ऑफबीट, ऑफ द रोड ड्रायव्हिंगची वाहनं..

गवि's picture
गवि in काथ्याकूट
28 Jan 2015 - 4:08 pm
गाभा: 

अन्य धाग्यात सुरु झालेली चर्चा तिथे अवांतर नको म्हणून इथे चालू ठेवण्याची विनंती करतो. प्रस्तावना अशी की मजसहित अनेकांना एसयूव्ही, एमयूव्ही, ऑल टेरेन व्हेइकल्स, ऑल व्हील ड्राईव्ह गाड्या, अधिक ताकदीचं इंजिन, ओव्हरड्राईव्ह मोड याविषयी क्रेझ असल्याचं वाटलं. अश्या "ऑफरोडरोमियों"कडे रोजच्या शहरी वाहतुकीसाठी कॉम्पॅक्ट फॅमिली कार घरोघरी असली तरी मनात कुठेतरी जीप, थार, एक्सयूव्ही, कमांडर वगैरे यांचे मांडे खाल्ले जात असतातच. यात ती लेह लडाखची एक सेल्फ ड्राईव्ह लाईफटाईम टूर करण्याचं स्वप्न असतंच पण त्याचप्रमाणे पूर्ण भारत फिरणं, जंगलात नदीनाल्यांतून प्रवास अश्याही कल्पना असतात.

कोणाला भरपूर जागा हवी असते तर कोणाला भरपूर ताकद.. किंवा दोन्ही.

मी काही ऑप्शन्स इथे टाकून सुरुवात करतो. बाकी चर्चा पुढे होईलच.

-सफाईदार लुकवर भर असणारी टाटा सफारी.
-पाहताक्षणी टुणकन उडी मारुन स्टीअरिंग व्हील हाती घ्यावं अशी गोड पण रफटफ अंतरंग असलेली महिंद्रा क्लासिक

AA

With thanks from www.mahindracarsindia.com

-भरपूर रफनेस असलेली थार

-स्कॉर्पिओ, झायलो आणि क्वान्तोचं त्रिकूट

-एक्सयूव्ही५००चा अ‍ॅनिमल लुक आणि आकर्षण (बादवे, रिव्ह्यूंमधे मार खाल्लेला दिसतो)

-जुनी टेंपो (आता फोर्स) ट्रॅक्स.. चक्क तेरा चौदा लोकांना आरामात वाहून नेणारी. बाहेरुन ट्रंकसारखा पोलादी लुक पण इंजिन मर्सिडिज कंपनीने बनवलेलं.

-आताचा ट्रॅक्सचा अवतार - फोर्स गुरखा

-फोर्स वन. प्रचंड आकार आणि तुलनेत कमी किंमत. क्रूझ कंट्रोल. स्टियरिंग व्हील कंट्रोल्स.

AAA

with thanks from i.ndtvimg.com
...

ही वाहनं सेकंडहँड घेऊन त्यावर दुरुस्ती करुन नव्यासारखी करणं स्वस्त वाटलं तरी शेवटी महागच पडतं असा अनुभव आहे. एकूण या गाड्या ताबडल्या गेलेल्या असल्याने त्यांना सेकंडहँड घेणे म्हणजे चरकात पिळून बराचसा रस संपलेला ऊस विकत घेण्यासारखं आहे असं मला तरी वाटतं.

या आणि अश्याच गाड्यांविषयी आणखी माहिती, अनुभव आहेत का? या कार्स आणि त्यांना घेऊन केलेला प्रवास यांचं अद्वैत आहे. तेव्हा कोणते प्रवास तुम्ही केलेत आणि त्यात काय अनुभव आले.. जे इतरांना कळल्याने त्यांना खूप फायदा होईल तेही सांगावेत.. (अंतर वाचणे, खराब रस्ता टळणे, जास्त सुंदर रस्ता सापडणे, जेवणाखाण्याची पंचाईत न होणे, पेट्रोलडिझेलपंपपासून दूर जाऊन अडकून न पडणे इत्यादि)

प्रतिक्रिया

गवि's picture

21 Sep 2015 - 4:56 pm | गवि

महिंद्रा TUV300 टेस्ट करण्याची संधी कोणाला मिळालीय का? काय आहेत सुरुवातीचे रिपोर्ट्स?

वेल्लाभट's picture

21 Sep 2015 - 10:36 pm | वेल्लाभट

टेस्ट ड्राइव्ह नाही पण मला बघताक्षणी लुक्स आवडलेत. (अपनी अपनी पसंद... बॉक्सी लुक्स अधिक आवडतात)
टॉप गिअर ने ठीक रिव्ह्यू दिलाय पण मला ते नेहमीच बायस्ड वाटलेत.
http://www.topgear.com/india/mahindra/review-mahindra-tuv300/itemid-51

हे एक बघा
http://www.motoroids.com/features/renders-mahindra-tuv300-modifications-...

अनिरुद्ध.वैद्य's picture

25 Sep 2015 - 3:54 pm | अनिरुद्ध.वैद्य

गाडी वाटतेय मस्त.

भटकंती अनलिमिटेड's picture

24 Sep 2015 - 3:25 pm | भटकंती अनलिमिटेड

नुकतीच (दोन महिन्यांपूर्वी) घेतली. अर्थात सगळा अभ्यास करुनच.

माझ्या गरजांमध्ये कितीही खराब रस्ता असला तरी सहज जाईल अशी गाडी, अधिक ग्राऊंड क्लिअरन्स, पाच मोठे लोक आणि सामान बसेल अशी गाडी, रिलायबल, चांगले सर्व्हिस नेटवर्क, हायस्पीड कॉर्नरिंगला सुरक्षित, वेगात हायवे क्रुझिंग, एअरबग्स आणि एबीएस अशी लिस्ट होती.

उमेदवारीत डस्टर, टेरानो, बोलेरो, स्कॉर्पियो आणि XUV5OO या उभ्या होत्या.

डस्टरने इंटिरियर क्वालिटीत मार खाल्ला. शिवाय टॉपएंड व्हेरियंट (अधिक पॉवर, ११०ps) मध्ये स्कॉर्पियो येते शिवाय दोन सीट अधिक आणि मोठे इंजिन, अधिक शक्ती, मोठा आकार (माझ्यासाठी हा महत्त्वाचा होता).
टेरानो किंमतीत हारली. बोलेरोला एअरबग्स आणि एबीएस ऑप्शन्स नाहीत.
स्कॉर्पियोचा विचार केला. एकदोन ट्रिपा (सह्याद्रीतल्या अतिशय खराब असलेल्या रस्त्यांवर, आणि नसलेल्या रस्त्यांवरही) केल्या. पण बॉडीरोल नावाचा प्रकार असतो तो त्रासदायक वाटला. उंच ग्राऊंड क्लियरन्स, बंपी राईड आणि १००किमी स्पीडच्यावर गाडी स्पीडअप करायला आत्मविश्वास वाटत नाही. शिवाय बिल्ड क्वालिटीचाही थोडा खोडा पडला. म्हणून थोडे बजेट ताणून XUV5OO घेतली.

XUV5OO

ताकद, लोएंड टॉर्क, स्पीड, खराब रस्ते कुठेही कमी पडत नाही. कितीही हायस्पीडला कॉर्नरिंगला भीती वाटत नाही. शिवाय एबीएस, एअरबग्समुळे जास्त सेफ वाटते. मधल्या रांगेतल्या सीटांना बसायला शब्दशः एकरभर रान आहे. मधल्या सीटाच्या पायात बाकी गाड्यांप्रमाणे ट्रान्समिशन हंप (उंचवटा) नाही. जे काही इश्शू होते ते नवीन मॉडेलमध्ये सगळे रेक्टिफाय केले आहेत.
एकच निगेटिव्ह पॉइंट आहे तो म्हणजे पूर्ण सात सीट्स बसल्यावर सामान ठेवायला फार काही जागा शिल्लक राहत नाही. पण प्रत्येक सीटला स्वतःचा वेगळा एसी व्हेंट, मागच्या सीटसाठी वेगळाच एसी कंट्रोल आणि शून्य बॉडी रोल त्यामुळे पैसा वसूल गाडी.

अवांतर: आधी स्विफ्ट चालवायचो तेव्हा नव्वद-शंभरच्या वर काटा गेला की बायको ढोपर मारायची, आई म्हणायची काटा कुठे चाललाय. XUV5OO घेतल्यानंतर पहिल्यास ट्रिपला १२० ने गाडी मारत होतो हायवेला तेव्हा आई म्हणाली नवीन गाडी आहे म्हणून सावकाश चालवतोय का रे तू आज? ;) (आतमध्ये वाढत्या स्पीडचा फील आणि आवाज अजिबात जाणवत नाही).

..अत्यंत उपयुक्त..खूप आभार.. टीयूव्ही३०० अजून कोणाच्या प्रत्यक्ष हाती आलेली नाही.

..एक्सयूव्ही भारीच देखणी आहे.

प्रसाद गोडबोले's picture

24 Sep 2015 - 5:00 pm | प्रसाद गोडबोले

मस्त रीव्ह्यु !

नवीन क्षुव ५०० चे लूक्स जुन्या गाडी पेक्षा मस्त आहेत ह्यात शंकाच नाही !!

कोणते व्हेरीयेंट घेतले ? टोटल बजेट ? इकॉनॉमी ? ह्या विषयीही लिहा ! क्षुव ५०० चा विषय निघाला की उगाच एन्डेव्हर आणि फॉर्च्युनर येतात मनात म्हणुन विचारले :)

बाकी

आतमध्ये वाढत्या स्पीडचा फील आणि आवाज अजिबात जाणवत नाही

हे बेस्ट !

मी W-6 हे व्हेरियंट घेतले. घेण्याआधी एकवेळ असा विचार केला होता की नवे मॉडेल लॉंच झाले की जुन्या व्हर्जनवर थोडेफार डिस्काऊंट मिळेल. कारण नवीनच घ्यावे असा काही विचार नव्हता. माझ्या गरजांना (आणि स्वप्नांना) जुनेही चालले असते. पण त्यात फक्त एकच कलर उपलब्ध असल्याने आणि डीलरही विशेष डिस्काउंट देत नसल्याने तो विचार सोडला आणि नवीन मॉडेल घेतले. पुण्यात ऑनरोड १५.१L. वरचे व्हर्जन W8 आणि W10 आहेत पण त्यात अधिक ज्या सुविधा (material benefits, भौतिक सुख, ब्लिंग्ज) आहेत त्याशिवाय मी गाडी चालवू शकतो. जसे कलर इन्फोटेनमेंट डिस्प्ले, टायरट्रॉनिक्स (टायर प्रेशर मॉनिटर), जीपीस, इलेक्ट्रिक फोल्ड आरसे, लेदर सीट्स, कीलेस एंट्री, अलॉय व्हील्स वगैरे. म्हणून क्रुझ कंट्रोल, एअरबॅग्स आणि एबीएस असलेली W6 निवडली. हायवेवर क्रुझ कंट्रोल वापरणे म्हणजे सुखच आहे. सहा गियर्समुळे १२० ने जाणारी ओव्हरटेक करतानाही पॉवर कमी पडत नाही.

एन्डेव्हर आणि फॉर्च्युनर या सेगमेंटच्या गाड्या नाहीत. त्या याच्या पुढच्या सेगमेंटच्या आहेत. किंमत २३ लाखापासून पुढे. या सेगमेंटमध्ये डस्टर, टेरानो, ह्युंडाईची नवीन आलेली क्रेटा या गाड्या आहेत. आणि सध्या तरी कुठलीच कॉम्पॅक्ट एसयुव्ही चार मीटरच्या आतली नसल्याने टॅक्स वाचत नाही. शिवाय या गाड्या मी का साईडलाईन केल्या आणि XUV5OOच का घेतली हे आधीच्या प्रतिसादात लिहिले आहेच.

TUV3OOबद्दल चांगले रिव्ह्यू ऐकले आहेत. (मला आता एवढ्यात गाडी घ्यायची नसली तरी) एकदा टेस्ट ड्राइव घेतली आहे. बॉडीरोल बराच कंट्रोल्ड असला तरी तो जाणवतो मात्र. शिवाय लॅडर ऑन फ्रेम डिझाईन असल्याने ती हार्डकोअर ऑफरोडर आहे हे नक्की. परंतु इंजिनमध्ये अधिक ताकदीचा पर्याय हवा होता असे वाटते (जसे डस्टर मध्ये ८५पीएस आणि ११०पीएस असे पर्याय आहेत). हायवेवर ओव्हरटेकला बरेचदा दीड लिटर ८४पीएस इंजिनची पॉवर कमी पडू शकते.

अधिक माहिती हवी असल्यास देईनच. बर्‍याच गाड्यांचा अनुभव आणि तांत्रिक ज्ञान आहे तसे थोडेफार.

वेल्लाभट's picture

25 Sep 2015 - 11:30 am | वेल्लाभट

कडक रिव्ह्यू.
महिंद्रा ने स्कार्पियो नंतर काढलेली आणिक एक भारे गाडी. अ थरो एसयुव्ही अपील दॅट द कार गिव्ज यू. बट आय फाइंड इट अ लिटल ओव्हरडन. माझं मत. स्टिल'; इट्स अ ग्रेट कार. तुमचा रिव्ह्यू आवडलाय. दर्दी आहात.

भटकंती अनलिमिटेड's picture

25 Sep 2015 - 11:52 am | भटकंती अनलिमिटेड

ओव्हरडन आधीचे व्हर्जन होते. सध्याचे व्हर्जन बर्‍यापैकी सुटसुटीत केले आहे. शिवाय आधीच्या मॉडेलचे जे काही इश्यू होते (सस्पेन्शन, ट्रान्समिशन वगैरे) हे सध्याच्या मॉडेलमध्ये काढलेत. शिवाय काळा रंगच अशासाठी घेतला की जास्त काही डिझाईनचे ओव्हरडू असेल ते दिसूच नये. पुढे आता शक्य झाल्यास नजीकच्या भविष्यात डायमंड कट ब्लॅक अलॉय व्हील्स लावेन म्हणतोय.

आणि हो महिंद्राची आफ्टरसेल्स सर्व्हिसला तोड नाही. वॉरंटीमध्ये काहीही पार्ट खळखळ न करता रिप्लेस केला जातो. नाहीतर साले माझे आधीचे मारुतीवाले... पार्टचे पैसे जसे सर्व्हिस मॅनेजरच्या खिशातून देणार होता असे नखरे करायचा. XUV5OO च्या मालकांना पर्पल क्लबची मेंबरशिप मिळते त्याचे अनेक फायदे आहेत. जसे गाडी जोपर्यंत तुमच्या मालकीची आहे तोपर्यंत एक डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर (ज्याला तुम्ही कधीही आणि गाडीसंदर्भातल्या कुठल्याही शंका, प्रश्नासाठी फोन करु शकता) प्रायॉरिटी सर्व्हिस, होम पिकप-ड्रॉप, जास्त दिवस सर्व्हिस सेंटरला गाडी राहणार असेल तर लोनर कार.

वेल्लाभट's picture

25 Sep 2015 - 12:10 pm | वेल्लाभट

वेल, आधीचे इशू, ओव्हरडू अपील काढला असेल तर सहीच आहे मग.

पर्पल क्लब, आफ्टर सेल्स चं वाचून आनंदित झालोय. क्या बात है. हे म्हणजे भारीच आहे. But Mahindra is one brand which has taken some serious efforts to improve itself and reach closer to international standards. Commendable. स्कॉर्पियो जेंव्हा काढली तेंव्हा सहा वर्ष आर अँड डी झाला होता. "जीप" च्या लेबल मधून बाहेर यायचं हे प्राथमिक उद्दिष्ट होतं.

टाटाचंही कौतुक वाटतं (नाव कानफाट्या असलं तरी). जे एल आर अ‍ॅक्विजिशन फार मोठी झेप आहे. नवीन बोल्ट, झेस्ट क्लास आहेत. अगेन, अ थरोली न्यू प्रॉडक्ट अटेम्प्टेड टू गेट आउट ऑफ द इंडिका इमेज. आरिया इस गुड, बट राँगली प्राइस्ड. नवीन वाली इनोव्हा च्या जवळपास प्लेस केलीय म्हणे.

असो. गाड्या आवडता विषय आहे. मात्र मारुतीबद्दल तुमचं मत ऐकून खट्टू झालो. #मारुतीलॉयलकस्टमर #८००लव्हर

तळटीपः तुम्ही फटुग्राफर किती भारी आहात आम्हाला ठाऊक आहे. तुमच्या रथाचा एक फोटो येऊदे की. आणि हो, ब्लॅक अ‍ॅलॉय लावाच. :)

भटकंती अनलिमिटेड's picture

25 Sep 2015 - 12:36 pm | भटकंती अनलिमिटेड

टाटाचंही कौतुक वाटतं (नाव कानफाट्या असलं तरी). जे एल आर अ‍ॅक्विजिशन फार मोठी झेप आहे. नवीन बोल्ट, झेस्ट क्लास आहेत.

मलाही टाटाचा अभिमान आहे. जी कंपनी ते फोर्डला विकत घ्या असे विनवत होते त्याच फोर्डकडून जेएलआर विकत घेतली, तीही नाकावर टिच्चून. पण अजूनही त्यांना इंडिकाइश डिझाईनमधून बाहेर पडता आलेलं नाही. कुठलीही गाडी इंडिकासारखीच दिसते. झेस्टमात्र थोडी बरी आहे. बोल्टने सपशेल निराशा केली. अर्थात नॅनोमुळे टाटांच्या बद्दल मनात कायम आदरच राहील. नवीन आरिया इनोव्हाजवळ प्लेस केली असली तरी इनोव्हाचा क्लासच वेगळा आहे. तिच्यासारखी कंफर्टेबल आणि रिलायबल गाडी नाही दुसरी. पण जरा आऊट्डेटेड टेक्नॉलॉजी आणि ओव्हरप्राईज्ड आहे इनोवा. इनोव्हा-२०१६ तर पार अठरा-वीस लाखाच्या घरात जाणार आहे असं ऐकलंय.

मारुती: अहो, आम्हीही पाच वर्षे मारुती स्विफ्टच ५०,०००किमी कुठल्याही सह्याद्रीच्या रस्त्यांवर ताबडत होतो. पण त्यांची बिल्ड क्वालिटी आणि सेफ्टी हा नेहमीच वादाचा विषय राहिलाय. लेटेस्ट NCAP टेस्ट्सचे रिझल्ट्स पाहिलेत का मारुतीचे? शून्य स्टार्स म्हणजे पारच लायकी निघाली.

आमची जुनी स्विफ्ट:
Swift

आताच्या रथाचा फोटू:
XU5OO

वेल्लाभट's picture

25 Sep 2015 - 12:58 pm | वेल्लाभट

लेटेस्ट NCAP टेस्ट्सचे रिझल्ट्स पाहिलेत का मारुतीचे? शून्य स्टार्स म्हणजे पारच लायकी निघाली.

