✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भूत कसे बनते? - सर्वपित्री पेश्शल!

प
प्रियाली यांनी
Sun, 09/25/2011 - 23:49  ·  लेख
लेख
सौ.अ.जि.१ पैसाताई यांना खालील लेख पुष्पगुच्छ देऊन समर्पित. सदर पुष्पगुच्छावर विक्रेत्याचा लोगो असेलच पण तरीही एक विशेष श्टीकर लावून तो पुष्पगुच्छ कोणत्या विक्रेत्याकडून खरेदी केला आहे ते कळवले आहे. पैसाताईंना हा लेख समर्पित करण्याचे कारण काही चाणाक्ष वाचकांनी जाणले असेलच पण ज्यांनी ते जाणले नसेल त्यांच्यासाठी पुढील खुलासा: पितृपक्ष सुना सुना गेला अशी खरड लिहून त्यांनी मला मसणातून उठवले. अर्थातच, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. या पार्श्वभूमीवर आमचे एक जालमित्र मध्यंतरी मला म्हणाले होते. “अगं हडळी, कधीतरी माणसांत ये.” तो अपमान आणि शल्य अद्याप माझ्या हृदयात सलते आहे. सदर व्यक्तीचा लोकांनी या लेखात जाहीर निषेध करावा अशी मी विनंती करते. सर्वपित्री जवळ येत असताना काहीच चमत्कारिक आणि भयंकर घडू नये अशी माझी इच्छा नव्हती पण हिंदू क्यालेंडरानुसार यावर्षी सर्वपित्रीने आमच्या लाडक्या हॅलोविनला कल्टी दिली, त्यातून नव्या प्रोजेक्टचे भूत मानेवर बसलेले त्यामुळे सर्वपित्री गुळमुळीत निघून जाते असेच वाटले होते पण पैसाताईंमुळे काहीतरी भयंकर धागा टाकण्याचा योग आला आहे. त्यातून गेली वर्ष-दोन वर्षे उगीच माझ्या मानगुटीवर चढून बसण्याचा प्रयत्न करणार्‍या घासुगुर्जींचा “दृष्ट कशी काढावी?” हा लेख औत्सुक्यापायी लिहिला आहे, समज गैरसमज जाणून घेण्यासाठी लिहिलेला आहे असा समज झाल्याने मी याच लेखाला माझे प्रेरणास्थान२ बनवले आहे. अवांतरः सहज आठवलं म्हणून आमच्या एका आयटमला आम्ही फ्यांटम म्हणत असू, दुसर्‍याला वेताळ तर तिसर्‍याला मुंजा.
लहान मुलांची किंवा मोठ्यांचीही कधी कधी भुते बनतात. बाहेरची बाधा होणे, माणूस झपाटला जाणे असे प्रकार घडतात. इच्छा अतृप्त राहिलेला किंवा अनैसर्गिक मृत्यू आलेला मनुष्य भूत बनतो असे समजले जाते. माणसाचे भूत बनून त्याने त्रास देऊ नये म्हणून श्राद्ध करणे, दिवस करणे, शांती करणे इ. प्रकार केले जातात. हे सर्व ठीक पण ही चर्चा भूत कसे काढावे त्यावर नसून भूत कसे बनते त्यावर आहे. तुमच्या लहानपणापासून तुम्ही “मग तो व्यक्ती भूत बनला....” अशा टैपाच्या गोष्टी ऐकल्या असतील त्या इथे सांगा बघू. भूत नेमके कसे बनते? त्यासाठी कोणत्या वस्तू वापरतात? भूत कोणत्याही तिथीला बनता येते का? इतर कोणाला बनवता येत नसल्यास स्वतःच स्वतःला भूत बनता येते का? यामागचे शास्त्र काय आहे? हे सर्व थोतांड आहे असा अंनिसकडे कोण्ता पुरावा, स्टडी आहे काय? माणसाप्रमाणेच घर, दुकान, प्राणी यांचेही भूत बनते का? कोकणातल्या लोकांना खास आवाहन आहे की त्यांनी खास कोकणी भुतांच्या गोष्टी थोडक्यात इथे सांगाव्या आणि मिपाकरांना उपकृत करावे. बिगर कोकणी लोकांनाही हे आवाहन लागू आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी. प्रतिसाद देताना तो भयंकर आणि चमत्कारिक आहे याची दखल घ्यावी. सुरुवात माझ्यापासून करते: आमची आजी (बाबांची आई) पक्की कोकणातली. लहानपणापासून तिने मला भुतांच्या गोष्टींचेच बाळकडू देऊन वाढवले. आमच्या आईला हा प्रकार पसंत नसे पण तिची काय बिशाद होती आजीसमोर शब्द काढण्याची. आजीने तिला तिथेच माणसांतून उठवली असती अर्थातच, तसं कधी घडले नाही. आजीच्या गावी एक कोळी होता. त्याचं नाव पाकुल्या. पाकुल्या तसा वयानुसार कमरेतून वाकला होता. मच्छीमारी सोडून किनार्‍यावर सुकवायला टाकलेल्या खारवलेल्या माशांची रखवाली करत असे. अशाच एका रात्री पौर्णिमा अली. त्या पुनवेच्या रात्री चंद्र आकाशात वर आला होता. समुद्राचं पाणी चांदीसारखं चमचमत होतं. रुपेरी वाळूने चंद्राला स्वत:त सामावून घेतल्याचा भास होत होता. किनार्‍यावर मंद वारा सुटला होता आणि त्याच रात्री रखवाली करणारा पाकुल्या अचानक खुडुक झाला. अजूनही कधीतरी पौर्णिमेच्या शांत रात्री समुद्रावर भटकायला गेलेल्या लोकांना पाकुल्या दिसतो. खारवायला टाकलेल्या माशांची रखवाली करत असतो. फक्त पाकुल्याचं अंग तो मेला त्या रात्री समुद्र आणि वाळू चमकत होती तसंच चांदीसारखं चमचमत असतं. लोक त्याला आता “पाकुल्या चकचक” म्हणतात. तात्पर्यः पौर्णिमेच्या रात्री समुद्रावर फिरायला जाऊ नये. गेलात तर चकचक हे उपनाम मानगुटीवर बसायची शक्यता आहे. तसेही पौर्णिमेला काय करावे याचा सल्ला युयुत्सुंकडून घ्यावा असे माझे स्पष्ट मत आहे. आता येऊ द्या – खवीस, हडळे, गिरे, हाकामारी, चकवा यांच्या कहाण्या ऐकण्यास उत्सुक. सर्वांना सर्वपित्री अमावास्येच्या शुभेच्छा!! (हडळ नं. १) प्रियाली.
१ अ. जि. = अद्याप जिवंत २ हे विडंबन नाही. सदर लेखाचा प्रेरणा म्हणून वापर केला आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
58579 वाचन

