[शतशब्दकथा स्पर्धा] हेल्पिंग हँड

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in स्पर्धा
6 Aug 2015 - 5:27 am

सगळेे साचेबद्ध होते. साडेनऊला मेट्रोत शिरणे. तिथे खांबाला टेकून उभे राहणे. तो आल्यावर समोर 'महिलाओं के लिए' खाली कोपऱ्यात रेलून बसणाऱ्या 'तिची' एक नजर त्याच्याकडे आणि परत कानात इयरफोन हातात स्मार्टफोन. दर मिनिटाला गाणे बदलायच्या तिच्या सवयीची ह्याला मौज वाटे.
त्या दिवशीही दोघे करोल बाग़ ला उतरले आणि आपापल्या गेटकड़े वळले. तो अचानक थबकून, उगाच बैगमध्ये शोधाशोध करत थांबलेल्या तिच्याकडे वळला.
" आप कोई गाना पूरा क्यों नहीं सुनती?"
" पता नहीं,बस हाथ आगे बढ़ के गाना बदल देता है। Bad habit, isn't it?"
" I think you need a helping hand stopping your hand from changing songs."
ती चमकून बघतच राहिली.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

6 Aug 2015 - 6:49 am | प्रचेतस

+१

झक्कास

दमामि's picture

6 Aug 2015 - 6:52 am | दमामि

+1

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Aug 2015 - 6:56 am | कैलासवासी सोन्याबापु

+१

ब़जरबट्टू's picture

6 Aug 2015 - 8:33 am | ब़जरबट्टू

+1

बोका-ए-आझम's picture

6 Aug 2015 - 9:04 am | बोका-ए-आझम

+१

dadadarekar's picture

6 Aug 2015 - 9:24 am | dadadarekar

.

टवाळ कार्टा's picture

6 Aug 2015 - 9:37 am | टवाळ कार्टा

+१

सदस्यनाम's picture

6 Aug 2015 - 9:39 am | सदस्यनाम

नोप्प

रातराणी's picture

6 Aug 2015 - 9:41 am | रातराणी

+१

नीलमोहर's picture

6 Aug 2015 - 9:45 am | नीलमोहर

+१

मुक्त विहारि's picture

6 Aug 2015 - 9:50 am | मुक्त विहारि

+१

नाखु's picture

6 Aug 2015 - 9:54 am | नाखु

हातासरशी हातचलाखी आवडली.

देशपांडे विनायक's picture

6 Aug 2015 - 10:30 am | देशपांडे विनायक

+१

भुमन्यु's picture

6 Aug 2015 - 10:44 am | भुमन्यु

+१

नितिन५८८'s picture

6 Aug 2015 - 12:40 pm | नितिन५८८

+१

नागेश कुलकर्णी's picture

6 Aug 2015 - 12:47 pm | नागेश कुलकर्णी

+१ मस्तच

प्यारे१'s picture

6 Aug 2015 - 12:53 pm | प्यारे१

+१
(स्वाम्या, कुठवर आलं प्रकरण?)

स्वामी संकेतानंद's picture

6 Aug 2015 - 6:51 pm | स्वामी संकेतानंद

कथा काल्पनिक आहे. :P

प्यारे१'s picture

6 Aug 2015 - 8:59 pm | प्यारे१

:)

चलो हमने मान लिया, जाओ ऐश करो! ;)

तुडतुडी's picture

6 Aug 2015 - 12:59 pm | तुडतुडी

का हो मराठी येत नै का तुम्हाला आणि तिला पण ? कशासाठी विनाकारण हिंदी आणि इंग्लिश च्या कुबड्या ? मराठीत बोलायचं असतं हेच विसरतो का आपण ? त्या संभाषणासाठी निषेध

प्रसाद गोडबोले's picture

6 Aug 2015 - 4:02 pm | प्रसाद गोडबोले

अनुमोदन !

कथा मराठीतच असावी ही नम्र विनंती . इथे निम्म्या पेक्षा जास्त शब्द हिंदी / ईम्ग्रजी आहेत !

चिगो's picture

6 Aug 2015 - 4:08 pm | चिगो

त्या दिवशीही दोघे करोल बाग़ ला उतरले आणि

म्हणजे करोल बाग़ला उतरणार्‍यांनापण मराठी आलंच पाहीजे काय? आणि मराठी कथेत नायक/नायिका हिंदी-इंग्रजीत बोलूच शकत नाही का? हा नियम ठाऊक नव्हता, ब्वॉ..

अवांतर : विदर्भात / नागपुरात मराठी पोरं-पोरी बिनधास्त आपापसांत हिंदीत बोलतात आणि तरीही त्यांच्या 'मराठीपणा'ला कसलीही बाधा येत नाही..
(वैदर्भीय) चिगो

प्रसाद गोडबोले's picture

6 Aug 2015 - 4:27 pm | प्रसाद गोडबोले

मिसळपावचा बॅनर एकवार नीट वाचावा !

मराठी अंतरंग ... मराठी अभिव्यक्ती !