हां, ते वाचलंय. काय आता... असेलही...
काय करणार.

वेल्लाभट's picture

25 Sep 2015 - 11:00 pm | वेल्लाभट

फटू दिसत नाही

कपिलमुनी's picture

24 Sep 2015 - 5:45 pm | कपिलमुनी

comparision

कपिलमुनी's picture

24 Sep 2015 - 5:48 pm | कपिलमुनी

४ मीटर पेक्षा लांबी कमी असेल तर टॅक्स कमी असतो असे कुठेसे वाचले आहे . त्यामुळे काँपक्ट एसयुव्ही काँपक्ट सेदान भारतात जास्त पॉप्युलर/ स्वस्त अहेत

वेल्लाभट's picture

25 Sep 2015 - 11:32 am | वेल्लाभट

काही म्हणा...
काळ्या काचांची काळी स्कार्पियो विथ सेक्सी क्रोम अ‍ॅलॉय्ज ... तिची बातच काही और आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Sep 2015 - 12:45 pm | कैलासवासी सोन्याबापु

मित्रहो आपल्यापैकी खुप लोक उत्तम यंत्रअभियंता आहेत अन आवड म्हणून ही खुप लोक तांत्रिक माहिती ठेवतात मला थोड़ी मदत हवी आहे, एक प्रोजेक्ट आहे डोक्यात त्याला थोड़ी मदत तुम्ही लोक करू शकलात तर आनंद होईल. मला हिंदुस्तान मोटर्स कॉन्टेसा रिबिल्ड + मॉडिफाई करायची इच्छा आहे मला एक मॉडेल मिळते आहे १९९८ बिल्ड ७०,००० किमी चालली आहे एस्थेटिक मॉड्स काही विशेष नाही पेंट जॉब वगैरे किंवा आलोय व्हील वगैरे होतील नीट मला प्रॉब्लम आहे तो इंजिन चा ओरिजिनल इंजिन मिळणे किंवा ओरिजिनल इंजन मिळाले तरी एफिशिएंसी ही आधुनिक इंजिन इतकी खचित नसेल शिवाय स्पेयरपार्ट्स ची सतत बोंब,

मला कोणी एखादे असे डीजल इंजिन सांगू शकेल का जे २ लीटर एंड अबोव असावे शक्यतो २.१ वगैरे जे नेमका कॉन्टेसा ओरिजिनल इंजिन इतका torque देईल जेणेकरुन मजबूत लंबीचौड़ी असलेल्या ह्या गाडी चा पिकअप मार खाणार नाही अन जास्त वेल्डिंग जागा बनावणे क्रेडल नवे घालणे वगैरे न करता ते इंजिन कॉन्टेसा च्या चेसिस मधे फिक्स होईल? त्याशिवाय कॉन्टेसा ची शॉकप्स ही विशेष हार्ड म्हणुन बदनाम आहेत ती सेट करणे बदलणे म्हणजे एडिशनल डोकेदुखी अन मैकेनिक नेमका शोधणे आले अश्यवेळी शॉक्स चेंज करायचे म्हणले तर चेसिस मधे काय बदल करावे लागणार?

धन्यवाद

वेल्लाभट's picture

25 Sep 2015 - 12:56 pm | वेल्लाभट

कॉन्टेसा रिबिल्ड + मॉडिफाई करायची इच्छा आहे

मनातलं बोललायत.... माझंही हे स्वप्न आहे. यू कॅन मेक इट अ परफेक्ट लो रायडर.

इंजिन - वेल.... टेक्निकल माहित नाही. पण शेव्ही परफॉर्मन्स सीरीज इंजिन्स मिळतात. पण बेक्कार तज्ञ मेकॅनिक हवा तुम्हाला हे करायला. ये-यागबाळ्याचं काम नव्हे. अन व्यवस्थित खर्च केलात तर यु वोल हॅव अ हेडटर्नर ऑन युअर हँड्स.
मदत काय करू शकेन ठाऊक नाही, पण वाचूनच एक्सायटेड आहे. माझ्याही मनातलं हे स्वप्न असल्याने अजूनच.

भटकंती अनलिमिटेड's picture

25 Sep 2015 - 12:59 pm | भटकंती अनलिमिटेड

या दोन लिंक्सवरुन बरीच माहिती मिळऊ शकेल. पण खर्चाचाही एक अंदाज घ्या.

http://www.team-bhp.com/forum/modifications-accessories/40542-new-engine...

http://www.team-bhp.com/forum/modifications-accessories/66140-contessa-r...

अनिरुद्ध.वैद्य's picture

25 Sep 2015 - 1:22 pm | अनिरुद्ध.वैद्य

मसल कार बनवून राहिलेत का सोन्याबापु :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Sep 2015 - 1:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

लागेल तेवढी तांत्रिकी मदत मी करेन. ३.० लिटर डिझेल इंजिनाचा पर्याय बेष्ट राहिल. फियाटचं घ्यायचं. इंजिन माउंट्स वगैरे बनवुन घ्यावे लागतील. जर बजेट असेल तर ५.२ लिटर व्ही-८ विथ टर्बो/ सुपरचार्जिंग करता येईल (मायलेज विचारायचं नाही). ट्रान्समिशनही बदलावं लागेल. सुटेबल ट्रान्स्मिशन कुठलं असेल त्याचा थोडा अभ्यास करावा लागेल. शिवाय ऑक्झिलरिजही बदलाव्या लागतील.

भटकंती अनलिमिटेड's picture

25 Sep 2015 - 1:39 pm | भटकंती अनलिमिटेड

Guys,Im Yohan,ive owned a petrol conte since more than 1.5 years now,and prior to that a Merc benz 240 D123 series,and i even recently bought a diesel contessa..Ive been to chor baazar many times,,and guys who are serious about engine swap,can try o purchase the 4 variants available.The gear box mounting is common for petrol and diesel,in petrol swap howeve suspension coils and etc will have to be strengthened.I was also informed by a spare parts dealer that Armada grand,Bolero have a contessa isuzu gearbox,only scorpio is different.

1)isuzu diesel og-2.0 65 bhp
2)isuzu diesel og 2.2 70 bhp turbo and non turbo option
3)isuzu diesel og 2.4 86 bhp turbo and non turbo option
4)isuzu diesel indian 2.0 55 bhp non turbo (turbo can be added aftermarket isuzu)
i could be wrong about the bhp rating,but they are approximate ratings.
engines are availble at Mr.Pardawala isuzu diesel engine shop(chor baazar).He is quite famous for stocking all isuzu and contessa engine parts for diesel and petrol.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Sep 2015 - 10:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

हि इंजिन्स जुनी असतील ना पण? ३.० लिटरांचा पर्याय अश्यासाठी सुचवला की ती इंजिन्स टर्बो/सुपर चार्जिंगबरोबर जास्तं चांगला परफॉर्मन्स देतात. त्यासाठी गिअरबॉक्सेसची भयानक जास्तं पर्याय उपलब्ध होतील. शिवाय इंजिन मॅनेजमेंट सिस्टीम सुद्धा बसवता येईल. शिवाय सोन्याबापुंना "मसल" कार बनवायची आहे असं गृहित धरतो (अमेरिकन मसल ड्रिम) २.० लिटरचं इंजिन तेवढं आउटपुट देतं नाही. ३.० लिटरच्या इंजिनाचं हेड मिलिंग/ ग्राइंडिंग करुन ३ एम.एम. पर्यंत कमी करता येतं (काँप्रेशन वाढवायसाठी). २.० लिटरचं इंजिन एवढं वाढिव प्रेशर सहन करु शकणार नाही. (आयला माझं बजेट असतं तर ५.२ किंवा ६.० लिटरांचं इंजिन टाकलं असतं. चासी रिइनफोर्स्ड करुन घेतली असती. किंवा सरळ डॉज चॅलेंजर नाहितर मस्तांग घेतली असती. <3 )

वेल्लाभट's picture

25 Sep 2015 - 11:20 pm | वेल्लाभट
वेल्लाभट's picture

25 Sep 2015 - 3:37 pm | वेल्लाभट

1

2

3

4
ही मॅट ब्लॅक वाली हॉट आहे यार....

5

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Sep 2015 - 4:14 pm | कैलासवासी सोन्याबापु

कलिजा खत्म भाई वेल्लाभट!! ह्यातली मॅट ब्लॅक जर कोणी विक्री करणारा असला तर मी हार्डकॅश द्यायला तैयार आहे!

एक कॉन्टेसा अन दूसरी रॉयल एनफील्ड मॉडिफाइड बॉबर ह्या मॅटब्लॅक मधे काय दिसतात राव!!

वेल्लाभट's picture

25 Sep 2015 - 4:27 pm | वेल्लाभट

मंग! हाय का नाय!

भटकंती अनलिमिटेड's picture

25 Sep 2015 - 4:32 pm | भटकंती अनलिमिटेड

मॅटब्लॅक हा खरंच फेवरिट कलर आहे माझाही. पण फार कमी कंपन्या असा रंग देतात. त्यासाठी एक ऑप्शन म्हणजे. आरटीओमध्ये गाडी ब्लॅक कलर मध्ये रजिस्टर करुन घ्यायची. आणि नंतर body wrap करुन मिळते ते करायचे. अगदीच स्वस्तात मॅटब्लॅक रंग होईल. दहा हजारात. अगदीच 3M wrap वगैरे लावले तर साधारण वीस हजार.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Sep 2015 - 1:02 pm | कैलासवासी सोन्याबापु

माझं conservative budget १३ लाखापर्यंत आहे

भटकंती अनलिमिटेड's picture

25 Sep 2015 - 1:36 pm | भटकंती अनलिमिटेड

त्या टीमबीएचपीच्या धाग्यावर इसुझुच्या काही इंजिनांची यादी आहे. बहुतेक कुठलेही ट्रान्समिशन मॉडिफाय न करता ती वापरता येतील कारण हिंदुस्तान मोटर्स आणि इसुझु यांचा तांत्रिक सहाय्य करार होता. अँबेसेडर (हाय आला...कलिजा खलास झाला)मध्ये देखील इसुझुचे १.८ लिटरचे डिझेल इंजिन वापरले गेले आहे.

