह्य, अस्थायी आहे. तुम्हाला तुमच्या देवाबद्दलच्या भावना योग्य शब्दात मांडण्याचा पुर्ण अधिकार आहे. पण देवाला लाथा मारा, त्याच्यावर थुंका, मुता (उरलेले दोन शब्द तुम्ही लिहिलेले नाहित. ते उदाहारणार्थ दिले आहेत) असली अग्राह्य भाषा ही मुळात एखाद्याच्या श्रद्धेबद्दल असलेली कमालीची असहिष्णुता दर्शवते. तुम्हाला तुमचा नास्तिकपणा गोंजारत बसण्याचा पुर्ण अधिकार आहे. मात्र हे करताना आस्तिकांच्या भावनेविषयी अनादर दाखवणे हे हीनपणाचे लक्षण आहे. चूक स्पष्टपणे दाखवल्यावर ती मान्य करुन दुरुस्त करण्यापेक्ष दुरुत्तरे करणे, वाद घालणे, आक्रस्ताळेपणा करणे हाच जर तुम्ही तुमचा युएसपी करु इच्छित असाल तर नाईलाज आहे. योग्य त्या भाषेत सर्वांनाच उत्तरे देता येतील. मात्र हे करताना "देवाला लाथा घाला" असली दळभद्री भाषा वापरणे किंबहुना कुणाच्याही भावना दुखावण्यासाठी उगाच काड्या सारण्यासाठी असंस्कृत भाषा वापरणे आमच्या संस्कृतीत बसत नाही. त्यामुळे प्रतिवाद करताना थोड्या मर्यादा जरुर येतील पण मलातरी पातळी सोडुन बोलणे शक्य होणार नाही. कुठल्याही विशिष्ट देवाचे नाव न घेता विधान केलं आहे, त्यात अशा देवाचं वर्णन आहे जो 'देव' ह्या सश्रद्धांच्या संकल्पनेत बसत नाही. मग त्यांच्या धार्मिक भावना का दुखावतात? शंकराला शिवी दिली तर मुस्लिम रागावतील काय? अल्लाहला शिवी दिली तर हिंदु रागावतील काय? जिजसला शिवी दिली तर जैनांना राग येईल काय? माझं विधान धार्मिक भावना दुखावणारं कसं आहे ते पटवून दिलंत तर तुमच्या अपेक्षेबद्दल विचार करता येईल. अन्यथा समाजप्रबोधनास आपला विरोध आहे असे समजावे लागेल. तुम्ही कुठल्याही विशिष्ट धर्माचे नाव घेतले नाही म्हणुभाते धार्मिक भावना न दुखावणारे विधान आहे हा तर्क अजब आहे. देव ही वैश्विक संकल्पना आहे. किंबहुना जगातल्या ९९% धर्मांचा गाभा देव हाच असेल. देवाला कुठल्या स्वरुपात पहायचे याबद्दलचे प्रत्येक धर्माचे निकष वेगळे असु शकतील. पण म्हणुन देव ही संरचना नाकारता येतच नाही. एखाद्या अज्ञेयवाद्यासाठी देवाचे अस्तित्व नसणे हा समज योग्य असु शकतो पण जगाच्या पाठीवरील बहुसंख्य धर्मात देवाचे अतित्व मान्यच आहे. तुम्ही या संरचनेला उद्देशुनच "लाथा घाला" असे म्हटले आहे. इथे ते हिंदुंच्या देवासाठी म्हटले किंवा मुसलमानांच्या देवासाठी म्हटले हा मुद्दा पुर्णतः गैरलागू आहे. किंबहुना मुस्लिमांच्या देवासाठी बोललात तर धार्मिक भावना दुखावणार नाहित आणी हिंदुंच्या देवाबद्दल बोललात तर दुखावतील असेही काही नाही. वाटल्यास "मुस्लिमांचा देव" असे स्पष्टपणे लिहुन मग त्याला "लाथा घाला" असे वक्तव्य खुषाल करुन पहा. मला ते ही आवडणार नाही. पण तुम्हाला प्रयोग करुन बघायचा असेल तर करा की. अन्यथा समाजप्रबोधनास आपला विरोध आहे असे समजावे लागेल. गंमतच आहे. कश्यावरुन काहिही अर्थ काढायचा म्हणजे हद्द झाली. उद्या तुम्ही म्हणाल की माझ्या वरील विधानावरुन माझा स्त्रीशिक्षणाला विरोध आहे असे समजावे लागेल. आता असल्या फालतु तर्कांना मी कं क्रवे ब्रं? ज्याची त्याची जाण समज वगैरे वग्रै.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 12/01/2015 - 13:18

