इच्छामरण ह्याचा अर्थ ’युदेन्शिया’ (ग्रीक शब्द) "चांगले मरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला आयुष्याची सुरवात आणि शेवट चांगल्या रितीने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’इच्छामरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही.
अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांची सेवा करणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु नवरा किंवा बायको वृद्ध असली आणि मुलगा-सुन दोघेही नौकरी करणारे असतील तर मात्र अशा वृद्धाची किंवा रूग्णाची अवस्था खुप दयनीय होते. त्यांचे करण्यासाठी माणूस किंवा बाई लावावी म्हणले तर पेपरमधील बातम्या वाचून भीती वाटते. शेवटी प्रत्येक अंथरूणाला खिळलेल्या वृद्धाच्या व रूग्णाच्या मनात इच्छामरण मिळाले तर बरे असा विचार येतो.
हा विषय सर्वांना माहित असला तरी मिपावरील चर्चेतून प्रत्येकाच्या मनातील विचार कळतील.
प्रतिक्रिया
3 Sep 2015 - 5:41 pm | जेपी
काल तर धाग्यावर शंभर झाले की!
आवरा उगाच चघळुन झालेल्या जिल्ब्या टाकु नका.
अवांतर-इच्छामरणासाठी लै कोर्टबाजी करायची गरज नाही.
फार गरज असल्यास सांगा 101 जालीम उपाय सांगु.
3 Sep 2015 - 5:51 pm | रुस्तम
आवरा ...
3 Sep 2015 - 5:53 pm | प्रसाद गोडबोले
+१
खरेच आवरा !
3 Sep 2015 - 5:55 pm | द-बाहुबली
आवराच.
3 Sep 2015 - 5:55 pm | प्यारे१
+१
कालच्या एका बातमीमध्ये एका मुलीनं ८९ पर्यायांचा अभ्यास केला होता म्हणे.
यशस्वी झाली कुठल्याशा एका पर्यायात. :(
4 Sep 2015 - 8:11 pm | हेमंत लाटकर
फार गरज असल्यास सांगा 101 जालीम उपाय सांगु....
इच्छामरण म्हणजे आत्महत्या नव्हे. अथंरूणाला खिळलेले, कोणताही: इलाज नसलेल्या रूग्णांना डाॅक्टरी सल्ल्याने कायद्याचा आधार देऊन दिले जाणारे मरण. मला गरज नाही, संकटाला घाबरून आत्महत्त्या करणे म्हणजे भ्याडपणा.
6 Sep 2015 - 10:59 am | मारवा
१- ज्ञानेश्वरांनी आत्महत्या केली.
२- ज्ञानेश्वरांनी आपली जीवनयात्रा संपवली.
३- ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली.
What's in a name? that which we call a rose
By any other name would smell as sweet; - Shakespeare's
वरील विधानात फरक आहे. तिसरे विधान महत्वाचे आहे.
तिसरे विधान थेअरी दर्शविते. आत्महत्या वेगळी आहे हे दाखवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
जोन्सटाउन मध्ये पिपल्स टेम्पल या संप्रदायाच्या लोकांनी जिम्स जोन्स च्या मार्गदर्शनावरुन आत्महत्या केली. त्यामागे एक डिटेल थेअरी होती. त्यांच्या काही कल्पना होत्या. संज्ञा होत्या.
जपानमध्ये हाराकीरी केली जाते त्यामागे ही एक डिटेल थेअरी संज्ञा कल्पना सर्व काही आहे.
स्वामी विज्ञानानंद यांनी जनतेला मनशक्ती ची शिकवण देउन मग उंच इमारतीचा जिना चढण्यास सुरुवात केली. त्यांची तर फार च विस्ताराने मांडलेली थेअरी होती.
तर सामान्य आत्महत्या केली या विधानाला झळाळी मिळते थेअरीने.
थेअरी इज ऑल .
नग्न सत्याला झाकण्यासाठी थेअरीचे शुभ्र महावस्त्र ह्वे. त्या महावस्त्राचा ताणा जस्टीफीकेशन ( जितका ताणाल तितक उत्तम ) ने व बाणा ग्लोरीफीकेशन चा हवा.