💬 प्रतिसाद (137)

प्रतिक्रिया

पहिल्यंदा लोकाना तोच डाउट आला

मोहनराव
Tue, 09/27/2011 - 16:03 नवीन
पहिल्यंदा लोकाना तोच डाउट आला होता... ;) पण तसा काही झाला नव्ह्ता!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

SPA

स्पा
Tue, 09/27/2011 - 15:56 नवीन
Sarva Pitri Amavsya --धन्यवाद
  • Log in or register to post comments

मृत्यु

मृत्युन्जय
Tue, 09/27/2011 - 16:06 नवीन
मृत्युन्जय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अर्रे लेका, असं आहे होय! मग

रेवती
Tue, 09/27/2011 - 18:08 नवीन
अर्रे लेका, असं आहे होय! मग आज तुझा दिवस्..........मजा कर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हॅप्पी बड्डे!

प्रियाली
Tue, 09/27/2011 - 20:41 नवीन
हॅप्पी बड्डे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

आमच्या गावाला एक शेत आहे.

बिपिन कार्यकर्ते
Wed, 09/28/2011 - 14:45 नवीन
आमच्या गावाला एक शेत आहे. त्या शेतात रात्री पाणी वगैरे द्यायची पाळी आली तरी कोणी सहसा एकटे जात नाही. आणि गेले तरी तिथे मुक्काम करत नाहीत. एकदा असेच ३-४ जण गेले पाणी द्यायला. खूपच उशिर झाला म्हणून तिथेच गप्पा मारत बसले. गार वार्‍यात त्यांना झोपा लागल्या. थोड्यावेळाने त्यातल्या एकाला जाग आली तर त्याला असे आढळून आले की ते जिथे झोपले होते तिथपासून शेताच्या अगदी दुसर्‍या टोकाला ते होते. आणि शेतात कुठेही त्यांच्या पावलांचे ठसे नव्हते.
  • Log in or register to post comments

काय बिका?

प्रियाली
Wed, 09/28/2011 - 15:15 नवीन
चर्चा येऊन २ दिवस झाले आणि हा बिका आता हळूच पिल्लू सोडतोय. आधी घाबरला होतास कारे अंनिसला वगैरे. या धाग्यावर भुताहडळींचे राज्य आहे. तू घाबरू नकोस. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. ;) बाकी श्टोरी मस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

छ्या: घाबरायचे काय त्यात?

