प्राजु in जे न देखे रवी... 9 Jan 2008 - 1:19 am मंडळी... आता इथे या सगळे... पुन्हा विणकरी जमूया... ही नवी वीण भाग -३... यात आपल्या सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे. आपल्या सहकर्याशिवाय हे शक्य नवते. चला पुन्हा विणूया... हे ठिकाण प्रतिक्रिया पाऊस 9 Jan 2008 - 1:21 am | प्राजु पाऊस झिरमिर झिरमिर पानापानात बरसतो पाऊस अल्लड अवखळ धरेशी पिंगा घालतो.. - प्राजु. चला शो मस्ट गो ऑन... सरींवर सरी 9 Jan 2008 - 1:28 am | इनोबा म्हणे पावसाच्या सरींनी धरा न्हाऊन निघाली अन नववधू सारखी ती हिरवीगार झाली... धरेशी 9 Jan 2008 - 1:28 am | ऋषिकेश धरेशी पिंगा घालतो पावसाचा गहिवर की धरेस भेटाया बरसला मेघकुंभ अतिआतुर पाण्यात 9 Jan 2008 - 1:35 am | प्राजु पाण्यात वाकूनी तरू प्रतिबिंब आपुले पाहते क्षितिजाला टेकूनी नभ धरेला गूज सांगते.. - प्राजु धरेला गूज 9 Jan 2008 - 1:38 am | ऋषिकेश धरेला गूज सांगते अतिचपळ विद्युल्लता धरणीही मग लाजून भिजते ऐकून आकाशाची कथा आई.... शपथ्थ! 9 Jan 2008 - 1:40 am | प्राजु ऋषिकेश.... फारच सुंदर... बिलगूनी या धरेला आकाश गूज सांगते या गाण्याची आठवण झाली. धरणी..... 9 Jan 2008 - 1:40 am | ब्रिटिश टिंग्या बरसणार्या मेघांच्या तालावरी हिरवेगार पीक डौलती जणू पावसाच्या स्पर्शाने धरणीचे रोमांच उभे राहती लाजलाजली 9 Jan 2008 - 1:44 am | प्राजु लाजलाजली पाहूनी भास्करा पांढ-या वस्त्रा आड लपली हळूच सरला नाजूक पदर अन अवनी ती धुंदित झाली - प्राजु. मन वढाय वढाय 9 Jan 2008 - 1:50 am | इनोबा म्हणे आज झाले मज काय नाही 'मी' तो कालचा काल मन माझे होते आज 'मी' झालो मनाचा... चला आज झोप अनावर झाली आहे,काही लिहायच्या मूड मधे नाही...सॉरी :( उद्या पुर्ण तयारीत येईन आणि आजची कसूर काढीन.... (मनमौजी) -इनोबा आज 'मी' झालो 9 Jan 2008 - 1:52 am | ऋषिकेश आज 'मी' झालो मनाचा पण माझे मन आहे कोठे? घेऊन गेलीस ते तुजसवे आता उरले फक्त नाते धन्यवाद.. 9 Jan 2008 - 1:56 am | प्राजु धन्यवाद.. विनोबा, उद्या या पुन्हा..असेच. -प्राजु. हो! 9 Jan 2008 - 2:01 am | इनोबा म्हणे हो!नक्की येईन.तु दिवसभर येत नाहिस... नेमकी रात्रीच येतेस...फॉरेनला राहतेस की काय? मन..... 9 Jan 2008 - 2:00 am | ब्रिटिश टिंग्या न लगे थांग तिच्या अथांग मनाचा गुंता कसा सोडवू मी न उमजलेल्या भावनांचा मन माझे 9 Jan 2008 - 2:13 am | प्राजु मन माझे हिरवे हिरवे घेई झेप आकाशी पंख पसरूनी पुन्हा विसावे तुजपाशी.. - प्राजु. हो.. 9 Jan 2008 - 2:04 am | प्राजु अमेरिकेत आहे मी. - प्राजु. माझ्या 9 Jan 2008 - 2:22 am | प्राजु माझ्या मनाचा थांग मी कवितेतून मांडला चारोळीतून शब्दांचा सडाच इथे सांडला.. - प्राजु. परत एकदा माझ्या मनाचा थांग...... 9 Jan 2008 - 2:29 am | ब्रिटिश टिंग्या माझ्या मनाचा थांग न समजला तिला बांधून मोकळी झाली ती राखी माझ्या हाताला :(( खूप खोल 11 Jan 2008 - 12:08 am | प्राजु खूप खोल जाऊनही नाही समजले तिचे मन तिने मात्र अर्पिले मला तन, मन आणि धन.. - प्राजु. भावना....... 