दाहीरची यमदिक्षा

पालीचा खंडोबा १'s picture
पालीचा खंडोबा १ in जे न देखे रवी...
24 Nov 2015 - 2:19 pm

चुका वांझोट्या नसतात
कधीनाकधी त्या
प्रसवतात
भूतकाळातील पातके
मग
सारे जगणे
यातनामय होवून जाते.

गलितगात्र असे जगणे
मोहपाशात गुरफटलेले,
सतत भूतकाळाची
सावली घेवून नाचणारे,
सारे थरारून जाते
अन
सुन्न पडते.

बाणासारखा अंधार
छेदुन चिवडलेला काळोख
त्याच्या चित्रविचित्र
मुर्त्या होवून नाचतात
अन घेवून जातात
त्या अनाकलनीय जगात
जिथे
मानवाचे प्रथम वंशज
प्रत्येक भयाण वस्तूला
देवत्व देत होते.

मग संस्कृतीपाठोपाठ
हाव आली
त्याचाच परिपाक
आक्रमणे,
प्रत्येक संस्कृतीवर
बलात्कार होवून
अनौरस वंशाचे ओझे
वाढत राहिले,
त्यात शेवटची आहुती
दाहीरची पडली
मग
सारेच दाहीर होत राहिले.

संस्कृती अन धर्म
त्यागाताना भोगलेल्या
यमयातना
वंशास यमदीक्षा
देवून गेल्या,
मग कत्तलींचे खेळ
पोरखेळ वाटू लागले,
आक्रमक धर्माचे वरवंटे
भरडू लागले
आदिम अनंत जगणे.

तक्षशिला नालंदेच्या
ढिगा-यात
कित्येक ज्ञानाच्या
अर्भकांची आहुती
पडली
रक्तात भिजल्या पुनरुत्थानास
पुन्हा कधी
मोड आलेच नाहीत.
सारे जराजर्जर होवून राहिले.

पुन्हा सांगतो
चुका वांझोट्या नसतातच !
मूळमाती विसरून
आभाळाला धर्म समजणारे
सारे हिजडे
टाळ्या वाजवू लागतात

नपुंसक संस्कृतीरक्षक
फक्त पहात राहतात
विनाश
ज्यात त्यांचे पूर्वजही
कधीतरी सामील होते.

विजयकुमार.........

२३ / १० / २०१०, मुंबई

कविता

प्रतिक्रिया

बरं लिहीलंय, बानु-म्हाळसा काय म्हणतायेत? बानुबाईंचा नवीन टॅब कसाय?

पालीचा खंडोबा १'s picture

24 Nov 2015 - 2:25 pm | पालीचा खंडोबा १

बानू बरी हाये बागा आन म्हळसा भांडती बागा सदा न कदा

सस्नेह's picture

24 Nov 2015 - 2:51 pm | सस्नेह

त्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तुम्ही जेजुरी सोडून पालीला येऊन र्‍हायलाय वाट्टं ?

पालीचा खंडोबा १'s picture

24 Nov 2015 - 2:22 pm | पालीचा खंडोबा १

दाहीर हा सिंध प्रांताचा शेवटचा राजा होता त्याची हत्या करून मुहम्मद बिन कासीम ने अरबी सत्ता व इस्लाम भारतात आणला.

तात्याराव मस्त लिहिलेय :D

पालीचा खंडोबा १'s picture

24 Nov 2015 - 2:52 pm | पालीचा खंडोबा १

आहो आम्ही तात्या नाहीच आणि भरीस राव कशाला उगाच पंत पडले नि राव चढले हि म्हण आठवली

पर्नल नेने मराठे's picture

24 Nov 2015 - 3:01 pm | पर्नल नेने मराठे

ओके

पालीचा खंडोबा १'s picture

24 Nov 2015 - 3:13 pm | पालीचा खंडोबा १

नेने बाई कश्या आहात

दमामि's picture

24 Nov 2015 - 3:07 pm | दमामि

वा!

देव मासा's picture

25 Nov 2015 - 3:07 am | देव मासा

सुरेख ,

मोगा's picture

25 Nov 2015 - 6:05 am | मोगा

तक्षशिला नालंदेच्या
ढिगा-यात
कित्येक ज्ञानाच्या
अर्भकांची आहुती
पडली
रक्तात भिजल्या पुनरुत्थानास
पुन्हा कधी
मोड आलेच नाहीत.
सारे जराजर्जर होवून राहिले..

.....

आमची तक्षशिला अ नालंदा त्या आक्रमक धर्मानी जाळली हो ! त्यात सगळे आमचे सगळे ज्ञान जळाले बघा !