बिपिन कार्यकर्ते
Wed, 09/28/2011 - 15:18 नवीन
छ्या: घाबरायचे काय त्यात? बाकीचे लोक काय फुसकुल्या सोडतायेत ते बघत होतो! ;) मूड लागल्यास (पक्षी: आठवल्यास) अजून लिहीन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

न उलगडलेले रह्स्य

सोना-शार्वील
Wed, 09/28/2011 - 17:49 नवीन
या आधी माझा भुतावर विश्वास नव्हता,पण आता आहे,मी स्वत: पाहिले आणी त्याने मला हलवले पण,हे सत्य आहे पण अजुनही मन मानत नाही.साधारण ५ वर्षापूर्वी मी एका शहरात नोकरीच्या निमीत्ताने गेले.खुप शोधले पण म्हणावा तसा फ्लॅट मिळत नव्ह्ता अचानक तो शोधा संपला आणि एक चांगला फ्लॅट मिळाला आणी मी पण फारशी चौकशी न करता घेतला.त्यावेळी मी कशाला घाबरत नव्हते,सगळयना खूप कौतुक वाटायचे ही एकटी मुलगी कशी राहाते,आणि ते पण त्या घरात,तो फ्लॅट २ मजल्यावर होता खाली एक ज्वेलर्सचे दुकान होते,पहिल्या मजल्यावर चाटे क्लास,आणि सर्वात वर मी एकटी म्हणजे त्या पूर्ण बिल्डिंग मधे रात्री मी एकटीच असायचे आणि रात्री मी मेन गेट ला लॉक करायचे. आजूबाजूचे माझ्याकडे खूप विचित्र पाहायचे पण का ते मला काही कळायचे नाही,खाली एक वॉचमन असायचा. करमणूक म्हणून संध्याकाळी कंप्यूटर क्लास लावला होत.एक महिना पण झाला नाही तोच एका रात्री,मी क्लास वरुन घरी आले, घरी आल्यावर आईशी मोबाइल्वर गप्पा मारल्या,तितक्यात कोणतरी माझा ड्रेस मागुन ओढत आहे असे वाटले,परत वळून पहिले तर कोणीच नाही.विचार केला अडकला असेल कशाततरी.परत झोपले,साधारण रात्री १ वाजता अचानक अंगावर काहीतरी चढत असल्याचा भास झाला,पाहीले तर एक हात लटकतोय व एक मुलगा त्याने मुस्लिम लोकांमधे घालतात ती टोपी घातली होती पांढरा शर्ट,मला विश्वासच बसत नव्ह्ता,मी स्वप्नात आहे का ते पाह्ण्यसाठी स्वताला चीमटा पण घेतला,मग मात्र खुप घाबरले कि हार्ट फेल झाला असता,तशिच ओरडले व पळ्त खाली आले,परत ईतका त्रास झाला कि बेशुद्ध झाले दवाखान्यात भरती करावे लागले.त्या वॉचमननेच मला शुद्धीवर आल्यावर सांगितले कि तिथे मुन्जा आहे त्यामुंळ तेथे कोणी रहात नाही,मी परत सामान आणायला॑ पण त्या घरात गेले नाही.
  • Log in or register to post comments

काल रात्री दारावर टकटक झाली

चतुरंग
Wed, 09/28/2011 - 19:42 नवीन
म्हणून उघडलं तर दारात बिका! मी आश्चर्याने थक्क झालो. "अरे ये ये ये, बिपिन ये!!" (हे अशोक सराफ स्टाईलने म्हणावे..;) ) त्याला घरात घेतले (कोण म्हणालं रे कोकणस्थ असूनही? ;) ) "कधी आलास? कसा आहेस? असा अचानक कसा काय?" "चल जेवायला बस." "नको नको, गडबड आहे! चटकन काहीतरी तोंडात टाकायला दे आणि मी निघतो. हां आणि आलो होतो अशाकरता की सर्वपित्री पेश्शलच्या धाग्यावर तू काही लिहिलं कसं नाहीयेस?" "अरे तुमच्यासारखे सगळे भूतप्रीय आणि भूतप्रियाली जमलेले असताना मी बापडा काय लिहिणार? आणि हा घे लाडू!" लाडू तोंडात टाकून त्याने एका क्षणात संपवला, मला जरा चमत्कारिक वाटले! पाणी द्यायला ग्लास पुढे केला तर त्याने एका दमात संपवला आणि ग्लासवर बोटांचे ठसेही नव्हते मग मात्र मला जरा भीती वाटायला लागली. कधी नव्हे ते बिकाने बेलबॉटम पँट घातल्याने त्याची पावलेही दिसत नव्हती. मलाच वेड्यासारखं झालंय असं वाटून मी तो विचार झटकला. बिका जायला निघायचं म्हणून वळला आणि त्याच्या बेलबॉटम खालून त्याची पावलं माझ्याकडे वळली! खल्लास एका क्षणात थरकापून मी उडालोच्....दचकून उठलो तर स्वप्न होतं.................मग विसरायच्या आत लिहायला बसलो. नाहीतरी बिका सांगून गेलाच होता ना लिही म्हणून! (बिलेटेड सर्वपित्री पेश्शल) रंगा (घटस्थापनेच्या दिवशी लिहिलं, उगाच मनात शंका नकोत, तसा मी अंधश्रद्ध आहे! ;) )
  • Log in or register to post comments

