तुमच्या लुमियासाठी { Microsoft Nokia Lumia }

मदनबाण's picture
मदनबाण in तंत्रजगत
13 Oct 2014 - 10:07 am

तर मंडळी आता अ‍ॅन्ड्रॉइड वरुन विंडोज ८.१ {अपडेट} वर शिफ्ट झालो आहे. नव्या ओएस आणि नव्या फोनचा अनुभव चांगला आहे. अ‍ॅन्ड्रॉइडच्या युजर इंटरफेसला आता अनेकजण कंटाळले आहेत, आणि सर्व जण नव्या नव्या ओएस वापरण्यास उत्सुक आहेत.
हा धागा लुमियाचे अनुभव / अ‍ॅप्स / सेटिंग्स /सिक्युरिटी / तांत्रिक माहिती यासाठी पूर्णपणे खुला आहे, इथे मिपावर लुमिया वापरकर्ते आहेतच त्यांनीही त्यांना माहित असलेल्या गोष्टींची भर या धाग्यात जरुर घालावी. :)

अ‍ॅप्स :-

१} Transfer my Data :-
नविन फोन घेतला की सगळ्यात पहिले काम असते ते आधीच्या फोन मधले फोन कॉन्टॅक्स नविन मोबाइल मधे मुव्ह करणे. बरेच जण गुगल सिंक करुन ठेवतात,पण काही वेळा काही तांत्रिक कारणांमुळे हे होत नाही. लुमिया मधे ट्रान्सफर माय डेटा हे अ‍ॅप आहे, हे अ‍ॅप वापरुन ब्लू-टुथ च्या सहाय्याने अ‍ॅन्ड्रॉइड मधले सगळे फोन कॉन्टॅक्स इंपोर्ट करता येतात.

२} Authenticator :-
विंडोजवर शिफ्ट होण्यापूर्वी मी आधी जी-मेल साठी असलेले २-स्टेप अ‍ॅथंटिकेटर अ‍ॅप वापरत होतो, मेल सिक्युरिटी महत्वाची असल्याने मी आधी विंडोजसाठी असे अ‍ॅप आहे का ? ते शोधले. ते मिळाले आणि मगच विंडोजवर स्वीच मारण्याचा निर्णय घेतला.

सध्या जसे जसे अ‍ॅप्स निवडत जाईन तसे तसे या धाग्यावर ती मी देत जाईन... अ‍ॅन्ड्रॉइडवर उपलब्ध असलेली बरीचशी अ‍ॅप्स विंडोजवर उपलब्ध आहेत,अगदी व्हॉट्अ‍ॅप सकट. अजुन बरीचशी यायची देखील आहेत. तेव्हा तुमच्या लुमिया संदर्भात सर्व प्रतिसादांचे स्वागत आहे.

मायक्रोसॉफ्ट अ‍ॅप स्टोअर :- http://www.windowsphone.com/en-us/store/featured-apps

मदनबाण.....

प्रतिक्रिया

अमित मुंबईचा's picture

16 Oct 2014 - 10:37 am | अमित मुंबईचा

नवीन नोकिया लूमिया विकत घेतल्यावर आपण नोकिया अकाउंट वर साइन इन करून तीन महिन्यांपर्यंत नोकिया म्यूज़िक ही सर्विस वापरु शकता, यामधे तुम्ही हवी तितकी गाणी फ्री डाउनलोड करू शकता आणि ती गाणी SD कार्ड वर सेव करून दुसर्या डिवाइस मधे देखील वापरु शकता.
नोकिया म्यूज़िकचा संग्रह जवळपास एक दशलक्ष आहे. मराठी गाणी सुद्धा हवी ती आहेत.
मी स्वतः जवळपास दीड हजार गाणी डाउनलोड केली होती पहिल्या तीन महिन्यात.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Oct 2014 - 12:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सेम हीअर. मला ही सर्व्हिस सबस्क्राईब करायची आहे. पण क्रेडीट कार्ड नं वापरता. नोकिआ केअर मधे करुन मिळेल का टॉप अप? अ‍ॅन्युअल स्बस्क्रिपशन ला किती रुपये पडतील?

