एक मानुस होता. जुआन माण नावाचा. तो सिडनीला आपल्या घरी चाल्ला होता. विमानतळावर पाहिलं तं कोनीच त्याला घ्यायास आलेलं नव्हतं. आजुबाजुला सर्वजनांचे नातलग आल्ते. एकमेकांना मिठि मारुन राहिले होते.
त्याला खुप दु:ख वाटुन राहिले. की आपल्याला कोनीच भेटायला आलेलं नाही. मग त्याने एक मोठा पुट्ठा, रंगीत पेनं विकत घेतली. त्यावर दोनी बाजूला लिहलं Free Hug - मोफत जादुची झप्पी आनि उबा राहिला लोकान्च्या मधे जाउन. लोक त्याच्याकडं पाह्यचे फुडे जायचे.
मग एक बाई थाबली. त्याला म्हनाली, माझं कुत्र मेलं आज सकाली. आनि माझ्या मुलीची आजच पहिली बरसी आहे. ती गेल्या वर्षी अपघातात मरन पावली. मग हा फुडे झाला आनि तीला घट मिठि मारली. तिला खुप बरं वाटलं. दिवसभर लोक त्याच्या जवल येत राहिल्ले आनि मिठि मारत राहिल्ले. मग हि आयडिया सगल्यांना आवडली. बरेच लोक असं करायला लागले, मग पोलीस बोल्ले असं करायचं नाही. त्यानी बंदी आनली. पण माण डरला नाही. शेवटी पोलीस लोक हरले. हये सगलं तुमाला http://www.freehugscampaign.org/ इथं वाचता येयील.
(मी इंग्लीश मिडीयमचा आहे. माझ मराठी खराब आहे. समजुन घ्यावा.)
प्रतिक्रिया
20 Dec 2008 - 2:06 pm | परिकथेतील राजकुमार
लय भारे माहेत्यी दियिल्या बद्ल आबार
आनि त्यो कुतरयाचा परसन्ग वाचुन माज्या मेय्लेल्या कुतरयाचे आत्वन झालि आन्नि दोल्यात पानी आल्ये. असेच लिव्हित जावा आपलयाला खुप आवदले. तुमहाला शुबेच्चा आनी जादुचि जहप्पी.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
20 Dec 2008 - 4:08 pm | आनंदयात्री
तोडलस रे राजकुमारा !! =))
बाकी बिंदुराव माहितीची उत्तम देवाणघेवाण झाली.
-
आपलाच
परिकथेतील जाडकुमार
20 Dec 2008 - 4:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कोणत्या विमानतळावर पुठ्ठा घेउन उभी असते तेवढी इन्फॉरमेशन काडा राव
आपला पुठ्ठा सांभाळून वागा, नाहीतर बसायच्या दोन-चार लाथा! ;-)
"आतापर्यंत अनेकदा विमानातून प्रवास केलेला आहे तेव्हा उगाच तिकडे विमानतळावर येऊ नका. मी येईन घरी माझी-माझी!", हे माझं सांगणं घरच्यांनी कधीही मनावर घेतलं नाही. याउलट जिथून घरी यायचे त्या विमानतळावर घ्यायला कोणीही नसायचं. दोन्ही प्रकारात मला कधीही काहीही फरक वाटला नाही. दहा-बारा तास प्रवास केल्यावर खरंतर जाऊन ताणून देणे हेच महत्त्वाचं वाटायचं. त्यामुळे कोणी आलं, नाही आलं, झप्पी दिली, नाही दिली, काहीही वाटलं नाही. मात्र शेवटच्या वेळेस घरी यायला निघाले तेव्हा मात्र सोडायला तिघं जण आले होते, तेव्हा फारच छान वाटलं.
अर्थात, वरच्या गोष्टीत काहीही गंमत वाटली नाही.
20 Dec 2008 - 4:20 pm | आनंदयात्री
या प्रतिसादात बरेचसे अवांतर लेखन अन वैयक्तीत मालकीच्या गोष्टींचा उल्लेख आहे असे संपादक मंडळासाठी नमुद करु इच्छितो.
