ढगाला लागली कळ...

धम्मकलाडू's picture
धम्मकलाडू in काथ्याकूट
18 Dec 2008 - 3:08 pm
गाभा: 

मला आदरणीय दादा कोंडके यांच्या एका चित्रपटातली 'ढगाला लागली कळ...' हे अप्रतिम गीत देवनागरी लिपीत हवे आहे.... कृपया इथे कुणी देऊ शकेल का ?
आजही हे गाणे आठवले की रोमांच येते, काटा येतो. या अप्रतिम गाण्याचा रसास्वाद करून दिल्यास मी आभारी राहीन. गांधीवादाचा किंवा संघवादाचा वैचारिक प्रभाव या गाण्यावर कसा आहे किंवा नाही हेदेखील सांगावे.

प्रतिक्रिया

प्रदीप's picture

18 Dec 2008 - 3:35 pm | प्रदीप

आजही हे गाणे आठवले की रोमांच येते, काटा येतो

हे तुम्ही काही दिवसांनी म्हटलेत, तर आम्ही तुमचे नामकरण 'तिळगूळ- लाडू' असे करू .

धम्मकलाडू's picture

18 Dec 2008 - 3:45 pm | धम्मकलाडू

हे तुम्ही काही दिवसांनी म्हटलेत, तर आम्ही तुमचे नामकरण 'तिळगूळ- लाडू' असे करू .

धन्यवाद प्रदीप. तुमच्या आपुलकीने गदगदून, भारावून गेलो आहे. लहान असताना हे गाणे पाठ होते. दादांच्या सिनेमे मी अशीच गाणी बघायला ऐकायला जायचो. सुधीर फडक्यांच्या गाण्यांत मला अजिबात रस नव्हता.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

परिकथेतील राजकुमार's picture

18 Dec 2008 - 3:49 pm | परिकथेतील राजकुमार

>>दादांच्या सिनेमे मी अशीच गाणी बघायला ऐकायला जायचो.
== आणी मग परत येताना तुमचे सहकारी तुमच्या घरी गरम गरम चहा आणी नाष्टा ढोसायला पण येत असतिल नाही ? ;)

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

आजानुकर्ण's picture

18 Dec 2008 - 4:48 pm | आजानुकर्ण

हा फार उच्च विनोद होता

आपला,
(काटेरी) आजानुकर्ण हलवाई

सखाराम_गटणे™'s picture

18 Dec 2008 - 3:42 pm | सखाराम_गटणे™

वाह वाह, छानच आहे,
आवडले

पुले शु

----
सखाराम गटणे

मैत्र's picture

18 Dec 2008 - 3:46 pm | मैत्र

+१

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Dec 2008 - 3:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

येऊ द्या अजून. शेवटचा भाग आला की मग एकत्रच प्रतिक्रिया देईन!

धम्मकलाडू's picture

18 Dec 2008 - 3:49 pm | धम्मकलाडू

धन्यवाद. अर्ध्या चड्डीत डोक्यावर आडवी टोपी लावून डोळे मिचकावत हे गीत म्हणायचे असते. गाणे म्हणून झाले की पुन्हा एकदा म्हणायचे तिच्यायला.

आपला
(दादा) धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Dec 2008 - 3:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजही हे गाणे आठवले की रोमांच येते, काटा येतो.

रोमांच येणे म्हणजेच काटा येणे असे आम्ही इतक्या दिवस समजत होतो ज्या अर्थी शुद्धशब्दांचा, शुद्धलेखनाचा आग्रह धरणारे त्याला वेगवेगळे लिहितात त्या अर्थी बहुतेक ते दोन वेगळे शब्द असावेत असे वाटते ;)

-दिलीप बिरुटे
(अशुद्धलेखनपाडू )

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Dec 2008 - 3:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो प्रा.डॉ., शिंपल आहे ते!
"ते" रोमांच आणि "तो" काटा, आहे की नाही फरक! ;-)

(छळवादी) अदिती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Dec 2008 - 3:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"ते" रोमांच आणि "तो" काटा, आहे की नाही फरक!
=))

मिंटी's picture

18 Dec 2008 - 4:01 pm | मिंटी

"ते" रोमांच आणि "तो" काटा, आहे की नाही फरक!

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

धम्मकलाडू's picture

18 Dec 2008 - 4:00 pm | धम्मकलाडू

तुमचे निरीक्षण अचूक आहे.

(बाबांच्या "मित्रां"मुळे अनेक रविवारच्या झोपमोडीच्या आठवणीने दु:खी) अदिती

असे तुम्ही एका गाण्याबाबत लिहिले होते.
अशाच काही आठवणी या ढगाला लागली कळ च्या बाबतीत असल्यास सांगाव्यात. आनंद द्विगुणित होईल.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

टारझन's picture

18 Dec 2008 - 4:01 pm | टारझन

"ते" रोमांच आणि "तो" काटा, आहे की नाही फरक!

पण जर एकचं रोमांच असेल तर ? किंवा अणेक काटाज् असतील तर ? झालं की पुण्हा सेम ..

बाकी काटे वाचून मला ते गाणं आठवलं ... "जाणे क्या होगारामा रे .... जाणे क्या होगा मौला रे .. " आणि होगाराम मुळे मला अनीक काही आठवलं म्हणून मी आठवणींची दारं बंद केली !! दारं बर्‍याच कारणांनी बंद केली जातात.. दरवाजा कशाचा आहे त्यावर दारं बंद करण्याचा मार्मिक अर्थ ठरतो... दरवाजा नावाचा रामसे ब्रदर्सचा भुतपट होता.. रामसे मधे राम आहे पुन्हा !! भयपटाने आम्हाला भयकथा आठवतात .. भयकथांमुळे भयाली देवींची कथा आठवते ... आणी भयालीदेवी आठवल्या की आमच्या अंगावर भीतीने काटे उभे रहातात

समाप्त
टारदास आठवले
ब्लैक पैंथर आघाडी

धम्मकलाडू's picture

18 Dec 2008 - 3:56 pm | धम्मकलाडू

आदरणीय प्राध्यापकसाहेब धन्यवाद खास तुमच्याकडून प्रतिसाद आलेला बघून आनंदाला परिसीमा राहिली नाही. हीच न राहिलेली परिसीमा त्या पुनरुक्तीतून व्यक्त होते आहे.
ते जाऊ द्या. तुम्ही या गाण्यावर परीक्षण लिहायला हवे. आणि हो या गाण्याचा आणि चहापोहे अशा खाद्यपदार्थांच्या आठवणी कुणाजवळ आहेत का? बाबांचे मित्र घरी येणे, चहापोहे खात हे गाणे सगळ्यांनी मिळून म्हणणे आणि वर एखादा डायलॉग... अशा स्वरुपाच्या. कृपया सांगाव्यात..

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Dec 2008 - 3:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चहापोहे अशा खाद्यपदार्थांच्या आठवणी कुणाजवळ आहेत का?
चहा-पोहे याचा अर्थ वेगळाच होतो असं माझं वैयक्तिक मत आहे!

(लव म्यारेजवाली) अदिती

चहा-पोहे याचा अर्थ वेगळाच होतो असं माझं वैयक्तिक मत आहे!

वेगळा अर्थ असणार्‍या, नसणार्‍या किंवा अर्थांचे अनेक पदर असलेल्या आठवणीही दिल्या तरी चालतील.

हे गीत सुंदरच आहे. कोणी याचा हिंदीत भावानुवाद केला तर दुधात साखर पडेल.
लहानपणी जागोजागी हे गाणे वाजत असे. ते गंभीर स्वर वातावरण अजून गंभीर करत असत.
खूपदा गाणे ऐकायचे आणि नंतर पुन्हापुन्हा अंगविक्षेप करीत म्हणायचे असा क्रम असायचा.
दादांना हिंदीत पाहिजे तसे यश का मिळाले नाही याच्यावर अभ्यास केला पाहिजे.

