ऑफबीट, ऑफ द रोड ड्रायव्हिंगची वाहनं..

गवि's picture
गवि in काथ्याकूट
28 Jan 2015 - 4:08 pm
गाभा: 

अन्य धाग्यात सुरु झालेली चर्चा तिथे अवांतर नको म्हणून इथे चालू ठेवण्याची विनंती करतो. प्रस्तावना अशी की मजसहित अनेकांना एसयूव्ही, एमयूव्ही, ऑल टेरेन व्हेइकल्स, ऑल व्हील ड्राईव्ह गाड्या, अधिक ताकदीचं इंजिन, ओव्हरड्राईव्ह मोड याविषयी क्रेझ असल्याचं वाटलं. अश्या "ऑफरोडरोमियों"कडे रोजच्या शहरी वाहतुकीसाठी कॉम्पॅक्ट फॅमिली कार घरोघरी असली तरी मनात कुठेतरी जीप, थार, एक्सयूव्ही, कमांडर वगैरे यांचे मांडे खाल्ले जात असतातच. यात ती लेह लडाखची एक सेल्फ ड्राईव्ह लाईफटाईम टूर करण्याचं स्वप्न असतंच पण त्याचप्रमाणे पूर्ण भारत फिरणं, जंगलात नदीनाल्यांतून प्रवास अश्याही कल्पना असतात.

कोणाला भरपूर जागा हवी असते तर कोणाला भरपूर ताकद.. किंवा दोन्ही.

मी काही ऑप्शन्स इथे टाकून सुरुवात करतो. बाकी चर्चा पुढे होईलच.

-सफाईदार लुकवर भर असणारी टाटा सफारी.
-पाहताक्षणी टुणकन उडी मारुन स्टीअरिंग व्हील हाती घ्यावं अशी गोड पण रफटफ अंतरंग असलेली महिंद्रा क्लासिक

AA

With thanks from www.mahindracarsindia.com

-भरपूर रफनेस असलेली थार

-स्कॉर्पिओ, झायलो आणि क्वान्तोचं त्रिकूट

-एक्सयूव्ही५००चा अ‍ॅनिमल लुक आणि आकर्षण (बादवे, रिव्ह्यूंमधे मार खाल्लेला दिसतो)

-जुनी टेंपो (आता फोर्स) ट्रॅक्स.. चक्क तेरा चौदा लोकांना आरामात वाहून नेणारी. बाहेरुन ट्रंकसारखा पोलादी लुक पण इंजिन मर्सिडिज कंपनीने बनवलेलं.

-आताचा ट्रॅक्सचा अवतार - फोर्स गुरखा

-फोर्स वन. प्रचंड आकार आणि तुलनेत कमी किंमत. क्रूझ कंट्रोल. स्टियरिंग व्हील कंट्रोल्स.

AAA

with thanks from i.ndtvimg.com
...

ही वाहनं सेकंडहँड घेऊन त्यावर दुरुस्ती करुन नव्यासारखी करणं स्वस्त वाटलं तरी शेवटी महागच पडतं असा अनुभव आहे. एकूण या गाड्या ताबडल्या गेलेल्या असल्याने त्यांना सेकंडहँड घेणे म्हणजे चरकात पिळून बराचसा रस संपलेला ऊस विकत घेण्यासारखं आहे असं मला तरी वाटतं.

या आणि अश्याच गाड्यांविषयी आणखी माहिती, अनुभव आहेत का? या कार्स आणि त्यांना घेऊन केलेला प्रवास यांचं अद्वैत आहे. तेव्हा कोणते प्रवास तुम्ही केलेत आणि त्यात काय अनुभव आले.. जे इतरांना कळल्याने त्यांना खूप फायदा होईल तेही सांगावेत.. (अंतर वाचणे, खराब रस्ता टळणे, जास्त सुंदर रस्ता सापडणे, जेवणाखाण्याची पंचाईत न होणे, पेट्रोलडिझेलपंपपासून दूर जाऊन अडकून न पडणे इत्यादि)

प्रतिक्रिया

बाळ सप्रे's picture

28 Jan 2015 - 4:28 pm | बाळ सप्रे

टाटा सफारी भारतीय बनावटीची आणि स्टायलिश आणि व्हॅल्यु फॉर मनी अशी पहिली एस यु व्ही.. पण ताकद मिळाली २००५-०६ मध्ये डायकॉर इंजिन आल्यापासुनच..

पण ऑफरोडींग करायला फोर व्हील ड्राईव्ह असेल तरच धाडस करावं.. खास करुन चिखल वगैरे असल्यास .. अन्यथा जास्त वजनामुळे रुतण्याचा धोका अधिक संभवतो.. एक दोन वेळा पस्तावलोय :-(

सफारी स्टॉर्मने मात्र लूक्स खराब केले या मस्त गाडीचे..

सध्याच्या काळातील गाड्यात लुक्स, पॉवर यात फॉर्च्युनरला तोड नाही.

फॉर्च्युनर आणि एन्डेव्हर एकाच दर्जाच्या आहेत का?

बाकी व्हील फसणे हा प्रकार बेकार असतो.. फोर व्हील ड्राईव्हशिवाय लेहबिह नकोच.

बाळ सप्रे's picture

28 Jan 2015 - 4:49 pm | बाळ सप्रे

हो.. फॉर्च्युनर आणि एन्डेव्हर एकाच दर्जाच्या .. जवळपास सारख्याच ताकदीच्या ( व किमतीच्या) .. पण एन्डेव्हर खूप बल्की आहे..

गुंड्या's picture

28 Jan 2015 - 4:58 pm | गुंड्या

गवि, सर्वप्रथम, अत्यंत आवडीच्या विषयाची चर्चा चालू केल्याबद्दल धन्यवाद!
फॉर्च्युनर आणि एन्डेव्हर एकाच दर्जाच्या आहेत. लेह साठी फोर व्हील ड्राईव्हची गरज नाही.
सीरीयस ऑफरोडिंग करायचं असेल तर फोर व्हील ड्राईव्ह आवश्यक आहे.
मी गेलं वर्षभर सफारी स्टॉर्म वापरतोय्..भन्नाट गाडी आहे..

सफारीचं इंटिरियर आणि एक्स्टिरियर फिनिशिंग / क्राफ्ट्समनशिप सुरुवातीपेक्षा आता खूपच चांगली झाली आहे ना? आधी कमी प्लॅस्टिक क्वालिटी आणि जोडकामात कमी नजाकत असं वाटायचं. आता बहुधा स्मूथ आहे.

हो..एकंदरीत क्वालिटी मधे खूपच सुधारणा झाली आहे. सगळ्यात महत्वाचं इंजिन. नवीन वॅरिकॉर इंजिन अतिशय स्मूथ आणि रिस्पॉन्सिव्ह आहे. लुक्सबाबत म्हणाल तर मला जुना आणि नवा दोन्ही आवडतात्..दोन्हीचा चार्म वेगळा आहे.

बाबा पाटील's picture

29 Jan 2015 - 1:43 pm | बाबा पाटील

बद्दल माहिती मिळेल का ? टाटा साफारी स्टॉर्म्,एक्स यु व्ही,आणी नविन येणारी होंडा एच आर व्ही यापैकी एक विचार आहे.सध्या लिनिया आणी इको स्पोर्ट वापरत आहे,लिनिया खुपच कंफर्टेबल आहे,एको स्पोर्ट पुर्णपणे बायकांची गाडी आहे,त्यामुळे वरील तिन पैकी एक गाडी चॉइस करायला मदत करा. नविन गाडी बोंबलत फिरण्यासा ठीच घ्यायची आहे.

चित्त्यावरुन इन्स्पायर्ड डिझाईन अन एकेकाळी आधी पैसे भरुन मग काही नशीबवान लोकांना ती लाभणार वगैरे अशी सुरुवातीची शान पाहून.. शिवाय आजुबाजूला दोघातिघांनी घेतलेली प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून काळ्या रंगाच्या एक्सयूव्हीवर फार मन बसलं होतं. पण हळूहळू रिव्ह्यू यायला लागले आणि नुसता लुकच बेस्ट आहे असं वाटायला लागलं. गियरशिफ्ट स्मूथ नसणे आणि इतरही काही निगेटिव्ह मते बर्‍याच ठिकाणी वाचली.

टीम बीएचपी याबाबत उत्तम रिव्यू वगैरे देते. चर्चाही रोचक असतात पण त्यांची मेंबरशिप ही अमेरिकेच्या विसापेक्षाही अवघड आहे असं वाटतं. मेम्बर होण्यासाठी मोठे तपशीलवार क्वेस्चअनेअर मनापासून भरुनही कोणतेही कारण न दाखवता "पुरेशी डीटेल्ड उत्तरे न देणे" आधी मोघम आणि साचेबद्ध कारण दाखवून मेम्बरशिप नाकारतात. अनेकांना हा अनुभव आहे असं ऐकलं.

याहून चांगली उत्तरं काय लिहायची ? असा प्रश्न पडतो. पण गाईडलाईन्स काहीच नाहीत. मग वाटतं जाऊदे, आपली लायकी नाही असं मानू.. :(

वेल्लाभट's picture

29 Jan 2015 - 1:56 pm | वेल्लाभट

या साईट चा खूप पूर्वीपासून मेंबर व चाहता आहे. पण सहभाग काही घेता आला नाही. आजवर चार पाच वेळा माझ्य आयडीस बॅन करण्यात आलं. का? मला कळत नाही. मी इंग्रजीत ट्रेक वृत्तांत वगैरे टाकला, छान फोटो टाकले, इत्यादी झालं... आणि मग पुढे प्रतिसादात कुठला तरी शब्द रिपीट केला तर स्पॅमिंग च्या कारणाखाली माझा आयडी ब्लॉक झाला. अजून दोन तीनदा अशीच क्षुल्लक निरर्थक कारणं. त्यामुळे नाद सोडला. पण साईट वाचक म्हणून अजूनही फॉलो करतो.

तुम्हाला सदस्यत्व मिळाले तरी.. तुमची गाडी भारीपैकी असणार.. त्यांच्या दृष्टीने सामान्य गाडीवाल्यांना ते घेत नसावेत असं आपलं माझं एक मत झालंय..

