शत्रूच्या गोळ्यांनी
शहीद सैनिक किती.
ओघळणाऱ्या रक्ताची
किंमत शाई पेक्षा कमी.
कसुरी नागाने
विष ओकले किती.
दही -दुधाच्या नवैद्य
आनंदी दाखविला जी.
शिवबाची लेकुरो हो
कशाला करता राडा.
गुलाम संगीत ऐकुनी
ताल धरा हो त्यावरी.
एका गालावर चापटी
दुसरा गाल पुढती.
नागाला दुध पाजण्याची
आहे आपली रिती.
प्रतिक्रिया
25 Oct 2015 - 1:28 pm | अनुप ढेरे
नाही पटलं. पाकिस्तानशी क्रिकेट न खेळणं समजू शकतो. पण गुलाम अलींचा कार्यक्रम किंवा पुस्तक प्रकाशनावर बंदी हा मूर्खपणा आहे.
25 Oct 2015 - 2:28 pm | दमामि
गुलाम अलींच्या गायनाचा भोक्ता मी पण आहे. पण स्वत: जगजित सांग यांनी एकदा याबद्दल उत्तर दिले होते. लिंक शोधून पोस्ट करतो.
25 Oct 2015 - 3:04 pm | कानडाऊ योगेशु
मला ही ह्या संदर्भात काहीसे वाचल्यासारखे आठवते आहे. कोण म्हणाले होते ते आता आठवत नाही पण मुद्दा असा होता कि जेव्हा हे कलाकार भारतात येतात पैसे/नावलौकिक वगैरे मिळवतात व परत जातात तेव्हा पाकिस्तानात गेल्यावर त्या कलाकारांकडुन तेथील सरकारवर भारतासोबत संबंध नीट करावेत अश्या प्र्कारचा दबाव आणणे अशी अपेक्षा भारतातल्या लोकांनी धरली तर त्यात चुकीचे असे काहीच नाही.परंतु ही मंडळी ( सगळीच नाहीत काही अपवाद असावेत) तिकडे गेल्यावर पून्हा तिथल्या राजकारण्यांची भाषा बोलायला लागतात. असे जर असेल तर असले कलाकार काय कामाचे?
असा प्र्कार शाहीद आफ्रिदीने केला होता. इथला मनसोक्त पाहुणचार वगैरे उपभोगल्यानंतर तिकडे गेल्यावर लगेचच विमानतळावर पत्र्कारांशी बोलताना "हिंदुस्थानीयोंको दिल बडे नही होते" अशी गरळ ओकली होती.
25 Oct 2015 - 7:49 pm | अनुप ढेरे
केवळ स्वतःचा फायदा करून जातात याच्याशी असहमत. गुलाम अली इथल्या लोकांना भरपूर आनंद देउन जातात.
25 Oct 2015 - 8:11 pm | बाप्पू
खरच कठीण आहे. ....
तुम्ही आणि तुमच्यासारख्या लोकांनी पाकिस्तान मध्ये जाउन त्यांच्या संगीताचा आनंद घ्यावा.
आम्हाला गरज नाहीए. आम्हाला भारतातील संगीत कार आणि गायकांचा कार्यक्रम ऐकून समाधान मिळते.
त्यांना त्यांच्या देशात दहशतवादामुळे पैसा व लोकप्रियता कमावता येत नाही. त्यामुळे इथे येऊन आपले खिसे भरण्याचा प्रयत्न करतात.
अश्या भिकरड्या लोकांना मिळेल तिथे फोडून काढले पाहिजे.
25 Oct 2015 - 8:21 pm | द-बाहुबली
हम्म.. एक देश आहे जो अधिकृत परवानगी देउन एका भारतात आनंदासाठी पाठवतो तर दुसर्याला अनाधिकृत परवानगी देउ प्रचंड दुख्खासाठी भारतात पाठवतो मग आता सांगा त्या देशाच्या अशाप्रकारे लोक भारतात पाठवायच्या धोरणाबद्दल आपण कसे असले पाहिजे ?
25 Oct 2015 - 8:18 pm | बाप्पू
भाउ. तुम्ही कृपया पाकिस्तान मध्ये जओनच त्यांचा पुस्तक प्रकाशन आणि गाण्याची मैफिल अटेंड करून या.
आणि हो येताना जिवंत या.. आणि स्वता:चा सुंता न करता या म्हणजे मिळ्वले.
