Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by धम्मकलाडू on गुरुवार, 12/18/2008 - 15:08
  • Log in or register to post comments
  • 40458 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रदीप on गुरुवार, 12/18/2008 - 15:35

Permalink

हम्म...

आजही हे गाणे आठवले की रोमांच येते, काटा येतो हे तुम्ही काही दिवसांनी म्हटलेत, तर आम्ही तुमचे नामकरण 'तिळगूळ- लाडू' असे करू .
  • Log in or register to post comments

Submitted by धम्मकलाडू on गुरुवार, 12/18/2008 - 15:45

In reply to हम्म... by प्रदीप

Permalink

लहान असताना हे गाणे पाठ होते

हे तुम्ही काही दिवसांनी म्हटलेत, तर आम्ही तुमचे नामकरण 'तिळगूळ- लाडू' असे करू .
धन्यवाद प्रदीप. तुमच्या आपुलकीने गदगदून, भारावून गेलो आहे. लहान असताना हे गाणे पाठ होते. दादांच्या सिनेमे मी अशीच गाणी बघायला ऐकायला जायचो. सुधीर फडक्यांच्या गाण्यांत मला अजिबात रस नव्हता. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 12/18/2008 - 15:49

In reply to लहान असताना हे गाणे पाठ होते by धम्मकलाडू

Permalink

>>दादांच्या

>>दादांच्या सिनेमे मी अशीच गाणी बघायला ऐकायला जायचो. == आणी मग परत येताना तुमचे सहकारी तुमच्या घरी गरम गरम चहा आणी नाष्टा ढोसायला पण येत असतिल नाही ? ;) |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on गुरुवार, 12/18/2008 - 16:48

In reply to हम्म... by प्रदीप

Permalink

हाहाहाहा

हा फार उच्च विनोद होता आपला, (काटेरी) आजानुकर्ण हलवाई
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on गुरुवार, 12/18/2008 - 15:42

Permalink

वाह वाह,

वाह वाह, छानच आहे, आवडले पुले शु ---- सखाराम गटणे
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on गुरुवार, 12/18/2008 - 15:46

In reply to वाह वाह, by सखाराम_गटणे™

Permalink

सहमत आहे !

+१
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 12/18/2008 - 15:47

In reply to सहमत आहे ! by मैत्र

Permalink

२

येऊ द्या अजून. शेवटचा भाग आला की मग एकत्रच प्रतिक्रिया देईन!
  • Log in or register to post comments

Submitted by धम्मकलाडू on गुरुवार, 12/18/2008 - 15:49

In reply to वाह वाह, by सखाराम_गटणे™

Permalink

धन्यवाद.

धन्यवाद. अर्ध्या चड्डीत डोक्यावर आडवी टोपी लावून डोळे मिचकावत हे गीत म्हणायचे असते. गाणे म्हणून झाले की पुन्हा एकदा म्हणायचे तिच्यायला. आपला (दादा) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 12/18/2008 - 15:49

Permalink

नेमके काय

आजही हे गाणे आठवले की रोमांच येते, काटा येतो. रोमांच येणे म्हणजेच काटा येणे असे आम्ही इतक्या दिवस समजत होतो ज्या अर्थी शुद्धशब्दांचा, शुद्धलेखनाचा आग्रह धरणारे त्याला वेगवेगळे लिहितात त्या अर्थी बहुतेक ते दोन वेगळे शब्द असावेत असे वाटते ;) -दिलीप बिरुटे (अशुद्धलेखनपाडू )
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 12/18/2008 - 15:51

In reply to नेमके काय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

अहो

अहो प्रा.डॉ., शिंपल आहे ते! "ते" रोमांच आणि "तो" काटा, आहे की नाही फरक! ;-) (छळवादी) अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 12/18/2008 - 15:53

In reply to अहो by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

हा हा हा

"ते" रोमांच आणि "तो" काटा, आहे की नाही फरक! =))
  • Log in or register to post comments

Submitted by मिंटी on गुरुवार, 12/18/2008 - 16:01

In reply to हा हा हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

"ते" रोमांच

"ते" रोमांच आणि "तो" काटा, आहे की नाही फरक! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by धम्मकलाडू on गुरुवार, 12/18/2008 - 16:00

In reply to अहो by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

निरीक्षण अचूक

तुमचे निरीक्षण अचूक आहे.
(बाबांच्या "मित्रां"मुळे अनेक रविवारच्या झोपमोडीच्या आठवणीने दु:खी) अदिती
असे तुम्ही एका गाण्याबाबत लिहिले होते. अशाच काही आठवणी या ढगाला लागली कळ च्या बाबतीत असल्यास सांगाव्यात. आनंद द्विगुणित होईल. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 12/18/2008 - 16:01

In reply to अहो by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

:)

"ते" रोमांच आणि "तो" काटा, आहे की नाही फरक!
पण जर एकचं रोमांच असेल तर ? किंवा अणेक काटाज् असतील तर ? झालं की पुण्हा सेम .. बाकी काटे वाचून मला ते गाणं आठवलं ... "जाणे क्या होगारामा रे .... जाणे क्या होगा मौला रे .. " आणि होगाराम मुळे मला अनीक काही आठवलं म्हणून मी आठवणींची दारं बंद केली !! दारं बर्‍याच कारणांनी बंद केली जातात.. दरवाजा कशाचा आहे त्यावर दारं बंद करण्याचा मार्मिक अर्थ ठरतो... दरवाजा नावाचा रामसे ब्रदर्सचा भुतपट होता.. रामसे मधे राम आहे पुन्हा !! भयपटाने आम्हाला भयकथा आठवतात .. भयकथांमुळे भयाली देवींची कथा आठवते ... आणी भयालीदेवी आठवल्या की आमच्या अंगावर भीतीने काटे उभे रहातात समाप्त टारदास आठवले ब्लैक पैंथर आघाडी
  • Log in or register to post comments

Submitted by धम्मकलाडू on गुरुवार, 12/18/2008 - 15:56

In reply to नेमके काय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

आनंदाला परिसीमा राहिली नाही

आदरणीय प्राध्यापकसाहेब धन्यवाद खास तुमच्याकडून प्रतिसाद आलेला बघून आनंदाला परिसीमा राहिली नाही. हीच न राहिलेली परिसीमा त्या पुनरुक्तीतून व्यक्त होते आहे. ते जाऊ द्या. तुम्ही या गाण्यावर परीक्षण लिहायला हवे. आणि हो या गाण्याचा आणि चहापोहे अशा खाद्यपदार्थांच्या आठवणी कुणाजवळ आहेत का? बाबांचे मित्र घरी येणे, चहापोहे खात हे गाणे सगळ्यांनी मिळून म्हणणे आणि वर एखादा डायलॉग... अशा स्वरुपाच्या. कृपया सांगाव्यात.. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 12/18/2008 - 15:59

In reply to आनंदाला परिसीमा राहिली नाही by धम्मकलाडू

Permalink

चहापोहे

चहापोहे अशा खाद्यपदार्थांच्या आठवणी कुणाजवळ आहेत का? चहा-पोहे याचा अर्थ वेगळाच होतो असं माझं वैयक्तिक मत आहे! (लव म्यारेजवाली) अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by धम्मकलाडू on गुरुवार, 12/18/2008 - 16:07

In reply to चहापोहे by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

कोणी याचा हिंदीत भावानुवाद केला तर दुधात साखर पडेल

चहा-पोहे याचा अर्थ वेगळाच होतो असं माझं वैयक्तिक मत आहे!
वेगळा अर्थ असणार्‍या, नसणार्‍या किंवा अर्थांचे अनेक पदर असलेल्या आठवणीही दिल्या तरी चालतील. हे गीत सुंदरच आहे. कोणी याचा हिंदीत भावानुवाद केला तर दुधात साखर पडेल. लहानपणी जागोजागी हे गाणे वाजत असे. ते गंभीर स्वर वातावरण अजून गंभीर करत असत. खूपदा गाणे ऐकायचे आणि नंतर पुन्हापुन्हा अंगविक्षेप करीत म्हणायचे असा क्रम असायचा. दादांना हिंदीत पाहिजे तसे यश का मिळाले नाही याच्यावर अभ्यास केला पाहिजे. (दादांचा चाहता) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on गुरुवार, 12/18/2008 - 16:17

In reply to कोणी याचा हिंदीत भावानुवाद केला तर दुधात साखर पडेल by धम्मकलाडू

Permalink

भारावून टाकणारा अनुभव..

गेल्याच आठवड्यात काही दादांचे चाहते या गाण्यावर प्रभुदेवाला हरवण्याची प्रॅक्टिस करत होते. ती चपळाई पाहून मी भारावून गेलो आणि महागुरूंना सर्वोत्कृष्ट चेला मिळणार की आम्हा आम जनतेला नवीन महागुरू मिळणार की काय या विचारात पडलो... यथावकाश एक दाढीवाले गृहस्थ या मुलांना मार्गदर्शन करताना दिसले. तेच नवीन महागुरू आहेत असं वाटून मी पुढे झालो तर ते 'साहेब .. साहेब' असं काही म्हणत होते व अनुभवी शिष्यांना उपदेशाचे चार शब्द सांगत होते. म्हणजे अजून कोणी मोठे गुरू आहेत असं माझ्या लक्षात आलं.. ते कोण असावेत हे काही समजलं नाही... पण त्या भारावलेल्या स्थितीत एका जुन्या जाणत्या शिष्याने दाढीवाले गृहस्थ स्थानिक 'उपगुरू' म्हणून नेमले गेले आहेत अशी बहुमोल माहिती पुरवली... मला अजाणाला फारसं काही कळलं नाही. हा जरा वेगळा पदर असलेला अनुभव... लहानपणी जागोजागी हे गाणे वाजत असे. ते गंभीर स्वर वातावरण अजून गंभीर करत असत. खूपदा गाणे ऐकायचे आणि नंतर पुन्हापुन्हा अंगविक्षेप करीत म्हणायचे असा क्रम असायचा. लहानपणापासून या गाण्याचे संस्कार आपल्यावर आहेत. आपण अनुभवी दिसता.. या पदराचा खुलासा व्हावा.. तेवढीच थोडी आमच्या ज्ञानात भर ! अवांतर: दाढीवाले गृहस्थ पाहून मला लहानपणी पाहिलेला एक विलक्षण सुंदर चित्रपट आठवला. त्यात असेच दिसणारे एक सदगृहस्थ काहीतरी सारखं स्पॉट स्पॉट म्हणायचे.. कदाचित गोल्ड स्पॉट ची एजन्सी असावी..
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 12/18/2008 - 17:02

In reply to भारावून टाकणारा अनुभव.. by मैत्र

Permalink

.. या पदराचा

.. या पदराचा खुलासा व्हावा.. तेवढीच थोडी आमच्या ज्ञानात भर ! या पदराला अनेकविध अर्थाने वेगवेगळे पदर आहेत याची जाणीव ठेवा मैत्रराव! (ट्रूजरवाली) अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by गुरु on गुरुवार, 12/18/2008 - 22:15

In reply to चहापोहे by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

पेरम ल ग न

पेरम ल ग न वाले सा॑ग
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on गुरुवार, 12/18/2008 - 19:24

In reply to नेमके काय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

रोमांच आणि काटा

प्रेयसी मिठीत असता आपल्या अंगावर येतात ते रोमांच... तशा अवस्थेत तिच्या पिताश्रींनी पाहिले की आपल्या अंगावर येतो तो काटा ... ;) ;) ;) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 12/18/2008 - 15:53

Permalink

प्राध्यापक

अहो प्राध्यापक, तुमचे बरोबर आहे पण आजकाल रोमांच आधी येतात नंतर काटा येतो. सध्या शब्दकोष बदलला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पॅपिलॉन on गुरुवार, 12/18/2008 - 16:03

Permalink

गाणे

जसा जीवात जीव घुटमळं तसा पिरतीचा लागतयं बळ तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळं ह्ये बघून दुष्मन जळं वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं चल गं राणी, गाऊ या गाणी फिरूया पाखरासंग रामाच्या पार्‍यात घरघर वार्‍यात अंगाला भिडू दे अंग जेव्हा तुझं नि माझं जुळ पाणी थेंब थेंब गळं सुंदर मुखडा, सोन्याचा तुकडा कुठे हा घेऊन जावा काय बाई अप्रित, झालया विपरीत सश्याला भितुया छावा माझ्या पदरात पडाळाय खुळं पाणी थेंब थेंब गळं जमीन आपली, उन्हान तापली लाल लाल झालिया माती करूया काम आणि गाळूया घाम चला पिकवू माणिकमोती एका वर्षात होईल तिळं पाणी थेंब थेंब गळं शिवार फुलतय, तोर्‍यात डुलतय झोक्यात नाचतोय धोतरा तुरीच्या शेंगा दावतात ठेंगा लपलाय भूईमूग भित्रा मधे वाटाणा बघ वळवळ पाणी थेंब थेंब गळं अजूनही दोन्-तीन कडवी आहेत पण आता नाहीत. नंतर मिळाल्यावर देईन फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
  • Log in or register to post comments

Submitted by धम्मकलाडू on गुरुवार, 12/18/2008 - 16:14

In reply to गाणे by पॅपिलॉन

Permalink

डोळ्यांत पाणी आलं वाचून

जमीन आपली, उन्हान तापली लाल लाल झालिया माती करूया काम आणि गाळूया घाम चला पिकवू माणिकमोती एका वर्षात होईल तिळं पाणी थेंब थेंब गळं
डोळ्यांत पाणी आलं हे गीत वाचून. शेतकर्‍यांना, कामकर्‍यांना नवचेनता देणारे हे तर अमर क्रांतिगीत. आता "गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार! " पॅपिलॉन कोटि कोटि धन्यवाद ! "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments

Submitted by पॅपिलॉन on गुरुवार, 12/18/2008 - 16:17

In reply to डोळ्यांत पाणी आलं वाचून by धम्मकलाडू

Permalink

आत्महत्या

म्हणूनच हे गाण जेव्हा चार्टवर सर्वात वरती होतं, तेव्हा शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत नव्हत्या. फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Fri, 12/19/2008 - 00:15

In reply to आत्महत्या by पॅपिलॉन

Permalink

>>फुलांफुला

>>फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मरंद चाखणारे फुलपाखरू हे मरंद म्हणजे काय बरे? एखादे उंची फ्रेंच मद्य तर नाही ना! (अज्ञानी) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on गुरुवार, 12/18/2008 - 17:18

In reply to गाणे by पॅपिलॉन

Permalink

बामनाच्या मळ्यात

बामनाच्या मळ्यात कमळाच्या तळ्यात येशील का संध्याकाळी जाऊ दुसरीकडं नको बाबा तिकडं बसलाय संतू माळी म्हाताऱ्याला त्या लागलाय चळ पाणी थेंब थेंब गळं अशी काहीशी ओळ आहे. दादांचा सर्व जातींविषयीचा आदरच या ओळींतून व्यक्त होतो. सकल हिंदू बंधू बंधू अशी शिकवण देणारी गाणी विरळा आपला (स्मरणशील) संघमित्र आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 12/18/2008 - 17:19

In reply to बामनाच्या मळ्यात by आजानुकर्ण

Permalink

दादांचा

दादांचा सर्व जातींविषयीचा आदरच या ओळींतून व्यक्त होतो. सकल हिंदू बंधू बंधू अशी शिकवण देणारी गाणी विरळा सहमत आहे. दादांबद्दलचा आदर आता तेरा पटीने वाढला.
  • Log in or register to post comments

Submitted by राजा गोंदकर on Mon, 09/24/2018 - 20:11

In reply to बामनाच्या मळ्यात by आजानुकर्ण

Permalink

दादा कोंडके, एक ईरसाल वल्ली!

या कडव्याचा *'खास मतितार्थ'* दादाप्रेमींसाठी. चित्रनगरी कोल्हापूर येथील तत्कालीन जाणकारांकडून समजलेला... दादा कोंडकें एक अजब ईरसाल व्यक्तीमत्व होते. त्यांच्या चित्रपटांतील प्रसंग, संवाद आणि गीते यांस बर्याच वेळा काही तत्कालीन राजकीय किंवा अनेकदा व्यक्तीगत असेही संदर्भ असत. दादांच्या मनात व्ही. शांताराम यांच्या बाबत विशेष (काही कारणपरत्वे) कटूता होती. पांडू हवालदार (बहुधा) मधील एका प्रसंगात वरळीच्या गटारातून घाणिमधे लडबडून बाहेर पडताना एका हातांत 'फाटकी चोळी' आणि दुसऱ्या हातात 'तुटका पिंजरा' ही राजकमलच्या, अर्थातच शांतारामांच्या 'चंदनाची चोळी अंग अंग जाळी' आणि 'पिंजरा' या दोन प्रसिद्ध अशा चित्रपटांची खिल्ली होती. ह्या गिताच्या या कडव्यामागे सुध्दा ही कटूताच कार्यरत आहे... *बामणाच्या मळ्यात...* प्रथम व्ही. शांताराम हे 'प्रभात फिल्म कंपनी' या भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास रचणा-या संस्थेचे विष्णुपंत गोविंद दामले या व ईतर संस्थापक सदस्यांपैकी एक होते. वरील ओळ दामलेंना अनुसरुन असावी (त्यांनी निर्मिलेल्या "संत तुकाराम" हा चित्रपट व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जाणारा पहिला भारतीय चित्रपट होता). *कमळाच्या तळ्यात...* पुढे व्ही. शांताराम यांनी वेगळे होउन स्वतःची अशी 'राजकमल कलामंदीर' ही संस्था स्थापन केली. येशील का संध्याकाळी...? नकोबाबा तिकडं जाऊ दुसरीकडं... *लपलाय संतूमाळी...* येथे व्ही. शांताराम, अर्थात शांताराम वणकुद्रे यांचा 'माळी' असा उल्लेख करुन पुढे... म्हातार्यालाच लागलय चळ... असा उपहास केला आहे. शब्दांकन: राजा गोंदकर
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Mon, 09/24/2018 - 20:46

In reply to दादा कोंडके, एक ईरसाल वल्ली! by राजा गोंदकर

Permalink

दादा निमित्तमात्र

अवघ्या एक आठवड्याच्या सदस्यकाळात खूपच उत्खनन केलेत की! असो, माहिती रोचक. माझ्या आठवणीनुसारे सदर धाग्यात दादा केवळ निमित्तमात्र होते. मूळ निशाणा वेगळाच होता! माझ्याच ह्या खालील प्रतिसादावरून काही बोध होतोय काय? https://www.misalpav.com/comment/75836#comment-75836
  • Log in or register to post comments

Submitted by आपला अभिजित on गुरुवार, 12/18/2008 - 17:41

In reply to गाणे by पॅपिलॉन

Permalink

जाहल्या काही चुका...

जसा जीवात जीव घुटमळं तसा पिरतीचा लागतयं बळ जसा जिवात जीव घुटमळं. तसं पिरतीचं वाढतंय बळ रामाच्या पार्‍यात घरघर वार्‍यात अंगाला भिडू दे अंग रामाच्या पार्‍यात गारगार वार्‍यात अंगाला भिडू दे अंग काय बाई अप्रित, झालया विपरीत सश्याला भितुया छावा काय बाई आक्रित झालंया इपरित आणि सशाला बिळ कुणी दावा असं आहे, माझ्या माहितीनुसार. माझ्या पदरात पडाळाय खुळं माझ्या पदरात पडलंय खुळं शिवार फुलतय, तोर्‍यात डुलतय झोक्यात नाचतोय धोतरा शिवार फुलतंय झोकात डुलतंय खुशीत नाचतोय धोतरा आणखी काही... बामणाच्या मळ्यात कमळाच्या तळ्यात येतेस का संध्याकाळी नको बाबा तिकडं जाऊ दुसरीकडं लपलाय संतूमाळी म्हातार्‍यालाच लागलाय चळ पाणी थेंब थेंब गळं... अजून दोन कडवी आहेत. घरी स्वत:च्या पैशांनी विकत घेतलेली `बोट लावीन तिथं गुदगुल्या'ची ध्वनिफित आहे. ऐकून उद्या टाकतो बाकीची. मोर लांडोरीसंग खेळं आणि तू दमयंती मी नळ एवढी शेवटची वाक्यं आठवताहेत. बाकी, गाणं भन्नाट होतं. पण ते नेमकं दादांच्या डोक्यातून प्रसवलेलं, की राजेश मुजुमदारांच्या, हे कळायला मार्ग नाही. इतकी दोघांची लेखणी एकमेकांत विरघळून गेली होती! `साखरझोपेमंदी मी असता' (आली अंगावर) काल रातीला सपान पडलं (सोंगाड्या) आणि मळ्याच्या मळ्यामंदी कोण गं उभी लबाड लांडगं ढ्वांग करतंय (एकटा जीव सदाशिव) ही पण प्रचंड आवडतात! सलाम दादा!
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on गुरुवार, 12/18/2008 - 17:46

