मिपाचे एक सदस्य नाव आडनाव यांनी विनंती केल्यावरुन खरडफळ्यावर मी अपलोड केलेल्या काही गाण्यांच्या लिंक्स येथे एकत्रित स्वरुपात देत आहे. खरडफळ्यावर डस्टर फिरवल्यावर अर्थातच ते सर्व उडल्या गेले आहे. गाणी मुख्यतः वेस्टर्नच आहेत. हिंदी गाणी आपल्या सर्वांना माहीतच असतात, म्हणून नमूद करत नाही.
गाणी मुद्दाम embed न करता केवळ टेक्स्च्युल यूट्यूब लिंक्स देत आहे. त्यामुळे धागा उघडल्यानेच डाटा खर्च झाला असं नको व्हायला. ज्यांना या धाग्यात रस नाही, अशा व्यक्तिंचे त्यामुळे नुकसान होणार नाही.
प्रत्येक गाण्याचे शक्य तितके ऑफिशियल व्हर्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु जिथे ते शक्य नाही तिथे दुसरी व्हर्शन्स दिलेली आहेत. अशा वेळीस सरळ गाण्याचे शीर्षक वापरुन Wynk Music App वर गाणी शोधावीत. (सावन आणि गानापेक्षा मला Wynk जास्त चांगले वाटते.) तसेही तूनळी वर गाणे पाहण्यापेक्षा विंकवर ऐकणे जास्त परवडेल.
बरीचशी गाणी वेस्टर्न असल्यामुळे त्यात काही दृश्ये आक्षेपार्ह असू शकतात. तरी आपल्या जबाबदारीवर बघणे.
1) Jennifer Paige – Crush
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rj...
2) Sheryl Crow – Are you strong enough to be my man
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rj...
3) Sheryl Crow – You are my favorite mistake
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=video&cd=1&cad=...
4) Lene Merline – Sitting down here
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rj...
5) Darius Campbell – Colorblind
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rj...
6) Ronan Keating – Life is a rollercoaster
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rj...
7) Savage Garden – Animal
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rj...
8) Glen Mediros – Nothings gonna change my love for you
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=video&cd=3&cad=...
9) Chris De Burgh – Lady In Red
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=2&cad=rj...
10) Shania Twain – You’re still the one I love
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rj...
11) Christina Aguilera – Gennie in a bottle
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rj...
12) Cliff Richard – U r my theme for a dream
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rj...
13) Sacred Spirits – Indian Dreams
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rj...
14) Madonna – Frozen
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rj...
15) Santana – Maria Maria
https://www.youtube.com/watch?v=nPLV7lGbmT4
16) The Corrs – Only when I sleep
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rj...
इतर सदस्यांनी देखील चांगली गाणी सुचवलेली होती. ती पुन्हा येथे द्यावीत ही विनंती. गाणी नक्कीच ऐका. अगदी सर्वोत्तम आहेत. काही गाणी दुर्दैवाने फारशी प्रसिद्ध होऊ शकली नाहीत. पण अतिशय rarest gems आहेत.
प्रतिक्रिया
26 Nov 2015 - 1:40 pm | नाव आडनाव
धन्यवाद :)
26 Nov 2015 - 1:59 pm | मांत्रिक
गाणी व आर्टीस्ट यांची नावे इंग्रजीत देण्याचे कारण विंकवर शोधणे सोपे पडावे म्हणून.
26 Nov 2015 - 3:10 pm | मांत्रिक
@मांत्रिक,
तुम्हाला तुमच्या नवीन धाग्याची लिंक द्यायची असेल तर:
माझा नवीन लेख इशकजादे – ३ इथे पहा.
असं दिसण्यासाठी टेम्प्लेट :-
माझा नवीन लेख ######
वापरा आणि
*** च्या ठिकाणी धाग्याची लिंक टाका,
#### च्या ठिकाणी 'इशकजादे – ३ ' लिहिले तेच क्लिक। होते
26 Nov 2015 - 3:58 pm | बाबा योगिराज
लै भेष्ट....