स्वच्छंदी_मनोज's picture

29 Jan 2015 - 3:25 pm | स्वच्छंदी_मनोज

फार पुर्वी ह्याचा मेंबर होतो, जेव्हा लाईसन्स नव्हतं आणी स्वतःच्या गाडीची स्वप्न पण पडत नव्हती तेव्हा पासून.. इतर लोकांचे अनुभव वाचून भारी वाटायचे, पण मग मधे साईटचा लूक बदलला आणी अचानक लॉगिन बॅन झाले, का माहीत नाही :(
मज जेव्हा परत मेंबरशीप घ्यायला गेलो तेव्हा कशाही पद्धतीने फॉर्म भरला तरी मेंबरशीप मिळालीच नाही, अगदी तुमची पुढची ड्रीम कार कुठली ह्याला, फेरारी, बीएमड्ब्ल्यू, लॅम्बोर्गीनी, नॅनो, बजाज..कुठल्याही उत्तराने साईट अ‍ॅडमीनचे समाधान झाले नाही.. शेवट नाद सोडला..

माझ्या मते भारतातल्या ऑफरोड ड्रायवींगला महींद्राला पर्याय नाही.. भारताच्या रस्त्यांची एतक्या वर्षांची उत्तम जाण, आणी त्याच जाणीवेतून बनवलेल्या गाड्या यामुळे मनात ऑफरोड म्हणजे तिथे फक्त एस्टी आणी जीप याच जाऊ शकतील असे समीकरण बनले आहे. स्वतः असंख्य वेळा जीपमधून (खास करून महींद्रा कमांडर) फिरलो असल्याने याची खात्री आहे :)

तश्या सध्याच्या चलती असलेल्या क्रॉस सेगमेंटच्या गाड्या पण ऑफरोडला चालू शकतील..

अवांतर - महाराष्ट्रातील पावसाळ्यातील रस्त्यांची अवस्था बघता ऑफबिट, ऑफरोड कुठल्या रस्त्याला म्हणायचे हाही एक प्रश्णच आहे.. :)

चिगो's picture

29 Jan 2015 - 2:59 pm | चिगो

पण हळूहळू रिव्ह्यू यायला लागले आणि नुसता लुकच बेस्ट आहे असं वाटायला लागलं. गियरशिफ्ट स्मूथ नसणे आणि इतरही काही निगेटिव्ह मते

हेच.. मलाही ही गाडी सुरुवातीला प्रचंड आवडली होती. पैसे असते तर घेतलीच असती. पण नंतर कळलं, की गाडीपेक्षा गाडीबद्दलचं बोलबच्चन भारी आहे म्हणून.. :-(

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Jan 2015 - 5:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एक्स.यु.व्ही. ५०० चांगली गाडी आहे!!!!!!!!

बाकी बी.एच.पी. टीम विषयी काही माहिती नाही.

संदीप डांगे's picture

30 Jan 2015 - 12:48 am | संदीप डांगे

खरं आहे अगदी, त्यांचे काय निकष आहेत देवच जाणे,

अगदी नवीन साईट असताना सुरुवातीला माझी मेम्बरशिप मिळाली, काही कारणाने ३-४ वर्ष फिरकलो नाही तिकडे. नंतर कार घेतल्यावर गेलो तर लॉग इन करायला पासवर्ड आठवेना. ते पासवर्ड पाठवेना. नवीन मेम्बरशिप घ्यायला गेलो तर तुमचे इंग्रजी खराब आहे असे चक्क चक्क सांगून परतवलंय कित्ती वेळा.

माझा ब्रिटीश क्लायंट म्हणतो तुझे इंग्लिश चांगले आहे आणि हे देशी लोक खराब म्हणतात. मी नाद सोडून दिला. मग ठरवले आपण आपले ज्ञान ग्रहण करावे. उगाच मनस्ताप करून घेऊन फुकटचा आनंद मिळतोय तो का घालावा.

खंडेराव's picture

31 Mar 2015 - 12:28 pm | खंडेराव

हिशोब विचित्र आहे. मी बर्याचदा प्रयत्न केला, आणि एकदा अचानक मिळाली मेंबरशीप.

बाकी, ते देत असलेल्या माहितीला तोड नाही. त्यांचे ओवनरशीप रिव्यु झकास असतात.

संदीप डांगे's picture

31 Mar 2015 - 12:54 pm | संदीप डांगे

मेंबरशीपबद्दल अभिनंदन...

मेंबरशिपचे आपले असे फायदे असतात, काही व्यक्तिगत समस्या तिथे मांडून जाणकारांकडून मार्गदर्शन मिळू शकतं. सम-विचारी, सम-गाडी ग्रुप मिळू शकतो. मेंबर नसल्याने थोडी अडचण होते इतकेच, कारण आपल्याला आलेली समस्या तिकडे कुणी मांडली असेलच असे नसते. बाकी प्रवासवर्णनं, गाडी-मालकीचे अनुभव, नविन गाड्यांचे अनेक वापरकर्त्यांकडून येणारे खात्रीलायक अनुभव, काही तांत्रिक समस्यांवर उपाय, नविन बातम्या वैगेरे भरपूर उपयोगाची माहिती विना-मेंबरशीप उपलब्ध आहे ते फारच छान.

अनुभव काडीचा नसलेला परंतू असले कार्यक्रम टिव्हीवर कोचावर बसून पाहणारा आणि वाचनोत्सुक. नाही म्हणायला मारुतीच्या फोरव्हीलड्राइव(दोन दरवाजे) मधून ठाण्याच्या एरफॉर्स स्टेशनच्या वरच्या डिशस्टेशनपर्यँत पावसाळ्यात जाण्याचा अनुभव घेतला आहे. तीस पस्तीस डिग्रीचा चढ आहे.

बाळ सप्रे's picture

28 Jan 2015 - 4:55 pm | बाळ सप्रे

भारतीय रस्त्यांवर मात्र या गाड्या खड्ड्यांची पर्वा न करता सुसाट नेता येतात.. जास्त ग्राउंड क्लीअरन्स आणि जबरदस्त शॉक अ‍ॅब्सॉर्बर असल्याचा फायदा खूपच असतो.. अति वेगात वळवताना मात्र high CG चा तोटा असतो.. गाडी टॉपल होण्याचा धोका जास्त असतो..

प्रसाद गोडबोले's picture

28 Jan 2015 - 5:08 pm | प्रसाद गोडबोले

मला टाटा ची क्षेनॉन क्ष्त आणि स्कॉर्पियो गेटवए सुध्दा आवडते ...पण १० आणि ११ लाख घालुन अशी रगेड दिसणारी गाडी खास हौसेसाठी घेण्याचे दिवस आले नाहीत अजुन .

टाटा क्षेनॉन क्ष्त स्पेक्स पाहता गेट अवे पेक्षा लय भारी वाटत आहे
http://www.team-bhp.com/forum/indian-car-dealerships/56927-took-delivery...
a

ही पहा आमच्या आवडत्या गुल पनाग ची मॉडीफाईड गेट अवे
http://www.team-bhp.com/forum/4x4-vehicles/139358-interesting-modified-s...
gp

अअवांतर : मिपावर फोटो टाकताना फोटोचि हाईट आनि विडथ किती असावी ?

ही गेट अवे कधी आली बाजारात ? पाहण्यातून कशी निसटली इतकी मोठी गाडी ? निरीक्षण खूपच कमी पडतंय माझं.. :(

प्रसाद गोडबोले's picture

28 Jan 2015 - 5:16 pm | प्रसाद गोडबोले

ही गेट अवे कधी आली बाजारात ?

स्कॉर्पियोचेच मॉडेल आहे , खुप आधी पासुन आहे मार्केट मध्ये .

मला तर बोलेरो कॅम्पर पण आवडते आणि ही बजेट मध्ये ही येत होती पण महिन्द्रा महाराश्त्रात ती ट्रान्स्पोर्ट वेहिकल म्हणुन विकतात ... पिवळी नंबर प्लेट ... श्षी ... दुष्ट कुठले :-\

b

वेल्लाभट's picture

28 Jan 2015 - 5:26 pm | वेल्लाभट

झेनॉन कव्वा आहे बरं का गाडी. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे, ज्याचे तसे दिवस आलेत त्यानेच विचार करावा. महाग आहे.

प्रसाद गोडबोले's picture

28 Jan 2015 - 5:35 pm | प्रसाद गोडबोले

खरंच महाग आहे राव , पण हौसेला मोल नसते .

अर्थात चैनीचे दिवस आल्यावर ;) घरी एक मस्त होन्डा सिटी घेवुन द्यायची अन मग म्हणायचे की आता मला विचारु नका मी वाट्टेल ते करेन,

मग एक अशी रगेड गाडी घेता येईल !

कसलं इम्प्रेशन पडेल राव , एखादी ओपन टॉप जीप , जीन चे जॅकेट , फास्ट त्रॅक चा गॉगल !
आणि " आय डोन्ट गिव्ह अ फक" असा अ‍ॅटीट्युड ! कसली लाईफ स्टाईल असेल ती ... अहाहा !!

#dream2020 !!

अजुन थोडी वाट पहावे लागेल , तोवर जीप रँगलर भारतात लॉन्च होवो हिच इच्छा !!

टवाळ कार्टा's picture

29 Jan 2015 - 12:58 pm | टवाळ कार्टा

फास्ट त्रॅक चा गॉगल

कर दी ना छोटी बात :(

अन्या दातार's picture

30 Jan 2015 - 4:18 pm | अन्या दातार

गॉगल घेऊन घेऊन फास्त त्रकचा?? माझे रेकमेंडेशन फकस्त आनि फकस्त रेब्यान. त बी D श्टाईलचा
rb
हा अस्सा

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 Jan 2015 - 5:17 pm | कैलासवासी सोन्याबापु

रेनो डस्टर कशी आहे हो?

डस्टर आणि इकोस्पोर्ट एकमेकींच्या प्रतिस्पर्धी. पण इतके करुन त्या पाच सीटरच.

प्रत्यक्ष अनुभव नाही. पण या दोन्हीपेक्षा निसान टेरानो चांगली असल्याचे माहितीतल्या लोकांच्या अनुभवाने वाटते. या कंपनीचे नेटवर्क भारतात कितपत आहे आणि सर्व्हिस कशी अन कुठे मिळेल याविषयी शंका आहे.

@प्रगो. बोलेरोला बाजूने काहीच लुक नाही. बाकी सर्व उत्तम आहेच..

वेल्लाभट's picture

28 Jan 2015 - 5:32 pm | वेल्लाभट

डस्टर व इकोस्पोर्ट ओव्हर हाईप्ड आहेत माझ्या मते. इकोस्पोर्ट्चे तर वाईट रिव्ह्यू आहेत.

वेल्लाभट's picture

29 Jan 2015 - 1:32 pm | वेल्लाभट

बोलेरोला बाजूने काहीच लुक नाही. बाकी सर्व उत्तम आहेच..

हे....... नई.....पटलं.. ब्वा.

