[शतशब्दकथा स्पर्धा] निकाल
दहावीचा निकाल लागला. सगळीकडून कौतुक झालं. आमची एकच खोली, आईबापांचे हातावरचे पोट, पण बाईंनी कॉलेजची फी भरली. अशातच मामा आले घरी. "कुठे शिकवताय पोरीला, मी मुलगा बघितलाय, हुंड्याशिवाय लग्न होईल." मामा पैसावाले. बैठका झाल्या, लग्न पण लागले. तिकडे दिवसभर शेतात काम अन रात्रीचा मार. कामाचे काही नाही, परीक्षेत पण हंडे भरून आणायची सवय होती, पण तिकडे गुरासारखे राबवायचे. जीव नकोसा झालेला. मामाची पोरगी कॉप्या करून दवाखान्यात सिस्टर. अन मला धाडले नरकात. रोजच्या रडायचा पण वैताग आला एक दिवस अन ठरवलं. याचा निकाल लावायचाच. आता मागे फिरायचं नाही. निघाले तशीच. मंगळसूत्र मोडले. अन पळून आले इकडे बाईंच्या संस्थेत. उद्यापासून कॉलेज सुरु.
उत्तरार्ध
वाचने
18689
वाचनखूण
प्रतिक्रिया
76
+१
+१
+१
+१
In reply to +१ by स्मिता.
धन्यवाद. अगदी हेच होते
+१
+१
+१
+१
In reply to +१ by खेडूत
:)
+१ एक नंबर
+१
एक क्षण वाटलं शतशब्दकथा
In reply to एक क्षण वाटलं शतशब्दकथा by बाळ सप्रे
हाहाहा :-)
+१
+१
+१
+1
+1
+१
+१
+१ छान
मस्त
+१
+१
+1