मराठीमध्ये चर्चा करण्याचे संकेतस्थळ.

उगाचच काय स्वमतांध दांभिकता :-\ किमान मुद्दा तरी योग्य पकडा !

चिगो's picture

6 Aug 2015 - 5:05 pm | चिगो

'टर्म' आवडली.. 'करोल बाग'वाल्यांनी मराठी का बोलावी, हे कळवाल का? 'लोकल'च्या गर्दीत ही गोष्ट घडणे लेखकाला कल्पनेतही शक्य वाटली नसल्याने दिल्लीत गेले असावेत.

(हिंदी बोलणारा स्वमतांध दांभिक मराठी वैदर्भिय) चिगो..

प्यारे१'s picture

6 Aug 2015 - 5:45 pm | प्यारे१

मराठी 'बॅनर' वाचून ड़वाळे पाणावले

कपिलमुनी's picture

6 Aug 2015 - 6:09 pm | कपिलमुनी

सहीच पकडा हे मामू

प्रसाद गोडबोले's picture

7 Aug 2015 - 11:44 am | प्रसाद गोडबोले

संपादक मंडळ आणि नीलकांत यांचे काय मत आहे ह्या विषयावर ?

अविनाश पांढरकर's picture

6 Aug 2015 - 1:04 pm | अविनाश पांढरकर

+१

खटपट्या's picture

6 Aug 2015 - 2:24 pm | खटपट्या

+१

पाटील हो's picture

6 Aug 2015 - 2:45 pm | पाटील हो

+१

निमिष सोनार's picture

6 Aug 2015 - 2:59 pm | निमिष सोनार

प्रपोज करायचा वेगळा अंदाज

सानिकास्वप्निल's picture

6 Aug 2015 - 3:58 pm | सानिकास्वप्निल

छान आहे कथा
+१

चिगो's picture

6 Aug 2015 - 4:09 pm | चिगो

+१ लैच चालु हाय, बाप्पु.. कथा आवडली..

एकाने बोललं कि सगळ्यांनी तसच करायला हवंय का ? विदर्भ , नागपुर हे सुधा महाराष्ट्रातच येतं . करोल बाग असो नै तर फिरोल बाग असो . ते ठिकाण महाराष्ट्रात येत असेल तर हो . मराठी यायलाच पाहिजे . दुसरं म्हणजे तुम्ही मराठी संकेतस्थळावर कथा लिहित आहात . एखाद दुसरं वाक्य चालू शकतं कि दुसर्या भाषेतलं . नाही कोण म्हणलंय . आणि मी तुमच्या कथेचा निषेध केला नाहीये . त्यातल्या संभाषणाचा केला आहे

प्यारे१'s picture

6 Aug 2015 - 4:28 pm | प्यारे१

>>>" आप कोई गाना पूरा क्यों नहीं सुनती?"
तुला कुठलंच गाणं पूर्ण एकता येत नाही का गं टवळे?
>>>" पता नहीं,बस हाथ आगे बढ़ के गाना बदल देता है। Bad habit, isn't it?"
काय करु, हाताला काहीतरी चाळा हवा असतो ना???? चुकीचंय नै?
>>>>>" I think you need a helping hand stopping your hand from changing songs."
उलट्या हाताची एक चापट बसली की कळेल का????

मराठी अभिव्यक्ती. आपली बोली, आपला बाणा!

चिगो's picture

6 Aug 2015 - 5:07 pm | चिगो

" I think you need a helping hand stopping your hand from changing songs."
उलट्या हाताची एक चापट बसली की कळेल का????

LOL..

स्वामी संकेतानंद's picture

6 Aug 2015 - 6:53 pm | स्वामी संकेतानंद

वारल्या गेले आहे.
ही कथा पुण्यात घडती तर हीच वाक्ये वापरली असती.

अजया's picture

6 Aug 2015 - 4:55 pm | अजया

+१

कपिलमुनी's picture

6 Aug 2015 - 6:10 pm | कपिलमुनी

कथा मस्तच !

बाकी उगीच मराठीच्या नावाने गळे काढणार्याम्चा णीषेढ

जडभरत's picture

6 Aug 2015 - 6:31 pm | जडभरत

+१

टिवटिव's picture

6 Aug 2015 - 6:51 pm | टिवटिव

+१

द-बाहुबली's picture

6 Aug 2015 - 7:12 pm | द-बाहुबली

शतशब्द कथा(?) प्रकारात कथा न्हवे फक्त प्रसंग बसु शकतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं...

प्रसंग आवडला.

स्वामी संकेतानंद's picture

6 Aug 2015 - 7:24 pm | स्वामी संकेतानंद

मलाही तसेच वाटते. कथा लिहीणे अगदीच अशक्य नाही, विशेष प्रयत्न पाहिजेत. साध्यातरी माझ्याने प्रसंग लिहीणेच झाले.