In reply to आपल्याकडून अश्याच by मृत्युन्जय

Permalink

पण देवाला लाथा मारा,

पण देवाला लाथा मारा, त्याच्यावर थुंका, मुता (उरलेले दोन शब्द तुम्ही लिहिलेले नाहित. ते उदाहारणार्थ दिले आहेत) हे अतिशय चिंताजनक आहे. आपण एखादं विधान कुठल्या बाजूने झुकणारं आहे हे स्वतःच ठरवून मो़कळे होता हे आधी मंत्रीमंडळाच्या विधानाबद्दल जे झालं तिथेच लक्षात आलं. इथेही तेच. ज्या वाक्याचा साधा अर्थ देवाला बंदिस्त करणार्‍या व्यवस्थेला नाकारा इतकाच अभिप्रेत आहे. 'लाथ घाला' म्हणजे तिथे जाऊन प्रत्यक्ष मुर्तीवर लाथ घाला असेच म्हटले असे तुम्ही कशावरून ठरवले? त्या विधानाला दुसर्‍या बाजूने ढकलत नेऊन 'थुंका-मुता' इथपर्यंत घेऊन जाणे, वरून मला असंच म्हणायचे होतं असे अर्थ काढणे म्हणजे वा! तुमची 'देव ह्या संकल्पनेला विरोध करणार्‍यांबद्दलची' स्वतःची मते माझ्यावर लादू नये अशी प्रांजळ प्रार्थना. कश्यावरुन काहिही अर्थ काढायचा म्हणजे हद्द झाली हेच तुम्हाला आणि इतरांना ज्यांनी माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला त्यासाठी म्हणावेसे वाटते. माझे इतर धाग्यांवरचे ह्याच विषयाशी संबंधीत प्रतिसाद आपण वाचलेले नाहीत असे दिसते. तसेच माहितगार यांना जो प्रतिसाद दिला व त्याचे शेवटचे वाक्य उतावीळपणाच्या भरात आपण वाचलेले नाही असेही दिसते. अन्यथा आपण असा प्रतिसाद टाकलाच नसता. बाकी कोणत्या प्रॉडक्टचा युएसपी काय असावा हे कंझ्युमरच्या पर्सेप्शननुसार ठरते हे आपणास मी काय सांगावे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Tue, 12/01/2015 - 14:42

In reply to पण देवाला लाथा मारा, by संदीप डांगे

Permalink

हे अतिशय चिंताजनक आहे. आपण

हे अतिशय चिंताजनक आहे. आपण एखादं विधान कुठल्या बाजूने झुकणारं आहे हे स्वतःच ठरवून मो़कळे होता हे आधी मंत्रीमंडळाच्या विधानाबद्दल जे झालं तिथेच लक्षात आलं. इथेही तेच. तुम्ही काय लिहिता ते तुमचे तुम्हालाच कळत नाही वगैर वगैरे जे मी वरती लिहिले आहे. त्याचा संदरभ मंत्रिमंडळाचा धागच होता. तिथेही तुम्ही चुकीचे लिहुन माती खाल्ली आणि मग सारवासारव केली. इथेही तेच करत आहात. तुम्ही चुकीच्या प्रकारे लिहिता म्हणुन आम्हाला कळफलक बडवावा लागतो. ज्या वाक्याचा साधा अर्थ देवाला बंदिस्त करणार्‍या व्यवस्थेला नाकारा इतकाच अभिप्रेत आहे. 'लाथ घाला' म्हणजे तिथे जाऊन प्रत्यक्ष मुर्तीवर लाथ घाला असेच म्हटले असे तुम्ही कशावरून ठरवले? तुम्ही जे लिहिले आहे तेच मी उद्ध्रूत करतो आहे. तुम्ही स्पष्ट शब्दात "अरे बंदी आहे तर लाथ मारा च्यायला त्या देवाला.." असे लिहिले आहे. इथे "लाथा मारा" आणि "च्यामायला त्या" या दोन्ही शब्दसमूहांना माझा आक्षेप आहे. आणि तुम्ही जे लिहिले आहे तेच मी परत टंकले आहे. तुम्ही स्पष्ट लिहित जा म्हणजे नंतर असली सारवासारव करावी लागणार नाही. तुम्ही चुकीचे लिहित आहात आणि वर कांगावा करत आहात. हे पहिल्यांदा होते आहे असे नाही. पण इतर वेळेस तो मनुष्यस्वभाव म्हणुन सोडुन देता येइल. इथे धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये जाणुनबुजुन करुन तुम्ही वातावरण दूषित करत आहात. त्या विधानाला दुसर्‍या बाजूने ढकलत नेऊन 'थुंका-मुता' इथपर्यंत घेऊन जाणे, वरून मला असंच म्हणायचे होतं असे अर्थ काढणे म्हणजे वा! बघा. तुम्हीच किती आक्रस्ताळेपणा करत आहात. मी तिथे स्पष्टपणे लिहिले आहे की तुम्ही 'थुंका-मुता' लिहिलेले नाही. लाथा घाला हे काही फार वेगळे वक्तव्य आहे असे नाही. बाकी मी अर्थ काहिच काढलेला नाही,. तुम्ही स्पष्टपणे लिहिलेले आहे. "तु गाढव आहेस. कुत्रा आहेस तु" असे लिहायचे आणि वर तोंड करुन म्हणायचे की "तु गाढवासारखा कष्टाळु आणि कुत्र्यासारखा प्रामाणिक आहेस असे मला म्हणायचे होते. तु चुकीचा अर्थ काढतोस" तर ती निव्वळ सारवासारव झाली. इथे स्पष्ट शब्दात "लाथ मारा च्यायला त्या देवाला.." असे लिहिले आहे तुम्ही. अर्थ काढायला पण वाव नाही ठेवलेला. तुमची 'देव ह्या संकल्पनेला विरोध करणार्‍यांबद्दलची' स्वतःची मते माझ्यावर लादू नये अशी प्रांजळ प्रार्थना. मी कुठलीही मते लादत नाही आहे. तुम्ही ओझे वाहत चालला आहात त्याला मी काय करणार? कश्यावरुन काहिही अर्थ काढायचा म्हणजे हद्द झाली काहीही बोलण्याची हद्द तर तुम्ही केली आहे. माझे इतर धाग्यांवरचे ह्याच विषयाशी संबंधीत प्रतिसाद आपण वाचलेले नाहीत असे दिसते. तसेच माहितगार यांना जो प्रतिसाद दिला व त्याचे शेवटचे वाक्य उतावीळपणाच्या भरात आपण वाचलेले नाही असेही दिसते. अन्यथा आपण असा प्रतिसाद टाकलाच नसता. स्वतः उतावीळपणे बेताल वक्तव्ये करायची आणी मग चोर तो चोर वर शिरजोर या न्यायाने तोंड वर करुन बोलायचे ही सवय आपली असावी. आमची नाही. बाकी कोणत्या प्रॉडक्टचा युएसपी काय असावा हे कंझ्युमरच्या पर्सेप्शननुसार ठरते हे आपणास मी काय सांगावे. प्रॉडक्टचा युएसपी प्रॉडक्टवरच ठरतो. त्यातले इंप्रोव्हायझेशन कंझ्युमरच्या पर्सेप्शननुसार होते.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 12/01/2015 - 15:05