(दादांचा चाहता) धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मैत्र's picture

18 Dec 2008 - 4:17 pm | मैत्र

गेल्याच आठवड्यात काही दादांचे चाहते या गाण्यावर प्रभुदेवाला हरवण्याची प्रॅक्टिस करत होते.
ती चपळाई पाहून मी भारावून गेलो आणि महागुरूंना सर्वोत्कृष्ट चेला मिळणार की आम्हा आम जनतेला नवीन महागुरू मिळणार की काय या विचारात पडलो... यथावकाश एक दाढीवाले गृहस्थ या मुलांना मार्गदर्शन करताना दिसले. तेच नवीन महागुरू आहेत असं वाटून मी पुढे झालो तर ते 'साहेब .. साहेब' असं काही म्हणत होते व अनुभवी शिष्यांना उपदेशाचे चार शब्द सांगत होते.
म्हणजे अजून कोणी मोठे गुरू आहेत असं माझ्या लक्षात आलं.. ते कोण असावेत हे काही समजलं नाही...
पण त्या भारावलेल्या स्थितीत एका जुन्या जाणत्या शिष्याने दाढीवाले गृहस्थ स्थानिक 'उपगुरू' म्हणून नेमले गेले आहेत अशी बहुमोल माहिती पुरवली... मला अजाणाला फारसं काही कळलं नाही.
हा जरा वेगळा पदर असलेला अनुभव...

लहानपणी जागोजागी हे गाणे वाजत असे. ते गंभीर स्वर वातावरण अजून गंभीर करत असत.
खूपदा गाणे ऐकायचे आणि नंतर पुन्हापुन्हा अंगविक्षेप करीत म्हणायचे असा क्रम असायचा.

लहानपणापासून या गाण्याचे संस्कार आपल्यावर आहेत. आपण अनुभवी दिसता.. या पदराचा खुलासा व्हावा.. तेवढीच थोडी आमच्या ज्ञानात भर !

अवांतर: दाढीवाले गृहस्थ पाहून मला लहानपणी पाहिलेला एक विलक्षण सुंदर चित्रपट आठवला. त्यात असेच दिसणारे एक सदगृहस्थ काहीतरी सारखं स्पॉट स्पॉट म्हणायचे.. कदाचित गोल्ड स्पॉट ची एजन्सी असावी..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Dec 2008 - 5:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

.. या पदराचा खुलासा व्हावा.. तेवढीच थोडी आमच्या ज्ञानात भर !
या पदराला अनेकविध अर्थाने वेगवेगळे पदर आहेत याची जाणीव ठेवा मैत्रराव!

(ट्रूजरवाली) अदिती

गुरु's picture

18 Dec 2008 - 10:15 pm | गुरु

पेरम ल ग न वाले सा॑ग

संदीप चित्रे's picture

18 Dec 2008 - 7:24 pm | संदीप चित्रे

प्रेयसी मिठीत असता आपल्या अंगावर येतात ते रोमांच...
तशा अवस्थेत तिच्या पिताश्रींनी पाहिले की आपल्या अंगावर येतो तो काटा ...
;) ;) ;) ;)

विनायक प्रभू's picture

18 Dec 2008 - 3:53 pm | विनायक प्रभू

अहो प्राध्यापक, तुमचे बरोबर आहे पण आजकाल
रोमांच आधी येतात नंतर काटा येतो. सध्या शब्दकोष बदलला आहे.

पॅपिलॉन's picture

18 Dec 2008 - 4:03 pm | पॅपिलॉन

जसा जीवात जीव घुटमळं
तसा पिरतीचा लागतयं बळ
तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळं
ह्ये बघून दुष्मन जळं
वर ढगाला लागली कळ
पाणी थेंब थेंब गळं

चल गं राणी, गाऊ या गाणी
फिरूया पाखरासंग
रामाच्या पार्‍यात घरघर वार्‍यात
अंगाला भिडू दे अंग
जेव्हा तुझं नि माझं जुळ
पाणी थेंब थेंब गळं

सुंदर मुखडा, सोन्याचा तुकडा
कुठे हा घेऊन जावा
काय बाई अप्रित, झालया विपरीत
सश्याला भितुया छावा
माझ्या पदरात पडाळाय खुळं
पाणी थेंब थेंब गळं

जमीन आपली, उन्हान तापली
लाल लाल झालिया माती
करूया काम आणि गाळूया घाम
चला पिकवू माणिकमोती
एका वर्षात होईल तिळं
पाणी थेंब थेंब गळं

शिवार फुलतय, तोर्‍यात डुलतय
झोक्यात नाचतोय धोतरा
तुरीच्या शेंगा दावतात ठेंगा
लपलाय भूईमूग भित्रा
मधे वाटाणा बघ वळवळ
पाणी थेंब थेंब गळं

अजूनही दोन्-तीन कडवी आहेत पण आता नाहीत. नंतर मिळाल्यावर देईन

फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

धम्मकलाडू's picture

18 Dec 2008 - 4:14 pm | धम्मकलाडू

जमीन आपली, उन्हान तापली
लाल लाल झालिया माती
करूया काम आणि गाळूया घाम
चला पिकवू माणिकमोती
एका वर्षात होईल तिळं
पाणी थेंब थेंब गळं

डोळ्यांत पाणी आलं हे गीत वाचून. शेतकर्‍यांना, कामकर्‍यांना नवचेनता देणारे हे तर अमर क्रांतिगीत. आता "गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार! " पॅपिलॉन कोटि कोटि धन्यवाद !

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

पॅपिलॉन's picture

18 Dec 2008 - 4:17 pm | पॅपिलॉन

म्हणूनच हे गाण जेव्हा चार्टवर सर्वात वरती होतं, तेव्हा शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत नव्हत्या.

फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Dec 2008 - 12:15 am | llपुण्याचे पेशवेll

>>फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मरंद चाखणारे फुलपाखरू
हे मरंद म्हणजे काय बरे? एखादे उंची फ्रेंच मद्य तर नाही ना!
(अज्ञानी)
पुण्याचे पेशवे

आजानुकर्ण's picture

18 Dec 2008 - 5:18 pm | आजानुकर्ण

बामनाच्या मळ्यात
कमळाच्या तळ्यात
येशील का संध्याकाळी

जाऊ दुसरीकडं
नको बाबा तिकडं
बसलाय संतू माळी

म्हाताऱ्याला त्या लागलाय चळ
पाणी थेंब थेंब गळं

अशी काहीशी ओळ आहे. दादांचा सर्व जातींविषयीचा आदरच या ओळींतून व्यक्त होतो. सकल हिंदू बंधू बंधू अशी शिकवण देणारी गाणी विरळा

आपला
(स्मरणशील) संघमित्र आजानुकर्ण

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Dec 2008 - 5:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

दादांचा सर्व जातींविषयीचा आदरच या ओळींतून व्यक्त होतो. सकल हिंदू बंधू बंधू अशी शिकवण देणारी गाणी विरळा
सहमत आहे.
दादांबद्दलचा आदर आता तेरा पटीने वाढला.

राजा गोंदकर's picture

24 Sep 2018 - 8:11 pm | राजा गोंदकर

या कडव्याचा *'खास मतितार्थ'* दादाप्रेमींसाठी. चित्रनगरी कोल्हापूर येथील तत्कालीन जाणकारांकडून समजलेला...

दादा कोंडकें एक अजब ईरसाल व्यक्तीमत्व होते. त्यांच्या चित्रपटांतील प्रसंग, संवाद आणि गीते यांस बर्याच वेळा काही तत्कालीन राजकीय किंवा अनेकदा व्यक्तीगत असेही संदर्भ असत.

दादांच्या मनात व्ही. शांताराम यांच्या बाबत विशेष (काही कारणपरत्वे) कटूता होती.

