सौ.अ.जि.१ पैसाताई यांना खालील लेख पुष्पगुच्छ देऊन समर्पित. सदर पुष्पगुच्छावर विक्रेत्याचा लोगो असेलच पण तरीही एक विशेष श्टीकर लावून तो पुष्पगुच्छ कोणत्या विक्रेत्याकडून खरेदी केला आहे ते कळवले आहे. पैसाताईंना हा लेख समर्पित करण्याचे कारण काही चाणाक्ष वाचकांनी जाणले असेलच पण ज्यांनी ते जाणले नसेल त्यांच्यासाठी पुढील खुलासा:
पितृपक्ष सुना सुना गेला अशी खरड लिहून त्यांनी मला मसणातून उठवले. अर्थातच, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. या पार्श्वभूमीवर आमचे एक जालमित्र मध्यंतरी मला म्हणाले होते. “अगं हडळी, कधीतरी माणसांत ये.” तो अपमान आणि शल्य अद्याप माझ्या हृदयात सलते आहे. सदर व्यक्तीचा लोकांनी या लेखात जाहीर निषेध करावा अशी मी विनंती करते.
सर्वपित्री जवळ येत असताना काहीच चमत्कारिक आणि भयंकर घडू नये अशी माझी इच्छा नव्हती पण हिंदू क्यालेंडरानुसार यावर्षी सर्वपित्रीने आमच्या लाडक्या हॅलोविनला कल्टी दिली, त्यातून नव्या प्रोजेक्टचे भूत मानेवर बसलेले त्यामुळे सर्वपित्री गुळमुळीत निघून जाते असेच वाटले होते पण पैसाताईंमुळे काहीतरी भयंकर धागा टाकण्याचा योग आला आहे.
त्यातून गेली वर्ष-दोन वर्षे उगीच माझ्या मानगुटीवर चढून बसण्याचा प्रयत्न करणार्या घासुगुर्जींचा “दृष्ट कशी काढावी?” हा लेख औत्सुक्यापायी लिहिला आहे, समज गैरसमज जाणून घेण्यासाठी लिहिलेला आहे असा समज झाल्याने मी याच लेखाला माझे प्रेरणास्थान२ बनवले आहे.
अवांतरः सहज आठवलं म्हणून आमच्या एका आयटमला आम्ही फ्यांटम म्हणत असू, दुसर्याला वेताळ तर तिसर्याला मुंजा.
लहान मुलांची किंवा मोठ्यांचीही कधी कधी भुते बनतात. बाहेरची बाधा होणे, माणूस झपाटला जाणे असे प्रकार घडतात.
इच्छा अतृप्त राहिलेला किंवा अनैसर्गिक मृत्यू आलेला मनुष्य भूत बनतो असे समजले जाते. माणसाचे भूत बनून त्याने त्रास देऊ नये म्हणून श्राद्ध करणे, दिवस करणे, शांती करणे इ. प्रकार केले जातात.
हे सर्व ठीक पण ही चर्चा भूत कसे काढावे त्यावर नसून भूत कसे बनते त्यावर आहे. तुमच्या लहानपणापासून तुम्ही “मग तो व्यक्ती भूत बनला....” अशा टैपाच्या गोष्टी ऐकल्या असतील त्या इथे सांगा बघू.
भूत नेमके कसे बनते? त्यासाठी कोणत्या वस्तू वापरतात? भूत कोणत्याही तिथीला बनता येते का? इतर कोणाला बनवता येत नसल्यास स्वतःच स्वतःला भूत बनता येते का? यामागचे शास्त्र काय आहे? हे सर्व थोतांड आहे असा अंनिसकडे कोण्ता पुरावा, स्टडी आहे काय? माणसाप्रमाणेच घर, दुकान, प्राणी यांचेही भूत बनते का?
कोकणातल्या लोकांना खास आवाहन आहे की त्यांनी खास कोकणी भुतांच्या गोष्टी थोडक्यात इथे सांगाव्या आणि मिपाकरांना उपकृत करावे. बिगर कोकणी लोकांनाही हे आवाहन लागू आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी. प्रतिसाद देताना तो भयंकर आणि चमत्कारिक आहे याची दखल घ्यावी.
सुरुवात माझ्यापासून करते:
आमची आजी (बाबांची आई) पक्की कोकणातली. लहानपणापासून तिने मला भुतांच्या गोष्टींचेच बाळकडू देऊन वाढवले. आमच्या आईला हा प्रकार पसंत नसे पण तिची काय बिशाद होती आजीसमोर शब्द काढण्याची. आजीने तिला तिथेच माणसांतून उठवली असती अर्थातच, तसं कधी घडले नाही.
आजीच्या गावी एक कोळी होता. त्याचं नाव पाकुल्या. पाकुल्या तसा वयानुसार कमरेतून वाकला होता. मच्छीमारी सोडून किनार्यावर सुकवायला टाकलेल्या खारवलेल्या माशांची रखवाली करत असे. अशाच एका रात्री पौर्णिमा अली. त्या पुनवेच्या रात्री चंद्र आकाशात वर आला होता. समुद्राचं पाणी चांदीसारखं चमचमत होतं. रुपेरी वाळूने चंद्राला स्वत:त सामावून घेतल्याचा भास होत होता. किनार्यावर मंद वारा सुटला होता आणि त्याच रात्री रखवाली करणारा पाकुल्या अचानक खुडुक झाला.
अजूनही कधीतरी पौर्णिमेच्या शांत रात्री समुद्रावर भटकायला गेलेल्या लोकांना पाकुल्या दिसतो. खारवायला टाकलेल्या माशांची रखवाली करत असतो. फक्त पाकुल्याचं अंग तो मेला त्या रात्री समुद्र आणि वाळू चमकत होती तसंच चांदीसारखं चमचमत असतं. लोक त्याला आता “पाकुल्या चकचक” म्हणतात.
तात्पर्यः पौर्णिमेच्या रात्री समुद्रावर फिरायला जाऊ नये. गेलात तर चकचक हे उपनाम मानगुटीवर बसायची शक्यता आहे. तसेही पौर्णिमेला काय करावे याचा सल्ला युयुत्सुंकडून घ्यावा असे माझे स्पष्ट मत आहे.
आता येऊ द्या – खवीस, हडळे, गिरे, हाकामारी, चकवा यांच्या कहाण्या ऐकण्यास उत्सुक. सर्वांना सर्वपित्री अमावास्येच्या शुभेच्छा!!
(हडळ नं. १) प्रियाली.
१ अ. जि. = अद्याप जिवंत
२ हे विडंबन नाही. सदर लेखाचा प्रेरणा म्हणून वापर केला आहे.
प्रतिक्रिया
25 Sep 2011 - 11:59 pm | अविनाशकुलकर्णी
दारुकाम झाल्यावर रिकाम्या बाटलीतुन भूत काढायच्या पुसट आठव्णी आहेत..
भुते
**भुता बद्दल आपणास काय माहिति आहे का?
**भुताचे पाय उलटे असतात का?
**उदमांजर नावाच भुत लहान मुलांना पळवुन नेते का?
**भुतांचे फोटो काढले गेले आहेत ते खरे आहे का?..आपणा पैकी कुणी पाहिले आहे का??[भुत किंवा फोटो}
**हडळ/ डाखीण दिसायला खुप सुंदर असते असे म्हणतात..आपणास काहि अनुभव आहे का?
**आसरा, इर, वीर, पिशाच्च, खवीस, वेताळ, गिरा, सटवाई, जखाई, जखीण, कैदाशीण, ड्रॅक्युला, ब्रह्मसमंध, चकवा..डेमन,भानामति..मुंज्या भुत्या.. कोण आहेत?
**एखादि स्री जर बाळंत पणात गेली तर तिचे भुत होते व त्याला कैदाशिण असे म्हटले जाते..हि कैदाशिणीला लहान मुले आवडतात...या बद्दल जाणकार माहिति देवु शकतिल का????????
** आरश्यात भुताचे प्रतिबिंब दिसत नाहि हे ऎकलेले खरे आहे का???
एक ना अनेक प्रश्णांचे मोहळ उठले आहे..
26 Sep 2011 - 12:21 am | प्रियाली
मिपावरचे सर्व लग्न झालेले पुरुष या प्रश्नाचे उत्तर हो असे देतील असा अंदाज आहे.
गेल्यावेळी माझे पाय कोणीतरी तपासले होते पण असे काहीतरी होईल अशी अटकळ असल्याने मी पाय सुलट फिरवून ठेवले होते.
हा घ्या माझ्या घरातला भुताचा फोटो:
26 Sep 2011 - 2:45 pm | नरेश_
आणि इतका मोठा प्रतिसाद? एवढ्या मटेरियलमध्ये दोनचार धागे सहज (मिपाकर सहजजी नव्हेत)प्रसूत करता आले असते,(शब्दसौजन्य:पाभे) :) हा प्रतिसाद (साक्षात) तुम्ही नव्हे तर तुमच्या भूताने लिहीला असल्याची साधार शंका मनाला चाटून गेली ;)
26 Sep 2011 - 12:34 am | गणपा
धाग्याच शिर्षक वाचून मिरासदारांच्या 'भुताचा जन्म' ह्या विनोदी कथेची आठवण झाली. :)
26 Sep 2011 - 1:20 am | शहराजाद
सविस्तर प्रतिसादासाठी जागा आरक्षित करून ठेवत आहे.
26 Sep 2011 - 5:28 am | पैसा
या लेखाला प्रत्यक्षपणे कारणी "भूत" झाल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेते. (लोगोसकट) पुष्पगुच्छाबदल भूत महामंडळ आभारी आहे!
भुतांच्या निरागस जगातून माणसांच्या जगात येणे हे कठीण गोष्ट आहे ,पण प्रियालीने ती सहजसाध्य केली आहे. तिच्या घरातला (जॉन अब्राहमपेक्षा) देखणा भुताचा फोटो पाहून फार आनंद झाला. पाकल्याची गोष्ट आवडली. रात्री बेरात्री बाहेर भटकणार्या आत्म्यानी त्यापासून योग्य तो बोध घ्यावा ही विनंती!
रत्नागिरीच्या भुतांबद्दल नंतर सवडीने लिहीन. आज सर्वात आधी आठवण झाली ती पणजी आणि पर्वरीतल्या २ फेमस भुतांची. (इथे मिपाकरांनी पैसा आणि प्रीतमोहर यांची आठवण काढू नये.)
पणजी भर शहरात 'फिदाल्गो' नावाचं मोठं हॉटेल आहे. बर्याच वर्षांपूर्वी तिथल्या स्विमिंग पुलात एक माणूस अपघाती बुडून मेला होता. त्यानंतर चांगलं चालणारं ते हॉटेल अचानकच 'बसलं.' कितीतरी मालक बदलले, पण ते काहीकेल्या चालेना. अजूनही 'तो' स्विमिंग पुलाजवळ दिसतो असं म्हणतात. कोणी फिदाल्गो हॉटेलात गेल्यास स्विमिंग पुलाजवळ दिसणारी व्यक्ति कोण आहे याच्या चौकश्या करू नयेत.
पर्वरी इथल्या पेट्रोलपंपाजवळ मोटारसायकल अॅक्सिडेंट होऊन दोघेजण गेले होते. त्यानंतर अनेक मोटारसायकल चालकांना मोटारसायलीपुढे अचानक कोणीतरी आडवे गेल्याचे अनुभव आले आहेत. सरळ लांबपर्यंत दिसणार्या रस्त्यावर हवेतून अचानक कोणीतरी दिसावं ही गोष्ट भयनकच! आमच्या ऑफिसातल्या एकाला संध्याकाळी ७ च्या सुमाराला त्या जागी असंच कोणीतरी आडवं आलं आणि त्याची मोटारसायकल घसरून त्याचा हात फ्रॅक्चर झाला. त्याच्या पाठीमागे बसलेला दुसरा माणूस मात्र रस्त्यावर कोणी नव्हतं असं छातीठोकपणे सांगत होता. त्याचाही पाय फ्रॅक्चर झालाच!
माहितगार लोकांनी मात्र संध्याकाळच्या वेळी तिथून परत जाऊ नको अशाच सल्ला दिला.
आणखी गोष्टी आठवतील तशा देईनच. तोपर्यंत सर्वांना सर्वपित्री आणि हॅलोविनच्या आगाऊ शुभेच्छा!
-हडळ क्र. २
26 Sep 2011 - 10:20 am | नितिन थत्ते
>>पणजी भर शहरात 'फिदाल्गो' नावाचं मोठं हॉटेल आहे. बर्याच वर्षांपूर्वी तिथल्या स्विमिंग पुलात एक माणूस अपघाती बुडून मेला होता. त्यानंतर चांगलं चालणारं ते हॉटेल अचानकच 'बसलं.'
मागच्या दिवाळीत जागा मिळण्यासाठी क्यू लावावं लागतो असं जोरदार चालणारं फिडाल्गो हाटेल बहुधा वरिजनल फिडाल्गो हाटेलाचं भूत असावं. ;)
(खवीस नं १)
नितिन थत्ते
26 Sep 2011 - 6:29 pm | पैसा
दिवाळीत ना? दिवाळीपासून ३१ डिसेंबरपर्यंत गोव्यात इतकी गर्दी असते की लोक म्युन्सिपल गार्डनमधे झाडाखाली झोपायला तयार असतात, बिचार्या भुतांबरोबर काय, कोणीही रहायला तयार होईल!
तुम्ही त्या स्विमिंग पूलमधे जाऊन आलात की काय? तुमच्या खवचीसुद्धा शांत करून घ्या हो, नाहीतर 'ते' तिथे पण येतील!
26 Sep 2011 - 6:31 pm | प्रियाली
चिच्चा, धर्मांतर कधी केलेत?
26 Sep 2011 - 7:50 am | रेवती
चला! मला घाबरवणारा धागा आला!