In reply to जाहल्या काही चुका... by आपला अभिजित

Permalink

बरोबर

त्यातच 'सोडा की राया नाजूक काया नका गुदगुल्या करू' असे होते आपला, (कायिक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Fri, 12/19/2008 - 07:32

In reply to जाहल्या काही चुका... by आपला अभिजित

Permalink

आताच

आताच आयपॉडवरुन गाण्याच्या उरलेल्या ओळी (पॉज करत करत) लिहून काढल्या त्या अशा झाडावर बुलबुल बोलत्यात गुलगुल वराडतिया कोकिळा चिमणी झुरते उगीच राघू मैनेवरती खुळा मोर लांडोरीसंगं खेळं थुईथुई नाचते खुशीत हासते मनात फुलपाखरु सोडा की राया नाजूक काया नका गुदगुल्या करु तू दमयंती मी नळ आलोया फारमात पडलोय पेरमात सांग मी दिसतोय कसा अडाणी ठोकळा मनाचा मोकळा पांडू हवालदार जसा तुझ्या वाचून जीव तळमळं आपला (दादाप्रेमी) आजानुकर्ण हे गाणं दादा कोंडक्यांचंच आहे असे वाटते. राजेश मुजुमदार बहुधा दादांच्या चित्रपटांचे दिग्दर्शन करत. एक लक्षणीय गोष्ट म्हणजे माझ्याकडे या गाण्याचे दोन बोल आहेत. एकात उषाबाईंनी (मागे मंगेशकर पुढे चव्हाण) "सशाला वाट कुणी दावा" असे म्हटले आहे तर एकात "सशाला बीळ कुणी दावा" असे. बहुधा सेन्सॉरच्या हस्तक्षेपानंतर हा बदल करण्यात आला असावा. शा. दादा कोंडके गीतमाला नावाचे दहा रुपयांचे पुस्तक यष्टीष्ट्यांडांवर मिळायचे त्यात दादांच्या गाण्यांबाबत बरीच माहिती मिळते. आपला (अभ्यासू) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Fri, 12/19/2008 - 07:40

In reply to जाहल्या काही चुका... by आपला अभिजित

Permalink

हिल पोरी हिला

आंधळा मारतो डोळा ह्या चित्रपटातले 'हिल पोरी हिला' हे माझे सर्वात आवडते गाणे. दक्षिणेतील राजकुमार, रामचंद्रन, शिवाजी गणेशन यांच्याप्रमाणे या चित्रपटात दादांनी भरपूर पावडर आणि लिपस्टिक लावली आहे. चित्रपट काळापांढरा असला तरी ते समजून येते. हा निखळ करमणूक करणारा चित्रपट होता. मात्र चित्रपटाच्या शेवटाला असलेला सस्पेन्स थोडा फसल्यासारखा वाटतो. नंतरच्या चित्रपटांमध्ये रंगीत फ्रेमा आल्यावर लिपस्टिक वगैरे थोडी विजोड वाटायची. पण आता अमिताभ आणि शाहरुखही लिपस्टिक लावतातच की. दादांचा मास्टरपीस म्हणजे 'आली अंगावर'. शरद तळवलकरांनी आणि दादांनी धमाल उडवून दिली आहे. आपला, (दादू) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on गुरुवार, 12/18/2008 - 16:06

Permalink

क्रांतिकारक - दादा कोंडके

दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटांत जी क्रांती आणली त्यामुळे साचेबद्ध मराठी चित्रपटांच्या जोखडातून मराठी सिनेमा स्वतंत्र झाला. मराठी चित्रपटांचे स्फुरणगीत म्हणून या गाण्याची गणना केली जावी. दादांना माझा सलाम, प्रणिपात, येथे कर माझे जुळती. धम्मकलाडू दादांची आठवण करून दिल्याबद्दल तुम्हालाही प्रणाम.
  • Log in or register to post comments

Submitted by धम्मकलाडू on गुरुवार, 12/18/2008 - 16:09

In reply to क्रांतिकारक - दादा कोंडके by प्रियाली

Permalink

मराठी चित्रपटांचे स्वातंत्र्यगीतच

धन्यवाद प्रियाली. आपण अगदी नवीकोरी करकरीत माहिती दिली आहे. हे गाणे म्हणजे मराठी चित्रपटांचे स्वातंत्र्यगीतच आहे थोडक्यात. दादांना सलाम आणि तुम्हालाही! "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on गुरुवार, 12/18/2008 - 16:56