मदनबाण's picture

17 Oct 2014 - 10:31 am | मदनबाण

Battery Doctor Pro :- बॅटरी पॉवर मॅनेजमेंट. ३ स्टेप चार्जींग.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
RBI in talks with govt over a Financial Resolution Authority
Modi government cuts through red tape to make working easier in India

जेपी's picture

17 Oct 2014 - 5:12 pm | जेपी

माझ्याकडे lumia चा 525 आहे.
windows 8 वर चालतो.
अपग्रेड करता येईल का ? मी सध्या नेट आणी काही गेम वापरतो. काही चांगले गेम सुचवणे.
थांकु

मदनबाण's picture

20 Oct 2014 - 9:39 am | मदनबाण

windows 8 वर चालतो.अपग्रेड करता येईल का ?
हो.तुमचे मॉडेल अपग्रेड होउ शकते.
या बद्धल अधिक इकडे :- http://www.microsoft.com/en/mobile/support/software-update/wp8-software-...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms

नया है वह's picture

21 Apr 2015 - 10:53 am | नया है वह

.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Oct 2014 - 5:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अवांतरः व्हॉट्स अ‍ॅपवर मिपाकरांचा ग्रुप असेल तर कळवा. मला सामिल व्हायला आवडेल. इथे सांगा नंबर व्य.नि. वर कळविन.

टवाळ कार्टा's picture

20 Oct 2014 - 9:20 am | टवाळ कार्टा

=))

तो कंपूबाजांचा ग्रूप आहे???

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Oct 2014 - 9:42 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मी कंपुबाज नाही असं म्हणायचयं का? =))

व्हॉट्स अ‍ॅपवर मिपाकरांचा ग्रुप असेल तर कळवा.
अ‍ॅडमिनला तुमची विनंती कळवली आहे, निर्णया हा पूर्णपणे अ‍ॅडमिनचाच असेल.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maharashtra and Haryana poll victories will give Narendra Modi a tremendous boost to pursue economic reforms

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Oct 2014 - 9:58 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

धन्यवाद. :)

मदनबाण's picture

5 Nov 2014 - 1:43 pm | मदनबाण

@ जेपी
नेहमीचेच गेम्स सध्या खेळतो आहे,म्हणजे टेंपल-रन-२, सबवे सर्फर्स, रेल रश.
जरा वेगळे खाली देतो :-
१} AE Bubble :- एक टिपी गेम
२} AE Jewels 2 - Island Adventures :- ज्वेल्स गेम्स मला नेहमीच आवडले आहेत.
३} Candy Village :- हा इतर कँन्डी गेम्स पेक्षा वेगळा आहे.
४}Microsoft Solitaire Collection :- हा इन्स्टॉल करुन ठेवला आहे,अजुन खेळुन पाहिला नाही.
५} Tetris Blitz :- व्हिडीयो गेम्स खेळणार्‍यांना Tetris माहित नसेल असे शक्यच नाही ! ;) या गेमच्या निर्मीतीला या वर्षी ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. :)

@ संपादक मंडळ
काही तांत्रिक कारणामुळे मला हा माझा लेख, माझे लेखन या पर्यायात दिसत नाहीये ! तसेन ज्यांना हा लेख बुकमार्क करायचा आहे त्यांनाही तो करता येत नाही. काही मदत मिळेल काय ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Pentagon report a manifestation of Pakistan's support to terrorism: India
ANNUAL REPORT TO CONGRESS Military and Security Developments Involving the People’s Republic of China 2014 {2014_DoD_China_Report PDF}
Robert Vadra's Sky Light Realty inventory zooms
tenfold over three years

मदनबाण's picture

5 Nov 2014 - 2:07 pm | मदनबाण

2.5 GB चा गेम आहे.
बाब्बो ! पण तिकडे पेजवर साइझ 978 MB दाखवतय !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Pentagon report a manifestation of Pakistan's support to terrorism: India
ANNUAL REPORT TO CONGRESS Military and Security Developments Involving the People’s Republic of China 2014 {2014_DoD_China_Report PDF}
Robert Vadra's Sky Light Realty inventory zooms tenfold over three years

नंतर हळूहळू 900 MB चे अपडेट्स येतात आणि नवीन सर्कीट्स वाढत जातात.