मी लहाणपनापासूणच भूतांना घाबरते......म्हणजे 'भूत' या शब्दाला घाबरते.
आमच्याकडे दहा वर्षे कामाला असलेल्या आजीबाई आजारी पडल्या.
स्वभावाने फारच सालस, मायाळू होत्या. विशेषत: माझ्या बाबांवर मुलासारखे प्रेम करीत.
ट्रीटमेंटसाठी पैसे देऊ केले होते पण त्या शेवटच्या घटका मोजायला लागल्या.
जाण्याआधी आईची गैरसोय होवू नये म्हणून नव्या मोलकरणीची व्यवस्था लावून दिली.
रोज बाबा नव्या बाईंना आजींच्या तब्येतीविषयी विचारत असत.
शेवटी 'ती' बातमी आलीच! बाबा दिवसभर जेवले नाहीत.
नव्या कामवाल्या बाई चांगल्या रूळल्या होत्या आणि एक दिवस दारावरची बेल वाजली.
डोळाछिद्रातून पाहिल्यास कोणीच दिसले नाही. बाबांच्या सांगण्यावरून दार उघडताच त त प प करायला लागले.
पाय उलटे आहेत का ते पाहिले. स्वयंपाकघरात गेल्यावर माझ्याकडे पाहून आईने "कोण आलय?" म्हणून विचारलं.
"असा काय भूत पाहिल्यासारखा चेहेरा केलायस?" म्हटल्यावर तर मी मटकन खालीच बसले. नंतर समजलेल्या ष्टोरीवरून आजीबाई मरता मरता वाचल्या. तिरडी बांधायचे कष्ट वाया गेले. नंतर वर्षभर हट्टाने कामाला येत होत्या. मग मात्र 'खरच' गेल्या. नंतरचे वर्षभर त्या आल्या की मला भूतच येऊन घरकाम करतय असं वाटायचं.
बाकी पैसाताईचे अभिनंदन! सर्वांना सुरक्षित सर्वपित्री आमोशा!;)
26 Sep 2011 - 9:04 am | ऋषिकेश
माझ्या आजीने सांगितलेली कथा:
ती व तिची बहिण एकदा पहाटे नेहमीप्रमाणे फुलं वेचायला गेल्या होत्या. काहितरी विषेश असेल म्हणून अधिकची फुले हवी होती, त्यासाठी त्या नदीशेजारी असणार्या झाडांवरची फुलं खुडत होत्या. अचानच त्यांना मागुन कोणीतरी चाललंय असं वाटलं.. आणि मागे वळून पाहिलं तर जवळ जवळ 'विजेच्या तारांइतकी उंच' अगदी माणसासारखी नाही पण माणसासदृश आकृती तेथून तरंगत/चालत जाताना दोघींनीही पाहिली.
कथा क्र. दोनः पनवेलला एका परिचितांच्या वाड्यात एक विहिर होती. वर्षातील एका विषिष्ट दिवशी (दिवस विसरलो) जर तुम्ही त्याच्या काठावर गेलात तर आतून हाका ऐकू येत असत, आणि त्या तुमच्या नावाने नसून कोणत्या तरी वेगळ्याच नावाने येतात, गंमत म्हणजे त्या नावाची व्यक्ती तुम्ही ऐकलेली नसते. त्याहुन गंमत म्हणजे पुढील वर्षाच्या आत त्या नावाची व्यक्ती तुमच्या वाड्यात येऊन त्या विहिरीत जीव द्यायची. आता ती विहिर बुजवून बोअरवेलने पाणि खेचले जाते. 'त्या' नेमक्या दिवशी नेमकी मोटार का नादुरुस्त होते हा भाग सगळे नजरेआड करतात :)
(हिच ती विहिर ज्यात मला पोहायला शिकवायचा प्रयत्न केला गेला होता :) . कारण वर्षातल्या अन्य दिवशी तेथे धोका नसे)
26 Sep 2011 - 9:29 am | हंस
हा प्रतिसाद आधी एका धाग्यावर दिला होता, इथे पुन्हा देत आहे-
हा माझा अनुभव आहे, मी साधारण सातवीत असेन त्यावेळेस घडलेली घटना आहे ही, एके दिवशी मी, आई आणि वडिल आमच्या गावाकडे चालत निघालो होतो, साधारण रात्री १२ ची वेळ असावी, गावाच्या बाहेर वळणावर एक वड आहे, लोकांच्या म्हणण्यानुसार तिथे एक भुताचे वास्तव्य आहे, त्या वळणावरुन जात असताना अचानक वडील तिथेच खाली बसले आणि त्यांच्या एका पायात असह्य वेदना सुरु झाल्या, काही केल्या त्यांना चालता येईना. कसेबसे मी आणि आईने त्यांना उभे केले, तेवढ्यात समोरुन दोघेजण M80 वरुन आमच्या जवळ आले आणि अचानक गाडी घसरुन पडले, हे बघताच वडीलांनी पळत जाऊन त्यांना उठ्वले, आई आणि मी हे बघतच बसलो, ज्या माणसाला काही क्षणांपूर्वी चालताही येत नव्हते त्याने पळत जाऊन त्या दोन माणसांन उठवले. पुढे आम्हि घरी आलो काही वेळ जाताच वडिलांची दातखिळी बसली, बरेच उपाय करुन त्यांना normal केले. अचानक ते जोरात ओरड्त त्या वडाच्या दिशेने पळत सुट्ले, ३-४ लोकांनांही आवरेनासे झाले, त्या रात्री ही घटना अनेक वेळा घड्ली, शेवटी त्यांना दोरीने बांधून ठेवावे लागले, पण दुसर्या दिवशी त्यांना यातले काहिही आठ्वत नव्हते.
ही घटना घडली त्यावेळी ते पिलेले होते, पण हे रोजचे होते आणि असा त्रास कधीही झाल नाही. मी पण त्या झाडाखालून बर्याच वेळा रात्रीच्या सगळ्यावेळी गेलो आहे, पण मला कधीही वेगळे जाणवले नाही. माझा भुतांवर विश्वास नाही पण ह्या घटनेची उकल मी अजुणही करु शकलो नाही.
26 Sep 2011 - 9:52 am | राजेश घासकडवी
<पंगा मोड ऑन> हे वाक्य पार्स करताना इतके कष्ट पडले की आमचेच भूत होण्याची वेळ आली.
गेली वर्ष दोन वर्षे उगीच माझ्या मानगुटीवर चढून (मग) बसण्याचा प्रयत्न करणाऱ्या....
गेली वर्ष दोन वर्ष घासुगुर्जींच्या मानगुटीवर चढून बसण्याच्या माझ्या प्रयत्नातून औत्सुक्यापायी "दृष्ट कशी काढावी" हा लेख लिहिला गेला आहे... असंही एकदा वाटलं. नंतर
घासुगुर्जींचा “दृष्ट कशी काढावी?” हा लेख औत्सुक्यापायी लिहिला आहे असा समज झाल्याने प्रेरणास्थान...??!!?? (तो लेख घासुगुर्जींनी लिहिलेला नाही हे आपण जाणत असालच हे गृहित धरतो)
इतरही अनेक क्लिष्ट पर्याय मनात आले, पण ते सर्वच लिहून काढणे शक्य होईल असे वाटत नसल्याने येथेच थांबतो.
पण मुळातच आधी १० वेळा वाचून मगच प्रसिद्ध केल्यास माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या वाचकांना असे त्रास कमी होतील अशी आशा वाटते, हे म्हणणे मान्य होण्यास प्रत्यवाय नसावा.
<पंगा मोड ऑफ>
बाकी मराठी संस्थळांवर काही मृत आयडींची भुतं एकमेकांना खरडी लिहिताना मी स्वतः पाहिली आहेत. काही वेळाने पहावं तो खरडवह्या पूर्ववत ऍक्सेस डिनाइड झालेल्या असतात. खरंखोटं बापडा सर्व्हरच जाणो. पण असलं काही झालं की तोही थोडा वेळ भूतबाधा झाल्याप्रमाणे गपगार पडलेला असतो.
26 Sep 2011 - 2:21 pm | प्रियाली
या धाग्याला काय द्याचं ते बोला गुर्जी. ;) वाक्य पार्स करताना तुम्हाला त्रास व्हावे म्हणूनच ते टाकले आहेत हे प्लीज लक्षात घ्या!
तुम्ही सोडून इतरांना तेथे अदृश्य विरामचिन्हे दिसत आहेत म्हणूनच त्यांना त्रास झाला नाही.
26 Sep 2011 - 10:59 am | पिवळा डांबिस
त्याच रात्री रखवाली करणारा पाकुल्या अचानक खुडुक झाला.
मराठीत 'खुडुक होणे' म्हणजे पुनरुत्पादनासाठी निकामी ठरणॅ....
हा शब्दप्रयोग मुख्यत्वेकरून कोंबडीसाठी करतात. जर नियमित अंडे देणारी कोंबडी जर एकाएकी अंडे देईनाशी झाली तर ती कोंबडी "खुडुक झाली" असं म्हणतात....
वरील लेखात पाकुल्या खुडुक झाला म्हणजे नक्की काय झालं?
:)
26 Sep 2011 - 2:22 pm | प्रियाली
मुंबईकरांच्या बोली भाषेत खुडुक होणे म्हणजे खपणे.
तुम्ही बी कोकणी ना मग बाकी गजाल्या कसल्या करता? गोष्ट सांगा बघू.
26 Sep 2011 - 10:24 pm | पिवळा डांबिस
गोष्ट सांगा बघू.
आमी भुतां आपल्याच प्रजातीतल्या लोकांक एक्स्पोज करणोंव नाय!!!!
आय इन्व्होक द फिफ्थ अमेंडमँट!!!!!
:)
26 Sep 2011 - 11:13 am | विसुनाना
माझ्या वडिलांच्या कळत्या बालपणीची गोष्ट आहे.माझे आजोबा (त्याकाळचे ;)) डॉक्टर असल्याने त्यांचा भूताखेतांवर (आणि देवादिकांवरसुद्धा) विश्वास नव्हता. "डॉक्टरसाहेब, त्या बंगल्यात राहू नका. तिथे खून झालेत." असे सांगूनही त्यांनी त्या 'उपलपांचा बंगला' नामक रिकाम्या पडलेल्या वास्तूत बिर्हाड केले.
तिथल्या वास्तव्यात अचानक घरातले दिवे जाणे, रात्री कोणी घरात फिरत आहे असे आभास होणे इ.इ. प्रकार नेमाने होत होते. (तपशील लिहिले तर भयकथा होईल.) एके रात्री आमचे मोठे काका (त्यावेळी वय १२-१३ वर्षे) अचानक झोपेतून उठून अंगणात येऊन गरागरा लाठी फिरवू लागले. त्यांना खरेतर लाठी फिरवता येत नसे. घरातल्या मोठ्या व्यक्तींनी थांबवायचा प्रयत्न केला तर, "जवळ येऊ नका, एकेकाचे डोस्के फोडीन" असे ओरडू लागले.काही वेळाने बेशुद्ध झाले.
नंतर लोकांच्या सांगण्यानुसार सदर जागेच्या मूळ मालकाचा (कै.? उपलप) काही वर्षांपूर्वी खून झाला त्यावेळी तोही अंगावर आलेल्या मारेकर्यांवर लाठी घेऊन तुटून पडला होता असे कळाले.
घरातील स्त्रीसदस्यांच्या आग्रहावरून माझ्या आजोबांनी तो बंगला सोडला.
हा प्रकार कोकणात घडलेला नसून सांगली जिल्ह्यातील एका दुष्काळी गावात घडलेला आहे. उपलपांच्या भूत-पाक-क्रियेबद्दल माहिती नाही.पण यत्र, तत्र, सर्वत्र भुतांची निर्मिती होत असते याचा हा सबळ पुरावा आहे. ती केवळ कोकणाची मक्तेदारी नाही याची कृपया नोंद घ्यावी.. ;)
26 Sep 2011 - 11:19 am | बिपिन कार्यकर्ते
विसुनानांशी सहमत आहे. मला तर साक्षात पुण्यातच भूताचा अनुभव आला.
झाले काय की एकदा माझी एक मैत्रिण आली पुण्यात. तिला घेऊन आम्ही बाहेर जेवायला गेलो. काव्यशास्त्रविनोदात वेळ अगदी छान गेला... मग आम्ही त्या मैत्रिणीला परत घरी सोडायला गेलो. जशी गाडी तिथे पोचली, तसे लक्षात आले की गाडीत कोणीच नव्हते... मैत्रिण गायबच झाली एकदम! अस्सा घाबरलोय म्हणून सांगू! जी गाडी पळवली ती एकदम घरी येऊनच श्वास घेतला!
बाप रे!
;)
26 Sep 2011 - 11:36 am | विसुनाना
पुण्यात काय? तिथे काहीही घडू शकते. आणि पुणे कोकणात नाही तर अख्खे कोकणच पुण्यात आहे! ;)
त्यामुळे विशेष काही वाटले नाही.
नवल वाटले ते या गोष्टीचे की एक पुणेकर असूनही आपण आपल्या पाहुण्यांना हाटेलात जेवायला घेऊन गेलात. कदाचित बिल द्यावे लागेल या भितीने मैत्रिणीने कलटी मारली असावी. :)
26 Sep 2011 - 11:51 am | बिपिन कार्यकर्ते
मी पुणेकर? लाहौलबिलाकुवत! तोबा तोबा!
26 Sep 2011 - 12:20 pm | परिकथेतील राजकुमार
आम्ही हेच लिहायला आलो होतो, की बिकांना असा असा अनुभव आला म्हणून.
असो..
आम्हाला त्या काव्यशास्त्रविनोदातील 'सायकलवरती डबलसीट हिंडणार्या भूताची' गोष्ट आठवली.
