गाभा:
झालं आता यावरही 'राज'कारण सुरू. मुंबईवरील ह्ल्यानंतर म्हणे शर्मिला ठाकरे यांनी एसएमएस पाठवला की यात मराठी लोकांनीच आपले प्राण दिले आणि मनसेचे कार्यकर्ते लोकांना हरप्रकारे मदत करत आहेत. बातमीत असंही म्हटलंय, हल्ल्यावेळी राज ठाकरे कुठे होते? कुठल्याही हॉस्पिटलमध्ये वा मदतकार्यात त्यांना पाहिले नाही. याच पोलिस व सैनिकांच्या जीवावर राज ठाकरे निवांत झोपतात. तुम्हाला याविषयी काय वाटतंय?
http://www.latestnewsonline.net/world/amitabh-angry-over-thackeray%E2%80...
प्रतिक्रिया
2 Dec 2008 - 12:52 pm | टारझन
निदान अशा वेळी तरी राजकारन करू नये .. कोणीही ...
- टारझन
2 Dec 2008 - 1:01 pm | घाशीराम कोतवाल १.२
अरे टार्याभो हे तर मढ्याच्या टाळु वरचे लोणी खातात तर राजकारण हा धर्म आहे
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
2 Dec 2008 - 1:58 pm | आम्हाघरीधन
मागे यान्ची सुरक्षा काढल्याचे सुद्धा यान्नि राजकारण केले होते. देश दहशतिखाली असताना या प्रकारच्या उचापती निश्चीतच अपेक्षीत नाहीत.
'मढ्याच्या टाळुवरचे लोणी खाणे' यालाच म्हणतात.
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
2 Dec 2008 - 2:11 pm | परिकथेतील राजकुमार
तो एसएमएस 'म्हणे' तिने अमिताभ ला पाठवला होता !
=))
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
2 Dec 2008 - 2:16 pm | छोटा डॉन
असे २-३ ठिकाणी वाचले खरे, अमिताभच्या ब्लॉगवर सुद्धा आहे म्हणतात ...
हे सत्य असल्यास अशा परिस्थीतीतही राजकारण करणार्या व सुचणार्या व्यक्ती आणि प्रवॄत्तीचा आम्हाला "निषेध" करु वाटतो ...
बाकी काहीही असले तरी "ह्या परिस्थीती" मध्ये ह्या गोष्टी निंदनीयच ...
छोटा डॉन
" अफवा न पसरवणे व पसरवणार्याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? "
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
2 Dec 2008 - 4:18 pm | शैलेन्द्र
तो समस कोणत्यातरी समसचे उत्तर होते का?
2 Dec 2008 - 9:41 pm | योगी९००
मी आधी प्रकाशित केलेला हा ही धागा वाचा.
मराठी द्वेष
खादाडमाऊ
2 Dec 2008 - 10:41 pm | विकास
वर शैलेंद्र आणि खादाडमाऊ ने अप्रत्यक्ष सांगीतले आहेच. पण माझ्या मते शर्मिला ठाकर्यांनी तो एस एम एस हा राज आणि मनसेविरुद्ध जाणार्या एसएमएस ला प्रत्युत्तर म्हणून पाठवला असेल. याचा अर्थ असे लिहीणे बरोबर आहे का? तर ते नाही, पण तरी देखील ते एक प्रश्न जो सर्वत्र जात होता त्याला उत्तर आहे असे समजल्यास त्यातील भावना या एकदम "चीप राजकारणी" म्हणून घेण्याची गरज मला तरी वाटत नाही.
वृत्तपत्रे आणि नेटवर्क्स अर्धसत्य असलेल्या बातम्या सतत देत असतात. आत्ता तर त्यांना जबाबदारीची जाणीव होण्यापेक्षा असल्या हीन पातळीवर जाण्यातच चढाओढ चालू आहे असे वाटते. त्यामुळेच एक प्रश्न विचारावासा वाटतो की, अमिताभला शर्मिला ठाकरेंनी जो एस एम एस पाठवला तो प्रतिसाद म्हणून पाठवला की असाच? ह्या बद्दल काही लिहीले गेले आहे का? अथवा अमिताभने तसे सांगीतले आहे का?
2 Dec 2008 - 11:20 pm | विसोबा खेचर
चालू द्या..!
2 Dec 2008 - 11:31 pm | विकास
चालू द्या..!
कुणाचेच चालू द्या?
तात्या नक्की कोणाच्या टिम मधे आहेत आणि नक्की काय करताहेत? फलंदाजी की गोलंदाजी? :?