टोपीवाला's picture

5 Nov 2014 - 5:11 pm | टोपीवाला

जसा प्रसिसाद टायिप करतोय तस लुमिया वर कस करायच ते सान्गा कि राव.....

जेपी's picture

5 Nov 2014 - 5:20 pm | जेपी

धन्यवाद मदनबाण,
मी indian airforce चा guardian हा गेम घेतला होता. गेम मस्ता आहे पण दुसर्या स्टेज हॅंग होतो

मदनबाण's picture

6 Nov 2014 - 11:04 am | मदनबाण

मी indian airforce चा guardian हा गेम घेतला होता. गेम मस्ता आहे पण दुसर्या स्टेज हॅंग होतो
गेम आवडला, साइझच्या मानाने गेम फील मस्त आहे. काला टेस्ट पास केली,आता पहिल्याच स्टेजवर आहे. अश्या प्रकारच्या फायटर प्लेनचा फील देणारा गेम मी आधी खेळलो नव्हतो, नॉरमल असतात ते फक्त टाइमपास प्लेन गेम्स ! पण यात विमान उडवण्याचा बर्‍यापैकी चांगला फील मिळतो. :) जे टारगेट डिस्ट्रॉय करायचे आहे ते लॉक करण्याची पण सुविधा द्यायला हवी होती ! युद्ध नौका बुडवण्यासाठी बर्‍याच चकरा माराव्या लागतात ! पण ओव्हरऑल मला आवडला हा खेळ. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
L&T Info to hire joint CEOs by month end; but all decisions funnelled through AM Naik

मायक्रोसॉफ्ट यापुढे "नोकिया" हे ब्रँडनेम वापरणार नाहीये. त्यामुळे बाजारात सध्या असलेले "नोकिया लुमिया" फोन हे शेवटचेच नोकिया लोगो असलेले हॅन्डसेट ठरणार आहेत.
त्यामुळेच त्यांच्या नव्या मॉडेलचे नाव आहे Microsoft Lumia 535

आजचा गेम :- Resident Evil या चित्रपटामुळे झॉम्बी गेम्सचे पेव फुटले असावे ! असाच एक मस्त झॉम्बी गेम सध्या खेळतो आहे, या गेमच्या अत्ता पर्यंत २५ लेव्हल्स मी पूर्ण केल्या आहेत. :)
DEAD TARGET: Zombie

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres
Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism
After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership

मोदक's picture

18 Dec 2014 - 5:05 pm | मोदक

DEAD TARGET: Zombie

९५ वी लेवल सुरू आहे आणि डबल मनी, फायर रेट, डॅमेज रेट, क्रिटीकल - हे "बुस्टस" आत्ता कळाले. ;)

मदनबाण's picture

18 Dec 2014 - 5:17 pm | मदनबाण

मी १२० पर्यंत गेलो, मग अनइन्स्टॉल केला, परत खेळलो परत अनइन्स्टॉल केला. काल परत नविन व्हर्जन इनस्टॉल केले ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Fed calls time on $5.7 trillion of emerging market dollar debt
Oil's Price Decline Weighs On High Yield Debt
U.S. shale junk debt tumbles amid oil crunch

अ‍ॅस्फाल्ट ट्राय केला का..?

मदनबाण's picture

19 Dec 2014 - 6:55 pm | मदनबाण

नाही... लिंक दे ना.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Make In India

भाते's picture

20 Nov 2014 - 6:23 pm | भाते

माझ्याकडे अजुनही विंडोज विस्ता प्रणाली आहे. आंजावर बरेच संशोधन (?) केल्यावर समजले कि लुमिया फोनसाठी विंडोज ७, ८/८.१ या प्रणालीची आवश्यकता आहे. पुढल्या वर्षी विंडोज १० आल्यावर सध्याचे डबडे बदलायचा विचार आहे. तोपर्यंत थांबून मग लुमिया फोन घेऊ का एखादा अ‍ॅन्ड्रॉइड (मोटो जी) घेऊ?

मी लुमिया ७३० किंवा १३२० घ्यायच्या विचारात आहे. १३२० साठी डेनिम अपडेट आली आहे का?

