घोरणारा आत्मा.........
"कांदे पोहे" चा रीतसर कार्यक्रम झाला..
मंदार ला वसुधा पसंत पडली..
मंदारने होकार कळवला व साखरपुडा झाला..
लग्नाची तारीख ठरली व वसु च्या घरी लग्नाची तयारी सुरु झाली..
मंदार नगर पालीकेत लीपीक म्हणुन काम करत होता..सरकारी नोकरी.शांत नीवांत जीवन..२ रुमचा स्वत:चा फ्ल्याट होता..
मंदार ला आई वडील नव्हते..
वसु त्याला मना पासुन आवडली होती..
भेटी गाठीत मंदार चा शांत स्वभाव वसुला आवडला. त्याच्या बोलण्यात तीचा जीव गुंतु लागला....
व एक नाजुक प्रेमबंध जमु लागला होता...
एकदा फीरायला जात असताना वसुला तीचा जुना शाळकरी मित्र भेटला व वसु त्याच्याशी गप्पा मारु लागली..ब~याच वेळ गप्पा चालल्या होत्या...
तिचा गप्पा मारण्यातला मोकळेपणा व देहबोली मंदार ला अस्वस्थ करत होती..
तो गेल्यावर मंदारने वसु जवळ आपली नाराजी व्यक्त केली व लग्नापुर्विची मैत्री नाति संपव असा आग्रह धरला.
वसुस मात्र हे रुचत नव्हते..मैत्री वर त्याने घेतलेला आक्षेप तिला खटकत होता...
ती बोलायला लागली पण मंदार ने तिला थांबले व स्पष्ट शब्दात सांगीतले कि हे त्याला चालणार नाहि..अशी मैत्री नाति..लग्नानंतर संसारात वादळे निर्माण करतात ..त्या मुळे हे असे नकोच.....
बोलताना मंदार च्या आवाजात एक सुप्त जरब व धार होति..
वसु काहि बोलाली नाही.."ठिक आहे" असे म्हणत तिने विषय संपवला...
घरी अल्यावर आई जवळ बोलताना आईने सांगीतले की पुरुष काहि दिवस असेच असतात .एक मुल झाले व संसारात रुळली कि सारे ठिक होईल...
.
१-२ दिवसानी कॉफि पिताना मंदार म्हणाला..माझ्या परवाच्या बोलण्याचे वाईट वाटुन नको घेवुस..तु मला खुप आवडते..मी तुझ्या बाबतित खुप पझेसिव्ह आहे..."
वसुधा काहि न बोलता नुसतिच हसली.
.
लग्न झाले व वसु संसाराला लागली...
मध्यरात्रीची वेळ असेल कसल्या तरी आवाजाने तीला जाग आली...
शेजारी झोपलेलेला मंदार तारस्वरात घोरत होता..मुळात रुम लहान त्यातुन मंदार चे घोरणे टिपेला पोहोचले होते..
भयानक जोरात घोरत होता तो..
वसुने त्याला गदागदा हलवत उठवले...मंदार अर्धवट झोपेत होता उठला...
"अहो तुम्ही किति मोठ्या आवाजात घोरत आहात" ती म्हणाली...
हो का?" असे म्हणत मंदार पुन्हा झोपला...
श्वासाने लय पकडली अन त्याचे घोरणे पुन्हा सुरु झाले.
वसुने ति रात्र जागुन काढली..तीला बाहेरच्या खोलित झोपावेसे वाटत होते..पण तिथ पर्यंत तो आवाज पोहोचत होता....
.
सकाळी चहा घेताना वसु ने मंदार जवळ घोरण्याचा विषय काढला...
ऐकताच मंदार म्हणाला " खर सांगु..अत्ता पर्यंत मी एकटाच झोपत होतो त्या मुळे मी घोरतो हे कुणी मला सांगीतलेच नाहि..पण आता काय करायचे??वसु मला माफ कर पण मी तरी काय करु? झोपेत मी काय करतो ते मला समजत नाहि..मात्र तुला त्याचा त्रास होतो हे ऐकुन मला ओशाळल्या गत होत आहे"
वसु ने त्याचा कडे पाहिले त्याचा बोलण्यात एक निरागस पणा होता...
