Skip to main content

ऑफबीट, ऑफ द रोड ड्रायव्हिंगची वाहनं..

लेखक गवि यांनी बुधवार, 28/01/2015 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
अन्य धाग्यात सुरु झालेली चर्चा तिथे अवांतर नको म्हणून इथे चालू ठेवण्याची विनंती करतो. प्रस्तावना अशी की मजसहित अनेकांना एसयूव्ही, एमयूव्ही, ऑल टेरेन व्हेइकल्स, ऑल व्हील ड्राईव्ह गाड्या, अधिक ताकदीचं इंजिन, ओव्हरड्राईव्ह मोड याविषयी क्रेझ असल्याचं वाटलं. अश्या "ऑफरोडरोमियों"कडे रोजच्या शहरी वाहतुकीसाठी कॉम्पॅक्ट फॅमिली कार घरोघरी असली तरी मनात कुठेतरी जीप, थार, एक्सयूव्ही, कमांडर वगैरे यांचे मांडे खाल्ले जात असतातच. यात ती लेह लडाखची एक सेल्फ ड्राईव्ह लाईफटाईम टूर करण्याचं स्वप्न असतंच पण त्याचप्रमाणे पूर्ण भारत फिरणं, जंगलात नदीनाल्यांतून प्रवास अश्याही कल्पना असतात. कोणाला भरपूर जागा हवी असते तर कोणाला भरपूर ताकद.. किंवा दोन्ही. मी काही ऑप्शन्स इथे टाकून सुरुवात करतो. बाकी चर्चा पुढे होईलच. -सफाईदार लुकवर भर असणारी टाटा सफारी. -पाहताक्षणी टुणकन उडी मारुन स्टीअरिंग व्हील हाती घ्यावं अशी गोड पण रफटफ अंतरंग असलेली महिंद्रा क्लासिक AA With thanks from www.mahindracarsindia.com -भरपूर रफनेस असलेली थार -स्कॉर्पिओ, झायलो आणि क्वान्तोचं त्रिकूट -एक्सयूव्ही५००चा अ‍ॅनिमल लुक आणि आकर्षण (बादवे, रिव्ह्यूंमधे मार खाल्लेला दिसतो) -जुनी टेंपो (आता फोर्स) ट्रॅक्स.. चक्क तेरा चौदा लोकांना आरामात वाहून नेणारी. बाहेरुन ट्रंकसारखा पोलादी लुक पण इंजिन मर्सिडिज कंपनीने बनवलेलं. -आताचा ट्रॅक्सचा अवतार - फोर्स गुरखा -फोर्स वन. प्रचंड आकार आणि तुलनेत कमी किंमत. क्रूझ कंट्रोल. स्टियरिंग व्हील कंट्रोल्स. AAA with thanks from i.ndtvimg.com ... ही वाहनं सेकंडहँड घेऊन त्यावर दुरुस्ती करुन नव्यासारखी करणं स्वस्त वाटलं तरी शेवटी महागच पडतं असा अनुभव आहे. एकूण या गाड्या ताबडल्या गेलेल्या असल्याने त्यांना सेकंडहँड घेणे म्हणजे चरकात पिळून बराचसा रस संपलेला ऊस विकत घेण्यासारखं आहे असं मला तरी वाटतं. या आणि अश्याच गाड्यांविषयी आणखी माहिती, अनुभव आहेत का? या कार्स आणि त्यांना घेऊन केलेला प्रवास यांचं अद्वैत आहे. तेव्हा कोणते प्रवास तुम्ही केलेत आणि त्यात काय अनुभव आले.. जे इतरांना कळल्याने त्यांना खूप फायदा होईल तेही सांगावेत.. (अंतर वाचणे, खराब रस्ता टळणे, जास्त सुंदर रस्ता सापडणे, जेवणाखाण्याची पंचाईत न होणे, पेट्रोलडिझेलपंपपासून दूर जाऊन अडकून न पडणे इत्यादि)

वाचने 164365
प्रतिक्रिया 281

प्रतिक्रिया

In reply to by स्वप्नांची राणी

@ स्वप्नांची राणी: मत्सराने आम्ही जळून खाक. करा करा.. चैन करा.. रोज ड्युरँगो चालवा वाळूत.. बादवे, मिडलईस्टमधे स्त्रियांना ओव्हरऑलच ड्रायव्हिंग करायला मिळत नाही अशी एक जनरल समजूत अन्यत्र असते. दुबईत लिबरल आहे असे वाटले पण तिथेही ड्राईव्ह करणार्‍या मुली कमी दिसल्या. सौदीमधे तर म्हणे अलाउडच नाही. कतारमधे ते सहज शक्य आहे हे पाहून आनंद झाला.