मदनबाण's picture

21 Nov 2014 - 1:37 pm | मदनबाण

पुढल्या वर्षी विंडोज १० आल्यावर सध्याचे डबडे बदलायचा विचार आहे. तोपर्यंत थांबून मग लुमिया फोन घेऊ का एखादा अ‍ॅन्ड्रॉइड (मोटो जी) घेऊ?
अँड्रॉइड फार वाईट आहे असं मी अजिबात म्हणणार नाही,पण नेव्हिगेशनच्या दॄष्टीने विंडोज ८.१ अधिक जलद आहे, तुम्हाला जे अ‍ॅप उघडायचे आहे त्याच्यासाठी पाने उलटवत बसण्याची गरज यात लागत नाही. मी अ‍ॅन्ड्रॉइडच्या बॅग्राउंडला चालु राहणार्‍या प्रोसेसमुळे लवकर बॅट्री ड्रेन होण्याच्या त्रासाला कंटाळलो होतो, जो विंडीज मधे अजिबात जाणवला नाही.
काही गोष्टी मात्र नक्कीच अ‍ॅन्ड्रॉइड मधे फायदेशीर आहेत, त्यातले अर्थात पहिले म्हणजे अ‍ॅप्स { आता बरेचसे विंडोजवर देखील उपलब्ध आहेत / होत आहेत.} आणि दुसरा मला जाणवलेला, म्हणजे इंनफर्मेशन शेअरिंग, यात अजुन विंडोज जरा मागे आहे, पण सुरक्षतेचा विचार केल्यास विंडोज हा नक्कीच अ‍ॅन्ड्रॉइडला मागे टाकतो.

१३२० साठी डेनिम अपडेट आली आहे का?
या बद्धल एव्हढा अंदाज नाही, बहुतेक डेनिम अपडेटचे अ‍ॅप उपलबध आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nagin (Full Song) ;) { Bajatey Raho }

आजानुकर्ण's picture

25 Nov 2014 - 12:43 am | आजानुकर्ण

जुना महागडा(!) नेक्सस-४ पडला आणि त्याचे पॉवर बटन निकामी झाले. दुरुस्तीला बराच खर्च येत होता. तेव्हा वाट पाहिली नंतर महिन्याभरात आणखी एकदा पडला तर व्हॉल्युम बटन बंद पडले. आता रिपेअर करण्याऐवजी फुटण्याची वाट पाहतोय (ग्लास कन्स्ट्रक्शन असल्याने तेही होईलच.) शेवटी तो रिपेअर करत बसण्याऐवजी ही चर्चा वाचून रिपेअरच्या कॉस्टमध्ये येईल असा एक स्वस्तातला नोकिया लुमिया (५२०) घेतला. खूपच आवडला. घेतला तेव्हा विंडोज-८ होते. अपडेट करुन ८.१ आले. बॅटरी लाईफ खूपच चांगली. विशेष म्हणजे किंमतीच्या मानाने फारच चांगला आहे. ५१२ एमबी रॅम असूनही अत्यंत स्मूथ आणि फास्ट. मी वापरतो ते व्हॉट्सॅप, इमेल, मॅप्स, रेडिओ, म्युझिक वगैरे सगळे व्यवस्थित चालते. वर्षभर चालला तरी पैसे वसूल. पडला झडला तरी फार दुःख होणार नाही. इतर फालतू अॅप्स व गेम्समध्ये फारसा रस नाही. त्याबाबत पास.

कोर्टाना तर जबराच आहे बॉ. तिला रोज एक जोक सांगायला लावतो.

तुम्ही वापरत असलेले अ‍ॅप्स / गेम्स सुचवले तर आनंदच होइल. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }

आजानुकर्ण's picture

25 Nov 2014 - 5:45 pm | आजानुकर्ण

थर्ड पार्टी अॅप विशेष वापरत नाही. हवामानाचा अंदाज घेण्यासाठी एमएसएन वेदर वापरतो. मायक्रोसॉफ्ट हेल्थही चांगले वाटले. जीपीएस अतिशय उत्तम दर्जाचा आहे. मॅप डाऊनलोड करुन ऑफलाईन वापरता येतात. मिक्स रेडिओ छान वाटले. गाणी फुकट डाऊनलोड करुन ऐकता येतात. बाकी इमेल्स, व्हॉट्सअॅप वगैरे. वयोमानाने नवीन अॅप्स झेपत नाहीत. ;)

मला लुमिआचे (५२५,७२० ,५३५ )वगैरेंचे स्पे॰ पटले फक्त एक सोडून =कैमरा आस्पेक्ट रेशो 4:3 नसून16:9 आहे. लांबुडके फोटो क्लोजअपला काय कामाचे ?ते बदलायचा पर्याय ठेवला आहे का ?
4:3मध्ये आपण पोट्रेट आणि आडवे लैँडस्केप दोन्ही काढू शकतो.