26 Sep 2011 - 2:23 pm | प्रियाली
बिकाशेट गाडी इतकी हळू हाकतात की सदैव हवेतून संचार करणार्या मैत्रिणीला ते रुचले नसावे. ;) तरी बरं पाय उल्टे आहेत का हे चेक केले होते आधी.
26 Sep 2011 - 3:11 pm | नरेश_
तुमच्याबाबत घडलेला वरील किस्सा घरी ठाऊक आहे का? नाही म्हणजे मैत्रिणीला घेऊन हॉटेलात जाणं वगैरे वगैरे ;)
त्यानंतर तुम्हाला आलेले भूताटकीचे अनुभव वाचण्यास युयुत्सुक, माफ करा उत्सुक आहे ;)
26 Sep 2011 - 12:27 pm | श्रावण मोडक
प्रियालीला 'अगं हडळे माणसांत ये' असं म्हणून 'घरचं झालं थोडं, व्याह्यानं धाडलं घोडं' अशी स्थिती आणणाऱ्याचा जाहीर निषेध.
तर, भूत कसे बनते? याविषयी प्रियालीने एकदा आत्मसंवाद करावा, त्यात जे संचित हाती लागेल ते या धाग्यावर लिहावे, अशी आग्रहाची विनंती. मंडळ आपले आभारी राहील. ;)
26 Sep 2011 - 2:33 pm | प्रियाली
थांकु! एक तुम्हीच काय तो निषेध प्रस्ताव शिरिअसली घेतलात.
आत्मसंवादासाठी जागा राखून ठेवते.
26 Sep 2011 - 3:16 pm | परिकथेतील राजकुमार
काही दिवसांपूर्वी एके रात्री सलग ३/४ तास पावले सरळ करून बसायला लागल्याने अशाच एका पाशवी शक्तीला जो त्रास झाला त्या बद्दल मी पण दु:ख व्यक्त केले होते.
26 Sep 2011 - 3:36 pm | विसुनाना
एक प्रामाणिक शंका : भुतांना संचित (+प्रारब्ध+क्रियामाण) असते का?
26 Sep 2011 - 4:24 pm | श्रावण मोडक
शंका अगदी रास्त. पण, सांप्रतजन्मी भूत असले तरी मूळचा जन्म माणसाचा असल्याने कर्मविपाक झालेला नसतो व ती कर्मे आठवतात, त्यांची परिणती आठवते, असे आमचे जुलाबराव महाराज चाळेकुन्द्रीकार (ब्रम्हीभूत) सांगायचे. त्यानुसार, भुतांनाही पूर्वजन्मीच्या आठवणी या होत असतात, व त्याचे सांप्रत जन्मी संचित होत असते, असे विवेचनही त्यांनी केले होते. ;)
26 Sep 2011 - 2:27 pm | नरेश_
आता दिनांतास भूत/ते, हडळ/ळी शोधणं आलं. ;)
26 Sep 2011 - 1:54 pm | सुनील
मस्त आहेत एकेक किस्से!
26 Sep 2011 - 2:37 pm | प्रियाली
पैसा, विसुनाना, ऋषीकेश, हंस यांचे किस्से भारी आहेत. आजचा दिवस चांगला जाणार.
रेवती धीर कर. शिकागोला एक सेमेट्री आहे. रेजरेक्शन मेरी म्हणून तिचा किस्सा अखील अमेरिकेत सु की कुप्रसिद्ध आहे.
26 Sep 2011 - 7:11 pm | रेवती
लिंक वाचली.
नकोच तो विषय!;)
28 Sep 2011 - 2:33 pm | बिपिन कार्यकर्ते
गेल्या काही महिन्यांपासून शिकागोत असाच प्रकार अजून एका ठिकाणी घडतो असे ऐकले आहे! ;)
28 Sep 2011 - 7:28 pm | रेवती
कळ्ळं बरं! एवढं काही बोलायला नकोय!
आणि तसंही मी तुझ्याशी बोलणं बंद केलय.
राजकारणातच हवा होतास रे! दलबदलू कुठचा!
8 Jul 2015 - 4:50 pm | निरन्जनदास
मिपावरल्या समस्त (स "मस्त")...
हडळ/ डाखीण, आसरा, इर, वीर, पिशाच्च, खवीस, वेताळ, गिरा, सटवाई, जखाई, जखीण, कैदाशीण, ड्रॅक्युला, ब्रह्मसमंध, चकवा..डेमन,भानामति..मुंज्या भुत्या.. हे खविसांनो , -
एक भूत आवाहन करीतो की मी आताच अत्यंत उच्च दर्ज्याच्या सेमेट्रीयोत्तम रेजरेक्शन मेरी वाचून काढली. तेथून कसाबसा उलट्या पायांनी टिंब टिंब ... पाय लावून पळून येथे येवून स्वतःला वाचवून आव्हान देतो आहे की ,-
विंग्रजी येणाऱ्यांसाठी या लेखाचे मराठी भाषांतर करावे आणि मराठी येणाऱ्यांसाठी इंग्लिश भाषांतर करावे, ही सुलट्या पायांनी विनंती.
26 Sep 2011 - 2:38 pm | विसोबा खेचर
जियो..! :)
26 Sep 2011 - 3:52 pm | विनायक प्रभू
नुसते काय वर न थांबता कसे ह्यावर मार्गदर्शन करावे अशी मी पुरवणी जोडतो.
26 Sep 2011 - 3:57 pm | श्यामल
माझ्या आजीकडुन ऐकलेली ही गोष्ट :-
कोकणातल्या एका गावात एक शाळामास्तर आपल्या कुटुंबासहीत शाळेच्या गावी रहायला आला. गावकर्यांनी बर्याच वर्षांपासुन रिकाम्या असलेल्या एका घरात त्याची रहाण्याची सोय केली.
वारंवार बदली होणार्या नोकरीमुळे अगदी मोजक्या असलेल्या सामानाची लावालाव करुन झाल्यावर मास्तरांच्या सुगरण बायकोने छानसे जेवण रांधले. रात्री दोघे जेवायला बसल्यावर "माका पन दी" असे शब्द ऐकु आले. मास्तराने ह्या शब्दांच्या रोखाने पाहिले असता स्वयंपाकघराच्या खिडकीच्या गजातुन एका बाईचा हात दृष्टिस पडला. मास्तरांना वाटले, बायकोने बनवलेल्या रुचकर जेवणाच्या खमंग वासाने कुणी शेजारची गरीब बाई जेवण मागायला आली असेल. मास्तर बायकोला म्हणाले, "दे तिला पण जेवण." बायकोने जेवण वाढुन ती त्या बाईला बोलवायला खिडकीजवळ गेली. पण तिथे तर कोणीच नव्हते ! ........त्या उभयतांना वाटले की संकोचामुळे ती बाई तिथुन निघुन गेली असावी. पण नंतर सलग तीन रात्री असा प्रकार घडु लागला.
मास्तराला काही राहवेना, म्हणुन त्याने एका गावकर्याकडे हा विषय काढला. गावकर्याने दिलेल्या माहितीनुसार ते घर झपाटलेले होते. खुप वर्षांपुर्वी तिथे एक जोडपे रहात होते. बर्यापैकी आर्थिक स्थिती असलेल्या त्या घरात पाककला निपुण आणि पट्टीची खव्वयी असलेली बायको तर्हेतर्हेची पक्वान्न बनवुन खिलवत होती आणि खात होती. तरुणपणात अचानक तिच्या नवर्याचा अपमृत्यु झाला. घरचा कर्ता, कमावता पुरुष गेल्यावर तिला रोजचे दोन घास मिळणे कठीण झाले. मोलमजुरी करुन ती पोट भरु लागली. पण गतायुष्यात खाल्लेले चारीठाव भोजन आणि पक्वान्ने तिला विसरता येईनात. अशाच एका दिवशी साप चावल्याचे निमित्त होऊन ती सुद्धा परलोकवासी झाली. मुलबाळ नसल्यामुळे बरीच वर्षे ते घर रिकामेच राहिले. त्या घरात कुणी रहायला आले की प्रत्येक रात्री घरातले लोक जेवायला बसल्यावर ती अशीच जेवणाची मागणी करते !........... जाहीर आहे पुढचे ऐकायला मास्तर तिथे थांबलेच नाही................................................................
26 Sep 2011 - 5:12 pm | प्रियाली
फारा वर्षांपूर्वी आमच्या गावात एक अनाथालय आणि शाळा होते. थंडीच्या रात्री एके दिवशी त्या अनाथालयाला आग लागली आणि काही लहान मुले होरपळून त्यात मृत्यूमुखी पडली. हे अनाथालय जिथे होते तो रस्ता सपाट नाही. अचानक एके ठिकाणी तो थोडा खाली उतरतो आणि नंतर पुन्हा वर चढावे लागते. या खोलगट भागाला हेडी हॉलो असे म्हणतात काराण ती शाळा/अनाथालय हेडी नावाचे एक कुटुंब चालवत असे.
अजूनही एखाद्या रात्री जेव्हा दाट धुके पडलेले असते तेव्हा वाहन चालकांना रस्त्यावर लहान मुले लिफ्ट मागताना दिसतात. त्यांच्याजवळ जाऊन गाडी थांबवावी तोपर्यंत ती अदृश्य होतात. :)
अधिक माहिती येथे वाचा. हा अॅलीसनविल आणि १२६ वा रस्त्याचे जंक्शन माझ्या सद्य घरापासून ५ मैल असून पूर्वीच्या घरापासून मैलभरावर होते. रोजच्या येण्याजाण्याचा रस्ता. ;)
26 Sep 2011 - 7:07 pm | शुचि
भूत/हडळ यापलीकडे कोणाची धाव कशी गेली नाही? हाकामारी ची वावदूक पुण्यात मध्यंतरी उठली होती ना ;) रात्री दारावर थाप पडून आपल्या नावची हाक ऐकू यायची म्हणे आणि जर ओ दिली तर खेळ खतम!!!
चकवा एक असतो. माणूस एकाच रस्त्यावर फिर फिर फिरत राहतो.
खवीस , मुंजा वगैरेची माहीती पूर्वी एकदा "श्री" नावाच्या भन्नाट वर्तमानपत्रात वाचली होती.
राशीरंजन चा भाग कालच ऐकला त्यात शरद उपाध्ये यांनी छातीठोकपणे सांगीतले आहे की "ब्लॅक मॅजिक" असते. लिंबू मारणे, जारण-मारण या सर्वाचे अस्तित्व आहे.
30 Sep 2011 - 2:09 pm | चिगो
>>राशीरंजन चा भाग कालच ऐकला त्यात शरद उपाध्ये यांनी छातीठोकपणे सांगीतले आहे की "ब्लॅक मॅजिक" असते. लिंबू मारणे, जारण-मारण या सर्वाचे अस्तित्व आहे.
आता बोंबला... मी सध्या मेघालयात आहे. इथे दुर्गापुजेच्या वेळी "देईल तो प्रसाद खाऊ नकोस. काली जादू करतात." असा सल्ला काही जेष्ठ लोकांनी दिला होता. मानावा की काय ?
बादवे, दुर्गेच्या पुजेच्या प्रसादावर काळ्या जादुचा प्रभाव पडत असेल काय !?
7 Oct 2011 - 2:30 pm | चेतन सुभाष गुगळे
<< भूत/हडळ यापलीकडे कोणाची धाव कशी गेली नाही? >>
नाही कशी? आम्हाला एका स्वच्छ भूताचा प्रकार ठाऊक आहे. बहुसंख्य मंडळी सकाळी स्नानादी संस्कार आटोपून बाहेर पडतात तेव्हा याच भूताचा अवतार धारण करतात.
शुचिर्भूत
विनोदाचा भाग सोडून द्या. अर्थात काही जण या अवस्थेतही (विशेषत: मेक अप उतरविलेल्या नट्या) खरोखरच भूतासारखे दिसत असतात.
26 Sep 2011 - 7:34 pm | आदिजोशी
भय इथले संपत नाही
गोष्ट एका रात्रीची आहे. एका भयाण, अंधार्या रात्री मी, धम्या आणि अभ्या, बंगलोर मिपा कट्ट्यांच्या जन्मस्थानी, माझ्या घरी, चिंतन बैठकीसाठी जमलो होतो. चिंतनाचा मूड व्हावा म्हणून आम्ही दिवे न लावता मेणबत्त्या पेटवल्या होत्या (वि.सू. - ह्याच मेणबत्त्या सिगारेट पेटवायच्या कामी पण येतात)
विषय होता आजकाल सर्वत्र सहजसंचार करणारी भुतं. तिघेही कॉटला रेलून जगातून दारूचा शेवटचा थेंब नष्ट केल्याशिवाय थांबणार नाही अशी प्रतिज्ञा केल्यासारखे ढकलत होतो. चेहर्यावरचा करारीपणा उतू जात होता, इतका की कुणी नुसतं हसण्यासाठी जरी गाल हलवले तरी काच फुटल्यासारखा 'खळ्ळ्ळ्ळ्' आवाज येत होता.
इतक्यात ते घडलं. मी पुढचा घोट घेण्यासाठी माझा ग्लास उचलला तर तो रिकामा होता. मी डावीकडे बसलेल्या धम्याकडे पाहिलं, तर त्यावेळी तो त्याच्या डावीकडे अभ्याच्या ग्लासातली गुपचूप संपवत होता. अभ्या आकाशात बघून प्रदुषण करत होता. होतं असं कधी, संपवला असेल मीच अशी माझिया मनाची समजूत घालून देऊन मी पुन्हा ग्लास भरला. तितक्यात धम्या ओरडला "काय बे आद्या, माझी दारू काऊन संपवून र्हायला बे?" मला कळलंच नाही एक मिनीट "अबे मी काऊन तुझी पिऊ, माझा ग्लासातूनच पितोय मी... तूच अभ्याची पिताना पाह्यलं मी..." त्यावर मला गप्प बस अशी खूण करून त्याने स्वतःचा ग्लास उचलला. तितक्यात अभ्या ओरडला "का बे साल्यान्नो... तुम्ही दोघे प्लॅन करून माझी दारू काऊन संपवून र्हायलात लेकांनो?" आम्ही दोघेही त्याला पटवून द्यायचा प्रयत्न करत होतो की हे हि&हि कॄत्य आमचे नाही... तरी त्याचा विश्वास बसेना.