आता साताऱ्याला याव लागणार... भेट घ्याविच लागणार.
26 Nov 2015 - 4:24 pm | उगा काहितरीच
याबद्दल विशेष धन्यवाद ! ;-)
26 Nov 2015 - 4:59 pm | मांत्रिक
व्हिडीयो एंबेड केला तर प्रत्येक वेळीस नवा प्रतिसाद पाहताना जास्त डाटा खर्च तर होतोच शिवाय २जी वापरणार्या मंडळींना धागा उघडणं फार वेळखाऊ होतं. हा पण मुद्दा आहे.
26 Nov 2015 - 4:29 pm | गवि
यूबी४० - किंग्स्टन टाऊन
डायर स्ट्रेट्स - वॉक ऑफ लाईफ, सल्टन्स ऑफ स्विंग्ज.
अली कॅम्पबेल - लेट युअर येह बी येह.
पॉल अंका - ब्रिंग द वाईन, डायना
रॉड स्टुअर्ट- सम गाईज हॅव ऑल द लक
डोरिस डे- परहॅप्स, परहॅप्स, परहॅप्स.
अॅबा - आय डू आय डू आय डू, निना प्रेटी बॅलेरिना
फ्रेडी मर्क्युरी - वुई विल रॉक यू, आय वाँट टु ब्रेक फ्री, लिव्हिंग ऑन माय ओन
मायकेल जॅक्सन- बिली जीन, विल यू बी देअर, दे डोंट केअर अबाउट अस, हील द वर्ल्ड
बिली जोएल : इन द मिडल ऑफ द नाईट, अपटाउन गर्ल, वुई डिडंट स्टार्ट द फायर
रॉय ऑर्बिसन - यू गॉट इट, प्रेटी वुमन
जॉन डेनवर - टेक मी होम कंट्री रोड्स
शनाया ट्वेन - क चिंग, अप
सर्व्हायवर - आय ऑफ द टायगर
टिना टर्नर - गोल्डन आय
ग्लोरिया एस्टिफन - टर्न द बीट अराउंड, रिदम इज गोना गेट यू.
26 Nov 2015 - 4:45 pm | स्वच्छंदी_मनोज
यूबी४० - कांन्ट हेल्प फॉलींग इन लव्ह
इगल्स - हॉटेल कॅलीफोर्नीया
एल्टन जॉन - फ्रेंड्स नेव्हर से गुडबाय
शायना ट्वेन - आय् म गॉना गेट्च यू गुड
ब्रिटनी - ऊप्स आय डिड इट अगेन, आय् म नॉट अ गर्ल नॉट अ वूमन
मा.जॅ. - होल्ड माय हॅन्ड
लुईस आर्म्सस्ट्राँग - व्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड
सिलीन डायॉन - दॅट्स द वे इट ईझ.
अजून बरीच आहेत जी मी आवडिने ऐकतो पण परत लिस्ट कधीतरी देईन
26 Nov 2015 - 4:53 pm | मांत्रिक
अर्र, ईगल्सचं 'हाॅटेल कॅलिफोर्निया' तर क्लासिक आहे. मी कसा विसरलो त्या गाण्याला. अप्रतिम आहे ते!
26 Nov 2015 - 4:53 pm | गवि
उत्तम गाणी. नेमक्या यापैकीच काही गायक/बँड्सची आणखी एकदोन तितकीच उत्कृष्ट गाणी इथे नोंदवतो.
यूबी४० - ब्रिंग मी युअर कप, रेगी म्युझिक, रेड रेड वाईन, कम बॅक डार्लिंग, आय गॉट यू बेब, रॅट इन द किचन
ईगल्स- लाइंग आईज, आय कांट टेल यू व्हाय, टकीला सनराईज
एल्टन जॉन- निकीता, डॅनियल, कँडल इन द विंड
शनाया ट्वेन - दॅट डोन्ट इम्प्रेस मी मच
माजॅ - गिव्ह इन टु मी, हू इज इट, थ्रिलर, स्मूथ क्रिमिनल
26 Nov 2015 - 4:57 pm | परिकथेतील राजकुमार
गाण्याचे शब्द मराठीत समजावून सांगीतल्यास आम्ही पण आनंद घेऊ.
