भारतातील अधुनीक दहशतवादाची मुळे

विकास's picture
विकास in काथ्याकूट
3 Dec 2008 - 4:45 am
गाभा: 

मुंबईत जे आत्ता अतिरेकी हल्ले झाले, तसेच गेल्या दशकापासून जे अनेक अतिरेकी हल्ले मुंबईत आणि भारतातील इतर शहरात झाले त्यासंदर्भात आपण येथे बर्‍याच चर्चा करत आहोत. त्याचे मूळ शोधताना हे जणू काही १९९२ सालानंतर अचानक चालू झाले असा सूर लागतो. आता त्यासंबंधात मी मला माझ्या काही माहीतीवर आधारीत जे काही माहीत आहे ते येथे लिहीत आहे. त्यात तथ्य आहे अथवा नाही हे तुम्हीच ठरवा. मात्र जे काही लिहायचे असेल ते भावनाप्रधान होऊन लिहीलेत तर चालू शकेल पण न आवडणार्‍याविरुद्ध भावनाशुन्य आणि आपल्याला जे वाटते तेच खरे असे भावनाविवश होऊन कृपया लिहू नये ही विनंती.

आधीच्या चर्चेत दाउद ने जे मुंबईत १९९३ साली बाँब उडवण्याचे कारस्थान रचले तें बाबरी मशिदीच्या विरोधात होते असा सूर आला आहे. त्या संदर्भात विचार केल्यास काय जाणवते? सर्व प्रथम दाउदने अथवा कुठल्याही मुसलमान (अतिरेकी अथवा तात्कालीन विरोधक) संघटनेने असे कुठेही म्हणलेले नाही की हे बाबरी मशिदीच्या घटनेमुळे झाले आहे म्हणून. या संबंधात फक्त इतकेच म्हणले जाते, "असे समजण्यात येते की ही स्फोट मालीका बाबरी मशिदीमुळे झाली" अर्थात तसे झाले असे क्षणभर धरले तरी त्याचे समर्थन करायचा प्रश्न येत नाही. नाही तर तसे काय रामजन्मभूमीचा ४०० वर्षाचा हट्ट (आणि स्वातंत्र्यानंतर जा-ये करत गेलेला हट्ट) हा अचानक इतका मोठा होण्यास शहाबानो प्रकरण आहे ज्यात अयोग्य घटनादुरूस्ती करत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलून एका अर्थाने स्त्रीच्या आणि मानवी हक्कांवर गदा आणली असे येईल. पण मी असल्या कुठल्याच समर्थनात पडू इच्छित नाही.

दुसरा भाग म्हणजे, दाउद हा ना धार्मिक मुसलमान आहे ना धर्मांध मुसलमान आहे. तो फक्त माफिया आणि स्मग्लर होता आणि आहे. जुगार, वेश्याव्यवसाय आणि ड्र्ग्ज ह्यावर त्याने साम्राज्य तयार केले. या तिन्ही गोष्टींना इस्लाम मधे बंदी असल्याचे माहीत असेलच. त्याचे आणि मुंबई पोलीसांचे युद्ध हे अनेक वर्षे चालले होते. त्याने या काळात अनेकांना मारले होते पण शेवटी पोलीसांना यश येऊ लागले. तेंव्हा दाउद १९८६ साली म्हणजे मुंबई बाँबस्फोट मालीकेच्या आधी जवळपास ७ वर्षे दुबईला जाऊन बसला. अर्थात त्याचे साम्राज्य तो रिमोट कंट्रोलने चालवत होताच. या काळात पण अनेक एन्काउंटर होऊन त्याचे डावे-उजवे सहकारी मेले होते. दाउद स्वतः कधी काळी स्थानीक होता आणि त्याची टोळी ही स्थानीकच होती. त्यामुळे मुंबई पोलीसांना आणि पर्यायाने भारताला धडा शिकवण्यासाठी त्याने अतिरेकी कारवाया चालू केल्या कारण तो पूर्ण "कॉर्नर" झाला होता. कदाचीत त्याला असेही वाटले असेल की पाकीस्तान सरखे भारतात वरकरणी सरकार आणि आतून निर्नायकी होईल. सुदैवाने आपल्याकडे लोकशाही रुजली आहे त्यामुळे तसे झाले नाही आणि या माफियाकिंगला कायमचा अज्ञातवास नशिबी आला. आजता गायत दाउदने कधिही धर्माच्या नावाने काही केल्याचे ऐकलेले नाही, त्यामुळे त्याच्याकड सामन्य मुसलमान जसे एक वेळ बीन लेडन कडे त्यांच्या मसीहासारखे बघत असतील तसे बघत असणे संभवत नाही.

आता हे होण्या आधी ८०च्या दशकाच्या शेवटाला (व्हि पी सिंग पंतप्रधान झाल्यापासून) काश्मिर प्रश्नावरून पाकीस्तानने अतिरेकी तयार करणे हे जोरात मनावर घेतले. त्याचे परीणाम आधी काय झाले याचा विचार केल्यास काय दिसते? तर ३ ते ४ लाख काश्मिरी पंडीतांवर स्वतःच्या घरातून बाहेर पडायची आणि स्वतःच्याच देशात निर्वासीत म्हणून रहायची वेळ आली. त्याच काळात अनेक अत्याचार झाले ज्याचे वर्णन मी येथे करत नाही तसेच हिंदूंच्या म्हणून ज्या काही वास्तू असतील त्यांना भग्न केले गेले. अर्थात त्याकडे आपण (म्हणजे तुम्ही-आम्ही सर्वचजण) दुर्लक्ष करत होतो. कारण जळत असली तरी ते आपले नव्हते अशी भावना आणि आलटूनपालटून जी कुठली टोपी आहे त्याप्रमाणे एकदा नेहरूंनी तयार केलेला आंतर्राष्ट्रीय काश्मिरी मुद्दा आणि आता तो पाळला पाहीजे म्हणणारे, दुसरीकडे तेथील मुसलमानांच दोषी ठेवणे तिसरीकडे राजकारण्यांना नावे ठेवणे आणि आपण काय करणार असे म्हणत पण एकंदरीत दुर्लक्ष करणारे सर्व इतर सामान्य भारतीय...पण यात फार कमी विचारांनी दहशतवाद म्हणून लक्ष दिले. सरकारने तर पूर्णपणे दुर्ल़क्ष केले.

पण असा हा काश्मिरमधील दहशतवाद वाढायचे कारण तरी काय होते? बाबरी मशिद? ती तर तेंव्हा उभीच होती... मग त्या भागातील हिंदू-मुसलमान? पण ते देखील स्वातंत्र्यापुर्वी आणि नंतरदेखील तेथे बहुतांशी गुण्यागोविंदाने रहात होतेच की. मग असे काय होत होते? कडवे हिंदू चिथावत होते? ...

विचार करा परत, की हे कधी चालू झाले त्याचा - ज्याला अपसर्ज असा शब्द आहे तो प्रकार चालू झाला तो ८०च्या दशकात. त्याच वेळेस पाकीस्तानच्या दुसर्‍या बा़जूस म्हणजे अफगाणिस्तानच्या बाजूस काय होत होते? अमेरिकेने रसद पुरवून बिन लादेन आणि त्याचे सहकारी तयार केले होते - मुजाहीदीन हा त्याकाळात प्रकर्षाने प्रचलीत झालेला शब्द आहे. हे सर्व अफगाणिस्तानात बाहेरून लढायला आलेले होते. त्यांचे युद्ध रशिया विरुद्ध अफगाणिस्तानात चालू होते. बघता बघता ते वरचढ होऊ लागले. मला लहान होतो तरी देखील चांगलेच आठवते आहे की त्या काळात अफगाण पंतप्रधान की राष्ट्राध्यक्ष - त्याचे नाव आत्ता आठवत नाही, पण इंदीरा गांधी मुळे भारतात बर्‍याचदा दिसायचा आणि अर्थातच सोव्हीएट पपेट होता, त्याला या मुजाहीदीनने सरळ पकडून फासाला लटकावले. आश्चर्य म्हणजे हे त्या वेळीस दुरदर्शनवर त्याचे लटकणारे पाय दाखवले होते (कदाचीत प्रणव रॉयच्या "द वर्ल्ड धिस वीक" मधे असेल). तर अशा या वरचढ झालेल्या मुजाहीदीनपुढे आधीच इतरत्र आणि घरात डळमळीत झालेल्या सोव्हीएट राज्यास रहाणे हे "कॉस्ट बेनिफीट"चा विचार करता अवघड वाटू लागले आणि ते सोडून गेले.

अमेरीकेचा अफगाण स्ट्रॅटेजीत विजय झाला. तो काळ होता १९८७ चा रेगनचा... त्याच काळात अमेरिकेत "ग्रेटेस्ट रिसेशन ऑफ १९९०ज " चालू झाले होते. तेंव्हा माकडीने स्वत:ला वाचवायच्या भानगडीत या मुजाहीदीनच्या पिल्लाला ढकलून दिले. त्याचा व्हायचा तोच परीणाम झाला. आता हे निव्वळ युद्धावर जगणारे मुजाहीदीन आणि त्यांच्याकडची शस्त्रे ही पाकीस्तान काबीज करायला लागली. बीन लेडन मात्र तो पर्यंत नेता होऊ लागला होता... अर्थात त्याला इष्टापत्ती समजत तत्कालीन हुकूमशहा झिया उल हक यांनी त्यांना "काश्मिरीच्या लढ्यासाठी"पाठवले. पुढचा इतिहास आणि त्यातील परीणाम वर सांगितल्याप्रमाणे आहेत. काश्मिरवर हल्ले सुरू झाले, पंडीत निर्वासीत झाले वगैरे वगैरे...चीन मधे पण यातून काही प्रकरणे झाल्याचे या संदर्भात आठवते, पण चीन काही कुणाचे ऐकणार नाही आणि आपले कम्युनिस्ट त्यांकडे दुर्ल़क्ष करणार हे ठरलेलेच असते.

पण राक्षसी भूक आणि महत्वाकांक्षा थांबवल्याशिवाय थांबत नसते आणि त्याला जसे राक्षसाला हाताळायचे असते तसेच हाताळावे लागते हा युगानुयुगे जगभर चालत आलेला नियम आहे. त्याला हे मुजाहीदीन तरी कसे अपवाद असणार? पण दुर्दैवाने अनेक कारणाने आपण त्याला महत्व दिले नाही आणि डोळ्यावर कातडे ओढून बसलो. आज हा राक्षस आपल्याला जे दार होते तेथून आत येऊन घरात आला आहे...

याचेच अजून एक उदाहरण पहा. शिवसेना-भाजपाचे जेंव्हा राज्य होते तेंव्हा बाळासाहेब ठाकरे हे बांग्लादेशींच्या घुसखोरीवरून त्यांच्या पद्धतीत ओरडत होते. अर्थातच प्रचंड बोंबाबोंब झाली. त्यात आघाडीवर अर्थातच बंगाली कम्युनिस्ट पण इतर स्वतःला सेक्युलर समजणारे आणि काँग्रेस होतेच. पण गेल्या काही वर्षात विलासराव कितीवेळा तेच म्हणालेत अथवा ते पहा. आता बंगाली कम्युनिस्टपण तेच म्हणत आहेत. पण त्यावेळेस दुरक्ष केल्याने आजपण आसाम मधे बाँबस्फोट होत आहेत आणि मुंबई सकट अनेक शहरे ही या नवीन दहशतवादी गुन्हेगारीच्या सावलीत आहेत. पण हे सर्व का झाले? कारण सवंग राजकारण आणि सेक्युलॅरीझमचा जप करत धार्मिकतेच्या चष्म्यातून गुन्हे आणि गुन्हेगार हे दानव आहेत का मानव ते ठरवणार... म्हणजे हिंदू असतील तर "हिंदू" असे म्हणत त्यांना राक्षस म्हणणार आणि "मुसलमान" असतील तर मात्र "त्यांना तसे म्हणायचे नाही" असे म्हणत त्यांना अडाणीच ठेवणार.

थोडक्यात आधीपण इतरत्र म्हणलेले आहेच पण पुनरुच्चार करत मला काय वाटते ते सांगतो, " आजच्या दहशतवादाचे आणि दहशवाद्यांचे मूळ हे जसे आंतर्राष्ट्रीय सीमेच्या सभोवताल होत असलेल्या भूराजकीय घटनांशी जोडलेले आहे, तसेच त्याचा वेळीस अंदाज न घेता योग्य निर्णय न घेण्याच्या कमकुवत नेतृत्वाशी आणि "आपण बरे आणि आपले पोट बरे" म्हणत जगणार्‍या समाजवृत्तीशी आहे."

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Dec 2008 - 10:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

विकासराव,
नेहेमीप्रमाणेच तुमचा लेख अभ्यासपूर्ण आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारा आहेच; पण तो योग्य कृती करण्यासाठी प्रवृत्त करणारा ठरावा.

... आणि "आपण बरे आणि आपले पोट बरे" म्हणत जगणार्‍या समाजवृत्तीशी आहे.
हे अगदी विशेषत्त्वाने आवडलं आणि पटलं.

अदिती

राघव's picture

3 Dec 2008 - 11:32 am | राघव

सहमत आहे.
दहशतवादाच्या उगमाचा आढावा घेणारा छान लेख! :)
मुमुक्षु

ऋषिकेश's picture

3 Dec 2008 - 5:44 pm | ऋषिकेश

असेच म्हणतो

"आपण बरे आणि आपले पोट बरे" म्हणत जगणार्‍या समाजवृत्तीशी आहे

लाखमोलाचं वाक्य :)
-(गोंधळलेला) ऋषिकेश

सर्किट's picture

3 Dec 2008 - 11:19 am | सर्किट (not verified)

मला लहान होतो तरी देखील चांगलेच आठवते आहे की त्या काळात अफगाण पंतप्रधान की राष्ट्राध्यक्ष - त्याचे नाव आत्ता आठवत नाही, पण इंदीरा गांधी मुळे भारतात बर्‍याचदा दिसायचा आणि अर्थातच सोव्हीएट पपेट होता, त्याला या मुजाहीदीनने सरळ पकडून फासाला लटकावले.

त्याचे नाव नजीबुल्ला..

इंदिराजींच्या सद्दामसारख्या मित्रांनी भरलेल्या मित्रमंडळात हा देखील होता.

-- सर्किट

विकास's picture

3 Dec 2008 - 5:55 pm | विकास

त्याचे नाव नजीबुल्ला..

इंदिराजींच्या सद्दामसारख्या मित्रांनी भरलेल्या मित्रमंडळात हा देखील होता.

बरोबर. धन्यवाद! त्याचा चेहरापण मला आठवतो आणि सहजरावांनी त्याची तूनळीतील चित्रफितपण पाठवली!

धम्मकलाडू's picture

3 Dec 2008 - 12:05 pm | धम्मकलाडू

मात्र जे काही लिहायचे असेल ते भावनाप्रधान होऊन लिहीलेत तर चालू शकेल पण न आवडणार्‍याविरुद्ध भावनाशुन्य आणि आपल्याला जे वाटते तेच खरे असे भावनाविवश होऊन कृपया लिहू नये ही विनंती.

भावनाप्रधान, भावनाशून्य, भावनाविवश. यातले नक्की काय चालेल, काय चालणार नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट करावे.

रामजन्मभूमीचा ४०० वर्षाचा हट्ट (आणि स्वातंत्र्यानंतर जा-ये करत गेलेला हट्ट) हा अचानक इतका मोठा होण्यास शहाबानो प्रकरण आहे. ज्यात अयोग्य घटनादुरूस्ती करत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलून एका अर्थाने स्त्रीच्या आणि मानवी हक्कांवर गदा आणली असे येईल.

शहाबानो प्रकरणाचा रामजन्मभूमीशी आणि हिंदू समाजाशी थेट संबंध काय होता? घटनादुरुस्ती करून काँग्रेसने मुस्लिमांचे तुष्टीकरण केले आणि समान नागरी कायद्याची मागणी योग्यच आहे या दोन्ही गोष्टी मान्य.

शहाबानोमुळे भाजपाला चांगलीच संधी मिळाली. भाजपानेही घाणरेडे राजकरण करून अगदी उत्तम भांडवल केले. थोडक्यात काँग्रेस आणि भाजपा दोघेही एकाच माळेचे मणी.