पण हळू हळू हे प्रकार वाढू लागले. तिघांचेही ग्लास आपोआप संपू लागले. ग्लास खाली ठेऊन दुसर्या सेकंदाला जरी परत उचलला तरी संपलेला असे. तीच गत सिगारेटची. अॅश ट्रे वर ठेवली की अर्धी आपोआप संपत असे. आमची जाम तंतरली. भूत असेल ह्या भावनेने नाही. ह्या स्पीडने दारू लवकर संपेल ह्या भीतीने.
शेवटी आम्हा तिघांचीही इथे भूत आहे ह्याची खात्री पटली आणि त्याने आपली संपवण्यापेक्षा आपण आता थोडावेळ झोपू. लवकरच पहाट होईल, पहाटे उजेडाच्या भितीने भूत आपल्या घरी गेलं की मग निश्चींतपणे पुन्हा बसू असा विचार करून आम्ही थांबलो.
आम्ही तिघेही पैलवान असल्याने एकाच कॉटवर झोपलो. सगळ्यात डावीकडे भिंतीच्या बाजूला अभ्या, मधे धम्या आणि मग मी असे झोपलो. डोळे जड झाले होते. झोपेमुळे की दारूमुळे माहिती नाही. इतक्यात कसलासा आवाज झाला. माझी पाचावर धारण बसली. घामाने डबडबलो. जीभ जड झाली. मी अभ्या नी धम्याला हाका मारायचा प्रयत्न केला पण तोंडातून शब्द फुटेना. कसे बसे मी डोळे किलकिले करून बघण्याच्या प्रयत्न केला तर मला जे दिसले त्याने मी पार स्तिमीत झालो - डाण्या कॉट खालून हळूच बाहेर येऊन आपली झुल्फं सावरत सावरत गुपचूप घराबाहेर पडत होता...
26 Sep 2011 - 7:38 pm | प्रियाली
:) :)
@ शुचि, भुतांची सविस्तर गोष्ट हवी. वरच्या प्रतिसादातून बोध घे.
26 Sep 2011 - 7:56 pm | शुचि
=)) =)) =))
फुटले!!!!
26 Sep 2011 - 11:50 pm | नंदन
बेश्ट!
27 Sep 2011 - 1:45 pm | मोहनराव
लई भारी!!! :)
26 Sep 2011 - 8:03 pm | जाई.
या आवाहनास अनुसरुन काहि अनुभव
मुंबईहून कोकणात जाताना वडखळ नाका नावाचे एक (कु)प्रसिध ठिकाण आहे.माझ्या गावापासुन ते ३०० किमी अंतरावर आहे.तीथे गाडी चालवताना फार भीतीदायक अनूभव येतात्. त्या ठिकाणी गाडी थांबवू नये असे स्पष्ट्पणे सांगितले जाते.गाडी थांबवल्यास पांढरी साडी नेसलेली बाई दिसणे, एकदम चित्रविचीत्र आवाज येणे असे अनुभव येतात.
माझ्या काकांनी एकदा ही चूक केली होती. लग्णाच्या बिर्हाडाला वाट देण्यासाठि गाडी थांबवली असाताना ते बीर्हाड अचानक गायब झाले. व काकाना वरील अनुभव आले. तसच कोणीतरी गाडी खेचू लागले.काकानी प्रसंगावधान राखून गाडी एकदम जोरात स्टाट्र्र केली ते गाव आल्यावरच थांबवली.
26 Sep 2011 - 8:21 pm | अप्पा जोगळेकर
याच वडखळच्या नाक्यापाशी अंतुले नावाच्या एका भूताने ' ***,माझी गाडी चेक करतो ' असे म्हणत तिरीमिरीत कोणत्याशा इन्स्पेक्टरचा दिवसाढवळ्या मुडदा पाडला होता असे ऐकले आहे.
26 Sep 2011 - 8:07 pm | जाई.
प्र्.का.टा.आ
26 Sep 2011 - 8:08 pm | प्रियाली
वडखळ नाक्याची ही गोष्ट मी ऐकलेली आहे. सारस्वत बँकेतील काही अधिकारी एकदा गाडीने चालले होते. रस्त्यात त्यांना ही बाई गाडी थांबवा (लिफ्ट मागणे) असे सांगू लागली पण ड्रायव्हरला माहित होते त्याने लक्ष दिले नाही.
तेव्हा एकजण त्या ड्रायव्हरशी हुज्जत घालू लागला की 'अरे इतक्या रात्री, निदान विचारायचं तरी तिला काय हवं ते? तिला मदत हवी असेल.'
ड्रायव्हर म्हणाला, "साहेब हे प्रकरण तुम्हाला वाटतं तसं नाहीये. तिला नाही, आपल्यालाच मदतीची गरज आहे. बाहेर बघा."
खिडकीबाहेर बाई गाडीच्या वेगात बाजूने चालत होती. ;)
26 Sep 2011 - 9:00 pm | Nile
या सगळ्या ठिकाणी जायला आवडेल. भुतांना केव्हाचं भेटायचं आहे. तस्मात ज्या ज्या लोकांनी वरती कथा लिहलेल्या आहेत त्यांच्याकडे आम्ही लवकरच जाणार आहोत, तयार रहा. (डॉन्या आणि आड्या कडे सोडून!) ;-)
जिवंत भुत,
निळोबा.
26 Sep 2011 - 9:05 pm | प्रियाली
तुझा गळा आवळायची चांगली संधी मिळाली. जिथे तिथे टिवटिवत असतो. येच आता. ;)
भूत बनवायची आयती संधी चालून आली आहे.
26 Sep 2011 - 10:21 pm | श्रावण मोडक
तुला मदत लागणार नाहीच या कामासाठी. पण लागत असली तर कळव. काळा दोरा, बिब्बे, नारळाची करटी... शुभ कामात अडथळा येऊ नये यासाठी इथं मांत्रीकही सांगून ठेवला आहे. तो काय ते अंगारे-धुपारे करील. ;)
पण काये, साला, आपला याच्यावर विश्वासच नाही. त्यामुळं संकटं येणार आणि तुझ्या हातून हे शुभकाम होणार नाही. तू एखाद्या भुतालाच गाठावंस. प्लॅन बी असलेला बरा. कसं?
26 Sep 2011 - 10:29 pm | Nile
हॅलोविनला सुटी नाही, पण थँक्सगिव्हिंगची तिकीटं पाठवून द्या. २३ ला संध्याकाळचं अन परतीचं २७ रात्रीचं चालेल. आणि हो, तुमच्या राक्षसी काकड्याच्या वेगवेगळ्या रेशिप्या हव्यात हां! ;-)
26 Sep 2011 - 10:34 pm | प्रियाली
मेल्या! तुला गळा दाबून मारेन आणि तुझं भूत बनतं का ते बघेन म्हणते आहे तर हा परतीचं तिकिट मागतोय. कशाला हवं ते? भुतं त्यांच्या मरणाच्या जागी अडकून बसतात असा प्रवाद आहे. तू आलास की राहा गपगुमान इथे. बेसमेंट चालेल का?
घालेन हो. मरणार्याची शेवटची इच्छा पूर्ण करावी म्हणतात. ;)
26 Sep 2011 - 10:41 pm | Nile
>>भुतं त्यांच्या मरणाच्या जागी अडकून बसतात असा प्रवाद आहे.
हे चूक आहे, जिथं त्याचा जीव अडकतो तिथे अडकून बसतं असा आमचा अनूभव आहे. इथे बर्याच पोरींमध्ये माझा जीव अडकलेला आहे ना केव्हाचा, तेव्हा परत तर यावंच लागेल. त्यात मेलं तुमचं ते इष्ट कोष्ट, सारखं वादळं अन वारे.. तेव्हा माझ्या भूताला उडत येताना थंडी नाय वाजणार?? म्हणून परतीचं तिकिट पण हवं आहे.
बाकी चार दिवस बेसमेंट चालेल! ;-)
>>मरणार्याची शेवटची इच्छा पूर्ण करावी म्हणतात.
असं आहे काय? मग माझ्या शेवटच्या इच्छांची यादीच घेऊन येतो, कसें?
26 Sep 2011 - 10:47 pm | प्रियाली
साहेब आम्ही इष्ट कोष्टात नाही. मिड वेष्टात असतो. इथे दूर दूर तक कोणी मनुष्यप्राणी नजरेस पडत नाही आणि एकदा इथे पोहोचलात की इथेच अडकून पडायला होते. तेव्हा पोरीबिरी विसरा. इथेच मिळाली एखादी नशीबाने तर बसा तिच्या मानगुटीवर. ;)
26 Sep 2011 - 11:43 pm | श्रावण मोडक
आधीच स्टॉकहोम सिंड्रम झाला दिसतो. पार बोंबललं सगळं एकूण असं दिसतंय... तरी मला एक मित्र सांगत होता, या प्रियालीचा भरवसा नाही. पाहता-पाहता बेपत्ता होत असते. इथं तर ती दलबदलू होणार असं दिसतंय. ;)
26 Sep 2011 - 8:13 pm | अप्पा जोगळेकर
४ पेग डाउन झालेले असताना माझ्या एका मित्राने मला पुढील प्रमाणे कथा सांगितली.
लग्न न होताच किंबहुना कौमार्यभंग न होताच जे मुलगे, पुरुष मरतात त्यांचा मुंज्या होतो. ज्याच्या मानगुटीवर बसायचे त्याच्या स्वप्नात मुंज्या येतो आणि डब्लू डब्लू एफ मधल्या अंडर टेकर सारखे फ्रीस्टाईल कुस्ती खेळण्याचे आव्हान देतो. हे आव्हान न स्वीकारताच मी पळून जाईन, त्याच्या हातापाया पडेन असा विचार करु नका. आव्हान स्वीकारावेच लागते. तुम्ही पळून जाऊ शकत नाही किंवा त्याला दयाही येत नाही. तो सिंघम बनून सरळ कमरेचा पट्टा काढून तुम्हाला फोडून काढतो. त्यापेक्षा आव्हान स्वीकारा. आणि त्याच्याशी कुस्ती खेळा. तुम्ही जरी हरलात तरी तो तुम्हाला जिवंत सोडून देईल. कारण तुम्ही त्याच्याशी लढण्याचे धैर्य दाखवले. जर जिंकलात तर तुमच्यावर खूश होऊन हातात सोन्याचं कडं घालेल.
26 Sep 2011 - 8:33 pm | Nile
>>लग्न न होताच किंबहुना कौमार्यभंग न होताच जे मुलगे, पुरुष मरतात त्यांचा मुंज्या होतो.
>>तो तुम्हाला जिवंत सोडून देईल
आयच्या गावात दहीबटाटाशेवपुरी!! मेल्यावरही जगण्याची चिंता आहेच का!!
28 Sep 2011 - 8:12 pm | अप्पा जोगळेकर
आयच्या गावात दहीबटाटाशेवपुरी!!
नविन वाक्प्रचाराबद्दल आभार.
26 Sep 2011 - 8:44 pm | मदनबाण
Henry VIII's चे तथाकथीत भूत ! ;)
http://www.youtube.com/watch?v=7sjzjyfPJqA&feature=related
26 Sep 2011 - 9:22 pm | सूड
हा धागा बघून आज एक मुंज्या असल्याचा अभिमान वाटला !! नाहीतर आम्हा पारलौkick शक्तींची कोण दखल घेतं म्हणा.
27 Sep 2011 - 1:12 am | रेवती
अर्रर्र! असं आहे काय?
तरीच एकाही मुलीला तू पसंत पडत नाहीस.
यापुढे सगळ्या दाखवण्याच्या/बघण्याच्या कार्यक्रमांना पाऊले झाकतील असे कपडे घालायचे.
कफनीही चालेल्.;).......भगवी नको नाहीतर संन्यासच घ्यावा लागेल.
27 Sep 2011 - 9:36 am | सूड
आज्जे, पुढल्या वेळपास्नं हडळींना बघायला जाऊ स्मशानात. म्हणजे ते कफनी वैगरेचं झंझट नको.
*( आज्जी स्मशानात यायला घाबरते म्हणून असं म्हणायचं, ती माणसात आहे ना अजून !! म्हणजे काय आज सर्वपित्रीचं मला एकट्याला जाता यील. )*
27 Sep 2011 - 6:04 pm | रेवती
जा जा. एकटाच जा!
मला काही हौस नाही.
26 Sep 2011 - 9:24 pm | जाई.
गोरेगाव पूर्वेत दोन बिल्डीग झपाटलेल्या म्हणून प्रसिध्द होत्या
तिथे बराच काळ कोणीच राहायला गेलं नव्हत
त्यापैकी एक बिल्डीग पुर्ण बांधून तयार होती
तर एकीच बांधकाम चालू होतं
तेव्हा अचानक तिथे विचित्र भेसुर रडण्याचे आवाज येउ लागले
बरेच दिवस हे चालू होत
नंतर काही दिवसानी कामगारांच्या मृत्यूच्या घटना घडल्या
भुताचे अनुभव येण्यास सुरुवात झाली
यामुळे पहिल्या बिल्डीगच बुकिंग सुध्दा धोक्यात आल
त्या बिल्डरवर काही आपत्ती आल्या
आता कुठे तिथे माणस राहायला आलीत
26 Sep 2011 - 9:55 pm | प्रियाली
या उंचच उंच एकसारख्या दिसणार्या बिल्डींग्ज माझ्या लहानपणापासून(? टीनेजपासून) तेथे आहेत. मी असेही ऐकले होते की एक म्हातारी बाई त्या बिल्डींगच्या वरच्या मजल्यावरून उडी मारून जीव देताना दिसते. ;) असा प्रसंग अनेकदा घडताना अनेक लोकांनी पाहिले आहे.