11 Jan 2008 - 12:45 am | ब्रिटिश टिंग्या तिच्या मनाच्या डोहात मारूनी खोल बुडी मला न समजे कोठे माझ्याबद्दलची भावना दडी (दडलेला) छोटी टिंगी भवनेला 11 Jan 2008 - 1:25 am | प्राजु भवनेला शब्दात गुंफून मी कागदावर ठेवले.. माझे मनंही नकळत अश्रू बनून ओघळले.. - प्राजु. माझं मन 11 Jan 2008 - 1:50 am | इनोबा म्हणे पुस डोळे सखे आता सांग तुला हवे काय...? माझं मन हे अबोल जशी दूधावर साय... (फणसा सारखा) -इनोबा अबोल अबोली 11 Jan 2008 - 1:53 am | प्राजु अबोल अबोली फुलून आली आज माझ्या अंगणी.. हजार नक्षत्रे क्षणात हसली.. रूप तिचे पाहूनी.. - प्राजु. आभास 11 Jan 2008 - 2:07 am | इनोबा म्हणे तुझं रूप हे लोभस तरीही का मन भकास तुझं हसणं हे असणं आणि मी आहे आभास (मन माझे हे...) -इनोबा तसं पाहीलं 11 Jan 2008 - 10:15 pm | सनिल पांगे तसं पाहीलं तर खेळला तर जुगारही चांगला आहे काहीचं नसण्या पेक्षा मोल आला तर भंगारही चांगला आहे @सनिल तुझं हसणं 11 Jan 2008 - 11:25 pm | प्राजु तुझं हसणं जणू चांदण्यांच शिंपणं... तुझ्यात गुंतून माझा 'मी'पणा संपणं... - प्राजु.. शिंपलेस 13 Jan 2008 - 6:40 pm | सुधीर कांदळकर शिंपलेस तू हृदयांत मिपाकरांच्या प्रीतिचे मळे मनांत नाचले त्यांच्या मोर कां बरे प्रेम' ..... 13 Jan 2008 - 9:07 pm | सनिल पांगे प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचा नुसता ऐकला तरी हर्ष होतो आणि ऊच्चारला तर दोन ओठांमध्ये स्पर्श होतो @ सनिल मनांत 13 Jan 2008 - 10:39 pm | प्राजु मनांत माझ्या मोराची केकारव मिपाकरांचे प्रेम असेच मिळो हीच देवाकडे आर्जव.. - प्राजु अशृ... 15 Jan 2008 - 1:16 am | इनोबा म्हणे मोर नाचला वनात हर्ष माझीया मनात त्याचे मन दुखी: कष्टी अशृ लपती पाण्यात (पावसाच्या थेंबातही त्याचे दूखः पाहू शकणारा) -इनोबा समुद्राने 15 Jan 2008 - 1:28 am | प्राजु समुद्राने एकदा गोड व्हायचं ठरवलं माशांच्या अश्रुंनी सारं पाणी खारावलं.. - प्राजु सागराच्या 15 Jan 2008 - 1:34 am | इनोबा म्हणे सागराच्या खारट उदरामधे जिवन कसे रंगीत असते तो कसाही असला तरी त्याच्यातही जिवनसंगीत असते... (अथांग) -इनोबा जीवनाच्या 15 Jan 2008 - 1:38 am | प्राजु जीवनाच्या संगीतात तू माझा सूर आहेस माझ्या ललाटीचा तू नूर आहेस.. - प्राजु कुंकु 15 Jan 2008 - 1:49 am | इनोबा म्हणे तुझ्या ललाटी विधात्यानं माझंच नाव का बरे लिहावं? तूझ्या भांगातल्या कुंकूतही मी तुझा होऊन जगावं... (तूझाच) -इनोबा तूझ्या 15 Jan 2008 - 1:58 am | इनोबा म्हणे तूझ्या भांगात कुंकु भरताना तू किती स्वप्नं पाहीली होतीस खरं सांग तेव्हा तू स्वतःची किती राहीली होतीस? स्वप्न 15 Jan 2008 - 2:04 am | इनोबा म्हणे स्वप्न अधूरी सोडून तू जाशील असं वाटलं नव्हतं... सुखाची किरणे झाकोळणारं ढग तेव्हा दाटलं नव्हतं... (......) -इनोबा सुख म्हणजे काय? 15 Jan 2008 - 2:14 am | इनोबा म्हणे सुख म्हणजे काय?