अध्यात्म-विज्ञान समन्वय ?

यनावाला's picture
यनावाला in काथ्याकूट
26 Oct 2015 - 10:26 pm
गाभा: 

[नमस्कार ! इथले लेखन-विशेषत: प्रतिसाद-वाचून हे संस्थळ तरुणाईचे आहे हे प्रतीत होते. इथे माझ्यासारख्या ज्येष्ठ (वयाने) सदस्याने लिहिणे म्हणजे शिंगे मोडून वासरात शिरण्यासारखे आहे हेही कळते. पण एक पद्यलेख (ओवीरचना) दिला आहे. तरी क्षमध्वम् !यनावाला]

विज्ञानाची विश्वासार्हता । जाणते सामान्य जनता । विज्ञानतत्त्वांची सत्यता । वादातीत सर्वत्र ॥१॥
बहुत क्षेत्रीं विज्ञानसत्ता । लोपली अध्यात्म महत्ता । आध्यात्मिक इच्छिती आता । विज्ञानाशीं समन्वय ॥२॥
अध्यात्मीं श्रद्धा आवश्यक । तर्क मानिती वैज्ञानिक । श्रद्धा न टिके जेथे तर्क । मूलभूत भेद हा ॥३॥
असत्य हे बुद्धीसी कळे । परी भावनेसी न वळे । ते सत्य मानणे भावबळे । सोपी व्याख्या श्रद्धेची॥४॥
विज्ञान समाज उपयोगी । अध्यात्म ते निरुपयोगी । बुद्धिमान जन यालागी । अध्यात्मासी धि:कारिती ॥५॥
विज्ञान नियम नैसर्गिक । अध्यात्म तत्त्वे अतार्किक । अध्यात्म विद्येचे साधक । भ्रामक तत्त्वे मानिती ॥६॥
वैज्ञानिकां हवे प्रयोग । आध्यात्मिक करिती योग । प्रयोगीं ज्ञान संयोग । जे नच लाभे योगाने ॥७ ॥
प्रयोगांसी साधने नाना । अध्यात्मीं अष्टांग साधना । तियेने काहींच साधेना । भ्रांतज्ञाना व्यतिरिक्त ॥८॥
अध्यात्म मानी परलोक । विज्ञान एक इहलोक । वास्तव केवळ ऐहिक । पारलौकिक भ्रामक ॥९॥
आध्यात्मिक शोधिती ब्रह्म । विज्ञान निसर्गनियम ।ब्रह्मवेत्ता न करी काम । जे समाजा उपयोगी ॥१०॥
वैज्ञानिकांचे संशोधन । त्या आधारे तंत्रज्ञान । करी दैनंदिन जीवन । समाजाचे सुखकर ॥११॥
समाज समस्या अनेक । विज्ञानाने सुटती देख । देवी-प्लेगादि सांसर्गिक । साथी मिटल्या विज्ञानें ॥१२॥
अध्यात्मासी देणे-घेणे । कांही न समाजाकारणे । "अहं ब्रह्मास्मि" मंत्र जपणे । भ्रांत कल्पना मोक्षाची ॥१३॥
असती मंडूक कूपात ।बाह्य जग तयां न ज्ञात । अध्यात्म तैसे संकुचित । विज्ञानक्षेत्र विशाल ॥१४ ॥
कोsहं ? कोsहं ? प्रश्न वृथा । उगाच शिणविती माथा । शतकानुशतके काथा । कुटती तोच तोच तो ॥१५॥
प्रश्नाचे उत्तर सुस्पष्ट । स्वनाम असे साधी गोष्ट । सारे विचार तर्कदुष्ट । व्यर्थ स्तोम माजविती ॥१६ ॥
अमावास्या काळी रजनी । गुडुप अंधार्‍या सदनी । शोधणे काळी माऊमनी । अस्तित्वात नसेच जी ॥१७॥
तैसा प्रकार अध्यात्माचा । अंतिम सत्य शोधनाचा । कधी काळीं न संपायाचा । धुंडिती जे न असे ते ॥१८॥
वैज्ञानिक तत्त्वे शोधिती । सुधारणा शक्य मानिती । यास्तव होतसे प्रगती । विज्ञान क्षेत्रीं सदैव॥१९॥
आध्यात्मिक घरी बैसोन ।सुखे करो धारणा-ध्यान । तयाने समाधी लागोन ।डुल्लत राहो स्वानंदीं ॥२०॥
वा रिघोनी गिरिकुहरीं । ध्यानमग्न जाहल्यावरी । लोंबत राहो अधांतरी । ब्रह्मानंदांत डुंबत ॥२१॥
आम्हां ना सुतक-सोयर । ज्याचा त्याचा तो अधिकार । परी "संसार हा असार "। नको ऐसा उपदेश ॥२२॥
"जीवनाची इतिकर्तव्यता । केवळ मोक्ष मिळविता । जन्म-मृत्यु फेरे अन्यथा ।" बरळणे हे टाळावे ॥२३॥
आत्मानुभव व्यक्तिगत । "ब्रह्म आकळले " समजुत । भ्रम म्हणणे क्रमप्राप्त । प्रमाणाच्या अभावी ॥२४॥
अध्यात्मीं महत्त्व मोक्षाला । विज्ञानीं न मान्यता त्याला । मग समन्वय कसला । ऐशा भिन्न विषयांचा ?॥२५॥
******************************************************************************************************

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

26 Oct 2015 - 10:43 pm | प्रचेतस

जबरी.
उत्तम लिहिलंय.

अंतिम सत्य शोधण्या| उभारती प्रयोग्शाळा|
फलीत जे मिळले| दैवी कण का वदती त्यासी?
विज्ञान हि मानते| कुठे ना कुठे दैवासी|

हिग्ज बोसॉना। गॉड पार्टिकल म्हणती।
किमया सारी। माध्यमांची॥

मारवा's picture

26 Oct 2015 - 11:29 pm | मारवा

नाव केवळ दैवी, म्हणुन का यांस हिणवी
मागे त्याच्या बघावा, असतो तर्काचा पुरावा
ही नाही अध्यात्मासम उथळ मिरवणी
इथे लागतो द्यावा निष्क्रर्षांचा पुरावा
असतो प्रत्येक प्रयोंगामागे भरभक्कम विदा
नाही अध्यात्मिकासम बोलणे अद्वातद्वा विनाविदा
विज्ञाने नाव ठेवतीं परी साधने त्यांचीच वापरती
अहो बाबा देखील आजकाल ध्वनिक्षेपक वापरती
यांना वाटे सर्वच शोध मोठे सहजच लागले
त्यामागील कष्ट न यांना कधी दिसले
दिसतीलही कसे बाबा
यांना नकोय प्रयोगांचा त्रागा
यांना हवा फक्त एक दिलासा
एक भ्रमाचा खेळ हवाहवासा

आनंद कांबीकर's picture

2 Nov 2015 - 6:25 am | आनंद कांबीकर

आवडला तुमचा प्रतिसाद

एस's picture

26 Oct 2015 - 10:51 pm | एस

वालावलकरसाहेब, आपण परत लिहिते झाल्याचा प्रचंड आनंद झाला आहे. बाकी इथे तरुण आणि त्यांच्यापेक्षा जास्त तरुण अशा दोन्ही कॅटेगरी जोमाने मिपा-मिपा खेळतात. ;-) तेव्हा तुम्ही जास्त तरुण असाल तर उलट जास्त जोमाने शिरा रिंगणात!

असेच उत्तमोत्तम लेख आणि प्रतिसादही येऊ द्या मिपावर. उपक्रमावरील आपल्या लेखनाचा भोक्ता होतो.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Oct 2015 - 11:32 pm | अत्रुप्त आत्मा

जोर दार हणुमोदण्ण!

खेडूत's picture

28 Oct 2015 - 8:29 am | खेडूत

+१
सर लिहीते झाले याचा आनंद आहेच.
अजून लेखांच्या प्रतिक्षेत..

यनावाला जी नमस्कार
आपण उपक्रम वर होतात ना ?
आपले काही सुंदर लेख वाचलेले आहेत कोणी कोणी सजेस्ट केलेले आहेत.
आपण इतके दिवस कुठे होता हो ?
फार सुंदर आहेत या विज्ञान ओव्या म्हणु का ? म्हणजे पारंपारीक अध्यात्मावर टीका करण्यासाठी साधन भाषा शैली सर्व परंपरेतुनच घेतलेली हे विशेष वाटलं.

देवी-प्लेगादि सांसर्गिक । साथी मिटल्या विज्ञानें
यातल्या प्लेग या शब्दाने थोडं ओरबाडलं, कारण याने अडथळा आला एकदम वर्तमानात आलो, बाकी सर्व छान आहे.
आपण इथे लिहायला सुरुवात केलीयं याने फार आनंद वाटला.
धन्यवाद यनावाला जी.

प्यारे१'s picture

26 Oct 2015 - 11:03 pm | प्यारे१

मस्त रचना जमली आहे. कीप इट अप.

आपण जेश्ठ आहात असे वाटते पण अध्यात्म-विज्ञान समन्वय असे म्हणत आपण विज्ञानाचा प्रसार करत आहात. मी ही विज्ञानाचाच पुरस्कर्ता आहे पण आपल्या ओवीतून समन्वय काही दीसला नाही. असो. ओवी मस्तच.
बादवे पीके चा प्रतिसाद पण आवडला.

शेवटची ओवी वाचलीत का?

संजय पाटिल's picture

26 Oct 2015 - 11:46 pm | संजय पाटिल

फारच गहण विषय आहे. आम्ही पास.

प्यारे१'s picture

27 Oct 2015 - 10:11 am | प्यारे१

आमचा पास असे स्वत: म्हणावे आम्ही पास नाही.
तुम्ही पास असं क्वचित् आणि तुम्ही नापास असं नेहमीच इतर जनता म्हणेल.

संजय पाटिल's picture

27 Oct 2015 - 12:11 pm | संजय पाटिल

आमचा पास असे स्वत: म्हणावे आम्ही पास नाही.
सहमत! आमचा पास....

जानु's picture

26 Oct 2015 - 11:35 pm | जानु

श्री यनावाला आपण उपक्रम वर जे विज्ञानवादी लेखन करीत होतात मी सतत वाचत होतो. तस मला प्रथम नवल वाटले की आपल्यासारख्या कट्टर विज्ञानवादी व्यक्तीने ओवीतुन सुरुवात करावी ! तशी माझी काहीच हरकत नाही. पण मग विचार केला यातही विज्ञानच आहे की फक्त ते मानसशास्र की काय ते..

उलट हा अधिक सटल पातळीवरचा विरोध आहे.
जबरदस्त कल्पकता आहे या विरोधात.
अशी क्रिएटीव्हीटी विरोध करण्याची काबिल-ए-तारीफ आहे.

यनावाला,

तुमच्या ओव्यांचा शेवट रोचक आहे. 'मग समन्वय कसला ऐशा भिन्न विषयांचा ?' हा प्रश्न करून एका तऱ्हेचं आव्हान दिल्यासारखं वाटतं. हे आव्हान अनेकांनी समर्थपणे पेललंय. सुरुवात म्हणून सर आयझॅक न्यूटनचं काम बघूया.

इथे न्यूटनच्या धार्मिक (=रिलीजस) कामाची यादी आहे : http://www.newtonproject.sussex.ac.uk/prism.php?id=44

या यादीतल्या ०२, ०३, २२, २७, २८, २९, ४४, ५८, ५९, ६० आणि ७६ क्रमांकाच्या लेखांची फक्त नावं पहा म्हणून सुचवेन.

आधुनिक विज्ञानाची सुरुवात ज्याच्यापासून झाली तो न्यूटन धार्मिक (=रिलीजस) ग्रंथांकडे अतिशय गंभीर व आदरपूर्वक दृष्टीने बघत असे. बायबल हे साक्षात भगवंतांचे शब्द आहेत यावर त्याची प्रगाढ श्रद्धा होती. त्याच्या मते विज्ञान हे एक प्रकारचं तत्त्वज्ञान आहे.

तर आता तुमच्या प्रश्नाकडे येऊया. अध्यात्म आणि विज्ञान या वरपांगी भिन्न दिसणाऱ्या विषयांचा समन्वय साधायचा झाला, तर तो तत्त्वज्ञानामार्गे साधावा लागेल. असा समन्वय साधणाराच खरा वैज्ञानिक आहे.

आ.न.,
-गा.पै.

यनावाला's picture

27 Oct 2015 - 8:49 pm | यनावाला

श्री.गामा पैलवान यांनी न्यूटनच्या धार्मिकतेविषयी लिहिले आहे ते सारे खरे आहे. न्यूटनच्या लहानपणी त्याचे वडील वारले. आईने पुनर्विवाह केला. न्यूटनला आजोळी पाठविले. आजोबा (आईचे वडील) बिशप. त्यांच्याकडे बरेच धर्मग्रंथ. न्यूटनला वाचनाचा नाद. त्याने ते ग्रंथ वाचले.(दुसरी पुस्तके न्यूटनला उपल्ब्ध नव्हती.) बालमनावर झालेले संस्कार दृढमूल होतात. आपले पालक, आजुबाजूची माणसे काय बोलतात-काय करतात, ते बालक पाहाते, ऐकते. पुढे मोठे झाल्यावर वाचते. डोक्यावर चढलेले हे संस्कारांचे गाठोडे उतरवून ठेवणे अवघड असते. रिचर्ड डॉकिन्स म्हणतात, "देवा-धर्माच्या संस्कारांचे विष बाळाला त्याची आई स्वमुखे पाजते. या विषाचा परिणाम आयुष्यभर टिकू शकतो. "
तसेच डार्विनपूर्व बहुतेक वैज्ञानिक पूर्णतया नास्तिक नाहीत. कारण या सृष्टीवर एवढे विस्मयकारक वैविध्य कसे निर्माण झाले याचे बुद्धिगम्य स्पष्टीकरण तेव्हा मिळत नव्हते. ते उत्क्रांतिवादामुळे मिळाले. कुंठित झालेले विज्ञान डार्विनने प्रवाही केले आणि जगातून ईश्वराची हद्दपारी अधोरेखित झाली.

यनावाला,

न्यूटन प्रतिभाशाली अन्वेषक होता. बायबल असो वा निसर्गनियम त्याने सारख्याच जिज्ञासेने शोध घेतला. मग त्याला वैज्ञानिक मानावा का? की त्याच्या अलौकिक प्रतीभेकडे दुर्लक्ष करून त्याचं धार्मिक लिखाण झटकून टाकावं (डिसमिस करावं) ?

आ.न.,
-गा.पै.

दिवाकर कुलकर्णी's picture

27 Oct 2015 - 1:10 am | दिवाकर कुलकर्णी

धी गोष्ट । सारे विचार तर्कदुष्ट । व्यर्थ स्तोम माजविती ॥१६ ॥
अमावास्या काळी रजनी । गुडुप अंधार्‍या सदनी । शोधणे काळी माऊमनी । अस्तित्वात नसेच जी ॥१७॥
गद्य पद्य रेषा जणूहि। तुम्हा वाटें जाये पुसूनी।वंडरफूल ओव्या बापा।अशाी राहो मिपा वरी किरपा।

श्र्योडिंजराच्या माऊस ।
अध्यात्माच्या अडगळीत ।
पाहूनी धन्य झाला तो कंजूस।।
यानावाला, पीके आणि मारवा
काव्यशास्त्र विनोदाने ।
करती सकळाचे रंजन ।
आत्मु आणि प्रचेतस ।
मान डोलवती आनंदाने ।।

बोका-ए-आझम's picture

27 Oct 2015 - 7:33 am | बोका-ए-आझम

की अध्यात्म आणि विज्ञान हे दोन वेगळे तरीही पूरक दृष्टिकोन आहेत. अध्यात्म म्हणजे आत्मज्ञान (अधि+आत्म) हे micro पातळीवर आहे आणि विज्ञान हे संपूर्ण विश्वाचे रहस्य उलगडू इच्छितं. कर्मकांड, देव, मोक्ष या अध्यात्मातल्या सर्वांना माहित असलेल्या संकल्पना आहेत, पण त्या म्हणजे अध्यात्म नव्हे. तत्वज्ञानात मेटाफिजिक्स हा जो भाग आहे त्याच्याशी ख-या अध्यात्माचा संबंध येत असावा. अध्यात्म हे दुर्दैवाने कर्मकांडात अडकून पडल्यामुळे तोच अर्थ प्रचलित झाला, पण अध्यात्म प्रचंड व्यापक आहे. विज्ञानाप्रमाणेच. आणि The Tao of Physics सारख्या काही पुस्तकांत विज्ञान आणि तत्वज्ञान यांचा परस्परांशी असलेला संबंध उलगडून दाखवण्याचा प्रयत्नही केलेला आहे. अध्यात्म हा तसाच एक दृष्टिकोन आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

27 Oct 2015 - 9:34 am | प्रकाश घाटपांडे

प्रत्येक मनुष्याचे भावना अशा अशा असाव्यात



.
.
प्रत्येक मनुष्याचे विचार असे असे असावेत



.
.
प्रत्येक मनुष्याचे आचार असे असे असावेत



.
.
असे मॉडेल अजून इम्प्लिमेंट करता येत नसल्याने
अध्यात्य व विज्ञान हे द्वैत चालूच रहाणार आहे हे आमचे भाकित

क्या बात है हा प्रतिसाद !
ये तो मीठे घाट का पानी है पांडे जी !

प्रकाश घाटपांडे's picture

27 Oct 2015 - 11:48 am | प्रकाश घाटपांडे

हॅहॅ आमचे भाकीत यापूर्वीच वर्तवले आहे. या ज्योतिषाच काय करायचं?

दत्ता जोशी's picture

27 Oct 2015 - 10:05 am | दत्ता जोशी

को जागर पौर्णिमेचा चांगलाच इफ़ेक्ट दिसतोय आज मिपावर.
छे...! आयुष्य वाया गेले सगळे. उगीचच गौतम बुद्धांपासून तुकाराम महाराजांपर्यंत महापुरुषांची चरित्रे आणि तत्वज्ञान वाचण्यात समजून घेण्यात आयुष्यातला बहुमोल वेळ घालवला कि हो. कसली मुक्ती आणि कसलं निब्बाण... आता काय करावे...!. याचे परिमार्जन काय...कोणाचे पाय धरावे. ...!!! काही कळेनासे झालेय. जगात एकमेव गोष्ट खरी. प्रदूषण प्रदूषण आणि प्रदूषण ...!

अनुप ढेरे's picture

27 Oct 2015 - 10:15 am | अनुप ढेरे

आवडल्या ओव्या!

द-बाहुबली's picture

27 Oct 2015 - 12:58 pm | द-बाहुबली

[नमस्कार ! इथले लेखन-विशेषत: प्रतिसाद-वाचून हे संस्थळ तरुणाईचे आहे हे प्रतीत होते. इथे माझ्यासारख्या ज्येष्ठ (वयाने) सदस्याने लिहिणे म्हणजे शिंगे मोडून वासरात शिरण्यासारखे आहे हेही कळते. पण एक पद्यलेख (ओवीरचना) दिला आहे. तरी क्षमध्वम् !यनावाला]

हेबघा एकतर आम्ही याला म्हातारचळ अजिबात गणत नाही तेंव्हा चुकीनही क्षमध्वम् वगैरे भावना मनात आणून नका वा टंकु नका. कसे आहे वाढते/वाढलेले वय मुळ बाल्यस्वरुप पुसुन टाकतेच असे नाही, असा बरेच लोकांबाबत अनुभव असल्याने आपण कोणी त्यापेक्षा वेगळे नाही म्हणून आपलेही बिंधास्त स्वागत.

बाकी आपल्या या बालसुलभ स्वभावाला जरा तारुण्यसुलभतेची झालार आल्यावर त्यास परुढ बनवण्यासाठी अवश्य या लिखाणावर योग्य ते विचारमंथन केल्या जाइल. तो पर्यंत मजा करा.

चित्रगुप्त's picture

27 Oct 2015 - 7:21 pm | चित्रगुप्त

बाकी आपल्या या बालसुलभ स्वभावाला जरा तारुण्यसुलभतेची झालार आल्यावर त्यास परुढ बनवण्यासाठी अवश्य या लिखाणावर योग्य ते विचारमंथन केल्या जाइल. तो पर्यंत मजा करा.

+१
सदर लेखातील अध्यात्म आणि अष्टांगयोग यांची झालेली गल्लत बरेच काही सुचवून जाते.

कवितानागेश's picture

27 Oct 2015 - 1:00 pm | कवितानागेश

कुणी एकनाथी भागवत आणि दासबोध पूर्वग्रहाशिवाय वाचण्याचे कष्ट घेतले तर त्यांचे विज्ञान म्हटल्या जाणाऱ्या विषयांचे ज्ञान आणि आध्यात्मिक दृष्टीकोन हे दोन्हीही स्पष्ट दिसेल.
बाकी समन्वय किंवा विरोध म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे?

मारवा's picture

27 Oct 2015 - 2:48 pm | मारवा

लीमाउजेट जी
एक अडचण असते या ग्रह पुर्वग्रहा संदर्भात
उदा. एक गाणं आहे आपण ऐकलं असेल की नाही माहीत नाहे

गोली मार भेजे मे भेजा शोर करता है
भेजे की सुनेगा तो मरेगा कल्लु
अरे तु करेगा दुसरा भरेगा कल्लु
मामा कल्लु मामा

तर वरील गीताकडे दोन अर्थांनी पाहता येते.
एक लीटरली जसे आहे तसा शब्दश: सरळ अर्थ
एक सिम्बॉलीकली जसे दिसते तसे नसुन फार गहन अर्थ असलेले एक प्रतिकात्मक गीत या अर्थाने.

धार्मिक बाजुने जी आर्ग्युमेंट्स होतात त्यात एक कनींग ट्रीक वापरली जाते.

त्यात धर्मग्रंथातील जो जो लीटरली शब्दश: च्या दिशेने येणारा अर्थ अडचणीचा असेल तर त्याकडे
अहो ते तसे नाही त्या मागचा " गहन प्रतिकात्मक अर्थ " असा असा आहे असे "समजावुन" देण्यात येते.

आणि ज्यात धर्मग्रंथातील प्रतिकात्मक अर्थ अडचणीचा असेल तर त्याकडे
अहो काहीही काय अर्थ काढता सरळ सरळ असे असे दिलेले आहे ते बघा असे "समजावुन" देण्यात येते.

विज्ञान हा वरील सर्व धार्मिक मार्ग दांभिक समर्थनाचा आपल्या सत्याच्या मांडणीसाठी वापरत नाही.
प्रतिपादना मागे एक पुराव्यांची वस्तुनिष्ठतेची मालिका असते.
मागील शोध कीतीही मोठ्या व्यक्तीने लावला असेल तरी त्याकडे पवित्र अपरीवर्तनीय अशा अर्थाने बघितले जात नाही.
उलट त्याकडे एक बेस निर्माण केला या यथोचित आदराने बघुन त्याला पुढे तपासण्यात-सुधारण्यात-विकसीत करण्यात येते.