प्रत्यक्षात, बिल्डर्समधले वॉर असावे.
26 Sep 2011 - 10:04 pm | जाई.
होय आता सगळेजण असच म्हणतात
आतातर त्या आजूबाजूला खूप बिल्डीग तयार झाल्यात
28 Sep 2011 - 8:48 pm | गणपा
च्छ्या हल्ली भुतांनाही रहायची जागा उरली नाही मुंबईत. :(
28 Sep 2011 - 9:10 pm | जाई.
काळजी नको पण. मंत्री लवकर सोय करतील
26 Sep 2011 - 9:56 pm | मेघवेडा
तरी मी म्हणतच होतो यंदा मागल्या वर्षीसारखं सर्वपित्री पेश्शल काही दिसत कसं नाही?! निषेध व्यक्त करायच्या विचारानेच आलो तर समोर हा धागा! मस्तच हो हडळीण्बै!
वडखळच्या भुताप्रमाणेच संगमेश्वरजवळ धामणीच्या घाटातली कथासुद्धा लै फ्येमस हां! रत्नांग्रीच्या दिवट्या परबाची तिथंल्या हडळीन घेतलेली विकेट लै गाजली होती.. अगदी रत्नांग्री टैम्सात बातमी होती! दिवट्या भुताखेतांवर विश्वास न ठेवणारा एक साधासरळ रिक्षाचालक. नुस्ता विश्वास नाही असं नव्हे तर तो भुताखेतांच्या नावानं बोंबा मारी! आपल्या बहिणीकडे सावर्ड्याला गेला होता तिथून तो परतत असताना धामणीच्या घाटात एका बाईनं त्याच्या रिक्षाला हात दाखवला. अपरात्रीची वेळ, तशात घाटात ती बाई एकटी.. काही आक्रीत नको घडायला म्हणून मदत करण्याच्या हेतून त्यानं त्या बाईला रिक्षात बसवलं. "एवढ्या अपरात्री तुम्ही या निर्मनुष्य ठिकाणी एकट्या कशा?" अशी चौकशी त्यानं केल्यावर "भूक लागली, घराकडे खायला काही नाही, जवळपास काही सोय नाही, पुढे घाट उतरल्या उतरल्या उजवीकडे एक ढाबावजा हॉटेल आहे तिथं काहीतरी खावं म्हणून बाहेर पडले" हे तिनं दिलेलं विक्षिप्त उत्तर त्याला पटलं नाही. त्याला शंका आलीच की काहीतरी गडबड नक्की दिसते म्हणून त्यानं आणखी चौकशी करण्यास सुरूवात केली. तेंव्हा त्याला कळलं की त्या बाईचा नवरा या जगात नसून आणि एकुलता एक मुलगा होता त्याला वेडाचे झटके येत असल्याने ती त्याला घरातच डांबून ठेवते. हे उत्तर ऐकून दिवट्या आणखीच भंजाळला. त्यानं विचारलं "बाई तुमचा नवरा गेला आहे तर तुम्ही हे कुंकू, मंगळसूत्र वगैरे का घातलंय?" तर त्यावर त्याला उत्तर मिळालं. "अरे मी फार नशिबवान रे बाबा, गंगा भागीरथी होण्यापूर्वीच मृत्यू लाभला मला! मघाशी तुझ्या रिक्षेत बसले ना त्या तिथंच घाटमाथ्यावर त्या रिक्षावाल्यानं माझ्यावर बलात्कार करून माझा गळा चिरला होता!" हे ऐकून दिवट्या ताडकन उडालाच. भुताखेतांवर विश्वास नसला असं म्हणत असला तरी लहानपणापासून त्यानं ऐकलेल्या सार्याच्या सार्या भुतांच्या गोष्टींची त्याला एकदम आठवण आली.. मागं वळून पाहण्याचं धाडस होत नव्हतं.. गाडी थांबवायला म्हणून ब्रेकवर पाय देतो तर ब्रेक लागेल तर शप्पथ.. मागून जोरदार हसण्याचा आवाज आला आणि "ब्रेक लागणार नाही!" असे शब्द ऐकू आले! दिवट्याला घाम फुटला.. मागं वळून बघतो तर काय! मघाशी व्यवस्थित दिसणार्या त्या बाईचे केस वार्यावर उडत होते, कुंकू लल्लाटभर पसरलं होतं, तोंडातून रक्त येत होतं आणि गळ्यावर एक मोठीच्या मोठी चीर होती.. आणि ती जोरजोरात हसत होती..
तळेकांटे गावच्या लोकांना सकाळी घाटपायथ्याशी वडावर आपटलेली एक रिक्षा दिसली नि त्यात दोन प्रेतं सापडली. पुरूषाच्या पाकिटात मिळालेल्या लायसन्सवरून त्याचा पत्ता लागला पण त्याच्यासोबत ती विवाहित बाई कोण होती ते आजपर्यंत कुणालाच कळलेलं नाही..! "दिवट्याचं सावर्ड्याला काहीतरी लफडं होतं, उगाच नाही बहिणीच्या घरी सारखा फेर्या मारायचा" अशी वावडी उठली..
अलिकडे धामणीच्या घाटात एक सावळासा उंचपुरा तरूण रात्री बेरात्री एकटाच हिंडत असतो म्हणे..
26 Sep 2011 - 10:02 pm | प्रियाली
तू अवतीर्ण कसा झाला नाहीस याचीच काळजी लागली होती. आलास भूत पावले!
आता पुढली कथा ऐक.
आमच्या नातेवाईकांपैकी एकजण फ्रान्सला असे. तो एका मित्राकडे पार्टीला गेला होता. परतताना रात्र झाली. पेयपान झाले असले तरी साहेब चांगले शुद्धीत होते. रात्री ते गाडीतून आपल्या गावी यायला निघाले. रस्त्यात त्यांना अचानक काहीसं वेगळं वाटायला लागलं. रस्ता हळूहळू अरुंद होतो आहे असे वाटायला लागलं. दिवसा ते याच रस्त्यावरून मित्राकडे गेले होते आणि रस्ता व्यवस्थित होता.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चांगली वाढलेली झुडपं होती. ती हळूहळू गाडीच्या जवळ यायला लागली. इतकी जवळ की गाडीलाच खेटली आहेत. तेव्हा यांना काहीतरी वेगळं आहे असा भास झाला. त्यांनी गाडीचा स्पीड वाढवला तसा रस्ता आणखीच अरुंद व्हायला लागला. आता झुडपं गाडीवर घासायला लागली होती. यांची जाम गाळण उडाली होती. पण ते गाडी हाकत राहिले. अचानक एके ठिकाणी त्यांना जाणवलं की ते अपेक्षित वळणं, रस्ते न ओलांडता अचानक स्वतःच्या एरियात पोहोचले आहेत.
त्यांनी सरळ घरात धाव घेतली. दुसर्या दिवशी सकाळी त्यांना रात्री झालेल्या प्रकारावर विश्वास बसेना. पण त्यांनी बाहेर जाऊन गाडी पाहिली तर तिच्यावर चर्रे उमटले होते. मग मित्राला फोन लावला आणि झालेला प्रकार सांगितला.
मित्राने शांतपणे उत्तर दिले,"अरे! असे पूर्वीही काही लोकांना अनुभव आले आहेत."
हा होता चकवा.
28 Sep 2011 - 7:20 pm | अनामिक
तळेकांटे गावच्या लोकांना सकाळी घाटपायथ्याशी वडावर आपटलेली एक रिक्षा दिसली नि त्यात दोन प्रेतं सापडली.
प्रेतं? मग झाला प्रकार गावकर्यांना कुणी सांगीतला? त्या मेलेल्या तरूणाच्या भूतानं?
30 Sep 2011 - 6:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
सोप्पय! रत्नांग्री टाईम्सनं.
(हिरवी हडळ) अदिती
30 Sep 2011 - 2:30 pm | प्रियाली
अशा गोष्टी कोणी सांगितल्या असं अजिबात विचारायचं नसतं.
26 Sep 2011 - 10:08 pm | प्रीत-मोहर
अजुन माझ्यावर एकही कमेंट कशी काय नाही? हा माझा घोर अपमान आहे...
(पुण्यातली मानाची पहिली हडळ) प्रीमो
26 Sep 2011 - 10:26 pm | श्रावण मोडक
इति पैसा. तुला वाचता येत नाही, म्हणून दिलं इथं. पैसानं हा सन्मान केला तेव्हा तू बहुदा इकडं-तिकडं वटवटत फिरत असावीस. माणसाच्या जन्मातही असंच केलंस. तो ब्रह्मदेव अक्कल वाटत होता तेव्हाही बोंबलत फिरत बसलीस. आताही तेच. जित्याच्या खोडी... असं उगाचच म्हणतात हे सिद्ध केलंस. ;)
27 Sep 2011 - 10:20 am | प्रीत-मोहर
श्रामोअण्णा.. पैसा मावशी तशी माका विसराची नाय ह्या माका ठाउकच होता. माझ्या डोळ्यावर काकडीची कापा असलेल्यान तो प्रतिसाद माका दिसाक नाय तर तुमी तेचो एवढो मोठो पर्वत केलो?
अता पैसाताय आनी मी एकाच जमातीत असल्या कारणान आमी समजान घेतो म्हणान सांगा..
आगलावे खयच्याकडले..
आणि माका टोमणे मारुची, घालुन्-पाडुन बोलुची एक्कय संधी सोडशात तर श्रामोवेताळ पुणेकर कस्ले तुमी?
हेच्यासाठी वेगळां बिल वसुल करतलंय .. बिल मगे व्यनि करतंय ...
फुडल्या फाउटी मी तुमच्ज्याफ्य्ड्यात टपाकलंय की बिल देवची तयारी ठेवा.. क्काय?
26 Sep 2011 - 10:32 pm | जाई.
ही सुध्दा फेमस गोष्ट आहे मुंबैतील.
एका शेअर रिक्षात एक स्री आणि दोन पुरुष बसले.
ईच्छित स्थळी पोचल्यावर
त्या स्रीने प्रथम पैसे दिले
सुटे पैसे देताना पैसे रिक्षावाल्याच्या पायापाशी पडले.
तो ते उचलायला गेल्यावर त्याला त्या स्रीचे पाय उलटे असल्याचे दिसले.
वर बघेस्तोवर ती बाई गायब झाली.
दोघा प्रवाशांना हे सांगितल्यावर त्यांनी मान उडवली आणि म्हटल की
"त्यात काय एवढ आमचे पण पाय उलटे आहेत की हे बघ".
ते बघताच तो रिक्षावाला कार्डियक अरेस्टने मृत्यू पावला.
27 Sep 2011 - 1:01 am | अत्रुप्त आत्मा
@---भूत कसे बनते?
भूत बनविण्याची पाक-क्रुती:-
साहीत्य- एक जोडी धार्मिक वातावरणात वाढलेले-पती/पत्नी, त्यांचं तसच १ श्रद्धाळू अपत्य (वय तीन वर्षापेक्षा जास्त नसावं, नाहीतर रेसीपी संपंन्न होण्यात काही बुद्धीवादी तसेच विवेकी अडचणी येतात), रहाण्यासाठी कोणत्याही देश/प्रदेशातले एक घर, आणी जगातला कुठलाही देश( देश जितका धार्मिक असेल,तितकी पाक-क्रुती दमदार व जोमदार होते)
क्रुती--- प्रथम भारता सारखा १ धर्म:श्रद्ध देश घ्यावा, तो परंपरेनी लडबडीत होइपर्यंत भारुन/माखुन घ्यावा,मग त्यात एका सुशिक्षीत,उच्चविद्याविभुषीत कींवा अशिक्षीत कींवा कश्याही...थोडक्यात ---धार्मिक असलेल्या पती/पत्नींना आणून सोडावे. त्यांना त्यांच्या या अपत्यास शक्यतोवर यथेच्छ धार्मिक संस्कार करण्यास सांगावे, मुल जर का निबर मिळालेलं असेल तर, मधुन मधुन त्याच्यावर 'ऐकत नाहीस आई बाबांचं?...थांब तुला भूत्याकडे देते' असे मंत्र मारावे,यानी पोर चांगलं मऊ पडत,आणी रेसीपी योग्य वळणावर पोहोचते...पोर फारच निबर असेल आणी धर्मश्रद्धेच्या रश्यात बुडत नसेल तर,वरतून एक जाड छडी घेऊन त्याला ''फार अक्कल वाढलीये तुझी,म्हणे आत्मा कुठ्रे असतो?'' असं वरुन खोबरं पेरत खाली टेंबाव...मग त्याला एक श्रद्धेची उकळी येऊ द्यावी... आणी जगात फिरण्यासाठी डीशमधे काढावं... इथे मुलाच्या डोक्यातलं भूत निम्म तयार होतं.. मग हा मुलगा थोडं जरी काही झालं तरी एकदम फॉर्मात येऊन घाबरेल..'माझ्यावर भूत बसलय' अश्या कथा सांगुन शाळेला दांड्या मारेल... झालं... इथुन पुढे त्याच्यावर श्रद्धेचं झाकण टाकून त्याला निवत ठेवलं की त्याच्यातलं भूत तय्यार ...