भाजपाचे अनेक मुखवटे आहेत. एकीकडे सामाजिक समरसतेची गाणी गायची, तर दुसरीकडे मंडल आयोगाला विरोधही करायचा. एकीकडे डॉ. आंबेडकरांचा गौरव करायचा, दुसरीकडे 'रिडल्झ इन हिंदुइझम' ला विरोध करायचा आणि 'वर्शिपिंग फॉल्स गॉड्स' कमिशन करायचे. एकीकडे स्त्रीच्या आणि मानवी हक्कांच्या बाता करायच्या आणि दुसरीकडे "लिपस्टिकवाल्या बाया.." सारखी अशोभनीय वक्तव्ये (विहिंपच्या संतांच्या विधानांपुढे हे नकवीचे विधान काहीच नाही) करायची. ही यादी न संपणारी आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मुंबईवर काही दिवसांपुर्वीच महाभयंकर असा अतिरेकी हल्ला झाला.हे हल्लेखोर समुद्रामार्गे बोटीतून मुंबईत आले असा प्राथमिक अंदाज पोलीसांनी काढला आहे. याबाबत सरकारचे,गुप्तचर यंत्रणाचे अपयश असे बरेच काही लिहीले गेले बोलले गेले(अर्थात कोणतेही कटकारस्थान शिजताना आपल्या कारस्थानाचा सुगावा लागू नये याबाबत ज्या दहशतवादी संघटनेमार्फत हे हल्ले झाले त्यांनीही योग्य ती काळजी घेतली असणारच) आणि खरोखरच हा हल्ला म्हणजे गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे असे म्हणायला निश्चितच जागा आहे.
फार वर्षापुर्वी मुंबईत गुन्हेगारी टोळ्यांची दहशत होती.करीम लाला ,हा़जी मस्तान पासून दाऊद,गवळी,छोटा राजन,अमर नाईक,गुरू साटम,सदा पावले ही त्यांची नावे. बेरोजगार तरूण मोठ्या प्रमाणावर या टोळ्यांच्या आश्रयाला होता.खंडणी,दहशत पसरवणे,टोळी युध्द तसेच राजकीय वरदहस्त सर्वसामान्य माणूस,व्यापारी वर्ग हैराण झाला होता.पोलीसांनी एन्काऊंटर सुरू केले आणि या गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडले.मुंबईत गँगवार संपले(अधून मधून होत असते. ते सोडा)यातील दाऊद,छोटा राजन हे देश सोडून बाहेर पळाले.यापैकी दाऊद दुबईमार्गे पाकीस्तानात पळाला.या गुन्हेगारी टोळ्यांचा दहशतवाद जरी संपला असला तरी मुंबईल पुन्हा एकदा नव्या तर्‍हेच्या दहशतवाधाने ग्रासले.
तेथील गुप्तचर यंत्रणेणे त्याचा भारतविघातक कारवाया करण्यासाठी पुरेपुर उपयोग केला तो असा.भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्वाचे वारे देशभर वाहू लागले होते.बाबरी मशीदीच्या जागेवर राम मंदीर हा त्यांच्या अट्टाहास होता/आहे.अडवाणी नी रथयात्रा काढली देशभर पेटवापेटवी केली .अनेक हिंदू संघटना एकत्र झाल्या त्यांनी बाबरी मशीद जमीनदोस्त केली.बाबरी मशीद जमिनदोस्त केल्याचे बरेच परीणाम झाले. मुंबईत हिंदू-,मुस्लीम दंगली झाल्या शिवसेनेचा दंगलीत उघड सहभाग होता सहजिकच दोन मने दुभंगली गेली.मुस्लीमांत(अपवाद सोडून) असंतोष वाढू लागला.त्यांत बदल्याची भावना निर्माण झाली.दाऊदने टायगर मेमन मार्फत स्थानिक तरूणांना एकत्र करून मुंबईत भीषण बॉम्बस्फोट केले.अनेक जण ठार झाले.बॉम्बस्फोटातील गुन्हेगार(यांत हिंदू पोलीसही होते) पकडले गेले त्यांना शिक्षाही झाली.टायगर,दाऊद,पाकीस्तानी गुप्तचर यंत्रणा यांनी पध्दतशीरपणे यांचा वापर केला आणि त्यांना फेकून दिले.
त्यानंतर अनेक बॉम्बस्फोट मुंबईत झाले.आणी सीमी सारख्या संघटनाच्या त्या बॉम्बस्फोटात हात असल्याचे सिध्द झाले.येथे एक असे सांगावेसे वाटते सुरूवातीला काश्मिर खोर्‍यापुरता असणारा दहशतवाद(याला आपण फुटिरतावाध(स्वतंत्र काश्मिर) म्हणू शकतो)पण भाजप जसा जसा वाढू लागला तसतसा या देशात दहशतवाद अधिक जोमाने वाढू लागला असे दिसुन येते.
मुंबईत आता झालेला हल्ला नविन स्वरुपाचा होता.तोपर्यंत मुंबईला बॉम्बस्फोटाची सवय होती. असे काही होईल याची शासनाला कल्पनाही नव्हती. या हल्ल्यात जर स्थानिकांनी हल्लेखोरांना मदत(अजुन पुरावा नाही आहे) केली असेल तर ते ती मदत का करत आहेत याचाच विचार करायची आता वेळ आली आहे.

लिखाळ's picture

3 Dec 2008 - 8:08 pm | लिखाळ

विकासराव,
आढावा चांगला घेतला आहे.

कमकुवत राजकीय नेतृत्व आणि आपल्या कातडीला धग लागली तरच आगीकडे लक्ष द्यायचे या सामान्यांच्या वृत्तीमुळेच दहशतवाद फोफावतो आहे हे खरेच.
-- लिखाळ.

सुनील's picture

3 Dec 2008 - 8:44 pm | सुनील

लेखात काही विसंगती जाणवल्या त्या अशा -

सर्व प्रथम दाउदने अथवा कुठल्याही मुसलमान (अतिरेकी अथवा तात्कालीन विरोधक) संघटनेने असे कुठेही म्हणलेले नाही की हे बाबरी मशिदीच्या घटनेमुळे झाले आहे म्हणून.
न्यायमूर्ती कोदे यांच्या समोर झालेल्या सुनावणीच्या वृत्तांतांत बर्‍याच आरोपींनी (आता गुन्हेगार म्हणायला हरकत नाही), बाबरी मशिदीचा उल्लेख केल्याचे वाचले होते.

तर ३० लाख काश्मिरी पंडीतांवर स्वतःच्या घरातून बाहेर पडायची आणि स्वतःच्याच देशात निर्वासीत म्हणून रहायची वेळ आली.
जम्मू-काश्मिर राज्याची आजची लोकसंख्या सुमारे १ कोटी आहे. हे लक्षात घेतले तर, ३० लाख हा आकडा बरोबर असेल असे वाटत नाही.

अवांतर म्हणून १९०९ च्या इंपिरीयल गॅझेटीयर मधील हा खाली उतारा (पृष्ट ९९) पहायला हरकत नाही.

The total population includes 2,154,695 Muhammadans, 689,073
Hindus, 25,828 Sikhs, and 35,047 Buddhists. The Hindus are found
chiefly- in the Jammu province, where they form rather less than half
the total. In the Kashmir province they represent only 524 in every
io,ooo of population, and in the frontier wazarats of Ladakh and
Gilgit only 97 out of every io,ooo persons.

बाबरीकांडापूर्वी भारतात दंगली जरूर झाल्या. परंतु, आंतरराष्ट्रीय परिमाण लाभलेल्या संघटीत दहशतवादाची चुणूक १९९३ च्या बॉम्बस्फोटातच दिसली. ज्याचे मूळ निश्चितपणे बाबरीकांडातच आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुनील's picture

3 Dec 2008 - 9:45 pm | सुनील

वेळेअभावी फार गुगलता आले नाही. परंतु, रॉयटरच्या स्थळावर ही बातमी मिळाली. त्यात, न्या कोदे यांचे हे वाक्य स्पष्ट आहे -

His excuse that the acts were revenge for the Babri masjid is not convincing

दुवा येथे -

http://www.reuters.com/article/worldNews/idUSSP8968120070718

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विकास's picture

3 Dec 2008 - 10:22 pm | विकास

न्यायमूर्ती कोदे यांच्या समोर झालेल्या सुनावणीच्या वृत्तांतांत बर्‍याच आरोपींनी (आता गुन्हेगार म्हणायला हरकत नाही), बाबरी मशिदीचा उल्लेख केल्याचे वाचले होते.

असेलही मी जेंव्हा पाहीले तेंव्हा या समान अर्थाचे वाक्य आढळले ते असे होते, "It is believed that the attacks were carried out in retaliation for the destruction of the historic Babri Masjid on December 6, 1992" (आत्ता पटकन गुगलले तेंव्हा येथे मिळाले पण मी इतरत्रपण पाहीले होते. मला वाटते विकीपिडीयावर पण असेच आहे.) त्याशिवाय, माझे म्हणणे आपण परत वाचाल तर वेगळे होते:
सर्व प्रथम दाउदने अथवा कुठल्याही मुसलमान (अतिरेकी अथवा तात्कालीन विरोधक) संघटनेने असे कुठेही म्हणलेले नाही की हे बाबरी मशिदीच्या घटनेमुळे झाले आहे म्हणून.

आरोपी जेंव्हा स्वत:चा बचाव करत असतो तेंव्हा तो कोर्टात जे बोलतो, ते त्याचे व्यक्तीगत बचावासाठीचे कारण असते. थोडक्यात त्या संबंधात कोणत्याही संघटनेने जबाबदारी घेतली नव्हती. कारण तो हल्ला मुसलमानांचा धार्मिक कारणाने केलेला हल्ला नव्हता असेच माझे म्हणणे आहे. या उलट आत्ता आणि इतर अनेक अतिरेकी हल्ल्यात त्या त्या संघटना तसे जाहीर करतात कधी लपून बसत नाहीत...

जम्मू-काश्मिर राज्याची आजची लोकसंख्या सुमारे १ कोटी आहे. हे लक्षात घेतले तर, ३० लाख हा आकडा बरोबर असेल असे वाटत नाही.

धन्यवाद! मला ३ लाख म्हणायचे होते. पण आत्ता आपण म्हणल्यावर परत पाहीले तर काश्मिरी पंडीतांच्या मताने ४ लाख आहे. मी मूळ लेखात हा आकडा बदलत आहे.

बाबरीकांडापूर्वी भारतात दंगली जरूर झाल्या. परंतु, आंतरराष्ट्रीय परिमाण लाभलेल्या संघटीत दहशतवादाची चुणूक १९९३ च्या बॉम्बस्फोटातच दिसली. ज्याचे मूळ निश्चितपणे बाबरीकांडातच आहे.

आंतर्राष्ट्रीय संघटीत दहशतवादाची चुणूक ही बाबरीने लागली असे म्हणताना मग एक त्यावेळचा निषेध वगैरे सोडल्यास पाकीस्तान/बांग्लादेश ही इस्लामिक राष्ट्रे सोडल्यास इतर कुठल्याही प्रबळ राष्ट्राने "मुसलमानी" राष्ट्र म्हणून या विरुद्ध सातत्याने आवाज का नाही केला? त्याचे परत कारण तेच आहे की ह्याचा संबंध हा बाबरी मशिदीशी नाही तर या आंतर्राष्ट्रीय दहशतवादाचा संबंध हा आंतर्राष्ट्रीय भूराजकीय घडामोडींशी आणि त्यात आपण सातत्याने घेतलेल्या नाकर्त्या अथवा पडत्या भुमिकेशी आहे आणि हा लेखाचा/चर्चेचा मूळ मुद्दा आहे. आणि आपल्याला सेक्युलॅरीझमचे लाडके वाक्य माहीत आहेचः "दहशतवादाला धर्म नसतो" म्हणून!

भास्कर केन्डे's picture

4 Dec 2008 - 10:26 am | भास्कर केन्डे

श्री. विकास,

अतिशय संयमीत व योग्य ताळमेळ असलेला लेख योग्य उदाहरणांसह व मिमांसेसह दिलात. अभिनंदन!

काही लोक पूर्वग्रह असल्याने जाणूनबुजून हे त्यांच्या मनाला पटू देणार नाहीत व सगळे काही बाबरी प्रकरणाच्या माथ्यावर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न करतील हे लेख वाचतानाच ध्यानात आले होते. प्रतिसादांवरुन तो अंदाच चुकला नाही हे सिद्ध झाले.

बाकी त्यांचेही खरेच आहे म्हणा - मुसलमान कधीच दहशतवादी कृत्ये करीत नव्हते. हिंदूंनीच शेकडो वर्षे स्वतःची देवळे पाडून घेतली व त्यावर मशिदी बांधल्या. त्या मशिदीत दानधर्माला आलेल्या मुसलमान यात्रेकरुंना आपल्या बाया-पोरी भेट दिल्या व त्यानेही संतोष झाला नाही म्हणून स्वतःच्या प्रिय मातृभूमीचे भागच दान केले.

आपला,
(उद्विग्न) भास्कर
आम्ही येथे वसतो.

व्यक्ती वा संघटना हे शब्दांचे खेळ आहेत. बाबरी पतनाच्या निमित्ताने परदेशी शक्तींची मदत घेऊन कट रचणे, त्यासाठी पैसा पुरवठा करणे, माणसे (देशी/परदेशी) तयार करणे, हे प्रथमच झाले. त्यापूर्वी च्या कोणत्याही दंगलीत असे झाले नव्हते. दाउद आणि आयएसाआय एकत्र येण्याची सुरुवातदेखिल इथेच झाली.

अर्थात, बाबरी प्रकरण घडले नसते तरी हे कधी घडलेच नसते असे नाही, पण बाबरी पतनाने याची सुरुवात झाली हेही खरेच. बाबरी पतन आणि १९९२ चे बॉम्ब्स्फोट यांचा परस्परसंबंध सूर्यप्रकाशाइतका स्पष्ट असताना कोंबडे झाकण्याचा प्रयत्न कशापायी?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विकास's picture

5 Dec 2008 - 12:24 am | विकास

कोंबडे झाकण्याचा प्रयत्न

माझे देखील तेच म्हणणे आहे की आपल्यासारखी माणसे बाबरीकडे बोट दाखवत आज ज्यांच्यामुळे इतकी निष्पाप माणसे मेली, पोलीस मेले त्या गुन्हेगारांविरुद्ध ठोस पावले उचला म्हणायच्या ऐवजी ज्या गोष्टीचा संबंध नाही ते दाखवून हे अतिरेक्यांचे कोंबडे झाकण्याचा प्रयत्न करत आहात, असेच वाटते. काय गंमत आहे, सेक्युलर म्हणणारेच कायद्यापेक्षा, धर्माच्या नजरेतून जास्त पहात आहेत असे वाटते. :-)

दाउद आणि आयएसाआय एकत्र येण्याची सुरुवातदेखिल इथेच झाली.
दाउदला, त्यावेळेस त्याच्या वेश्याव्यवसाय, ड्रग्ज, आणि जुगारातील पैशाचे (कदाचीत आता आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा व्यापार) याचे पडले होते, मुसलमानांचे अथवा मुसलमान धर्माचे पडले नव्हते... तेच आयएसआय च्या बाबतीत त्यांना भारतात घातपाती कृत्ये त्यांच्या (पाकच्या आणि पाक सैन्याच्या) राजकीय मह्त्वाकांक्षा आणि वैयक्तिक स्वार्थाच्या पोळ्या भाजत ठेवण्यासाठी करायची आहेत हे आपल्याला माहीत असेलच. त्याचा संबंध बाबरीच काय पण साधा मुस्लीम धर्मासाठी लावणे पण ना-पाक आहे :-)

व्यक्ती वा संघटना हे शब्दांचे खेळ आहेत.... बाबरी पतन आणि १९९२ चे बॉम्ब्स्फोट यांचा परस्परसंबंध सूर्यप्रकाशाइतका स्पष्ट असताना कोंबडे झाकण्याचा प्रयत्न कशापायी?

मी शब्द वापरताना त्याला अर्थ असलेले वापरलेत. खेळ करायला वापरत नाही. अशा मोठ्या कारवाया (एकाच वेळी अनेक ठिकाणी बेकायदेशीर स्फोटके आणून उडवणे) एखादी व्यक्ती करत नसते. त्याच्या मागे संघटना असाव्या लागतात. बाबरीचा आणि १९९३चे (९२चे नाही) बाँबस्फोट यांचा काही संबंध नाही तर हा संबंध दाउद्च्या माफिया टोळीला मुंबई पोलीसांकडून मिळालेल्या तत्कालीन शेवटच्या धक्क्याला उत्तर म्हणून आहे हेच वरती दाखवून दिले आहे. परत म्हणतो की एकाही अतिरेकी संघटनेने ते हल्ले बाबरी मशिदीला उत्तर म्हणून केलेत असे जाहीर केले नव्हते. अगदी आत्ता पण "डेक्कन मुजाहीदीन" ने पाठवलेल्या इ-मेल प्रमाणे त्यांना त्यांचे सर्व मुजाहीदीन तुरूंगातून सोडवून हवेत अशी एक अट आहे आणि हे मुजाहीदीन हे काश्मिरसंबधात कारवाया करतात हे आपल्याला माहीत असेलच.

सुनील's picture

5 Dec 2008 - 2:13 pm | सुनील

माझे देखील तेच म्हणणे आहे की आपल्यासारखी माणसे बाबरीकडे बोट दाखवत आज ज्यांच्यामुळे इतकी निष्पाप माणसे मेली, पोलीस मेले त्या गुन्हेगारांविरुद्ध ठोस पावले उचला म्हणायच्या ऐवजी ज्या गोष्टीचा संबंध नाही ते दाखवून हे अतिरेक्यांचे कोंबडे झाकण्याचा प्रयत्न करत आहात

कृपया माझ्या कोठल्या प्रतिसादातून मी गुन्हेगारांविरुद्ध ठोस पावले उचलू नये असे म्हतले ते दाखवून द्यावी, ही विनंती.

बाबरीकांडापासून हे सर्व सुरू झाले असे म्हणणे म्हणजे १९९२ च्या बॉम्बस्फोटापासून सुरू झालेल्या दहशतवादाचे समर्थन करणे असे आपणास का वाटावे, हे कळत नाही.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विकास's picture

5 Dec 2008 - 7:54 pm | विकास

कृपया माझ्या कोठल्या प्रतिसादातून मी गुन्हेगारांविरुद्ध ठोस पावले उचलू नये असे म्हतले ते दाखवून द्यावी, ही विनंती.

आपण गुन्हेगारांबद्दल अथवा दहशतवादांबद्दल ठोस पावले उचलली पाहीजेत असे पण म्हणाला असाल तर गोष्ट वेगळी आहे...

बाबरीकांडापासून हे सर्व सुरू झाले असे म्हणणे म्हणजे १९९२ च्या बॉम्बस्फोटापासून सुरू झालेल्या दहशतवादाचे समर्थन करणे असे आपणास का वाटावे, हे कळत नाही.

मला सांगा जर कोणी मुंबई दंगलीचे विश्लेषण करताना राधाबाई चाळ आणली, गुजरात दंगलीचे विश्लेषण करताना गोध्रा रेल्वे प्रसंग आणला तर ते योग्य आहे का? त्या त्या वेळेस ज्या काही हिंसक कारवाया चालल्या असतील तेंव्हा त्यांना त्या एकाच मुद्द्यावरून विरोध करून कुठलेही विश्लेषण देत न बसणे योग्य नाही का?

पण त्या ऐवजी बाबरी मशिद आणून कडवे हिंदू म्हणायचे आणि आत्ता जे काही झाले त्याला जबाबदार असणार्‍यांना साधे दहशतवादी पण म्हणायचे नाही, गुन्हेगार म्हणायचे? हे काय योग्य वाटते? ते काय सीएसटीवर पाकीटमार करत होते का मंगळसुत्री खेचत होते? ते दहशत तयार करत होते, ते राष्ट्रविरोधी आणि मानवता विरोधी कारवाया करत होते, त्यांना आधी गुन्हेगार म्हणण्याऐवजी दहशतवादी म्हणा मग पुढे बोलू.

सुनील's picture

5 Dec 2008 - 8:30 pm | सुनील

त्यांना आधी गुन्हेगार म्हणण्याऐवजी दहशतवादी म्हणा मग पुढे बोलू.

