त्या वीर मुलास प्रेम.पूर्वक श्रद्धांजली , ज्याचे मृत.देह इस्तांबुल च्या समुद्र काठी मिळाले.
इस्लामिक स्टेट (कवितेत त्यांसाठी कावळा अशी उपमा वापरली आहे) च्या आतंका पासून स्वतःच्या परिवाराची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात अत्यान्त् सध्या होडीतून आपल्या परिवारास घेऊन अथांग सागराचा प्रवास करणाऱ्या ११ लोकांना घेऊन जाणारी होडी सागरात विलीन झाली.
ह्या लहान ३ वर्षाचे मृत देह मात्र सागराने परतावले , जगास त्यांचे कर्म त्यांना दाखवून देण्या साठी. एवढीच आशा कि हे हृदय विदारक चित्र पाहून तरी आतंकी मन बदलतील.
….त्या लहान आयलान कुर्दी साठी..
सुटले साथ सारे
सुटले हात सारे
निसटलो पदरातून आईच्या
हरवलो अनंत सागरात!
जिंकतील का ते कावळे आसमंत
करून उध्वस्त घरटे चिमुकल्या पाखरांचे?
हिसकावले लहानपण
हरवले मित्र
खेळणी माझी
सुटली मागेच
.
.
कडे वर आइनं
घेतले मला
घट्ट धरून काळजा जवळ
कुरवाळले मला
होडीत कागदाच्या बसतांना
असावी कल्पना
असेल ती शेवटची मिठी मला
जगण्याच्या
त्या आशेंनं
बाबा माझे
झाले असतील व्याकूळ
मागे आड अन पुढे विहीर
असेच काहीसे निर्णय
जीव मुठीत धरून
घ्यावे लागले असावेत त्यांना !
उंच लाटांनी वेढताच
असावी आईस जाणीव
असंख्य मुके घेत तिनं
शेवटचे भरून पहिले मला !
बाबांचे नेहमी खंबीर हात मला मात्र आज
गुलाबाच्या पाकळी सारखे जाणवत होते
बाबा माझे घाबरलेले मला पाहवत नव्हते
हे सर्व काहीच उलगडत नव्हते मला
सुरक्षित नाही आम्ही मात्र एवढेच जाणवत होते
.
.
होडी उलटली
अन आईचे हात सुटले
अन मग तेथे.. सारेच संपले
आई बाबांची आर्त हाक
ऐकू येत होती मला
माझे रडणे माझे अश्रू
होते सारे सागरी जमा
.
.
असंख्य प्रश्न मनात माझ्या
सोबत होती बुडत
आलोच का आम्ही ह्या होडी वर
का आइनं घेतले असावे इतके मुके
का होते बाबा माझे घाबरले
का नाही थांबलो आम्ही घरी
होते मला मित्रांसोबत
अजून खुप खेळायचे
घरी माझ्या माऊ च्या पिलांना
होत मोठे बघायचे
. . .
.
मी काय करावे आता
कुठे असेल आई
बरी असेल का ती
बाबा कुठे असतील
भेटतील का ते मला
आई… तुझी आठवण येती ग मला
मी घाबरोलोय ह्या खोल पाण्यास
घेऊन चल इथून मज
मला नाही यायचेय इथे पुन्हा
.
.
इतक्यात कुशीत घेतले कुणी मज
घरी नवीन जायचे आहे सांगीतले मला
असेल नवीन आई असतील नवे बाबा
करतील तेवढेच लाड
घेतील मुके मला
.
.
वळून मग
पाहिले मी काठावर मज
त्याच छान कपड्यात
तयार केले होतेस न आई
किती मयेनं तु मला !
प्रतिक्रिया
4 Sep 2015 - 3:14 pm | शरभ
त्या शेवटच्या क्षणात, चिमुर्ड्याच्या आसंवांमध्ये समुद्र बुडला असणार.. :(
4 Sep 2015 - 3:30 pm | नाव आडनाव
.
5 Sep 2015 - 10:20 am | मांत्रिक
:(
कविता अगदी काळजाला हात घालणारी.
अगदी दुर्दैवी. नीच दहशतवादी लांडगे अजून किती जणांची आयुष्ये उद्ध्वस्त करणार कुणास ठाऊक?