तर वरील गाण्याचा एक अर्थ जसा दिसतो तसा च आहे
दुसरा खरा गहन अर्थ माझ्या गुरुंनी परवानगी दिली आणि मुख्य म्हणजे तुमची पात्रता असेल व तुम्ही पुर्वग्रहदुषीत नसाल
तरच तुम्हाला कळेल.
हे मी लिहीत नाही कर्ता करविता तो आहे
(शेवटचा परिच्छेद हलक्यात घ्या हे वेगळे सांगणे न लगे )

कवितानागेश's picture

27 Oct 2015 - 3:17 pm | कवितानागेश

मी नक्की काय विचारतेय हे न कळता तुम्ही टिपिकल दळण दळताय!
शिवायतुम्ही मध्येच धर्मग्रंथ घुसडताय. तसाही मी कुठलाही धर्मग्रंथ वाचलेला नाही, त्यामुळे त्याबद्दल मी काहीच लिहिले नाहिये.

मारवा's picture

27 Oct 2015 - 4:14 pm | मारवा

कुणी एकनाथी भागवत आणि दासबोध पूर्वग्रहाशिवाय वाचण्याचे कष्ट घेतले
हे दोन्ही धर्मग्रंथ नाहीत ?
मग ठीक आहे

संजय पाटिल's picture

27 Oct 2015 - 6:33 pm | संजय पाटिल

पण ते त्यांनी वाचलेत असं म्हंटलय का?

द-बाहुबली's picture

27 Oct 2015 - 6:40 pm | द-बाहुबली

कुणी एकनाथी भागवत आणि दासबोध पूर्वग्रहाशिवाय वाचण्याचे कष्ट घेतले तर त्यांचे विज्ञान म्हटल्या जाणाऱ्या विषयांचे ज्ञान आणि आध्यात्मिक दृष्टीकोन हे दोन्हीही स्पष्ट दिसेल.

हे विधान करायचे ज्ञान त्यांना कुठुन प्राप्त झाले असावे ?

प्यारे१'s picture

28 Oct 2015 - 2:38 am | प्यारे१

>>>>कोsहं ? कोsहं ? प्रश्न वृथा । उगाच शिणविती माथा । शतकानुशतके काथा । कुटती तोच तोच तो ॥१५॥
>>>>प्रश्नाचे उत्तर सुस्पष्ट । स्वनाम असे साधी गोष्ट । सारे विचार तर्कदुष्ट । व्यर्थ स्तोम माजविती ॥१६ ॥

यनावाला स्वनाम म्हणजे मी हे कोsहं चं उत्तर मानतात.
उद्या त्यांचं नाव Alex pothimpillaey असं केलं तर? ते नाव म्हणजे ते तेच असतील? नाव बदललं तर माणूस बदलेल? बरं यनावाला ज्येष्ठ झाले असं स्वत: म्हणतात. यनावालांनी फोटो काढले असतील. लहानपनापासून आतापर्यंत छे फोटो त्यांनी पाहून यातला खरा कोण हे देखील सांगावे.

काल्याकुट्ट अमावश्येच्या रात्री कालाकाभिन्न माणूस जो स्वत:लाही दिसत नाही तो मी आहे ही जाणीव ठेवून असतो. त्यालाच एखाद्या अपघातात दोन हात गमवावे लागले तरी तो तोच असतो की निराळा?
माणसाचं नाव अथवा शरीर हे त्याचं कायमचं ओळख पटवण्याचं साधन असू शकेल पण ती व्यक्ती म्हणजे नाव अथवा शरीर नव्हे. माझ्यासारखे दिसणारे अनेक लोक असतील. माझं च नाव असलेले त्याहून जास्त असतील. खरा मी कोण हां प्रश्न येतोच. आपापल्या गरजा भागवल्यानंतर का होईना प्रश्न पडायला हवा. म्हणजे विज्ञान आणि मुख्यत्वे यनावाला खुश आणि प्यारेही!

अध्यात्म याचा संबंध देव... धर्म...संप्रदाय...कृपा. अनुग्रह...ईईईई गोष्टीच्या संदर्भात जास्त करून येतो हे आपण सार्‍यानीच वारंवार पाहिले आहे. या सार्‍याचेही अस्तित्व नाकारणार्‍या मला अध्यात्मापासून सुटका नाही कारण मी व माझ्यासारखे नसलेले याच्यात एक साम्य आहे की मला ही मन आहे व ते माझ्या सारख्या नसणार्‍यांच्या मनासारखेच बहिर्गामी आहे. सबब आत डोकावून पहाण्याची मला ही संवय नाही ही सवय लावणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म असे स्थूलमानाने मी मानतो. साहजिकच ज्याचा मनाशी संबंध नाही अशा उर्वरित सर्व गोष्टीच्या उलथापालथीचा पध्हतशीर अभ्यास म्हणजे विज्ञान असे मी मानतो. जिथे विज्ञान संपते तिथे श्रद्धा सुरू होते असे एक फेमस वाक्य नेहमी फेकले जाते. मुळात जिथे चिकित्सा संपते तिथे श्रद्द्धा सुरू होते असे ते वाक्य हवे. थोडक्यात विज्ञान शस्त्र निर्माण करते त्याचा उपयोग किती व कसा करायचा हे अध्यात्म शिकविते. प्रत्येक जीवित गोष्ट या दोन्हीच्या समन्वयानेच जीवन जगत असते त्यातून न्युटनचीही सुटका नव्हती ना माझी आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Oct 2015 - 9:45 am | ज्ञानोबाचे पैजार

हे सगळे वाचुन मला पाडगावकरांचे हे गाणे आठवले.......

कुठे शोधिसी रामेश्वर अन्‌ कुठे शोधिसी काशी
हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी

झाड फुलांनी आले बहरून, तू न पाहिले डोळे उघडुन
वर्षाकाळी पाउसधारा, तुला न दिसला त्यात इशारा
काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी

रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविलेस तू भस्म कपाळा
कधी न घेउन नांगर हाती, पिकविलेस मातीतुन मोती
हाय अभाग्या भगवे नेसून घर संन्यासुन जाशी

देव बोलतो बाळमुखातुन, देव डोलतो उंच पिकांतुन
कधी होउनी देव भिकारी, अन्‍नासाठी आर्त पुकारी
अवतीभवती असुन दिसेना, शोधितोस आकाशी

पैजारबुवा,

चित्रगुप्त's picture

28 Oct 2015 - 10:15 am | चित्रगुप्त

ओव्या उत्तमच जमल्या आहेत. त्यात मांडलेले विचार हे शाळकरी निबंधातल्यासारखे असले, तरी विज्ञानाविषयी ओवीबद्ध लिहावेसे वाटणे आणि ते सुचत जाणे, हा लेखकाचा अध्यात्माच्या दिशेने प्रवास सुरु झाल्याचे लक्षण . त्याबद्दल अभिनंदन . पतंजलि योगसूत्रांचा गहन अभ्यास सुरू करावा असे सुचवतो. यासाठी बीकेएस अयंगार आणि ओशो यांचे ग्रंथ उपयुक्त . विज्ञानाची पार्श्वभूमि लाभलेली असणे हे फारच उत्तम .

असेच...किंबहुना हेच म्हणतो...

यनावाला's picture

29 Oct 2015 - 2:22 pm | यनावाला

उद्याचे विनोदी साहित्य
श्री.चित्रगुप्त म्हणतात,

"ओवीबद्ध लिहावेसे वाटणे हे लेखकाचा प्रवास अध्यात्माच्या दिशेने सुरू झाल्याचे लक्षण आहे."

श्री.पी.के. या समजाला अनुमोदन देतात.
...शनीमाहात्म्य, शिवलीलामृत, व्यंकटेशस्तोत्र, सत्यनारायण कथा, दासबोध, अशी अनेक लहान मोठी ओवीबद्ध धार्मिक पुस्तके वाचली. त्यामुळे ओवीछंद चांगला परिचयाचा आहे. मात्र या वाचनामुळे माझी नास्तिकविचारसरणी अधिकाधिक दृढ झाली. खरोखर धार्मिक ग्रंथ हे नास्तिकचेच्या प्रसाराचे प्रभावी साधना आहे. सत्यनारायण कथा अर्थ जमजून (अगदी सोपा आहे.) वाचली तर ती अथ ते इति असत्य आहे हे कुणाच्याही लक्षात येईल. असे असता अनेकजण सत्यनारायणव्रत पुन:पुन्हा करतात याचे आश्चर्य वाटते. "आजचे धार्मिक ग्रंथ हे उद्याचे विनोदी साहित्य आहे." असे म्हणतात. मला वाटते शनिमाहात्म्य, शिवलीलामृत या ग्रंथांची निर्मिती विनोदी साहित्य म्हणून झाली असावी.(वाचून तर पाहा. मात्र वाचताना श्रद्धा सोडायला हवी . कारण, "श्रद्धेने जो बरबटला । तो सत्यज्ञानासी मुकला।श्रद्धासंभार विसर्जिला । ज्ञानप्राप्तीस पात्र तो॥ )

प्यारे१'s picture

29 Oct 2015 - 2:25 pm | प्यारे१

आपला सकळ जनांना शहाणे करुन सोडण्याच्या भूमिकेचं कौतुक आहे.
आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

शशिकांत ओक's picture

30 Oct 2015 - 12:54 am | शशिकांत ओक

आणखी शहाणे कोण करणार.
अहो प्यारे लाल,
हा शिया सुन्नी पंथिकांच्या जागतिक वैरभावासमान न सुटणारा तिढा आहे. दोन्ही बाजूने हम नहीं सुधरेंगे अशी कसम खाऊन असलेल्या लोकांची मानसिकता बदलायला शक्य नाही. असो.
या ओव्यांचे काव्य करतानाच्या प्रसव वेदनांची जाणीव वाला सरांना झाली असेल तर भविष्य कथन म्हणून नको निदान काव्य प्रकार म्हणून नाडीग्रंथातील काव्य रचनेचा आस्वाद घ्यावा ही आपणास नम्र विनंती. या काव्य रचनांचे वैशिष्ट्य काय. तशी अलंकारिक काव्यरचना अन्य भाषेतील काव्यात सापडते का यावर आपल्या सारख्याने भाषाप्रेमी म्हणून लक्ष घालावे अशी प्यारेंनी वालासरांना विनंती करावी . असे सुचवतो.
निरर्थक कामाला मला वेळ नाही म्हणून आपण ही विनंती लाथाडणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त करतो. मिपावरील या बाबत काही काळापुर्वी माझ्याकडून धागे सोडले होते... कदाचित आपल्या वाचनात आले असतील.
नसतील तर पुन्हा एकदा सादर करेन.

यनावाला's picture

29 Oct 2015 - 9:25 pm | यनावाला

"....समन्वय?" मधील "अध्यात्मीं अष्टांग योग ।" चुकीचे आहे असे श्री. चित्रगुप्त यांनी म्हटले आहे. "प्रत्येक आध्यात्मिक व्यक्ती अष्टांग योग करते." असा अर्थ इथे अभिप्रेत नाही. " अध्यात्मात अष्टांग योगाला मान्यता आहे." असा आहे. ..अध्यात्माची नेमकी व्याख्या सापडत नाही.(मला) ."किमध्यात्मम् ?"(अ.८,श्लोक १) या अर्जुनाच्या प्रश्नावर भगवानुवाच आहे,"स्वभावोsध्यात्ममुच्यते।" त्यावर ज्ञानेश्वरीत भाष्य आहे

"आणि आकाराचां जालेपणे।जें जन्मधर्मातें कहीं नेणे ।आणि आकारलोपीं निमणे नाही जेया॥ऐसी आपुलिया सहजस्थिती। जेया ब्रह्माची नित्यता असती ।तिया नाम सुभद्रापती । अध्यात्म गा ॥"

(ओ.१७-१८)पण पाहावे तो ज्याचे त्याचे अध्यात्म वेगळे. तरी ईश्वर ,परमात्मा, (परब्रह्म), जीवात्मा (ब्रह्म)पुनर्जन्म, परलोक, मोक्ष या सर्व संकल्पना सत्य आहेत. तसेच मोक्ष हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे.योगसाधना हा मोक्षप्राप्तीचा एक मार्ग आहे.धारणा-ध्यानामुळे समाधी लागू शकते. मग ब्रह्म आकळते. या गोष्टी सत्य आहेत असे सर्व आध्यात्मिक मानतात. म्हणजे सहा वैदिक दर्शनांतील न्याय,योग आणि वेदान्त ही तीन दर्शने आध्यात्मिक लोक मानतात. त्यांना पातंजल योगदर्शन निषिद्ध नाही. म्हणून "अध्यात्मीं अष्टांग योग " हे चूक नसावे असे मला वाटते. तरी पण प्रस्तुत ओवी नसती तर बरे होते.

पण पाहावे तो ज्याचे त्याचे अध्यात्म वेगळे.

Religious fanatics want people to switch off their own minds, ignore the evidence, and blindly follow a holy book based upon private 'revelation'.

To an honest judge, the alleged marriage between religion and science is a shallow, empty, spin-doctored sham.

Richard Dawkins

गामा पैलवान's picture

30 Oct 2015 - 1:48 pm | गामा पैलवान

मारवा,

ignore the evidance वरून एक आठवलं. डॉक्टर इयन स्टेव्हनसन यांनी संशोधन करून पुनर्जन्माच्या पन्नासाहून अधिक घटना उघडकीला आणल्या आहेत. या पुराव्याबाबत तथाकथित विज्ञानवादी गप्प का आहेत? पुराव्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या असल्यांना रिलीजस फ्यान्याटिक का म्हणू नये? विज्ञानवाद हा आधुनिक युगातील एक कर्मठ रिलीजन आहे.

आ.न.,
-गा.पै.

टवाळ कार्टा's picture

30 Oct 2015 - 1:56 pm | टवाळ कार्टा

पुनर्जन्म ही भारतीय कंसेप्ट आहे...पाश्चात्यांनी ती ढापली आहे

गामा पैलवान जी
आपला प्रतिसाद ससंदर्भ व विचारवेधी आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपले अभिनंदन.
या एवजी आपण तुम्हाला कळत नाही, तुम्ही अमुक अमुक पात्रते-विचारसरणीचे-जातीचे-धर्माचे-भुमिकेचे च आहात इ.इ.
तुमचा हेतु तुमच जीवन तुमच अमक नि तुमच ढमक अस अस च आहे
आम्ही तुम्हाला ओळखुन आहो तुमच्याशी बोलण्यात अर्थच नाही हे नेहमीचच आहे यात नविन काय
मला माहीताय पण असो, आदि अनेक
तर्कहीन अर्थहीन संवाद टाळुन आपण एक मुलभुत काहीतरी नवीन कॉन्ट्रीब्युशन करुन एका प्रयोगाचा व्यक्तीचा
सुस्पष्ट काहीतरी अर्थपुर्ण खणखणीत संदर्भ दिला. आणी चर्चेत एका बाजुने महत्वाची मांडणी केली.
याने दोन विरोधी बाजुने होत असलेल्या चर्चेला एक चांगला आवश्यक मुद्दा समाविष्ट झाला.
असे व्हॅल्यु अ‍ॅडीशन चर्चेला निव्वळ भावनिक व्यक्तीवेधी प्रतिसादांनी कधीच होत नाही व चर्चा पुढे ही जात नाही. व संबंधित कोणालाच काहीही फायदा व निष्पन्न होत नाही
तर एवढ सगळ रामायण झाल्यानंतर तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्याविषयी व प्रयोगाविषयी
या प्रयोगाविषयी मला काहीच माहीती नाही मी हे वाचलेलं नाही, मी हे अगोदर माहीती मिळवुन वाचुन बघतो हे कुठल्या जर्नलमध्ये प्रकाशित झाल किंवा किमान कुठल्या वैज्ञानिंकांसमोर हे सादर करण्यात आल ? त्याला न बघताच त्यावर कोणत्या वैज्ञानिकांनी टीका केली ? कोणी नकार दिला ( तुमच्या प्रतिसादावरुन तरी अस वाटत की काही वैज्ञानिकांसमोर हा प्रयोग सादर झाला व तो त्यांनी मुद्दलातच नाकारला ). त्याच्या चाचण्या सर्वांसमक्ष झाल्या होत्या का ?
ही सर्व माहीती घेण आवश्यक वाटत व सध्या ती नसल्याने मी हा एक जाणून घेण्याचा विषय म्हणून मान्य करतो व तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा आहे म्हणून साहजिकच तुमच्याकडुन वरील माहीतीची अपेक्षा करतो.
तो पर्यंत आपण एक सशक्त अर्थपुर्ण मुद्दा उपस्थित केला आहे हे मान्य करुन उत्तर देण्यासाठीची माहीती गोळा करतो.
धन्यवाद

सतिश गावडे's picture

31 Oct 2015 - 10:10 am | सतिश गावडे

डॉ. इयान स्टिव्हन्सन यांच्या काही केसेसवर त्यांचे सहकारी डॉ. जिम टकर यांनी Life Before Life: Children's Memories of Previous Lives हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकाची प्रस्तावना डॉ. इयान स्टिव्हन्सन यांचीच आहे.

अर्थात पुस्तकाची मांडणी शोधनिबंध साच्यातील नसून कथानक स्वरुपातील आहे.

गामा पैलवान's picture

1 Nov 2015 - 3:26 am | गामा पैलवान

मारवा,

डॉक्टर इयन स्टेव्हनसन यांच्यावर ब्रिटीश मेडिकल जर्नल मध्ये हा (लांबलचक) लेख सापडला :
http://www.bmj.com/rapid-response/2011/11/01/professor-ian-stevenson-emp...

ब्रिमेज हे नाणावलेले (रेप्युटेड) प्रकाशन आहे. तुम्ही उपस्थित केलेल्या शंकांची उत्तरं या लेखात मिळवीत. डॉक्टर स्टेव्हनसन यांनी कोणतेही प्रयोग केले नाहीत. त्यांनी पुनर्जन्मावर प्रचंड प्रमाणावर माहिती गोळा केली आणि तिची वर्गवारी करून विगतवार नोंदी केल्या. त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं याचं त्यांना वैषम्य वाटंत असे.

एकंदरीत विज्ञानाच्या मर्यादा विस्तारतील अशा संशोधनाकडे तथाकथित विज्ञानवादीच दुर्लक्ष करतात. विज्ञानातही बुवाबाजी चालते. घरोघरी मातीच्याच चुली.

आ.न.,
-गा.पै.

पण पाहावे तो ज्याचे त्याचे अध्यात्म वेगळे.

Religious fanatics want people to switch off their own minds, ignore the evidence, and blindly follow a holy book based upon private 'revelation'.

To an honest judge, the alleged marriage between religion and science is a shallow, empty, spin-doctored sham.

Richard Dawkins

गामा पैलवान's picture

30 Oct 2015 - 11:21 pm | गामा पैलवान

यनावाला,

तुम्ही अध्यात्माची व्याख्या शोधायचा प्रयत्न केलात तशी विज्ञानाची व्याख्या शोधलीत का? काय सापडलं?

यापुढचा प्रश्न म्हणजे विज्ञान (=सायन्स) आणि तंत्रज्ञान (=टेक्नोलॉज=) यांतला काही फरक आहे का? असल्यास कृपया उदाहरणे देऊन स्पष्ट कराल काय?

आ.न.,
-गा.पै.

प्रसाद गोडबोले's picture

29 Oct 2015 - 9:49 pm | प्रसाद गोडबोले

यनावाला ,

तुम्हाला अध्यात्म म्हणजे काय माहीत नाही अन विज्ञान म्हणजे काय हेही माहीत नाही , तुमची सारी मते एकांगी स्वमतांधतेचे प्रदर्शन करणारी आहेत .

आता तुमच्या प्रत्येक ओवीला उत्तर दिले असते पण सगळीच स्वमतांध दांभिक लोक कसे एकांगी मताला चिकटुन रहातात हे कैक वेळा पाहण्यात आलेले आहे म्हणुन उगाच वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही .

असो .

अवांतर : यनावाला म्हणजे य.ना.वालावलकर का ? य.ना.वालावलकर नावाचे कोणीतरी प्रसिध्द गणितज्ञ की शास्त्रज्ञ पुण्यात होते त्यांच्याशी आपला काही संबंध ?

तर्राट जोकर's picture

29 Oct 2015 - 11:55 pm | तर्राट जोकर

अगदी अगदी..... नेमकं पकडलंत...

तुम्हाला अध्यात्म म्हणजे काय माहीत नाही अन विज्ञान म्हणजे काय हेही माहीत नाही , तुमची सारी मते एकांगी स्वमतांधतेचे प्रदर्शन करणारी आहेत.

कुणावरही काहीही शिक्का मारण्याआधी थोडी त्यांच्याबद्द्ल माहिती घ्यायचे पण कष्ट घ्यायचे होते. त्यांची मतं मान्य नसतीलही पण त्यांच्याबद्द्ल काही माहित नसताना त्यांना विज्ञान पण माहित नाही असं कसं म्हणू शकता? यनावालाजी हे एक अभ्यासु व्यक्ती म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांचं मिपा आणि उपक्रम वर बरंच लेखन प्रसिध्द आहे.

अवांतर : यनावाला म्हणजेच य.ना.वालावलकर.

कुणावरही काहीही शिक्का मारण्याआधी थोडी त्यांच्याबद्द्ल माहिती घ्यायचे पण कष्ट घ्यायचे होते.
अत्यंत मार्मिक टीप्पणी
मतभेद असण्यात काहीही गैर नाहीच नाही.
मात्र केवळ भावनिकच प्रतिसाद मला हे पटत नाही मला हे पटत या प्रेरणेतुन.
विचारवेधी प्रतिसाद न देता व्यक्तीवेधी प्रतिसाद देणं
अशा ad hominem (of an argument or reaction) directed against a person rather than the position they are maintaining.
अत्यंत अयोग्य आहे.
तुमचं मत अधिकाधिक ससंदर्भ व भावनिकता टाळुन असेल शक्त तितकी ( सहज संवेदना सोडुन चा उर्वरीत भाग )
तितकी चर्चा वाद अधिकाधिक चांगल्या पातळीवर जातो.
त्याने सहभागी प्रत्येक व्यक्तीला काही ना काही लाभच होतो.
अ‍ॅग्री टु डिसअ‍ॅग्री चा ऑप्शन नेहमीच ओपन आहे.
पण....

