भावना दुखावणे

यनावाला's picture
यनावाला in काथ्याकूट
20 Nov 2015 - 1:31 pm
गाभा: 

"मंत्रसामर्थ्य " या लेखामुळे काही वाचकांच्या भावना दुखावल्या असतील तर त्या सर्वांची मी क्षमा मागतो. या भावना दुखावण्यावर अधिक विचार केला. भावना का दुखावतात?
माणूस हा मूलत: तर्कनिष्ठ प्राणी आहे. (मॅन इज अ रॅशनल अ‍ॅनिमल) प्रत्येकाला तर्कबुद्धी असते. (मतिमंद अपवाद). कुतूहल असते. त्यामुळे तो निसर्गाचे निरीक्षण करतो. घटनांवर विचार करतो. त्यातून अनुभव मिळतो. त्याने अनुभव-विवेक (कॉमनसेन्स) येतो. त्याचा उपयोग व्यावहारिक जीवनात होतो. पण देवा-धर्माचे संस्कार बालपणापासून मनावर बिंबवलेले असतात. त्यात आई-वडील, शिक्षक, समाज, प्रसारमाध्यमे इत्यादींचा सहभाग असतो. बालपणीचे संस्कार दृढ असतात. भांड्यावर ठोक-ठोकून कोरलेले नाव जसे सहजी पुसता येत नाही तसे बालमेंदूवर झालेले संस्कार पुढे सहजीं पुसले जात नाहीत. मुलगी मोठी होते. मग आपल्यावर बालपणी झाले तसे संस्कार ती आपल्या मुलांवर करते. असे पिढ्यानुपिढ्या चालते. या संस्कारांमुळे श्रद्धा निर्माण होतात. त्या मुख्यत्वेकरून देव, धर्म, आत्मा, पुनर्जन्म इ.संबंधी असतात. श्रद्धेमुळे तर्कबुद्धी ठप्प होते. जे धर्मग्रंथांत आहे, धर्मगुरू सांगतात ते सर्व खरे मानण्याची मानसिकता बनते. याचा गैरफायदा घेऊन समाजातील लबाड लोकांनी ज्योतिष, मुहूर्त, भाग्यरत्‍ने, ग्रहांचे खडे, वास्तुशास्त्र अशा अनेक गोष्टी निर्मून त्या देवा-धर्माशी जोडल्या. त्यामुळे श्रद्धाळू त्यांना बळी पडतात. हे विषय सोडले तर अन्य क्षेत्रांत श्रद्धाळूंची तर्कबुद्धी चांगली चालते. समजा त्यांच्या वाचनात पुढील मजकूर आला:--

"मूर्तीची समंत्रक प्राणप्रतिष्ठा केली की तिथे देवतत्त्वाचा संचार होतो,असा समज रूढ आहे. पण त्याचा अनुभव कधी आला आहे का? प्रचीती कधी दिसली आहे का? मूर्तीच्या समक्ष दानपेटी फोडली. देवीच्या अंगावरचे दागिने चोरले, मुकुट पळविला, दिवेआगर येथील मंदिरात चोरटे शिरले, प्रतिकार करणार्‍या रक्षकाला जीवे मारून सुवर्ण-गणेश चोरला, देवाने निष्ठावंत सेवकाला वाचवले नाही. या सत्य घटना आहेत. यावरून कोणता निष्कर्ष निघतो? देवमूर्तीत काही सामर्थ्य आहे असे दिसते का? प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपल्या मनाशी विचार करावा."

हे वाचल्यावर श्रद्धाळूंच्या भावना दुखावतात. ज्याची सत्यता कुणाही सुबुद्ध व्यक्तीला पटावी असे सत्य सुसंस्कृत भाषेत निदर्शनाला आणल्यावर श्रद्धाळूंच्या भावना का दुखावतात? मूर्तीमध्ये देवत्व असते ही श्रद्धा अतूट असेल तर हे विधान त्यांना हास्यास्पद वाटायला हवे. असे लिहिणार्‍याची त्यांनी कीव करायला हवी. ज्यात एकही अपशब्द, असभ्य, असंसदीय शब्दप्रयोग नाही, तसेच कुणाचे चारित्र्यहनन नाही, असे अभिव्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. तेव्हा श्रद्धावंतांच्या दृष्टीने निरर्थक असलेल्या लेखनाकडे त्यांनी दुर्लक्ष करावे. मग भावना का दुखावतात? मला वाटते श्रद्धाळूंनी असे लेखन वाचले की त्यांच्या उपजत तर्कबुद्धीमुळे लेखातील तर्कसंगत युक्तिवाद आणि निष्कर्ष त्यांना पटतात. ते योग्य आहेत असे बुद्धीला वाटते. पण बालपणापासून जोपासलेल्या श्रद्धेचा त्याग करायला भावना तयार होत नाही. मग बुद्धी आणि भावना यांच्या द्वंद्वांत ते सापडतात. हे खरे मानावे का ते याचा निर्णय होत नाही. ते अगतिक होतात. आपले काहीतरी चुकते आहे हे कळते. पण वळत नाही. मन प्रक्षोभित होते. उद्विग्न होते. मग "या लेखामुळे आमच्या भावना दुखावल्या." असे ते म्हणतात. ज्या लेखातील विचार सुसंस्कृत शब्दांत मांडलेले आहेत, ज्यातील विधाने वस्तुस्थितिदर्शक म्हणजे सत्य आहेत, ज्यात चारित्र्यहननाच्या हेतूने वृथा दोषारोप केलेले नाहीत, ते लेखन आपल्याला कितीही कटु आणि अप्रिय वाटले, तरी तो अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आविष्कार आहे हे समजणे योग्य ठरेल. त्या लेखनावर टीका करावी. मात्र टीकेत लेखनशुचिता अवश्य पाळावी.

प्रतिक्रिया

काय याना काका वेळ जात नाहीये वाटत हल्ली :)

संदीप डांगे's picture

20 Nov 2015 - 1:48 pm | संदीप डांगे

जौदे हो, त्यांच्या भावना दुखवतील्ल..

प्रचेतस's picture

20 Nov 2015 - 1:38 pm | प्रचेतस

अगदी सहमत.

गॅरी ट्रुमन's picture

20 Nov 2015 - 1:41 pm | गॅरी ट्रुमन

सहमत आहे. जरा खुट्ट वाजलं तरी दुखावल्या जातील अशा भावना कचकड्याच्या नकोतच.

माणूस हा मूलत: तर्कनिष्ठ प्राणी आहे. (मॅन इज अ रॅशनल अ‍ॅनिमल)

याविषयी मात्र मतेमतांतरे नक्कीच आहेत. इज मॅन रिअली अ रॅशनल अ‍ॅनिमल यावर डॅनिएल कॅनेमान आणि रिचर्ड ट्रॅव्हस्की यांनी केलेल्या प्रयोगांविषयी वेळ मिळेल तेव्हा एक लेख मिपावर जरूर लिहायचा आहे.

मृत्युन्जय's picture

20 Nov 2015 - 1:44 pm | मृत्युन्जय

अवघड आहे.

भाऊंचे भाऊ's picture

20 Nov 2015 - 1:49 pm | भाऊंचे भाऊ

संदीप डांगे's picture

20 Nov 2015 - 1:50 pm | संदीप डांगे

काका,

गाय दूध देते. पण गाय कापून बघितली तर आत दूध नसते. असे का?

प्रसाद१९७१'s picture

20 Nov 2015 - 1:56 pm | प्रसाद१९७१

हे वाचल्यावर श्रद्धाळूंच्या भावना दुखावतात. ज्याची सत्यता कुणाही सुबुद्ध व्यक्तीला पटावी असे सत्य सुसंस्कृत भाषेत निदर्शनाला आणल्यावर श्रद्धाळूंच्या भावना का दुखावतात? मूर्तीमध्ये देवत्व असते ही श्रद्धा अतूट असेल तर हे विधान त्यांना हास्यास्पद वाटायला हवे.

हा प्रश्न चुकीचा आआण, उद्धट आहे आणि अतिशहाणपणाचा आहे. हे बघा

१. सत्यता "सुबुद्ध" व्यक्तीला पटावी - म्हणजे वाचणार्‍याला ती पटली नाही तर तो निर्बुद्ध किंवा कुबुद्धी. वा रे वा!!!
२. दुसरे म्हणजे, कोणी कोणा बद्दल लिहावे च का? कोणी माणुस आपल्या घरात दार-खिडक्या बंद करुन नागडा बसेल, तू ( इथे तू म्हणजे यना वाला नाहीत तर हे दिडशहाणे लोक ) कोण सांगणार त्याला की कपडे घाल म्हणुन.

यनावाला - आधी हे स्वताला मी हत्ती वर बसलोय आणि बाकी मूर्ख लोक अनवाणी फिरतायत हे हे समजणे सोडा. तुम्हाला ती लोक अनवाणी फिरतायत असे वाटते पण त्यांना तुम्ही हत्ती वर नाही तर गाढवावर बसला आहात ( आणि ते पण उलटे ) असे वाटतय.

संदीप डांगे's picture

20 Nov 2015 - 2:17 pm | संदीप डांगे

सहमत,

म्हणजे अगदी सुसंकृत भाषेत कुणी कुणाला आईवरुन शिव्या घातल्या तर राग का येतो बॉ असे म्हणण्यासारखं आहे. मुळात "तू शिव्या घालतोच का?" हा प्रश्न साफ विसरून जायचा आणि भाषेच्या शुद्धतेबद्दल व सुसंस्कृतपणाबद्दल व्याख्यान झोडायचे. व्वा रे वैज्ञानिक विचारपद्धती. मान गये,

कविता१९७८'s picture

20 Nov 2015 - 2:31 pm | कविता१९७८

लेखन पटतय पण ते ही तुमच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे लिहिलं गेलय असं वाटतय नाहीतर या स्पष्टीकरणाची गरजच नव्हती, आपण कुठल्यातरी एकाच मतावर ठाम राहावे , एखादे मत मांडावे आणि त्याविरुद्ध प्रतिसाद आले की त्याचे स्पष्टीकरण द्यावे किंवा माझे मत कसे खरे आहे यासाठी प्रयत्न करावे याला काहीच अर्थ नाही असे माझे वैयक्तिक मत. या विषयाचा तुमचा स्वतंत्र धागा आला असता तर जास्त आवडले असते.

मांत्रिक's picture

20 Nov 2015 - 2:52 pm | मांत्रिक

उत्कृष्ट प्रतिसाद
+१११११११११११

मारवा's picture

20 Nov 2015 - 4:29 pm | मारवा

ते संवादाच्या स्तराची एका विशीष्ट पातळीची अपेक्षा करत आहेत.
भावना का दुखावतात याचा प्रामाणिकपणे ते शोध घेत आहेत.
या शोध घेण्यातुनच व हा मुद्दा वेगळा धागा काढण्याइतपत त्यांना महत्वाचा वाटतो
हेच त्यांची संवेदनशीलता व गंभीरता दाखवुन देत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Nov 2015 - 2:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत. लिहित रहा हो.

