स्थापत्य- एक कला

प्यारे१'s picture
प्यारे१ in जनातलं, मनातलं
15 Oct 2015 - 4:08 am

मूलभूत गरजां पैकी शेवटची पण महत्त्वाची गरज म्हणजे निवारा. आदिमानवाच्या गुहेपासून ते आताच्या प्रचंड आलिशान घरांपर्यंत खरंतर घर म्हणन्यापेक्षा महाल, राजवाड़े किंवा आपल्या भाषेत 'पॅलेस' म्हणावं अशा अनेक इमारती निवारा याच सदरात येतात. निवाऱ्याबरोबरच आणखी काही गरजा भागवण्यासाठी करावं लागणारं तात्पुरतं बांधकाम ते त्याच गरजेचं आपल्या सत्ता, संपत्ति, सामर्थ्याच्या अभिव्यक्ती करता वापरल्या जाणाऱ्या दृश्य रुपाला कदाचित स्थापत्यकला मानलें जावं. मी कुणीतरी मोठा, लोकोत्तर म्हणून काहीतरी अचाट घडवेन या भावनेतून जगातली काही स्थापत्य शिल्पं बनली. काही संरक्षणाच्या दृष्टीनं, काही दिखावा म्हणून तर काही व्यापारासाठी, बरीच गरज म्हणून देखील घडली. चीनच्या भिंतीपासून अनेक गड़किल्ले, भव्य पुतळे, धरणं, कालवे, पूल, बोगदे याचीच प्रतिकं.
आता एवढ्या मोठ्या पातळीवर विचार न करता सध्याच्या स्थापत्याबाबत विचार करावा इतपत साधा प्रयत्न आहे. सहजसाध्य वाटल्यानं आणि भरघोस आर्थिक उत्पन्न मिळू शकल्यानं शिरलेल्या अपप्रवृत्तीनी भरपूर बदनाम झालेल्या या क्षेत्राकड़े योग्य प्रकारे पाहिल्यास एक समाधानाची भावना निश्चित दिसू शकेल.
वर सगळीकडं मी स्थापत्य कला म्हणतोय कारण त्यात मला कला दिसते जाणवते. अगदी साध्यातल्या साध्या इमारतीच्या उभारणीमध्ये देखील कला असते. सगळ्यांचा विचार करण्यापेक्षा आपल्या घराच्या रचनेचा विचार केला तरी आपल्याला ते पटेल.
एक घर किंवा एक इमारत कशी बनते हे आता पाहू. काही इंग्रजी शब्द येतील ते सोपे करण्याचा प्रयत्न करेन. कुठल्याही इमारतीमध्ये सगळ्यात वरुन खालच्या आणि तिथून आणखी खालच्या बाजूला वजन (लोड) स्थानांतरीत होत असतं. यात सुद्धा लाईव्ह लोड म्हणजे व्यक्ति किंवा वस्तू ज्या एका जागेवरून दुसरीकडे हलू शकतात तर डेड लोड म्हणजे बांधकामाचं स्वत:चं वजन असे प्रकार असतात. स्वत:च्या वजनात लोखंड, खड़ी,वाळू,सिमेन्ट,विटा, टाईल्स यांच्या घनतेनुसार वजन गृहीत धरलं जातं. इमारतीचा आराखडा नि सांगाडा बनवताना याचा एका अधिकच्या संरक्षक आकड्यासहीत (सेफ्टी फैक्टर) विचार होतो. याबरोबर भूकंपामुळे येऊ शकणारे हादरे, उंच इमारतीमध्ये वाऱ्याचा दाब, पाणथळ किंवा दलदलीच्या जमिनीच्या जागी इमारतीच्या वजनामुळे वरुन आलेल्या वजनाला विरोध करणारा खालच्या बाजूनं येणारा दाब, मातीची क्षमता असे अनेक विषय इमारत बनवण्या आधी विचारात घ्यावे लागतात. हे सगळं व्यवस्थित विचारात घेऊन बनतो इमारतीचा सांगाडा. कुठेही भिंत घातली, कुठलाही खांब काढला किंवा कुठेही slab ला छिद्र पाडलं असं चालत नाही त्याबरोबरच कुठल्याही नाल्याशेजारी अथवा नदीशेजारी पाया रचून देखील.
वरील गोष्टीन्चा विचार करून इमारतीचा सांगाडा बनवणं हे निष्नात आणि अधिकृत व्यक्ति किंवा संस्थेकडून केलं जातं त्याला स्ट्रक्चरल इंजीनियर म्हणतात. मातीची आवश्यक क्षमता पारखण्याचं वेगळंच क्षेत्र स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये आहे त्याला सॉइल इंजीनियरिंग म्हणतात तर इमारत उभी राहताना नेमकी कशी उभी राहील हे आर्किटेक्ट पाहतो.
आर्किटेक्टच्या अचाट नि अतर्क्य स्वप्नाला स्ट्रक्चरल इंजिनीयरच्या ताकदवान सांगाड्यासहीत असेल त्या मातीच्या पायात उभा करतो तो कंत्राटदार/कॉंट्रॅक्टर.
लक्षावधी इमारती व्यवस्थित उभ्या असताना नि संपूर्ण मानवजातीचं रक्षण करताना आपण त्या उभ्या करण्यामागचे कष्ट सुद्धा लक्षात घेतले पाहिजेत.
सध्या एवढंच. आवडलं तर पुढे लिहीन.