26 Nov 2015 - 5:02 pm | मांत्रिक
त्या त्या गाण्याचे शीर्षक वापरुन व पुढे lyric हा शब्द जोडून गुगलवर शोध करा. कुठल्याही गाण्याचे लिरीक मिळेल.
26 Nov 2015 - 9:27 pm | परिकथेतील राजकुमार
गडबड न करता, तुमच्या लिखाणाचे चाहते नक्की काय प्रतिक्रिया देत आहेत ते वाचत जा ना सर. मला मान्य आहे, की तुम्ही कायम गडबडीत असणार, सतत लिखाणाचे, विविध विषयांचे विचार डोक्यात असणार. पण तरी आम्हा रसीकांना थोडा शांतपणे वेळ दिलात, तर तुमच्या ज्ञानातून आम्ही सुद्धा काही मिळव शकु.
तर सांगायचा मुद्दा काय, मी विचारले आहे :-
आता गाण्याचे शब्द आणि पुढे लिरीक्स लिहीले की सगळी लिरीक्स मिळतात हे आमच्या आलीया भटला देखील कळते. आमचा मुद्दा आहे तो आमच्या इंग्रजीच्या अज्ञानाचा आणि त्याचे ज्ञानात रुपांतर करून मिळण्याचा.
तुम्ही कळकळीने ह्या प्रश्नाकडे पहाल आणि तळमळीने मदत कराल अशी अपेक्षा आहे.
तुमच्या लिखाणाचा पंखा.
26 Nov 2015 - 9:33 pm | मांत्रिक
ठीक आहे. यातला उपहास नक्कीच लक्षात आला.
26 Nov 2015 - 9:42 pm | मांत्रिक
चला बघू या! आज काय काय आहे डोक्यात तुमच्या! करुया एंजाॅय ते पण! फुल परवानगी तुम्हाला!!!
28 Nov 2015 - 10:09 am | महासंग्राम
अगदी हसून हसून ठार मेलो
28 Nov 2015 - 11:16 am | ज्ञानोबाचे पैजार
परा आलीया वरुन तुझा माझ्यात भांडणे नकोत.
इथुन पुढे तिचा उल्लेख करताना आलीया वाहिनी असा करता जा.
पैजारबुवा,
28 Nov 2015 - 11:20 am | परिकथेतील राजकुमार
लोकं माझ्या बुद्धीवर शंका घेणार नसतील तर मी ताई पण म्हणायला तयार आहे हो दाजी. ;)
28 Nov 2015 - 11:29 am | ज्ञानोबाचे पैजार
तुझ्या बुद्धीवर शंका घेणार्यांचे घर आपण उन्हात बांधू ह परा.
(पाजी ) पैजाराबुवा,
26 Nov 2015 - 5:02 pm | गवि
यूबीचाळीस - तुझा कप मला आण, रेगी संगीत, लाल लाल वारुणी, परत ये लाडके, तू मला मिळालीस पोरी, स्वैपाकघरात उंदीर आता काय करु.
गरुड- खोटारडे डोळे, मी तुला का ते सांगू शकत नाही, मेक्सिकोतील एक प्रकारच्या मद्याचा सूर्योदय
एल्टन जॉन- निकीता, डॅनियल, वार्यात मेणबत्ती
शनाया ट्वेन - त्याने मी जास्त प्रभावित होत नाही
माजॅ - माझ्यात दे, ते काय आहे, थरारक, गुळगुळीत गुन्हेगार
26 Nov 2015 - 5:04 pm | मांत्रिक
हा हा! भारीच!