:D
20 Dec 2008 - 2:31 pm | विसोबा खेचर
चालू द्या! आमचीही तुम्हाला जादूची झप्पी!
आपला,
तात्या बालन! :)
20 Dec 2008 - 2:40 pm | इनोबा म्हणे
ए. आर. रहमानने ही नुकतंच एक गाणं आणि त्याचा विडीओ बनवलाय या विषयावर. टिव्हीवर पाहिलं तेव्हा हे नेमकं काय आहे ते कळालं नाही आधी, पण तुमच्यामुळे या विषयीची माहिती मिळाली.
धन्यवाद!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
20 Dec 2008 - 2:49 pm | अवलिया
सरजी... व्हॉट ऍन आयडीया...
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
20 Dec 2008 - 4:46 pm | कलंत्री
एकदा एका ध्यान शिबीराला गेलो असताना तेथील साधूने सांगितलेली गोष्ट.
असेच एक ध्यान शिबीर त्यांनी तुरुंगात आयोजन केले होते. तेथील अनेक शिक्षा भोगणारे गुन्हेगार त्यात सहभागी झाले होते. काही कैदी लगेचच शिबीराच्या अभ्यासक्रमाचा लाभ घेऊ लागले. त्यात एक अट्टल खुनाच्या आरोपातून सिक्षा झालेला कैदी होता. तो मात्र अधून मधून ऐवुन न ऐकता शिवीगाळ करीत असे.
२/३ दिवस असा क्रम चालला. ते त्या कैद्याशी मात्र चांगले बोलत आणि त्याला अलिंगन देत असत. २/३ दिवसानंतर असेच अलिंगन दिले असताना तो कैदी स्पुंदुन स्पुंदुन रडायला लागला. मला माणसासारखे कोणीच वागवले नाही तुम्ही मात्र मला किती चांगली वागणुक देत आहात?
स्पर्शाची ओढ माणसाला असतेच, दुखी माणसाला मात्र ती जास्तच असते.
वारकरी लोक गळाभेट घेत असतात.
20 Dec 2008 - 6:26 pm | साखरांबा
स्पर्शाची ओढ माणसाला असतेच, दुखी माणसाला मात्र ती जास्तच असते.
अस्मादिक पण निरतिशय दु:खी आहेत. :S
कोणी उत्सुका आहे इथे गळाभेट घ्यायला? O:)
ताबडतोब व्य.नि. ने कळवावे. :-C
केवळ आपलाच,
साखरांबा.
20 Dec 2008 - 4:52 pm | विनायक प्रभू
असे काहीतरी करावे म्हणतो.
बायडीला कळले तर?
20 Dec 2008 - 4:56 pm | कलंत्री
कल्पना चांगलीच आहे असेच म्हणेल.
20 Dec 2008 - 5:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आणि त्यामागची भावना?
20 Dec 2008 - 5:23 pm | विनायक प्रभू
परी तु जागा चुकलासी असे म्हणेल.
प्रतिसादाची जागा पण चुकली. दोन नंबर वर द्यायला पाहिजे होता.
आज झालय काय मला?
कानाला सर्दी झाली आहे वाटते.
20 Dec 2008 - 6:58 pm | सखाराम_गटणे™
ठिक आहे कल्पना.
मला तर काय खास वाटत नाही.
अवांतरः 'मोफत जादुची झप्पी' मी आधी 'मोफत जादुची पप्पी' वाचले होते.
----
सखाराम गटणे
20 Dec 2008 - 7:00 pm | अवलिया
'मोफत जादुची पप्पी' हे मी आधी 'मोफत जाडुची पप्पी' असे वाचले होते.
आता जाडु कोण हे विचारु नकोस
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
21 Dec 2008 - 8:15 am | दवबिन्दु
माज्या काहीबाही लिहिन्याला आपन लोकांन्नी दिलेल्या प्रतिसादासाठी मनापास्न थ्यांकु.