- पाकिस्तान मधील हिंदूंचे ज़िवन ( ??) पाहिलेला बाप्पू
25 Oct 2015 - 8:41 pm | काळा पहाड
आहोत आम्ही मूर्ख असं समजा मग. पण कसूरीचं पुस्तक पब्लिश करण्यासाठी भाजप नं जो आटापिटा केला त्यामुळे पुढच्या निवडणुकीत त्यांचं मत कटाप.
25 Oct 2015 - 2:33 pm | मारवा
उद्धवा, अजब तुझे सरकार
लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार
इथे फुलांना मरण जन्मता, दगडांना पण चिरंजिवीता
बोरी बाभळी उगाच जगती, चंदन माथी कुठार
लबाड जोडिती इमले माड्या, गुणवतांना मात्र झोपडया
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार
वाईट तितुके इथे पोसले, भलेपणाचे भाग्य नासले
या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार
26 Oct 2015 - 2:46 pm | आनंद कांबीकर
मारवा भौ आवडली कविता"उद्धवा, अजब तुझे सरकार"
25 Oct 2015 - 6:46 pm | द-बाहुबली
कठीण आहे.
25 Oct 2015 - 9:58 pm | श्रीगुरुजी
ही एकेरी वाहतूक आहे. पाकिस्तानी गायक, चित्रपट कलाकार इ. भारतात येऊन डेरा टाकतात, आपले कार्यक्रम सादर करतात, भरपूर पैसे मिळवितात, वास्तव्य परवान्याची मुदत संपली तरी परवान्याचे नूतनीकरण न करता तसेच राहतात, काही वेळा तर आयकर न भरताच इथे मिळालेले पैसे घेऊन जातात. त्यातले काही पैसे पाकिस्तान सरकारकडे करांच्या रूपाने जात असतीलच आणि सरकारकडून अतिरेक्यांना मदत होते. म्हणजे थोडक्यात आपणच अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानी अतिरेक्यांना पोसत आहोत.
जर पाकड्या कलाकारांना इथे येऊन कार्यक्रम करायचा असेल तर तितक्याच भारतीय कलाकारांना देखील पाकिस्तानात कार्यक्रम करता आला पाहिजे. भारतातल्या एखाद्या कलाकाराने अगदी क्वचितच पाकिस्तानात कार्यक्रम सादर केला असावा. जगजितसिंग यांचा व्हिसा दोन वेळा पाकिस्तानने नाकारला होता. अनुपम खेर यांचाही व्हिसा पाकिस्तानने नाकारला होता. पाकिस्तानने फार पूर्वी अनुप जलोटांना (का पंकज उदास यांना?) व्हिसा दिला होता, परंतु त्यांच्यावर अशी अट लादण्यात आली होती की त्यांनी कोणतीही भजने सादर न करता फक्त गझल सादर करायच्या. १९८२ मध्ये भारतात आलेल्या नूरजहॉचे मुंबईत प्रचंड स्वागत करण्यात आले होते, परंतु मंगेशकर भगिनींना आजतगायत पाकिस्तानात बोलाविलेले नाही. अशी एकतर्फी वाहतूक काय कामाची?
पाकिस्तानमध्ये एकाही भारतीय कलाकाराला येऊन दिले जात नाही, आपण मात्र त्यांच्या कलाकारांचे पायघड्या घालून स्वागत करतो आणि त्यांच्याद्वारे अप्रत्यक्षरित्या अतिरेक्यांना मदत करतो. त्यामुळे जोपर्यंत भारतीय कलाकारांना तितक्याच संख्येने पाकिस्तानात कार्यक्रम सादर करायला परवानगी दिली जात नाही तोपर्यंत भारताने पाकिस्तानी कलाकारांना भारतात कार्यक्रम करण्यासाठी परवानगी देऊ नये. वाहतूक एकेरी नको, दुहेरी वाहतूक असली पाहिजे.
25 Oct 2015 - 10:25 pm | काळा पहाड
कसलीही वाहतूक नकोच आहे. भारतानं पाकिस्तानशी कसलेही संबंध ठेवू नयेत. पाकिस्तान नावाचं राष्ट्र संपवून त्याचे चार किंवा अधिक तुकडे करणं हे भारताचं प्रथम क्रमांकाचं धोरण असलं पाहिजे. ते साध्य होई पर्यंत पाकिस्तानचा आर्थिक गळा आवळणं, त्यांच्या विमानांच्या पूर्वेकडच्या मार्गावर बंदी आणणं आणि अनेक देशांत लॉबीइंगची ताकद वापरून, विविध देशातल्या कायदानिर्मात्यांना साम दाम दंड भेदानं विकत घेवून पाकिस्तानचा व्यापार संपवणं वगैरे गोष्टी केल्या पाहिजेत.