पांडू हवालदार (बहुधा) मधील एका प्रसंगात वरळीच्या गटारातून घाणिमधे लडबडून बाहेर पडताना एका हातांत 'फाटकी चोळी' आणि दुसऱ्या हातात 'तुटका पिंजरा' ही राजकमलच्या, अर्थातच शांतारामांच्या 'चंदनाची चोळी अंग अंग जाळी' आणि 'पिंजरा' या दोन प्रसिद्ध अशा चित्रपटांची खिल्ली होती.

ह्या गिताच्या या कडव्यामागे सुध्दा ही कटूताच कार्यरत आहे...

*बामणाच्या मळ्यात...*
प्रथम व्ही. शांताराम हे 'प्रभात फिल्म कंपनी' या भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास रचणा-या संस्थेचे विष्णुपंत गोविंद दामले या व ईतर संस्थापक सदस्यांपैकी एक होते. वरील ओळ दामलेंना अनुसरुन असावी (त्यांनी निर्मिलेल्या "संत तुकाराम" हा चित्रपट व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जाणारा पहिला भारतीय चित्रपट होता).

*कमळाच्या तळ्यात...*
पुढे व्ही. शांताराम यांनी वेगळे होउन स्वतःची अशी 'राजकमल कलामंदीर' ही संस्था स्थापन केली.

येशील का संध्याकाळी...?
नकोबाबा तिकडं जाऊ दुसरीकडं...
*लपलाय संतूमाळी...*

येथे व्ही. शांताराम, अर्थात शांताराम वणकुद्रे यांचा 'माळी' असा उल्लेख करुन पुढे...

म्हातार्यालाच लागलय चळ...

असा उपहास केला आहे.

शब्दांकन: राजा गोंदकर

सुनील's picture

24 Sep 2018 - 8:46 pm | सुनील

अवघ्या एक आठवड्याच्या सदस्यकाळात खूपच उत्खनन केलेत की! असो, माहिती रोचक.

माझ्या आठवणीनुसारे सदर धाग्यात दादा केवळ निमित्तमात्र होते. मूळ निशाणा वेगळाच होता!

माझ्याच ह्या खालील प्रतिसादावरून काही बोध होतोय काय?

https://www.misalpav.com/comment/75836#comment-75836

आपला अभिजित's picture

18 Dec 2008 - 5:41 pm | आपला अभिजित

जसा जीवात जीव घुटमळं
तसा पिरतीचा लागतयं बळ

जसा जिवात जीव घुटमळं.
तसं पिरतीचं वाढतंय बळ

रामाच्या पार्‍यात घरघर वार्‍यात
अंगाला भिडू दे अंग

रामाच्या पार्‍यात गारगार वार्‍यात
अंगाला भिडू दे अंग

काय बाई अप्रित, झालया विपरीत
सश्याला भितुया छावा

काय बाई आक्रित झालंया इपरित
आणि
सशाला बिळ कुणी दावा
असं आहे, माझ्या माहितीनुसार.

माझ्या पदरात पडाळाय खुळं

माझ्या पदरात पडलंय खुळं

शिवार फुलतय, तोर्‍यात डुलतय
झोक्यात नाचतोय धोतरा

शिवार फुलतंय झोकात डुलतंय
खुशीत नाचतोय धोतरा

आणखी काही...

बामणाच्या मळ्यात कमळाच्या तळ्यात
येतेस का संध्याकाळी
नको बाबा तिकडं जाऊ दुसरीकडं
लपलाय संतूमाळी
म्हातार्‍यालाच लागलाय चळ
पाणी थेंब थेंब गळं...

अजून दोन कडवी आहेत. घरी स्वत:च्या पैशांनी विकत घेतलेली `बोट लावीन तिथं गुदगुल्या'ची ध्वनिफित आहे. ऐकून उद्या टाकतो बाकीची.
मोर लांडोरीसंग खेळं
आणि
तू दमयंती मी नळ
एवढी शेवटची वाक्यं आठवताहेत.

बाकी, गाणं भन्नाट होतं. पण ते नेमकं दादांच्या डोक्यातून प्रसवलेलं, की राजेश मुजुमदारांच्या, हे कळायला मार्ग नाही. इतकी दोघांची लेखणी एकमेकांत विरघळून गेली होती!

`साखरझोपेमंदी मी असता' (आली अंगावर)
काल रातीला सपान पडलं (सोंगाड्या)
आणि
मळ्याच्या मळ्यामंदी कोण गं उभी
लबाड लांडगं ढ्वांग करतंय (एकटा जीव सदाशिव)
ही पण प्रचंड आवडतात!

सलाम दादा!

आजानुकर्ण's picture

18 Dec 2008 - 5:46 pm | आजानुकर्ण

त्यातच 'सोडा की राया नाजूक काया नका गुदगुल्या करू' असे होते

आपला,
(कायिक) आजानुकर्ण

आजानुकर्ण's picture

19 Dec 2008 - 7:32 am | आजानुकर्ण

आताच आयपॉडवरुन गाण्याच्या उरलेल्या ओळी (पॉज करत करत) लिहून काढल्या त्या अशा

झाडावर बुलबुल बोलत्यात गुलगुल
वराडतिया कोकिळा
चिमणी झुरते उगीच राघू मैनेवरती खुळा
मोर लांडोरीसंगं खेळं

थुईथुई नाचते खुशीत हासते
मनात फुलपाखरु
सोडा की राया नाजूक काया
नका गुदगुल्या करु
तू दमयंती मी नळ

आलोया फारमात पडलोय पेरमात
सांग मी दिसतोय कसा
अडाणी ठोकळा मनाचा मोकळा
पांडू हवालदार जसा
तुझ्या वाचून जीव तळमळं

आपला
(दादाप्रेमी) आजानुकर्ण

हे गाणं दादा कोंडक्यांचंच आहे असे वाटते. राजेश मुजुमदार बहुधा दादांच्या चित्रपटांचे दिग्दर्शन करत. एक लक्षणीय गोष्ट म्हणजे माझ्याकडे या गाण्याचे दोन बोल आहेत. एकात उषाबाईंनी (मागे मंगेशकर पुढे चव्हाण) "सशाला वाट कुणी दावा" असे म्हटले आहे तर एकात "सशाला बीळ कुणी दावा" असे. बहुधा सेन्सॉरच्या हस्तक्षेपानंतर हा बदल करण्यात आला असावा.

शा. दादा कोंडके गीतमाला नावाचे दहा रुपयांचे पुस्तक यष्टीष्ट्यांडांवर मिळायचे त्यात दादांच्या गाण्यांबाबत बरीच माहिती मिळते.

आपला
(अभ्यासू) आजानुकर्ण

आजानुकर्ण's picture

19 Dec 2008 - 7:40 am | आजानुकर्ण

आंधळा मारतो डोळा ह्या चित्रपटातले 'हिल पोरी हिला' हे माझे सर्वात आवडते गाणे. दक्षिणेतील राजकुमार, रामचंद्रन, शिवाजी गणेशन यांच्याप्रमाणे या चित्रपटात दादांनी भरपूर पावडर आणि लिपस्टिक लावली आहे. चित्रपट काळापांढरा असला तरी ते समजून येते. हा निखळ करमणूक करणारा चित्रपट होता. मात्र चित्रपटाच्या शेवटाला असलेला सस्पेन्स थोडा फसल्यासारखा वाटतो.
नंतरच्या चित्रपटांमध्ये रंगीत फ्रेमा आल्यावर लिपस्टिक वगैरे थोडी विजोड वाटायची. पण आता अमिताभ आणि शाहरुखही लिपस्टिक लावतातच की.

दादांचा मास्टरपीस म्हणजे 'आली अंगावर'. शरद तळवलकरांनी आणि दादांनी धमाल उडवून दिली आहे.

आपला,
(दादू) आजानुकर्ण

प्रियाली's picture

18 Dec 2008 - 4:06 pm | प्रियाली

दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटांत जी क्रांती आणली त्यामुळे साचेबद्ध मराठी चित्रपटांच्या जोखडातून मराठी सिनेमा स्वतंत्र झाला. मराठी चित्रपटांचे स्फुरणगीत म्हणून या गाण्याची गणना केली जावी.