-दिलीप बिरुटे

मारवा's picture

20 Nov 2015 - 5:00 pm | मारवा

जो तुम को हो पसंद वही बात कहेंगे
तुम दिन को अगर रात कहो, रात कहेंगे

मला वाटते श्रद्धाळूंनी असे लेखन वाचले की त्यांच्या उपजत तर्कबुद्धीमुळे लेखातील तर्कसंगत युक्तिवाद आणि निष्कर्ष त्यांना पटतात. ते योग्य आहेत असे बुद्धीला वाटते. पण बालपणापासून जोपासलेल्या श्रद्धेचा त्याग करायला भावना तयार होत नाही. मग बुद्धी आणि भावना यांच्या द्वंद्वांत ते सापडतात. हे खरे मानावे का ते याचा निर्णय होत नाही. ते अगतिक होतात. आपले काहीतरी चुकते आहे हे कळते. पण वळत नाही. मन प्रक्षोभित होते. उद्विग्न होते. मग "या लेखामुळे आमच्या भावना दुखावल्या." असे ते म्हणतात.

अत्यंत मार्मिक विश्लेषण !

एक तर्काला ते पटलेले असते मात्र कंडीशनींग मराठी शब्द संस्कारबद्धता ही फार खोलवर झालेली असते. हा मुळ राग आपण आजवर जोपासलेल्या श्रद्धेतला फोलपणा समजल्यातुन उदभवत असावा हे खर आहे. कॉग्नीटीव्ह डिसोनन्स् चे संशोधन ही या संदर्भात बघणे उपयुक्त आहे.

यातील बहुतांशी विरोध साधारण असा असतो.

काही वेळा अत्यंत नकारात्मक पातळीवर भाषा शब्द संबोधन करुन होते ,त्यानंतर जोरदार तर्काच्या बाजुने मोठा प्रयत्न, तो वाया गेल्यावर मग एक वेगळीच भुमिका असते तो म्हणजे एक प्रकारची आम्ही काय बाबा अशेच त्यात एक छानसा तुच्छतावाद असतो. प्रत्येकवेळी तो तर्क मानेलच असे नाही. काही वेळा संभाव्य तर्काच्या भीतीने ही प्रतिरोध होतो.
एक अत्यंत अभ्यासनीय प्रतिसाद श्री. मांत्रिक यांचा प्रातिनीधीक स्वरुपाचा असा आहे.

हो, काही ठिकाणी आध्यात्मिक अर्थ सरळसरळ दृग्गोचर होतो. काही ठिकाणी व्यावहारिक दृष्टांत असू शकतात, असतीलच असे नाही. कारण मुळात ज्ञा.कालीन मराठीचा अर्थ चटकन लक्षात येत नाही. ज्ञानेश्वरांचे एकूण साहित्य पाहता व त्यांचे एकूण व्यक्तीमत्व अभ्यासता माऊली जातभेद व लिंगभेद या गोष्टींचा पुरस्कार करत असतील असे मला तर मुळीच वाटत नाही. आपण काटछाट किंवा फेरबदल करण्यापेक्षा जे उपलब्ध आहे त्याचा अभ्यास करुन माऊलींना खरंच कोणता अर्थ अमिप्रेत आहे हे माझ्याप्रमाणे पाहिले पाहिजे. तशी दृष्टी ठेवली तर माऊलींच्या साहित्याचा खरा गहन आध्यात्मिक अर्थ समोर येईल व आपणांस एक नवीनच आनंद प्राप्त होईल.
बरे काही आक्षेपार्ह दिसले तरी ते प्रक्षिप्त असू शकते याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. अशा गोष्टीकडे खरा साधक तरी दुर्लक्षच करेल. समजा प्रक्षिप्त नसले तरी त्या काळच्या लोकसमजुती स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी, त्याच्यावर भर देण्यासाठी केवळ उदा.मात्र वापरलेल्या असू शकतात. त्याला माऊलींचा पाठिंबा आहे असा अर्थ होत नाही.
आता पाहू बाकीचे सदस्य काय मत व्यक्त करतात. मी एकटा तरी किती बोलू?

ज्ञानेश्वरांचे एकूण साहित्य पाहता व त्यांचे एकूण व्यक्तीमत्व अभ्यासता माऊली जातभेद व लिंगभेद या गोष्टींचा पुरस्कार करत असतील असे मला तर मुळीच वाटत नाही.

तर्क काहीच नाही मला वाटते मला वाटत नाही इतकचं पुरेसं आहे, एक महत्वाचा दोष म्हणजे आर्बीट्ररीली सगळ विधान असतं हम कहे सो सच हम कहे सो कायदा किंवा बाबा कहे सो सच बाबा कहे सो कायदा. थोडी लव्हर्स लॉजिक ची अपेक्षा असते. दुसरी शैली म्हणजे तुमची लायकी नाही (अ‍ॅड होमीनेम ) तिसरी भुमिका म्हणजे माझी लायकी नाही ( एक गंमत आहे समजा माझी मुल्यमापनाची लायकीच नाही क्ष या व्यक्तीची यात उघडपणे एक बाजु घेतलेली आहे की क्ष व्यक्ती इतकी पुज्यनीय आहे की मला त्याचे मुल्यमापनही करणे शक्य नाही. यावर साधा प्रतिवाद म्हणजे जर मुल्यमापन करण्याची लायकीच नाही मुळात तर या निर्षणावर कसे आलात ? की क्ष व्यक्ती योग्य च आहे. हे येणं वरील सारखं मला वाटत मला वाटत नाही बस.

आपण काटछाट किंवा फेरबदल करण्यापेक्षा जे उपलब्ध आहे त्याचा अभ्यास करुन माऊलींना खरंच कोणता अर्थ अमिप्रेत आहे हे माझ्याप्रमाणे पाहिले पाहिजे.

हे अत्यंत रोचक वाक्य आहे. आपण माझ्यासारख पाहीलं पाहीजे यातला आवेश बघा. तुम्ही अभ्यास करा काय वाटेल ते करा जेव्हा निष्कर्ष जो येइल तो माझ्या मनासारखाच आला पाहीजेच . पुरावे विरोधात असतील तर असुदेत तर्क विरोधात असेल तर असु देत अ‍ॅट द एन्ड ऑफ डे माझ्याप्रमाणे पाहील पाहीजे.

बरे काही आक्षेपार्ह दिसले तरी ते प्रक्षिप्त असू शकते याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. अशा गोष्टीकडे खरा साधक तरी दुर्लक्षच करेल.

ही पुढील संभाव्य आक्षेपार्ह आढळण्याच्या भीतीचा बंदोबस्त बघा प्रक्षिप्त तपासा किंवा प्रक्षिप्त आहे की नाही याची छानणी तपासणी करा असे नाही.
काही आक्षेपार्ह दिसले तर ते प्रक्षिप्त असु शकते याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे ही जाणीव ह्वीच ही जाणीव नसेल तर तुम्ही कदाचित आक्षेपार्ह भागाला सत्य पुराव्याच्या आधारे जाहीर करणार.

समजा प्रक्षिप्त नसले तरी त्या काळच्या लोकसमजुती स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी, त्याच्यावर भर देण्यासाठी केवळ उदा.मात्र वापरलेल्या असू शकतात.

आता त्याच्या पुढील तरतुद हे बघा क्रमाने पुढे काय वाढुन ठेवलय याच्या भीतीने व्याकुळतेतुन समजा प्रक्षिप्त तुम्ही आणलचं शोधुन तर माझे मन कशी पळवाट शोधेल
त्या काळच्या लोकसमजुती स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी, त्याच्यावर भर देण्यासाठी केवळ उदा.मात्र वापरलेल्या असू शकतात.

त्याला माऊलींचा पाठिंबा आहे असा अर्थ होत नाही.

त्याला माऊलीने पाठिंबा दिला नाही ते नाही अर्थ असा होत नाही.

आता पाहू बाकीचे सदस्य काय मत व्यक्त करतात. मी एकटा तरी किती बोलू?

हे विधान स्वयं स्पष्ट आहे.

वरील प्रतिसाद प्रातिनीधीक आहे. हे सर्व अस आहे. यावर उपाय काय ? मार्ग काय ?
तर आपले विधान आपले तत्व अधिकाधिक तर्काने संयमाने मांडण्याचा प्रयत्न करत राहणे हा तर आहेच.
मात्र दाभोळकर व स्टीफन कोव्ही जसे सांगतात तसा एथोज पॅथोज नंतर लोगोज असा क्रम असतो तो नेहमी लक्षात ठेवणे. स्वतःची मते चुकीची असतील तर ती सदैव बदलण्यास तयार असणे, अन्वेषण सतत सुरु ठेवणे, जमेल तितके आपण इतरांकडुन काही चांगले घेण्यासारखे असेल ते घेत राहणे. आवश्यक तेथे थांबणे आवश्यक तेथे भावनांवर संयम ठेवणे आवश्यक तेथे तर्काने आवश्यक तेथे संवेदनशीलतेने वागणे. अतिरेक टाळणे, टोकाची भुमिका घेण्याऐवजी सामंजस्याची भुमिका घेणे असे सर्व आहे. जसे दाभोळकर करत होते ती शैली सुंदर होती तीच योग्य आहे. त्या शैली ला आपण अधिकाधिक सकारात्मक दिशेने विकसीत करत नेले पाहीजे.
अजुन दुसर काय करु शकतो आपण या शिवाय ?
असच काहीस आपण करु शकतो.

स्पा's picture

20 Nov 2015 - 4:36 pm | स्पा

mk

मांत्रिक's picture

21 Nov 2015 - 9:10 pm | मांत्रिक

खिक्क! काय सणसणीत चपराक मारलीये! जौ दे!!! त्यांना पण ते कळणार नाही!!!

गॅरी शोमन's picture

20 Nov 2015 - 2:59 pm | गॅरी शोमन

"मूर्तीची समंत्रक प्राणप्रतिष्ठा केली की तिथे देवतत्त्वाचा संचार होतो,असा समज रूढ आहे. पण त्याचा अनुभव कधी आला आहे का?

काही संकल्पना सिध्द करायला आजचे शास्त्र प्रगत आहे का ? असल्यास हे तंत्रज्ञान वापरुन केलेल्या संशोधनाचा खर्च उचलणारी एखादी संस्था आहे का ?

मागे पुण्यात असे बरेच शास्त्राचे प्रोफेसर्स आणि डॉक्टर्स यांनी मोरगावच्या गोडाबाबाचे हाताच्या स्पर्शाने पाणी गोड होते यावर तपासणी संशोधन केले. प्रत्यक्षात निष्कर्ष काय निघाले हे त्या प्रोफेसर्स ना कळायच्या आत गोडाबाबा हातचलाखीने सॅकरीन मिसळतो अशी बातमी प्रसिध्द झाली.