बॉक्सी आहे एकंदरित. पण अगदीच लुक 'नाही' असं नाही. :)

हे पहा.. फ्रंट लुक भारी आहे:

B

With thanks from www.cartoq.com

साईडने बघा.. सपाट अन तुलनेत बोरिंग, फीचरलेस.. म्हणून म्हटले, साईडलुक नाहीच.. अगदी जुन्या ट्रॅक्स अथवा आरमाडेचा साईड लुक.. आरमाडा जरा जास्त डौलदार म्हणायची तरीही.

C

With thanks from images.cardekho.com

वेल्लाभट's picture

30 Jan 2015 - 10:57 am | वेल्लाभट

जैसी जिसकी सोच

मला प्रचंड आवडते :)

वेल्लाभट's picture

30 Jan 2015 - 12:16 pm | वेल्लाभट

बोलेरोवर एक अक्क्खं गाणं आहे हरियाणवीत.

मॅडम बैठ बुलेरो में ..... ऐका एकदा. व्हिडियोच बघा.
यातून गाडीची लोकप्रियता, लोकमान्यता कळते. :)

वेल्लाभट's picture

28 Jan 2015 - 5:24 pm | वेल्लाभट

गाड्या म्हणजे प्रेम आहे राव पहिलं !
याबद्दल एक ब्लॉगपोस्ट लिहिली होती. ही बघा

काही उत्तम एसयुव्हीज भारतातल्या/बाहेरच्या/उत्पादित होत असलेल्या/बंद झालेल्या
१) टाटा सिएरा - बघताक्षणी जो वेडा झालो तो आजतागायत. कदाचित शेवटपर्यंत
२) टाटा सुमो - ही ख-या अर्थाने एसयुव्ही नाही, पण दमदारपणा आणि युटिलिटीमधे हिला तोड नाही
३) महिंद्रा बोलेरो - एकच शब्द; जबराट. शान आहे गाडीची. स्कॉर्पियो च्या आगमनावेळी फेज आउट प्लॅन झाला होता हिचा. पण महिन्यागणिक महिंद्राची टॉप सेलिंग कार हीच ठरत गेली आणि आता ब्रँड झालाय बोलेरो म्हणजे.
४) महिंद्रा स्कॉर्पियो - अतिशय कॉमन तरीही उठून दिसणारी. गरीबाची हमर. बसायला बिसायला किंचित छोटी असेल, पण कितीही ताबडवावी अशी गाडी.
५) टाटा सफारी - ख-या अर्थाने भारतातील पहिली लक्झरी एसयुव्ही. आजही सेकंड थर्ड जनरेशन सफारी खरी हौशी लोकं विकत नाहीत यातच या गाडीचा महिमा कळतो.
६) क्लासिक ५५० - महिंद्रा, अर्थातच. ओपन जीप हवी तर ही. लाल रंग आणि सेक्सी अ‍ॅलॉय्ज. खलास.
७) फोर्स वन - फोर्स कंपनीला फारसं वलय अजूनही मिळालेलं नाही. पण मर्सिडिज चं ह्रदय घेऊन मिरवणारी ही अजस्त्र गाडी जबरदस्त आहे एवढं सांगू शकतो.
८) कॅडिलॅक एस्कलेड - केवळ साईझमुळे इंप्रेस करते ही गाडी. ह्यूज ! अ‍ॅब्सल्यूटली ह्यूज !
९) रेंज रोव्हर - हे जरा महागाचं प्रकरण आहे पण ग्रेस काय वर्णावी
१०) जीएमसी एन्व्हॉय - पुन्हा तेच; साईझ डज मॅटर. आणखी एक अजस्त्र गाडी.

आता एसयुव्ही पेक्षा जरा वेगळ्या पण मनात घर करून राहिलेल्या गाड्या. (खरं तर या याद्या संपणारच नाहीत पण असो)
१) ११८ एनी
२) कॉन्टेसा - द लाँगेस्ट इन्डियन सेडान टिल डेट
३) टाटा इस्टेट - पहिली वाहिली स्टेशन वॅगन प्रकारातली गाडी. टाटाने पहिल्या काही गाड्या too ahead of time काढल्या. आणि अर्थातच त्या फसल्या. त्यापैकी ही एक. नंतर बलेनो अल्टुरा, सिएना वीकेंड, इंडिगो मरीना, ऑक्टाविया काँबी आल्या.
४) मेटॅडोर - काय माहीत पण ही गाडी जाम आवडते. युनीक.
५) फोर्ड मॉंडियो - जबरदस्त व्हॅल्यू फॉर मनी होती खरं ही गाडी. पण अ‍ॅकॉर्ड, सोनाटा केवळ नावामुळे सरस ठरल्या.

वर म्हटल्याप्रमाणे असंख्य गाड्या आहेत नमूद करण्याजोगत्या. पण तूर्तास इतक्याच.
बाकी कितीही आल्या गेल्या तरी माझी डार्लिंग मात्र आमची ८००च राहील. अखेरपर्यंत.

१) टाटा सिएरा - बघताक्षणी जो वेडा झालो तो आजतागायत. कदाचित शेवटपर्यंत
२) टाटा सुमो - ही ख-या अर्थाने एसयुव्ही नाही, पण दमदारपणा आणि युटिलिटीमधे हिला तोड नाही

टाटा सिएरा आता ऑब्सोलीट झाली आहे ना? पूर्वी एकदा सेकंडहँड फक्त सव्वा लाखात आली होती डिस्प्लेला. त्यामुळे रिसेल व्हॅल्यू नाही इतकंच कळलं. शिवाय मागच्या खिडक्या उघडत नाहीत असं दिसलं. फक्त फट करता येते थोडीशी मला वाटतं.. म्हणून त्यावेळी आवडली नव्हती. काय गुण होता खास?

सुमो एसयूव्हीच आहे ना? का नाही?

या निमित्ताने एस यू व्ही आणि एम यू व्ही म्हणजे न्येमकं काय यावर स्पष्टता यावी तर मजा येईल.

इंडिगो मरिना मजकडे होती. हौसेने घेतली होती लांबच्या प्रवासाला. पण दगा द्यायचे इंजिन. मग विकावीच लागली बरीच स्वस्तात.

वेल्लाभट's picture

28 Jan 2015 - 5:36 pm | वेल्लाभट

अहो ती मागची न उघडणारी भव्य काच - तेच ते युनिक डिझाईन - अ‍ॅग्रेसिव्ह ओव्हरॉल लुक - सुपिरियर कंफर्ट इन द रेअर सीट - पॉवरफुल इंजिन - !!!! काय सांगू अजून !

अहो ती मागची न उघडणारी भव्य काच - तेच ते युनिक डिझाईन - अ‍ॅग्रेसिव्ह ओव्हरॉल लुक - सुपिरियर कंफर्ट इन द रेअर सीट - पॉवरफुल इंजिन - !!!! काय सांगू अजून !

https://gaadiwaadi.com/legendary-tata-sierra-reborn-as-a-concept-at-2020...

तुमची लाडकी सिएरा पुन्हा जन्मास आली हो वेल्लाभट..

कापूसकोन्ड्या's picture

28 Jan 2015 - 8:32 pm | कापूसकोन्ड्या

टाटा सुमो हे नाव Sumant Mulgaonkar यावरून ठेवले आहे असे समजले पण कितपत खरे आहे ?

घाटावरचे भट's picture

29 Jan 2015 - 2:25 pm | घाटावरचे भट

ते Sumant Moolgaonkar असे आहे. म्हणून नाव SuMo असे आहे. कै. सुमंत मूळगावकर टाटा मोटर्सचे चेयरमन होते. त्यांच्या कारकिर्दीत टेल्को (तेव्हाची. आत्ताची टामो) उभी राहिली असे म्हणायला हरकत नाही. २०७, ४०७ वगैरे त्यांच्याच काळातल्या. शिवाय त्यांनी टामो-करवी सामाजिक उपक्रमांमध्येही भरीव योगदान दिलेले आहे.

कापूसकोन्ड्या's picture

29 Jan 2015 - 6:20 pm | कापूसकोन्ड्या

धन्यवाद माहितीबद्दल

विटेकर's picture

28 Jan 2015 - 5:55 pm | विटेकर

नुकतीच लोन्च झालेली मर्क सी एल ए / जी एल ए ???
आणि जी क्लास ६३ ए एम जी ??? वोव !!
पुढच्या वर्षी सी एल ए / जी एल ए पैकी एक नक्की !!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Jan 2015 - 6:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

झेनॉन मस्त आहे. पॅसेंजर बॉडी बिल्ड करुन घेणं सगळ्यात मस्त.

आता भारतीय मार्केट मधे असणार्‍या सगळ्या एस.यु. व्हीं.ची किंमत २७ लाखापर्यंत हा घटक गृहित धरला तर माझी विशलिस्ट खालील प्रमाणे आहे.

१. फोर्ड एंडेव्हर.
२. टोयोटा फॉर्च्युनर
३. लॅंडरोव्हर
४. टाटा झेनॉन (४*४) वाली पॅसेंजर बॉडी बांधुन घेऊन
५. एक्स यु व्ही ५००
६. स्कॉर्पिओ
७. डस्टर

आणि किंमत हा घटक नाही पकडला तर

१. ऑडी क्यु ५
२. बी.एम.डब्ल्यु.
३. एक्स ५

टाटा सिएरा वर वेल्लाभट म्हणतात तशी प्रचंड आवडायची.

आता टाटा २०७ जी झेनॉन म्हणुन विकली जाते तिचा ओरिजिनल टर्बो चार्जर बदलुन, बोर्ग वॉर्नर चा टर्बो चार्जर लाउन एक झॅक एक्सुसिव्ह एस.यु.व्ही. पुढे मागे बनवायचा प्लान आहे. :)

घाटावरचे भट's picture

31 Jan 2015 - 11:20 am | घाटावरचे भट

अतिप्रचंड महाभयानक असहमती. तुम्हाला कदाचित २०७डिआय आणि झेनॉन पिकप म्हणायचे असावे. अन्यथा २०७ आणि झेनॉन एक्सटी मधे जमीन-आस्मानाचा फरक आहे. जरा स्पेसिफिकेशन्स तपासून पहा. विशेषतः चॅसिज वगैरे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Jan 2015 - 12:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ओह..माफ करा...मला एवढे दिवस झेनॉन ही २०७ डी.आय. ची वारसदार वाटायची. -_-

मला लिंक द्याल का फरकाची? मी कारवाले आणि कारदेखो वर चेक केलं पण २०७ डी.आय. सापडली नाही. -_-
त्यामु़ळे माझा असा समज झाला की झेनॉन ही २०७ डी.आय. ला रीप्लेस करते आहे. -_-

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Jan 2015 - 12:21 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एक मिनिट ही लिंक पहा.

http://en.wikipedia.org/wiki/Tata_TL

ह्याच्यामधे झेनॉन २०७ चा फोर्थ जनरेशन सक्सेसर म्हणुन दाखवते आहे.