१००

प्रियाली
Wed, 09/28/2011 - 20:15 नवीन
एका क्षणात बिका भारत ते अमेरिका दारावर टकटक करायला टकाटक पोहोचला तेव्हाच सर्व संशय दूर व्हायला हवे होते. ;) धाग्याचे शंभर अपराध भरले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

सर्वपित्री मस्त झाली

पैसा
Wed, 09/28/2011 - 20:21 नवीन
सर्वपित्री मस्त साजरी झाली! सगळ्या उलट्या पायाच्या लोकांसाठी एक उलट्या पिसांची कोंबडी आणा रे कोणीतरी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

च्यायला! रंगोपंतांना मीच

बिपिन कार्यकर्ते
Fri, 09/30/2011 - 01:36 नवीन
च्यायला! रंगोपंतांना मीच भेटलो! =)) खुद के साथ बातां: पुढच्या वर्षी सर्वपित्रीला खरंच जायला पाहिजे रंगोपंतांकडे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

रत्नागिरीमध्ये खुप ऐकल्या

विशाखा राऊत
Wed, 09/28/2011 - 20:47 नवीन
रत्नागिरीमध्ये खुप ऐकल्या होत्या भुताच्या गोष्टी :) ह्या सगळ्या वाचुन खुपच मज्जा आली.
  • Log in or register to post comments

मस्त भुतमय धागा. आमच्या

जागु
Sat, 10/08/2011 - 12:07 नवीन
मस्त भुतमय धागा. आमच्या काकांच्या मुलांना नेहमी भुते दिसायची. ते नेहमी वर्णन करायचे. लोणावळ्याला त्यांचा बंगला होता त्यात म्हणे रोज भांडी वाजायची. लाईच ऑन ऑफ व्हायची. नंतर ते मुंबईत रहायला आले. तिथे एका चुलत भावाला घरातच मुंडके कापलेली, साडी नेसलेली बाई दिसायची. भिंतीवर टांगलेला कपड्याचा हँगर मंद गतीने खाली पडताना दिसायचा. माझी चुलत बहीण नर्स आहे. ती तर लहानपणी सतत भुतांच्या गोष्टी सांगायची. ती नाईट शिप्टला टोपी घालून कधी डूलकी लागलीच की तिची टोपी सकाळी दुसर्‍या ठिकाणीच सापडायची. कसले कसले आवाज वगैरे. भरपुर किस्से आहेत. लिहेन सावकाश.
  • Log in or register to post comments

मस्तच लेख! आजकाल हे लेखक का

जडभरत
Sat, 07/04/2015 - 23:20 नवीन
मस्तच लेख! आजकाल हे लेखक का दिसत नाहीत मिपावर!
  • Log in or register to post comments

भूत

कपिलमुनी
Wed, 07/08/2015 - 16:26 नवीन
भूत होउन गायबले आहेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत

आमचं मास्तर भूताला हितकं

खटासि खट
Sun, 07/05/2015 - 09:22 नवीन
आमचं मास्तर भूताला हितकं घाबरायचं की म्हराटिचं व्याक्रण शिकीवताना भवीश्यकाळ, वर्तमाण काळ आनं पास्ट टेन्स असंच म्हनायचं..
  • Log in or register to post comments

आमच्यावर धागा... ??

अत्रुप्त आत्मा
Sun, 07/05/2015 - 17:36 नवीन
आमच्यावर धागा... ?? Image removed. थांबा..आता जनम कथाच द्येतो ठेऊन दोन!
  • Log in or register to post comments

