बंगला भाग २

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
5 Oct 2015 - 2:00 am

भाग १

बहुतेक मी ऑफिसला जायचो तेव्हा तो घरच सामान आणत असावा. कारण त्याला तर कधी मी आवाराबाहेर पडलेला बघितला नाही. फक्त मी जेव्हा बंगल्याच्या बाजूने फेऱ्या मारायचो तेव्हा तो काहीतरी काम करतो आहे अस दाखवत बंगल्याच्या आतून माझ्यावर नजर ठेवून असायचा. त्याला वाटत असेल मला कळत नाही,; पण मला माहित होत की त्याच पहिल्या दिवसापासूनच माझ्याकडे लक्ष होत.

मला मात्र त्या बंगल्याबद्दल आणि त्याच्या मालकिणी बद्दल खूप उत्सुकता होती. अनेकदा मी प्रयत्न केला त्या मालकीणबाईना गाठण्याचा. पण त्या कधी बाहेर पडायच्या ते कळलच नाही. दिवसां मागून दिवस आणि महिन्यांमागून महिने जात होते; पण तरी जास्त माहिती अशी कळतच् नव्हती त्या बंगल्याच्या मालकिणी बद्धल किंवा त्या नोकाराबाद्धल. लोकं काही फार उत्सुक नसायचे त्या बंगल्याबाद्धाल बोलायला. आणि मग मला का बुवा त्या बंगल्याची एवढी उत्सुकता? असा ते प्रश्न विचारतील आणि एकूणच ते वाईट दिसेल म्हणून मी देखिल कोणाला काही बोललो नाही. आपली आपणच जमेल तशी माहिती काढावी अस मनात मी ठरवून टाकल.

मूलं मोठी होत होती. त्यांच्या शाळेच्या पिकनिक असायच्या. ती जायची त्या पिकनिकना. बायको पण ऑफिसच्या पिकनिकला जायची. आमच्या ऑफिसची ठरायची; मला विचारायचे देखील पण मी काही ना काही कारण सांगून टाळायचो. तसा मी आत्ता तुमच्याशी बोलतो आहे; पण मुळचा अबोलच. म्हणजे जर बायको मुद्धाम येऊन माझ्याशी बोलली नाही तर मी आपणहून नाही तिच्याशी बोलायला जात. काय बोलायचं? मला नेहेमीच प्रश्न पडतो... लोकं सारख गप्पा काय मारतात? इतक काय असत त्यांच्याकडे बोलण्यासारख? अर्थात मी कामात चोख आहे; त्यामुळे ऑफिसमध्ये जरी फारसा कोणाला आवडत नसलो तरी कोणी मला त्रास द्यायला नाही येत. त्यात मला त्या चढाओढीत इंटरेस्ट नाही. त्यामुळे माझ्या कामाच्या जोरावर जी इन्क्रिमेंट मिळते आणि वरची पोस्ट मिळते त्यात मी सुखी असतो.

आता परवाच इन्क्रिमेंट झाली. बायकोला रात्री जेवताना सांगितल तर ती वैतागली. म्हणे इतकी चांगली बातमी अशी शांतपणे काही खास नसल्यासारखं काय सांगता? अहो आल्या आल्या बोलला असतात तर बाहेर गेलो असतो ना सेलिब्रेट करायला.

आता हिला काय सांगू? बाहेर जायचं म्हणजे संध्याकाळचा माझा फेरफटका ही बुडवायला लावणार. म्हणजे त्या बंगल्याच दर्शन नाही होणार. कालच मी बघितलं होत की २ पपया छान पिकल्या होत्या. आज तो नोकर त्या उतरवतो की नाही ते बघायला नको का? हिला काही कळतच नाही. बर मला माझा फेरफटका चुकवायला आवडत नाही अस सांगितलं तर घराला रणागाणाच रूप आल असत.

मागे झाल होत न असच. कुठलासा नवीन सिनेमा आला होता. हिला आणि मुलांना तो फर्स्ट डे लाच बघायचाच होता. माझी शुक्रवार संध्याकाळ एकदमच लाडकी. कारण शनिवारी ऑफिस नाही त्यामुळे शुक्रवारी निवांतपणे खूपवेळ मी भटकतो. त्या बंगल्याच्या आजू-बाजूने आणि मग तसाच बंगल्याच्या मागच्या बाजूच्या टेकडीवर पण जाऊन येतो. घरात कोणालाच ते माहित नाही. घरात काय.... इतर कोणालाच ते माहित नाही. बहुतेक त्या नोकराला देखील माहित नसावं. कारण मी बंगल्यापासून ४-५ फुटावर गेलो की त्याची नजर परत बंगल्यात वळते.