च्यायला ! त्या सगळ्या ज्ञानाच्या अजुन चार पाच कॉप्या काढून उर्वरीत भारतात ठेवाव्यात एवढी अक्कल नव्हती का ? सगळे ज्ञान एकाच लायब्ररीत भरून ठेवले होते म्हणे !

मोगा's picture

25 Nov 2015 - 7:40 am | मोगा

प्राचीन भारतीयानी विमानाचा शोध लावला होता म्हणे.

त्यापेक्षा झेरॉक्स मशीनचा शोध लावला असता तर ते सत्कारणी लागले असते.

बोका-ए-आझम's picture

25 Nov 2015 - 9:49 am | बोका-ए-आझम

तुम्ही एवढ्या डू आयडींचा शोध लावलात ना? कसले असुरक्षित सहिष्णू हो तुम्ही!

मोगा's picture

25 Nov 2015 - 9:58 am | मोगा

आमची नालंदा तक्षशीला दुष्ट आक्रमकानी जाळली तेंव्हा सहा की दहा दिवस जळत होती म्हणे.

त्यात विमानविद्येचे पुस्तक जळले हो !

च्यायला ! विमानविद्या , ब्रह्मास्त्र असले शोध लावत बसले ! बोअर वेल , फायरब्रिगेडची गाडी यांचे शोध लावले असते तर ते सत्कारणी लागले असते की.

जातवेद's picture

25 Nov 2015 - 12:31 pm | जातवेद

मोड आले कि आम्ही ते खाऊन टाकतो.

साहिरसारखं वाटतय.

गुगलवरदेखील अरेबिक नाव दाखवतय.

अत्रुप्त आत्मा's picture

25 Nov 2015 - 10:11 am | अत्रुप्त आत्मा

पांडू मोड़ ऑन

छाण काव्य

पांडू मोड़ ऑफ

पालीचा खंडोबा १'s picture

25 Nov 2015 - 11:33 am | पालीचा खंडोबा १

दाहीर राजा होता सिंध प्रांताचा त्याची वाईट रीतीने हत्या करण्यात आली आणि मग प्रचंड कत्तली करून दहशत माजवून आक्रमकांनी त्याचा धर्म तिथे प्रस्थापित केला. हा आकांत आहे तेव्हा पासून चालत आलेल्या आक्रोशाचा

आक्रमकांनी त्याचा धर्म तिथे प्रस्थापित केला. हा आकांत आहे तेव्हा पासून चालत आलेल्या आक्रोशाचा

हे विधान असहिष्णू आहे!

मोगा's picture

25 Nov 2015 - 12:44 pm | मोगा

तो युद्धात जिंकला होता.

शिवाय त्या दाहिरविरुद्ध अनेक बहुजन लोक मुसलमानाना मिळालेल्या होते. तेही सगळे दुष्ट का ?

चैतन्य ईन्या's picture

25 Nov 2015 - 6:36 pm | चैतन्य ईन्या

थोडा इतिहास खरच जाणून घ्या मोगा. तसेही तुम्ही पूर्वीचे हितेस आहात बहुदा. तेंव्हा अल्ला तुम्हाला प्र्यारा आहेच. तर असे आहे जनाब कि तुमच्या पैगंबराची इहलोकीची यात्रा ज्या दिवशी संपली त्यादिवशी तुमचा धर्म संपला. त्याचे पार्थिव पडलेले असताना अरब लोकांच्यात उत्तरधिकारावरून भांडणे झाली. शेवटी तुमच्या पैगंबराच्या फ्यामिलीला परागंदा व्हावे लागले बरे. नुसते परागंदा नाहीतर त्याचे निम्मे खानदान तिकडे संपले. उरलेले पाळले आणि त्यांना दाहीर राजाने संरक्षण दिला. थोडक्यात हिंदूंनी तुमच्या इस्लामला आश्रय दिला. त्या खानदानाला संपण्यासाठी तुमचा अति आदर्श सेनापती कासिम आला आणि त्याने दहीरला हालहाल करून मारले. तेंव्हा जरा इतिहासत डोकवा आणि जमत असेल तर उगाचच कड्या करणे थांबवा.

असं कुणी संपला म्हणून धर्म संपत नाही.

ती गोष्ट वाचून मला तर बै सुग्रीव वाली व तुमचे प्रभू आठवले !

गादीचा उत्तराधिकारी कोण हे त्यांचे वारस लढुनच ठरवत होते त्या काळात . मग ते वाळवंटातील घराणं असो वा हस्तिनापूर वा कुठले किल्लेदार घराणं असो, तो आमचा विषय नाही.