त्या मंडळात माझ्या एका मित्राचे वडील होते. ते मित्राला म्हणाले की एखादी गोष्ट एकदा अंधश्रध्दा म्हणुनच शिक्कामोर्तब करायचे ठरले की मिडीया मॅनेजमेंट आणि त्यात ती प्रसिध्दी मिळवण्याची हौस असलेली मंडळी काय नाही करत.

मायबोलीवर http://www.maayboli.com/node/51554 हा धागा वाचा. याला जोडुन पुण्यातल्या काही मंडळींनी मीड ब्रेन नसतोच कारण लाईट बंद असताना डोळे बांधलेल्या व्यक्तीला वाचता आले नाही असा निष्कर्ष वर्तमान पत्रात जाहीर छापला सुध्दा.

वास्तवीक वरील प्रयोग जेव्हा डॉ राजेंद्र बर्वे यांच्या समोर दुरदर्शनवरच्या चॅनलवर झाली त्यात त्यामुलीला डोळे बांधुन काही गोष्टी ओळखत्या आल्या हे सिध्द झाले आहे.

एखाद्या वस्तुवर प्रकाश पडतो आणि त्या प्रकाशाचे परावर्तन होऊन त्याची एक इमेज आपल्या डोळ्याच्या लेन्स वर येते. त्या इमेजचे मेंदुत वाचन होऊन त्याचा अर्थ आपण काढतो.

एखाद्या वस्तुवर प्रकाश पडल्यानंतर त्यातुन कितीप्रकारचे किरण बाहेर पडतात ? जर डोळे कापडाने बांधले तर कोणत्या प्रकारचे किरण डोळ्यात पोचु शकत नाहीत ? कापडाच्या पट्टीतुन काही वेगळ्या प्रकारचे किरण डोळ्याच्या आत जाऊन सरावाने कोणाला ती वस्तु पहाता/ ती अक्षरे ओळखता येऊ शकणारच नाही का?

मग लाईटच बंद केल्यावर जर कोणत्याच प्रकराचे किरण त्या वस्तु कडुन परावर्तीत झाले नाहीत तर ती वस्तु डोळे बांधलेले असता पहाता येणारच नाही.

हाच प्रयोग आपल्याला त्यावस्तुकडुन डोळ्याकडे जाणार्‍या वेगवेगळ्या किरणांना डोळे बांधलेल्या परिस्थितीत काही फिल्टर्स टाकुन त्या वेगळ्या किरणांना अटकाव करुन पहाता येईल का ? हा शात्रीय प्रयोग होईल. यावरुन ( कदाचित ) असा निष्कर्ष निघेल की सामान्यतः आपले डोळे ह्या प्रकारच्या किरणांची इमेज उघड्या डोळ्याने पाहु शकतात. जर डोळे कापडाने बंद केले असता अभ्यासाने आपण काही वेगळ्या प्रकराच्या किरणांनी तयार होणारी इमेज पाहु शकतो.

थोडक्यात संधोधक वृत्ती जागृत ठेऊन कोणत्याही प्रयोगाचे स्वागत करायला अनेक लोक तयार असतील.

मी तर परमेश्वर नाही हे मानायला तयार आहे पण मी नास्तीक लोकांचे "मला अनुभव नाही आला" या वाक्यावर भरवसा ठेऊ का सर्व धर्मातले कॉमन तत्व आणि कोणत्याही भौतीक फायदा किंबहुना प्रसिध्दीची अपेक्षा नसलेल्या संतवचनांवर विश्वास ठेऊ ?

राजेश कुलकर्णी's picture

20 Nov 2015 - 3:03 pm | राजेश कुलकर्णी

तुम्ही मंत्रसामर्थ्य या शब्दावरून क्षमा का मागितली हे माहित नाही. त्याचा संदर्भ माहित नाही.
परंतु या पोस्टमध्ये तुम्ही म्हटलेल्यातले काहीही चूक नाही.
देव अाहे यावर कोणाचा विश्वास असेल तर त्यावर तो नसण्यावर चर्चा करण्याची माझी तयारी आहे. मी अगदी साध्या प्रश्नांनी व उदाहरणांनी ते पटवून देऊ शकतो. पण यावर ज्या मोकळेपणाने मी चर्चा करतो तेवढ्याच मोकळेपणाने समोरच्यानेही च्रर्चा करावी ही अपेक्षा.
आज शंभरपैकी नव्व्याण्णव लोकांना तुम्ही हि्दू आहात म्हणजे नक्की काय अाहात हे विचारले तर सांगता येणार नाही. याला कारण आपली प्रश्न न विचारण्याची व्ृत्ती. दुसरा करतो म्हणून आम्ही करतो, मग या दुस-यामध्ये आई-वडील अाले, नातेवाईक आले, समाज आला. पण आम्हाला काही पटत नसले तरी आम्ही प्रश्न विचारणार नाही ही आपली पद्धत.
त्यामुळे धर्माला गुंडांनी रस्त्यावर आणून ठेवले तरी आपल्याला काही वाटत नाही.
प्रत्येक जण आपापल्या समजुतीसाठी स्वत:ला जबाबदार आहे. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या तर ती त्याची-तिची वैयक्तिक जबाबदारी आहे. त्यामुळे कोणाची माफि मागण्याची गरज नाही.
वर आईवडलांबद्दल कोणी अनुद्गार काढले तर वाईट वाटणार नाही का असा प्रश्न विचारला आहे. बाप दारूडा असेल तरी त्याला कोणी काही म्हणायचे नाही का? तसेच कोणाचा काही संबंध नसला तर कोणाच्या आईवडलांना कोण का नावे ठेवील? पण काही कारणामुळे यांच्या बाबा-बुवा-महाराजांना, नसलेल्या देवांबद्दल कोणी काही बोलले की दुखावल्या यांच्या भावना. जर तो देव खरोखरच असेल व मी त्याच्याबद्दल काही बोललो व ते जर त्याला आवडले नाही, तर तो करेल ना माझ्याशी चर्चा, देईल ना मला शिक्षा. पण यांना जणू त्याच्या वतीने भांडायचा परवाना दिला आहे असे समजून यांच्या भावना दुखावणार आणि हे माझ्याशी भांडणार. एकंदरीत अजब प्रकार आहे हा भावना दुखावण्याचा.

संदीप डांगे's picture

20 Nov 2015 - 5:37 pm | संदीप डांगे

भावसाहेब,,,
आधी खालील प्रश्नांची उत्तरे द्या जमलं तर..
१. देव आहे असे तुम्हाला कोण सांगायला येतं काय?
२. देव माना नाहीतर तुमच्या माना मुरगाळतो असे कुणी तुम्हाला म्हटले काय?
३. देव आहे असे कुणी म्हटल्याने तुमचे व्यक्तिगत असे काय नुकसान झाले आहे?

कोणाचा काही संबंध नसला तर कोणाच्या आईवडलांना कोण का नावे ठेवील?
ठिक आहे. मग आस्तिक लोकांच्या भावना दुखावणारे विधान नास्तिकांना करायचा काय संबंध?

पण काही कारणामुळे यांच्या बाबा-बुवा-महाराजांना, नसलेल्या देवांबद्दल कोणी काही बोलले की दुखावल्या यांच्या भावना.
बाबा-बुवा-म्हाराजांबद्दल, देवाबद्दल नास्तिक बोलत नाहीत तर त्यांच्यावर विश्वास श्रद्धा असणार्‍यांच्या बौद्धिक कुवतीबद्दल बोलले जाते, आस्तिक कसे चु** आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न सतत केला जातो. असे करायचे, नास्तिकांना कुणी आमंत्रण देतं काय?

वामन देशमुख's picture

21 Nov 2015 - 3:17 pm | वामन देशमुख

२. देव माना नाहीतर तुमच्या माना मुरगाळतो असे कुणी तुम्हाला म्हटले काय?

हो, इस्लाम असेच म्हणतो.

संदीप डांगे's picture

21 Nov 2015 - 3:23 pm | संदीप डांगे

तुम्ही मुसलमान आहात?

बोका-ए-आझम's picture

20 Nov 2015 - 5:17 pm | बोका-ए-आझम

एकदा लोकशाही म्हटली की या सगळ्या गोष्टी येणारच. प्रत्येकाला भावना असणार, लोकांच्या भावना परस्परविरोधी असणार, एका गटाला आपल्या भावना बरोबर वाटणार, दुस-या गटाला त्या चूक वाटणार, त्यावरून वादविवाद होणार, जर दोन्हीही बाजू आपल्या विचारांवर ठाम असतील तर असे वाद वर्षानुवर्षे चालणार - हे अपरिहार्य आहे आणि याच्यावर लोकांना त्यांच्या भावना आणि विचार व्यक्त करण्यापासून थांबवणं हाच उपाय आहे, पण तो भयंकर अाणि कुठल्याही परिस्थितीत न स्वीकारण्याजोगा आहे. त्यामुळे वाद हे होत राहाणार. जोपर्यंत ते व्यक्तिगत स्वरूपाचे होत नाहीत तोपर्यंत ठीक आहे आणि व्यक्तिगत स्वरूपाचे झाले तरीही काही बिघडत नाही. बाकीच्यांची करमणूक होतेच.

बॅटमॅन's picture

20 Nov 2015 - 6:24 pm | बॅटमॅन

बोकोबांशी पूर्ण सहमत.

अजया's picture

21 Nov 2015 - 4:46 pm | अजया

बोकोबांशी अगदी सहमत.

उगा काहितरीच's picture

20 Nov 2015 - 6:24 pm | उगा काहितरीच

काही प्रश्न आहेत . इच्छा असेल तर उत्तर द्या .
१) तुमच्या (किंवा तुमच्या वडिलांच्या / आजोबाच्या) फोटोवर कुणी पान खाऊन थूकत असेल तर तुमच्या भावना दुखतील का नाही ?
२) भारताच्या झेंड्याप्रती आपली भावना काय आहे ?
तुर्तास इतकेच!

भाऊंचे भाऊ's picture

20 Nov 2015 - 7:29 pm | भाऊंचे भाऊ

मांत्रिक's picture

20 Nov 2015 - 7:34 pm | मांत्रिक

मस्तच रे उका.!!!

भाऊंचे भाऊ's picture

20 Nov 2015 - 7:55 pm | भाऊंचे भाऊ

कोणाचेही सदस्यनाम हीच मुळात विज्ञानाच्या नियमाने जिवंत एंटीटी ठरत नाही ( आठवा अकरावी बायोलॉजीच्या पहिल्या धड्यातीलच लिवींग ऑर्गेनीजमची डेफीनीशन, कसयं आज काल लय रेफरंस द्यावे लागतात). पण कसं आहे सगळेच असे विज्ञाननीश्ठ नसल्याने सदस्यनामलिखाणाबाबत हात आवरता घ्यावा लागतो. कधी कोणाच्या भावना दुखावतील काय भरोसा नाही.

