Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by हेमंत लाटकर on गुरुवार, 09/03/2015 - 17:36
इच्छामरण ह्याचा अर्थ ’युदेन्शिया’ (ग्रीक शब्द) "चांगले मरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला आयुष्याची सुरवात आणि शेवट चांगल्या रितीने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’इच्छामरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांची सेवा करणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु नवरा किंवा बायको वृद्ध असली आणि मुलगा-सुन दोघेही नौकरी करणारे असतील तर मात्र अशा वृद्धाची किंवा रूग्णाची अवस्था खुप दयनीय होते. त्यांचे करण्यासाठी माणूस किंवा बाई लावावी म्हणले तर पेपरमधील बातम्या वाचून भीती वाटते. शेवटी प्रत्येक अंथरूणाला खिळलेल्या वृद्धाच्या व रूग्णाच्या मनात इच्छामरण मिळाले तर बरे असा विचार येतो. हा विषय सर्वांना माहित असला तरी मिपावरील चर्चेतून प्रत्येकाच्या मनातील विचार कळतील.
  • Log in or register to post comments
  • 28662 views

प्रतिक्रिया

Submitted by चित्रगुप्त on Sat, 09/05/2015 - 20:39

Permalink

लोन

पितृऋण देवऋण ऋषिऋण सगळी लोन फोडायची असतात बाप्पा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Mon, 09/07/2015 - 18:21

In reply to लोन by चित्रगुप्त

Permalink

पितृऋण देवऋण ऋषिऋण सगळी लोन

पितृऋण देवऋण ऋषिऋण सगळी लोन फोडायची असतात बाप्पा.
ईएमआय खुप जास्त आहे राव ... प्री-क्लोजर च्या टर्म्स ही क्लीयर नाहीत :(
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 09/08/2015 - 18:23

In reply to पितृऋण देवऋण ऋषिऋण सगळी लोन by प्रसाद गोडबोले

Permalink

पितृऋण काही अंशी ठीक आहे

पितृऋण काही अंशी ठीक आहे (सर्वस्वी नाही). आमच्या पिताजींनी/माताजींनी अशी काही अपेक्षा ठेवली नाही... ना आम्ही आमच्या पुत्रापासून ठेवली आहे. पण देवऋण, ऋषिऋण हे कसले ऋण ??? उलट या अश्या पावरफुल्ल संकल्पनांनी /माणसांनी एकच सज्जड आशिर्वाद / वर देवून आपली (म्हणजे तुम्ही, मी, इत्यादींची) सर्व ॠणे एका फटक्यात फेडून टाकून जीवन सुकर-सुंदर करायला पाहिजे. तेच आपल्याकडून ऋणपरतीची याचना / अपेक्षा करत असले तर मग देवत्व आणि ऋषित्व श्रेष्ठ कसे काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 09/08/2015 - 19:06

In reply to पितृऋण काही अंशी ठीक आहे by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

मालक गैरसमज झालाय.

मालक गैरसमज झालाय. पितृऋण, देवऋण, ऋषिऋण या शब्दांचे अर्थ नि ते पूर्ण करण्याचे संकेत वेगळे आहेत. पितृऋण आपल्या संततीला योग्य शिक्षण दिल्यानं पार पडतं अशी माझी माहिती आहे. आजोबांचं नाव आपल्या मुलाला ठेवण्यामागं ही च भूमिका असते. देव ऋण, ऋषिऋण हे सुद्धा प्रत्यक्ष त्यांना काही खडणी देऊन पुरे करायचे असते असं नाहीये. आत्ता लगेच संदर्भ हाताशी नाही पण भागवतामध्ये हा विषय सविस्तर आणि सविस्तार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 09/07/2015 - 16:23

Permalink

थोडासा गोंधळ आहे का?

लेखाच्या संकल्पनेत थोडासा गोंधळ आहे का? इच्छामरण म्हणजे भविष्यात कधीतरी होणारा मृत्यु आधी ओढवून घ्यायचा असा अर्थ बहुतेकांनी घेतला आहे. मला आठवते त्याप्रमाणे इच्छामरणी असलेल्या भीष्मांनी आपला मृत्यु पुढे ढकलला होता.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Mon, 09/07/2015 - 17:00

Permalink

इच्छामरण आणि परकायाप्रवेश

मलासे वाटते इच्छामरण म्हणजे आपल्याला हवे तेंव्हाच (आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर?) देह सोडता येणे. आत्महत्या म्हणजे इच्छामरण नव्हे, किंवा आपण सांगितले आणि दुसर्‍याने आपल्याला इंजेक्शन वगैरे देऊन संपवणे म्हणजेही नव्हे. भीष्माने आपले मरण अमूक एका दिवशी कसे/कोणत्या क्रियेने घडवून आणले, याबद्दल माहिती महाभारतात आहे का? याखेरील 'परकायाप्रवेश' हाही प्रकार प्राचीन साहित्यात असतो. त्यात काही काळासाठी देह सोडून दुसर्‍या देहात प्रवेश करणे वगैरे असते, परंतु त्याविषयी ते नेमके कसे केले जायचे, हे वाचायला मिळालेले नाही. आज जरी ही विद्या नामशेष झालेली असली तरी ती पुढे कधीतरी पुन्हा साध्य केली जाईल/जावी, असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Mon, 09/07/2015 - 23:27

Permalink

परकायाप्रवेश भौतिक पातळीवर कधीही करता येतो.