27 Nov 2015 - 12:14 am | बोका-ए-आझम
मेक्सिकोमधील एक प्रकारच्या मद्याचा सूर्योदय - ROFL!
गुळगुळीत गुन्हेगार - हे तर H.H.P.V.
26 Nov 2015 - 5:05 pm | मांत्रिक
www.azlyrics.com यासंस्थळावर बरीच लिरिक्स उपलब्ध आहेत.
26 Nov 2015 - 7:18 pm | अभ्या..
सर्वोत्तम आणि रेअरेस्ट जेम वगैरे काही नाही.
नाईन्टीजच्या सुरुवातीला टीव्ही होते पण त्यावर फक्त देशी गाण्याची भरमार असायची. रेकॉर्ड प्लेयरवर फुल्ल नदीम-श्रवणीय गाण्याचा रतीब चालू असायचा. त्या काळात अन आधी सुध्दा इंग्लिश अल्बम कॅसेट्स इझीली मिळत नसत. तरीसुध्दा काहींनी ही आवड जोपासलेली असायची. ह्यांच्यात मेडिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा भरणा अधिक असायचा. नंतर २०१० पर्यंत जसे टीव्ही अँकर शो, पीसी अन ईंटरनेटमुळे हे अल्बम सर्वांच्याच आवाक्यात आले. जेलो, क्रिस्तिना, एमजे, मॅडोना ह्यांची ही गाणी जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांकडे असायची. इकडून तिकडे हि गाणी अन आवड फिरायची. ब्रायन अॅडॅम्स वगैरेंची नंबर्स लिरिक्ससहीत माहीत असायची. ती इन थिंग होती तेंव्हा. त्याकाळात फारसे काही कळायचेही नाही ऐकणार्याला. सॉफ्ट, हार्ड अॅसिड रॉक, जाझ अन पॉप मधला फरक न कळता गाणी ऐकली गेली. आता जरा जास्त जवळ आलय जग तर पिढी इंडिअन क्लासिकलकडे नाहीतर बॉलिवुडी रॉक सिंगर कडे वळतेय. चांगलेय.
26 Nov 2015 - 7:41 pm | मांत्रिक
तुमच्या निरीक्षणात चूक काहीच नाही. फक्त एक की संगीत आवडणे हा अतिशय व्यक्तीगत विषय असल्याने त्यात माझ्या दृष्टीने 'सर्वोत्तम' व 'रेअरेस्ट जेम' असणे हा माझ्या वैयक्तिक आवडीचा अधिकार आहेच.
बाकी शास्त्रीय संगीत व हिंदी पाॅप, बाॅलीवुडी वगैरे मला आवडतेच. शास्त्रीय संगीतावर स्वतंत्र लेख मला लिहायचा आहेच. पण त्यासाठी वेळ पाहिजे. सध्या दोन कथामाला लिहीत असल्याने वेगळा वेळ काढणे शक्य नाही. पण त्यावर नक्कीच लिहायचे आहे. ही माझी आवड खफवर अनेकदा मी व्यक्त केलेली पण आहे.
तसेही शास्त्रीय संगीतावर लिहायचे तर पूर्ण अभ्यासानेच लिहीणे गरजेचे आहे.
मी स्वतः व्हायोलीन वाजवतो. थोडेफार, जास्त नाही. त्यामुळे संगीताचे कुठलेही प्रकार मला आवडतातच. भले मग ते शॅमॅनिक इंडियन ड्रीम्स का असेना.
26 Nov 2015 - 8:11 pm | अभ्या..
कसे असते साह्यबा. "लैच दुर्मिळ रत्न आहे. दिसणे सुधा मुश्कील" असे सांगत एखाद्या जोहर्यांने नक्षीदार वेल्वटेची डब्बी उघडावी अन त्यात एक सुबकशी काचेची गोटी ठेवलेली असावी असे झाले बघा. आता काच सुबक असेल पण रेअरेस्ट असेल तर असो बापडे.
आपल्या व्हायोलिन, शास्त्रीय संगीत, पॉप संगीत, खफ, लेखन अन अभ्यासाला शुभेच्छा.