आपण सर्व भावनाशील आहोत कधी ना कधी रागावतो संयम हरवुन बसतो आपण सर्व स्खलनशील आहोत.
भावनिक प्रतिसादाचा अनादर नाहीच.
मात्र नेहमीच आपण आपल्या भावनांवर नियंत्रण न ठेवता प्रतिसाद देत असु
तर त्यात अर्थ राहत नाही.
नैसर्गिक भावभावनांच्या आहारी जाण्यात
राग लोभा इ. प्रेरंणामधुन आलेल्या नैसर्गिक उत्स्फुर्त प्रतिक्रीयांचे एक आपले महत्व आहेच.
मात्र अखेर विवेकी संयमी प्रतिसादाच योग्य आहे.
त्यानेच एकुण संवाद प्रक्रियेला काही तरी अर्थ राहतो
नाही तर त्यातुन काही अर्थपुर्ण मंथन होण्याची शक्यताच राहत नाही.

कवितानागेश's picture

31 Oct 2015 - 4:41 am | कवितानागेश

भावनाची व्याख्या काय?
अनादराची व्याख्या काय?
त्याशिवाय,
अध्यात्माची व्याख्या कळत नसताना शिकके मारायला आधी कोण आले?
समन्वय किंवा विरोध म्हणजे नक्की काय करायचय?
तो काय लोकशाही विरुद्ध हुकुमाशाही, किंवा कल्याणकारी हुकुमशाही किंवा समाजवादी लोकशाही सारखा प्रकार आहे का?

माझ्या मते ही तुलना ऍप ल्स वर्सेस ऑरेंज सुद्धा नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

31 Oct 2015 - 10:22 am | प्रकाश घाटपांडे

प्रगो.
तेच हे! सुप्रसिद्ध शब्दकोडीकार प्रा.य.ना.वालावालकर. अनेक श्रद्धांध व श्रद्धाळू लोकांना विचार करायला प्रवृत्त करणारे लेखन ते करतात.मते मान्य नसू द्यात पण विचार तर करायला लावतात की नाही?
http://mr.upakram.org/user/78/track इथे त्यांचे लेखन वाचता येईल

सतिश गावडे's picture

31 Oct 2015 - 10:43 am | सतिश गावडे

तुम्हाला अध्यात्म म्हणजे काय माहीत नाही अन विज्ञान म्हणजे काय हेही माहीत नाही , तुमची सारी मते एकांगी स्वमतांधतेचे प्रदर्शन करणारी आहेत .

अध्यात्माबाबत यनावाला यांची काही मते चुकली आहेत. काही ठिकाणी ते ज्याला अध्यात्म म्हणत आहेत ती खरे तर "धार्मिकता" आहे.

विज्ञानाच्या बाबतीत मात्र मी तुमच्याशी असहमत आहे. यनावालांनी मांडलेल्या विज्ञानवादी मतांशी कुणीही विज्ञानवादी नि:संशय सहमत होईल.

आता तुमच्या प्रत्येक ओवीला उत्तर दिले असते पण सगळीच स्वमतांध दांभिक लोक कसे एकांगी मताला चिकटुन रहातात हे कैक वेळा पाहण्यात आलेले आहे म्हणुन उगाच वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही .

तुमचे आवडते वाक्य आठवले, I don't hate in the plural.

अध्यात्म आणि धार्मिकता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मात्र काही व्यक्ती धार्मिकतेलाच अध्यात्मिकता समजतात आणि अध्यात्म बदनाम होते. दुर्दैवाने यात स्वतःला अध्यात्मिक समजणारे अधिक आहेत. बाबा, महाराज, बुवा, बापू यांच्या नादी लागणारे, त्यांचे बिल्ले खिशाला अडकवणारे स्वतःला अध्यात्मिक मानतात. काय करू नये, काय करावे याबद्दल दोन हजार वर्षांपूर्वीचे लोक अडाणी नसतील इतका अडाणीपणा दाखवणारे स्वतःला अध्यात्मिक मानतात.

"विज्ञानवादा"एव्हढी अवैज्ञानीक कल्पना शोधुन सापडायची नाहि. :)
असो.

सतिश गावडे's picture

31 Oct 2015 - 11:09 am | सतिश गावडे

बरं :)

कवितानागेश's picture

1 Nov 2015 - 6:53 am | कवितानागेश

खिक्क्!

प्रसाद गोडबोले's picture

1 Nov 2015 - 12:48 am | प्रसाद गोडबोले

धन्यवाद सर :)

आपण चर्चेत सहभाग नोंदवल्याने छान वाटले :) स्वमतांध दांभिक लोकांशी चर्चा करण्याचा खरच कंटाळा आलाय , पण आता आपण चर्चा करीत आहात तर काही तरी मजा येईल :)

काही मोजक्या ओव्यांची जरा चिकित्सा करुया :

विज्ञानाची विश्वासार्हता । जाणते सामान्य जनता । विज्ञानतत्त्वांची सत्यता । वादातीत सर्वत्र ॥१॥

जगातील बहुसंख्य जनता आजही धार्मिकच ( नॉट अध्यात्मिक) आहे , ख्रिश्चन मुस्लिम ज्यु लोक डार्विनचा सिधांत जाणतात ? चायनिज लोक आजही वाघ अन अन्य प्राण्यांच्या हाडांचा औशदात सर्रस वापर करतात , ते विज्ञानाची विश्वासार्हता जाणत्तात ? सामान्यजनता विज्ञानाची विश्वासार्हता जाणते हा क्लेम अपुर्‍या आणि बायसड सँम्पल वरुन काढला आहे ! सामान्यभारतीय लोअकं आणि विज्ञानाची विश्वासार्हता जाणणे ... हा तर विषयच सोडुन द्या . तसेच विज्ञान तत्वांची सत्यता वादातीत हा ही क्लेम चुकीचा आहे कारण सत्यता हे टाईम रीलेटेड वेरीयेबल आहे ज्याला आपण विज्ञानवादी आज सत्य मानतो ते उद्या सत्य असेलच असे नाही उद्या ते १००% वादग्रस्त ठरणार ! ( आपल्या चर्चेत आधी एकदा आलेला विषय : सिगंद फ्रॉईड ची मते आज सर्वत्र वादातीत आहेत का ? किंव्वा त्याच्या काळात तरी सर्वत्र वादातीत होती का ? )

अध्यात्मीं श्रद्धा आवश्यक । तर्क मानिती वैज्ञानिक । श्रद्धा न टिके जेथे तर्क । मूलभूत भेद हा ॥३॥

कोण म्हणते की विज्ञानात श्रध्दा नसतात . गणिताच्या भाषेत ज्याला ज्याला अ‍ॅक्झियम्स म्हणतो ते श्रध्दा नसते तर काय ? मी नेहमी विचारतो तो प्रश्ण की जे अ‍ॅटम चे मॉडेल आज जवळपास सर्व विज्ञानजगताने मान्य केले आहे तसा अ‍ॅटम कोणी तरी पाहिला आहे का हो ? पाहणे शक्य आहे का हो ? श्रधा विज्ञान आणि अध्यात्म दोहोंत लागते ! श्रध्दा न टिके जिथे तर तर्क हा ही बर्‍याच अंशी संशयास्पद क्लेम आहे मागे ब्यॅटमॅन ने सुचवलेली ही लिन्क पहा : सार्‍याच सत्य असलेल्या गो ष्टी पुराव्याने सत्य आहेत असे सिध्द करणे शक्य नाही !!!! https://en.wikipedia.org/wiki/G%C3%B6del%27s_incompleteness_theorems

विज्ञान समाज उपयोगी । अध्यात्म ते निरुपयोगी ।

आता अध्यात्मते निरुपयोगी असे म्हणणे स्वमतांधता नाही काय ? मला एखादी गोष्ट उपयेगी वाटत नसेल तर ती सर्वांसाठी निरुपयोगी ठरते का ? अध्यात्म माझ्या साठी निरुपयोगी असे यनावाला म्हणाले असते तर ते योग्य ठरले असते ना ! शिवाय विज्ञानही कायमच समाज उपयोगी असते हा क्लेमही चुकीचा आहे , विज्ञानही काही वेळा उपयोगी आणि काही वेळा समाजघातक असते . वरील ओवी हे जे २ युनीव्हर्सॅलिस्ट क्लेम करीत आहेत ते तर्काच्या कसोटीवर टिकणारे आहेत का ?

विज्ञान नियम नैसर्गिक । अध्यात्म तत्त्वे अतार्किक ।

अध्यात्म तत्त्वे अतार्किक हे पहा परत तसाच क्लेम स्वतःला तर्क समजला नाही म्हणुन तो सार्वजनीन रित्या अतार्किक ठरतो का ?

ब्रह्मवेत्ता न करी काम । जे समाजा उपयोगी ॥१०॥

आँ ?
http://belurmath.org/
http://ssy.org/
http://www.artofliving.org/in-en
http://www.tm.org/enlightenment
http://www.chinmayamission.com/
http://www.kriya.org/
http://www.osho.com/
http://www.divyayoga.com/
आणि अशा अनेक हजारो संस्था कार्यरत आहेत आजही ! ह्यांचे कार्यजर अजिबातच समाज उपयोगी नसते तर ह्या चालु राहिला असत्या का ?

वैज्ञानिकांचे संशोधन । त्या आधारे तंत्रज्ञान । करी दैनंदिन जीवन । समाजाचे सुखकर ॥११॥

बरं . नाशिकच्या कुंभमेळ्याला किमान अर्धा एक कोटी असे लोक आले होते की अध्यात्माच्या ( भले मग त्यांच्या लेखी त्याचा काहीही अर्थ असो ) आधारे सुखकर जीवन जगत आहेत , त्यांना का बरे विसरलात ? अध्यात्माच्या आधारेही अत्यंत सुखकर जीवन जगता येते. पहा thoreauvian simple living . शिवाय आपला आवडता मार्कस ऑरेलियसही काय सांगतो : Very little is needed to make a happy life; it is all within yourself, in your way of thinking.
http://www.brainyquote.com/quotes/quotes/m/marcusaure386395

अध्यात्मासी देणे-घेणे । कांही न समाजाकारणे । "अहं ब्रह्मास्मि" मंत्र जपणे । भ्रांत कल्पना मोक्षाची ॥१३॥

ही परत स्वमतांधता !
हे पहा समर्थांनी स्पष्ट सांगितले आहे :
माहावाक्य उपदेशसार । परी घेतला पाहिजे विचार ।
त्याच्या जपें, अंधकार- । न फिटे भ्रांतीचा ॥ १२॥ http://satsangdhara.net/db/D05.htm

कोणीही सच्चा अध्यात्मिक माणुस आपल्याला अहंब्रह्मास्मि ह्या मंत्राचा जप करताना सापडणार नाही !

शिवाय अज्ञात्मासि समाजकारणासी देणे घेणे नसते असे म्हणणे म्हणणे म्हणजे महाराष्ट्रातील पाचही महान संतांच्या समुळ जीवनकार्याकडे दुर्लक्ष करण्या सारखे आहे ! जास्त काही नको फक्त ... भर वाळवंटात महाराच्या पोराला कडेवर उचलुन घेणारे एकनाथ महाराज आठवा फक्त !!

परी "संसार हा असार "। नको ऐसा उपदेश ॥२२॥

ही परत स्वमतांधता !
संसार हा असार असे कोण म्हणाले ? उगाचच काही तरी .
नुकतीच मी ईशावास्योपनिषदातील पहिले दोन श्लोक एकेठिकाणी क्वोट केले ते पहा :
ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्। तेन त्यक्तेन भुञ्जीथा:मा गृध: कस्यस्विद्धनम्।।
=> या जगातील यःकिंचित अशा प्रत्येक गोष्टीत ईश्वराचे वास्तव्य आहे म्हणुनच ह्या भौतिक जगाचा त्यागपुर्वक भोग घ्या कशातही गुंतुन पडु नका कारण ह्या आसक्तीने आजवर धन संपत्ती पैसा कोणाचा झालाय ?( अर्थात कोणाचाच नाही )
आता हे आचरणात आणायचे तर कसे , तर हे पहा :
कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतँ समाः. एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ।।
अशा प्रकारे अनासक्तीने १०० वर्षे जगण्याची इछ्छा मनात धरुन कर्मे करत रहा , ह्या शिवाय मोक्षाचा दुसरा कोणताच उपाय नाही , पण काळजी करु नका कारण अशा प्रकारे कर्मे केल्याने तुम्हाला कर्मफल लागणार नाही !

हे वाचुन तुम्हाला वाटते की अद्यात्म हे संसार असार आहे असा उपदेश करते ???

"जीवनाची इतिकर्तव्यता । केवळ मोक्ष मिळविता । जन्म-मृत्यु फेरे अन्यथा ।" बरळणे हे टाळावे ॥२३॥

परत स्वमतांधता ! कंटाळा अला राव किती उदाहरणे शोधुन द्यायची ... हे घ्या अजुन :
ॐ सहना भवतु, सहनो भुनक्तु सहवीर्यं करवावहै । तेजस्वीनावधीतामस्तु माविद्विषावहै ॥
किंवा हे घ्या
ॐ भद्रं कर्णेभि शृणुयाम देवा:। भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा:।। स्थिरै रंगै स्तुष्टुवां सहस्तनुभि::। व्यशेम देवहितं यदायु:।1।

हे वैदिक शांति मंत्र आहेत अगदी दैनंदिन आयुष्यात वापरले जाणारे ! ह्यात कोठे बरे आहे मोक्षाचा उल्लेख ... हे श्लोक तर सरळ सरळ ऐहिक भौतिक सुखांकडेच निर्देश करणारे आहेत ना ! समस्त भगवद्गीतेत भगवंताने कर्मत्यागा(सन्यासापेक्षा) पेक्षा कर्मफलत्याग ( अर्थात कर्मयोग) श्रेष्ठ असल्याचे कित्येक वेळा सांगितले आहे ... पण वाचलेच नाही तर कळणार कसे ?

अध्यात्मीं महत्त्व मोक्षाला । विज्ञानीं न मान्यता त्याला । मग समन्वय कसला । ऐशा भिन्न विषयांचा ?॥२५॥

जाउं दे आता अजुन काय बोलणार ... त्यांनी एकदा मनाचा पुर्वग्रह करुनच घेतला आहे तर कितीही समजावुन सांगितले तरी त्यांना पटणार नाही . शिवाय वया बरोबर माणसांच्या धारणा दृढ होत जातात पुढे पुढे त्या बदलणे अवघड असते हेही मला कळुन चुकले आहे ! त्या मुळे आधीच्या प्रतिसादात जास्त काही वोललो नव्हतो ,

असो.
इति शम

अवांतर : पहिल्या प्रतिसादातही यनावाला ह्यांचा अपमान करण्याचा कोठेही उद्देश नव्हता , माझ्या प्रतिसादात योजलेले शब्द आणि मते ही केवळ त्यांच्या ओव्यांवरुन त्यांचया विषयी बांधलेल्या अंदाजाने व्यक्त केलेली होती . कोणत्याही प्रकारे व्यक्तिगत टिपण्णी आणि चिखलफेक करायचा उद्देश नव्हता . कोणाला तसे वाटले असल्यास ह्या दीर्घ प्रतिसादाच्या निमित्ताने गैरसमज दुर करु इच्छितो :)

याॅर्कर's picture

1 Nov 2015 - 4:42 pm | याॅर्कर

हा धागा प्रतिसादात कोणी लिहला?

बाकी प्रतिसादाबद्दल काही मत नाही, फक्त ते अ‍ॅटम दिसण्याबद्दल लिहितो. काही नॅनोमीटर साईझचे मोलेक्यूल्स दिसतात मायक्रोस्कोपमधून. लहान ऑब्जेक्ट्स पाहण्यातला प्राब्ळम म्हणजे तेवढ्या कमी वेवलेंग्थचा अर्थात जास्त पावरचा फोटॉन सोडावा लागतो आणि तितक्या पावरच्या फोटॉनमुळे अ‍ॅटम वगैरेला एनर्जी जास्त मिळते आणि तो जास्ती डिस्टर्ब होतो, सबब पोझिशन नक्की ठरवता येत नाही. अनसर्टण्टी प्रिन्सिपल अठवा.

तरी किमान तिथपर्यंत तरी गेलेत. इन्शागणपती पुढेही जातील अजून.

गामा पैलवान's picture

3 Nov 2015 - 1:44 pm | गामा पैलवान

बॅटमॅन,

अनिश्चिततेचं तत्त्व आधुनिक पुंजवादाचं मूलभूत अंग आहे. सृष्टीच्या व्यापारांत अनिश्चितता असायलाच हवी हा पुंजवादाचा आग्रह आहे. कितीही प्रयोग केले तरी संपूर्णपणे अचूक मोजमापे काढता येत नसतात. हे यनावाला यांना माहीत नाही. प्रस्तुत ओव्यांत कळकळ आहे, पण समज नाही. तशी विकसित झालेली पाहायला आवडेल.

आ.न.,
-गा.पै.

तर्राट जोकर's picture

30 Oct 2015 - 12:00 am | तर्राट जोकर

या ओव्यांचा समाचार घ्यायला फक्त पुरेसा वेळ हवा....

भाऊंचे भाऊ's picture

30 Oct 2015 - 8:58 pm | भाऊंचे भाऊ

अध्यात्मीं महत्त्व मोक्षाला । विज्ञानीं न मान्यता त्याला । मग समन्वय कसला । ऐशा भिन्न विषयांचा ?

अध्यात्मी महत्व मोक्षाला | शब्द जरी मोक्ष योजला ||
भ्रमीत वैज्ञानीक झाला | विज्ञान आगळेची राहिले ||

वैज्ञानीकाला भ्रम झाला | प्रगतीच्या मागे धावला ||
समाधान अंती असे फक्त चित्ताला | सुधरेचना त्याला ||

विज्ञानही शोधती मोक्ष | मान्य न करे परी थकीत ||
मोहुन भौतीक प्रगतीच्या त्या बलाला | भ्रमला यानावाला यानावाला ||

"विज्ञानीं न मान्यता त्याला (मोक्षाला)। " या विधानावर श्री.भाऊंचे भाऊ लिहितात," विज्ञानही शोधती मोक्ष।"... असे नाही हो भाऊसाहेब. आत्मा-पुनर्जन्म-मोक्ष या संकल्पनांना विज्ञानात मुळीच स्थान नाही. शाळेत आपण भौतिकी, रसायन असे विषय शिकलो. त्या कुठ्ल्या क्रमिक पुस्तकात आत्मा,मोक्ष हे शब्द तरी कधी होते का ? शाळा-कॉलेजात जे ज्ञानविषय शिकवितात त्यांतील ज्ञान हे मानवाच्या अधिकृत ज्ञान भांडारातील असते. या ज्ञानभांडारात आत्मा-पुनर्जन्म-मोक्ष असल्या विषयांचा समावेश नाही. मेडिकलचे विद्यार्थी शरीरशास्त्राचा अभ्यास करतात त्याविषयीं:- शरीरशास्त्राच्या ग्रंथीं देख । आत्मयाचा न नामोल्लेख । इंद्रियांचे कार्य हृदयादिक । संपूर्ण वर्णन तयाचे॥ शरीर अंतर्बाह्य अभ्यासिती । शल्यकर्म यशस्वी करिती । आत्मयाचे ना नाम धेती ।कधीही देही न आढळे ॥ यापरी आत्मा नाही नाही । कोणाच्याही हृदयीं देहीं । तैं पुनर्जन्म कोण घेई ?। भ्रांत कल्पना आत्म्याची ॥
कठोपनिषदांत .."अंगुष्ठमात्रो पुरुषोSन्तरात्मा । सदा जनानां हृदये संनिविष्ठ: ।" असे म्हटले आहे. नखाएवढा आत्मा असता तरी वैद्यकशास्त्रज्ञांना तो सापडलाच असता. पण नाहीच. म्हणून विनंती की स्वबुद्धीने विचार करावा. आपला अनुभव-विवेक (कॉमनसेन्स) वापरावा. शब्दप्रामाण्य मानू नये. अज्ञानाच्या अवगुंठनात राहू नये

दत्ता जोशी's picture

31 Oct 2015 - 5:34 pm | दत्ता जोशी

<<<<<<<<<<<नखाएवढा आत्मा असता तरी वैद्यकशास्त्रज्ञांना तो सापडलाच असता. पण नाहीच.>>>>>>>>>
धन्यवाद.नक्कीच अंतर्मुख होवून विचार करायला लावणारी गोष्ट.
एक छोटीशी शंका शक्य असल्यास निरसन करा. मनाविषयी काय? ते असते का? कुठे असते? बुद्धी म्हणजे काय? ती नक्की कशी दिसते? मानवाच्या भावनया खर्या कि खोट्या? आईचे ममत्व, प्रेम, राग लोभ, द्वेष, आनंद इ. भावना कशा दिसतात? कुठे असतात ? त्यांना वस्तुमान, रंग, चव, गंध असतो का? विज्ञानाच्या कसोटीवर यातल्या कोण कोणत्या गोष्टींचे गणिती सादरीकरण ( mathamatical representation ) करता येते किवा केले जावू शकते? मन बुद्धी, भावना इ.चे विज्ञान प्रामाण्य काय?

दत्ता जोशी's picture

31 Oct 2015 - 5:40 pm | दत्ता जोशी

<<<<<<< नखाएवढा आत्मा असता तरी वैद्यकशास्त्रज्ञांना तो सापडलाच असता. पण नाहीच. म्हणून विनंती की स्वबुद्धीने विचार करावा. आपला अनुभव-विवेक (कॉमनसेन्स) वापरावा. शब्दप्रामाण्य मानू नये. अज्ञानाच्या अवगुंठनात राहू नये.>>>>>>
धन्यवाद.नक्कीच अंतर्मुख होवून विचार करायला लावणारी गोष्ट.
एक छोटीशी शंका शक्य असल्यास निरसन करा. मनाविषयी काय? ते असते का? कुठे असते? बुद्धी म्हणजे काय? ती नक्की कशी दिसते? मानवाच्या भावनया खर्या कि खोट्या? आईचे ममत्व, प्रेम, राग लोभ, द्वेष, आनंद इ. भावना कशा दिसतात? कुठे असतात ? त्यांना वस्तुमान, रंग, चव, गंध असतो का? विज्ञानाच्या कसोटीवर यातल्या कोण कोणत्या गोष्टींचे गणिती सादरीकरण ( mathamatical representation ) करता येते किवा केले जावू शकते? मन बुद्धी, भावना इ.चे विज्ञान प्रामाण्य काय?

अत्रुप्त आत्मा's picture

31 Oct 2015 - 5:54 pm | अत्रुप्त आत्मा

@

मनाविषयी काय? ते असते का? कुठे असते? बुद्धी म्हणजे काय? ती नक्की कशी दिसते? मानवाच्या भावनया खर्या कि खोट्या? आईचे ममत्व, प्रेम, राग लोभ, द्वेष, आनंद इ. भावना कशा दिसतात? कुठे असतात ? त्यांना वस्तुमान, रंग, चव, गंध असतो का? विज्ञानाच्या कसोटीवर यातल्या कोण कोणत्या गोष्टींचे गणिती सादरीकरण ( mathamatical representation ) करता येते किवा केले जावू शकते? मन बुद्धी, भावना इ.चे विज्ञान प्रामाण्य काय?