मग शेक्सपिअर म्हणतो तसे न होता दुसरे च काहीतरी होते.
भला उसकी थेअरी मेरी थेअरी से सफेद कैसी ?
असो.
6 Sep 2015 - 11:37 am | प्यारे१
And 'this' is 'your theory', isn't it?
6 Sep 2015 - 12:57 pm | मारवा
आत्महत्या म्हणजे आत्महत्या म्हणजे आत्महत्या च असते
तुमची आमची त्यांची महापुरुषांची खलपुरुषांची सेम असते.
थेअरी मात्र वेगवेगळी असते.
काहींची प्राचीन काहींची अवार्चीन काहींची कैवल्यवादी काहींची अॅपॉस्टॉइक समाजवादी असते.
काहींची वजनदार काहींची हलकी असते. काहींची हजार पानांची काहींची दहा पानी असते.
काही बिचारयांची थेअरीच नसते.
त्यांची आत्महत्या नुसतीच असते.
थेअरी शिवाय जगण व्यर्थ आहे.
थेअरी असेल तर मरणात सुद्धा अर्थ आहे.
हाऊ सॅड टु डाय विदाउट थेअरी लाइक फॉर एक्झाम्पल सौ. मनिषा गटकळ.
ऑर बालकवी
अॅन्ड हाउ ग्लोरीयस टु डाय वुइथ थेअरी वुइ डोन्ट डाय लोनली !
6 Sep 2015 - 1:21 pm | प्यारे१
चांगली झाली असती अजून.
असो.
3 Sep 2015 - 6:00 pm | इस्पिक राजा
इच्छामरण ह्याचा अर्थ ’युदेन्शिया’ (ग्रीक शब्द)
?????????????????????????????????????????????????????????????
इच्छामरणाचा अर्थ युन्देशिया?????????????????????????????????????????????????????????????
3 Sep 2015 - 6:11 pm | नाव आडनाव
ते वृद्धाश्रमाचं कँसल का?
3 Sep 2015 - 6:13 pm | कपिलमुनी
3 Sep 2015 - 6:17 pm | प्यारे१
काहीही म्हणा, पण जिलेबी दिसली की धारा ची जाहीरात आठवतेच.
'जाना तो है, लेकिन २०-२५ साल के बाद' हे आता 'वेगळ्या' अर्थानं जाणवायला लागलंय.
3 Sep 2015 - 6:34 pm | चित्रगुप्त
ग्रि़ ब्।आआस्।आआ स्।ई़आआट स्।ई़आआञाच्।अॅ फाआर् वार्स्।आआम्पाआसुणंआणाआट।ऑटॅ,पाऩऊनिङूऱ्इब्।अॅतॅणाआट
...च्यामारी, काहीतरी घोळ झाला टाईपताना, मला असे लिहायचे होते:
ग्रीक भाषा शिकायचे फार वर्षांपासून मनात होते, पण कुणी गुर्जी मिळेनात. आता ती संधी आलीसे दिसते. तरी मिपावर ग्रीक भाषा शिकण्याची सोय करावी, ही विनंती. सुरुवात म्हणून खालील शब्दांचे ग्रीक भाषांतर द्यावे, ही विनंती:
१. आचरट २. मूर्तीमंत ३. पाजी. ४. रिकामटेकडा. ५.हलकट ६. र्हदयस्पर्शी ७. पचपचीत ८. एकसमयावच्छेदेकरून ९. गांगरणे १०. दीडशहाणा ११. अगंबाई १२ अरेच्चा १३ इश्श्य्य.
3 Sep 2015 - 7:05 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मलाही.
मला एका ग्रीक पोरीला इंप्रेस करायचयं. मला खालच्या वाक्यांच ग्रीकात भाषांतर करुन द्याल का लाटकर काका?
१. केहते है अगर तुम किसी चीज को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश मे मिल जाती है!
२. इतनी शिद्दत से मैने तुम्हे पाने की कोशिश की है के हर झर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है!
३. खेड्याकडे चलणं हाचं ग्रीसच्या २०००० लीग्स समुद्राखाली गेलेल्या अर्थव्यवस्थेला सावरायचा राजमार्ग आहे.