मांडणी

प्रतिक्रिया

एका नवीन विषयाच्या लेखाला सुरुवात केली तो विषय सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आणि मुलभूत गरजेचा आहे.वेळोवेळी प्रश्न विचारेनच.लवकर लिहा पुढचे भाग.

चांदणे संदीप's picture

15 Oct 2015 - 8:02 am | चांदणे संदीप

प्यारेदादा... लवकर लवकर लिहा. वाट बघतोय!
(पण हा धागा असा का दिसतोय? प्रतिसाद लिहिल्यासारखा.)

मुक्त विहारि's picture

15 Oct 2015 - 8:34 am | मुक्त विहारि

पुभाप्र

खटपट्या's picture

15 Oct 2015 - 8:41 am | खटपट्या

मस्त !! माझ्या आवडीच्या विषयाला हात घातलात. भराभर लीहा. माझ्या बर्‍याच शंका असतील...

प्यारे१'s picture

15 Oct 2015 - 10:31 am | प्यारे१

@ कंजूस काका, मुवि, खटपट्या
धन्यवाद. इथे शंका विचारल्या तरी माझ्या ताकदीनुसार उत्तरं देईन. मी स्थापत्य अभियांत्रिकीच्या 'व्यावसायिक' विभागाचा हिस्सा आहे. त्यामुळे डिझाइन किंवा स्ट्रक्चरशी कमी संबंध आहे. तरीही उत्तरं मिळवून देता येतील.
@ संदीप,
मोबाइल वरुन टंकलं होतं. त्यामुळे व्यवस्थित लिहीता आलेलं नाही.

सौंदाळा's picture

15 Oct 2015 - 10:38 am | सौंदाळा

वाचतोय.
जुन्या इमारतींचे (आरसीसी, लोड बेअरिंग) स्ट्रक्चरल ऑडीट कसे करतात आणि त्यात काय निकष असतात?

मांत्रिक's picture

15 Oct 2015 - 11:02 am | मांत्रिक

मस्तंय विषय! बाकी हेच विचारणार होतो कि लोड बेयरिंग आणि कॉलम या टर्म्स बरेच वेळा ऐकल्यात. त्याचा अर्थ काय?

लोड बेयरिंग चा अर्थ जसं शब्द सुचवतात त्यापद्धतीनं इमारतीचं वजन सर्वांगांनी वरुन खाली स्थानांतरित होतं ( लोड पास होतं)
यात भिंती छपराचं वजन तोलून धरण्यास आवश्यक असतात.
आर सी सी म्हणजे reinforced cement concrete च्या सांगाड्यात हे काम सांगाड्यातले मुख्य घटक जे की slab ( मजल्याचा आडवा पृष्ठ क्षेत्रफलाचा भाग) त्याला तोलणारे आणि लागून असलेले आडवे भाग (beams) आणि या सगळ्याचं वजन तोलणारे उभे मेंबर म्हणजे columns.

साधारण दहीहंडीचा मनोरा म्हणजे एक इमारत मानावी. 60-70-80 वर्षं उभा मनोरा.