भृशुंडी's picture

21 Nov 2015 - 2:52 am | भृशुंडी

१) नाही. तुमच्या?
२) काहीच नाही. राष्ट्रीय पक्षी मोराबद्दल तुमची काय भावना आहे?

उगा काहितरीच's picture

21 Nov 2015 - 2:29 pm | उगा काहितरीच

१) नाही. तुमच्या?

बिलकुल दुखावणार , कारण आम्ही आमच्या वडिलांचा, आजोबांचा आदर करतो. रच्याकने तुम्ही स्वतः हा प्रयोग तुमच्या वडिलांसमोर केला तर तुमच्या वडिलांना तुमच्याबद्दल अभिमान वाटेल , नाही ?

२) काहीच नाही

ज्या व्यक्तीला भारतीय झेंड्याप्रती आदरच नाही. त्या व्यक्तीने भारतात राहूच नये असे प्रामाणिकपणे वाटते .

राष्ट्रीय पक्षी मोराबद्दल तुमची काय भावना आहे?

प्रेमाची भावना आहे.

मांत्रिक's picture

21 Nov 2015 - 2:33 pm | मांत्रिक

अगदी मार्मिक उ.का. साहेब.

१) विषय भावना दुखावण्याचा आहे, आदर /अनादराचा नाही.
समोरच्या कुठल्याही थिल्लर कृतीमुळे "भावना" दुखावल्या जात असतील तर जरा सांभाळून रहात जा. उदया कुठेही कुणी जर पान खाऊन तुमच्या आय-कार्डवर थुंकला, तर घाण वाटायच्या आधी तुमच्या भावना दुखावल्या जातील. मग कठीण आहे!

२) भारताच्या झेंड्याबद्दल आदर असणे ही भारतीय असण्याची पूर्व अट आहे हे सांगितलंत ते बरं केलंत. म्हणजे मग असल्या प्रतीकांमधे एकदा देशभक्तीची हजेरी लावून टाकली की पुढेमागे बघायला नको. बरं, झेंड्याचा आदर असणे/नसणे ह्याचा भावनांशी काय संबंध?

३) मग मोराला जर कुणी शिव्या घातल्या तर तुमच्या भावना दुखावतील का?

उगा काहितरीच's picture

21 Nov 2015 - 4:57 pm | उगा काहितरीच

१) विषय भावना दुखावण्याचा आहे, आदर /अनादराचा नाही.

माझ्या मते "आदर" ही पण एक "भावनाच" आहे.

२) भारताच्या झेंड्याबद्दल आदर असणे ही भारतीय असण्याची पूर्व अट आहे हे सांगितलंत ते बरं केलंत.

बघा मिपावर आल्याचा फायदा झाला तुम्हाला ! (मनातल्या मनात लाजलो बुवा. )

बरं, झेंड्याचा आदर असणे/नसणे ह्याचा भावनांशी काय संबंध?

मला असे म्हणायचे होते की सामान्य लोकांना झेंडा या 'प्रतिकाबद्दल' आदर असू शकतो तर 'मुर्ती' बद्दल थोडा आदर असेल तर पोट का दुखावे ?
असो ! मलाच माझ्या "भावना" पोचवता आल्या नाहीत बहुतेक .

३) मग मोराला जर कुणी शिव्या घातल्या तर तुमच्या भावना दुखावतील का?
नाही !
बट तुम्ही जर मोराला मारत असतील तर मात्र माझ्या भावना दुखतील.

सांभाळून रहा हो. तुमच्या भावना दुखावणं हे भलतंच सोप्पं आहे असं दिसतंय. आणि तेवढं आय-कार्ड जपून वापरत जा. ह्यापुढे तुमच्यासाठी सगळे दिवस भावना दुखावणार्‍यांचेच असणार आहेत.
नशीब कोंबडी हा भारताचा राष्ट्रीय पक्षी नाही, तसं असतं तर तुमच्या भावना आयुष्यभर कायमच्या दुखावलेल्याच राहिल्या असत्या.

उगा काहितरीच's picture

22 Nov 2015 - 1:34 pm | उगा काहितरीच

धन्यवाद ! मंडळ आभारी आहे. रच्याकने आमच्या भावना दुखावणार्या व्यक्तीच्या भावना कशा दुखवायच्या याचे ट्रेनिंग घेतलेले आहे . त्यामुळे आपण काळजी करू नये. (वेळ पडल्यास भावना दुखावणार्यांना पण दुखावु शकतो , पण काळजी नसावी . )
-नम्र फाटाप्रेमी .

उगा काहितरीच's picture

21 Nov 2015 - 5:05 pm | उगा काहितरीच

सदरील प्रकरणाची चौकशी व्हावी . व दोषीस योग्य ती शिक्षा व्हावी .

प्रकाश घाटपांडे's picture

21 Nov 2015 - 10:21 am | प्रकाश घाटपांडे

कठोर तर्ककर्कश अश्रद्ध माणसाची उत्तरे अशी असतील
१) काही दुखावणार नाहीत.
२) झेंडा म्हणजे एक प्रतिक आहे बाकी काही नाही. खर तर या सगळ्या अंधश्रद्धा आहेत.
स्वत:पुरता अश्रद्ध परंतु इतरांच्या श्रद्धेचा आदर करणार्‍या विवेकी माणसाची उत्तरे
१) थोड खटकेल खरं! तरी पण थुंकणार्‍याच्या भावना समजावून घेतल्या पाहिजेत
२) राष्ट्रीय प्रतिकांचा आदर असावा. स्वातंत्र्य समता बंधुता याच प्रतिक आहे ते

सतिश गावडे's picture

21 Nov 2015 - 3:42 pm | सतिश गावडे

म्हणजे मी "कठोर तर्ककर्कश अश्रद्ध" माणूस आहे. :)

अर्थात मी "अंधश्रद्धा" हा शब्दच चुकीचा समजतो. श्रद्धा असते किंवा नसते. डोळस श्रद्धा आणि अंध श्रद्धा असे काही नसते.

मात्र एक निरिक्षण नोंदवावेसे वाटते. अंनिसचे बरेचसे यश त्यांच्या "अंधश्रद्धा" या शब्दाच्या वापरात आणि "देवाला" अंधश्रद्धेतून वगळण्यात आहे. अंनिसने "देव" आणि "अंधश्रद्धा" या दोन गोष्टी वेगळ्या केल्या नसत्या तर लोकांनी अंनिसला धुतले असते. आणि आजही बळी जात राहीले असते, आजही गावोगवी गोडबाबा, कडूबाबा, आंबटबाबा मोकाट सुटले असते.

डॉ. दाभोलकरांच्या द्रष्टेपणाला सलाम. !!!

यनावाला's picture

21 Nov 2015 - 8:47 pm | यनावाला

अर्थात मी "अंधश्रद्धा" हा शब्दच चुकीचा समजतो. श्रद्धा असते किंवा नसते. डोळस श्रद्धा आणि अंध श्रद्धा असे काही नसते.

श्री. सतीश गावडे यांच्याशी सहमत. "अंधश्रद्धा" म्हणणे ही द्विरुक्ती आहे. श्रद्धा अंधच असते. म्हणून श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांत भेद (फरक)कोणता ? तर पहिल्या शब्दापेक्षा दुसर्‍या शब्दात अधिक अक्षरे आहेत एवढाच !हे झाले तत्त्वतः. पण व्यवहारात श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांत भेद करता येईल.

बोका-ए-आझम's picture

21 Nov 2015 - 10:11 pm | बोका-ए-आझम

कार्यकारणभाव असल्यावर जी श्रद्धा असते तिला अंध कसं म्हणता येईल? तुम्ही मिपावर पोस्ट टाकलीत. तिला प्रतिसाद मिळतील कारण याआधी टाकलेल्या पोस्टलाही मिळाले होते असं तुम्हाला वाटतं. ही अंधश्रद्धा वाटते तुम्हाला? काहीही संबंध नसलेल्या गोष्टी एकमेकांना जोडणं आणि सर्वांना त्या तशा आहेत असं सांगणं ही अंधश्रद्धा. आणि ती श्रद्धेपासून वेगळी असते. श्रद्धा ही अंधच असते असं म्हणणं हा एकांगी विचार आहे.

संदीप डांगे's picture

21 Nov 2015 - 10:28 pm | संदीप डांगे

I am not saying Faith is Different than Blind Faith.

cc

but they are different

सतिश गावडे's picture

21 Nov 2015 - 12:07 pm | सतिश गावडे

तुम्हाला अपेक्षित प्रतिसादाच्या उलट विचार असणारे खुप लोक आहेत. :)

चौकटराजा's picture

22 Nov 2015 - 1:05 pm | चौकटराजा

प्रामाणिक उत्तर अपेक्षित .
प्रश्न:जरा आजोबान्च्या फ़ोटोवर कबूतर हगले तर नातवाची प्रतिक्रया कोणी तरी पानाची पिचकारी मारल्यावर येईल तशीच असेल का ?

कवितानागेश's picture

22 Nov 2015 - 5:29 pm | कवितानागेश

तुम्ही कोणाला कबूतर म्हणतायत चौराकाका? :):ड

चौकटराजा's picture

22 Nov 2015 - 7:49 pm | चौकटराजा

आम्ही इथे माहितीच्या देवाण घेवाणी साठी च फक्त येतो कबूतर कोणत्याही आय डी ला उद्देशून नाही .कबुतर हे एका पक्षाचे नाव आहे .कसे ?

ह्या पक्षाची नोंदणी झालीय का. राषट्रीय की प्रादेशिक? कोण आहे कार्यकारिणीत? निवडणूक आयोगाची मान्यता आहे का? पक्षचिन्ह कबूतर हेच आहे का? प्रचारात गाणे वापरायसाठी बडजात्याची परवानगी घेतलीय का?

सुज्ञ's picture

21 Nov 2015 - 12:48 am | सुज्ञ

जगात देव आहे असे मानणारे लोक आहेत व प्रत्येकाची कशावर तरी एक भाबडी श्रद्धा असते हे पाहून स्वतास उगाचच शाहणे समजनार्यांच्या भावना दुखावतात. कारण आपण कोणीतरी जगावेगळे आहोत व बाकीचे लोक कसे अश्रद्ध श्रद्धाळू आहेत असे उगीचच स्वताशी घोकताना आपला मूर्खपणा व महत्वाचे म्हणजे फुकाचा अहंकार जगाला दिसेल हि खंत त्यांच्या मनात कायम असते. म्हणूनच ते नेहेमि ओरडून ओरडून आपली वैचारिक व मानसिक जळजळ जगाला पटवून देण्याच्या प्रयत्नात लेखांवर लेख पाडत राहतात.