तसचं हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी दिसशी तु नवतरुणी काश्मिरी ह्या गाण्याला ग्रीक युद्धगीताची चालही लाउन द्याल का? तुमचे उपकार मी आजन्म विसरणार नाही.
Σ 'αγαπώ
8 Sep 2015 - 11:22 am | विशाल कुलकर्णी
सुरुवात म्हणून खालील शब्दांचे ग्रीक भाषांतर द्यावे, ही विनंती:
यात अजुन दोन शब्द अॅडून घ्या देवा..
१. आवरा आता
२. जिलब्या
3 Sep 2015 - 6:45 pm | रेवती
बास झालं हां आता! किती गैरफायदा घ्याल आमच्या टंकनसेवेचा!
कालचं सगळं टंकनबजेट तुमच्या धाग्यावर खर्चलं की!
3 Sep 2015 - 7:47 pm | मितान
ओ काका !
नुकतेच निवृत्त झालाय का ? की मिडलाइफ क्रायसिस ?
4 Sep 2015 - 8:14 pm | हेमंत लाटकर
मितानराव, जरा भान ठेवा लिहताना
5 Sep 2015 - 8:06 pm | खटपट्या
मितान या राव नसून ताई आहेत याची क्रूपया नोंद घ्यावी.
8 Sep 2015 - 6:21 pm | सूड
आपण मिपावर नवीन आहोत हे दाखवायला असं दादाला ताई आणि ताईला दादा म्हणायचं असतं म्हणे..
4 Sep 2015 - 8:21 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
योग्य मुद्द्यांना हात घातला आहेस रे हेमंता.माझ्या आठवणीप्रमाणे पूर्वी(अरूणा शानभाग) ह्या विषयावर चर्चा झाली होती मिडियात.अनेकांचा सूर तेव्हा भारतात तसे होणे कठिण असे मोठ्या घटना तज्ञांचे मत होते.
4 Sep 2015 - 9:44 pm | पैसा
तुम्हाला इच्छामरण म्हणायचं आहे ना? माईसाहेब दयामरणाबद्दल बोलत आहेत. दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. एक स्वतःच्या इच्छेने मरण आणि दुसरे जो माणूस निर्णय घेऊ शकत नाही त्याचे आयुष्य दुसर्या कोणाच्या इच्छेने संपवणे. जे मला पटत नाही. एक आत्महत्या होते तर दुसरी हत्या. जे जीवन आपल्या इच्छेने मिळालेलं नाही ते आपल्या इच्छेने संपवायचा अधिकार कोणालाही नाही. (इथे खाद्य म्हणून मारल्या जाणार्या प्राण्यांचा/वनस्पतींचा विचार केलेला नाही.) ;)
(स्वगतः आयडींचे इच्छामरण आणि दयामरण यावर अजून कोणी विडंबन कसे पाडले नाही?)
4 Sep 2015 - 10:03 pm | अजया
नानांना आलं ते कुठलं मरण? माईचे काय प्लॅन? इच्छा की दया मरण?
5 Sep 2015 - 11:24 am | नाखु
माईंनी दया दाखवली नाहीतर आले ते "अनिच्छा मरण" दया दाखवीली तर "विलंबीत-सावकाश अनिच्छा मरण"
आणि दोन्ही नसले तर आहेच "झुरत झुरत आडून आडून मरण"
श्री गुरुजींच्या "भावजींची पत्रे" या ललित लेखांस्म्ग्रहामधील "वहिनींच्या शेवग्याच्या शेंगा,आणि नानुला ठेंगा" या लेखातून साभार.
वाचक नाखु
5 Sep 2015 - 11:31 am | मांत्रिक
मस्तच ओ नाखु का़का!
5 Sep 2015 - 11:49 am | अजया
झुझुआआमरण फार आवडलं!!
4 Sep 2015 - 10:09 pm | प्यारे१
ते यूथेनाशिया ज़रा शुद्ध करून लिहावं अशी इच्छा आहे मरणा आधी. किमान दया तरी करा. https://en.m.wikipedia.org/wiki/Euthanasia
5 Sep 2015 - 1:09 pm | प्रकाश घाटपांडे
गांभीर्याने विषय घ्यायचा असल्यास मिपावरील याअगोदर झालेल्या चर्चा वाचाव्यात
परमसखा मृत्यू : किती आळवावा...