मदनबाण's picture

25 Nov 2014 - 10:39 am | मदनबाण

कॅमेर्‍याच्या सेटिंग मधे आस्पेक्ट रेशो बदलण्याचा पर्याय आहे. { निदान माझ्या मोबल्या मधे तरी आहे.}
16:9 हा वाईड स्क्रीन फोटो घेण्यासाठी अधिक उपयुक्त आहे.
लुमिया धारकांसाठी काही महत्वाचे दुवे देवुन ठेवतो :-

Nokia Pro Camera now available for Lumia 920, 925, and 928
Can changing the aspect ratio on the Nokia Lumia 920 sharpen images?
Nokia Lumia 930 Camera Tips & Tricks
Lumia Creative Studio
4 ways to improve your photos with Nokia Creative Studio 6.0
Windows Phone 8.1 Tips, Tricks and How To

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }

कंजूस's picture

25 Nov 2014 - 1:15 pm | कंजूस

७३०मध्ये ? शिवाय या लांबुडक्यांचे प्रिंटस काढतांना चांगलीच फोडणी बसेल.

मदनबाण's picture

25 Nov 2014 - 1:19 pm | मदनबाण

हो ७३० मधे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }

धर्मराजमुटके's picture

25 Nov 2014 - 7:35 pm | धर्मराजमुटके

५" स्क्रीन आणि ड्युअल सिम असे कोणते मॉडेल आहे काय ? ४.५" स्क्रीन थोडा लहान वाटतो.

धर्मराजमुटके's picture

28 Nov 2014 - 12:19 pm | धर्मराजमुटके

शेवटी मला हवा असलेले फिचर्स घेऊन मायक्रोसॉफ्ट लुमिया ५३५ आला रे आला. ५" स्क्रीन, ड्युअल सिम, १जीबी मेमरी आणि ८ जीबी स्टोअरेज. नोकीयाच्या ऐवजी मायक्रोसॉफ्टची नाममुद्रा आहे. एक आठवडा थांबून, प्रतिक्रिया बघून घ्यावा म्हणतो.

१)याच ५३५ ,५२५ वगैरेचे जिएसेम अरेना'मधले स्पेसि॰ वाचल्यास 'जावा सपोर्ट := नाही' असे लिहिले आहे .याचा अर्थ काय ?विंडोमध्ये जावा गेम्स चालत नाहीत का ? का आणखी काही अर्थ आहे ?

२)लुमिआ ६३०ची SAR VALUE 1.55 आहे जी जास्तीच्या मर्यादेच्या =1.8जवळ आहे तर काही इतर फोन्सची 1.0च्या आसपास असते याने काय धोका वगैरे असतो का याविषयी कूपया जाणकारांनी इथे अथवा वेगळ्या धाग्यात प्रकाश टाकावा ही विनंती.

जेपी's picture

2 Dec 2014 - 8:29 pm | जेपी

lumia 535 जबरा फोन.
मला हवी ती सगळी फिचर्स आहेत.
किमतीला जड जातोय पण या महिन्यात येईल हातात.

श्रीगुरुजी's picture

2 Dec 2014 - 8:35 pm | श्रीगुरुजी

lumia 535 १० डिसेंबरपासून उपलब्ध होईल असे अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर लिहिले आहे. फ्लिपकार्ट्वरही हे सध्या उपलब्ध नाही. हे मॉडेल दुकानातून मिळायला लागले आहे का? अ‍ॅमेझॉन व फ्लिपकार्टवर याची किंमत ९१९९ दिली आहे. दुकानातून मिळत असल्यास यापेक्षा कमी किंमतीला मिळेल का?

जेपी's picture

2 Dec 2014 - 8:43 pm | जेपी

lumia 535 सध्यातरी विकायला नाही.आज nokia care मध्ये पाहायला मिळाला.महिनाखेर विकत मिळेल.
किमंत सर्वत्र सारखी आहे. 9199 /- मला हीच सांगितली आहे दुकानात.

