दहावीचा निकाल लागला. सगळीकडून कौतुक झालं. आमची एकच खोली, आईबापांचे हातावरचे पोट, पण बाईंनी कॉलेजची फी भरली. अशातच मामा आले घरी. "कुठे शिकवताय पोरीला, मी मुलगा बघितलाय, हुंड्याशिवाय लग्न होईल." मामा पैसावाले. बैठका झाल्या, लग्न पण लागले. तिकडे दिवसभर शेतात काम अन रात्रीचा मार. कामाचे काही नाही, परीक्षेत पण हंडे भरून आणायची सवय होती, पण तिकडे गुरासारखे राबवायचे. जीव नकोसा झालेला. मामाची पोरगी कॉप्या करून दवाखान्यात सिस्टर. अन मला धाडले नरकात. रोजच्या रडायचा पण वैताग आला एक दिवस अन ठरवलं. याचा निकाल लावायचाच. आता मागे फिरायचं नाही. निघाले तशीच. मंगळसूत्र मोडले. अन पळून आले इकडे बाईंच्या संस्थेत. उद्यापासून कॉलेज सुरु.
प्रतिक्रिया
10 Aug 2015 - 1:00 pm | तुषार काळभोर
+१
भले शाब्बास्स!!!
10 Aug 2015 - 3:41 pm | gogglya
+१
10 Aug 2015 - 3:49 pm | सूड
+१
10 Aug 2015 - 3:55 pm | स्मिता.
+१
शशक चांगली आहेच पण माझा +१ कथेपेक्षा आशयाला, संदेशाला आहे.
आयुष्यभर नशिबाला दोष देत रडत बसण्यापेक्षा कथानायिकेने घेतलेला निर्णय फारच सकारात्मक आहे. महत्त्वाचं म्हणजे नायिका स्वतः कर्म करून स्वतःचं आयुष्य घडवायला निघाली आहे, कुणाच्या उपकाराखाली नाही. समाजातही ही विचारसरणी पसरली तर बरेच प्रश्न कमी होतील (की हा माझा भाबडा आशावाद?)
11 Aug 2015 - 4:47 pm | मधुरा देशपांडे
धन्यवाद. अगदी हेच होते डोळ्यासमोर कथा लिहिली तेव्हा. खरंतर माझ्या आजुबाजुलाच असणार्या काही लोकांकडे बघुन ही कथा तयार झाली. पोळ्यावाल्या बाईंची दहावी झाल्यानंतर नातलगांच्या दबावाने लग्न झालेली एक मुलगी, जिला विरोध करता आला नाही. सासरच्यांनी माहेरी पाठवले. १८च्या आत झालेले लग्न, कुठे त्याचे कागदपत्र आणि कुठे घटस्फोट. पण नंतर मार्गदर्शक चांगले मिळाले आणि आज ती मुलगी पुढे शिकते आहे. अजुन एक अशीच मुलगी. अत्यंत गरीब. खरंच बोर्डाच्या पेपरला येतानाही दुरवरुन पाणी भरुन आणायची. पण धडपडत आज शिकते आहे. एक घरी भांडी घासणारी निरक्षर बाई, नवरा मारझोड करायचा, हिचे पैसे दारुवर उडवायचा. हिने शेवटी स्वतंत्र संसार थाटला आणि मुलांना शिकवते आहे. तिच्या आजुबाजुला अनेक जणी या त्रासातुन जात आहेत पण तिने हिंमत दाखवली. या सगळ्यात अनेक निकारात्मक बाबी असल्या, तरीही या ३-४ कथा जोडताना त्यात काही काळासाठी कोलमडुन जाणे, पुढे पाऊल टाकायला भीती वाटणे हे असले तरीही नशीबाला दोष न देता पुढे जाणे हा समान आणि महत्वाचा धागा होता. आणि तोच कथेतुन सांगण्याचा प्रयत्न होता. पहिल्यांदाच शशक लिहिली आणि ती अनेकांना आवडली हे वाचुन आनंद झाला. :)
10 Aug 2015 - 5:58 pm | जगप्रवासी
+१
10 Aug 2015 - 6:29 pm | नावातकायआहे
+१
11 Aug 2015 - 2:51 pm | गिरकी
+१
11 Aug 2015 - 3:25 pm | खेडूत
+१
आम्हीही एक शशक लिहीली होती याच नावाची.
11 Aug 2015 - 4:20 pm | मधुरा देशपांडे
:)
अरे हो, मी प्रतिसादही दिला होता पण लक्षात नव्हते ही कथा लिहिताना अजिबातच. दोन्ही कथानायिका एकाच मार्गाने जाणार्या आहेत हे मस्तच.
11 Aug 2015 - 3:27 pm | किसन शिंदे
+१
एक नंबर
11 Aug 2015 - 4:29 pm | मृत्युन्जय
+१
11 Aug 2015 - 4:47 pm | बाळ सप्रे
एक क्षण वाटलं शतशब्दकथा स्पर्धेचा निकाल आहे की काय हा .. :-)
11 Aug 2015 - 4:55 pm | मधुरा देशपांडे
हाहाहा :-)
11 Aug 2015 - 6:31 pm | अनिरुद्ध.वैद्य
छान कथा! बाकी मला सुरुवातीस वाटले की स्पर्धेचा निकाल लागला …
12 Aug 2015 - 5:49 pm | अनन्न्या
मस्तच गं!
12 Aug 2015 - 5:55 pm | मीता
+१
12 Aug 2015 - 6:25 pm | जेपी
+1
13 Aug 2015 - 10:45 am | पाटील हो
+1
13 Aug 2015 - 10:49 am | थॉर माणूस
याचा सिक्वेल कसा असेल याविषयीची उत्सूकता आहे आता...
कथेला अर्थातच +१
13 Aug 2015 - 10:56 am | असा मी असामी
+१
13 Aug 2015 - 12:01 pm | अभ्या..
+१
छान
13 Aug 2015 - 1:37 pm | कविता१९७८
मस्त
14 Aug 2015 - 10:34 pm | निमिष सोनार
-
14 Aug 2015 - 11:09 pm | जुइ
+१
15 Aug 2015 - 10:28 pm | जयनीत
+1