दादांना माझा सलाम, प्रणिपात, येथे कर माझे जुळती.

धम्मकलाडू दादांची आठवण करून दिल्याबद्दल तुम्हालाही प्रणाम.

धन्यवाद प्रियाली. आपण अगदी नवीकोरी करकरीत माहिती दिली आहे. हे गाणे म्हणजे मराठी चित्रपटांचे स्वातंत्र्यगीतच आहे थोडक्यात. दादांना सलाम आणि तुम्हालाही!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आजानुकर्ण's picture

18 Dec 2008 - 4:56 pm | आजानुकर्ण

कुणीतरी दादांचे गाणे विचारावे, कुणीतरी ते तत्परतेने द्यावे याचा आनंद वाटला.
अनेक सामान्य प्रेक्षकांना, गोरगरीबांना चित्रपटातून निखळ आनंद देणाऱ्या दादांच्या या अप्रतिम गीताबद्दलच्या चर्चेतही आचरट प्रतिसाद यावेत याचे दुःख झाले. निदान या विषयात तरी गांभीर्य ठेवा. सगळीकडेच सवंगपणा नको.

आपला
(दादाप्रेमी) आजानुकर्ण कोंडके

धम्मकलाडू's picture

18 Dec 2008 - 4:57 pm | धम्मकलाडू

आजानुकर्ण, चर्चेत सहभागी होणार्‍यांना वेळीच हे भान करून दिल्याबद्दल धन्यवाद.
आदरणीय दादांचा आणि गोरगरिबांना निखळ आनंद देणार्‍या या गीताबद्दल सवंगपणा नकोच. ही चर्चा भरकटते आहे असे वाटल्यास तसे सांगावे. तसेच या सगळ्या चर्चेत उषा चव्हाण यांच्याकडे दुर्लक्ष होते आहे का? दादांनी जी क्रांती आणली हे खरेच. पण ती क्रांती आणण्यात या रणरागिणीचा सिंहाचा वाटा होता.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Dec 2008 - 5:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दादांच्या या चर्चेतच नव्हे तर इतर ठिकाणीही आचरट प्रतिसाद येऊ नये असे वाटते. सर्वत्र असे भान ठेवून प्रतिसाद दिले पाहिजेत या विचारांचे आम्ही स्वागतच करतो.

या सगळ्या चर्चेत उषा चव्हाण यांच्याकडे दुर्लक्ष होते आहे का?
हम्म, त्या पेक्षा महेन्द्र कपूर यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे असे वाटते, त्यांनी आवाज दिला नसता तर या गाण्यांची मजा आली नसते असे वाटते.

-दिलीप बिरुटे

आजानुकर्ण's picture

18 Dec 2008 - 5:22 pm | आजानुकर्ण

अहो उषा चव्हाण यांना आम्ही कसे विसरु. त्या आमच्या मंचरच्या. (म्हणजे तशा त्या मंचरपासून ६-७ किमीवर अवसरी नावाचे गाव आहे त्याच्या आसपासच्या वाडीवरच्या)

आज लोक शाहरुख खान, ऐश्वर्या राय यांना बघण्यासाठी गर्दी करतात तशी आम्ही उषाबाईंना पाहण्यासाठी गर्दी करायचो. उषेला पाहिल्यावर "शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट' असे उद्गार जरी आमच्या तोंडातून निघाले नसले (आम्ही 'काय आयटम आहे राव' असे म्हणायचो. असो.) तरी भावना मात्र सवंग नव्हत्या.

मंचरच्या या भूमिपुत्रीचा आम्हाला सार्थ अभिमान होता. मात्र 'गौराचा नवरा' च्या काळात दादांशी तिचे वाद झाले आणि आम्ही भौमिपौत्रिक अभिमान आणि दादांशी असलेली आमची चैत्रपटिक निष्ठा यात गोंधळून गेलो. मात्र शेवटी दोघे एकत्र आले तेव्हा कुठे दोन घास पोटात जाऊ लागले. (तोपर्यंत दोन पेगांवरच भागवत होतो)

आपला
(उषाप्रेमी) आजानुकर्ण चव्हाण

सुनील's picture

18 Dec 2008 - 5:24 pm | सुनील

उषा चव्हाण म्हणजे सौंदर्याची लवंगी माळ.

(त्या काळात सौंदर्याचा ऍटम बाँब वेगळा होता)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आजानुकर्ण's picture

18 Dec 2008 - 5:29 pm | आजानुकर्ण

कोण पद्मा चव्हाण का?

आपला
(साशंक) आजानुकर्ण

उषा चव्हाण आणि पद्मा चव्हाण या दोन्ही रणरागिणींना माझा त्रिवार सलाम!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

प्रियाली's picture

18 Dec 2008 - 10:06 pm | प्रियाली

उषा चव्हाण आणि पद्मा चव्हाण या दोन्ही रणरागिणींना माझा त्रिवार सलाम!

या दोघी कुठलीही युद्धे लढल्याचे मला आठवत नाही. परंतु या दोघींना महाराष्ट्राच्या वाघिणी म्हणणे अधिक योग्य दिसेल. :)

कोलबेर's picture

18 Dec 2008 - 10:17 pm | कोलबेर

मीही हेच म्हणणार होतो! महाराष्ट्राच्या ह्या वाघिणींना माझा मानाचा मुजरा!!

वेताळ's picture

18 Dec 2008 - 4:53 pm | वेताळ

आता ह्या गाण्याचा अर्थ व ते कधी गायचे ते सांगा.
सकाळी उटुन हाफपॅन्ट घालुन थंडीच्या दिवसात पहाटेपाच ला हे स्वातंत्र्यगीत गायचे अतीच होते. पायावर काटा यायच्या एवजी दुसरेच व्हायचे.
बाकी शेतकरी ह्या गाण्याला विसरल्यामुळे आत्महत्या करत असावेत हे मनाला कुठे तरी पटते, सुंदर अर्थपुर्ण धागा चालु केल्याबद्दल लाडवाचे आम्हास खुप कौतुक वाटते.
वेताळ

सकाळी उटुन हाफपॅन्ट घालुन थंडीच्या दिवसात पहाटेपाच ला हे स्वातंत्र्यगीत गायचे अतीच होते. पायावर काटा यायच्या एवजी दुसरेच व्हायचे.

थंडी कितीही असेल तरी जिवाची पर्वा न करता उच्चरवात "ढगाला लागली कळ" असे म्हणायचे. अर्ध्या पळासाठी थांबायचे आणि मग "पाणी थेंब थेंब गळ" म्हणायचे. अनुलोम विलोम प्राणायमासारखीच किमया या गाण्यात आहे. हे गाणे नाही मंत्र आहे, उपचार आहे. अनुभूती घ्या आणि प्रचारप्रसार करा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

विनायक प्रभू's picture

18 Dec 2008 - 5:07 pm | विनायक प्रभू

मेहनत करावी. वर्षाला ३ पीके घ्यावीत. ठिबक सिंचन पद्धत वापरावी असा संदेश शेतक्र्-याना दिला होता दादानी.

लिखाळ's picture

18 Dec 2008 - 5:10 pm | लिखाळ

मेहनत करावी. वर्षाला ३ पीके घ्यावीत. ठिबक सिंचन पद्धत वापरावी असा संदेश शेतक्र्-याना दिला होता दादानी.

वर्षाला तीन पिकांचा हिशेब जुळला नाही.
पिके वेगवेगळ्या शेतात घ्यावी असे सांगणे होते का?
-- लिखाळ.

सुनील's picture

18 Dec 2008 - 5:14 pm | सुनील

पिके वेगवेगळ्या शेतात घ्यावी असे सांगणे होते का?

पिके महत्त्वाची, शेते नाहीत. प्रत्येक शेतकर्‍याने किमान एक आणि कमाल चार शेते बाळगून, तीबार पिके घ्यावीत म्हणजे देशात अन्नधान्य समस्या राहणार नाही, अशी त्यांची शिकवण होती
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विनायक प्रभू's picture

18 Dec 2008 - 5:15 pm | विनायक प्रभू

एकाच शेतात ३ पीके घेता येतात.