>>> तुमच्या सर्व शंकाचे निरसन खालील पुस्तकात सांगोपांग रित्या केलेले आहे.. जरूर वाचा.
लेखकः-डॉ.प्रदिप पाटील.

http://www.bookganga.com/eBooks/Content/images/books/47b49c90b1f3428abc100578eef39644.jpg

सतिश गावडे's picture

31 Oct 2015 - 7:14 pm | सतिश गावडे

मनाविषयी काय? ते असते का? कुठे असते?

कोणत्याही शरीरबाह्य अथवा शरीरांतर्गत संवेदनेला मेंदूने दिलेला प्रतिसाद म्हणजे मन.

बुद्धी म्हणजे काय? ती नक्की कशी दिसते?

मेंदूची ज्ञान मिळवण्याची आणि त्या ज्ञानाचा योग्य तो वापर करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी.

मानवाच्या भावनया खर्या कि खोट्या?

खर्‍या. शरीरबाह्य अथवा शरीरांतर्गत परिस्थितीनुसार मेंदूमध्ये चेताप्रक्षेपक स्त्रवू लागतात आणि त्यांनुसार ज्या तीव्र संवेदना जाणवू लागतात त्या संवेदना म्हणजे भावना.

आईचे ममत्व, प्रेम, राग लोभ, द्वेष, आनंद इ. भावना कशा दिसतात? कुठे असतात ?

या सार्‍या भावनांशी संबंधित मेंदूमध्ये विशिष्ट प्रकारची चेताप्रक्षेपके स्त्रवतात. उदा. आईचे ममत्व. आई जेव्हा ममतेने बाळाला जवळ घेते तेव्हा तिच्या मेंदूमध्ये ऑक्सिटोसीन स्त्रवत असते.

विज्ञानाच्या कसोटीवर यातल्या कोण कोणत्या गोष्टींचे गणिती सादरीकरण ( mathamatical representation ) करता येते किवा केले जावू शकते?

मेंदूची संरचना तसेच मेंदूमध्ये स्त्रवणार्‍या चेताप्रक्षेपकांची पातळी मोजण्यासाठी विविध प्रकारची अत्याधुनिक उपकरणे आणि चाचण्या उपलब्ध आहेत. उदा. fMRI (Functional magnetic resonance imaging) या तंत्राने मेंदूतील उलाढालींचे आणि त्यायोगे मानवी भावनांचे आलेख स्वरुपात आरेखन करता येते.

मन बुद्धी, भावना इ.चे विज्ञान प्रामाण्य काय?

चेताविज्ञान (Neuroscience) या शाखेत या बाबींचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास केला जातो.

जर तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची अधिक सविस्तर उत्तरे मिळवण्याची ईच्छा असेल तर Cognitive Psychology या विषयावर एखादे पुस्तक वाचा.

लहानपणी गावाकडील कुणीतरी एक अभंग हमखास म्हणत असे, "मन इंद्रियांचा राजा, त्याची सर्वभावे पुजा". बहूधा तुकारामांचा असावा हा अभंग. आता नक्की आठवत नाही. मात्र अभंगकर्ता ज्याला मन म्हणत आहे ते खरे तर मेंदू आहे. ज्या काळात हा अभंग लिहिला गेला त्या काळात अर्थातच शरीरविज्ञान प्रगत नव्हते. अन्यथा अभंगकर्त्याने नक्कीच "मेंदू इंद्रियांचा राजा, त्याची सर्वभावे पुजा" असे म्हटले असते.

संदीप डांगे's picture

1 Nov 2015 - 2:14 am | संदीप डांगे

गावडे सर,

काही म्हणा पण तुमचा अभ्यास एक नंबर. एकच खटकणारी गोष्ट की वरच्या सर्व विधानांमधे जाम अतिआत्मविश्वास दिसतो. म्हणजे आपण म्हणतो तेच सत्य आहे, याशिवाय दुसरे सत्य असूच शकत नाही. आम्ही म्हटले, मनाची अमुक एक व्याख्या केली म्हणजे ते तसेच असते असा दंभ दिसतो. हे जे मला जाणवले ते खरे नसेलही कदाचित. पण जाणवले मात्र खरे. आपले असे मत आहे बुवा की विज्ञानवाद्यांना कधीच असला ठाम विश्वास असू नये. असे असेल तर धर्मांध आणि विज्ञानवादी यांच्या फरक राहत नाही असे वाटते.

कवितानागेश's picture

1 Nov 2015 - 6:57 am | कवितानागेश

इट इज विज्ञानधर्म! ;-)
डॉकिन्स बाबा वाक्यम् प्रमाणं!

सतिश गावडे's picture

1 Nov 2015 - 4:30 pm | सतिश गावडे

एकच खटकणारी गोष्ट की वरच्या सर्व विधानांमधे जाम अतिआत्मविश्वास दिसतो. म्हणजे आपण म्हणतो तेच सत्य आहे, याशिवाय दुसरे सत्य असूच शकत नाही. आम्ही म्हटले, मनाची अमुक एक व्याख्या केली म्हणजे ते तसेच असते असा दंभ दिसतो. हे जे मला जाणवले ते खरे नसेलही कदाचित. पण जाणवले मात्र खरे.

तुम्हाला असे वाटले ही माझ्या लेखनशैलीची न्युनता समजा.
मी जे लिहिले आहे ती माझी मते नसून आजच्या घडीला मनोविज्ञानाला जे ज्ञात आहे ते माझ्या परीने सोप्या शब्दांत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

आपले असे मत आहे बुवा की विज्ञानवाद्यांना कधीच असला ठाम विश्वास असू नये. असे असेल तर धर्मांध आणि विज्ञानवादी यांच्या फरक राहत नाही असे वाटते.

असे नसतेही. जी गोष्ट आज स्विकारली आहे त्याविरोधात उद्या नविन काही हाती आले तर ते स्विकारले जाते.

दत्ता जोशी's picture

31 Oct 2015 - 6:29 pm | दत्ता जोशी

धन्यवाद अतृप्त जी,
वेळ मिअल्ल कि नक्की वाचतो. पण माझा प्रश्न मेंदुविषयी नाही तर मनाविषयी आहे. मन आणि मानसिक भावना इत्यादी. मनाचे विज्ञान प्रामाण्य सिद्ध करता येते काय? गणिती सादरीकरण करता येते काय? बुद्धी म्हणजे मेंदू नव्हे ना? विचार कोठून येतात? इ. प्रश्न होते.

अत्रुप्त आत्मा's picture

31 Oct 2015 - 10:13 pm | अत्रुप्त आत्मा

दत्ता जोशी,

कृपया वर सतिश गावडे यांनी सदर विषयातील केलेलं इत्थम्भूत डिटेलींग अतिशय शांतपणे आणी एकाग्रतेनी वाचा..

दत्ता जोशी's picture

1 Nov 2015 - 12:42 pm | दत्ता जोशी

वाचले. धन्यवाद. :-)

मूकवाचक's picture

31 Oct 2015 - 8:32 pm | मूकवाचक

Ramana Maharshi's Philosophy of Existence and Modern Science: The Convergence in Their Vision of Reality (J. Sithamparanathan)

पुस्तकाचे मूल्यः रू. ३९५

आंतरजालावरून मागवण्यासाठीचा दुवा:
Ramana Maharshi's Philosophy of Existence and Modern Science

चतुरंग's picture

31 Oct 2015 - 9:17 pm | चतुरंग

अशा वादात पडण्याआधी एक विडिओ बघा असे सुचवेन. डॉ. ब्रूस लिप्टन या डॉक्टर शास्त्रज्ञाने पेशींवरती केलेले संशोधन त्याचे सद्य वैद्यकीय ज्ञानापेक्षा अतिशय निराळेच निष्कर्ष यावरती हा विडीओ आहे. मानवी पेशीसंबंधाने होणारे अभ्यास, मुळात माणसाचे उत्क्रांत होणे यावरतीच एका वेगळ्या कोनातून हा बघतो. अत्यंत सोप्या पद्धतीने, स्लाईड्स दाखवून सर्व शास्त्रीय परिभाषा अवलंबून तो अनेक गोष्टी स्पष्ट करतो. वैद्यकीय क्षेत्राशी दूरान्वयाने संबंधित नसूनही समजायला मला अतिशय सोपा वाटला विडिओ.
आपल्या पंचेंद्रियांना जाणवणार्‍या गोष्टींबाहेर आणि सद्यस्थितीत ज्ञात ज्ञानाच्या कक्षेबाहेर अनेक गोष्टी अशा आहेत की ज्यांचा विचार आपल्याला करणे भाग पडावे इतपत विचार मी तरी त्यातून घेतला. हाच विचार इतर विज्ञानशाखांना लावता यायला हरकत नसावी असे वाटते.

चंद्रनील मुल्हेरकर's picture

31 Oct 2015 - 9:38 pm | चंद्रनील मुल्हेरकर

मध्यंतरी, what the bleep do we know नावाची डॉक्युमेंट्री प्रचंड गाजत होती,आधुनिक विज्ञानाचे संदर्भ अत्यंत बेमालुमपणे अध्यात्माशी कसे जोडता येतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही फिल्म,यात उपरोक्त लिप्टन वगैरे मंडळीही होती,सामान्य माणसाला अतिक्लिष्ट वैज्ञानिक गोश्टी कळत नाहीत याचा फायदा काही पाश्च्यात्य व भारतीय स्युडोसायंटीस्ट घेत असतात,
ब्रुस लिप्टन, दिपक चोप्रा वगैरे मंडळी यांच्यापैकीच आहेत.सॅम हॅरीस, मायकेल शर्मर,व स्वत रिचर्ड डॉकीन्स यांचा वेळोवेळी समाचार घेत असतात,तस्मात अध्यात्म नावाच्या थोतांडाकडे फारसे लक्श देऊ नये.

मांत्रिक's picture

31 Oct 2015 - 9:46 pm | मांत्रिक

वा! काय प्रचंड मुद्देसूद प्रतिवाद आहे. धन्य झालो.

दत्ता जोशी's picture

1 Nov 2015 - 1:17 pm | दत्ता जोशी

ईश्वरावर परमेश्वरावर विश्वास नसणे हा मला तरी गुन्हा वाटत नाही. किमान ते विज्ञानावर पुर्ण ( अंध म्हटले तर चालेल का?) विश्वास ठेवून चालत असतात. ज्याप्रमाणे ते मला बदलू शकत नाहीत अगदी त्याच प्रमाणे मेही त्यांना बदलू शकत नाही. ईश्वर आहे/ नाही, ईश्वर जगत्नियंता आहे / नाही हा वाद फार जुना आणि जगभरचा आहे. तेव्हा त्यात फारसे गुंतू नये. बायबल म्हणते स्वर्गाचे द्वार अतिशय अरुंद असते. प्रत्येक जण सुखाच्या ( स्वर्गाच्या) शोधात आहे म्हणून तर पंच ज्ञानेंद्रियांनी ते सुख ओरबाडून घेण्याचाच प्रत्येकाचा प्रयत्न आहे. पण त्यात यश येत नाही. कारण इंद्रियांतून मिळणारे सुख हे क्षणभंगुर असते. . भारतीय तत्वज्ञान शाश्वत( अमर) सुखाचा मार्ग दाखवते. विविध विषयांतून मिळणारे सुख हे तात्पुरता आनंद देते. सुख हे विषयांशी निगडीत असते पण आनंद हि त्यातून येणारी अनुभूती आहे. म्हणून तर या शाश्वत सुखाला सत चित आनंद ( सच्चिदानंद) असे म्हटले आहे सत चित सुख नाही. पण सर्वांनाच ते पटेल असे नाही. कारण विशायोलोलूप मन इंद्रियांच्या मार्फत जे पाहते तय्लाच सत्य समजते.आणि त्यातून बाहेर पडावयास तयार नसते. यालाच बुद्धांनी माया असे म्हटले आहे.
१००% विज्ञानवादी लोकांचा मी आदरच करतो. फक्त ज्या प्रमाणे श्रध्लौ लोकांकडून त्यनचिउ जी अपेक्षा असते, माझीहि त्यांच्या कडून तीच अपेक्षा- त्यांनी त्यांचे तत्वज्ञान उगीचच लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करू नये.

अवांतर ; विज्ञानावर अंध विश्वास ठेव्नारांनी उत्क्रांती आणि बिग बँग या केवळ वैज्ञानिक कल्पना आहेत त्या खर्या असू शकतीलही आणि अगदी खरे आहे असे गृहीत धरले तरी एक पेशीय अमिबा पासून इतक्या क्लिष्ट रचनेच्या कोट्यावधी जीव जंतूंच्या उत्क्रांती मागे कोणता intelligence आहे हे समजत नाही. किंवा सांगण्याची त्यांची ( शास्त्रज्ञांची) तयारी नसते. उत्क्रांतीसाठी उत्क्रांती झाली म्हणणे कितपत सयुक्तिक आहे? याचा विचार करावा आणि उत्तर शोधण्याचा जरूर प्रयत्न करावा.

हे सगळं शंभर टक्के मान्य केलं तरी आयुष्यातले प्रॉब्लेम ना डार्विन सोडवणारे ना डॉकिन्स ना प्रसरण पावणारं विश्व.
आयुष्यात आवश्यक स्पर्धा, चिड़चिड़, कटकट , त्रागा इ इ साठी उपाय?
1. कोण्याही जीवाचा न घड़ो मत्सर
2. अहंकाराचा वारा न लागो
3. जे जे देखिजे भूत ते ते मानिजे भगवंत
4. जगी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे
अशी अनेकानेक वाक्ये हेच आहेत.

चतुरंग's picture

31 Oct 2015 - 11:53 pm | चतुरंग

गल्लत होते आहे.
मी म्हणतो आहे त्या विडिओमध्ये शास्त्रीय परिभाषेत ब्रूसने काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या मला तरी तर्काच्या कसोटीवर व्यवस्थित पटल्या. वैद्यकीय क्षेत्रातले तज्ञ जसे इथे डॉ. सुबोध खरे, डॉ. सुहास म्हात्रे आहेत. मला वाटते बहुगुणी देखील याविषयाशी संबंधित आहेत. यांनी हा विडिओ बघावा त्याचे इतरही विडिओ बघावेत त्यात त्यांना काही अतार्किक वाटले तर जरुर ते मुद्दे समोर येऊदेत. मी देखील सॅम हॅरिसचे विडिओ, पुस्तके मिळेल ते जरुर बघेनच.
ध्यान, धारणा, प्राणायाम, योग या सर्वांना निश्चित बैठक आहे. प्रयोग करुन बघा. काय काय अनुभव येतात त्यंची छाननी करा विचार मोकळे ठेवा. प्रत्येकवेळी प्रयोगशाळेतच गोष्टी सिद्ध करता येतात असे नसते. शरीर हीच मोठी प्रयोगशाळा आहे त्यातल्या अनुभवांना नाकारणे म्हणजे "शास्त्रीय" असं वाटत अस्सेल तर पुढे काही चर्चा घडणे नाही!
कोणतीही बाजू अभ्यासाखेरीज थोतांड वगैरे मानणे हे कितपत शास्त्रीय आहे?

दत्ता जोशी's picture

1 Nov 2015 - 12:48 pm | दत्ता जोशी

सॅम हॅरीसच्या भाषणांचा आणि त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीचा मी भोक्ता आहे पण त्याच्या तत्वज्ञानाचा नाही.
अशा चर्चा आणि (सु) वाद कायम होत असतात. त्यात कोणी कोम्नाचा समाचार घेते असे म्हणण्यात अर्थ नाही कारण ज्याला जे पटले तो र्याचाला फॉलो करतो आणि मला जे पटते तीच मते फोलोवर मंडळी डोक्यावर घेतात. म्हणजे अशा चर्चा तून तसे निष्पन्न काहीच होत नाही ( तोच न्याय इथेही लागू). तुम्हाला "त्यांची" मते आवडतात आणि त्यामुळे "ते" "यांचा" समाचार घेतात असे तुम्हाला वाटते आणि vice versa .

संदीप डांगे's picture

1 Nov 2015 - 2:08 am | संदीप डांगे

दुधाला मोजू मीटरमधे अन् अंतर मोजू लिटरमधे,
मीटर समजे ना लीटर, दूध कळे ना अंतर,
वस्तू अन् मापे घेऊन गर्जत फिरतो दारोदार.
वैज्ञानिका... बुद्धी असून आंधळा तू ठार.

प्यारे१'s picture

1 Nov 2015 - 5:35 am | प्यारे१

यानंतर उगाच
'विठ्ठला, तू वेडा कुंभार' असं ऐकू आलं.
कंडीशनिंग यु सी!

कवितानागेश's picture

1 Nov 2015 - 7:06 am | कवितानागेश

कशाला हो वैद्नानिकान्ना यात खेचता?
खरे वैज्ञानिक निवांतपणे आपले काम करतात. कारण त्यांना पूर्णपणे माहीत असते की आपल्याला निसर्गाबद्दल फार कमी कळते आहे..... आपला अभ्यास पूर्ण झालेला नाही. ते कुठलाच दरवाजा बंद करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट मूळातून जानूं घ्यायला बघतात. वरावरची उत्तरे त्यांना खपत नाहीत.
पण कुठलाही विषय असो.. एकदा का आपल्याला लई कळतय असे वाटायला लागले की झाले कल्याण!

मांत्रिक's picture

1 Nov 2015 - 8:22 am | मांत्रिक

Albert Einstein's religious views have been studied extensively. He said he believed in the "pantheistic" God of Baruch Spinoza, but not in a personal god, a belief he criticized. He also called himself an agnostic, while disassociating himself from the label atheist, preferring, he said, "an attitude of humility corresponding to the weakness of our intellectual understanding of nature and of our own being"
.https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://en.m.wiki...
हे पहा, स्वतः आईनस्टाईनने पण हेच मत मांडलेय.

संदीप डांगे's picture

1 Nov 2015 - 7:30 pm | संदीप डांगे

सोरी सोरी, वैज्ञानिक नव्हते म्हणायचे मला... विज्ञानांध म्हणूया!

वरील धागा दोन्ही अध्यात्म आणि विज्ञान यातील फरक स्पष्ट करणारा आहे.
म्हणून धाग्याच्या मुळ विषयाच्या दिशेने आर्ग्युमेंट मांडण्याचा प्रयत्न करतो.

फरकाचा मुद्दा क्रमांक १

अध्यात्मिक सत्याचा अनुभव घेण्यासाठी कायम श्रद्धेची विश्वासाची फेथ ची मागणी केली जाते. ती असल्याशिवाय संबंधित क्लेम केलेल्या आध्यात्मिक सत्याचा :अनुभव: घेता येत नाही. संशय असेल तर तुम्हाला कधीच ते अनुभवता येणार नाही असे प्रतिपादन आध्यात्मिक बाजुने नेहमीच केले जात असते.

वैज्ञानिक सत्याचा अनुभव घेण्यासाठी कुठल्याही श्रद्धेची विश्वासाची फेथ ची पुर्वअट नसते. प्रयोग समोर असतो निष्कर्ष समोर असतो एक व्यक्ती पुर्ण शंका मनात बाळगुन पुर्णपणे श्रद्धाहीनतेने एखाद्या वैज्ञानिक सत्याकडे बघुन तपासुन प्रयोग करुन पाहु शकतो व तर्काच्या साहाय्याने निष्कर्षापर्यंत जाउ शकतो.
प्रत्येक वैज्ञानिक पुर्वसुरींनी केलेल्या प्रयोगांकडे संशयानेच पाहत असतो क्रिटीकल एन्क्वायरी करतो व प्रत्येक वेळी तार्कीकतेने अंतिम निष्कर्षांपर्यंत पोहोचत असतो.

फरकाचा मुद्दा क्रमांक २

अध्यात्मिक सत्ये आर्बीटरीली मांडलेली असतात ती सनातन व अंतिम या स्वरुपात असतात. त्यात बदल सुधारणा विकास या प्रक्रियेचा समावेशच नसतो. धर्मग्रंथात या रीतीने मांडलेली कीतीतरी सनातन सत्ये वैज्ञानिक कसोटीवर टीकलेली नाहीत. उदा. पृथ्वी चा आकार

वैज्ञानिक सत्ये आजपर्यंतचा निष्कर्ष या भुमिकेतुन मांडलेली असतात. ती सनातन या व्याख्येने संचालित न होता नित्यनुतन या अर्थाने असतात. त्यात सुधारणा विकास बदल या सर्व बाबी गृहीतच असतात. कुठलाही वैज्ञानिक माझ्या पुस्तकात जे सांगितलेलं आहे ते अंतिम विधान आहे यापुढे काहीही सत्य संभवतच नाही. तसे वाटत असेल तर तो तुमचा एक भ्रम आहे अशी भाषा नसते. एक विनम्रता असते.

मांत्रिक's picture

1 Nov 2015 - 8:13 am | मांत्रिक

वैज्ञानिक सत्याचा अनुभव घेण्यासाठी कुठल्याही श्रद्धेची विश्वासाची फेथ ची पुर्वअट नसते hypothesis, simple enumeration हे फेथ नाहीत तर काय आहेत मग? अनेक शास्त्रज्ञ या पद्धतींचा वापर करतच आले आहेत ना?
अध्यात्मिक सत्ये आर्बीटरीली मांडलेली असतात ती सनातन व अंतिम या स्वरुपात असतात. जगभरातील अनेक साधुसंतांनी याबाबत आपले विचार मांडलेले आहेत. त्यात बाह्यांगाने फरक तर अंतरंगाने समानताच आढळते. बुद्ध, येशू, कृष्ण, महावीर या सर्वांच्या शिकवणुकीबाबत असेच आहे. हे महात्मे स्वार्थी होते असे त्यांचे कट्टर विरोधकही म्हणणार नाही. मग त्यांनी आध्यात्मिकतेबाबत जे विचार मांडले आहेत ते स्वार्थी, दिशाभूल करणारे आहेत का?
ख्रिस्ताला सुळावर मृत्यू पत्करण्याचं काय कारण होतं? मस्त आपलं निवांत जगता आलं नसतं का त्याला?