घाटावरचे भट's picture

31 Jan 2015 - 2:04 pm | घाटावरचे भट

विकीवरील माहिती जनरेशनवाईज जरी ठीक असली तरी त्यात तांत्रिक माहिती समाविष्ट नाही. आणि जनरेशन जरी चौथी दाखवलेली असली तरी फर्स्ट जेन आणि फोर्थ जेन गाडीमधे खूप फरक आहेत. आत्ता जी २०७ बाजारात उपलब्ध आहे त्यात टाटा ४एसपी डिआय इंजिन आहे (नॅचरली अ‍ॅस्पिरेटेड)तर झेनॉनमधे २.२लि किंवा ३लि कॉमन रेल इंजिन आहे. २०७ ४-व्हील ड्राईव्हमधे उपलब्ध नाही, झेनॉन आहे. जर कुठे साधर्म्य असेल तर साधारण स्टायलिंग प्रोफाईलमध्ये आहे. तुमचा गोंधळ २०७ डिआय आरएक्स आणि झेनॉन पिक-अप मधे झाला असावा. झेनॉन पिक-अपचे मेकॅनिकल्स बर्‍याच प्रमाणात २०७ डिआय वर आधारित आहेत. कॅब स्टायलिंग झेनॉन सारखे आहे आणि लोड बॉडी जास्त छान दिसणारी आहे. शिवाय त्याला ३लि टर्बो डिआय इंजिन आहे (डायकॉरचा ऑप्शन आहे, भारतात उपलब्ध आहे की नाही ठाऊक नाही).

बाबा पाटील's picture

28 Jan 2015 - 7:25 pm | बाबा पाटील

सफारी स्टॉर्म नक्की.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jan 2015 - 8:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोबस्ट रफ टेरेन व्हेईकल...
 .
लँड रोव्हर (सिरीज १) (डावीकडील चित्र जालावरून साभार)

आणि

ऑल टेरेन बुलेटप्रूफ व्हेईकल...


१९९०च्या दशकातला M-सिरीज अमेरिकन मेन बॅटल टँक

पैसा's picture

28 Jan 2015 - 9:38 pm | पैसा

रणगाड्यातून जायची आयडिया तुम्हालाच सुचणार!

मला ब्वा पायी चालायला आवडतं! =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jan 2015 - 2:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

+D
पहिली गाडी वाळवंट, दलदल, चिखल, इत्यादीत ५०-६०,००० किलोमीटर चालवली आहे. दुसरी मात्र फक्त ५० एक मीटर्स चालवून रक्तदाब वाढण्याची मजा चाखली आहे ! :)

वेल्लाभट's picture

28 Jan 2015 - 10:27 pm | वेल्लाभट

आच्चर्य म्हणजे......

जिप्सी चं नाव कुणीच घेतलं नाही !

Gypsy

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Jan 2015 - 11:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जिप्सी अजुनही भारी आहे. पण मारुतीवाले दळिद्री, अजुनही काही विशेष सुधारणा करत नाहियेत डिझाईनमधे. जर का काळाशी सुसंगत बदल केले तर ही पण एक मस्त आणि मस्ट होऊ शकेल.

..जिप्सी कुठेही दिसली नाही नवीन गेल्या कित्येक वर्षांत
..डिसकंटिन्यु झालीय ना?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Jan 2015 - 7:46 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मिळते अजुन. पण वेटिंग पिरिअड खुप आहे. आर्मी मधे अजुनही नव्या जिप्सिज घेतात. मारुतीनी त्यात सुधारणा करायला हवी काळाशी सुसंगत.

वेल्लाभट's picture

29 Jan 2015 - 10:30 am | वेल्लाभट

मला कळत नाही

द ऑल न्यू मारुती जिप्सी
२.० लि DDIS Turbo Engine
Bigger, Better, Meaner

हे वास्तव का होऊ शकत नाही मारुती साठी? सेगमेंट हलवून सोडतील हो अशी गाडी काढली तर.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Jan 2015 - 10:47 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

२ नको. ही गाडी खरचं मीन मशिन करायची असेल तर ४.२ लिटर च्या DDIS Supercharged engine पाहिजे. ते पण इनलाईन ८ किंवा व्ही-६ मधे.

टर्बोचार्जरच्या ऐवजी ही गाडी सुपरचार्जड म्धे जब्राड परफॉर्म करेल.

वेल्लाभट's picture

29 Jan 2015 - 10:50 am | वेल्लाभट

हां ते तुम्ही योग्य सांगा. पण म्हणजे...... का? या गाडीत तो दम भरण्याचा विचार का नाही करत मारुती? शॅ !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Jan 2015 - 10:54 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

काही कल्पना नाही हो. पण जर का ह्या लोकांनी मनापासुन लक्ष घातलं तर जिप्सीचं सुवर्णयुग परत यायला हरकत नाही. फक्त अत्याधुनिक टेक्नॉलॉजी असलेलं इंजिन आणि इंटेरिअर मधे थोडे फेरफार केले तरी गाडी लै सेक्सी होईल ती. टायर्स चा कँबर थोडासा वाढवुन फॅट टायर्स टाकले तर सोन्याहुन पिवळं!!

@कॅजॅस्पॅ: जिप्सीला इतकी पॉवर दिली तर आकाराच्या /वजनाच्या मानाने ओव्हरपॉवर्ड होऊन बेफाम किंवा अनकंट्रोलेबल होईल असं वाटतं का? तदनुषंगिक व्हॉल्युम आणि डिझाईन बदलही करावे लागतील ना? ग्राउंड क्लिअरन्स कमी करावा लागेल का वाढीव पॉवरसहित स्टॅबिलिटीसाठी?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Jan 2015 - 11:09 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

चासी रिएन्फोर्स्ड करायला लागेल वाढीव ताकद सहन करण्यासाठी. गिअरबॉक्स ४ स्पीड मॅन्युअल च्या ऐवजी ५ किंवा ६ स्पीड मॅन्युअल/ सेमी/ ऑटोमॅटीक करायला लागेल. चारही चाकाला मास्टर सिलिंडर पुश्ड प्रकारचे डिस्क ब्रेक लावायला लागतील. ग्राऊंड क्लिअरन्स कमी करायची आवश्यकता नाही. जिप्सी ला सद्ध्या कुठल्या प्रकारचं सस्पेंशन वापरलं जात हे माहित नाही. पण लीफ वापरत असतील तर त्याच्या जागी मागच्या चाकांना लीफ आणि पुढच्या चाकांना इंडिव्हिजुअल सस्पेंशन वापरायला लागेल.

किंमत कदाचित दोन किंवा अडीचं पटीनी वाढेल, स्कॉर्पिओ वगैरे च्या रेंजमधे येईल.

प्रसाद गोडबोले's picture

29 Jan 2015 - 2:49 pm | प्रसाद गोडबोले

मी तर म्हणतो , साधं स्विफ्ट चं इंजिन ( जे की फियाट चे आहे ) लावुन जवळपास तेवढ्याच किमतीला जरी ही गाडी विकायला काढली तरीही तुफ्फान चालेल !

अन्या दातार's picture

30 Jan 2015 - 4:22 pm | अन्या दातार

आजही या गाडीत कंपनी टर्न अराऊंड करुन द्यायचे प्रचंड पोटेन्शियल आहे. कदाचित त्यासाठीच कंपनी तिच्याकडचा हुकमी एक्का काढत नसावी??

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Jan 2015 - 6:39 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

स्विफ्टचं इंजिन एखाद्या एस.यु.व्ही. साठी अंडरपॉवर्ड आहे. आणि हाय फ्लो वेस्टगेट टर्बो नाही बसवता येणार स्विफ्टच्या इंजिनला. म्हणजेचं इंजिनानी २९००-३२०० आर.पी.एम. क्रॉस केलं की बसवलेला टर्बो अक्षरशः शिट्ट्या वाजवायला लागेल. आणि इंजिन ब्लॉकची वाट लागेल.

असंका's picture

28 Jan 2015 - 11:11 pm | असंका

+१

हम आपके है कौन हा निम्मा पिच्चर त्या गाडीत शूट झाला असेल ....

बराच काळ भारतात्ली एकमेव ४डब्ल्यू डी असलेली गाडी. बियास नदीच्या पात्रात एक एक दगड डोंगराएवढा असताना आमच्या जिप्सी वाल्या टॅक्सी ड्रायव्हरने सरळ त्या पात्रातनं अर्धा किमी ही गाडी चालवली होती!

वेल्लाभट's picture

28 Jan 2015 - 10:31 pm | वेल्लाभट

मला जाम आवडते. पण या सगळ्या इथे मिळत नाहीत ना. नुसत्या बघूनच खुश व्हायचं.
DRAM

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Jan 2015 - 10:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फोर्ड एफ ३५० किंवा ६५० आहे ही?
जर असेल तर हिचा पंखा आहे मी. आणि फक्त आपल्या इथे मिळतं नाही म्हणुन झेनॉन चा पंखा आहे.

वेल्लाभट's picture

29 Jan 2015 - 10:31 am | वेल्लाभट

ही डॉज रॅम आहे. खालील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे. बीस्ट

स्वप्नांची राणी's picture

29 Jan 2015 - 12:17 am | स्वप्नांची राणी

हा डॉजचा रॅम. मी ईथे 5.7L Hemi engine VVT V8(8 cylinder) असलेली डॉजची डूरॅन्गो (Durango) चालवते. असली दणदणित, पण चालवायला मख्खन मलाई गाडी आहे!! तिचं मायलेज वगैरे विचारायच नाही, पण तरिही fuel saver mode अर्थात cylinder deactivation फिचर असल्यामुळे चांगल एवरेज देते. (अर्थात ईथे पेट्रोल १३ Rs./L आहे हा ही एक मोठ्ठा प्लस पॉईंट आहेच...*dance4* *DANCE* :dance:)

तर , जेंव्हा नविन नविन चालवायला घेतली तेंव्हा एकदा फ्री राईट घेतांना जागा किंचित कमी होती आणि डिव्हाईडर लगेच होता, तर ही गाडी मलाही कळायच्या आत तो साधारण पाउण फुट तत्सम उंचीचा अडथळा अश्या नजाकतीने चढून पार करुन गेली की पुढे बराच वेळ मला 'अल फजा वाल्यांनी पाहिलं तर नसेल ना..?' या विचारानी धडधडत होतं!!