In reply to by गवि

फक्त सौदीमधेच स्त्रियांना नाही चालवता येत गाडी. कतार मधे नो प्रोब्लेमो... आणि स्पिडब्रेकरमुक्त, खड्डेमुक्त गुळगूळीत रस्ते, तसेच नो टेन्शन ड्रायव्हींग यामुळे गाडी चालवणं हा खराच सुखद अनुभव आहे. हे असलं धुडही फुल्ली ऑटोमॅटीक transmission . त्यातून क्रूझ कंट्रोलला गाडी टाकली की ड्रायव्हरला झोप लागायची फुल्ल गॅरंटी!!! पण साधारण 60-95 km कुठल्याही दिशेला गेलं की कतारच संपून जातं त्यामुळे नाईलाजानी परत फिरावं लागतं!!!

In reply to by स्वप्नांची राणी

(मी हमेरिकेत होतो तेव्हा ) डॉज ची रॅम चालवलीये , तुफ्फान गाडि !! गाड्या पाहुन फक्त गाड्या पळवायला अमेरिकेत जावं असं वाटलं होतं .... टेस्ला कॅडिलॅक कॉर्व्हेट कस्यल्या भारी होत्या ... आणि मेन म्हणजे एस.यु,व्ही / ट्रक सुद्दा परवडेबल होते !!

१.सफारी - शक्यतो जुनी ३ लि. इंजिन वाली.. स्टॉर्म म्हंजे सिंहाची आयाळ काढुन घेतल्यासारखं झालंय, २.फोर्स नं १ - प्रचंड मोठी अन महत्वाचं म्हणजे मर्सिडिजचं इंजिन. ३.फोर्स गुरखा ४ बाय ४ - हार्ड्कोअर ऑफरोडिंगसाठी फक्त ४.बोलेरो - पार शेताच्या बांधावरुन मग शेतातुन देखील चालवता येईल. पण मधले आणि मागचे सीट बदलुन घेणं गरजेचं.. मध्यंतरीच्या काळात एक १०० एच्पी मॉडेल आणलं होतं, उगाच बंद करुन पुन्हा ६५ एच्पी केलं.. पण कंपनीच्या पडत्या काळात कंपनी जिवंत ठेवणारी गाडी.. ५.क्वांटो - स्वस्तात एस्युव्ही, आणि स्वप्नातली म्हंजे - टाटा झेनॉन + कस्टम बॉडी, एकदा चालवुन पाहिल्यावरच कळतं काय चीज आहे ही गाडी, पण बहुधा टाटाला विकायची नाही किंवा विकता येत नाही. आणि अजुन टाटा अरिया, एकरभराची गाडी, मधल्या आरशातुन पाहिलं तर गाडी मागं कुठपर्यंत आहे हेच समजत नाही लवकर.

In reply to by ५० फक्त

टाटा झेनॉन आणि टाटा अरीया बद्दल प्रचंड सहमत.. टाटा कधीकधी एकतर्फी प्रेमवीरासारखं का वागतो, मला कळत नाही. ;-) म्हणजे गाड्यांची कॉलिटी भारीतली असली तरी त्याबद्दल बोलणार नाही. च्यामारी, महींद्रा बघा. गाडीत दम असो किंवा नसो, बोलबच्चन जबरदस्त.. स्कॉर्पियो दमदार गाडी असली तरी स्टॅबिलीटीच्या बाबतीत मार खाते असं माझं मत आणि अनुभव आहे. मधल्या सीटवर बसून पहा, वळणदार आणि खाचखळग्यांच्या रस्त्यावर.. माठातल्या ताकासारखा घुसळून निघतो माणूस.. नवीन स्कॉर्पियोमध्ये ह्या बाबतीत सुधारणा आहे, असं ऐकलंय, पण त्याचा अनुभव नाही..

अमेरिकेतल्या गाड्यांवरसुद्धा चर्चा असेल तर एकापेक्षा एक अवजड गाड्यांची खूप आवड आहे तिकडे.. फोर्ड एक्सपिडीशन, एक्सकर्शन, डॉज डुरँगो, निस्सन पाथफाईंडर, हमर, जी एम सी एन्वॉय, टोयोटा सीकोइया, लिंकन नेव्हीगेटर, कॅडीलॅक एस्क्लेड, .. यांची पॉवर ३००+ हॉर्सपॉवरपर्यंत असते.. भारतातील बहुतांश प्रिमीयम एसयुव्हीज १५०-२०० हॉर्सपॉवरपर्यंत आहेत तर कॉम्पॅक्ट एसयुव्हीज १००- १४० हॉर्सपॉवरपर्यंत आहेत.. आणि रेंटल कंपन्यांकडे या सर्रास मिळतात.. (अर्थात रेंट खूप जास्त असते).. पण हौस म्हणून कधीतरी घ्यायला ऑप्शन असतो.. कहर म्हणजे या सर्व मॉडेल्सची लिमोझीन आवृत्ती देखिल असते (पण या रेंटल वाल्यांकडे नाही मिळत )..