"ओके हरकत नाहि मी बघते काय करायचे ते.." वसु म्हणाली.
वसुने हि गोष्ट जवळच्या लोकाना सांगीतली..व तिला क्लु मिळाला.
डॉ.स.दा.झोपे.. हे डॉ यावर उपाय करतात असे तिला समजताच तिने डॉ ची ऍपोइंट्मेन्ट घेतली.
डॉ मंदार ला तपासले व एक आठवड्याची औषधे दिली...
" तुम्ही हि औषधे घ्या बहुतेक गुण येईल पण आला नाहि तर आपल्याला एक छोटेसे ऑपरेशन करावे लागेल..आणी हो उगीच टेंन्शन घेऊ नका..किरकोळ आजार आहे..सर्वानाच कमी जास्त प्रमाणात हि बिमारी असते"
आठवड्यात फारसा गुण आला नाहि व पुढच्या आठवड्यात ऑपरेशन करावयाचे ठरले...
.
मंदार डॉ कडुन परस्पर कामाला गेला..मंदार ने खळखळ न करता ऑपरेशनला तयारी दाखवल्या मुळे वसु पण खुष होति..आज सायंकाळी तिने " मसाला डोसा" चा बेत ठेवला होता..
मसाला भाजी तयार होति..डोश्याचे बॅटर पण तयार होते वाटीभर लोणी तिने फ्रिज मधे ठवले होते..मंदार आला कि गरमागरम डोसे तयार करायचे असा बेत ठरला होता..
.
५ वाजुन गेले तरी मंदार चा पात्ता नव्हता..ति मंदार ची वाट पहात बसली ६ वाजले अन वसु अस्वस्थ झाली तिने मंदार ला फोन लावला पण लागला नाहि..
बहुतेक काम असेल असा तिने विचार केला....
तेव्हढात फोन ची रिंग वाजली तिने फोन घेतला व फोन वर एक अनोळखी आवाज आला तो म्हणत होता कि "तुम्हा मंदाच्या घरचे आहात का?
हो मी मंदार चा बायको बोलत आहे" वसु उत्तरली.
मग ऐका मंदार ला अपघात झाला आहे त्याना ट्रक ने ऊडवले आहे..आम्हि त्याना "सिटी दवाखान्यात" आणले आहे व ते रुम नं १०५ ला ऍडमिट आहेत.."
बातमी ऐकताच वसुच्या पायातले बळ गेले..तिने आइला फोन केला व त्या दोघीजणी दवाखान्यात पोहोचल्या..
मंदार बेशुद्ध अवस्थेत होता..सलाईन प्राणवायू..रक्ताच्या नळ्या लावलेल्या दिसत होत्या..अंगावर ब्यांडेज दिसत होते..
चौकशी करता कळाले मंदार ला एका ट्रक ने उडवले होते..डॉ म्हणाले आत खुप जखमा झाल्या आहेत..आत रक्तस्त्राव चालु आहे..
देवाची प्रार्थना करत वसु रुम च्या समोर असलेल्या खुर्चीवर बसली..
.
रात्रीचे १२ वाजायला आले होते..शारिरीक धावपळ..मानसिक ताण या मुळे वसु थकली होति..
व तिचा डोळा लागला...
"ताई ऊठा असे नर्स म्हणत असल्याचे तिला वाटले व ति पटकन उठली..समोर नर्स उभी होती..ती सांगत होती..."पेशटला वाचवु शकलो नाहि..आता पेशट आपल्यात नाहि"
वसु ची झोप खाडकन उडाली..समोरच्या रुमच्या काचेच्या खिडकित वॉर्ड बॉय मंदार च्या शरीरातुन सुया बाहेर काढत असल्याचे तिने पाहिले...खेळ संपला होता..