In reply to हे अतिशय चिंताजनक आहे. आपण by मृत्युन्जय

Permalink

मी तिथे स्पष्टपणे लिहिले आहे

मी तिथे स्पष्टपणे लिहिले आहे की तुम्ही 'थुंका-मुता' लिहिलेले नाही. लाथा घाला हे काही फार वेगळे वक्तव्य आहे असे नाही. बाकी मी अर्थ काहिच काढलेला नाही,. तुम्ही स्पष्टपणे लिहिलेले आहे.
तुम्हाला हिस्टरी चॅनलवरचा हा माणूस आठवतो काय? अगदी असंच बोलतो. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Tue, 12/01/2015 - 19:50

In reply to मी तिथे स्पष्टपणे लिहिले आहे by संदीप डांगे

Permalink

नाय ब्वो. आम्हाला काही असला

नाय ब्वो. आम्हाला काही असला कोणी माहिती नाही. पण वरचा तो फोटो बघुन कळाले की तुम्ही फक्त चुकीचे लिहितच नाही तर चुकीचे अर्थ पण काढता. तुम्ही जरा मराठी भाषा समजुन उमजुन लिहित चला बरे म्हणजे तुमच्याच डोक्यात गोंधळ कमी उडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Mon, 11/30/2015 - 18:41

Permalink

मिपावर अचानक सहिष्णुता वाढीला

मिपावर अचानक सहिष्णुता वाढीला लागलेली दिसत आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by नूतन सावंत on Mon, 11/30/2015 - 19:03

Permalink

यावरून इंदिरा गांधीन

यावरून इंदिरा गांधीन पंतप्रधान असतानाही तिरुपती मंदिरात जाण्यास विरोध झाला होता त्याची आठवण झाली.तेव्हा इंदिरा गांधी मंदिरात न जाता परत गेल्या होत्या त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Mon, 11/30/2015 - 19:45

In reply to यावरून इंदिरा गांधीन by नूतन सावंत

Permalink

मला वाटतं

केरळातील गुरुवायूर येथील प्रसिद्ध अय्यप्पा मंदिरात हा विरोध झाला होता. त्याचं कारण ते कार्तिकेयाचं (जो अखंड ब्रम्हचारी समजला जातो) मंदीर आहे असं सांगण्यात आलं होतं. तिरुपती मंदिरात असं काही असल्याचं पाहण्यात किंवा ऐकण्यात आलेलं नाही. चूभूद्याघ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Tue, 12/01/2015 - 10:17

In reply to यावरून इंदिरा गांधीन by नूतन सावंत

Permalink

मला वाटते

मला वाटते उडीशातल्या जगन्नाथ मंदिरात(ही) असा विरोध झाला होता. त्यांच्या हत्येआधी एक दोन दिवस. इंदिरा गांधींचे शेवटचे जाहीर भाषण या उडीशा दौर्‍यातले होते आणि 'माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून भारताला संजीवन मिळेल' या अर्थाच्या शब्दांमुळे कायम स्मरणात राहाण्याजोगे झाले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Tue, 12/01/2015 - 10:19

In reply to मला वाटते by राही

Permalink

लिंक

लिंक https://www.youtube.com/watch?v=56_rFuGh8aQ
  • Log in or register to post comments

Submitted by आदिजोशी on Mon, 11/30/2015 - 19:11

Permalink

पहिल्या ओळी वाचून डायरेक्ट

पहिल्या ओळी वाचून डायरेक्ट प्रतिसाद दिला लेख न वाचता. चीयर्स!!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 11/30/2015 - 20:52

Permalink

ये गलिया ये चौथारा, यहा आना ना दोबारा...की तेरा यहा कोयी नही.

