तुमच्या लुमियासाठी { Microsoft Nokia Lumia }

मदनबाण's picture
मदनबाण in तंत्रजगत
13 Oct 2014 - 10:07 am

तर मंडळी आता अ‍ॅन्ड्रॉइड वरुन विंडोज ८.१ {अपडेट} वर शिफ्ट झालो आहे. नव्या ओएस आणि नव्या फोनचा अनुभव चांगला आहे. अ‍ॅन्ड्रॉइडच्या युजर इंटरफेसला आता अनेकजण कंटाळले आहेत, आणि सर्व जण नव्या नव्या ओएस वापरण्यास उत्सुक आहेत.
हा धागा लुमियाचे अनुभव / अ‍ॅप्स / सेटिंग्स /सिक्युरिटी / तांत्रिक माहिती यासाठी पूर्णपणे खुला आहे, इथे मिपावर लुमिया वापरकर्ते आहेतच त्यांनीही त्यांना माहित असलेल्या गोष्टींची भर या धाग्यात जरुर घालावी. :)

अ‍ॅप्स :-

१} Transfer my Data :-
नविन फोन घेतला की सगळ्यात पहिले काम असते ते आधीच्या फोन मधले फोन कॉन्टॅक्स नविन मोबाइल मधे मुव्ह करणे. बरेच जण गुगल सिंक करुन ठेवतात,पण काही वेळा काही तांत्रिक कारणांमुळे हे होत नाही. लुमिया मधे ट्रान्सफर माय डेटा हे अ‍ॅप आहे, हे अ‍ॅप वापरुन ब्लू-टुथ च्या सहाय्याने अ‍ॅन्ड्रॉइड मधले सगळे फोन कॉन्टॅक्स इंपोर्ट करता येतात.

२} Authenticator :-
विंडोजवर शिफ्ट होण्यापूर्वी मी आधी जी-मेल साठी असलेले २-स्टेप अ‍ॅथंटिकेटर अ‍ॅप वापरत होतो, मेल सिक्युरिटी महत्वाची असल्याने मी आधी विंडोजसाठी असे अ‍ॅप आहे का ? ते शोधले. ते मिळाले आणि मगच विंडोजवर स्वीच मारण्याचा निर्णय घेतला.

सध्या जसे जसे अ‍ॅप्स निवडत जाईन तसे तसे या धाग्यावर ती मी देत जाईन... अ‍ॅन्ड्रॉइडवर उपलब्ध असलेली बरीचशी अ‍ॅप्स विंडोजवर उपलब्ध आहेत,अगदी व्हॉट्अ‍ॅप सकट. अजुन बरीचशी यायची देखील आहेत. तेव्हा तुमच्या लुमिया संदर्भात सर्व प्रतिसादांचे स्वागत आहे.

मायक्रोसॉफ्ट अ‍ॅप स्टोअर :- http://www.windowsphone.com/en-us/store/featured-apps

मदनबाण.....

प्रतिक्रिया

ऋष्या's picture

7 Jul 2015 - 5:02 pm | ऋष्या

धन्यवाद! Windows 8.1 वर व्हॉट्सअ‍ॅपचे प्रॉब्लेम्स आहेत का? माझ्या एका मित्राच्या मते व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप आणि व्हॉट्सअ‍ॅपचा media (photos and videos) SD कार्ड वर move करता येत नाहीत. त्यामुळे ८ जीबी फोन मेमरी सुध्दा अपुरी पडते. हे खरे आहे का? व्हॉट्सअ‍ॅपचा फक्त media SD कार्ड वर move करता आला तरी पुरे आहे. कृपया मदत करा.

go to Seetings>Storage sense & Select SD card option.

होय हा ओप्शन तर केला नसेल तर मेमरी अपुरीच पडणार.
दुसरे एक महत्त्वाचे म्हणजे फोनमध्ये अगोदरच "upload photos and synrconise files to OneDrive "ON" ठेवलेले असते ते OFF करावे.नाहीतर भरमसाठ डेटा खाइल.