तसा कतार बर्‍यापैकी सपाट देश आहे, कसलेही चढ-उतार नाहीत. त्यातूनही काही काही ऑफरोड् झोन्स आम्ही शोधून काढलेत. ही गाडी ..गाडी कसली, माझा लाडका रणगाडा आहे तो...तिथल्या दगड-गोट्यांवरून 'किस झाड की पत्ती' असल्यासारखी आरामात विहरत जाते. त्याची उंची जास्त असल्यामुळे खूप उंच वालुका टेकड्यांवर नेण्यासाठी फार आदर्श नाहिये तो. पण मध्यम साईझ च्या टेकड्यांवर मात्र सही ड्युन बॅशिंग करता येतं.

ईथून भारतात परत जायची वेळ येईल तेंव्हा फक्त हा रणगाडा मला तिकडे नेण्याची ईच्छा आहे!!

Dodge
माझा याच्यावर फार जीव!!!

मीता's picture

29 Jan 2015 - 1:14 am | मीता

सहीये....

कविता१९७८'s picture

29 Jan 2015 - 1:16 am | कविता१९७८

मस्तच , काय भारी गाडीये.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Jan 2015 - 7:51 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मी खालीचं उतरणार नाही ह्या गाडीतुन मिळाली कधी चालवायला तर.

५.७ लिटर बेस्ट बीस्ट. =))

@ स्वप्नांची राणी: मत्सराने आम्ही जळून खाक. करा करा.. चैन करा.. रोज ड्युरँगो चालवा वाळूत..

बादवे, मिडलईस्टमधे स्त्रियांना ओव्हरऑलच ड्रायव्हिंग करायला मिळत नाही अशी एक जनरल समजूत अन्यत्र असते. दुबईत लिबरल आहे असे वाटले पण तिथेही ड्राईव्ह करणार्‍या मुली कमी दिसल्या.

सौदीमधे तर म्हणे अलाउडच नाही. कतारमधे ते सहज शक्य आहे हे पाहून आनंद झाला.

स्वप्नांची राणी's picture

29 Jan 2015 - 5:16 pm | स्वप्नांची राणी

फक्त सौदीमधेच स्त्रियांना नाही चालवता येत गाडी. कतार मधे नो प्रोब्लेमो... आणि स्पिडब्रेकरमुक्त, खड्डेमुक्त गुळगूळीत रस्ते, तसेच नो टेन्शन ड्रायव्हींग यामुळे गाडी चालवणं हा खराच सुखद अनुभव आहे. हे असलं धुडही फुल्ली ऑटोमॅटीक transmission . त्यातून क्रूझ कंट्रोलला गाडी टाकली की ड्रायव्हरला झोप लागायची फुल्ल गॅरंटी!!! पण साधारण 60-95 km कुठल्याही दिशेला गेलं की कतारच संपून जातं त्यामुळे नाईलाजानी परत फिरावं लागतं!!!

आरोही's picture

29 Jan 2015 - 9:34 pm | आरोही

कसली भारीये ग गाडी हि !!! मस्तच ...

प्रसाद गोडबोले's picture

29 Jan 2015 - 12:30 pm | प्रसाद गोडबोले

(मी हमेरिकेत होतो तेव्हा ) डॉज ची रॅम चालवलीये , तुफ्फान गाडि !!

गाड्या पाहुन फक्त गाड्या पळवायला अमेरिकेत जावं असं वाटलं होतं .... टेस्ला कॅडिलॅक कॉर्व्हेट कस्यल्या भारी होत्या ... आणि मेन म्हणजे एस.यु,व्ही / ट्रक सुद्दा परवडेबल होते !!

५० फक्त's picture

29 Jan 2015 - 12:00 am | ५० फक्त

१.सफारी - शक्यतो जुनी ३ लि. इंजिन वाली.. स्टॉर्म म्हंजे सिंहाची आयाळ काढुन घेतल्यासारखं झालंय,
२.फोर्स नं १ - प्रचंड मोठी अन महत्वाचं म्हणजे मर्सिडिजचं इंजिन.
३.फोर्स गुरखा ४ बाय ४ - हार्ड्कोअर ऑफरोडिंगसाठी फक्त
४.बोलेरो - पार शेताच्या बांधावरुन मग शेतातुन देखील चालवता येईल. पण मधले आणि मागचे सीट बदलुन घेणं गरजेचं.. मध्यंतरीच्या काळात एक १०० एच्पी मॉडेल आणलं होतं, उगाच बंद करुन पुन्हा ६५ एच्पी केलं.. पण कंपनीच्या पडत्या काळात कंपनी जिवंत ठेवणारी गाडी..
५.क्वांटो - स्वस्तात एस्युव्ही,

आणि स्वप्नातली म्हंजे - टाटा झेनॉन + कस्टम बॉडी, एकदा चालवुन पाहिल्यावरच कळतं काय चीज आहे ही गाडी, पण बहुधा टाटाला विकायची नाही किंवा विकता येत नाही.

आणि अजुन टाटा अरिया, एकरभराची गाडी, मधल्या आरशातुन पाहिलं तर गाडी मागं कुठपर्यंत आहे हेच समजत नाही लवकर.

चिगो's picture

29 Jan 2015 - 12:47 pm | चिगो

टाटा झेनॉन आणि टाटा अरीया बद्दल प्रचंड सहमत.. टाटा कधीकधी एकतर्फी प्रेमवीरासारखं का वागतो, मला कळत नाही. ;-) म्हणजे गाड्यांची कॉलिटी भारीतली असली तरी त्याबद्दल बोलणार नाही. च्यामारी, महींद्रा बघा. गाडीत दम असो किंवा नसो, बोलबच्चन जबरदस्त.. स्कॉर्पियो दमदार गाडी असली तरी स्टॅबिलीटीच्या बाबतीत मार खाते असं माझं मत आणि अनुभव आहे. मधल्या सीटवर बसून पहा, वळणदार आणि खाचखळग्यांच्या रस्त्यावर.. माठातल्या ताकासारखा घुसळून निघतो माणूस.. नवीन स्कॉर्पियोमध्ये ह्या बाबतीत सुधारणा आहे, असं ऐकलंय, पण त्याचा अनुभव नाही..

अमेरिकेतल्या गाड्यांवरसुद्धा चर्चा असेल तर एकापेक्षा एक अवजड गाड्यांची खूप आवड आहे तिकडे.. फोर्ड एक्सपिडीशन, एक्सकर्शन, डॉज डुरँगो, निस्सन पाथफाईंडर, हमर, जी एम सी एन्वॉय, टोयोटा सीकोइया, लिंकन नेव्हीगेटर, कॅडीलॅक एस्क्लेड, ..
यांची पॉवर ३००+ हॉर्सपॉवरपर्यंत असते.. भारतातील बहुतांश प्रिमीयम एसयुव्हीज १५०-२०० हॉर्सपॉवरपर्यंत आहेत तर कॉम्पॅक्ट एसयुव्हीज १००- १४० हॉर्सपॉवरपर्यंत आहेत..

आणि रेंटल कंपन्यांकडे या सर्रास मिळतात.. (अर्थात रेंट खूप जास्त असते).. पण हौस म्हणून कधीतरी घ्यायला ऑप्शन असतो..

कहर म्हणजे या सर्व मॉडेल्सची लिमोझीन आवृत्ती देखिल असते (पण या रेंटल वाल्यांकडे नाही मिळत )..

-ठराविक मॉडेल्स ठराविक देशांतच रिलीज करण्यामागे काय हिशोब असावा?

-लिमोझिन आवृत्ती म्हणजे काय?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Jan 2015 - 11:12 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

लिमोझिन आव्रुती म्हणजे गाडीची लांबी वाढवणं. त्यासाठी गाडीची फ्रेम वाढवायला लागते. तसचं गाडी रिअर व्हील ड्राईव्ह असल्यास् प्रॉपेलर शाफ्ट आणि डिफ्रन्शिअल बदलावा लागतो.

ठराविक मॉडेल्स ठराविक देशांतच रिलीज करण्यामागे काय हिशोब असावा?

नक्की अंदाज नाही पण काही आवडीनिवडींवर अवलंबून असावे.. अमेरीका व यु ए ई सारख्या ठिकाणी अशा मोठमोठ्या गाड्यांची आवड आहे आणि त्यांना भरपूर लागणारे ईंधन परवडणार्‍या दरात उपलब्ध आहे..

युरोपात खासकरुन शहरांत जास्त जागेच्या अभावामुळे छोट्या गाड्या जास्त लोकप्रिय आहेत..

भारतासारख्या देशात कींमत व फ्युएल इकॉनॉमी जास्त महत्वाची असल्याने कमी पॉवरची मॉडेल्स काढली जातात..

सेडान, हॅचबॅक, कन्व्हर्टिबल, व्हॅन याप्रमाणे लिमोझीन ही एक कॅटॅगरी आहे, ज्यात गाडीची लांबी जास्त असते आणि आतील ले आउट वेगळा असतो.
अतिलांब लिमोझीन देखिल असतात (स्ट्रेचलिमो) त्या ७-८ मीटर पर्यंत लांब असु शकतात. एका बाजूला १०-१२ खिडक्या देखिल असतात..

धन्य आमचा अडाणीपणा.. आम्हांस (म्हणजे मला) लिमोझिन ही एक विशिष्ट कंपनी वाटायची (मर्सिडिजप्रमाणे)..

बाळ सप्रे's picture

29 Jan 2015 - 11:59 am | बाळ सप्रे

कॅडबरी, जीप, झेरॉक्स सारखंच क्न्फ्युजन झालं हे !! फक्त उलटं.. लोक या कंपन्यांना जनरल/कॅटॅगरीचे शब्द समजतात.. तुम्ही कॅटॅगरीला कंपनी :-)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Jan 2015 - 12:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

बिसलरी विसरलात मालक :)

फार्फार पूर्वी पहिल्यांदा भारतात नेस्ले चॉकलेट लाँच झालं तेव्हा सर्वजण "नेस्लेची नवीन कॅडबरी आलीय" असं म्हणायचे.

अगदी लहानपणी आणखी एक भेद होता. "चॉकलेट" म्हणजे टॉफीसदृश म्हणजे चिकट वडीरुपी (किस्मी, मेलोडी वगैरे) अन कॅडबरी म्हणजे मोठे डेअरी मिल्क फाईव्ह स्टार टाईप "भारी"

म्हंजे.. काकांनी चॉकलेट नाय दिलं नुसतं.. कॅडबरी दिली. इ इ

मृत्युन्जय's picture

30 Jan 2015 - 11:57 am | मृत्युन्जय

अगदी अगदी,

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Jan 2015 - 12:51 pm | कैलासवासी सोन्याबापु

स्कोडा येती कशी गाडी आहे? मला ओवर प्राइझ्ड वाटली ज़रा!, महिन्द्रा रेक्स्टन?

येती ही खर्‍या अर्थाने या कॅटेगरीतली गाडी आहे का? ती तर नॉर्मल सिटी कार आहे ना? एसयूव्हीसारखा शेप असलेली स्टाईलिश लुक पण खरी साधारण चारसीटर सिटी कार (रिओ, डस्टर आदिप्रमाणे).