Permalink

हम्म

कुणीतरी दादांचे गाणे विचारावे, कुणीतरी ते तत्परतेने द्यावे याचा आनंद वाटला. अनेक सामान्य प्रेक्षकांना, गोरगरीबांना चित्रपटातून निखळ आनंद देणाऱ्या दादांच्या या अप्रतिम गीताबद्दलच्या चर्चेतही आचरट प्रतिसाद यावेत याचे दुःख झाले. निदान या विषयात तरी गांभीर्य ठेवा. सगळीकडेच सवंगपणा नको. आपला (दादाप्रेमी) आजानुकर्ण कोंडके
  • Log in or register to post comments

Submitted by धम्मकलाडू on गुरुवार, 12/18/2008 - 16:57

In reply to हम्म by आजानुकर्ण

Permalink

भान दिल्याबद्दल धन्यवाद

आजानुकर्ण, चर्चेत सहभागी होणार्‍यांना वेळीच हे भान करून दिल्याबद्दल धन्यवाद. आदरणीय दादांचा आणि गोरगरिबांना निखळ आनंद देणार्‍या या गीताबद्दल सवंगपणा नकोच. ही चर्चा भरकटते आहे असे वाटल्यास तसे सांगावे. तसेच या सगळ्या चर्चेत उषा चव्हाण यांच्याकडे दुर्लक्ष होते आहे का? दादांनी जी क्रांती आणली हे खरेच. पण ती क्रांती आणण्यात या रणरागिणीचा सिंहाचा वाटा होता. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 12/18/2008 - 17:10

In reply to भान दिल्याबद्दल धन्यवाद by धम्मकलाडू

Permalink

इथेच नव्हे तर सर्वत्र

दादांच्या या चर्चेतच नव्हे तर इतर ठिकाणीही आचरट प्रतिसाद येऊ नये असे वाटते. सर्वत्र असे भान ठेवून प्रतिसाद दिले पाहिजेत या विचारांचे आम्ही स्वागतच करतो. या सगळ्या चर्चेत उषा चव्हाण यांच्याकडे दुर्लक्ष होते आहे का? हम्म, त्या पेक्षा महेन्द्र कपूर यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे असे वाटते, त्यांनी आवाज दिला नसता तर या गाण्यांची मजा आली नसते असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on गुरुवार, 12/18/2008 - 17:22

In reply to भान दिल्याबद्दल धन्यवाद by धम्मकलाडू

Permalink

उषा चव्हाण

अहो उषा चव्हाण यांना आम्ही कसे विसरु. त्या आमच्या मंचरच्या. (म्हणजे तशा त्या मंचरपासून ६-७ किमीवर अवसरी नावाचे गाव आहे त्याच्या आसपासच्या वाडीवरच्या) आज लोक शाहरुख खान, ऐश्वर्या राय यांना बघण्यासाठी गर्दी करतात तशी आम्ही उषाबाईंना पाहण्यासाठी गर्दी करायचो. उषेला पाहिल्यावर "शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट' असे उद्गार जरी आमच्या तोंडातून निघाले नसले (आम्ही 'काय आयटम आहे राव' असे म्हणायचो. असो.) तरी भावना मात्र सवंग नव्हत्या. मंचरच्या या भूमिपुत्रीचा आम्हाला सार्थ अभिमान होता. मात्र 'गौराचा नवरा' च्या काळात दादांशी तिचे वाद झाले आणि आम्ही भौमिपौत्रिक अभिमान आणि दादांशी असलेली आमची चैत्रपटिक निष्ठा यात गोंधळून गेलो. मात्र शेवटी दोघे एकत्र आले तेव्हा कुठे दोन घास पोटात जाऊ लागले. (तोपर्यंत दोन पेगांवरच भागवत होतो) आपला (उषाप्रेमी) आजानुकर्ण चव्हाण
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on गुरुवार, 12/18/2008 - 17:24

In reply to उषा चव्हाण by आजानुकर्ण

Permalink

+१

उषा चव्हाण म्हणजे सौंदर्याची लवंगी माळ. (त्या काळात सौंदर्याचा ऍटम बाँब वेगळा होता) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on गुरुवार, 12/18/2008 - 17:29

In reply to +१ by सुनील

Permalink

पद्मा

कोण पद्मा चव्हाण का? आपला (साशंक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by धम्मकलाडू on गुरुवार, 12/18/2008 - 17:58

In reply to पद्मा by आजानुकर्ण

Permalink

या दोन्ही रणरागिणींना माझा त्रिवार सलाम!