मुळात विंडोज फोन बिझनेस फोन आहेत असं म्हणण्यापेक्षा विंडोज ओएस बिझनेससाठी होती आणि आहे फाइल ,इमेल आणि सिक्युअरटीला प्राधान्य आहे . मिडियाला नाही. फोनची बांधणि आणि कॅम्रा नोकियाकडून मिळाले .त्याचा परिणाम -
१) WAV ,AVI ,MOV,FLAC वगैरे बय्राच फाइल सपॅाट करत नाही आणि फोन सिक्यअर राहावा म्हणून या फाइल्स दुसय्रा फोनमधून ब्लुटुथने पाठवल्यास त्या घेतच नाही. हा प्रश्न वॅाटसअपमध्ये सतावत असेल.
२) तुम्हाला फोटोग्राफी महत्त्वाची वाटत असल्यास ७३० चा कार्ल झाइस कॅम्रा अति उत्कृष्ट आहे.६४०,६३० चेही कॅमरे फार चांगले आहेत.
३)मेमरीचा काहीच प्रॅाब्लेम येत नाही.

ऋष्या's picture

8 Jul 2015 - 3:47 pm | ऋष्या

धन्यवाद

नोकिया फोन वापरणार्‍याने "स्नेक" आवडीने खेळला होता, नोकिया ३३१० आणि ३३१५ च्या काळात "स्नेक" गेम फारच लोकप्रिय झाला होता.
तसाच स्नेक गेम मी हल्ली खेळत आहे... आणि त्यामुळेच "नोकिया" चे जुने दिवस सुद्धा आठवले. :)
Snake

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aashiqui Mein Teri... ;) :- 36 China Town

अशा रीतीने धाग्याचे द्विशतक झाल्याबद्दल बाण रावांना दोन बदामाचा आकारवाले फुगे, सेना कार्यालयाच्या बोर्डवर लावलेला धनुष्यबाण(चोरून आणलेला) आणि जुना panasonic मोबाइल विथ सेपरेट एंटेना असा संच भेट देण्यात येत आहे.

मदनबाण's picture

28 Aug 2015 - 3:50 pm | मदनबाण

प्यारे... धन्स हो... तु़झ्यामुळे जुने मिपा दिवस आठवले... माझ्या खरडवहीत त्यावेळी डोकवले असता खालील चिन्ह दिसायचे...

Madanban

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aashiqui Mein Teri... ;) :- 36 China Town

कंजूस's picture

28 Aug 2015 - 4:14 pm | कंजूस

video compressor appपरवा सापडले .फक्त १ एमबी.
१२८०x चे video झटकन २४०x वगैरे करून देतो.६० एमबीचा व्हिडिओ एकदम ६ एमबी होतो.file sd cardमध्ये सेव होते.

best slideshow app वापरून फोटोंचा स्लाइडशो करता येतो कोणतेही बॅकग्राउंड म्युझिक जोडता येते.file save होते.

briefcase app एक फाइल मॅनेजर.

नया है वह's picture

2 Sep 2015 - 6:33 pm | नया है वह

.

नया है वह's picture

2 Sep 2015 - 6:32 pm | नया है वह

mp3 गाण्यांचे गायक,artist name, album आणी चित्र बदलण्यासाठी छान app.

मदनबाण's picture

2 Sep 2015 - 8:01 pm | मदनबाण

WinTools :-वेगवेगळी टुल्स असलेले अ‍ॅप. ठीक वाटलं.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Halke Gaadi Haako... { Folk Fusion by Neeraj Arya's Kabir Cafe - Official Video }

नया है वह's picture

8 Sep 2015 - 7:29 pm | नया है वह

बरेच टुल्स दिले आहेत. आणि easy to use

धनावडे's picture

9 Sep 2015 - 12:21 am | धनावडे

जुनी हिंदी गाणी online ऐकण्यासाठी old Hindi song म्हणून अॅप छान आहे

नया है वह's picture

11 Sep 2015 - 5:04 pm | नया है वह

हे cross platfrom app जे कोणतीही फाईल wi-fi द्वारे ट्रान्स्फर करते. no data charges.