प्यारे१'s picture

1 Nov 2015 - 11:55 am | प्यारे१

जनाब, हम बार बार लगातार उसी चौराहे से गुजर रहे है| आप के 'मिपा क्लासिक सिरीज' में आपको कुछ ऐसे क्लासिक बेशक ऐसे मिलेंगे जिसमे आपके ऊपरी सारे सवालोंके जवाब मिल जायेगे|
अब आपने उत्खनन शुरू किया है ही तो थोड़े कष्ट अवश्य करे|

आपला मुद्दा विज्ञान काही साधनांद्वारे व्यक्तीनिरपेक्ष निकाल देतं आणि त्यात श्रद्धा वगैरे काही लागत नाही. बरोबर आहे. आध्यात्मिक शब्दाची व्याख्याच 'माझ्या शरीराआड़ दडलेलं तत्त्व' किंवा 'आत्म्याला धरून असलेलं शरीर' अशी आहे. जेव्हा स्वत:ला काही अनुभाव घ्यायचा असतो तेव्हा पहिलं पाऊल म्हणजे ती गोष्ट अमुक आहे अशी श्रद्धा च हवी. पूर्वानुभवावरून, इतरांच्या सांगन्यावरून किंवा आणखी काही वाचनातून, बघण्यातून वगैरे अमुक एक गोष्ट अशी झाली तर ते अमुक एक होईल ही प्रोसीजर प्रक्रिया साखळी घडते. ती तशी वापरून अमुक एक अनुभव आलेली अनेक उदाहरणे आहेत म्हणून ती वापरायची. वापरायची नसल्यास चर्चा शून्य निष्कर्षापर्यंत नेऊन पोचवते. नेहमीप्रमाणं.

दत्ता जोशी's picture

1 Nov 2015 - 12:49 pm | दत्ता जोशी

<<<<कीतीतरी सनातन सत्ये वैज्ञानिक कसोटीवर टीकलेली नाहीत. उदा. पृथ्वी चा आकार >>>>
प्रचंड असहमत.

दत्ता जोशी's picture

1 Nov 2015 - 12:51 pm | दत्ता जोशी

माझी असहमती मारवांच्या प्रतीक्रीयेतल्या काही विधानांशी आहे.

मांत्रिक's picture

1 Nov 2015 - 8:20 am | मांत्रिक

आईनस्टाईन यांचे याविषयी मतः
Albert Einstein's religious views have been studied extensively. He said he believed in the "pantheistic" God of Baruch Spinoza, but not in a personal god, a belief he criticized. He also called himself an agnostic, while disassociating himself from the label atheist, preferring, he said, "an attitude of humility corresponding to the weakness of our intellectual understanding of nature and of our own being".
शेवटच्या परिच्छेदाचा अर्थ समजून घेतला तर वर प्रगोसाहेब, लीमाऊजेट यांना काय म्हणायचंय ते समजून येईल.

<<< मनाविषयी काय? ते असते का? कुठे असते?

कोणत्याही शरीरबाह्य अथवा शरीरांतर्गत संवेदनेला मेंदूने दिलेला प्रतिसाद म्हणजे मन.>>>>

हि व्याख्या पुर्ण नाही. मेंदू आणि प्रतिसाद यांचा एकत्रित विचार केला तर आकलन, पृथक्करण, स्मृती, विचार आणि तर्क इ. गोष्टींचा प्रभाव प्रतिक्रियेवर पडेल. पण तिकडे जाण्यापूर्वी तुम्ही दिलेल्या प्रतिसादावरून मन आणि मेंदू या दोन भिन्न गोष्टी आहेत हे गृहीत धरायला आपली हरकत नसावी. मेंदू एकादी गोष्ट/ संवेदना प्राप्त करून त्यावर प्रक्रिया करून एक प्रतिसाद देतो मात्र पण त्या भावना/ संवेदना समजून घेणारे दुसरेच कोणी असते. असा निष्कर्ष यातून निघतो.

<<<<< बुद्धी म्हणजे काय? ती नक्की कशी दिसते?
मेंदूची ज्ञान मिळवण्याची आणि त्या ज्ञानाचा योग्य तो वापर करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी.>>>>>>
मान्य. पण त्याबरोबर तर्क ( reasoning ) हा बुद्धीचा एक अविभाज्य घटक आहे. ( मराठीत विचार करून टंकणं जड जातंय). म्हणजे बुद्धी आणि भावना वेगळ्या गोष्टी असून बुद्धीच्या ठिकाणी भावनांना थारा नाही/ भावना जाणू शकत नाही. परत हाच मुद्दा इथे अधोरेखित होईल कि बुद्धी आणि भावना जाणारे कोणीतरी वेगळे आहेत. अर्थात मन हे बुद्धी (पर्यायाने मेंदूशी) फार घनिष्ट रित्या निगडीत आहे यावर दुमत नाही.

<<<<< मानवाच्या भावनया खर्या कि खोट्या?
खर्‍या. शरीरबाह्य अथवा शरीरांतर्गत परिस्थितीनुसार मेंदूमध्ये चेताप्रक्षेपक स्त्रवू लागतात आणि त्यांनुसार ज्या तीव्र संवेदना जाणवू लागतात त्या संवेदना म्हणजे भावना.

आईचे ममत्व, प्रेम, राग लोभ, द्वेष, आनंद इ. भावना कशा दिसतात? कुठे असतात ?

या सार्‍या भावनांशी संबंधित मेंदूमध्ये विशिष्ट प्रकारची चेताप्रक्षेपके स्त्रवतात. उदा. आईचे ममत्व. आई जेव्हा ममतेने बाळाला जवळ घेते तेव्हा तिच्या मेंदूमध्ये ऑक्सिटोसीन स्त्रवत असते. >>>>>>
मान्य. भावनांच्या प्रभावाने मेंदूत हे स्त्राव स्त्रवतात. उलट हि बहुतांश शक्य आहे. पण ऑक्सिटोसीन म्हणजे ममत्व नव्हे असे निश्चित म्हणता येईल नाही का? याच न्यायाने, इतर संप्रेरके हि बाह्य घटना, संवेदनांमुळे मेंदूने दिलेल्या प्रतिक्रिया असल्या तरी अशी संप्रेरके ( हा योग्य शब्द आहे ना?) म्हणजे त्या भावना नव्हेत. मेंदू जरी विविध माहिती संकलित करून पृथक्करण / प्रक्रिया करीत असला भावना या मनाशी निगडीतच असल्या पाहिजेत, मेंदूशी नाही हे उघड आहे.

<<<<<< विज्ञानाच्या कसोटीवर यातल्या कोण कोणत्या गोष्टींचे गणिती सादरीकरण ( mathamatical representation ) करता येते किवा केले जावू शकते?
मेंदूची संरचना तसेच मेंदूमध्ये स्त्रवणार्‍या चेताप्रक्षेपकांची पातळी मोजण्यासाठी विविध प्रकारची अत्याधुनिक उपकरणे आणि चाचण्या उपलब्ध आहेत. उदा. fMRI (Functional magnetic resonance imaging) या तंत्राने मेंदूतील उलाढालींचे आणि त्यायोगे मानवी भावनांचे आलेख स्वरुपात आरेखन करता येते. >>>>>>
अंशतः मान्य. या प्रकारात मेंदूच्या कोणत्या भागात कधी रक्तप्रवाह वाढतो ( प्राणवायूच्या मागणीमुळे) याचे इमेजिंग केले जाते. माझ्या माहिती प्रमाणे fMRI चा मुख्य उपयोग विविध भावना उद्दीपित होताना तसेच भावनिक/ मानसिक प्रतिक्रिया देताना मेंदूचा कोणता भाग जास्ती कार्यान्वित होतो आणि किती प्रमाणात होतो हे समजून घेण्यासाठी तसेच मेंदूच्या विविध अवस्था समजून घेण्यासाठी केला जातो. (जागेपणीच्या भावना, जाणीव, झोप, स्वप्नारहित झोप, स्वप्ने, कोम, ब्रेन डेथ इ.). पण मानवी मन आणि भावना फक्त पेरिस्थिति सापेक्ष नसतात तसेच फक्त व्यक्तीसापेक्ष नसतात. तसेच त्यांच्यावर कोणतेही ठराविक, विशिष्ट ,भौतिक नियम लागू होत नसल्यामुळे मन, मानवी भावना आणि प्रतिसाद अतर्क्यच आहेत आणि म्हणूनच त्यांचे गणितीय मूल्यमापनही.

जर तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची अधिक सविस्तर उत्तरे मिळवण्याची ईच्छा असेल तर Cognitive Psychology या विषयावर एखादे पुस्तक वाचा.
Cognitive या शब्दाचा अर्थच मुळात "मानसिक घडामोडींशी संबंधित" असा आहे. ( related to mental activities आणि मेंटल चा अर्थ मनाशी संबंधित असाच आहे.). मानसशास्त्राची व्याख्या मन आणि आचरण/ व्यवहार ( behavior ) यांचे अभ्यास करणारी विज्ञान शाखा असा आहे. ( elaborate करतोय कृपया आपल्याला शिकवतोय असे समजू नये)
Cognitive Science मध्ये मानसशास्त्र, neuroscience , तत्वज्ञान इतकेच काय कृत्रिम बुद्धिमत्ता ( artificial Intelligence ) इतक्या गोष्टी एक्चात्राखाली घेतल्या गेल्याने, AI शी संबंधित काम करत असताना याच्याशी थोडासा संबंध आला. पण सखोल अभ्यास नाही. गरजेपुरती माहिती मिळवली.
एकूण माझा मुद्दा- मनाचे अस्तित्व, मनोव्यापार आणि मन हे शरीर आणि बुद्धीशी घनिष्ट संबंधित असून मनाचे अस्तित्व कोणत्याही शास्त्राने नाकारलेले नाही.
<<<<लहानपणी गावाकडील कुणीतरी एक अभंग हमखास म्हणत असे, "मन इंद्रियांचा राजा, त्याची सर्वभावे पुजा". बहूधा तुकारामांचा असावा हा अभंग. आता नक्की आठवत नाही. मात्र अभंगकर्ता ज्याला मन म्हणत आहे ते खरे तर मेंदू आहे. ज्या काळात हा अभंग लिहिला गेला त्या काळात अर्थातच शरीरविज्ञान प्रगत नव्हते. अन्यथा अभंगकर्त्याने नक्कीच "मेंदू इंद्रियांचा राजा, त्याची सर्वभावे पुजा" असे म्हटले असते.>>>
असे नाही. उलट भारतीय तत्वज्ञानात मनाचा आणि कर्म (व्यवहार/ behavior )यांचा अभ्यास फार सूक्ष्मपणे केला गेला आहे. आज प्रगत राष्ट्रात बहुतांशी मानस शास्त्रज्ञ हेच शोधत आहेत. (गुन्हेगारी प्रवृत्तीचे मूळ, हिंसक प्रतिक्रिया/ व्यवहार इ.) मनुष्याच्या व्य्व्काराला कारणीभूत महत्वाचा आणि सगळ्यात मोठा drive मनच असते हे भारतीय तत्व्ज्ञान्ने समजून घेतले आणि पुनः पुनः अधोरेखित केले. मनुष्याचे निर्णय हे विचारापेक्षा बर्याचदा मन आणि मनो भावनांनी प्रभावित असतात. भारतीय ( आध्यात्मिक) तत्वज्ञानात मनुष्याचे कर्म ( आचरण/ व्यवहार) हा केंद्रबिंदू असल्यानेच मनावर संयम आणि नियंत्रणावर सर्वंकष भर दिला गेला आहे. ( आवडी निवडी मेंदू ठरवणे शक्य नाही. समजा मला गोड आवडते- गोड या चवीची जाणीव जरी जीभ( ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी ( मेंदू) करून देत असले तरी आवड मनच ठरवते. म्हणजे मला काहीही आणि कितीही गोड आवडते का? तर याचे उत्तर नाही असे असू शकेल म्हणजे मला फक्त अमुक एककिंवा काही गोड पदार्थच आवडतो/तात तसेच इतपतच गोड आवडतात, हे आवडत नाही इ.इ. प्रत्येक ज्ञानेन्द्रीयाशी निगडीत अशा अनेक हव आणि नको असलेल्या भावना मनुष्याला त्या गोष्टी परत परत करण्यास किंवा मोहात पडण्यास प्रवृत्त करतात. आणि मनुष्याचे पतन होऊ शकते किंबहुना ते अटळ असते). म्हणून मनावर संयम, नियंत्रण , यासाठी मनो निग्रह आणि चिंतन ही कामे अंतरंगाची वेगवेगळी अंगे करतात. \याला भारतीय तत्वज्ञानात अन्तःकरण चतुश्टय ( मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार) असे नाव आहे. अर्थात यासर्वांमध्ये मेंदूचा सहभाग असेलच हे पुन्हा सांगण्याची गरज नाही.

यजुर्वेदाच्या ३४व्या अध्यायात आलेले शिवसंकल्प सुक्त हेच सांगते.

सुसारथिरश्वानिव यन्मनुष्यान्नेनीयतेऽभीशुभिर्वाजिन इव
हृत्प्रतिष्ठं यदजिरं जविष्ठं तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु ।

एकदा कुशल सारथी ज्या सहजतेने अश्वांचे नियंत्रण करतो, त्याच प्रमाणे मनुष्याचे नियंत्रण करणारे, हृदयास्थित, जे जरारहित असून अत्यंत चपळ असलेले माझे मन शिव( पवित्र) संकल्पाने भरून जावो.

सतिश गावडे's picture

1 Nov 2015 - 4:57 pm | सतिश गावडे

दिर्घ प्रतिसादासाठी धन्यवाद.

मी ज्ञानाच्या बाबतीत भारतीय आणि पाश्चिमात्य असा भेदभाव करत नाही. किंबहूना एखादा विचार भारतीय आहे म्हणून तो मी टाकाऊ समजत नाही. याचे एक सुंदर उदाहरण आहे. डॉ. अल्बर्ट एलिस यांची Rational Emotive Behavior Therapy (REBT) ही भावनिक समस्यांवर एक परिणामकारक उपचारपद्धती आहे. जरा बारकाईने अभ्यास केला असता लक्षात येते की REBT आणि समर्थांचे "मनाचे श्लोक" यांची मध्यवर्ती कल्पना एकच आहे. जे डॉ. एलिस यांनी विसाव्या शतकात सांगितले ते आपल्याकडे समर्थांनी सतराव्या शतकातच सांगितले होते.

(पण म्हणून मी मनाच्या श्लोकामधील सारेच स्विकारतो असे नाही.)

मात्र आपल्या पूर्वजांनी जे म्हटले आहे ते सारेच आज कालसुसंगत असेल असेही नाही. काही हजार वर्षांपूर्वी किंवा काही शे वर्षांपूर्वीचे आकलन आजच्या उपलब्ध असलेल्या ज्ञानाच्या कसोटीवर घासून घ्यायलाच हवे या मताचा मी आहे.

आपल्या मनासंबंधीच्या मतांशी मी असहमत आहे. मात्र तुम्हाला जे वाटते ते वाटण्याला माझा आक्षेप असण्याचे कारण नाही. We agree to to disagree. :)

दत्ता जोशी's picture

1 Nov 2015 - 6:48 pm | दत्ता जोशी

<<<<<<<<काही हजार वर्षांपूर्वी किंवा काही शे वर्षांपूर्वीचे आकलन आजच्या उपलब्ध असलेल्या ज्ञानाच्या कसोटीवर घासून घ्यायलाच हवे या मताचा मी आहे. >>>>>

+१०००.

गाडगीळ एकदा एका पाश्च्यात्य देशात गेले होते.
तेथील विदेशी श्रोत्यांसमोर ते मोक्ष समाधी एनलाइटनमेंट इ. विषयांवर बोलले एक व्याख्यान दिले.
ते झाल्यावर तेथील एका व्यक्तीने त्यांना एक प्रश्न विचारला
ठीक आहे हे सर्व मला हवे आहे यासाठी मी सर्व काही करायला तयार आहे
मला एक सांगा किती दिवसात वर्षांत मला हे सर्व मोक्ष इ. प्राप्त होइल काय काय कसे कसे करावे लागेल ते सांगा ?

या वरील प्रश्नावर जी जशी प्रतीक्रीया माणुस देईल
त्यावरुन अध्यात्म व विज्ञान च्या दृष्टीकोणातील मुलभुत फरक अधोरेखीत होतो.

मूकवाचक's picture

1 Nov 2015 - 5:26 pm | मूकवाचक

याच धर्तीवर एखाद्या संगीत विद्यालयात जाउन एखाद्या व्यक्तीने प्रश्न विचारला की मला दुसरा हरिप्रसाद चौरसिया व्हायचे आहे आणि त्यासाठी मी सर्व काही करायला तयार आहे ...

काय प्रतिक्रिया येईल?

प्यारे१'s picture

1 Nov 2015 - 5:41 pm | प्यारे१

या शतकी धाग्यासाठी य ना वालावलकर आणि इतर सगळ्या वैज्ञानिक आध्यात्मिक सरांना काय भेट द्यावं ब्रं?

यनावाला's picture

1 Nov 2015 - 10:21 pm | यनावाला

श्री. दत्ताजी जोशी विचारतातः मन म्हणजे काय ? ते कोठे असते ? बुद्धी म्हणजे काय ? या शंकांच्या निरसनाचा प्रयत्‍न:

..
मन आणि बुद्धी
मनाविषयीं माझी समजूत अशी आहे:
व्यक्तीला दु:ख झाले की ती उदास होते. प्रसंगी रडते. आनंद झाला की ती उत्साहित होते. कधी हसते. गर्व झाला की उन्मत्तपणे बोलते, वागते. या प्रमाणे आविष्कारातून भावना समजतात. अगदी फोनवरच्या आवाजावरूनही भावना कळू शकते. आपण विचारतो," काय विशेष. आज अगदी खुषीत दिसताय!."आनंद, दु:ख, प्रेम, राग लोभ, मत्सर, इत्यादि भावना आहेत. श्रद्धा ही सुद्धा एक भावना आहे. सर्व भावनांच्या समुच्चयाला मन असे नाव आहे. मन अमूर्त आहे. सर्व भावनांचे उगमस्थान मेंदू आहे. तसेच बुद्धीसुद्धा मेंदूतच उद्भवते.
बुद्धीविषयीं :-
मानवी मेंदू हे अब्जावधी मज्जापेशींपासून बनलेले, अत्यंत गुंतागुंतीचे, व्यामिश्र असे विद्युत-रासायनिक ( इलेक्ट्रो-केमिकल ) यंत्र आहे. मेंदूच्या अनेक क्षमता आहेत. त्यांतील जिज्ञासा, निरीक्षणशक्ती, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, अपोहन (निरीक्षणांवरून तर्कसुसंगत निष्कर्ष काढण्याची क्षमता ), प्रतिभाशक्ती, अंत:स्फुरणशक्ती, आणि विवेकशक्ती या क्षमतांचा समुच्चय म्हणजे मानवी बुद्धी होय. म्हणजे बुद्धीची नऊ अंगे-- नऊ घटक-- आहेत. सर्वसामान्यपणे प्रत्येक माणसात यांतील पहिल्या सहा क्षमता कमी-अधिक प्रमाणात असतात. प्रतिभा, अंत:स्फुरण, आणि विवेक या क्षमता प्रत्येक व्यक्तीत असतीलच असे नाही. मतिमंद व्यक्तीत स्मरणशक्ती आणि कल्पनाशकी हे घटक अल्प प्रमाणात असतात. क्वचित् अत्यल्प प्रमाणात तर्कशक्ती असू शकेल.

मांत्रिक's picture

1 Nov 2015 - 10:41 pm | मांत्रिक

हे सर्व गुंतागुंतीचं यंत्र कुठून आलं याबद्दल काही मत? आजचे वैज्ञानिक याविषयी ठामपणे काहीच का सांगू शकत नाहीत?

संदीप डांगे's picture

1 Nov 2015 - 11:11 pm | संदीप डांगे

मांत्रिकजी,

प्रश्नाचा रोख तयार उत्तराच्या अपेक्षेने असल्यास मुद्द्यात दम राहत नाही. उदाहरणार्थ "कुठून आलं" हे शब्द कुठून तरी अज्ञात ठिकाणाहून आलं असलं पाहिजे ह्याकडे रोख करतात. मग "कुठून आलं" हा प्रश्न आपसूक येतो. "वस्तू आहे म्हणजे निर्माता आहेच" ह्या गृहितकावर "कोणी निर्माण केलं" हा प्रश्न आपसूक येतो. प्रश्नच चुकीच्या गृहितकांवर आधारित असतील तर उत्तरे मिळणार नाहीत. फक्त निरर्थक अहंकाराचे वाद होतील.

या विश्वात कोणतीही गोष्ट कुठूनही येत नाही. ती इथेच आहे, ती सतत बदलत असते, विज्ञान आणि अध्यात्म दोघेही हीच गोष्ट शोधण्याचा व सांगण्याचा प्रयत्न करतात. आपल्या वाटीत पडणारं चमचाभर तूप "कुठून येतं, कोण बनवतं" हे प्रश्न उत्तरांवर आधारित आहेत. म्हणुन ते व्यक्तिसापेक्ष, दृष्टिकोनसापेक्ष आहेत. "तूप कसं बनतं" हा प्रश्न म्हणजे विज्ञान व अध्यात्म आहे. तूप ही अवस्था आहे, लोण्याची. लोणी दह्याची, दही दुधाची, दुध चार्‍याची, चारा धरती+प्रकाश+ हवा+ पाणी यांची. हे तूप परत तिकडेच जाऊन मिळणार, त्याच हवेत, पाण्यात, जमिनीत, त्याचा प्रकाशही होईल. कशाचेही मूळ स्वरुप नसते. जे आहे ते सतत बदलत आहे. हे सतत बदल का व कसे होतात हे शोधणे विज्ञानाचे काम तर हे बदल आत्मसात करणे हे अध्यात्माचे काम. बाकी देव, इश्वर, परमात्मा, जगन्नियंता, निर्माता वैगेरे आपल्या मनुष्याच्या कल्पनेच्या भरार्‍या.

माझ्या आधीच्या एका धाग्यात मी हेच मत मांडलं होतं की विज्ञान आणि अध्यात्म एकच आहे. लोक दोन्हीत गफलत करतात. विज्ञान आणि तंत्रज्ञान एकच समजतात. अध्यात्म आणि धर्म-कर्म-पूजा-उपचार-श्रद्धा एक समजतात. बरेच आदिवासी वर्षानुवर्षे काही विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करत असतील, त्यांना पेपर वैगेरे लिहून-प्रसिद्ध करून त्यामागचे विज्ञान उकलता येत नसेल. इथे लाखो-अब्जो लोक मोबाइल वापरतात पण कितींना त्यामागचे विज्ञान ठावूक असते? लाखो-अब्जो लोक पुजा-अर्चा-कर्मकांड करतात, पण खरे अध्यात्म कितींना कळते? मुळात कर्मकांडात अध्यात्म नाहीच हेदेखील कितींना कळते?

जगात घडणार्‍या समस्त उलाढालींचा परस्पर संबंध शोधणे हे दोहोंचे उद्देश्य आहे. विज्ञान बाहेरून आत येते, अध्यात्म आतून बाहेर जाते. अजुन बरेच लिहण्यासारखे आहे. असो.