सुज्ञ's picture

21 Nov 2015 - 12:52 am | सुज्ञ

* तसेच लोकांनी आपल्याला खूप शाहणे समजावे या हव्यासापायी

प्रकाश घाटपांडे's picture

21 Nov 2015 - 10:58 am | प्रकाश घाटपांडे

अट्टल व सराईत सश्रद्ध आणि अट्टल व सराईत अश्रद्ध माणसांच्या भावना फुटकळ कारणाने दुखावत नाहीत. आता देव सैतान श्रद्धा अश्रद्धा यांचे अस्तित्व हे मेंदुत असल्याने त्यात काही जैवरासायनिक बदल झाले तर मग काहीही घडू शकते. :)

भंकस बाबा's picture

21 Nov 2015 - 11:00 am | भंकस बाबा

मलापण हे कर्मकांड वैगेरे आवडत नाही पण माझ्या आईला मी हे कसे पटवू? त्यासाठी मी एक प्रयोग केला. वर्षश्राद्ध घालणे हा एक कर्मकांडाचा प्रकार, मला तो माझ्या घरापुरता बंद करायचा होता. वडील अकाली गेल्यामुळे आईच्या भावनेला ठेच न लावता हां प्रकार बंद करणे जरा कठिण होते. मग एका वर्षी माझ्या ऐपतिप्रमाणे मी एका अशा वृद्धाश्रमाला माझ्या वडिलाच्या पुण्यतिथिला अन्नदान केले जेथिल वृद्ध बिनासहारा होते. म्हणजे त्यांना मुलेबाळे नव्हती. हां सोहळा आईला दाखवला. पुढील वर्षी आईने स्वतःहुन या कामात पुढाकार घेतला व् वर्षश्राद्ध पद्धत आमच्या घरापुरती बंद झाली कारण मी आईला स्पष्ट सांगितले की मला माझ्या कमाइत दोन पैकी एकच जमेल.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Nov 2015 - 11:11 am | प्रकाश घाटपांडे

प्रश्नाला चांगले हाताळलेत.

संदीप डांगे's picture

21 Nov 2015 - 11:20 am | संदीप डांगे

सुंदर उपक्रम आणि विचार. सर्वांनीच अनुकरण करण्यासारखे आहे.

सतिश गावडे's picture

21 Nov 2015 - 12:10 pm | सतिश गावडे

मस्त !!!

रमेश भिडे's picture

21 Nov 2015 - 11:25 am | रमेश भिडे

मला एक समजत नाही की यच्चयावत सगळे वि(अ)ज्ञानवादी / फुर्रोगामी / विचारजन्त / फेक्युलर / फुदारणावादी /चन्गळवादी महाभाग फक्त हिन्दू धर्मातील अन्धश्रद्धा अन मन्त्रसामर्थ्यावर का घसरतात नेहमी?

शान्तिप्रिय (?) अल्प(?)सन्ख्यान्क समाजातील शरियत / कुराण / हदीस वगैरे जुनाट रानटी प्रथा ... सौदी तील मुल्ला अन मुतव्वान्चे चाळे , आयसिस च्या कडव्या धर्मान्धाचे विक्रुत चाळे अन अविज्ञानवादी बायबल अन मागास अन्धश्रद्द्धाळू पोप यान्च्या बद्दल अवाक्शर देखिल न उच्चारता फक्त हिन्दु धर्मच तेवढा मागास /बुरसतलेला अन अन्धश्रद्धाळू आहे का?

की इतरान्च्या "भावना" दुखवण्याची भारीच कळकळ यन्नावाल्याना लागुन राहिलेय ?

त्यान्च्याबाबतीत काय वाचा बसते का तुमची? मन्त्रसामर्थ्य अन भावना दुखवण्यावर चर्चा करताहेत

मयुरMK's picture

21 Nov 2015 - 11:40 am | मयुरMK

आपण आपल्याच माणसान्च्या चूका काढत बसतो . आणि आपल्यातच फूट पढ़ते हे म्हणजे आस झाल दोघांच्या भांडणात तिस्र्याचा बोम्ब्स्फोट ;)

मयुरMK's picture

21 Nov 2015 - 11:36 am | मयुरMK

माझ्या मते तुमच म्हणन बरोबर आहे पण ५० % कारण श्रध्दा आणि अंधश्रध्हा ह्यामधे फरक आहे प्रत्येक गोष्टी च्या दोन बाजु आसतात आपण जे होम हवं मंदिरात जातो ह्यामागे विज्ञानं आणि श्रध्हा दोन्ही आहेत . आपण नास्तिक आहोत हे आपल्यापुरत पण मी आहे त्याने ही आसाव हे चुकिच आहे . कारन भारत हा अभिव्यक्ति स्वातंत्र्य देश आहे ( निदान महाराष्ट्रात तरी ) कही लिह्न्यत चुक झाली असेल तर सांगा मी नवीन च आहे इथे पण आणि ह्या क्षेत्रात पण :)

अभिजीत अवलिया's picture

21 Nov 2015 - 11:53 am | अभिजीत अवलिया

भंकस बाबा ह्यांनी केलेले आवडले.
यनाकाका जपून राहा. हा लेख लिहून तुम्ही पुन्हा भावना दुखावल्याबद्दल तुम्हाला पाकिस्तान मध्ये पाठविण्याची मागणी देखील केली जाऊ शकते. (हलके घ्या).

भंकस बाबा's picture

21 Nov 2015 - 12:03 pm | भंकस बाबा

नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला ? दुसऱ्या धर्मात अनिष्ट प्रथा आहेत त्याचा हिन्दू धर्माशि काय सम्बंध? पिण्डदानावर गाडगे महाराज सत्तरएक वर्षापुर्वी नुसत बोलूंनच नाही तर कृति करून गेले आहेत. त्यांना तुम्ही कोणत्या पारड्यात टाकाल? फ़क्त पिंडदानवर नाही तर एकूण हिंदू धर्मातील चलिरितीवर?
प्रतिसाद अपेक्षित आहे

यनावाला's picture

21 Nov 2015 - 1:57 pm | यनावाला

"भावना दुखावणे" या लेखावरील कांही प्रतिसाद वाचून मौज वाटली.माणसाच्या बुद्धीने त्याच्या भावनेला डिवचल्यावर त्याचा कसा प्रक्षोभ होतो याचे प्रत्यंतर दिसले.हे प्रतिसाद स्वाभाविक आहेत. एका सदस्यांनी विचारले आहे, "प्राणप्रतिष्ठित मूर्तीत देवतत्त्व असते हे सिद्ध करायला आजचे शास्त्र प्रगत आहे का ?" अहो, अशा मूर्तीच्या अंगावरील दागिने चोरीला जातात, मूर्तीचे सोन्याचे डोळे चोर काढून नेतात, कधी मूर्तीच बखोटीला मारून घेऊन जातात. कांहीच प्रतिकार होत नाही.तरी त्या मूर्तीत देवतत्त्व आहेच असे म्हणायचे का ?विचार करायचाच नाही का? श्रद्धाळूची तर्कबुद्धी त्याच्या श्रद्धा विषयात ठप्प होते. लुळी पडते असे म्हणतात.ते खरेच आहे.
** कांही जणांनी प्रश्न केले ,"इतरांच्या श्रद्धांविषयीं तुम्ही का लिहिता ? तुम्हांला तो अधिकार आहे काय? " अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी स्वतंत्र लेख लिहावा लागेल.

प्रचेतस's picture

21 Nov 2015 - 2:32 pm | प्रचेतस

ह्या विषयावर स्वतंत्र लेख नक्कीच लिहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Nov 2015 - 5:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यनावाला तुम्ही लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

संदीप डांगे's picture

21 Nov 2015 - 2:39 pm | संदीप डांगे

यनावालासर,

http://www.deccanherald.com/content/244871/isro-seeks-balajis-blessing-l...

आधी यांना समजवा. मग इथे लेख पाडायचे कि कसे ते बघा. विज्ञानाने कितीही उड्या मारल्या तरी सायंटीस्टही श्रद्धेच्या पगड्यातून सुटले नाहीत, ते का? एवढ्या एकाच प्रश्नाचे उत्तर द्या. बाकी तुम्ही आजवर मी विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत (तसे ते दिलेच नाहीत) तरी चालेल.

शिक्षणाने नास्तिकपणा येतोच असं नाही किंबहुना सर्वच काही येतं असंही नाही. अगदी इस्रोचे वैज्ञानिक जरी असले तरी त्यांची ती अंधश्रद्धाच.

संदीप डांगे's picture

21 Nov 2015 - 3:10 pm | संदीप डांगे

प्रचेतसजी,
मी यनावालांना एकच प्रश्न विचारत आहे, तो असा की जर लहानपणापासून अगदी नकळत्या वयापासून स्वतंत्र भारतात वैज्ञानिक पद्धतीचे शिक्षण घेत आहेत तरी वैज्ञानिक विचारपद्धती का रुजू शकलेली नाही? कुठल्याही शाळेत, कॉलेजमधे कधीच कोणत्याच धर्माच्या आचरणाबद्दल, आस्थांबद्दल शिकवले जात नाही. तरी ते (श्रद्धा वा अंधश्रद्धा) एवढे घट्ट का की अंतराळ वैज्ञानिक असलेले लोकही हा पगडा दूर करू शकत नाहीत?

"आपण आपले शंभर टक्के प्रयत्न केले आहेत. आता इश्वर आपल्या प्रयत्नास यश देवो" ही भावना वैज्ञानिकाच्या मनात खोलवर बसलेली आहे ती वैज्ञानिक शिक्षणाने का दूर होऊ शकलेली नाही इतकाच मुद्दा आहे.

लोक श्रद्धाळू वा नास्तिक का बनतात? कित्येक घरांमधे प्रचंड धार्मिक वातावरण असते तरी तिथली मुलं नास्तिक होतात. किंवा याच्या उलटही असते. मग घरचे संस्कार, समाजाचे संस्कार असे आपण म्हणू शकत नाही.

कित्येक लोक आधी कट्टर नास्तिक असतात मग आस्तिक होतात, याच्या उलटही होतं. कट्टर आस्तिक असणारे प्रत्यक्षात प्रयत्नवादावर विश्वास ठेवतात, प्रयत्नवादी असण्याचा दावा करणारे जपजाप्य्, होमहवन, सत्यनारायण पुजा घालतांना दिसतात. समूह एकाच प्रकारच्या मनोवृत्तीने बनलेला नाही. ज्यात काही आस्तिक, नास्तिक, अजून यांच्या अधले-मधले बरेच प्रकार आहेत. प्रत्येकाचा एक पिंड असतो, जो तो जन्मत:च घेऊन येतो. त्याचे कितीही ब्रेनवॉशिंग चांगल्या वा वाईट कारणासाठी केले तरी मूळ स्वभाव सोडत नाहीत. ह्यात शि़क्षणाचा काहीच परिणाम होत नाही कारण आपण शिक्षण उदरनिर्वाहाच्या कारणासाठी घेतो. वैज्ञानिक झाला म्हणून त्याला षडरिपूंपासून मुक्ती मिळत नाही. अँक्सायटी, फीअर पासून सर्व मूळ मानवी भावना त्याच्या ठायी असतातच. वैज्ञानिक विचारपद्धतीने यासगळ्यांपासून मुक्ती नाहीच. बाकी गॅजेटमय आयुष्य कितीही झाले तरी.