सुनील's picture

18 Dec 2008 - 5:18 pm | सुनील

पण त्याला नैसर्गिक बंधने असतात. शेतेच वेगळी असली की ती समस्याच नाही!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

टारझन's picture

18 Dec 2008 - 6:19 pm | टारझन

शेत केवळ कसायला घेतलं तर ? हवी तेवढी पेरणी णांगरणी करता येउ शकते ! मालकांस वार्षीक वाटा ..
पण हल्ली "राहील त्याचं घर ! कसेल त्याची जमीण" असा कायदा आलाय म्हणे ...

कसाराम शेतकी

आजानुकर्ण's picture

18 Dec 2008 - 5:06 pm | आजानुकर्ण

गांधीवादाचा किंवा संघवादाचा वैचारिक प्रभाव

गाण्याकडे थोडे तटस्थ दृष्टीने पाहिले तर दादांनी घातलेली गांधीटोपी आणि हाफपँट पाहता दादांचा वैचारिक गोंधळ झाला आहे असे वाटू शकते. मात्र काळजीपूर्वक निरीक्षण केले असता हाफपँट कमरेला घट्ट राहावी म्हणून दादा नाडी वापरत असत. चामड्याचे पट्टे वापरत नसत.

दादांच्या अनेक प्रेक्षकांना चामडी पट्टे परवडत नसताना आपण चामडी पट्टे घालण्याची हौस करणे योग्य नाही हे दादांचे मत असावे.

मात्र दादाही सांघिक हाफपँट घालत असले तरी दादांच्या रामराम गंगाराम या चित्रपटाचा संदर्भ जर घेतला तर असे लक्षात येईल की संघाला अभिप्रेत असलेला राम आणि दादांना अभिप्रेत असलेला राम यात फरक आहे.

डोक्याला मुंडाशे, मळलेले धोतर, पायात तुटक्या वहाणा असे घालूनही समाधानी असणाऱ्या एखाद्या शेतकऱ्याच्या तोंडातून अभिवादनपर प्रेमळ रामराम निघावे आणि कडक टोपी, खाडखाड बूट (आणि हाफपँट) घालणाऱ्याच्या तोंडातून आक्रस्ताळे जय श्रीराम निघावे तितका फरक या दोन रामांमध्ये आहे असे वाटते.

आपला
(रामभक्त) आजानुकर्ण हनुमान

धम्मकलाडू's picture

18 Dec 2008 - 8:45 pm | धम्मकलाडू

गाण्याकडे थोडे तटस्थ दृष्टीने पाहिले तर दादांनी घातलेली गांधीटोपी आणि हाफपँट पाहता दादांचा वैचारिक गोंधळ झाला आहे असे वाटू शकते.

काय मौलिक बोललात राव! वैचारिक गोंधळ आणि कोतेपणा (दादांच्या प्यांटीचा) यांत अनेकदा अनेकांची गल्लत होते.

अशी गल्लत करण्याचा कोतेपणा मी करणार नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आजानुकर्ण's picture

18 Dec 2008 - 9:02 pm | आजानुकर्ण

दादांच्या हाफप्यांटीला कोते म्हणून तुम्ही गल्लत केली आहे असे वाटते.

फुल्लप्यांटींशी तुलना केली तर दादांची हाफप्यांट ही कोती वाटेल. मात्र इतर हाफप्यांटींशी तुलना केल्यास दादांच्या प्यांटीत अवघे विश्व सामावू शकेल एवढा तिचा विस्तार आहे असे वाटेल. किंबहुना आधुनिक काळातील तीन चतुर्थांश उर्फ केप्री यांचा उगम दादांच्याच हाफप्यांटीतून झाला असे म्हणता येईल.

आपला
(केप्री व 3/4 प्रेमी) आजानुकर्ण

सूक्ष्म विचार केल्यास दादांचा, कमरेचे वस्त्र (किंवा फॉर द्याट म्याटर कोणतेही) हे लज्जारक्षणासाठी हवे हा फंडा क्लीअर होता. त्यामुळे तत्कालीन फ्याशनचा विचार न करता दादांनी नेमके वस्त्रपरिधान केले.
तीच पद्धत आता सर्वत्र फ्याशन म्हणून रुढ होते आहे. (व हाफ प्यांटींचा आकारही छोटाछोटा होत आहे.) हे पाहून दादांच्या दूरदृष्टीबाबत आदर वाटल्यावाचून राहवत नाही.

आपला,
(सादर) आजानुकर्ण

प्रदीप's picture

18 Dec 2008 - 9:33 pm | प्रदीप

दादांच्या हाफपँटीत अवघे विश्व सामावू शकेल काय, सूक्ष विचार काय, कमरेचे वस्त्र काय... कुठेकुठे वाहावत चालले आहात तुम्ही, कर्णराव...

सूक्ष्मातील विचार एक ते विनोबाच करू जाणे. येर्‍या कर्णाचे ते काम नोहे...

वेताळ's picture

18 Dec 2008 - 5:13 pm | वेताळ

खुपच रोचक ,अभ्यासपुर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
तसच अजुन एक निरिक्षण.......दादांचे डॉयलॉग व गाणी हे ठराविक वर्गातील लोकानाच समजत त्यामुळे इतर लोक निर्लज्जपणे दादा व्दीअर्थी संवाद/गाणी म्हणतात असा आक्षेप घेत असत.संघाच्या कार्याबद्दल देखिल खुप कमी लोकाना माहिती आहे ,पण बाकीचे कोडगे त्याला नावे ठेवत बसतात.हे दोन्ही बाबतीत मला साम्य आढळते.
वेताळ

धम्मकलाडू's picture

18 Dec 2008 - 5:22 pm | धम्मकलाडू

पण बाकीचे कोडगे त्याला नावे ठेवत बसतात.हे दोन्ही बाबतीत मला साम्य आढळते.

वेताळराव, तुमच्याशी सहमत.

काही नाटकं, चित्रपट, नट, नट्या, आयटम, इ. यांच्यावर इतकी श्रद्धा जडते, की केव्हाही त्याबद्दल अधिक उणे ऐकायला येणे अस्वस्थ करते. आणि हे अगदी व्यक्तिगत आहेच. ईश्वरावरही ज्यांची श्रद्धा डळमळीत होऊ शकते, त्या मर्त्य माणसांकडून दादांसारख्या अद्वितीय, अतुलनीय आणि दैवी अशा संस्थेबद्दल, आणि उषाताईँबद्दल अपशब्द येणे सर्वथा शक्य आहे. खरेतर ते नित्य परिचित आहे.
'कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहना'.

ढगाला लागली कळ.... वाचून मात्र पुन्हा एकदा मन प्रसन्न झाले ना पण? आं आं???

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

प्रदीप's picture

18 Dec 2008 - 7:16 pm | प्रदीप

ऐशीच्या दशकात मला हिंदी चित्रपट-धंद्याचे 'ट्रेड गाईड' नामक पाक्षिक नियमितपणे बघावयास मिळायचे. त्यात कुठल्या चित्रपटाचा मुहूर्त झाला आहे, त्यात कोणकोण आहेत, तसेच कुठला पिक्चर कुठल्या टेरिटरीत कितीला विकला गेला, दर आठवड्याच्या मिळकतीचे टेरिटरीनुसार आकडे इ. त्या धंद्याविषयीची माहिती असायची. मला चांगले आठवते की दादांचा पहिला हिंदी चित्रपट तयार होऊन रिलीज होत असण्याच्या सुमारास त्या पाक्षिकाच्या एका कॉलममधून दादांची प्रच्छन्न टिंगल व्हायची. त्यांचा अवतार, व त्याहून हा मराठी निर्माता आता हिंदीत काय करणार, इसके बस की बात नही अशा आशयाचे काहीतरी ते असायचे. पण मग त्यांचा पहिला हिंदी चित्रपट रिलीज झाला, सर्व टेरिटरीतून चांगली कमाई करू लागला, तशी ती टिंगल आपसूकच बंद झाली. त्यांचा दुसरा हिंदी चित्रपट येत असतांना ही सर्व टर बंद झालेली होती. एका मर्‍हाठी माणसाने त्या हिंदीवाल्यांना छान हात दाखवला, ह्याचा मला तेव्हाही आनंद झाला होता.