अजून एक गोष्ट दैनिकात वाचण्यात आली की भारतातील शंभर टक्के साक्षर म्हणुन मिरवणार्‍या केरळ राज्यातील घटना. आपण अजूनही मानसिकरित्या कसे विकलांग आहोत हे दर्शविणारी ही घटना. केरळमधील पठाणमधिटा जिल्ह्यात असणार्‍या सबरीमला मंदिराचे विश्वस्त यांनी एका मशीनची मागणी केली आहे. हे स्कॅनिंग मशीन मंदिराच्या सुरक्षेसाठी असेल असे वाटले परंतु तसे ते नाही. तर या मशीनद्वारे महिलांची पवित्रता सिद्ध केली जाणार आहे. मंदिर विश्वस्तांना असे वाटते की मासिक धर्माच्या काळात स्त्रीया अस्वच्छ आणि अपवित्र असतात. आता स्कॅनिंग करणारं मशिन मासिक धर्म असणार्‍या स्त्रीया ओळखणार आहे. आणि अशा ओळखलेल्या गेलेल्या महिलांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. कारण अशा विटाळलेल्या महिलांमुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात येण्याची शक्यता वाटते. जी गोष्ट नैसर्गिक आहे त्यामुळे देवालाही विटाळ होतो ? स्त्रीयांनी या गोष्टीला विरोध म्हणुन हॅपी टू ब्लीड ही चळवळ सुरु केलीच आहे. आपण ब्वॉ ही गोष्ट सबरीमला देवावर आणि शनिमहाराजावर सोडून दिली आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Mon, 11/30/2015 - 22:39

In reply to ये गलिया ये चौथारा, यहा आना ना दोबारा...की तेरा यहा कोयी नही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

अरेरे...

दुर्दैव... मंदिरातील देवाचं आणि त्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ इच्छिणार्‍या स्त्रीयांचं.
  • Log in or register to post comments

Submitted by pacificready on Mon, 11/30/2015 - 23:09

In reply to ये गलिया ये चौथारा, यहा आना ना दोबारा...की तेरा यहा कोयी नही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

विश्वस्तांचा निषेध. बुद्धीची

विश्वस्तांचा निषेध. बुद्धीची कीव कराविशी वाटते. देवस्थान सुधारा भगव्यान्नो आधी.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Mon, 11/30/2015 - 23:51

In reply to ये गलिया ये चौथारा, यहा आना ना दोबारा...की तेरा यहा कोयी नही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

+१

करेक्ट ! पुरोगामी विचारांच्या लोकांनी ह्यॅप्पी टु ब्लीड वगैरे आंदोलने करत बसण्यापेक्षा असल्या दगडाच्या देवावर आणि संस्थानांवर बहिष्कार टाकावा . ह्याचे दुहेरी फायदे आहेत पुढील प्रमाणे १) पुरोगामी लोकांन्ना पुरोगामित्वाचा आनंद आणि समाधान मिळेल. २) परंपरावादी लोकांन्ना मंदीरात गर्दी कमी झाल्याचा अन निवांतपणे दर्शन घेता आल्याचा आनंद मिळेल. आणि एकच की परंपरावादी लोकांनी स्वतःच्या हुच्चतेची जाहिरात करु नये अन पुरोगामी लोकांनी त्यांन्ना चणे फेकुन मारु नयेत , बस्स इतकेच जमले तर सर्वेत्र सुखिनो सन्तु: हे साध्य होईल !! :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Mon, 11/30/2015 - 23:25

Permalink

स्त्रीपुरूष समानता = ?

च्यायला, स्त्रीपुरुष समानतेचे उमाळे दाटल्यावर संबंधितांना हिंदूंची मंदिरेच बरी आठवतात! एव्हढाच जर पुळका आला असेल तर स्वत:च्या शरीरापासून सुरुवात करावी म्हणतो मी. कोणी अडवलंय! -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 12/01/2015 - 10:48