वेल्लाभट's picture

25 Sep 2015 - 2:49 pm | वेल्लाभट

अँबेसेडर (हाय आला...कलिजा खलास झाला)

हिचंही म्वाडिफिक्शन करायचंय एकदा. पार्किंग नाही म्हणून अडतंय फक्त (लोल) उगीच आपली आपली समजूत काढणं.

भटकंती अनलिमिटेड's picture

25 Sep 2015 - 3:03 pm | भटकंती अनलिमिटेड

नव्या गाडीमुळे माझं आता सध्या असलेली सायकलही (Schwinn Sporterra) दुरुस्त करण्याचं बजेट राहिले नाही.

जिन्क्स's picture

25 Sep 2015 - 3:51 pm | जिन्क्स

तुमचं टाटा सफारी स्टोर्म बद्दल काय मत आहे. तुम्ही टेस्ट ड्राइव घेतली होती का?

भटकंती अनलिमिटेड's picture

25 Sep 2015 - 4:17 pm | भटकंती अनलिमिटेड

होय मी टेस्ट ड्राइव्ह घेतली होती. रॉ पॉवर म्हणतात तशी खूप आहे गाडीत. मी पाहिलेल्या सार्‍या गाड्यांमध्ये ड्रायव्हर सीटिंग पोझिशन सफारीची सर्वात उत्तम होती. बाहेरुन लूक्स एकदम कल्ला. मी SUVचे स्वप्न (१५००/- पगार असताना) सफारी पाहूनच पाहिले होते. अर्थातच आता लायकी आल्यावर आधी तिची टेस्ट ड्राइव्ह घेतली. मागील तिसरी सीटची रांग एकमेकांसमोर तोंड करुन असल्याने त्यात सामान ठेवायलाही तशी बरी जागा असूनही ते अगदीच "जंपसीट्स" अशा प्रकारचे असल्याने त्याचा मोठ्या ड्राइव्हला तसा काहीच उपयोग नाही. त्या दीड फुटी सीटवर माणूस अगदीच अवघडून बसतो. परंतु अजून म्हणावी तशी रिफाईनमेंट जमली नाहीये टाटाला. पण इंटिरियर क्वालिटी आणि फीचर्स अजून कंडमच. सिंगल DIN म्युझिक सिस्टीमचे (जरी ‘हरमन’ची असली तरी) दिवस गेलेत आता. शिवाय XUV म्युझिक सिस्टीम, गॅजेट्स, क्रुझ कंट्रोल, मायक्रोहायब्रिड इंजिन स्टार्ट-स्टॉप फीचर, ऑटो लाईट सेन्सिंग हेडलाईट, रेन सेन्सिंग व्हायपर आणि विशेषतः केबिनचा लक्झरी फील या बाबतीत उजवी ठरली. सफारीची हायस्पीड कॉर्नरिंग स्टॅबिलिटी, बॉडी रोल, राईड क्वालिटी हाही एक वादाचा विषय आहेच. टाटा सेल्स आणि सर्व्हिसचा attitude म्हणजे आपल्यावर उपकार केल्यासारखा आहे.

आणखी एक मुद्दा म्हणहे सफारी फुलटाईम SUV म्हणतात तशी आहे रिअर व्हील ड्राइव्ह (इंजिनाच्या ताकदीचा पुरवठा मागील चाकास) आणि XUV ही क्रॉसओव्हर म्हणतात त्या प्रकारातली. मला सध्या तरी हार्डकोअरऑफरोडिंग करायचे नाही. फक्त मी नेईन त्या रस्त्याने नीट खालून न लागता (bottom out होणे) जाणारी गाडी जिचा हायस्पीडला परफ़ॉर्मन्स रिफाईन्ड असेल आणि हॅंडलिंगमध्ये आत्मविश्वास असेल अशी गाडी मला हवी होती. XUV ही फ्रंटव्हील ड्राइव्ह (इंजिनाच्या ताकदीचा पुरवठा पुढील चाकास) असल्याने हॅंडलिंग पुष्कळसे कारसारखे आहे. फ्रंटव्हील ड्राइव्ह गाड्या driver intended path अगदी ऍक्युरेटली फ़ॉलो करतात आणि तेच करताना रिअरव्हील ड्राइव्ह गाडी काही अंशी तो पाथ अंडरस्टिअर किंवा ओव्हरस्टिअर करते (कारण स्टिअरिंग पुढील चाकाला असते आणि पॉवर मागील चाकाला).

जिन्क्स's picture

25 Sep 2015 - 4:33 pm | जिन्क्स

धन्यवाद. आता नविन गाडी सोबत photography outings होतीलच. त्याची वर्णने येउद्यात मिपा वर :) .

भटकंती अनलिमिटेड's picture

28 Sep 2015 - 9:28 am | भटकंती अनलिमिटेड

नवीन गाडीसोबत दोन महिन्यात सात आऊटिंग्ज झालीत. एक वीकेंड मिस झाला त्याची खंत वाटते.

जिन्क्स's picture

28 Sep 2015 - 11:51 am | जिन्क्स

xuv 500, रॉयल एन्फिल्ड, Schwinn Sporterra, नावाजलेले फोटोग्राफर असल्यामुळे महागडा कॅमेरा असेलच.
त्यात "दोन महिन्यात सात आऊटिंग्ज" . वाह! वाह! वी एन्वी यू :)

भटकंती अनलिमिटेड's picture

28 Sep 2015 - 10:33 pm | भटकंती अनलिमिटेड

नावाजलेला तर नाहीये. घरात अनोळखी चेहरा कुणी दाखवत नाही तेच समाधान मानायचे. कॅमेरा ऑफरोडिंग या सदरात येत नसल्याने त्याबद्दल येथे लिहिणे टाळतोय. ;-)

संदिप एस's picture

25 Sep 2015 - 4:40 pm | संदिप एस

भरून पावलो,
एक से एक गुरु लोक्स... मनापासून नमस्कार!!

कपिलमुनी's picture

30 Sep 2015 - 7:17 pm | कपिलमुनी

TUV300

भटकंती अनलिमिटेड's picture

30 Sep 2015 - 9:26 pm | भटकंती अनलिमिटेड

टीयुव्ही३०० ही गाडी सेगमेंटमधे रॉक करणार यात शंका नाही. ती लॉंच झाली आणि मारुतीने त्यांच्या एसक्रॉसवर एक लाखापर्यंत डिस्काउंट देण्याची योजना जाहीर केली, यातच या गाडीमुळे मार्केट किती हलले आहे याची कल्पना यावी.

बादवे, वरील फोटो खऱ्या गाडीचा नसून रेंडर केलेला आहे.

कपिलमुनी's picture

30 Sep 2015 - 10:53 pm | कपिलमुनी

फोटो मधली मॉडीफाइड केली आहे

भटकंती अनलिमिटेड's picture

1 Oct 2015 - 9:10 am | भटकंती अनलिमिटेड

कपिलमुनीश्वर,
फोटूमधली टीयुव्ही मॉडीफाइड नसून ग्राफिक रेंडर आहे. ही त्या रेंडर केली आहे त्या बातमीची लिंक. व्हील्स आणि स्टेपनीचं कव्हर पाहिलेत की लक्षात येईल की ग्राफिक रेंडर आहे.
http://www.motoroids.com/features/renders-mahindra-tuv300-modifications-...

हा ओरिजिनल फोटो एका ऑटो वेबसाइटचा असून तो महिंद्राच्या चाकण प्लांटमधल्या टेस्ट ट्रॅकवर काढलेला आहे. त्या फोटोवरुन kalleo4 नावाच्या युजरने हे रेंडर बनवले आहे. त्याच गाडीचा (MH14EY6368) हा ओरिजिनल फोटो.
TUV300

भटकंती अनलिमिटेड's picture

1 Oct 2015 - 9:14 am | भटकंती अनलिमिटेड

प्रसाद गोडबोले's picture

1 Oct 2015 - 12:34 pm | प्रसाद गोडबोले

ही गाडी पाहुन आम्हाला मर्सीडीज च्या जीप ची आठवण झाली

a

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Sep 2015 - 9:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

टीयुव्ही ३०० चे लुक्स विशेष आवडले नाहित. तसचं ती झायलो चं फेसलिफ्ट केलेलं वर्जन वाटते आहे. झायलो मला स्वतःला तरी कॉर्नरिंग ला कधीचं रिलायेबल वाटली नाही. गाडी प्रत्यक्ष पाहिली किंवा टेस्ट ड्राईव्ह घ्यायला मिळाली तर मत सांगेनच.

भटकंती अनलिमिटेड's picture

30 Sep 2015 - 9:57 pm | भटकंती अनलिमिटेड

या वीकेंडला मी टेस्ट ड्राइव्ह घेईन म्हणतो. झायलो आणि टीयुव्ही३०० या दोन्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर बनावल्या आहेत. टीयुव्हीसाठी स्कोर्पियोची हायड्रोफॉर्म चॅसी वापरली आहे जी झायलोहून खूप वेगळी आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Sep 2015 - 10:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्म्म. चासी स्कॉर्पिओची असेल पण सस्पेंशन आणि सेटिंगचं कसं काय आहे? टेस्ट ड्राईव्ह घेतलीत की नक्की लिहा. झायलो ला अगदी कमी वेगात कॉर्नरिंग करताना पहातानाही भिती वाटते. मे बी माझं एकट्याचं असं मत असेल.