26 Oct 2015 - 1:34 pm | मोगा
पाकिस्तानला होणारी निर्यात प्रामुख्आने गुजरातमधुन होते.
25 Oct 2015 - 10:55 pm | मारवा
आपण मात्र त्यांच्या कलाकारांचे पायघड्या घालून स्वागत करतो आणि त्यांच्याद्वारे अप्रत्यक्षरित्या अतिरेक्यांना मदत करतो.
हे कस काय होत नेमकं ?
मी गुलाम अली यांच्या गाण्याचं तिकीट काढुन जातो. पैसा इथले आयोजक तबलजी त्यांचे गुलाम अली आणि मंडळी इ. संच आदित विभागला जातो.
अतिरेकी कुठे आले एकदम मध्येच ?
कळल नाही जरा विस्त्तार करता का ?
26 Oct 2015 - 12:01 am | काळा पहाड
त्यावर गुलाम अली पाकिस्तान सरकारात टॅक्स भरतात. त्या टॅक्स च्या पैशाचा काही भाग जमात उद दावा आणि जमाते इस्लामी सारख्या संघटनांना मदत म्हणून जातो. आणि मग त्याच पैशातून कसाब भारतात येतो. तुम्ही घेतलेल्या १००० रुपयाच्या तिकीटातून जरी १ रुपया लश्करे तैयबाला जात असेल तरी तुमच्या मनाला टोचणी लागायला हवी.
26 Oct 2015 - 11:49 pm | मारवा
माझा रुपया थेट लश्कर ए तोयबाच्या खिशात गेला की
अरे बापरे मला आता हिशोब लावावा लागेल की माझे
एकुण किती रुपये या गाणी एकण्याच्या नादात गेलेत
म्हणजे एकेका गाण्यावर मी डोलत होतो एकीकडे आणि दुसरीकडे लश्कर माझ्यावर चाल करुन येत होत हळु हळु
फारच धक्कादायक प्रकार आहे हा सगळा
27 Oct 2015 - 10:25 pm | काळा पहाड
दिसतयंच की ते.
27 Oct 2015 - 9:37 am | मोगा
गुज्रातमधून इतकी वर्षे पाकशी आयात निर्यात का सुरु आहे ?
26 Oct 2015 - 8:35 pm | रमेश आठवले
--ही एकेरी वाहतूक आहे.--हे खरे आहे.
भारताने पाकिस्तान ला Most Favored Nation (MFN) चा दर्जा १९९६ पासून दिलेला आहे. त्यामुळे पाकिस्तान ला त्यांनी भारतात निर्यात केलेल्या मालावर आयात शुल्क आणि इतरही काही बाबतीत सवलती मिळतात. दोन देश MFN दर्जा हा परस्परांना देतात असा संकेत असूनही पाकिस्तान ने हा दर्जा भारताला आज पर्यंत दिलेला नाही.
शिवसेना पाकिस्तान विरुद्ध मुंबईत चळवळ करते . तर मग पाकिस्तानचा MFN दर्जा काढून घ्या अथवा या मोठया करणा साठी आम्ही केंद्र सरकारातून बाहेर पडू अशी धमकी का देत नाही ?
26 Oct 2015 - 9:09 pm | खटपट्या
चान्गली माहीती
25 Oct 2015 - 11:15 pm | भंकस बाबा
ह्या भिक्करि पाकड्याना लाज नाही वाटत इथे येऊन भिक मागायला. मागे त्या राहत फतेह अली ला पकडला होता बक्कळ पैसा बाळगल्या बद्दल. हवाला मार्केट चालवतात हे इथे. ड्रग्स, हवाला, तस्करी, आणि भरपूर भारतद्वेष हेच धंदे येतात ह्यांना.
26 Oct 2015 - 9:20 pm | श्रीगुरुजी
तुम्हाला ते भिक्कारी वाटतात, पण इथल्या निधर्मी आणि पुरोगामी विचारवंतांना ते सन्माननीय अतिथी वाटतात. त्यांचे स्वागत करून त्यांनी आपले कार्यक्रम इथे सादर केले की भारत-पाकिस्तान शत्रूत्व मिटून दोन्ही देश एकमेकांचे घट्ट लंगोटीयार होतील अशा समजूतीत ते असतात. त्यांच्या म्हणण्यानुसार दोन्ही देश जवळपास सारखेच आहेत. दोन्ही देशांची संस्कृती एक, आचारविचार एक, खाणेपिणे एकसारखे, वेशभूषा एकसारखी, आवडीनिवडी एकसारख्या, दोन्ही देशांचा इतिहास एकच ...