सुखांत
5 Sep 2015 - 5:04 pm | हेमंत लाटकर
मला वाटते अंथरूणावर खिळलेल्या रूग्णानां इच्छामरण मिळायला पाहिजे. अंथरूणावर खिळल्यामुळे दुसर्यावर अंवलबून राहावे लागते, बोलणे खावे लागते, सगळे राग करतात.
5 Sep 2015 - 6:25 pm | अजया
कोण देणार ते? डाॅक्टर? ते का जीव घेतील कोणाचाही.इच्छा आहे म्हणून? आणि कायदेशीर कटकटीत अडकतील ?
8 Sep 2015 - 6:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
इच्छामरण भारतात कायदेशीर नाही. त्यामुळे मरताना उगाच इतरांना गोत्यात आणण्याऐवजी खालील देशात जावून कायदेशीरपणे इच्छापूर्ती करून घेता येईल...
As of June 2015, human euthanasia is legal only in the Netherlands, Belgium, Colombia and Luxembourg.
Assisted suicide is legal in Switzerland, Germany, Japan, Albania and in the US states of Washington, Oregon, Vermont, New Mexico and Montana.
5 Sep 2015 - 5:15 pm | अजया
ते दयामरण हो!
5 Sep 2015 - 6:28 pm | ढंप्या
उगाच वाटले की दार तोडून कोणतरी आत येतोय आणि उजवा हात हलवत पाश टाकतोय...........!!!
5 Sep 2015 - 6:47 pm | अजया
कुछ तो गडबड है!!
5 Sep 2015 - 5:58 pm | हेमंत लाटकर
अजयाताई इच्छामरणाची व्याख्या सांगता जरा
5 Sep 2015 - 6:26 pm | अजया
तो तुम्हाला नाहिये प्रतिसाद. पुढे आला.
5 Sep 2015 - 7:41 pm | चित्रगुप्त
मला स्वतःला आपला इच्छामृत्यू व्हावा अशी इच्छा आहे. म्हणजे आपले जीवन आता परिपूर्ण झाले. आता यापुढील यात्रा (जर तशी काही खरोखर असेल तर) करण्यासाठी अगदी नि:संग होऊन आपण तयार आहोत, असे उत्कटतेने वाटू लागले की. परंतु हा मृत्यू विष, खड्ग, उपास इ. उपाय अवलंबून नाही, तर योगक्रियेने श्वास अवरुद्ध करून आणता यावा. ही प्राचीन भारतीय विद्या आता विस्मृत झाली असली तरी आपण ती साध्य करावी अशी इच्छा आहे.
5 Sep 2015 - 7:44 pm | चित्रगुप्त
हो, आणखी एक सांगायचे राहिले. हे आपण अगदी धडधाकट असताना करायचे.
5 Sep 2015 - 8:05 pm | खटपट्या
माझी सगळी लोनं फीटली की विचार करेन असे वाटतेय..
5 Sep 2015 - 8:44 pm | प्यारे१
अतिशय चुकीचा विचार करताय मालक. असला काही घोळ घालू नये ही नम्र विनंती.
कर्ज फिटल्यावर स्वत: साठी जगायला काही प्रत्यवाय आहे का??? आणि कर्ज संपलं तरी नंतरच्या तरतुदी कराव्या लागतात च की.
एकदा बसून बोलायला हवं.
कोणे रे तिकडे? ६-८ शीटा बुक करा.
6 Sep 2015 - 12:25 pm | खटपट्या
अहो उगाच ते व्रुद्धाश्रम वगैरे कशाला कटकट. जे काय करायचं ते करुन झालंय असं आत्ताच वाटू लागलंय.
सद्या फक्त विचार चालू आहे. पक्का झाला नाय अजून...
6 Sep 2015 - 1:28 pm | प्यारे१
आयुष्य तुमचं, विचार तुमचे.
योग्य रितीनं वापराल अशाच अपेक्षा करतो.
