परवा एक लेख वाचण्यात आला. त्यात आयटीतील लोकांच्या रोजच्या जीवनमानाबद्दल लिहीले होते.
त्यां लेखाचा मतितार्थ असा होता की आयटीतील लोक खूप स्वच्छंद जगतात. त्याना हवे तेवढे पैसे उपलब्ध असतात मात्र नशिबात आईच्या हातची गरम भाकरी खाण्याचे सूख मात्र नसते.
एकूणातच समाजातील आयटीवाले हा एक छोटा वर्ग लोकांच्या चर्चेचा नेहमीच विषय असतो.
यातील काही कॉमन अभिप्राय/प्रश्न असे आहेत. तुम्हालाही असे अनुभव आले असतील्.तुम्हाला काय वाटतंय या अभिप्रायांबद्दल?
लोकांच्या मते
१)आयटीवाले भरपूर पगार मिळवतात.
२) एसी मधे बसून नुस्ते इंटरनेट बघायचे हेच तर नुस्ते काम असते. बाकी काय करतात.
३) फोनवर बोलायचे यात कसले आले काम ?
४) आयटी वाल्यांकडे भरपूर पैसे असतात त्यामुळे ते पैसे कसेही उडवतात. त्यामुळे महागाइ वाढते. जागांच्या किमती,इथपासून भाज्या आणि डाळींच्या किमती, रिक्षाचे दर वाढण्याचे कारण आयटीवाले आहेत.
५) तुमची काय मज्जा आहे एकदा ऑन साईट मिळाले की नुसते पैसे छापायचे असतात. वर्षाकाठी पन्नास एक लाख काय सहज मिळतात तुम्हाला.
६) सगळे आयटीवाले ऑनसाईट म्ह्णून अमेरीकेतच जातात.
७)तुम्हा आयटीवाल्यांमुळे उत्पादन ( म्यान्युफॅक्चरिंग) क्षेत्रात काम करणार्या मुलाना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. (मुलाला किमान पन्नास हजार पगार /३ बी एच के/सासू सासरे नको वगैरे..)
८) आयटीवाल्या मुलीना घरकाम अजिब्बात येत नाही.
९) भारत आयटीतील महसत्ता आहे तर आपल्या भारतीय कंपन्या मायक्रोसॉफ्ट इतक्या मोठ्या का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त सेवा उद्योगात का आहोत? अजूनपर्यन्त मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाही
१०)सगळे भारतीय आयटीवाले जर भारताने परत बोलावून घेतले तर अमेरीकेचा सगळा माज एका फटक्यात उतरेल.
प्रतिक्रिया
8 Oct 2015 - 8:07 am | खेडूत
काय विजुभौ !
आज सुट्टी का मधेच?
बाकी प्रश्न विचार करण्यासारखे हाएत खरं !
(शॉपफ्लोर वाला ) खेडूत ….
8 Oct 2015 - 8:13 am | आनन्दा
माझा पास. या गोष्टींबद्दल बोलण्यात पण अर्थ नाही. आधीच एव्हढे सगळीकडे बोलून झाले आहे.
जाता जाता - पूर्वी मला कोणी काम काय करता असे विचारले तर कंपनीचे नाव सांगायचो. हल्ली फक्त आयटी मध्ये आहे असे सांगतो. विचारणारा किंवा त्याची मुले आयटीमधलीच असेल तर कंपनी वगैरे विचारतो. नाहीतर तो पण आयटी म्हणल्यावर गप्प बसतो. तरी पण कोणी फारच मागे लागला तर तुम्हाला कंपनी माहीत नाही असे सांगतो.
8 Oct 2015 - 8:16 am | आनन्दा
बाकी माझा एक मॅनेजर मला काही वर्षांपूर्वी म्हणाला होता, की आयटी पण आता लवकरच फॅक्टरी मोडमधे जाईल. तसे काही खरेच झालेले आहे का याबद्दल वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांमधील लोकांचे मत ऐकायला आवडेल.
8 Oct 2015 - 8:24 am | श्रीरंग_जोशी
१)आयटीवाले भरपूर पगार मिळवतात.
भारतातली आजची परिस्थिती ठाऊक नाही पण सात आठ वर्षांअगोदर किमान आठ दहा वर्ष किंवा अधिक अनुभव असणारे त्यांच्या अमेरिकेन काउंटरपार्टच्या तुलनेत खूपच चांगला पगार मिळवायचे. याउलट फ्रेशर्सचा पगार त्यांच्या अमेरिकन काउंटरपार्टच्या तुलनेत अतिशय लाजीरवाणा असायचा. (म्हणायचा अर्थ हा की अमेरिकेत फ्रेशरच्या दुप्पट पगार मिळवायला कदाचित १२-१३ वर्षे लागू शकतात. भारतात १२-१३ वर्षे अनुभव असणारा मा.तं अभियंता कदाचित फ्रेशच्या आठ नऊ पट पगारही मिळवायचा (आजचे ठाऊक नाही).
२) एसी मधे बसून नुस्ते इंटरनेट बघायचे हेच तर नुस्ते काम असते. बाकी काय करतात.
जगात कुणी कुणाला फुकट पैसे (पगार) देत नसते. संगणकीकरणामुळे एसी आजकाल प्रत्येक ठिकाणी सरकारी वा खाजगी कार्यालयात असतो. उगाच एसींना मध्ये आणू नये
३) फोनवर बोलायचे यात कसले आले काम ?
अगदी जुजबी अनुभव असताना परदेशातल्या व्यक्तींकडून काम वा त्याबाबतच्या अपेक्षा काही मिनिटांच्या फोन कॉलमध्ये समजावून घेऊन ते पार पाडणे हे काही वेळा चांगलेच आव्हानात्मक काम असू शकते.
४) आयटी वाल्यांकडे भरपूर पैसे असतात त्यामुळे ते पैसे कसेही उडवतात. त्यामुळे महागाइ वाढते. जागांच्या किमती,इथपासून भाज्या आणि डाळींच्या किमती, रिक्षाचे दर वाढण्याचे कारण आयटीवाले आहेत.
भारतातील मोठ्या शहरांमधल्या जागांच्या किमती वाढण्यासाठी भारतात काळा पैसा असणारे श्रीमंत लोक सर्वाधिक जबाबदार आहेत. त्यानंतर काही निवडक शहरांत खूप सार्या मा. तं. कंपन्यांना कार्यालये थाटू देऊन त्यांचे संख्येने अधिक शहरांत विकेंद्रीकरण होऊ न देणे हे अत्यंत अदुरदर्शी धोरण भारतातल्या विविध राज्यांच्या सरकारांनी राबवले आहे त्याचेही दुष्परिणाम सर्वांनाच सहन करावे लागत आहेत.
५) तुमची काय मज्जा आहे एकदा ऑन साईट मिळाले की नुसते पैसे छापायचे असतात. वर्षाकाठी पन्नास एक लाख काय सहज मिळतात तुम्हाला.
परदेशात जगण्यासाठीही पैसे लागतात. तिथला आयकर व इतर कर भारतापेक्षा अधिक असतो. त्यामुळे या दाव्यातली कमाईची रक्कम अतिरंजित आहे.
६) सगळे आयटीवाले ऑनसाईट म्ह्णून अमेरीकेतच जातात.
ऑनसाईट मगरपट्ट्यापासून रत्नागिरी व जळगावलाही असलेले पाहिले आहे.
७)तुम्हा आयटीवाल्यांमुळे उत्पादन ( म्यान्युफॅक्चरिंग) क्षेत्रात काम करणार्या मुलाना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. (मुलाला किमान पन्नास हजार पगार /३ बी एच के/सासू सासरे नको वगैरे..)
याबाबत शून्य अनुभव असल्याने भाष्य करू शकत नाही.
८) आयटीवाल्या मुलीना घरकाम अजिब्बात येत नाही.
समानतेच्या युगात याबाबतीत केवळ मुलींचा विचार करणे चुकीचे आहे. मी या क्षेत्रात करियर केले असल्याने बहुतांश तरुण तरुणींना व्यवस्थित घरकाम करताना पाहिले आहे. मी व माझी बायकोही व्यवस्थित घरकाम करणार्या गटातच मोडतो.
९) भारत आयटीतील महसत्ता आहे तर आपल्या भारतीय कंपन्या मायक्रोसॉफ्ट इतक्या मोठ्या का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त सेवा उद्योगात का आहोत? अजूनपर्यन्त मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाही
याबाबत फार अभ्यास नाही पण अमेरिकेसारखे नवउद्योजकांसाठी मैत्रीपूर्ण वातावरण आपल्याकडे अजिबात नव्हते. शिक्षणक्षेत्रही अजिबात प्रॅक्टिकल ओरिएन्टेड नाही. १९९१ नंतर उदारीकरणामुळे बरेच काही शक्य झाले. हेच १५-२० वर्षे आधी सुरु झाले असते तर कदाचित आज चित्र बरेच वेगळे असते.
१०)सगळे भारतीय आयटीवाले जर भारताने परत बोलावून घेतले तर अमेरीकेचा सगळा माज एका फटक्यात उतरेल.
असे करणे अशक्य असल्याने हे विधान भाष्य करण्याजोगे नाही.
8 Oct 2015 - 8:42 am | असंका
मा. तं. कंपनी!!!
मातम कंपनी???????
:-))
8 Oct 2015 - 10:29 am | मराठी_माणूस
हा अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. ऐरोलीत जे प्रचंड SEZ उभे आहेत ते पाहुन नेहमी वाटते की हे असे नाशीक, सांगली, कोल्हापुर, नागपुर, अमरावती, जळगाव, औरंगाबाद, सोलापुर अणि अशी अन्य शहरे इथे का नाही होत. ज्या मुळे ह्या शहरातला विकास होण्यास मदत झाली असती आणि मंबईतील गर्दी कमी झाली असती.
स्थानीक मुलांना वाव मिळाला असता.
8 Oct 2015 - 11:14 am | तर्राट जोकर
असहमत.
जेवढं टलेंट (संख्येच्या प्रमाणात) मुंबईत एकवटून आहे तेव्हढं इतर ठिकाणी नाही. वरच्या सर्व शहरांमधून लायक मुलं मुंबईत येतात. छोट्या शहराच्या ठिकाणी टॉप मॅनेजमेंट पासून ग्राऊंड लेबर पर्यंत सर्व प्रकारचं स्किलसेट असणारं मनुष्यबळ मिळत नाही. मिळालं तरी त्यांना ज्या प्रकारच्या सोयीसुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर ची आवश्यकता आहे ते उभारायला वेळ आणि पैसा प्रचंड लागेल, तसेच टॉप मॅनेजमेंट मेट्रो शहरे सोडून छोट्या शहरांमधे करीयर करायला उत्सूक नसतात हे ही आहेच.
दहा लाख माणसं एकाच ठिकाणी काम करणं, तीच दहा लाख पन्नास ठिकाणी काम करणं याचे आपआपले फायदे तोटे आहेत. दहा वर्षांआधी विकेंद्रीकरण अशक्य होतं, आज शक्य आहे तर आयटीक्षेत्र संपृक्त होत आहे. पैशाकडे पैसा येतो ह्या तत्त्वाप्रमाणे मेट्रोजमधे आधीच माणसं होती, त्यांनी काम करून अधिक व्यवसाय/संपत्ती मिळवली, त्याने अधिक लोक आकर्षित होऊन, बोलावल्या जाऊन गर्दी वाढली.
छोट्या शहरांचा विकास 'बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर व दर्जेदार शिक्षण' या दोन गोष्टी दिल्या तरी आपोआप होईल. आयटी हेच प्रचंड पैसा देणारे क्षेत्र आहे असे नाही. प्रत्येक शहराची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. त्यांना जगराहाटीचे ज्ञान आले तरी भर भराट शक्य आहे. नुसते बांबू विकणारे एक छोट्याशा गावात सगळे करोडपती आहेत. 'माहिती तंत्रज्ञान' मोठे क्षेत्र आहेच पण त्याही पेक्षा योग्य माहीती व उपयोगी तंत्रज्ञान हे विकासाचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे हेही लक्षात ठेवले पाहिजे.
8 Oct 2015 - 11:40 am | मराठी_माणूस
असहमत.
माणसे जीथे रोजगार असेल तिथे जातील. इन्फ्रास्ट्रक्चर सुध्दा हळु हळु तयार होउ शकेल. आज मुंबई मधे काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे? २/४ की.मी. साठी तासंतास खर्च करावे लागतात. कॉस्ट ओफ लीवींग सुध्दा ज्यास्त आहे. इथल्या पेक्षा निम्या खर्चात छोट्या शहरा मधे लोक आनंदात राहु शकतात.
इन्फोसिस , विप्रो यांनी जेंव्हा सुरुवात केली तेंव्हा बेंगलोर मधे काय होते .
8 Oct 2015 - 12:21 pm | तर्राट जोकर
असहमती कबूल. मतभेदाच्या मुळाशी दोन वेगवेगळे दृष्टीकोन आहेत असं वाटतंय.
बंगलोरमधे दर्जेदार मनुष्यबळ होते. विकास घडायला काहीतरी मजबूत निविष्ठा (रीसोर्स) लागतेच. मुंबईत ज्या लेवलचे मनुष्यबळ आहे ते तुम्ही उल्लेखित शहरांमधे नाही. जे आहे त्यांना तिथे राहयचे नाही. कारण तसा स्कोप नाही.
तुमच्यापेक्षा माझा दृष्टीकोन वेगळा आहे, तुम्ही आज आलेली भरभराट बघत आहात. 'सुरुवात होण्यास काय पार्श्वभूमी होती' हे आता कळले आहे. म्हणून असे म्हणू शकतो की इन्फ्रा-स्ट्रक्चर अस्ते तर विकास झाला असता. पण हेच अंधार असतांना कळत नसते. आपण 'आज' विकेंद्रीकरण केले असते तर बरे झाले असते असे म्हणतो. आयटी ही काही आपली मक्तेदारी नव्हती किंवा सरकारी उपक्रम नव्हता. उपलब्ध जागेत, उपलब्ध परिस्थितीत ताबडतोब काम सुरू केले म्हणून जगात आज आपले नाव आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आणि विकेंद्रीकरण करण्याच्या नादात ती संधी गमावली असती तर आयटीमधे चायना-फिलिपाइन्स आज भारताच्या जागी असते. कारण त्यांना उशीर झाला तो त्यांच्या इंग्रजीच्या कमकुवतपणामुळे. ज्या काळात ते इंग्रजीवर मेहनत घेत होते तोवर आपण बाजी मारली. अगदी हेच आपल्यासोबतही झाले असते. त्या विशिष्ट वेळी 'केवळ इंग्रजी चांगले' म्हणून भारताला हे दिवस दिसले. याचा अर्थ आपल्या लोकांच्यात हुशारी कमी आहे असा नाही. दोन तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमधे एका साध्याशा पॉइंटने हारजीत होते. म्हणून तो साधासा मुद्दाच 'फक्त' महत्त्वाचा असे नाही. चांगले इंग्रजी हेही आपले एक रिसोर्स होते. विकास घडायला रिसोर्स आवश्यक आहेत, ते जिथे असतील तिथेच उजेड पडतो.
राहीला तो मुंबैच्या प्रवासाचा त्रास. वाहतूक सोडली तर आणखी काय त्रास आहे मुंबैत? घरात नळ असले तरी आठ-पंधरा दिवस पाणीबंदी नाही, पाणी नदीवर जाऊन आणावे लागत नाही. विहिरीत उतरून तासंतास कळशीभर पाणी चमच्याने भरावे लागत नाही. सोळा सोळा तास वीज जात नाही. शाळा-कॉलेजांचा दर्जा भंगार नाही, दळणवळणासाठी सकाळी एक बस, सायंकाळी एक असा प्रकार नाही. इंटरनेट तर सोडा मोबाइलच्या रेंजसाठी झाडावर चढावे लागत नाही. एवढ्या सार्या सुविधा असून मुंबैला शिव्या घालणे रोचक आहे.
दुसरा मुद्दा कॉस्ट ऑफ लिविंगचा. जगातल्या सर्व प्रमुख शहरांचे कॉस्ट ऑफ लिविंग त्यांच्या नजीकच्या छोट्या शहरांपेक्षा कैक पटीत जास्त आहे. तो अर्थशास्त्राचा नियम आहे. रडून उपयोग नाही. जास्त पैसे कमवायला लोक शहरात येतात. याचाच अर्थ कुणाला तरी जास्त पैसे द्यावेच लागणार ना? मुंबैतल्या एका मिठाइवाल्याकडे एक पोर्या काम करतो, त्याला गावात पन्नास रुपये रोज मिळत असतो, ते सोडून तो इथे दोनशे रुपये रोज कमवायला येतो. मिठाइवाला २०० रुपये किलोनेच मिठाइ विकणार, त्याला गावातल्या मिठाइवाल्यासारखं ५० रुपयांनी विकायला नाही परवडत. ज्यांना ५० रुपयाच्या मिठाइत सुख वाटतं त्यांनी मग दोनशे रुपये पगाराची अपेक्षा धरू नये.
8 Oct 2015 - 2:46 pm | मराठी_माणूस
हे क्षेत्रच जेंव्हा बाल्यावस्थेत होते तेंव्हा बंगलोर मधे ह्या क्षेत्रा साठी लागणारे मनुष्यबळ मुबलक होते हे कशावरुन म्हणता येईल ?
मुंबई मधे ह्या क्षेत्रात काम करणारी जास्तीत जास्त मंडळी ही मुंबई बाहेरची आहेत. ही मंडळी, त्यांना काम अन्य शहरात मिळाले तर ते तीथे जातील. घरच सोडायचे असेल तर कुठेही जाता येईल.
बाकी तुम्ही म्हणता ते पाणी आणि वीजेची परिस्थीती ही इतकी बिकट नाही (विहिरीत उतरून तासंतास कळशीभर पाणी चमच्याने .....वगैरे ). आता तर मंबईत सुध्दा २०% पाणी कपाती मूळे त्रास सुरु झाला आहे.
१९९६-९७ मधे सतत वीज जाणे हे बँगलोर मधे मी स्वतः अनुभवले आहे. दुरद्रूष्टीची गरज आहे. ज्या लोकांची मेट्रो मधे ऑफिसेस आहेत ते त्यांची एक छोटी शाखा लहान शहरात सुरु करु शकतात.
8 Oct 2015 - 4:13 pm | तर्राट जोकर
मी मुबलक मनुष्यबळ नाही तर दर्जेदार मनुष्यबळ म्हटले आहे. ह्यात राजकारण्यांपासून अभियंत्यांपर्यंत सगळेच आले.
मुंबैत येणार्यांना मुंबैचे अप्रूप आहे. गावात काम मिळाले तरी करणार नाहीत. इतर ठिकाणी जाय्ला काही हरकत नाही पण तिकडे मुंबैसारखे ग्लॅमर नाही. इतर ठिकाणी केवळ वीज-पाणी नाही, इतरही खूप समस्या आहेत.
आयटी हा धंदा आहे, प्योर बिजनेस. एखादी शाखा अविकसित शहरात सुरु करून तिथल्या स्थानिकांचे टॅन्ट्रम झेलायला रो.ह.यो. नाही. तरीही काही लोकांनी स्थानिक भाषेतली कॉलसेंटर्स सुरू केली आहेत. विशेष कौशल्य न लागणारे बॅक-ऑफीस, बी.पी.ओ. सुरु केले आहेत. कोअर आयटीची शक्यता कमी आहे. कारण आधीच म्हटल्याप्रमाणे हे क्षेत्र सॅचुरेशनकडे फार वेगाने जात आहे. दोन हजार सालाच्या आसपास आपल्या लोकांना आयटीचे महत्त्व कळायला लागले. पण पंधरा वर्षातच आयटीचा जोर ओसरला आहे. हालचाल होऊन काही करण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ लागतो. ठाण्याचा एक फ्लायओवर व्हायला ८ वर्षे गेली. ह्या गतीने शाळा, कॉलेजं, त्यांचे योग्य अभ्यासक्रम, ते शिकवणारे दर्जेदार शिक्षक, आयटी-शिक्षण-व्यवस्था, संपर्क-व्यवस्था, दळवळण, जीवनमान उंचावणारे इतर सुविधा, जेणेकरून टॉप-मॅनेजमेंटला सुखकर वाटेल अशी वातावरण निर्मिती, इत्यादी एवढ्या कमी कालावधीत उभे करून उत्पादनास तयार करणे अशक्य होते.
मी निराशावादी नसून प्रचंड आशावादी आहे. आयटी इंडस्ट्रीने भारतासाठी यशाचे एक मोठे दालन उघडले आहे. याचा फायदा घेऊन देशातला तरुण आपल्या राहत्या शहरात बरंच काही करू शकतो, त्यास सरकारवर अवलंबून राहायची गरज नाही. असेल तर तसा तो दबाव आणू शकतो. पण तो ते सोडून आरक्षण, मांसबंदी, मोबाइल सर्फींग, वॉट्सॅप, इत्यादी फुटकळ आणि अनुत्पादक बाबींमधे गुरफटला जातोय. इतर अनेक क्षेत्रात जगासाठी भारत उपयुक्त आणि भरिव काम करू शकतो. दूरदृष्टीची गरज आहेच, पण ती वेगळ्या पद्धतीच्या.
8 Oct 2015 - 12:06 pm | रंगासेठ
सहमत
8 Oct 2015 - 6:26 pm | श्रीरंग_जोशी
पायाभूत सुविधांचा अभाव असूनही काही शहरांमध्ये मातं कंपन्यांची क्षमतेपेक्षा खूपच अधिक कार्यालये निघत राहिली. याउलट पायाभूत सुविधांमध्ये उत्कॄष्ट असूनही केवळ भौगोलिक स्थान तेवढे सोयीचे नसल्याने नागपूरसारख्या शहरांत अगदीच जुजबी संख्येने मा.तं कंपन्यांचा प्रसार झाला.
औरंगाबादबाबत फारसे ठाऊक नाही पण जेवढे पाहिले आहे अन जेवढी माहिती आहे त्यानुसार तिथेही बर्यापैकी प्रसार होऊ शकला असता.
सरकारांनी पुढच्या दोन तीन दशकांचा विचार करून धोरण आखणी करायची असते. आपोआप घडणार्या गोष्टींनाच साहाय्य देऊन आला दिवस ढकलणे हे तर कुणीही करतच असते.
8 Oct 2015 - 6:38 pm | तर्राट जोकर
आयटीसाठी दर्जेदार मनुष्यबळ महत्त्वाचं आहे. पायाभूत सुविधांचा तेवढा अडथळा भासत नसावा. नागपूर मागे पडण्यामागे भौगोलिक स्थानाचा दोष नसून कुशल मनुष्यबळाचा असावा. महाराष्ट्रातून सगळं क्रीम पब्लिक शिकून पुण्या-मुंबै कडे धाव घेतं. अॅप्टेकच्या शाखा अगदी छोट्या छोट्या शहरांतही निघाल्या पण तिथे शिकलेल्यांना संधी पुण्या-मुंबै-बेन्गलोर-हैदराबाद इथंच. तेव्हा एकदा सवय लागली आणि झापड बसली की कुणी दुसरा विचारच येत नाही. राजकिय दूरदृष्टी तर परम आवश्यकच. त्यांच्याकडून कुशल मनुष्यबळ तयार करण्याकडे दुर्लक्ष झाले म्हणावे तर मेट्रोजमधे येणारे हे भारतीयच आहेत ना?
8 Oct 2015 - 6:44 pm | श्रीरंग_जोशी
नागपूर अन भोवतालच्या दोनशे अडीचशे किमी त्रिज्येतले अभियंते गेल्या दोन दशकांत प्रामुख्याने बंगरुळू, हैद्रबाद अन पुणे येथून सुरुवात करून मोठ्या संख्येने सर्वच मा.तं. कंपन्यांमध्ये पोचले. मी देखील त्यापैकीच एक. सुरुवातीच्या काळात नागपूरमध्येच नोकरी करायला मिळण्याची संधी असती तर यापैकी मोठ्या प्रमाणात हे अभियंते लांब गेले नसते.
राजकीय अदूरदर्शीतेचा मुद्दा मी माझ्या पहिल्याच प्रतिसादात मांडला आहेच.
8 Oct 2015 - 7:04 pm | तर्राट जोकर
पण त्यापैकी कुणीही परत येऊन या दोनशे अडीचशे किमी त्रिज्येत स्वतःची आयटी कंपनी स्थापन केली नाही. वीज, इंटरनेट आणि थोडेसं भांडवल एवढं सोडलं तर अजून पायाभूत सुविधा काय लागतात एका आयटी कंपनीला? इथे सरकारने नक्की काय मदत करावी अशी अपेक्षा होती? तरी सरकारने हात आखडतेही घेतले नव्हते. नागपूरहून छोट्या शहरांमधे आज कैक स्थानिक सॉफ्टवेअर कंपन्या स्वतःचे इन्फ्रास्ट्रक्चर उभारून चांगले काम करत आहेत. मुंबैत तर बरेच लोक सब-कॉन्ट्रॅक्ट घेऊन घरगुती फ्लॅटमधे १०-१० जणांच्या टीम बनवून काम करत आहेत. यातूनच मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या निर्माण होतात. आपण कुठल्या अँगलने या प्रश्नाकडे बघतो त्यावर मत ठरते असं वाटतं. मी विदर्भातल्या टॅलेंटला कमी लेखतो असा आपला गैरसमज झालेला दिसतो. 'इथून सारे बाहेर गेले' हेच आपणही मांडले, मीही. अँगल वेगळा आहे. 'पैशाकडे पैसा जातो' हे अर्थशास्त्राचं तत्त्व आहे. 'पैशाकडे माणूस जातो' हे मानसशास्त्र आहे. आपल्याकडे पैसा यावा असे वाटत असेल तर काय करायला हवे ते विदर्भात होत नसेल.
8 Oct 2015 - 8:53 pm | एस
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राला आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ असणे फार आवश्यक असते असे वाचले होते. मुंबई-पुणे दृतगती महामार्ग नसता तर पुण्यातही या उद्योगाचा एव्हढा विस्तार झाला नसता. नागपूरहून थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणे आजही कमीच असावीत. तेव्हढ्यासाठी मुंबई वा हैदराबाद गाठावे लागणे हा दोष असल्यामुळे नागपूरचा समावेश आयटी-सिटींमध्ये झाला नाही.
8 Oct 2015 - 9:04 pm | तर्राट जोकर
नागपूर-मुंबई विमानप्रवास पुणे-मुंबई एक्प्रेसपेक्षा जास्त वेगवान आहे. पण विदर्भात सामान्य लोकांची मानसिकता हाच फॅक्टर जास्त महत्त्वाचा वाटतो.
8 Oct 2015 - 11:01 pm | श्रीरंग_जोशी
हैद्राबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकाही अमेरिकन एअरलाइनची थेट सेवा आजही उपलब्ध नाही. अमेरिकेतून हैद्राबादला जाताना एक तर लोक आखातातून जातात किंवा भारतातल्या इतर मोठ्या विमानतळांवरून कनेक्टिंग फ्लाइटने जातात.
कुठल्याही शहरात जोमाने उद्योग सुरु झाले की थेट किंवा कनेक्टेड फ्लाइट्सने मोठ्या प्रमाणावर ते शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडले जाऊ लागते.
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गामुळे पुण्यातल्या मा.तं. उद्योगाच्या प्रगतीला मोलाचा हातभार लागला या निरिक्षणाशी सहमत.
अवांतर - पर्सिस्टंट कंपनीचे संस्थापक व सिइओ आनंद देशपांडे ९० च्या दशकात दर गुरुवारी मुंबईला क्लायंट इमेल चेक करून रिप्लाय करायला जात असत कारण तोवर पुण्यात इंटरनेट उपलब्ध होऊ शकले नव्हते.
9 Oct 2015 - 12:21 pm | बॅटमॅन
काय सांगता, ही गोष्ट नक्की कधीची आहे? आमच्या मिरजेतही इंटरनेट पाहिलेले आहे १९९८-९९ साली म्हणून विचारले.
9 Oct 2015 - 1:03 pm | टवाळ कार्टा
भौतेक ९५ च्या आधी असेल
8 Oct 2015 - 10:52 pm | श्रीरंग_जोशी
हा मूळ धाग्याचा विषय नाहीये अन विषयाचा आवाकाही मोठा आहे.
राज्याची संतुलित वाढ होण्यासाठी राज्य सरकारांना धोरणात्मक प्रयत्न करावे लागता. नाही तर सध्या आपण जे बघत आहोत ते असंतुलित चित्र स्पष्टच दिसत आहे. नागपूर शहरामध्ये मा. तं. कंपन्यांची वाढ कूर्मगतीने का होईना सुरु आहेच. सर्वसामान्य नव-उद्योजकांना गेल्या दशकात भेडसावलेली सर्वात मोठी समस्या म्हणजे लोडशेडींग. वीजच दिवसातले अनेक तास अनुपलब्ध असेल तर पुढच्या गोष्टींचा प्रश्नच येत नाही.
महाराष्ट्रातील मा.त. उद्योगाने ढोबळ मानाने २००० सालपासून वेगाने घोडदौड सुरु केली. सुरुवातीच्या काळातच दूरदृष्टीने धोरणे आखली असती तर नागपूरसारख्या शहराच्या क्षमतेचा योग्य वापर करता आला असता अन मुंबई व पुणे या महानगरांवरचा ताणही आहे त्यापेक्षा नक्कीच कमी करता आला असता.
गेली अनेक वर्षे मी अमेरिकेत राहत आहे. इथे बर्याच राज्यांमध्ये उद्योगांचे व रोजगाराच्या संधींचे व्यवस्थित विकेंद्रीकरण झालेले पाहत अहे. महाराष्ट्रात आता थोडेबहूत या दिशेने प्रयत्न सुरु झालेले दिसत आहे. बघुया किती चित्र बदलते ते.
बाकी पैशामागे पैसा जातो अन पैशामागे माणूस जातो हे शाश्वत सत्य आहे याबद्दल पूर्ण सहमती.
8 Oct 2015 - 11:49 pm | तर्राट जोकर
तुमचे म्हणणे मान्य पण हे असंतुलन केवळ आयटी साठी नाही तर सर्वच उद्योगांसाठी सरधोपट आहे. विकासाचा अनुशेष इत्यादी... पिठाच्या गिरण्या बंद पडून लोक घरोघरी परत जाती फिरवतात का काय असा प्रसंग यावा. इतक्या भयाण परिस्थितीत आयटीचे तर नाव कुणी काढणार नाही. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाचीच काय, कशाचीच वाढ विदर्भात झालेली दिसून येत नाही. आहे तीही चिंधीभर कारखानदारी बंद पडायच्या मार्गावर आहे. विदर्भातली मंडळीही एकदा सोडून गेली की ज्ञान, संपत्ती असलं काही घेऊन परत विदर्भात येत नाहीत.... १९९१ ते २०११ या वीस वर्षांदरम्यान झालेल्या लोकसंख्येच्या वाढीवरूनच हे लक्षात येइल.
nagpur: 32 lac - 46 lacs
amravati: 22 lac -- 29 lac
akola/washim: 21lac -- 30 lac
yavatmal: 20 lac -- 28 lac
chandrapur: 18 lac -- 22 lac
buldhana: 19 lac -- 26 lac
pune: 55lacs--> 95 lac
nashik: 39 lacs --> 61 lac
नाशिक-पुणे या फक्त दोन जिल्ह्यांमधे झालेले लोकसंख्यावाढ ही विदर्भातल्या महत्त्वाच्या ६ जिल्ह्यांच्या एकूण लोकसंख्यावाढीपेक्षा तीस टक्क्यांनी जास्त आहे. हा जिल्ह्यांचा हिशोब आहे. शहरांचा नाही. म्हणजेच विदर्भातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. याची विदर्भाला सवयही लागली आहे. मुंबैचा हिशोब मांडला नाही कारण तिथला डेटा मिक्स्ड आहे. खेड्यातून जवळच्या मोठ्या शहरात कामधंद्याला जावे तसे लोक विदर्भातून पुण्या-मुंबैत येतात. ज्या दिवशी वैदर्भीय माणसाचे डोळे उघडतील तो सुदिन....
एकूणच विदर्भाच्या बाबतीत राजकारण्यांपासून, उद्योजक, सामान्य नागरिक सगळेच जरा उदासिन आहेत. कोणा एकाचा तर दोष नाही. विदर्भाचा बिहार-युपी झाला असता पण मराठी आहेत म्हणून संस्कार टिकून आहेत अजून... नक्षलवादास पूर्ण रान मोकळे असून एक-दोन जिल्ह्यांशिवाय फोफावला नाही.
असो. धाग्याचे अवांतर विदर्भाच्या अनुशेषापर्यंत होण्याची आवश्यकता नाही. आयटीवाल्या मुलींचे उत्तान शरीरसौष्ठव प्रदर्शन हा जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे काही जणांसाठी इथे. त्याबद्दल बोलूया...
9 Oct 2015 - 12:08 am | श्रीरंग_जोशी
लोकसंख्येच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्थलांतराबाबत वर वर कल्पना होती पण कधी आकडेवारी तपासली नव्हती.
9 Oct 2015 - 10:23 am | टवाळ कार्टा
म्हणजे अशी म्हणायची आहे का?
सर्व अनाहितांना सस्नेह निमंत्रण....तत्परतेने जे काही हाताला मिळेल ते घेउन या =))
9 Jun 2016 - 4:56 pm | एकुलता एक डॉन
चित्र दिसत नाही
11 Oct 2015 - 7:19 pm | पप्पुपेजर
आकडेवारी ज जोरदार आहे, जर रिसोर्सेस बद्दल बोलायचे असेल तर त्याची काही कमी नाही. मध्य प्रदेश , आंध्र, छत्तीस गड मधून लोक मुंबई पुण्या पेक्षा नागपूर ला आले अस्ते.
मेन इषू वीज आणी तापमान हा होता. सत्यंम च्या वेळेस आम्ही उन्हाळ्यात टेस्ट केल्या होत्या नेटवर्क स्विचेस रीबूट होत होते दर १० मिनटा मधे, कुलिंग चा प्रोब्लेम असायचा
राजकारण्यांची इच्छा हा अजून एक दुसरा पेहलू आहे. आता पुष्कळ छोट्या छोट्या कंपन्या आहेत पण मिहान मध्ये ज्यांनी जागा घेली होती यांनी अजून हि काही सुरु केले नाही.
पर्सिस्टन्त बर्यापैके मोठी आहे नागपूरला कारण त्यांच्या कडे BFSI clients नाही आहेत. मला टाईप करायला जमत नाही जास्त त्यामुळे एवढेच पुरे सध्या साठी . :)
9 Jun 2016 - 4:55 pm | एकुलता एक डॉन
पर्सिस्टन्त बर्यापैके मोठी आहे नागपूरला कारण त्यांच्या कडे BFSI clients नाही आहेत
असे कसे?
9 Jun 2016 - 6:35 pm | अनिरुद्ध.वैद्य
वरचे स्टेटमेंट मलाही कळले नाही. बँकिंग न फायनांन्स चे क्लायंट नसणे अन मोठे असण्याचा अर्थाअर्थी काही संबंध दिसत नाही.
10 Jun 2016 - 11:12 am | टवाळ कार्टा
बहुदा BFSI clients नसतील तर बीलिंग रेट कमी असतो
बाकी २०० झाले :)
10 Jun 2016 - 4:19 pm | एकुलता एक डॉन
बिलिंग रते कमी आहे म्हणून मोठी आहे ?
7 Jun 2016 - 11:49 pm | विजुभाऊ
माझ्या मित्राने पश्चिम महाराष्ट्रातील एका शहरात स्वतःची आयटी कंपनी काढली. त्याला योग्य मनुष्यबळच मिळत नाही. जे मिळते ते सगळे पुण्याल किंवा बंगलोरला पळायच्या विचारात असतात.
10 Jun 2016 - 8:21 pm | सही रे सई
कोणत्या शहरात? कोणी महितीत असेल तिथले तर त्यांना रेफर करता येईल.
6 May 2021 - 5:06 pm | विजुभाऊ
आज सहा वर्षांनंतरही या परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाहिय्ये
9 Jun 2016 - 2:42 pm | अफ्रिकेचा मुम्बैकर
उत्तम प्रतिसाद !!!!
8 Oct 2015 - 8:38 am | कोमल
हम्म वाचतेय.
पाहुया तरी काय काय (गैर)समज आहेत आमच्याबद्दल.
नंतर सवडीने प्रतिवाद करेन.
फॉर नाउ, ही येऊन गेल्याची पावती
8 Oct 2015 - 10:15 am | अनुप ढेरे
टीआरपीचा मोह वाइट!
8 Oct 2015 - 11:18 am | नाखु
ये टी आर पी का चक्कर डेंजर रे बाबा ====
नाखुराव आपटे.
मिपा हेरा फेरी.
8 Oct 2015 - 10:35 am | पिलीयन रायडर
जगातल्या प्रत्येक कामधंद्यात चांगल्या न वाईट गोष्टी आहेत. आयटीवाल्यांना इतरांच्या तुलनेत ऑनसाईटच्या, पैसा छापण्याच्या जास्त संधी आहेत. कामही एसी ऑफिसमध्ये बसुन असतेच (पण त्यात शाररिक दगदग नसते एवढंच.. मानसिक ताण पुष्कळ असतो.. पण तो सगळ्याच क्षेत्रात असतो म्हणुन एसीत तर किमान बसता येतय ह्यांना असा बाकिच्यांचा सुर लागत असावा.)
कॉलेजमधुन बाहेर पडुन बर्यापैकी पैसा मिळवायला हे एक बरे क्षेत्र आहे म्हणुन आयटीत नसणार्यांना आयटीत असणार्यांचा हेवा वाटत असणार. आणि हाच समज लोकांचाही असल्याने रिक्षावाले, भाज्यावाले स्वतःच भाव वाढवुन ठेवतात. खिशात पैसा खुळखुळणारे जर मोलभाव करत नसतील तर तसा अंदाज बांधणं स्वाभाविकही आहेच.
पण आता जे आहे ते आहे.. उगाच गिगाबायटी चर्चा करुन काय होणारे?
8 Oct 2015 - 10:41 am | असंका
रग जिरते हो जरा.....
8 Oct 2015 - 10:43 am | पिलीयन रायडर
एसीत बसुन काम नसणारे दुसरं काय करणारेत मग!!!
8 Oct 2015 - 10:56 am | असंका
:-))
8 Oct 2015 - 11:48 am | तर्राट जोकर
आयटीवाल्यांना पुरवल्या जाणार्या सर्व सोयीसुविधा ह्या इतर लोक लग्जरी म्हणून बघतात त्यात त्यांची अज्ञानामुळे होणारी चूक आहे. कारण जीवंत माणसाला वस्तू-यंत्र म्हणून वापरलं जातंय हेच त्यांना कळत नाही. कारखान्यात एखादं बॉयलरला काही कोटी रुपये लागतात तेव्हा हिच माणसं लोखंडाच्या बंबाला काय एवढे पैसे असं म्हणत नाहीत. आयटीमधे मनुष्यबळ व त्याची बुद्धी हेच सर्वात मोठे रीसोर्स असतं, त्याला जास्तीत जास्त परफॉर्मन्स द्यायला 'योग्य ते वातावरण' असणं ही 'लग्जरी' नाही तर 'मिनिमम रीक्वायरमेंट' आहे. कारखान्यांच्या काळात जगलेल्यांना यंत्र ही मोठी, त्यांना चालवणारी माणसं लहान अशी वर्गवारी माहित. आज माणसं मोठी यंत्र लहान हा बदललेला विचार त्यांना लवकर पचनी पडत नाही. त्यांच्या दृष्टीने कम्प्युटर आणि बॉयलर मधे फरक नाही तसेच सुपरवायजर व टीम लीडर मधेही फरक नाही. तो फरक फक्त आयटीत काम करणारेच जाणू शकतात. यंत्रासारखे, न कुरकुरता, सदैव उत्तम काम देणार्या आयटीवाल्यांनीच जग जगण्यास सुखकर केलंय हे एटीममधे जाऊन चटकन नोटा हातात घेणार्याला कळत नाही तसेच गिर्हाइक उभे ठेवून मोबाइलवर बिन्कामाच्या गप्पा हाकणार्या भाजीवाल्यालाही कळत नाही. त्यांच्या सो-़कॉल्ड लग्जरी मुळे आज आपण खर्याखुर्या लग्जरीत जगतोय हे त्यांना कळत नाही. पण आयटीवाल्यांचा पगार फक्त दिसतो, तो ओरबाडून घेण्याच्या नीच प्रवृत्तीला शब्द नाहीत माझ्याकडे.
काही प्रमाणात याला आयटीतली लोकंही जबाबदार आहेत. संपत्तीच्या अभावात बालपण काढलेली मुलं पैसा बघून चेकाळली, पैशाच्या जोरावर काहीही विकत घेता येतं हेही कळलं. बालपणीचं अभावाचं जीणं झुगारून वाट्टेल तसा पैसा खर्च करायला लागली. सेझ झाल्यावर नवी मुंबईत भाड्यांच्या किमती वाढल्या कारण हीच मुलं "तुमको कितना मंगताय उतना लगाव, हम्को कंपनी पैसा देगी" असा बादशाही आव आणत होती. हे डोळ्यानी पाहिलंय. त्यांच्यामुळे मला घरमालकाने सरळ तीस टक्के घरभाडं वाढवून मागितलं. म्हणजे 'ती' देऊ शकतात, तुम्हाला जमत असेल तर राहा नाहीतर निघा. आयटीवाल्यांचे असे स्वभाव बघून इतरही लोकांनी आपले भाव चढवले. तशीही आयटीतली जास्तीत जास्त मुलं छोट्या शहरातून आलेली, "मुंबै-पुण्यात सगळं महागच असतं"चा पुर्वग्रह घेऊन. त्यांना इथे मोलभाव करायला जमतही नव्हतं, तशी गरजही नव्हती. तिकडे गावात बाप जितका महिन्याला कमावत असेल तितकं तर ही मुलं मेसवाल्याला देत होती. त्यामुळे पैशाचं अप्रूप संपलं. रुपया-रुपया जपून खर्च करावा ही बापाची शिकवण गरीबीच्या पोटी आली आहे असं त्यांना वाटायला लागलं. त्यातून बेफिकीरी वाढली आणि महागाई तर अशा प्रसंगाची वाटच बघत असते. घ्यायला सोडायला येणार्या गाड्या आहेत म्हणजे हे पैसा छापणारे मोठे साहेब आहेत अशी मानसिकता ८०-९०च्या दशकात होती. तीच अजून कायम आहे. पण ह्या गाड्यांमधून नेल्या जाणारे फक्त हमालीचं काम करत आहेत, त्यांच्या पगारातूनच ह्या लग्जरीजचे पैसे वळते करून घेतले जात आहेत, कंपनी कुठलेही उपकार वा चोचले करत नाहीये - असं चुकूनही सामान्य लोकांना कळत नाही. ते आपले फक्त लुटायला बघतात.
8 Oct 2015 - 12:07 pm | अभ्या..
हीहीहीहीही
8 Oct 2015 - 12:24 pm | तर्राट जोकर
काही चुकलं का दादा?
8 Oct 2015 - 2:24 pm | अभ्या..
आयटी सोडून दुसरे सगळे काय रोबोट असतात काय?
मनुश्यबळ आणि बुध्दी अजून कला अन कारागीरी. याशिवाय दुसरे काय वापरतो मनुश्य स्वतःचे?
आयटी सोडून पण तेच असते. मग सर्वानाच गरज असते मिनिमम लग्जरीची. मग कशाला कौतुके?
8 Oct 2015 - 2:45 pm | प्यारे१
अरे अभ्या,
आपल्याकडं एकंदरच माणसाकडं नि त्याच्या आयुष्याकडं बघण्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे. हे आयटीवाले सुविधा देतात त्यामध्ये कदाचित क्लायेन्टकडून आलेला दट्ट्या सुद्धा असेल की कमीत कमी एवढ्या सुविधा पुरवाव्यात.
आमच्या कंस्ट्रक्शन लाईन मधल्या मजूर लोकांना आठवड्यात चार वेळा चिकन दोन वेळा अंडी दिली की ती सुविधा भरपूर वाटते. मजूरीचं स्वरुप वेगळं असतं नि त्यानुसार होणारे लाडही वेगळे.
8 Oct 2015 - 3:41 pm | तर्राट जोकर
गैरसमज झाला बरं का तुमचा...
ही जी 'मिनिमम रीक्वायरमेंट' आहे ती प्रत्येक ठिकाणी लागू आहे. जे लागू करत नाहीत त्यांना त्यातली गोम कळली नाही म्हणून....
आता आयटीमधेच ही सक्ती किंवा मुभा का? तर आयटी ही इंडस्ट्री आहे. म्हणजेच इंडस्ट्रीला इंडस्टीसारखे वागवणारे आले. जेव्हा गाय घराचीच असते तेव्हा ती रानोमाळ भटकते, आपले आपण काय-बाय खाते, घरी येते. घरचे जेवढं निघेल तेवढं दूध काढून समाधानी असतात. त्याविरूद्ध इन्डस्ट्रीयल मिल्कींग मधे गाय जास्तीत जास्त दूध कसे देइल यावर असंख्य संशोधक काम करतात. त्यातून वेगवेगळे सल्ले-प्रयोग देतात-करतात. गायीला कसे वागवले म्हणजे जास्त दूध मिळेल याचीच चिंता असते.
आता आयटीकडे या. इथे मनुष्य व त्यांचा मेंदू हेच रीसोर्स आहे. याची जेवढी जास्त काळजी घेतली जाईल तेवढा जास्त चांगला परफॉर्मन्स मिळेल हे साधं गणित. साधं असलं तरी अनेक प्रयोगांतून-संशोधनांतून पुढे आलंय. आपली कार्यक्षमता (म्हनजे कंपनीची) वाढवण्यासाठी काय करावे लागेल किंवा चुका का घडतात यावरच्या संशोधनातून असे लक्षात आले की बुद्धीजीवी मनुष्यास त्याचे काम चांगले करण्यासारखे वातावरण असेल तर त्याची कार्यक्षमता कैक पटीत वाढते. यात येण्याजाण्यापासून ते ऑफिसच्या वातावरणापर्यंतचे घटक ह्या कार्यक्षमतेवर चांगला-वाईट परिणाम करू शकतात हेही लक्षात आले. उदा. बसण्याची जागा शरीरास आरामदायक नसेल तर मेंदूचा काही भाग त्या अवघड परिस्थितीवर काही प्रमाणात लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे जे काम हातात आहे, ज्याचे भविष्य पूर्णपणे मेंदुवर अवलंबून आहे त्या कामास पूर्ण न्याय देण्यास मेंदू कमी पडतो. लक्ष विभाजीत होते. प्रोडक्शन कमी होते. चुका वाढतात. हे जेव्हा आयटीच्या मोठ्या कंपन्यांना लक्षात आले तेव्हापासून ते कामगारांना प्रचंड सुविधा देण्यास पुढे आले, कारण केवळ त्यावरच त्यांचे अॅन्युअल रिपोर्ट्स व स्टॉकचे रेट अवलंबून आहेत म्हणून.
कारखानदारी मधे जिथे बरेचसे काम यंत्रांद्वारेच होते तिथे मनुष्य देखरेख किंवा हाताने काम करणे यासाठी उपलब्ध असतो. एखादा कामगार यांत्रिकपद्धतीने एखादी वस्तू जसे पंखा बनवणे, रेडीयो बनवणे, सायकल बनवणे असं काम करतो तर तिथे त्याला कौशल्य लागतं, बुद्धी व मेंदूची एकाग्रतेची तेवढी प्रचंड आवश्यकता नाही जितकी आयटीमधे आहे. कारखान्यात जुळणी करत असतांना तो मनुष्य 'महिना संपत आलाय, आता कुणाकडे उधारी करायची, देणी कशी फेडायची' याच्या प्रचंड तणावात असूनही कंपनीस आवश्यक इतके प्रॉडक्शन देऊ शकतो. हीच परिस्थिती कोड लिहिणार्या किंवा दुरुस्त करणार्या संगणक अभियंत्यास घातक आहे. कारण त्याची चुकलेली एक लाइन वा डॉट त्याला ते काम परत परत करायला भाग पाडू शकतो, कंपनीचा परफॉर्मन्स घटतो आणि त्याची स्वतःची पतही. कारखानदारीत यंत्र बनवणार्यांचे अतोनात महत्त्व आहे, जे लाड आहेत, ते तेच यंत्र चालवणार्यांचे नाही.
आता कारागीरी किंवा कला, जसे सुतारकाम किंवा मिस्त्रीकाम. हे सरावाने येणारे कौशल्य आहे. यात सुरुवातीस प्रचंड मेहनत घेऊन हे कौशल्य आत्मसात केले की पुढे निरंतर कामाने ते अधिक अधिक मजबूत होत जाते. एक स्थिती अशी येते की त्या ठिकानी कारागीर अगदी गप्पा हानत, शिव्या घालत, इकडे तिकडे बघत ते काम करू शकतो. कारण नवनिर्मिती असली तरी ते सृजन नाही. आयटीत हे शक्य आहे का? कितीही मोठा कोडर असला तरी तो वरील अवस्थेत अचूक कोड लिहू शकेल किंवा दुरुस्त करू शकेल काय हे आयटीधुरिणांनी सांगावे.
पुढचा मुद्दा निव्वळ कला किंवा उपयोजित कला, ज्यात तुम्ही स्वतः आहात असे कळते. इथे आयटीसदृश्य परिस्थिती आहेच. पण इथे वरील तिन्ही गोष्टींचा संगम होतो. सरावाने सहज होत जाणारे कौशल्य एकाग्र बुद्धिने वापरले जाते. इथे पण मेंदूस एकाग्रता लागतेच, पण कलेचा एक अनामिक डोळा अनावधनाने झालेल्या चुका लगेच लक्षात आणून देतो. चुकलेले रंग, आकार, शब्द तिथल्या तिथे बदलले जातात. ही प्रोसेस नकळत होत असते. ती उपजत असते. शिकवून येत नाही. शिकवून फक्त तंत्र आत्मसात होते, कला नाही. तर कलेच्या क्षेत्रात आरामदायक वातावरणाची जरूर असली तरी ती प्रॉडक्शन क्षमतेवर परिणाम करेलच असे नाही. तरीही मोठमोठ्या जाहिरात संस्था आयटीसारखे वातावरण आयटीच्या आधिपासून राखून आहेत.
मनुष्य आणि त्याची बुद्धी हेच आयटीमधे 'सबकुछ' आहे. तिथे चुकीस मुभा नाही, पर्यायी व्यवस्था नाही. अशा मनुष्यबळास सांभाळणे, त्याकडून जास्तीत जास्त उत्पादन करवून घेणे ह्यालाच प्राधान्य आहे. त्यामुळे डोक्याला ताप देतील अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या मार्गातून दूर केल्या जातात. अगदी कामगारांचे व्यक्तिगत करव्यवस्थापन पासून पासपोर्ट विजापर्यंत कंपन्या मदत करतात, मुलांसाठी पाळणाघरं चालवतात, अजूनही काय काय. त्यामुळे लाड होतात असा गैरसमज आहे बाहेर.
इंडस्ट्रीयल मिल्किंगमधल्या गायींना वेळच्या वेळी कसदार खाणं, वैद्यकिय देखभाल, चळांना त्रास न होता दूध काढणार्या मशिन, राहण्याची अत्याधुनिक व्यवस्था, अल्टीमेट स्वच्छता हे सगळं मिळतं म्हणून रानोमाळ भटकणार्या गायीने तिच्याकडे असूयेने पाहणे कितपत बरोबर...?
9 Oct 2015 - 12:54 pm | वगिश
+१००
9 Oct 2015 - 12:59 pm | अभ्या..
त्रिभुवनदास जव्हेरी तुमचे सखोल विश्लेषण आवडलेले आहे.
ह्याला तर लै सहमत आहे.
.
एकेकाळी थ्रीफोर्थ टीशर्टात नोकरीच्या नावाखाली एसीत झोपणारा.
9 Oct 2015 - 1:04 pm | टवाळ कार्टा
थ्रीफोर्थ टीशर्ट कसा अस्तो रे??? =))
9 Oct 2015 - 1:07 pm | सतिश गावडे
हो ना राव... काय झबलं वगैरे घालायचा की काय हापिसात जाताना? ;)
10 Oct 2015 - 12:54 pm | अभ्या..
अबे झबलंच. त्येला बंडी म्हणायचं, नायतर छाटण. बिनबाह्याचे आसतय.
आमच्या सारख्या तब्येतवाल्यांना शोभतेय. बिअर ढेरकाट दाखवणार्यांना येगळे असतेत.
10 Oct 2015 - 1:55 pm | टवाळ कार्टा
बेंबाट पण डिस्प्लेला ठेवता वाट्टे =))
10 Oct 2015 - 12:51 pm | अभ्या..
तू तीन तीन प्रश्नचिन्हे दिलेली चालतेत. म्या एक कॉमा इसरलो तर पळत आला टोचायला.
छिद्रान्वेशी कुठला. (टक्या तुला लैच परफेक्ट बसतोय बे ह्यो शब्द)
10 Oct 2015 - 12:56 pm | प्यारे१
आम्ही एकदा कॉमा चुकून दुसरीकडं टाकलो होतो.
>>>>>हो, शिंदळीच्या अशी शिवी आहे.
ऐवजी
>>>>>हो शिंदळीच्या, अशी शिवी आहे.
असं एका थोर्थोर मिपाव्यक्तिमत्वास म्हणून आलो.
ती व्यक्ति खरंच तशी असल्यानं तिनं दुर्लक्ष केलं बहुधा. ;)
11 Oct 2015 - 2:53 pm | dadadarekar
इनोदास तेंव्हा दाद दिली नव्हती. आता देतो
13 Oct 2015 - 4:34 pm | अनिरुद्ध.वैद्य
खूप छान समजाउन सांगितलेत. एक सेपरेट लेख लिहून टाका :)
8 Jun 2016 - 2:23 am | सही रे सई
तजो, अतिशय नेमकं सांगितलत बघा. तेही अगदी उदाहरणासह स्पष्टीकरण द्या स्टाईल.
8 Oct 2015 - 12:08 pm | रंगासेठ
>>आयटीवाल्यांना पुरवल्या जाणार्या सर्व सोयीसुविधा ह्या इतर लोक लग्जरी म्हणून बघतात त्यात त्यांची अज्ञानामुळे होणारी चूक आहे. कारण जीवंत माणसाला वस्तू-यंत्र म्हणून वापरलं जातंय हेच त्यांना कळत नाही. << +१
17 Oct 2015 - 11:10 pm | palambar
perfect. आपल्या कडे एखादा शेरा आपण अगदि सहज मारतो. त्यातले आपल्याला कळो न कळो .खोल विचार वैगेरे
कोण करणार.
8 Oct 2015 - 1:23 pm | विजुभाऊ
इतके सगळे असताना आपल्या देशी कंपन्या फक्त सेवा देण्यातच अडकून पडल्या आहेत.
प्रत्येकानेच प्रॉड्क्ट डेव्हलप केले पाहिजे असे नाही. मायक्रॉसॉफ्ट , एस ए पी , गूगल , अॅपल मधले भारतीय लोक त्या कम्पन्याना प्रॉडक्ट डेव्हलप करुन देत असतातच. पण ते प्रॉड्क्ट त्या विदेशी कंपन्यांच्या नावावर जमा होते. भारतीय कंपनीच्या नावावर नाही
8 Oct 2015 - 1:53 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
छान चर्चा. हल्ली तो 'प्रॉड्क्ट'च्या नावाने सगळीकडे उद्घोष चालू असतो.उत्साहापोटी काहीतरी नविन करण्याची मानसिकता भारतियांमध्ये तशी कमी असते.जो काही पगार्,सुखसोयी आहेत त्या पुढे रेटत कशा न्यायच्या ह्यावर भर.मग टाटा असो वा बजाज वा तुमची ती विप्रो...disruptive innovation का काय म्हणतात ते येथे घडायची शक्यता फार कमी असे ह्यांचे मत.
8 Oct 2015 - 1:55 pm | प्यारे१
यो यो माई आणि तुमचे हे!
व्हाट्सअप दा?
8 Oct 2015 - 2:12 pm | बिहाग
एकदा लग्जरी गाड्या , घरे घेणाऱ्या लोकांची यादी बनवा ( BMX merc etc etc ) त्यात आएती वाले किती आणि नोन आएती वाले किती ते शोधा ,
दुसरी बाजू डॉक्टर कडे येणर्या लोकांची यादी तपासा ( मुले होण्यासाठी त्रीत्मेंत ते हृदय रोग पर्यंत ) त्यात आएती वाले किती ते शोधा आणि मग ठरवा.
8 Oct 2015 - 2:41 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
योग्य प्रश्न विचारलास रे बिहाग्या.
मर्सेडिझ,ऑडीसारख्या प्रचंड महाग मोटारी लहान सहान धंदे-व्यवसाय करणार्या लोकांच्या आहेत.कर कसा चुकवायचा ह्या काळजीत असणारा हा नवश्रीमंत वर्ग तो हाच. औरंगाबादमध्ये २०० लहान मोठ्या व्यापार्यांनी २०० मर्सेडिझ गाड्या
पूर्वी बूक केल्या होत्या त्याची आठवणे झाली.आता औरंगाबादेत आय.टी. कुठे?
आय.टी.वाल्यांची झेप आय.१० किंवा स्वीफ्ट डिझायर पर्यंत असते असे वाटते.
8 Oct 2015 - 3:07 pm | फुलथ्रॉटल जिनियस
भारतात आयटीवाल्यामुळे चंगळवाद फोफावला आहे ,पुण्यासारख्या सांस्कृतीक शहराचे वातावरण बिघडायला हेच लोक कारणीभूत आहेत.व्यसनं करणे ,त्याचं उद्दातीकरण करणे ,पैश्याचा माज दाखवणे,रेव्हपार्ट्या करणे,वासनेला खतपाणी घालणारे शरीरसौष्ठव दाखवत फिरणार्या आयटीतील तरुणी,यांच्यामुळे ईतरांची मनं कलुषीत होतात,मग गुन्हे आणी बलात्कार झाले की हेच आयटील लोक मस्त एसीत बसून ' सिक इंडीयन मेंटॅलीटिवर' लांबचौड्या पोस्ट सोशल मिडीयावर टाकतात.पैसा कमावण्याला कोणाचीच हरकत नाही, पण त्याबरोबर सामाजिक भानसुद्धा ठेवने गरजेचे आहे.
8 Oct 2015 - 3:16 pm | नाव आडनाव
आयला, ह्या सगळ्या गोष्टिंसाठी मी पण जबाबदार आहे हे मला गेल्या ~१० वर्षांत समजलंच नाही. बरं तुम्ही सांगितलं.
"वासनेला खतपाणी" हे सगळ्यात भारी आहे. मी आठवतो आता कोणी कोणी काय काय केलं होतं वासनेला खतपाणी घालण्यासाठी ते :)
9 Oct 2015 - 11:19 am | टवाळ कार्टा
पाणी तरी घातलेच असशील =))
9 Oct 2015 - 11:38 am | नाव आडनाव
:)
आयटीत काम करणार्यांची लैच भारी ईमेज आहे. जिनियस साहेबांनी .व्यसनं करणे ,त्याचं उद्दातीकरण करणे ,पैश्याचा माज दाखवणे,रेव्हपार्ट्या करणे, हे सगळ्याच आयटी वाल्यांना चिकटवून टाकलंय.
बायदवे, जिनियस साहेब तुम्ही काय काम करता ओ? आणि तिकडे सगळे संत असतात का?
9 Oct 2015 - 11:54 am | टवाळ कार्टा
ओ जर्रा जपून की...आता जर जिनियस साहेब म्हणाले कि "मिपावर प्रबोधन करणे" हेच त्यांचे काम तर फट्ट म्हणता ब्रम्हहत्या व्हायची की =))
8 Oct 2015 - 3:53 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
काय रे हे फूल्थ्रॉटल्या? दिल्लीत आय.टी. बरेच कमी आहे पण तेथे तर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होतात. तिथे चेन्नईला आय.टी. कंपन्या बर्याच आहेत असे ऐकले आहे पण त्यामानाने अत्याचार कमी असावेत. होय ना ?
8 Oct 2015 - 4:17 pm | फुलथ्रॉटल जिनियस
अपवादानेच नियम सिद्ध होतो ना हो माईसाहेब!
चंगळवाद करायला हरकत नाही, पाश्चीमात्य देशात असे करायला काहीच अडचण नाही,तिथे सामाजिक भान मोठ्या प्रमाणावर आहे, त्याच बरोबर आर्थिक संपन्नताही आहे.
परंतु भारतासारख्या देशात जिथे प्रचंड प्रमाणात आर्थिक आणि लैंगिक
दमन होत असते अश्या ठिकाणी तरी आर्थिक ,लैंगिक चंगळवादाचे जाहीर प्रदर्शन करु नये.हे प्रदर्शन फक्त आयटीवालेच करतात असे नव्हे ,पण भारतात आयटीवाले यात आघाडीवर असतात हे सत्य कोणी नाकरु शकत नाही.
8 Oct 2015 - 4:26 pm | तर्राट जोकर
भारताची लोकसंख्या आणि तीत काम करणार्या आयटीवाल्यांची (ऑन-साइट वजा) बघितली तर आयटीवाले फार प्रभाव टाकू शकत असतील असं वाटत तर नाही. भारतात जेवढे आयटीवाले आहेत त्यापेक्षा जास्त तर दरवर्षी बलात्कार होत असतील.
पण तुम्हाला काही सत्ये जास्त चांगली कळतात ह्याला आमचे आंधळे अनुमोदन!
8 Oct 2015 - 5:18 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
तुमच्या मुंबापुरीत व दिल्लीत तर हे आय.टी. यायच्या कित्येक वर्षे आधीपासून चालू आहे.हिंदी चित्रपटांमध्ये जे दाखवले
जाते त्यालाही आय.टी.वालेच जबाबदार का?
10 Oct 2015 - 3:28 pm | lakhu risbud
आयला ! कसं जमतं ओ ?
डाव्या हातानं उजव्या हाताला प्रतिसाद देता काय ?
8 Oct 2015 - 8:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
धागा शतकी करण्यासाठी तुम्चा काय रेट आहे हो फुजि !? तुम्चं रेट्कार्ड प्रसिद्ध कराच येक्दा... म्युचुअल्ली बेनेफिशियल व्हईल बगा ! =)) ;)
8 Oct 2015 - 9:13 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
अजून धाग्यात दरेकर वा गुरूजी आलेले नाहीत.नाहीतर रविवार पर्यंत ३००च्या वर प्रतिसाद व सोमवारी धागा वाचन्मात्र.
8 Oct 2015 - 9:25 pm | तर्राट जोकर
त्यांच्या वकुबाचं इकदे काय दिसत नाय
9 Oct 2015 - 12:26 pm | बॅटमॅन
आयटी क्रांती किंवा क्रायसिस यांपैकी कशाशीच आरेसेस किंवा भाजपाचा संबंध कुणी न जोडल्यामुळे असेल.
8 Oct 2015 - 3:17 pm | डायवर
पुण्यात ५ ते ६ फ्रेशर आईटी इंजीनियर एकाच २बीएचके मध्ये राहताना सर्रास दिसतात. विशेषत वाकड, औंध, पिंपळे सौदागर, बाणेर, हिंजवडी , येरवडा अन विमान नगर या भागात. त्यांचाकडे बघून असे काही वाटत नाही कि ते पैश्यांची उधळपट्टी, चंगळवादी जीवन वगैरे जगतात. आणि क्याम्पस प्लेसमेंट न मिळालेले उमेदवार अगदी ७ हझारांवर करीयर सुरु करताना पाहिले आहेत. तेदेखील दोन वर्षांच्या बाँड वर. स्वीच मारताना २/ ३ महिन्यांचा नोटीस पिरेड असतो, अन तेवढे थांबण्याची दुसर्या कंपनीची तयारी नसते. कंपनी दिवसाला १२ तास राबवून घेते, यातून काहींना मणक्याचे अन डोळ्यांचे विकार जडतात. थोडक्यात सरसकटीकरण योग्य होणार नाही.
ऑन साईट बद्दल बोलायचे झाले तर टीम मधल्या सर्वांनाच परदेशात जायचे असते अन संधी कमी असतात त्यामुळे टीममध्ये भयानक स्पर्धा, हेवे दावे, परस्पर चुगल्या, अविश्वास राजकारण चालते. थोडक्यात मला असे म्हणायचे आहे कि बाहेरून दिसते तेवढे आत सुखासुखी नसते.
8 Oct 2015 - 3:24 pm | मधुरा देशपांडे
चान चान लेख वाचुन मनोरंजन झाले. मिपाकरांच्या माहितीत भर घालणारे काही जिनियस प्रतिसाद तर त्याहुनही रोचक.
8 Oct 2015 - 4:10 pm | लक्ष्या
वाचतोय.....
पण
वरील गोष्टीचा आणि आमचा काही संबंध नाही... आढळल्यास एक योगायोग समजावा....
8 Oct 2015 - 4:37 pm | द-बाहुबली
आयटीवाले भरपूर पगार मिळवतात.
- होय. (फ्रेशर्स न्हवे)
२) एसी मधे बसून नुस्ते इंटरनेट बघायचे हेच तर नुस्ते काम असते. बाकी काय करतात.
- मिसळपाववरुन वेळ मिळाला की बरीच कामे असतात. ती वेळेत उरकावी लागतातच. जशी एखादी कुटूंबवत्सल नोकरदार स्त्री घरातील सर्व जबाबदार्या पार पाडून नोकरीही व्यवस्थीत सांभाळते तसेच आय्टीवाले नेटसर्फींग करुनही क्लायंट रिक्वायरमेंट्स हसत हसत पुर्ण करत असतात. (पण यात कुम्टुंबसुख प्रकारचा बोर्या वाजतो, ज्याची भरपाइ घसघशीत इनकम स्वरुपात होउन जाते)
३) फोनवर बोलायचे यात कसले आले काम ?
- ते नुकसान झाले की बरोबर लक्षात येते.
४) आयटी वाल्यांकडे भरपूर पैसे असतात त्यामुळे ते पैसे कसेही उडवतात. त्यामुळे महागाइ वाढते. जागांच्या
किमती,इथपासून भाज्या आणि डाळींच्या किमती, रिक्षाचे दर वाढण्याचे कारण आयटीवाले आहेत.
- होय. यात बर्यापैकी तथ्य आहे.
५) तुमची काय मज्जा आहे एकदा ऑन साईट मिळाले की नुसते पैसे छापायचे असतात. वर्षाकाठी पन्नास एक लाख काय सहज मिळतात तुम्हाला.
एव्हडे नाही पण नोकरदार या वर्गात मोडुनही तोंडात बोटे जातील इतकी प्रचंड रक्कम बरेचदा नक्किच मिळुन जाते.
६) सगळे आयटीवाले ऑनसाईट म्ह्णून अमेरीकेतच जातात.
- होय. पण त्यांना फक्त तिथेच जावे लागते असे नाही.
७)तुम्हा आयटीवाल्यांमुळे उत्पादन ( म्यान्युफॅक्चरिंग) क्षेत्रात काम करणार्या मुलाना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. (मुलाला किमान पन्नास हजार पगार /३ बी एच के/सासू सासरे नको वगैरे..)
- होय.
८) आयटीवाल्या मुलीना घरकाम अजिब्बात येत नाही.
- आधी वाटायचे त्यांना मेकप करणे जमत नाही, पण परप्रांतीयांशी कंपिटीशन बघता बघता म्राठी पोरी ज्या आधी पोस्टात नोकरीला आल्या आहेत प्रमाणे भासत त्या सॉलीड काँम्पीटीटीव झाल्या आहेत. असो मुळात आय्टीवाल्या मुलीने घरकाम का करावे ? आय्टीतच काम करावेना ?
९) भारत आयटीतील महसत्ता आहे तर आपल्या भारतीय कंपन्या मायक्रोसॉफ्ट इतक्या मोठ्या का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त सेवा उद्योगात का आहोत? अजूनपर्यन्त मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाही
आत्मविश्वासाचा आभाव. मराठी लोक धंध्यात ज्यामुले मागे आहेत बरेचदा तेच कारण भारतीय लोक सेवा उद्योग का सोडु शकत नाहीत याला लागु होते. अर्थात काळ बदलत आहे पण अजुन लायकी आलेली नसल्याने चाचपडणॅच चालु आहे.
१०)सगळे भारतीय आयटीवाले जर भारताने परत बोलावून घेतले तर अमेरीकेचा सगळा माज एका फटक्यात उतरेल.
दिवास्वप्न आहे.
8 Oct 2015 - 5:50 pm | असंका
श्रीगणेश लेखमालेतील अकरावा लेख म्हणा याला....
अप्रतिम! कसला अविर्भाव नाही, सावरून घेणं नाही, जे आहे ते आहे!
13 Oct 2015 - 3:40 pm | हतोळकरांचा प्रसाद
उत्तम प्रतिसाद!
बाकी नं. १० अगदी खोटं आहे असंही म्हणता येणार नाही. अगदी माज नसला उतरणार तरी घाम नक्की फुटेल. परत आलेल्या भारतीयांच्या जागी तिथले लोक घेणं आर्थिक दृष्ट्या अजिबात शक्य नसल्यामुळे तेथील कंपन्या ज्याला आम्ही क्लायंट म्हणतो त्यांचा IT इन्फ्रास्ट्रक्चर डबघाईला येऊ शकता. म्हणजेच पर्यायाने अमेरिकन अर्थव्यवस्थेला घाम फुटू शकतो. अर्थात असं प्रत्यक्षात घडवून आणणं अजिबात शक्य नाही.
13 Oct 2015 - 4:06 pm | टवाळ कार्टा
wait till chine learns english which they are doing at very rapid rate
don't underestimate Philippines which already overtook india in BPO call center business
13 Oct 2015 - 4:07 pm | टवाळ कार्टा
and at both places, salaries are less compared to indian salaries for same positions
14 Oct 2015 - 3:43 pm | हतोळकरांचा प्रसाद
भारत व इतर राष्ट्रे यांची निवड करताना कमीत कमी पैसा हे एकमेव कारण लावले जात नसावे. सरकारी अनुदाने, सांस्कृतिक फ्लेक्सिबिलीटी, कायदे, चलनाची स्थिरता आणि अशा बर्याच गोष्टी असाव्यात. सध्यातरी आणि पुढची बरीच वर्षे (जशी मागची बरीच वर्षे कारण चीन वि. भारत हि तुलना साधारणपणे १० वर्षापूर्वी सुरु झाली) भारताला पर्याय असेल असं वाटत नाही.
14 Oct 2015 - 4:21 pm | टवाळ कार्टा
मला नाही वाटत
14 Oct 2015 - 4:36 pm | तर्राट जोकर
भारत व इतर राष्ट्रे यांची निवड करताना कमीत कमी पैसा हे एकमेव कारण लावले जात नसावे.
>> व्यापार्याला पैसाच प्यारा, तो कुठे वाचतो ह्याचाच तो विचार करतो. २००८ नंतरच्या मंदीत भारतातले प्रोजेक्ट चीनमधे गेलेले बघितले आहेत
सरकारी अनुदाने, सांस्कृतिक फ्लेक्सिबिलीटी, कायदे, चलनाची स्थिरता आणि अशा बर्याच गोष्टी असाव्यात.
>> व्यापार्याला या गोष्टींचा विचार करायची काहीच गरज नाही. दोन पैसेही कुणी कमी दर देत असेल आणि तोच दर्जा मिळत असेल तर तो तिकडेच जाईल. याउप्परही थोडा कमी दर्जा चालवून घेऊन पण आत्ता पैसा वाचतोय ना असा विचार भारतातले प्रोजेक्ट चीनमधे जातांना केला गेला. वर त्यांनाही थोडा अनुभव येइल, मग याच अनुभवाचा फायदा आपल्यालाही भविष्यात होईल हा सुविचारही त्यामागे होता. कॅपीटलिस्ट हॅव नो नेशन. ओन्ली कमीशन इज दीअर रीलीजन.
सध्यातरी आणि पुढची बरीच वर्षे (जशी मागची बरीच वर्षे कारण चीन वि. भारत हि तुलना साधारणपणे १० वर्षापूर्वी सुरु झाली) भारताला पर्याय असेल असं वाटत नाही.
>> या भ्रमात न गेलेलेच बरे. वरच्या माझ्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे आयटी मेंदूचं क्षेत्र आहे. मेंदुवर कुणाची मक्तेदारी नाही. पासा कभीभी पलट सकता है.
14 Oct 2015 - 5:53 pm | हतोळकरांचा प्रसाद
स्वस्त वि. टिकाऊ (थोडक्यात महाग) अशी साधी तुलना आहे ही. स्वस्त (चीन) घेणारेही असतात , टिकाऊ (अमेरिका) घेणारेही असतात. पण तुलनेने-स्वस्त आणि टिकाऊ (भारत) घेणाऱ्यांची संख्या नक्कीच जास्त असते. कुठलाही व्यापारी चार पैसे वाचतात म्हणून सगळा व्यवसाय धोक्यात नाही घालणार. IT मध्ये करोडो रुपये गुंतवणूक करणारे नक्कीच त्याचं महत्व जाणून असतील. आणि मेंदूचाच प्रश्न असेल तर तो विश्वास आपल्या लोकांच्या मेंदूवर ठेवायला काय हरकत आहे?
एनीवेज, चर्चा मूळ विषयापासून भरकटतेय आणि वरून मुळ लेखातला मुद्दा नं . २ सिद्ध होण्याची भीती :).
14 Oct 2015 - 6:01 pm | तर्राट जोकर
तुमच्या प्रतिसादावरून मला असं जाणतंय की माझं आयटीक्षेत्राबद्दलचं ज्ञान फारच तोकडे आहे.
असो. धन्यवाद!
8 Oct 2015 - 4:46 pm | अद्द्या
फक्त पगार दिसतो . तो हि १० पैकी ३-४ जणांना तसा मिळतो .
पण १० पैकी १० लोकांना वयाच्या २५-२६ व्या वर्षी झालेले पाठीचे विकार . डोळे / डोके दुखी , अपुऱ्या आणि कैच्या काय वेळेला झालेली / न झालेली झोप आणि त्यामुळे इतर विकार .
हे सगळं बघता का ?
आता म्हणाल या आणि अश्या गोष्टी असतातच कि इतर व्यवसायात .. हो असतात .. जरूर असतात .
पण मग याहून जास्त पैसा पण असतो . काही लोक लेथ मशीन समोर १४ तास राबतात . . काही लोक कम्प्युटर समोर १४ तास राबतात . शेवटी हिशोब तोच .
त्यामुळे . असोच
8 Oct 2015 - 6:07 pm | मोदक
...पण लेथ मशीन AC मध्ये कुठे असते?
8 Oct 2015 - 6:14 pm | बॅटमॅन
अच्चा म्हणजे एसीमध्ये बसून केलेली राबणूक ही राबणूक नव्हेच तर. ओह आय सी.
8 Oct 2015 - 6:24 pm | मोदक
उपरोध आहे रे.
8 Oct 2015 - 6:29 pm | बॅटमॅन
रैट्ट.
8 Oct 2015 - 8:19 pm | आदूबाळ
ओह् ए सी!
8 Oct 2015 - 6:28 pm | अद्द्या
असते कि !!
9 Oct 2015 - 1:26 pm | पिलीयन रायडर
वा वा असं कसं!!
मेकॅनिकलवाले मशिनी एसीमध्ये ठेवतील.. माणसांच काय ठाऊक नाही..
मशिनी म्हत्वाच्या बाबा...
8 Oct 2015 - 6:06 pm | बॅटमॅन
विजुभाऊ, वेळ जात नै वाट्टं!!
8 Oct 2015 - 6:20 pm | सूड
अगदी हेच !!
8 Oct 2015 - 6:27 pm | अद्द्या
आमचा हि जात नाहीये
एसीत बसून फुकटचं नेट कुठे तरी उपयोगी पडेल म्हणून इथे प्रतिसाद पडतोय =]]
8 Oct 2015 - 7:07 pm | प्रदीप
भरपूर पॉप्कॉर्न घेऊन क्लाऊडात जावून बसलोय! होऊन जाऊद्या!
8 Oct 2015 - 7:39 pm | धर्मराजमुटके
काय करायचं काय तुम्हाला मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे प्रॉडक्ट बनवून ? लिनक्सवर आधारीत इतक्या मोफत ऑपरेटींग सिस्टम बाजारात उपलब्ध असतांना आणि त्याच्यावर घरातल्या वापरातली जवळपास सर्वच कामे होऊ शकत असतांना (नेट सर्फिंग, चित्रपट बघणे, गाणि ऐकणे आणी बरेच काही) घरी पायरेटेड विंडोज का बरे वापरतात लोक ?
बाकी आयटी म्हणजे फक्त सॉफ्टवेअरवालेच असा बर्याच जणांचा गोड गैरसमज आहे असे दिसते. हार्डवेअरवाल्यांना स्वतः आयटीवाले तरी आयटी क्षेत्राचे मानतात की नाही देव जाणे !!!
फुलथ्रॉटल जिनियस : अगदी जोक ऑफ द इयर बरं का ! तुमची शरीरसौष्ठवाची व्याख्या आम्हाला कळु द्या एकदा.
9 Oct 2015 - 1:40 am | रामपुरी
"हार्डवेअरवाल्यांना स्वतः आयटीवाले तरी आयटी क्षेत्राचे मानतात की नाही देव जाणे"
नाही मानत!!! :) :)
9 Oct 2015 - 6:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अद्द्याचं म्हणणं ऐकायला आवडेल :)!!
9 Oct 2015 - 9:29 am | खटपट्या
आता काडी टाकलेलीच हाय तर थोडी हवा पण देतो...
हार्डवेअर आणि नेटवर्कींगवाले म्हणजे आयटीचे वायरमन आणि कडीया आहेत.(यात इमेल, बॅकप, स्टोरेज, सपोर्ट, अँटीवायरसवाले इत्यादी सर्वे आले)
यांनी जर विटा बरोबर लावल्या नाहीत कींवा वायरींग (नेटवर्कींगसाठी खूप खालच्या दर्जाचा शब्द वापरतोय्)बरोबर केले नाही तर सॉफ्टवेअर वाल्यांनी कीतीही सुंदर सजावट केली तरी काय फायदा नाय.
हे एक असे क्षेत्र आहे जीथे फक्त आणि फक्त अनुभवाला महत्व आहे. बाकी डीग्र्या आणि सर्टीफीकेशन गेले तेल लावत. काम करुन दाखवा आणि पैसे घेउन जा.. असा सरळ साधा मामला आहे.
10 Jun 2016 - 11:12 pm | अजय देशपांडे
अगदी बरोबर मी गेली १२ वर्षे हार्डवेर आणि नेत्वोर्किंग आहे .......
9 Oct 2015 - 10:14 am | अद्द्या
हार्डवेअरवाल्यांना स्वतः आयटीवाले तरी आयटी क्षेत्राचे मानतात की नाही देव जाणे !!!
^^^^^
हे काही बर्याच जणांकडून ऐकलय .
रादर मी स्वतः हि असंच म्हणेन . हार्डवेअर वाले आयटी कमी आणि इलेक्ट्रोनिक्स मध्ये जास्ती येतील . कारण शेवटी तुम्हाला चिप्स आणि वायर्स आणि सोकेट्स आणि पीसीबी बघायचे आहेत.
हा पण नेट्वर्किंग ला मी आयटीचं अविभाज्य घटक म्हणेन . त्याशिवाय घंटा काहीच होत नाय ऐटीत . .
9 Oct 2015 - 9:59 am | पैसा
काय वाटेल ते शिकलेले लोक आयटीत असतात ना?
9 Oct 2015 - 10:25 am | टवाळ कार्टा
तर तर =))
9 Oct 2015 - 10:42 am | पैसा
बी ए पासून एम टेक पर्यंत, बी सी ए पासून एम ई मेक्यानिकल इंजिनिअरपर्यंत सगळे कोणाला विचारावं तो आपला ऐटीत! माझं पोरगं मेक्यानिकल इंजिनिअर होणार ते घाबरलंय त्याला ही ऐट काय जमणारी नाही.
9 Oct 2015 - 10:49 am | अद्द्या
मेक वाले पण हैत ऐटीत . .
टेन्शन घेऊ नका .. जमेल :D
9 Oct 2015 - 11:40 am | पैसा
:)
9 Oct 2015 - 12:26 pm | बॅटमॅन
साला मेकवालेच जास्त हैत ऐटीत. =))
9 Oct 2015 - 1:17 pm | नाव आडनाव
आयटीत जाण्यासाठीच बीई मेकॅनिकल करतात लोक :)
४ वर्षांचं ग्रॅज्युएशन असलं तर आयटीत नोकरी मिळण्याचे चांगले चांस आहेत म्हणून मी पण बीई मेकॅनिकल केलं होतं (त्या कॉलेजात अजूनही बीई कंप्युटर चा ऑप्शन नाही) आणि झेडएफ नावाच्या कंपनीत ३ तास नोकरी केल्यानंतर मेकॅनिकलला कायमचा रामराम केला. बाकीच्या विंजिनियरांपेक्षा (सिविल, इलेक्ट्रिकल ई.) मेकॅनिकल वाले जास्त बघितले आहेत आयटीत.
9 Oct 2015 - 1:22 pm | सतिश गावडे
मेकॅनिकलचे काय घेऊन बसला आहात, बी ई मायनिंगवालेही पाहिले आहेत मी.
9 Oct 2015 - 11:20 am | टवाळ कार्टा
डोक्यात लॉजीक असणारा कोणीही आयटीमध्ये चांगले काम करू शकतो
9 Oct 2015 - 11:33 am | प्यारे१
स्त्रिया आयटीत चांगलं काम करतात की कसे?
काही विदा आहे का उपलब्ध?
9 Oct 2015 - 11:54 am | टवाळ कार्टा
आयटीत काम करणार्या प्रत्येकाला वेगवेगळी कामे दिलेली असतात ;)
9 Oct 2015 - 12:04 pm | सतिश गावडे
=))
9 Oct 2015 - 1:03 pm | टवाळ कार्टा
जल्ला फकस्त तुकाच कल्लांव काय? =))
9 Oct 2015 - 11:43 am | पैसा
लॉजिक आहे, मॅथ्स बरोबरच्या पोरांना शिकवतो. पण आय्टीत गेलं तर १०/१२ तास हापिसात बसून काम कोण करणार?
9 Oct 2015 - 11:54 am | टवाळ कार्टा
खि खि खि....वरून दट्ट्या बस्ला की सगळेच बस्तात
14 Oct 2015 - 10:36 am | sagarpdy
१०-१२ तासापैकी, १-२ तास मि.पा. वर घालवायचे असतात हो. फिकर नॉट.
9 Oct 2015 - 11:34 am | डॉ सुहास म्हात्रे
चिरंजीवांना सांगा, "पर्वा इल्ले". नव्वदीच्या दशकात आयटीत आलेल्या नॉन-आयटी इंजिनियर्सपैकी ७०-८०% मेकॅनिकलचे होते. पिंचिच्या एमायडीसी मध्ये हे होताना स्वतः पाहिले आहे.
9 Oct 2015 - 11:42 am | पैसा
नोकरी मिळेल. पण त्याला ती अॅप्टिट्यूड नाहीच! म्हणजे कॉम्प्युटर आंणि मोबाईलचे काहीही करू शकतो आरामात पण जन्मजात घिसाडी आहे! =))
9 Oct 2015 - 11:47 am | सतिश गावडे
आर एस अगरवाल वाचायला सांगा ना त्याला. मी इंजिनीयरींगला असताना मी ही आर एस अगरवालच वाचत असे.
9 Oct 2015 - 11:51 am | पैसा
त्याला मेक्यानिकल फिल्डमधे हवी तशी नोकरी मिळाली नाही तर तो वेगळे काय करता येईल ते शोधत आहे पण आयटी अजिबात नको म्हणे. अर्थात अजून तसा वेळ आहे. बी ई ची २ वर्षे आणि मग पुढे शिकायचे असेल तर ते. बघू!
9 Oct 2015 - 11:54 am | टवाळ कार्टा
"आर एस अगरवालच"
हा हा हा...अॅप्टीसाठी प्रॅक्टिस म्हणून अख्खे पुस्तक सोडवले होते....२ दिसात :)
9 Oct 2015 - 12:01 pm | सौंदाळा
इंफोसिस असेल तर शकुंतलादेवी.
9 Oct 2015 - 1:03 pm | टवाळ कार्टा
तसे सुरवातीला होते...नंतर इंन्फीसाठी इंन्फीचेच आधीचे पेपर बघितले तरी चालून जायचे =))
9 Oct 2015 - 10:00 am | विजुभाऊ
वर दिलेल्या एका प्रतिसादात इतरत्र आयटी उद्योग का येत नाहीत या बद्दल उहापोह मांडलेला आहे.
सातार्या सारख्या शहराचे उदाहरण द्यायचे झाल्यास. तेथे सर्व पायाभूत उदा जागा वीज पाणी वगैरे.सुविधा आहेत.
मात्र तेथे योग्य मनुष्यबळ उपलब्ध नाही. माझ्या एका मित्राने तेथे स्वतःची आयटी कंपनी सुरू केलेली आहे. तो पगारही व्यवस्थित देतो. मात्र बहुतेक कुशल कामगार वर्ग पुण्याला नोकरीसाठी जातो आणि त्या मित्राला उपलब्ध असलेल्या अर्धकुशल लोकाना शिकवुन काम करुन घ्यावे लागते.
राजकीय नेत्यांच्या अतीअदूर्दर्शीपणामुळे तेथे आयटी कम्पन्याच काय पण इतर क्षेत्रातील उद्योगही येण्यास तयार होत नाहीत. अर्थात त्यासाठी आम्ही सातारकरच जबाबदार आहोत.
असो. मुद्दा हा आहे की स्थानीक पातळीवर खरोखरच सर्वप्रकारचे कुशल कामगार उपलब्ध होत नाहीत. हेच लोक पुण्यात किंवा मुम्बैत किंवा मेट्रो शहरात बर्याच मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात.
रच्याकने : आयटी कम्पनीसाठी विमानतळ ही अत्यावश्यक बाब कधीच होउ शकत नाही.
9 Oct 2015 - 11:26 am | मराठी_माणूस
अगदी बरोबर. बंगलोर मधे सुध्दा इंटरर्नॅशनल फ्लाईट्स खुप उशीरा सुरु झाल्या (इन्फोसिस च्या स्थापनेच्या कीतीतरी नंतर).
त्यातही आत्ता offshore मधुनच जास्त कामे केली जातात.
9 Oct 2015 - 3:06 pm | अस्वस्थामा
विजुभाऊ.. सातार्यात कोणाची नि कुठली कंपनी हो ? हरकत नसेल तर सांगाल काय ? व्यनि केलात तरी चालेल.
जेवढ्या कंपन्या मला माहीत आहेत त्या रोखाने मी एक सांगेन की कुशल मनुष्यबळ यायला तयार होईल पण तसं काम आणि संधी दिसत असतील तर. अजूनही बरेच जण खूप सार्या जुन्याच तंत्रज्ञानावर आधारित फुटकळ कामे करत असतील तर लोक का येतील ? मी बर्याच अनुभवी तसेच शिकणार्या (BSc अथवा BE) मुलांशी बोललो. त्यांचं म्हणण हेच की लोकल काम मिळालं तर आनंदच होईल पण अव्यावसायिक वातावरण (unprofessional environment) आणि काळासोबत पुढे न जाण्याची वृत्ती त्याचबरोबर अपुर्या संधी त्यांना आपले घर सोडायला बाध्य करतात.
( बादवे, याच प्रकारचे स्पष्टीकरण पुणे मुंबई आणि भारत सोडून सिलिकॉन वॅलीत जाणार्या पब्लिककडूनही ऐकलेले आहे.. :) )
याला +१००० .. मागे एकदा कुठल्यातरी धाग्यावर याबद्दल झालेय मला वाटतं बोलून..
9 Oct 2015 - 10:30 am | ए ए वाघमारे
माझे काही अनुभव
मी स्वत: आयटीमध्ये एका प्रॉडक्ट बेस्ड कंपनीत ०२ वर्षे नोकरी करून सोडून दिली कारण कोअर इंडस्ट्रीचा अनुभव नसताना स्वत:ला बिजनेस अॅनालिस्ट/कन्सलटंट वगैरे म्हणवून घेणं मला मूर्खपणाचं वाटत होतं.
२००८ची पुण्याच्या आमच्या प्रथितयश इंजिनीयरींग कॉलेजमधील गोष्ट.कॉलेजमध्ये एल अॅण्ड टी कंपनी कॅम्पससाठी आली होती. त्यांच्या दोन्ही बिजनेससाठी म्हणजे कोअर आणि एल अॅण्ड टी इंफोटेकसाठी त्यांना भरती करायची होती. दोन्हीची वेगवेगळी प्रेझेंटेशन्स झाली. कोअरच्या प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी त्यांचा नवा पॉवर प्लॅण्ट बॉयलर व स्पेअर्सच्या कारखान्याचा एक विडीओ दाखवला. त्यातलं हेवी इंजिनीयरींग पाहून अनेक मुलं अॅप्टीट्यूडला बसलीच नाहीत पण दुपारच्या सेशनमध्ये इन्फोटेकसाठी परीक्षा द्यायला मात्र 'ही' गर्दी झाली.
आज जसे प्रतिभावान मुले इंजिनीयरींग/सायन्स कडे गेल्याने कॉमर्स व आर्टसमध्ये एक टॅलेंट डेफिसिट तयार झाले आहे त्याचप्रकारे बहुसंख्य नवे इंजिनीयर्स,त्यांचे शिक्षण आयटीसंबंधित नसले तरी, आयटीमध्ये जात असल्याने कोअर इंडस्ट्रीत आणि त्यातही पीएसयु सेक्टरमध्येही(उत्तम वेतन असूनही) एक टॅलेंट डेफिसिट तयार झाले आहे.मेहनतीचे काम बहुसंख्यांना नको आहे. निदान मराठी इंजिनीयर्समध्ये तरी ही प्रवृत्ती मला जाणवते.
आयटीचं आकर्षण असल्याच्या अनेक कारणामध्ये महत्वाची काही कारणं म्हणजे ०१. मेट्रोत राहायला मिळणे व पर्यायाने ग्लॅमरस लाइफस्टाईल जगायला मिळणे ०२.जनसंपर्क नसणे म्हणजे समाजातील तथाकथित खालच्या वर्गाशी उदा.बॅंकेत हरतर्हेचे कस्टमर किंवा कोअर इंडस्ट्रीमधला लेबर क्लास इत्यादींशी रोजच्या कामासाठी संपर्क येत नाही. सतत घरी व कामावर चांगल्याचुंगल्या 'दिसणार्या/राहणार्या' लोकात वावरल्यामुळे एक सुखकर, हवाहवासा असा सुपीरीआरीटी भाव मनात येतो. ०३. मेट्रोत काम करणारे अनेक आयटीवाले हे 'मायग्रंटस' आहेत याला स्थानिक पातळीवर संधींचा अभाव याबरोबरच आपल्याच गावात राहून काम केले तर आपण काय काम करतो,कसे राहतो हे इतरांना लगेच माहिती होते,समाजाची आयुष्यातली दखल वाढते हेही एक कारण आहे.त्याउलट गावापासून दूर राहिले की आपच एक दुरावा निर्माण होतो व प्रायव्हसी मिळते हाही विचार आहे. हा मुद्दा नवीन लग्न करून सासरी जाणार्या मुलींच्या बाबतीत जास्त जाणवतो.असो.
9 Oct 2015 - 10:55 am | माईसाहेब कुरसूंदीकर
महत्वाचे मुद्दे.पण हेच लोक अमेरिकेस्,युरोपात जातात तेव्हा त्यांचे कौतुक होते. म्हणजे तुझ्या त्या गूगलमध्ये अमूक टक्के भारतिय्,माय्क्रोसॉफ्टमध्ये तमूक टक्के भारतीय..जोमाने काम करीत आहेत,जग बदलावे म्हणून सिलिकॉन व्हॅलीत बुद्धी पणाला लावत आहेत.. असे वाचायला मिळते.ह्यातले खरे किती?खोटे किती?
विरोधाभास वाटतो.
9 Oct 2015 - 12:27 pm | बॅटमॅन
त्यातही हा पॅरा लैच भारी आहे. एकदम नेमके निरीक्षण आहे.
9 Oct 2015 - 12:33 pm | अभ्या..
सहमत. परफेक्ट निरिक्षण आहे.
.
आणि मुख्य म्हणजे तसे राहून ईंटरनेटावर 'माझी मैना गावाकडं राह्यली' टैप नॉस्टॅल्जिक धाग्याचा रतीब टाकता येतो.
व्हाट्सपवर कायकाय मिस्स्स्स्स्स्स्स्स करतो त्याचे गळे काढता येतात.
.
बरं असते ते. ;)
9 Oct 2015 - 12:49 pm | बॅटमॅन
"सीसीडी आणि बरिस्तामध्ये बसून प्यालेल्या कडवट कॉफीला गावाकडच्या टपरीवर प्यालेल्या चहाची सर कशी येणार" वगैरे. पण यांना जर विचारलं की गावाकडच्या टपरीवर पुन्हा जाल का तर तोंडं बघून घ्यावीत एकेकाची.
9 Oct 2015 - 12:54 pm | अभ्या..
चल बे. पोलिस स्टेशनापाशी पंडीत पिऊ. लै दिवस झाले.
9 Oct 2015 - 2:08 pm | बॅटमॅन
चल.
9 Oct 2015 - 1:03 pm | सतिश गावडे
मी तर याच्या उलटही अनुभवलंय. माझ्यासारख्या एका खेडयात शिकलेल्या, लहानाचा मोठा झालेल्या मुलाने कौतुकाने त्याच्या शहरी जालमित्रांना (आणि एका खडूस जालमैत्रिणीला) सीसीडीची कॉफी पाजली असता "याच्यापेक्षा टपरीवरील दहा रुपयांची कॉफी चांगली असते" असे काहीबाही ऐकवले होते.
आता शहरात वाढलेल्यांनाच जर सीसीडीच्या कडवट कॉफीपेक्षा टपरीवरील दहा रुपयांची चहा किंवा कॉफी अधिक चांगली वाटत असेल तर ते गावाकडच्या पोरांना तसे वाटले तर त्यात त्यांचे काय चुकले?
ही दुटप्पी भुमिका असून समस्त गावाकडच्या आयटीतील पोरांच्या वतीने मी त्याचा त्रिवार निषेध करतो.
9 Oct 2015 - 2:07 pm | बॅटमॅन
=))
मुद्दा इतकाच आहे की असे कढ येतात त्याच्या मुळाशी "आता बरिस्ता / स्टारबक्समध्ये जाण्याची ऐपत आलीये" हे सांगणे हाच मेन हेतू असतो. नायतर "अगोदर जसा टपरीवर चहा पीत होतो, तसाच आत्ताही पितो" असे सांगण्यात अर्थ काय आहे? "अजूनही चहा पितो, कारण स्टारबक्स इतके पैशे आले तरी साधी राहणी......इत्यादी इत्यादी बैलशीट" मध्ये "पैशे आले" हे खुबीने दडपलं की झालं.
9 Oct 2015 - 2:29 pm | पैसा
कोणाला शीशीडीच्या कोमट कॅफे पेक्षा उडप्याची फिल्टर कापी खरीच आवडत असेल तर? =))
9 Oct 2015 - 3:58 pm | सतिश गावडे
त्यांनी तसं आधीच सांगायला हवं होतं ना मग.
अर्थात त्यांचीही सीसीडीत कॉफी प्यायची ती पहिलीच वेळ असेल तर हम माप करताय उनको. ;)
9 Oct 2015 - 4:03 pm | बॅटमॅन
तो मुद्दा वेगळा. विशिष्ट संदर्भात मी म्हणतोय तसे प्रतिसाद आले की ओळखावे साधारणपणे काय चाल्लंय ते.
9 Oct 2015 - 2:29 pm | अद्द्या
आणि हे असं काही म्हणायचे दिवस हि असतात ठरलेले . .
म्हणजे महिन्याचा शेवटचा एक आठवडा वगेरे . . " मंथ एंड " .
किती पण पैसे कमवा . याचा त्रास होतोच . मग त्या वेळेला टपरी वरचा चहा हि ऐश असते . =]]