वेल्लाभट's picture

1 Oct 2015 - 10:46 am | वेल्लाभट

कॉर्नरिंग वरून आठवलं, टीयुव्ही हॅज अ लॉट ओफ कॉर्नर्स. बॉक्सी लुक आहे. आणि मला असा लुक वैयक्तिक जाम आवडतो. सो मी टीयुव्ही च्या लुक च्या प्रेमात आहे. गाडी बेन्चमार्क आहे व ठरेल यात वाद नाही. कडक. असं वाटतंय की याचंच मोठं व्हर्जन (फुल साइझ एसयुव्ही) टीयुव्ही ५०० च्या नावाने येईल पुढे मागे. (झायलो क्वान्तो सारखा प्रकार)

ते अजून भारी वाटेल. ही गाडी कडक आहे बाकी. इंटिरियर क्वालिटी, राइड अँड फील इज सेड टू बी द बेस्ट महिंद्रा हॅज ऑफर्ड सो फार.

भटकंती अनलिमिटेड's picture

1 Oct 2015 - 11:01 am | भटकंती अनलिमिटेड

TUV300 गाडी नक्कीच बेंचमार्क ठरणार आहे यात शंकाच नाही. ज्या आकर्षक किंमतीत महिंद्राने पाच सीटर (सात सीट्स असले तरी इमर्जन्सी ला ७ सीटर, एरवी ती ५ सीटरच आहे. मागील २ सीट्स अगदीच लहान मुलांना बसण्याजोगे आहेत) कॉंम्पॅक्ट एसयुव्ही बाजारात आणली आहे त्याने नक्कीच सध्याच्या प्रतिस्पर्ध्यांचे (डस्टर, टेरानो, इकोस्पोर्ट, एस-क्रॉस, क्रेटा) धाबे दणाणले आहेत. ६.९०लाख (बेस मॉडेल) ते ९.१०लाख (टॉप मॉडेल, AMT) या एक्स-शोरुम किमतीने बरेच प्रतिस्पर्धी गाड्यांचे प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर महिंद्राने पळवले आहेत. पण त्याची TUV5OO लॉंच केली जाईल असे मला तरी वाटत नाही. कारण मला नाही वाटत त्याच चॅसीवर बनवलेल्या स्कॉर्पिओच्या समोर त्याच प्राइस-पॉइंटला स्पर्धक गाडी लॉंच करुन महिंद्रा त्यांच्या मोस्ट सेलिंग एसयुव्हीच्या स्थानाला धक्का देऊन स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारुन घेईल.

वेल्लाभट's picture

1 Oct 2015 - 11:48 am | वेल्लाभट

पॉइंट आहे.

गुंड्या's picture

1 Oct 2015 - 11:08 am | गुंड्या

सफारी डायकॉर किंवा स्टॉर्म बद्दल अधिक माहीती हवी आणि असेल तर आमच्या SOUL (Safari Owners United League) च्या ड्राईव्ह मधे आपण सहभागी होऊ शकता !

भटकंती अनलिमिटेड's picture

1 Oct 2015 - 11:12 am | भटकंती अनलिमिटेड

हैला... असा ग्रुपदेखील आहे का पुण्यात? मीही असा काहीतरी ‘झोल’ (XOL) करावा म्हणतो. ;-)

हो आहे पुण्यात. महिन्यातून एक ड्राईव्ह असतो.‘झोल’ (XOL) कराच !

वेल्लाभट's picture

1 Oct 2015 - 11:47 am | वेल्लाभट

लोल !

सही आहे.

जिन्क्स's picture

1 Oct 2015 - 12:57 pm | जिन्क्स

तुम्हीच लिहा ना एखादा user review सफारी बद्दल.

आर्बि२३९९'s picture

1 Oct 2015 - 12:09 pm | आर्बि२३९९

माझी टाटा सफारी २.२ EX (February २००८) आहे . ~ २,००,००० रंनिंग झाले आहे :). जवळपास सर्व राज्ये पालथी घातली आहेत हिच्यातून :) (ह्यात २ लडाख ट्रिप्स अन अनेक हिमाचल +काश्मीर ट्रिप्स आल्या )
गाडी एकदम rugged आहे , आफ्टर सेल्स सपोर्ट बेस्ट आहे . फक्त suspension अन timing belt कडे लक्ष द्यावे लागते वेळोवेळी ....
driving comfort unmatched आहे अन रोड presence बाबत बोलायलाच नको !
हे काही फोटू
गुरुडोंग्मार लेक , नॉर्थ सिक्कीम:
गुरुडोंग्मार लेक , नॉर्थ सिक्कीम
भूतान
भूतान
सच पास (२०१३)
sach pass
स्पिती valley
spiti

pangong lake २००९
pangong

कुणाला अजून काही माहिती हवी असल्यास अवश्य विचारावी !

भटकंती अनलिमिटेड's picture

1 Oct 2015 - 12:18 pm | भटकंती अनलिमिटेड

फोटो लई कातिल आणि जब्र्या! इनो घेतो आहे.
आमच्या ब्लॅकप्युमालाही असेच नवनवे प्रदेश पाहण्याचे भाग्य लाभो अशी प्रार्थना करा. येत्या वर्षात तिला सदेह लडाखगमन करवून ते रंगीत फ्लॅग लावण्याचे मनी योजितो आहे (तसे मी एकदा लडाख आणि एकदा झंस्कार सदेह केलंय, पण ते झेंडे शरीरावर लावता येत नाहीत ;) )

वेल्लाभट's picture

1 Oct 2015 - 12:42 pm | वेल्लाभट

कडकच फोटो. सफारीचं ते स्पेअर व्हीलच अर्धा जीव करून टाकतं...

तसं म्हणता, एक वेडं स्वप्नं होतं अजूनही आहे, ८०० ने मुंबई लदाख मुंबई करायचं. असो. ८०० नाही आता, तरी जी कुठली गाडी असेल ती. पण डोअर टू डोअर गाडीने जाणार.... नैतर नाय जाणार असं ठरवलंय. व्हेनेवर इट इज.

ते....एखाद ईनो एक्स्ट्रा असेल तर बघा.

तर्राट जोकर's picture

1 Oct 2015 - 12:29 pm | तर्राट जोकर

कुणाला अजून काही माहिती हवी असल्यास अवश्य विचारावी !

विकायची आहे काय?
-Tj (Truly Jargon)

आर्बि२३९९'s picture

1 Oct 2015 - 1:34 pm | आर्बि२३९९

ही ही
नाही, आता तिची पालखी माझ्याबरोबरच निघणार !

एअरपोर्टवर डिसप्लेला ठेवलेली टीयूवी३०० प्रतेक्ष पाहिली. घाईत असूनही घाई दूर ठेवून दरवाजे वगैरे उघडून पाहिले. मागच्या सीट्स जंपसीट्स आहेत. लुक ओव्हरऑल चांगला आहे. फिनिशिंग उत्तम. समोरचं ग्रिल पाहून जीप चेरोकी (की शेरोकी.. चूभूदेघे) ची आठवण होते. (जशी पूर्वी मरिना = गरिबाची सीआरव्ही, तशी टीयूव्ही३०० गरीबाची चेरोकी?! ;) )

जीप चेरोकी:

J

With thanks from Jeep.com

टीयूव्ही:

A

With thanks from Mahindratuv300.com

वेल्लाभट's picture

1 Oct 2015 - 12:52 pm | वेल्लाभट

हो हो. ते उघड आहे. शरूकी वरूनच उचललेलं आहे डिझैन.

शरुकी आहे होय उच्चार.. धन्यवाद..

भटकंती अनलिमिटेड's picture

1 Oct 2015 - 12:53 pm | भटकंती अनलिमिटेड

खरंय. फ्रंट ग्रिल ग्रॅंड शेरोकीचं डिझाईन आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Oct 2015 - 7:28 am | कैलासवासी सोन्याबापु

फ़ोर्स गोरखा बद्दल काही रिव्यु आहेत का कोणाचे? मला फ़ोर्स चे डीलर नेटवर्क कसे आहे ते माहिती नाही तस्मात् त्यांची सर्विस कशी असेल कल्पना नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Oct 2015 - 9:22 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

गोरखा चांगली गाडी आहे. मी एकदा चालवली आहे चांगली ३० एक किमी. टु मच पॉवर अंडर लाईट चासीज एवढं म्हणेन. ऑफरोड ला चांगली आहे. पण इंटेरिअर एवढं विशेष आवडलं नाही. शिवाय मी चालवलेली गाडी हार्ड टॉप होती. हि गाडी वरती टॉप नसताना अजुन भारी दिसेल.

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Oct 2015 - 9:59 am | कैलासवासी सोन्याबापु

तिचं साइलेंसर साइड न बाहेर काढलेले आहे उभे ते लैच भारी वाटते एकदम हमर स्टाइल

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Oct 2015 - 10:10 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

हमर वरुनचं ढापलयं डिझाईन ते. अर्थात ६२०० सी.सी. चं इंजिन सोडुन =))!!!

गुंड्या's picture

6 Oct 2015 - 10:01 am | गुंड्या

एअर इनटेक आहे तो..for deep water wading

गवि's picture

6 Oct 2015 - 2:31 pm | गवि

हेच म्हणतो.