कृपया मी याच धाग्यावर दिलेला पहिला प्रतिसाद पुन्हा एकवार वाचा - http://misalpav.com/comment/reply/4939/71856

त्यातील एक वाक्य असे आहे -
परंतु, आंतरराष्ट्रीय परिमाण लाभलेल्या संघटीत दहशतवादाची चुणूक १९९३ च्या बॉम्बस्फोटातच दिसली

असो, हिंदुत्ववादी नसणे म्हणजे दहशतवाद्यांचे मित्र असणे किंवा दहशतवाचा विरोध करण्यासाठी हिंदुत्ववादी असणे आवश्यक आहे, अशी काहिशी आपली समजूत दिसते. तशी ती नसेल, तर उत्तम. पण असेल, तर ती समजूत चुकीची आहे, असे सांगावेसे वाटते.

(रूढार्थाने हिंदुत्ववादी नसलेला, हिंदू धर्माचा रास्त अभिमानी) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विकास's picture

5 Dec 2008 - 9:38 pm | विकास

असो, हिंदुत्ववादी नसणे म्हणजे दहशतवाद्यांचे मित्र असणे किंवा दहशतवाचा विरोध करण्यासाठी हिंदुत्ववादी असणे आवश्यक आहे, अशी काहिशी आपली समजूत दिसते. तशी ती नसेल, तर उत्तम. पण असेल, तर ती समजूत चुकीची आहे, असे सांगावेसे वाटते.

आपण कोणते विचारधारेचे आहात अथवा नाही, मी कुठल्या विचारधारेचा आहे अथवा नाही याने हा दहशतवाद थांबणार नाही. हिंदूत्ववादी नसणे म्हणजे दहशतवाद्यांचे मित्र असणे असा मी कुठे म्हणालो? उलटे मी धनंजयला त्याच्या चर्चेत काय म्हणालो ते पहा: "मुंबई प्रकरणानंतर्च्या प्रत्येक चर्चेत कोणीतरी एकाबाजूने असते आणि कोणीतरी विरोधात. म्हणले तर दोघेही प्रामाणिक आहेत."

प्रश्न प्रामाणिकपणाचा आणि विचारधारेचा नाही आहे तर, तो आहे चुकीच्या वेळेस चुकीचे विश्लेषण करण्याचा. आणि आपल्याला माहीत असेलच दोन चुकांनी एक बरोबर होत नाही ते...

जेंव्हा आत्ता ऐरणीवर असलेला विषय सोडून - आणि तो दहशतवाद हा आहे, उगाच कुठलेतरी बौद्धीक विश्लेषण करायचे, करायचे ते करायचे वर त्या संदर्भात "कडवे" हिंदू वगैरे शब्द वापरायचे आणि बुद्धीभेद करायचा याला माझा विरोध आहे. तुम्ही कदाचीत म्हणाल की मी (म्हणजे सुनीलने) असे कधी म्हणले?" तर माझे देखील तेच म्हणणे आहे की मी कुठे तुमच्यावर व्यक्तिगत आरोप करतोय ज्यामुळे तुम्हाला वैयक्तिक वाटावे? तसेच माझ्या लिहीण्यात असे कुठे दिसले की ज्यात मी मुसलमानांच्या विरोधात आहे आणि त्या संदर्भात हिंदुंची आणि त्याहूनही हिंदुत्ववाद्यांची बाजू घेत आहे असे? तसे असते तर मी आमच्या कडील कँडल लाईट व्हिजील मधे मुसलमानी संस्थांशी संपर्क करायला गेलो नसतो...

बरं तुम्ही म्हणालात की आपण आंतरराष्ट्रीय दहशतवादाची चुणूक वगैरे म्हणालात आणि ते खरे आहे. पण त्याच धाग्यात ज्यांनी बाँब उडवले हे सप्रमाण सिद्ध झाले त्यांना "गुन्हेगार"च म्हणालात. त्याने परत माझे काही बिघडत नाही, तो काही विकास-सुनील हा वाद नाही... पण असेच म्हणणारे येथे अथवा इतरत्र ज्या हिंदूंवर अजून साधे आरोपपत्र पण ठेवले गेले नाही त्यांच्या संदर्भात "हिंदू दहशतवादी' म्हणतात आणि त्याला प्रसिद्धी देतात ही दुर्दैवाने वस्तुस्थिती आहे. बरे आज एकही प्रमुख हिंदू पुढारी/पक्ष/संघटना असे म्हणत नाही आहे की सिद्ध झाल्यास त्यांना शिक्षा करू नका म्हणून...पण जे सिद्ध नाही तेथे धर्माच्या नावाने दहशतवादी म्हणायचे आणि जे सिद्ध झाले तेथे "गुन्हेगार" म्हणायचे आणि परत तसे का झाले याची कारणे देत परत इतरांना (म्हणजे हिंदूंनाच) दोषी ठरवायचे. ह्याला बुद्धीभेद आणि समाजभेद म्हणतात.

विचार करा , अशीच कारणे देत जर शिख १९८३च्या दंगलीचा सूड म्हणून अजूनही मारत बसले, तसेच इतर देशात होत राहीले म्हणजे - अमेरिकेने जपान विरुद्ध, जपानने अमेरिकेविरुद्ध, (चुकून दम असला तर) भारताने चीन विरुद्ध करत बसले तर काय होईल आणि प्रत्येक वेळेस अशी कारणे दिली जातील का? याचे उत्तर नाही असे आहे आणि तसेच असायला हवे. पण मग हेच उत्तर आत्ता पण लागू आहे. उगाच बाबरी मशिद प्रकरणाचे थडगे उकरून काढायची गरज नाही किंबहूना ते करून आत्ता ज्यांचे बळी पडलेत त्यांची नकळत क्रूर थट्टाच होत आहे असे वाटते.

याहून जास्त काय लिहू?

आजानुकर्ण's picture

6 Dec 2008 - 12:05 am | आजानुकर्ण

पण असेच म्हणणारे येथे अथवा इतरत्र ज्या हिंदूंवर अजून साधे आरोपपत्र पण ठेवले गेले नाही त्यांच्या संदर्भात "हिंदू दहशतवादी' म्हणतात आणि त्याला प्रसिद्धी देतात ही दुर्दैवाने वस्तुस्थिती आहे. बरे आज एकही प्रमुख हिंदू पुढारी/पक्ष/संघटना असे म्हणत नाही आहे की सिद्ध झाल्यास त्यांना शिक्षा करू नका म्हणून...पण जे सिद्ध नाही तेथे धर्माच्या नावाने दहशतवादी म्हणायचे आणि जे सिद्ध झाले तेथे "गुन्हेगार" म्हणायचे आणि परत तसे का झाले याची कारणे देत परत इतरांना (म्हणजे हिंदूंनाच) दोषी ठरवायचे.

सामनातल्या अग्रलेखातल्या शेवटच्या परिच्छेदाबद्दल काय म्हणायचे आहे?

ठळक वाक्येः
इस्लामी दहशतवादास तोंड देण्यास हिंदू दहशतवादही तयार झाला पाहिजे
इस्लामी आक्रमणाबद्दल फक्त दंड थोपटून नव्हे तर बॉम्ब आपटून तयार असायला हवे.
हिंदुत्त्ववाद्यांनी स्फोट घडवले हे वाचून मन प्रसन्न होते.
फुसक्या बॉम्बचे पीक काढून हिंदूंची इज्जत घालवू नका.

हा काही दिवसांपूर्वीचा नमुना... साध्वी बाईला पकडल्यावर आलेले सामन्यातले सगळे अग्रलेख पाहा. सगळीकडे तिचे समर्थन केले आहे.

आज मुसलमानांना स्टीरीओटाईप करून त्यांच्यावर जसे सरसकट आरोप होत आहेत तसे हिंदूंबद्दल टाळायचे असेल तर अशा प्रवृत्तीला आवर घालायला नको का? ह्या असल्या लोकांमुळे स्वतःला हिंदू म्हणवून घेण्याची लाज वाटते.

विकास's picture

6 Dec 2008 - 1:45 am | विकास

सर्वप्रथम माझे आपणच ठळक केलेले वाक्य पहा (पुन्हा ठळक करून लिहीत आहे): बरे आज एकही प्रमुख हिंदू पुढारी/पक्ष/संघटना असे म्हणत नाही आहे की सिद्ध झाल्यास त्यांना शिक्षा करू नका म्हणून.

तो अग्रलेख तिरकस (सार्कॅस्टीक) आहे, ह्याची आपल्याला कल्पना असेलच, पण तसे धरले नाही तरी, आपण दिलेला संदर्भ हा जास्त करून दहशतवादास (शिवसेना/ठाकर्‍यांचा भाषेत "इस्लामी दहशतवादास") कसे उत्तर देयचे या संदर्भात सामन्यातील अग्रलेखात काय आले आहे.

आता आपण २९ नोव्हेंबरच्या अग्रलेखातील शेवटचा परीच्छेद पहा: येथे संपूर्ण टंकतोय. (परत यात काही शिवसेना/ठाकरे/सामना यांचे मत बरोबर का चूक ह्या संदर्भात नाही, फक्त काय म्हणले ते दाखवण्यासाठी पहा):

काही टिनपाट वृत्तपत्रांनी प्रश्न विचारला आहे की, करकरे यांच्यावर टिका केल्याबद्दल शिवसेना त्यांची माफी मागणार आहे काय? आम्ही हेमंत करकरेसह सर्व पोलीस हुतात्म्यांना साष्टांग दंडवत घातलेच आह, पण पोलिसांना अशा प्रकारे मरणाच्या खाईत ढकलणार्‍या सरकारचा धिक्कार केला आहे. "दहशतवाद विरोधी पथकास 'हिंदू' संघटनांच्या मागे लावून इस्लामी आतंकवादास मोकळे रान देणार्‍या राज्यकर्त्यांची खेटरानेच पूजा करायला हवी. करकरे, कामठे व साळसकर यांनी बेडरपणे दहशतवाद्यांचा सामना केला. आयुष्यभर ज्या बेडरपणे, झुंझारपणे ते जगले, त्याच बेडरपणाने मृत्यूशी अखेरच्या क्षणापर्यंत निकराने झुंझत त्यांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या जीवनाचा कण आणि कण राष्ट्रभक्तीने प्रेतित होता. अशी शूर माणसे अधूनमधून या पृथ्वीवर अवतार घेतात म्हणून मानवजातीला काही आशा आहेत. करकरे, कामठे, साळसकरांच्या हौतात्म्याने आशेचे दिवे जणू विझले आहेत. अतिरेक्यांचे हल्ले आजही सुरूच आहेत व लष्कराचे कमांडोज त्या दोन-पाच इस्लामी दहशतवाद्यांशी तीन दिवस युद्धच करीत आहेत. शेकडो प्रेतांचा खच पडला. रक्ताच्या नद्या वाहील्या. पोलीस व सैनिक मेले. यालाच म्हणतात दहशतवाद व या दहशतवादाचे पूर्ण उच्चाटन करण्याची खरी गरज आहे. सनातन संस्थेच्या साधकांना गडकरी रंगायतनमध्ये फुसके बाँब फोडले म्हणून जरूर कायद्याने शिक्षा ठोठवा. मालेगाव प्रकरणातील आरोपींनाही पुरावा असल्यास शिक्षा द्या, पण जणू काही हेच लोक देश जाळायला निघाले आहेत, हेच लोक दहशतवाद घडवीत असल्याचा प्रचार शिगेला नेउन काय मिळवले? हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांना उलटे लटकवून मारलेत. त्या बद्दल आम्ही शाब्दिक टिका केली. पण इस्लामी दहशतवाद्यांनी चोबीस तासात मुंबईस जखमी केले व पोलीस अधिकार्‍यांना ठार केले. आम्ही त्याला "हौतात्म्य" म्हणतो व त्या हौतात्म्यावर श्रद्धेने, आदराने अश्रूंचा अभिषेक करून रे. टिळकांच्या शब्दात इतकेच सांगतो की, 'जिंकुनी मरणाला, जीव कुडीतून गेला!'

आता विरोधी पक्षनेते आणि भाजपचे अडवानी काय म्हणलेत ते पहा: "New Delhi, October 31:: Talking to reporters, BJP's Prime Ministerial candidate L K Advani said on Friday that if the controversial Sadhvi Pragya Singh Thakur is found guilty, she should be punished.

Advani went on to say that she has nothing to do with the BJP and if any one from any Sangh outfit found guilty of any crime that person should be brought to book. "

रा.स्व. संघाचे आत्ता गुगलल्यावर जे काही मिळाले त्याप्रमाणे त्यांच्या प्रेस रिलीज मधे असे म्हणले आहेः "Ever since this turn of events took place in the Malegaon case there has been an unrelenting cacophony about the rise of so-called 'Hindu Terror' and the involvement of the RSS and other Hindu organizations in terrorist activities not only at Malegaon but also at several other places. It is an article of faith for the RSS that it will never sponsor or support any form of violence. Being a law abiding organization committed to peace and social harmony we took a principled stand that the investigations into the case must be conducted thoroughly and professionally and truth brought out."

विहीपचे अधिकृत आत्तातरी मिळाले नाही, पण त्यांनी इतकेच म्हणलेले दिसले की, 'महीना होऊन गेला तरी आरोपपत्र ठेवले नाही, कुठल्याही अतिरेक्याची नार्को चाचणी केली जात नाही (असे ते म्हणतात, मला माहीत नाही) तर मग साध्वीची का?'

तुम्हीच दाखवा की माझे जे वर ठळक केलेले वाक्य आहे त्यात नक्की काय चूक आहे ते.

आज मुसलमानांना स्टीरीओटाईप करून त्यांच्यावर जसे सरसकट आरोप होत आहेत तसे हिंदूंबद्दल टाळायचे असेल तर अशा प्रवृत्तीला आवर घालायला नको का? ह्या असल्या लोकांमुळे स्वतःला हिंदू म्हणवून घेण्याची लाज वाटते.

स्टीरीओटाईप करयाचाच प्रश्न असेल तर मग हिंदू दहशतवाद, कडवे हिंदू असा सरसकट शिक्का मारताना काय होत असते? तेंव्हा लाजाळू पणा कुठे जातो? 'जिथे आग असते तेथे धूर असतो' हे आपल्याला माहीत असेलच. बरं मी जे काही या लेखात म्हणले आहे त्यात मुसलमानांना मुसलमान म्हणून कुठे स्टीरीओटाईप केले आहे? किंबहूना माझे म्हणणे आहे की दाऊद हा मुसलमान नाहीच (त्याला आता सेक्युलर म्हणायचे का ते तुम्ही ठरवा, :-) तो हिंदू नक्कीच नाही!). जे काही झाले आहे त्याची कारणे माझ्या लेखी भूराजकीय आहेत आणि त्यात स्पष्ट म्हणले नसले तरी आंतर्राष्ट्रीय तस्करी आहे.

पण त्यावर बोलायचे नाही. परत परत बाबरी बाबरी करत हिंदूंना झोडपायचे आणि आत्ता ऐरणीवर असलेल्या दहशतवादाच्या प्रश्नाला बगल देयची. हा काय बुद्धीवाद आहे? असला तर तो लाजीरवाणा आहे इतकेच म्हणून थांबतो.

आजानुकर्ण's picture

6 Dec 2008 - 2:09 am | आजानुकर्ण

सामन्याला अशी उपरती होणे स्वाभाविकच आहे. मरेपर्यंत करकरेंना शिव्या घातल्यानंतर आता तोंड कुठे काळे करणार.

ही बातमी देखील वाचाः
http://www.expressbuzz.com/edition/story.aspx?Title=Karkare+was+disturbe...

सामना पेपरात उघडउघड हिंदूंनी दहशतवादी व्हावे अशी चिथावणी देण्यात येते... अजून दहशतवादाच्या समर्थनाचे काय पुरावे हवेत.

विकास's picture

6 Dec 2008 - 3:46 am | विकास

सामन्याला अशी उपरती होणे स्वाभाविकच आहे. मरेपर्यंत करकरेंना शिव्या घातल्यानंतर आता तोंड कुठे काळे करणार.

एक उदाहरण द्या ज्यामधे करकर्‍यांना शिव्या दिल्या आहेत. ज्या अर्थी इतके बोलले जाते त्या अर्थी करकर्‍यांना शिव्या दिल्या असतील असे मला वाटले होते आणि अजूनही वाटते. पण म्हणून जेंव्हा मी माझ्या उत्सुकतेपोटी शोधायचा प्रयत्न केला आणि एकही दुवा मिळाला नाही. आपल्याला मिळाला तर धन्यवाद पण मिळाला नाही तर तसे अवश्य सांगा.

एटीस ला नावे ठेवली आहेत आणि ती का ते त्यांनी स्पष्ट केले आहे. जे साध्वीबरोबर वागले गेले असते ते अफझलगुरू बरोबर वागले गेले असते तर एटीस आणि सरकारला जेव्हढ्या सुडोसेक्युलर्सने शिव्या दिल्या असत्या तितक्याच त्यांनी दिल्या आहेत.

आणि हो आपल्या सादप्रतिसादातील"रे आज एकही प्रमुख हिंदू पुढारी/पक्ष/संघटना असे म्हणत नाही आहे की सिद्ध झाल्यास त्यांना शिक्षा करू नका म्हणून." या मुद्द्याचा आणि आपल्या वरील भाष्याचा काही संबंध नाही हे आहेच...

कौंतेय's picture

20 Feb 2009 - 6:51 am | कौंतेय

>>जे साध्वीबरोबर वागले गेले असते ते अफझलगुरू बरोबर वागले गेले असते तर एटीस आणि सरकारला जेव्हढ्या सुडोसेक्युलर्सने शिव्या दिल्या असत्या तितक्याच त्यांनी दिल्या आहेत.

म्हणजे नक्की काय करायला हवे होते साध्वीला? साध्वी आणि अफजलगुरू मध्ये असा काय भेदभाव केला म्हणे एटीएस ने?

विकास's picture

20 Feb 2009 - 6:18 pm | विकास

म्हणजे नक्की काय करायला हवे होते साध्वीला? साध्वी आणि अफजलगुरू मध्ये असा काय भेदभाव केला म्हणे एटीएस ने?