उत्तर तसं पाहिलं तर सोपं आहे.
व्यक्ती तितक्या प्रकृती.
अगदी कुरुंदकरांचंच उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांच्याइतका प्रखर बुद्धीवादी, समाजवादी विचारांच्या विचारवंतालाही घरच्यांसाठी स्वतःच्या मुलाची मुंज करावी लागली होती. ह्यांच शल्य सुद्धा त्यांनी कुठल्यातरी एका लेखात प्रकट केलं होतं.

संदीप डांगे's picture

21 Nov 2015 - 3:26 pm | संदीप डांगे

व्यक्ती तितक्या प्रकृती
अगदी अगदी.

एकूण माणूस हे एक अजब रसायन आहे. त्याला लेबल चिकटवणे पटत नाही.

चौकटराजा's picture

22 Nov 2015 - 3:50 pm | चौकटराजा

माणुस तीन गोष्टी ने घडतो अनुवंश,परिसर व या दोन्हीत न बसणारी तीसरी म्हणजे त्याला सोयीसाठी पूर्वसंचित मानू या .सबब व्यक्ति तितक्या प्रकृति हां अनुभव येतो.उदा इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्यास शास्त्रीय संगीताची आवड नसते पण हां सरसकट नियम दिसत नाही कारण अनुवंश किंवा पूर्वसंचित हे प्रबळ ठरल्यास अपवाद निर्माण होतो.

संदीप डांगे's picture

22 Nov 2015 - 5:36 pm | संदीप डांगे

मला जरा समजले नाही आपले विधान. काही प्रमेये मांडुयात काय?

म्हणजे:

१) इंग्रजी माध्यम + पुर्वसंचित/अनुवंश = शा. सं. आवड
२) इंग्रजी माध्यम - पुर्वसंचित/अनुवंश = शा. सं. नावड
३) कुठलेही माध्यम - पुर्वसंचित/अनुवंश = शा. सं. नावड

माझ्यामते वरील तिन्ही वस्तुस्थितीत आवड-नावडीचा भौतिक बाबींशी संबंध दिसत नाही. यावर अधिक चर्चा आवश्यक वाटते.

आवड/नावड ही अमूर्त व पारलौकिक गोष्ट आहे ज्यावर जगात असंख्य लौकिक व्यवहार चालतात.

अनुवंशिकतेच्या प्रभावाबद्दल माझा व्यक्तिगत अनुभव सांगतो. माझे बाबा हे त्यांच्या मोठ्या कुटुंबातून एकटेच अकोल्याला शिकायला आले. बाकी सगळे डांगे खेड्यातच. त्यांचा आमचा संबंधही सणसमारंभ-लग्नकार्यापुरता, जास्त जाणे-येणे नाही. मला लहानपणापासून बर्‍याच कलांमधे गती होती, गाणे, चित्रकला, नृत्य वैगेरे. पण बाबांच्या कर्मठ-कठोर स्वभावाने ते सर्व दाबले गेले. त्यांना हे सगळे भिकेचे डोहाळे वाटायचे. त्यामुळे गाणे-नाचणे तर सोडा, चित्रकलेसाठीही घरून कधी प्रोत्साहन मिळाले नाही. नंतर बारावी झाल्यावर शिंग फुटल्यावर बंडखोरी पुकारल्यावर हे सगळे सुरु झाले. दहा-बारा वर्षांचा असतांना मी बासरी अगदी पहिल्यांदा हातात घेतल्याबरोबर सूरात वाजवू लागलो, त्यात गती आहे असे जाणवले. पण घरून कुणी सपोर्ट केला नाही. बारावीच्या वर्षाला असतांना घरीच प्लास्टीकची बासरी बनवून अक्षरशः एकलव्य होऊन स्वत:च शिकत ४ दिवसात गाणी वाजवायला लागलो. बरेच जण म्हणायचे की मला पण शिकव. पण कित्येकांना कितीदा सांगूनही बासरी नीट धरता येत नाही हे समजले. योग्य फुंकर मारून सूर काढणे तर लांबच. मग मला प्रश्न पडला की आपल्याला हे कसे काय जमते, कुणी न शिकवताही? तेव्हा पूर्वसंचितचा किडा डोक्यात वळवळला होता, नंतर बर्‍याच वर्षांनी समजले की आमचे डांगे घराणे एकसेएक वस्ताद कलाकार मंडळी आहेत, तबला, पेटी, गाणी, रचणे, संगीत देणे, भारूड, किर्तन, इत्यादी कार्यक्रम करणे असे बरेच उद्योग ते लोक खेड्यामधे करतात. माझ्या आत्याची तर स्वत:ची टीम असून नवरात्रकाळात फुल्ल बुकिंग असते. हा झाला सांगितिक वारसा. आता चित्रकला आली आईच्या माहेरून. माझी सगळी मामे-मावस भावंड चित्रकला, क्राफ्टस यात तरबेज होती, त्यांना तसे प्रोत्साहनही होते. आईने कधी रांगोळीशिवाय काहीच कला अशी दाखवली नाही. त्यांच्या तेव्हाच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे असेल कदाचित पण आमच्या घरात दोन्ही पालक कलेत इंटरेस्टेड आहेत असे मला कधी दिसले नाही. त्यामुळे मी स्वतःला उपजत अष्टपैलू वैगेरे समजत होतो. ते तसे नव्हते हे बर्‍याच काळाने कळले. त्यामुळे 'पूर्वसंचित' ह्या प्रकाराबद्दल मी जर्रासा साशंक आहे.

रमेश भिडे's picture

21 Nov 2015 - 3:20 pm | रमेश भिडे

शान्तिप्रिय (?) अल्प(?)सन्ख्यान्क समाजातील शरियत / कुराण / हदीस वगैरे जुनाट रानटी प्रथा ... सौदी तील मुल्ला अन मुतव्वान्चे चाळे , आयसिस च्या कडव्या धर्मान्धाचे विक्रुत चाळे अन अविज्ञानवादी बायबल अन मागास अन्धश्रद्द्धाळू पोप यान्च्या बद्दल अवाक्शर देखिल न उच्चारता फक्त हिन्दु धर्मच तेवढा मागास /बुरसतलेला अन अन्धश्रद्धाळू आहे का?

की इतरान्च्या "भावना" दुखवण्याची भारीच कळकळ यन्नावाल्याना लागुन राहिलेय ?

त्यान्च्याबाबतीत काय वाचा बसते का तुमची

प्रचेतस's picture

21 Nov 2015 - 3:24 pm | प्रचेतस

समाजसुधारणा आधी आपल्या धर्मातच करायला हवी ना?

बाकी ह्या प्रश्नाचं समर्पक उत्तर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पूर्वी दिलं होतं. दुवा मिळाल्यास शोधून डकवतो.

भंकस बाबा's picture

21 Nov 2015 - 3:46 pm | भंकस बाबा

@ तुम्ही लिहिल्याप्रमाणे मुस्लिम, ख्रिचन् आपण मागास समजू. तुम्ही या धर्मात मोड़ता का? उत्तर हो असेल तर चर्चा संपली पण नाही असेल तर आपल्या धर्मातील अनिष्ठ प्रथा आपणच दूर नको का करायला पाहिजे? प्रत्येक वेळी दुसऱ्या धर्माकडे बोट दाखवून तुम्ही आपल्या चूका का झाकता आहात?
बाय द वे तुमचा कुराण, हदीस ,बाइबल यावरचा अभ्यास बराच दांडगा वाटतो. एक नविन धागा टाकून चर्चेला तोंड फोड़ा ना .

यनावाला's picture

21 Nov 2015 - 8:57 pm | यनावाला

श्री.प्रचेतस आणि श्री. भंकसबाबा यांचे प्रतिसाद अगदी बिंदुगामी, म्हणजे टु द पॉइंट आहेत.

बाय द वे तुमचा कुराण, हदीस ,बाइबल यावरचा अभ्यास बराच दांडगा वाटतो. एक नविन धागा टाकून चर्चेला तोंड फोड़ा ना .

वा! बिनतोड .
धन्यवाद !

मांत्रिक's picture

21 Nov 2015 - 9:02 pm | मांत्रिक

रेड

गामा पैलवान's picture

22 Nov 2015 - 9:15 pm | गामा पैलवान

यनावाला,

>> अशा मूर्तीच्या अंगावरील दागिने चोरीला जातात, मूर्तीचे सोन्याचे डोळे चोर काढून नेतात, कधी मूर्तीच
>> बखोटीला मारून घेऊन जातात. कांहीच प्रतिकार होत नाही.तरी त्या मूर्तीत देवतत्त्व आहेच असे म्हणायचे का ?
>> विचार करायचाच नाही का? श्रद्धाळूची तर्कबुद्धी त्याच्या श्रद्धा विषयात ठप्प होते. लुळी पडते असे म्हणतात.
>> ते खरेच आहे.

देवतत्त्वाकडून चोरी थांबवायची अपेक्षा का केली जात आहे? चोरी रोखण्याची व्यवस्था वेगळी असते. तिचा देवाशी संबंध नाही. आज अस्तित्व म्हणजे काय हे आधुनिक विज्ञानही ठामपणे सांगू शकलं नाहीये. इथे बघा एक मी एक वैज्ञानिक चमत्कार दाखवलाय. तुमच्या हातातलं रिमोट आणि दूर ठेवलेला टीव्ही यांच्या दरम्यान काही अस्तित्व आहे का? हो आणि नाही अशी दोन्ही उत्तरं आहेत. ही दोन्ही उत्तरं बरोबर आहेत.

मग तुमच्यासाठी दगड असलेल्या मूर्तीत आस्तिक लोकं देवतत्त्व उतरलेलं मानतात, यात आक्षेप घेण्याजोगं काय आहे? देवतत्त्वाचा प्रत्यय हवा असेल तर तशी श्रद्धा हवी ना मनात.

आ.न.,
-गा.पै.

काय विचार करावा कळेनासं झालं आहे. इतका हिरीरीने कशाला वाद घालायचा या असल्या विषयावर? उगाच कटुता वाढत चाललीये...