अरे लिंक तुटली वटत; तर काय म्हणत होतो.... की मी शुक्रवारी त्या टेकडीवर जातो. ती टेकडी म्हणे झपाटलेली आहे. लोकाना म्हणे तिथून चित्र-विचित्र आवाज एकू येतात. मूर्खपणा सगळा. अहो; मी कायम जातोच कि तिथे. काही नाही तिथे. सुंदर निसर्ग सोडला तर.लोकाना जे विचित्र आवाज वाटतात ना ते वारा दगडांवर आणि झाडांमधून वाहत असतो; त्याचा असतो. आपल्याला वाटत की खरच कोणीतरी आपल्याला हाक मारत आहे. पण तस काहीच नाही.

हव तर चला माझ्याबरोबर तुम्ही एकदा त्या टेकडीवर. आणि मला तर वाटत की खर तर बंगल्याच्या मालकीणबाई पण बहुतेक जात असाव्यात टेकडीवर. कारण त्या तयार होतात पण मागून बाहेर पडतात अस मी बघून ठेवल. आहे. असो! तर.... सांगायचा मुद्धा हा, की मी नाही म्हणालो सिनेमाला यायला. मग घरात जो काही प्रकार झाला त्यावरून मला पहिलं आणि दुसर जागतिक युद्ध कस झाल असेल याची कल्पना आली. पण मी मात्र माझ्या म्हणण्यावर ठाम राहिलो. परिणाम एवढाच झाला की बायको आणि मुल सिनेमा आणि मग बाहेरच जेवून रात्री उशिरा आली आणि मी फक्त ब्रेड खाऊन झोपलो. पण ते नव्हते ते माझ्या पथ्यावरच पडल बर का! खूप भटकलो मी त्यादिवशी टेकडीवर. आणि असा शोधही लागला मला की टेकडीचा एक सुळका बंगल्याच्या अगदी जवळ आहे आणि त्यामुळे बंगल्याच्या आतल्या भागांच निट निरीक्षण करता येयील मला. फक्त दिवसा जायला हव टेकडीवर.

अहो तसा मी अबोल आहे त्यामुळे लिंक तुटते माझी बोलताना. मुळात मी तुम्हाला दुसरच सांगत होतो न. तर; मी जेव्हा बायकोला सांगिलतल की मला इन्क्रिमेंट मिळाली आहे तेव्हा तिला आनंद पण झाला आणि सेलिब्रेशन नाही म्हणून राग पण आला. म्हणून मग मुलांना बोलावून तिने लगेच परस्परच सांगून टाकल की त्या शनिवार-रविवार बाबा.... म्हणजे अस्मादिक.... सेलिब्रेशन म्हणून त्यांना जवळच्या थंड हवेच्या ठिकाणी नेणार आहेत. अस्सा राग आला मला. कोणी सांगितल होत हिला असला शहाणपणा करायला. बर नाही म्हणावं तरी पंचायीत. तिसर महायुद्ध मला नको होत. म्हणून मग हो म्हणालो. अहो ते तेवड्यापुरतच. म्हणजे मी बुकिंग केल... शनिवार सकाळसाठी गाडी बुक केली.... पण मला अचानक शुक्रवारी रात्री ताप भरला. मुलांची तोंड उतरली. मग मीच हिला समजावलं की तू जा मुलांना घेऊन. त्यांचा हिरमोड नको. मी सांभाळीन स्वतःला. तिची अगोदर तयारी नव्हती मला एकट्याला सोडून जायची. पण मग मुलांकडे बघून तयार झाली. शनिवार सकाळी ६ वाजता गाडीत बसवून दिल त्याना आणि पोहोचल्यावर फोन करा म्हणून सांगितल.

मी जिना चढून वर आलो घरी तेच शीळ वाजवत. अहो असा प्रश्नार्थक चेहेरा काय करताय? मला ताप बीप काही नव्हता. उगाच नाटक केल. मग अंग कस गरम लागल? आहो त्यात काय.... आपण म्हंटल न अंग गरम आहे की या बायका लगच खर मानतात. मला जायचं नव्हत.... मी अगोदरच ठरवलं होत. बस!

आता पर्यंत तुम्हाला मी न जाण्याच कारण समजलच असेल न? तसे तुम्ही हुशार आहात. अगदी बरोबर! मला आजचा पूर्ण दिवस आणि उद्या दुपारपर्यंत मी कुठे जातो; काय अरतो ते विचारणार कोणीही नाही. त्यामुळे मी आजच दुपारी टेकडीवर जाणार आहे. प्रत्यक्ष त्या बंगल्यात जाण माझ स्वप्न आहे पण ते तर तो योग काही जुळून येत नाही आहे. मग निदान त्या सुलाक्यावरून काही दिसलं तर. म्हणजे... मला आता एक उत्सुकता आहे की तो बंगला आतून कसा ठेवला आहे. थोडक्यात त्याच आर्किटेक्चर कस आहे.

ठरल्याप्रमाणे गेलो टेकडीवर. बंगल्याच्या बाजूने जात होतो तेव्हा त्या नोकराच माझ्याकडे लक्ष होत. पण मी मुद्धामच शीळ घालत माझ बंगल्याकडे लक्ष नाही अस दाखवत टेकडीच्या दिशेने गेलो. मस्त टेकडी फिरलो अगोदर. अर्थात त्याची दोन कारण होती. एकतर टेकडीवर अजून कोणी नाही ना याची खात्री करून घ्यायची होती. नाहीतर मी आपला बंगल्याच निरीक्षण केवळ कुतूहल म्हणून करणार आणि कोणी बघितल तर वाटणार की मी कोणी चोर-बीर आहे. आणि दुसर म्हणजे; मी खरच ती टेकडी अजून निट पूर्ण बघितालील नव्हती.

तर टेकडी फिरलो. मग बरोबर नेलेली sandwiches खाल्ली. एका मस्त वडाच्या झाडाखाली मस्त ताणून दिली. थोड्यावेळाने जाग आली. काहीतरी आवाज जाणवला. मी वळून बघितलं तर मालकीणबाई टेकडीच्या दिशेनेच येत होत्या. काळ्या रंगाचा चुडीदार त्यांच्या गोऱ्या कांतीवर खुलून दिसत होता. मी पटकन उठून झाडामागे लपलो. त्या कुठे जातात त्याची मला उत्सुकता होती. त्या नाकासमोर सरळ चालत टेकडीच्या टोकावर गेल्या. पार वर-वर. तस पाहिलं तर एका मर्यादेबाहेर टेकडीचा चढ दमछाक करणारा होता. पण बाईला सवय असावी. झपझप चालत त्या वर गेल्या. माझी खुप इच्छा होती त्यांच्या मागे जायची. निदान कळल असत की त्या कुठे जातात रोज छान तयार होऊन. पण वरती साधी झुडप होती. त्यांनी मागे वळून बघितल असत तर लपायला ना मोठे दगड ना झाड. म्हणून मग मी त्या परत यायची वाट बघत बसलो.

आता तर मला मी ठरवल्येल्या सुळक्यावर जाऊन त्या बंगल्याच निरीक्षण देखील करता येणार नव्हत. कारण मी अस काही करताना जर त्यांनी बघितल असत तर पंचाईत झाली असती. त्यामुळे त्या खाली यायची वाट बघत बसलो. सहा वाजून गेले तरी त्यांचा पत्ता नव्हता. आणि अचानक चांगलाच वारा सुटला. शीळ घालत होता वारा. मला तर वाटल की कोणातरी बाईच्या नावाचा जप चालू झाला आहे. गम्मत म्हणजे वारा टेकडीवर सुटला होता आणि मला भास होत होता की हाका बंगल्यातून येत आहेत. हळूहळू अंधार झाला. मी गोंधळून गेलो होतो. अजून मालकीणबाई टेकडीवरून उतरल्या नव्हत्या. काही प्रोब्लेम नसेल ना झाला. माझ्या मनात आल. वर जाव का? मदतीच्या निमित्ताने ओळख पण होईल. पण तेवध्यात त्याना मी घाइघाइने खाली येताना बघितल. इथे तिथे न बघता त्या वेगात टेकडी उतरल्या आणि बंगल्याच्या दिशेने अदृश्य झाल्या. मनातून चरफडत मी घराकडे निघालो; ते ठरवूनच की दुसऱ्या दिवशी सकाळीच जायचं टेकडीवर.

पण हाय रे माझ दुर्दैव! मला रात्री खरच ताप आला. इतका की औषध घ्यायलासुद्धा मी पलंगावरून उठू शकत नव्हतो. फोन वाजत होता बाहेरच्या खोलीत. पण तो उचलायला जाण्याचे पण अंगात त्राण नव्हते. बायको मुल दुसऱ्या दिवशी दुपारी किंवा संध्याकाळी येणार होती. म्हणजे आता ते लोकं येईपर्यंत आपल काही खर नाही. माझ्या मनात आल. पण आश्चर्य म्हणजे सकाळीच ही माझ्या समोर उभी. म्हंटल तू कशी काय आत्ता या वेळेला. तर म्हणाली काल फोन लावत होते तुम्ही उचलला नाहीत. काळजी वाटायला लागली. शेजारच्या वाहीनींना फोन केला तर म्हणाल्या तुम्ही काल कुठेतरी गेला होतात. कधी आलात ते कळल नाही. म्हणजे उशिरा आला असाल; असा अंदाज केला मी. बर नाही त्यात बाहेर आणि उशिरा घरी... राहावल नाही आणि मुलांना घेऊन आले परत. काय सांगू हिच्या या वागण्याला. अस कोणी कोणावर इतका जीव लावत का? जाऊ दे झाल.
-------------------

कथा

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

5 Oct 2015 - 7:42 am | कविता१९७८

हम्मम