मी फक्त एटीस म्हणले नाही अर एटीस आणि सरकार असे म्हणले आहे. एटीस आणि कुठल्याही कायदा संरक्षण (पोलीस इत्यादी) चे काम हे गुन्हेगारांना शोधणे, त्यांचा गुन्हा शाबीत करण्यासाठी गोळा केलेला पुरावा हा न्यायालयात सादर करणे असते. पत्रकारांसमोर जाऊन गुन्हा शाबीत होण्याआधीच गुन्हेगार असल्यासारखे बोलणे, आरोपपत्र महिनोंमहीने अगदी योग्य कारणांमुळे ठेवता आले नाही तरी मधल्याकाळात बातम्या फोडणे वगैरे अनुचीत वाटते. हे अर्थातच साध्वीबरोबर झाले आहे.

अफझलगुरूचे गुन्हे हे सर्वोच्च न्यायालयापर्यंत शाबीत झालेत तरी देखील तो निर्णय, त्यातील पुरावे मान्य नाही म्हणत सुडोसेक्युलर्स आरडाओरडा करत आहेत.

कौंतेय's picture

22 Feb 2009 - 3:28 am | कौंतेय

मी फक्त एटीस म्हणले नाही अर एटीस आणि सरकार असे म्हणले आहे.

माझा प्रतिसाद हा फक्त एटीएस संबधीत आहे. सरकार वगैरे मधे आणण्यात काय हशील? पुन्हा पुन्हा सुडो सेक्युलर्सचा मु्द्दा आणुन तुम्ही तेच तेच उगाळत आहात.

पत्रकारांसमोर जाऊन गुन्हा शाबीत होण्याआधीच गुन्हेगार असल्यासारखे बोलणे, आरोपपत्र महिनोंमहीने अगदी योग्य कारणांमुळे ठेवता आले नाही तरी मधल्याकाळात बातम्या फोडणे वगैरे अनुचीत वाटते.

ह्या सगळ्यात एटिएसचा कुठे आणि कसा सहभाग ह्याच दुवे द्या.

विकास's picture

23 Feb 2009 - 7:12 am | विकास

माझे सुरवातीचे (वरील अजानुकर्णाला दिलेल्या प्रतिसादातील) वाक्य - "...जे साध्वीबरोबर वागले गेले असते ते अफझलगुरू बरोबर वागले गेले असते तर एटीस आणि सरकारला जेव्हढ्या सुडोसेक्युलर्सने शिव्या दिल्या असत्या तितक्याच त्यांनी दिल्या आहेत..."

त्यावर तुमचे म्हणणे -".. साध्वी आणि अफजलगुरू मध्ये असा काय भेदभाव केला म्हणे एटीएस ने?"

त्यावर माझे स्पष्टीकरण - "...मी फक्त एटीस म्हणले नाही अर एटीस आणि सरकार असे म्हणले आहे."

त्यावर परत तुमचे तेच:- "माझा प्रतिसाद हा फक्त एटीएस संबधीत आहे. सरकार वगैरे मधे आणण्यात काय हशील?"

आता खालील उत्तर Smile

सर्वप्रथम एटीएस हा सरकारचा भाग आहेतच हे आपण दोघेही लक्षात ठेवूया. दुसरा भाग असा की एकदा गुन्हा शाबीत झाल्यावर कायद्याप्रमाणे जास्तीत जास्त शिक्षा झाली तरी काहीच चूक नाही. मग तो अफझल गुरू असोत अथवा साध्वी प्रज्ञा...असे माझे मत आहे. मात्र ते गुन्हा कायद्याने शाबीत झाल्यावर. त्या आधी कोणाला पण पकडले तरी तो/ती कथीत गुन्हेगार असतात आणि पोलीसांनी त्या संबंधात उलट सुलट बाहेर बोलणे अयोग्य आहे, कदाचीत बेकायदेशीर पण ठरू शकेल. किंबहूना त्यांना ते अडचणीत आणणारे पण ठरू शकेल. त्यांचे काम गुन्हे अन्वेषण करणे आहे लोकांसमोर जाऊन कुणालाच "ब्रँड" करणे नाही...

बाकी स्पष्टीकरण आधीच दिले आहेच की, "पत्रकारांसमोर जाऊन गुन्हा शाबीत होण्याआधीच गुन्हेगार असल्यासारखे बोलणे, आरोपपत्र महिनोंमहीने अगदी योग्य कारणांमुळे ठेवता आले नाही तरी मधल्याकाळात बातम्या फोडणे वगैरे अनुचीत वाटते."

आता आपला प्रश्न हे कशाच्या जीवावर. तर सातत्याने येणार्‍या बातम्यांच्या जीवावर. मला सर्व बातम्या शोधायला वेळ नाही, हौस असल्यास अवश्य पहा. एक त्याच संदर्भातील आणि माझा मुद्दा स्पष्ट करणारी बातमी खाली देत आहे:


ATS quizzes Muthalik on Malegaon blast

MANGALORE: A team from the Maharashtra Anti-Terrorism Squad on Saturday interrogated Sri Ram Sene chief Pramod Muthalik here on Saturday for over two hours on his suspected links to the Malegaon blast.

According to ATS sources, Mr. Muthalik remained calm and denied any links to the Malegaon blasts.

When he was asked about the blast accused, Lt. Col. Srikant Prasad Purohit, he reportedly said, “I saw him for the first time on television channels and newspapers after you accused him of being behind the Malegaon blast.”

The investigators also asked him about the purported telephone conversation where Purohit dwells on the “good work being done by Muthalik in Karnataka.” Mr. Muthalik was believed to have said, “He need not know me personally to be aware of the good work that I am doing.”

.....
» पुन्हा पुन्हा सुडो सेक्युलर्सचा मु्द्दा आणुन तुम्ही तेच तेच उगाळत आहात.

कारण या समस्येचे ते मूळ आहेत म्हणून

कौंतेय's picture

26 Feb 2009 - 10:56 pm | कौंतेय

बाकी स्पष्टीकरण आधीच दिले आहेच की, "पत्रकारांसमोर जाऊन गुन्हा शाबीत होण्याआधीच गुन्हेगार असल्यासारखे बोलणे, आरोपपत्र महिनोंमहीने अगदी योग्य कारणांमुळे ठेवता आले नाही तरी मधल्याकाळात बातम्या फोडणे वगैरे अनुचीत वाटते."

तुम्ही दिलेल्या बातमीत हे कुठेही नाही.

विकास's picture

27 Feb 2009 - 3:26 am | विकास

आता आपला प्रश्न हे कशाच्या जीवावर. तर सातत्याने येणार्‍या बातम्यांच्या जीवावर. मला सर्व बातम्या शोधायला वेळ नाही, हौस असल्यास अवश्य पहा. एक त्याच संदर्भातील आणि माझा मुद्दा स्पष्ट करणारी बातमी खाली देत आहे: आणि वरचा प्रतिसाद वाचा.

या पुढे या विषयावर आपण नवीन चर्चा चालू केल्यास अवश्य लिहीन , येथे ट्रॅकींग करणे अवघड जाते. तुम्हाला लिहीत बसायचे असले तर अवश्य बसा.

धम्मकलाडू's picture

4 Dec 2008 - 11:09 am | धम्मकलाडू

अगदी बरोब्बर!

संबंधितांनी 'पाञ्चजन्य' सोडून मोदी, तोगडियांची भाषणं ऐकून 'ते' उसळले! ही 'मटा'तली बातमी वाचावी. :):):)

तर ३० लाख काश्मिरी पंडीतांवर स्वतःच्या घरातून बाहेर पडायची आणि स्वतःच्याच देशात निर्वासीत म्हणून रहायची वेळ आली.

जम्मू-काश्मिर राज्याची आजची लोकसंख्या सुमारे १ कोटी आहे. हे लक्षात घेतले तर, ३० लाख हा आकडा बरोबर असेल असे वाटत नाही.

यावर आता काय बोलावे!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मोदी, तोगाडियांची भाषणे ऐकून 'ते' चवताळतात आणि हाफिज सईदची 'भारताला केवळ बळाचीच भाषा समजते' ही दर्पोक्ती ऐकूनही आम्ही शांतच. इतकेच काय 'ते' (अवघे १० -१५ जण) मुंबईत येतात, २००-२५० लोकांच्या कत्तली करतात, पोलिस, एन्.एस्.जी कमांडोंना ६० तास झुलवत ठेवतात तरीही आपण ढिम्मच. आणि वर आपण मोदी-तोगाडियांना 'त्यांना' चिथावल्याबद्दल जबाबदार धरणार!

धर्मनिरपेक्षतावाद्यांनो एकदाचे जाहिर करून टाका की
१. हिंदूंनी स्वतःच आपल्या देशाची फाळणी केली आणि पाकिस्तान-बांगलादेशाचे दान त्यांना दिले.
२. दिले तेवढे दान कमी वाटल्यामुळे नंतर हिंदूंनी आपल्या जुलमी राजवटीतून आझाद काश्मीरची मुक्तता केली. आजही काश्मीर इतकी वर्षे दडपशाहीने ताब्यात ठेवल्याचा हिंदूंना पश्चात्ताप होत असून हवे असेल तर काश्मीर खोरे, आसाम किंवा त्यांना पाहिजे तो भाग द्यायची तयारी हिंदूंनी ठेवली पाहिजे.
३. फाळणीच्या वेळी आपल्याच काही लाख लोकांना हिंदूंनीच ठार मारले.
४. हजारो लोकांनी स्वखुषीने धर्मांतर केले.
५. हिंदूंनीच आपली शेकडो मंदिरे पाडली आणि ठिकठिकाणी मशिदी उभारल्या.
६. कलकत्त्यातील प्रत्यक्ष कृतीदिनापासून २ महिन्यांपूर्वी झालेली धुळ्यातील आणि ठाण्यातील राबोडीतील दंगल या सर्व गोष्टी खरोखरच घडल्याच नव्हत्या. तर हा सर्व हिंदू धर्मांधांनी मुस्लिमांविरुध्द मते कलुषित व्हावीत म्हणून काही कपोलकल्पित कहाण्या रचून केलेल्या प्रचाराचा एक भाग आहे.

तेव्हा तरी तुम्हा धर्मनिरपेक्षतावाद्यांचे समाधान होईल का पामर हिंदूंनी अजून काही त्याग करावा अशी तुमची अपेक्षा आहे?

पूर्वी माझा मराठी संकेतस्थळांवर यायचा माफक उद्देश मायबोली मराठीतून इतरांशी संवाद साधून टाईमपास करावा असा होता. पण आता धर्मनिरपेक्षतावादी (खरं म्हणजे हिंदूविरोधी) लोकांचे पितळ उघडे पाडणे हा ही एक नवीन उद्देश झाला आहे.

(धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या कारवायांमुळे वैतागलेला) विल्यम जेफरसन क्लिंटन

आजानुकर्ण's picture

5 Dec 2008 - 12:46 am | आजानुकर्ण

पूर्वी माझा मराठी संकेतस्थळांवर यायचा माफक उद्देश मायबोली मराठीतून इतरांशी संवाद साधून टाईमपास करावा असा होता. पण आता धर्मनिरपेक्षतावादी (खरं म्हणजे हिंदूविरोधी) लोकांचे पितळ उघडे पाडणे हा ही एक नवीन उद्देश झाला आहे.

माझाही उद्देश असाच आहे. हिंदुत्त्वाची राजकीय दुकानदारी करून 'हिंदुत्त्व' या शब्दाला व एकंदर हिंदुत्त्वाला कमीपणा आणणाऱ्या बारतीय जंता पक्षा सारख्या पक्षांचे पितळ उघडे पाडणे व हिंदुत्त्वाची बदनामी टाळण्याचा प्रयत्न करणे.

संतां नाही मान । देव मानीं मुसलमान ॥१॥
ऐसे पोटाचे मारिले । देवा आशा विटंबिले ॥धृ॥
घाली लोटांगण । वंदी नीचाचें चरण ॥२॥
तुका म्हणें धर्म । न कळें माजल्याचा भ्रम ॥३॥

विकास's picture

5 Dec 2008 - 2:08 am | विकास

तुमच्या प्रतिसादावर आधीच जे उत्तर दिले ते वाचले असते तर समजले असते की, मी काय म्हणालो ते,

"धन्यवाद! मला ३ लाख म्हणायचे होते. पण आत्ता आपण म्हणल्यावर परत पाहीले तर काश्मिरी पंडीतांच्या मताने ४ लाख आहे. मी मूळ लेखात हा आकडा बदलत आहे." पण कदाचीत, "आपला चष्मा केव्हढा, आपण वाचतो केव्हढे आणि त्यातले न समजता बोलतो/लिहीतो किती" या मधे आपला अंदाज गेला असावा :-). असो.

संबंधितांनी 'पाञ्चजन्य' सोडून मोदी, तोगडियांची भाषणं ऐकून 'ते' उसळले! ही 'मटा'तली बातमी वाचावी.

अस्स अस्स! म्हणजे हे १७०+ निष्पाप माणसांना मारणे, वरीष्ठ पोलीसांना मारणे, त्या ज्यूंना, कोळ्यांना, हालहाल करत मारणे, ताज-ओबेराय आणि इतर नागरी संपत्तीचा विध्वंस करणे, तीन दिवस संपूर्ण देशाला ओलीस ठेवणे, हे आणि याहून ही अधिक केवळ मोदी-तोगाडीयांची भाषणे ऐकून केले असे एकदा म्हणले की पापक्षालन झाले म्हणायचे.

मग काय हो, तसे त्या साध्वीला की अजून कुणाला जर खरेच असेच त्यांचे (म्हणजे अतिरेक्यांचे) वागणे पाहून जर वागावेसे वाटले तर योग्य ठरते का? माझ्या मते नाही. कायदा असा हातात कोणिही कोणत्याही कारणासाठी घेणे आणि निष्पापांना मारणे हे अयोग्य. त्याला कोणतेही कारणे जबाबदार असू शकत नाहीत, त्यात फक्त एकच मानसीक विकृती असते ज्याला द्वेष असे म्हणतात. पण तुम्हाला ते कसे कळणार? आणि कळले तरी कसे वळणार? :-(

मुक्तसुनीत's picture

5 Dec 2008 - 2:14 am | मुक्तसुनीत

विकासराव , उत्तम प्रतिसाद !

अस्स अस्स! म्हणजे हे १७०+ निष्पाप माणसांना मारणे, वरीष्ठ पोलीसांना मारणे, त्या ज्यूंना, कोळ्यांना, हालहाल करत मारणे, ताज-ओबेराय आणि इतर नागरी संपत्तीचा विध्वंस करणे, तीन दिवस संपूर्ण देशाला ओलीस ठेवणे, हे आणि याहून ही अधिक केवळ मोदी-तोगाडीयांची भाषणे ऐकून केले असे एकदा म्हणले की पापक्षालन झाले म्हणायचे.

सोयीस्कर निष्कर्ष काढू नका हो काका. ती बातमी वानगीदाखल होती. वाचून झाली का? झाली असल्यास सांगावे. आणखी बरेच काही वाचण्यासारखे आहे. वाचायला देईन. लोभ असावा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Dec 2008 - 1:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमची क्षमता वाढेल तसे वाचायला देईन.
व्यक्तिगत टीकाटिप्पणी असणारा प्रतिसाद काढून टाकावा किंवा संपादीत करावा अशी संपादक मंडळाला विनंती.

याने काय फरक पडेल. उद्धटपणा तर काढून टाकता येत नाही ना? मुद्दा कुठलाही असो. पगार आणि वाचन विचारण्याचा जो जबरदस्त उद्धटपणा आणि अरेरावी वृत्ती आहे ती कुठून काढणार? दुसर्‍या काही प्रतिसादात येइल परत.
असं स्वतःचे दुर्गुण दाखवायला काय आवडतं देव जाणे. पण हेही खरं की दांभिकपणा नाही कुठे. मी उद्धट आहे हे स्पष्ट आणि बिनधास्त पणे दाखवत राहायचं.

स्वगत : अरेच्या... हे पण व्यक्तिगतच झालं. असो. संपादक मंडळ जे ठरवेल ते मान्य.

धम्मकलाडू's picture

5 Dec 2008 - 3:08 pm | धम्मकलाडू

याने काय फरक पडेल. उद्धटपणा तर काढून टाकता येत नाही ना? मुद्दा कुठलाही असो. पगार आणि वाचन विचारण्याचा जो जबरदस्त उद्धटपणा आणि अरेरावी वृत्ती आहे ती कुठून काढणार? दुसर्‍या काही प्रतिसादात येइल परत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

ही स्वाक्षरी आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मैत्र's picture

6 Dec 2008 - 9:56 am | मैत्र

दिसते आहे. त्यातून वृत्ती ही दिसते. आणि प्रत्येक प्रतिसादात ती स्वाक्षरी पाहून सवयीने विसर पडू नये यासाठी प्रतिसादाचा टोन शक्य तितका उद्धट, कुजका, दुसर्‍या व्यक्तीला झोंबेल असा आणि शिवाय आपण कसे महान या स्वरुपाचा राहील याचा व्यवस्थित काळजी घेणं किंबहुना आटोकाट प्रयत्न करणं. की सरळ शब्दात मुद्द्याला मुद्दा उत्तर द्यायचंच नाही.
सरळ दिसतं हो. पण इतकं धडधडीत पणे वागणं ही मोठी गोष्ट आहे. की बिनधास्त पणे मी दांडगट आहे हे तोंडावर सांगायला हिंमत लागते. की आहे मी असाच. सरळपणा नाहीच आहे. मानलं !
मराठीत एकच शब्द आहे त्याला... असो...

विकास's picture

5 Dec 2008 - 10:44 pm | विकास

सोयीस्कर निष्कर्ष काढू नका हो काका. ती बातमी वानगीदाखल होती. वाचून झाली का? झाली असल्यास सांगावे. आणखी बरेच काही वाचण्यासारखे आहे. तुमची क्षमता वाढेल तसे वाचायला देईन. लोभ असावा.

मी निष्कर्ष काय काढला असे म्हणायचे आहे? मी आपल्याबद्दल त्यात काहीच बोललो नाही तरी मी बरळतो असे का बरं वाटते? मी कुठे असे म्हणालो आहे की आपण, "मोदी-तोगाडीयांची भाषणे ऐकून केले असे एकदा म्हणले की पापक्षालन झाले" असे म्हणताहात म्हणून?

हे दहशतवादी (ह्या संदर्भात कसाब) जेंव्हा,"हिंदूंविरुद्ध चिथवण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांच्या भाषणाचं व्हिडिओ फुटेज दाखवण्यात आलं होतं," असे म्हणतात तेंव्हा, "तसे म्हणल्यावर आपले (म्हणजे कसाब चे) पापक्षालन झाले असे त्याला म्हणायचे आहे" मला सांगा यात काय चूक आहे?