-----------------------------

अत्रुप्त आत्मा
Sun, 07/05/2015 - 18:11 नवीन
---------------------------------॥दैनिक टनाटन प्रसन्न॥------------------------------ १)भूत कसे बनते??? ह्ही...ह्ही...हा...हा....हा.... भू.....................त!!! Image removed. तर अता अपल्याला भुतांच्या गोष्टी ऐकायला मिळणार.... स्थळ-कोकणातलं १ घर(अश्या गोष्टींना तीकडचीच घरे हवीत,गूढ वातावरणाची कीक माळरानापेक्षा कोकण प्रांती अधिक चटकन येते! ) काळ-झडप घालायला आलेला भूतं-काळ वेळ- रात्री नीजानीज झाल्यानंतरची.... Image removed. ह्ही:ह्हा...! चला........सगळी पूर्व तयारी तर ठीक झाली अता आपण शरीराची त्वचा,....त्वचाच म्हणतात ना तीला? स्वारी... त्याला?...अं...अं...हं....तर त्वचा थरथरे पर्यंत त्या वातावरणात राहू.चला तर मग त्या ऐतीहासीक पडवीत,,पडवीच्या मागे १ 'आड' आहे,त्यामागे वाडी...आज कुणाचं तरी वर्षश्राद्ध झालेलं आहे आणी वाडीचा नैवेद्य कुत्र्यानी वगैरे खाल्लेला नसून तो आपोआप गायब झाल्याची वदंता आहे,,,या पार्श्वभूमीवर काही स्त्रीया गुप्त खलबंतं केल्याप्रमाणे पडल्या/पडल्या सुरू होतात... स्त्री १-काय गं झोप लागत्ये? स्त्री २- नाय बा,,,लागेल कशी?तुला कळ्ळ नाय? स्त्री१- (दबक्या आवाजात) का$$$$य? ते पान ना? त्यात काय कळायचय मेलं? अत्रुप्ती हो...दुसरं काही नाय स्त्री२-मला वाट्टं,पलीकडचे मामा स्त्री१- कोण? गेल्या आषाढात गेले ते? स्त्री२-नाय तं काय? इतका अत्रुप्त दुसरा होता का तरी कोणी गावात? स्त्री१-हो बाई,ती पलीकडची कुमुद आहे ना,ती म्हणत होती दुपारी शेणकीत शेण टाकायला आली तेंव्हा तीला हे आपण वाडीला ठेवलेलं पान हलताना दिसलं म्हणे... स्त्री२-होय की काय? आणी गं म ? स्त्री१- तिचं तेच म्हणण हो,,,मामांचं त्यांच्या पोरांनी काही मंजे का...ही केलन नाई ना,त्याचा परिणाम स्त्री२-जळो मेलं,तरीच मी म्हण्ट्ये...स्वतःचा चहा ढोसल्यावर सुधा,दुसय्राच्या कपावर मेल्याची भारी नजर असायची,,,माणसं जगतात ती जगतात आणी मेल्यावर सुद्धा स्वभाव जरा देखिल बदलत नाही हो... एवढ्यात स्त्री क्रमांक-१ चा दिवटा (वय-साधारण-८/९) ''आई पोटात मळमळतय...'' म्हणुन रडत उठतो.. स्त्री१- जरा मेलं निजल्ये नाई त आली ही ब्याद ...पोराला - काय रे मेल्या,काय झाल?वावडींग घातलवतं ना संध्याकाळी तूला? पोरगा-आई,,उलटी होत्ये...वळचणीचा लाइट लाव ना..आणी तू पण ये...हो... मला भीती वाट्टे एकट्याला...स्त्री१ पोराच्या पाठीत धपाटा घालत...'चल हो पुढे'....बाहेर जाऊन पोर बकाबका ओकतं....आणी स्त्री१ला धक्का बसतो.... स्त्री१-(मोठ्यांदी ओरडते)काय कार्ट आहे मेलं स्त्री२-(लगबगीनं बाहेर येउन)- काय गं आता उलटी झाली त पोरावर चिडत्येस कसली? स्त्री१-अगो...काल पासून पोट दुखत होत म्हणून लंघन करायला भाग पाडल ना याला,,,आणी उलटी मधे हे भरड्याच्या वड्याचे भरा भरा खाताना अर्धे चावलेले तुकडे पडलेत...अगो ते पान दुसय्रा कुणी खाल्लन नाइ...हाच आमचा मेला भस्म्या...अता गोठ्यात डांबते...आणी चांगलं २/४ दिवस ठेवते हो उपाशी.....वगैरे वगैरे..... --------------------------------------- देन चिंटू, ट्येल मी,,,व्हाट इज दी मॉराल आफ श्टोरी...?--- "खय्रा गोष्टी जो पर्यंत उजेडात येत नाहीत तोपर्यंत खोट्या गोष्टीच खय्रा असतात!" Image removed. ०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===० २)भूत बनविण्याची पाक-क्रुती:- साहीत्य- एक जोडी धार्मिक वातावरणात वाढलेले-पती/पत्नी, त्यांचं तसच १ श्रद्धाळू अपत्य (वय तीन वर्षापेक्षा जास्त नसावं, नाहीतर रेसीपी संपंन्न होण्यात काही बुद्धीवादी तसेच विवेकी अडचणी येतात), रहाण्यासाठी कोणत्याही देश/प्रदेशातले एक घर, आणी जगातला कुठलाही देश( देश जितका धार्मिक असेल,तितकी पाक-क्रुती दमदार व जोमदार होते) क्रुती--- प्रथम भारता सारखा १ धर्म:श्रद्ध देश घ्यावा, तो परंपरेनी लडबडीत होइपर्यंत भारुन/माखुन घ्यावा,मग त्यात एका सुशिक्षीत,उच्चविद्याविभुषीत कींवा अशिक्षीत कींवा कश्याही...परंतू---धार्मिक असलेल्या पती/पत्नींना आणून सोडावे. त्यांना त्यांच्या या अपत्यास शक्यतोवर यथेच्छ धार्मिक संस्कार करण्यास सांगावे, मुल जर का निबर मिळालेलं असेल तर, मधुन मधुन त्याच्यावर 'ऐकत नाहीस आई बाबांचं?...थांब तुला भूत्याकडे देते' असे मंत्र मारावे,यानी पोर चांगलं मऊ पडतं,आणी रेसीपी योग्य वळणावर पोहोचते...पोर फारच निबर असेल आणी धर्मश्रद्धेच्या रश्यात बुडत नसेल तर,वरतून एक जाड छडी घेऊन त्याला ''फार अक्कल वाढलीये तुझी,म्हणे आत्मा कुठ्रे असतो?'' असं वरुन खोबरं पेरत खाली टेंबाव...मग त्याला एक श्रद्धेची उकळी येऊ द्यावी... आणी जगात फिरण्यासाठी डीशमधे काढावं... इथे मुलाच्या डोक्यातलं भूत निम्म तयार होतं.. मग हा मुलगा थोडं जरी काही झालं तरी एकदम फॉर्मात येऊन घाबरेल..'माझ्यावर भूत बसलय' अश्या कथा सांगुन शाळेला दांड्या मारेल... झालं... इथुन पुढे त्याच्यावर श्रद्धेचं झाकण टाकून त्याला निवत ठेवलं, की त्याच्यातलं भूत तय्यार ... Image removed. टीप-स्वतःला आणी नंतर इतरांना फसविण्यासाठी... हे भूत अगदी हुकमी एक्यासारखं तयार राहातं, त्याला नासण्या,अंबण्या विटण्याचं भय फक्त जागरुक प्रशासन,सुशिक्षीत समाजमन या पासूनच असतं ... तेंव्हा ही पाक-क्रुती एकदा का तयार झाली,की सहसा हज्जारो वर्ष खराब होत नाही,अगदी बिनधोक टिकते... ०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
  • Log in or register to post comments