दादांबद्दल तुम्ही अगदी भारून लिहीताय, तेव्हा हे सांगणे उचित वाटले.

टग्या's picture

19 Dec 2008 - 4:04 am | टग्या (not verified)

(या 'गळत्या'त या वरातीमागून येणार्‍या 'घोड्या'चे थोडे उशिराने का होईना, पण 'योगदान'...)

दादांचे डॉयलॉग व गाणी हे ठराविक वर्गातील लोकानाच समजत त्यामुळे इतर लोक निर्लज्जपणे दादा व्दीअर्थी संवाद/गाणी म्हणतात असा आक्षेप घेत असत.

अगदी! आणि याच कारणासाठी याच गाण्यातल्या काही चांगल्याचांगल्या पंक्ती सेन्सॉर झाल्या असे ऐकिवात आहे.

दोन जिवलगांमधील प्रेमाचे अतूट बंध, जवळीक आणि एकात्मता दाखवणार्‍या पंक्तींमध्ये सेन्सॉरवाल्यांना द्व्यर्थी काय दिसले तेच जाणोत! 'प्रिये, आपण एवढे जिवलग आहोत, की तू आकाश, तर मी तारे. तू बगीचा, तर मी फुले. तू चंद्र, तर मी चांदणे (अर्रर्रर्रर्रर्र... उलटे झाले वाटते!)...' याच मालिकेत तेवढे सौंदर्य आहे काय? शेतकरी मंडळी म्हणजे कशी, जमिनीवरची, 'डाउन टू अर्थ' माणसे. त्यांच्यासाठी गाणे रचायचे तर त्यांना समजणार्‍या, रुचणार्‍या, त्यांच्या दैनंदिन जीवनाशी नाते राखणार्‍या उपमा वापरायला नकोत काय? आकाश-तारे, बगीचा-फुले, चंद्र-चांदणे वगैरे उपमा शहरी, सुखवस्तू समाजासाठी ठीक आहेत, शेतकर्‍यासाठी त्या नकोत.

आणि म्हणूनच जर दादांनी त्या उपमांत फेरफार करून '(प्रिये, आपण एवढे जिवलग आहोत, की) तू वाटी असशील, तर वाटीत खाण्यासाठी ठेवलेले केळे मी आहे' असे म्हटले, तर त्यात त्यांचे काय चुकले? किंबहुना ही उपमा तर केवळ शेतकर्‍यांनाच नव्हे, तर सर्वांनाच 'अपील' होण्यासारखी आहे. केळी तर सगळेच खातात! (आपले थोर पूर्वजही खायचे - डार्विनबाबा झिंदाबाद!) तसेच 'मोरी' या जागेशी संबंध सगळ्यांचाच येतो. (फॅक्ट ऑफ लाइफ! ज्यांचा येत नाही असा दावा आहे, ते तद्दन खोटे बोलतात. घाणेरडे कुठले! कधी आंघोळ करत नाहीत म्हणजे काय!) त्यामुळे '(प्रिये, आपण एवढे जिवलग आहोत, की) तू मोरी असशील, तर मी त्या मोरीतला (नेहमीप्रमाणे वायसर उडाल्यामुळे) नित्य गळणारा नळ आहे' ही कल्पनाही अशीच सगळ्यांच्या हृदयातील कोठलीतरी तार छेडणारी! (वायसर उडण्याचा प्रकार हा केवळ खेड्यांपुरता मर्यादित नसावा. किंबहुना शहरांतदेखील पावलोपावली, नित्यनेमाने हा अनुभव येत असावा. त्यामुळे शहरी, सुखवस्तू समाजालादेखील खरे तर त्याचे वावडे नसायला हवे, उलट आत्मीयता हवी!)

तर अशा रीतीने दादांनी कविता ही आकाश-तारे-बगीचा-फुले-चंद्र-चांदणे वगैरे शहरी-सुखवस्तू-उच्चभ्रू-इ.इ. बंधनांतून मुक्त करून सर्वांसाठी सर्वांना रुचेल अशा पातळीवर आणली. परंतु कविता, उपमा वगैरे आपलेच राखीव कुरण मानणार्‍या (आणि इतर कोठल्याही 'राखीव' प्रकारांच्या नावाने शंख करणार्‍या) शहरी-सुखवस्तू-उच्चभ्रू युतीच्या त्यामुळे पोटात दुखू लागले. कविता सर्वांसाठी खुली करणारे दादा त्यांना साम्यवादी न वाटले तरच नवल! आणि याच मत्सरापोटी दादांच्या याच गाण्यातल्या 'तुझ्या वाटीत माझं केळं' आणि 'तुझ्या मोरीत माझा नळ' या वास्तविक अतिशय साध्या, स्वच्छ आणि सुंदर अर्थवाही पंक्ती त्यांना द्व्यर्थी, अश्लील दिसू लागल्या. शेवटी सौंदर्याप्रमाणेच अश्लीलता हीसुद्धा बघणार्‍याच्या दृष्टीत ('आय ऑफ द बिहोल्डर'मध्ये) असते, हेच खरे. ('अश्लील, अश्लीलच म्हणायचे झाले तर मग मराठीत "आहे" आणि "नाही" हे दोन वगळल्यास बाकी सर्वच शब्द अश्लील आहेत' अशा अर्थाचे विधान आचार्य अत्र्यांनी केले होते असे सदानंद जोशींच्या 'मी अत्रे बोलतोय'वरून समजते.) आणि मग याच मुद्द्याला पुढे करून सेन्सॉर बोर्डातल्या याच शहरी-सुखवस्तू-उच्चभ्रू युतीच्या सभासदांनी त्या पंक्तींची काटछाट केली.

वास्तविक महात्मा गांधींनी दिलेल्या 'खेड्याकडे चला' या हाकेला ओ देऊन दादांनी कविता केवळ खेड्यातल्याच नव्हे, तर खेड्याबरोबरच शहरातल्याही जनतेच्या परसाकडे वळवली, याबद्दल दादांचा गौरव होण्याऐवजी गांधींचेच नाव लावणार्‍या या थोर देशात त्यांच्या काव्यपंक्तींची काटछाट होऊन त्या थोर कवितेची अशी विटंबना व्हावी; केवढा हा दैवदुर्विलास!!!

अवांतर: मर्ढेकरांनी कवितेत ओल्या पिपात मेलेले उंदीर आणले, दादांनी मोरीत गळणारे नळ आणले. फरक तो काय? बोंबाबोंब दोघांच्याही नावाने झाली, पण मोरीतल्या नळाला मात्र काट मिळाली, तर ओल्या पिपात मरून पडलेले उंदीर आजही जस्सेच्या तस्से (सडत पडलेले?) आहेत. शहरी-सुखवस्तू-उच्चभ्रू कंपूचा हा दुटप्पीपणा नाही तर आणखी काय?