तो हवेचा इनलेट आहे असं वाटतं, एक्झॉस्ट नव्हे.

भटकंती अनलिमिटेड's picture

6 Oct 2015 - 9:24 am | भटकंती अनलिमिटेड

टीयुव्ही३०० ची टेस्ट ड्राइव्ह काही गेल्या वीकेंडला घेता आली नाही. कुटुंबाला घेऊन खराडी-पनवेल-डोंबिवली-निगडी-चाकण-सुपा-अहमदनगर-जामगावचा भुईकोट किल्ला-भाळवणी-पारनेर-सुपा-पुणे असा ६००किमी मॅरेथॉन ड्राइव्ह झाला. एक्सयुव्ही बिहेव्ड वेल.

एक्सप्रेस हायवेला नॉर्मल क्रुझिंग स्पीड १२०, फास्ट क्रुझिंग स्पीड १३०, हायेस्ट स्पीड १६० (खालापूर टोल नंतर मुंबईच्या दिशेने आणि उर्से टोलनाक्यानंतर पुण्याच्या दिशेने फक्त सरळ रस्ता असतानाच). नॉर्मल क्रुझिंग करताना त्या १२० च्या वेगातही आतमध्ये बॉडी रोल न होता व्यवस्थित आणि कॉन्फिडन्ट वळणे घेता आली. १३०किमी/तासच्या पुढे मात्र केबिन नॉइज जरा वाढतो. पण १२० पर्यंत स्पीडोमीटरकडे पाहिल्याशिवाय कळतही नाही की आपण त्या वेगात चाललो आहोत. त्यामुळे जरा cautiously चालवावी लागतेय.

गुंड्या's picture

6 Oct 2015 - 10:07 am | गुंड्या

प्लीज १२०+ कि.मी. च्या वरील वेग टाळावा. भारतातील एकही रस्ता ह्या वेगासाठी तांत्रिकरित्या योग्य नाही. तसेच अश्या वेगाने गाडी चालवल्याचा उल्लेख आणि फोटोही सार्वजनिक करु नयेत.

प्रसाद गोडबोले's picture

6 Oct 2015 - 2:03 pm | प्रसाद गोडबोले

अ‍ॅग्रीड

माझ्यामते भारतातील रस्तांवर जास्तीत जास्त स्पीडलिमिट ८० किमी प्रति तास आहे !

जाणकारांनी ह्यावर प्रकाश टाकावा !

कपिलमुनी's picture

6 Oct 2015 - 2:29 pm | कपिलमुनी

८० किमी प्रति तास या वेगासाठी रस्ते , वळणे, उतार बनवलेले असतात तिथे जास्त वेग धोकादायक ठरू शकतो

भटकंती अनलिमिटेड's picture

7 Oct 2015 - 9:00 am | भटकंती अनलिमिटेड

फास्ट ड्राइव्हिंगचं मी समर्थन करत नाही. परंतु सुरक्षित ड्राइव्हिंगचे नक्की करेन. पण एक्सप्रेस-वेवर अगदी वीसचाकी ट्रेलर सुद्धा ८० हून अधिक वेगाने चालतो. त्याला आपल्याकडे इलाज नाही. मी मधल्या लेनमधून ८० (किंवा कमी) वेगाने जात राहिलो तर ट्रेलर माझ्यावरुन घालतील. किंबहुना इथल्या कुठल्या सदस्याने ऐंशीहून अधिक वेगाने वाहन चालवले नाही काय?

अवांतर: आपल्याकडील वेगमर्यादा या इसवी सन १८५७ च्या काळातील आहेत. ज्यावेळी गाड्यांमध्ये लहान क्षमतेची इंजिने होती, एबीएस, ईबीडी, ईएसपी, पॉवर स्टियरिंग, पॉवर ब्रेक्स, एअरबॅग अशा प्रगत तंत्रज्ञानयुक्त सुविधा नव्हत्या त्यावेळी मोटर वाहन आणि हायवेचे नियम बनवले गेले आहेत. त्यात कालपरत्वे सुधारणा होणे अत्यावश्यक आहे. सध्या एक्सप्रेस हायवेवर वेगमर्यादा १२० करावी की १०० यावर सरकार आणि न्हाई पातळीवर चर्चाही सुरु आहे.

अवावांतर: लेह-कन्याकुमारी ७८ तासांत.

टवाळ कार्टा's picture

7 Oct 2015 - 11:51 am | टवाळ कार्टा

अहो पण आपल्याकडे लोकांना ड्रायव्हिंग सेंस नाही त्याचे काय? ७०-८०+ च्या स्पीडने XUV/Fortuner सारखे रणगाडे zig-zag रिक्शाचालवल्यासारखे चालवताना बघितले आहेत....ते सुध्धा आजूबाजूच्या वाहनांपासून फक्त २-३ फूट अंतर ठेउन

वेल्लाभट's picture

7 Oct 2015 - 11:54 am | वेल्लाभट

बाला.... बाजू व्हं !
फोर्चुनर आयली दादूस ची...

टवाळ कार्टा's picture

7 Oct 2015 - 12:03 pm | टवाळ कार्टा

असे नस्ते....सगळ्या टैपची लोकं बघितली आहेत...अगदी सुटाबुटातला डस्टरवाला हॉर्न न देता डावीकडून झूमकरून ओव्हरटेक करून गेलेला आहे

वेल्लाभट's picture

7 Oct 2015 - 4:14 pm | वेल्लाभट

हो रे टका... :)
म्हैत्ये. पण तरीही.

टवाळ कार्टा's picture

7 Oct 2015 - 4:59 pm | टवाळ कार्टा

अस्सं कसं अस्सं कसं :)

वेल्लाभट's picture

7 Oct 2015 - 5:24 pm | वेल्लाभट

दादूस ची गाडी दादूस ची गाडी असते.
तिची सर सुटाबुटाला नाही.

वेल्लाभट's picture

7 Oct 2015 - 11:53 am | वेल्लाभट

अवावांतर: लेह-कन्याकुमारी ७८ तासांत.

अवाव्वा ! हे भारी आहे.... वाचायला हवं

अनिरुद्ध.वैद्य's picture

9 Oct 2015 - 7:44 am | अनिरुद्ध.वैद्य

ही पोस्ट आपल्याला उद्देशून नाही, हे आधीच स्पष्ट करू इच्छितो.

गाड्यांमध्ये मोठ्या क्षमतेची इंजिने आली, एबीएस, ईबीडी, ईएसपी, पॉवर स्टियरिंग, पॉवर ब्रेक्स, एअरबॅग अशा प्रगत तंत्रज्ञानयुक्त सुविधा आल्या, तरीही भारतात, अपघातांचे प्रमाण काही कमी होत नाहीये ;) कारण अर्थात वेगळीच आहेत, हे मान्य आहेच.

उलट भारतात तरी रेकलेस ड्रायव्हिंग फार वाढत चालले आहे. गाडी लोडेड आहे, टेक्निकली सुपिरिअर आहे, मग कशाला काळजी करा? ही भावना असू शकेल काय?

पॉवर स्टेअरिंग आले आणि कट मारण्याचे प्रमाण वाढले. मी आत्तापर्यंत गाडीत एबीएस, ईबीडी नाहीयेत म्हणून सांभाळून चालवायचो. पण जर मी मोठी गाडी घेतली आणि अधिक स्पीडवर चालवायला सुरुवात केली तर ते कधी रेकलेस ड्रायव्हिंगकडे झुकेल सांगता येत नाही. लोकं सेफ्टी फीचर्सना गृहीत धरून अधिक फास्ट चालवायला लागलीत!

एके ठिकाणी असे दावे करण्यास सपोर्टिंग मटेरीअल सापडले. टेक्निकली लोडेड कार्स वाले लोकं रेकलेस ड्रायव्हिंगकडे झुकू शकतात.

http://www.esafety-effects-database.org/applications_16.html

आल इन आल, स्पीड थ्रील्स, बट इट किल्स!

भटकंती अनलिमिटेड's picture

9 Oct 2015 - 9:26 am | भटकंती अनलिमिटेड

(मिपाच्या पोस्ट कुणालाच उद्देशून नसतात हे गृहितच आहे. उलट सारे जण मिळून साधक बाधक चर्चा करत आहेत.)

एबीएस, ईबीडी, ईएसपी, पॉवर स्टियरिंग, पॉयवर ब्रेक्स, एअरबॅग यांमुळे रेकलेस ड्रायविंग वाढले का? मला तरी असे वाटत नाही. उलट भारतात फारतर ५-१०% कार्सना (अंदाज आपला) हे फीचर्स असतील (पॉवर स्टिअयरिंग सोडून). उलट माझा अनुभव असा आहे की असे फीचर्स नसलेलेच बहुतेक ड्रायव्हर्स रेकलेस चालवतात. उदा. ट्रक्स, पीएमपी/बेस्ट बसेस, खाजगी बस, वडाप, जीप, स्कूल व्हॅन्स, इ. किंबहुना रेकलेस ड्रायव्हिंग हा गाडी कुठल्या परिस्थितीत शिकलात आणि शिकवायला कोण होतं यावरही थोडेबहुत अवलंबून असते. रेकलेस ड्रायव्हिंग हा गाडीपेक्षा मानसिकतेचा भाग अधिक आहे. सीटबेल्ट पोलिस पकडतील म्हणून लावणारा आणि सीटबेल्ट आपल्यासाठी आहेत म्हणून लावणारा यात जो फरक आहे अगदी तोच.