अर्टिगा नामक लाजिरवाण्या तडजोडीचा विषयही न निघाल्याचं पाहून बरं वाटलं.

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Jan 2015 - 1:31 pm | कैलासवासी सोन्याबापु

१००% मान्य! मला वाटले कोणी येती चे बी पंखे असतील दुखावतील म्हणून घाबरत विचारले! :P

वेल्लाभट's picture

29 Jan 2015 - 1:42 pm | वेल्लाभट

अर्टिगा एसयुव्ही नव्हेच. आणि ऑफबीट गाडीही नव्हे. नाहीतर इनोव्हाचाही उल्लेख झाला असता मग.
बाकी काही म्हणा, पण अर्टिगात बसलेलो आहे; आणि छान आहे गाडी. very practical and compact passenger car.

वेल्लाभट's picture

29 Jan 2015 - 1:40 pm | वेल्लाभट

बरोबर. किमतीच्या मानाने इतकी भारी नाही.
फॉर्च्युनर मधे पैसे घालायची तयारी असलेल्याने एकवार रेक्स्टन बघावीच. खूप छान आहे आणि स्वस्तही. पण सगळी भारी फीचर्स औटोमॅटिक व्हर्जन मधेच येतात. मॅन्युअल घेऊन त्याला ती बसवूनही देण्यास कंपनी नकार देते. त्यामुळे ड्रायव्हिंगवेड्यांचा हिरमोड होतो.

येती खाली म्हटल्याप्रमाणे चौघांचीच आणि सिटी कारच म्हणावी अशी आहे. खूप लो आहे एक तर. एकच जमेची बाजू म्हणजे डिझाईनमधला वेगळेपणा. लक्ष वेधून घेते गाडी.

विशाल कुलकर्णी's picture

29 Jan 2015 - 5:14 pm | विशाल कुलकर्णी

मारुती सुझुकीची ग्रँड व्हिटारा आली आहे,तिचे रिव्ह्युज कसे आहेत?

vitara

प्रसाद गोडबोले's picture

29 Jan 2015 - 5:22 pm | प्रसाद गोडबोले

किंमत पहा

GRAND VITARA MT 2,341,459 /-

आर यु किडिंग मी ? येवढ्यात तर फोर्चुनर किंवा एन्डेव्हर पण येईल ... इतका पैसा टाकणारा माणुस मारुति सुझुकीचा विचार करेल असे वाटत नाही .

चर्चा (सध्या फक्त) वाचतो आहे. कधी ह्या माहितीचा उपयोग करण्याचा चान्स मिळेल असे वाटत नाही! :-)

आदिजोशी's picture

29 Jan 2015 - 8:08 pm | आदिजोशी

ऑफरोड गाड्यांचा विषय आणि हमरचा उल्लेखही नाही. जोंगा बद्दल गप्पा होतील अशी अपेक्षाही नव्हती पण हमरचा उल्लेख नसल्याचे बघून डोळे पाणावले आणि एक मिपाकर म्हणून...

वेल्लाभट's picture

29 Jan 2015 - 8:13 pm | वेल्लाभट

तुमच्याकरताच राखून ठेवलेला असं समजा.....

येउद्यात

..आदिसाहेब..आमची औकात कितीही फुलवली तरी हमरविषयी स्वप्ने नाही हो बघत.

..पण बरे केलेत..आता मोठे स्वप्न गावले.

ग्रेटथिंकर's picture

29 Jan 2015 - 10:15 pm | ग्रेटथिंकर

मला टोयोटा क्वालिस आवडायची ,विशेषतः नंतरच वर्जन. छान लुक्स व कम्फर्टेबल होती.

हेमन्त वाघे's picture

30 Jan 2015 - 1:10 am | हेमन्त वाघे

Hummer H1
हमर आता मिळत नाही . Hummer is DEAD .
पण मला हि पहिलीच H १ फार फार आवडली होति.

हेमन्त वाघे's picture

30 Jan 2015 - 1:20 am | हेमन्त वाघे

Oshkosh

ओश कोश JLTV हमर ची replacement

AMG

संदीप डांगे's picture

30 Jan 2015 - 1:56 am | संदीप डांगे

मित्सुबिशी च्या गाड्यांबद्दल कुणी बोलत नाही आहे इथे.

logo

मी स्वत: मित्सुबिशी गाड्यांचा पंखा आहे.

अतिशय उत्तम गाड्या पण सेवा आणि स्पेअर पार्टस ची अनुपलब्धता यांच्यामुळे भारतात या गाड्यांना कधीच व्यवस्थित सेल्स व सन्मान मिळाला नाही.
असो.

जुनी पजेरो
pajero

मला नव्या पजेरो पेक्षा जुनी पजेरो जास्त आवडते. नवी पजेरो नव्या काळातल्या स्पर्धेला बघून बनवली आहे.

मित्सुबिशी पजेरो स्पोर्ट्स : २.५ लिटर , डीझेल, २४ लाख ते २६ लाख
pajero
खास करून फ़ोर्चुनर ला टफ फाईट म्हणून २-४ लाखांनी कमी किमतीत देत आहेत. पण वर म्हटल्याप्रमाणे सेल्स साठी प्रयत्न नाहीत हिंदुस्थान मोटर्स कडून.

मित्सुबिशी मोन्टेरो : ३.२ लिटर डीझेल, ४२ लाखांपासून पुढे

montero

माझ्याकडे आत्ता मित्सुबिशी लान्सर स्पोर्ट्स (२०००) आहे. 'मेंटेनन्स भयंकर आहे' असे म्हणून लोकांनी पार घाबरवून टाकले होते. सेकंडहँड कार असून गेल्या साडेचार वर्षात मेंटेनन्स वर अवघा पन्नास हजार खर्च झाला आहे. हेल्थ म्हणाल तर नाशिक-मुंबई रस्त्यावर यच्चयावत नव्या गाड्यांना कधीही धूळ चारते. पार खेड्यापाडयातुन ताबडवली आहे. आत्ता तरी हिच आमची फॅमीली कार, एसयुव्ही, एमयुव्ही सर्वकाही आहे. लडाख टूर करायचा तर हीच्यासोबतच असा प्लान आहे. बघू कसे जमते ते.

car

स्पंदना's picture

30 Jan 2015 - 3:40 am | स्पंदना


येशील कधी तू?

संदीप डांगे's picture

30 Jan 2015 - 4:58 am | संदीप डांगे

पण काय करणार. प्रोडक्शन बंद केले भारतात...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Jan 2015 - 11:02 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

जुन्या पजेरो चा लुक मस्तं अ‍ॅग्रेसिव्ह होता...!!!

विथ माय लिनिया.फक्त २ महिने अगोदर सांगा,माझ्या अपाँटमेंट अ‍ॅडजस्ट करता येतील आणी काही कायदेशिर परवानग्या घ्याव्या लागतील त्यासाठी.

संदीप डांगे's picture

30 Jan 2015 - 5:37 pm | संदीप डांगे

अगदी आनंदाने, पण कदाचित २०१६ किंवा २०१७ च्या जून मध्ये. सोबत असाल तर और भी मजा आयेगा.
सेडान घेऊन लडाख जरा टफ आहे पण साहसी मोहिमा करायच्या तर त्या सोपी करण्यात मजा नाही.
जमले तर मिपाचा एखादा मोठा कट्टा तिकडे झाला तर काय बहार येईल.

बाबा पाटील's picture

30 Jan 2015 - 8:13 pm | बाबा पाटील

मग प्रश्नच नाही,तोपर्यंत्,एखादी मजबुत एस यु व्ही आली असेल.आताही इकोस्पोर्ट आहे पण लिनिया इतका भरवसा तिच्यावर नाही वाटत.

टवाळ कार्टा's picture

31 Jan 2015 - 12:21 am | टवाळ कार्टा

मालक...लडाख मला पण करायचे"च" आहे...फक्त १ दिवस आधी कळवले तरी मी येईन :)

श्रीरंग_जोशी's picture

30 Jan 2015 - 9:16 am | श्रीरंग_जोशी

आता भारतात एकाहून एक गाड्या दिसत असल्या तरी काही वर्षांअगोदरपर्यंत भारतातले चारचाकीचे जग खूपच मर्यादित होते. अमेरिकेत नवा असताना एकाहून एक आश्चर्याचे बसत होते. भारतात ज्या गाडीला मोठ्या लोकांची गाडी समजायचो ती अमेरिकेत एकदम बजेट गाडी समजली जायची.

इथे रेंटल कार्सच्या सोयीमुळे शेवी सबर्बन, जीएमसी युकॉन, मस्टँग यासारख्या गाड्या मनसोक्त चालवता आल्या.

नुकतीच आम्ही दुसरी गाडी घेतली. पहिली गाडी घेताना फारसे पर्याय बघितले जात नाहीत किंवा फारसं कळतही नसतं.

तर मुद्दा असा की शौक बडी चीज हैं पासून सुरुवात करून (जीप ग्रँड चेरोकी) गुमान कितना देती हैं हा विचार केला अन सीआरव्ही टुरिंग घेतली - फोटोज.

CRV
CRV

विविध नवनवीन वैशिष्ट्यांपैकी मला सर्वाधिक आवडलेले वैशिष्ट्य म्हणजे Adaptive Cruise Control.

बाकी आम्ही दर हिवाळ्यात प्रत्यक्ष रोडवर ऑफरोड ड्रायव्हिंगचा अनुभव घेतच असतो :-) .

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Jan 2015 - 9:32 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्तांग चालवलीत. झक्कास....शेल्बी वाली का फोर्ड वाली. शेलबी वाली मिळाली असेल तर भाग्यवान आहात.

श्रीरंग_जोशी's picture

30 Jan 2015 - 9:40 am | श्रीरंग_जोशी

अर्थातच फोर्डवाली :-)
Mustang

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Jan 2015 - 9:46 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

झक्कास!!! :)

आदिजोशी's picture

30 Jan 2015 - 8:28 pm | आदिजोशी

श्रीरंग जोशींनी ताबडतोब १ जहाज भरून इनो पाठवून द्यावे

संदीप डांगे's picture

31 Jan 2015 - 12:42 am | संदीप डांगे

आमचे ह्या प्रस्तावास अनुमोदन आहे :-)

सीआरव्हीचा उल्लेख फारसा झाला नव्हता. एकदाच एचआरव्हीचा उल्लेख ओझरता आला होता. उत्तम केलेस श्रीरंग फोटो टाकून.

