सखी सांगूनी जा
काय तुझ्या मनी
हसू लाजरे का
फुले ओठांवरी |
खळी नाजूक गं
खुले गोर्या गाली
बट लाडीक ही
कशी रुळे भाळी |
क्षणी तुज गाली
उमटे का लाली
तुझी पापणी का
झुकली ही खाली |
धरेवर नाही
तुझी पाउले ही
नजरेस नाही |
विश्वाचे भान ही |
अशी चालता तु
वळूनी पाहसी
उगा थांबूनी का
पुढेच तु जासी |
रती होउनी तु
विहरसी वनी
सखी सांगूनी जा
काय तुझ्या मनी |
प्रतिक्रिया
9 Dec 2008 - 2:33 pm | धमाल मुलगा
मनिषाताई, जातो बरं का!
*आम्हाला काव्यातलं काहीही कळत नाही..शक्यतो आम्ही कवितांमध्ये चोच घालत नाही, पण हे शिर्षक वाचुन अगदी म्हणजे अगदी रहावलंच नाही :)
सॉरी मनिषाताई!!!
9 Dec 2008 - 6:48 pm | मनीषा
पण मी तर सखीला सांगीतलं होतं ...
पण असो ............सांगीतल्या बद्दल धन्यवाद!!
(आणि सॉरी ची खरच गरज नव्हती)
9 Dec 2008 - 11:30 pm | इनोबा म्हणे
पण मी तर सखीला सांगीतलं होतं ...
सख्याला सांगीतलं नाही हे बरं केलंत...
बाकी कविता आवडली... पु ले शु
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
9 Dec 2008 - 3:39 pm | राघव
छान कविता :)
आवडली.
मुमुक्षु
9 Dec 2008 - 10:13 pm | प्राजु
छान जमली आहे.
पहिली तीन कडवी सुरेखच. नंतरच्या कडव्यांमध्ये वाचताना थोडेसे खटकते आहे. नक्की काय आहे नाही सांगता येत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Dec 2008 - 10:12 am | पिवळा डांबिस
पाचव्या कडव्यात "तू पुढे जा.." असं आपल्या सगळ्यांना सांगितलं आहे....
"ए, आगे जाव भाई...."
ते खटकलं का?
(ह. घे.)
:)
13 Dec 2008 - 7:19 pm | विनायक प्रभू
असेच म्हणतो
11 Dec 2008 - 2:52 pm | दत्ता काळे
कविता आवडली.
11 Dec 2008 - 3:13 pm | विसोबा खेचर
खळी नाजूक गं
खुले गोर्या गाली
बट लाडीक ही
कशी रुळे भाळी |
क्या केहेने..!
तात्या.
13 Dec 2008 - 7:17 pm | बाकरवडी
कविता आवडली
मस्त...
13 Dec 2008 - 10:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता आवडली