प्रगोंनी जो मुद्दा उपस्थित केला आहे त्याला सहमती आहेच. विज्ञानवादी लोकांना अध्यात्म तर सोडा, विज्ञान तरी माहीत आहे का? तंत्रज्ञानाला विज्ञान असे संबोधुन, कर्मकांडाला अध्यात्म असे संबोधुन निरर्थक वादाचा, श्रेष्ठ-कनिष्ठेतच्या कलगीतुर्‍याचा खेळ रंगेल मस्त पण सत्य राहील निद्रिस्त. काय म्हणता...?

कुठुन आलं ? सांगता येत नाही मग बघा .... अस अस अस
ही एक अध्यात्मिक बाजुने मांडली जाणारी काहीशी मजेदार भुमिका आहे.
एक अखिल विश्वात काही समजा चार गोष्टी आहेत नक्कीच की ज्या अजुन आपल्या आकलनाच्या पुर्ण स्पष्टीकरणाच्या आवाक्यात आलेल्या नाहीत. अस म्हणूया की अनसॉल्व्ह्ड पझल्स आहेत.
पण या साध्या सत्यापेक्षा अती महत्वाचा आहे तो त्याकडे बघण्याचा दृष्टीकोण
एक वैज्ञानिक त्याकडे एक सुंदर मिस्टरी एक कुतुहल म्हणून बघतो. त्यात एक पोटेंशियल त्याला दिसतं. त्याचा तो वेध घेण्याचा एका विशीष्ट शिस्तीत प्रयत्न करतो.
आध्यात्मिक व्यक्ती एकदम निष्कर्षांवर उडी मारुन शोध प्रक्रीया च थांबवावी काहीतरी मानुन मोकळ व्हाव या शैलीत पुढे सरकतो. पुढचं अनसॉल्व्ड म्हणून मग आता आपापला वैयक्तीक निष्कर्षांचा इंडीव्हीज्युअल सबेज्क्टीव्ह ट्रुथ्स चा प्रसार करण्याकडे आध्यात्मिकाचा कल असतो. विचीत्र आग्रह आक्रमकता आदि अनेक बाबी त्यातुन जन्म घेतात.
दोन्हींचा अनसॉल्व्हड मिस्टरी कडे पाहण्याचा दृष्टीकोण हा फरकाचा एक अत्यंत महत्वपुर्ण मुद्दा आहे.

कुठुन आलं ? सांगता येत नाही मग बघा .... अस अस अस
ही एक अध्यात्मिक बाजुने मांडली जाणारी काहीशी मजेदार भुमिका आहे.
एक अखिल विश्वात काही समजा चार गोष्टी आहेत नक्कीच की ज्या अजुन आपल्या आकलनाच्या पुर्ण स्पष्टीकरणाच्या आवाक्यात आलेल्या नाहीत. अस म्हणूया की अनसॉल्व्ह्ड पझल्स आहेत.
पण या साध्या सत्यापेक्षा अती महत्वाचा आहे तो त्याकडे बघण्याचा दृष्टीकोण
एक वैज्ञानिक त्याकडे एक सुंदर मिस्टरी एक कुतुहल म्हणून बघतो. त्यात एक पोटेंशियल त्याला दिसतं. त्याचा तो वेध घेण्याचा एका विशीष्ट शिस्तीत प्रयत्न करतो.
आध्यात्मिक व्यक्ती एकदम निष्कर्षांवर उडी मारुन शोध प्रक्रीया च थांबवावी काहीतरी मानुन मोकळ व्हाव या शैलीत पुढे सरकतो. पुढचं अनसॉल्व्ड म्हणून मग आता आपापला वैयक्तीक निष्कर्षांचा इंडीव्हीज्युअल सबेज्क्टीव्ह ट्रुथ्स चा प्रसार करण्याकडे आध्यात्मिकाचा कल असतो. विचीत्र आग्रह आक्रमकता आदि अनेक बाबी त्यातुन जन्म घेतात.
दोन्हींचा अनसॉल्व्हड मिस्टरी कडे पाहण्याचा दृष्टीकोण हा फरकाचा एक अत्यंत महत्वपुर्ण मुद्दा आहे.

दत्ता जोशी's picture

3 Nov 2015 - 12:35 am | दत्ता जोशी

या विश्वात कोणतीही गोष्ट कुठूनही येत नाही. ती इथेच आहे, ती सतत बदलत असते, विज्ञान आणि अध्यात्म दोघेही हीच गोष्ट शोधण्याचा व सांगण्याचा प्रयत्न करतात. आपल्या वाटीत पडणारं चमचाभर तूप "कुठून येतं, कोण बनवतं" हे प्रश्न उत्तरांवर आधारित आहेत. म्हणुन ते व्यक्तिसापेक्ष, दृष्टिकोनसापेक्ष आहेत. "तूप कसं बनतं" हा प्रश्न म्हणजे विज्ञान व अध्यात्म आहे. तूप ही अवस्था आहे, लोण्याची. लोणी दह्याची, दही दुधाची, दुध चार्‍याची, चारा धरती+प्रकाश+ हवा+ पाणी यांची. हे तूप परत तिकडेच जाऊन मिळणार, त्याच हवेत, पाण्यात, जमिनीत, त्याचा प्रकाशही होईल. कशाचेही मूळ स्वरुप नसते. जे आहे ते सतत बदलत आहे. हे सतत बदल का व कसे होतात हे शोधणे विज्ञानाचे काम तर हे बदल आत्मसात करणे हे अध्यात्माचे काम.

१. तेच तर धागाकर्ते म्हणत आहेत. तूप बने पर्यंत दुधाची जी स्थित्यंतरे आहेत ती सिद्ध ( proven ) आहेत. measurable आहेत, या स्थित्यांतारामागे काही निसर्ग नियम आहेत. विशिष्ट ज्ञान आणि कृती आहे ( विज्ञान) . तसे अध्यात्माचे नाही. आत्मा ( मनो) ,पुनर्जन्म ( संसार), मोक्ष ( निब्बाण) या गोष्टींना विज्ञानात थारा नाही. तूप होतेच असे कसे म्हणता येईल? दुधापासून तूप बनविण्याची कृती अनेक लोकांच्या संशोधनातून/ प्रयत्नातून आली असेल ना? जर ती मला माहिती आहे तर मी संगीत्ल्क्या नंतर कोणी दुसराही तूप बनवू शकेल ना?

२. याच अनुषंगाने मांत्रिक भौंचा प्रश्न असा आहे कि तूप बनवणे हि कृती जरी सिद्ध असली तरी, गायीच्या शरीरात दुध कसे बनते? त्या दुधाचे दही- लोणी- तूप कसे बनते? हे निसर्ग नियम कोठून आले? कोणी ठरवले ? इलेक्ट्रो_केमिकल यंत्र कसे अस्तित्वात आले? विज्ञानाच्या कक्षेत असे यंत्र बनवता येवू शकेल काय? जर असा यांत्रिक मेंदू बनवणे शक्य असेल ( आहेच) तर ज्या नैसर्गिक मेंदूने हे यंत्र बनविले तो मेंदू बनविणारा निसर्ग कोठून आला? त्यालाही काही निर्मिती प्रक्रिया असेल ना? विज्ञानाच्या मते हि निर्मिती प्रक्रिया म्हणजे बिग बँग आणि उत्क्रांती. तुमची थियरी ( आधीपासून होते) विज्ञानाच्या आणि एकूणच सर्वच विश्व निर्मिती संकल्पना दुर्लक्षित करते. जर सगळेच आधी पासून होते तर ते तसेच किवा बदलाने पुढे राहणार आहे मग कशाचाही विचार करण्याची गरज काय?
आध्यात्मिक मनुष्याचा हा प्रश्न असतो कि हे इलेक्ट्रो-केमिकल यंत्र बनवणारे आणि चालवणारे चैतन्य कोठून येते? अशी कोणती गोष्ट आहे कि जी गोष्ट यातून वजा केली तर हे इलेक्ट्रो-केमिकल यंत्र निर्जीव होईल ( with all ideal physical conditions )? आयुष्य म्हणजे फक्त शरीरात होणार्या रासायनिक प्रक्रिया -बदलांचा खेळ असेल तर मग झोंबी किंवा यंत्रमानव आणि मानव यांच्यात फरक काय? अशा रास्यानिक प्रक्रिया आणि बदलातून साकारणारे मानवी आयुष्य जर भय, निद्रा, आहार आणि मैथुन इतक्याच त्रिज्येत फिरून संपणार असेल तर इतर जीव जंतू आणि मनुष्य यात फरक तो काय?

सतिश गावडे's picture

3 Nov 2015 - 1:00 am | सतिश गावडे

अशा रास्यानिक प्रक्रिया आणि बदलातून साकारणारे मानवी आयुष्य जर भय, निद्रा, आहार आणि मैथुन इतक्याच त्रिज्येत फिरून संपणार असेल तर इतर जीव जंतू आणि मनुष्य यात फरक तो काय?

या संबंधी मी वाचलेले दोन परिच्छेद इथे देतो. कदाचित या उतार्‍यांमध्ये तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

लेखक युवल नोआ हरारी आपल्या "सॅपियन्स" या पुस्तकात "Know Thyself" या मथळ्याखाली लिहितो,

...So our medieval ancestors were happy because they found meaning to life in collective delusions about the afterlife? Yes. As long as nobody punctured their fantasies, why shouldn’t they? As far as we can tell, from a purely scientific viewpoint, human life has absolutely no meaning. Humans are the outcome of blind evolutionary processes that operate without goal or purpose. Our actions are not part of some divine cosmic plan, and if planet Earth were to blow up tomorrow morning, the universe would probably keep going about its business as usual. As far as we can tell at this point, human subjectivity would not be missed. Hence any meaning that people ascribe to their lives is just a delusion. The other-worldly meanings medieval people found in their lives were no more deluded than the modern humanist, nationalist and capitalist meanings modern people find. The scientist who says her life is meaningful because she increases the store of human knowledge, the soldier who declares that his life is meaningful because he fights to defend his homeland, and the entrepreneur who finds meaning in building a new company are no less delusional than their medieval counterparts who found meaning in reading scriptures, going on a crusade or building a new cathedral.

So perhaps happiness is synchronising one’s personal delusions of meaning with the prevailing collective delusions. As long as my personal narrative is in line with the narratives of the people around me, I can convince myself that my life is meaningful, and find happiness in that conviction.

आधी निरिश्वरवादी असलेली आणि नंतर सश्रद्ध झालेली जेनिफर फुलवायलर If Atheism Is True, Does Life Still Have Meaning? मध्ये लिहिते,

If everything that we call heroism and glory, and all the significance of all great human achievements, can be reduced to some neurons firing in the human brain, then it’s all destined to be extinguished at death. And considering that the entire span of homo sapiens’ existence on earth wouldn’t even amount to a blip on the radar screen of a 5-billion-year-old universe, it seemed silly to pretend like the 60-odd-year life of some random organism on one of trillions of planets was something special. (I was a blast at parties.) By simply living my life, I felt like I was living a lie. I acknowledged the truth that life was meaningless, and yet I kept acting as if my own life had meaning, as if all the hope and love and joy I’d experienced was something real, something more than a mirage produced by the chemicals in my brain.

बहूधा हा परिच्छेद तिने निरिश्वरवादी असताना लिहिला असावा :)

विलासराव's picture

4 Nov 2015 - 10:34 am | विलासराव

सगा लेखक युवल नोआ हरारी हे विपशयना टीचर आहेत. ते सध्या इतपुरीला ६० दिवसांच्या विपशयना शिबिराला बसलेले आहेत. तुम्हाला इच्छा असेल तर १४ डिसेम्बरला मला फ़ोन करा. तुम्हाला त्यांच्याशी बोलता येईल.

दत्ता जोशी's picture

4 Nov 2015 - 3:37 pm | दत्ता जोशी

धन्यवाद सतीशराव,
पण दोन्ही उतारे तेच सांगता आहेत. ज्याला सर्वसामान्यपणे आनंदी, अर्थपूर्ण आयुष्य म्हटले जाते ते वास्तविकपणे तसे नसते ( dilusion ).
एकूण लिखाण पाहता, मला वाटतं ..So our medieval ancestors were happy because they found meaning to life in collective delusions about the afterlife हे लेखकाने इस्लाम आणि क्रिश्चन धर्मात असलेल्या इटर्नल हेवन किंवा इटर्नल हेल विषयी असावं.

संदीप डांगे's picture

4 Nov 2015 - 2:00 am | संदीप डांगे

अध्यात्मासोबत वा विज्ञानासोबत जे नेहमी होत आलंय तेच इथेही परत झालंच. तूप हे एक अविरत बदलाचं म्हणून उदाहरण दिलंय. तुम्ही तूपाची निर्मिती करणारे, कृती, नियम वैगेरे बघत आहात. विशिष्ट ज्ञान व कृती म्हणजेच विज्ञान नसते. इथे प्रश्न तूपाचा नाहीये. पंचमहाभूतांच्या, मूलकणांच्या प्रवासाचा, स्थित्यंतराचा आहे. तूपाच्या ठिकाणी दुसरं काहीही घ्या. दूधच घ्या. गायीने चारा खाल्ला, दूध दिलं, दूध तान्ह्याबाळाने प्यायलं, त्याच्या शि-शूतून ते परत जमीनीला मिळालं. कुठलीही एक घटना घ्या. त्याला कार्यकारणभाव असतो. हजारो लाखो कारणं असतात. हजारो लाखो पैलू असतात. हजारो लाखो बिंदू एकमेकांशी जोडत ती घटना घडते. अशा हजारो लाखो घटना घडत असतात. ह्यामागचं तत्त्व शोधणे म्हणजेच अध्यात्म व विज्ञान.

आखून दिलेल्या नियमांबरहुकूम एखादी वस्तू बनवणे हे तंत्र आहे, विज्ञान नाही. तूप बनवायचे तंत्र विकसित झाले. पण ते का बनवायचे, का वापरायचे, त्याचे उपयोगाचे परिणाम हे जे ज्ञान आहे ते विज्ञान. विज्ञान हरवलं तर तंत्रज्ञानाला अर्थ राहत नाही. हे परत तूपाचेच उदाहरण घेऊन सांगतो. जेव्हा केव्हा तूपाचा शोध लागला तेव्हा गायी, चारा, हवा-पाणी यांची परिस्थिती आजच्या परिस्थितीच्या अगदी विपरित होती. ज्या पद्धतीने तेव्हा गायीच्या दूधापासून तूप बनवले जात होते ती पद्धत आज फॉलो होत नाही. तेव्हा नगाला नग असे तूप डब्यांमधून मॉलमधे विक्रिस येते. आपण विकत घेतो, वापरतो. त्या ऋषी-मुनिंना ज्या दर्जाचे तूप मिळाले त्याच दर्जाचे आज मिळणे दुरापास्त आहे. त्यामुळे त्यांना जे फायदे-परिणाम मिळायचे ते मिळणेही दुरापास्त आहे. त्याकाळातल्या परिणामांच्या कथा ऐकून आज आपण मॉलमधून तूप आणतो. त्यांना तूपाने फायदा झाला तो आपणांसही होइल असा विश्वास ठेवतो. म्हणजे आपण विज्ञान विसरून कर्मकांडात (तंत्रज्ञानात) गुंततो. अध्यात्माचेही तेच आहे. ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत, येशूपासून बुद्धांपर्यंत आणि त्यांच्यासारख्या असंख्य महात्म्यांनी घसा कोकलून कोकलून जे सांगितलं ते उपलब्ध जनतेपैकी किती लोकांनी आत्मसात केलं? ज्या कोणा तुटपुंजा लोकांनी केलं त्यांनी मिळवलं, इतरांना ते कष्ट सहन झाले नाहीत त्यांनी फक्त करण्याचे अवडंबर केले. कठोर तपश्चर्या टाळण्यासाठी पुजा-कर्म-कांडं शोधून काढली. तंत्र विकसित झालं पण अध्यात्मातलं खरं विज्ञान मागेच राहिलं.


विज्ञानाच्या मते हि निर्मिती प्रक्रिया म्हणजे बिग बँग आणि उत्क्रांती. तुमची थियरी ( आधीपासून होते) विज्ञानाच्या आणि एकूणच सर्वच विश्व निर्मिती संकल्पना दुर्लक्षित करते. जर सगळेच आधी पासून होते तर ते तसेच किवा बदलाने पुढे राहणार आहे मग कशाचाही विचार करण्याची गरज काय?

आधुनिक विज्ञान हे फक्त अनुमानावर आधारित थेयरी मांडते, तेच संपूर्ण सत्य आहे हे कधीच मान्य करत नाही. बिग बँगबद्दलचं विज्ञानाचं नवं मत : No Big Bang? Quantum equation predicts universe has no beginning क्वांटम मेकॅनिक्सबद्दलच्या संशोधनांनी प्रचलित सर्वमान्य भौतिकी नियमांना जबरा फटका दिला होता हे आपणास माहित असेलच. त्यामुळे विज्ञान आज एक म्हणतं, उद्या एक म्हणतं तरी त्याच्या "असा अनुमान आहे बुवा की...." ह्या भूमिकेला परमसत्य मानणे हे अंधविश्वासाचे लक्षण आहे.

दुसरा मुद्दा असा की सगळेच आधीपासून होते असे मी किंवा अध्यात्म कधीच म्हणत नाही. हे विश्व अनादि-अनंत आहे. जे आज आहे ते काल नव्हते, ते उद्या नसणार. जे सतत बदलत आहे त्याला धरून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्नच मनुष्यजन्मात हजारो दु:खांचे कारण बनतो. तो प्रयत्न सोडला तर परमसुख मिळतंच. पण ते सोडणं एवढं सहज नसतं. त्यासाठी विश्वाचा पसारा कसा सतत बदलत आहे ह्याचा अनुभव घ्यावा लागतो. एका क्षणाच्या लाखो तुकड्यांमधे सुद्धा आपलं शरीर एकसारखे राहिलो नाही हे जेव्हा जाणवतं तेव्हा खर्‍या अर्थाने मोक्षाची सुरुवात होते. त्याचाच विचार करायची गरज आहे. आता सामान्य मंडळींनी मोक्ष म्हणजे काय ह्याचा आपआपला अर्थ लावला आहे तो भाग वेगळा.

आध्यात्मिक मनुष्याचा हा प्रश्न असतो कि हे इलेक्ट्रो-केमिकल यंत्र बनवणारे आणि चालवणारे चैतन्य कोठून येते?
वरील विधान अनेको पुर्वग्रहांचा समुच्चय असल्याने उत्तर कठिण आहे. प्रथम आध्यात्मिक मनुष्य म्हणजे कोण? मनुष्याचे शरिर म्हणजे एक इलेक्ट्रो-केमिकल यंत्र आहे म्हणजे नेमकं काय? चैतन्य कशाला म्हणायचे? कोठून येते म्हणजेच कोठुनतरी येत असलेच पाहिजे याचा पुर्वग्रहातून काढलेला अनुमान.

अध्यात्मिक मनुष्यास सांगू इच्छितो की हे यंत्र सेपरेट -वेगळे समजणे यातच सगळी गोम आहे. जेव्हा तुम्ही-आम्ही समुद्र म्हणतो तेव्हा समुद्र म्हणजे नक्की काय असते? खळाळणार्‍या लाटा, खारं पाणी, जीवजंतू, की एकत्र सगळं? समुद्र म्हणजे हे सगळंच परत किनाराही आणि त्यावरची हवाही. समुद्र असा वेगळा नाहीच. त्यातली व्हेलही वेगळी नाही. सगळी एकच आहे. हे सगळं विश्व एकच आहे. अध्यात्मिक मनुष्यास ती लिंक शोधणे महत्त्वाचे आहे. जोवर सगळं वेगळं-वेगळं दिसत राहिल तोवर कुणी स्वतःला आध्यात्मिक म्हणू नये. लिहिण्यासारखे बरेच आहे पण इथे नको.

अशी कोणती गोष्ट आहे कि जी गोष्ट यातून वजा केली तर हे इलेक्ट्रो-केमिकल यंत्र निर्जीव होईल ( with all ideal physical conditions )?

निर्जीव-सजीव ह्या मानवी संकल्पना आहेत. एखाद्या खडकात जे मूलद्रव्य असतील ते तुमच्या माझ्या सर्वांच्या शरिरात आहेत. त्या मूलद्रव्यांधे जी आंदोलने चालू आहेत ती सर्वांच्या शरिरात चालू आहेत. कुणीही सजीव वा निर्जीव नाही. कणकणमें है भगवान उगाच म्हणत नाही. निर्जीव वाटणारी एखादी गोष्ट खाऊन मरणारा जीवंत होतो, सजीव वाटणारी खाऊन धडधाकट मरून जातो. तेव्हा अशी काय गोष्ट आहे जी सर्वांमधे वास करून आहे?

आयुष्य म्हणजे फक्त शरीरात होणार्या रासायनिक प्रक्रिया -बदलांचा खेळ असेल तर मग झोंबी किंवा यंत्रमानव आणि मानव यांच्यात फरक काय?
आयुष्य म्हणजे फक्त शरिरात होणार्‍या रासायनिक प्रक्रिया-बदलांचा खेळ नाही असे आपले मत आहे असे जाणवते. हे मत पक्के असेल तर याशिवायही असे काही आहे ज्यावर आपण विश्वास ठेवता असे जाणवते. पण याशिवाय काहीही नाही हे मान्य करणे अवघड जात असेल तर अध्यात्माचा प्रवासही अवघड होईल. किंबहुना होतोच. कारण ध्येय आधीच स्पष्ट केलेले आहे. ते चुकीचे आहे हे कधीच लक्षात येत नाही, कारण त्या ध्येयापर्यंत पोचणे शक्यच नाही. कुणीही पोचले नाही. पण शरिराला फक्त रासायनिक प्रक्रिया मानणारे मोक्षाच्या ध्येयापर्यंत पोचलेत. कारण त्यांनीच जाणले की झोंबी, यंत्रमानव वा जिवंत मानव यात काहीच फरक नाही.

अशा रास्यानिक प्रक्रिया आणि बदलातून साकारणारे मानवी आयुष्य जर भय, निद्रा, आहार आणि मैथुन इतक्याच त्रिज्येत फिरून संपणार असेल तर इतर जीव जंतू आणि मनुष्य यात फरक तो काय?
आपण आज ज्या योनीत आहोत, ज्या जन्मात आहोत, ज्या देशात, ज्या धर्मात आहोत, त्यापेक्षा वेगळ्या जातीत, धर्मात, देशात जन्माला आलो असतो तर कसे वाटले असते याचे एक कल्पनाचित्र उभे करू शकतो. तसेच्या तसे असू शकत नाही. तस्मात् एखादा प्राणी हा मनुष्यापेक्षा कमी प्रतीचाच आहे हे मनुष्याच्या अहंकाराने मान्य केले आहे. आपणच श्रेष्ठ हा विचार जेव्हा त्यागला जाईल त्यावेळेस हे सर्व फरक नष्ट होतात. भय, निद्रा, आहार, मैथून याच्या चक्रांतूनच साधना करत मनुष्ययोनीत जीव पोचतो. जीवाला कुठल्याही योनीत मोक्ष वा सद्गती प्राप्ती होऊ शकते. अहंकारी मनुष्याला असे वाटते की फक्त मनुष्य योनीत असे घडते. सर्व पोचलेल्या लोकांच्या कथा-कहान्यांमधून असे सूचक संदर्भ उपलब्ध आहेत.