परंतु नीट विचार केला तर दोन्ही देशात फारसे साम्य नाही. ते मूर्तीभंजक तर आपण मूर्तीपूजक, आपल्याला नष्ट करायला ते जीवापाड प्रयत्न करीत आहेत तर आपण फक्त त्यांनी हल्ले केले तरच प्रतिहल्ला करतो, ते एकेश्वरवादी तर आपण अनेक वेगवेगळे देव मानतो, त्यांच्या देशाचा अधिकृत धर्म इस्लाम तर आपल्या देशाला अधिकृत धर्मच नाही, त्यांच्याकडे कुराणावर आधारीत न्यायव्यवस्था तर आपल्याकडे वेगळी राज्यघटना, पाकिस्तान हा एक संपूर्ण अपयशी ठरलेला देश तर आपण बर्यापैकी प्रगती केलेली, पाकिस्तानची सर्व धोरणे भारतकेंद्रीत तर आपली धोरणे फक्त पाकिस्तानला केंद्रस्थानी ठेवून नसतात, पाकिस्तान त्यांच्या देशात एकही भारतीय कलाकाराला पाऊल ठेवून देत नाही तर आपण त्यांचे पायघड्या घालून स्वागत करतो, आपल्याकडे जे वाँटेड गुन्हेगार ते पाकिस्तानात सन्मानमीय पाहुणे, पाकिस्तान भारतात हल्ले करण्यासाठी अतिरेकी पाठवितो तर आपण तसले काही करीत नाही, पाकिस्तानला भारतीय प्रदेशाचा एक भाग तोडून हवा आहे तर भारताला पाकिस्तानचा कोणताही भाग नको आहे . . .
कोठे आहे दोन देशात साम्य, दोन्ही देशांची समान संस्कृती?
27 Oct 2015 - 8:43 am | नगरीनिरंजन
एक्झॅक्टली. तोच वेगळेपणा आपल्याला टिकवायचा आहे. आपण सभ्य लोक आहोत; "रानटी" नाही. पण काही लोकांचं म्हणणं असतं की ते जसे वागतात तसंच आपण वागलं पाहिजे. ते जसे "खतरे में खतरे में" ओरडत फिरतात तसंच आपणही करावं अशी काही लोकांची मानसिकता असते. अशा लोकांमुळे भारताचा विकास म्हणाव्या तितक्या वेगाने होत नाही आणि क्षुल्लक गोष्टींवर राष्ट्रीय शक्ती वाया जाते. पण अशा लोकांना समजावून सांगणार कोण?
27 Oct 2015 - 8:47 am | नगरीनिरंजन
अर्थात असा वेगळेपणा आहे आणि आपण सहिष्णु बिहिष्णु आहोत हे घडीभर गृहीत धरुन हे लिहीलंय.
26 Oct 2015 - 3:34 pm | आनंद कांबीकर
मारवा भौ आवडली कविता"उद्धवा, अजब तुझे सरकार"
26 Oct 2015 - 6:00 pm | नगरीनिरंजन
कराचीतल्या मराठी लोकांनी शिवसेनेला थंड घ्या असं सांगितलं म्हणे.
http://www.dnaindia.com/india/report-why-create-problems-when-we-live-in-peace-marathi-speaking-community-from-karachi-to-shiv-sena-2137208
27 Oct 2015 - 7:47 pm | विवेकपटाईत
प्रतिसादाबाबत धन्यवाद. विश्वामित्र गोत्राचा एका ऋषींनी वशिष्ठ गोत्राच्या एका ऋषीचा सर्व पुत्रांना ठार मारले तरी वशिष्ठ ऋषीला राग आला नाही. शेवटी विश्वामित्र यांना पश्चाताप झाला. त्यांनी कसाबला शहीद म्हंटले तरी त्यांचा आदर करा. कितीही अपराध केला तरी मोठ्या भावाने लहान भावाला क्षमाच केले पाहिजे. हीच आपली परंपरा आणि देशाचे धोरण आहे. (बाकी तालिबानी राज्यात गाणे वैगरे ऐकणे गुन्हा असतो, बेचारे गुलाम अली काय करणार, पोट-पाण्यासाठी भारतात यावेच लागते).