लै म्हणजे लैच

श्रीरंग_जोशी
Mon, 07/06/2015 - 07:16 नवीन
लै म्हणजे लैच भारी हो बुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मस्त बुवा _/\_

अविनाश पांढरकर
Wed, 07/08/2015 - 16:06 नवीन
भूत बनविण्याची पाकक्रुती एकदम भन्नाट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

इच्या मारी !

निरन्जनदास
Wed, 07/08/2015 - 16:37 नवीन
इच्या मारी ! (भिस्कूटे ! ) भयावह प्रतिभावंत लोकं हैत हित मनायची. काय जबरी स्टोरी लीव्लीय. एकदम मनापासून आणि अशरीरापासून अबिनंदन !!! शिंच्या अत्रूत्पा, तृप्त केल्यानं रे तू माका !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ह्या ह्या ह्या! :-D

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/08/2015 - 17:39 नवीन
ह्या ह्या ह्या! :-D धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निरन्जनदास

ष्टोरी जब्बर बुवा!!!आपण खुष!

जडभरत
Sun, 07/05/2015 - 20:45 नवीन
ष्टोरी जब्बर बुवा!!!आपण खुष!
  • Log in or register to post comments

पण बुवाजी तुमचा भुतांवर

जडभरत
Sun, 07/05/2015 - 21:03 नवीन
पण बुवाजी तुमचा भुतांवर विश्वास का नाही? मला अशा दुष्ट शक्तींचे काही अनुभव आलेत. अशा दुष्ट शक्ती जगात आहेत! अनुभव हाच शिक्षक. मग कोणी काही म्हणो!!!
  • Log in or register to post comments

लिवा की तुम्च्या आण्भवांवर

टवाळ कार्टा
Sun, 07/05/2015 - 22:03 नवीन
लिवा की तुम्च्या आण्भवांवर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत

@ अनुभव हाच शिक्षक. मग कोणी

अत्रुप्त आत्मा
Sun, 07/05/2015 - 22:24 नवीन
@ अनुभव हाच शिक्षक. मग कोणी काही म्हणो!!!>> रैट्ट! माझ्यासाठिहि. कळत नव्हत या विक्षयातलं तेंव्हा. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत

सटवाई

सिरुसेरि
Wed, 07/08/2015 - 14:11 नवीन
वरील सर्व अनुभव वाचुन श्री. व्यंकटेश माडगुळकर यांच्या 'करुणाष्टक' या आत्मकथनपर पुस्तकातील एक प्रसंग आठवला . - लेखक लहान असताना त्यांच्या वडीलांची औंध प्रांतातील एका खेडेगावी बदली झाली . या गावात महिलांना भल्या पहाटे उठुन एका दुरवरील विहीरिपर्यंत जाउन पाणी आणावे लागत असे . माडगुळकर यांच्या आईसुद्धा त्याप्रमाणे पहाटे उठुन विहीरीतुन पाणी आणत असत . एकदा त्यांना झोपेत कोंबडा आरवल्याचा आवाज ऐकू आला . नेहमीप्रमाणे पहाट झाली असे समजुन त्या उठ्ल्या व घागर घेउन पाणी आणायला घराबाहेर आल्या . तर बाहेर अजुन पुर्ण अंधारच होता . त्यांना बाहेर अंगणात एक हिरवी साडी नेसलेली , कपाळाला मळवट भरलेली स्त्री उभी असलेली दिसली . ती स्त्री त्यांना जरबेने म्हणाली 'एवढ्या लवकर का उठलीस ? जाउन झोप' . त्या आवाजातील जरबेने भारुन माडगुळकर यांच्या आई परत घरात आल्या व झोपी गेल्या . दुसरया दिवशी सकाळी जेव्हा त्यांना हा रात्री घडलेला हा प्रसंग आठवला , तेव्हा त्यांना दरदरुन घामच फुटला व ताप आला .
  • Log in or register to post comments

लई म्हंजी लैच विंटरेष्टिंग

तुडतुडी
Wed, 07/08/2015 - 16:34 नवीन
लई म्हंजी लैच विंटरेष्टिंग धागा . पण एवढुसेच प्रतिसाद होय . राशीरंजन चा भाग कालच ऐकला त्यात शरद उपाध्ये यांनी छातीठोकपणे सांगीतले आहे की "ब्लॅक मॅजिक" असते. लिंबू मारणे, जारण-मारण या सर्वाचे अस्तित्व आहे.>>> शरद उपाध्येंनी हे सगळे प्रकार नुसते बघितलेच नाही तर त्यातले काही शिकून सुधा घेतलेत .
  • Log in or register to post comments

दावूद

कपिलमुनी
Wed, 07/08/2015 - 16:44 नवीन
शरद उपाध्येंनी त्या दावूदवर एक मंत्र मारून त्याला संपवायला हवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

लई म्हंजी लैच विंटरेष्टिंग

तुडतुडी
Wed, 07/08/2015 - 17:17 नवीन
लई म्हंजी लैच विंटरेष्टिंग धागा . पण एवढुसेच प्रतिसाद होय . राशीरंजन चा भाग कालच ऐकला त्यात शरद उपाध्ये यांनी छातीठोकपणे सांगीतले आहे की "ब्लॅक मॅजिक" असते. लिंबू मारणे, जारण-मारण या सर्वाचे अस्तित्व आहे.>>> शरद उपाध्येंनी हे सगळे प्रकार नुसते बघितलेच नाही तर त्यातले काही शिकून सुधा घेतलेत .
  • Log in or register to post comments

भूत

लक्ष्या
Wed, 07/08/2015 - 19:48 नवीन
तूम्ही NatGeo/Discovery वरची मालीका पाहीली आहे का. America's Most Hunted Paranomal Activity खरच मस्त असते. रात्री बघायला. ;)
  • Log in or register to post comments

नाय पहिलि. पण आता नक्की

तुडतुडी
गुरुवार, 07/09/2015 - 12:44 नवीन
नाय पहिलि. पण आता नक्की पाहणार . सांगीतल्या बद्दल ठांकू
  • Log in or register to post comments