या दहशतवाद्यांना "नाठाळाच्या माथी हाणू काठी" इतके म्हणून चालणार नाही... त्यांना धम्मकलाडूच दिला पाहीजे :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Dec 2008 - 11:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

या दहशतवाद्यांना "नाठाळाच्या माथी हाणू काठी" इतके म्हणून चालणार नाही... त्यांना धम्मकलाडूच दिला पाहीजे
याला गांधीवाद म्हणणार का दहशतवाद्यांचं ब्लॅकमेलिंग? ;-)

प्रदीप's picture

5 Dec 2008 - 10:49 am | प्रदीप

त्यांनी आणि इतरेजनांनी हेही वाचावे. "आम्हाला असे सांगण्यात आले की आपला मोठा भाऊ [भारत] कितीतरी श्रीमंत आहे आणि आपण गरिबी आणि भूक अनुभवतो आहोत".

हे लिहीलेले शिरोधार्ध मानून आता आपण सर्वांनी गरिबी वाढवण्याच्या प्रयत्नात मग्न व्हावे!

सखाराम_गटणे™'s picture

5 Dec 2008 - 2:55 pm | सखाराम_गटणे™

"आम्हाला असे सांगण्यात आले की आपला मोठा भाऊ [भारत] कितीतरी श्रीमंत आहे आणि आपण गरिबी आणि भूक अनुभवतो आहोत".

म्हणुन भावाच्या घरच्यांना मारायचे ??????

सर्किट's picture

5 Dec 2008 - 11:23 pm | सर्किट (not verified)

उगाच प्रमोद महाजन आणि त्याच्या भावाची आठवण झाली.

-- सर्किट

कलंत्री's picture

6 Dec 2008 - 9:24 am | कलंत्री

असे जर त्या अतिरेक्यांना सांगितले असेल तर एक चांगली सुरवात आहे असे मी समजेल. पाकिस्तानच्या गरिबी आणि दारिद्र्याला तेच जबाबदार आहेत. हेही काळाच्या ओघात समजेलच आणि त्यावरचे उत्तर अशा हिंसा हे नसुन योग्य नेतृत्व आणि त्यासाठीची कृती हेच असेल. उदा. भारतातील सहकारी चळवळ, शिक्षण, स्त्रींचा सहभाग, गरिब, दलित यांना आरक्षण इत्यादी इत्यादी.

भारताची स्पर्धा करण्यापेक्षा त्यांचा याबाबतीतला आदर्श त्यांनाही प्रगतीपथावरच आणेल.

( अनंत आशावादी)

प्रदीप's picture

6 Dec 2008 - 11:02 am | प्रदीप

[आपण त्यांचे भाऊ आहोत]असे जर त्या अतिरेक्यांना सांगितले असेल तर एक चांगली सुरवात आहे

मान्य.

पाकिस्तानच्या गरिबी आणि दारिद्र्याला तेच जबाबदार आहेत. हेही काळाच्या ओघात समजेलच आणि त्यावरचे उत्तर अशा हिंसा हे नसुन योग्य नेतृत्व आणि त्यासाठीची कृती हेच असेल

इथे अमान्य. कारण कुठल्या आधारावर असे मानायचे? आतापर्यंतचा त्यांचा इतिहास तसे दर्शवत नाही. तेव्हा ह्या आपल्या आशावादाला आधार काय?

पूर्वापार आम्ही 'समृद्ध पाकिस्तान हा चांगला, जबाबदार शेजारी असेल' असे ऐकत/ वाचत आलो आहोत. पण तसे कधी कोईल कोण जाणे. ते आर्थिक दृष्ट्या सबल झाले (किंवा/आणि आपण 'त्यांच्या प्रेमापायी') मुद्दाम आर्थिक दृष्ट्या गरीब झालो, तरी दहशतवाद करण्याचे नवे मुद्दे उपस्थित होतीलच. येथील अनेक प्रतिसादातून तर असे दिसते आहे, की निव्वळ बाबरी अनेक दशके/शतके पुरून उरेल. नंतर गोध्रा आहेच. मला तरी आतापर्यंतच्या इतिहासातून ह्याबाबरीत (ह्याबाबतीत) 'मूव्हिंग गोलपोस्ट'च दिसतो.

चित्रा's picture

3 Dec 2008 - 9:31 pm | चित्रा
नीलकांत's picture

4 Dec 2008 - 12:50 pm | नीलकांत

विकासराव,
लेख खुप छान आहे. उठसुठ हिंदूंना बडवणार्‍या लोकांनी हा जरूर वाचावा.
केवळ बाबरी मशिदीमुळे भारतातील तसेच जगातील मुसलमान आज म्हणजे २००८ मध्ये (१५ वर्षानंतर ) सुध्दा जर त्याच कारनाने हिंदूंची कत्तल न्यायोचीत ठरवत असतील आणि आमचे सुडो सेक्युलर्स त्याला अनुमोदन देण्यात धन्यता मानत असतील तर ह्या वर कठोर कारवाईशिवाय पर्याय नाही असं मला वाटते.

बाकी जे लोक मुस्लीम दहशतवादाला बाबरीची प्रतिक्रिया म्हणतात त्यांनी -

खुप मागे न जाता केवळ गेल्या पन्नास-शंभर वर्षांतील खालील घटनांचा अभ्यास करावा. मुद्दे देत आहे , गुगलायला सोईचे होईल.

अल कायदा , अयमान अल जवाहीरी , त्याची इजिप्त मधील कारकिर्द, नंतर अफगाणीस्तानातील वास्तव्य, ओसामा बिन लादेन, त्याचं आणि जवाहिरीचं साटं लोटं, सौदीच्या कारभारावरील आक्षेप, त्यात अमेरिकेच्या सैन्य तळाचा मुद्दा, पुढे सद्दामची सौदीतून हकालपट्टी, अफगाणीस्तानातील सोवियत विरूध्दचे युध्द, अमेरिकेचा ओसामाला पाठींबा, तालीबानचा व मुजाहिदीन नावाच्या भस्मासुराचा उदय.

गेले पन्नास वर्षे इस्त्रायलचा प्रश्न, इरानचा आयातुल्ला खोमेणी त्याचे इराणला परतणे आणि पुढील क्रांती ( याचे प्रायोजक कोण होते ?) आज इराणला अण्व्रस्त्र का हवेत ? पाकीस्तानचा १९४८ पासूनचा काश्मिर मिळवण्याचा प्रयत्न. त्यांचं लश्कर आणि आयएसाआयच्या कारवाया.

केवळ धर्मांधताच नाहीतर यासोबतच चालणारी अर्थव्यवस्था, शस्त्रास्त्र आणि अमली पदार्थांचा बाजार, पेट्रोल मधील पैसा. पॅलेस्टाईन असो अथवा पाकिस्तान दहशतवादासाठी होत असलेला पतपुरवठा, यालाच असलेली जागतीकीकरणाची किनार, सत्तासंघर्ष.

याच वेळी भारताचं मवाळ धोरण, भारताचं सतत युध्द टाळण्याचं संयमी धोरण, भारताची प्रगतीकडे वाटचाल. तीनवेळा सरळ युध्द करून अपयश आल्याने १९८८ सालापासूनचं काश्मिर मधील आतंकवादाचं धोरण. त्याला सुरूवातीला जनतेचा प्रतिसाद , पुढे तो कमी होत गेला. आता काश्मिरमध्ये कारवाया करणारे आतंकवादी हे इराण, इराक, अफगाणीस्तान मधील व्यवसायीक लढवय्ये असतात. हा होणारा बदल. हुर्यीयत कॉन्फ्ररंसचे कमी होत जाणारे बळ. शेख अब्दुला पासून ते आज ओमर अब्दुला पर्यंत बदलत गेलेली भुमिका आदींचा अभ्यास व्हावा.

ह्यासोबतच,
अयोध्येचे राममंदीर बांधण्याचे आंदोलन कधी पासून आहे ते बघावे. संघ किंवा विहिंप स्थापन व्हायच्या आधी भारतातील अनेक संत परंपरेतील लोकांनी यासाठी आंदोलने केलेली आहेत.
राममंदीर प्रश्न भाजपने उचलला आणि त्यावर राजकारण केले, हा मुद्दा मान्य मात्र....

यामुळे आम्ही समस्त भारतीयांनी निमुट हे होणारे हल्ले पहावे आणि त्यावर सुध्दा त्यांना फाशीवर न लटकवता त्यांना पि.व्हि. नरसिंह रावांच्या हॉटेलातील बिर्याणी खाऊ घालावे अशी या सर्वांची अपेक्षा असेल तर कृपया माफ करा !!!
यापुढे हे होणे नाही. आज भारतातील सामान्य मानुस प्रतिक्रिया देण्या एवढा तरी समजदार झाला आहे.

लोकस्मृती खुप कमी असते असं म्हणतात. असं असल्यावरसुध्दा येत्या १० महिण्यांतील निवडणुकाबघता कॉग्रेस काहीतरी कठोर पावले उचलेल असं वाटतं. सोबतच यावेळी या दहशतवादाची झळ सामान्य नागरिकांपेक्षा उद्योग जगताला आणि उचभ्रु लोकांना झाल्याने ते सुध्दा भारतात आतंकवाद पसरतो आहे असं आजच साक्षात्कार झाल्यासारखे बोलताहेत. काही का कारण असेनाका, शेवटी काहीतरी कठोर पावले उचलली पाहिजेत.

तुमच्या या लेखात दाऊदचा मुस्लीम वगळता गुन्हेगार म्हणुन परिचय खरोखर खुप छान आहे. प्रत्येकाने याचा विचार करावा. मुंबई पोलीसांनी या गुन्ह्याचा शोध घेतला असता. डिसेंबर च्या आधीच म्हणजे ऑक्टोंबर मध्येच रायगड जिल्ह्यात आरडीएक्स उतरवले गेले होते असं मला आठवतं.
बॉम्बस्फोट करतांना ज्यांचा वापर करण्यात आला होता ते लोक कदाचीत बाबरीमुळे चिडलेले असु शकतात. मात्र स्फोटाचे खरे सुत्रधार जे होते ते अतिशय थंड डोक्याने हे सर्व करीत होते. बाबरी होवो अथवा न होवो. भारताच्या अर्थव्यवस्थेला हादरवण्यासाठी हे स्फोट झालेच असते आणि मुंबईतच झाले असते. त्यामागे धर्म कमी आणि अर्थ जास्त होता.
असो.

लेख छान झाला आहे. मला आवडला.

नीलकांत

धम्मकलाडू's picture

4 Dec 2008 - 1:41 pm | धम्मकलाडू

लेख खुप छान आहे. उठसुठ हिंदूंना बडवणार्‍या लोकांनी हा जरूर वाचावा.

माझ्यामते लेख फालतू आहे. पण कोण हिंदूंना बडवते आहे ते सांगावे?

केवळ बाबरी मशिदीमुळे भारतातील तसेच जगातील मुसलमान आज म्हणजे २००८ मध्ये (१५ वर्षानंतर ) सुध्दा जर त्याच कारनाने हिंदूंची कत्तल न्यायोचीत ठरवत असतील

कोण न्यायोचित ठरवते आहे? संबंध जोडणे आणि न्यायोचित ठरवणे या दोन्ही गोष्टी अगदी वेगळ्या नाहीत काय?

आणि आमचे सुडो सेक्युलर्स त्याला अनुमोदन देण्यात धन्यता मानत असतील तर ह्या वर कठोर कारवाईशिवाय पर्याय नाही असं मला वाटते.

कोण कुणावर कुठली कठोर कारवाई करणार?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

लिखाळ's picture

5 Dec 2008 - 6:17 pm | लिखाळ

नीलकांत,
आपली प्रतिक्रिया आवडली. आपण सांगीतलेल्या मुद्द्यांची सवडीने माहिती सुद्धा करुन घ्यायला आवडेल.

हिंदूंनी अरे ला कारे केले की त्यांच्या पाठीत धपाटे घालून त्यांना गप्प करणारे अनेक हिंदू असतात. हिंदूंनी आवज काढला की अचानक यांना जाग येते आणि समानतेचे सूत्र आठवते. असो....प्रत्येकाचे विचार असतात.
-- लिखाळ.

विकि's picture

5 Dec 2008 - 12:50 am | विकि

अवांतर-दाऊद इब्राहीम कासकर ला बहुतेक गुन्हेगारी जगतात करीअर करायचे होते.म्हणून तो असा वागला.कितीही झाले तरी तो एका पोलीस शिपायाचा मुलगा तसेच तात्यांच्या कोकणातील सुपुत्र होता.त्याने कोकणचो नाव मातीत मिळवल्यान.

आजानुकर्ण's picture

5 Dec 2008 - 12:54 am | आजानुकर्ण

:B तात्यांच्या कोकणातील सुपुत्र होता.

विकास's picture

5 Dec 2008 - 1:32 am | विकास

दाऊद इब्राहीम कासकर ला बहुतेक गुन्हेगारी जगतात करीअर करायचे होते.म्हणून तो असा वागला.कितीही झाले तरी तो एका पोलीस शिपायाचा मुलगा तसेच तात्यांच्या कोकणातील सुपुत्र होता.त्याने कोकणचो नाव मातीत मिळवल्यान.

यातील एक "सुपुत्र" हा मी मुद्राराक्षसाचा विनोद म्हणत सोडून देतो. पण बाकी माझे तेच म्हणणे आहे. दाउदने बाँब उडवले ते बाबरीमशिदी मुळे नाही. एका अर्थी आपण तेच म्हणत आहात असे समजायचे का?

विकि's picture

5 Dec 2008 - 11:01 am | विकि

मला तर वाटते आहे बाबरी तोडल्याचा संबंध बॉम्बस्फोटाशी लागू नये या साठी आपण प्रयत्नशील दिसत आहात. दाऊद ने स्फोट केले ते बाबरीमुळे नाही हे आपण एकवेळ मान्य केल तरी त्याचा पुरेपुर उपयोग पाकिस्तानने करून घेतला हे तर सत्य आहे.
दाऊदने त्यांच्या सांगण्यांप्रमाणे टायगर मेमनला हाताशी धरून दंगलीत झळ पोहोचलेल्यांना किंवा पेटून उठलेल्या तरूणांना संघटीत करून स्फोट केलेच ना. ते तरुण असे काम करण्यासाठी का तयार झाले कारण दंगलीत सर्वात जास्त झळ मुस्लीमांनाच बसली होती. बाबरी मशीद तोडल्याची आणी दंगलीची प्रतिक्रीया म्हणजेच १९९३ चे मुंबई बाँम्बस्फोट असे मान्य करायला जागा आहे(बदल्याची तीव्र भावना) आणि दंगलीची झळ पोहोचलेल्यांनी दाऊद कडून कशावरून मदत मागीतली नसेल.
अवांतर-दाऊद टोळी मुंबईत जेव्हा जोमात होती तेव्हा टोळीत दोन्ही धर्माचे गुंड होते .

सुनील's picture

5 Dec 2008 - 1:26 pm | सुनील

मला तर वाटते आहे बाबरी तोडल्याचा संबंध बॉम्बस्फोटाशी लागू नये या साठी आपण प्रयत्नशील दिसत आहात
त्यांच्या प्रयत्नांच्या आड येण्याचा प्रयत्न मी सोडून दिला आहे!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विकास's picture

5 Dec 2008 - 5:54 pm | विकास

त्यांच्या प्रयत्नांच्या आड येण्याचा प्रयत्न मी सोडून दिला आहे!!

प्रयत्न वाटून आड येयचे नसेल तर नका येऊ पण वस्तुस्थिती अलीप्तपणे लक्षात घ्याल अशी आशा करतो.

विकास's picture

5 Dec 2008 - 5:52 pm | विकास

मला तर वाटते आहे बाबरी तोडल्याचा संबंध बॉम्बस्फोटाशी लागू नये या साठी आपण प्रयत्नशील दिसत आहात.

हा प्रयत्न नाही आहे पण जेंव्हा अर्धसत्य हे पूर्णसत्य म्हणून सांगितले जाते तेंव्हा त्यामागचे खरे कारण काय असते ते सांगण्याचा प्रयत्न आहे. मी अजूनही तेच म्हणत आहे जे सुरवातीला म्हणले, बाबरी मशिद प्रकरणामुळे दाउद अथवा इतर कुठल्याही मुस्लीम अतिरेकी संघटनांनी त्या विरोधात मुंबईत बाँब उडवण्याचे कृत्य केले असे म्हणलेले नाही. कारण तो उद्देश नव्हता.

सुनीलने म्हणल्याप्रमाणे, कदाचीत काही आरोपींनी तसे कोर्टात म्हणले असेल पण बचावासाठी काही बोलले जाऊ शकते. त्यातूनही एखादा प्रामाणिकपणे म्हणला असेल आणि म्हणून आपण म्हणता तसे परत दंगलीची झळ पोहोचलेल्यांनी दाउद कडे मदत मागितली असेल. बाबरी मशिदीपेक्षा नंतरच्या रमाबाई चाळीत अनेकांना जिवंत जाळल्यावर जेंव्हा ४८ तास, सरकार कडून काही केले गेले नाही, (किंबहूना निर्णय घेण्यावरूनपोलीसांचे हात बांधलेलेच ठेवले होते) तेंव्हा झालेल्या दंगलीत जो काही हिंसाचार झाला आणि त्यात जेंव्हा दोन्ही धर्मातील निरपराध व्यक्तींना त्रास झाला, त्याचा फायदा घेऊन काही मुस्लीम तरूणांना जर दाऊदने चिथावले असेल हे मान्य आहे. पण सर्वप्रथम ते दंगलीमुळे झाले, ज्याचे कारण राधाबाई चाळ आणि नंतरचा पहील्या ४८ तासातील एकतर्फी हिंसाचार होता राधाबाई चाळीचे कारण हे आपल्याला माहीत असेलच पण नुसते धार्मिक नव्हते (कदाचीत नव्हतेच) तर बिल्डर हे होते. (तिथे अजून चाळ आहे का हे माहीत आहे का? मला माहीत नाही, हा केवळ प्रश्न आहे...) थोडक्यात बाबरी हे कारण नव्हतेच. परत याचा अर्थ असा घेऊ नये की हे दंगलीचे समर्थन आहे. मी कुठल्याही नागरी हिंसेच्या विरोधातच आहे हे आपल्याला सांगायची गरज नाही, तरी स्पष्ट करतो.