भौतिक जीवनात पर काया प्रवेश कधीही करता येतो. पण हा मायेचा भाग झाला. तुम्ही कदाचित अधिभौतिक पातळीविषयी बोलत आहात.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Tue, 09/08/2015 - 00:20

Permalink

यानिमित्ताने चंगो यांची

यानिमित्ताने चंगो यांची कुठलीशी चारोळी अंशतः आठवली :- '...जगण्याने छळले होते.' कुणाला पूर्ण चारोळी वा कविता आठवत असल्यास इथे द्यावी ही विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Tue, 09/08/2015 - 00:31

Permalink

मरणाने केली सुटका

जगण्याने छळले होते मरणाने केली सुटका असे काहीतरी तुटक तुटक आठवत आहे, चंगो की अजुन कोण आठवत नाही बाकी चंगो च ते छोट पुस्तक लय चालल होत नाही, मी माझा त्याच्या कॉप्या पण कीती आल्या होत्या मार्केटात मी तुझा, माझ्यातला माझा मी आणि माझा बेंडबाजा त्या काळातली सर्व तरुण पोर सर्व तरुण पोरींना हे पुस्तक भेट देत असत, जशी आजकाल पोस्टी फारवर्ड करतात तस
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Tue, 09/08/2015 - 00:38

In reply to मरणाने केली सुटका by मारवा

Permalink

हाहाहा! तेच ते.

हाहाहा! तेच ते.
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Tue, 09/08/2015 - 18:50

In reply to हाहाहा! तेच ते. by एस

Permalink

सोरो गट्ट यांची एक उत्तर आधुनिक कविता आहे

ट्रोलांनी छळले होते नव जिलबीने केली सुटका
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Wed, 09/09/2015 - 11:26

In reply to मरणाने केली सुटका by मारवा

Permalink

सुरेश भट

'इतकेच मला जातांना, सरणावर कळले होते मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते.." सुरेश भटांच्या ओळी आहेत ह्या.
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री कुलकर्णी on Tue, 09/08/2015 - 09:30

Permalink

ती सुरेश भटांची गझल आहे.

ती सुरेश भटांची गझल आहे. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Tue, 09/08/2015 - 11:31

In reply to ती सुरेश भटांची गझल आहे. by भाग्यश्री कुलकर्णी

Permalink

धन्यवाद! मला आठवत नव्हते.

धन्यवाद! मला आठवत नव्हते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 09/08/2015 - 13:05

In reply to धन्यवाद! मला आठवत नव्हते. by एस

Permalink

http://www.sureshbhat.in/node

http://www.sureshbhat.in/node/76
  • Log in or register to post comments

Submitted by gogglya on Tue, 09/08/2015 - 14:48

Permalink

नक्की काय ठरले आहे मग?

आधी वृद्धाश्रम वाढत आहेत म्हणून त्रागा करायचा. नंतर घरी असलेल्या आणी अंथरूणाला खिळलेल्या वृद्धांना मारून वर त्याला 'ईच्छामरण' असे गोंडस [आणी चुकीचे] नाव द्यायचे?
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंत लाटकर on Tue, 09/08/2015 - 16:02

Permalink

मी समाजातील गोष्टीचां फक्त

मी समाजातील गोष्टीचां फक्त आढावा घेतला.वृद्धाश्रम व इच्छामरण या गोष्टी वैयक्तिक आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Tue, 09/08/2015 - 16:21

Permalink

ह्या धाग्याला..

ह्या धाग्याला इच्छामरण (आमची इच्छा म्हणून) किंवा दयामरण (आमच्यावर दया म्हणून) द्यावं, ही वृद्धाश्रमात माळ ओढता ओढता संपादकमंडळाचरणी नम्र विनंती आहे.. (ट्रोल धाग्यांनी खंगलेला) चिगो
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंत लाटकर on Tue, 09/08/2015 - 17:45

Permalink

ट्रोल धाग्यांनी खंगलेल्या

ट्रोल धाग्यांनी खंगलेल्या पामरास इच्छामरणाची गरज नाही.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com