तर मंडळी आता अॅन्ड्रॉइड वरुन विंडोज ८.१ {अपडेट} वर शिफ्ट झालो आहे. नव्या ओएस आणि नव्या फोनचा अनुभव चांगला आहे. अॅन्ड्रॉइडच्या युजर इंटरफेसला आता अनेकजण कंटाळले आहेत, आणि सर्व जण नव्या नव्या ओएस वापरण्यास उत्सुक आहेत.
हा धागा लुमियाचे अनुभव / अॅप्स / सेटिंग्स /सिक्युरिटी / तांत्रिक माहिती यासाठी पूर्णपणे खुला आहे, इथे मिपावर लुमिया वापरकर्ते आहेतच त्यांनीही त्यांना माहित असलेल्या गोष्टींची भर या धाग्यात जरुर घालावी. :)
अॅप्स :-
१} Transfer my Data :-
नविन फोन घेतला की सगळ्यात पहिले काम असते ते आधीच्या फोन मधले फोन कॉन्टॅक्स नविन मोबाइल मधे मुव्ह करणे. बरेच जण गुगल सिंक करुन ठेवतात,पण काही वेळा काही तांत्रिक कारणांमुळे हे होत नाही. लुमिया मधे ट्रान्सफर माय डेटा हे अॅप आहे, हे अॅप वापरुन ब्लू-टुथ च्या सहाय्याने अॅन्ड्रॉइड मधले सगळे फोन कॉन्टॅक्स इंपोर्ट करता येतात.
२} Authenticator :-
विंडोजवर शिफ्ट होण्यापूर्वी मी आधी जी-मेल साठी असलेले २-स्टेप अॅथंटिकेटर अॅप वापरत होतो, मेल सिक्युरिटी महत्वाची असल्याने मी आधी विंडोजसाठी असे अॅप आहे का ? ते शोधले. ते मिळाले आणि मगच विंडोजवर स्वीच मारण्याचा निर्णय घेतला.
सध्या जसे जसे अॅप्स निवडत जाईन तसे तसे या धाग्यावर ती मी देत जाईन... अॅन्ड्रॉइडवर उपलब्ध असलेली बरीचशी अॅप्स विंडोजवर उपलब्ध आहेत,अगदी व्हॉट्अॅप सकट. अजुन बरीचशी यायची देखील आहेत. तेव्हा तुमच्या लुमिया संदर्भात सर्व प्रतिसादांचे स्वागत आहे.
मायक्रोसॉफ्ट अॅप स्टोअर :- http://www.windowsphone.com/en-us/store/featured-apps
मदनबाण.....
प्रतिक्रिया
4 Mar 2015 - 8:47 pm | कंजूस
नाही समजलं अॅन्डरॉइड ओपन सोर्स (AOSP)जे आतापर्यंत जेलीबिन पर्यँत आहे ते कोणीही वापरेल आणि त्यातला हवा तो कोड वापरेल परंतू तो वापरायचा का नाही ते ठरवायचं काम हैंडसेटमेकरचं.आता गुगलचाच नेक्सस भारतीय विक्रीसाठी आणला तर तो कॉल रेकॉर्डीँग देईल का ?
4 Mar 2015 - 10:56 pm | मदनबाण
अॅन्डरॉइड ओपन सोर्स (AOSP)
ह्म्म... खरयं...AOSP गुगल त्यांच्या पद्धतीने बदल करुन देइल. { त्यांच्या हँडसेटसाठी }
मला वाटतं CyanogenMod हा या पुढे पॉप्युलर होइल असे दिसते...
अॅमेझॉन इंडिया Yureka हा Cyanogen OS बेस्ड फोन सध्या विकतोय...माझ्या हापिसातल्या एकाने हल्लीच घेतलाय... कस्टमायझेशन करता येतय... थीम्स बदलता येतात इं.
या विषयी काही वाचलेले लेख :-
Meet AOSP, the other Android, while you still can
How to Get Open Source Android
Is Android Really Open Source?
Debunking four myths about Android, Google, and open-source
Anyone can mess with it, to Google's detriment.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पांगळेपणाचे डोहाळे
5 Mar 2015 - 2:11 am | आजानुकर्ण
गूगलने अँड्रॉईडला कसे ताब्यात ठेवले आहे याचा विस्तृत लेखाजोखा. अतिशय वाचनीय लेख आहे.
http://arstechnica.com/gadgets/2013/10/googles-iron-grip-on-android-cont...