.
थांबतो इथेच.
26 Nov 2015 - 8:20 pm | मांत्रिक
ठीक आहे. हेतु लक्षात आला. थांबतो इथेच मी पण. चालु द्या काय करायचे ते.
26 Nov 2015 - 9:05 pm | सतिश गावडे
ओ, नदीम श्रवणला नाव ठेवायचं नाही.
26 Nov 2015 - 8:01 pm | DEADPOOL
मांत्रिक साहेब तुम्ही ID चे नाव बदलून 'लवगुरु' करावे अशी नम्र विनंती!!
26 Nov 2015 - 8:09 pm | मांत्रिक
दुत्त दुत्त डेडपुल्या! यात फक्त संगीताचा निर्मळ मनाने आस्वाद घे रे बाबा! पैजे तर व्हीड्यू बघू नको!
26 Nov 2015 - 8:55 pm | DEADPOOL
लोळ!!!!
26 Nov 2015 - 9:37 pm | विशाल कुलकर्णी
जियो दोस्त, खजिना आहे हां !!
26 Nov 2015 - 11:25 pm | मांत्रिक
काही विशेष घडत नाहीये. दोन तीन जण फक्त वांडपणा करताहेत एवढेच. सहन करायचा प्रयत्न करतो. नाहीच झालं सहन तर इथे यायचं बंद करीन एवढंच. बाकी आपले रक्तानात्याचे लोकही वाटेल ते वागतात, बोलतात! त्याला कोण काय करू शकतो? इथं पण तोच न्याय! करु दे वांडपणा. उद्या चेक करीन. नाहीच सहन झालं तर गपचुप आपल्या विश्वात दंग राहीन. इथं येणार नाही. एवढंच.
बघूया कायकाय बोलू शकतात ते ही वांड बालके!
27 Nov 2015 - 9:06 pm | अभ्या..
परा आणि गवि ना. भलतेच वांड दोघेपण.
.
तुम्ही काही मनावर घेऊ नका त्यांचे. चेक वगैरे करा काय करायचे ते पण येत जावा. तुमच्यासारखे आयडी खरे तर रेअरेस्ट जेम आहेत मिपावर.
27 Nov 2015 - 9:08 pm | मांत्रिक
तू काय कमी वांड आहेस का अभ्या.. डांबरट बालका!!!
अरे बाबा जौ देत की! मी विसरलो पण हे सर्व!!!
27 Nov 2015 - 9:12 pm | अभ्या..
हे जिगर..
असे डायरेक्ट मनापासून बोलणारी माणसे आपल्याला लै आवडतेत. मांत्रिकभाऊ आजपासून आपण फ्यान तुमचे.
तुमच्याशी वांडपणा केला नाही, करत नाही, करणार नाही. जंटलमन्स प्रॉमीस एकदम.
27 Nov 2015 - 9:20 pm | मांत्रिक
धन्यवाद डांबरट बालका. सातारा कट्ट्याला ये एकदा. मस्त चुलीवरचे मटण बनवू. एकदा टेस्ट कर फक्त. मी सातारला गेलो तर मित्रांसोबत रानात मटण पार्टी करतो. काय झक्कास फ्लेवर येतो रे चुलीवरच्या मटणाला. खतरा स्मोकी फ्लेवर असतो. त्यासोबत मित्रांच्या गप्पा. क्लास असते रे ते वातावरण!!!
27 Nov 2015 - 10:04 pm | गवि
मी काय पाप केलंय? त्या मेल्या अभ्याला एकट्याला मटनाचं निमंत्रण..
27 Nov 2015 - 10:07 pm | मांत्रिक
आयला आय माय स्वारी बरं का? तुम्हीपण या राजे!!!
मस्त सातारी मटण बनवू!!! या साहेब एकदा!!!
27 Nov 2015 - 10:10 pm | अभ्या..
एवढ्या सगळ्यांना हौसेने आमंत्रण देताय. एक बोकड कुठला पुरायला?