चैतन्य ईन्या's picture

25 Nov 2015 - 7:30 pm | चैतन्य ईन्या

तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. मुदलात तुम्हाला फक्त तुम्हाला पाहिजेल तेच बरोबर वाटत असते. नवीन फार काही जाणून घ्यायची इच्छा नाहीये. फक्त कड्या टाकत हिंडायचे आहे. असो. थोडक्यात तुम्हाला बाकीच्यांचा रक्तपात मान्य आहे तर. किंवा तेच जास्त आवडते.

अहो कुणाला समजवताय इतिहास कोळुन प्यालाय त्यानी म्हणून त्याना आशा उलट्या होतात इतिहासाच्या

मोगा आणि मंडळी(डुआयडी) एकदा खरा इतिहास सांगणारी लेखमाला लिहूनच टाका

पैसा's picture

25 Nov 2015 - 11:42 am | पैसा

प्रतिमांच्या जंजाळात सापडू नका. चांगले लिहिता.

दाहिर, सिंध असे काही शब्द वापरले की मोगा लोहचुंबकासारखे आकर्षित होतात, मग भले ती कविता का असेना! तेव्हा सगळे प्रतिसाद कवितेवरच असतील याची गॅरंटी नाही. तुम्हालाही तशी अपेक्षा दिसत नाही हे छान आहे.

मोगा's picture

25 Nov 2015 - 12:40 pm | मोगा

प्रतिसाद कवितेतील विषयावरच आहेत.

उत्तरं देणं तुम्हाला सोयीस्कर नाही म्हणून प्रश्नच चुकीचा ठरवू नये.

किती हा इंटॉलरनस !

पैसा's picture

25 Nov 2015 - 1:07 pm | पैसा

चला, कै तरी परत करा बघू णिषेध म्हणून!

बोका-ए-आझम's picture

25 Nov 2015 - 6:01 pm | बोका-ए-आझम

लगेचच अक्कल परत केलीय की. तुम्ही पण फार अपेक्षा ठेवता पैतै लोकांकडून!

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Nov 2015 - 6:48 pm | कैलासवासी सोन्याबापु

सगळे आयडी घ्या परत त्यांचे!

बबन ताम्बे's picture

25 Nov 2015 - 6:56 pm | बबन ताम्बे

त्यांचे प्रतिसाद विनोदी असतात. खूप मनोरंजन होते. कुणीतरी विनोदी लिहीणारे हवेतच ना मिपावर. :-)

बबन ताम्बे's picture

25 Nov 2015 - 6:57 pm | बबन ताम्बे

.

पालीचा खंडोबा १'s picture

25 Nov 2015 - 12:33 pm | पालीचा खंडोबा १

माफ करा मी कोणत्याही प्रतिमांच्या जाळ्यात अडकलो नाही मी एक कवी आहे जे सुचते ते लिहितो त्यामुळे गैरसमज नसावा

जव्हेरगंज's picture

25 Nov 2015 - 6:37 pm | जव्हेरगंज

ड्यांजर लिहिलयं!!!
आवडलं आवडलं!!!
असं काहितरी पाहीजेच होतं मिपावर!!
येऊ द्या!!

चाणक्य's picture

26 Nov 2015 - 4:43 am | चाणक्य

पहिल्या कडव्यात जबरदस्त पकड घेतली होतीत पण नंतर ती जरा सैलावल्यासारखी वाटली मला.

अजून एक सुचवू का ? मुक्तछंदात यतिभंग वगैरे प्रकार नसला तरी ओळ अचूक ठिकाणी तोडावी लागते. ती जागा तुमच्या कवितेचा विषय, तुम्हाला अपेक्षित असणारा वाचनाचा वेग, परिणाम ई. वर ठरते. चुकीच्या ठिकाणी तोडलेल्या ओळीमुळे कवितेच्या नैसर्गिक प्रवाहीपणात अडथळा येऊ शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर या तुमच्या ओळी:-

बाणासारखा अंधार
छेदून चिवडलेला काळोख

यात मला वाटतं तुम्हाला अंधाराला बाणाची उपमा द्यायची नाहीये. अंधार बाणासारखा नाहीये तर बाण जसा छेदतो तसा अंधार छेदला आहे. पण वाचताना 'बाणासारखा अंधार' हे दोन शब्द एका दमात वाचल्याने आणि त्यानंतर ती ओळ तिथेच तोडल्यामुळे तसं वाटतंय.

चु.भु.द्या.घ्या.

