प्रपोज केले मला काल तू
सॉरी पण तू खरंच फालतू
विसरून जाण्या कुणा सांगतो
दु:ख तुझे ते चुलीत घाल तू
धीर ना तुला घडीभराचा
गडी अजून तू लहान खुराचा
उतावीळ बस पळण्या पाहिले
ठोकली कुठे अजून नाल तू
प्रेमाच्या कथा मनमानी
अहंकाराची त्यास जोडणी
लाजवाब हा नखरा घेऊन
उलटी चालतो बघ चाल तू
कशास धरली होती आशा
जर उडवता येइना त्या माशा
एकतर्फी हे मनोरथ ओढून
स्वतःशी फसवले रे कमाल तू
फसले नाही तुझ्या जालाशी
म्हणून कैदाशीण का आज मी
होतास फिरत तेव्हा मागे मागे
म्हणशी अप्सरा, म्हणशी माल तू
कवी: बुर्राट ठोकर (त.जो.)
प्रतिक्रिया
9 Oct 2015 - 12:42 am | तर्राट जोकर
संपादकः अअॅड करायचंय >> कवी: बुर्राट ठोकर (त.जो.)
9 Oct 2015 - 12:46 am | चांदणे संदीप
आताच मूळ कवितेवर प्रतिसाद देऊन आलो... रॉ मटेरियल म्हणून, तोवर इथे त्यावर प्रोसेस होऊन प्रॉडक्ट हजर!
थांबा, आता वाचतो!
9 Oct 2015 - 12:52 am | अत्रुप्त आत्मा
अजुन एक आय डी-घेतला का? :P
9 Oct 2015 - 4:34 am | एस
अफलातून!
10 Oct 2015 - 1:17 am | रातराणी
मूळ कवितेपेक्षा भारी!
10 Oct 2015 - 6:30 am | चाणक्य
भारी. दुसरं कडव्याबद्दल सलाम घ्या मालक.
(सदस्यनाम लईच जमलय)
10 Oct 2015 - 3:22 pm | तर्राट जोकर
सर्व रसिक प्रतिसाददात्या सदस्यांना विनम्र धन्यवाद!
10 Oct 2015 - 3:25 pm | सतिश गावडे
जबरा... मुळ कविता वाचली नाही. आता वाचतो.
11 Oct 2015 - 11:29 am | जव्हेरगंज
आवडेश!
11 Oct 2015 - 6:36 pm | विवेकपटाईत
आवडली
13 Feb 2016 - 3:00 pm | तर्राट जोकर
वैधानिक का काय तो इशारा म्हणून वर काढतोय. उद्या चौदाफेब्रारी. सव्वीस्ज्जानेवरी किंवा पंद्रागस्टच्या चालीवर...
13 Feb 2016 - 3:13 pm | विजय पुरोहित
खतरा विडंबन तजो....