5 Mar 2015 - 2:03 am | कंजूस
होय याविषयी वाचलंय परंतू बरीचशी पेटंटस नोकियाने आणि माइक्रोने घेतली आहेत त्यामुळे यांची प्रगती होत नाही. कॉल रेकॉर्डीँग हे अॅप असेल तर ते कधीही बंद पडू शकतं आणि डेटा चोरताहेत का हे कसं कळणार?फुकटच्या तयार ओएसमुळे किंमत कमी होणार परंतू गुगल प्रॉडक्टस त्यांना फुकट नाही मिळणार अर्थात सामान्य लोकांना ते कुठे हवेत ?दोन सिम ,टचपैड मेमरी कार्ड बारका कैमरा आणि ब्लुटुथ झाले काम.
5 Mar 2015 - 3:56 am | कंजूस
आजानुकर्ण ,गुगलने AOSP घेतली आणि त्यावर मैपस ,डॉक ,ड्राइव प्लस वगैरे सेवा दिल्या त्यासाठी त्यांनी खर्च केला. इंटरनेट वापरणारे हे वापरतात आणि त्याची त्यांना गरज आहे. एकप्रकारे अॅनड॰वर कबजा ठेवला आहे. भारतातल्या (आणि इतरही)८०टक्के लोकांना या प्रॉडक्टसची गरज लागत नाही. एक प्लंबर म्हणेल फोन आला की कामाला जाईन आणि दणाणा गाणी वाजली की खूप झाले. पत्ता सापडला नाही तर तो
गुगल मैपस थोडीच उघडणार आहे ?इथे CYnogen पुरेसे आहे.
आज शेवटचा दिवस MWC बासलोना इथला प्रदर्शनाचा. एक रिपोर्ट इथे
pocketlint dot com या साइटवर.
क्योसेरा आणि अल्काटेल लक्षवेधक तसेच लुमिआचा कार्ल जाइस १३एमपि कैमरावाला फैब लुमिआ ६४०इक्सेल पंधरा हजारात.
28 Oct 2015 - 11:03 pm | भटकंती अनलिमिटेड
काल आर्डर केला. उद्या पोचेल.
31 Mar 2015 - 11:07 pm | खंडेराव
मिळ्तोय ११२०० मधे फ्लिपकार्ट वर. तेवढ्या किमतीत उत्तम फोन.
1 Apr 2015 - 12:04 pm | मदनबाण
आजचे अॅप :-
Reminders
सध्या हे अॅप वापरतो आहे. साधे आणि सोपे आणि उपयोगाचे देखील. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..
1 Apr 2015 - 9:15 pm | आजानुकर्ण
कोर्टानाला रिमाईंडर सांगता येतात ना. वेगळ्या अॅपची काय गरज आहे?
6 Apr 2015 - 6:27 am | मदनबाण
सध्या मी माझी लोकेशन सेटिंग डिसेबल करुन ठेवली आहे, तसेच कोर्टानाला काम करण्यासाठी नेट कनेक्शन लागते. त्यामुळे हे वेगळे अॅप वापरत आहे. सोपे आणि उपयोगी.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Cinema Choopistha Mava... ;) :- { Race Gurram }
1 Apr 2015 - 1:20 pm | कंजूस
वेब पेज सेव करता येत नाहीत यासाठी ऑपरा ब्राउजर बिटा वापरायचो कालच्या अपडेटमध्ये इथलीही सोय बंद झाली. ऑफलाइन सेविंगसाठी (विंडोज फोन ८.१)काय पर्याय आहे ?
6 Apr 2015 - 4:50 am | कंजूस
Offline browser हा एक browser घेतला trial मध्ये पाच वेबपेजिज offline साठवता आल्या आणि फास्ट आहे.पण अॅप विकत घेतल्यावरच आणखी साठवता येईल.
MapMyindia हेपण छान आहे.
8 Apr 2015 - 9:48 am | कंजूस
GPS TRACKING ची अॅपस घेऊन तपासत आहे (फ्री)
१)A ROUTE TRACKER
2)CYCLE TRACKS GPS
3)GPS SATELLITE
तिन्ही बिना नेटवर्क चालतात.नं१ बरे वाटतंय.बॅटरी किती खाते पाहायचे आहे
OneDrive save चे लफडे नाही हे बरे आहे.
फार accuracy ची अपेक्षा ठेवणे गैर आहे.altitude ५५०मिटर्स ऐवजी ५७०मिटर्स दाखवली तरी चालेल.
