जगावेगळी ती
स्वप्न असतो एक अजोडसा ठेवा
कोणत्याही क्षणी आठवणीला एकटे सुटू देत नाही
स्वप्नांचे असते सगळ्यांशीच सख्य
हा आपला अन तो परका असा भेदभाव तिथे होत नाही
'ती' हा व्यक्तिविशेष
कोणी न कोणी प्रत्येकच तरुणाच्या स्वप्नात असेल
तरीही कवितेत सही पण 'माझी ती' वेगळीच वाटो
या अट्टाहासाला अजिबात तळ मिळत नसेल
प्रेम हि कल्पना प्रत्येकच जण अनुभवतो
हातात हात घेऊन नशिबाशी भांडाया बघतो
पण 'जिचा' हात 'माझ्या' हातात आहे तीच जगावेगळी
या अन यासम मान्यतेला अजिबातच अंत नसतो
वेगळेपणा तिचा
कुठे नि कसा स्मरावा??
सावरणारा तिचा आडोसा
नेहमिपुरता हृदयात बंदिस्त असावा!!!
तिच्या आठवणींना कधीही अंत
असूच शकत नाही
पण नशिबापुढे आपण सगळेच पांगळे या वास्तविकतेला पर्याय
असूच शकत नाही
-समीर
प्रतिक्रिया
4 Oct 2015 - 10:44 am | पैसा
कविता ठीक वाटली. अजून लिहा.
4 Oct 2015 - 12:13 pm | अभ्या..
कविता फालतू वाटली. अजून लिहा (काय जाते सांगायला?)
4 Oct 2015 - 12:21 pm | टवाळ कार्टा
आज सूड घुस्ला का तुझ्यात =))
4 Oct 2015 - 12:28 pm | अभ्या..
आज सूडक्याने जरी जिलबी पाडली तरी त्याचं काई खरं नाही. हिहॉहॉहॉहॉहॉ.
.
(टक्या समीरजीनी आपल्याला एवढे खरडफळे उपल्ब्ध करुन दिलेत. आभार मान त्याचे. मापं काय काढतोयस? )
4 Oct 2015 - 12:34 pm | टवाळ कार्टा
माप तू काढतो हैस....बिल माझ्यावर फाडू नको
ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊउ
4 Oct 2015 - 6:51 pm | समीर_happy go lucky
बारकाईने वाचल्याबद्दल धन्यवाद
4 Oct 2015 - 7:55 pm | द-बाहुबली
करावी तेव्हडी निर्भत्सना कॅमीच्च.
4 Oct 2015 - 7:59 pm | समीर_happy go lucky
सर समजल नाही, लिंगभेद???
4 Oct 2015 - 8:13 pm | खटपट्या
चांगलंय !!