थेंब एक असा बरसून गेला..

स्वाती फडणीस's picture
स्वाती फडणीस in जे न देखे रवी...
22 Dec 2008 - 1:22 pm

थेंब एक असा बरसून गेला..
=====================
.
.
गडगडाट ना कल्लोळ झाला..
घननीळ मुक्याने बोलून गेला..
.
सुटला ना जरा भिरभीर वारा..
वादळ थेंबात निचरून गेला..
.
झाकोळ रात्रीत दडवून गेला..
अवचित पाऊस बरसून गेला..
.
दिशा दिशांत पसरवून शहारा..
अंतरंगी गारवा झिरपून गेला..
.
अलवार झेलता झेला नभीचा..
अलगूज कधीचे मांडून गेला..
.
कितीक अश्या अबोल गाथा..
भिजल्या मला सांगून गेला..
.
थेंब एक असा बरसून गेला..
थेंब एक असा भिजवून गेला..
.
.
=====================
स्वाती फडणीस............. २२-१२-२००८

कविता

प्रतिक्रिया

व्यंकु's picture

22 Dec 2008 - 1:31 pm | व्यंकु

अप्रतिम कविता

स्वाती फडणीस's picture

22 Dec 2008 - 5:31 pm | स्वाती फडणीस

:)

मीनल's picture

22 Dec 2008 - 5:54 pm | मीनल

लाजवाब.

मीनल.

दत्ता काळे's picture

22 Dec 2008 - 7:49 pm | दत्ता काळे

दिशा दिशांत पसरवून शहारा..
अंतरंगी गारवा झिरपून गेला..

क्या बात है, फार छान.

जयेश माधव's picture

22 Dec 2008 - 8:09 pm | जयेश माधव

जयेश माधव
तुझ्या कवीतेच्या पावसाने
चि॑ब ओथ॑बुली गेलो
तुझी कवीता वाचुन
उगाच काहीतरी लिहुन गेलो

प्राजु's picture

22 Dec 2008 - 9:06 pm | प्राजु

सुरेखच..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लवंगी's picture

22 Dec 2008 - 9:15 pm | लवंगी

खूप आवडली

शितल's picture

22 Dec 2008 - 9:23 pm | शितल

कविता आवडली. :)

संदीप चित्रे's picture

22 Dec 2008 - 9:43 pm | संदीप चित्रे

स्वाती...
कविता खूप आवडली....
थोडा कॉर्म बदलला, तर एक चांगली गझल म्हणून पुन्हा लिहिता येईल.
(गझलबद्दल मी अधिकारवाणीने बोलू शकत नाही पण तुमची कविता वाचून इतकं मात्र नक्की जाणवलं की एक सुरेख गझल होईल.)

चिंचाबोरे's picture

23 Dec 2008 - 3:41 am | चिंचाबोरे

कविता खासच.
(माझेही दोन आणे.. :D )

उले काळोखात कोंब हिरवा
थेंब एक असा बरसून गेला...

आजानुकर्ण's picture

23 Dec 2008 - 5:59 am | आजानुकर्ण

अलवार झेलता झेला नाभीचा..

या ओळींचा अर्थ काय आहे?

आपला
(संभ्रमित) आजानुकर्ण

राघव's picture

23 Dec 2008 - 12:44 pm | राघव

नभीचा असे म्हणायचे असावे बहुदा.

मुमुक्षु

स्वाती फडणीस's picture

23 Dec 2008 - 3:28 pm | स्वाती फडणीस

ह्म्म.. टायपिंग मिस्टेक :(
कविता वाचणार्‍यांचे मनापासून आभार :)