PDF files Adobe वगैरेतून ओपन केल्यावर प्रिंटस काढणे (विंडोज ८.१) म्हणजे सातसमुद्र पार करणारे जहाज खाडी ओलांडू शकत नाही असा अनुभव आहे.Microsoft च्या pdf reader app ने प्रिंट काढायचे तर OneDrive चा वळसा आणि चौपट डेटा खर्च करावा लागतो.
8 Apr 2015 - 9:41 am | मदनबाण
कंजूस मामा मी बर्याच वेळी पाहिले आहे की, आपणास जीपीएस सॉफ्टवेअर मधे विशेष रस आहे. आपण हे कशासाठी मुख्यत्वे वापरतात ? म्हणजे नक्की कशासाठी आपल्याला याचा उपयोग होतो ?
या जीपीएस बद्धल मी अजुन जास्त टाळकं चालवल नाहीये...म्हणुन विचारणा कराविशी वाटली...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }
29 Oct 2015 - 4:38 pm | वेल्लाभट
एक जीपीएस डेटा नावाचं अॅप पण छान आहे.
शिवाय मायक्रोसॉफ्ट हेल्थ अँड फिटनेस मधे रनिंग / सायकलिंग चा डेटा साठवता येतो जीपीएस मार्फत ट्रॅकिंग होतं.
8 Apr 2015 - 10:02 am | कंजूस
एकट्यानेच भटकंती करताना (ढाक ,रतनगड,प्रबळगड परिसर)बय्राचवेळा वाट चुकलो आहे.अशाठिकाणी रूट ट्रॅक होऊन फोनमध्येच ओफलाइन राहिला तर परत मूळ जागी येता येते.असले डेडिकेटिड gps tracking instrument (रु दहा हजारचे)पाहिले आहे.हेच काम माझ्या ६३० मध्ये होइल का पाहतो .
8 Apr 2015 - 10:06 am | मदनबाण
ओक्के... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }
8 Apr 2015 - 10:23 pm | कंजूस
अपडेट-
हे gps tracking चे screen shots
१)डोंबिवलीत एक तास फेरी
२)डोंबिवली घर-स्टेशन-रेलवेने-मुंम्बरा-डोंगरावर अर्धे अंतर-परत-रेल्वेने-डोंबिवली-घर.
३)track list परत पाहण्यासाठी-
{A}"Route Tracker" app offline वापरले,बॅटरी १-२ टक्के उतरली दीड तासात.
--------------------------------------------------------
9 Apr 2015 - 7:07 am | मदनबाण
ओक्के... हे वापरुन पहायला पाहिजे... जरा निवांत वेळ मिळताच या जीपीएस प्रकरणाकडे बघीन...
दिलेल्या माहिती बद्धल आपणास धन्यवाद.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ho Jaun Tera Madamiyan... ;) { Tevar }
9 Apr 2015 - 10:13 am | तुषार काळभोर
सध्या ५२० वापरतोय.
३ वर्षे अॅंड्रॉइड वापरल्यावर विन्डोज फोन वापरायची इच्छा अन् उत्सुकता होती.
याच्याआधी नोकियाचा एन९०० वापरलाय. त्यात sygic चं जीपीएस अॅप टाकलं होतं, एकदम झक्कास अन् अचूक होतं. विशेष म्हणजे महाराष्ट्राचा संपुर्ण नकाशा एकदा डाऊन्लोड केल्यावर, नंतर सिम नेटवर्क/डाटा कनेक्शन काहीही नसताना केवळ जीपीएस वापरून नेविगेशन शक्य होतं.
अँड्रॉईड वर sygic चं अॅप मोफत आहे. देशांचे नकाशे विकत घ्यावे लागतात. भारतातून अर्थातच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी भारताचा नकाशा मोफत उप्लब्ध करून दिला. पण तो ८५० एमबी चा आहे. त्यामुळे ते करायला नाही जमलं. आणि अँड्रॉईडवर नकाशा डाऊनलोड करून ठेवण्यासाठी मला दुसरे काही सापडले नाही. (नकाशे बफर करून साठवून ठेवायची सोय आहे, पण ते वेळ व डाटा खाऊ काम आहे.)
५२० वर नोकिया मॅप्स मध्ये आख्खा महाराष्ट्र २५० एमबीमध्ये उतरून घेतलाय. sygicपेक्षा कमी फीचर्स आहेत, पण अचूक आहे आणि नकाशे बर्यापैकी अपडेटेड आहेत.
