यार

पालीचा खंडोबा १'s picture
पालीचा खंडोबा १ in जे न देखे रवी...
27 Nov 2015 - 11:30 am

एकदा संग करूनी
गर्भास दिलास जीव
उघड्या माझ्या भाळाची
सगळेच करतात कीव |

अत्तरबुधली तनु
एकदाच हुंगलीस
अन् मलाच म्हणालास
कशी झिंगलीस ?

एकलकोंड्या रात्रीही
असती नजरपहारे
अलिप्त राहुनीही
झोंबती मज शरीरे |

ढळल्या पदराचे भान
कशी विसरली बाई
भाकड जाहल्या गाई
कसाई ओढत नेई |

अवचित स्वप्ने चळती
रात्री ओशाळलेल्या
आरश्यात नजरेच्या
उलट्याच बाहुल्या |

भंगुनी लक्ष्मणरेषेस
शरीर विटाळले
भर आमावस्येला
कुंतली केवडे माळले |

केवड्याच्या सुगंधाने
भुजंग दारी येई
बंद कवाड माझे
जिव्हा चाटत पाही |

विटाळल्या शरीरावरी
मुक्त कुंतल भार
नदिपलीकडे वाट पाही
विधवेचा यार |

विजयकुमार......................
21 / 11 / 2008

कविता

प्रतिक्रिया

रातराणी's picture

27 Nov 2015 - 11:33 am | रातराणी

बापरे! :(

रवेळरवंडोबा's picture

27 Nov 2015 - 12:37 pm | रवेळरवंडोबा

अघोरपंथी कविता! ;)

शिव कन्या's picture

27 Nov 2015 - 6:14 pm | शिव कन्या

:-) गूढ! समजण्या न समजण्याच्या धूसर रेषेवरची.
सुंदर.

पालीचा खंडोबा १'s picture

28 Nov 2015 - 11:58 am | पालीचा खंडोबा १

माणसाला मन असते आणि शरीराला भूक ह्यात अघोरपंथी ते काय ? ताकाला जावून भांडे लपवणे ह्या २१ व्या शतकात तरी शक्य नाहि. हे यथोचित चित्रण आहे त्या कोंडमा-याचे .

दमामि's picture

27 Nov 2015 - 12:38 pm | दमामि

वा!!!

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2015 - 9:22 pm | अत्रुप्त आत्मा

ठीक

जव्हेरगंज's picture

27 Nov 2015 - 9:27 pm | जव्हेरगंज

+१

थोडा बिभत्सपणा कमी केला तर एक नंबरी होतील कविता!!!!

एक एकटा एकटाच's picture

27 Nov 2015 - 9:34 pm | एक एकटा एकटाच

वेगळा विषय आहे.

प्रसाद गोडबोले's picture

27 Nov 2015 - 9:41 pm | प्रसाद गोडबोले

बरेच दिवसांनी काहीतरी नवीन प्रकारचे वाचायला मिळाले... प्रचंड पोटेंशीयल आहे आपल्या लिखाणात ... नेहमीच्याच रुटीन बाहेर जाऊन लिहिण्याची प्रचंड क्षमता दिसत आहे ह्या कवितेतुन !

क्लासिक / अभिजात हा शब्द पुढील लेखनासाठी राखुन ठेवत आहे .

पु ले शु :)

संदीप डांगे's picture

28 Nov 2015 - 10:35 am | संदीप डांगे

+१०००००

महासंग्राम's picture

28 Nov 2015 - 10:17 am | महासंग्राम

खंडूबा पावलाय… जबरदस्त झालीये कविता असच लिवत चला…

पु ले शु :)

पालीचा खंडोबा १'s picture

28 Nov 2015 - 11:50 am | पालीचा खंडोबा १

श्री जव्हेरगंज ह्यात बिभित्सपणा काय आहे ? जरा समजवाल काय ? मन मारल्या भावनेचे मोकळे चित्रण आहे . ह्यात दर्शवलेला "ताण " पाहू नका. त्रासलेले आणि ताणलेले मन पहा . बाकी सगळ्यांचे आभार . आणि महत्वाचे मी असेच लिहितो . बौतेक ते तुम्हास अशील वाटेल तसे काही शोधायचा प्रयत्न कृपा करून करू नका.