तिने आईला फोन लावला आई व ईतर जण आले..कागद पत्रांची पुर्तता केली बिल भरले व मंदार ची बॉडी ताब्यात मीळाली..
.
क्रीयाकर्मे आटोपली व वसु माहेरी रहावयास आली..मंदार च्या खोलिला कुलुप लागले होते...
.
काळ पुढे सरकत होता..वसु पण भानावर आलेली होति..
आईने संधी साधत वसु जवळ लग्नाचा प्रस्ताव ठेवला..
वसु काहिच बोलली नाहि व तिचे मौन हीच संमती समजत आईने स्थळे पहाण्यास सुरवात केली
शेखर बिजवर होता... कंपनित नोकरी होति..व त्याला वसु पसंत पडली.
लग्न झाले अन वसु सासरी नांदु लागली.
शेखरच्या घरात भाऊ बहिणी भाऊ सासरे असे मोठे खटले होते..
सासुचा स्वभाव विचित्र होता..तिचे अन वसुचे जमेना..शेजारी गप्पा मारताना वसु स समजले कि मृत सुनेला पण हिने खुप छळले होते..
वसु ने शेखर शी बोलताना त्याला सारे सांगीतले..त्याला हि आईचे वागणे खटकत होते..
वसुने जुन्या मंदार च्या घरी रहाण्याबद्दल शेखर ला सुचवले..व त्याने पण प्रस्ताव मान्य केला.... सासुला तर असे हवेच होते.."सुंठी वाचुन खोकला गेला होता...
.
वसु शेखर चा संसार सुरळीत सुरु झाला.
त्या रात्री शेखर लवकर झोपी गेला होता वसु वाचत बसली होति..
शेखरचा मंद श्वास चालु होता घोरणे अजिबात नव्हते..
वाचन झाल्यावर वसुने दिवा मालवला अन ति पण झोपी गेली
.
रात्री साधारण १२-१२.३० चा सुमार असेल..
तिला प्रचंड गारवा जाणवु लगला..
वसु उठली अन तिने खिडकी उघडी आहे का पहाण्यासाठी नाईट ल्यांप लावला.
खिडकी बंद होति..
वळताच तिला एक भयाण आकृति समोर दिसली बेडच्या आगदी जवळ...
तिने दिवा लावला अन समोर मंदार उभा होता.
त्याचा चेहरा रक्ताने माखला होता जखमातुन रक्त गळत होते..
तो म्हणाला " वसु मी जरी जगात नसलो तरी माझा आत्मा तुझ्या भोवति घुटमळत आहे..तुझ्या शिवाय मी राहु शकत नाहि..माझा आत्मा मुक्त होणार नाहि..तुझा सहवास लाभावा म्हणुन मी शेखरच्या शरीरात आपला आत्मा प्रवेशत आहे.."
वसुची पाचावर धारण बसली..मंदार चे ते भेसुर रुप पाहुन ....
तिने पाहिले मंदार रडत होता..डोळ्यातुन रक्ताचा पुर वहात होता..
"मी शेखर च्या देहात जात आहे" असे म्हणत ति आकृति नाहिशी झाली.
.
तिने घाबरलेल्या स्थितित शेखर कडे पाहिले तो शांत झोपला होता..
क्षणात शेखर किंचाळुन उठला..व परत झोपी गेला.
वसु ने ओळखले की मंदारच्या आत्माने शेखर च्या शरीराचा ताबा घेतला आहे..
ति शेखर कडे पहात होती..हलकेच श्वासाची लय वाढल्याचे तिच्या ध्यानात आले व शेखर घोरु लागला.
काहि क्षणंआत त्याच्या घोरण्याचा आवाज टिपेला पोहोचला..
वसु ला काय करावे ते समजेना.तश्या आवस्थेत पण तिला डॉ.झोपे ची आठवण आली..
पण तिला उमगले शेखरच्या शरीरात काहिच दोष नाहि..
घोरण्याचा आवाज मंदार चा आत्मा काढत होता...अन आत्म्याचे ऑपरेशन कसे करणार...