टीप-स्वतःला आणी नंतर इतरांना फसविण्यासाठी... हे भूत अगदी हुकमी एक्यासारखं तयार राहातं, त्याला नासण्या,अंबण्या विटण्याचं भय फक्त जागरुक प्रशासन,सुशिक्षीत समाजमन या पासूनच असतं ... तेंव्हा ही पाक-क्रुती एकदा तयार का झाली,की सहसा हज्जारो वर्ष खराब होत नाही,अगदी बिनधोक टिकते...
27 Sep 2011 - 2:31 am | इंटरनेटस्नेही
पराग दिवेकरजी यांच्याशी सहमत. भूत हे मानण्यार्याच्या मनात असतं.. मी तर कोकणातला (मालवण/कट्टा) असुन सुद्धा भुतांच्या कथा केवळ ऐकल्या आहेत. गावची आजी.. आजोबा यांनी लहानपणी मी गावी जात असे तेव्हा मी टळटळत्या दुपारी घराबहेर जाऊन दंगा करु नये / रात्री लवकर झोपावे / जेवण (विशेषतः न आवडण्यार्या भाज्या गपचुप गिळ्याव्यात) यासाठी काही भुतांच्या गोष्टी सांगुन पाहिल्या. मात्र मी त्यांना क्रॉस एक्झामिन केल्यावर, सत्य बाहेर पडत असे की, त्यांनी देखील कधी ही भुतं प्रत्यक्षात पाहिलेली नाहीत; त्यांनाही या आधीच्या पिढीतील मंडळींनी सांगितलेल्या गोष्टी आहेत या. मला भुतांचा कधीच अनुभव नाही आला.
30 Sep 2011 - 10:17 am | वपाडाव
पन तु जन्माला आल्यावर हा अनुभव तुझ्या घरच्या मंडळीना आला असेलच अशी खात्री आहे.........
30 Sep 2011 - 7:25 pm | सूड
वपाडाव तुमच्या या वाक्यावरुन भूतांनी तुमच्या घरासमोर धरणं का धरु नये ?? हे विधान भूतांचा अपमान करणारं आहे. उद्या खळ्ळ फट्याक झाल्यास जबाबदारी तुमची राहील हे लक्षात घ्या. :D स्वाक्षरीतलं वाक्य खरोखरीच म्हणावं लागेल, बघा ब्वॉ.
30 Sep 2011 - 7:41 pm | प्रियाली
वपाडाव यांचे विधान नक्की कोणाचा अपमान करणारे नाही असे तुम्हाला वाटते? (काही उदा. माणसांचा, प्राण्यांचा, भुतांचा वगैरे)
1 Oct 2011 - 8:39 am | सूड
तेही खरंच म्हणा !! भूतांचा उल्लेख आला म्हणून मी बोल्लो. बाकी माणूस, प्राणी वैगरेंना प्रॉब्लेम असेल तर त्यांनी तसं सांगावं ब्वॉ काय ते.
27 Sep 2011 - 10:39 am | मृत्युन्जय
प्रथम भारता सारखा १ धर्म:श्रद्ध देश घ्यावा, तो परंपरेनी लडबडीत होइपर्यंत भारुन/माखुन घ्यावा
काही लोकांना स्वत:ला उपेक्षेने मारायची सवय असते. मी भारी, माझा देशा भारी, संस्कृती तर लै भारी आणी बाकी सगळे छाटछूट या वेडाने पछाडलेले काही लोक असतात आणि न्यूनगंडाने पछाडलेले पण काही लोक असतात की ज्यांना आपण, आपला देश, आपले लोक, आपली संस्कृती सतत दुय्यम, खालच्या दर्जाची, अडाणी लोकांनी भरलेली वाटत असते. पहिल्या दोषाने ग्रासलेले लोक तरीदेखील परवडले पण हे दुसर्या प्रकारातले लोक इतके नैराश्याने ग्रासलेले असतात की अगदी नकोसे होते.
याच धाग्यावर निम्म्या कथा परदेशातल्या दिसतील. एवढ्या प्रसिद्ध की विकीवर त्याची नोंद व्हावी. अंधश्रद्धेच्या बाबतीत भारतातील लोक ग्रासलेले असतील तर जगभरातले लोक अगदी स्वर्गभूमी अमेरिकेतले लोकदेखील अंधश्रद्धेने ग्रासलेले आढळतील. १३ तारखेबद्दल एवढे असंख्य गैरसमज आढळतील की त्या विषयावर पी एच डी करता येइल. फारेनातल्या ९९% हाटेलांमध्ये १३ नंबरचा मजला आढळणार नाही. त्याच बड्या हॉटेल चेन्स ने भारतात देखील ही प्रथा रुजवली.
घरात कुर्हाड ठेवु नये, १३ तारखेला मोठी खरेदी करु नये, टचवूड, गळाला लागलेला पहिला मासा फेकुन देणे असली हजार उदाहरणे फारिनर्स बद्दल देता येतील. भारतात पण याच प्रकारातली उदाहरणे सापडतील. थोडक्यात सांगायचे तर अंधश्रद्धाना देश आणि धर्माचे वावडे नसते. सगळ्याच देशांत, सगळ्याच धर्मात अंधश्रद्धा सापडतात. त्या दूर करणे इष्टच पण केवळ स्वकीयच अंधश्रद्ध आहेत असा फुकाचा समज करुन घेणे कधीही अयोग्यच.
27 Sep 2011 - 10:56 am | मराठी_माणूस
आणि न्यूनगंडाने पछाडलेले पण काही लोक असतात की ज्यांना आपण, आपला देश, आपले लोक, आपली संस्कृती सतत दुय्यम, खालच्या दर्जाची, अडाणी लोकांनी भरलेली वाटत असते. पहिल्या दोषाने ग्रासलेले लोक तरीदेखील परवडले पण हे दुसर्या प्रकारातले लोक इतके नैराश्याने ग्रासलेले असतात की अगदी नकोसे होते.
अगदी बरोबर.
(अवांतर: एक बरे की ते लोक शक्यतो (येन केन प्रकारेन) हरीत पत्रे मिळवुन तिकडेच (लांब, ) रहातात. )
27 Sep 2011 - 6:22 pm | अत्रुप्त आत्मा
आणि न्यूनगंडाने पछाडलेले पण काही लोक असतात की ज्यांना आपण, आपला देश, आपले लोक, आपली संस्कृती सतत दुय्यम, खालच्या दर्जाची, अडाणी लोकांनी भरलेली वाटत असते. पहिल्या दोषाने ग्रासलेले लोक तरीदेखील परवडले पण हे दुसर्या प्रकारातले लोक इतके नैराश्याने ग्रासलेले असतात की अगदी नकोसे होते. गैरसमज...गैरसमज...गैरसमज ...मृत्युन्जय भौ ... आंम्ही भारतराष्ट्र-वादी आहोत... त्यामुळे आंम्हाला आमच्या देशाची चिंता पहिली आहे...''सगळ्या जगातल्याच अंधःश्रद्धा काढत बसा,,,मग त्यातच भारताच्याही निघुन जातील'' अश्या स्वरुपाचं तुंम्ही मनाशी मांडलेलं फसवं ग्रुहीतक आंम्हाला अजिबात उपयोगी पडणारं नाही... शिवाय प्रत्येक भारतीय नागरीकाला विज्ञाननिष्ठ द्रुष्टीकोन बाळंगणं हे भारतीय घटनेनी दिलेलं कर्तव्य आहे... ते आपण समाजमनात वावरत असताना तर पहिल्यांदा बाजावायला हवं ना..? मग पहिल्यांदा केला आपल्याच घराच्या सफाइचा प्रयत्न तर त्यात न्यून-गंड येण्यासारखं काय आहे बर? शेजाय्रांच्या घरातला कचरा काढण्याचं व्रत मिळण्यासाठी,मला माझ्या घराच्या सफाइचा कार्यक्रम पहिल्यांदा हाती घ्यायला हवा ना? नाहीतर जागाचा काढायला जातो कचरा,आणी माझ्याच उंबरठ्यात पाचोरा... असं व्हायच नै का?... आणी आंम्ही हे असं लिहितो हा नैराश्याचा आजार वगैरे नसुन ''वस्तुस्थितीची खडखडीत जाणीव'' आहे...हे समजुन घ्या... या उप्परही तुमच म्हणण ''फक्त भारतालाच टार्गेट करायचं नाही'' असं असेल..तर तुमचा माझा रस्ता वेगळा आहे,इतकच मी म्हणेन... पुढील प्रवासासाठी तुंम्हाला शुभेच्छा... अलविदा...
अवांतर-@-आणि न्यूनगंडाने पछाडलेले पण काही लोक असतात की ज्यांना आपण, आपला देश, आपले लोक, आपली संस्कृती सतत दुय्यम, खालच्या दर्जाची, अडाणी लोकांनी भरलेली वाटत असते... या वाक्यावर हसावं की रडावं हेच कळत नाही... जे लोक स्वतःच्याच जगात जगतात,त्यांना भारतात रहायला यायची सवड कशी काय होणार?...मला न्यूनगंड आहे की नाही ते नंतर पहाता येइल, पण आपण जी भारतीय जनमानस आधुनीक मनाचं झाल्याची पडद्या आडुन तरफदारी करताय ती पाहुन आपल्याला संस्क्रुतीचा अतिगंड आहे असं मला निश्चित पणानी वाटतं,,,आणी हल्ली तर अंधारयुगाचा उदोउदो करणाय्रा निरनिराळ्या धार्मिक संस्था/संघटना निघालेल्या असताना... या सद्यःकालीन परिस्थितीकडे संपूर्ण डोळेझाक करुन जगणं आंम्हाला तरी शक्य नाही...
28 Sep 2011 - 11:52 am | मृत्युन्जय
मला आपल्या संस्कृतीचे ढोलही बडवायला आवडत नाही आणि तिच्या नावाने गळेदेखील काढायला आवडत नाहीत. इतर कुठल्याही देशाप्रमाणे भारतात आणि भारतीय संस्कृतीत काही कमतरता असतील. त्या दूरही केल्या पाहिजेत पण प्रत्येकवेळेस त्याबद्दल गळे काढण्यात मला इंटरेस्ट नाही. माझा देश जगात सर्वोत्कृष्ट होण्यासाठी मी माझ्यापरीने योगदान देत राहिल. "भारतासारखा देश" असा हेटाळणीपुर्वक उल्लेख करण्यापेक्षा जास्त चांगले काम आपल्याला नक्कीच करता येइल याची मला जाणीव आहे. आता हा अतिगंड असेल तर मला त्याचा अभिमान आहे.
28 Sep 2011 - 4:36 pm | अत्रुप्त आत्मा
आता हा अतिगंड असेल तर मला त्याचा अभिमान आहे. आपल्या अभिमानास आमच्या शुभेच्छा... राम राम...
27 Sep 2011 - 1:27 am | पुष्करिणी
27 Sep 2011 - 1:34 am | रेवती
एक तर बरेच दिवसांनी दिसतियेस मिपावर्....तीही या वेषात/रुपात!
नक्की काय समजायचं आम्ही!;)
की दिसतियेस यावरच समाधान मानायचं?;)
27 Sep 2011 - 1:43 am | Nile
अॅलर्जी चांगलीच मानवलीए हो पुष्करिणी काकू! ;-)
27 Sep 2011 - 1:47 am | पुष्करिणी
दॄष्ट लावायच काम नाही नायल्या...
27 Sep 2011 - 3:12 pm | मोहनराव
भुताखेताचा धागा आवडला.
सर्व भुतखेतमंड्ळीना या नवीन भुताचा प्रणाम!!
आमचे काही अनुभव (ऐकलेले)
१) आमच्या गावाकडे अश्या भरपुर कथा एकायला मिळतात. गावाकड्चा ओढा, पड्की विहीर, मळा हि भुतांची रहायची आवडीची ठिकाणे. माझा दादा एकदा पावसाळ्यात त्याच्या मित्रांसोबत रात्री शेतांमधे खेकडे पकडायला गेला होता आणी त्यांच्याबरोबर तो चकवा का काय तो प्रकार घडला. रात्रभर ही मंडळी घरी न आल्याने काही घरातले लोक शोधायला म्हणुन बाहेर पड्ले. प्रत्येकजण कुठेतरी मुर्छीत होउन पड्ला होता. पायातल्या चपला इकडेतीकडे पडुन हरवल्या होत्या. त्यांना रात्री काय घडले ते काहीच आठवत नव्हते. पड्की विहीरीच्या तर खुप कथा आहेत.
२) माझे आजोबा ट्रक ड्रायवर होते. रात्री एकदा ट्रक चालवत असताना त्यांना एक उंचापुरा म्हातारा लिफ्ट मागताना दिसला. त्यांनी गाडी थांबवली नाही. थोड्या वेळाने बघतात तर काय.... तो म्हातारा गाडीच्या वेगाने धावत येत होता. वेग वाढवला तरीही तो गाडीच्या बरोबर पळ्त होता. दुसर्या दिवशी गावात विचारले असता कळाले कि काही वर्षापुर्वी तिथे एका म्हातार्याचा ट्रकखाली येउन मोठा अपघात झाला होता.
अजुन आठवेल तशी भर घालुच!!! :)
27 Sep 2011 - 3:49 pm | नितिन थत्ते
>>रात्रभर ही मंडळी घरी न आल्याने काही घरातले लोक शोधायला म्हणुन बाहेर पड्ले. प्रत्येकजण कुठेतरी मुर्छीत होउन पड्ला होता. पायातल्या चपला इकडेतीकडे पडुन हरवल्या होत्या. त्यांना रात्री काय घडले ते काहीच आठवत नव्हते.
आमच्या ओळखीतल्या काही 'तारुण्यात पदार्पण केलेल्या' मुलांबद्दल अशा कथा ऐकू येत तेव्हा आमचे वडील अर्थपूर्ण हसत असत असे आठवते. ;)
27 Sep 2011 - 3:53 pm | परिकथेतील राजकुमार
थत्ते चांचाच्या तारुण्य पदार्पणाच्यावेळी घडलेली कथा वाचायला आवडेल.