In reply to by बाळ सप्रे

-ठराविक मॉडेल्स ठराविक देशांतच रिलीज करण्यामागे काय हिशोब असावा? -लिमोझिन आवृत्ती म्हणजे काय?

In reply to by गवि

लिमोझिन आव्रुती म्हणजे गाडीची लांबी वाढवणं. त्यासाठी गाडीची फ्रेम वाढवायला लागते. तसचं गाडी रिअर व्हील ड्राईव्ह असल्यास् प्रॉपेलर शाफ्ट आणि डिफ्रन्शिअल बदलावा लागतो.

In reply to by गवि

ठराविक मॉडेल्स ठराविक देशांतच रिलीज करण्यामागे काय हिशोब असावा? नक्की अंदाज नाही पण काही आवडीनिवडींवर अवलंबून असावे.. अमेरीका व यु ए ई सारख्या ठिकाणी अशा मोठमोठ्या गाड्यांची आवड आहे आणि त्यांना भरपूर लागणारे ईंधन परवडणार्‍या दरात उपलब्ध आहे.. युरोपात खासकरुन शहरांत जास्त जागेच्या अभावामुळे छोट्या गाड्या जास्त लोकप्रिय आहेत.. भारतासारख्या देशात कींमत व फ्युएल इकॉनॉमी जास्त महत्वाची असल्याने कमी पॉवरची मॉडेल्स काढली जातात.. सेडान, हॅचबॅक, कन्व्हर्टिबल, व्हॅन याप्रमाणे लिमोझीन ही एक कॅटॅगरी आहे, ज्यात गाडीची लांबी जास्त असते आणि आतील ले आउट वेगळा असतो. अतिलांब लिमोझीन देखिल असतात (स्ट्रेचलिमो) त्या ७-८ मीटर पर्यंत लांब असु शकतात. एका बाजूला १०-१२ खिडक्या देखिल असतात..

In reply to by बाळ सप्रे

धन्य आमचा अडाणीपणा.. आम्हांस (म्हणजे मला) लिमोझिन ही एक विशिष्ट कंपनी वाटायची (मर्सिडिजप्रमाणे)..

In reply to by गवि

कॅडबरी, जीप, झेरॉक्स सारखंच क्न्फ्युजन झालं हे !! फक्त उलटं.. लोक या कंपन्यांना जनरल/कॅटॅगरीचे शब्द समजतात.. तुम्ही कॅटॅगरीला कंपनी :-)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

फार्फार पूर्वी पहिल्यांदा भारतात नेस्ले चॉकलेट लाँच झालं तेव्हा सर्वजण "नेस्लेची नवीन कॅडबरी आलीय" असं म्हणायचे. अगदी लहानपणी आणखी एक भेद होता. "चॉकलेट" म्हणजे टॉफीसदृश म्हणजे चिकट वडीरुपी (किस्मी, मेलोडी वगैरे) अन कॅडबरी म्हणजे मोठे डेअरी मिल्क फाईव्ह स्टार टाईप "भारी" म्हंजे.. काकांनी चॉकलेट नाय दिलं नुसतं.. कॅडबरी दिली. इ इ

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

येती ही खर्‍या अर्थाने या कॅटेगरीतली गाडी आहे का? ती तर नॉर्मल सिटी कार आहे ना? एसयूव्हीसारखा शेप असलेली स्टाईलिश लुक पण खरी साधारण चारसीटर सिटी कार (रिओ, डस्टर आदिप्रमाणे). अर्टिगा नामक लाजिरवाण्या तडजोडीचा विषयही न निघाल्याचं पाहून बरं वाटलं.

In reply to by गवि

१००% मान्य! मला वाटले कोणी येती चे बी पंखे असतील दुखावतील म्हणून घाबरत विचारले! :P

In reply to by गवि

अर्टिगा एसयुव्ही नव्हेच. आणि ऑफबीट गाडीही नव्हे. नाहीतर इनोव्हाचाही उल्लेख झाला असता मग. बाकी काही म्हणा, पण अर्टिगात बसलेलो आहे; आणि छान आहे गाडी. very practical and compact passenger car.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बरोबर. किमतीच्या मानाने इतकी भारी नाही. फॉर्च्युनर मधे पैसे घालायची तयारी असलेल्याने एकवार रेक्स्टन बघावीच. खूप छान आहे आणि स्वस्तही. पण सगळी भारी फीचर्स औटोमॅटिक व्हर्जन मधेच येतात. मॅन्युअल घेऊन त्याला ती बसवूनही देण्यास कंपनी नकार देते. त्यामुळे ड्रायव्हिंगवेड्यांचा हिरमोड होतो. येती खाली म्हटल्याप्रमाणे चौघांचीच आणि सिटी कारच म्हणावी अशी आहे. खूप लो आहे एक तर. एकच जमेची बाजू म्हणजे डिझाईनमधला वेगळेपणा. लक्ष वेधून घेते गाडी.