ह्या विचारने वसु कोसळली..व हवालदिल झाली..तिला रडु फुटले
मात्र बाजुस झोपलेला शेखर तारस्वरात घोरत होता..आवाजाने खोली दणाणुन गेली होती
.
प्रतिक्रिया
12 Nov 2015 - 7:42 pm | अभ्या..
जब्बरदस्त
कसले खत्तरनाक कन्क्लुजन
अक्कुकाका रॉक्स ऑल्वेज
13 Nov 2015 - 5:25 pm | बॅटमॅन
अगदी अगदी!!!!!!!!!!आत्म्याचे आप्रेषण कसे करणार????????????
12 Nov 2015 - 8:02 pm | मांत्रिक
अक्कुकाका राॅक्स!!!जियो सर जियो!!!
12 Nov 2015 - 8:19 pm | टिवटिव
____/\_____
12 Nov 2015 - 8:30 pm | आदूबाळ
धन्य झालो. वसूच्या लॉजिकलनेसपणाचं कौतुक आहे राव. आत्म्याचे ऑपेशन कसं करणार हा प्रश्न अत्यंत योग्य आहे.
12 Nov 2015 - 8:30 pm | मितान
अग्गो बाई ! काय बै सणासुदीला घोर लावला तुम्ही !
मी काय म्हणते, एखाद्या डॉक्टरचा आत्मा आणून तो वसुधाच्या अंगात नै का सोडता यायचा ??? मग आत्मे आत्मे बघून घेतील. आपल्याला घोर नै न वसुधालाही घोर नाही.
12 Nov 2015 - 8:38 pm | मितान
एक राहिलं-- ते डोशाचं ब्याटर खराब झालं असेल नै :(
अजून एक - किती निरागस लिहिलंय तुम्ही ! नक्की तुम्हीच ना अकु ????
12 Nov 2015 - 8:32 pm | शब्दबम्बाळ
वाचून वारलो!
पण प्रतिक्रिया देण्याचा मोह आवरला नाही म्हणून कलीगच्या शरीरात घुसून त्याच्याकडून लिहून घेतोय!! :)
13 Nov 2015 - 10:16 am | पलाश
:)))
12 Nov 2015 - 8:48 pm | अजया
आत्म्याचे आॅपरेशन करता येईल अकु.डाॅक्टरचा आत्मा करु शकेल.कथेचा सिक्वल लिहाच.
कोणाला कशाचं मितानला डोशाचं =))भाजी आणि लोणी विसरलीस का?
12 Nov 2015 - 8:53 pm | पियुशा
घोरनारा आत्मा ? ही कथा विनोदी भयकथा आहे राव ,आत्मुस गुर्जी कुठे गेले ;)
13 Nov 2015 - 1:18 am | अत्रुप्त आत्मा
@ आत्मुस गुर्जी कुठे गेले >>
दुत्त दुत्त जिल्बुचा! मै मेरा आत्मा नही छोडूंगा|
13 Nov 2015 - 7:09 am | पीके
ईथे एक घोरणारी स्मायली टाकुन विषय संअपवा बघू...
13 Nov 2015 - 6:08 pm | अत्रुप्त आत्मा
13 Nov 2015 - 11:00 pm | पीके
हेच म्हनलोतो..
13 Nov 2015 - 11:04 pm | पीके
आत्मा अत्रूप्तच असनार..
12 Nov 2015 - 9:01 pm | बोका-ए-आझम
हा अन्याय आहे. स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे!
12 Nov 2015 - 9:05 pm | मितान
वसू घोरणार नाही कारण आत्मा शेखरात गेलाय...
फार झाले विदर्भाचे लाड !!!
12 Nov 2015 - 9:10 pm | अजया
स्वतंत्र अकु झालेच पाहिजेत.
12 Nov 2015 - 9:20 pm | मांत्रिक
अकु कथांसाठी स्वतंत्र टॅब झालीच्च पाहिजे....