ट्रान्स्फर फाईलस
from Lumia to android, from Android to Lumia
from Lumia to Apple, from Apple to Lumia
from android, to Apple, from Apple to android,

बहुतेक वेळा Android to Lumia ट्रान्स्फरला काही अडचणी येऊ शकतात (वैयक्तिक अनुभव)

बाकी मस्त अॅप १gb फाईल काही ५-१० mins. मधे ट्रान्स्फर होते

भटकंती अनलिमिटेड's picture

8 Oct 2015 - 12:29 pm | भटकंती अनलिमिटेड

देवनागरी लेखनासाठी गुगल हिंदी कीबोर्डएवढा प्रबळ दावेदार आहे का विंडोज फोनसाठी?

देवनागरी लेखनासाठी गुगल हिंदी कीबोर्डएवढा प्रबळ दावेदार आहे का विंडोज फोनसाठी?
नाही.टाईप मराठी हे अ‍ॅप आहे, पण कॉपी पेस्ट करुन टंकणे कंटाळवाणे आहे. :(
जितकी लक्ष मायक्रोसॉफ्टकडुन या फोनच्या बाजारपेठेकडे द्यायला हवे होते,तितके ते न दिल्याने त्याचा तोटा लुमिया वापरणार्‍यांना अनेकदा जाणवतो, अगदी अ‍ॅप डेव्हलपर देखील विशेष लक्ष देत नाही असे जाणवले आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अधीर मन झाले,मधुर घन आले... :- निळकंठ मास्तर

वेल्लाभट's picture

29 Oct 2015 - 4:43 pm | वेल्लाभट

पण कशाला
सरळ लँगवेज मधे जाऊन हिंदी आणि तो कीबोर्ड डाउनलोड करा. खतम विषय.
मस्त आहे सोपा आणि एफिशियंट. जबरदस्त.

काळा पहाड's picture

9 Oct 2015 - 1:29 am | काळा पहाड

१० च्या खिडक्या कधी येणार ते वाट बघून दमलो.

कंजूस's picture

9 Oct 2015 - 5:50 am | कंजूस

lumia 550 ( 4G LTE) ,Lumia 950 XL कालच लाँच झाले. दहाच्या खिडकीत उघडतात पण दहावर सर्वच अॅप अपग्रेड झालेली नाहीत.डिसेंबरात दुकानात येतील.

नेटिव ब्राउजर "EDGE" नावाचा आणि फास्ट आहे असा दावा आहे( कारण optimise केला आहे).

मदनबाण's picture

9 Oct 2015 - 6:46 am | मदनबाण

दहाच्या खिडकीत उघडतात पण दहावर सर्वच अॅप अपग्रेड झालेली नाहीत.डिसेंबरात दुकानात येतील.
हे कशाला कालनिर्णय २०१५ सध्याच्या व्हर्जन मधे उघडत नाही ! मी Maxthon ब्राउजर वापरतो,पण तो असंख्य वेळा कोसळतो.
Ringtones box अ‍ॅप वापरुन काही मस्त रिंगटोन्स डाउनलोड केल्या आहेत. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अधीर मन झाले,मधुर घन आले... :- निळकंठ मास्तर

कंजूस's picture

9 Oct 2015 - 9:36 am | कंजूस

lumia मध्ये mp3 वगैरे गाण्यांचे रेकॅार्डींग /ब्लुटुथचे रिंगटोन करता येत नाहीत.फक्त डौनलोड .wav file रिंगटोन होतात.Ringtone Maker 8.1app वापरून कोणतेही गाणे sd कार्डातले होते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Oct 2015 - 9:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

लुमिया फोन हँगला असताना हार्ड रिसेट करायसाठी आधी सॉफ्ट रिसेट करावा लागतो.

सॉफ्ट रिसेट करायसाठी अनलॉक बटन + व्हॉल्युम कमी करायचं बटण दाबावं. सुमारे २०-२५ सेकंदानी फोन व्हायब्रेट होउन रिस्टार्ट होईल. ह्यानंतर दोन पद्धतीनी फोन हार्ड रिसेट करता येउ शकतो. एक म्हणजे थेट सेटिंग मधे जाउन फॅक्टरी रिसेट मारणं (सेटिंग्स>अबाउट> फॅक्टरी रिसेट) किंवा दुसरं म्हणजे खालच्या पद्धतीने रिसेट करणं.

१. फोन स्विच ऑफ करुन स्विच ऑन करायचा
२. फोन रिस्टार्ट होउन होम स्क्रीन ला आला की पॉवर की फोन व्हायब्रेट होईपर्यंत होल्ड करायची
३. व्हायब्रेट झाल्याझाल्या व्हॉल्युम डाउन चं बटण दाबुन धरायचं.
४. काही सेकंदांनी स्क्रीन्वर एक्स्क्लेमेशन मार्क (!) दिसेल.
५. ह्या स्क्रीन वर खालच्या क्रमाने बटणं दाबायची व्हॉल्युम अप> व्हॉल्युम डाउन> पॉवर> व्हॉल्युम डाउन.

दुसरी पदधत वापरायला किचकट आहे. पण माहिती असावी. काही वेळेला फोन गंडला की सेटिंग ला जायच्या आतमधेचं हँगतो. त्यावेळेला दुसरी पद्धत वापरायची. अदरवाईज पहिली पद्धत जिंदाबाद.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Oct 2015 - 9:30 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

७२० साठी विन फोन १० कधी येणारे काही कल्पना?

मदनबाण's picture

26 Oct 2015 - 11:31 am | मदनबाण

जर तुमची OS version 8.10.14219.341, or higher installed असेल तर तुम्हाला १० अपडेट करता येइल, केव्हा ? ते नक्की अजुन कळाले नाहीये.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जान ओ बेबी... ;)

भटकंती अनलिमिटेड's picture

28 Oct 2015 - 5:53 pm | भटकंती अनलिमिटेड

Package arrived at a courier facility. Pune, IN. :-)

कॉणी केला आहे का?
कोणता वाय फाय डीवाइस वापरला?
एचडीएमआय केबल वापरुन शक्य आहे का?

वेल्लाभट's picture

20 Nov 2015 - 3:24 pm | वेल्लाभट

फिटनेस ट्रॅकिंग साठी अ‍ॅक्टिव्ह फिटनेस नावाचं अ‍ॅप बरं आहे. वापरतोय.

लहानपणी पिक ए स्टीक चा गेम खेळ खेळलो होतो... फार मजा यायची.
तोच गेम थोड्याश्या वेगळ्या पद्धतीत खेळता येइल :- Pick A Pencil

बहुतेक हे माझ्याकडुन हे शेवटचे अ‍ॅप... बाय बाय लुमिया !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Baltic Dry Shipping Index Just Collapsed To An All-Time Record Low

वेल्लाभट's picture

20 Nov 2015 - 4:07 pm | वेल्लाभट

बाय बाय लुमिया का???

मला वाटले नव्हते की मी विंडोज वरुन अँड्रॉइडवर शिफ्ट होइन, परंतु माझ्या तिर्थरुपांना मध्यंतरी मोटो इ ४ जी घेउन दिल्यानंतर बर्‍याच काळाने अँड्रॉइडव ओएस ला हात लावला, ती सुद्धा स्टॉक... टेस्ट ऑफ व्हॅनिला. मग मी सुद्धा स्टॉक अँड्रॉइडवच्या प्रेमात पडलो आणि मोटो जी -३ वर शिफ्ट झालो.
मोटो जी- ३ + सॅमसंग इव्हीओ प्लस क्लास टेन मायक्रोएसडी कार्ड यांचे झकास काँबिनेशन वापरतो आहे.
P1
P2
P3

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Baltic Dry Shipping Index Just Collapsed To An All-Time Record Low

Lumia Help + Tips मधून

DLNA stands for Digital Living Network Alliance. It provides an easy way to share media on a network.

DLNA Terminology:

DLNA - Digital Living Network Appliance. A media sharing device that uses standard computer networking protocols.

**
Lumia 630 TV वर प्रजेक्शन करण्याचे उत्तर-
Screen Projection makes it possible for you to mirror your phone's screen onto a TV, PC, monitor, or projector. Copyrighted material is not compatible with Screen Projection on the Lumia 630, but you can share a wealth of content such as start screen, menus, photos, videos and documents with this feature. Options for wireless sharing with compatible devices and USB sharing for PC are supported.

Wireless connection: Both your Lumia phone and your external device need to support the specific technology.
1.Enable Miracast on the receiver (TV, monitor etc.)
2.Open the Screen Projection on the phone, go to Settings > project my screen and when a compatible device is found, tap to connect.
3.To switch off the Screen Projection, go to Settings > project my screen and tap on the name of a connected device to disconnect.

USB connection:
1.Install the Project My Screen app from the Microsoft Download Center.
2.Start the Project My Screen app on your PC.
3.Connect your phone to a computer with a compatible USB cable.
4.Follow the prompts that appear on your phone screen.
5.To switch off the Screen Projection, go to Settings > project my screen and tap on Windows PC to disconnect.

तुंम्ही लुमिया वरुन मोटोवर उडी मारलीत? ओके. पण त्याचा रिव्ह्यु मी वाचला आहे, जास्त निगेटीव्ह नसला तरी तो पॉझीटीव्हही नाही. सध्या मायक्रोसॉफ्टच्या फोनलाच जास्त डीमांड चालू आहे. बाकिचे महागातले महाग अ‍ॅन्ड्रॉइड फोन आहेत पण त्यातही हॅगिंगचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे बघू मीसुद्धा अ‍ॅन्ड्रॉइडपेक्षा मग विंडोजचाच फोन घेण्याच्या विचारात आहे.

पण त्याचा रिव्ह्यु मी वाचला आहे, जास्त निगेटीव्ह नसला तरी तो पॉझीटीव्हही नाही.
मोटो जी ३र्ड जनरेशन हा टॉप सेलिंग "बजेट" स्मार्ट फोन आहे. याच्या जोडीला अनेक स्पर्धक असले तरी टॉप १० सेलिंग मधे सध्या याचा नंबर लागलेला आहे, ऑगस्ट मधे एका आठवड्यातच हा फोन सोल्ड आउट स्टेटसला पोहचला होता. बजेटच्या नुसार IPX-7 सर्टिफिकेशन असलेला हा फोन मिळतो हे एक विशेष आहे.
मला बाकीच्या फिचर्स पेक्षा ओएस पर्फोरमन्स हवा होता आणि त्यासाठीच मी या फोनची निवड केली.
एक रिव्हू :- Moto G 3rd Gen रिव्यू: स्पेसिफिकेशन नहीं, परफॉर्मेंस ज्यादा जरूरी

विंडोज फोन वाईट नक्कीच नाही,पण त्यातल्या बर्‍याचश्या त्रुटींकडे लक्ष पुरवले जात नाही असे दिसले.साधे मराठी लिहण्यासाठी बरेच सव्य-अपसव्य करायला लागायचे ! त्या मराठी लिहण्याच्या अ‍ॅप मधे सद्धा आता जाहिराती घुसवडल्या आहेत. आता काय अप्पावर मी मराठीत भरभर लिहु शकतो, जे आधी फारच त्रासदायक काम होते !
मोटो-जी जी ३र्ड जनरेशन निवडण्याच्या मागचे अजुन एक कारण म्हणजे याला Marshmallow अपडेट देखील मिळणार आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridev

वेल्लाभट's picture

24 Nov 2015 - 11:57 am | वेल्लाभट

असहमत

मी फक्त हिंदी कीबोर्ड, तोही मायक्रोसॉफ्ट वालाच. अ‍ॅप बिप नाही. तो इन्स्टॉल केलाय. दोन वर्ष झाली. सप्पासप टाइप होतं, शेट्ट प्रॉब्लेम येत नाही.

आताच्या माझ्याफोनमध्येतरी मराठीसाठी खटपट करावी लागत नाही-अॅप वगैरे.सरळसरळ टॅागल कीपॅड आहे.
लुमियाचा कॅम्रा इतर कोणत्याही सॅमसंगला भारी पडतो.फोकसिंग आणि झूम करताना पिक्सेलची वाट लावत नाही.विक्सच्या डबीवरचं बारीक अक्षर बारापट झूम करूनही सेव केलेला फोटो 1.5MB मिळतो.
मेमरी संपण्याची विवंचना नाही.

आताच्या माझ्याफोनमध्येतरी मराठीसाठी खटपट करावी लागत नाही-अॅप वगैरे.सरळसरळ टॅागल कीपॅड आहे.
हे मला पहायला हवे ! कॅम्रा भारी आहे यात काही प्रश्नच नाही.तम्ही मराठी की-बोर्ड कसा टॉगल केलात ? मराठी की-बोर्ड / फॉन्ट वेगळा इनस्टॉल करावा लागतो काय ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridev

महेश हतोळकर's picture

24 Nov 2015 - 10:58 am | महेश हतोळकर

वेगळा मराठी फाँट इन्स्टॉल करावा लागत नाही (युनिकोडला धन्यवाद).

Settings --> Time & languages --> Keyboard --> Add keyboards

हवा तो कळफलक निवडा. काम झाले.

नरेन.'s picture

24 Nov 2015 - 11:04 am | नरेन.

Settings --> Keyboard --> Add keyboards

माझ्याकडे English, Hindi (Devnagari) आणि Hinglish असे तीन पर्याय आहेत. अजीबात काही त्रास होत नाही.

वेल्लाभट's picture

24 Nov 2015 - 12:00 pm | वेल्लाभट

हेच म्हणतो.

इट्स डॅम्न सिंपल
नो नॉनसेन्स.

कंजूस's picture

24 Nov 2015 - 5:35 pm | कंजूस

answer to your Q

Screen shot 1-

आता पहा हे लिहितांना फक्त ENG बटण दाबल्यावर हिंदी आले.
Screen shot 2-

आणि हा फोटो विक्सच्या डबीवरचे लिखाण बारापट झूम केल्यावर

कंजूस's picture

24 Nov 2015 - 5:38 pm | कंजूस

adobe flash player डाउनलोड करू देत नाही आणि html5 audio video code पुर्ण विकसित नाही ही अडचण आहे.

मदनबाण's picture

24 Nov 2015 - 9:25 pm | मदनबाण

कंजूस मामा सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद ! :)
हा की बोर्ड मी सुद्धा टॉगल करुन पाहिला होता,मला वाटले अजुन कोणता दुसरा पर्याय आहे जो मला समजला नव्हता ! या कीबोर्ड पेक्षा गुगल किबोर्ड अधिक सोपा वाटतो. { निदान मला तरी, आणि म्हणुनच विंडोजवर मराठी टंकण्यासाठी मी अ‍ॅप वापरत होतो.} विंडोजला सुधारणा करण्यासाठी जास्त मेहनत घ्यायला हवी इतकेच आत्ता तरी म्हणतो आणि इथेच थांबतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridev

कंजूस's picture

24 Nov 2015 - 10:04 pm | कंजूस

मदनबाण,android ही आहे तर अधिक तुलनात्मक इथे लिहित रहा.मला मराठी देवनागरीतूनच लिहायला आवडते त्यामुळे 'दणका इंग्रजी -उमटेल मराठी' छाप अॅपस मला नाही आवडत.एवढं खरं की टाइपराइटरच्या लेआउटमधला कीपॅड काही सोनीच्या मोबल्यात आहे तो फार भयानक आहे.

मदनबाण's picture

24 Nov 2015 - 10:08 pm | मदनबाण

android ही आहे तर अधिक तुलनात्मक इथे लिहित रहा
हो,नक्कीच. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridev

नया है वह's picture

26 Nov 2015 - 6:45 pm | नया है वह

विविध भारती
एअर मराठी
गोल्ड एफ एम
रेडीओ ऐकणार्यांसठी मस्त अ‍ॅप!