श्रीगुरुजी's picture

2 Dec 2014 - 8:50 pm | श्रीगुरुजी

धन्यवाद! कदाचित अ‍ॅमेझॉनवर १० डिसेंबरपासून मिळेल असं वाटतंय. फ्लिपकार्टवर ८ ते १२ डिसेंबरपर्यंत १०% सवलत मिळणार आहे. बघूया तिथे हे मॉडेल ९१९९ पेक्षा कमी किंमतीत मिळतंय का.

भाते's picture

3 Dec 2014 - 10:40 am | भाते

५३०/५३५ च्या तोडीचा विंडोजचा फोन लावा कंपनीकडुन कडून निम्या किंमतीत, फक्त ५ हजारात येतो आहे.

होय पण १)नोकिआच्या फोनमधल्या कैमरावर (प्रिंटस चांगले येतात)भरोसा आहे तेवढा कोणत्याही दुसऱ्या फोनवर नाही. २)लावा आजारी पडला तर कोणत्या ससाण्याकडे जायचे? ३)एचटीएमेल नोटस (वन नोट) आहे का? ४)ऑफलाइन मैपस नाही मिळणार. ५)१५जीबी फ्री ऑनलाइन स्टॉरेज कोण देणार?

आता लावा हिशेब ५ हजारांचा.

वेल्लाभट's picture

9 Dec 2014 - 10:44 am | वेल्लाभट

पोस्ट केली होती याच विषयाची पण हे उत्तर बघायचं राहिलं. धन्यवाद.

वेल्लाभट's picture

9 Dec 2014 - 11:20 am | वेल्लाभट

ते जावा चं काय?

लावा च्या साईट वर स्पेक्स दिलेली असता, जावा = नो असं आहे. त्याचा काय अर्थ?

मदनबाण's picture

9 Dec 2014 - 11:31 am | मदनबाण

लावा च्या साईट वर स्पेक्स दिलेली असता, जावा = नो असं आहे. त्याचा काय अर्थ?
Java apps are not and will not be supported in Windows Phone

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?

मदनबाण's picture

3 Dec 2014 - 10:59 am | मदनबाण

आजचे अ‍ॅप्स :-
१} Photosynth :- हे मायक्रोसॉफ्टचे panorama अ‍ॅप आहे. सोप्पे आणि मस्त.

२} Office Lens:- हे सुद्धा मायक्रोसॉफ्टचे अ‍ॅप आहे, याचा उपयोग तुमच्या डॉक्युमेंटचे / व्हाइट बोर्डचे वाचता येण्या सारखे फोटो काढण्यासाठी होतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पाकमध्ये दहशतवादी हाफिझ सईदच्या सभेसाठी विशेष रेल्वे

रवीराज's picture

5 Dec 2014 - 9:44 pm | रवीराज

2 डिसेंबर रोजी 9200 रु. मधे घेतला,मस्तच आहे आधीच्या 720 च्या तुलनेत मोठी स्क्रीन,जास्त रॅम आणि किंमत कमी.सध्या हाच वापरतो आहे.

श्रीगुरुजी's picture

7 Dec 2014 - 9:59 pm | श्रीगुरुजी

अ‍ॅमेझॉनवरून बुक केलाय. ११ ते १३ तारखेपर्यंत घरी येईल. आतापर्यंत वाचलेले रिव्ह्यू चांगले आहेत. या मॉडेलवर तुमचाही फीडबॅक लिहा.

डिफॉल्ट म्युझिक प्लेअरच्या जागी २ नविन प्लेअर्स :-

१} NiQi Music Player
२} Music player
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- RJ Dhvanit on Guitar Guruwar Ahmedabad with Aishwarya Majmudar { Cool Video,Must Watch }

वेल्लाभट's picture

9 Dec 2014 - 10:43 am | वेल्लाभट

कसा आहे?
नुकताच आलाय.
स्पेक्स भारी आहेत.
सेलकॉनचाही विंडोज फोन आलाय याच किमतीत. त्यापेक्षा लाव्हा चांगला वाटला मला कागदावर व चित्रांमधून.