संदीप डांगे's picture

21 Nov 2015 - 3:16 pm | संदीप डांगे

श्रद्धावंत माणसाला सरसकट, खिल्ली उडवल्यासारखे, बुद्धीहिन, अक्कलशून्य म्हणून हिणवू नये म्हणून. 'ते बघा कशे येडे हैत' ह्या टैप संवाद चालला आहे त्याबद्दल विरोध आहे. सभ्यता, सुसंस्कृतता ही भाषेत नसून भावनेत असते हे सांगण्यासाठी असा सगळा खटाटोप.

वामन देशमुख's picture

21 Nov 2015 - 3:19 pm | वामन देशमुख

सभ्यता, सुसंस्कृतता ही भाषेत नसून भावनेत असते

बव्हंशी सहमत.

संदीप डांगे's picture

21 Nov 2015 - 3:24 pm | संदीप डांगे

हे हे, धन्यवाद! कधी मित्रांसोबतच्या शिवराळ गप्पा आठवून बघा, पूर्णतः सहमत व्हाल.

नितीनचंद्र's picture

21 Nov 2015 - 3:31 pm | नितीनचंद्र

प्रत्येकाचा एक पिंड असतो, जो तो जन्मत:च घेऊन येतो. तुम्ही श्र्ध्दा की अंधश्रध्दा या प्रश्नाचे उत्तर देताना चक्क पुनर्जन्माच्या सिध्दांताचा आधार घेत आहात. सर्वसाधारण जे नास्तीक असतात ते पुनर्जन्म सुध्दा मानत नाहीत. तुमच मत मांडणारी एखादी थेअरी सांगायची ज्यावर शोध निबंध प्रसिध्द झाले आहेत. खास करुन ते शोध निबंध परदेशात प्रसिध्द झालेले असले म्हणजे त्यावर तिरकस शेरे येणार नाहीत.

आता जे मी लिहणार आहे ते तुमच्या साठी आहे. नास्तीक, पुनर्जन्म इ. न मानणारे इ. लोकांसाठी बिलकुल नाही.

तुम्हाला जे म्हणायचे आहे ते लास्ट बर्थ रिग्रेशन या थेअरी च्या संदर्भात आहे का ?

संदीप डांगे's picture

21 Nov 2015 - 4:00 pm | संदीप डांगे

ते विधान पुनर्जन्माच्या बाबतीत केलेलं नाही हे स्पष्ट करू इच्छितो. जन्मतःच म्हणजे समजायला लागल्यापासून शिक्षण, संस्कृती, स्वभाव, चालिरिती, समाजातले स्थान यापेक्षा वेगळं काही म्हणजे पिंड. 'मनाचा धर्म'. एखादी व्यक्ती लहानपणापासून उचापती असते, तर कोणी शांत असते. एखादं लहान मुल फार मारकुटं असतं तर दुसरं मारखाऊ असतं. आयुष्यात शिक्षण, संस्कार, स्थानाचे, ज्ञानाचे अनेक लेप लागले तरी मूळ पिंड अबाधित राहतो. हे त्याचे विवेचन.

राहता राहिला पुनर्जन्माचा सिद्धांतः यात एखाद्याचे मान्यतेनुसार काही बदल घडत नाही. समजा असेल पुनर्जन्म ही संकल्पना खरी तर त्याचा मला नक्की काय उपयोग. नसेल तरी काय उपयोग? आज हजारो थोरामोठ्यांच्या आयुष्याचे एकुणेक तपशिल उपलब्ध आहेत. त्याचा अभ्यास करून कोणी म्हटले की मी नेहरुंचा पुनर्जन्म आहे तर सिद्ध कसं करणार की नाही, खोटे आहे?

साधनेत पुढे जातांना योग्याला आपले सगळे जन्म आठवतात असे म्हटले जाते. आता तिथे गेल्यावर जर मला यदाकदाचित ते आठवले तरी मी दुसर्‍याला सांगू शकणार नाही. दुसर्‍यांना कसे दिसणार मी जे बघतो ते? सिद्ध कसे करणार? पुरावा काय? त्यात जर मी थेट अकराव्या शतकातला कोणी हिंदू राजा होतो म्हटले तरी कोणाकडे त्याचे तपशील नाहीत क्रॉसचेक करायला.

एक विनोद आठवतो, डोळ्यांच्या डॉक्टरकडे एकजण गेला. डॉक्टर डोळे तपासण्यासाठी एकेक भिंग लावून भिंतीवरच्या अक्षराचे बोर्ड वाचायला सांगू लागले. "बघा, आता सांगा?" बिचारा रुग्ण ठार निरक्षर. त्याला काला अ़़क्षर भैंस बराबर. असो.

काही मुले समजायला लागल्यापासून इतक्या तेजस्वी बुद्धीचे, कलेचे, जाणीवेचे प्रदर्शन करायला लागतात जे साठी उलटलेल्या लोकांना थोडं थोडं जमायला लागलेले असते. उपजत कलागुण, बुद्धीमत्ता हा खरंच अपघात की मागच्या जन्मीचे संस्कार पुढच्या जन्मात कॅरीफारवर्ड झाले असे समजायचे? तिथेही गोची आहेच. लोक म्हणतात सगळे इथेच सोडून जायचे आहे. मग कॅरीफारवर्ड होते तरी काय?

सतिश गावडे's picture

21 Nov 2015 - 4:05 pm | सतिश गावडे

प्रत्येकाचा एक पिंड असतो, जो तो जन्मत:च घेऊन येतो.

जर माझं संदीपच्या त्या प्रतिसादाचे आकलन योग्य असेल तर संदीपचा रोख पुनर्जन्माच्या सिध्दांताकडे नसून Genetic Predisposition कडे आहे.

माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा जनुकांच्या स्वरुपात काही स्वभाव विशेष घेऊन जन्माला घेऊन येतो. उदा. कुणी जन्मतःच तापट स्वभावाचा असतो तर कुणी अंतर्मुख. हे स्वभाव विशेष एका पीढीकडून दुसर्‍या पीढीकडे जनुकांच्या स्वरुपात पुढे सरकत राहतात. अर्थात त्यातही काही वेळा एखाद्या पीढीतील एखाद्या अपत्यामध्ये हे स्वभाव विशेष कधी दबले जातात तर कधी प्रकर्षाने मूर्त रुप धारण करतात.

संदीप डांगे's picture

21 Nov 2015 - 4:11 pm | संदीप डांगे

सहमत. असंच काहीसं म्हणणं आहे.

मार्मिक गोडसे's picture

21 Nov 2015 - 8:36 pm | मार्मिक गोडसे

अर्थात त्यातही काही वेळा एखाद्या पीढीतील एखाद्या अपत्यामध्ये हे स्वभाव विशेष कधी दबले जातात तर कधी प्रकर्षाने मूर्त रुप धारण करतात.

सहमत.

Mendel's laws of inheritance हेच सांगतो.

संदीप डांगे's picture

21 Nov 2015 - 9:17 pm | संदीप डांगे

ओ धागावाले, तुम्ही पण टू द पॉइंट येऊन माझ्या प्रतिसादावर उत्तर द्याना...? का पळून र्‍हायलेत सारखे इकडून तिकडे...?

भंकस बाबा's picture

21 Nov 2015 - 10:01 pm | भंकस बाबा

संदीप जी तुम्ही तेच ना जे दुसऱ्या धाग्यावर मुस्लिमाचा कैवार घेत होते. एक तर तुम्ही गोंधळात आहत अथवा माझे डोके चालेनासे झाले आहे. श्रद्धा ह्या फ़क्त हिंदुच्या असतात काय? तुमच्या मागे दिलेल्या प्रतिसादानुसार मुस्लिम दंगे घडवत नाहीत तर काही बाहरी शक्ति ते त्यांच्याकडून ते करुन घेतात.
मग आपण मुस्लिमाच्या श्रद्धेनुसार विचार केला तर थोड्याच अवधीत सर्व जग मुस्लिम बनणार आहे. इस्लाम हे सर्व समस्येचे समाधान आहे. हदीस मधे सर्व आधीच लिहिलेले आहे , हे सर्व तुम्हाला मान्य असले पाहिजे.
एखाद्याला चुकून पाय लागला तर पाया पडणे ही हिन्दू संस्कृति आहे. मी स्वतःला नास्तिक म्हणवत असलो तरी पाय लागला तर नमस्कार करतो . याचा अर्थ असा होत नाही की मी त्या व्यक्तीला देव मानतो. ती माझी प्रतिक्षिप्त क्रीया असते. मला माझ्या हिंदू मित्राने गणपतीला घरी बोलवले तर एकतर मी त्याच्याकडे गणपतित जाणार नाही अथवा गेलो तर गणपतीला मनोभावाने पाया पडींन . माझ्या थियरी साठी मी माझ्या मैत्रीचा बळी देणार नाही.

संदीप डांगे's picture

21 Nov 2015 - 10:55 pm | संदीप डांगे

संदीप जी तुम्ही तेच ना जे दुसऱ्या धाग्यावर मुस्लिमाचा कैवार घेत होते.

मी कधीच मुस्लिमांचा कैवार घेत नाही. मुस्लिमांना जानीदुष्मन समजणारे मी तसं करतो असं समजतात. उदा: "भाजपविरोधी बोलणे म्हणजे देशद्रोही/पाकिस्तानप्रेमी असणे"

एक तर तुम्ही गोंधळात आहत अथवा माझे डोके चालेनासे झाले आहे.

पहिला क्लॉज चुकीचा आहे, दुसर्‍या क्लॉजबद्दल मी काही सांगू शकत नाही.

श्रद्धा ह्या फ़क्त हिंदुच्या असतात काय?

हा प्रश्न मला विचारण्याचा हेतू काय? नाही खरंच मला प्रश्नच समजला नाही. म्हणजे तुम्ही नेमकं कोण्या बाजूने बोलत आहात. श्रद्धावंतांच्या की बुद्धीवाद्यांच्या? कारण सद्यस्थितीत ह्या धाग्यावर हिंदू-मुस्लिम असं काही नाही आणि मी तरी श्रद्धावंतांच्या बाजूने मत मांडत आहे आतापर्यंत.

तुमच्या मागे दिलेल्या प्रतिसादानुसार मुस्लिम दंगे घडवत नाहीत तर काही बाहरी शक्ति ते त्यांच्याकडून ते करुन घेतात.

वाक्यांचा विपर्यास करुन स्वतःला हवे ते समजुन घेऊन एखाद्याबद्दल प्रतिमा तयार केली तर काय होते याचे हे विधान मूर्तिमंत उदाहरण आहे. मी कुठेही असं म्हटलेलं नाही की 'मुस्लिम दंगे घडवत नाहीत'. हां, हे म्हटलं असेल की राजकारणी मतांचे धृवीकरण करण्यासाठी दंग्यांचे आयोजन करतात. पुढचं विधान 'बाहरी शक्ति' हे फक्त आयसिस, अलकायदाला असलेल्या अमेरिकन पाठिंब्याबद्दल आहे. उणेपुरे तीस हजार आयसिसवाले आतंकवादी मारायला ७+ देशांना १३+ महिने झाले तरी जमत नाहीये. असं का होते याचं उत्तर शोधा. हा ह्या चर्चेचा धागा नाही. त्यामुळे इथे यापेक्षा जास्त लिहिणार नाही.