In reply to स्त्रीपुरूष समानता = ? by गामा पैलवान

Permalink

च्यायला, स्त्रीपुरुष समानतेचे

च्यायला, स्त्रीपुरुष समानतेचे उमाळे दाटल्यावर संबंधितांना हिंदूंची मंदिरेच बरी आठवतात!
आपण धागालेख नीट वाचला आहेत का ? स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करताना हा धागालेख कोणत्याही एकाच विशीष्ट धर्माला लक्ष्य बनवत नाही हे लेखाच्या शेवटी स्पष्ट नमूद केले आहे, अशा स्वरूपाच्या असमानता राखणार्‍या सर्वच धर्मसंस्थांच्या प्रबोधनाचे आवाहन या धागालेखातून आवाहन केले आहे. शनि शिंगणापूर हे केवळ चर्चा सुरवातीसाठी निमीत्तमात्र आहे. केवळ शनि शिंगणापूरला लक्ष्य बनवायचे असते तर धागा लेखाचे शीर्षक तसे लिहिले असते, ध्रर्मसंस्था आणि धर्मस्थळे संबंधाने पक्षपात टाळण्याचा अधिकतम प्रयास केला आहे.
एव्हढाच जर पुळका आला असेल तर स्वत:च्या शरीरापासून सुरुवात करावी म्हणतो मी. कोणी अडवलंय!
गा.पै. आपल्या या वाक्याचा नेमका अर्थ लक्षात आला नाही अर्थ काय होतो ते कृपया स्पष्ट कराल काय ? म्हणजे इतरांना चर्चा करता येईल
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Tue, 12/01/2015 - 19:59

In reply to च्यायला, स्त्रीपुरुष समानतेचे by माहितगार

Permalink

थोड्या वेगळ्या शब्दांत मांडतो.

माहितगार, माझं म्हणणं अधिक व्यवस्थित शब्दांत मांडता आलं असतं. ते न केल्यामुळे तुमची आणि वाचकांची क्षमा मागतो. १.
स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करताना हा धागालेख कोणत्याही एकाच विशीष्ट धर्माला लक्ष्य बनवत नाही हे लेखाच्या शेवटी स्पष्ट नमूद केले आहे,
बरोबर आहे. जे लोकं मंदिरांतल्या विविध प्रथांना स्त्रीपुरुष भेदभावाचा रंग देऊ इच्छितात त्यांच्यासाठी माझा प्रतिसाद आहे. धागाकर्त्यासाठी नाही. २.
आपल्या या वाक्याचा नेमका अर्थ लक्षात आला नाही अर्थ काय होतो ते कृपया स्पष्ट कराल काय ? म्हणजे इतरांना चर्चा करता येईल
जिथेतिथे स्त्रीपुरुष समानता बघायची ज्यांना हौस आहे त्यांनी स्वत:च्या शरीराकडे बघायला शिकावं. आपलं शरीर आणि मन हेच मुळी स्त्रीपुरुष भेदभावावर आधारलेलं आहे. उगाच मंदिरबिंदिर अशा बाह्य ठिकाणी समानता पैदा करण्याऐवजी स्वत:च्या शरीरापासून सुरुवात करावी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Mon, 11/30/2015 - 23:36

Permalink

नरे निर्मिले...

'देव दानवां नरे निर्मिले' आणि त्यांचे नियमही. देव जर असलाच तर त्याच्यापाशी कसला भेदभाव असूच कसा शकेल? शनिशिंगणापूरच्या गावकर्‍यांनी शनिदेवाला दुधा-तेलाचा अभिषेक घालून स्वतःच्या कोतेपणाचे दर्शन घडवले आहे. देवाला विटाळ घडविणारीही माणसेच. आणि देवाचे शुद्धीकरण करणारीही माणसेच! अजब आहे सगळे...
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Mon, 11/30/2015 - 23:44

In reply to नरे निर्मिले... by एस

Permalink

+१०००

+१०००
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 12/01/2015 - 00:02

In reply to नरे निर्मिले... by एस

Permalink

सर्वच प्रस्थापित धर्मांमधे

सर्वच प्रस्थापित धर्मांमधे एक अनुस्यूत घटक म्हणून हा दुजा-भाव पहिल्या पासून आहे....ज्याना बदलायच आहे त्यानी बिनदिक्कत बदलाव.. धर्म आपोआप बदलेल..ज्याना जाणीव पूर्वक मागास रहायच असेल,त्यांना राहु द्यावे. ते आपोआप गाळात जातील. दुसरे धर्म बदलत नाहीत,मग आम्ही तरी का बदलाव? अस म्हणणाय्राना तर बदलाची इच्छा असलेल्यानी मुद्दाम स्वत: बदलून त्याची ताकद कमी करावी. जोपर्यंत इथे लोकशाही आहे , तो पर्यंत हे सहज शक्य आहे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 12/01/2015 - 00:26

In reply to सर्वच प्रस्थापित धर्मांमधे by अत्रुप्त आत्मा

Permalink

ये हुई ना बात !!

चला ह्या निमित्ताने एक सत्यनारायण घालुयात =))))
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 12/01/2015 - 09:06

In reply to ये हुई ना बात !! by प्रसाद गोडबोले

Permalink

तुम्हाला दुसर काही जमेल तरी

तुम्हाला दुसर काही जमेल तरी का? Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 12/01/2015 - 13:42

In reply to तुम्हाला दुसर काही जमेल तरी by अत्रुप्त आत्मा

Permalink

हो

हो , व्यक्तिगत पातळीवर सत्यनारायणासारखी सरळ सरळ लुबाडणुक करणारी पुजा अन अन्य कर्मकांडे संपुर्णपणे बंद करणे आम्हाला जमले आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 12/01/2015 - 15:47