अवांतर-दाऊद टोळी मुंबईत जेव्हा जोमात होती तेव्हा टोळीत दोन्ही धर्माचे गुंड होते .

अगदी १००% मान्य आहे आणि आपण मी जे सुरवातीपासून म्हणत आहे त्यालाच पुष्टी देत आहात. म्हणूनच जेंव्हा "कडवे हिंदू" वगैरे अपशब्द वापरत असे लिहीले जाते, "काही लाख लोक जमून अयोध्येला जातात, बाबरी जमीनदोस्त करतात. यामुळे मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेचीच भावना निर्माण झाली आहे. त्यातूनच दहशतवादी कारवायांमध्ये ते सहभागी झालेत." तेंव्हा त्यात पूर्णसत्य सोडा अर्धसत्य पण नसते ही वस्तिस्थिती दाखवण्याचा उद्देश या लेखात आहे.

विकि's picture

5 Dec 2008 - 6:16 pm | विकि

बाबरी हे कारण नव्हते मग दंगली कशामुळे भडकल्या केवळ जोगेश्वरीतील ती चाळ जाळल्याने. तर नाही.कारण दंगल होणारच होती त्याची तयारी आधीपासूनच झालेली होती.जर तुम्ही म्हणत असाल १९९३च्या स्फोटानंतर बाबरी मशिद प्रकरणामुळे दाउद अथवा इतर कुठल्याही मुस्लीम अतिरेकी संघटनांनी त्या विरोधात मुंबईत बाँब उडवण्याचे कृत्य केले असे म्हणलेले नाही. कारण तो उद्देश नव्हता. मग उद्देश काय होता.
बॉम्बस्फोट ही दंगलीची तसेच बाबरी पाडल्याची प्रतिक्रिया होती .स्फोटात सहभागी असणार्‍यांनी योग्य ते प्रशिक्षण घेतले होते.इथे अतिरेकी संघटनांचा उल्लेख होत नाही कारण यातील बहुसंख्य गुन्हेगार दाऊद धरून स्थानिक(कोकण रायगड,रत्नागिरी जिल्हा)होते. त्यांनी केवळ संघटीत होऊन(अर्थात त्यांच्यात असुरक्षीततेची भावना निर्माण झालीच असणार)सुडाने पेटून उठून हे कृत्य केले.

प्रदीप's picture

5 Dec 2008 - 6:35 pm | प्रदीप

आहे. क्षणभर असे मानून चालू की बाबरीमुळे मुंबईची दंगल उसळली. मग पुढे उसळलेल्या अनेक दंगलींचे काय?

(एक निरीक्षण: अलिकडे भारतात उसळलेल्या अनेक दंगलींचे खापर, तथाकथित सर्वधर्मसमभाव- पुरस्कर्त्यांकडून गोध्रावर फोडले जायचे. पण आता तो स्त्रोत परत बाबरीपर्यंत जाऊ लागला आहे. गेल्या वर्षीच्या निवडणूकीत मोदींचा झालेला सणसणीत विजय तर ह्या बदलाला कारणीभूत नव्हे?)

विकी, भारताबाहेरही अनेक ठिकाणी मुसलमानांतील काही जण दहशतवादी कृत्ये करत असतात, त्यांबद्दल मी येथे लिहीले होते, ते वाचा.

कौंतेय's picture

6 Dec 2008 - 4:12 am | कौंतेय

विकास तुम्ही पुन्हा पुन्हा तेच मुद्दे शद्बांवर शब्द रचुन मांडत आहात.

बाबरी मशीद उध्वस्त करणे तसेच कडव्या हिंदूंच्या इतर कारवाया ह्यांचा सध्याच्या भारतातील दहशतवादात काहीच इन्फ्लुएन्स नाही का? ह्याचे कृपया स्पष्ट उत्तर द्या.

तुमच्या ह्या लेखाचा उद्देश 'दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहे, त्यामागे आंतरराष्ट्रीय कारणे आहेत भारतातील अंतर्गत घडामोडींचा काहीही संबध नाही' असे काहीसे मांडण्याचा आहे असे वाटते. "दहशतवाद आंतरराष्ट्रीय स्तरावरुन भारतात घुसला पण इथल्या कडव्या हिंदूंच्या करामतींमूळे तो घट्ट मूळे रोवत आहे." ह्या विधानाशी तुम्ही सहमत आहात का ते सांगा.

विकास's picture

6 Dec 2008 - 8:47 am | विकास

विकास तुम्ही पुन्हा पुन्हा तेच मुद्दे शद्बांवर शब्द रचुन मांडत आहात.
सत्य एकच आहे, फार तर वेगवेगळ्या शब्दात ते सांगता येईल इतकेच. :-) मुद्दा चुकीचा वाटतो का ते सांगा.

बाबरी मशीद उध्वस्त करणे तसेच कडव्या हिंदूंच्या इतर कारवाया ह्यांचा सध्याच्या भारतातील दहशतवादात काहीच इन्फ्लुएन्स नाही का? ह्याचे कृपया स्पष्ट उत्तर द्या.

  1. बाबरी मशिद, १९९३ ची हिंदू-मुसलमान दंगल आणि अगदी गोध्रा रेल्वेकांडानंतर उसळलेली दंगल याचा परीणाम म्हणून काही व्यक्तिगत पेटून हिंदूंच्या विरुद्ध गेले असते तर आपण म्हणता ते बरोबर आहे. जर संघटना हिंदूंच्या विरुद्ध उठल्या असत्या तर आपण म्हणता ते बरोबर आहे. मात्र दिसताना काय दिसते? ज्या काही दहशतवादी घटना घडल्या त्या कुठल्याही निव्वळ हिंदू म्हणता येईल अशा ठिकाणी झाल्या नाहीत तर सार्वजनीक ठिकाणी झाल्या आणि त्यात, अगदी कालच्या दहशतवादी कारवायात पण निष्पाप मुसलमान धर्मियांनापण आपले प्राण गमवावे लागले. मला सांगा बरं असे धर्माच्या कारणावरून दुसर्‍या धर्माच्या विरुद्ध (चूक-बरोबर, कारणे काही असोत) जे उठले त्यांनी असे सार्वजनीक ठिकाणी खुले आम दहशतवाद करत स्वतःच्या धर्मबांधवांना पण कसे मारले? खुले-आम अशासाठी म्हणत आहे कारण जर स्वतःची ओळख लपवून करायचे असते तर नक्की स्वतःच्या धर्मातील व्यक्तींना पण मुद्दाम मारले असते.
  2. दुसरा भाग असा, गेल्या १७-१८ वर्षात दोन दुर्दैवी अपहरणे झाली ज्यात काही अतिरेक्यांना सोडवण्यात आले. ते अतिरेकी कोण होते? एकतर पाकीस्तानी अथवा काश्मिरी मुजाहीदीन... तसे म्हणाल तर कंदहार प्रकरणाच्या वे़ळेस मुंबई स्फोटातील अटक झालेल्या मुसलमान धर्मियांना तुरूंगात राहून ६-७ वर्षे झाली होती. तरी देखील त्यांना सोडवण्याचा प्रयत्न का बरे झाला नाही? कारण साधे आहे, त्यांना मुंबई आणी मुसलमान धर्माचे काही पडलेले नव्हते, आपण म्हणत असलेल्या कडव्या हिंदूंचे काही पडले नव्हते. त्यांना त्यांच्या तस्करीचे आणि फारतर काश्मिरचे पडले होते/आहे. बाकी धिंगाणा घालत स्वतःच्या द्वेषात भारतीयांना जाळायचा प्रयत्न मग ते कोणच्या का धर्माचे असेनात. याला अपवाद एकच आहे - अक्षरधाम आणि तो का आहे हे स्पष्ट आहे.

तुमच्या ह्या लेखाचा उद्देश 'दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहे, त्यामागे आंतरराष्ट्रीय कारणे आहेत भारतातील अंतर्गत घडामोडींचा काहीही संबध नाही' असे काहीसे मांडण्याचा आहे असे वाटते. "दहशतवाद आंतरराष्ट्रीय स्तरावरुन भारतात घुसला पण इथल्या कडव्या हिंदूंच्या करामतींमूळे तो घट्ट मूळे रोवत आहे." ह्या विधानाशी तुम्ही सहमत आहात का ते सांगा.

मी आपण करीत असलेल्या विधानाशी सहमत नाही. दहापेक्षा जास्तवेळेस सांगून झाले... दहशतवादाला धर्म नसतो. दहशतवाद फोफावायला कडू-गोड-आंबट-तुरट हिंदू आणि तसेच मुसलमान जबाबदार नाहीत तर त्याला जबाबदार आहेत सरकारची कचखाउ धोरणे आणि व्होट बँक पॉलीटीक्स. धर्मांध मुस्लीम, कडवे हिंदू यांच्यामुळे फारतर सामाजीक तणाव निर्माण होऊ शकतात आणि तसे झाले देखील होते, आहेत आणि अजूनही होतील. ते इतर प्रकारच्या समाजभेदात पन होतात. उ.दा. राज ठाकरे विरुद्ध बिहारी, कधीकाळची शिवसेना विरुद्ध दाक्षिणात्य, औरंगाबाद विद्यापिठाला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देणे, वगैरे वगैरे... पण हिंदू-मुसलमान तणाव रहायचे कारण माझ्या लेखी वेगळे आहे. ते आहे सुडोसेक्युलर्स ज्यांनी माध्यमांचा वापर करून दोन समाजात दरी निर्माण केली. परीणामी जशी काही मुसलमानांची प्रतिक्रीया टोकाची झाली तशीच काही हिंदूंची कालांतराने झाली. पण ती प्रतिक्रीया जरी मुसलमानांना कधी भोगावी लागली असली तरी त्याला मूळ कारण आहे सुडोसेक्युलर्स.

कौंतेय's picture

6 Dec 2008 - 9:50 am | कौंतेय

पुन्हा एकदा शब्दांचे बुडबुडे प्रसवित आहात तुम्ही. कडवे हिंदू आणि धर्मांध मुस्लिम हे दोन्हिही तेढ वाढवण्यास कारणीभूत आहेत असे तुम्ही मान्य करता पण तुम्हाला ते पटत नाही असा काहीसा विचित्र युक्तिवाद आहे तुमचा. सरकारची कचखाऊ धोरणे दहशतवादाला पूर्णपणे जवाबदार आहेत असं भासवता तर खापर स्युडो सेक्युलर लोकांवर फोडू इच्छिता. (सरकार हे हिंदू विचारसरणीच्या भाजपाचे देखिल होते हे लक्षात घ्या.) आणि तसेही स्युडो सेक्युलर लोक हे ढोंगीच असतात कडवे हिंदुत्ववादी आणि धर्मांध मुस्लिमांइतकेच, त्यामुळे त्यांना सोडून द्या. खरे सेक्युलर आणि हिंदुत्ववादी ह्यांची तुलना करा आणि तुम्हाला काय वाटले ते सांगा.

मात्र दिसताना काय दिसते? ज्या काही दहशतवादी घटना घडल्या त्या कुठल्याही निव्वळ हिंदू म्हणता येईल अशा ठिकाणी झाल्या नाहीत तर सार्वजनीक ठिकाणी झाल्या आणि त्यात, अगदी कालच्या दहशतवादी कारवायात पण निष्पाप मुसलमान धर्मियांनापण आपले प्राण गमवावे लागले. मला सांगा बरं असे धर्माच्या कारणावरून दुसर्‍या धर्माच्या विरुद्ध (चूक-बरोबर, कारणे काही असोत) जे उठले त्यांनी असे सार्वजनीक ठिकाणी खुले आम दहशतवाद करत स्वतःच्या धर्मबांधवांना पण कसे मारले? खुले-आम अशासाठी म्हणत आहे कारण जर स्वतःची ओळख लपवून करायचे असते तर नक्की स्वतःच्या धर्मातील व्यक्तींना पण मुद्दाम मारले असते.

ह्या युक्तिवादातुन तुम्हाला अतिरेकी हे सेक्युलर होते असे दर्शवायचे आहे का?

प्रदीप's picture

6 Dec 2008 - 1:22 pm | प्रदीप

भारतातील आधुनिक दहशतवादाचे मूळ बाबरीत (अथवा गोध्र्यात) आहे असे म्हणणे एकांगी वाटते. बाबरीने ठिणगी निर्माण केली हे खरे आहे, पण विकास ह्यांनी दर्शवलेल्यानुसार आजूबाजूच्या देशातील घडामोडींमुळे गोळाबारूद अगोदरच तय्यार होते, ठिणगीची आवश्यकता होती, ती मिळाली व पहिली मोठ्ठी दंगल झाली. ह्या अगोदरपासूनच काश्मिरमध्ये खून, बलात्कार, हिंदूंना देशोधडीस लावणे हे सुरू झालेले होतेच. बाबरीच्या दंगलीने सर्वांचे लक्ष तसल्या घटनांकडे ठळकपणे गेले इतकेच. आणि बाबरी नसती तरी दुसर्‍या कुठल्याही निमीत्ताने धार्मिक दंगे झालेच असते.

जगतील मुस्लिमातील धर्मांधांचे कधीपासूनच नेटवर्क बांधणे सुरू आहे. त्यामुळे अनेक देशांतील मुस्लिमांत धर्मविषयक माहितीची देवाण घेवाण होत राहिली आहे. त्यातूनच दहशतवादी एका देशांतून दुसर्‍या देशात जाणे सुरू झाले, व ह्यापुढेही ते तसे होत राहील. इथे हेही लक्षात घेऊया की, हे धर्मांध असली माहिती पुरवतांना कसली बातमी पुरवायची व ती कशी पुरवायची ह्याबद्दल पूर्ण जागरूक असतात. ह्यामुळे काही निवडक घटना त्यांच्या कह्यातील तरूणांना सांगितल्या जातात, त्यांचे हॅमरिंग केले जाते. ह्यात अर्थातच अमेरिका, ब्रिटन, युरोपातील इतर राष्ट्रे आली, रशियातील चेचेन आले, फिलीपिन्समधील मिंदानाओ आले (कालच बातमी वाचली की तेथे एका बांग्लादेशी तरूणाला दहशतवादासाठी अटक करण्यात आली आहे). पण चीनमधे शिंजांगात तेथील मुस्लिमांची जी शतकांनू शतके फुटिरवादी 'चळवळ' सुरू आहे, त्याबद्दल ह्या तरूणांना काहीही माहिती नसते. कारण आर्थिकदृष्ट्या व राजकिय दृष्ट्या चीन हे मध्यपूर्वेतील अरब राष्ट्रांना व पाकिस्तानला दोस्त राष्ट्र वाटत आलेले आहे, तिथे काहीही गडबड करून चालणार नाही. म्हणूनच पाकिस्तानी धर्मांध मुस्लिम तेथील लढ्याबद्दल मूग गिळून आहेत. तुलनेने भारत हे अगदी 'सॉफट टार्गेट'. ही दहशतवादाची खुल्ली प्रयोगशाळा आहे, इथे खेळ खेळणे तुलनेने सोपे आणि कुणी पकडले गेले तरी त्यांची सुंदर व्यवस्था येथील सरकार पहाते. तेव्हा इथे बाहेरून धर्मांध तरूणांना दहशतवादासाठी पाठवणे सोपे. म्हणजे केवळ इथे भारतात धर्माची अस्मिता डिवचली गेली, म्हणून एक मोठी दंगल झाली, व पुढेही त्या त्याच कारणामुळे होतच राहिल्या आहेत, हे म्हणणे प्रश्नाचे सोप्पीकरण आहे.

चेचेन्याच्या निमीत्ताने रशियातही ह्या धर्मांध मुस्लिमांनी दंगेधोपे घडवून आणलेले आहेत अथवा प्रयत्न केलेले आहेत. बेसलानबद्दल सगळ्यांना माहिती आहेच. पण त्यांना २००६ साली से. पीट्सबर्ग येथे जी. ८आ च्या कॉन्फरनसच्या वेळी आता मुंबईत झाले तसेच मोठ्ठ्या प्रमाणात घडवून आणायचे होते. त्यात स्थानिकांचा बरोबरीनेच अनेक रशियाबाहेरील तरूणांचाही अंतर्भाव होता. पण रशितातील संरक्षणयंत्रणेने वेळीच ठाम पावले उचलली, व हा संभाव्य हल्ला उधळून लावला. तिथेही अर्थातच चेचेयातील फुटिरांच्या मागे 'बाबरी' प्रमाणेच काहीतरी कारण उभे केले असावे.

ह्या मुंबईच्या दहशतवादाइतकाच एक खेळ काही वर्षांपूर्वी इंडोनेशियातील बाली येथे खेळला गेला. बाली त मुख्यत्वे हिंदू जनता आहे, आणि तेथे टूरिझम हा मुख्य व्यवसाय आहे. आजूबाजूच्या सर्वच देशांतून व विशेषतः ऑस्ट्रेलियातून तिथे टूरिस्ट जात असतात. २००२ साली तिथे जेमा इस्लामिया ह्या एल. ई. टी. च्या भाईबंद संघटनेने जोरदार स्फोट घडवून आणले, २०० च्या वर माणसे मृत्युमुखी पडली. त्यातील मुख्य आरोपींना पकडून त्यांच्यावर खटला चालला, त्यांना दोषी ठरवले गेले व मृत्युदंडाची शिक्षा सुनवण्यात आली. त्यांनी केलेल्या अपिलाची सुनावणी होऊन ही शिक्षा कायम करण्यात आली. आपल्या येथील सर्वच वर्तमानपत्रांनी ह्याविषयी काही बातमी दिली नाही, पण त्यांच्या ह्या शिक्षेची अंमलबजावणी गेल्या महिन्याच्या ९ तारखेस करण्यात आली. लक्षात घ्या, इंडोनेशिया हा जगातील सर्वाधिक जास्त मुस्लिम लोकसंख्येचा मुस्लिम देश आहे, व अलिकडे तेथील मूलतत्ववाद वाढीला लागला आहे. आरोपींनी सर्व अपिले हरल्यावर निदान आमच्या शरियानुसार शिरच्छेद व्हावा, अशी मागणी केली होती, तिही फेटाळली गेली व कायद्यानुसार त्यांच्या देहांत शिक्षेची अंमलबजावणी बंदुकीच्या गोळींनी झाली. तेथील सरकारने दंगेधोपे होतील म्हणून जय्यता तयारी ठेवली होती, पण काहीही विपरित झालेले नाही. हे सगळे आपल्याकडे अफझल गुरूच्या संर्भात जो घोळ चालू आहे, त्यावर उठून दिसते (म्हणून इथे सविस्तर लिहीले).