एक टवेरा म्हणून वाहन होतं ते कोणत्या प्रकारात मोडतं? ते चोरांचं आवडतं वाहन म्हणून त्याला इन्शुरन्स मिळायला अडचणी येत होत्या असं वाचलं. यातून प्रवासही केला आहे. काही वाहनं की लाँच होताच टुरिस्ट टॅक्सीज बनतात. खपाच्या आकड्याच्या दृष्टीने कंपनीला फायदा होत असेलच पण स्टेट्स सिंबॉल म्हणून ती कार बाद ठरत असल्याने बहुधा जनरल पब्लिकमधे ती कमी खपत असावी.

मागे द. महाराष्ट्रात राहात असताना ट्रॅक्स आणि नंतर आलेली सुमो या दोन गाड्या खाजगी मालकीसाठी कोणी घेतल्या तरी त्यांना विचित्र अनुभव यायचा. रस्त्याकडेला किंवा एसटी स्टँड परिसरात कुठेही गाडी उभी केली आणि आत स्वतः बसलेलो असलो की रस्त्यातले लोक विनाचवकशी धडाधड दारे उघडायचा प्रयत्न करत आणि गाडीत बसून घेत. वडाप गाडी आहे असे गृहीतच धरुन सर्व चालत असे.

या निमित्ताने एसयूव्ही, एमयूव्ही नेमकं कशाला म्हणायचं हे कन्फ्युजन वाढलं आहे. कोणीतरी सुमो ही एसयूव्ही नाही असं म्हटलं आहे वर. तो फक्त शेप आहे की आणखी काही फीचर्सही आवश्यक आहेत?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Jan 2015 - 11:09 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ट्रॅक्स,सुमो, तवेरा, क्वालिस वगैरे गाड्या जरी जास्त ग्राऊंड क्लिअरन्स च्या आणि ताकदवान इंजिनं वाल असल्या तरी त्यांना एस.यु.व्ही. असं म्हणता येणार नाही ह्याचं कारण कंफर्ट आणि ऑफ रोड केपेबिलिटीज. ह्या तिन्हीमधली एकही गाडी ऑफरोड केपेबल नाही.

एस.यु.व्ही. मधे महत्त्वाच्या असणार्‍या काही गोष्टी म्हणजे दमदार इंजिन, ४*४, व्हेरिएबल सस्पेंशन, उत्तम ग्राउंड क्लिअरन्स, ५ सीट्स कमीत कमी, उत्तम ट्रान्स्मिशन सिस्टीम आणि स्पोर्ट्स टायर्स.

संदीप डांगे's picture

30 Jan 2015 - 6:22 pm | संदीप डांगे

सहमत.

एसयूव्ही मध्ये मायलेज हा विचार नसतोच. दमदार इंजिन, त्याचा लो एंड टॉर्क, हाय एंड टॉर्क, त्यांची गुणोत्तरे. चारही चाकांवर अफलातून नियंत्रण, जास्त ग्राउंड क्लिअरन्स, रस्ता असो वा नसो पुढे जाण्याची क्षमता आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्व सुविधा मिळून येणारा सर्वोच्च कम्फर्ट. यैच मंगता बाकी कुछ नाही. प्रवासी क्षमता ५ ते ८ अशी असु शकते. ह्या प्रकारच्या गाड्या फक्त ३५ लाख + सेगमेंट मध्ये मिळतात, त्याखाली विकल्या जाणाऱ्या एसयूव्ही ग्राहकांच्या डोळ्यात धूळफेक आहे.

एक उदाहरण:

car

एमयुव्ही म्हणजे मल्टी युटीलिटी व्हेइकल म्हणजेच बऱ्याच वेगवेगळ्या कामासाठी वापरण्यास योग्य. त्यात प्रथम मायलेज, जास्तीत जास्त सामान व प्रवासी वाहून न्यायची क्षमता, लांब अंतरे चांगल्या रस्त्यांवरून दमदारपणे कापण्याची क्षमता इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. प्रवासी क्षमता किमान ७+१ असली पाहीजे. इनोवा, तवेरा, क्वालीस, इत्यादी ह्या उत्तम एमयुव्ही आहेत.

आता भारतीय पब्लिक चे एसयूव्ही चे वेड आणि रस्त्यांची हालत बघून जास्त ग्राउंड क्लिअरन्स असणाऱ्या एमयुव्ही भासणाऱ्या पण फक्त फुगवलेल्या आकारातल्या हॅच्बॅक येत आहेत. कारण पब्लिक ला मायलेज आणि जास्त ग्राउंड क्लिअरन्स ह्याच दोन गोष्टींचे सर्वात जास्त आकर्षण आहे. अर्टीगा हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Jan 2015 - 8:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अतिशय चांगलं उत्तर.

वेल अगदी ३५ लाखांपासुन असं म्हणता येणार नाही. फॉर्चुनर आणि एंडेव्हर २५ लाखाच्या रेंजमधे आहेत आणि दोन्ही गाड्यांच्या टेस्ट्स युट्युबवर उपलब्ध आहेत. जब्राट गाड्या आहेत. फॉर्चुनर चे काही इन्क्लिनेशन टेस्टचे व्ही.डी.ओ. पहा. धडकी भरते.

संदीप डांगे's picture

30 Jan 2015 - 10:30 pm | संदीप डांगे

फ़ोर्चुनर आणि एन्डेवर खरंच चांगल्या आहेत पण फ़ोर्चुनर मध्ये अंतर्गत सजावट आणि एक्स्पेडिशन मध्ये कामी येणारी आयुधे इतर वरच्या सेग्मेंट मधल्या गाड्यांच्या तुलनेत थोडी कमी पडतात. एन्डेवर ची हाताळणी तिच्या अनावश्यक लांबीमुळे टफ टेरेन, घनदाट जंगली रस्त्यांवर वर त्रास देते. बाकी प्रत्येकाचा स्वत:चा अनुभव व मत वेगवेगळे असू शकतं.

वरील दोन्ही गाड्या शहरात इम्प्रेशन साठी अतिशय उत्तम आहेत. भारतीय रस्त्यांवर जबरदस्त आहेत. मायलेज, शक्ती आणि दणकटपणात त्या कुणाला हार जाणार नाहीत. पण कट्टर ऑफरोडींग ला जरा कमी पडू शकतात. सरते शेवटी चालक आणि टेरेनवरही खूप काही अवलंबून असते. नाहीतर हमर सारखी गाडीही अडकून पड्ते..
https://www.youtube.com/watch?v=Tz143TYMZx4

संदीप डांगे's picture

30 Jan 2015 - 10:35 pm | संदीप डांगे

पण त्याचवेळी टोयोटाच्या एसयुव्ही सेगमेंटमधल्या गाड्या लाइफ्सेव्हर आहेत. हे शंभर टक्के मान्य करतो.

प्रसाद१९७१'s picture

30 Jan 2015 - 8:35 pm | प्रसाद१९७१

गेली अनेक दशके मुजाहदीन आणि तत्सम अतिरेकी लोकांनी अफगाणीस्तान आणि आफ्रीकेत वापरलेली टोयोटा लॅंडक्रुजर चे नाव नाही बघुन आश्चर्य वाटले.
टॉप गियर वरच्या एका भागात ती गाडी पाण्यात बुडवुन ठेवली होती वगैरे तरी पण क्षणात चालु झालेली दाखवली.
अतिशय रगेड आणि वाळवंटापासुन कुठल्याही टरेन ला उपयुक्त.

प्रसाद१९७१'s picture

30 Jan 2015 - 8:42 pm | प्रसाद१९७१

टोयोटा लँड्क्रुजर च्या ह्या उपयुक्ततेमुळे आणि मिलिशिया उपयोगामुळे तिच्या वर बंदी घालावी अशी पण मागणी वेळोवेळी होते.

In all my field research I have observed one common instrument used by all parties to a conflict, whether rebels and governments. This is the Toyota Land Cruiser. This vehicle is manufactured for civilian purposes in Japan, but now it has become the favored weapon of war in Africa and plays an important role in enabling insurgents and governments to conduct war in their preferred manner, and also to expand their theaters of operations. It is especially widely used in dry areas such as the Sahel and Sahara and in Somalia.

http://sites.tufts.edu/reinventingpeace/2013/06/22/toyota-land-cruiser-a...

प्रसाद१९७१'s picture

30 Jan 2015 - 8:43 pm | प्रसाद१९७१

Other vehicles just aren’t as reliable as the Toyota Landcruiser and no other 4WD brand has established such a robust base of mechanics and spare parts train to support their vehicles. There is a sweet Porsche Cayenne Turbo parked by the Toyota dealer in N’Djamena, but there are no mechanics that know how to work on it and parts will take forever to get here and cost a fortune!

श्रीरंग_जोशी's picture

30 Jan 2015 - 11:35 pm | श्रीरंग_जोशी

मी लँड क्रुझर गाडीला केवळ शरद पवार वापरायचे म्हणून ओळखायचो.

अमेरिकेत कधीच दिसली नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jan 2015 - 11:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

TLC... ओ हो हो. जुन्या आठवणी जाग्या केल्यात !

सुबोध खरे's picture

30 Jan 2015 - 8:43 pm | सुबोध खरे

आमचे पण एक ऑफ द रोड ड्रायव्हिंगचं वाहन
शक्तिमान -- ५८८० CC पण फक्त ११० हॉर्स पॉवर
पण वाटेल त्या ( आणी नसणाऱ्या पण) रस्त्यावर चालत असे. सर्व गोष्टी केवळ टिकाऊ आणी युद्धात उपयुक्त असाव्यात याच निकषाने बनवलेल्या.
११ मिमी जाड लोखंडी पट्ट्यानी बनवलेला सांगाडा. चालक आणी प्रवासी यांच्या आरामाची कोणतीही सोय नसलेला. पुण्याच्या थंडीत ६-७ अंश तापमानाला सकाळी ६ वाजता त्या बर्फासारख्या गार पट्ट्या हाताने धरून शक्तिमान मध्ये उभे राहून गोळीबाराच्या सरावाला दिघी क्याम्पला गेल्याची आठवण आजही ताजी आहे. त्या ट्रकला सस्पेन्शन नावाचा प्रकारच नाही असे वाटावे. खाली बसलो तर आपलीच हाडे आपल्याला टोचतील असे वाटे आणी उभे राहिले कि त्या लोखंडाच्या पट्ट्या धरून हात बधीर होत. तो ट्रक चालवून पहिला तर आपण हत्ती चालवतोय असा अनुभव येतो. चाकाला पॉवर स्टीयरिंग नाही लोखंडाचे चाक शक्ती लावून वाळवावे लागते. सीटला स्पंज नाही कापसाची गादी जी नेहमी "बसलेलीच" पहिली आहे. हा ट्रक चालवणे हाही एक अनुभव वेगळा
असो एक गोष्ट त्यात वैशिष्ट्यपूर्ण होती ती म्हणजे इंजिनला जोडलेला कोम्प्रेसर. ज्याच्या योगाने शेतात सुद्धा टायरचे पंक्चर काढून त्यात हवा भरण्याची सोय होती.