In reply to by विशाल कुलकर्णी

किंमत पहा GRAND VITARA MT 2,341,459 /- आर यु किडिंग मी ? येवढ्यात तर फोर्चुनर किंवा एन्डेव्हर पण येईल ... इतका पैसा टाकणारा माणुस मारुति सुझुकीचा विचार करेल असे वाटत नाही .

ऑफरोड गाड्यांचा विषय आणि हमरचा उल्लेखही नाही. जोंगा बद्दल गप्पा होतील अशी अपेक्षाही नव्हती पण हमरचा उल्लेख नसल्याचे बघून डोळे पाणावले आणि एक मिपाकर म्हणून...

In reply to by आदिजोशी

..आदिसाहेब..आमची औकात कितीही फुलवली तरी हमरविषयी स्वप्ने नाही हो बघत. ..पण बरे केलेत..आता मोठे स्वप्न गावले.

मित्सुबिशी च्या गाड्यांबद्दल कुणी बोलत नाही आहे इथे. logo मी स्वत: मित्सुबिशी गाड्यांचा पंखा आहे. अतिशय उत्तम गाड्या पण सेवा आणि स्पेअर पार्टस ची अनुपलब्धता यांच्यामुळे भारतात या गाड्यांना कधीच व्यवस्थित सेल्स व सन्मान मिळाला नाही. असो. जुनी पजेरो pajero मला नव्या पजेरो पेक्षा जुनी पजेरो जास्त आवडते. नवी पजेरो नव्या काळातल्या स्पर्धेला बघून बनवली आहे. मित्सुबिशी पजेरो स्पोर्ट्स : २.५ लिटर , डीझेल, २४ लाख ते २६ लाख pajero खास करून फ़ोर्चुनर ला टफ फाईट म्हणून २-४ लाखांनी कमी किमतीत देत आहेत. पण वर म्हटल्याप्रमाणे सेल्स साठी प्रयत्न नाहीत हिंदुस्थान मोटर्स कडून. मित्सुबिशी मोन्टेरो : ३.२ लिटर डीझेल, ४२ लाखांपासून पुढे montero माझ्याकडे आत्ता मित्सुबिशी लान्सर स्पोर्ट्स (२०००) आहे. 'मेंटेनन्स भयंकर आहे' असे म्हणून लोकांनी पार घाबरवून टाकले होते. सेकंडहँड कार असून गेल्या साडेचार वर्षात मेंटेनन्स वर अवघा पन्नास हजार खर्च झाला आहे. हेल्थ म्हणाल तर नाशिक-मुंबई रस्त्यावर यच्चयावत नव्या गाड्यांना कधीही धूळ चारते. पार खेड्यापाडयातुन ताबडवली आहे. आत्ता तरी हिच आमची फॅमीली कार, एसयुव्ही, एमयुव्ही सर्वकाही आहे. लडाख टूर करायचा तर हीच्यासोबतच असा प्लान आहे. बघू कसे जमते ते. car

In reply to by संदीप डांगे

विथ माय लिनिया.फक्त २ महिने अगोदर सांगा,माझ्या अपाँटमेंट अ‍ॅडजस्ट करता येतील आणी काही कायदेशिर परवानग्या घ्याव्या लागतील त्यासाठी.

In reply to by बाबा पाटील

अगदी आनंदाने, पण कदाचित २०१६ किंवा २०१७ च्या जून मध्ये. सोबत असाल तर और भी मजा आयेगा. सेडान घेऊन लडाख जरा टफ आहे पण साहसी मोहिमा करायच्या तर त्या सोपी करण्यात मजा नाही. जमले तर मिपाचा एखादा मोठा कट्टा तिकडे झाला तर काय बहार येईल.

In reply to by संदीप डांगे

मग प्रश्नच नाही,तोपर्यंत्,एखादी मजबुत एस यु व्ही आली असेल.आताही इकोस्पोर्ट आहे पण लिनिया इतका भरवसा तिच्यावर नाही वाटत.