अध्यात्म हा चर्चेचा, डेमोन्स्ट्रेशनचा, वादविवादाचा विषय अजिबात नाही. तो फक्त अनुभवाचा विषय आहे. योग्य गुरुंकडून मार्गदर्शनाद्वारे आत्मसात करण्याचा मार्ग आहे. जागेअभावी, वेळेअभावी, किंवा योग्य-मती अभावी मी इथे अजून जास्त चर्चा करणे शक्य नाही. त्याबद्दल क्षमस्व. माझा वरिल प्रतिसाद अजून हजारो प्रश्नांना जन्म देऊ शकतो हे माहिती आहे. प्रश्नोत्तरे खेळणे हे एका अध्यात्मिक व्यक्तिचे साध्य कधीही असू नये म्हणून आवरत आहे. धन्यवाद!

सतिश गावडे's picture

4 Nov 2015 - 9:55 am | सतिश गावडे

अध्यात्म काय आहे आणि काय नाही यावर आपण एखादा लेख लिहू शकाल का?

संदीप डांगे's picture

4 Nov 2015 - 10:07 am | संदीप डांगे

गावडेसर, चेष्टा नका हो करू गरिबाची.

अध्यत्म लेखपाडून सांगता येत नाही. प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. हिमालयात गेल्याअवर कसे वाटते हे लेख वाचुन नव्हे तर तिथे प्रत्यक्ष जाऊनच कळते. प्रात्येकाच्या वकुबाप्रमाणे हिमालय भासतो. आध्यात्माचेही तसेच.

सतिश गावडे's picture

4 Nov 2015 - 10:32 am | सतिश गावडे

डांगेजी चेष्टा नाही हो. ती प्रामाणिक विनंती होती.

अध्यत्म लेखपाडून सांगता येत नाही. प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. हिमालयात गेल्याअवर कसे वाटते हे लेख वाचुन नव्हे तर तिथे प्रत्यक्ष जाऊनच कळते. प्रात्येकाच्या वकुबाप्रमाणे हिमालय भासतो. आध्यात्माचेही तसेच.

प्रत्यक्ष अनुभव घ्यायला हवा हे मान्य. पण कशाचा अनुभव घ्यायचा हे तर कळायला हवे ना. समजा "हे हे म्हणजे अध्यात्म" असे जरी सांगता येत नसेल तरीही काही तरि शब्दांत लिहिता येत असेल की.

उदा, देव, धर्म, कर्मकांड, पुनर्जन्म याहून अध्यात्म वेगळं आहे. :)

जीवाला कुठल्याही योनीत मोक्ष वा सद्गती प्राप्ती होऊ शकते. अहंकारी मनुष्याला असे वाटते की फक्त मनुष्य योनीत असे घडते. सर्व पोचलेल्या लोकांच्या कथा-कहान्यांमधून असे सूचक संदर्भ उपलब्ध आहेत.
डांगे साहेब, हे काही लक्षात नाही आलं. कुत्री मांजरे हे परमात्म्याचेच रूप आहे हे आध्यात्मिक औपनिषदिक सत्य १०० टक्के मान्य, पण म्हणून त्या जीवांना मोक्षप्राप्तीसाठी साधना करताना कधी बघितले नाही. आता मोक्ष प्राप्तीसाठी साधारणतः खालीलप्रकारे प्रयत्न करता येईलः
१) ज्ञान - वेद, उपनिषद, ब्राह्मण ग्रंथ यांचा अत्यंत सखोल गहन अभ्यास करुन व मग ते ज्ञान प्रत्यक्ष व्यवहारात आचरणात आणणे.
२) कर्म - मी परमात्माच आहे या भावनेने जसं आयुष्य वाट्याला आलंय ते निर्विकारपणे सुख् दु:खापासून अलिप्त राहून जगणे. या प्रकारात प्रपंचाचा त्याग अपेक्षित नाही.
३) भक्ति - फारसं सांगावं नाही लागणार. म्हणजे संत तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वर यांचा मार्ग आचरणार आणणे.
४) योग - प्रपंचाचा त्याग करुन अष्टांगयोग, ध्यान-धारणा-जप यांच्या मार्गाने साक्षात्कार गाठणे.

मग आता या ४ मार्गांत चतुष्पाद जीव कुठे व कसा बसेल. हां, पुराणांत असे काही उल्लेख आहेत, की एखाद्या तपस्वी किंवा सत्पुरुषाच्या हस्तस्पर्शाने किंवा आशीर्वादाने एखाद्या चतुष्पादाला मुक्ती मिळाली. परंतु मग त्यात त्यांचे क्रेडिट नाही.

आपणांकडे काही संदर्भ असल्यास वाचायला आवडेल.

विलासराव's picture

4 Nov 2015 - 10:48 am | विलासराव

आपण आज ज्या योनीत आहोत, ज्या जन्मात आहोत, ज्या देशात, ज्या धर्मात आहोत, त्यापेक्षा वेगळ्या जातीत, धर्मात, देशात जन्माला आलो असतो तर कसे वाटले असते याचे एक कल्पनाचित्र उभे करू शकतो. तसेच्या तसे असू शकत नाही. तस्मात् एखादा प्राणी हा मनुष्यापेक्षा कमी प्रतीचाच आहे हे मनुष्याच्या अहंकाराने मान्य केले आहे. आपणच श्रेष्ठ हा विचार जेव्हा त्यागला जाईल त्यावेळेस हे सर्व फरक नष्ट होतात. भय, निद्रा, आहार, मैथून याच्या चक्रांतूनच साधना करत मनुष्ययोनीत जीव पोचतो.जीवाला कुठल्याही योनीत मोक्ष वा सद्गती प्राप्ती होऊ शकते. अहंकारी मनुष्याला असे वाटते की फक्त मनुष्य योनीत असे घडते. सर्व पोचलेल्या लोकांच्या कथा-कहान्यांमधून असे सूचक संदर्भ उपलब्ध आहेत.

ठळक केलेल्या ओळीशी सहमत नाही. बाकी तुमचे सगळे प्रतिसाद पटले. फक्त पटलेच नाहीत तर बऱ्याच गोष्टी साधनेमुळे अनुभवालाही आल्यात.

दत्ता जोशी's picture

4 Nov 2015 - 3:40 pm | दत्ता जोशी

:-) हलके घ्या.
हळु हळू तसा मला काय म्हणायचं ते तुम्हाला समजेल आणि पटेल.

दत्ता जोशी's picture

4 Nov 2015 - 3:42 pm | दत्ता जोशी

^^^^^^^^^^ वरील प्रतिसाद संन्दीप भाऊंसाठी होता. गैरसमज नसावा.

दत्ता जोशी's picture

2 Nov 2015 - 11:40 pm | दत्ता जोशी

आपल्या वाटीत पडणारं चमचाभर तूप "कुठून येतं, कोण बनवतं" हे प्रश्न उत्तरांवर आधारित आहेत. म्हणुन ते व्यक्तिसापेक्ष, दृष्टिकोनसापेक्ष आहेत. "तूप कसं बनतं" हा प्रश्न म्हणजे विज्ञान व अध्यात्म आहे. तूप ही अवस्था आहे, लोण्याची. लोणी दह्याची, दही दुधाची, दुध चार्‍याची, चारा धरती+प्रकाश+ हवा+ पाणी यांची. हे तूप परत तिकडेच जाऊन मिळणार, त्याच हवेत, पाण्यात, जमिनीत, त्याचा प्रकाशही होईल. कशाचेही मूळ स्वरुप नसते. जे आहे ते सतत बदलत आहे. हे सतत बदल का व कसे होतात हे शोधणे विज्ञानाचे काम तर हे बदल आत्मसात करणे हे अध्यात्माचे काम.

प्यारे१'s picture

2 Nov 2015 - 11:45 pm | प्यारे१

थोड़ा वरण भात भाजी भाकरी आणा.

वदनिकवल घेता.....

दत्ता जोशी's picture

3 Nov 2015 - 12:38 am | दत्ता जोशी

थोड़ा वरण भात भाजी भाकरी आणा.

वदनिकवल घेता.....
:D :D .....बिस्मिल्लाह ...करा सुरु.

दत्ता जोशी's picture

2 Nov 2015 - 11:10 pm | दत्ता जोशी

धन्यवाद.
म्हणजे मन/ भावना आणि/ किंवा बुद्धी जर असते तर शास्त्रज्ञांना शरीरात ती कोठेच कशी सापडत नाही? मग ती आहे किंवा असते हे खात्रीपूर्वक आपण कसे सांगू शकता?

नगरीनिरंजन's picture

2 Nov 2015 - 4:55 am | नगरीनिरंजन

रचना आवडली; पण "मी म्हणजे स्वनाम" हे पटले नाही. अतिरिक्त प्रोटीन्समुळे विकसित झालेल्या मेंदूत, एकत्रित जोडलेले शरीर, डोळ्यांनी "दिसणारे" जग, मुखातून येणारा आवाज इत्यादींमुळे लॉजिकली डिड्युस झालेली कल्पना म्हणजे मी.
मी म्हणजे यापेक्षा लै भारी कै तरी असावं अशा अहंकारयुक्त भ्रमातून निर्माण झालेला शोध म्हणजे अध्यात्म. इतर सगळ्या प्राण्यांसारखेच आपणही एक आपोआप निर्माण झालेले प्राणी आहोत ही कल्पना अध्यात्मवाल्यांना सहन होत नसावी बहुतेक.

मारवा's picture

2 Nov 2015 - 5:34 am | मारवा

मी म्हणजे यापेक्षा लै भारी कै तरी असावं अशा अहंकारयुक्त भ्रमातून निर्माण झालेला शोध म्हणजे अध्यात्म. इतर सगळ्या प्राण्यांसारखेच आपणही एक आपोआप निर्माण झालेले प्राणी आहोत ही कल्पना अध्यात्मवाल्यांना सहन होत नसावी बहुतेक.

कदाचित एक जी. ए. चं विधान आहे मॅन इज द मेझर ऑफ एव्हरीथींग या कल्पनेवर
कुत्रा का चांगला तो माणसाचा वफादार आहे.
हिरवळ माणसाला नेत्रसुखद म्हणून चांगली
अस काय काय गमतीदार आहे.
इन शॉर्ट सर्व जगाकडे माणुस हीच एकमेव मोजपट्टी लाऊन बघणे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Nov 2015 - 12:03 pm | ज्ञानोबाचे पैजार

विज्ञान आणि अध्यात्म या ज्ञानाच्याच दोन शाखा आहेत असे नि:संधिग्दपणे म्हणता येईल. या दोन्हीही ज्ञान शाखांचा उद्देश मनुष्य जीवन सुखी करणे हाच आहे. विज्ञान जगाला सुखी करण्याच्या नवनविन युक्त्या बाह्य साधनांचा आधार घेउन शोधते तर अध्यात्म हे तोच शोध अंतरंगात घ्यायला शिकवते.

सध्यातरी परिस्थिती अशी आहे की दोन्ही बाजूनी ( वैज्ञानिक आणि अध्यात्मिक) घेतला जाणारा शोध असीम आणि अनंत आहे. विज्ञानाने मुलद्रव्ये शोधली, मग त्याचे अणु शोधले, मग रेणू, आता हिग्स् बोसॉन अर्थात देवकण शोधला, उद्या अजूनही पुढचे काहीतरी सापडेल. जस जसे पुढे जावे तस तसे त्या ही पुढे आणखी काहीतरी आहे याची पुन्हा पुन्हा जाणीव होत जाते. पण शोध काही थांबत नाही.

दोन्ही मार्गांवरुन चालणार्या महान व्यक्तींना अजून पुढे बरेच काही आहे याची नक्कीच जाणीव आहे. म्हणुनच जेष्ठ
तत्वज्ञानी सॉक्रेटीस असे म्हणतो की "मला इतकेच ठाउक आहे की मला काहीच ठाउक नाही". तर तीच गोष्ट सांगताना
"जीये मार्गीचा कापडी महेश अजुनी" असे ज्ञानोबाराया म्हणतो.

आपल्याला असे दिसुन येते की जस जशी विज्ञानाची प्रगती होते आहे तसतशा विज्ञानाच्या अनेक शाखांची सरमिसळ होते आहे . त्या शाखा बरेच ठिकाणी एकमेकांना पुरक असे काम करताना दिसतात. आध्यात्मात सुध्दा तसेच दिसते, अंतिम लक्ष गाठायच्या अनेक मार्गांची एकमेकात सरमिसळ झालेली पहायला मिळते. यात काहिच गैर नाही हे नैसर्गिकच आहे .

विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही शाखांनी एकाच ठिकाणापासुन शोधाला सुरुवात केली आहे दोघांचे उद्दिष्ट एकच आहे. फक्त ते गाठण्याचे मार्ग सध्यातरी भिन्न आहेत. पण मला खात्री आहे की शेवटी हे दोन्ही मार्ग सुध्दा एकमेकांना येउन मिळतीलच आणि तेव्हा मग विज्ञान आणि अध्यात्म हा भेदच रहाणार नाही.

पैजारबुवा,

चित्रगुप्त's picture

2 Nov 2015 - 12:42 pm | चित्रगुप्त

प्रत्यक्ष प्रयोगातून बाह्य विश्वाचा शोध घेणे म्हणजे विज्ञान, तर प्रत्यक्ष प्रयोगातून 'स्व' चा शोध घेणे हे अध्यात्म असे म्हणता येईल. दोन्ही 'प्रयोगा'त 'योग' आहेच. प्रत्यक्ष प्रयोगाशिवाय नुसती वांझोटी चर्चा म्हणजे वेळेचा अपव्यय.

'माझे' घर, 'माझे' वडील, 'माझा' हात, 'माझे' आरोग्य, माझे मन, माझ्या आवडीनिवडी, माझ्या भावना, या सर्वातला 'मी' काय आहे, कोण आहे, 'को हम?' ही जिज्ञासा 'स्व' चा शोध घेण्यास प्रेरित करते.

शनिमहात्म्य, सत्यनारायण कथा, स्वामी-बुवांचे तथाकथित चमत्कार, अनेक प्रकारच्या भ्रामक समजुती वगैरेंचा या दोन्हीशी काही संबंध नाही.

अध्यात्मिक अनुभूति ही कलासाधनेतून, साहित्य-कला-संगीत आस्वादातूनही गवसते. अगदी काहीही न करता शांत राहण्यातही गवसते. एकतानतेने, प्रेमाने कोणतीही कृति करतानाही गवसते.

प्रकाश घाटपांडे's picture

3 Nov 2015 - 1:49 pm | प्रकाश घाटपांडे

हा अनुभूतीच तर कळीचा मुद्दा आहे. ती व्यक्तिसापेक्ष असल्याने तसेच त्याचे हस्तांतरण होउ न शकल्याने तो गूढ प्रांत राहिला आहे.

मोगा's picture

2 Nov 2015 - 6:34 pm | मोगा

.हा देश आनि हा धर्म लग्नच न केलेल्या , लग्नातून पळालेल्या , बाय्को घेऊन वनवासात गेलेल्या , बायको सोडून वनवासात गेलेल्या , ब्रह्मचारी , नवरा किंवा बायको सोडुन फीरणारे तंबोरेवाले / तंबोरेवाल्या .... इ इ अतीत्यागवादी बोळे अडकलेल्या सख्या गटणेंनी भरलेला व भारलेला अहे.

अध्यात्माशी एकनिष्ठ रहा व विज्ञानाशीही.

.... मिपाचं लाडकं व्यक्तीमत्व .. मोगा देशपांडे.

टवाळ कार्टा's picture

2 Nov 2015 - 9:19 pm | टवाळ कार्टा

.... मिपाचं लाडकं व्यक्तीमत्व .. मोगा देशपांडे.

=))

मांत्रिक's picture

4 Nov 2015 - 4:35 am | मांत्रिक

सूफी संतांविषयी काय मत आहे दादूस?

तसचं मिपा चे पण आहेत हे आजचं कळलं.

यनावाला's picture

3 Nov 2015 - 1:55 pm | यनावाला

मन आणि बुद्धी ....@दत्ता जोशी
मनोभावनाविषयीं श्री.सतीश गावडे यांनी उत्कृष्ट वैज्ञानिक स्पष्टीकरण दिले आहे ते तुम्ही वाचलेच आहे. मला ते पटते.(प्रतिसाद ३१-१०) . या भावनांचे उगमस्थान मेंदू आहे. !."आनंद, दु:ख, प्रेम, राग लोभ, मत्सर, इत्यादि भावना आहेत. श्रद्धा हीसुद्धा एक भावना आहे. सर्व भावनांच्या समुच्चयाला मन असे नाव आहे. मन अमूर्त आहे. तेव्हा ते दिसण्याचा प्रश्न नाही. पण मनोभावनांचा आविष्कार दिसतो. भावनांचे उगमस्थान मेंदू आहे. तो मूर्त आहे. तो अर्थातच दिसतो. बुद्धीसुद्धा अमूर्तच आहे. म्हणून ती प्रत्यक्ष दिसण्याचा प्रश्न नाही.. माणसाच्या विविध कृतींतून त्याची बुद्धी व्यक्त होते.

यनावाला's picture

3 Nov 2015 - 9:34 pm | यनावाला

["...समन्वय" या पद्यरूप लेखातील कांही ओव्यांची श्री. प्रगो यांनी अभ्यासपूर्ण चिकित्सा केली आहे. त्या संदर्भात हा प्रतिसाद आहे.]
* "विज्ञानाची विश्वासार्हता । जाणते सामान्य जनता।" याचा अर्थ, " वैज्ञानिक सांगतात ते खरे असते, हे जनसामान्यांना कळते." असा स्पष्ट आहे. इस्रोने मंगलयान सोडले. ते ३००दिवसांत मंगळकक्षेत जाईल असे सांगितले. त्याप्रमाणे ६० कोटी कि.मि.अंतर ३०० दिवसांत पार करून ते पूर्वनियोजित स्थळी पोचले. नंतर मंगळाभोवती फिरू लागले. नियंत्रण पृथ्वीवरून केले. अशा अनेक प्रसंगी विज्ञान खरे ठरते. तसेच विज्ञानावर आधारित तंत्रज्ञानाने निर्माण केलेली अनेक सुविधा-साधने लोक वापरतात. त्यामुळे विज्ञान उपयोगी आहे, खरे आहे, सांगते ते करून दाखवते हे त्यांना पटते. म्हणून," "विज्ञानाची विश्वासार्हता । जाणते सामान्य जनता।" याचा अर्थ त्या सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला असा नव्हे.
*विज्ञानामुळे माणसाची आश्चर्यकारक प्रगती झाली. जीवन अधिक सुख-सुविधापूर्ण झाले. कोट्यवधींचे दु:ख कमी झाले. अनेकांचे अकाली होणारे मृत्यू टळले. वाढत्या लोकसंख्येच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य या प्राथमिक गरजा बर्‍याच प्रमाणात पुर्‍या होऊ शकल्या. मनोरंजनाची दालने घरा घरात पोचली. हे सर्व विज्ञानामुळे घडले. यात अध्यात्माचे योगदान शून्य आहे."एक शून्य मी", (पु.ल.देशपांडे), या पुस्तकातील काही सुवचने अशी:--"पूर्वी पंढरपुरच्या वारीत हजारो माणसे कॉलर्‍याने मरत असत. लाखो वारकर्‍यांनी केलेल्या विठुनामाच्या गजराने ते मृत्यू थांबले नाहीत. ते थांबवले प्रतिबंधक लस शोधणार्‍या वैज्ञानिकाने." "आपल्या देशात इतके साधु-संत जन्माला आले. त्या ऐवजी निसर्गाचे रहस्य ओळखून ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे वैज्ञानिक जन्माला आले असते तर हा देश अधिक प्रगत, अधिक सुखी झाला असता." "अ‍ॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्‍यकीय शस्त्रक्रिया वेदनारहित करणारा संशोधक मला कुठल्याही संत -महात्म्यापेक्षा अधिक मोठा वाटतो." पु.ल.नीं व्यक्त केलेल्या या अपेक्षा अध्यात्माच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. पण समाजावर शतकानुशतके प्रभुत्व गाजवणारे अध्यात्म, हिंदुधर्माला कलंकभूत ठरलेले चातुर्वर्ण्य संपवू शकले नाही. असेच आधु-संतही ते नष्ट करू शकले नाहीत. ते संपवले प्रजासत्ताक भारताच्या संविधानाने.
*साधारणपणे इ.स.५०० पासून बहुसंख्य भारतीयांनी ऐहिकाकडे पाठ फिरविली. परलोकाचा ध्यास घेतला. इहलोक (हे जग) अशाश्वत आहे, क्षणभंगुर आहे, किंबहुना खोटे आहे, जे काही खरे, चिरंतन आनंदमय आहे ते सगळे तिकडे, परलोकी. असा समज सर्वत्र पसरला. तो कथा, कीर्तने, प्रवचने, यांमुळे जनसामान्यांच्या मनात दृढ झाला. बुद्धिमंतांचे डोळे तर तिकडेच लागलेले. कारण इहलोक भ्रामक. खरे ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. बाकी सारे अज्ञान. अध्यात्मापायी अनेकांची बुद्धी, ऊर्जा, वेळ आणि पैसा या गोष्टी वाया गेल्या.
या अध्यात्मामुळे कोणता लाभ झाला? शेत नांगरण्याची पद्धत , बी बियाणे यांत काही सुधारणा झाली? धान्य उत्पादन वाढले? दळणा-कांडणाची सुलभ रीत शोधून आध्यात्मिकांनी स्त्रियांचे कष्ट कमी केले?( नांगर आणि जाते या साधनांत महाभारत काळापासून पेशवाईपर्यंत कांही सुधारणा झाली नाही असे अभ्यासक सांगतात.) वाहतुकीची साधने वाढून प्रवास सुखकर झाला? रात्रीचा अंधार दूर झाला? अध्यात्माने काय साधले ते तरी सांगावे! नीतिमत्ता वाढली म्हणता? मग भ्रष्टाचार,व्यभिचार,बालिकावरील अत्याचार यांत भारत देश अग्रगण्य कसा? अध्यात्मामुळे मन:शांती लाभते म्हणावे तर देशात मानसोपचार तज्ञांची संख्या अपुरी पडते आहे. "ब्रह्मवेत्ता न करी काम जे समाजा उपयोगी ।" असे म्हटले आहे ते या अर्थाने.
पूर्वग्रह दूर ठेवून शुद्ध बुद्धीने विचार करावा म्हणजे अध्यात्माच्या वेडामुळे गेल्या दीड हजार वर्षांत आपल्या देशाची अपरंपार हानी झाली, आपण भौतिक प्रगतीत मागे राहिलो, पारतंत्र्यात पडलो हे पटेल. "अध्यात्मामुळे अनेकांचे आत्मे ब्रह्मरूप झाले, त्यांना मोक्ष मिळाला, अक्षय चिदानंदाची प्राप्ती झाली, त्यांचे जन्म-मृत्यूचे फेरे चुकले." असल्या भ्रामक समजुतीत ज्यांना खितपत पडायचे असेल त्यांच्याविषयीं काय बोलावे?
.......................