शिव कन्या's picture

27 Nov 2015 - 6:17 pm | शिव कन्या

मी ही अशीच अडखळले.

पण कविता अतिशय आशयपूर्ण. आवडली.

मितान's picture

26 Nov 2015 - 6:25 am | मितान

कविता आवडली.
चाणक्याशी सहमत.
मुक्तछंद 'वाचताआला' तरच प्रभावी ठरतो. तो कसा वाचायला लावायचा हे कवीने सांगायचे असते.
अजून लिहा.

चांदणे संदीप's picture

26 Nov 2015 - 12:29 pm | चांदणे संदीप

मुक्तछंद 'वाचताआला' तरच प्रभावी ठरतो. तो कसा वाचायला लावायचा हे कवीने सांगायचे असते.

येग्झ्याटली!

मुक्तछंद याचसाठी घातकी प्रकार आहे! लिहिणार्याला लिहिताना सगळे लख्ख दिसते असते, कळत असते पण वाचणार्याला कळेलच असे नाही. मुक्तछंदातले लिखाण तसेच बर्याच उपमांचा मारा करून केलेले काव्य हे सर्वसामान्य वाचकांना कविता/साहित्य यांपासून दूर घेऊन जायला यामुळेच कारणीभूत ठरतात!

(मुक्तछंदापासून जरा अंतर राखून लिहिणारा)
Sandy

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Nov 2015 - 2:17 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मुक्तछंदातले लिखाण तसेच बर्याच उपमांचा मारा करून केलेले काव्य हे सर्वसामान्य वाचकांना कविता/साहित्य यांपासून दूर घेऊन जायला यामुळेच कारणीभूत ठरतात!

नाय हं नाय हं असं नाय हं...

रचना आवडली. ठळक आणि थेट..

चांदणे संदीप's picture

26 Nov 2015 - 2:59 pm | चांदणे संदीप

तुम्ही मिसळलेले आहात त्यामुळे तुम्हाला

रचना आवडली. ठळक आणि थेट..

आम्ही सर्वसामान्य वाचक... आमच्या तर डोक्यावरून गेली! :)

पालीचा खंडोबा १'s picture

26 Nov 2015 - 11:28 am | पालीचा खंडोबा १

दाहीरने पैगंबर मोहम्मद ह्याचा वारसांना आश्रय दिला हे हि खरे परतू अरंबाना व्यापारासाठी त्यांच्या व्यापा-यांसाठी सुरक्षित तळ हवा होता. तेव्हा श्रीलंकेच्या बेटावर चाचे असत ते नेहमीच अरब व्यापा-यांचे लूट करून नुकसान करत. त्यावेळेच्या बादशहाने दाहीरकडे ह्या व्यापा-यांच्या संरक्षणाची मागणी केली. त्यास दाहीर ने उत्तर दिले कि माझ्या धर्मात समुद्र लांघने वर्ज्य आहे . भूमीवर मी त्यांचे संरक्षण करू शकतो परंतु समुद्रात नाही. ह्यावरून एक लढाई झाली त्यात दाहीर हरला. तह झाला परंतु व्यापा-यांच्या सुरक्षेत काही फरक पडला नाही. पुढे मोहम्मद बिन कासीम ने आक्रमण करून सिंध प्रांत बळकावला. दाहीर शर आला असतानाही त्याचे मुंडके धडावेगळे केले गेले. ते बादशहास भेट म्हणून पाठविण्यात आले. आणि अन्वनित अत्याचार आणि कत्तली घडवून लोकांचे धर्मांतरण करण्यात आले. हा झाला इतिहास. कृपया ह्यास कोणी धार्मिक वळण देवू नये. जे माझ्याकडे वारसाहक्काने आले ते मी ह्या कवितेत मांडले आहे. पुढे काय घडले हे सगळ्यास ज्ञात आहे. तक्षशिला , नालंदा जाळण्यात आल्या कारण एकाच आमच्या धर्मात असले ज्ञान नाही आणि पर धर्मा विषयी द्वेष . कन्नड लेखक एस एल भैरप्पा ह्याची सार्थ नावाची कादंबरी वाचावी त्यात त्यांनी ह्या विषयी लेखन केले आहे. कृपया एक लक्षात घ्या सिंध दाहीर हे विषय किंवा शब्द मी लोकांचे ध्यान आकर्षित करण्यासाठी वापरले नाहीत . कवितेखाली ती ज्या दिवशी लिहिली गेली त्याची तारीख पण आहे. ह्याआधी हि कविता ओर्कुट वर काव्याजली आणि मराठी कविता ह्या साईट वर प्रसिध्द झाली आहे. धन्यावाद