स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये (माझा विषय नाही हा खरंतर त्यामुळे कितपत जमेल ठाऊक नाही पण) मुख्यत्वे इमारतीच्या याच वजन तोलून धरण्याच्या क्षमतेची तपासणी होते.

प्रत्येक गोष्ठीचं आपलं एक वय असतं. इमारतीचंही असतं. विघटनाची क्रिया पदार्थात् सातत्यानं होत असते. इमारत एकसंधपणं उभी राहण्यासाठी आवश्यक असलेले घटक पन्नास साठ वर्षं ऊन पाऊस वारा आणि प्रदूषण या घटकांमुळे प्रभावित होतात नि त्याच्यात रासायनिक प्रक्रिया झाल्यानं त्याची धरून राहण्याची क्षमता हळू हळू कमी होते.
या गोष्टी कितपत तग धरून राहतील याची चाचणी म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिट.
लोखंड पाण्याशी संपर्क आला की गंजतं म्हणजे ते हळूहळू सुटायला लागतं. विशिष्ट व्यासाचा लोखंडी बार पिळ देऊन आणखी मजबूत केलेला असतो ज्यामुळे तो आणखी ताण सहन करु शकतो. नैसर्गिकरित्या अनेक वर्षांनी त्या ची ताण सहन करण्याची शक्ती कमी होते. ते या ऑडिट मधून समजू शकतं. सरासरी एकदा एका टप्प्यानंतर ताकद कमी व्हायला सुरुवात झाली की बास च करणं इष्ट.

मांत्रिक's picture

15 Oct 2015 - 11:39 am | मांत्रिक

भिंती छपराचं वजन तोलून धरण्यास आवश्यक असतात.
slab ( मजल्याचा आडवा पृष्ठ क्षेत्रफलाचा भाग) त्याला तोलणारे आणि लागून असलेले आडवे भाग (beams) आणि या सगळ्याचं वजन तोलणारे उभे मेंबर म्हणजे columns.
विशिष्ट व्यासाचा लोखंडी बार पिळ देऊन आणखी मजबूत केलेला असतो ज्यामुळे तो आणखी ताण सहन करु शकतो.

धन्यवाद! या गोष्टी अगदी नव्याने कळल्या.
ओळंबा वापरणे म्हणजे काय? ते एक मला कधीच कळत नाही. ओळंबा वापरुन भिंत सरळ रेषेत आहे हे कसं कळतं?
वापरताना पाहिलाय, पण काय चाललंय समजलं नाही.

प्यारे१'s picture

15 Oct 2015 - 12:00 pm | प्यारे१

भोवऱ्या सारखा दिसणारा पण धातूचा एक गोळा असतो ज्याला भोवऱ्याच्या मोठ्यात मोठ्या व्यासाच्या लाम्बी एवढीच् एक धातूची गोल नळी मधोमध एका पातळ पण मजबूत दोऱ्यानं जोडलेली असते. ही गोल नळी (जमिनीला समांतर आणि सरकती असते) आणि भोवरा यांचा अक्ष एक असतो. ही झाली ओळंब्याची रचना https://www.google.dz/search?q=plumb+bob&client=ms-android-lge&espv=1&gb...

हे वापरताना मुख्यत्वे गुरुत्वाकर्षणावर काम होतं. काम सुरु असताना ओलंब्याचा दोरा वरची नळी हातात धरून खाली सोडायचा. साधारण सात आठ फुट किंवा आवश्यक असेल तितका खाली सोडून गोळा स्थिर झाल्यावर वरची नळी बांधकामाला/कॉलमला लावून चेक करायचं की खालचं पृष्ठभागाचं गोळ्यापासूनचं अंतर नि वरचं पट्टीपासूनचं अंतर समान असायला हवं. गोळा फ्रीली उभा हवा.कुठंही चिकटवून योग्य रिजल्ट मिळणार नाही.

नीलमोहर's picture

15 Oct 2015 - 11:48 am | नीलमोहर

"आवडलं तर पुढे लिहीन"
- आवडलं आहे, अधिक माहिती जाणून घ्यायची गरजही आहे.

पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.