महासंग्राम's picture

28 Nov 2015 - 2:08 pm | महासंग्राम

राग मानू नका एक गोष्ट सूचना आहे. शक्यतो प्रतिसाद हे ज्या व्यक्तीने कॉमेंट केली आहे त्याच्या खाली केल्यास उत्तम राहील. कारण भविष्य काळात वाचणार्याला सुद्धा त्याचा संदर्भ समजेल….

असेच लिहिते रहा

पालीचा खंडोबा १'s picture

28 Nov 2015 - 11:55 am | पालीचा खंडोबा १

माझ्या कविता थोड्या मोकळ्या असतात तुम्हास त्या अश्लील वाटू शकतात ह्यात माझा काहीच दोष नाही असलाच तर तो अर्था चा आणि भावनांचा असेल. उगाच फुले पाने ढग ह्याना ओढून मी त्रास देत नाही त्याना. मानवी भावभावनांचे सचित्र चित्रण करतो मी. जे माझ्या जगण्याशी, समाजाशी, अवती भोवती घडणा-या घटनांशी निगडीत आहे. ते तसेच उतरते कागदावर. एकदा शब्द उतरला कागदावर मग मी तडजोड करत नाही कवितेशी. असे करणे मी प्रतारणा मानतो माझ्या कवितेची आणि त्या भावनेशी

पालीचा खंडोबा १'s picture

28 Nov 2015 - 11:58 am | पालीचा खंडोबा १

माणसाला मन असते आणि शरीराला भूक ह्यात अघोरपंथी ते काय ? ताकाला जावून भांडे लपवणे ह्या २१ व्या शतकात तरी शक्य नाहि. हे यथोचित चित्रण आहे त्या कोंडमा-याचे .

अभ्या..'s picture

28 Nov 2015 - 1:48 pm | अभ्या..

असो. छान लिहिताय.
अजून अशाच अप्रतिम लेखनाच्या प्रतिक्षेत.

यशोधरा's picture

28 Nov 2015 - 2:11 pm | यशोधरा

कविता आवडली.

चाणक्य's picture

28 Nov 2015 - 2:26 pm | चाणक्य

.

संदीप डांगे's picture

28 Nov 2015 - 4:28 pm | संदीप डांगे

कविराज,

एक उपयोगाचा सल्ला: इथे कविता टाकल्यावर गरज नसलेले एक्स्प्लेनेशन देत बसू नका. कुणी शब्दार्थ विचारले, गर्भीत अर्थ विचारले तरच प्रतिसाद टाका. कविता पाण्यासारखी असते, ज्या भांड्यात जाईल त्याचा आकार घेईल. तुम्ही अमूकच भांड्यात का टाकलं असे वाचकाला विचारू नये वा सांगू नये. कविता आणि रसिक या दोघांच्यामधे कवीने येऊ नये असे माझे व्यक्तिगत मत आहे. बघा, पटलं तर.

तुम्ही उत्तम लिहिता. अल्पावधित आपण इथे चांगली प्रतिमा निर्माण केली आहे. मनाचा मोठेपणा दाखवून तुम्हाला त्रासदायक ठरतील अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष करा. योग्य तिथे, काही गैरसमज होत असतील तर, जरूर दर्शवा. पण माझी कविता तशीच, माझी कविता अशीच असे करु नका. कविता रसिकांच्या मनात उतरली की ती कुणाची राहत नाही. सर्वांची होते.

पर्ण's picture

28 Nov 2015 - 4:33 pm | पर्ण

अगदी खरं डांगे साहेब!!

पालीचा खंडोबा १'s picture

28 Nov 2015 - 4:45 pm | पालीचा खंडोबा १

मनपूर्वक आभार. आपण सांगितलेले कायम लक्षात ठेवीन. कधीतरी असे होते कि अति उत्साहाच्या भरात माणूस नको त्या चुका करतो. मी पण माणूसच आहे. ह्यापुढे सकारात्मक विचारांनाच चालना देईन. आपल्या प्रोत्साहानाबद्दल धन्यवाद