13 Nov 2015 - 9:16 am | पगला गजोधर
हागनदरीमुक्त वेगळा विधर्भ झाला पाहिजे .
12 Nov 2015 - 9:07 pm | जव्हेरगंज
सणासुदीला टरकलो राव!
बाकी आपल्या कथा साष्टांग असतात! :-D
लगे रहो :)
12 Nov 2015 - 9:18 pm | पैसा
घाबल्ले ना मी!
12 Nov 2015 - 9:36 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
माझा अत्मा तुझ्यात आणि तुझा अत्मा बाहेर...ओम फट स्वाहा!!
12 Nov 2015 - 10:09 pm | एक एकटा एकटाच
एक नंबर प्रतिसाद !!!!!!!!!!
12 Nov 2015 - 10:36 pm | परिकथेतील राजकुमार
आत्मु डांबिस आहे.
12 Nov 2015 - 11:53 pm | चांदणे संदीप
आत्मे शॉक्स!
अकु रॉक्स!
चला, आता डॉ. स. दा. झोपेंचा आत्मा करून टाका पुढल्या भागात! हाकानाका!
अकु, मोजी, दिनु गवळी यांनी भय+हास्य+करूण+गूढ+वैताग या रसांमध्ये कथा बुडवून पिण्याची....आपल.... लिहिण्याची एक कार्यशाळा आयोजित करावी अशी इथे मी समस्त अखिलभारतीयनवमिपाकरलेखककवीविडंबनकारकाथ्याकूटपटूमॅरेथॉनप्रतिसादक संघातर्फे जाहीर मागणी करतो.
धन्यवाद,
Sandy
13 Nov 2015 - 12:55 am | ब्रिटिश टिंग्या
__/\__
अशक्य! वारलो!
13 Nov 2015 - 12:55 am | उगा काहितरीच
बिच्चारी वसु ! अतृप्त आत्मा उर्फ अतृप्त यांना संपर्क करायला सांगा वसुला , बघा काही फरक पडतो का ?
13 Nov 2015 - 1:33 pm | टवाळ कार्टा
त्यांच्याकडे आधीच एक वैजू आहे...त्यातून आणखी जुळे पण हैत...एक्टे गुर्जी किती मेहनत कर्णार =))
13 Nov 2015 - 2:41 am | रामपुरी
जखमातुन रक्त गळत होते.. डोळ्यातुन रक्ताचा पुर वहात होता..
एका आत्म्यात साधारण किती रक्त असतं? आणि एवढं सांडलेलं रक्त साफ कोण करणार आता?
13 Nov 2015 - 6:22 am | मनीषा
आईग्गं ... :))
कथा भयंकर आवडली .
13 Nov 2015 - 8:01 am | एस
काय (थर्ड)क्लास लिहिता हो तुम्ही! भुस्कुटेबैंनी फक्त तुमचेच लेख वाचून तो गहन आणि अभ्यासू निष्कर्ष काढलेला असणार याबाबत कोणतीही शंका नाही!
13 Nov 2015 - 8:37 am | बोका-ए-आझम
झालंय हो त्यांचं. पण स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे!
13 Nov 2015 - 9:02 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
बबन सर चावले का काय बोकोबा =))
13 Nov 2015 - 5:58 pm | बोका-ए-आझम
बबन, पोपा म्याडम, सप्तर्षींचं मांजर, बिबट्या वगैरे सगळे एकत्र चावले.
13 Nov 2015 - 9:00 am | सिरुसेरि
एक नंबर अघोरी कथा आहे.
13 Nov 2015 - 10:09 am | सागरकदम
कथेत खूप मोठू चूक आहे
घर शिफ्ट केल्यावर तिला कळले ?
"शेखरचा मंद श्वास चालु होता घोरणे अजिबात नव्हते.."
ह्याचा अर्थ आधी शेखर झोपत नवता ?
13 Nov 2015 - 10:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भयकथा अजुन फुलवता आली असती अर्थात मजा आलीच नाही असं काही नाही, मजा आली. लिहित राहा.