स्वामी संकेतानंद's picture

6 Aug 2015 - 7:19 pm | स्वामी संकेतानंद

वर तुडतुडी आणि प्रगो ह्यांनी भाषेचा मुद्दा उपस्थित केलाय त्याला उत्तर द्यावेसे वाटते.
कथा दिल्लीत घडत असल्याने दोन अनोळखी तरुणांच्या संवादाची सुरुवात नैसर्गिकपणे हिंदी किंवा इंग्रजीतच होईल. मराठीत कसे शक्य आहे? खरं सांगायचं तर तिथे हिंदीही आली नसती. माझ्याशी इकडे दिल्लीत पहिलंवहिलं वाक्य हिंदीत बोलणारी मुलगी आठवत नाही. थेट इंग्रजीत सुरु होतात. पुढे बरीच ओळखपाळख झाली की हिंदीवर येतात.( माह्यासारख्या इदर्भाच्या गावठी पोट्टयाले हे बम मुश्किल जाते न बाप्पा!) आणि कथेत नैसर्गिकता यावी म्हणून संवादांमध्ये हिंदी आणि इंग्रजीची मुबलक पखरण करणे हे मुंबईकर व. पु. काळेंपासूनच शिकलो बरं. त्यांच्या कथाकादंबरयांतली मराठी पात्रे इंग्रजी वाक्ये फेकताना पाहून तुम्ही नक्कीच त्यांना निषेधाचे खरामरीत पत्र पाठवले असणार ह्यात शंकाच नाही. ( सॉरी वपु, तुम्हाला इथे खेचले.)
मी ज्या वातावरणात लहानाचा मोठा झालोय तिथे भाषेचा आग्रह-दुराग्रह कधीच नव्हता, अजूनही नाही. लहानपणापासून आम्हाला एकाच घरात १० माणसे जमली की तीन भाषा ऐकू येत आहेत. आम्ही भराभरा, कधीकधी वाक्यागणिक भाषा बदलतो.मी माझ्या या संस्कतीवर मनापासून प्रेम करतो. त्यामुळे माझ्या कथांमधली पात्रे २-३ काय ४-५ भाषा बोलत असली तरी मला ते खूप नैसर्गिक वाटते. माझ्यासाठी जे नैसर्गिक आहे ते तुमच्यासाठीही नैसर्गिक असावे असा आग्रह नाही. पण भाषेच्या एकसूरी जगापलीकडेही एक बहुरंगी बहुढंगी भाषांचे सहिष्णु जग आहे ह्याची जाणीव असली तरी पुरे.
शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या कथेला सीक्वल आहे. तेव्हा दोघांचा संवाद हिंदी आणि इंग्रजीत ठेवून मी कथा ओपन एंडेड ठेवली असे तुम्हाला का वाटत नाही? :)

ब़जरबट्टू's picture

6 Aug 2015 - 9:09 pm | ब़जरबट्टू

भैताडले लोक बावा..
एक नम्बर आहे ना स्टोरी ,, :) +1

प्रसाद गोडबोले's picture

7 Aug 2015 - 5:46 pm | प्रसाद गोडबोले

भाषेच्या एकसूरी जगापलीकडेही एक बहुरंगी बहुढंगी भाषांचे सहिष्णु जग आहे ह्याची जाणीव असली तरी पुरे.

अब रुलायेगा क्या पगले !!

देख भाई , मै संपादक मंडळ के लाडके ग्रुप मे नही हुं , दोडके ग्रुप मे हुं , इसिच वजह से वह मेरी तक्रार सुन रेले नई !

वैसे इदर ये क्या लिधा तुने वाच्या हय क्या

५) मिसळपाव.कॉम हे मराठी भाषेतून मराठी लोकांसाठीचे संकेतस्थळ आहे. त्यामुळे येथे केवळ मराठीतूनच चर्चा व अन्य लेखन अपेक्षीत आहे.

सदस्य होण्यापूर्वी वाचलेच पाहिजे असे काही.
http://www.misalpav.com/beforesignup.html

इसिलिये मै बोल्या तेरेकु !

मेरा क्या जाता हय , किसि भी जुबान मे बोल ना भाई तु ! अपुन को अच्छाईच लगेगा !

=))

पैसा's picture

6 Aug 2015 - 7:24 pm | पैसा

+१
ऐड्या आवडली. शो स्वीट!

विवेकपटाईत's picture

6 Aug 2015 - 7:52 pm | विवेकपटाईत

सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा करोलबाग स्टेशन पाहतो. बघू सापडेल का ती अर्धवट गाणी ऐकणारी, ३० वर्षे पूर्वीचा काळ असता तर मी निश्चित तिला मदत केली असती गाणे ऐकण्यासाठी - हम आपके हैं कौन ?? +++ 1

स्वामी संकेतानंद's picture

6 Aug 2015 - 8:01 pm | स्वामी संकेतानंद

काका भेटूया आपण कधी. ऑगस्टनंतर वेळ ठरवू. मी पण ब्लू लाइनवरच राहतो.

राघवेंद्र's picture

6 Aug 2015 - 8:27 pm | राघवेंद्र

+१