संगिताच्या मैफिलीचा
'तो' दिवस खास होता
आजूबाजूला बघण्याचा
फक्त थोडा त्रास होता
बंदिश गात होते बुवा,
रंग भरु लागला छान
हार्मोनियम साथीला,
तानपुर्याचीही डोले मान
लक्ष नव्हते माझे मुळी,
गायकाच्या तानांकडे
टक लावुन बघत होतो,
रसिकांच्या मानांकडे
कित्ती छान डोलत होत्या,
प्रत्येक ठेका तोलत होत्या
आपले ज्ञान दाखवण्यासाठी,
मध्ये मध्ये बोलत होत्या
(विषय होते कितीतरी)
गायकाच्या गायकीचे
अन् त्याच्या लायकीचे,
त्याचा लहरीच स्वभावाचे,
कधी 'तयारी' तील अभावाचे
लक्ष नव्हते माझे मुळी,
गायकाच्या रुपड्याकडे
अवाक होऊन बघत होतो,
रसिकांच्या कपड्यांकडे
छान, छान साड्या होत्या
झब्बे देखील छान, नवे
(रमण बागेजवळ कदाचित,
Fab India चे दुकान असावे)
सेंट्स आणि गजर्यांमुळे
मैफिल फारच सुगंधी झाली
ताना आणि हरकतींमुळे
डोळ्यांवरती गुंगी आली
मी नकळत उठलो तेव्हा
काहीतरी गडबड झाली
शेजारच्या झब्ब्याने
झुकून मला 'साईड' दिली
विचार करत होतो की
असे कसे झाले बुवा ?
त्याला वाटले असावे, कदाचित
मी असावा 'कळणारा बुवा'
नकळंत मला कळून गेले
अंगातल्या झब्ब्यामुळे,
तोंडातल्या पानामुळे
असले सूर जुळून आले.
*-*-*-*-*
प्रतिक्रिया
21 Dec 2008 - 5:22 pm | टारझन
चुकिच्या जागी प्रतिसाद पडला म्हणून प्र.का.टा.आ.
सौरी
- टाळ्काराम (सटके)
21 Dec 2008 - 5:42 pm | विसोबा खेचर
नकळंत मला कळून गेले
अंगातल्या झब्ब्यामुळे,
तोंडातल्या पानामुळे
असले सूर जुळून आले.
अरे मस्तच रे! :)
आपला,
(पानबिन खाऊन मैफलीत पहिल्या रांगेत बसणारा एक अ-जाणकार श्रोता!) तात्या.
21 Dec 2008 - 7:36 pm | संदीप चित्रे
याद करून दिलात राव... दरवर्षी डिसेंबरच्या दुसर्या आठवड्यात मन सवाईला पोचतं !!!
22 Dec 2008 - 6:01 am | मदनबाण
सेंट्स आणि गजर्यांमुळे
मैफिल फारच सुगंधी झाली
ताना आणि हरकतींमुळे
डोळ्यांवरती गुंगी आली
सह्ही.... :)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -