वादळ उठत..
एक मनात... एक दर्यात
पड-झड़ होतेच न दोघात
मोठी कुठली? सांग माझ्या कानात
मनात... भावना उध्वस्त;
दर्यात जीव अस्वस्थ!
मनातल्या नात्यात द-या बनतात;
सागरातल्या द-या भरून निघतात!
दर्याच्या वादळात आधार मनाचा
मनाच्या वादळात आधार कोणाचा?
सारंगाची नजर किनारा शोधते
उध्वस्त मन मात्र कायमचे हरते
प्रतिक्रिया
13 Jul 2015 - 7:40 am | दमामि
वा!
13 Jul 2015 - 8:07 am | जडभरत
खूप छान.
दर्याच्या वादळात आधार मनाचा
मनाच्या वादळात आधार कोणाचा?:-
हे खूप आवडलं.
13 Jul 2015 - 12:53 pm | वेल्लाभट
वाह वाह ! आशय खूप आवडला !
13 Jul 2015 - 2:54 pm | अत्रुप्त आत्मा
जिलबी संयंत्र वापरल्याचा भास् होतो आहे! ;-)