आता भारतात एकाहून एक गाड्या दिसत असल्या तरी काही वर्षांअगोदरपर्यंत भारतातले चारचाकीचे जग खूपच मर्यादित होते. अमेरिकेत नवा असताना एकाहून एक आश्चर्याचे बसत होते. भारतात ज्या गाडीला मोठ्या लोकांची गाडी समजायचो ती अमेरिकेत एकदम बजेट गाडी समजली जायची. इथे रेंटल कार्सच्या सोयीमुळे शेवी सबर्बन, जीएमसी युकॉन, मस्टँग यासारख्या गाड्या मनसोक्त चालवता आल्या. नुकतीच आम्ही दुसरी गाडी घेतली. पहिली गाडी घेताना फारसे पर्याय बघितले जात नाहीत किंवा फारसं कळतही नसतं. तर मुद्दा असा की शौक बडी चीज हैं पासून सुरुवात करून (जीप ग्रँड चेरोकी) गुमान कितना देती हैं हा विचार केला अन सीआरव्ही टुरिंग घेतली - फोटोज. CRV CRV विविध नवनवीन वैशिष्ट्यांपैकी मला सर्वाधिक आवडलेले वैशिष्ट्य म्हणजे Adaptive Cruise Control. बाकी आम्ही दर हिवाळ्यात प्रत्यक्ष रोडवर ऑफरोड ड्रायव्हिंगचा अनुभव घेतच असतो :-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

मस्तांग चालवलीत. झक्कास....शेल्बी वाली का फोर्ड वाली. शेलबी वाली मिळाली असेल तर भाग्यवान आहात.

सीआरव्हीचा उल्लेख फारसा झाला नव्हता. एकदाच एचआरव्हीचा उल्लेख ओझरता आला होता. उत्तम केलेस श्रीरंग फोटो टाकून. एक टवेरा म्हणून वाहन होतं ते कोणत्या प्रकारात मोडतं? ते चोरांचं आवडतं वाहन म्हणून त्याला इन्शुरन्स मिळायला अडचणी येत होत्या असं वाचलं. यातून प्रवासही केला आहे. काही वाहनं की लाँच होताच टुरिस्ट टॅक्सीज बनतात. खपाच्या आकड्याच्या दृष्टीने कंपनीला फायदा होत असेलच पण स्टेट्स सिंबॉल म्हणून ती कार बाद ठरत असल्याने बहुधा जनरल पब्लिकमधे ती कमी खपत असावी. मागे द. महाराष्ट्रात राहात असताना ट्रॅक्स आणि नंतर आलेली सुमो या दोन गाड्या खाजगी मालकीसाठी कोणी घेतल्या तरी त्यांना विचित्र अनुभव यायचा. रस्त्याकडेला किंवा एसटी स्टँड परिसरात कुठेही गाडी उभी केली आणि आत स्वतः बसलेलो असलो की रस्त्यातले लोक विनाचवकशी धडाधड दारे उघडायचा प्रयत्न करत आणि गाडीत बसून घेत. वडाप गाडी आहे असे गृहीतच धरुन सर्व चालत असे. या निमित्ताने एसयूव्ही, एमयूव्ही नेमकं कशाला म्हणायचं हे कन्फ्युजन वाढलं आहे. कोणीतरी सुमो ही एसयूव्ही नाही असं म्हटलं आहे वर. तो फक्त शेप आहे की आणखी काही फीचर्सही आवश्यक आहेत?

In reply to by गवि

ट्रॅक्स,सुमो, तवेरा, क्वालिस वगैरे गाड्या जरी जास्त ग्राऊंड क्लिअरन्स च्या आणि ताकदवान इंजिनं वाल असल्या तरी त्यांना एस.यु.व्ही. असं म्हणता येणार नाही ह्याचं कारण कंफर्ट आणि ऑफ रोड केपेबिलिटीज. ह्या तिन्हीमधली एकही गाडी ऑफरोड केपेबल नाही. एस.यु.व्ही. मधे महत्त्वाच्या असणार्‍या काही गोष्टी म्हणजे दमदार इंजिन, ४*४, व्हेरिएबल सस्पेंशन, उत्तम ग्राउंड क्लिअरन्स, ५ सीट्स कमीत कमी, उत्तम ट्रान्स्मिशन सिस्टीम आणि स्पोर्ट्स टायर्स.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सहमत. एसयूव्ही मध्ये मायलेज हा विचार नसतोच. दमदार इंजिन, त्याचा लो एंड टॉर्क, हाय एंड टॉर्क, त्यांची गुणोत्तरे. चारही चाकांवर अफलातून नियंत्रण, जास्त ग्राउंड क्लिअरन्स, रस्ता असो वा नसो पुढे जाण्याची क्षमता आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्व सुविधा मिळून येणारा सर्वोच्च कम्फर्ट. यैच मंगता बाकी कुछ नाही. प्रवासी क्षमता ५ ते ८ अशी असु शकते. ह्या प्रकारच्या गाड्या फक्त ३५ लाख + सेगमेंट मध्ये मिळतात, त्याखाली विकल्या जाणाऱ्या एसयूव्ही ग्राहकांच्या डोळ्यात धूळफेक आहे. एक उदाहरण: car एमयुव्ही म्हणजे मल्टी युटीलिटी व्हेइकल म्हणजेच बऱ्याच वेगवेगळ्या कामासाठी वापरण्यास योग्य. त्यात प्रथम मायलेज, जास्तीत जास्त सामान व प्रवासी वाहून न्यायची क्षमता, लांब अंतरे चांगल्या रस्त्यांवरून दमदारपणे कापण्याची क्षमता इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. प्रवासी क्षमता किमान ७+१ असली पाहीजे. इनोवा, तवेरा, क्वालीस, इत्यादी ह्या उत्तम एमयुव्ही आहेत. आता भारतीय पब्लिक चे एसयूव्ही चे वेड आणि रस्त्यांची हालत बघून जास्त ग्राउंड क्लिअरन्स असणाऱ्या एमयुव्ही भासणाऱ्या पण फक्त फुगवलेल्या आकारातल्या हॅच्बॅक येत आहेत. कारण पब्लिक ला मायलेज आणि जास्त ग्राउंड क्लिअरन्स ह्याच दोन गोष्टींचे सर्वात जास्त आकर्षण आहे. अर्टीगा हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे.

