चाललो मी आता टॅम्पोत बसुनी
खाऊनी मिसळ, आनंदाने
वर्षाव फुलांचा होई तिन्ही लोकी
टाकुन गियर, भक्तिभावे
सांगा रे सांगा रे जाऊ कुठे आता
फिरुनी गावे, दमला जीव
काढुनी तलवार हे द्वंद्व माजे
पेटवुनी दिले, रान सारे
नाही रे नाही रे आता भिती कसली
भिडलो मी साक्षात, यमराजाशी
काढा रे टॅम्पो बसतो मी तयात
जाऊद्या आता, काढीतो लक्तरं
शोधिला मी स्वर्ग सुनासुना
टाकितोय तेथे, आयटमबॉम्ब
येईल परतोनी नव अवतार
घेऊनी विरझन, कहर कहर
-घंटेश
प्रतिक्रिया
23 Nov 2015 - 10:15 pm | सागरकदम
मस्त
आजची स्वाक्षरी काय होणार राकू चे ?
23 Nov 2015 - 10:20 pm | वडाप
अरारा.मिसळपाव खउन चाल्ला टिंपोतून? हुंडाशिटी नाय आणली? त्येबी कारतिकी येकादशीला.लई पुण्यावान तुमी.
यावा हिकडं कुरडुच्या वाडीला.--
वडाप चालक-मालक संघटना .कुरडुची वाडी.
23 Nov 2015 - 11:10 pm | आदूबाळ
निघालो घेऊन । टेम्पोची मालकी ।।
मिपा भाग्यवान । आनंदनिधान ।।
गेले ते घेऊन । टेम्पोची मालकी ।।
23 Nov 2015 - 11:15 pm | आदूबाळ
धाग्यांची आरास । माज मखमली ।।
त्यातच वादांची । चरचरीत फोडणी ।।
कीबोर्डात गंगा । जाहली बोलकी ।।