(मला बाहेर फिरायला नाही जावं लागत, पण याच्या आधीची नोकरी मोटरसायकलवरून कात्रज ते निगडी आणि बाणेर ते वाघोली वेगवेगळ्या ठिकाणी मोटारसायकलवरून फिरायची होती. तेव्हा एन ९०० ची प्रचंड मदत व्हायचि. आता सवय लागलीये, कुठे नवीन ठि़काणी जाताना नॅव्हिगेशन वापरायची.)
9 Apr 2015 - 8:45 am | कंजूस
"viber"हेapp घेतले.दोनतिन नातेवाइक परदेशात हेच वापरतात त्यांच्याशी बोलण्यासाठी.(non video call)माझ्या 2Gवरही होतात,दहा मिनिटांस पाच एमबि डेटा जातो.no problem कारण reliance 2G recharge six GB data 90 days validityवापरतोय.
11 Apr 2015 - 12:00 pm | कंजूस
काल आले windows 10 सर्वांसाठी.
फोनची यादी आणि। माहितीथोडा खटाटोप करून मिळणार.एक छोटा ब्राउजर आणि windows 8.1,windows phone 8.1अशा दोन ओएस जाणार , बाकी जुजबी मेकप आहे/असावा.
ओफलाइन वेबपेज सेव अॅ्ाप्शन टाकला तर काही कामाचे आहे.दोन चार दिवसात कळेल.
13 Apr 2015 - 6:50 am | मदनबाण
ही संपूर्ण फक्शंनल ओएस दिसत नाही, आणि बग्स असण्याची बरीच शक्यता दिसते... त्यामुळे सध्या उपग्रेड करणे योग्य आहे का ? या विचारात आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बघुन मला झाला पाव्हणा येडा... ;) { Bugadi Maazi Sandali Ga }
12 Apr 2015 - 8:55 pm | कंजूस
PDF फाइलसाठी adobe हे app आहे परंतू यातून Bluetooth ने प्रिंटरला फाइल पाठवता येत नाही. दुसरे एक onereader घेतले त्याला हा पर्याय आहे.
13 Apr 2015 - 4:46 pm | मदनबाण
आजचा टिपी गेम :-
Candy Bomb
फुल-टु- टाईपपास आहे... माझ्या २०० लेव्हल्स खेळुन झाल्या... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बघुन मला झाला पाव्हणा येडा... ;) { Bugadi Maazi Sandali Ga }
13 Apr 2015 - 6:53 pm | जेपी
हे lumia मला धार्जीण नाय भौतेक.
6 महिण्यात दुसरा फोन गेला..
:-(
आता दुसरा विंडोज फोन शोधतोय.
बजेट 6000,
सुचवा
14 Apr 2015 - 10:08 am | कंजूस
लुमिआतले FM RADIO डब्बा वाटताहेत.
वेबपेज ओफलाइन सेव करणे आणि HTML 5 यांचे वाकडे आहे का??-opera mini,UC BROWSER यांनीही सोय काढली.
16 Apr 2015 - 9:17 am | कंजूस
1)२जी कनेक्शनवर फास्ट ब्राउजर = BASIC BROWSER
फारच बेसिक परंतू फास्ट आहे
काही नवीन अॅप्स
2)वॉइस रेकॉर्डिंगसाठी
सोपा इंटरफेस, एमपी ३ फाइल फॉर्मेट, एसडी कार्ड आणि म्यझिक लाइब्ररी सेविंग.
3) गिटार
4)पिआनो (तीन सप्तके ,चांगला नाद)
16 Apr 2015 - 9:56 am | मदनबाण
आजचा एक हटके गेम...
Space Wars
बर्याच काळा नंतर एकदम वेगळ्या पद्धतीचा टाईम पास गेम मिळाला... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Airtel Zero plan prima facie violates the principle of net neutrality, says Trai
18 Apr 2015 - 12:12 pm | कंजूस
हा एक ब्राउजर पाहा
हा SURF CUBE 3D ब्राउजर बरा वाटतोय
19 Apr 2015 - 5:41 pm | कंजूस
The sound recorder हे app बय्राच गोष्टी करते.
28 May 2015 - 11:01 am | मदनबाण
२ टिपी गेम देत आहे :-
CastleMine Deluxe :- याच्या काही लेव्हल्स खेळलो आहे, ठीक ठाक..
