[शतशब्दकथा स्पर्धा] हेल्पिंग हँड

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in स्पर्धा
6 Aug 2015 - 5:27 am

सगळेे साचेबद्ध होते. साडेनऊला मेट्रोत शिरणे. तिथे खांबाला टेकून उभे राहणे. तो आल्यावर समोर 'महिलाओं के लिए' खाली कोपऱ्यात रेलून बसणाऱ्या 'तिची' एक नजर त्याच्याकडे आणि परत कानात इयरफोन हातात स्मार्टफोन. दर मिनिटाला गाणे बदलायच्या तिच्या सवयीची ह्याला मौज वाटे.
त्या दिवशीही दोघे करोल बाग़ ला उतरले आणि आपापल्या गेटकड़े वळले. तो अचानक थबकून, उगाच बैगमध्ये शोधाशोध करत थांबलेल्या तिच्याकडे वळला.
" आप कोई गाना पूरा क्यों नहीं सुनती?"
" पता नहीं,बस हाथ आगे बढ़ के गाना बदल देता है। Bad habit, isn't it?"
" I think you need a helping hand stopping your hand from changing songs."
ती चमकून बघतच राहिली.

प्रतिक्रिया

टुंड्रा's picture

6 Aug 2015 - 9:02 pm | टुंड्रा

+१

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Aug 2015 - 9:18 pm | कैलासवासी सोन्याबापु

यार ये भी कोई बात हुई!!!

स्वामीजीनी दिल्ली vibe पकडली त्याचे कौतिक करा की राव ज़रा नको तिथे कश्याला काहीही टिका, आपले पटाईत सर सुद्धा दिल्लीकर आहेत ते सुद्धा हिंदी शब्द वापरतात पण म्हणुन त्यांचे कुठलेच लेखन निषेधार्ह असते का?? मला तर त्यांची स्वतंत्र शैली वाटते ती!! अशी वाक्य रचना किंवा टाइटल आले की सरांची पुर्ण शैली उभी राहते डोळ्या समोर , हे उदहारण सुद्धा सोडा मी अकादमी लिहिली त्याला तुम्ही वाचक रासिकांनी भरभरुन प्रेम दिले मला (अन मी आजन्म त्यांच्यासाठी ऋणी होतो/आहे/राहीन) त्यात माझ्या बॅचमेट्स चे उस्तादजी चे अद्जुडेन्ट सरांचे बोल हे हिंदीत आहेत, तेव्हा ते हजारो शब्दांत मांडलेले प्रसंगच होते न? इथे हे कोण स्वामीजी आहेत त्यांनी सुद्धा तेच केले आहे १०० शब्दांत,त्यात काही गैर वाटत नाही आमचे तर ++१ (संभाषण ते मांडणी साऱ्यांस) बाकी हे स्वामीजी सुरस प्रकरण दिसते आहे (कुकडले हात स्वामीजी इदर्भातले??)

सुहास झेले's picture

6 Aug 2015 - 10:19 pm | सुहास झेले

+१

शॉर्ट आणि स्वीट :)

सव्यसाची's picture

6 Aug 2015 - 11:01 pm | सव्यसाची

+१

थॉर माणूस's picture

7 Aug 2015 - 10:29 am | थॉर माणूस

मस्त हो स्वामी... आवडेश. :)

+१

gogglya's picture

7 Aug 2015 - 4:41 pm | gogglya

बाकी चालुद्या. इथे पण आरक्षण हवे आहे का मराठी शब्दांना - कमित कमी ३०% मराठी शब्द नसतील तर इथे चालणार नाही ?

बहिरुपी's picture

7 Aug 2015 - 8:18 pm | बहिरुपी

+१०१

नूतन सावंत's picture

8 Aug 2015 - 11:31 am | नूतन सावंत

+१

शब्दबम्बाळ's picture

8 Aug 2015 - 2:05 pm | शब्दबम्बाळ

+१ आवडली!
सहज सुंदर!

तीरूपुत्र's picture

9 Aug 2015 - 8:48 am | तीरूपुत्र

+१

संदीप डांगे's picture

13 Aug 2015 - 6:37 am | संदीप डांगे

इंग्रजी व हिंदी वाक्यांची घुसखोरी मान्य करून ते योग्य ठरवणार्‍या सर्व माननीय सदस्यांना एक प्रश्नः
जर हीच कथा कुठल्या इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, पारशी, हिब्रू, रशियन, चायनीज, जापनीज, तेलुगू, तमिळ, मल्यालम, सिंहली, इत्यादी भाषेच्या संकेतस्थळावर असती आणि फक्त ते करोलबाग ला उतरलेत म्हणून नायक-नायिका हिंदीतूनच बोलतील असा अट्टाहास खपवून घेतला असता काय?

शतशब्दकथा स्पर्धा ही मराठी संकेतस्थळावर आहे, ती मराठीत लिहिली जावी अशीच अपेक्षा असेल. इथे हिंदी-ईंग्रजी समजणारे लोक आहेत म्हणून धडाधड इंग्रजी-हिंदी वाक्ये टाकून संकेतस्थळाच्या मूळ उद्देशाशी प्रतारणा करावी हे पटत नाही.