भारतातील आधुनिक दहशतवाद भारताला जगापासून वेगळे करून पहाता येणार नाही. मुस्लिम धर्मांधाचे नेटवर्क, माहितीच्या आदानप्रदानाची नवनवी साधने जसजशी उपलब्ध होत आहेत, तसतसे जास्त एकसंध होत राहिल. शस्त्रात्रांची वाढती आंतरराष्ट्रिय उलाढाल ह्यामुळे असले प्रयोग होत राहतील असे वाटते.

स्थानिक मुस्लिमांचा विश्वास संपादन करण्यासाठी आपणही काही प्रामाणिक पाऊले उचलली पाहिजेत. ह्यासाठी आपल्या देशाचे नेतृत्व कुण्या खंबीर व दूरदर्शी व्यक्तिकडे असावेच, पण मुस्लिमांतूनच कुणी दूरदर्शी नेता निर्माण होण्याची आवश्यकता आहे. आपल्यावर येथे निव्वळ अन्यायच होत राहिला आहे, ही नकारात्मक भावना सोडून त्या समाजास सकारात्मक विचारांकडे व कृतिंकडे वळवण्याची जरूरी आहे. हे त्याच्च्यातीलच कुणी नेता करू शकतो, इतर बाहेरून कॅटॅलिस्टचे कार्य करू शकतात.

कौंतेय's picture

7 Dec 2008 - 10:34 pm | कौंतेय

इतका लांबलचक प्रतिसाद देउन तुम्ही काय साधलेत तेच कळले नाही. आंतरराष्ट्रीय दहशतवाद आंतरराष्ट्रीय स्तरावरुनच भारतात आला. त्याची पाळेमुळे तिकडेच आहेत हे मला देखिल पूर्ण मान्य आहे, पण ति इथे घट्ट रोवण्यात इथल्या कडव्या धर्मांध हिंदूंनी देखिल मदत केली. आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं ते कार्ट असा पूर्वग्रह ठेवू नका.

प्रदीप's picture

8 Dec 2008 - 7:26 pm | प्रदीप

आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं ते कार्ट असा पूर्वग्रह ठेवू नका.

ह्या वाक्यात तुम्हाला जे अभिप्रेत आहे, ते साफ चुकिचे आहे, व मी त्याचा निषेध करतो. एकाध्या व्यक्तिचा धर्म ही त्याची वैयक्तिक बाब आहे व म्हणून ती घरापुरतीच मर्यादित ठेवावी, असे मी समजतो. येथील माझ्या कुठल्या वक्तव्याचा आधार घेऊन आपण हे लिहीले आहे, हे मला समजले नाही. लिहीण्याच्या (अथवा कॉपी अँड पेस्ट करण्याच्या) नादात तुम्ही हे लिहीले असेल असे समजून मी हे सोडून देत आहे. (ह्याबाबत अधिक चर्चा करायचीच असेल तर ती व्य. नि. अथवा खरडीतून करावी, कारण त्याचा ह्या चर्चाप्रस्तावाशी काहीही संबंध नाही).

आपण सर्वच येथे शक्य तेव्हढ्या अलिप्तपणे ह्या प्रश्नाकडे बघत आहोत, असे मी तरी मानतो. मला वाटते आपल्यात मतभेद आहेत ते दोन मुद्द्यांविषयी. पहिला हा की भारतात सर्रास दहशतवाद कधीपासून सुरू झाला असे म्हणावे. व दुसरा, दंगलीच्या मागील दिल्या जाणार्‍या कारणांना कितपत वजन द्यावे हा.

एका मोठ्ठ्या शहरात एकाच वेळी अनेक हल्ले केले म्हणजेच दहशतवाद होतो असे नाही. मुंबईच्या दंगलीच्याही काही वर्षे आधी भारतात, काश्मिरात दहशतवाद इंपोर्ट झालेला होता (सुमारे १९८९ सालापासून). तेव्हा तर बाबरी हे कारण नव्हते.

दुसरा मुद्दा धार्मिक अस्मिता दुखावणे आणि / किंवा आपल्या धर्माच्या माणसांची केलेली छळणूक ही कारणे आपल्याला वारंवार दिली जातात त्यात वास्तव किती व अतिशयोक्ति किती ? (मी हे अगोदरच मान्य केले आहे, की बाबरीचे मुंबईच्या दंगलीला निमीत्त मिळाले, प्रश्न आहे तो पुन्हा पुन्हा होणार्‍या दंगलींच्या मागे तेच कारण दिले जाते तेव्हा).

मी चीनचे उदाहरण अशासाठी दिलेले होते की तेथे अनेक शतकांपासून ह्या दोन्ही गोष्टी सुरू आहेत, पण धर्मांध मुस्लिमांचे राजकिय, आर्थिक हितसंबंध तेथे गुंतलेले आहेत तसेच तिथे सरकारची संरक्षण यंत्रणा अत्यंत खंबीर आहे. तेव्हा हीच कारणे देण्यासारखी असूनसुद्धा तिथे दहशतवाद इंपोर्ट करण्यात आलेला नाही. तेथील स्थानिक विघुरांनी काही तुरळक स्फोट वगैरे बैजिंग ऑलिंपिक्सच्या आधी देशाच्या पश्चिम प्रांतात (गांसू, शिन्ज्यांग इ.) घडवून आणले खरे पण सक्षम संरक्षण यंत्रणेमुळे ते तेव्हढ्यावरच निभावले.

रशिया, इंग्लंड इतर युरोपीय देश व अमेरिका ह्या सगळ्या देशातही काही पहिल्या दंगली असल्याच कारणांमुळे केल्या गेल्या (अफगाणीस्तान, अर्थात भाईबंदांवर हल्ले) . पण तेथील सरकारांच्या प्रतिबंधक योजना व चोख संरक्षणयोजनांमुळे परत परत दंगली घडवता आलेल्या नाहीत. अगदी प्रेषिताची व्यंगचित्रातून विटंबना करण्यात आली होती, तरीही तेथे पुढे कसलीही दहशतवादी कृत्ये 'घडवता' आलेली नाहीत.

इंडोनेशियातील जेम्मा मिलीयाने बालीतले बाँबस्फोट घडवून आणण्यातही तेथीला हिंदूंनी केलेल्या कुठल्याही कृत्याचे उट्टे काढणे हे कारण नव्हते. (जेम्मा ही इंपोर्टेड दहशतवादी संघटना आहे). पण मी अगोदर लिहील्याप्रमाणे तेथेही सरकारने खंबीर पाउले उचलून दहशतवाद्यांना टक्कर दिलेली आजतरी दिसते.

राहता राहिले फिलिपिन्स, थायलंड व भारत. ही तिन्ही अत्यंत सॉफ्ट टार्गेट्स. येथे काहीही करा, काहीही कारणे द्या व परत परत तेच करत रहा, असे चाललेले आहे.

थोडक्यात ही जी कारणे आपल्या तोंडावर फेकली जातात, तद्सदृश्य कारणे कमीजास्त प्रमाणात अन्यत्र असूनसुद्धा एकतर तेथे अस्थैर्य निर्मांण करण्याची जरूरी भासली नाही अथवा ते सहजसाध्य नाही, तिथे दहशतवाद्यांनी स्पॉन्सर केलेल्या दंगली पुन्हा पुन्हा होत नाहीत. त्यामुळे अर्थातच त्या समाजांतर्गत 'आपण ते अमुक तमुक केले होते त्याची ही फळे आजवर भोगतो आहोत' अशा अर्थाच्या चर्चा तेथे होण्याचे कारणच संभवत नाही.

विकि's picture

6 Dec 2008 - 12:51 pm | विकि

उघड उघड बाबरी तोडल्याचे समर्थन करताना दिसत आहेत .त्यांच्या प्रत्येक प्रतिसादात तसे दिसून येते.

विकास's picture

6 Dec 2008 - 7:21 pm | विकास

उघड उघड बाबरी तोडल्याचे समर्थन करताना दिसत आहेत .त्यांच्या प्रत्येक प्रतिसादात तसे दिसून येते.

एक वाक्य दाखवा ज्यात मी समर्थन केले आहे. नाही मिळाले तर तसे लिहून वरील प्रतिसाद गाळायला जाहीरपणे सांगा. माझे म्हणणे इतकेच आहे की आज जे काही झाले आहे त्यासंबंधी लिहीत असताना निष्कारण त्यात हिंदूंना गोवण्यासाठी बाबरी मशिद मधे आणणे हे अयोग्य आहे.

विकि's picture

7 Dec 2008 - 1:08 pm | विकि

मी तुमच्या प्रतिसादावरून आणि लेखावरून असा निष्कर्ष काढला अर्थात लेख वाचून कोणाला ही तेच वाटेल.असो.
मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की बाबरी तोडणारे कोण होते तर हिंदू.मी माझ्या एका प्रतिसादात लिहीलेच आहे की बाबरी तोडल्यावर जी हिंदुत्वाची लाट आली व नंतर ज्या दंगली झाल्या त्यानंतर भाजप या देशात वाढू लागला.जसजसा भाजप वाढू लागला तसतसा दहशतवादही या देशात वाढल्याचे दिसून येते(पहा निरीक्षण करून).याला कारण काय मुसलमानांतील असुरक्षीतता.

विकास's picture

7 Dec 2008 - 7:16 pm | विकास

मी तुमच्या प्रतिसादावरून आणि लेखावरून असा निष्कर्ष काढला अर्थात लेख वाचून कोणाला ही तेच वाटेल.असो.

मला एक वाक्य दाखवा हे मी आधीपण म्हणालोच आणि आत्ता पण तेच म्हणत आहे...

मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की बाबरी तोडणारे कोण होते तर हिंदू.
इतके स्पष्टपणे जेंव्हा मुंबईतील बाँबस्फोट असो, काश्मिरमधील दहशतवाद असो, होतो तेंव्हा ते करणारे मुसलमान असे म्हणता का? मग येथेच हिंदू असे का म्हणता?

मी माझ्या एका प्रतिसादात लिहीलेच आहे की बाबरी तोडल्यावर जी हिंदुत्वाची लाट आली व नंतर ज्या दंगली झाल्या त्यानंतर भाजप या देशात वाढू लागला.जसजसा भाजप वाढू लागला तसतसा दहशतवादही या देशात वाढल्याचे दिसून येते(पहा निरीक्षण करून).याला कारण काय मुसलमानांतील असुरक्षीतता.
तसे असते तर भाजप-सेना युतीचे सरकार असताना मुंबईत एकही दंगल अथवा दहशतवादी कृत्ये का झाली नाहीत? आसाम आणि पुर्वांचल प्रदेशांमधे ज्या काही घातपाती घटना होत आहेत, नक्षलवादी घटना यांचा संबंध भाजपाशी कसा लावणार? बरं घटकाभर असे म्हणू की आपण म्हणता त्यात तथ्य आहे. पण मग सरकारची जबाबदारी काय असते? ती सरकार (कुठलेही, त्यात भाजपचे/ रालोआचे पण आलेच) त्यांनी ठोस पावले उचलली का? म्हणून माझ्या वरील मूळ लेखाचा निष्कर्ष परत वाचा:

थोडक्यात आधीपण इतरत्र म्हणलेले आहेच पण पुनरुच्चार करत मला काय वाटते ते सांगतो, " आजच्या दहशतवादाचे आणि दहशवाद्यांचे मूळ हे जसे आंतर्राष्ट्रीय सीमेच्या सभोवताल होत असलेल्या भूराजकीय घटनांशी जोडलेले आहे, तसेच त्याचा वेळीस अंदाज न घेता योग्य निर्णय न घेण्याच्या कमकुवत नेतृत्वाशी आणि "आपण बरे आणि आपले पोट बरे" म्हणत जगणार्‍या समाजवृत्तीशी आहे."

कौंतेय's picture

7 Dec 2008 - 10:29 pm | कौंतेय

विकासजी तुम्ही माझ्या मुद्द्यांना उत्तरे देणे मात्र टाळले आहे. कडव्या हिंदूंचा देखिल सध्याच्या परिस्थिती चिघळवण्यात इतकी विकोपाला नेण्यात काहीच हात नाही असा अपप्रचार तुम्ही गोल गोल विधाने करुन मांडत आहात.

माझ्या वरील प्रतिसादाचा प्रतिवाद तुम्ही कसा करता ते बघायची उत्सुकता होती. पुन्हा एकदा सांगतो हा आंतरराष्ट्रीय दहशतवाद आंतरराष्ट्रीय स्तरावरुनच भारतात आला. त्याची पाळेमुळे तिकडेच आहेत पण ति इथे घट्ट रोवण्यात इथल्या कडव्या धर्मांध हिंदूंनी देखिल मदत केली. आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं ते कार्ट असा पूर्वग्रह ठेवू नका.

विकास's picture

8 Dec 2008 - 10:28 am | विकास

विकासजी तुम्ही माझ्या मुद्द्यांना उत्तरे देणे मात्र टाळले आहे.

मी आणि प्रतुत्तर देण्याचे टाळतो? अहो इथे असलेले माझे वैचारीक विरोधक पण हे मान्य करणार नाहीत, अगदी मी आता उत्तरे देण्याचे टाळले तर, 'हुश्श! एकदाची कटकट संपली!', असे म्हणत त्यांना कितीही आनंद झाला तरी. :-) तसे म्हणायलाच गेलो तर आधीच्या चर्चांमधे, आपल्या वादविवादात मलाच आपल्याकडून परत उत्तरे आली नाहीत...:-( पण ते आता राहूंदेत...मी आपल्याला काल दोनदा उत्तरे लिहायला लागलो होतो, आणि अचानक "मिपावरील अतिरेकी हल्ले" माझ्या उत्तराला भोगावे लागले... असो.

कडव्या हिंदूंचा देखिल सध्याच्या परिस्थिती चिघळवण्यात इतकी विकोपाला नेण्यात काहीच हात नाही असा अपप्रचार तुम्ही गोल गोल विधाने करुन मांडत आहात.

आज झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा आणि तुम्हाला अपेक्षित असलेल्या कडव्या हिंदूंचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. हे म्हणत असताना, आपण विचारलेल्या या प्रश्नाचे: "ह्या युक्तिवादातुन तुम्हाला अतिरेकी हे सेक्युलर होते असे दर्शवायचे आहे का? " उत्तर, सोपे आहे - नाही! आजचा हल्ला हा हिंदुत्वाला अथवा हिंदूना प्रतिक्रीया म्हणून झालेला नसून तो भारतावर झाला. म्हणून त्या संदर्भात मी आपल्याला दिलेल्या "एकम सत" प्रतिक्रीयेत, अक्षरधामचे उदाहरण दिले आहे, ज्या संदर्भात आपण म्हणत असलेला मुद्दा लागू होतो. पण २६ नोव्हेंबरला झालेल्या हल्ला हा एका पारशाच्या मुसलमानी नाव असलेल्या हॉटेलावर झाला आणि त्यात सर्वधर्मियांना मरण आले आहे.

आजचे दहशतवादी जनावर हे वेगळे आहे आणि त्याचा भारतातील धार्मिक मुलतत्ववाद्यांशी संघटनात्मक संबंध आहे असे अजूनपर्यंत बाहेर आलेले नाही. अर्थात परत याला अपवाद काश्मिरमधील दहशतवादी टोळ्या असू शकतात आणि असतीलही.

बरे आपण म्हणता ते जर मान्य केले की, "त्याची पाळेमुळे तिकडेच आहेत पण ति इथे घट्ट रोवण्यात इथल्या कडव्या धर्मांध हिंदूंनी देखिल मदत केली." तर त्याचा दुसरा अर्थ असा होतो की या दहशतवादास केवळ भारतातील मुसलमान मदत करतात. हा आरोप मला अमान्य आहे. जी कोणती अंतर्गत मदत या दहशतवाद्यांना झाली आहे ती केवळ मुस्लीमांची आहे असे म्हणणे अन्याय्य आहे. जी मदत झाली आहे ती भ्रष्टाचारी नोकरशहा आणि राज्यकर्त्यांकडून झाली आहे. अर्थातच त्यांना त्याचे भिषण परीणाम माहीत नसणार, पण स्वतःचे पोट भरताना, पेट्या गोळा करताना थोडाफार कानाडोळा झाला तर काय बिघडले या हावरट आणि हिन वृत्तीच्या माणसांणि ती मदत केली आहे. दहशतवादाप्रमाणेच भ्रष्टाचारास धर्म नसतो असे जरी म्हणले तरी वस्तुस्थितीत अशा व्यक्ती कुठल्यान कुठल्या धर्माच्या असतातच. त्यात केवळ मुसलमान नसणार तर हिंदू आणि इतर धर्मिय पण असू शकतात असे माझे म्हणणे आहे. आता हे म्हणताना तुम्हाला मी बाब्या कुणाला म्हणतो आणि कार्टे कुणाला म्हणतो हे जर समजत नसेल तर माझ्या त्या मर्यादा मानाव्या लागतील :-(

आता थोडे अजून आपल्या वरील आधीच्या प्रतिक्रीयेसंदर्भातः

आपण म्हणालात - आणि तसेही स्युडो सेक्युलर लोक हे ढोंगीच असतात कडवे हिंदुत्ववादी आणि धर्मांध मुस्लिमांइतकेच, त्यामुळे त्यांना सोडून द्या. खरे सेक्युलर आणि हिंदुत्ववादी ह्यांची तुलना करा आणि तुम्हाला काय वाटले ते सांगा.

सर्वप्रथम, आपल्या, "स्युडो सेक्युलर लोक हे ढोंगीच असतात" शेर्‍याबद्दल धन्यवाद! आजतागायत सुडोसेक्युलर्स नावाचे काही प्रकरण अस्तित्वात असते हेच मान्य न करणे अथवा त्याकडे दुर्लक्ष करणारे मी पाहीलेत. आपण मला पहीलेच असे म्हणणारे भेटला आहात.