'करायचं ते करुन झालं' असं कुणी व्यक्ति कधी म्हणू शकते हे जाणून घेण्यास उत्सुक. (सर्वसाधारणपणे. पर्टिक्युलर केस नको आहे.)
7 Sep 2015 - 2:26 pm | खटपट्या
भेटा सांगतो.
8 Sep 2015 - 9:43 am | पैसा
सगळा भारत नीट फिरायचा आणि पुस्तकं वाचायची एवढंच केलं तरी एक आयुष्य पुरेसं नाहीये!
8 Sep 2015 - 10:59 am | खटपट्या
हा हे बरोबर, ते तर करायचं आहेच. भारत फिरायला आणि पुस्तकं वाचायला हा जन्म पुरणार नाही.
8 Sep 2015 - 9:37 am | सुबोध खरे
लोन फिटलं कि उलट दुप्पट जोमाने जगायला पाहिजे. आता काय जबाबदारी नाही मग एन्जॉय माडी.
मरो तुमचे शत्रू
8 Sep 2015 - 11:01 am | खटपट्या
बरोबर डॉक, पण कधी कधी खूप थकून जायला होतं धावपळीनं आणि विचार करतो की का करतोय हे आपण? एक लोन फेडण्यासाठीच ना. पण तुम्ही सांगीतल्याप्रमाणे दुप्पट जोमाने जगायला शिकणार.
सदीच्छांबद्द्ल धन्यवाद.
6 Nov 2015 - 10:50 am | बोका-ए-आझम
हा कसला डबल मीनिंग टाकलात डाॅक!
5 Sep 2015 - 8:39 pm | चित्रगुप्त
पितृऋण देवऋण ऋषिऋण सगळी लोन फोडायची असतात बाप्पा.
7 Sep 2015 - 6:21 pm | प्रसाद गोडबोले
ईएमआय खुप जास्त आहे राव ... प्री-क्लोजर च्या टर्म्स ही क्लीयर नाहीत :(
8 Sep 2015 - 6:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
पितृऋण काही अंशी ठीक आहे (सर्वस्वी नाही). आमच्या पिताजींनी/माताजींनी अशी काही अपेक्षा ठेवली नाही... ना आम्ही आमच्या पुत्रापासून ठेवली आहे.
पण देवऋण, ऋषिऋण हे कसले ऋण ??? उलट या अश्या पावरफुल्ल संकल्पनांनी /माणसांनी एकच सज्जड आशिर्वाद / वर देवून आपली (म्हणजे तुम्ही, मी, इत्यादींची) सर्व ॠणे एका फटक्यात फेडून टाकून जीवन सुकर-सुंदर करायला पाहिजे. तेच आपल्याकडून ऋणपरतीची याचना / अपेक्षा करत असले तर मग देवत्व आणि ऋषित्व श्रेष्ठ कसे काय ?
8 Sep 2015 - 7:06 pm | प्यारे१
मालक गैरसमज झालाय.
पितृऋण, देवऋण, ऋषिऋण या शब्दांचे अर्थ नि ते पूर्ण करण्याचे संकेत वेगळे आहेत.
पितृऋण आपल्या संततीला योग्य शिक्षण दिल्यानं पार पडतं अशी माझी माहिती आहे. आजोबांचं नाव आपल्या मुलाला ठेवण्यामागं ही च भूमिका असते. देव ऋण, ऋषिऋण हे सुद्धा प्रत्यक्ष त्यांना काही खडणी देऊन पुरे करायचे असते असं नाहीये. आत्ता लगेच संदर्भ हाताशी नाही पण भागवतामध्ये हा विषय सविस्तर आणि सविस्तार आहे.
7 Sep 2015 - 4:23 pm | पैसा
लेखाच्या संकल्पनेत थोडासा गोंधळ आहे का? इच्छामरण म्हणजे भविष्यात कधीतरी होणारा मृत्यु आधी ओढवून घ्यायचा असा अर्थ बहुतेकांनी घेतला आहे. मला आठवते त्याप्रमाणे इच्छामरणी असलेल्या भीष्मांनी आपला मृत्यु पुढे ढकलला होता.