बाकी, आत्म्याचं असं आदान प्रदान इतकं सहज महानुभाव पंथात पंचकृष्णाच्या कथेत आहे, असो ती कथा सांगेन कधीतरी. :)
-दिलीप बिरुटे
13 Nov 2015 - 12:51 pm | मीता
दावणगिरी डोसा करणार होती का ..नाही म्हणजे लोण्याचा गोळा ठेवला न फ्रीजमध्ये म्हणून विचारलं
13 Nov 2015 - 1:18 pm | एस
वरील कवितेतील अजून एक सौंदर्यस्थळ खास वाचकांचे कीबोर्ड कॉफीने खराब करण्यासाठी -
"हो मी मंदार चा बायको बोलत आहे" वसु उत्तरली."
13 Nov 2015 - 2:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता लेखनाला एकदा थर्ड क्लास म्हटल्यावर प्रतिसाद देण्यासारखं काही उरत नाही, तरी अजूनही लेखनातील सौंदर्य स्थळे खुणावतच आहे का ?
-दिलीप बिरुटे
13 Nov 2015 - 11:05 pm | एस
थर्डक्लासमध्ये सौंदर्य आणि स्थळं, ह्यातलं काहीही नसतं असं म्हणणार्या बूर्झ्वा प्राडाँचा तीव्र णिशेद असो. ;-)
कॉम्रेड एस.
13 Nov 2015 - 3:14 pm | मीता
तुम्हा मंदाच्या घरचे आहात का? असं विचारल्यावर वसु अजून काय उत्तर देणार..
13 Nov 2015 - 8:55 pm | स्रुजा
लोल.. ती त्या वेळी अशी ही बनवाबनवी बघत असणार आणि तेवढ्यात फोन आला असणार
13 Nov 2015 - 11:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
लोल!! बेष्ट पिच्चर है तो.
एकेक डायलॉग झॅक आहे.
माझा तो दुबईवाला मित्र, तो अचानक वारला. तुमचे ७० रुपये पण वारले.
माने हा शुद्ध हलकटपणा आहे.
इ.इ.
16 Nov 2015 - 4:27 pm | मीता
लिम्बाच मटण विसरू नका . :)
16 Nov 2015 - 5:46 pm | सागरकदम
ते नेमके कुठे आले ? मी विसरलो
16 Nov 2015 - 6:07 pm | टवाळ कार्टा
आधी नाही अठवणार....नंतर आपोआप स्वतःच स्वतःला अठवण करून देशील =))
13 Nov 2015 - 1:49 pm | बाबा योगिराज
कै उपाय सुचवा...
कथा आवडली.
थोड्स घाबरलेला बाबा.
13 Nov 2015 - 6:14 pm | नूतन सावंत
अकु,तुम्ही सिक्वेल लिहयला घ्याच.पण मिपावर टाकण्याआधी पूर्वपरीक्षण करा. शुद्ध्लेखनाकडे लक्ष द्या प्लीज.डोळे फार ठेचा लागतात हो.
13 Nov 2015 - 6:29 pm | अविनाशकुलकर्णी
ओके
13 Nov 2015 - 6:26 pm | गामा पैलवान
कथा वाचून वाटलं की आत्मा ज्याम बदनाम शब्द झालाय. खरंतर भूत, पिशाच्च, लिंगदेह, वासनादेह असे अनेक पर्यायी शब्द उपलब्ध आहेत. आत्मा हा शब्द उगीच वापरलेला वाटतो. आत्मा उपाधीविरहित आहे. तो इकडून तिकडे जात बित नसतो. ज्याचं संक्रमण होतं त्याला लिंगदेह म्हणतात. आत्मा नव्हे.
-गा.पै.
13 Nov 2015 - 7:05 pm | सायकलस्वार
'भयरसाचिया घरी हास्यरस आलासे पाहुणेरा' अशा या क्रांतिकारी धाग्यावर मिपाकरांनी दिलेले बालिश प्रतिसाद वाचून मिपाकरांचे मानसिक वय कमी आहे याची पुन्हा खात्री पटली.