आता आपला मुद्दा, "सेक्युलर आणि हिंदुत्ववादी" ह्यांची तुलना या संदर्भात - आणि ती पण भारतीय व्यक्तींशी मर्यादीतः

जर दोघे प्रामाणिक असतील तर त्यांच्यामधे एक धार्मिक नाव हा फरक सोडला तर विशेष फरक जाणवणार नाही. सेक्युलर आणि हिंदुत्ववादी हे धर्माच्या चौकटीतून कोणाकडे बघणार नाहीत. तसे नसते तर बाळ ठाकरे नर्गिस दत्तचे पण स्नेही नसते आणि शबाना आझमीचे प्रमोद महाजनशी मैत्रीचे संबंध नसते (यात मी त्यांचे इतर राजकारण अथवा वागणे या संदर्भात बोलत नाही आहे, उदात्तीकरण तर लांब राहूंदेत! ).

मग फरक कुठे असेल? कदाचीत (चांगल्या अर्थाने) "कडवा" सेक्युलर हा निधर्मी असेल आणि कदाचीत त्या नादात तो जी काही हिंदू म्हणा अथवा भारतीय (परत चांगली) सांस्कृतिक ठेव ही आपली म्हणून जपणार नाही. याचा अर्थ हिंदूत्ववादी घरात दिवाळीत सात्विक वातीचे दिवे लावतील असे नाही :-) किंबहूना तसे मुद्दामून/जाणिवेने अजिबात करणार नाहीत... पण आपली संस्कृती, त्यातील घेण्यासारख्या अनंत गोष्टी, त्यात अभिमानास्पद असणार्‍या गोष्टी यांचा रास्त मान राखेल आणि तो जगाला तसे न लाजता सांगेल. ...

>>आज झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा आणि तुम्हाला अपेक्षित असलेल्या कडव्या हिंदूंचा अर्थाअर्थी काही संबंध नाही.

हे कुणी ठरवले? कशाच्या जोरावर असली विधाने ठोकून देता? सध्याच्या अतिरेकी कारवाया ह्या पाकिस्तानकडून फूस लावल्याने होत असल्या तरी त्यांना भारतीय मुसलमानांचा पाठींबा असल्या शिवाय हे शक्य नाही. हे तरी मान्य आहे का? मग इथल्या मुसलमानांना ही पाकिस्तानी अतिरेक्यांना मदत करण्यासाठी कोण पेटवत आहे? त्यांच्या मनात असुरक्षीततेची आणि सुडाची भावना कुणामुळे धिक जोपासलि जात आहे?

>>आजतागायत सुडोसेक्युलर्स नावाचे काही प्रकरण अस्तित्वात असते हेच मान्य न करणे अथवा त्याकडे दुर्लक्ष करणारे मी पाहीलेत. आपण मला पहीलेच असे म्हणणारे भेटला आहात.

मग मी काय करू? हे मला कशाल सांगताय?

>>सेक्युलर आणि हिंदुत्ववादी हे धर्माच्या चौकटीतून कोणाकडे बघणार नाहीत.

हा तर विनोदच आहे. धर्माच्या चौकटीतून बघत नसतील तर ते कसले बोडक्याचे (कुठलाही)धर्म वादी??

विकास's picture

20 Feb 2009 - 6:11 pm | विकास

नेहमी प्रमाणे शब्दबंबाळ एकांगी प्रतिक्रिया

तरी वाचाविशी वाटली सर्व काही पावले... :-)

>>> आज झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा आणि तुम्हाला अपेक्षित असलेल्या कडव्या हिंदूंचा
अर्थाअर्थी काही संबंध नाही. हे कुणी ठरवले? कशाच्या जोरावर असली विधाने ठोकून देता?

विचार करा, ज्यांनी हल्ले केलेत त्यांनी ते काही प्रतिक्रीया म्हणून केलेत असे म्हणलेले नाही. जे हल्ले ते जगभर करत आहेत त्याच हल्ल्यातील हा एक भाग आहे. मग ते अमेरिका असोत अथवा लंडन/माद्रीद आणि इतरत्र फसलेले हल्ले असोत.

>>>सध्याच्या अतिरेकी कारवाया ह्या पाकिस्तानकडून फूस लावल्याने होत असल्या तरी त्यांना भारतीय मुसलमानांचा पाठींबा असल्या शिवाय हे शक्य नाही.

तुमचे म्हणणे मान्य नाही. त्यांना पाठींबा केवळ मुसलमानांचा मिळाला असे मला वाटत नाही तो कुठल्याही लाचखोर भारतीयाचा मिळाला ज्यात केवळ मुसलमानच नाही तर हिंदूंसकट इतर कुठल्याही धर्माचे असू शकतात. थोडक्यात यातील पाठींबा हा धर्माधारीत नसून "अर्था"धारीत होता आणि काही बाबतीत पोलीसांच्या निष्का़ळजीपणाचा पण होता. आठवते, डोंबिवलीतील एका विद्यार्थीनीने ऑक्टॉबरच्या सुमारास पोलीसांना तिच्या मित्राकडून जिहाद संदर्भात आलेला एसएमएस दाखवून काळजी व्यक्त केली होती आणि दुर्लक्ष झाले होते ते?

>>>हा तर विनोदच आहे. धर्माच्या चौकटीतून बघत नसतील तर ते कसले बोडक्याचे (कुठलाही)धर्म वादी??

विनोद नाही वास्तव असायला हवे. सेक्युलर जर निधर्मी असतात तर त्यांनी त्यापद्धतीनेच विचार करायला हवा आणि हिंदुत्ववाद हा राष्ट्रवाद आहे धर्मवाद नाही, हे आपण तो काय होता हे मुळातून वाचल्यास कळेल. दुर्दैव असे आहे की आंधळे हिंदुत्ववादी आणि त्याचे आंधळे विरोधक दोघेही ते वाचत नाहीत आणि सोयीस्कर अर्थ काढत मुक्ताफळे उधळतात.

असो. बाकी एक विनंती, पहा जमल्यास - आता ही चर्चा मोठी झाल्याने ट्रॅक करणे अवघड जाते, यावर अधिक चर्चा करायची असल्यास एक तर नवीन चर्चा चालू करा अथवा खरड पाठवा.

धन्यवाद.

कौंतेय's picture

22 Feb 2009 - 3:32 am | कौंतेय

विचार करा, ज्यांनी हल्ले केलेत त्यांनी ते काही प्रतिक्रीया म्हणून केलेत असे म्हणलेले नाही.

ज्यांनी गोळीबार केला त्या अतिरेक्यांच्या मुलाखतीत त्यांनी स्वत: गुजरात मध्ये केलेल्या हिंसाचाराच बदला अस उल्लेख केलेला आहे. आणि तुम्ही काय म्हणता प्रतिक्रिया म्हणून केलेल नाही?

हा एक जागतिक पातळीवरील प्रश्न असल्याने त्याची उत्तरे प्रामाणिकपणे शोधायची तर इतरस्त्रही बघावयास हवे, नुसते भारतातील काही घटना घेऊन चालणार नाही. ह्याबद्दल मी अगोदरच बरेच काही येथे लिहीले आहे. त्यावर तुमचे काहीही भाष्य नाही. तरी परत आपण 'बाबरी', 'गुजरातेतील हिंसाचार' ह्यात गुंतून पडला आहात. कारण तसे करणे सोपे आहे.

विकास ह्यांना: " ...या आठवड्यात तुम्हाला चिथावणार्‍या प्रतिसादांना तुम्हाला उत्तर द्यावेसे वाटेल. प्रामाणिकपणे तुम्ही संदर्भ तपासून, वाक्ये योजून लांबलचक प्रतिसाद लिहाल आणि तुमचे विरोधक "येडं, कामधाम सोडून टैम वाया घालवतंय" असं म्हणून एकमेकांना टाळ्या देतील."" असे तर होत नाही आहे ना?

तेव्हा ह्या फुटकळ प्रतिसादांना ह्यापुढे उत्तरे न देणे हेच उत्तम. चर्चा खरोखरीच सुरू ठेवायची असेल, तर जे काही मांडले गेले आहे, त्याविषयी दुसर्‍या व्यक्तिचेही ठोस भाष्य हवे. नुसती पळापळ नको.

विकास's picture

23 Feb 2009 - 7:13 am | विकास

आपला प्रतिसाद एकदम मान्य!

पूर्णविराम.

कौंतेय's picture

25 Feb 2009 - 9:31 pm | कौंतेय

" ...या आठवड्यात तुम्हाला चिथावणार्‍या प्रतिसादांना तुम्हाला उत्तर द्यावेसे वाटेल. प्रामाणिकपणे तुम्ही संदर्भ तपासून, वाक्ये योजून लांबलचक प्रतिसाद लिहाल आणि तुमचे विरोधक "येडं, कामधाम सोडून टैम वाया घालवतंय" असं म्हणून एकमेकांना टाळ्या देतील."" असे तर होत नाही आहे ना?

प्रदीप इथे येउन असलं काहितरी बरळेल ह्याचा अंदाज होताच. पण विकास तू देखिल लगेच सहमतीचा होकार टाकून अंग काढून घेतलेस ते अनपेक्षीत होते. असो, असले ऍटीट्यूड दाखवल्यावर मलाही चर्चा करण्यात इंटरेस्ट नाही.

धन्यवाद!

विकास's picture

25 Feb 2009 - 10:38 pm | विकास

असो. बाकी एक विनंती, पहा जमल्यास - आता ही चर्चा मोठी झाल्याने ट्रॅक करणे अवघड जाते, यावर अधिक चर्चा करायची असल्यास एक तर नवीन चर्चा चालू करा अथवा खरड पाठवा.

प्रदीप's picture

26 Feb 2009 - 4:53 pm | प्रदीप

यायची काय जरूर होती? संयम सुटला? माझा इथला वावर पहाता कुणालाही मी 'असे काही बरळत' असेन असे वाटले ह्याचेही आश्चर्य वाटते!! मी जे सविस्तर मुद्दे (उदाहरणासकट) लिहीले त्याला तुमचा काहीही प्रतिवाद नाही. का तेही 'बरळणे' वाटले?

आणी आता तर तुम्ही कमालच करत आहात. बाहेरील कुणी अतिरेकी आले, निरपराध्यांना सरसकट मारू लागले व मीडियाचे त्यांच्याकडे लक्ष जाताच (हेच त्यांना अपेक्षितही असावे) त्यांनी नेहमीची 'गुजरात' वगैरे रेकॉर्ड लावली. त्याला तुम्ही किती क्रेडन्स देता आहात? हे असे करणे तुम्हाला सोप्पे आहे, कारण आजूबाजूस बघण्याची, एक मोठे चित्र पहाण्याची तुमची तयारी नाही, अथवा कुवत नाही.

कौंतेय's picture

26 Feb 2009 - 10:53 pm | कौंतेय

संयम कुणाचा सुटला हे दिसतेच आहे. विकासची आणि माझी चर्चा चालू असताना त्यात तोंड घालून "येडं, कामधाम सोडून टैम वाया घालवतंय" असं म्हणून एकमेकांना टाळ्या देतील."" असली शेरेबाजी करणे ह्याला बरळणे म्हणत नाहीत काय?

आणि राहता राहिलं वादा विषयी तर माझं वाक्य/भुमिका अशी आहे;
पुन्हा एकदा सांगतो हा आंतरराष्ट्रीय दहशतवाद आंतरराष्ट्रीय स्तरावरुनच भारतात आला. त्याची पाळेमुळे तिकडेच आहेत पण ति इथे घट्ट रोवण्यात इथल्या कडव्या धर्मांध हिंदूंनी देखिल मदत केली.

असे पुन्हा पुन्हा सांगुनही, "हा एक जागतिक पातळीवरील प्रश्न असल्याने त्याची उत्तरे प्रामाणिकपणे शोधायची तर इतरस्त्रही बघावयास हवे, नुसते भारतातील काही घटना घेऊन चालणार नाही." हे तुमचे पालुपद आणि वर माझी कुवत काढता?

मी गुजरातचा उल्लेख केला तो विकासच्या ह्या "विचार करा, ज्यांनी हल्ले केलेत त्यांनी ते काही प्रतिक्रीया म्हणून केलेत असे म्हणलेले नाही." ह्या वाक्याला. त्यावरुन सोयीस्करपणे मी फक्त हिंदूंवरच खापर फोडतो आहे असले अर्थ काढणारे धर्मांधच म्हणायचे.

कौंतेय

विकास's picture

27 Feb 2009 - 3:34 am | विकास

विकासची आणि माझी चर्चा चालू असताना त्यात तोंड घालून...

हे सार्वजनीक संकेतस्थळ आहे आणि चर्चा पण सार्वजनीक आहे. कोणीही कुठेही लिहू शकतो. नाहीतर तुम्ही देखील माझ्या आणि विकीच्या चर्चेत तोंड घातले असे म्हणता येईल...अनलेस तुम्हीच विकी असाल तर गोष्ट वेगळी...

पुन्हा एकदा सांगतो हा आंतरराष्ट्रीय दहशतवाद आंतरराष्ट्रीय स्तरावरुनच भारतात आला. त्याची पाळेमुळे तिकडेच आहेत पण ति इथे घट्ट रोवण्यात इथल्या कडव्या धर्मांध हिंदूंनी देखिल मदत केली.

१००% असहमत. म्हणूनच कुठल्याही आंतर्राष्ट्रीय दहशतवादी दुष्कृत्यांनंतर "कडव्या धर्मांध हिंदूंनी" एकही दंगल चालू केली नाही की स्थानीक मुसलमानांना दोष दिलेला नाही. तसेच तुमच्या सारखे सुडोसेक्युलर्स सोडल्यास मुस्लीमांनी पण असे म्हणत झालेल्या दुष्कृत्यांचे समर्थन केलेले नाही, फक्त निषेधच केला आहे...

असो हा येथील शेवटचा प्रतिसाद. आता आपण जर चालू केलीत तर नवीन चर्चेत प्रतिसाद देण्यासाठी उत्सुक!

सर्वप्रथम मी ते जे लिहीले ते माझे स्वतःचे नव्हते तर ते ह्या 'टंग- इन-चीक' लिखाणावरून घेतलेले होते. विकास ह्यांना ते समजले व ते आपल्याला माहिती असेल असे वाटले होते. तसे नसल्याने आपण दुखावले गेला असाल, तर माफ करावे.

दुसरे, अशा चर्चा सर्वांनाच खुल्या आहेत, तेव्हा कुणीही 'नाक खुपसू' शकतात. तसे नको असेल तर व्य. नि. तून पत्रव्यवहार करावा.

आता माझ्या 'पालुपदा'बद्दल.

ते पालुपद मूळ चर्चाप्रस्तावाशी निगडीतच आहे. आपला रोख 'भारतातच इतके दहशतवादी हल्ले होतात, ह्याचे कारण इथे मुस्लिमांना असुरक्षित वाटत रहाते, त्यांच्यात एक वैफल्याची भावना आहे' असा दिसतो. तेव्हा मी जे प्रतिपादन करत आहे ते थोडक्यात असे:

१. जगात अनेक ठिकाणी मुस्लिम धर्मांधांची तेथील समाजांशी भांडणे सुरू आहेत.

२. तरीही त्यातील किमान एका ठिकाणी (चीन) दहशतवादाचे प्रयोग अत्यंत अल्प झाले,कारण तेथे सरकारचा प्रचंड वचक आहे, आणि राजकिय परस्पर संबंध गुंतल्याने बाहेरील दहशतवादी तिकडे काणाडोळा करतात.

३. इतरस्त्र जिथे असे हल्ले झाले, (रशिया,. स्पेन, ब्रिटन, नेदरर्लँड, अमेरिका, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया) ते आपल्या येथल्याप्रमाणे पुन्हापुन्हा होत राहिले नाहीत ह्याचे कारण सुरूवातीच्या हल्ल्यानंतर तेथील सरकारांनी सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवला आणि कायद्यात व न्यायनिवाड्याच्या तातडीत जरूर ते बदल केले.

४. जिथे सरकारे खंबीर पावले टाकावयास निष्प्रभ ठरली आहेत (भारत, थायलंड, फिलीपाईन्स), तेथे हे हल्ले परत परत होतच राहिले आहेत.

हे सर्व पहाता, ह्या तीन ठिकाणीच असे हल्ले सुरूच आहेत व तसेच रहाण्याची शक्यता आहे, तेथे एका धर्मियांवर तेथील बहुधर्मिय इतर जगाच्या मानाने जास्त अन्याय व जुलूम करता आहेत, असे मानणे चुकिचे आहे. (भारताचे एक वेळ जाऊ द्या, पण बौद्धधर्मिय व अगदी मवाळ प्रकृतिचे थाई तसे करतात असे म्हणणे हास्यास्पद ठरेल.२००४ सालापासून तेथे सुमारे ३,००० बळी गेले आहेत).

प्राजु's picture

5 Dec 2008 - 1:16 am | प्राजु

लेख चांगला झाला आहे. बर्‍याच गोष्टिंवर प्रकाश टाकणारा आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विकि's picture

5 Dec 2008 - 6:20 pm | विकि

केवळ मार्गदर्शनासाठी आपण ब्लॅक फ्रायडे हा चित्रपट पाहा.

चेतन's picture

6 Dec 2008 - 2:13 pm | चेतन

म.टा मधला एक दुवा

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3789760.cms

अवांतरः ब्लॅक फ्रायडे हा एक रद्दि चित्रपट होता. मी झोपा काढलेल्या मला अजुनही आठवतात.

अनिता's picture

7 Dec 2008 - 10:15 pm | अनिता

अर्धा तास वाचली ही चर्चा. टिपिकल हि॑दू/मराठी पद्धत आहे...किस काढत बसणे..

यशोधरा's picture

8 Dec 2008 - 6:11 pm | यशोधरा

विकासजी, उत्तम लेख आणि प्रतिसादही.

अनिताताई, अर्धा तास वाचल्यावर तुम्हाला ही चर्चा वाफ आहे याचा साक्षात्कार झाला?? आवडत नसेल, तर चर्चा वाचण्याची बळजबरी नाही आहे मिपावर. :)

विकास's picture

8 Dec 2008 - 7:44 pm | विकास

धन्यवाद यशोधरा!

विकेड बनी's picture

8 Dec 2008 - 8:20 pm | विकेड बनी

अहो, आवडत नसेल, तर तसं सांगायची मुभाही आहे मिपावर :) नाहीतर गांधीवादाला सर्वांनीच छान छान म्हटले असते आणि एक "विक्रम" स्थापन केला असता ना!