"अरे येडXव्या!" त्याच्या नकळत त्याचा आवाज टिपेला पोचला.
इतक्यात शेजारून "हाऊ चीप ! डिस्कस्टिंग ! दिस ब्लडी विलेजर्स न देअर कल्चर ! "
एक पंचविशीची तरुणी त्याच्याकडे तुच्छतेने पाहत फणफणली.
तिची नजर आणि पाठोपाठ ऑफिस कॅन्टीन मधल्या इतर लोकांच्या तिरस्कार आणि राग मिश्रित नजरा त्याला फाडून खाऊ लागल्या.
...........................................................................
काही दिवसांनी त्याच ठिकाणी तीच तरुणी तिच्या मित्रांच्या कंपू मध्ये खिदळताना त्याला दिसली.
"डोंट इवन ट्राय टू टच मी यु Xकिंग इडियट!" ती तिच्या मित्रावर बरसली.
याने चमकून तिच्याकडे पाहिलं, बाजूला लोकांकडे पाहिलं पण सगळ एकदम नॉर्मल होत.
तो स्वताशीच पुटपुटला "वा रे तुमची संस्कृती"
...........................................................................
प्रतिक्रिया
19 Jul 2015 - 4:24 pm | पद्मावति
इंग्रजी मधे शिव्या देणे का कोण जाणे पण आजकाल कूलपणाचं लक्षण झालं आहे.
19 Jul 2015 - 5:08 pm | मास्टरमाईन्ड
एकदम बरोबर
19 Jul 2015 - 7:18 pm | एक एकटा एकटाच
एकशे एक टक्का खर!!!!!!
19 Jul 2015 - 10:39 pm | एस
प्रचंड आवडली.
20 Jul 2015 - 12:02 am | तुमचा अभिषेक
आवडली शशक
पण अगदी असेच असते असे नाही..
ईंग्रजीतील शिव्याही शिव्याच समजल्या जातात बरेच ठिकाणी..
शेवटी सर्व संस्कारांचा भाग आहे
20 Jul 2015 - 8:55 am | योगी९००
बर्याच दिवसांनी एक चांगली शशक वाचली...प्रचंड आवडली..!!
बाकी शिव्या देणे हे आपण कसे देतो त्यावर सुद्दा अवलंबुन आहे. मित्राला प्रेमाने मा.चो. म्हणा (म्हणजे माखनचोर असे म्हणायचे आहे मला...उगाच गैरसमज नसावेत..!!) तो काहीच म्हणणार नाही. बोलपार्टीला?"अरे माखनचोरा काल का आला नाहीस पार्टीला?" असे म्हणलात तर इतके काही वाटणार नाही त्याला. पण हेच जर तुम्ही दात विचकावत आणि ओठ चावत थोड्या चढ्या आवाजाने "माखनचोर" असे म्हणा. भोगा मग काय ते...!!
21 Jul 2015 - 9:56 am | टवाळ कार्टा
मा.चो. = माखनचोर
=))
22 Jul 2015 - 4:12 pm | सतीश कुडतरकर
भेxचोx = भेलचोर का? :-)
20 Jul 2015 - 9:09 am | नाखु
देणे हे हुच्च आणि अस्स्ल साहीत्य असा प्रवाद होता मिपा वरही नंतर त्याचाच अतिरेक झाल्याने का श्या संपल्याने श्या देणारेही गायब झाले खरे!!!
सरसकट श्या न देणारा पण वेळ आलीच तर(द्यायला) अन्वट श्या माहीती असलेला
जुनाट वाचक नाखु
21 Jul 2015 - 10:24 am | टवाळ कार्टा
कट्ट्याला आमचा शब्द संग्रह वाढवाल का? ;)
22 Jul 2015 - 2:51 pm | कपिलमुनी
माचो सारखा "बाझ" मिपावर लई फ़ेमस होता
25 Jul 2015 - 9:18 am | तुषार काळभोर
हे त्याचं सोज्वळ रूप!
25 Jul 2015 - 10:20 am | प्यारे१
टेंपोत बसवला नै कै, 'बसवला टेम्पोत'
25 Jul 2015 - 1:00 pm | तुषार काळभोर
असंल, तसं पन असंल!
25 Jul 2015 - 1:02 pm | टवाळ कार्टा
टेंप्युत असे आहे ना :)
20 Jul 2015 - 9:11 am | अमृत
अतिशय मार्मिक
20 Jul 2015 - 10:17 am | भीमराव
यकदम खटक्याव बोट ठिवलय राव, पन काय वो भामटेराव हेंचाकडं बी एकादा बोरीचा बार आसतो का वो?
20 Jul 2015 - 11:53 pm | पुणेकर भामटा
@ तुमचा अभिषेक आणि योगी९००, तुमच्याशी सहमत अहो 'कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त राग व्यक्त करायचे माध्यम म्हणजे शिवी' (हे मी बाळासाहेबांच्या एका मुलाखतीमध्ये ऐकले होते) आणि शिवी हि झणझणीतच जायला हवी तशीच समोरच्याने पण ती तितक्याच ठसक्यात टोलवायला हवी, अहो मुळमुळीत शिव्या म्हणजे सातारच्या एखाद्या हिंद केसरीला झिम्मा खेळायला लावण्यासारखे आहे, असो... आजकालच्या सो कॉल्ड सोफेस्टीकेटेड संस्कृतीला पाहता आपल्या मराठी शिव्या आजून काही वर्षाने कदाचित केवळ गलिच्छ आणि मवाल्यांची भाषा म्हणून ओळखल्या जातील असे वाटते. याचा अर्थ रोजच्या भाषेमध्ये शिव्यांचा सर्रास वापर करावा असे माझे म्हणणे नाही पण तरीही हा एक मराठी भाषेचा ठेवा आहे (आचार्य अत्रे) अनमोल नसला म्हणून काय झाले.
@ नाद खुळा, एक काळ होता मिपा वर एखाद्या लेखा पेक्ष्या प्रतिक्रिया वाचायला जास्त पसंती असायची.
@ बाबुदादा, काय ठाव नाय बा, पन नसनच जनु, काय कि ती झेण्टल्मेन ल्होखांची वानी हाय न्हव.
सर्व वाचकांचे आभार आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद !!!
21 Jul 2015 - 11:17 pm | रातराणी
जमलीये! आवडली : )
22 Jul 2015 - 12:30 pm | पैसा
आवडलीच!
22 Jul 2015 - 12:57 pm | खटपट्या
जबरीच !!
24 Jul 2015 - 12:49 pm | तुडतुडी
अहो मुळमुळीत शिव्या म्हणजे सातारच्या एखाद्या हिंद केसरीला झिम्मा खेळायला लावण्यासारखे आहे, >>>
हे हे हे …………
24 Jul 2015 - 12:54 pm | जडभरत
मस्तंय!
25 Jul 2015 - 8:11 am | मनीषा
खरंय ..
आपली ती उच्चं अभिरूची - दुसर्याचा तो हेकटपणा
आपली ती संस्कृती - दुसर्याचा तो शिवराळपणा
असच असतं .
25 Jul 2015 - 8:40 am | नाव आडनाव
क्या बात !