In reply to by संदीप डांगे

अतिशय चांगलं उत्तर. वेल अगदी ३५ लाखांपासुन असं म्हणता येणार नाही. फॉर्चुनर आणि एंडेव्हर २५ लाखाच्या रेंजमधे आहेत आणि दोन्ही गाड्यांच्या टेस्ट्स युट्युबवर उपलब्ध आहेत. जब्राट गाड्या आहेत. फॉर्चुनर चे काही इन्क्लिनेशन टेस्टचे व्ही.डी.ओ. पहा. धडकी भरते.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

फ़ोर्चुनर आणि एन्डेवर खरंच चांगल्या आहेत पण फ़ोर्चुनर मध्ये अंतर्गत सजावट आणि एक्स्पेडिशन मध्ये कामी येणारी आयुधे इतर वरच्या सेग्मेंट मधल्या गाड्यांच्या तुलनेत थोडी कमी पडतात. एन्डेवर ची हाताळणी तिच्या अनावश्यक लांबीमुळे टफ टेरेन, घनदाट जंगली रस्त्यांवर वर त्रास देते. बाकी प्रत्येकाचा स्वत:चा अनुभव व मत वेगवेगळे असू शकतं. वरील दोन्ही गाड्या शहरात इम्प्रेशन साठी अतिशय उत्तम आहेत. भारतीय रस्त्यांवर जबरदस्त आहेत. मायलेज, शक्ती आणि दणकटपणात त्या कुणाला हार जाणार नाहीत. पण कट्टर ऑफरोडींग ला जरा कमी पडू शकतात. सरते शेवटी चालक आणि टेरेनवरही खूप काही अवलंबून असते. नाहीतर हमर सारखी गाडीही अडकून पड्ते.. https://www.youtube.com/watch?v=Tz143TYMZx4

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पण त्याचवेळी टोयोटाच्या एसयुव्ही सेगमेंटमधल्या गाड्या लाइफ्सेव्हर आहेत. हे शंभर टक्के मान्य करतो.

गेली अनेक दशके मुजाहदीन आणि तत्सम अतिरेकी लोकांनी अफगाणीस्तान आणि आफ्रीकेत वापरलेली टोयोटा लॅंडक्रुजर चे नाव नाही बघुन आश्चर्य वाटले. टॉप गियर वरच्या एका भागात ती गाडी पाण्यात बुडवुन ठेवली होती वगैरे तरी पण क्षणात चालु झालेली दाखवली. अतिशय रगेड आणि वाळवंटापासुन कुठल्याही टरेन ला उपयुक्त.

In reply to by प्रसाद१९७१

टोयोटा लँड्क्रुजर च्या ह्या उपयुक्ततेमुळे आणि मिलिशिया उपयोगामुळे तिच्या वर बंदी घालावी अशी पण मागणी वेळोवेळी होते. In all my field research I have observed one common instrument used by all parties to a conflict, whether rebels and governments. This is the Toyota Land Cruiser. This vehicle is manufactured for civilian purposes in Japan, but now it has become the favored weapon of war in Africa and plays an important role in enabling insurgents and governments to conduct war in their preferred manner, and also to expand their theaters of operations. It is especially widely used in dry areas such as the Sahel and Sahara and in Somalia. http://sites.tufts.edu/reinventingpeace/2013/06/22/toyota-land-cruiser-…

In reply to by प्रसाद१९७१

Other vehicles just aren’t as reliable as the Toyota Landcruiser and no other 4WD brand has established such a robust base of mechanics and spare parts train to support their vehicles. There is a sweet Porsche Cayenne Turbo parked by the Toyota dealer in N’Djamena, but there are no mechanics that know how to work on it and parts will take forever to get here and cost a fortune!

आमचे पण एक ऑफ द रोड ड्रायव्हिंगचं वाहन शक्तिमान -- ५८८० CC पण फक्त ११० हॉर्स पॉवर पण वाटेल त्या ( आणी नसणाऱ्या पण) रस्त्यावर चालत असे. सर्व गोष्टी केवळ टिकाऊ आणी युद्धात उपयुक्त असाव्यात याच निकषाने बनवलेल्या. ११ मिमी जाड लोखंडी पट्ट्यानी बनवलेला सांगाडा. चालक आणी प्रवासी यांच्या आरामाची कोणतीही सोय नसलेला. पुण्याच्या थंडीत ६-७ अंश तापमानाला सकाळी ६ वाजता त्या बर्फासारख्या गार पट्ट्या हाताने धरून शक्तिमान मध्ये उभे राहून गोळीबाराच्या सरावाला दिघी क्याम्पला गेल्याची आठवण आजही ताजी आहे. त्या ट्रकला सस्पेन्शन नावाचा प्रकारच नाही असे वाटावे. खाली बसलो तर आपलीच हाडे आपल्याला टोचतील असे वाटे आणी उभे राहिले कि त्या लोखंडाच्या पट्ट्या धरून हात बधीर होत. तो ट्रक चालवून पहिला तर आपण हत्ती चालवतोय असा अनुभव येतो. चाकाला पॉवर स्टीयरिंग नाही लोखंडाचे चाक शक्ती लावून वाळवावे लागते. सीटला स्पंज नाही कापसाची गादी जी नेहमी "बसलेलीच" पहिली आहे. हा ट्रक चालवणे हाही एक अनुभव वेगळा असो एक गोष्ट त्यात वैशिष्ट्यपूर्ण होती ती म्हणजे इंजिनला जोडलेला कोम्प्रेसर. ज्याच्या योगाने शेतात सुद्धा टायरचे पंक्चर काढून त्यात हवा भरण्याची सोय होती.

In reply to by सुबोध खरे

ताकद फक्त ११० एचपी. कमी नाही वाटत? ते सुद्धा ट्रक ला? डॉक्टर साहेब, पूर्वी तरी पेट्रोल आणि डीजेल अश्या दोन्ही वर चालु शकणारी इंजिन असलेल्या काही गाड्या आर्मी वापरायची, कारण वेळ पडेल तेंव्हा काय उपलब्ध असेल हे सांगता येत नसे. ती पद्धत अजुन चालू आहे का?

In reply to by प्रसाद१९७१

मालवाहू ट्रकची शक्ती आणि प्रवासी गाड्यांची शक्ती जरी एचपी मध्ये मोजली जात असली तरी एक मुलभूत फरक हा टॉर्क चा असतो. शक्तिमानचे ६ लिटर चे इंजिन २५०० आरपीएम वर ११० एचपी उत्सर्जित करतो जी त्याला जास्तीत जास्ती वजन वाहून (ढकलायच्या) न्यायच्या कामी येते. त्याचवेळेस रेनो डस्टर १.५ लिटर इंजिन ३९०० आरपीएम वर १०८ एचपी उत्सर्जित करते जी गाडीला अधिक वेग देण्याचा प्रयत्न करते. दुसऱ्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतो. उदा.एक: डस्टर आणि शक्तिमान आजूबाजूला एका सिग्नलवर उभे आहेत शून्य अतिरिक्त भारासह. सिग्नल हिरवा झाल्यावर कुठली गाडी आधी सुसाट पुढे जाइल? उदा. दोन: शक्तिमान ट्रकमध्ये सुमारे ६००० किलोचे अतिरिक्त वजन आहे अजून त्या ट्रक चे स्वत:चे ३००० किलोचे वजन आहे. बाजूला डस्टर उभी असून तिचे स्वत:चे १८०० किलो वजन आहे. तिच्यावर सुद्धा ६००० किलोचे अतिरिक्त वजन ठेवले. आता सिग्नल लागल्यावर कुठली गाडी पुढे जाइल? उदा. तीन: शक्तिमानचा जास्तीत जास्त वेग हा ७२ किमी प्रतितास आहे तर डस्टर चा १८० किमी प्रतितास. कॅटर्पीलर: ४००० एचपी track बुगाती वेरोन : १००६ बीएचपी car पण म्हणून ४ बुगाती वेरोन लावुन तो महाकाय ट्रक ओढल्या जाउ शकत नाही. इंजिनची क्षमता आणि उर्जा ही कमी किंवा जास्त हे वाहन कुठल्या प्रकारचे आहे त्यावर अवलंबून असते.