गामा पैलवान's picture

3 Nov 2015 - 10:33 pm | गामा पैलवान

यनावाला,

तुम्ही सांगितली भारताची अधोगती अध्यात्मामुळे झाली नाही. त्यास हिंदूविरोधी राज्यकर्ते जबाबदार आहेत. आपण भारतीय शिवाजीमहाराजांची शिकवण विसरल्याची शिक्षा भोगत आहोत.

आ.न.,
-गा.पै.

सतिश गावडे's picture

3 Nov 2015 - 11:34 pm | सतिश गावडे

:)

मोगा's picture

4 Nov 2015 - 10:33 am | मोगा

आणि तरीही हिंदुविरोधी इंग्रजांचे पाय चेपायला गामा लंडनला गेलेत बरं का !

गामा पैलवान's picture

5 Nov 2015 - 12:48 am | गामा पैलवान

काहीही हं मोगा. मी इंग्लंडला हिंदुत्वाची ध्वजा उंच धरायला आलो आहे.
आ.न.,
-गा.पै.

संदीप डांगे's picture

4 Nov 2015 - 3:07 am | संदीप डांगे

आपण परिस्थितीकडे कसे, कुठल्या दृष्टिकोनातून बघतो यावर बरेच अवलंबून असते.

विज्ञानामुळे माणसाची आश्चर्यकारक प्रगती झाली. जीवन अधिक सुख-सुविधापूर्ण झाले. कोट्यवधींचे दु:ख कमी झाले. अनेकांचे अकाली होणारे मृत्यू टळले. वाढत्या लोकसंख्येच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य या प्राथमिक गरजा बर्‍याच प्रमाणात पुर्‍या होऊ शकल्या. मनोरंजनाची दालने घरा घरात पोचली. हे सर्व विज्ञानामुळे घडले. यात अध्यात्माचे योगदान शून्य आहे.

विज्ञानामुळे प्रगती झाली की अधोगती हा दृष्टिकोनाचा प्रश्न आहे. "माझे सुखात चालले आहे ना?" एवढाच प्रश्न असेल तर त्यास विज्ञान लागत नाही. विज्ञानाच्या एक एका सुखसोयीमागे लपलेल्या एक एक दुखदायी वास्तवांना दुर्लक्षित करणे हे कितपत योग्य? कोट्यावधींचे दु:ख कमी झाले हे पुराव्यानिशी सिद्ध करू शकाल? दु:ख कमी झाले नसून बदलले आहे. अकाली होणारे मृत्यू टळले तर लोकसंख्या भरमसाठ वाढली. तिच्या सगळ्या गरजा भरमसाठ वाढल्या, त्या पूर्ण करता करता नैसर्गिक साधनसंपत्तीवर प्रचंड ताण आला आहे. एक उपाय शोधता त्यावर आ वासून दुसरे प्रश्न उभे राहत आहेत. आजचे ग्राउंडब्रेकींग सोल्युशन्स उद्यासाठी खरंच ग्राउंडब्रेकींग असतील. उदा: सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स. प्रचंड प्रमाणात जमिनित जात आहेत. खाद्यपिकांसाठी उद्या ही एक गंभीर समस्या असणार आहे. महिलांना, मुलांना आज सोयीचे आहे पण पुढ्च्या पिढ्यांसाठी आपण एक मोठे डंपिंग ग्राउंड सोडून जाणार आहोत याबद्दल डायपरचा शोध लावण्याअगोदर विज्ञानाने काय विचार केला?


"अ‍ॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्‍यकीय शस्त्रक्रिया वेदनारहित करणारा संशोधक मला कुठल्याही संत -महात्म्यापेक्षा अधिक मोठा वाटतो."

माझी चप्पल शिवून देणारा चांभार मला डोईचे केस भादरनार्‍या न्हाव्यापेक्षा मोठा वाटतो. प्रत्येकाचं आपलं एक स्थान, महात्म्य असतं. उगा बैलाने दूध दिलं असतं तर किती बरं झालं असतं असं म्हणायला काय लागतं.

पु.ल.नीं व्यक्त केलेल्या या अपेक्षा अध्यात्माच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. पण समाजावर शतकानुशतके प्रभुत्व गाजवणारे अध्यात्म, हिंदुधर्माला कलंकभूत ठरलेले चातुर्वर्ण्य संपवू शकले नाही. असेच आधु-संतही ते नष्ट करू शकले नाहीत. ते संपवले प्रजासत्ताक भारताच्या संविधानाने.

बैलानं दूध द्यावं ह्या अपेक्षा बैलाच्या आवाक्याबाहेरच असणार. तुमचे वरील विधान म्हणजे चमत्कारिक स्वमतांधतेचा उत्कृष्ठ नमुना आहे. आपलं मत पटवण्यासाठी भारदस्त वाटेल असं काहीही ठोकून द्यावं?

समाजावर अध्यात्माने कधीच प्रभुत्व गाजवलेले नाही. प्रभुत्व गाजवले ते अवडंबर करणार्‍यांनी, खोटे बोलणार्‍यांनी, जनतेला उल्लू बनवणार्‍यांनी. अध्यात्म म्हणजे पुजा-कर्मकांडं हेच सर्व समाजाचे मत बनवले, (तुमचेही तसेच झाले आहे.) हिंदूधर्माला कलंकभूत ठरणारी चातुर्वर्ण्य व्यवस्था लादली माणसांनीच, पाळली माणसांनीच. भारतीय संविधानही बनवले माणसांनीच, राबवले माणसांनीच. आकाशातून तर नाही पडले की कुठल्या प्रयोगशाळेत तयार झाले. चातुर्वर्ण्य म्हणा की आणखी काही वर्गाधिष्ठित समाज असणे ही समाजाची स्वत:ची मानसिकता आहे. विज्ञानाचे डंके वाजवणार्‍या, मी मी म्हणणार्‍या पाश्चात्त्य देशांमधेही वर्णभेद कसा पाळला जातो हे आपणांस जास्त ठावूक असावे. तस्मात् माणसे जिथून तिथून सारखीच असतात. हा देश तमाशाने बिघडला नाही की किर्तनाने सुधारला नाही.

साधारणपणे इ.स.५०० पासून बहुसंख्य भारतीयांनी ऐहिकाकडे पाठ फिरविली. परलोकाचा ध्यास घेतला.
समृद्धतेतूनच वैराग्य जन्माला येतं. भारतीय समाजाने गुप्तकाळात ऐहिकसुखाची परमावधी गाठली. सर्व मिळाल्यावर पुढे अजून काही तरी मिळवायचे राहते आहे, संपूर्ण समाधान मिळत नाही. संपूर्ण समाधान हे अध्यात्मातच आहे याचा शोध लागल्यावर ऐहिकाकडे पाठ फिरवणे सूरू झाले असेल. स्वघोषित बाबा बुवांनी परलोकाचा ध्यास वैगेरे व्याकूळ जनतेच्या गळी उतरवले.

इहलोक (हे जग) अशाश्वत आहे, क्षणभंगुर आहे, किंबहुना खोटे आहे, जे काही खरे, चिरंतन आनंदमय आहे ते सगळे तिकडे, परलोकी. असा समज सर्वत्र पसरला. तो कथा, कीर्तने, प्रवचने, यांमुळे जनसामान्यांच्या मनात दृढ झाला. बुद्धिमंतांचे डोळे तर तिकडेच लागलेले. कारण इहलोक भ्रामक. खरे ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. बाकी सारे अज्ञान. अध्यात्मापायी अनेकांची बुद्धी, ऊर्जा, वेळ आणि पैसा या गोष्टी वाया गेल्या.
आपणास खरेच अध्यात्माबद्दल कणभरही माहित नाही हे वरील विधानावरून स्पष्ट होते. पोथ्या-पुराणांमधली वर्णने म्हणजे अध्यात्म असे जर वाटत असेल तर खरंच अभ्यास वाढवा. इहलोक अशाश्वत आहे, क्षणभंगुर आहे म्हणजे नक्की काय याचा अर्थ शोधा. इथेच राहून इहलोकात गुंतून न पडणे म्हणजेच परलोक सिद्ध करने, चिरंतन आनंद इथेच याच आयुष्यात मिळवता येतो हे जनतेस कधीच समजले नाही. चुकीच्या मार्गदर्शनाचे फळ अजून काय?

अध्यात्मापायी अनेकांची बुद्धी, उर्जा वेळ आणि पैसा वाया जातो ह्या गोष्टी विज्ञान विज्ञान चा जप करणार्‍या पाश्चात्त्य देशांना बहुधा कळल्या नाहीत. भारतातले अनेक अध्यात्मिक गुरु तिकडे जाउन प्रसिद्ध झालेत ते... कधी विचार करा असे का झाले. जिथे सर्व सुखं पायाशी लोळण घेतात, आयुष्यात आता काहीच मिळवायचे शिल्लक राहिले नाही तरी मनाची अशांतता दूर होत नाही. तिथे विज्ञान माघार घेतं आणि अध्यात्मच मदतीस येतं. अभागी, गरिब, भौतिक विवंचनेत अडकलेल्या मनुष्यास अध्यात्म वापरताच येत नाही. तो टाळ कुटत बसतो, प्रभुच्या कृपेची वाट पाहत. त्याला प्रभूची कृपा हवी असते दोन वेळेची भुक भागवायला, बायकोला मूल व्हायला, आईची गुडघे दुखी दूर व्हायला, बहिणीला सासरी नीट वागणूक मिळायला. पण अध्यात्म ह्यासाठी नाही हे कुणीच त्या खुळ्याला सांगत नाही. अध्यात्म ह्या सगळ्या कचाट्यातून बाहेर निघण्यासाठी आहे.


या अध्यात्मामुळे कोणता लाभ झाला? शेत नांगरण्याची पद्धत , बी बियाणे यांत काही सुधारणा झाली? धान्य उत्पादन वाढले? दळणा-कांडणाची सुलभ रीत शोधून आध्यात्मिकांनी स्त्रियांचे कष्ट कमी केले?( नांगर आणि जाते या साधनांत महाभारत काळापासून पेशवाईपर्यंत कांही सुधारणा झाली नाही असे अभ्यासक सांगतात.) वाहतुकीची साधने वाढून प्रवास सुखकर झाला? रात्रीचा अंधार दूर झाला?

परत तेच. बैलाकडून दूधाची अपेक्षा.

अध्यात्माने काय साधले ते तरी सांगावे! नीतिमत्ता वाढली म्हणता? मग भ्रष्टाचार, व्यभिचार, बालिकावरील अत्याचार यांत भारत देश अग्रगण्य कसा? अध्यात्मामुळे मन:शांती लाभते म्हणावे तर देशात मानसोपचार तज्ञांची संख्या अपुरी पडते आहे.
बेछूट गोळीबार...? प्रथमतः एक गोष्ट स्पष्ट करतो यनावालावलकरजी. नीतीमत्ता तर विज्ञानानेही वाढत नाही. निष्पाप व निरागस शहरवासीयांवर दोन दोन अणुबॉम्ब टाकतांना नीतीमत्ता फारच उचंबळून आली होती का? भ्रष्टाचार, व्यभिचार व बालिकांवरील अत्याचार, नीतीमत्ता यात विज्ञानाने नेमके काय काम केले ते तरी सांगा.

मानसोपचार तज्ञांची गरज का वाढते आहे त्याचे कारण विज्ञान देईल काय? योग्य पद्धतीने आध्यात्मिक जीवनपद्धती आत्मसात करणार्‍यास मनःशांती लाभतेच. कर्मकांडं वा अवडंबर करणार्‍यास नाही. कितीही गॅजेट्स, कार, मोठे मोठे बंगले बाळगले तरी मनःशांती लाभत नाहीच. आधुनिक विज्ञानाने कितीही उड्या मारल्या तरी मनःशांती देणारं औषध कुठ्ल्याही प्रयोगशाळेत बनणार नाही.

तुमचा मूळ मुद्दा, अध्यात्म वर्सेस विज्ञान नसून, प्रयत्नवाद वर्सेस दैववाद हा आहे. हे आपण आधीच स्पष्ट करून घ्यायला पाहिजे होते. विज्ञानाची बाजू मांडतांना तुम्ही गरज नसतांना, माहिती नसतांना अध्यात्मावर चिखलफेक करत आहात हे आपल्या लक्षात आणून देण्याचा प्रमाद करत आहोत ह्याबद्दल क्षमस्व. कारण दैववाद म्हणजेच अध्यात्म अशी अगदी चुकीची, अवैज्ञानिक संज्ञा आपण तयार करून अज्ञानी जनतेची दिशाभूल करत आहात. हे आपले वर्तन एका विज्ञानवाद्यास शोभणारे आहे का याबद्दल आत्मचिंतन करावे. आपणास दैववादाचीच चिरफाड करायची असेल तर तीच नीट करावी, न कळणार्‍या प्रांतात घुसखोरी करून उपयोग नाही.

धन्यवाद!

अर्धवटराव's picture

4 Nov 2015 - 8:58 am | अर्धवटराव

तुम्ही 'सातच्या आत घरात' सिनेमा पाहिला आहे का?

"महाराज.. गाढवापुढे गीता वाचायला माझी काहिच हरकत नाहिए... पण गाढवं जागी हाएत का झोपलेली ते तर बघुन घ्या"
- इती मकरंद अनासपुरे.

एंजोय :)

मांत्रिक's picture

4 Nov 2015 - 10:11 am | मांत्रिक

प्रतिसाद आवडला डांगे साहेब...

मूकवाचक's picture

4 Nov 2015 - 11:14 am | मूकवाचक

+१

अर्धवटराव म्हणतात तसे गाढवं जागी हाएत का झोपलेली ते तर बघुन घ्या हे फार महत्वाचे असल्याने एकुणच किअतपत गांभीर्याने चर्चा करावी याला स्पश्ट मर्यादा आहेत. लिंबु टिंबु ना अर्धराज्य माफ हे विसरु नका. मुलांशी मुल बनुन खेळा...

आजची स्वाक्षरी :- पाहुनी विज्ञानाच्या बलाला भ्रमीष्ट झाला झाला दारु-अ-वाला दारु-अ-वाला.

दत्ता जोशी's picture

4 Nov 2015 - 2:42 pm | दत्ता जोशी

+१.

दत्ता जोशी's picture

4 Nov 2015 - 3:14 pm | दत्ता जोशी

आधुनिक विज्ञानाला दुषणे देत नाही. कारण या मार्गावरून परत फिरणे मानवाला आता अशक्य आहे. पण एक गोष्ट प्रामाणिक पाने सांगा - विज्ञान आणि तंत्रज्ञानाने अनेक सुख सुविधा निर्माण झाल्या असल्या तरी अशा प्रत्येक शोधामुळे पर्यावरणाला अत्यंत घातक दूरगामी परिणाम झालेत त्याची चर्चा विज्ञान उघडपणे करत नाही. आज जगभर जनुकीय तंत्रज्ञानाने बनवलेले अन्न घटक, रसायने आणि रासायनिक खतांपासून होणार्या दुष्परिणामां विषयी जागृती होत आहे. वाहतुकीची साधने, उर्जा निर्मिती, दूर संचार या साधनांनी जरी आज दैनंदिन जीवन व्यापून टाकले असले तरी त्याचे ( साधनांचे आणि त्यांच्या अतिवापराचे) अदृश्य आणि दूरगामी वाईट परिणाम आहेतच हे अमान्य करण्यात हशील नाही ( जरी या गोष्टी सोडून देने आजच्या युगात अशक्य असले तरी). हरित वायू उत्सर्जन, ओझोनथराची हानी, प्रदुषित हवा, पाणी, जमीन यामुळे अन्न घटकात वाढणारे शिसे, पारा, आणि इतक घातक रसायने या हाताबाहेर गेलेल्या गोष्टी नियंत्रणात आणण्यात विज्ञानाला यश येईल? विविध तंत्रज्ञानामुळे, वाढणारा किरणोत्सार मानवाचे भविष्य सुकर करत आहे कि धोकादायक? ( हे फक्त भारतासारख्या प्रगतीशील देश किंवा अप्रगत राष्ट्रांपुर्तेच मर्यादित नाही हे लक्षात घ्या)
अजून एक महत्वाची गोष्ट- जरी यामुळे सर्वसामान्यपणे मानवी जीवन सुकर झाले आहे हे मान्य करतांनाच हे सर्व तंत्रज्ञान ( दळणवळण, संरक्षण, दूर संचार, वाहन निर्मिती, अगदी वैद्यक) १००% व्यापार केंद्रित आहे हे लक्षात घ्या. ज्या व्यक्तीकडे हे विकत घेण्याची ताकत नाही त्याला यापैकी कशाचाही फायदा पोचणे शक्य नाही.
विविध अध्यामिक, धार्मिक संस्था मोफत धर्मादाय शाळा, कोलेज, दवाखाने, अन्नछत्रे चालवितात याची आपण माहिती करून घेतलेली दिसत नाही. मोठमोठे व्यावसायिक दवाखाने आज रुग्णाला दाखल करून घेताना प्रथम रुग्णाच्या आर्थिक परिस्थिती ची खात्री केल्याशिवाय दाखल करून घेत नाहीत. यात आपल्याला कोणालाच काहीच चुकीचे वाटत नाही. मग विज्ञान अशा व्यक्तीपर्यंत खरच पोचते का ?
मानसोपचारांची गरज कशामुळे वाढली आहे? अध्यात्मामुळे कि आणि कशामुळे याचा विचार व्हावा.
विज्ञानाची कास जरूर धरावी पण डोळसपणे. एकांगी विचार कधीही धोकादायक आणि विनाशकच .

दत्ता जोशी's picture

4 Nov 2015 - 2:40 pm | दत्ता जोशी

सर्व भावनांच्या समुच्चयाला मन असे नाव आहे. मन अमूर्त आहे. तेव्हा ते दिसण्याचा प्रश्न नाही. पण मनोभावनांचा आविष्कार दिसतो. भावनांचे उगमस्थान मेंदू आहे. तो मूर्त आहे. तो अर्थातच दिसतो. बुद्धीसुद्धा अमूर्तच आहे. म्हणून ती प्रत्यक्ष दिसण्याचा प्रश्न नाही.. माणसाच्या विविध कृतींतून त्याची बुद्धी व्यक्त होते.

वालावलकर सर, प्रतिसादासाठी धन्यवाद. म्हणजे मन, बुद्धी भावना या अमुर्थ गोष्टी असतात सिद्ध करता येत नाहीत हाच माझा मुद्दा होता. कोणतेही मूर्त स्वरूप नसतांना, भावना मन बुद्धी आहे किंवा यावर आपला आणि विज्ञानाचा पुर्ण विश्वास आहे आणि ते असण्याची ग्वाही देताना आपण (वैज्ञानिक सिद्धता देत येत नसल्याने ) तर्क लावता ( बुद्धी, भावना कृतीतून व्यक्त होतात). खरेतर तर्क हे तत्वज्ञानाचे अंग आहे पण विज्ञानालाही कधी कधी तर्क, गृहीतके यांचा आधार घ्यावाच लागतो. आणि आपणही त्याला नाकारत नाही याचे करण अगदी सोपे आहे ते म्हणजे स्वानुभव. भावना, बुद्धी, विचार, मन ( व्याख्या काहीही करा) इ. मनुष्याच्या व्यक्तिमत्वाची महत्वाची अंगे अमूर्त, अदृश्य असली तरी आपण कोणीही त्या नाकारू शकत नाही कारण या गोष्टी अनुभव सिद्ध आहेत. विज्ञान सिद्ध नाहीत. मग जर तत्वज्ञानाने काही अमूर्त गोष्टी तर्काच्या आधारे मांडल्या तर त्या विज्ञान कसोटीवर सिद्ध करा म्हणणे सयुक्तिक होणार नाही. कोणत्याही रासायनिक बदल/ प्रक्रिया/ प्रतिक्रिया शरीरात घडत असल्या तरी जीव ज्यामुळे जिवंत असतो ते चैतन्य ( तुम्ही काहीही नाव द्या) नाकारण्यात मला तरी काहीच अर्थ दिसत नाही. विज्ञानाचे सगळे सिद्धांत आपण वाचतो आणि विश्वास ठेवतो. सगळे सिद्धांत आपण प्रयोगशाळेत सिद्ध करून मग विश्वास ठेवत नाही. त्याच प्रमाणे अध्यात्मिक मनुष्य काही तात्त्विक सिद्धांतांवर विश्वास ठेवतो. मग अशा व्यक्तीला अडाणी का म्हणावे?
इथे असलेल्या कोणालाही अद्वैत ज्ञान, मुक्ती यांचा प्रत्यक्ष अनुभव नाही/ नसावे ( किमान मला तरी नाही) पण कोणीतरी हे अनुभव घेतले आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून पुढे जावे लागते. कारण असे अनुभव भौतिक शारीरिक अनुभवांच्या पलीकडचे असतात. जेव्हा तुकाराम महाराज या अद्वैतानुभावाचे वर्णन त्यांच्या अभंगात करतात-

अणु रेणूया थोकटा तुका आकाशाएवढा
गिळूनी सांडिले कलेवर,
भव भ्रमाचा आकार ( माया)
सांडूनी त्रिपुटी दीप उजळला घटी, ( अद्वैत)

इथे तुकोबारायांनी हे सांगितले त्यावर का विश्वास ठेवावा? याला तर्क आहे कि असे खोटे सांगण्यामागे तुकोबारायांचा काहीच वैयक्तिक स्वार्थ नसावा. ( नाहीच). शेवटी स्वतः तुकाराम बुवाच सांगतात-
तुका म्हणे आता, उरलो उपकारापुरता.
( अवांतर : इथल्या शब्दांची रचना- अणु रेणू सुमारे ४०० वर्षापूर्वी झाली आहे यावर थोडा अभ्यास करायचा आहे कोणी केला असल्यास कृपया माहिती देणे.)