7 Sep 2015 - 5:00 pm | चित्रगुप्त
मलासे वाटते इच्छामरण म्हणजे आपल्याला हवे तेंव्हाच (आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर?) देह सोडता येणे. आत्महत्या म्हणजे इच्छामरण नव्हे, किंवा आपण सांगितले आणि दुसर्याने आपल्याला इंजेक्शन वगैरे देऊन संपवणे म्हणजेही नव्हे. भीष्माने आपले मरण अमूक एका दिवशी कसे/कोणत्या क्रियेने घडवून आणले, याबद्दल माहिती महाभारतात आहे का? याखेरील 'परकायाप्रवेश' हाही प्रकार प्राचीन साहित्यात असतो. त्यात काही काळासाठी देह सोडून दुसर्या देहात प्रवेश करणे वगैरे असते, परंतु त्याविषयी ते नेमके कसे केले जायचे, हे वाचायला मिळालेले नाही.
आज जरी ही विद्या नामशेष झालेली असली तरी ती पुढे कधीतरी पुन्हा साध्य केली जाईल/जावी, असे वाटते.
7 Sep 2015 - 11:27 pm | मारवा
भौतिक जीवनात पर काया प्रवेश कधीही करता येतो. पण हा मायेचा भाग झाला.
तुम्ही कदाचित अधिभौतिक पातळीविषयी बोलत आहात.
8 Sep 2015 - 12:20 am | एस
यानिमित्ताने चंगो यांची कुठलीशी चारोळी अंशतः आठवली :-
'...जगण्याने छळले होते.'
कुणाला पूर्ण चारोळी वा कविता आठवत असल्यास इथे द्यावी ही विनंती.
8 Sep 2015 - 12:31 am | मारवा
जगण्याने छळले होते
मरणाने केली सुटका
असे काहीतरी तुटक तुटक आठवत आहे,
चंगो की अजुन कोण आठवत नाही
बाकी चंगो च ते छोट पुस्तक लय चालल होत नाही,
मी माझा
त्याच्या कॉप्या पण कीती आल्या होत्या मार्केटात
मी तुझा,
माझ्यातला माझा
मी आणि माझा बेंडबाजा
त्या काळातली सर्व तरुण पोर सर्व तरुण पोरींना हे पुस्तक भेट देत असत,
जशी आजकाल पोस्टी फारवर्ड करतात तस
8 Sep 2015 - 12:38 am | एस
हाहाहा! तेच ते.
8 Sep 2015 - 6:50 pm | मारवा
ट्रोलांनी छळले होते
नव जिलबीने केली सुटका
9 Sep 2015 - 11:26 am | चिगो
'इतकेच मला जातांना, सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते.."
सुरेश भटांच्या ओळी आहेत ह्या.
8 Sep 2015 - 9:30 am | भाग्यश्री कुलकर्णी
ती सुरेश भटांची गझल आहे.
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते.
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.
8 Sep 2015 - 11:31 am | एस
धन्यवाद! मला आठवत नव्हते.
8 Sep 2015 - 1:05 pm | प्रसाद गोडबोले
http://www.sureshbhat.in/node/76
8 Sep 2015 - 2:48 pm | gogglya
आधी वृद्धाश्रम वाढत आहेत म्हणून त्रागा करायचा. नंतर घरी असलेल्या आणी अंथरूणाला खिळलेल्या वृद्धांना मारून वर त्याला 'ईच्छामरण' असे गोंडस [आणी चुकीचे] नाव द्यायचे?
8 Sep 2015 - 4:02 pm | हेमंत लाटकर
मी समाजातील गोष्टीचां फक्त आढावा घेतला.वृद्धाश्रम व इच्छामरण या गोष्टी वैयक्तिक आहेत.
8 Sep 2015 - 4:21 pm | चिगो
ह्या धाग्याला इच्छामरण (आमची इच्छा म्हणून) किंवा दयामरण (आमच्यावर दया म्हणून) द्यावं, ही वृद्धाश्रमात माळ ओढता ओढता संपादकमंडळाचरणी नम्र विनंती आहे..
(ट्रोल धाग्यांनी खंगलेला) चिगो
8 Sep 2015 - 5:45 pm | हेमंत लाटकर
ट्रोल धाग्यांनी खंगलेल्या पामरास इच्छामरणाची गरज नाही.