मुंबई ते महाबळेश्वरच्या

शि बि आय
गुरुवार, 07/09/2015 - 13:44 नवीन
मुंबई ते महाबळेश्वरच्या रस्त्यावर माझ्या ओफिस मधील काही सहकारी प्रवास करताना घडलेली हि घटना. लवकर मुंबईला पोचायच्या नादात रात्रीचा प्रवास करण्याचे ठरवून मंडळीनी प्रवास सुरु केला. ड्रायव्हर पट्टीचा चालवणारा असल्यामुळे चिंता नव्हती तरी खबरदारीचा उपाय म्हणून सर्वाधिक बडबड करण्याऱ्या नम्रताला त्याच्या शेजारी बसवून सगळे पेंगायला लागले. नम्रताची अखंड बडबड सुरूच होती. अचानक समोरून पांढऱ्या साडीतील बाई गाडीसमोर येउन लिफ्ट मागू लागली. ड्रायव्हर कसलेला असल्यामुळे त्याला ह्या प्रकारची कल्पना आली पण तिला बघून नम्रताने नेमकी काच खाली केली आणि समोर दिसणारी बाई बाजूने मात्र अदृश्य झाली. तोपर्यंत वेग वाढवला असल्यामुळे काही झाले नाही पण त्यानंतर नम्रताला मात्र चांगलाच ताप भरला, जवळ जवळ महिनाभर "ती आली.... ती आली" करत झोपेत देखील ती ओरड होती. अजून एक सांगण्यासारखा किस्सा म्हणजे, २ वर्षापूर्वी हैद्राबादला जाण्याचा योग आला. "स्नो वर्ल्ड" पाहिल्यानंतर दुसर्या मजल्यावर असणारा हॉरर शो देखील बघायला मिळाला. आत शिरल्यावर खरच एखाद्या अति भव्य वाड्यात शिरल्याचा फील येत होता. जुनाट वास्तुत येणारा कुबट वास सगळीकडे भरून राहिला होता. जोडीला भीतीदायक संगीत आणि विचित्र आवाज. अपुर्या प्रकाशामुळे आपण कुठे चाललो आहोत काहीही कळत नव्हते. काही ठिकाणी तर एवढा अंधार होता कि सरळ वाट हि सापडेनाशी होत होती. पायाखाली हलणाऱ्या लाद्या, डोक्यावर खुपश्या झाडांच्या फांद्या होत्या. मधूनच एखादा रबरी पण हुबेहूब खरा वाटणारा साप अंगावर येई तर कधी पुढचे पाउल टाकल्यावर ती फारशी फुटभर खाली पाण्यात जाई. आपण खाली बघून चालावे तर अंधारात कुठूनतरी कानावर हलकीच फुंकर येई किंवा डोक्यावरून आवाज करत खोटे घुबड नाचे मधेच अर्धवट कापलेला आणि ओले रक्त (रंग) अंगाला लावणारा हात गळ्याभोवती येई . एवढे असूनही भूलभुलैया पण होताच. त्यात मनात नसतानाही लपाछुपी चा खेळ खेळावा लागला. ग्रुपमधील मेंबर त्यात यथेच्च आरडा-ओरडा करत बागडत होते. थोड्या वेळात भीती कमी झाल्यावर सगळ्या प्रकाराचा थोडा कंटाळा कम वैताग येऊ लागला कारण हे सगळे वाकून अनुभवायचे होते न!! अजून बाहेर कसे पडत नाही असा विचारही यायला लागला. तेवढ्यात एक भयानक भूत जवळ अंगावर आदळले. आधीच वैताग आल्यामुळेआणि त्यातून ते अंगावर खुपच जोरात आदळल्यामुळे त्याच्या पोटात जोरदार गुद्दा लगावला. ते भूत बिचारे तिथेच पोट धरून बसले हो!! तोपर्यंत आम्ही पुढे गेलो होतो. आपण ज्याला बदकले तो माणूस होता हे कळल्यावर अगणित वेळा सॉरी म्हणत त्याच्या पावलावर पाऊल टाकून बाहेर आले. कारण जर तसे केले नसते तर कपाळमोक्ष अटळ होता कारण मध्येच सरकणारी फरशी आणि त्याला समांतर ढकलणारी भिंत असे काहीबाही पण होते. परत एकदा सॉरीचा प्रोग्राम झाला आणि तिथून काढता पाय घेतला.
  • Log in or register to post comments

शरद उपाध्येंनी त्या दावूदवर

तुडतुडी
Mon, 07/13/2015 - 15:16 नवीन
शरद उपाध्येंनी त्या दावूदवर एक मंत्र मारून त्याला संपवायला हवा>>> शरद उपाध्ये ती विद्या वापरात नाहीत . नुसती शिकून घेतलीये कुतूहल म्हणून. भुतं नेहमी पांढरेच कपडे का घालतात ? दुसरा रंग आवडत नाही का त्यांना ?
  • Log in or register to post comments

राशीरंजन चा भाग कालच ऐकला

जडभरत
Mon, 07/13/2015 - 15:59 नवीन
राशीरंजन चा भाग कालच ऐकला त्यात शरद उपाध्ये यांनी छातीठोकपणे सांगीतले आहे की "ब्लॅक मॅजिक" असते. लिंबू मारणे, जारण-मारण या सर्वाचे अस्तित्व आहे.>>> शरद उपाध्येंनी हे सगळे प्रकार नुसते बघितलेच नाही तर त्यातले काही शिकून सुधा घेतलेत .
--- ताई हा विषय फार गहन आणि वादग्रस्त आहे. यावर इथे चर्चा शक्य नाही दिसत. स्वतंत्र धागाच काढायला हवा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा