तू उर्वशी तू मर्यादा , गीता रिता ज्युली शांती
तुझीच सारी अनंत रूपे, यास्मिन किंवा मंदाकिनी ती
अग्निरथी तू दुग्धदायिनी,
तुलाच नमितो कपूर राजीव,
हरहर गंगे तुलाच स्मरती
"बॅाली"वुडचे भक्त चिरंजीव
स्नानार्थं जलपातगामिनी
तुझ्या पल्लुचे कडे निसरडे….
कितीक आले गेले भुलले
तुझ्या दर्शने शांत गळाले
प्रणयसंगम तूनळी रंजन
तिथेच फिरते चक्र निरंतन
विशालसुंदर आम्र निरंतर
तिथे विरावे माझे अंतर
प्रणयसलिला मुक्ता कांता
ये वेगे, जा घेऊन मजला
मम तीर्थाचा तुला दिलासा,
जीवास थकल्या होई विसावा
तू उर्वशी तू मर्यादा...........
अज्ञानी बालकांसाठी संदर्भ -
उर्वशी -प्यार करके देखो
मर्यादा - देशवासी
गीता -लड़ाई
रिता - आखरी बाज़ी
ज्युली - जिते है शान से
शांती - मेरा साथी
तुनळी - युट्युब
प्रतिक्रिया
26 Sep 2015 - 1:31 pm | मांत्रिक
दमामि तुमची विडंबन स्टाईल आवडते. कुठेही मूळ रचना किंवा लेखक/कवी/कवयित्री यांच्यावर रोख न धरता एक स्वतंत्र कलाकृती निर्माण करता. तुमच्या विडंबनात मूळ रचना व रचनाकार यांचा कुठेही अपमान, चेष्टा, थट्टा न करता वेगळाच विषय विडंबीत होऊन पुढे येतो.
हे देखील आवडलं. बाॅलीवूड नायिकांच्यावर रोख आहे विडंबनाचा.
26 Sep 2015 - 1:58 pm | अभ्या..
दुबई कांड राहिले वाटते. प्रक्षिप्त असावे. ;)
26 Sep 2015 - 2:05 pm | मांत्रिक
दुबई कांड? काय घडलेलं? व्यनी कराल?
26 Sep 2015 - 2:10 pm | एस
त्याशिवाय कवितेत मज्जा नाय! :-)
26 Sep 2015 - 2:33 pm | अत्रुप्त आत्मा
@दुबई कांड राहिले वाटते. प्रक्षिप्त असावे. >>. अगदी अगदी, ह्येच मणी आलं! ;)
26 Sep 2015 - 2:39 pm | दमामि
आपण आपली खीर खावी, उगा खडा चघळण्यात काय आनंद?-
इति प्रथमपुरुषी एकवचन!
26 Sep 2015 - 5:20 pm | दमामि
बालकांड तसही वेगळंच असते नाही का?;)
26 Sep 2015 - 2:14 pm | विनोद१८
माई मोड ऑन.
अरे दमाम्या चावट कुठचा, नुसतीच कविता कसली देतोस, कवितेबरोबरच तिची तुनळीवरची लिंक देखील द्यायची होतीस म्हणजे मग त्या कवितेचा अधिक आस्वाद घेता आला असता. असे आमच्या ह्यांना वाटते.
माई मोड ऑफ.
26 Sep 2015 - 2:48 pm | चांदणे संदीप
अहो गंगेला (म्हणजे मूळ कवितेला) जरा दम तरी घेऊ द्यायचा ना दमामि!
26 Sep 2015 - 2:50 pm | नाखु
संदर्भाने विनोदालाही (सु)मोड आले तु नळीचे!!!
26 Sep 2015 - 5:11 pm | प्रचेतस
खी खी खी
कसं काय सुचतं राव तुम्हाला?
27 Sep 2015 - 8:22 am | प्राची अश्विनी
:):):)
27 Sep 2015 - 9:09 am | ज्ञानोबाचे पैजार
हे गंगा स्त्रोत्र सुध्दा भारी आहे.
बर्याच दिवसात या गंगेचा दर्शन झाला नाही.(बहुतेक तेजाब मध्ये शेवटचे)
पैजारबुवा,
27 Sep 2015 - 12:28 pm | दमामि
नाही, नंतर दोन अल्बम आले होते, पण पडलेच!
28 Sep 2015 - 6:36 pm | प्यारे१
येतानाच पडून आले होते ते अल्बम.
27 Sep 2015 - 12:32 pm | मृत्युन्जय
दंडवत स्वीकारावा गुर्जी.
27 Sep 2015 - 12:45 pm | दमामि
वत्सा, तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.:)
27 Sep 2015 - 12:39 pm | आदूबाळ
लोल. एक्स रेटेड विडंबन!
27 Sep 2015 - 12:44 pm | दमामि
धन्यवाद, मला वाटले धागा उडतो की काय?
27 Sep 2015 - 12:52 pm | पैसा
मला वाटलं, मोदींच्या गंगा स्वच्छता अभियानाबद्दल लिहिताय की काय! ;)
27 Sep 2015 - 4:42 pm | अनुप ढेरे
निराकार गाढवांचा नवा अवतार आहे का हा आयडी?
कविता आवडली!
29 Sep 2015 - 2:27 pm | पगला गजोधर
लेखकाने कृपया संधर्भासहित स्पष्टीकरण द्यावे, की त्याला इथे नक्की काय म्हणायचं ?
29 Sep 2015 - 5:52 pm | दमामि
मानलं , इतके व्यवस्थित बारकाईने वाचल्याबद्दल! __/\__
29 Sep 2015 - 4:29 pm | खटपट्या
शिव शिव, आता सत्संगामधे जाउन बसल्याशिवाय मन शुध्द होणार नाही.
29 Sep 2015 - 5:37 pm | दमामि
अहो, शिव शिव वाली झिनत अमन होती, मंदाकिनी नव्हे.
29 Sep 2015 - 9:04 pm | खटपट्या
ह्म्म, झिनतकडे शिकवणीला जायची वाटते मंदाकीनी. सगळे गुण घेतलेत.
9 Oct 2015 - 10:54 am | प्यारे१
राज कपूर आणि धबधबा: एक ओलेता आढावा असा एक लेख येऊ द्या. त्यात 12वा खेळाडू म्हणून किशन कन्हैय्या, 13 वा खेळाडू म्हणून टारझन असे चित्रपट जोडावेत.
महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना .... असो!
9 Oct 2015 - 11:22 am | बबन ताम्बे
आमच्या खालील लेखात थोडासा आढावा घेतला आहे.
http://www.misalpav.com/node/25739
9 Oct 2015 - 11:34 am | दमामि
राज कपूर आणि धबधबा फक्त दोन ओळीत??
छे छे अहो त्यावर जितके लिहू तितके थोडे, अख्खी रात्र अपुरी पडेल.
9 Oct 2015 - 11:40 am | बबन ताम्बे
धबाबा तोय आदळे..
9 Oct 2015 - 6:14 pm | दमामि
आता सिम्मीचा नंबर
29 Sep 2015 - 9:07 pm | बिन्नी
कै कळळं नै बै :(
9 Oct 2015 - 6:16 pm | दमामि
जाऊद्या, आपण बालोपासना करायची का?
9 Oct 2015 - 8:27 am | दमामि
हिंदू मुस्लिम वाद या कवितेवर न आणल्याबद्दल संबंधीत लोकांना धन्यवाद !
( काही नाही उगाच धागा वर आणण्यासाठी लिहिलेय.):):):)
9 Oct 2015 - 8:38 am | योगी९००
सुरेख..!!
जीवास थकल्या होई विसावा
येथे विसावा चा अर्थ नक्की काय आहे?
बाकी मीटर मध्ये बसवायचा प्रयत्न केला. "आओ बच्चो तुम्हे सिखायें" च्या चालीत चांगले वाटतेय..!!
9 Oct 2015 - 9:46 am | दमामि
अरे हो खरेच की, धन्यवाद!
विसावा चे इथे अनेक अर्थ होऊ शकतात, त्यातला एक म्हणजे," तेवढीच एक शांत करणारी गोष्ट"
9 Oct 2015 - 11:08 am | सालस
काय व्यासंग आहे तुमचा.मान गये!तु नळीचा चांगला उपयोग;)
9 Oct 2015 - 4:06 pm | सूड
आजचा/ची बोलवता/ती धनी/ण कोण?
9 Oct 2015 - 4:12 pm | बॅटमॅन
_/\_
फक्त ते तिसर्या लायनीशी असहमत आहे. यासंबंधीचे परिशीलन तूनळीवर कुणी करत असेल तर त्याला 'क्ष' कुळाची माहितीच नसावी असे वाटते. =))
9 Oct 2015 - 5:06 pm | सूड
आयडी चालवणारे क्ष कुळाची माहिती फार नसल्याचे असल्याचे आमच्या बातमीदाराकडून कळले आहे. ;)
9 Oct 2015 - 5:10 pm | प्यारे१
थोडक्यात 'नसलेले लिंग' चिकटवण्यात आले आहे काय?
- नुकतीच असली चर्चा कुठेतरी वाचलेला!
9 Oct 2015 - 6:22 pm | बॅटमॅन
मोठीच लैंगिक समस्या झाली ही तर =))
9 Oct 2015 - 6:29 pm | दमामि
यावर उपयोगी कुठचं "सूक्त वा सूत्र" आहे का हो?
रात्री सूक्त वगैरे? जे चांगलेच काम करेल?
9 Oct 2015 - 6:30 pm | दमामि
इति भोळाभाबडा दमामि
9 Oct 2015 - 6:31 pm | बॅटमॅन
एक सूक्त आहे. संक्लिद्य सूक्त. पण इथे दिले तर गहजब व्हायचा. =))
9 Oct 2015 - 6:33 pm | प्यारे१
व्यनि करा.... दमामिंना. बसू दे सांस्कृतिक धक्के.
कदाचित त्यापुढचं काही ज्ञानामृत तुलाच पाजून आडवा करेल हे (हा किंवा ही म्हटलेलं नाही) दमामि बघ ब्वा!
9 Oct 2015 - 6:43 pm | दमामि
करा करा, व्य निची वाट पहातो. :)
9 Oct 2015 - 5:17 pm | बॅटमॅन
अरे अरे अरे. हे म्हणजे जैन कांदाभजी सेंटर पैकी प्रकार झाला =))
9 Oct 2015 - 5:18 pm | सूड
तर काय!! पूर्वी लोक वारावर जेवायला जात, हल्ली आयडी वारावर वापरायला मिळतात. आहात कुठे!! =))
9 Oct 2015 - 6:46 pm | दमामि
काहिही हा सुडूक!
9 Oct 2015 - 6:11 pm | दमामि
ते काय आहे, " दैनिक गती , किंवा क्ष घन " वृत्तात(की वृत्तीत) बसत नाही.
9 Oct 2015 - 6:20 pm | बॅटमॅन
प्रणयसंगम अ'क्ष'त रंजन
हे बसू शकेल, काय म्हंटा?
9 Oct 2015 - 6:25 pm | दमामि
बॅट्या , भावा,जिंकलंस की रं!
9 Oct 2015 - 11:34 pm | अत्रुप्त आत्मा
@प्रणयसंगम अ'क्ष'त रंजन>> :-D या मेल्या खाटुकाला ना, सरळ लटकवून ठेवले पाहिजे,ते ही दिवसा!!! :-D