In reply to by संदीप डांगे

हेचं टंकायसाठी आलो होतो. अजुन एक गोष्ट वाढवतो ह्यात फक्त. टॉर्क आणि स्पीड हे एकमेकांशी व्यस्त गुणोत्तरामधे असतात. जसा वेग वाढत जाईल तसा टॉर्क कमी होत जातो. उदा. पहिला गिअर= जास्तीत जास्त टॉर्क कमीत कमी वेग पाचवा गिअर= कमी टॉर्क आणि जास्त वेग माझ्या वाहनविश्व ह्या मालिके मधे ट्रान्स्मिशन सिस्टीम येतील त्यावेळी ह्यामधलं गणित नेमकं उलगडुन दाखविन. (ही झैरात नाही)..

कमाल धागा काढलाय. एकदम हरवायलाच झालं या गाड्यांच्या विश्वात. आपल्यासारखे अनेक जीप्सिप्रेमी आहेत हे पाहून तर जे काही भारी फिलिंग आलंय. मी आजही पहिली गाडी म्हणून जिप्सी घेऊन थोडी modify करून वापरायची स्वप्न पाहतो, पण हल्ली त्यात थार डोकावते. नवीन माहिती अशी कळली कि लहानपणी जी गाडी लई आवडायची तिचं नाव सिएरा आहे. विशेष म्हणजे xenon आवडणारे पण आहेत, माझ्यासारखे. बोलेरो पण फार आवडतेच, छान आहे चालवायला. साली ती सुमो grande का आवडली हे मात्र कळल नाहीये. XUV तर आजही ठोका चुकवून जाते. पण ती चालवली नाही कधीच, एखादी मस्त गाडी, ब्रोड टायर्स, लाईट्स, आहाहाहा...थांबवा रे थांबवा...रिकाम्या खिशाने असली स्वप्नं पाहू नयेत.

In reply to by आगाऊ म्हादया......

एखादी मस्त गाडी, ब्रोड टायर्स, लाईट्स, आहाहाहा...थांबवा रे थांबवा...रिकाम्या खिशाने असली स्वप्नं पाहू नयेत.
तीव्र असहमती. परिस्थिती पालटायला वेळ लागत नाही...काय माहित आज रिकामा खिसा असणारा काही वर्षात ऑडी किंवा मर्सिडिझ मधुन फिरेल. अशी उदाहरण आहेत. सो स्वप्न पहाण सोडु नका आणि ती प्रत्यक्षात आणायसाठी कष्ट घ्यायला विसरु नका.

गोव्यात कुळे गावातून दूधसागरला जाताना ऑफरोडींगचा मस्त अनुभव मिळतो.. आपली गाडी घेउन जाता येत नाही. गोवा टुरीझमच्या शंभर एक गाड्या आहेत त्यातूनच जावं लागतं.. 4x4 SUV वगैरे नाहीयेत .. बोलेरो गाड्या असतात सगळ्या.. ३-३.५ फूट खोल पाण्यातून दोनवेळा नदी पार करावी लागते.. एका ठीकाणी तर नदी पार करताना वळणदेखिल आहे. तिथे बर्‍याचवेळा गाडी घसरते. तिथे गाडी ढकलण्यासाठी १०-१५ माणसं उभी असतात पाण्यात.. Offroading 1 Offroading 2

In reply to by कपिलमुनी

तिथे जंगलात फक्त दूधसागर बघायला जाणारे पर्यटक जातात.. लोकवस्ती ऑलमोस्ट नाहीच.. एखाददुसरं घर दिसलं रस्त्यात..

अश्या गाड्या घेण्याइतका पैसा आत्ता नाहीये...आणि जवळच्या भविष्यात येण्याचा चान्स दिसत नाहीये त्यामुळे माझा पास अवांतर - अशी गाडी असणारा सासरा शोधला पाहीजे...मुलीबरोबर गाडीसुध्धा मिळेल ;)

In reply to by टवाळ कार्टा

त्या जावै सेकंडहँड विकणे आहे वाल्या डीरेक्टर शी संपर्क कर रे. तिथे सासरेबुवा नै पण सासुबाई नक्की देतील पैसे ;) . बाकी एखादी मस्तांग किंवा गेला बाजार लँबो घेतलीस तर ह्या सल्ल्याचं "खमिशण" म्हणुन एक फेरी मारायला नक्की दे हो. =)) (मित्रर्हित) -अनिरुद्ध-

जातीने शेतकरी पण सर जन्म मुंबईत गेला .पन गावाची नाळ तुटली नाही . तर अति अति पैसा आला तर ऎक शेत घेवून हा ट्रक्टर घ्यायचा म्हणतोय . लामबोर्गिनी चा! Lambo तसेच आवडता TRUCK SUV - UNIMOG !