Crossy Road :- एकदम अॅडिक्टीव्ह गेम आहेत, खेळुन पहाच. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtado
28 May 2015 - 12:08 pm | रवीराज
हे अॅप पाहिजे होते स्टोरमधे
28 May 2015 - 12:32 pm | मदनबाण
@रवीराज
विंडोज ८ मधे कॉल रेकॉर्ड होत नाही. :(
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtado
28 May 2015 - 2:08 pm | रवीराज
हि एक उणिव आहेच.
28 May 2015 - 12:12 pm | कंजूस
व्यायामासाठी हे Perfect Workout अॅप पाहा फक्त २ MB .
28 May 2015 - 2:27 pm | रवीराज
२ महिने होत आलेत माझा ७२० रिपेअरिंगला देउन, Part not available च्या नावावर अजुन मिळाला नाही. Microsoft ला तक्रार केली, त्यांना विचारले " हे Microsoft आहे कि Micromax ?" उत्तर आले "७२० चे पार्ट उपलब्ध नाही, फिनलँड वरुन येत आहेत थोडा वेळ लागेल."
बोला आता...
28 May 2015 - 2:39 pm | मदनबाण
फिनलँड वरुन येत आहेत थोडा वेळ लागेल."
आयला ! पण ते बी काय करनार राव... नोक्याचा चेन्नई मधला प्लांट नव्हेंबर २०१४ मधे बंद झाला ना ! मग फिनलंड शिवाय दुसरा पर्याय राहिला नसावा ! पण हे बेक्कार आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtado
13 Jun 2015 - 10:26 am | रवीराज
मायक्रोसाॅफ्टने कालच नवीन मोबाइल दिला - ७२० च्या बदल्यात ७३०.
काय म्हणता....
3 Jun 2015 - 4:32 pm | मदनबाण
Tubecast :- तुमच्या "स्मार्ट टिव्ही" वर तुमचे आवडते व्हिडीयो पाहण्यासाठी.
Lumia Play to :- तुमच्या "स्मार्ट टिव्ही" वर तुमच्या मोबल्यातले फोटो आणि व्हिडीयो / गाणे स्ट्रीम करण्यासाठी हे उपयुक्त आहे.
वरील दोन्ही अॅप वापरतो आहे,आणि उपयोगी वाटले.
Microsoft Mahjong :- हा खेळ मला फार आवडला, सगळे स्कील लेव्हल खेळुन अनलॉक केले आहेत. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खुदा भी जब तुम्हे.... :- Ek Paheli Leela
3 Jun 2015 - 4:33 pm | मदनबाण
Tubecast :- तुमच्या "स्मार्ट टिव्ही" वर तुमचे आवडते व्हिडीयो पाहण्यासाठी.
हे तुमच्या "स्मार्ट टिव्ही" वर तुमचे आवडते यू-ट्युब व्हिडीयो पाहण्यासाठी असे हवे आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खुदा भी जब तुम्हे.... :- Ek Paheli Leela
16 Jun 2015 - 1:27 pm | मदनबाण
@रवीराज
मायक्रोसाॅफ्टने कालच नवीन मोबाइल दिला - ७२० च्या बदल्यात ७३०.
काय म्हणता....
वाह्ह... क्या बात है. :)
आता जरासे अॅप बद्धल:- Tubecast ने माझी निराशा केली, याचे फ्री आणि प्रो असे दोन वर्जन्स आहेत. मी फ्री वर्जन वापरत होतो, पण नंतर मला हे अॅप माझ्या स्मार्ट टिव्हीवर वापरता येइनासे झाले, माझे फ्री कास्ट करण्याचे लिमीट संपले असा संदेश अॅपवर दिसु लागला ! :( मी बरीच अॅप ट्राय मारली, अगदी अँड्रॉइडवर सुद्धा पण Tubecast सारखे परर्फॉर्म करणारे अॅप सापडले नाही. मग जालावर याची क्रॅक्ड XAP फाईल मिळते का याचा शोध घेतला,पण क्रॅक्ड फाईल फोन काही डिप्लॉय करेना मग जालावर अजुन शोध घेतला असता मायक्रोसॉफ्ट फोन अनलॉक करण्यासाठी Windows Phone Mini SDK चा वापर करता येतो असे कळले मग ते डाउनलोड मारले,इनस्टॉल केले पण च्यामारी हे एसडीके काही माझा कनेक्टेड फोन सापडला आहे म्हणुन सांगेना ! मग वैतागुन क्रॅक्ड Tubecast XAP डिप्लॉय करण्याचा नाद सोडला. :(
कोणाला यूट्युब कास्ट करण्याचे उत्तम अॅप माहित आहे का ? Tubecast सारखे अॅप मला हवे आहे.
