प्रेरणा खरेतर वेगळे सांगणे न लगे. पण तरीही लिङ्क देतोच.
धनाजीरावांनी शिरेस लिहिलेल्या लेखाचे स्मरण करून, धनाजीराव अन बुवा दोघांची माफी मागोन ही कविता सादर केल्या गेली ऐसीजे.
नकळितां न्हाण आलें ग बायें
म्हैसरु झट्या घेवों लागलें ग मायें
म्हैशीसि लागियलें जुगतपिसें
नुमगे मज कैसे हे अपैसें
नेवोनि रेडा जवळी, येर्हवीं ओरडा हाकाळोंनि का वो
परिं भादवियाते नलगे, लागतां जुगणियाचा लाहो का वो
जुगतां पहिलेया वारी रेडा लागितां म्हयशीसी
समापणी होतां हरिखे, दाबियलें कैसें तिजशी
रेडियासि जरि हंबरैल महिशी देखुनिया "सह्ह्ह्ह्ही!!"
तर्हीं म्या निजमनीं हासेन 'ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!''
प्रतिक्रिया
15 Oct 2013 - 8:52 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
खपल्या गेले आहे......
=)) =))
15 Oct 2013 - 9:07 pm | मुक्त विहारि
हसतोय...
15 Oct 2013 - 9:38 pm | मदनबाण
रेडियासि जरि हंबरैल महिशी देखुनिया "सह्ह्ह्ह्ही!!" तर्हीं म्या निजमनीं हासेन 'ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!''
हॅ.हॅ.हॅ... ;)
रेड्याला आयता पिकलेला फणस मिळतो. ;)
15 Oct 2013 - 9:39 pm | प्रचेतस
भाषाप्रभू आहेस रे. _/\_
16 Oct 2013 - 11:02 am | अभ्या..
वा माउली वा.
तुम्हाला तुमचे भाषा प्रभुत्व सिध्द करण्यासाठी रेडाच मिळाला.
धन्य तो हाल्या. त्याचे पूर्व्जन्मीचे संचित. अजुन काय ? ;-)
15 Oct 2013 - 10:04 pm | अत्रुप्त आत्मा
@तर्हीं म्या निजमनीं हासेन 'ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!''>>> =)) __/\___/\___/\___ =))
ठ्ठार झालो आहे! =))
15 Oct 2013 - 10:36 pm | मोदक
:-))
15 Oct 2013 - 10:48 pm | धन्या
भाषाप्रभू दंडवत स्विकारा. :)
15 Oct 2013 - 11:21 pm | प्यारे१
बॅट्मॅन 'वेडा' (इथे खरा वेगळा शब्द आहे हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच) आहे. ;)
16 Oct 2013 - 11:13 am | धर्मराजमुटके
तो खरोखर वेडा नसतो मात्र ती कृती वेडेपणासारखी करतो त्यामुळेच तो खरा शब्द तयार झाला असावा हे नमुद करतो.
16 Oct 2013 - 2:40 am | आदूबाळ
"जुगतपिसें" हा शब्दालाच १० मिनिटं हसलो :))
प्यारे यांच्या प्रतिक्रियेला +१०००
16 Oct 2013 - 5:11 am | चौकटराजा
नकळत धागे दिसले
काहीजण उघड पणे
तर काही जण मनांत हसले !
16 Oct 2013 - 8:31 am | पैसा
महिषी महिष प्रणयप्रसंग उत्कटतेने रंगवला आहे. धनाजीराव आणि बुवांची माफी तुम्हाला मिळाली असे दिसते आहे. या पुढच्या अध्यायात महिष आणि महिषी वृंदावन गार्डनात झाडाभोवते फेरे मारणार का?
16 Oct 2013 - 11:16 am | तिमा
या पुढच्या अध्यायात महिष आणि महिषी वृंदावन गार्डनात झाडाभोवते फेरे मारणार का?
हो आणि तिथे ते ,
जाशील कोठे म्हशी तू
नेशील तेथे रेड्या तू
हे गाणेही म्हणतील.
16 Oct 2013 - 1:24 pm | अत्रुप्त आत्मा
=))
16 Oct 2013 - 2:29 pm | सूड
>>धूसर काळा पद अवजड हा पदात तुझिया देते
नेशील तेथे येते, रेड्या नेशील तेथे येते<<
असंही काहीसं ती महिशी गाऊ शकेल. ;)
16 Oct 2013 - 5:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
एवढं सगळं काव्य झाल्यावर पद अव'जड' होणारच आणि ते नेमके शब्दात पकडण्याची कवीची हातोटी वाखाणणीय आहे ;)
16 Oct 2013 - 2:39 pm | बॅटमॅन
महिषमहिषीयुगुलगीत आवडले !!! एक "हम्मा" वाले ध्रुवपद टाकले की खंप्लीट प्याकेजच होईल ;)
16 Oct 2013 - 5:22 pm | इरसाल
हम्मा हम्मा हम्मा ए ए हम्मा, इक हो गये हम और तुम.....
चालुन जाईल
16 Oct 2013 - 11:19 am | उद्दाम
नवरात्रीची देवी उठली त्याचा रेड्याला आनंद झालेला दिसतोय.
16 Oct 2013 - 11:25 am | अग्निकोल्हा
.
18 Oct 2013 - 10:11 pm | चित्रगुप्त
अद्भुत रस, शृंगार रस, हास्यरस, आणखी जे कोणकोणते रस असतात, ते सर्व एकवटून भलतीच रसाळ जाहली आहे कविता.