दोन हजार शब्द असलेल्या एक अशा १०-१५ भागाच्या मालिकेत वातावरण निर्मीतीसाठी एखादं वाक्य किंवा पात्राचे व्यक्तिचित्र उभे राहावे म्हणून दुसर्‍या भाषेत ठिक आहे. पण जिथे मर्यादा शब्दसंख्येचीच घातली आहे तिथे शब्दांचीच मर्यादा ओळखली पाहिजे. अचूक शब्दांतून नेमकं वातावरण उभं करणं आवश्यक आहे. दिल्लीची आणि हिंदी-इंग्रजी वाक्यांची एक प्रेमकथा उभी राहण्यासाठी गरज पडावी हे पटत नाही. या कथेचं दिल्ली हे एक महत्त्वाचं अंग आहे असं वाटत नाही. जर हा प्रसंग पॅरीस्/टोकियोमधे घडला असता तर फ्रेंच/जॅपनीजमधेच टाकलं असतं का ते वाक्य?

कथा दिल्लीत घडत असल्याने दोन अनोळखी तरुणांच्या संवादाची सुरुवात नैसर्गिकपणे हिंदी किंवा इंग्रजीतच होईल. मराठीत कसे शक्य आहे?
इथे मराठी कमी पडतं असं सरळ मान्य करण्यासारखे झाले की. अनेक अनुवादीत कथाकादंबर्‍यांमधे वॉलस्ट्रीटवरचा जॉन नावाचा एखादा नायक हॅरी नावाच्या सहकार्‍याला तो केवळ न्युयॉर्कमधे आहे म्हणून हाव-डु-यु-डू म्हणून संभाषण सुरू करत नाही. किंवा एखाद्या चेतनभगतीय पुस्तकात दोन सहकारी हिंदीत बोलतायत असंही वाचलं नाही. मग मराठीत असं खपवून घ्या असा हट्ट का बुवा? आपली भाषा समर्थ आहे सगळ्या भाव-भावना नीट मांडायला. त्या तशा समर्थपणे मांडता येणे हे व्यक्तिपरत्वे बदलेल इतकंच. पण भाषा सोडू नये ही कळकळीची विनंती.

बरं इथे जे शेवटचं इंग्रजी वाक्य टाकलंय त्याच्या व्याकरणाबद्दल व शुद्धतेबद्दलही शंका आहे. आता म्हणा की आम्ही कसेही इंग्रजी लिहू. तर असोच.

लेखकरावांनी दिलेलं स्पष्टीकरण वाचलं. त्यात ते म्हणाले की भाषेच्या एकसूरी जगापलीकडेही एक बहुरंगी बहुढंगी भाषांचे सहिष्णु जग आहे ह्याची जाणीव असली तरी पुरे. अहो हे वाक्य तत्त्वज्ञानी छाप पाडायला बरं वाटत असलं तरी प्रत्यक्ष जगात उपयोगी नाहीये ना. मी उद्या एखादी मराठी कथा लिहिली ज्यात एक साउथ इंडीयन त्याच्या भाषेत जे बोलला ते त्या लिपीसकट इथं टाकलं आणि ते एकदम कथेचा केंद्रबिंदू आहे पण वाचणार्‍याला कळलंच नाही तर हे तुमचं सहिष्णु जग काय डोंबलाचं मदतीस येणारंय.

लहानपणापासून आम्हाला एकाच घरात १० माणसे जमली की तीन भाषा ऐकू येत आहेत. आम्ही भराभरा, कधीकधी वाक्यागणिक भाषा बदलतो.

ह्याच्या मागे काय तर्क आहे बुवा? ह्या दहा माणसांत एखादा फ्रेंच, जर्मन, यंडुगुंडू वाक्ये मराठीत घुसडून बोलणारा असेल तर जमेल काय? दाखवाल का तुमचा तो सहिष्णुपणा भाषेच्या जगातला का काय तो?

ह्या कथेचा मूळ आत्मा ज्या वाक्यात आहे तेच अक्खं इंग्रजीत तेही मोडक्या-तोडक्या. म्हणून आक्षेप आहे. या मराठी कथेत महत्त्वपूर्ण असलेलं वाक्य इंग्रजीत खपवून घेणार्‍यांना शिवाजी महाराजांवरच्या चित्रपटात शिवाजी म्हणून एखादा काळा आफ्रिकन दाखवला तरी चालेल असे समजतो.

बाकी चालु द्या.

@कपिलमुनि,
मराठीच्या नावाने संकेतस्थळे काढणारांचाही णिषेढ करा. त्याचेच सदस्य होऊन मराठीचा आग्रह धरणार्‍या इतर सदस्यांचा णिषेध करणे म्हणजे दांभिकतेची सर्वोच्च पातळी नव्हे काय?

दा विन्ची's picture

13 Aug 2015 - 2:06 pm | दा विन्ची

+१

झक्कास