भावना दुखावणे
"मंत्रसामर्थ्य " या लेखामुळे काही वाचकांच्या भावना दुखावल्या असतील तर त्या सर्वांची मी क्षमा मागतो. या भावना दुखावण्यावर अधिक विचार केला. भावना का दुखावतात?
माणूस हा मूलत: तर्कनिष्ठ प्राणी आहे. (मॅन इज अ रॅशनल अॅनिमल) प्रत्येकाला तर्कबुद्धी असते. (मतिमंद अपवाद). कुतूहल असते. त्यामुळे तो निसर्गाचे निरीक्षण करतो. घटनांवर विचार करतो. त्यातून अनुभव मिळतो. त्याने अनुभव-विवेक (कॉमनसेन्स) येतो. त्याचा उपयोग व्यावहारिक जीवनात होतो. पण देवा-धर्माचे संस्कार बालपणापासून मनावर बिंबवलेले असतात. त्यात आई-वडील, शिक्षक, समाज, प्रसारमाध्यमे इत्यादींचा सहभाग असतो. बालपणीचे संस्कार दृढ असतात. भांड्यावर ठोक-ठोकून कोरलेले नाव जसे सहजी पुसता येत नाही तसे बालमेंदूवर झालेले संस्कार पुढे सहजीं पुसले जात नाहीत. मुलगी मोठी होते. मग आपल्यावर बालपणी झाले तसे संस्कार ती आपल्या मुलांवर करते. असे पिढ्यानुपिढ्या चालते. या संस्कारांमुळे श्रद्धा निर्माण होतात. त्या मुख्यत्वेकरून देव, धर्म, आत्मा, पुनर्जन्म इ.संबंधी असतात. श्रद्धेमुळे तर्कबुद्धी ठप्प होते. जे धर्मग्रंथांत आहे, धर्मगुरू सांगतात ते सर्व खरे मानण्याची मानसिकता बनते. याचा गैरफायदा घेऊन समाजातील लबाड लोकांनी ज्योतिष, मुहूर्त, भाग्यरत्ने, ग्रहांचे खडे, वास्तुशास्त्र अशा अनेक गोष्टी निर्मून त्या देवा-धर्माशी जोडल्या. त्यामुळे श्रद्धाळू त्यांना बळी पडतात. हे विषय सोडले तर अन्य क्षेत्रांत श्रद्धाळूंची तर्कबुद्धी चांगली चालते. समजा त्यांच्या वाचनात पुढील मजकूर आला:--
"मूर्तीची समंत्रक प्राणप्रतिष्ठा केली की तिथे देवतत्त्वाचा संचार होतो,असा समज रूढ आहे. पण त्याचा अनुभव कधी आला आहे का? प्रचीती कधी दिसली आहे का? मूर्तीच्या समक्ष दानपेटी फोडली. देवीच्या अंगावरचे दागिने चोरले, मुकुट पळविला, दिवेआगर येथील मंदिरात चोरटे शिरले, प्रतिकार करणार्या रक्षकाला जीवे मारून सुवर्ण-गणेश चोरला, देवाने निष्ठावंत सेवकाला वाचवले नाही. या सत्य घटना आहेत. यावरून कोणता निष्कर्ष निघतो? देवमूर्तीत काही सामर्थ्य आहे असे दिसते का? प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपल्या मनाशी विचार करावा."हे वाचल्यावर श्रद्धाळूंच्या भावना दुखावतात. ज्याची सत्यता कुणाही सुबुद्ध व्यक्तीला पटावी असे सत्य सुसंस्कृत भाषेत निदर्शनाला आणल्यावर श्रद्धाळूंच्या भावना का दुखावतात? मूर्तीमध्ये देवत्व असते ही श्रद्धा अतूट असेल तर हे विधान त्यांना हास्यास्पद वाटायला हवे. असे लिहिणार्याची त्यांनी कीव करायला हवी. ज्यात एकही अपशब्द, असभ्य, असंसदीय शब्दप्रयोग नाही, तसेच कुणाचे चारित्र्यहनन नाही, असे अभिव्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. तेव्हा श्रद्धावंतांच्या दृष्टीने निरर्थक असलेल्या लेखनाकडे त्यांनी दुर्लक्ष करावे. मग भावना का दुखावतात? मला वाटते श्रद्धाळूंनी असे लेखन वाचले की त्यांच्या उपजत तर्कबुद्धीमुळे लेखातील तर्कसंगत युक्तिवाद आणि निष्कर्ष त्यांना पटतात. ते योग्य आहेत असे बुद्धीला वाटते. पण बालपणापासून जोपासलेल्या श्रद्धेचा त्याग करायला भावना तयार होत नाही. मग बुद्धी आणि भावना यांच्या द्वंद्वांत ते सापडतात. हे खरे मानावे का ते याचा निर्णय होत नाही. ते अगतिक होतात. आपले काहीतरी चुकते आहे हे कळते. पण वळत नाही. मन प्रक्षोभित होते. उद्विग्न होते. मग "या लेखामुळे आमच्या भावना दुखावल्या." असे ते म्हणतात. ज्या लेखातील विचार सुसंस्कृत शब्दांत मांडलेले आहेत, ज्यातील विधाने वस्तुस्थितिदर्शक म्हणजे सत्य आहेत, ज्यात चारित्र्यहननाच्या हेतूने वृथा दोषारोप केलेले नाहीत, ते लेखन आपल्याला कितीही कटु आणि अप्रिय वाटले, तरी तो अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आविष्कार आहे हे समजणे योग्य ठरेल. त्या लेखनावर टीका करावी. मात्र टीकेत लेखनशुचिता अवश्य पाळावी.
प्रतिक्रिया
अट्टल व सराईत सश्रद्ध आणि
मी पण नास्तिक
प्रश्नाला चांगले हाताळलेत.
सुंदर उपक्रम आणि विचार.
मस्त !!!
मला एक समजत नाही
अगदी बरोबर
५० % बरोबर
भंकस बाबा ह्यांनी केलेले
@रमेश
प्रक्षोभाचे प्रत्यंतर
ह्या विषयावर स्वतंत्र लेख
+१
यनावालासर,
शिक्षणाने नास्तिकपणा येतोच
प्रचेतसजी,
उत्तर तसं पाहिलं तर सोपं आहे.
व्यक्ती तितक्या प्रकृती
अगदी ठामपणे तीन स्रोत
मला जरा समजले नाही आपले विधान
शान्तिप्रिय (?) अल्प(?
समाजसुधारणा आधी आपल्या
होय ते मागास आहेत.
बिंदुगामी प्रतिसाद
(No subject)
देवतत्त्व म्हणजे काय ?
काय विचार करावा कळेनासं झालं
श्रद्धावंत माणसाला सरसकट,
बव्हंशी सहमत
हे हे, धन्यवाद! कधी
संदीप डांगे साहेब
ते विधान पुनर्जन्माच्या
प्रत्येकाचा एक पिंड असतो, जो
सहमत. असंच काहीसं म्हणणं आहे.
अर्थात त्यातही काही
ओ धागावाले, तुम्ही पण टू द
@संदीप , डांगेचे
संदीप जी तुम्ही तेच ना जे
रच्याकने, मिपावरच्या आधीच्या
श्रद्धा या फ़क्त हिंदुच्या असतात काय?
हा प्रश्न कुणाला आहे? कोण
नेहमीप्रमाणेच चुकीच्या
पिंका टाकू नका,
चर्चा
आमच्या सरांचं नावच बदनाम.
.
:)
मला वाटते तुमची भावना बरीच
काही विदा आहे का ?
डॉ. साहेब,
Pagination