च्यामारी, 'कविता' मधेही 'विता' आले.
18 Oct 2013 - 11:19 pm | प्रचेतस
=))
19 Oct 2013 - 4:15 am | बॅटमॅन
कविता क विता?
=)) जबराट हो चित्रगुप्तजी.
18 Oct 2013 - 10:22 pm | साती
भारी आहे.
तू भाषाप्रभू आहेस.
20 Oct 2013 - 2:46 pm | चित्रगुप्त
कष्टी बहुतचि जाला, गवळी त्याची महीष न-विता
होई मुदित बहुत जो, रेड्यासंगे त्रिवार ती स्त्रविता
सत्वर बॅटे रचिली नाना छंदी रसाळ जी कविता
स्तंभित होति मिपाकर बॅटे ती कविता-ऐकविता
20 Oct 2013 - 2:57 pm | अत्रुप्त आत्मा
=))
20 Oct 2013 - 3:45 pm | बॅटमॅन
बघुनी कविता साची, लेखणी सरसोनि चित्रगुप्त,
पंतांसम रचती आर्या, होती काढोनि चित्र गुप्त;
पाहुनि शीघ्रकवित्वा, होई मिपाकरां कळणें बंद,
चित्रांचा आधिच लाहो, देखुनि त्यासवें काव्यछंद.
नित्य तुम्ही आम्हाते, चित्रांचा की मजा दाखवावा
तरि पैं एके दिवशी, कवितारस पुर्ताचि दाखवावा ||
20 Oct 2013 - 3:53 pm | प्रचेतस
बाकी ते महिष च्या जागी महिषी असे हवेय.
एकदम बैलाचे दूध आठवल्या गेले. =))
20 Oct 2013 - 4:04 pm | बॅटमॅन
बलीवर्ददुग्धदानासमवेत मगधवासी यादवाची कथा होती ना रे ती ;)
20 Oct 2013 - 4:06 pm | प्रचेतस
हो.
आता नेमकी आठवत नै पण.
20 Oct 2013 - 4:10 pm | बॅटमॅन
सकलगोपालचमूत कवणाची धेनू बहुदुग्धदायिनी ऐशी स्पर्धा लागते. कवण येक बादली, कवण दोन बादल्या येणेप्रमाणे गायी दोहताती. मगधवासी यादवो आलियावेरी प्रहरभराने वाटीभरी दोहुनी येतो, समस्त जनलोक थट्टा करिताती, तेव्हा रागेजून वरीलप्रमाणे बोलतो ऐसी कथा.
20 Oct 2013 - 4:13 pm | प्रचेतस
=))
20 Oct 2013 - 7:16 pm | प्रसाद गोडबोले
=))
20 Oct 2013 - 6:27 pm | चौकटराजा
ही शेलेब्रेट करायला कविता
कधी साहेब, चपटी मागविता ..... ?
20 Oct 2013 - 4:23 pm | सुहास झेले
=)) =)) =))
20 Oct 2013 - 6:42 pm | चित्रगुप्त
काय हे ऐकविता ?
चपटी मागविता
अंतुरी रागविता
धुणि-भांडि करविता
सासूसि बोलाविता
सुचेल काय कविता ?
20 Oct 2013 - 7:24 pm | इष्टुर फाकडा
भाषाप्रभुत्वाची एक पुनःप्रचीती आली :) आवडेश
15 Jul 2015 - 4:14 pm | जडभरत
जबराट्ट कविता!
इतकी धुमाकूळ घालणारी कविता आज प्रथमच वाचली!
काय खत्तरनाक! ग्रामीण पाचकळपणा आणि मोरोपंती भाषा! हे एक नवीन जुगाड!
सह्ही रे सह्ही बॅट भाऊ!
15 Jul 2015 - 4:23 pm | टवाळ कार्टा
आईच्चा...कहर म्हणजे अगदी कहर आहे
15 Jul 2015 - 5:07 pm | नाखु
कळलं बॅट्या कधीही रेड्यांच्या झुंजी पहायला का जात नाही ते !!!
न जाणो बहीर्गमन झाले तर ??
आता पहिली गोष्ट : जोड काव्य अद्भुत.
याचकांची पत्रे वाला
15 Jul 2015 - 5:25 pm | अत्रुप्त आत्मा
@याचकांची पत्रे वाला>>
15 Jul 2015 - 5:11 pm | प्रचेतस
कविता आणि प्रेरणेची लिङ्क पाहून पुनरेकवार त्या आठवणींनी भडभडून आले.
15 Jul 2015 - 5:26 pm | अत्रुप्त आत्मा
15 Jul 2015 - 5:35 pm | अस्वस्थामा
गेले ते दिवस.. राहिल्या त्या आठवणी.. ;)
15 Jul 2015 - 5:34 pm | पॉइंट ब्लँक
खल्लास! लै जबरी :)
15 Jul 2015 - 6:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
निजधामाला गेलो आहे वाचुन =))!!!
15 Jul 2015 - 7:26 pm | अजया
____/\____
21 Jul 2015 - 2:01 pm | प्रसाद गोडबोले
मग खरवसाचा बेत कधी ;)
'ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!'
2 May 2017 - 10:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्या बॅट्याला हाणा रे पकडुन. जवळजवळ उर्ध्व लागला हसुन.
3 May 2017 - 1:04 pm | सूड
पुन्हा हसून घेतलं
3 May 2017 - 1:40 pm | दशानन
मनातल्या मनात हसलो =))
10 May 2017 - 12:55 am | बॅटमॅन
सर्वाञ्चे अनेक आभार ;) =))