हवा एक पाऊस
मला गाफिल पाहुन
अवचित बरसणारा...
लटक्या रागावर माझ्या
लडिवाळ हसणारा...
हवा एक पाऊस
ओळखीच्या खुणांवर
उगीचच रेंगाळणारा...
ओल्या वाटांवरल्या
पाउलखुणा जपणारा...
हवा एक पाऊस
बेधुंद उत्कट सरींनी
मला वेढणारा...
घेऊनी मिठीत मजला
अलवार शहारणारा...
हवा एक पाऊस
दूर माळरानात
रातराणीस छेडणारा...
मालवून चांदण्या सार्या
रात्र नशावणारा...........
हवा एक पाऊस
फक्त माझ्या अन
माझ्यासाठीचा झरणारा
पसरलेल्या आभाळातुन
ओंजळीत विसावणारा.........
प्रतिक्रिया
14 Jul 2015 - 10:41 pm | कविता१९७८
मस्त
14 Jul 2015 - 10:57 pm | सटक
छान!!
रात्र नशावणारा...........
ऐवजी
रात्री धुंदावणारा...
15 Jul 2015 - 11:35 am | विशाल कुलकर्णी
मस्त
15 Jul 2015 - 10:46 pm | एक एकटा एकटाच
प्रतिसादाबद्दल आभार!!!!
15 Jul 2015 - 11:10 pm | जडभरत
कविता छानंय!!!
15 Jul 2015 - 11:13 pm | अत्रुप्त आत्मा
मस्त पडलाय पाऊस!![http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy002.gif](http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy002.gif)
16 Jul 2015 - 10:18 am | शब्दबम्बाळ
हवा एक पाऊस
भेटीसाठी माझ्या
आतुर असणारा,
बरसून फक्त माझ्यावरती
माझ्यामध्येच विरघळणारा...
16 Jul 2015 - 10:27 am | एक एकटा एकटाच
वा!!!!!!
16 Jul 2015 - 10:29 am | एक एकटा एकटाच
प्रतिसादांबद्दल आपल्या सर्वांचे आभार