उषा चव्हाण आणि पद्मा चव्हाण या दोन्ही रणरागिणींना माझा त्रिवार सलाम! "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on गुरुवार, 12/18/2008 - 22:06

In reply to या दोन्ही रणरागिणींना माझा त्रिवार सलाम! by धम्मकलाडू

Permalink

रणरागिणी हे नाव अयोग्य आहे.

उषा चव्हाण आणि पद्मा चव्हाण या दोन्ही रणरागिणींना माझा त्रिवार सलाम!
या दोघी कुठलीही युद्धे लढल्याचे मला आठवत नाही. परंतु या दोघींना महाराष्ट्राच्या वाघिणी म्हणणे अधिक योग्य दिसेल. :)
  • Log in or register to post comments

Submitted by कोलबेर on गुरुवार, 12/18/2008 - 22:17

In reply to रणरागिणी हे नाव अयोग्य आहे. by प्रियाली

Permalink

मीही हेच

मीही हेच म्हणणार होतो! महाराष्ट्राच्या ह्या वाघिणींना माझा मानाचा मुजरा!!
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on गुरुवार, 12/18/2008 - 16:53

Permalink

सगळ झाल गाण मिळाले

आता ह्या गाण्याचा अर्थ व ते कधी गायचे ते सांगा. सकाळी उटुन हाफपॅन्ट घालुन थंडीच्या दिवसात पहाटेपाच ला हे स्वातंत्र्यगीत गायचे अतीच होते. पायावर काटा यायच्या एवजी दुसरेच व्हायचे. बाकी शेतकरी ह्या गाण्याला विसरल्यामुळे आत्महत्या करत असावेत हे मनाला कुठे तरी पटते, सुंदर अर्थपुर्ण धागा चालु केल्याबद्दल लाडवाचे आम्हास खुप कौतुक वाटते. वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by धम्मकलाडू on गुरुवार, 12/18/2008 - 17:04

In reply to सगळ झाल गाण मिळाले by वेताळ

Permalink

हे गाणे नाही मंत्र आहे, उपचार आहे

सकाळी उटुन हाफपॅन्ट घालुन थंडीच्या दिवसात पहाटेपाच ला हे स्वातंत्र्यगीत गायचे अतीच होते. पायावर काटा यायच्या एवजी दुसरेच व्हायचे.
थंडी कितीही असेल तरी जिवाची पर्वा न करता उच्चरवात "ढगाला लागली कळ" असे म्हणायचे. अर्ध्या पळासाठी थांबायचे आणि मग "पाणी थेंब थेंब गळ" म्हणायचे. अनुलोम विलोम प्राणायमासारखीच किमया या गाण्यात आहे. हे गाणे नाही मंत्र आहे, उपचार आहे. अनुभूती घ्या आणि प्रचारप्रसार करा. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on गुरुवार, 12/18/2008 - 17:07

In reply to सगळ झाल गाण मिळाले by वेताळ

Permalink

ठिबक

मेहनत करावी. वर्षाला ३ पीके घ्यावीत. ठिबक सिंचन पद्धत वापरावी असा संदेश शेतक्र्-याना दिला होता दादानी.
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on गुरुवार, 12/18/2008 - 17:10

In reply to ठिबक by विनायक प्रभू

Permalink

मेहनत

मेहनत करावी. वर्षाला ३ पीके घ्यावीत. ठिबक सिंचन पद्धत वापरावी असा संदेश शेतक्र्-याना दिला होता दादानी.
वर्षाला तीन पिकांचा हिशेब जुळला नाही. पिके वेगवेगळ्या शेतात घ्यावी असे सांगणे होते का? -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on गुरुवार, 12/18/2008 - 17:14

In reply to मेहनत by लिखाळ

Permalink

पिके आणि शेते

पिके वेगवेगळ्या शेतात घ्यावी असे सांगणे होते का? पिके महत्त्वाची, शेते नाहीत. प्रत्येक शेतकर्‍याने किमान एक आणि कमाल चार शेते बाळगून, तीबार पिके घ्यावीत म्हणजे देशात अन्नधान्य समस्या राहणार नाही, अशी त्यांची शिकवण होती Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com