5 Sep 2015 - 10:27 am | अजया
तो फोटो पाहिल्यापासून सहन होत नाहीये.किती छान कपडे बूट घालून तयार केलं होतं छोटुला.कधी थांबेल हा आतंक.त्या लहानग्या जीवांची फरपट:(
9 Sep 2015 - 2:46 pm | होबासराव
खुप ढसा ढसा रडावस वाटतय्..दाटुन येत.. किति हेल्पलेस आहोत आपण..
त्याच्या पित्यावर बिचार्यावर काय प्रसंग ओढवलाय्. ह्या सगळ्यांच्या चांगल्या भविष्या करताच तो हे सगळ करत होता.
5 Sep 2015 - 1:20 pm | रातराणी
:(
5 Sep 2015 - 1:43 pm | द-बाहुबली
WHAT THE F**K...
5 Sep 2015 - 1:51 pm | प्यारे१
आताच फ़ोटो पाहिला.... सुन्न झालंय डोकं.
भिकारचोट आहे दुनिया. :-(
5 Sep 2015 - 4:54 pm | सुहास झेले
लिटरली... कुठे जातंय हे सगळं कळतच नाही आहे :(
5 Sep 2015 - 1:54 pm | फुलथ्रॉटल जिनियस
अमेरिका अणि इस्त्राईल्चे पाप आहे आयसिस,मध्यपुर्वेत व्हेस्टेड इंटरेस्ट आहेत या दोस्त राष्ट्रांचे.आयलान कुर्दी या चिमुर्ड्याच्या हत्येला 'सुसंस्कृत म्हणवनारी अमेरीकाच जबाबादार आहे.
5 Sep 2015 - 2:11 pm | माहितगार
जिनियस हि राजकारण मो़जण्याची जागा आहे असा विश्वास आहे का तुमचा ? विषय काढलाच आहे तर एनी वे याझिदींवरील अत्याचारासही आमेरीका आणि इझ्राएलच जबाबदार आहेत का ?
5 Sep 2015 - 2:07 pm | माहितगार
दुखःद !! ते छायाचित्र वृत्त वाचलेले नव्हते, तरीही तुमची कविता एका दमात वाचू शकलो नाहीए.
अनुषंगिक अवांतरः
मी मागे अनुषंगिक विषयावर मयूरपंथाच्या पुर्नजन्मापर्यंत हा लेख मिपावर लिहिला होता.
5 Sep 2015 - 2:15 pm | अमृत
प्रत्येकवेळी डोळे पाणावतात. किती निष्पाप चिमुरडा होता तो. देवा रे असा कसा कठोर तू?
5 Sep 2015 - 5:48 pm | dadadarekar
.
5 Sep 2015 - 6:10 pm | जुबेर बिजापुरे
:(
5 Sep 2015 - 6:37 pm | पैसा
नाही सहन होत!
6 Sep 2015 - 1:59 pm | एक एकटा एकटाच
निशब्द
7 Sep 2015 - 10:53 pm | निनाव
Lahaan Aylan chya balidaanaan.nantar
Barich daare ughadli geli aahet. Deva kade hech maagane aahe ki hey sarv lavkarach thambaave an isis chaa kaayamcha ant.a whaawa.
Tumha sarvanche puna:h abhaar.
Tya lahaan baLachya atmya laa shaanti laabho!
8 Sep 2015 - 12:13 pm | विजुभाऊ
तो फोटो बघुन अजूनही अस्वस्थ आहे.एका चिमुरड्याचं निर्भय जग आम्ही हिसकावून घेत्लंय
9 Sep 2015 - 12:55 pm | तुडतुडी
अमेरिका अणि इस्त्राईल्चे पाप आहे
कशावरून ? संदर्भ द्या . इस्त्राईलचा काय संबंध ? आणि प्यालेस्ताईन , सौदी अरेबिया , इराण , इराक , सुदान , लेबनॉन , पाकिस्तान आणि बाकीचे इस्लामी देश ह्यांबद्दल काय म्हणणं आहे ?
9 Sep 2015 - 2:39 pm | अनिरुद्ध.वैद्य
नाही जात डोळ्यासमोरून … :(
श्रद्धांजली :( :(