माझ्यासमोर सगळा पाढा त्याने पढला आणि एकांतात जाऊन दूखा:मूळे तो ढसाढसा रडला... ढग दाटून 15 Jan 2008 - 2:09 am | प्राजु ढग दाटून असे आले मनांत काहूरांचे गालवरती ओघळले थेंब कोणते... पावसाचे? - प्राजु. पाऊसही 15 Jan 2008 - 2:14 am | प्राजु पाऊसही असा वेड्यासारखा वागतो.. तुझ्यासोबत भिजावं तर.. फक्त शिंतोडे उडवून जातो - प्राजु छान आहे चरोळी.. भांगाची. वेडा आहे 15 Jan 2008 - 2:17 am | इनोबा म्हणे वेडा आहे मी असं तू सारखी म्हणतेस पण मला पाहिलं की तूच खरेतर वेड्यासारखी वागतेस... (का बरं?) -इनोबा रात्र अशी 15 Jan 2008 - 2:18 am | प्राजु रात्र अशी अबोल ढ्साढसा रडते रजनी नाथालाही अंधारातच ठेवते.. - प्राजु वेडा आहेसच 15 Jan 2008 - 2:20 am | प्राजु वेडा आहेसच तू हे काही नवे नाही मुक प्रेम करणे, तुला दुसरे काही हवे नाही - प्राजु. मी आहे जरा 15 Jan 2008 - 2:31 am | इनोबा म्हणे मी आहे जरा असा मनातूनच जगणारा प्रेमामधेही,मूक्या शब्दांसारखा वागणारा... शब्द मुके 15 Jan 2008 - 2:34 am | प्राजु शब्द मुके होतात वाणी द्वेश करते.. तुला पाहताक्षणी नजरच माझी बोलते.. - प्राजु. मूक प्रेम 15 Jan 2008 - 2:39 am | इनोबा म्हणे सगळ्याच गोष्टी सांगूनही तूला मला समजत नसतात... काही गोष्टी मूक्यानेही खुप काही बोलत असतात... (अव्यक्त) -इनोबा पानगळ 15 Jan 2008 - 2:43 am | इनोबा म्हणे शिशिराच्या पानगळीनं तो इतका झडला होता... माझ्याबरोबर बोलता बोलता मूक्यानेच रडला होता... -इनोबा खूप काही 15 Jan 2008 - 2:45 am | प्राजु खूप काही बोलूनही मी काहिच बोलले नाही तुझ्या दोन शब्दांनी मी माझीच उरले नाही.. - प्राजु तू हवीस फक्त 15 Jan 2008 - 2:52 am | इनोबा म्हणे तू हवीस फक्त आणखी काही मागत नाही तसा कधी कधी मी वेड्यासारखा वागत नाही... (ठार वेडा) -इनोबा गळताना 15 Jan 2008 - 2:48 am | प्राजु गळताना झाडावरून प्राजक्त मुसमुसतो.. क्षणभंगूर जीवन त्याचे पण आसमंत फुलवतो - प्राजु प्रेमाचा 15 Jan 2008 - 2:59 am | इनोबा म्हणे प्रेमाचा प्राजक्त प्रत्येकालाच हवा असतो, पण...प्रत्येकाच्या आसमंतात दरवळेल,याचा नेम नसतो वेड्यासार 15 Jan 2008 - 2:58 am | प्राजु वेड्यासारखे वागणे म्हणजे नक्की कसे? कमळामध्ये भुंग्याने मिटून जाणे जसे? - प्राजु. मिटणं 15 Jan 2008 - 3:09 am | इनोबा म्हणे मिटणं म्हणजे प्रेम असंही म्हणता येतं... प्रेमाशिवाय तरी कुठे जिवन हे जगता येतं...
प्रतिक्रिया
9 Jan 2008 - 1:21 am | प्राजु
पाऊस झिरमिर झिरमिर
पानापानात बरसतो
पाऊस अल्लड अवखळ
धरेशी पिंगा घालतो..
- प्राजु.
चला शो मस्ट गो ऑन...
9 Jan 2008 - 1:28 am | इनोबा म्हणे
पावसाच्या सरींनी
धरा न्हाऊन निघाली
अन नववधू सारखी
ती हिरवीगार झाली...
9 Jan 2008 - 1:28 am | ऋषिकेश
धरेशी पिंगा घालतो
पावसाचा गहिवर
की धरेस भेटाया बरसला
मेघकुंभ अतिआतुर
9 Jan 2008 - 1:35 am | प्राजु
पाण्यात वाकूनी तरू
प्रतिबिंब आपुले पाहते
क्षितिजाला टेकूनी नभ
धरेला गूज सांगते..
- प्राजु
9 Jan 2008 - 1:38 am | ऋषिकेश
धरेला गूज सांगते
अतिचपळ विद्युल्लता
धरणीही मग लाजून भिजते
ऐकून आकाशाची कथा
9 Jan 2008 - 1:40 am | प्राजु
ऋषिकेश....
फारच सुंदर...
बिलगूनी या धरेला आकाश गूज सांगते या गाण्याची आठवण झाली.
9 Jan 2008 - 1:40 am | ब्रिटिश टिंग्या
बरसणार्या मेघांच्या तालावरी
हिरवेगार पीक डौलती
जणू पावसाच्या स्पर्शाने
धरणीचे रोमांच उभे राहती
9 Jan 2008 - 1:44 am | प्राजु
लाजलाजली पाहूनी भास्करा
पांढ-या वस्त्रा आड लपली
हळूच सरला नाजूक पदर
अन अवनी ती धुंदित झाली
- प्राजु.
9 Jan 2008 - 1:50 am | इनोबा म्हणे
आज झाले मज काय
नाही 'मी' तो कालचा
काल मन माझे होते
आज 'मी' झालो मनाचा...
चला आज झोप अनावर झाली आहे,काही लिहायच्या मूड मधे नाही...सॉरी :(
उद्या पुर्ण तयारीत येईन आणि आजची कसूर काढीन....
(मनमौजी) -इनोबा
9 Jan 2008 - 1:52 am | ऋषिकेश
आज 'मी' झालो मनाचा
पण माझे मन आहे कोठे?
घेऊन गेलीस ते तुजसवे
आता उरले फक्त नाते
9 Jan 2008 - 1:56 am | प्राजु
धन्यवाद.. विनोबा,
उद्या या पुन्हा..असेच.
-प्राजु.
9 Jan 2008 - 2:01 am | इनोबा म्हणे
हो!नक्की येईन.तु दिवसभर येत नाहिस... नेमकी रात्रीच येतेस...फॉरेनला राहतेस की काय?
9 Jan 2008 - 2:00 am | ब्रिटिश टिंग्या
न लगे थांग तिच्या
अथांग मनाचा
गुंता कसा सोडवू मी
न उमजलेल्या भावनांचा
9 Jan 2008 - 2:13 am | प्राजु
मन माझे हिरवे हिरवे
घेई झेप आकाशी
पंख पसरूनी पुन्हा
विसावे तुजपाशी..
- प्राजु.
9 Jan 2008 - 2:04 am | प्राजु
अमेरिकेत आहे मी.
- प्राजु.
9 Jan 2008 - 2:22 am | प्राजु
माझ्या मनाचा थांग
मी कवितेतून मांडला
चारोळीतून शब्दांचा
सडाच इथे सांडला..
- प्राजु.
9 Jan 2008 - 2:29 am | ब्रिटिश टिंग्या
माझ्या मनाचा थांग
न समजला तिला
बांधून मोकळी झाली ती
राखी माझ्या हाताला :((
11 Jan 2008 - 12:08 am | प्राजु
खूप खोल जाऊनही
नाही समजले तिचे मन
तिने मात्र अर्पिले मला
तन, मन आणि धन..
- प्राजु.
11 Jan 2008 - 12:45 am | ब्रिटिश टिंग्या
तिच्या मनाच्या डोहात
मारूनी खोल बुडी
मला न समजे कोठे
माझ्याबद्दलची भावना दडी
(दडलेला) छोटी टिंगी
11 Jan 2008 - 1:25 am | प्राजु
भवनेला शब्दात गुंफून मी
कागदावर ठेवले..
माझे मनंही नकळत
अश्रू बनून ओघळले..
- प्राजु.
11 Jan 2008 - 1:50 am | इनोबा म्हणे
पुस डोळे सखे आता
सांग तुला हवे काय...?
माझं मन हे अबोल
जशी दूधावर साय...
(फणसा सारखा) -इनोबा
11 Jan 2008 - 1:53 am | प्राजु
अबोल अबोली फुलून आली
आज माझ्या अंगणी..
हजार नक्षत्रे क्षणात हसली..
रूप तिचे पाहूनी..
- प्राजु.
11 Jan 2008 - 2:07 am | इनोबा म्हणे
तुझं रूप हे लोभस
तरीही का मन भकास
तुझं हसणं हे असणं
आणि मी आहे आभास
(मन माझे हे...) -इनोबा
11 Jan 2008 - 10:15 pm | सनिल पांगे
तसं पाहीलं तर
खेळला तर जुगारही चांगला आहे
काहीचं नसण्या पेक्षा
मोल आला तर भंगारही चांगला आहे
@सनिल
11 Jan 2008 - 11:25 pm | प्राजु
तुझं हसणं जणू
चांदण्यांच शिंपणं...
तुझ्यात गुंतून माझा
'मी'पणा संपणं...
- प्राजु..
13 Jan 2008 - 6:40 pm | सुधीर कांदळकर
शिंपलेस तू
हृदयांत मिपाकरांच्या
प्रीतिचे मळे
मनांत नाचले त्यांच्या मोर कां बरे
13 Jan 2008 - 9:07 pm | सनिल पांगे
प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचा
नुसता ऐकला तरी हर्ष होतो
आणि ऊच्चारला तर
दोन ओठांमध्ये स्पर्श होतो
@ सनिल
13 Jan 2008 - 10:39 pm | प्राजु
मनांत माझ्या
मोराची केकारव
मिपाकरांचे प्रेम असेच मिळो
हीच देवाकडे आर्जव..
- प्राजु
15 Jan 2008 - 1:16 am | इनोबा म्हणे
मोर नाचला वनात
हर्ष माझीया मनात
त्याचे मन दुखी: कष्टी
अशृ लपती पाण्यात
(पावसाच्या थेंबातही त्याचे दूखः पाहू शकणारा) -इनोबा
15 Jan 2008 - 1:28 am | प्राजु
समुद्राने एकदा
गोड व्हायचं ठरवलं
माशांच्या अश्रुंनी
सारं पाणी खारावलं..
- प्राजु
15 Jan 2008 - 1:34 am | इनोबा म्हणे
सागराच्या खारट उदरामधे
जिवन कसे रंगीत असते
तो कसाही असला तरी
त्याच्यातही जिवनसंगीत असते...
(अथांग) -इनोबा
15 Jan 2008 - 1:38 am | प्राजु
जीवनाच्या संगीतात
तू माझा सूर आहेस
माझ्या ललाटीचा
तू नूर आहेस..
- प्राजु
15 Jan 2008 - 1:49 am | इनोबा म्हणे
तुझ्या ललाटी विधात्यानं
माझंच नाव का बरे लिहावं?
तूझ्या भांगातल्या कुंकूतही
मी तुझा होऊन जगावं...
(तूझाच) -इनोबा
15 Jan 2008 - 1:58 am | इनोबा म्हणे
तूझ्या भांगात कुंकु भरताना
तू किती स्वप्नं पाहीली होतीस
खरं सांग तेव्हा तू
स्वतःची किती राहीली होतीस?
15 Jan 2008 - 2:04 am | इनोबा म्हणे
स्वप्न अधूरी सोडून तू
जाशील असं वाटलं नव्हतं...
सुखाची किरणे झाकोळणारं
ढग तेव्हा दाटलं नव्हतं...
(......) -इनोबा
15 Jan 2008 - 2:14 am | इनोबा म्हणे
सुख म्हणजे काय?माझ्यासमोर
सगळा पाढा त्याने पढला
आणि एकांतात जाऊन दूखा:मूळे
तो ढसाढसा रडला...
15 Jan 2008 - 2:09 am | प्राजु
ढग दाटून असे आले
मनांत काहूरांचे
गालवरती ओघळले
थेंब कोणते... पावसाचे?
- प्राजु.
15 Jan 2008 - 2:14 am | प्राजु
पाऊसही असा
वेड्यासारखा वागतो..
तुझ्यासोबत भिजावं तर..
फक्त शिंतोडे उडवून जातो
- प्राजु
छान आहे चरोळी.. भांगाची.
15 Jan 2008 - 2:17 am | इनोबा म्हणे
वेडा आहे मी
असं तू सारखी म्हणतेस
पण मला पाहिलं की
तूच खरेतर वेड्यासारखी वागतेस...
(का बरं?) -इनोबा
15 Jan 2008 - 2:18 am | प्राजु
रात्र अशी अबोल
ढ्साढसा रडते
रजनी नाथालाही
अंधारातच ठेवते..
- प्राजु
15 Jan 2008 - 2:20 am | प्राजु
वेडा आहेसच तू
हे काही नवे नाही
मुक प्रेम करणे, तुला
दुसरे काही हवे नाही
- प्राजु.
15 Jan 2008 - 2:31 am | इनोबा म्हणे
मी आहे जरा असा
मनातूनच जगणारा
प्रेमामधेही,मूक्या
शब्दांसारखा वागणारा...
15 Jan 2008 - 2:34 am | प्राजु
शब्द मुके होतात
वाणी द्वेश करते..
तुला पाहताक्षणी
नजरच माझी बोलते..
- प्राजु.
15 Jan 2008 - 2:39 am | इनोबा म्हणे
सगळ्याच गोष्टी सांगूनही
तूला मला समजत नसतात...
काही गोष्टी मूक्यानेही
खुप काही बोलत असतात...
(अव्यक्त) -इनोबा
15 Jan 2008 - 2:43 am | इनोबा म्हणे
शिशिराच्या पानगळीनं
तो इतका झडला होता...
माझ्याबरोबर बोलता बोलता
मूक्यानेच रडला होता...
-इनोबा
15 Jan 2008 - 2:45 am | प्राजु
खूप काही बोलूनही
मी काहिच बोलले नाही
तुझ्या दोन शब्दांनी
मी माझीच उरले नाही..
- प्राजु
15 Jan 2008 - 2:52 am | इनोबा म्हणे
तू हवीस फक्त
आणखी काही मागत नाही
तसा कधी कधी मी
वेड्यासारखा वागत नाही...
(ठार वेडा) -इनोबा
15 Jan 2008 - 2:48 am | प्राजु
गळताना झाडावरून
प्राजक्त मुसमुसतो..
क्षणभंगूर जीवन त्याचे
पण आसमंत फुलवतो
- प्राजु
15 Jan 2008 - 2:59 am | इनोबा म्हणे
प्रेमाचा प्राजक्त
प्रत्येकालाच हवा असतो,
पण...प्रत्येकाच्या आसमंतात
दरवळेल,याचा नेम नसतो
15 Jan 2008 - 2:58 am | प्राजु
वेड्यासारखे वागणे
म्हणजे नक्की कसे?
कमळामध्ये भुंग्याने
मिटून जाणे जसे?
- प्राजु.
15 Jan 2008 - 3:09 am | इनोबा म्हणे
मिटणं म्हणजे प्रेम
असंही म्हणता येतं...
प्रेमाशिवाय तरी कुठे
जिवन हे जगता येतं...