या एसडीके भानगड समजण्यासाठी अधिक इकडे :- How to: Install Cracked/Patched XAP on Windows Phone
जाता जाता :- मायक्रोसॉफ्ट स्टोअर अॅपवाल्यांनी याची { Tubecast } फ्री व्हर्जन ऐवजी ट्रायल व्हर्जन अशी नोंद दाखवायला हवी !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)
27 Jun 2015 - 7:43 pm | मदनबाण
एल ई डी प्रकारातला टी व्ही या धाग्यात बरेच एलजी धारक दिसल्याने एलजीचा टिव्ही अॅप देत आहे :-
Remote for LG
स्मार्ट टिव्ही रिलेटेड अॅप्स तुम्हाला माहित असतील तर जरुर शेअर करा. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दारु Peeke डांन्स... ;) :- Kuch Kuch Locha Hai
27 Jun 2015 - 7:45 pm | मदनबाण
मायक्रोसॉफ्ट स्टोअर अॅपवाल्यांनी याची { Tubecast } फ्री व्हर्जन ऐवजी ट्रायल व्हर्जन अशी नोंद दाखवायला हवी !
यात एक सुधारणा :- २० वेळा कास्ट केल्यानंतर तुम्हाला या अॅपने कास्ट करता येत नाही, हे या अॅपचे लिमीट आहे. २४ तासांनी बहुतेक हे लिमीट रिसेट होते आणि तुम्हाला परत २० कास्ट करण्याची मुभा मिळते.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दारु Peeke डांन्स... ;) :- Kuch Kuch Locha Hai
8 Jul 2015 - 6:39 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
बाणकाका एस.डी.के. फक्त डेव्हलपर किट फोनना चालतात असं ऐकुन आहे.
8 Jul 2015 - 7:09 am | मदनबाण
एस.डी.के. फक्त डेव्हलपर किट फोनना चालतात असं ऐकुन आहे.
अहं, अस वाटत नाही, तुमचे डेव्हलपर अकाउंट हवे बास्स्स...
संदर्भ :- How to register your phone for development for Windows Phone 8
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zara Zara... :- R H T D M
13 Jun 2015 - 2:09 pm | कंजूस
नवीन core music player(2MB) trial आले ले घेऊन पाहिले -.wav files playहोतात.
Stopmusic app ची टाइल बनवता येते आणि कोणतेही music app टुल भार मधून काढते,रेडियोपण बंद होतो.
27 Jun 2015 - 9:14 pm | कंजूस
"Sticky notes "app वापरून लिहिलेले PDF वगैरे ऐकता येते .
7 Jul 2015 - 2:19 pm | ऋष्या
माझा अॅन्ड्रॉइड फोन हरवल्यामुळे नवीन फोन घ्यायचा आहे. नवीन अनुभव हवा म्हणून आणि इथले पॉजिटीव प्रतिसाद वाचून विंडोज फोन घ्यायचं ठरवलं आहे. बजेट रु १००००. नेटवर थोडं चाळवाचाळव केल्यावर दोन मॉडेल्स shortlist केलेत - ल्युमिया ७३० आणि ल्युमिया ६४०.
ल्युमिया ७३० - चांगला कॅमेरा. छोटी स्क्रीन. कमी वजन. OLED स्क्रीन.
ल्युमिया ६४० - ७३० पेक्षा स्वस्त. बॅटरी बॅकअप चांगला. मोठी (५ इंच) स्क्रीन. IPS LCD स्क्रीन.
तसा प्रॅक्टीकल फार फरक नाही दोन्ही फोन्समध्ये.
माझा वापर नेट, WhatsApp, Facebook इतपत मर्यादीत आहे. इतर self-management चे अॅप्स वापरेन फारतर. इथे कुणाला ल्युमिया ६४० चा अनुभव आहे का? ह्या दोन फोन्सपैकी कुठला घ्यावा ?
7 Jul 2015 - 4:04 pm | मदनबाण
दोन्ही फोन चांगले आहेत, तुम्ही जर सेल्फी प्रेमी असाल तर ७३० ला प्राधान्य द्या.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- फार्स ते शोकांतिका