किती सुंदर चर्चा आलु आहे आपली. त्या डान्याकडुन काही प्रतिसादाच्या टिप्स मिळत्यात का बघायला गेलो होतो.पण आता तिथच काय डकवायचे ह्याचाच विचार करत आहे. पण अ प्र मि त झ क्का स
आनि हो विप्र ना एक लघुशंका विचारायची आहे
शिवार फुलतय, तोर्‍यात डुलतय
झोक्यात नाचतोय धोतरा
तुरीच्या शेंगा दावतात ठेंगा
लपलाय भूईमूग भित्रा
मधे वाटाणा बघ वळवळ
पाणी थेंब थेंब गळं

सदर गाण्यात शेतात धोतरयाचा उल्लेख केला आहे. पण धोतर्‍याचे पिक शेतात घेतात काहो?तसा गाण्यात धोतर्‍याचा वापर का केला आहे. तीबार पिकपध्दतीबद्दल अजुन सविस्तर माहिती मिळाली तर खुपच छान
वेताळ

विनायक प्रभू's picture

18 Dec 2008 - 5:40 pm | विनायक प्रभू

अरे वेताळा,
एवढ्या मोठ्या शंकेला लघू-शंका का म्हणतोस. फार मोठा प्रोजेक्ट आहे तो.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

18 Dec 2008 - 5:46 pm | घाशीराम कोतवाल १.२

अरे बाबांनो दादा तुम्हाला समजले नाहीत अरे दादाना समजुन घ्यायचे असेल तर दादाचे एकटा जिव सदाशिव वाचा काय आनि किति भोगले आहे त्या माणसाने
आयुष्यात सख्या पुतण्याने जन्मभराची कमाई हडप केलि तरी त्या माणसाने तोंडातुन शब्द काढला नाहि
दादाचा - चित्रपट वेडा कोतवाल

विनायक प्रभू's picture

18 Dec 2008 - 5:51 pm | विनायक प्रभू

सर्व जिनीयसना ही किंमत मोजावीच लागते.

धम्मकलाडू - आपली ही सदर चर्चा ही दादांच्या खांद्यावर बंदूक उडविण्याचा प्रकार आहे. चालू द्या ... तुमच्या हेटाळणींच्या यादीत आता दादांची लेटेस्ट भर! गुड लक!!

अवांतर - दादांच्या याच गाण्यावर परदेशी लोकांचे नृत्य बसविल्याची आठवण मात्र या निमित्त्याने जागी झाली. ह्हपुवा!!!

धम्मकलाडू's picture

18 Dec 2008 - 8:39 pm | धम्मकलाडू

तुमच्या हेटाळणींच्या यादीत आता दादांची लेटेस्ट भर! गुड लक!!
हा तुमचा गैरसमज आहे. दादा हे आमचे दैवत. सोंगाड्यापासून त्यांचे जवळजवळ सर्व चित्रपट आम्ही आवडीने बघितले आहेत. अगदी हिंदी चित्रपटदेखील. ( धीर छोड तेरी पाइप का पानी.. हे गाणे कुणाला आठवत असल्यास द्यावे. )

अवांतर - दादांच्या याच गाण्यावर परदेशी लोकांचे नृत्य बसविल्याची आठवण मात्र या निमित्त्याने जागी झाली. ह्हपुवा!!!

हेही नसे थोडके! त्या दादांच्या पुण्यात्माला आमचे पुन्हा एकदा अभिवादन!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

एकलव्य's picture

18 Dec 2008 - 8:43 pm | एकलव्य

हा तुमचा गैरसमज आहे. दादा हे आमचे दैवत.

खो खो खो... अजून एक जबरा हेटाळणी! कशाला दैवत वगैरे गमजा मारता राव?

धम्मकलाडू's picture

18 Dec 2008 - 8:50 pm | धम्मकलाडू

आम्ही दादांची हेटाळणी करणे शक्यच नाही. आणि सांगा बरे गोळ्या कोणाला मारतो आहोत? काहीतरीच काय राव! निषेध, निषेध! तुमचे आता बौद्धिकच घ्यायला हवे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

दादांना चिकटू पाहणारी बांडगुळे
खो खो खो... अजून एक जबरा हेटाळणी! कशाला दैवत वगैरे गमजा मारता राव?

'महापुरुषांची विटंबना' ह्यामध्ये वरील वाक्ये येत नाहीत का? उद्या संत तात्याबा महाराजांविषयी कुणी असली ओंगळवाणी चेष्टा केली आणि हसून लोळले तर ते खपवून घेतले जाईल का? दादा कोंडके हे महापुरुष होते हे मिपाला मान्य नाही का? कारण नसताना दादांची विचारसरणी प्रसृत करणार्‍यांची टर उडवण्याची मुभा सगळ्यांना आहे का? मराठी मनांची स्पंदने म्हणून कार्यरत असणार्‍या संकेतस्थळावर असा चुकीचा मेसेज दिला जाऊ नये. मस्करीची कुस्करी होत आहे इथे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

एकलव्य's picture

18 Dec 2008 - 10:08 pm | एकलव्य

पॉन्टिग धम्मकलाडू,

पूजा आपणच बांधली आहे... आम्ही नाही.

(हरभजन) एकलव्य

धम्मकलाडू's picture

18 Dec 2008 - 11:11 pm | धम्मकलाडू

तुम्हाला काहीच कसे समजलेले दिसत नाही! तुम्हाला काय समजावणार? तुम्हाला कोण समजवणार?

दादा तुम्हीच यांना समजावा बरे!
.....

शिवार फुलतंय झोकात डुलतंय
खुशीत नाचतोय धोतरा
तुरीच्या शेंगा दावतात ठेंगा
लपलाय भूईमूग भित्रा
मधे वाटाणा बघ वळवळ
पाणी थेंब थेंब गळं
.....

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

लिखाळ's picture

18 Dec 2008 - 8:47 pm | लिखाळ

उपहास आणि भाबडेपणा अश्या दोन चाकांवर चर्चेची गाडी चालू आहे हे पाहून अंमळ करमणुक झाली.

-- लिखाळ.
गोळीबाराचे लक्ष्य चर्चेचा विषय न ठरता बंदूकच चर्चेचा विषय ठरली.

चतुरंग's picture

18 Dec 2008 - 11:59 pm | चतुरंग

अपरंपार फसलेल्या चर्चेचा हा एक उत्तम विनोदी नमुना ठरावा! L) ~X( #:S

(खुद के साथ बातां - असंच काही नाही हं रंगा, कदाचित जाणूनबुजून पांघरलेल्या भाबडेपणाचा विजयही असेल का? B) )

चतुरंग

आजानुकर्ण's picture

19 Dec 2008 - 12:07 am | आजानुकर्ण

मी तरी या चर्चेत जाणूनबुजून असे काहीही केलेले नाही. माझे दैवत दादा कोंडके यांच्याबाबत भाबडेपणे बोलण्याऐवजी मी जॉन रॉब्लिंग सस्पेन्शन ब्रिजवरुन ओहायो नदीत उडी घेणे पसंत करीन

आपला
(कट्टर) आजानुकर्ण पुणेकर

चतुरंग's picture

19 Dec 2008 - 1:56 am | चतुरंग

मुळात ती प्रतिक्रिया तुमच्यासाठी नव्हतीच, आजानुकर्ण! :T
मी ही एक दादा प्रेमी आहे त्यामुळे यू आर ऑफ दि हुक! #o

चतुरंग

धम्मकलाडू's picture

20 Dec 2008 - 10:31 pm | धम्मकलाडू

अपरंपार फसलेल्या चर्चेचा हा एक उत्तम विनोदी नमुना ठरावा!
का बरे? चर्चा उत्तम आहे याबद्दल शंकाच नाही. पण विनोदी नमुना कसा दिसला तुम्हाला. या चर्चेत मला तरी कुठलाच विनोद अपेक्षित नव्हता. ही चर्चा माझ्यादृष्टीने तरी तुफान यशस्वी झाली आहे. तुम्हाला फसलेली वाटावी याचे आश्चर्य वाटते. जमून आलेल्या चर्चेला उत्तम विनोद नमुन्याचे लेबल लावण्याच्या केविलवाण्या प्रयत्नाचा मी धिक्कार करतो. दादांचा विजय असो!

चर्चेतून जे काही निष्पन्न झाले आहे ते मी थोडक्यात काही दिवसांत मांडीनच. या तुफान यशस्वी चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. काही जणांचे प्रतिसाद लाभले असते तर आवडले असते.

(गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सुनील's picture

18 Dec 2008 - 7:32 pm | सुनील

दादांच्या खांद्यावर बंदूक
हे, दादांच्या खांद्यावरून बंदूक

असे हवे होते का?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शंकरराव's picture

18 Dec 2008 - 7:37 pm | शंकरराव

दादांनी नाडी/नाडा चा यशस्वीरित्या वापर केला होता.

सुनील's picture

18 Dec 2008 - 9:29 pm | सुनील

थट्टा, टिंगल, टवाळी ह्या सर्व दुतर्फा असतात. तुम्ही दुसर्‍यांच्या दैवतांची यथेच्छ रेवडी उडवण्याचे स्वातंत्र्य उपभोगलेत तर, तुमची दैवतेही त्यापासून मुक्त राहू शकत नाहीत, हा एक महत्त्वाचा धडा ह्या चर्चेने दिला आहे.

सबब, आता ही चर्चा थांबवावी असे सुचवावेसे वाटते.

(तटस्थ) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धम्मकलाडू's picture

18 Dec 2008 - 11:18 pm | धम्मकलाडू

थट्टा, टिंगल, टवाळी ह्या सर्व दुतर्फा असतात. तुम्ही दुसर्‍यांच्या दैवतांची यथेच्छ रेवडी उडवण्याचे स्वातंत्र्य उपभोगलेत तर, तुमची दैवतेही त्यापासून मुक्त राहू शकत नाहीत, हा एक महत्त्वाचा धडा ह्या चर्चेने दिला आहे.

कुणी कुणाच्या कुठल्या दैवतांची यथेच्छ रेवडी उडवण्याचे स्वातंत्र्य उपभोगले व कुणाची कुठली दैवते मुक्त राहू शकत नाहीत? कळेल का?

सबब, आता ही चर्चा थांबवावी असे सुचवावेसे वाटते.

दादांचा यथोचित आदर होतो असला, त्यांच्या राष्ट्रकार्याची लोकांना ओळख होत असली तर ते उत्तमच नाही काय? पण तुम्ही म्हणत असाल तर ही एव्हढी चांगली उद्बोधक चर्चा सुरू आहे ती थांबवायला माझी तरी हरकत नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आद्यमराठी नाडीकार म्हणुन दादाचे नाव घ्यावे लागेल.त्यानी नाडी/नाडा ह्या शब्दाला मराठीत प्रथमच व्यापक अर्थ दिला(काय दिला ते माहित नाही आणि कोणी विचारण्याचा प्रयत्न करु नये)
तसेच दादा आमचे दैवत आहे. आम्ही आमच्या लहानपणापासुन दादाचे सिनेमे बघत आहे.काय राव तुम्ही चेश्टा करताय आमची. हे बर काय बर नाही.आमच्या वर दादाच्या विचाराचे लहानपणा पासुन संस्कार आहेत.म्हणुन आम्ही आता जादा बोलत नाही. वेताळ

धम्मकलाडू's picture

18 Dec 2008 - 10:03 pm | धम्मकलाडू

आद्यमराठी नाडीकार म्हणुन दादाचे नाव घ्यावे लागेल.त्यानी नाडी/नाडा ह्या शब्दाला मराठीत प्रथमच व्यापक अर्थ दिला(काय दिला ते माहित नाही आणि कोणी विचारण्याचा प्रयत्न करु नये)

खरेच की. दादांचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातले कार्य माहीत आहे. एकंदर नाडीशास्त्रातले त्यांचे योगदान दुर्लक्षित झालेले आहे हे खरे. या कार्यावर प्रकाश पाडल्याबद्दल धन्यवाद.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

धम्मकलाडू's picture

23 Dec 2008 - 1:26 pm | धम्मकलाडू

या संदर्भातले अधिक प्रश्न नाडी ग्रंथांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन शंका उपस्थित करणाऱ्यांचे समाधान या चर्चेत येतील. शशिकांत ओक या विषयातले तज्ज्ञ आहेत.

(गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

एकलव्य's picture

19 Dec 2008 - 2:32 am | एकलव्य

दादांची स्टाईल -- अगदी द्वर्थी स्टाईलही -- डायरेक्ट. उगाच दुधाला जाऊन दांडू लपविणारं खुसपट नाही.

दादांची साततोटी चौकातील शिवसेना-भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारसभेतील भाषणे पुसटशी आठवतात ती अशी (चुभूद्याघ्या भर घाला)...

  • दादा उवाच - १> लोक म्हणतात तुम्ही इकडे कसे? म्हटलं आम्हीही हाफपॅटवाले आणि हेही तसेच. आजही हाफपॅन्ट घालून येणार होतो पण म्हटलं नको स्टेज उंचावर आहे उगाच फुकटचा शो कशाला?
  • दादा उवाच - २> एकदा एका सफेद टोपीला विचारलं बाबारे तुजं नाव काय? तर म्हणे - "सर्वधर्मसमभाव". मी म्हटलं मग बापाचे नाव काय "सगळा गाव"?

एकलव्य (मुक्काम मंगळवार पेठ)

धम्मकलाडू's picture

21 Dec 2008 - 8:00 pm | धम्मकलाडू

* दादा उवाच - १> लोक म्हणतात तुम्ही इकडे कसे? म्हटलं आम्हीही हाफपॅटवाले आणि हेही तसेच. आजही हाफपॅन्ट घालून येणार होतो पण म्हटलं नको स्टेज उंचावर आहे उगाच फुकटचा शो कशाला?
* दादा उवाच - २> एकदा एका सफेद टोपीला विचारलं बाबारे तुजं नाव काय? तर म्हणे - "सर्वधर्मसमभाव". मी म्हटलं मग बापाचे नाव काय "सगळा गाव"?

माहितीपूर्ण प्रतिसाद. धन्यवाद. असेच आणखी प्रतिसाद वाचायला आवडतील.

(गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

चौथा कोनाडा's picture

24 Sep 2018 - 9:14 pm | चौथा कोनाडा

हा ..... हा ..... हा ... !

एकलव्य _/\_

शंकरराव's picture

19 Dec 2008 - 2:43 pm | शंकरराव

दादांना कायद्याची नाडी पक्की महिती होती
सवकार पद्ध्ती विरोधात केलेली ग्राम जग्रुती कोण विसरेल ???
राहिल त्याचे घर, कसेल त्याची जमीन - कयदे-तज्ञ गंगाराम
जर प.बंगाल मध्ये दादांना समकालीन सज्ञान समर्थक भेटले अस्ते तर आज करात ... बसू. .. ममता .. ई. कोण ??? असेच म्हणावे लागले असते. (नक्की काय म्हणायचे आहे ?? च्या.. ईथे नाड्यांचा गूंता झाला आहे)

असो.. प्रासंगिक विनोद, समयसुचकता, अतिहजरजवाबीपणा, नाड्या अवळने हि दादांची किमया ... मी तर म्हणेन मराठी सिनेस्रुष्टीला लाभलेल भाग्यच

सखाराम_गटणे™'s picture

21 Dec 2008 - 8:15 pm | सखाराम_गटणे™

मिपावर नवा पिक्चर येतो
आहे
http://misalpav.com/node/5208

'ढगाला लागली कळ' येउद्या त्यात

----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

धम्मकलाडू's picture

30 Dec 2008 - 2:08 am | धम्मकलाडू

प्रातःस्मरणीय दादा कोंडकेंच्या वादातीत, कालातीत अशा कार्याची (आणि अर्थातच त्यांच्या अर्ध्या चड्डीचा मोठेपणा) ओळख चर्चेमुळे अधिकच गहिरी झाली. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे, समरसतावादी, समतावादी विचारसरणीचे अनेक पैलू वाचकांपुढे आले, असे मला वाटते.

या ऐतिहासिक अशा चर्चेत सहभागी झालेल्या सगळ्यांचा मी फार आभारी आहे. परम पूजनीय व प्रातःस्मरणीय दादा कोंडकेंच्या स्मृतीला अभिवादन करून मी माझ्यातर्फे ही चर्चा संपल्याचे जाहीर करतो. जय हिंद.

() धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"