In reply to ये हुई ना बात !! by प्रसाद गोडबोले

Permalink

च्यायला या प्रतिसादातही यमक

च्यायला या प्रतिसादातही यमक साधलेच का शेवटी ? =))
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 12/01/2015 - 11:45

In reply to सर्वच प्रस्थापित धर्मांमधे by अत्रुप्त आत्मा

Permalink

@ अत्रुप्त एक चांगाला

@ अत्रुप्त एक चांगाला प्रतिसाद, असा प्रतिसाद देण्यासाठी धारीष्ट्य लागते. बाकी प्रगोंंच्या प्रतिसादाबाबत; सत्यनारायण कथेत कुठे दुजाभाव असण्याबद्दल अजून एकदा अभ्यासावी लागेल पण तरीही -सत्यनारायण कथेतील काही विश्वास तुर्तास बाजूस ठेवले तर- सत्यनारायण सर्वांचा समान सहभाग वाढवण्यास उपयूक्त आहे का त्या बाबत त्यात भेदभाव कमी असावा अंदाजा आहे जाणकारांनी प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 12/01/2015 - 03:30

Permalink

संदीप डांगे आणि अत्रुप्त +१००

संदीप डांगे आणि अत्रुप्त +१००
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Tue, 12/01/2015 - 06:11

Permalink

तत्त्वज्ञानाबद्दल काही सापडले

तत्त्वज्ञानाबद्दल काही सापडले नाही!
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 12/01/2015 - 09:50

In reply to तत्त्वज्ञानाबद्दल काही सापडले by कवितानागेश

Permalink

धागालेखकांनी एकाच धाग्यात दोन

धागालेखकांनी एकाच धाग्यात दोन वेगवेगळे मुद्दे मांडलेत. मला तरी दोन्हींची सांगड कशी घालावी हे कळले नाही. माझ्यामते 'समानतेचे तत्त्व' पुरुषवर्गाला समजावून सांगण्यात स्त्रिया कमी पडतात असे त्यांना म्हणायचे आहे. आता समानतेचे तत्त्व न पाळणार्‍यांमधे स्त्रि-पुरूष असा काही भेद दिसून येत नाही. त्यामुळे तो मुद्दा रद्दबातल होतो. बहुतेक 'पुरूषांसोबत अर्ग्युमेंट मधे स्त्रिया कमी पडतात' असे त्यांना म्हणायचे आहे काय असा मला प्रश्न पडला कारण मग हा जरा गंमतीदार विषय होइल. शिर्षक वादग्रस्त असावे याचसाठी केला होता अट्टाहास असे वाटत आहे. धागालेखकांनी यावर अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 12/01/2015 - 11:05

In reply to धागालेखकांनी एकाच धाग्यात दोन by संदीप डांगे

Permalink

बहुतेक 'पुरूषांसोबत

बहुतेक 'पुरूषांसोबत अर्ग्युमेंट मधे स्त्रिया कमी पडतात' असे त्यांना म्हणायचे आहे काय असा मला प्रश्न पडला कारण मग हा जरा गंमतीदार विषय होइल.
=)) अहो काहीही काय ? =)) एनीवे हा विषय या धागा लेखाच्या परिघातला नाही. बाकी धागा लेखाचा मुद्दा क्रमांक १ तुर्तास चर्चेसाठी पुरेशी हिंट देणारा आहे असे वाटते. अधिक स्पष्टीकरण म्हणजे प्रश्नही मीच विचारला उत्तरही मीच दिले होईल म्हणून चर्चा बरिच पुढे गेल्यावर अथवा संपताना देईन.
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Tue, 12/01/2015 - 09:58

In reply to तत्त्वज्ञानाबद्दल काही सापडले by कवितानागेश

Permalink

तेच तर..

" शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी केली आहे." मोठ्या अपेक्षेने धागा उघडला होता या विषयी काही उपयुक्त माहिती मिळेल म्हणून, पण हे 'उल्लू बनाया बडा मजा आया' असं झालं आहे. बाकी जिथे आपलं स्वागत आहे तिथे जावं, जिथे नाही त्याचा विचारही करू नये असं आमचं तत्व. आमच्या आवडत्या तळ्यातल्या गणपतीचे दरवाजे सर्वांसाठी खुले असतात, तिथे जाऊन डोकं टेकून यायचं. दर्शनासाठी न येता कचरा करायला येणार्‍या बुरखेधारी भक्तांना नो एंट्री, असा फलक न लावलेलं सहिष्णू देवस्थान आहे ते.
  • Log in or register to post comments

Submitted by गॅरी ट्रुमन on Tue, 12/01/2015 - 11:04

Permalink

स्त्रियांना किंवा अन्य

स्त्रियांना किंवा अन्य कोणालाही मंदिर प्रवेशापासून रोखणे अयोग्य आहे याविषयी फारसे दुमत नसावे. पण मंदिरात जाऊन काय होते, सगळी मंदिरे बंदच करा वगैरे विचार असणारे लोक हमरीतुमरीवर येऊन चर्चा करताना दिसले की जरा मजाच वाटते. समजा माझे असे मत आहे की दारूचे गुत्ते बंद करून टाकावेत आणि कुठल्या दारूच्या गुत्त्याने "ट्रुमन अडनावाच्या लोकांना प्रवेश नाही" अशा स्वरूपाची पाटी लावली तर त्यामुळे मला काय शष्प फरक पडणार आहे? अन्यथाही मी तिथे जाणार नव्हतोच त्यामुळे बंदी असली काय आणि नसली काय--- हू केअर्स? मंदिरांविरोधात असे मत नसणार्‍या इतर सर्वांचे आक्षेप मात्र नक्कीच ग्राह्य आहेत असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 12/01/2015 - 11:33