अजूनही आपल्याकडे चार पैसे वाचतात ना म्हणून सेफ्टी फीचर्स नसलेली कार विकत घेतली जाते. अगदी मीही आयुष्यातल्या पहिल्या कारच्या वेळी तेच केले. कारण तेव्हा फक्त पावसापाण्यापासून वाचत शरातल्या शहरात फिरणे, कधीतरी फोटोशूट्ला आणि नियमित ऑफिसला जाणे एवढाच उद्देश होता. परंतु जसा जसा मी आत्मविश्वासाने गाडी चालवायला शिकलो, प्रवासाचे पल्ले वाढले, दिवसाला सहाशे-सातशे किलोमीटरचे काही वाटेनासे झाले, गाडीचा वेग वाढला आणि विशेष म्हणजे लग्न झाले, बाप झालो त्यामुळे मला माझ्यापलीकडे जाऊन आणखी काही प्रियजनांचा विचार करण्याची गरज वाटू लागली. त्यामुळे अपग्रेड करताना साहजिकच मी सेफ्टी फीचर्स असलेलीच गाडी पाहत गेलो.

राहिला प्रश्न वेगमर्यादेचा, तर कुठल्याच रस्त्यावरील वेगमर्यादा प्रॅक्टिकल नसावी. हे नियम १९८९ मध्ये बनवले आहेत. पुण्यातल्या बहुतेक रस्त्यांवर ती चारचाकी वाहनाला ३० आणि दुचाकीला ४० अशी आहे. सगळ्या महामार्गांवर ती ८० आहे आणि विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या वाहनांना अगदी मोटरसायकल, कार, मल्टीऍक्सल ट्रेलर, बस सार्‍यांना ती सारखीच आहे. जर खरेच ती तशी अत्यावश्यक असती तर सरकारने वाहननिर्मिती करणार्‍या कंपन्यांना इसीयू प्रोग्राम करुन ती ८० ला स्पीडलॉक करा असा आदेश देणे जास्त अवघड नाहीच. परंतु त्यांनाही माहीत आहे की बदलत्या तंत्रज्ञानाच्या (वाहने आणि रस्ते दोन्ही बाबतीत) दृष्टीने हे प्रॅक्टिकल नाही. आणि ते बदलण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेतच.

ऑल इन ऑल, ड्राइव्ह फास्ट, नॉट रॅश!

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 10:14 am | टवाळ कार्टा

उदा. ट्रक्स, पीएमपी/बेस्ट बसेस, खाजगी बस, वडाप, जीप, स्कूल व्हॅन्स, इ.

यात ऑटोरिक्षा कशी विसरलात =))

सगळ्या महामार्गांवर ती ८० आहे आणि विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या वाहनांना अगदी मोटरसायकल, कार, मल्टीऍक्सल ट्रेलर, बस सार्‍यांना ती सारखीच आहे. जर खरेच ती तशी अत्यावश्यक असती तर सरकारने वाहननिर्मिती करणार्‍या कंपन्यांना इसीयू प्रोग्राम करुन ती ८० ला स्पीडलॉक करा असा आदेश देणे जास्त अवघड नाहीच.

खिखिखि....इतके सरकार विचार करते???

भटकंती अनलिमिटेड's picture

9 Oct 2015 - 10:41 am | भटकंती अनलिमिटेड

नक्कीच करु शकते. सरकारकडे ARAI सारख्या पारंगत तंत्रज्ञ असलेल्या नियामक संस्था आहेत. नुकत्यात १२५सीसी वरील सर्व बाईक्सना २०१६ पासून ABS सक्तीचे करणार आहेत अशी बातमी वाचनात आली.

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 11:22 am | टवाळ कार्टा

तेच म्हणतो...ती बातमी अजून बातमीच आहे...तसा नियम बनायचा आहे

भटकंती अनलिमिटेड's picture

9 Oct 2015 - 11:36 am | भटकंती अनलिमिटेड

नियम झाला आहे हे सांगण्याचा हेतू नसून, सरकार तांत्रिक विचार करते हे दाखवण्याचा आहे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

9 Oct 2015 - 11:44 am | अनिरुद्ध.वैद्य

ऑल इन ऑल, ड्राइव्ह फास्ट, नॉट रॅश!
>>

+१००.

बहुतांशी सहमत. आपल्याकडले स्पीड लिमीटस हे एक घोळ असतात त्यात वाद नाही. शहरी वाहतुकीत तर कितीही नियम लावलेत तरी सुधारणा नाहीच :D

सेफ्टी फर्स्ट! आपल्या हातात तेवढेच आहे.

वेल्लाभट's picture

6 Oct 2015 - 2:33 pm | वेल्लाभट

हो ते चांगलंच आहे,
पण भाई जरा जपून...
यक्शेवीस ला टरन म्हणजे जरा रिक्सीच

भटकंती अनलिमिटेड's picture

7 Oct 2015 - 8:48 am | भटकंती अनलिमिटेड

१२०ला टर्न दोनच ठिकाणी आहे. एकदा घाट चढताना अमृतांजन पुलाच्या एक किमी आधी आणि दुसरा सिंहगड इन्स्टिट्यूटचा टर्न. दोन्ही ठिकाणी बर्‍यापैकी रस्ता मोठा आणि मोकळा असतो. अर्थात फास्ट ड्राइव्हिंगचं मी समर्थन करत नाही. पण मला गाडीचे (आणि माझे) लिमिट टेस्ट करण्याचे असल्याकारणे कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली.

वेल्लाभट's picture

7 Oct 2015 - 11:52 am | वेल्लाभट

वोक्के

तर्राट जोकर's picture

7 Oct 2015 - 5:32 pm | तर्राट जोकर

धागा प्रतिसाद आव्डले...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Oct 2015 - 7:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आज एक मॉडीफाय केलेली थार बघितली. अलॉय व्हील्स ला बॉटम आउटवर्ड कँबरिंग करुन घेतलेलं आणि वरच्या आडव्या पट्टीवर ६ फॉग लँप्स लावलेले. बॉडीवर दबा धरुन बसलेल्या वाघाचं मस्तं आर्टवर्क केलेलं.

टवाळ कार्टा's picture

7 Oct 2015 - 8:33 pm | टवाळ कार्टा

फटू??? बाकी थारपेक्षा गुरखा जास्त आवडली पण फक्त लुक्स साठीच

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Oct 2015 - 10:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फोटो काढायला वेळ मिळाला नाही. :/

गुंड्या's picture

9 Oct 2015 - 1:17 pm | गुंड्या

थर आणि जिप्सि मॉडिफाय करण्यासाठी एक नंबर आहेत. एअर इनटेक, एक्झॉस्ट, विंच, रोल केज्...बरंच काही करता येतं!

भटकंती अनलिमिटेड's picture

9 Oct 2015 - 1:29 pm | भटकंती अनलिमिटेड

थार आणि जिप्सीसारख्या गाड्यांचं एक कॉमन वैशिष्ट्य असं आहे की बेसिक लॅडर ऑन फ्रेम चॅसीवर इंजिन आणि ट्रान्समिशन मॉड्युल माऊंट करुन त्यांचं लग्न लावलं आहे. सस्पेन्शनदेखील अगदी बेसिक प्रकारचे. प्रत्येक गोष्ट सुटसुटीतरीत्या जोडली गेल्याने त्याचे मॉडिफिकेशनदेखील सहज साध्य असते. म्हणूनच मॉडिफाय करणार्‍या जमातीच्या त्या आवडत्या गाड्या आहेत. दुचाकींमध्ये तशीच रचना रॉयल एन्फिल्डची आहे.

खरच अफाट आणि अचंबित करणारी माहिती आहे तुमच्या सर्वांकडे ... सलाम ....
मला गाड्यांमधले काडीचही ज्ञान नाही तरीपण सगळी माहिती वाचून माझाकडेही एसयुवि असावी असं वाटायला लागलंय.
माझाकडे wagonR आहे १५ वर्षापूर्वीची. कंटाळा आलाय गाडी चालवून असं नाही तर नवीन टेक्नोलोजी असलेली गाडी हवी म्हणून एसयुवि घ्यायचा विचार पक्का झालाय. आधी मारुतीची ertiga घ्यायचा विचार पक्का झाला होता पण नवीन आलेली महिंद्राची TUV ३०० ने परत विचार करायला सुरुवात केलीये.
माझी गाडीबद्दल फार काही अपेक्षा नाहीयेत . मला फमिली कार घ्यायची इच्छा आहे तरी तुमच्या सारख्या जाणकारांकडून योग्य माहिती मिळाली तर आपला आयुष्यभर आभारी असेन.....

भटकंती अनलिमिटेड's picture

9 Oct 2015 - 1:33 pm | भटकंती अनलिमिटेड

आपली फॅमिली कार ही संज्ञा अधिक स्पष्ट करावी. किती लोक, कुठल्या रस्त्यांवर प्रवास, गाडीचा मुख्य उपयोग काय (requirements) आणि काही प्रसंगी (occasional) उपयोग काय आहे हे सारे लक्षात घेऊन निर्णय घ्या. शुभेच्छा!

गुंड्या's picture

9 Oct 2015 - 2:03 pm | गुंड्या

अगदी बरोबर!

पण कल्ट कार्स आणि बाइक्स च्या बाबतीत ही गोळाबेरीज कधीकधी लागू पडेलच असं नाही ;). उदा. मी सफारी का घेतली?
उत्तर - कारण मला सफारी घ्यायची होती !( मायलेज, सर्विस,प्रॉब्लेम गेलं उडत!):)

भटकंती अनलिमिटेड's picture

9 Oct 2015 - 4:54 pm | भटकंती अनलिमिटेड

तसंच काहीसं आमचं रॉयल एम्फिल्डबाबत झालं. प्युअर कल्ट! brought with heart over brain!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Oct 2015 - 1:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मला झेनॉन घेउन मॉडिफाय करायची इच्छा आहे. फोर्ड-३५० च्या स्टायलिंग मधे.