डिस्क्लेमर - हा प्रतिसाद मी दिलेला नसून भुस्कुटेबाईंच्या आत्म्याने माझ्या शरीरात शिरून लिहिला आहे.
13 Nov 2015 - 7:21 pm | मित्रहो
जर मंदारचा आत्मा शेखरच्या शरीरात गेला तर शेखरचा आत्मा कुठे गेला.त्या लोण्याच्या गोळ्यात दडून फ्रिजमधे तर नाही बसला.
उद्या मुलबाळ झाली तर कुणाचे आडनाव लावनार. बहुतेक शेखरचे कारण आत्म्याला मुल होत नाही असे ऐकले.
रक्तबंबाळ आत्मा शेखरच्या शरीरात गेला, जर आत्म्याला शरीर नसते तर रक्त कसे. शेखर आणि मंदार यांचा रक्तगट एकच होता का.
13 Nov 2015 - 8:46 pm | सागरकदम
मसाले डोसे एकदाचे बनवून टाका ,खराब होईल naahiter
13 Nov 2015 - 9:05 pm | Maharani
रामसेपटांची आठवण आली..
14 Nov 2015 - 3:35 am | गामा पैलवान
रामसेपटांची पटकथा थोडक्यात आटोपल्यासारखी वाटते आहे.
-गा.पै.
13 Nov 2015 - 9:06 pm | मदनबाण
अकुंचा आयडी आत्म्याने हायजॅक केलेले आहे, अकु २-४ ओळी आणि प्रश्नमंजुषा करण्या पलिकडे जात नाहीत ! हे बहुतेक हा लेख पाडणार्या आणि आयडी हायजॅक करणार्या आत्म्याला ठावूक नसावे !
हा ;- ५० वा बरं का मंडळी. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आ के तेरी बाहों में, हर शाम लगे सिंदूरी... :- Vansh
13 Nov 2015 - 11:49 pm | शिव कन्या
:))))
14 Nov 2015 - 12:25 am | चिरोटा
भन्नाट.कथा वाचताना शाळकरी मित्र ट्रकवाला असेल असे वाटले होते.
14 Nov 2015 - 12:39 am | पीके
आत्मा अत्रूप्तच असनार..
23 Nov 2015 - 8:38 pm | सागरकदम
अश्लील अश्लील
14 Nov 2015 - 12:47 am | पीके
हेच म्हनलोतो..
16 Nov 2015 - 4:00 pm | नाखु
हा अभिप्राय आम्च्याकडून.
बाकी सध्या आत्माबदल योजना कशी चालू आहे,ग्रुप बुकींगला काही सवलत वगैरे आहे काय.
16 Nov 2015 - 4:24 pm | प्रसाद गोडबोले
नशीब की मंदारला फक्त घोरायचाच त्रास होता =))))
23 Nov 2015 - 9:22 pm | अभिजीत अवलिया
विनोदी कथा आवडली.
24 Nov 2015 - 11:56 am | शित्रेउमेश
बाकी आत्मा अत्रूप्तच असनार..
24 Nov 2015 - 12:23 pm | मृत्युन्जय
मला ही कथा लय म्हणजे लयच आवडली. मी किमान मिनिटभर तरी पोट धरधरुन हसत होतो. शेवटचा पंच काय भारी जमलाय. आधी अकुंची कथा म्हणुन मी सोडुन द्यायचा विचार करत होतो पण शेवटपर्यंत वाचल्याचे चीज झाले. ही कथा एकदम खतरनाक विनोदी आहे
24 Nov 2015 - 2:39 pm | बाळ सप्रे
अकुंनी मोजी लेव्हल गाठली..
24 Nov 2015 - 3:41 pm | खटपट्या
ओ अकु, मलापण बर्याच लोकांच्या शरीरात जायचे हाय. कसे जायचे?
24 Nov 2015 - 4:41 pm | सागरकदम
रात्री ? लबाद्ड