In reply to स्त्रियांना किंवा अन्य by गॅरी ट्रुमन

Permalink

इथे 'स्त्रियांना प्रवेशबंदी

इथे 'स्त्रियांना प्रवेशबंदी हे स्पष्ट भेदभावाचे निदर्शक आहे' हा चुकीचा ग्रह काहिजणांनी करून घेतला आहे असे दिसून येते आहे. त्यामुळे लगेच सामाजिक न्यायतत्त्वानुसार सर्वांना समान हक्क, दर्जा ह्याची भलामण करून सर्वांना मंदिरप्रवेशाचा आग्रह धरला जात आहे. पण हे इतके सरळ, साधे सोपे आहे काय? खरा मुद्दा साधनशुचितेचा आहे. वर काहींनी कपड्यांचे उदाहरण दिले आहे. कुणी बिकिनी घालून मंदिरप्रवेश केलेला चालेल काय? पुरुषांनी भले अंतर्वस्त्रांवर ओलेते गेले तर चालते, पण स्त्रियांनी तसेच करावे असा आग्रह धरून चालेल काय? तिथे समानतेचा आग्रह केला तर मान्य होईल काय? चपला, बूट घालून गेलेले चालेल काय? गुत्त्यात जायचेच नसेल तर प्रश्नच मिटतो पण ट्रुमन यांना गुत्त्यात जायची इच्छा आहे पण वय २१ पेक्षा कमी असल्याने प्रवेश नाकारला जाईल, त्यावेळी सामाजिक समानतेचा मुद्दा का लागू होत नाही हे सांगता आले तर बर्‍याच बाबी स्पष्ट होण्यास मदत होईल. तीच गोष्ट संवैधानिक पदांवरील व्यक्तिच्या वयाच्या अटीची, सरकारी नोकरीच्या पदावरील शैक्षणिक अर्हतेच्या अटीची. प्रत्येक जागी सरसकट प्रवेश नाकारणारे इतर मुद्दे असतात. तिथे भेदभाव होतो असे कसे म्हणता येईल?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 12/01/2015 - 12:08

Permalink

या निमित्ताने उहापोह होतो आहे

या निमित्ताने उहापोह होतो आहे ही चांगलीच गोष्ट आहे. खुद्द कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळाच्या गाभार्‍यात महिलांना प्रवेश नव्हता अगोदर, पाळी ऑर नॉन पाळी. तो ब्यान उठल्याचे कळते, तसेच इथेही होईल मोस्टली होपफुली.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Tue, 12/01/2015 - 12:35

Permalink

शनि मंदिरात स्त्रियांना

शनि मंदिरात स्त्रियांना प्रवेशबंदीचे कारण कळल्यास ह्या विषयावर अजून विस्तृत व समर्पक चर्चेस मदत होईल म्हणून सामान्य जनमानसात रूढ असलेल्या काही मान्यता: स्त्रियांच्या शनिमंदिर प्रवेशाला खरा कारणीभूत आहे तो मारूतीराया. कसा? तर मारुतीराया, हनुमान हा आजन्म ब्रह्मचारी आहे, शिवाय तो चिरंजीव आहे, परत तो सर्वव्यापी-विशाल आहे. 'हनुमानतत्त्व' असं काही मानल्या जातं. समर्थांनी महाराष्ट्रात शेकडो ठिकाणी, गावोगावी मारुतीची प्रतिष्ठापना केली. गावात बलोपसाना व्हावी, त्यातून भक्ती आणि शक्तीची उपासना होऊन चांगले तरूण तयार व्हावे अशी त्यांची योजना. दुसरी मान्यता अशी की गावात मारुतीचे मंदीर असेल तर भूत-प्रेत-पिशाच्च यापासून गावाचे रक्षण होते. तीसरी मान्यता अशी की हनुमान हा जागृत देव आहे. म्हणजे त्याचे आवाहन केले तर तो खरंच त्या ठिकाणी येऊन भक्तांच्या समस्या दूर करतो. तो असे करु शकतो ही मान्यता इतकी घट्ट आहे कारण तो अजून जीवंत आहे, त्याला वेगवेगळे आकार, अवस्था घेता येतात ही मान्यता. त्यामुळे शक्यतो हनुमानमंदिरात गांभिर्य जास्त असते. तो इथेच आसपास आहे, आपण काही उलट सुलट केले तर कानफाटवेल अशीही भीती असते. चौथी मान्यता अशी की हनुमान वीर्यतेजाने संपृक्त आहे. त्याच्या नुसत्या उच्छवासाने वा अवतीभवतीच्या वातावरणाने स्त्रिया गर्भवती राहू शकतात. इतके त्याचे वीर्यतेज बलवान आहे. आता आपल्या लक्षात येईल की याचमुळे कुमारी मुलींना हनुमानमंदिरात बंदी असायची. (असायची असे म्हटले आहे कारण गेल्या १०-१५ वर्षात विचारधारा बदलत गेल्या). अघोरीसदृश्य तंत्रविद्येत मूल न होऊ शकणार्‍या स्त्रीने अनावृत्त अवस्थेत जाऊन मध्यरात्री हनुमानाची विशिष्ट तंत्राने पूजा करून हनुमानत्त्व जागृत करून त्यास प्रसन्न करणे व गर्भवती होण्याची इच्छा पूर्ण करणे असेही विधी आहेत. ह्याचे एक उदाहरण मी स्वतःच्या डोळ्याने पाहिले आहे. म्हणजे मध्यरात्री स्त्री हनुमान मंदिराकडे जातांना पाहिली आहे. ते सर्व दृश्य पार टरकवणारे असते, त्यामुळे पुढे काही बघायची हिंमत झाली नाही. तेव्हा माझे वयही १५-१६ होते. हेच वीर्यतेज नव्याने गृहस्थाश्रमात प्रवेश करणार्‍या नवरदेवाच्या अंगात संचारावे म्हणून लग्नाआधी नवरदेवाला हनुमानमंदिरात दर्शनाला घेऊन जाण्याची प्रथा आहे. आजकाल मानवी अहंकार वाढल्याने ह्या प्रथेचे कारण विचित्रपणे बदलल्याचेही काही ठिकाणी दिसून येते. म्हणजे स्वतःमधे काहीच कमतरता नाही हे दाखवण्यासाठी त्याच्या विर्यतेजाची मला गरज नाही असे म्हणून त्याचे लग्न झाले नाही त्या बिचार्‍या ब्रह्मचार्‍याचा आशिर्वाद चांगला असेल म्हणून दर्शनाला आलो असं काहीसे. एवढं सगळं लक्षात घेतलं तर स्त्रियांनी हनुमानापासून दूर राहावे यामागचे कारण समजुन येईल. आता शनीमहाराजांनी काय घोडं मारलं? तर कुठल्याशा पुराणकथेनुसार शनीमहाराज हे हनुमानाचे अंकित आहेत, साडेसातीत त्रास कमी व्हावा म्हणून शनीसोबतच हनुमानाचीही उपासना करावी म्हणजे हनुमानजी शनीला तंबी देऊन आपल्या भक्ताचे त्रास कमी करून देतात. हनुमानजी आणि शनी हे एकसारखेच मानले जाऊ लागले. ३०-४० वर्षांआधी शनीमंदीर हे काही फार प्रस्थ नव्हते. एखाद्या गावात एखादे दुर्लक्षलेले शनीमंदीर असायचे. आता ते दुर्लक्षलेले नाही हा भाग वेगळा. पण हनुमानमंदिरापेक्षा शनीमंदिरास कमी महत्त्व होते, जे लोक साडेसातीने त्रस्त आहेत तेच तिथे पुजेला जात. पण तिथे गेल्यावरही हनुमानाचेच नियम लावत. परत शनीमहाराजांची कडक असल्याबद्दलची ख्याती. ह्यामुळे स्त्रियांना प्रवेश नाकारणे घडत आले आहे. ह्यात कुठेही भेदभाव, असमानता वैगेरे नाही. अनेक ठिकाणी आता स्त्रिया न घाबरता प्रवेश करत आहेत. काही हनुमान-शनी मंदिरांत अजून कर्मठ व्यवस्था आहे. हळूहळू सर्व बदलणारच आहे. वरील सर्व जनमान्यता आहेत. वैज्ञानिक सत्ये नव्हेत त्यामुळे चर्चा करतांना ह्याचे भान असणे गरजेचे.
  • Log in or register to post comments

Submitted by pacificready on Tue, 12/01/2015 - 12:40

Permalink

गवि सर,

गवि सर, तुमच्या टंचनिकेची- दिसायला ज़रा कमी सुन्दर आणि तत्त्वज्ञानात बऱ्यापैकी पक्की- बहिण डांगे अण्णा कड़े पाठवली आहे ना? खरं सांगा सर.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 12/01/2015 - 12:43

Permalink

दिसायला ज़रा कमी सुन्दर आणि

दिसायला ज़रा कमी सुन्दर आणि तत्त्वज्ञानात बऱ्यापैकी पक्की
हे दोन्ही फीचर्स नेहमीच गो टुगेदर असतात का?
  • Log in or register to post comments

Submitted by pacificready on Tue, 12/01/2015 - 12:49

In reply to दिसायला ज़रा कमी सुन्दर आणि by बॅटमॅन

Permalink

चाल तीच- हट्टीकट्टी ...

चाल तीच- हट्टीकट्टी ... लुळीपांगळी ... आत्ता मुद्दा डांगे अण्णा कडे आलेल्या टंचनिकेचा आहे. कीप फोकस.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com