वेल्लाभट's picture

9 Oct 2015 - 4:34 pm | वेल्लाभट

दे टाळी

अ.रा.'s picture

9 Oct 2015 - 1:45 pm | अ.रा.

फॅमिली कार म्हणजे ६ ते ७ लोक व्यवस्थित बसू शकतील अशी गाडी. त्या दृष्टीनेच मारुती ertiga आणि TUV ३०० ची निवड केलीये. तशी गाडी फक्त मी फिरण्यासाठीच जास्त वापरतो. त्यातल्या त्यात कोंकण जास्त. कोंकणात जाणारे सगळेच घाट रस्ते तसे खराबच असतात. (तसे सगळेच रस्ते खराब असतात हि गोष्ट वेगळी सांगायला नको) असो... गाडी जास्त specious हवी. आणि महत्वाचे म्हणजे low maintenance . मारुतीच्या गाड्यांना maintenance तसा कमी आहे पण महिंद्राच्या गाड्यांना माहित नाही.

भटकंती अनलिमिटेड's picture

9 Oct 2015 - 2:08 pm | भटकंती अनलिमिटेड

लो मेंटेनन्स आणि सहा सात लोकांसाठी स्पेशियस अशा सध्या XUV5OO आणि इनोव्हा या दोन गाड्या आहेत. अर्टिगा, मोबिलिओ फारच पाच लोकांना बसवूनदेखील फारच अंडरपॉवर्ड वाटली, मागील दोन सीट म्हणजे फक्त नावापुरते आहेत. आजकाल महिंद्रा/टोयोटा कमीत कमी तीन वर्षांची वॉरंटी देत असल्याने मेंटेनन्सची काळजी करु नका. एक सर्व्हिसिंग साधारण ५०००/- हा कुठल्याही गाडीचा खर्च असतोच. शिवाय टोयोटाचे इंजिन्स रॉकसॉलिड असतात असे म्हणतात. मी स्वतः २-२ लाख किमी रनिंग झालेल्या इनोव्हा पाहिल्या आहेत.
तसा बजेट हाही एक मुद्दा असतोच (म्हणजे निदान माझा तरी होता).

अ.रा.'s picture

9 Oct 2015 - 2:36 pm | अ.रा.

सगळ्यात महत्वाचा मुद्दा तोच असतो. माझं बजेट ८ लाखापर्यंत आहे. आणि त्यामुळेच XUV5OO आणि इनोव्हाचा नाद तिथेच सोडला. Renault ची लोद्ग्य, मोबिलिओ, फोर्ड एकोस्पोर्ट यांचा पण विचार केला तरी सगळ्यात जास्त TUV ३०० आणि अर्टिगाच अगदी योग्य वाटतीये. पण त्याचे फीचर्स आणि अन्य तांत्रिक गोष्टींची माहिती हवी आहे. किंवा अन्य काही मोडेल्स तुम्हाला माहिती असल्यास जरूर सुचवा. धन्यवाद..

बजेट थोडं वाढवता येणार असेल तर टाटा आरिया पण चांगला पर्याय आहे. मस्त टॉर्कि वॅरिकॉर इंजिन आहे त्यामुळं घाट वगैरे साठी उत्तम!

भटकंती अनलिमिटेड's picture

9 Oct 2015 - 6:57 pm | भटकंती अनलिमिटेड

फोर्ड इकोस्पोर्ट ही पाच सीटर गाडी आहे. थोडक्यात सांगायचं तर स्मॉल कार ऑन स्टिरॉइड्स.
Entusiastic Driver ही आपली स्वतःची ओळख नसेल तर अर्टिगा, मोबिलिओ या गाड्यांचा विचार करावा. पण पॉवर वगैरे हवे असेल तर ही मॉडेल्स डोक्यातून काढून टाका. रेनॉ लॉजीचे इंटिरियर मार खाते. सद्यस्थितीत स्कॉर्पिओ एस-४ आणि पुढचे व्हेरियंट (थोडे बजेट स्ट्रेच करुन), बोलेरो आणि टीयुव्ही३०० हे पर्याय आपल्यासमोर आहेत.

भटकंती अनलिमिटेड's picture

9 Oct 2015 - 2:54 pm | भटकंती अनलिमिटेड

सध्या तरी टूV३०० ची comprehensive १०किमीची टेस्ट ड्राइव्ह घेऊन या. त्यातले काय काय आवडते काय काय नाही? लूक्स, फील, बाकी फीचर्स याची यादी करा. आपल्या रिक्वायरमेंटचे बेंचमार्किंग करा. आणि त्याच्या अगेन्स्ट बाकी गाड्या टेस्ट ड्राइव्ह घेऊन तुलना करा. तुमचे उत्तर आपोआपच सापडेल.

टवाळ कार्टा's picture

9 Oct 2015 - 7:51 pm | टवाळ कार्टा

आजच येताना दोन टीयुव्ही ३०० बघितल्या ...बॉक्सी दिसते पण हमर टैप...दणदणीत रोड प्रेझेंस आहे
लाल कलर मस्त दिसतो पण पांढरा फक्त कॉर्पियोवाल्या गुंठामंत्र्यांना आवडेल

आदिजोशी's picture

13 Oct 2015 - 3:13 pm | आदिजोशी

कॉर्पिओला नाव ठेवायचं काम नाय :)

टवाळ कार्टा's picture

13 Oct 2015 - 3:19 pm | टवाळ कार्टा

तो तुम्चा समज आहे

कपिलमुनी's picture

13 Oct 2015 - 4:31 pm | कपिलमुनी

आता तुझा काही खरा नै . ३-४ पांढर्‍या कार्पिओ तुझ्या बिल्डिगचा गेट तोडून आत येणार आणि त्यातून गुंठा मंत्री उतरणार

टवाळ कार्टा's picture

13 Oct 2015 - 4:49 pm | टवाळ कार्टा

पण मी कॉर्पियोला काही म्हणालोच्च नैय्यै

भटकंती अनलिमिटेड's picture

14 Oct 2015 - 8:57 am | भटकंती अनलिमिटेड

गेल्या सप्ताहांती अस्मादिकांनी नदी आणि आजूबाजूच्या खडकावर XUV5OOसह मॉडरेट ऑफरोडिंगची ट्रायल घेतली. अधिक विस्तृत व्हिडिओ लवकरच येईल. तत्पूर्वी ही मोबाईल क्लिप.

https://www.facebook.com/100008168100113/videos/1676258549323066/

आजच महिंद्राची रोड टेस्टला आलेली गाडी बघितली. सेल फोन काढुन फोटो काढेपर्यंत पुढे निघुन गेली होती... बहुदा TUV 500 असावी. कारण गाडी आकाराने xuv 500 आणि TUV 300 च्यामधली वाटत होती, आणि उजव्या बाजुला मागच्या खिडकिच्या खाली TX-500 लिहिले होते.

शेप बर्‍यापैकी TUV 300 सारखाच होता फक्त साईझ मोठी होती

भटकंती अनलिमिटेड's picture

14 Oct 2015 - 12:09 pm | भटकंती अनलिमिटेड
भुमन्यु's picture

14 Oct 2015 - 2:40 pm | भुमन्यु

हो अशीच होती....फक्त काळा कपडा नव्हता

५० फक्त's picture

18 Oct 2015 - 12:33 pm | ५० फक्त

कुणी टेस्ट ड्राइव्ह केली आहे का....

नाना स्कॉच's picture

19 Mar 2016 - 5:56 pm | नाना स्कॉच

महिंद्रा केयुवी 100 कशी आहे कोणी मार्गदर्शन करू शकेल का???

भटकंती अनलिमिटेड's picture

13 Apr 2016 - 7:28 am | भटकंती अनलिमिटेड

हा धागा ऑफबीट आणि ऑफरोड वाहनांचा असल्याने KUVसाठी वेगळा धागा असावा :-P

विजुभाऊ's picture

23 Feb 2018 - 12:42 pm | विजुभाऊ

वा मजा आ गया वाचून. मस्त माहिती मिळाली

कपिलमुनी's picture

23 Feb 2018 - 1:29 pm | कपिलमुनी

TUV 300 mHAWK100 सध्या 100 bhp पॉवर देते असा वाचले आहे . इथे कोणाला या गाडीचा अनुभव आहे का ?

अपश्चिम's picture

25 Apr 2018 - 7:01 pm | अपश्चिम

6 वर्ष बोलेरो वापरून समाधानी होतो , हा धागा वाचून हृदयात बारीकशी कळ सुरु झालीये .....
पण तरीही महिंद्र च ... ( आता TUV ३०० वापरतोय )

गुंड्या's picture

7 Feb 2020 - 8:29 pm | गुंड्या

टाटा सिएरा परत येणार! अर्थात नवीन डिझाईन आहे पण तरीही लेगसी चालू राहील हे विशेष!
टाटा सिएरा!

गवि's picture

9 Feb 2020 - 2:19 pm | गवि

https://gaadiwaadi.com/maruti-showcased-suzuki-jimny-4x4-suv-for-the-fir...

मारुती जिम्नी 4x4

जिप्सी नवा अवतार?

राजो's picture

8 May 2024 - 8:44 pm | राजो

मागच्या वर्षी सिमला - मनालीला गेलो तेव्हा सगळीकडे थार चाच बोलबाला होता.