हत्ती वगैरे पाहावा लागेल. ;)
हत्ती जड असतो पण तुम्ही हल्के घ्या बर्का मांत्रिकराव.
27 Nov 2015 - 10:14 pm | मांत्रिक
हा हा! अभ्या.. २ किंवा ३ बोकड कापू. हा.का.ना.का.!!!
ये फक्त!!! मग बघू!!!
27 Nov 2015 - 10:18 pm | गवि
अभ्या.. डेंजर नाय ना वाटत?!! ;-) जाऊया का?
27 Nov 2015 - 10:23 pm | मांत्रिक
आयला काय राव!!! काय गरीबाची चेष्टा करता राव!!!
अहो फक्त या सातारा कट्ट्याला...
मग सांगतो राव!!!
27 Nov 2015 - 10:32 pm | अभ्या..
संगट बुवा अणि वल्लीला घेऊ की.
26 Nov 2015 - 11:41 pm | DEADPOOL
एक की संगीत
आवडणे हा अतिशय व्यक्तीगत विषय असल्याने त्यात
माझ्या दृष्टीने 'सर्वोत्तम' व 'रेअरेस्ट जेम' असणे हा
माझ्या वैयक्तिक आवडीचा अधिकार आहेच>>>>>>>+१११११
27 Nov 2015 - 5:34 pm | शिव कन्या
धागे मांडून ठेवलेत, ते बरे झाले.
सवडीने पाहणार.
धन्यवाद मांत्रिक भौ.
27 Nov 2015 - 6:14 pm | वेल्लाभट
अनेक गाण्यांचा संचय आहे इथे
http://www.misalpav.com/node/30143
27 Nov 2015 - 6:56 pm | मारवा
मांत्रिक जी
धागा आवडला छान विषय घेतलाय.
थोडा व्हायोलीन संदर्भात एक प्रश्न होता.
आर्त उदास गाण्यांना व्हायोलीन इतकं नैसर्गिक रीत्या सुट का होत असावं ?
व्हायोलीनच्या साहाय्याने अतीशय प्रसन्न अशी काही गाणी आहेत का तुमच्या माहीतीत असल्यास सुचवावी.
आपल्याला व्हायोलीन मध्ये रस दिसतोय म्हणुन हे प्रश्न विचारलेत.
27 Nov 2015 - 7:03 pm | मांत्रिक
आता मोबल्यावर शक्य नाही. उद्या देतो माहिती.
27 Nov 2015 - 10:32 pm | अजया
धन्स मांत्रिक भाऊ.वाखुसा!
28 Nov 2015 - 11:02 am | विशाखा पाटील
धन्यवाद! वाचनखूण साठवलीये. बऱ्याचदा ही गाणी ऐकताना हिंदी गाण्यांशी मिळतीजुळती चाल सापडते.:) Stevie Wonder चे I just called to say... हे उत्तम उदाहरण...
1 Dec 2015 - 9:28 pm | मांत्रिक
काही अजून अॅडिशन्सः
१. हार्टब्रेकर बाय मरायाह कॅरीःhttp://m.youtube.com/watch?v=kMCGvtlL4fw गाणं बरंच बोल्ड आहे.
२. लास्ट ख्रिसमस बाय व्हॅम
http://m.youtube.com/watch?v=E8gmARGvPlI
३. व्हेन द गोईंग गेट्स टफ बाय बाॅयझोन
http://m.youtube.com/watch?v=zjudr5YlzuE
४. स्टक ऑन यू बाय लायोनेल रिची
http://www.dailymotion.com/video/x1m6v7q_lionel-richie-stuck-on-you-1983...
५. व्हीव्हा फाॅरेव्हर बाय स्पाईसेस.
http://m.youtube.com/watch?v=3wkuqRFXNvI
६. व्हेन टू बिकम वन बाय स्पाईसेस.
http://m.youtube.com/watch?v=6M9cSez-mY4