27 Sep 2011 - 4:03 pm | मोहनराव
पहिल्यंदा लोकाना तोच डाउट आला होता... ;) पण तसा काही झाला नव्ह्ता!!!
27 Sep 2011 - 3:56 pm | स्पा
Sarva Pitri Amavsya
--धन्यवाद
27 Sep 2011 - 4:06 pm | मृत्युन्जय
मृत्युन्जय ;)
27 Sep 2011 - 6:08 pm | रेवती
अर्रे लेका, असं आहे होय!
मग आज तुझा दिवस्..........मजा कर.
27 Sep 2011 - 8:41 pm | प्रियाली
हॅप्पी बड्डे!!
28 Sep 2011 - 2:45 pm | बिपिन कार्यकर्ते
आमच्या गावाला एक शेत आहे. त्या शेतात रात्री पाणी वगैरे द्यायची पाळी आली तरी कोणी सहसा एकटे जात नाही. आणि गेले तरी तिथे मुक्काम करत नाहीत. एकदा असेच ३-४ जण गेले पाणी द्यायला. खूपच उशिर झाला म्हणून तिथेच गप्पा मारत बसले. गार वार्यात त्यांना झोपा लागल्या. थोड्यावेळाने त्यातल्या एकाला जाग आली तर त्याला असे आढळून आले की ते जिथे झोपले होते तिथपासून शेताच्या अगदी दुसर्या टोकाला ते होते. आणि शेतात कुठेही त्यांच्या पावलांचे ठसे नव्हते.
28 Sep 2011 - 3:15 pm | प्रियाली
चर्चा येऊन २ दिवस झाले आणि हा बिका आता हळूच पिल्लू सोडतोय. आधी घाबरला होतास कारे अंनिसला वगैरे.
या धाग्यावर भुताहडळींचे राज्य आहे. तू घाबरू नकोस. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. ;)
बाकी श्टोरी मस्त!
28 Sep 2011 - 3:18 pm | बिपिन कार्यकर्ते
छ्या: घाबरायचे काय त्यात? बाकीचे लोक काय फुसकुल्या सोडतायेत ते बघत होतो! ;)
मूड लागल्यास (पक्षी: आठवल्यास) अजून लिहीन!
28 Sep 2011 - 5:49 pm | सोना-शार्वील
या आधी माझा भुतावर विश्वास नव्हता,पण आता आहे,मी स्वत: पाहिले आणी त्याने मला हलवले पण,हे सत्य आहे पण अजुनही मन मानत नाही.साधारण ५ वर्षापूर्वी मी एका शहरात नोकरीच्या निमीत्ताने गेले.खुप शोधले पण म्हणावा तसा फ्लॅट मिळत नव्ह्ता अचानक तो शोधा संपला आणि एक चांगला फ्लॅट मिळाला आणी मी पण फारशी चौकशी न करता घेतला.त्यावेळी मी कशाला घाबरत नव्हते,सगळयना खूप कौतुक वाटायचे ही एकटी मुलगी कशी राहाते,आणि ते पण त्या घरात,तो फ्लॅट २ मजल्यावर होता खाली एक ज्वेलर्सचे दुकान होते,पहिल्या मजल्यावर चाटे क्लास,आणि सर्वात वर मी एकटी म्हणजे त्या पूर्ण बिल्डिंग मधे रात्री मी एकटीच असायचे आणि रात्री मी मेन गेट ला लॉक करायचे. आजूबाजूचे माझ्याकडे खूप विचित्र पाहायचे पण का ते मला काही कळायचे नाही,खाली एक वॉचमन असायचा. करमणूक म्हणून संध्याकाळी कंप्यूटर क्लास लावला होत.एक महिना पण झाला नाही तोच एका रात्री,मी क्लास वरुन घरी आले, घरी आल्यावर आईशी मोबाइल्वर गप्पा मारल्या,तितक्यात कोणतरी माझा ड्रेस मागुन ओढत आहे असे वाटले,परत वळून पहिले तर कोणीच नाही.विचार केला अडकला असेल कशाततरी.परत झोपले,साधारण रात्री १ वाजता अचानक अंगावर काहीतरी चढत असल्याचा भास झाला,पाहीले तर एक हात लटकतोय व एक मुलगा त्याने मुस्लिम लोकांमधे घालतात ती टोपी घातली होती पांढरा शर्ट,मला विश्वासच बसत नव्ह्ता,मी स्वप्नात आहे का ते पाह्ण्यसाठी स्वताला चीमटा पण घेतला,मग मात्र खुप घाबरले कि हार्ट फेल झाला असता,तशिच ओरडले व पळ्त खाली आले,परत ईतका त्रास झाला कि बेशुद्ध झाले दवाखान्यात भरती करावे लागले.त्या वॉचमननेच मला शुद्धीवर आल्यावर सांगितले कि तिथे मुन्जा आहे त्यामुंळ तेथे कोणी रहात नाही,मी परत सामान आणायला॑ पण त्या घरात गेले नाही.
28 Sep 2011 - 7:42 pm | चतुरंग
म्हणून उघडलं तर दारात बिका! मी आश्चर्याने थक्क झालो.
"अरे ये ये ये, बिपिन ये!!" (हे अशोक सराफ स्टाईलने म्हणावे..;) )
त्याला घरात घेतले (कोण म्हणालं रे कोकणस्थ असूनही? ;) )
"कधी आलास? कसा आहेस? असा अचानक कसा काय?"
"चल जेवायला बस."
"नको नको, गडबड आहे! चटकन काहीतरी तोंडात टाकायला दे आणि मी निघतो. हां आणि आलो होतो अशाकरता की सर्वपित्री पेश्शलच्या धाग्यावर तू काही लिहिलं कसं नाहीयेस?"
"अरे तुमच्यासारखे सगळे भूतप्रीय आणि भूतप्रियाली जमलेले असताना मी बापडा काय लिहिणार?
आणि हा घे लाडू!"
लाडू तोंडात टाकून त्याने एका क्षणात संपवला, मला जरा चमत्कारिक वाटले! पाणी द्यायला ग्लास पुढे केला तर त्याने एका दमात संपवला आणि ग्लासवर बोटांचे ठसेही नव्हते मग मात्र मला जरा भीती वाटायला लागली. कधी नव्हे ते बिकाने बेलबॉटम पँट घातल्याने त्याची पावलेही दिसत नव्हती. मलाच वेड्यासारखं झालंय असं वाटून मी तो विचार झटकला. बिका जायला निघायचं म्हणून वळला आणि त्याच्या बेलबॉटम खालून त्याची पावलं माझ्याकडे वळली! खल्लास एका क्षणात थरकापून मी उडालोच्....दचकून उठलो तर स्वप्न होतं.................मग विसरायच्या आत लिहायला बसलो. नाहीतरी बिका सांगून गेलाच होता ना लिही म्हणून!
(बिलेटेड सर्वपित्री पेश्शल) रंगा
(घटस्थापनेच्या दिवशी लिहिलं, उगाच मनात शंका नकोत, तसा मी अंधश्रद्ध आहे! ;) )
28 Sep 2011 - 8:15 pm | प्रियाली
एका क्षणात बिका भारत ते अमेरिका दारावर टकटक करायला टकाटक पोहोचला तेव्हाच सर्व संशय दूर व्हायला हवे होते. ;)
धाग्याचे शंभर अपराध भरले आहेत.
28 Sep 2011 - 8:21 pm | पैसा
सर्वपित्री मस्त साजरी झाली! सगळ्या उलट्या पायाच्या लोकांसाठी एक उलट्या पिसांची कोंबडी आणा रे कोणीतरी!
30 Sep 2011 - 1:36 am | बिपिन कार्यकर्ते
च्यायला! रंगोपंतांना मीच भेटलो!
=))
खुद के साथ बातां: पुढच्या वर्षी सर्वपित्रीला खरंच जायला पाहिजे रंगोपंतांकडे! ;)
28 Sep 2011 - 8:47 pm | विशाखा राऊत
रत्नागिरीमध्ये खुप ऐकल्या होत्या भुताच्या गोष्टी :)
ह्या सगळ्या वाचुन खुपच मज्जा आली.
8 Oct 2011 - 12:07 pm | जागु
मस्त भुतमय धागा.
आमच्या काकांच्या मुलांना नेहमी भुते दिसायची. ते नेहमी वर्णन करायचे. लोणावळ्याला त्यांचा बंगला होता त्यात म्हणे रोज भांडी वाजायची. लाईच ऑन ऑफ व्हायची. नंतर ते मुंबईत रहायला आले. तिथे एका चुलत भावाला घरातच मुंडके कापलेली, साडी नेसलेली बाई दिसायची. भिंतीवर टांगलेला कपड्याचा हँगर मंद गतीने खाली पडताना दिसायचा. माझी चुलत बहीण नर्स आहे. ती तर लहानपणी सतत भुतांच्या गोष्टी सांगायची. ती नाईट शिप्टला टोपी घालून कधी डूलकी लागलीच की तिची टोपी सकाळी दुसर्या ठिकाणीच सापडायची. कसले कसले आवाज वगैरे. भरपुर किस्से आहेत. लिहेन सावकाश.
4 Jul 2015 - 11:20 pm | जडभरत
मस्तच लेख! आजकाल हे लेखक का दिसत नाहीत मिपावर!
8 Jul 2015 - 4:26 pm | कपिलमुनी
भूत होउन गायबले आहेत :)
5 Jul 2015 - 9:22 am | खटासि खट
आमचं मास्तर भूताला हितकं घाबरायचं की म्हराटिचं व्याक्रण शिकीवताना भवीश्यकाळ, वर्तमाण काळ आनं पास्ट टेन्स असंच म्हनायचं..
5 Jul 2015 - 5:36 pm | अत्रुप्त आत्मा
आमच्यावर धागा... ??
थांबा..आता जनम कथाच द्येतो ठेऊन दोन!
5 Jul 2015 - 6:11 pm | अत्रुप्त आत्मा
---------------------------------॥दैनिक टनाटन प्रसन्न॥------------------------------
१)भूत कसे बनते???
ह्ही...ह्ही...हा...हा....हा.... भू.....................त!!!
तर अता अपल्याला भुतांच्या गोष्टी ऐकायला मिळणार....
स्थळ-कोकणातलं १ घर(अश्या गोष्टींना तीकडचीच घरे हवीत,गूढ वातावरणाची कीक माळरानापेक्षा कोकण प्रांती अधिक चटकन येते! )
काळ-झडप घालायला आलेला भूतं-काळ
वेळ- रात्री नीजानीज झाल्यानंतरची.... ह्ही:ह्हा...!
चला........सगळी पूर्व तयारी तर ठीक झाली अता आपण शरीराची त्वचा,....त्वचाच म्हणतात ना तीला? स्वारी... त्याला?...अं...अं...हं....तर त्वचा थरथरे पर्यंत त्या वातावरणात राहू.चला तर मग त्या ऐतीहासीक पडवीत,,पडवीच्या मागे १ 'आड' आहे,त्यामागे वाडी...आज कुणाचं तरी वर्षश्राद्ध झालेलं आहे आणी वाडीचा नैवेद्य कुत्र्यानी वगैरे खाल्लेला नसून तो आपोआप गायब झाल्याची वदंता आहे,,,या पार्श्वभूमीवर काही स्त्रीया गुप्त खलबंतं केल्याप्रमाणे पडल्या/पडल्या सुरू होतात...
स्त्री १-काय गं झोप लागत्ये?
स्त्री २- नाय बा,,,लागेल कशी?तुला कळ्ळ नाय?
स्त्री१- (दबक्या आवाजात) का$$$$य? ते पान ना? त्यात काय कळायचय मेलं? अत्रुप्ती हो...दुसरं काही नाय
स्त्री२-मला वाट्टं,पलीकडचे मामा
स्त्री१- कोण? गेल्या आषाढात गेले ते?
स्त्री२-नाय तं काय? इतका अत्रुप्त दुसरा होता का तरी कोणी गावात?
स्त्री१-हो बाई,ती पलीकडची कुमुद आहे ना,ती म्हणत होती दुपारी शेणकीत शेण टाकायला आली तेंव्हा तीला हे आपण वाडीला ठेवलेलं पान हलताना दिसलं म्हणे...
स्त्री२-होय की काय? आणी गं म ?
स्त्री१- तिचं तेच म्हणण हो,,,मामांचं त्यांच्या पोरांनी काही मंजे का...ही केलन नाई ना,त्याचा परिणाम
स्त्री२-जळो मेलं,तरीच मी म्हण्ट्ये...स्वतःचा चहा ढोसल्यावर सुधा,दुसय्राच्या कपावर मेल्याची भारी नजर असायची,,,माणसं जगतात ती जगतात आणी मेल्यावर सुद्धा स्वभाव जरा देखिल बदलत नाही हो...
एवढ्यात स्त्री क्रमांक-१ चा दिवटा (वय-साधारण-८/९) ''आई पोटात मळमळतय...'' म्हणुन रडत उठतो..
स्त्री१- जरा मेलं निजल्ये नाई त आली ही ब्याद ...पोराला - काय रे मेल्या,काय झाल?वावडींग घातलवतं ना संध्याकाळी तूला?
पोरगा-आई,,उलटी होत्ये...वळचणीचा लाइट लाव ना..आणी तू पण ये...हो... मला भीती वाट्टे एकट्याला...स्त्री१ पोराच्या पाठीत धपाटा घालत...'चल हो पुढे'....बाहेर जाऊन पोर बकाबका ओकतं....आणी स्त्री१ला धक्का बसतो....
स्त्री१-(मोठ्यांदी ओरडते)काय कार्ट आहे मेलं
स्त्री२-(लगबगीनं बाहेर येउन)- काय गं आता उलटी झाली त पोरावर चिडत्येस कसली?