सुबोध खरे's picture

15 Oct 2015 - 11:52 am | सुबोध खरे

प्यारे साहेब
लेखमालेची सुरुवात छान झाली आहे.
लोकांच्या काही जिव्हाळ्याच्या विषयांपासून सुरुवात केलीत तर लोकांना त्यात जास्त रस निर्माण होईल असे मला वाटते. उदा छपरातील गळती
किंवा इमारतीला तडे जाणे. कारण आमच्या सारख्या सामान्य माणसाना तांत्रिक गोष्टीत रस कमी असतो पण प्रत्यक्ष येणाऱ्या प्रश्नाची चर्चा जास्त आवडते असे वाटते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Oct 2015 - 12:06 pm | कैलासवासी सोन्याबापु

लिखो भैबा! हम पढ़ैबे कर रहैस!!

एस's picture

15 Oct 2015 - 12:12 pm | एस

पुभाप्र.

पद्मावति's picture

15 Oct 2015 - 2:09 pm | पद्मावति

उत्तम लिहिलंय. या विषयावर अजुन वाचायला आवडेल.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

15 Oct 2015 - 2:27 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

माहितीपूर्ण लेख रे प्यार्‍या.
मोठ्या,उंच ईमारतींसाठी फाउण्डेशन इंजिनियर्स असतात असे ऐकले आहे.फाउण्डेशन ईण्जिनियरिंग ही सिव्हिलमधील एक शाखा आहे.

प्यारे१'s picture

15 Oct 2015 - 3:59 pm | प्यारे१

होय.
सॉईल अ‍ॅण्ड फाऊन्डेशन इन्गिनिअरींग हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.

उगा काहितरीच's picture

16 Oct 2015 - 12:56 am | उगा काहितरीच

वाचतो आहे, येऊ द्या पुढील भाग लवकर .

तर्राट जोकर's picture

16 Oct 2015 - 1:16 am | तर्राट जोकर

प्यारेसर, आपके पास अणुभव का खजाना हय. आप उसमेंसे अईसा चिमूटभर मत फेंको ना हवामें.

और आने दो. वेगळा व अतिशय महत्त्वपूर्ण विषय आहे स्थापत्य, माणसाच्या सगळ्या कलांचा मेळ साधणारं, सगळ्या बुद्धीचा कस पाहणारं. एखादी लेखमाला करून टाका हलक्याफुलक्या शैलीत. खरंच मजा येइल...

प्यारे१'s picture

16 Oct 2015 - 1:45 am | प्यारे१

सर-पण देऊ नका मालक.
लेखमालाच काय पण अनेक पुस्तकं होतील असं मटेरियल आहे खरं. :)

रामपुरी's picture

16 Oct 2015 - 1:24 am | रामपुरी

पु ले प्र

श्रीरंग_जोशी's picture

16 Oct 2015 - 3:05 am | श्रीरंग_जोशी

हा विषय एकदम रोचक आहे. नेहमी संबंध येऊनही याबाबत संबंधीत नसणार्‍यांना फारसे ज्ञान नसते अन सहजपणे समजेल अशा भाषेत वाचायला मिळत नाही.

सदर लेखमालिका ही कमी भरून काढेल असा विश्वास वाटतो.
पुभाप्र.

दत्ता जोशी's picture

16 Oct 2015 - 1:17 pm | दत्ता जोशी

पुढील भाग प्रतीक्षेत.

टवाळ कार्टा's picture

16 Oct 2015 - 2:01 pm | टवाळ कार्टा

उत्तम :)
आणि प्यारेबुआ लिहिते झाले :)

द-बाहुबली's picture

16 Oct 2015 - 2:39 pm | द-बाहुबली

प्यारे धागा लेखक ? म्हंटलं दिवाळीअंक इतक्या लवकर आला पन ?

आपल्याला घरे बनवावी लागतात कारण वी सिक्स एक्सपिरीअन्सेस दॅट ड्सनॉट एग्झिस्ट नेचुरॅली अँड नीड टु बी क्रिटेड ऑर्टीफिशीअली. सो अ‍ॅज लाँग अ‍ॅज यु फुल्फील थॅट हंगर ओफ एक्सपिरीन्स. योर स्थापत्यकला विल रॉक...!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Oct 2015 - 3:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आर्किटेक्चर आणि सिव्हिल मधला फरक पण सांगा.

आर्किटेक्चर ... प्लॅनिंग व डिझायनिंग

सिव्हिल .... प्रत्यक्ष उभारणी करणे

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Oct 2015 - 11:15 am | कैलासवासी सोन्याबापु

आर्किटेक्चर = झकास पोरी

सिविल = तेच आपलं छोटी गोल्डफ्लेक अन कटिंग चहा विथ खुरटी दाढ़ी

(समस्तांस विनंती) कृपया हलके घेणे

एक एकटा एकटाच's picture

17 Oct 2015 - 4:30 pm | एक एकटा एकटाच

हां हां हां

structural इंजीनियरिंग ( स्ट्रक्चरल डिज़ाइन) हे खुप विस्तृत क्षेत्र आहे. ते फक्त रेजिडेंशियल,कमर्शियल किंवा पब्लिक बिल्डिंग्स एव्हडयाशीच मर्यादित नसून मोठ मोठे इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स चे डिज़ाइन जसे, ऑईल& गॅस, पेट्रोकेमिकल प्रोजेक्ट्स, इंफ्रास्ट्रक्चर, पॉवर प्लांट्स, ब्रिजेस ह्या सर्व क्षेत्रात स्ट्रक्चरल इंजीनियरिंग ला अतिशय महत्व आहे..( आर्किटेक्ट ला नाही ! म्हणजे आर्किटेक्ट ची गरज नसते)
रेजिडेंशियल,कमर्शियल किंवा पब्लिक बिल्डिंग्स मधे आर्किटेक्ट चा रोल महत्वाचा असतो. उपलभ्ध जमिनीच्या( plot ) आकरमाना प्रमाणे आणि प्रमाणित एफ.एस.आए. नुसार आर्किटेक्ट आर्किटेक्चरल ड्राइंग्स तयार करतो जसे प्लान, एलेवेशंस, सेक्शंस ई. आणि मंजूर करून घेतो. (आर्किटेक्चरल ड्राइंग्स तयार करत असताना तो स्ट्रक्चरल इंजीनियर चा सल्ला घेतो किंवा घ्यावा लागतो) . त्यानंतर स्ट्रक्चरल इंजीनियर स्ट्रक्चरल एनालिसिस ( हयात बीम, कॉलम मधील फोर्सेस, शियर, बेन्डिंग मोमेंट ई.) करून डिज़ाइन ( मेंबर sizes, स्टील रेइनफोर्सेमेंट) करतो. स्ट्रक्चरल एनालिसिस हे अतिशय जिकारीचे आणि महत्वाचे काम असते. ह्यात बाह्य बलांमुळे(forces - जसे डेड लोड, लाइव लोड, विंड लोड आणि सेस्मिक म्हणजे भूकम्प ई.) स्ट्रक्चर वर काय परिणाम होईल ह्याचा अभ्यास होतो. स्ट्रक्चरल एनालिसिस वरुन फाउंडेशन वर किती लोड येईल हे समजते आणि मग geotechnical engineer च्या सल्ल्या नुसार ( pile फाउंडेशन, राफ्ट फाउंडेशन, आइसोलेटेड फूटिंग्स ई.) डिज़ाइन होते.
थोडक्यात स्ट्रक्चरल इंजीनियर , आर्किटेक्ट च्या स्वप्ननांना मूर्त स्वरुप देतो.

स्ट्रक्चर किंवा बिल्डिंग ची safety आणि economy स्ट्रक्चरल इंजीनियर वर अवलंबून असते.
ही जी काही स्ट्रक्चर एनालिसिस आणि डिज़ाइन ची प्रोसेस वर सांगितली आहे ती त्या त्या देशाच्या स्टैंडर्ड्स आणि कोड्स नुसार करणे स्ट्रक्चरल इंजीनियर वर बंधन कारक असते..जसे इंडियन कोड्स, अमेरिकन, रशियन, ब्रिटिश, जर्मन ई. तरीही स्ट्रक्चरल एनालिसिस ही गोष्ट यूनिवर्सल असते.

एक एकटा एकटाच's picture

17 Oct 2015 - 10:52 am | एक एकटा एकटाच

इंडस्ट्रिअल डिझाईन वर विस्तृत लेख लिहाच.

पैसा's picture

17 Oct 2015 - 12:13 am | पैसा

पुभाप्र

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Oct 2015 - 12:26 am | डॉ सुहास म्हात्रे

खोलात माहिती नसताना नेहमी बर्‍याच चर्चेत असलेल्या विषयावरची लेखमाला !

पुभाप्र.

दीपा माने's picture

17 Oct 2015 - 8:25 am | दीपा माने

माझी मेडिकलची बॅकग्राउंड असुनही पती आर्किटेक्ट असल्याने हे माहीत आहे की आर्किटेक्टला वास्तुचे डिझाईन करताना त्याचा aesthetic and sustainable दृष्टिकोनातूनही विचार करावा लागतो.

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Oct 2015 - 9:25 am | ज्ञानोबाचे पैजार

एका नव्या विषयाची माहिती मिळणार आणि त्या निमित्ताने आमचे परममित्र प्यारे गुरुजी लिहिते झाले.

चला येउद्या पुढचे भाग पटापटा

पैजारबुवा,

दिवाकर कुलकर्णी's picture

17 Oct 2015 - 10:41 am | दिवाकर कुलकर्णी

फ़ार बाळबोध नको
ओळंबा मिपावर समजाऊन सागायचा म्हणजे स्पुन फिडीग होतंय

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Oct 2015 - 10:56 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मे बी तुमच्यासाठी स्पुन फिडिंग असेल पण ज्यांना माहिती करुन घ्यायची आहे त्यांच्यासाठी ही संधी आहे. सगळ्यांना सगळ्या क्षेत्रातली माहिती असेल का?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Oct 2015 - 10:55 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

रच्याकने एक प्रश्ण आहे. समजा मी राजस्थानसारख्या ठिकाणी रहातोय. जिथे दिवसा भयानक उकाडा आणि रात्री थंडी असते. अश्या ठिकाणी स्ट्रक्चर मधे वापरलेल्या स्टीलच्या एक्सपांशन आणि काँट्रॅक्शन चा कॉलम्स आणि बीमच्या सिमेंट मिक्सचर वर काय परिणाम होतो? एक्सपांशन/ काँट्रॅक्शनमुळे कॉलम्स आणि बीम्स च्या क्षमतेवर काय परिणाम होतो? उसकु काँपेन्सेट करणेके वास्ते क्या प्रोव्हिजन होना. येउंद्या येउंद्या अजुन १३ प्रश्ण तयार आहेत माझ्याकडे :)!!!

एक एकटा एकटाच's picture

17 Oct 2015 - 10:26 pm | एक एकटा एकटाच

बहुतांश इमारती मध्ये तापमानाच्या तफ़ावती मुळे काही अतिरिक्त forces निर्माण होतात.
त्यांची काळजी घेण्यासाठी बरेच प्रकार आहेत जे मुख्यत:वे इमारतीच्या प्लान आणि मुख्य करून त्याच्या लांबीवर डिपेंड असते.
तत्कालीन design code नुसार इमारती लांबी ठेवल्यास किंवा अतिरिक्त लांबी साठी प्रॉपर expansion gap ठेवल्यास बर्यापैकी ह्या forces पासून रिलीफ मिळतो.
जार अशी रचना करण्यास काही अडथळा असल्यास जे काही structural components आहेत ( slab beam column) ते ह्या temperature forces साठी design code नुसार design आणि detailed करावे लागतात.
अजुन एक अश्या इमारती मध्ये भिंति ह्या विटांच्याच वापराव्यात concrete block चा वापर शक्यतो टाळावा.

प्यारे१'s picture

17 Oct 2015 - 10:32 pm | प्यारे१

याबरोबर तापमानात खूप जास्त तफावत निर्माण होऊ नये म्हणून इपॉक्सि कोटिंग करतात. It minimises the temp. differences.

एक एकटा एकटाच's picture

17 Oct 2015 - 10:34 pm | एक एकटा एकटाच

बरोबर

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Oct 2015 - 11:58 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आमच्या यंत्रतोडीमधे आम्ही डायमेंन्शनमधे अ‍ॅडजस्ट करतो एक्स्पांशन आणि काँट्रॅक्शनला सिव्हील वाले कसं करत असतील त्याची कायम उत्सुकता होती.

मस्त लेख आहे. लिहीत सुटा आता धाडधाड. आउर आन्दो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Oct 2015 - 11:20 am | कैलासवासी सोन्याबापु

प्यारे भाय,

ससुरे तुहार फिरकी कसने वाली कॉमेंटवा के बाद ई सब बहुतै रिफ्रेशिंग बा!! बिनती करैस की इकरा के जारी रखो!

ऑन अ सीरियस नोट

आजच्या तांत्रिक युगताली megastructure कौतुकास्पद असली तरीही पुरातन वंडर्स ही कुतुहलाचा विषय असतात (आम्ही इतिहास वाले) अश्या इमारती उदा इस्तांबुल ची ब्लू मॉस्क किंवा कॅपिटल बिल्डिंग ब्रिटिश पार्लियामेंट ताजमहाल किंवा अपल्याकडले बृहड़ेश्वर मंदिर मिनाक्षी मंदिर ह्यांच्यावर तुमचा स्थापत्य अभियांत्रिकी नजरिया वाचायला तूफ़ान आवडेल प्यारे भाई

कंजूस's picture

17 Oct 2015 - 5:30 pm | कंजूस

"किंवा कॅपिटल बिल्डिंग ब्रिटिश पार्लियामेंट ताजमहाल किंवा अपल्याकडले बृहड़ेश्वर मंदिर मिनाक्षी मंदिर ह्यांच्यावर तुमचा स्थापत्य अभियांत्रिकी नजरिया वाचायला तूफ़ान आवडेल प्यारे भाई"
शिवाय राष्ट्रपति भवन यांवर डिस्कवरीवर कार्यक्रम झाले आहेत ,परंतू एक दोन महिन्यांपूर्वी हिस्ट्री टिव्ही 18 चे दाखवलेले अधिक आवडले.ते पुन्हा इथे लिहिण्यात अर्थ नाही.

आपल्या सर्वांसाठी खरंतर कामाचे दोन प्रकारचे प्रश्न आहेत-
१) नवीन घर ( स्वत:च्या प्लॅाटवर )बांधणाय्रांसाठी आगावू सूचना कोणत्या?
२) फ्लॅट/ब्लॅाक वगैरे जो बिल्डरने आपल्या गळ्यात मारलेला असतो ( =त्याची जाहिरात ड्रीम होम असते ) त्यांची इंचइंच जागा कशी खुबीने वापरता येईल.

बाकी ते एंजिनिअरिंग शब्दांची पत्तेपिसणी राहू दे बाजूला.पहिला धडधडीत प्रश्न { काल्पनिक असला तरी } कॅप्टन चिमणने विचारला आहे आणखी बारा विचारून झाल्यावर तिकडे वसाहत उभी करणार आहेत.

वेळ काढून वाचण्यासाठी लेख ठेवला होता.
आवडला.
अजून सविस्तर येउद्या...

'पिंक' पॅंथर्न's picture

17 Oct 2015 - 7:01 pm | 'पिंक' पॅंथर्न

मी आर्कीटेक्ट आहे..

आर्किटेक्चरचं मराठीत भाषांतर "वास्तुविद्या" असं आहे आणि आर्किटेक्टचं मराठी भाषांतर "वास्तुविद्य" असं आहे. कॉलेजला वर्गांच्या पाट्या प्रथम वर्ष वास्तुविद्या, पंचम वर्ष वास्तुविद्या अशा असतात.

"वास्तुशात्र" आणि "वास्तुविद्या" या दोन वेगळ्या शाखा आहेत. पण अजुनही काही लोकं आर्किटेक्टकडे येवुन वास्तुशात्राचे प्रश्न विचारीत असतात. आर्कीटेक्टही बाहेर वास्तुशात्राचे जुजबी ज्ञान मिळवतात. पण प्रत्यक्ष कॉलेजमधील अभासक्रमात त्याचा समावेश नसतो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Oct 2015 - 12:01 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

फार आधीपासुन एक नतद्रष्ट जोक ऐकत आलोय

आर्किटेक्ट्स आर सिव्हील इंजिनिअर्स विथाउट मॅथ्स.

त्यामधे किती तथ्य आहे ते तपासुन पहात होतो. :)

सध्याच्या भाषेत आर्किटेक्ट म्हणजे वाल्मिकी. पुष्पक विमानाची कल्पना करणारा. अमुक असावं, तमुक असावं, असं असावं, तसं असावं म्हणणारा. सिविल इंजीनियर म्हणजे त्या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवणारा '...' मानायला हरकत नाही.

चला म्हणजे पौराणीक भारतीय लोक कितीतरी आधुनीक अशा आजच्या काळातल्या कल्पनांचे किमान आर्कीटेक्ट तर नक्किच होते हे आता प्यारेंच्या विज्ञानाने व विधानाने सिध्दा झाले म्हणायचे तर ? गूड जोब .

'पिंक' पॅंथर्न's picture

18 Oct 2015 - 5:10 pm | 'पिंक' पॅंथर्न

आर्किटेक्चर च्या आभासक्रमात मॅथ्स चा समावेश असतो. पण बिल्डींग स्टॅबीलीटी पेक्षा डिझाईन वर जास्त भर दिला जातो. आर्कीटेक्टने जरी कॉलम / स्टील वगैरे डिझाईन केले तरी त्याला स्ट्रक्चरल इंजिनिअरची सही/ मान्यता असल्याशिवाय ऑथंटीक डाक्युमेंट म्हणता येत नाही....

इन्ना's picture

19 Oct 2015 - 12:17 pm | इन्ना

ह्यात अजिबातच तथ्य नाही. इम्जिइनियरिंग डिझाइन ( स्ट्रेन्थ ऑफ मटेरियल्स , अ‍ॅप्लाईड मेकॅनिक्स सारखे विषयही असतात) अभ्यासाला आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमात. एखादी वास्तू डिझाईन करताना ती बांधता येणे प्रॅक्टीकली शक्य आहे ना हे समजणे आवश्यक असते. तसच वास्तू बांधली जाते त्या ठिकाणचे नियम ( बाउंड्री पासून सोडायचे अंतर , उंची, पिण्याच्या पाण्याची , सांडपाण्याची व्यवस्था, उजेड, उंच इमारती बाबतीत फायर प्रिवेन्शन इत्यादी) पाळून प्लॅनिङ करणे ही आर्कीटेक्टची जबाबदारी असते व वास्तू त्या प्लॅन प्रमाणे उभ राहील अस स्ट्रक्चरल डिझाइन करणे स्ट्रक्चरल डिझायनर ची ( सहसा सिव्हिल इंजिनियर) जबाबदारी असते. कायद्यानी .

vijaykharde's picture

20 Oct 2015 - 2:13 pm | vijaykharde

आर्किटेक्चर ला वास्तुशास्त्रविशारद म्हणुया

बिन्नी's picture

20 Oct 2015 - 1:29 pm | बिन्नी

माझा दादा आरकिटेक्ट आहे. त्याला हा लेख पाठवला. आवडल

च्यामारी प्यारेलाल. हुशार हायेस लका. मला वाटले तुला फक्त................
असो.
लेखमाला आवडली. पुढे लिहित राहा. बिल्डर लोक्स हायेत तवर आम्ही हावोत. ;)
जर्रा मॅथ्स अन ट्रिग्नोमेट्री जमली असती तर म्याबी आर्किटेक्ट झालो असतो लका.

आमी मिपावर आमच्या अकलेचं तारं तोडाय येत न्हाय आब्या.

मिपाभाईर लै मोट्टं जग हाय. :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Oct 2015 - 2:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सहमत :)

आमी मिपावर आमच्या अकलेचं तारं तोडाय येत न्हाय आब्या.

खरं म्हणतील कुणीतरी. =))

प्यारे१'s picture

21 Oct 2015 - 3:25 pm | प्यारे१

;)
आमी जरा ट्यार्पी वाढवायचा प्रेत्न करत होतो रे.

खूप हाणामारी झाली आता एकेक छोट्या मुद्द्याचे लिहा कोणीतरी.

कंजूस's picture

20 Oct 2015 - 8:19 pm | कंजूस

नाहीतर मी लिहू का?

प्यारे१'s picture

20 Oct 2015 - 8:22 pm | प्यारे१

ऑलवेज वेलकम काकाश्री.