आनंदी गोपाळ's picture

26 Nov 2015 - 8:21 pm | आनंदी गोपाळ

मी विंडोज फोन न वापरण्याचा कारणांपैकी एक म्हणजे, इंडिव्हिजुअल अ‍ॅप्स लॉक करता येत नाहीत.
उदा. फक्त व्हॉट्सॅप लॉक करता येईल असे एकही अ‍ॅप मला ठाऊक नाही.

तशी सोय यात आहे का?

नया है वह's picture

7 Dec 2015 - 7:18 pm | नया है वह

Winner Nasscom Gaming Forum Awards 2015
Game of the Year People's Choice Award
windows साठी चा मला आवडलेला सर्वोत्तम Cricket Game !

आशु जोग's picture

22 Dec 2015 - 1:54 am | आशु जोग

1) मेमरी कोणती चांगली असते.. त्यात काही प्रकार असतात का. कोणते
2) microSD, up to 128 GB याबाबत काही अधिक सांगावे.
3) 1 GB RAM ही रॅम वाढवता येते का
मजकूर कॉपी पेस्ट करताना काही फरक जाणवतो का
4) मोबाईल काँप्यूटरला कनेक्ट करता येतो का... केबल मिळते का
काँपवरून मोबाईल ऑपरेट करता येतो का
5) हीयर मॅप चांगला की गूगल मॅप
6) लुमियावरून गूगल मॅप्स वापरता येतात का
7) ऑफलाइन मॅप्स चालतात का
8) सगळी अ‍ॅप्स पेड असतात की फ्री
9) एकदा पैसे देऊन विकत घेतल्यावर ओ एस, ऑफीस ३६५ अशासाठी पैसे देत रहावे
लागते का, किती
10) मराठी की-बोर्ड फ्री की पेड
11) जिथे मोबाईल टॉवरचा सिग्नल मिळत नाही तिथे जीपीएस लोकेशन कळू शकते का
12) रेकॉर्डींगची सुविधा कशी आहे.
13) गाणी ऐकताना तरी हेडफोनच्या बटणाने गाणे बदलता येते का
14) वन-ड्राईव्ह स्टोरेज फ्री असते का आणि गूगल ड्राईव्हच्या तुलनेत काय फरक
आहे.
15) काही सिम्युलेटर आहेत का जेणेकरून डेस्क टॉपवरून टेस्ट करायला
16) जीपीएस हे नुसते अ‍ॅप्स किंवा सॉफ्टवेयर आहे की त्यासाठी योग्य ते
हार्डवेयर पण लागते.
17) जुन्या चांगल्या गोष्टी ठेवल्यात ना तशाच.
म्हणजे आपण बर्‍याच पुढच्या गोष्टी चर्चितोय पण मेसेज(SMS) वगैरे नीटसे आहे
ना
18) काँटॅक्टस किती स्टोअर करता येतात.
19) mp3 रिंगटोन बनवता येत नसतील तर अवघड आहे.
20) कंप्यूटरवरून सहजपणे कोणतीही फाईल ट्रान्सफर करता येते का

यातल्या काही प्रश्नांना वरील चर्चेत उत्तरे मिळाली आहेत.

तरीही जे शिल्लक असतील त्यांना उत्तर देण्याचा उत्तर करावा

एवढी मोठी प्रश्नावली टाकलीय @आशुजोग!
लुमिआ फोन्स हे इतर सर्व ओएस फोन्सच्या इतके वरती आहेत की त्यांच्याबद्दल चर्चा आणि तुलना होत नसते.शिवाय मोबाइल या शब्दाचा पुर्ण अर्थ लक्षात घेतला तर त्याला कंप्युटर ( तोही असेंबल्ड ,पायरेटेड ओएस टाकलेला ) जोडता येतो का हा प्रश्न फारच विचित्र वाटतो!आता तुम्हीही स्मार्टफोनबरोबर स्मार्ट व्हावं या अपेक्षेने onedrive cloud storage 15+15gb free storage देतात.अजून बरीच माहिती देऊ शकतो. तूर्तास लुमिआ घ्यायचा आणि मेमरी पुरेल का?,वाइरस सॅाफ्टवेर लागेल का?,रॅम पुरेल का?हे सर्व विसरून जायचं.