प्रसाद१९७१'s picture

30 Jan 2015 - 8:48 pm | प्रसाद१९७१

ताकद फक्त ११० एचपी. कमी नाही वाटत? ते सुद्धा ट्रक ला?

डॉक्टर साहेब, पूर्वी तरी पेट्रोल आणि डीजेल अश्या दोन्ही वर चालु शकणारी इंजिन असलेल्या काही गाड्या आर्मी वापरायची, कारण वेळ पडेल तेंव्हा काय उपलब्ध असेल हे सांगता येत नसे. ती पद्धत अजुन चालू आहे का?

संदीप डांगे's picture

31 Jan 2015 - 12:37 am | संदीप डांगे

मालवाहू ट्रकची शक्ती आणि प्रवासी गाड्यांची शक्ती जरी एचपी मध्ये मोजली जात असली तरी एक मुलभूत फरक हा टॉर्क चा असतो. शक्तिमानचे ६ लिटर चे इंजिन २५०० आरपीएम वर ११० एचपी उत्सर्जित करतो जी त्याला जास्तीत जास्ती वजन वाहून (ढकलायच्या) न्यायच्या कामी येते. त्याचवेळेस रेनो डस्टर १.५ लिटर इंजिन ३९०० आरपीएम वर १०८ एचपी उत्सर्जित करते जी गाडीला अधिक वेग देण्याचा प्रयत्न करते.

दुसऱ्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतो.
उदा.एक: डस्टर आणि शक्तिमान आजूबाजूला एका सिग्नलवर उभे आहेत शून्य अतिरिक्त भारासह. सिग्नल हिरवा झाल्यावर कुठली गाडी आधी सुसाट पुढे जाइल?

उदा. दोन: शक्तिमान ट्रकमध्ये सुमारे ६००० किलोचे अतिरिक्त वजन आहे अजून त्या ट्रक चे स्वत:चे ३००० किलोचे वजन आहे. बाजूला डस्टर उभी असून तिचे स्वत:चे १८०० किलो वजन आहे. तिच्यावर सुद्धा ६००० किलोचे अतिरिक्त वजन ठेवले. आता सिग्नल लागल्यावर कुठली गाडी पुढे जाइल?

उदा. तीन: शक्तिमानचा जास्तीत जास्त वेग हा ७२ किमी प्रतितास आहे तर डस्टर चा १८० किमी प्रतितास.

कॅटर्पीलर: ४००० एचपी
track

बुगाती वेरोन : १००६ बीएचपी
car

पण म्हणून ४ बुगाती वेरोन लावुन तो महाकाय ट्रक ओढल्या जाउ शकत नाही.

इंजिनची क्षमता आणि उर्जा ही कमी किंवा जास्त हे वाहन कुठल्या प्रकारचे आहे त्यावर अवलंबून असते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Jan 2015 - 6:34 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

हेचं टंकायसाठी आलो होतो.

अजुन एक गोष्ट वाढवतो ह्यात फक्त. टॉर्क आणि स्पीड हे एकमेकांशी व्यस्त गुणोत्तरामधे असतात. जसा वेग वाढत जाईल तसा टॉर्क कमी होत जातो.

उदा. पहिला गिअर= जास्तीत जास्त टॉर्क कमीत कमी वेग
पाचवा गिअर= कमी टॉर्क आणि जास्त वेग

माझ्या वाहनविश्व ह्या मालिके मधे ट्रान्स्मिशन सिस्टीम येतील त्यावेळी ह्यामधलं गणित नेमकं उलगडुन दाखविन.

(ही झैरात नाही)..

आगाऊ म्हादया......'s picture

30 Jan 2015 - 9:25 pm | आगाऊ म्हादया......

कमाल धागा काढलाय.
एकदम हरवायलाच झालं या गाड्यांच्या विश्वात.
आपल्यासारखे अनेक जीप्सिप्रेमी आहेत हे पाहून तर जे काही भारी फिलिंग आलंय. मी आजही पहिली गाडी म्हणून जिप्सी घेऊन थोडी modify करून वापरायची स्वप्न पाहतो, पण हल्ली त्यात थार डोकावते.
नवीन माहिती अशी कळली कि लहानपणी जी गाडी लई आवडायची तिचं नाव सिएरा आहे. विशेष म्हणजे xenon आवडणारे पण आहेत, माझ्यासारखे.

बोलेरो पण फार आवडतेच, छान आहे चालवायला.
साली ती सुमो grande का आवडली हे मात्र कळल नाहीये.
XUV तर आजही ठोका चुकवून जाते. पण ती चालवली नाही कधीच,

एखादी मस्त गाडी, ब्रोड टायर्स, लाईट्स, आहाहाहा...थांबवा रे थांबवा...रिकाम्या खिशाने असली स्वप्नं पाहू नयेत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Jan 2015 - 11:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एखादी मस्त गाडी, ब्रोड टायर्स, लाईट्स, आहाहाहा...थांबवा रे थांबवा...रिकाम्या खिशाने असली स्वप्नं पाहू नयेत.

तीव्र असहमती. परिस्थिती पालटायला वेळ लागत नाही...काय माहित आज रिकामा खिसा असणारा काही वर्षात ऑडी किंवा मर्सिडिझ मधुन फिरेल. अशी उदाहरण आहेत. सो स्वप्न पहाण सोडु नका आणि ती प्रत्यक्षात आणायसाठी कष्ट घ्यायला विसरु नका.

आगाऊ म्हादया......'s picture

2 Feb 2015 - 2:24 pm | आगाऊ म्हादया......

पटलंय. माफी असावी!
स्वप्नरंजन कंटीन्यूज....

बाळ सप्रे's picture

30 Jan 2015 - 9:33 pm | बाळ सप्रे

गोव्यात कुळे गावातून दूधसागरला जाताना ऑफरोडींगचा मस्त अनुभव मिळतो..
आपली गाडी घेउन जाता येत नाही. गोवा टुरीझमच्या शंभर एक गाड्या आहेत त्यातूनच जावं लागतं.. 4x4 SUV वगैरे नाहीयेत .. बोलेरो गाड्या असतात सगळ्या..
३-३.५ फूट खोल पाण्यातून दोनवेळा नदी पार करावी लागते.. एका ठीकाणी तर नदी पार करताना वळणदेखिल आहे. तिथे बर्‍याचवेळा गाडी घसरते. तिथे गाडी ढकलण्यासाठी १०-१५ माणसं उभी असतात पाण्यात..

Offroading 1

Offroading 2

बाळ सप्रे's picture

30 Jan 2015 - 9:40 pm | बाळ सप्रे
कपिलमुनी's picture

2 Feb 2015 - 3:55 pm | कपिलमुनी

लोकं रोज असा प्रवास करतात ?

बाळ सप्रे's picture

2 Feb 2015 - 4:28 pm | बाळ सप्रे

तिथे जंगलात फक्त दूधसागर बघायला जाणारे पर्यटक जातात.. लोकवस्ती ऑलमोस्ट नाहीच.. एखाददुसरं घर दिसलं रस्त्यात..

टवाळ कार्टा's picture

31 Jan 2015 - 12:28 am | टवाळ कार्टा

अश्या गाड्या घेण्याइतका पैसा आत्ता नाहीये...आणि जवळच्या भविष्यात येण्याचा चान्स दिसत नाहीये त्यामुळे माझा पास

अवांतर - अशी गाडी असणारा सासरा शोधला पाहीजे...मुलीबरोबर गाडीसुध्धा मिळेल ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Jan 2015 - 6:43 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

त्या जावै सेकंडहँड विकणे आहे वाल्या डीरेक्टर शी संपर्क कर रे. तिथे सासरेबुवा नै पण सासुबाई नक्की देतील पैसे ;) .

बाकी एखादी मस्तांग किंवा गेला बाजार लँबो घेतलीस तर ह्या सल्ल्याचं "खमिशण" म्हणुन एक फेरी मारायला नक्की दे हो. =))

(मित्रर्हित) -अनिरुद्ध-

हेमन्त वाघे's picture

31 Jan 2015 - 12:57 am | हेमन्त वाघे

जातीने शेतकरी पण सर जन्म मुंबईत गेला .पन गावाची नाळ तुटली नाही . तर अति अति पैसा आला तर ऎक शेत घेवून हा ट्रक्टर घ्यायचा म्हणतोय . लामबोर्गिनी चा!
Lambo

तसेच आवडता TRUCK SUV - UNIMOG !

शिवोऽहम्'s picture

31 Jan 2015 - 7:14 am | शिवोऽहम्

आमची लाडाची मैना!
Subaru Outback

स्वाती राजेश's picture

31 Jan 2015 - 8:13 pm | स्वाती राजेश
संदीप डांगे's picture

7 Feb 2015 - 9:25 pm | संदीप डांगे

ही तर आमची लाडकी हाय,
पण करणार काय
लयच कडकी हाय... :-(

थारबद्दल लिहा ना जाणकारांनी. धन्यवाद.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Feb 2015 - 8:12 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

बा द वे. एक प्रश्ण किंवा शंका विचारायची होती. इथे टाटाच्या एस.यु.व्ही. वापरणार्‍यांना.

DiCoR आणि CRDI मधे नेमका काय फरक आहे?

डिकॉर= डिरेक्ट इंजेक्शन कॉमन रेल
सी.आर.डी.आय.= कॉमन रेल डिरेक्ट इंजेक्शन

का डिकॉर मॉडीफाईड सी.आर.डी.आय, आहे?

बाळ सप्रे's picture

7 Feb 2015 - 11:27 am | बाळ सप्रे

दोन्ही एकच.. प्रत्येकाचं आपापलं नोमेन्क्लेचर..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Feb 2015 - 11:55 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

वोक्के!! वाटलचं होतं. धन्यवाद. :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Mar 2015 - 9:37 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

@प्रगो @गवि @घाटावरचे भट @सर्व एस.यु.व्ही. प्रेमी

http://www.cartoq.com/mahindra-thar-modified

टवाळ कार्टा's picture

30 Mar 2015 - 10:40 am | टवाळ कार्टा

थार कधीतरी घेईन जमले तर :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Mar 2015 - 11:14 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

घेउन टाक. हा.का.ना.का. =))

बाकी पार्टीचं विसरु नये म्हणजे झालं.

टवाळ कार्टा's picture

30 Mar 2015 - 12:26 pm | टवाळ कार्टा

चायला इतके सोपे असते तर मी मिपावर थोडीच असतो ;)