स्त्री१-अगो...काल पासून पोट दुखत होत म्हणून लंघन करायला भाग पाडल ना याला,,,आणी उलटी मधे हे भरड्याच्या वड्याचे भरा भरा खाताना अर्धे चावलेले तुकडे पडलेत...अगो ते पान दुसय्रा कुणी खाल्लन नाइ...हाच आमचा मेला भस्म्या...अता गोठ्यात डांबते...आणी चांगलं २/४ दिवस ठेवते हो उपाशी.....वगैरे वगैरे.....
---------------------------------------
देन चिंटू, ट्येल मी,,,व्हाट इज दी मॉराल आफ श्टोरी...?---
"खय्रा गोष्टी जो पर्यंत उजेडात येत नाहीत तोपर्यंत खोट्या गोष्टीच खय्रा असतात!"
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
२)भूत बनविण्याची पाक-क्रुती:-
साहीत्य- एक जोडी धार्मिक वातावरणात वाढलेले-पती/पत्नी, त्यांचं तसच १ श्रद्धाळू अपत्य (वय तीन वर्षापेक्षा जास्त नसावं, नाहीतर रेसीपी संपंन्न होण्यात काही बुद्धीवादी तसेच विवेकी अडचणी येतात), रहाण्यासाठी कोणत्याही देश/प्रदेशातले एक घर, आणी जगातला कुठलाही देश( देश जितका धार्मिक असेल,तितकी पाक-क्रुती दमदार व जोमदार होते)
क्रुती--- प्रथम भारता सारखा १ धर्म:श्रद्ध देश घ्यावा, तो परंपरेनी लडबडीत होइपर्यंत भारुन/माखुन घ्यावा,मग त्यात एका सुशिक्षीत,उच्चविद्याविभुषीत कींवा अशिक्षीत कींवा कश्याही...परंतू---धार्मिक असलेल्या पती/पत्नींना आणून सोडावे. त्यांना त्यांच्या या अपत्यास शक्यतोवर यथेच्छ धार्मिक संस्कार करण्यास सांगावे, मुल जर का निबर मिळालेलं असेल तर, मधुन मधुन त्याच्यावर 'ऐकत नाहीस आई बाबांचं?...थांब तुला भूत्याकडे देते' असे मंत्र मारावे,यानी पोर चांगलं मऊ पडतं,आणी रेसीपी योग्य वळणावर पोहोचते...पोर फारच निबर असेल आणी धर्मश्रद्धेच्या रश्यात बुडत नसेल तर,वरतून एक जाड छडी घेऊन त्याला ''फार अक्कल वाढलीये तुझी,म्हणे आत्मा कुठ्रे असतो?'' असं वरुन खोबरं पेरत खाली टेंबाव...मग त्याला एक श्रद्धेची उकळी येऊ द्यावी... आणी जगात फिरण्यासाठी डीशमधे काढावं... इथे मुलाच्या डोक्यातलं भूत निम्म तयार होतं.. मग हा मुलगा थोडं जरी काही झालं तरी एकदम फॉर्मात येऊन घाबरेल..'माझ्यावर भूत बसलय' अश्या कथा सांगुन शाळेला दांड्या मारेल... झालं... इथुन पुढे त्याच्यावर श्रद्धेचं झाकण टाकून त्याला निवत ठेवलं,
की त्याच्यातलं भूत तय्यार ...
टीप-स्वतःला आणी नंतर इतरांना फसविण्यासाठी... हे भूत अगदी हुकमी एक्यासारखं तयार राहातं, त्याला नासण्या,अंबण्या विटण्याचं भय फक्त जागरुक प्रशासन,सुशिक्षीत समाजमन या पासूनच असतं ... तेंव्हा ही पाक-क्रुती एकदा का तयार झाली,की सहसा हज्जारो वर्ष खराब होत नाही,अगदी बिनधोक टिकते...
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
6 Jul 2015 - 7:16 am | श्रीरंग_जोशी
लै म्हणजे लैच भारी हो बुवा.
8 Jul 2015 - 4:06 pm | अविनाश पांढरकर
भूत बनविण्याची पाकक्रुती एकदम भन्नाट आहे.
8 Jul 2015 - 4:37 pm | निरन्जनदास
इच्या मारी ! (भिस्कूटे ! )
भयावह प्रतिभावंत लोकं हैत हित मनायची.
काय जबरी स्टोरी लीव्लीय.
एकदम मनापासून आणि अशरीरापासून अबिनंदन !!!
शिंच्या अत्रूत्पा, तृप्त केल्यानं रे तू माका !!
8 Jul 2015 - 5:39 pm | अत्रुप्त आत्मा
ह्या ह्या ह्या! :-D
धन्यवाद.
5 Jul 2015 - 8:45 pm | जडभरत
ष्टोरी जब्बर बुवा!!!आपण खुष!
5 Jul 2015 - 9:03 pm | जडभरत
पण बुवाजी तुमचा भुतांवर विश्वास का नाही? मला अशा दुष्ट शक्तींचे काही अनुभव आलेत. अशा दुष्ट शक्ती जगात आहेत!
अनुभव हाच शिक्षक. मग कोणी काही म्हणो!!!
5 Jul 2015 - 10:03 pm | टवाळ कार्टा
लिवा की तुम्च्या आण्भवांवर
5 Jul 2015 - 10:24 pm | अत्रुप्त आत्मा
@ अनुभव हाच शिक्षक. मग कोणी काही म्हणो!!!>> रैट्ट! माझ्यासाठिहि.
कळत नव्हत या विक्षयातलं तेंव्हा. ;-)
8 Jul 2015 - 2:11 pm | सिरुसेरि
वरील सर्व अनुभव वाचुन श्री. व्यंकटेश माडगुळकर यांच्या 'करुणाष्टक' या आत्मकथनपर पुस्तकातील एक प्रसंग आठवला . - लेखक लहान असताना त्यांच्या वडीलांची औंध प्रांतातील एका खेडेगावी बदली झाली . या गावात महिलांना भल्या पहाटे उठुन एका दुरवरील विहीरिपर्यंत जाउन पाणी आणावे लागत असे . माडगुळकर यांच्या आईसुद्धा त्याप्रमाणे पहाटे उठुन विहीरीतुन पाणी आणत असत . एकदा त्यांना झोपेत कोंबडा आरवल्याचा आवाज ऐकू आला . नेहमीप्रमाणे पहाट झाली असे समजुन त्या उठ्ल्या व घागर घेउन पाणी आणायला घराबाहेर आल्या . तर बाहेर अजुन पुर्ण अंधारच होता . त्यांना बाहेर अंगणात एक हिरवी साडी नेसलेली , कपाळाला मळवट भरलेली स्त्री उभी असलेली दिसली . ती स्त्री त्यांना जरबेने म्हणाली 'एवढ्या लवकर का उठलीस ? जाउन झोप' . त्या आवाजातील जरबेने भारुन माडगुळकर यांच्या आई परत घरात आल्या व झोपी गेल्या . दुसरया दिवशी सकाळी जेव्हा त्यांना हा रात्री घडलेला हा प्रसंग आठवला , तेव्हा त्यांना दरदरुन घामच फुटला व ताप आला .
8 Jul 2015 - 4:34 pm | तुडतुडी
लई म्हंजी लैच विंटरेष्टिंग धागा . पण एवढुसेच प्रतिसाद होय .
राशीरंजन चा भाग कालच ऐकला त्यात शरद उपाध्ये यांनी छातीठोकपणे सांगीतले आहे की "ब्लॅक मॅजिक" असते. लिंबू मारणे, जारण-मारण या सर्वाचे अस्तित्व आहे.>>>
शरद उपाध्येंनी हे सगळे प्रकार नुसते बघितलेच नाही तर त्यातले काही शिकून सुधा घेतलेत .
8 Jul 2015 - 4:44 pm | कपिलमुनी
शरद उपाध्येंनी त्या दावूदवर एक मंत्र मारून त्याला संपवायला हवा
8 Jul 2015 - 5:17 pm | तुडतुडी
लई म्हंजी लैच विंटरेष्टिंग धागा . पण एवढुसेच प्रतिसाद होय .
राशीरंजन चा भाग कालच ऐकला त्यात शरद उपाध्ये यांनी छातीठोकपणे सांगीतले आहे की "ब्लॅक मॅजिक" असते. लिंबू मारणे, जारण-मारण या सर्वाचे अस्तित्व आहे.>>>
शरद उपाध्येंनी हे सगळे प्रकार नुसते बघितलेच नाही तर त्यातले काही शिकून सुधा घेतलेत .
8 Jul 2015 - 7:48 pm | लक्ष्या
तूम्ही NatGeo/Discovery वरची मालीका पाहीली आहे का.
America's Most Hunted
Paranomal Activity
खरच मस्त असते. रात्री बघायला. ;)
9 Jul 2015 - 12:44 pm | तुडतुडी
नाय पहिलि. पण आता नक्की पाहणार . सांगीतल्या बद्दल ठांकू
9 Jul 2015 - 1:44 pm | शि बि आय
मुंबई ते महाबळेश्वरच्या रस्त्यावर माझ्या ओफिस मधील काही सहकारी प्रवास करताना घडलेली हि घटना.
लवकर मुंबईला पोचायच्या नादात रात्रीचा प्रवास करण्याचे ठरवून मंडळीनी प्रवास सुरु केला. ड्रायव्हर पट्टीचा चालवणारा असल्यामुळे चिंता नव्हती तरी खबरदारीचा उपाय म्हणून सर्वाधिक बडबड करण्याऱ्या नम्रताला त्याच्या शेजारी बसवून सगळे पेंगायला लागले. नम्रताची अखंड बडबड सुरूच होती. अचानक समोरून पांढऱ्या साडीतील बाई गाडीसमोर येउन लिफ्ट मागू लागली. ड्रायव्हर कसलेला असल्यामुळे त्याला ह्या प्रकारची कल्पना आली पण तिला बघून नम्रताने नेमकी काच खाली केली आणि समोर दिसणारी बाई बाजूने मात्र अदृश्य झाली. तोपर्यंत वेग वाढवला असल्यामुळे काही झाले नाही पण त्यानंतर नम्रताला मात्र चांगलाच ताप भरला, जवळ जवळ महिनाभर "ती आली.... ती आली" करत झोपेत देखील ती ओरड होती.
अजून एक सांगण्यासारखा किस्सा म्हणजे,
२ वर्षापूर्वी हैद्राबादला जाण्याचा योग आला. "स्नो वर्ल्ड" पाहिल्यानंतर दुसर्या मजल्यावर असणारा हॉरर शो देखील बघायला मिळाला. आत शिरल्यावर खरच एखाद्या अति भव्य वाड्यात शिरल्याचा फील येत होता. जुनाट वास्तुत येणारा कुबट वास सगळीकडे भरून राहिला होता. जोडीला भीतीदायक संगीत आणि विचित्र आवाज. अपुर्या प्रकाशामुळे आपण कुठे चाललो आहोत काहीही कळत नव्हते. काही ठिकाणी तर एवढा अंधार होता कि सरळ वाट हि सापडेनाशी होत होती. पायाखाली हलणाऱ्या लाद्या, डोक्यावर खुपश्या झाडांच्या फांद्या होत्या. मधूनच एखादा रबरी पण हुबेहूब खरा वाटणारा साप अंगावर येई तर कधी पुढचे पाउल टाकल्यावर ती फारशी फुटभर खाली पाण्यात जाई. आपण खाली बघून चालावे तर अंधारात कुठूनतरी कानावर हलकीच फुंकर येई किंवा डोक्यावरून आवाज करत खोटे घुबड नाचे मधेच अर्धवट कापलेला आणि ओले रक्त (रंग) अंगाला लावणारा हात गळ्याभोवती येई . एवढे असूनही भूलभुलैया पण होताच. त्यात मनात नसतानाही लपाछुपी चा खेळ खेळावा लागला. ग्रुपमधील मेंबर त्यात यथेच्च आरडा-ओरडा करत बागडत होते. थोड्या वेळात भीती कमी झाल्यावर सगळ्या प्रकाराचा थोडा कंटाळा कम वैताग येऊ लागला कारण हे सगळे वाकून अनुभवायचे होते न!! अजून बाहेर कसे पडत नाही असा विचारही यायला लागला. तेवढ्यात एक भयानक भूत जवळ अंगावर आदळले. आधीच वैताग आल्यामुळेआणि त्यातून ते अंगावर खुपच जोरात आदळल्यामुळे त्याच्या पोटात जोरदार गुद्दा लगावला. ते भूत बिचारे तिथेच पोट धरून बसले हो!! तोपर्यंत आम्ही पुढे गेलो होतो.
आपण ज्याला बदकले तो माणूस होता हे कळल्यावर अगणित वेळा सॉरी म्हणत त्याच्या पावलावर पाऊल टाकून बाहेर आले. कारण जर तसे केले नसते तर कपाळमोक्ष अटळ होता कारण मध्येच सरकणारी फरशी आणि त्याला समांतर ढकलणारी भिंत असे काहीबाही पण होते. परत एकदा सॉरीचा प्रोग्राम झाला आणि तिथून काढता पाय घेतला.
13 Jul 2015 - 3:16 pm | तुडतुडी
शरद उपाध्येंनी त्या दावूदवर एक मंत्र मारून त्याला संपवायला हवा>>>
शरद उपाध्ये ती विद्या वापरात नाहीत . नुसती शिकून घेतलीये कुतूहल म्हणून.
भुतं नेहमी पांढरेच कपडे का घालतात ? दुसरा रंग आवडत नाही का त्यांना ?
13 Jul 2015 - 3:59 pm | जडभरत
--- ताई हा विषय फार गहन आणि वादग्रस्त आहे. यावर इथे चर्चा शक्य नाही दिसत. स्वतंत्र धागाच काढायला हवा.