कृपया माझी 'मुस्लिमप्रेमी' अशी काही प्रतिमा बनवून घेऊ नये. डोके चकरावणार्‍या बर्‍याच भूमिका मी घेऊ शकतो. इथे मिसळपाववर कोणी मुस्लिम इस्लामची भलामण करणारा धागा टाकत नाही म्हणून... अन्यथा तेही दिसले असते.

संदीप डांगे's picture

21 Nov 2015 - 9:20 pm | संदीप डांगे

रच्याकने, मिपावरच्या आधीच्या काही आस्तिक-नास्तिक चर्चा असतील तर द्या कुणीतरी लिंका..

प्रश्न विचारण्याचा हेतु इतकाच की वेटकिंन ला पोपला भेटायला जाणारा किरिस्ताव वा हजला जाणारा मुस्लिम ह्यांच्या श्रद्धा तुमच्या श्रद्धेपेक्षा वेगळ्या कशा? म्हणजे एका धर्माची ती श्रद्धा व् दुसर्याची ते थोतांड असे म्हणायचे आहे का तुम्हाला? तसे नसेल तर मुस्लिमाना पण आपल्या प्रवाहात सामिल करा ना.त्यांच्या श्रद्धेला मान दया.

संदीप डांगे's picture

22 Nov 2015 - 5:33 pm | संदीप डांगे

हा प्रश्न कुणाला आहे? कोण म्हणतंय की 'वेटकिंन ला पोपला भेटायला जाणारा किरिस्ताव वा हजला जाणारा मुस्लिम ह्यांच्या श्रद्धा तुमच्या श्रद्धेपेक्षा वेगळ्या आहेत' म्हणून?

कवितानागेश's picture

22 Nov 2015 - 12:39 am | कवितानागेश

नेहमीप्रमाणेच चुकीच्या गृहितकांवर आधारित गदारोळ!

भंकस बाबा's picture

22 Nov 2015 - 12:44 am | भंकस बाबा

लिंका दया अथवा चर्चा करा.
चुकीचे बोललो असेल तर माफ़ी मागिण

तिमा's picture

22 Nov 2015 - 12:09 pm | तिमा

अशा चर्चांना कधी अंत नसतो. प्रत्येकाने त्याला जे पटेल तसे वागावे. उगाच इतरांना उपदेश करायला जाऊ नये, अशा मताचा मी झालो आहे.
--स्तिक = शहाणा, या समीकरणांत प्रत्येकानी त्याला आवडेल त्याप्रमाणे, 'आ' वा 'ना' टाकून वाचावे.

अर्धवटराव's picture

22 Nov 2015 - 12:42 pm | अर्धवटराव

बाबारे, तू ज्या गोष्टीवर प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो आहेस त्याविषयाच्या तुझ्या मूळ संकल्पनाच चुकीच्या आहेत. तुमचं मुसळ केरात जात नाहि आहे, तुम्ही केर-कचराच मुसळात घेतलाय कुटायला.

असं आम्हि आमच्या सरांना समजावुन सांगण्याचा खुप प्रयत्न केला... पण त्यांच्या पचनी पडलं नाहि. तसच अपचन झालय इथे पण. असो.

कवितानागेश's picture

22 Nov 2015 - 5:36 pm | कवितानागेश

. श्रद्धा ही अंधच असते याबद्दल मला आता पूर्ण खात्री आहे. मिपाकरांमध्येही मोठ्या प्रमाणात अशा लोकांचा भरणा असावा अशी शंका येते मला कधी कधी.
आता उदाहरणच घ्या,
http://www.misalpav.com/comment/763784#comment-763784
मनाविषयीं माझी समजूत अशी आहे:
व्यक्तीला दु:ख झाले की ती उदास होते. प्रसंगी रडते. आनंद झाला की ती उत्साहित होते. कधी हसते. गर्व झाला की उन्मत्तपणे बोलते, वागते. या प्रमाणे आविष्कारातून भावना समजतात. ......... सर्व भावनांच्या समुच्चयाला मन असे नाव आहे. मन अमूर्त आहे. सर्व भावनांचे उगमस्थान मेंदू आहे. तसेच बुद्धीसुद्धा मेंदूतच उद्भवते.
या प्रतिपादनातली तर्कातली आणि गृहितकातली चूक कुणालाही कळली नाही. सगळे अंधश्रद्ध वा वा करत राहिलेत. भावना व्यक्त केली नाही तर तिचे अस्तित्वच नाही का? व्यक्त न करताही आपली भावना आपल्याला माहितच असते. इथे उलटा क्रम आहे!
म्हणजे मन अमूर्त आहे.
सर्व भावना मनात असतात.
मन मेंदूत असते!? ( पण ते अमूर्त असेल तर त्याची जागा कशी ठरवली? ;) )
मेंदू नसलेल्या जीवांच्या भावनांचे काय?
शिवाय अमूर्त एनटीटी कडून मूर्त परिणाम कसे साधले जातात? कुणी वैदन्यानिक उत्तर देईल का प्लीज...
शिवाय हे असे व्हेग (आणि चुकीचेही) उत्तर की मन अमूर्त वगैरे आहे, हे आमच्यासारख्या श्रद्धापीडितांनी वैदन्यानिक सत्य समजून गपचुप ऐकून घ्यायचे आणि आणि आम्ही सांगितले की अव्यक्त परब्रह्म अमूर्त आहे, तर आम्ही येडे!!??

स्वगत: एक लेख पाडावा का ???

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Nov 2015 - 5:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्ही सांगितले की अव्यक्त परब्रह्म अमूर्त आहे, तर आम्ही येडे!!??

हो.

स्वगत: एक लेख पाडावा का ???

वेलकम. २५ प्रतिसादाची जवाबदारी मी घेतो.

-दिलीप बिरुटे

विवेकपटाईत's picture

22 Nov 2015 - 6:52 pm | विवेकपटाईत

मला वाटते तुमची भावना बरीच दुखावल्या गेली आहे. बाकी 'मंत्र सामर्थ्य' म्हणजे या शब्दाचा अर्थ शोधणे हि आवश्यक आहे. बाकी श्रद्धावंत लोक जास्ती तार्किक रूपाने विचार करतात, नास्तीकांपेक्षा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Nov 2015 - 6:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निष्कर्षावर पोहोचलात ? काही विदा आहे का ? श्रद्धाळु लोकांच्या कुठे नादी लागता म्हणुन हे नास्तिक लोक काही बोलत नाहीत असं मला वाटतं !

-दिलीप बिरुटे

संदीप डांगे's picture

22 Nov 2015 - 10:25 pm | संदीप डांगे

डॉ. साहेब,

झालंय असं की विज्ञानाचे चार गॅजेट्स दाखवून वैज्ञानिक पद्धतीच्या नावाखाली अहंकाराचा, विवेकवादाचा अनाठायी प्रोपागंडा केला गेलाय. तो इतका झालाय की विरूद्ध बाजूही तार्किक आणि अभ्यासपूर्ण विचार-संशोधन करू शकते याकडे कुणाचे लक्षच जात नाही, कुणी(हे विज्ञानवादीच) महत्त्वही देत नाही. हा झगडा मूर्त विरुद्ध अमूर्त मधला आहे. तो अगदी मुदलातच चुकीचा आहे.

वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करण्याजोगे दावेच मान्य केले जातील असे म्हणायचे, पण मग वैज्ञानिक पद्धतच वापरा म्हटले की पळ काढायचे ह्याशिवाय इथल्या विज्ञानवाद्यांनी काय केले? मी आधीच म्हटले तसे झाडांच्या वाढीचे औषध माणसावर उपयोगी असेल तरच ते खरे असे म्हणणार्‍यांचे काय करावे?

मूर्तीच्या समक्ष दानपेटी फोडली. देवीच्या अंगावरचे दागिने चोरले, मुकुट पळविला, दिवेआगर येथील मंदिरात चोरटे शिरले, प्रतिकार करणार्‍या रक्षकाला जीवे मारून सुवर्ण-गणेश चोरला, देवाने निष्ठावंत सेवकाला वाचवले नाही. या सत्य घटना आहेत. यावरून कोणता निष्कर्ष निघतो? देवमूर्तीत काही सामर्थ्य आहे असे दिसते का? प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपल्या मनाशी विचार करावा.

हे वाचल्यावर श्रद्धाळूंच्या भावना दुखावतात. ज्याची सत्यता कुणाही सुबुद्ध व्यक्तीला पटावी असे सत्य सुसंस्कृत भाषेत निदर्शनाला आणल्यावर श्रद्धाळूंच्या भावना का दुखावतात? मूर्तीमध्ये देवत्व असते ही श्रद्धा अतूट असेल तर हे विधान त्यांना हास्यास्पद वाटायला हवे.

प्राणप्रतिष्ठा, मुर्तीपूजा वगैरे एक विशिष्ट प्रकारची साधना आहे (ति कशी हा वेगळा विषय आहे). प्राणप्रतिष्ठा करुन एखादा रोबोट निर्माण करावा व त्याने आपल्या मालमत्तेचं रक्षण करावं अशी कुठलिही प्रोव्हिजन त्यात नाहि. रेडीओसंचात बॅटरी घालुन आकाषवाणी केंद्राशी ट्युन करतात. आता त्या रेडीओची प्लॅस्टीकची केस बदलुन चामड्याची घातली, किंवा तो रेडीओसंच चोरीला गेला, तुटला तर आकाषवाणी केंद्राने आपलं "सामर्थ्य" दाखवावं असा 'वैज्ञानीक' दावा कोणि करत नाहि.
आपण जे आर्ग्युमेण्ट करत आहोत त्यातल्या प्रमेयांची किमान वैधता तपासुन बघणे इतकंहि करु नये 'विज्ञानवाद्यां'नी ? आपले समज चुकीचे नाहितच या वैज्ञानीक अंधश्रद्धेच्या निर्मुलनाकरता कुणी आनेवाले है क्या दुनीयामे ??

हमें आपके रेडियो के गाने बहुत पसंद है. हमें वो परेडसी परेडसी जाना नहीं सुनना है. कब सुनायेंगे?

अर्धवटराव's picture

23 Nov 2015 - 12:42 am | अर्धवटराव

कृपया प्रतिक्षा किजीये :)

संदीप डांगे's picture

23 Nov 2015 - 9:39 am | संदीप डांगे

An atheist method: This is the conclusion, why we need any facts to prove it?

अतिशय मुद्देसूदपणे मांडले आहे, सहमत !